Home Blog Page 3050

आरोग्य सुविधेसाठी फीलीप्स इनोव्हेशनची मदत घेऊ -मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस

0

फीलीप्‍सच्‍या‍ हेल्‍थ केअर इन्‍नोव्‍हेशन सेंटरचे उद्घाटन

पुणे- राज्‍यातील सर्व जनतेला आरोग्‍य सुविधा परवडणा-या दरात उपलब्‍ध व्‍हाव्‍यात यासाठी फीलीप्‍स हेल्‍थकेअर इन्‍नोव्‍हेशन सेंटरची मदत घेऊ,असे प्रतिपादन मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.चाकण एमआयडीसी येथे फीलीप्‍स इंडिया कंपनीच्‍या उत्‍पादन तसेच संशोधन व विकास प्रकल्‍पाचे (हेल्‍थ केअर इन्‍नोव्‍हेशन सेंटरचे)उद्घाटन करतांना ते बोलत होते.

यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, आमदार महेश लांडगे, एमआयडीसीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी. अन्‍बल्‍गन, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, सहायक जिल्‍हाधिकारी आयुष प्रसाद, फ्रॅन्‍स वॅन होटेन, अभिजीत भट्टाचार्य, सोफीया बिचू, डॅनियल मेझॉन आदी उपस्थित होते.

मुख्‍यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्‍हणाले, राज्‍यातील तसेच देशातील जनतेला आरोग्‍य सुविधा उपलब्‍ध व्‍हाव्‍यात यासाठी प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जनआरोग्‍य योजना सुरु केली. राज्‍यात महात्‍मा फुले जन आरोग्‍य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्‍य योजनेच्‍या माध्‍यमातून अनेक कुटुंबांना आरोग्‍य सुविधेचा लाभ होत आहे. देशातील ९० टक्‍कयांहून अधिक कुटुंबे या योजनेशी जोडली गेली आहेत. आतापर्यंत 1.5 दशलक्ष लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

अन्‍न व आरोग्‍य सेवा या दोन क्षेत्रांमध्‍ये उद्योगवाढीसाठी मोठी संधी असल्‍याचे सांगून मुख्‍यमंत्री श्री. फडणवीस यांनी ग्रामीण भागात आरोग्‍य सेवेचे उद्योग सुरु करणा-या उद्योगांना सर्वतोपरी मदत करु, असे सांगितले. गेल्‍या 5 वर्षात कॅथलॅबची संख्‍या 250 वरुन 650 वर गेली असल्‍याचे लक्षात आणून देऊन मुख्‍यमंत्री श्री. फडणवीस म्‍हणाले, कॅथलॅब, सिटीस्‍कॅन, अल्‍ट्रासाऊंड या साधनांच्‍या संख्‍येत लक्षणीय वाढ झाली आहे. आरोग्यविषयक जागृती होत असल्‍यामुळे या साधनांच्‍या वापरामध्‍येही वाढ होत आहे. मध्‍यमवर्गीय तसेच उच्‍च मध्‍यमवर्गीय जनतेत आरोग्‍यसेवांवर खर्च करण्‍याचे प्रमाणही वाढत आहे. आरोग्‍य क्षेत्र हे नफा कमावण्‍याचे क्षेत्र नाही, तथापि सर्वसामान्‍य नागरिकांना आरोग्‍यसुविधा परवडणा-या दरात मिळण्‍यासाठी फीलीप्‍सच्‍या उत्‍पादनांची मदत होईल, अशी आशा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

फीलीप्‍स इंडियाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी फ्रॅन्‍स वॅन होटेन यांनी प्रास्‍ताविक केले. ते म्‍हणाले, आरोग्‍य आणि संपत्‍ती या दोन महत्‍त्वाच्‍या गोष्‍टी असून सर्वांसाठी आरोग्‍य ही संकल्‍पना प्रत्‍यक्ष अंमलात आणण्‍याचे आमचे प्रयत्‍न आहे. या प्रयत्‍नांना सरकारची मदत होईल, अशी आशा त्‍यांनी व्‍यक्‍त केली तसेच हेल्‍थकेअर इन्‍नोव्‍हेशन सेंटरची माहिती दिली. कार्यक्रमास फीलीप्‍सचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

पुन्हा अवतरलं पुण्यात हेल्मेटचं भुत…. नव्या वर्षात डोक्यावर बसणार म्हणे …

0

पुणे- पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात आरोपी पकडण्यासाठी ‘प्लॅनचेट’ चे उद्योग झालेत .पण पुणेकर ते उद्योग करणाऱ्यांना पुरून उरले … याच पुण्यात सातत्याने जो नवा कमिशनर येईल ..त्याच्या हळू हळू अंगात … हेल्मेट चं भूत संचारतं, आजपर्यंत प्रत्येक कमिशनराच्या डोक्यावर बसलेलं हे भूत उतरवायचं काम पुणेकरांनी विविध मार्गे केलं ..आणि त्यात यश हि मिळवीलं , हे अगदी खरं असलं तरी ,या पोलीस आयुक्तालयात दडून बसलेलं हे भूत अजूनही तिथेच वास्तव्य जणू करून असावं,याची प्रचीती वारंवार येते आहे . होय तसं दिसतंय खरं… कारण आता पुण्यात अलीकडे नव्यानेच आलेल्या व्यंकटेशम नावाच्या सुप्रसिद्ध कमिशनरांच्या डोक्यावरही हे कुप्रसिद्ध भूत बसल्याने …1 जानेवारी पासून पुण्यात हेल्मेट सक्ती राबविली जाणार आहे असा म्हणे फतवा निघाला आहे … भाजप सरकारच्या मागे जणू सारी नौकरशाही हात धुऊनच  मागे लागली असावी अशा निर्णयातील हा एक निर्णय म्हटल्यास वावगं वाटू नये . धरणात पाणी असताना ,पाणी कपातीचा बडगा उगारणारं पाटबंधारे खाते, १०० नगरसेवकांचे बळ लाभूनही भाजपच्याच विकासकामांची जंत्री विनाकारण अडकवून ठेवणारं, पे आणि पार्क चं भूत कायम उराशी बाळगणारं पालिका प्रशासन ..या सर्वांनी आगामी निवडणुकीच्या तोंडावर जणू जनतेला छळून भाजपला पराभूत करण्याचा विडाच उचललेला दिसतोय ..ज्या कारणांनी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचं सरकार पराभूत झालं तीच कारणं या ही सरकारचा सत्यानाश करणार काय ? असा प्रश्न आता निर्माण होऊ पाहतो आहे

पोलीस आयुक्तांनी 1 जानेवारीपासून  हेल्मेटसक्तीचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्तांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून  त्याची  अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील वाढत्या अपघातांमुळे आणि न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणीचे कारण अर्थात त्यासाठी देण्यात येत आहे .मोटारींना काळ्या काचा लावल्या तर ; म्हणे आत बसलेल्या ‘चोरांचे’चेहरे दिसत नाहीत आणि मोटारसायकलवरून मंगळसूत्रे खेचणाऱ्या चोरांच्या मात्र ओळखी हेल्मेटवरूनच लक्षात येतील असे कदाचित पुन्हा पुन्हा का पोलिसांना वाटते हे न समजणारे कोडे आहे .शिवाय ना इतिहास पाहतात ,ना भूगोल … अशावेळी त्यांना न्यायालयाच्या निर्णयाची मोठी चिंता असते . शहरातील होर्डींग्ज कोसळून चार निष्पाप जीव हकनाक गेले … त्या होर्डींग्ज बाबत पोलिसांनीच काय कोणीही अजूनही काहीही कारवाई केली नाही. पण कधी काळी कोणी करोडोच्या मोटारीने फिरणाऱ्या एका शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील महान स्त्रीने न्यायालयाकडून हा निर्णय मिळविला .आणि वारंवार जनतेतून विरोध होऊनदेखील वर्षानुवर्षे सातत्याने तो राबविण्याचा ‘विक्रम’ हट्ट पोलीस सोडेनात असे चिन्ह आहे .

 याआधीही अनेकदा पुण्यात हेल्मेटसक्ती करण्यात आली होती. मात्र नागरिकांच्या विरोधामुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. मात्र पोलीस आयुक्तांनी नव्याने हा निर्णय घेतला आहे. यामुळे पुण्यात पुन्हा एकदा नागरिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.

याआधीही पुण्यात हेल्मेटसक्ती कऱण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र प्रशासनाला नागरिकांच्या संतापाला सामोरं जावं लागलं होतं. ठिकठिकाणी सर्वसामान्य नागरिकांनी रस्त्यांवर उतरुन निर्णयाचा निषेध केला होता. विशेष म्हणजे काही राजकीय पक्षांनीही त्यांना पाठिंबा दिला होता. हेल्मेटमुळे मानदुखी जडते, आजूबाजूचे दिसण्यात अचडण येते असा आक्षेप घेत आधी सार्वजनिक वाहतूक सुधारा, वाहतूक नियोजन तसंच रस्त्यांची स्थिती सुधारा अशा मागण्या करण्यात आल्या होत्या.

सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत अर्णव पापरकर, इकराजू कनूमुरी यांना दुहेरी मुकुट

0

पाचगणी- रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होतअसलेल्या  एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 12 वर्षाखालील सुपर सिरीज्  टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात पुण्याच्या अर्णव पापरकर तर मुलींच्या गटात इकराजू कनूमुरी यांनी दुहेरीसह एकेरीतही विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुटाचा मान मिळवला.

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत विजेतेपदासाठीच्या लढतीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या दुस-या मानांकीत अर्णव पापरकरने आपल्या लैकीकाला साजेशी खेळी करत  तेलंगणाच्या पाचव्या मानांकीत चैत्रा गलीवेटी रेड्डी याच 6-4,3-6,6-3 असा तीन सेटमध्ये पराभव केला. अर्णवने पहिला सेट 6-4 असा जिंकल्यानंतर चैत्राने दुसरा सेट 3-6 असा जिंकत सामन्यात बरोबरी साधली मात्र अर्णवने आपले कैशल्य पणाला लावत तिसरा सेट 6-3 असा जिंकत विजेतेपद पटकावले.

मुलींच्या गटात  तेलंगणाच्या अव्वल मानांकीत इकराजू कनूमुरीने महाराष्ट्राच्या आठव्या मानांकीत प्राप्ती पाटीलचा 6-0, 6-1 असा सहज पराभव करत विजेतेपद पटकावले.

स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सिने अभिनेते जावेद सनेसरा व एआयटीए सुपरवायझर वैशाली शेकटकर यांच्याहस्ते करण्यात आले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी: 12वर्षाखालील मुले:  

अर्णव पापरकर(महा)(2)वि.वि. चैत्रा गलीवेटी रेड्डी(तेलंगणा)(5)6-4,3-6,6-3

मुली: अंतिम फेरी:   

इकराजू कनूमुरी(तेलंगणा)(1)वि.वि. प्राप्ती पाटील(महा)(8)6-0, 6-1

दीपिका -रणवीर च्या लग्नाचे फोटो …

0

बॉलिवूडचं लोकप्रिय जोडपं दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंग हे दोघंही विवाहबंधनात अडकले आहे. इटलीट पार पडलेल्या या शाही विवाहाची चर्चा गेल्या आठवड्याभरापासून सोशल मीडियावर होती. या जोडप्याचे फोटो पाहण्यास बॉलिवूडसह त्यांचे चाहतेही उत्सुक होते. अखेर हे फोटो समोर आले आहेत.दीपिका आणि रणवीर ने प्रत्येकी 1 असे हे हे फोटो सोशल मिडिया वरून शेअर केले आहेत .

हा विवाह सोहळा १४ व १५ नोव्हेंबरला इटलीतील लेक कोमो इथल्या नयनरम्य व्हिलामध्ये विवाह सोहळा पार पडला. गुरूवारी म्हणजेच १५ नोव्हेंबरला दीपिका व रणवीरने सिंधी रितीरिवाजात पुन्हा एकदा विवाह केला.

1 डिसेंबरला मराठा समाजाने जल्लोष करावा- मुख्यमंत्री

0

नगर-‘अरे आंदोलन कशाला करता, येत्या 15 दिवसात मराठा समाजाला आरक्षण देऊ. त्यामुळे करायचेच असेल तर 1 डिसेंबरला मराठा समाजाने जल्लोष करावा’, असे स्पष्ट विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले आहे. त्यांच्या या विधानातून मराठा आरक्षणासंदर्भात शुभसंदेश मिळाल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.

आज शनिशिंगणापूर येथे बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाकडून अहवाल सुपूर्द करण्यात आल्यानंतर आपल्या सरकारची भूमिका स्पष्ट केली. ‘अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. राज्य मागासवर्ग समितीने आज अहवालही सादर केला आहे. त्यावर पुढील 15 दिवसात निर्णय होईल’, असे मुख्यमंत्री म्हणाले.

नगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथील शेतकरी-वारकरी महासंमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. ‘मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे. हे आरक्षण देताना इतर समाजाच्या आरक्षणाला मात्र धक्का लागणार नाही’, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली कर्जमाफी योजना आजही थांबवली नाही. राज्य सरकार 4 वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. गेल्या चार वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50 हजार कोटी रुपयांची मदत थेट दिली असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, ‘खऱ्या अर्थाने वारकरी व शेतकऱ्यांनी धर्म आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. महाराष्ट्राचा धर्म आणि संस्कृती वारकरी संप्रदायाने जिवंत ठेवली आहे’, असेही ते म्हणाले.

पुण्यातून आशिष कांटे यांना आरपीआयची उमेदवारी देऊ –रामदास आठवले

विधानसभेत आशिष कांटेंसारख्यांची गरज- अर्जुन खोतकर

पुणे- ‘ज्याच्या जीवनाच्या प्रवासात अनेकांनी टाकले होते काटे…त्याला तुडवत पुढे निघाले आहेत, आशिष कांटे… अशी आपल्यानेहमीच्या शैलीत रचना सादर करीत केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यातील ‘तारका फाऊंडेशन’या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आशिष कांटे यांच्या कार्याचा गौरव केला. आशिष कांटे सारख्या तरुणासाठी आरपीआय तर्फे पुण्यामध्ये एक जागा मागून घेऊ असे रामदास आठवले यांनी सांगितल्यावर, आपण दोघांनी एकत्र हात दिल्यास आशिष कांटे नक्की आगामी विधानसभेत दिसतील अशी जोरकस टिप्पणी शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली आणि या अभिष्टचिंतन मेळाव्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चा जोरदार रंगली. निमित्त होते युवा नेते आशिष कांटे यांच्या वाढदिवसानिमित्ताच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे!

भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, मनसे, आरपीआय
अशा सहाही पक्षांचे नेते या वाढदिवसानिमित्त मंचावर एकत्र आल्याचे अनोखे दृश्य या कार्यक्रमात दिसून येत होते. हजारो कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती व त्यातून गर्दीचे रेकॉर्ड ब्रेक हा देखील चर्चेचा विषय बनला होता. ‘तारका फाऊंडेशन’च्या वतीने आशिष कांटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुण्यातील श्री महालक्ष्मी लॉन्स येथे त्यांच्या अभीष्टचिंतनाचा भव्य मेळावा आणि विशेष पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आठवले बोलत होते. यावेळी राज्याचे वस्त्रोद्योग, पशु संवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार अनिल
शिरोळे, शिपिंग बोर्डचे चेअरमन व माजी खासदार प्रदीप रावत,माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी, माजी आमदार मोहन जोशी पुणे शहर भाजपाचे अध्यक्ष योगेश गोगावले, नगरसेवक महेश लडकत, नगरसेविका श्रद्धा प्रभुणे-पाठक, सिद्धार्थ शिरोळे, सौ.स्वरदा बापट, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर, भाजप संघटनमंत्री रवी अनासपुरे, आरएसएसचे महेश करपे, मनसेचे कामगार सेनेचे मुंबईचे अध्यक्ष मनोज चव्हाण, सह्याद्री क्रीडा मंडळ, मुंबईचे अध्यक्ष व भाजप नेते राहुल वाळुंज, शिवसेना विभाग प्रमुख सुरज लोखंडे व निलेश गिरमे, आरपीआय नेते परशुराम वाडेकर व बाळासाहेब जानराव, राष्ट्रवादीचे माणिकशेठ दुधाणे, आरपीआय महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रियदर्शनी निकाळजे आदी उपस्थित होते.
‘सर्वजीव मंगल प्रतिष्ठान’चे डॉ. कल्याण गंगवाल, इस्त्रोचे सॅटेलाईट पॉवर इलेक्ट्रॉनिक विभागाचे प्रमुख डॉ. नितीन घाटपांडे, महाराष्ट्रात ४० हजाराहून अधिक तरुण तरुणींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणारे ‘अस्पायर नॉलेज व स्कील्स प्रा. लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय गांधी, विल्यम साळवी (व्यसनमुक्ती), कासीम इराणी( गुडलग हॉटेल) आणि इतिहास
संशोधक दत्ताजी नलावडे यांना यंदाच्या ‘तारका फौंडेशन सामाजिक कृतज्ञता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच तानाजी मालुसरे यांच्या वंशज श्रीमती शीतलताई मालुसरे, मतीमंद मुलांसाठी काम करणारी ‘सावली संस्था’, एड्सग्रस्त पालकांच्या लहान मुलांसाठी काम करणारी ‘मानव्य संस्था’, शिरगाव आश्रमशाळा आणि ‘आपलं घर’ चे विजय पळशीकर यांचा विशेष सामाजिक कार्याबद्दल प्रत्येकी ११ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर, आर्यन कीर्ती जाधव, आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर किरण साठे, मंगेश बालन, बाळासाहेब चौधरी यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
आठवले म्हणाले, मला नेहेमीच वारे कळतात. आशिष कांटे हा भविष्यामध्ये फारच मोठा होणार आहे. आशिषकडे भावी आमदार म्हणून बघितले जात आहे. तो कुठल्या पक्षाकडून उभा राहणार आहे हे माहिती नाही. मात्र, त्याची इच्छा असल्यास तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय) मध्ये आला तर त्याला आम्ही उमेदवारी देऊ शकतो. त्याच्यासाठी पुण्यातील आठ जागांपैकी एक जागा आरपीआयला मिळण्यासाठी नक्की प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले.
आशिष हा चांगला कार्यकर्ता असून त्याने पोल्ट्री, डेअरी, अशा प्रकारचे ग्रामीण उद्योग करून जीवनात चांगली आर्थिक प्रगती केली आहे. त्याच्याबरोबरीने ‘तारका फाउंडेशन’च्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. आपला उद्योग सांभाळून लोकांची सेवा करणे, रुग्णांना मदत करणे, विद्यार्थ्यांना मदत करणे असे अनेक उपक्रम ते राबवितात. आशिष कांटे हा हाडाचा कार्यकर्ता आणि उद्योगपती आहे असे गौरोद्गार आठवले यांनी काढले.
अर्जुन खोतकर म्हणाले, गेली तीस वर्षे विधानसभेत मी काम करत आहे. मला तरुणांमध्ये राहायला आवडते. आशिष कांटे याचा स्वभाव , काम करण्याची पद्धत मला खूप आवडते. कार्यकर्त्यांनी त्याचा भावी आमदार म्हणून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. रामदास आठवले यांना हवेचा अंदाज कळतो असे ते म्हणतात. आशिषच्या हवेचा अंदाज आला असेल तर तुम्ही आणि मी त्याला हात दिला तर हा तरुण सार्वभौम सभागृहात पाहायला मिळेल असे आवाहन त्यांनी आठवले यांना केले. आशिषचे संघटन कौशल्य बघितल्यानंतर अशा तरुणांची महाराष्ट्राला गरज आहे असे ते म्हणाले.

अजून १०-१५ वर्षे मोदींचीच हवा राहणार
काँग्रेसचे नसीम खान यांनी काही दिवसांपूर्वी आठवले यांनी काँग्रेसबरोबर यावे असे आवाहन केले होते. त्याला प्रतिक्रिया देताना रामदास आठवले यांनी काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात, मी हवा पाहून कोणाबरोबर जायचा याचा निर्णय घेतो असे वक्तव्य केले होते. त्याचा संदर्भ देत आठवले म्हणाले मी मला हवा कळते असे विधान केले होते, हे खरे आहे. मात्र, अजून १० ते १५ वर्षे मोदींचीच हवा राहणार आहे असेही म्हणलो होतो. मात्र,
माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. नरेंद्र मोदींची हवा सहजासहजी बदलणार नाही. मी जोपर्यंत नरेंद्र मोदींबरोबर आहे तोपर्यंत हवा बदलणार नाही. १०-१५ वर्षे मोदींची हवा झाल्यानंतर हवा कुठे आहे ते बघू असे मी म्हणालो होतो असेही त्यांनी
सांगितले.

“उड़ने दो”च्या ट्रेलर चे उद्या लाँँचींग

0

पुणे-सामाजिक कार्यकर्त्या उषा काकडे यांच्या
ओएसआर व्हेंचर आणि ग्रॅविटस फाऊंडेशन निर्मित आरती एस बागडी दिग्दर्शित “उडने दो “या लघुपटाचा ट्रेलर उद्या १६ नोव्हेंबर रोजी लॉन्च करण्यात येणार असून अॅक्सिस बँकेच्या उपाध्यक्ष  अमृता फडणवीस ,महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे,डिझायनर मनीष मल्होत्रा आणि अभिनेत्री लारा दत्ता, दाक्षिणात्य अभिनेत्री रेव्हथी सह बाल कलाकार यावेळी उपस्थित राहणार आहेत . बाल लैंगिंक अत्याचार वर आधारित हा लघुपट आहे.
ओएसआर व्हेंचरचे अध्यक्ष आणि ग्रॅविटस फाऊंडेशनचे संस्थापक असलेल्या उषा काकडे या २०११ पासून मुख्यत्वे बाल लैंगिक अत्याचार यावर आळा बसवण्या साठी सामाजिक स्तरावर कार्यरत आहेत.त्यांच्या फाउंडेशनच्या पुढाकारां पैकी एक ‘गुड टच बॅड टच’ बाल लैंगिक अत्याचाराचा मोठा मुद्दा हाताळत आहेत  आणि आतापर्यंत ६ लाख विद्यार्थ्यां पर्यन्त संदेश प्रसारित करण्यात यशस्वी झाले आहेत ज्यापैकी २.७० लाख विद्यार्थ्यांना कवर केले आहे.निर्भया आणि कश्मीरच्या बलात्काराच्या प्रकरणांनंतर उषा काकडे यांनी ६००० सरकारी शाळांमध्ये गुड टच बैड टच चा प्रचार केला. आतापर्यंत कोणीही या कारणाविषयी बोलले नाही आणि त्याकडे दुर्लक्ष केले गेले पण , ग्रॅविटस फाऊंडेशन ने सामाजिक भान ठेवून ह्याचा योग्य प्रसार करण्याचे काम सुरु ठेवले आहे .

गिनीज बुक ऑफ वर्ल्‍ड रेकॉर्ड करणाऱ्या प्राजक्‍ता काळे यांचा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते गौरव

0

पुणे– एकाच व्‍यक्‍तीने एकाच ठिकाणी बोन्‍सायची (वामन वृक्ष) 3 हजार 333 झाडे असण्‍याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्‍ड रेकॉर्ड( विश्‍वविक्रम ) प्राजक्‍ता गिरीधारी काळे यांनी केला. वित्‍त आणि नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी  गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र देऊन त्‍यांचा सत्‍कार केला.  गेल्‍या 35 वर्षांच्‍या अथक परिश्रमानंतर विवि‍ध वृक्षांच्‍या सुमारे दीडशे प्रजाती प्राजक्‍ता काळे यांनी विकसित केल्‍या. त्‍या निमित्‍ताने गिनीज वर्ल्‍ड रेकॉर्डच्‍यावतीने आज पहाणी करुन निर्णय जाहीर करण्‍यात आला.

     या कार्यक्रमास वन विभागाचे सचिव विकास खारगे, प्रधान  मुख्‍य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) अनुराग चौधरी, मुख्‍य वन संरक्षक विवेक खांडेकर, प्रतापराव पवार, विठ्ठलशेठ मणियार, गिरीधारी काळे, डॉ. के.एस.  संचेती, उद्योग विभागाचे उपसचिव संजय इंगळे, गिनीज बुक ऑफ वर्ल्‍ड रेकॉर्डचे ऋषीनाथ मेहता, वनसरंक्षक रंगनाथ नाईकडे, उप वनसंरक्षक श्रीलक्ष्‍मी ए. उपस्थित होते.

वन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी काळे दाम्‍पत्‍याचे अभिनंदन करुन सरकारच्‍यावतीने शुभेच्‍छा दिल्‍या. ते म्‍हणाले, प्राजक्‍ता काळे यांनी बोन्‍साय कलेच्‍या माध्‍यतातून पुणे शहराचा नावलौकीक राज्‍य, देश आणि जागतिक पातळीवर वाढविला. यापूर्वी मी काळे ताईंच्‍या बोन्‍साय प्रदर्शनास भेट दिली होती. ते प्रदर्शन पाहून सुंदर, अप्रतिम हे शब्‍द कमी पडतील, असे ते प्रदर्शन होते. बोन्‍साय म्‍हणजेच वामनवृक्ष ही कला मूळ भारतीय आहे, मात्र इतर कलांप्रमाणे तिचे जतन न झाल्‍याची खंत त्‍यांनी व्‍यक्‍त केली. भारत देशात  ‘शून्‍य आयात आणि शंभर टक्‍के निर्यातीत मोठा सहभाग’ हे ध्‍येय साध्‍य करण्‍यासाठी सर्वांच्‍या प्रयत्‍नांची गरजही त्‍यांनी प्रतिपादन केली. पर्यावरणाच्‍या सरंक्षणाचे महत्‍तव विशद करताना श्री. मुनगंटीवार यांनी आपल्‍या स्‍वत:साठी तसेच इतरांसाठी संरक्षण करण्‍याचे आवाहन केले. धन हे या जन्‍मीच्‍या शेवटच्‍या श्‍वासापर्यंत कामी येते, तर वन हे पुढच्‍या जन्‍माच्‍या पहिल्‍या श्‍वासासाठी कामी येते, असे ते म्हणाले. बोन्‍साय कलेल्‍या वाढीसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, असेही त्‍यांनी सांगितले.

वन विभागाचे सचिव विकास खारगे म्‍हणाले, प्राजक्‍ता काळे यांनी समर्पण आणि त्‍यागाच्‍या भावनेतून बोन्‍साय कला जोपासली. मुंबईसारख्‍या महानगरांमध्‍ये बोन्‍साय कलेला मोठी संधी आहे. यातून रोजगारही निर्माण होऊ शकतो. महिलांना प्रशिक्षण दिल्‍यास त्‍यांना यातून रोजगार प्राप्‍ती होऊ शकते.

यावेळी प्रतापराव पवार, विठ्ठलशेठ मणियार, गिरीधारी काळे, डॉ. के.एस.  संचेती, उद्योग विभागाचे उपसचिव संजय इंगळे यांची शुभेच्‍छापर भाषणे झाली.

कृषी विद्यापीठात हॉर्टीकल्चर संशोधन केंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

0

पुणे :- नर्सरी व्यावसायिकांना शोभिवंत रोपांच्या उत्पादनात येणाऱ्या अडचणींसह अन्य समस्या सोडविण्यासाठी, कृषी विद्यापीठात हॉर्टीकल्चर संशोधन सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे प्रतिपादन वित्त व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.

            महाराष्ट्र नर्सरीमेन असोसिएशन व ग्लोबल कन्सल्टिंग यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथील हिंन्दुस्थान अँटीबॉयोटिक्स् च्या मैदानावर हॉर्टीकल्चरवर आधारित ‘हॉर्टीप्रो-2018’ हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वन सचिव विकास खारगे, महाराष्ट्र नर्सरीमेन असोसिएशनचे अध्यक्ष संतोष सितोले, युएनआईडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित पराशर व्यासपिठावर उपस्थित होते.

            याप्रसंगी बोलताना, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे कृषी व वनप्रेम आपण सर्वजण जाणतो आहोत. त्यांच्या प्रेरणेतूनच महाराष्ट्रातल्या जनतेने वन व कृषीप्रेमाची कास धरली आहे.या कार्याचा जागतिक पातळीवर प्रसार देखील महाराष्ट्राच्या भूमीतून होत आहे. अशा प्रकारचे प्रदर्शन भरवून महाराष्ट्र नर्सरीमेन असोसिएशनने नर्सरी उद्योगास एक नवी दिशा दिली आहे. आज भारतात असलेल्या एकूण रोजगारापैकी पन्नास टक्क्यांहून अधिक रोजगार कृषीवर अवलंबून आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे कृषी क्षेत्राचा व पर्यायाने देशाचा विकास होण्यास मदत होते. भारतातील कृषी, नर्सरी व हॉर्टीकल्चर उद्योगाचा विकास करण्यासाठी प्रत्येक कृषी विद्यापीठात नर्सरी व हॉर्टीकल्चर संशोधन केंद्र स्थापन करणे गरजेचे आहे. त्याकरिता कृषि विभागाच्या सहकार्याने प्रयत्न करण्यात येईल. शेतीत किंवा नर्सरीत काम करताना एखादे संशोधन विकसित होऊ शकते. अशा संशोधनाचा फायदा सर्वांना मिळायला हवा, जेणेकरुन या क्षेत्राचा विकास होईल.

            सन 2050 पर्यंत पारंपारिक उर्जास्त्रोतांचा वापर बंद न केल्यास पृथ्वीवरील जीवन धोक्यात येण्याची शक्यता आहे, असे संशोधनातून लक्षात आले आहे. यासाठी नवीन ऊर्जास्त्रोतांचा वापर करणे काळाची गरज आहे. निसर्गाचा समतोल राखण्याचे कार्य वने करत असतात, त्यामुळे वनसंवर्धन व त्यातून आधुनिक विकास साधणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. प्रदर्शनात उभारण्यात आलेल्या विविध संस्थांच्या स्टॉलला वनमंत्र्यांनी भेट दिली व उत्पादनांची माहिती घेतली.

             महाराष्ट्र नर्सरीमेन असोसिएशनचे अध्यक्ष संतोष सितोले यांनी,  हॉर्टीकल्चर क्षेत्राने सर्वात मोठा निर्यातदार, रोजगार पुरवठादार, गरीब आणि किरकोळ शेतकऱ्यांसाठी दारिद्य निर्मूलक आणि लाखो भारतीयांसाठी जीवन परिवर्तक म्हणून स्थापित केले आहे, असे सांगितले. प्रदर्शनादरम्यान दहा चर्चासत्रांचे आयोजन केले असून त्याद्वारे  तंत्रज्ञान, वैज्ञानिक नवकल्पना, व्यवसाय मॉडेल, नेटवर्किंग आणि सहयोग संधींवर प्रदर्शन आणि कल्पना करण्याच्या संधी मिळेल अशी माहिती त्यांनी दिली.

            युएनआईडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित पराशर यांनी, हॉर्टिप्रो-इंडिया बागकाम क्षेत्रातील नामवंत संस्थांबरोबर  नेटवर्किंग, कल्पनांची देवाण-घेवाण आणि व्यावसायिक भागीदारीच्या संधी प्रदान करेल असा विश्वास यावेळी बोलताना व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय क्षेत्रातील प्रसिध्द व्यक्तींनी या कार्यक्रमात त्यांच्या पूर्ण क्षमतेने सहभाग घेतला आहे. त्यामुळे नवीन व होतकरू व्यावसायिकांना आपल्या व्यवसायात येणाऱ्या काळात भागीदार देखील करून घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

            हॉर्टीप्रो-2018 या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व परिषदेत शेती, बागकाम, फ्लोरिकल्चर, एग्रीप्रिनेरशिप आणि हाय-एंड टेक्नॉलॉजीचा वापर करून त्याचा विकास करण्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे शेतकरी व शेतीपूरक व्यावसायिकांना त्याचा फायदा होणार आहे. या प्रदर्शनात पिक कापणी आधी व नंतरच्या अडचणी, बाजारपेठ जोडणी तसेच स्टार्ट अप व्यवसायातील संधी यासारख्या अनेक विषयांवर  कार्यशाळा घेण्यात येणार आहे. संशोधक, तंत्रज्ञ, विद्यार्थी, सल्लागार, इंजिनियर, विस्तार एजंट, उत्पादक, व्यापारीवर्ग, पॉलीसी मेकर्स व अन्य लोकांना प्रदर्शनाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. 40 हजार स्क्वेअर मीटरच्या विस्तीर्ण परिसरात प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात हॉर्टीकल्चरवर आधारित व्यवसायाच्या संधीवर मार्गदर्शन करण्यात येणार असून आंतरराष्ट्रीय तज्ञांच्या विविध विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.

            केंद्र सरकारचे कृषि व प्रक्रिया खाद्य उत्पादन निर्यात प्राधिकरण, नेदरलँडचा दूतावास, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन  हॉर्टीकल्चर, इंडो-इटालियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, ब्रिक्स अलियान्झ, इंडियन सोसायटी ऑफ ॲग्री बिझनेस प्रोफेशनल्स, आन्त्रप्रेनर असोसिएशन ऑफ इंडिया, स्टार्ट अप इंडिया, बिहार आन्त्रप्रेनर असोसिएशन, बोउगैनविला सोसायटी ऑफ इंडिया, इंडियन सोसायटी ऑफ ओर्नामेंटल हॉर्टीकल्चर  संस्थांच्या सहकार्याने आयोजित प्रदर्शन 18 नोव्हेंबरपर्यत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे 635 कोटी रुपयांच्या थकीत कर्ज मालमत्तेची विक्री

0

पुणे: राज्याची अग्रणी आणि सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख राष्ट्रीयीकृत बँक, बँक ऑफ महाराष्ट्राने विविध विभागातील उद्योगांना दिलेल्या कर्जाच्या रकमेची  खाती थकीत झाल्यामुळे अशा खात्यांच्या रु 635 कोटी रुपयांच्या मालमत्तेची विक्री करणार आहे. 6 नोव्हेंबर रोजी ही सूचना बँकेने जारी केली आहे. थकीत झालेली कर्जे बॉम्बे रेयॉन, अंसल प्रॉपर्टीज, कोपरगांव-अहमदनगर टोलवेज यासह आयएसएमटी आदींची आहेत.

मालमत्तांच्या या विक्रीमुळे बँक ऑफ महाराष्ट्रच्या मालमत्ता गुणवत्ता याबरोबर आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.

 

‘युज ऑफ उरकुंड सॉफ्टवेअर इन प्लगरिझम चेक ‘ विषयावर कार्यशाळा

0

पुणे :भारती विद्यापीठ ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ‘ (आय एम इ डी ) तर्फे  ‘युज ऑफ उरकुंड सॉफ्टवेअर इन प्लगरिझम चेक ‘    या विषयावर कार्यशाळा आयोजित  करण्यात आली होती .  ‘आय एम इ डी ‘चे प्राचार्य डॉ सचिन वेर्णेकर यांनी स्वागत केले . डॉ . एस एफ पाटील ,डॉ . सचिन कदम यांनी मार्गदर्शन केले . डॉ . बलजित कौर ,डॉ . प्रमोद कदम ,डॉ . सुचेता कांची,डॉ . अजित मोरे  यांनी संयोजन केले . 

ही कार्यशाळा भारती विद्यापीठातील प्राध्यापकांसाठी  आय एम इ डी कॅम्पस (पौड रस्ता ) येथे १३ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती

जागतिक मधुमेह दिनानिमित्त मोफत तपासणी, अवयवदान जनजागृती कार्यक्रम

0
पुणे : लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २, रुबी हॉल क्लिनिक व पतित पावन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून मोफत मधुमेह तपासणी व अवयवदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या सोमवारी (दि. १९ नोव्हेंबर २०१८) कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती लायन्स क्लब्जचे माजी प्रांतपाल लायन चंद्रहास शेट्टी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी लायन श्याम खंडेलवाल, लायन सतीश राजहंस, दिनकर शिलेदार, डॉ. गौरी दामले आदि पदाधिकारी उपस्थित होते.
लायन चंद्रहास शेट्टी म्हणाले, “नागरिकांना अवयवदानाचे महत्व पटवून देण्यासाठी व मधुमेहाबाबत जनजागृती करण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता रॅलीने होणार असून, ती रॅली सिटीप्राईड थिएटर, कोथरुड ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह अशी निघणार आहे. त्याचे उद्घाटन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक व खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते होणार आहे. या रॅलीमध्ये विद्यार्थी, खेळाडू, मधुमेह रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर्स, विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक आणि लायन्स सदस्य सहभागी होणार आहेत. त्यानंतर सकाळी १० ते १२.३० या वेळेत मधुमेह व अवयवदान या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन असणार आहे. त्यामध्ये इन्शुलिन विषयी समज-गैरसमज, मधुमेहा बाबत घ्यायची काळजी, लहान मुलांमधील मधुमेहाची कारणे व दक्षता, मधुमेहींसाठी आहार, अवयवदान जागृती व तणावमुक्त जीवन कसे जगावे या विषयांचा समावेश आहे. त्यानंतर दुपारी १२ ते ३.०० या वेळेत याच ठिकाणी मधुमेहा संबंधी तपासण्या पूर्णतः मोफत करण्यात येणार आहेत.”
“या कार्यक्रमासाठी माजी मंत्री शशिकांत सुतार, समाजरत्न पुरस्कार प्राप्त डॉ. परवेज ग्रांट व समाज मित्र पुरस्कार प्राप्त डॉ. संजय पठारे, प्रांतपाल रमेश शहा, माजी प्रांतपाल चंद्रहास शेट्टी, धारिवाल फाउंडेशनच्या शोभा रसिकलाल धारिवाल, उपप्रांतपाल लायन ओमप्रकाश पेठे, लायन अभय शास्त्री यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, मोहन जोशी, नगरसेवक मुरलीधर मोहोळ, पृथ्वीराज सुतार,मंजुश्री खर्डेकर, अल्पना वर्पे, पतित पावन संघटनेचे पुण्याचे शहराध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित असणार आहेत” असेही संयोजकांनी सांगितले.

गोयल गंगा इंटरनैशनल स्कूल मध्ये बालदिन साजरा

0

पुणे :-   पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त गोयल गंगा इंटरनैशनल स्कूल मध्ये काल अनोख्या पद्धतीने बालदिन साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी नाटक, गाणी आणि वेगवेगळ्या नृत्यांमध्ये सहभागी होऊन त्यांचे मनोरंजन केले.यावेळी  गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलच्या संचालिका सोनू गुप्ता, शाळेच्या मुख्याध्यापिका भारती भागवाणी, इतर शिक्षक,पालकही उपस्थित होते.

आपण प्रत्येकवेळी म्हणतो लहानांनी मोठ्यांकडून शिकावे पण आजच्या या बालदिनानिमित्त मला असे सांगावेसे वाटते कि मोठ्यांनी लहानांकडून शिकावे कि, निरागसता, मनात येईल ते निसंकोचपणे सांगण्याची क्षमता तसेच चुका कबूल करण्याची मानसिकता या गोष्टी ज्या मोठ्या झाल्यानंतर आपण सहजपणे विसरतो त्या लहान मुलांकडून शिकल्या आणि अंगीकारल्या पाहिजेत. लहान मूल त्याला मारलेला फटकाही अगदी सहजपणे विसरून जातं तसंच आपणही उगीचच जपलेले अहंकार विसरून पुढे गेले पाहिजे,अशा भावना सोनू गुप्ता यांनी व्यक्त केल्या .प्रत्येक व्यक्तीमध्ये एक निष्पाप, लहान, खेळकर मूल लपलेलं असतं.उगाचच प्रौढपणाचा उहापोह न करता आपल्या मधल्या खोडकर, निष्पाप आणि गोंडस छोट्या मुलाला प्रत्येकाने जागं ठेवलं पाहिजे.भरभरून जगा,आयुष्याचा खरा आनंद केवळ एखादं  लहान,निष्पाप मुलंच घेऊ शकते त्यामुळे आयुष्य लहान मुलांसारखं प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत आणि तणावमुक्त जगा अशा भावना भारती भागवाणी यांनी मांडल्या.    

कुरुक्षेत्र येथील सावित्रीबाई;ज्योतिबा ग्रंथालयास, साहित्य कलांची भेट

0

पुणे- फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन आणि अखिल भारतीय महात्मा फुले समतापरिषद तर्फे महात्मा फुले यांचे 128 वी पुण्यतिथी आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे72 व्या वाढदिवसानिमित्त हरियाणा, कुरुक्षेत्र येथील सैनी समाज भवन च्या सावित्रीबाई-ज्योतिबा फुलेग्रंथालयास सामाजिक क्रांतीचे जनक सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले आणि सत्यशोधक ज्ञानज्योतीसावित्रीबाई फुले 3फुटी अर्ध पुतळे अध्यक्ष गुरणांम सिंग सैनी यांचेकडे भेट दिले.या वेळी सैनी यांना महात्माफुले पगडी,उपरणे आणि कुरुक्षेत्र विद्यापीठाचे डॉ.सुभाष सैनी आणि जेष्ठ समाजसेविका उषा पांढरे यांचेशुभहस्ते महापुरुषांचे 72 ग्रंथ नुकतेच भेट दिले.यावेळी माजी अध्यक्ष व माजी खासदार गुरुदयाल सिंग,माजीअध्यक्ष बलजीत सैनी,सचिव कौशल सैनी,सैनी पब्लिक स्कूलचे अध्यक्ष मायाराम सैनी,शिवदास महाजनआणि महात्मा फुले यांचे वेशभूषेत रतन माळी, रघुनाथ ढोक व सावित्रीबाई फुले यांचे वेशभूषेत आशा ढोकप्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी अध्यक्षीय भाषण करताना गुरणांम सिंग सैनी म्हणाले की हे पुतळे भेट देऊन महाराष्ट्र आणि हरियाणायांचे सबंध दृढ तर झालेच त्याबरोबर फुले दाम्पत्याचे महान कार्याची ओळख देखील झाली.त्यांचे सामाजिककार्याची ज्योत या निमित्ताने या परिसरात पेटत राहील त्यामुळे समाजातील सर्व  घटक एकत्र येऊन शेवटच्याघटकापर्यंत आम्ही शिक्षण देण्याचा प्रयत्न करु. या पुतळ्याचे सोबत फुले पगडीचा ताज आमचे डोक्यावरदिल्याने आमची सामाजिक जबाबदारी वाढली आहे असे देखील त्यांनी म्हंटले.

याप्रसंगी आयोजक  फुले एज्युकेशनल चे रघुनाथ ढोक यांनी पुतळे देण्यामागची भूमिका ,संस्थेचे कार्य तसेचमहात्मा फुले यांना अभिप्रेत असलेले कार्याची गरज आज पण आहे असे म्हंटले.शिवदास महाजन ,रतन माळीआणि डॉ.सुभाष सैनी यांनी देखील फुले दाम्पत्याच्या कार्याचा  वसा आपण सर्वांनी पुढे नेऊन सर्व वंचित घटकाचीसेवा करावी असे मौलिक विचार मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत टिळेकर आभार कौशल सैनी यांनी मानले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीराष्ट्रीय ओबीसी महासंघ,प्रतिमा परदेशी,दिलीप शेलवंते ,मंजिरी धाडगे,सुनीता भगत,वृषाली शिंदे,राजेंद्रआल्हाट,कै. बाबुराव धायरकर,राखी रासकर,रोहिणी भुजबळ,सुदाम धाडगे,किशोर भास्कर,शांतारामक्षीरसागर,पोपट सातव,शिवगोविंद कुशवाह,कैलास काठे,बाळासाहेब रायकर, बाळ भाकरे , ढोक परिवार तसेचसैनी समाज भवन चे विश्वस्त ,कर्मचारी यांनी मोलाची मदत केली. हरियाणा परिसरात फुले दाम्पत्याचे पुतळेप्रथम देण्याचा मान पुणे शहराला मिळाला याचा सर्वाना आनंद होऊन रॅली काडून ते   फुले दाम्पत्य पुतळेग्रंथालयात ठेवले या वेळी मोट्या संख्येने सैनी समाज उपस्थित होते.

‘त्यांनी ‘ लुटला बालदिनाचा आनंद!

0
पुणे :ज्यांना जग काय आहे हे माहित नाही, ज्यांचे आयुष्य केवळ स्वतःपुरते सीमित आहे अशा विशेष मुलांनी स्वतःच्या हातावर टॅटू काढण्याचा आनंद घेत, पिझ्झा , बर्गर ,केकचा आस्वाद घेत बालदिनाचा आनंद लुटला. 
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागुल आणि मित्र परिवाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही जंगली महाराज रस्त्यावरील मॅक्डोनाल्डस येथे विशेष मुलांसाठी बालदिनानिमित्त खास पार्टीचे आयोजन केले होते.
माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या प्रमुख उपस्थितीत या विशेष मुलांनी केक कापून पंडित नेहरू यांचा जन्मदिन साजरा केला. यावेळी बालचमूंसाठी  टॅटू पेंटिंग, पेन्सिल स्केचची व्यवस्था करण्यात आली होती, टॅटू आणि स्केच काढून घेण्यात आणि ते पाहण्यात ही मुले हरखून गेली होती. यावेळी यलो चित्रपटात अभिनय करणारी व   राष्ट्रपती पुरस्कार विजेती गौरी गाडगीळ कथ्थक नृत्यात निपुण ठरलेली सायली आगवणे या विशेष मुलींची उपस्थिती होती.
याप्रसंगी संयोजक अमित बागुल , पुणे नवरात्रौ महोत्सवाचे पदाधिकारी रमेश भंडारी, नंदकुमार बानगुडे तसेच  अभिषेक बागुल, महेश ढवळे, सागर आरोळे,धनंजय कांबळे,  सतीश कांबळे , सुरेश कांबळे , सन्मित चौधरी , बाबालाल पोळके, इम्तियाज तांबोळी, सुनिल लोखंडे  आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.