Home Blog Page 3048

पर्यटन विभागाने घेतली स्वच्छतेची जबाबदारी – जीटीडीसीच्या प्रोजेक्ट सेलच्या सहकार्याने समुद्रकिनाऱ्यांवर कामगार तैनात

0

•         उत्तर आणि दक्षिण गोव्यातील सर्व महत्त्वाच्या समुद्रकिनाऱ्यांवर २०० कामगार तैनात

•         येत्या काही दिवसांत स्वच्छ होणार सर्व समुद्रकिनारे

•        कचरा गोळा करण्यावर आणि त्याचे वर्गीकरण करून विल्हेवाट लावण्यावर मुख्य भर

 पणजीगोवा पर्यटन विकास महामंडळाच्या प्रोजेक्ट सेलच्या मदतीने कालपासून पर्यटन विभागाने स्वच्छतेची पूर्ण जबाबदारी आपल्याकडे घेत राज्याच्या सर्व समुद्रकिनाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर स्वच्छता सुरू केली आहे.

 २०० कामगार उत्तर दक्षिण गोव्यातील महत्त्वाच्या समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी तैनात करण्यात आले आहेत. पर्यटन विभाग येत्या काही दिवसांत कामगारांच्या उपलब्धतेनुसार इतर समुद्रकिनाऱ्यांवरही स्वच्छता मोहीम राबवणार आहे.

 गोवा टुरिझमने आज जारी केलेल्या निवेदनात स्वच्छतेचे कामकाज हाताळणाऱ्या दृष्टी लाइफसेव्हिंगचे निलंबन केल्यानंतर इतर विविध कंत्राटदारांना समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी त्यांचा कर्मचारीवर्ग उपलब्ध करत दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

 पर्यटन विभाग कचरा गोळा करणे, दुसऱ्या टप्प्यात त्याचे वर्गीकरण करणे यावर भर देत असून त्याची विल्हेवाट लावण्याचे कामही सुरू आहे.

समुद्रकिनाऱ्यांवरून गोळा करण्यात आलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचा प्रस्ताव असून त्यानंतर तो सालिगाव येथील कचरा विघटन कारखान्यात पाठवला जाणार आहे.

 कचरा गोळा करणे हे आमचे पहिले उद्दिष्ट आहे,’ असे जीटीडीसीच्या प्रोजेक्ट सेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. म्हणूनच समुद्रकिनाऱ्यांवर तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना नंतर वर्गीकरणासंदर्भात मार्गदर्शन केले जाणआर आहे. या संपूर्ण कामात सुसूत्रता स्थैर्य आणण्यासाठी किमान एक ते दोन दिवसांचा कालावधी लागेल,’ असेही ते अधिकारी म्हणाले,

 पर्यटन विभागाने पुढे असे सांगितले आहे, की समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता आता नियंत्रणात आली असून या कामात आणखी सुसूत्रता आल्यानंतर समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी नवी एजन्सी नेमण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर हे काम अधिक सफाईदारपणे प्रभावीपणे होईल.

पीएमआरडीएकडून सुविधा भूखंडाचा ई-लिलाव

0

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (पीएमआरडीए) कडून पायाभूत सोईसुविधा
निर्माण करण्याकरीता विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीकरिता
निधी उभारणीचा स्त्रोत म्हणून प्राधिकरणाच्या जमीन संचयातील सुविधा भूखंड ई-लिलाव (E-
auction)पद्धतीने दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने खाजगी विकसकांना देण्यासाठी पीएमआरडीए कार्यालयाकडून
भूखंडाचे जाहीर ई-लिलावाची प्रक्रिया केली जात आहे. या ई-लिलाव प्रक्रियेद्वारे माण, बावधन बुद्रूक अशा २
गावांमधील एकूण ४ सुविधा भूखंडाची लिलाव प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे.
सदर भूखंडाचा वापर त्याच्या अनुज्ञेय (Permission Uses) वापरासाठी आरक्षित करण्यात आलेला आहे.
त्यामध्ये ई-लिलाव प्रक्रियेद्वारे सदरच्या गावांमध्ये शाळा, दवाखाने, क्रीडांगण, व्यायामशाळा, पोस्ट कार्यालय,
पार्किंग, कचरा व्यवस्थापन, जलशुद्धीकरण केंद्र व इतर सुविधा निर्माण करण्यासाठी जास्तीत जास्त
नागरिकांनी सहभागी व्हावे, असे याद्वारे आवाहन पीएमआरडीएच्या करण्यात येत आहे. ई-लिलाव पद्धतीत
समाविष्ट भूखंडाची किंमत व इतर सर्व सविस्तर माहिती पीएमआरडीएच्या वेबसाईट
https://pmrda.auctiontiger.net वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर वेबसाईटवर निविदाधारक
यांच्यासाठी दि.१९ नोव्हेंबर २०१८ पासून नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे व
सदरच्या निविदा सादर करण्यास दि.२८ नोव्हेंबर २०१८ पर्यंत कागदपत्रे व शुल्क भरण्यासाठी मुदत देण्यात
आलेली आहे.
निविदेबाबत शंकेचे निरसन करणेसाठी बैठक दि. २० नोव्हेंबर २०१८ रोजी दुपारी ४ वाजता पीएमआरडीए,
आकुर्डी कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली. सदर निविदेची ई-लिलाव प्रक्रिया (Live e-Auction)
दि. ४ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ११:०० ते सायकाळी ५:०० वा. पर्यंत करण्यात येणार आहे. तरी
https:pmrda.auctiontiger.net या वेबसाईट द्वारे ई-लिलाव पद्धतीमध्ये समाविष्ट भूखंडाची किंमत व इतर
सर्व सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
उपरोक्त नमूद सुविधा भूखंड अनुज्ञेय (Permission Uses)वापरासाठी ई-लिलाव पद्धतीने दीर्घ मुदतीच्या
भाडेपट्ट्याने दिले जातील. सदर सुविधा भूखंडाच्या वापरामुळे संबंधित गावांचा जलद विकास होण्यास मदत
होईल व पायाभूत सोईसुविधा निर्माण होण्यास मदत होईल. ई-लिलावामध्ये सहभागी होण्यास नागरिकांना
आवाहन करणेत येत आहे, असे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले आहे.

व्यायाम व सकस आहाराने मधुमेहावर नियंत्रण डॉ. परवेज ग्रांट

0

पुणे : “नियमित व्यायाम आणि सकस आहार घेतला, तर मधुमेहासारख्या आजारावर नियंत्रण ठेवता येते; किंबहुना त्याला दूर ठेवता येते. मधुमेहामुळे शरीरारातील प्रत्येक घटकांवर परिणाम होतो. त्यामुळे मधुमेहाला कशाप्रकारे हाताळावे यासाठी मार्ग व पद्धती शोधायला हव्यात,” असे प्रतिपादन प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. परवेज ग्रांट यांनी केले.

जागतिक मधुमेह दिनानिमित्त लायन्स क्लब्ज इंटरनॅशनल, रुबी हॉल क्लिनिक व पतित पावन संघटनेतर्फे आयोजित भव्य मधुमेह-अवयवदान जनजागृती रॅली व मधुमेह तपासणी शिबीर आयोजिले होते. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात डॉ. ग्रांट यांना ‘समाजरत्न’, तर वैद्यकीय सेवा संचालक डॉ. संजय पठारे यांना ‘समाजमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी लायन्स क्लब्ज इंटरनॅशनलचे प्रांतपाल रमेश शहा, स्मिता शहा, माजी आमदार मोहन जोशी, धारिवाल फाउंडेशनच्या शोभा धारिवाल, माजी प्रांतपाल डॉ. चंद्रहास शेट्टी, उपप्रांतपाल ओमप्रकाश पेठे, अभय शास्त्री, शाम खंडेलवाल आदी उपस्थित होते.

मधुमेह आणि अवयवदानाविषयी जागृती करण्यासाठी सिटी प्राईड कोथरूड ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृहापर्यंत आयोजिलेल्या रॅलीचे उद्घाटन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आणि खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते झाले. प्रसंगी नगरसेवक दिलीप वेडे पाटील, प्रदीप धुमाळ यांच्यासह डॉक्टर्स, विद्यार्थी, खेळाडू, मधुमेह रुग्ण, तसेच विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक यात सहभागी झाले होते. मधुमेहाशी संबधित विविध विषयांवर आयोजित मार्गदर्शन सत्रात इन्शुलीनबाबत समज- गैरसमज या विषयावर मधुमेहतज्ञ डॉ. गौरी दामले, लहान मुलांमधी मधुमेहाची लक्षणे व दक्षता या विषयावर रुबी हॉल क्लिनिकच्या डॉ. मेघना चावला व मधुमेहासाठी आहार याबाबत डॉ. हर्षल एकतपुरे यांनी मार्गदर्शन केले.

डॉ. परवेज ग्रांट म्हणाले, “डॉ. अभय मुथा आणि माझे वडील डॉ. के. बी. ग्रांट खऱ्या अर्थाने या पुरस्काराचे मानकरी आहेत. काही वर्षांपूर्वी माझ्या वडिलांना मिळालेला पुरस्कार यावर्षी मला मिळत आहे याचा मला विशेष आनंद होत आहे.  नियमित व्यायाम आणि योग्य आहाराच्या जोरावर आपण मधुमेहाला दूर ठेवू शकतो. या गोष्टी प्रत्येकाने पाळायला हव्यात.”

शोभा धारिवाल म्हणाल्या, “आजवर लायन्स क्लबचे काम चांगले सुरू आहे. यापुढेही सामाजिक व चांगल्या कामासाठी लायन्स क्लबने प्रस्ताव आणावेत. त्यांच्या या सामाजिक कामामध्ये माझा नेहमी सहभाग असेल.”

मधुमेह जागृतीसाठी २०१४ पासून हा उपक्रम सुरु आहे. यंदापासून अवयवदान जागृतीही केली जात आहे. यासाठी रुबी हॉल क्लिनिकने नेहमीच पाठिंबा दिला असल्याचे डॉ. चंद्रहास शेट्टी यांनी सांगितले. प्रास्ताविक शाम खंडेलवाल यांनी केले.  हेमंत नाईक, अनुराधा डोंगरे, नीला कदम यांनी सूत्रसंचालन केले. आभार राजेंद्र गुगळे यांनी केले.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सुपरमाईंड’तर्फे विनामूल्य प्रश्नसंच व मोफत समुदेशन सेवा

0
पुणे : सुपरमाईंड शैक्षणिक संस्थेतर्फे मार्च २०१९ च्या दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन प्रश्नसंच विनामूल्य उपलब्ध करून देण्यासह व समुपदेशन सप्ताह आयोजिला आहे, अशी माहिती संस्थेच्या संचालिका अर्चिता मडके, मंजुषा वैद्य, अश्विनी भालेकर व मेघना मुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वर्षीपासून दहावीचा नवीन अभ्यासक्रम, नवीन पाठ्यपुस्तके व प्रश्नापत्रिकांऐवजी कृतिपत्रिका असणार आहेत. सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश असलेला प्रश्नसंच विनामूल्य दिला जातो. www.supermindstudy.com या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना लॉगइन करून प्रश्नसंच विनामूल्य डाऊनलोड करून घेता येणार आहेत. इंग्रजी, सेमी व मराठी माध्यमाच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश यामध्ये असणार आहे. दहावी बोर्ड परीक्षेला नेमके शंभर दिवस राहिले असताना विद्यार्थ्यांना विविध प्रश्नपत्रिकांचा सराव अतिशय उपयुक्त ठरत असतो. त्याकरिता प्रत्येक विद्यार्थ्याला असा संच सहज उपलब्ध करून व्हावा त्याकरिताच या संस्थेने दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता ही खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी याचा लाभ करून घेतील, असा विश्वास सुपरमाइंडच्या संचालिका अर्चिता मडके यांनी व्यक्त केला.
चालू वर्षापासून एसएससी महाराष्ट्र बोर्डाने अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिकांचा आराखडा बदललेला असून, विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकांऐवजी कृतिपत्रिका सोडवावी लागणार आहे. मोफत दिल्या जाणाऱ्या या संचामध्ये नवीन आराखड्यानुसार कृतिपत्रिकांचा समावेश आहे. अशा प्रकारच्या बदललेल्या आराखड्याचे हे पहिले वर्षं असून विद्यार्थ्याना अशा मदतीची गरज आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या सर्व प्रश्नपत्रिका विविध विषयांच्या तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांनी तयार केलेल्या आहेत. त्यामुळे दर्जेदार प्रश्नपत्रिका घरी बसून सोडविण्याचा सराव विद्यार्थ्यांना उत्तम गुण व गुणवत्ता मिळवून देण्यास नक्कीच उपयूक्त ठरतील. प्रश्नसंच डाऊनलोड करून घेताना काही अडचण आल्यास कृपया ९९२३७९८१७२ किंवा www.supermindstudy.com वर संपर्क साधावा. ९०४९९९२८०७/८/९ या हेल्पलाईन क्रमांकावरही विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन घेता येणार आहे.
मोफत समुपदेशन दहावीच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या शैक्षणिक समस्यांबद्दल मोफत समुपदेशन करण्यासाठी विनामुल्य सेवा देण्यासाठी समुपदेशन सप्ताहाचे आयोजन सुपरमाईंड संस्थेने केले आहे. उत्तरपत्रिका लेखनतंत्र, परीक्षेतील वेळेचे नियोजन, विषयावार अडचणी, छोट्या चुका, ताणाचे व्यवस्थापन, पालकांची भूमिका अशा विविध बाबींवर तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल. या सप्ताहास इयत्ता नववी व दहावीचे विद्यार्थी व पालक एकत्र येऊ शकतात, त्यांना वैयक्तिक पातळीवर समुपदेशन केले जाईल. प्रशिक्षित शैक्षणिक समुपदेशक हे मार्गदर्शन करणार असून पालकांनी या करिता वेळ आरक्षित करून येणे आवश्यक असल्याचे संस्थेने कळविले आहे.

प्लॅस्टिक बंदीच्या जाचक अटीमुळे किरकोळ व्यापार अडचणीत – रिटेल व्यापारी संघ

0

परराज्यातील प्लॅस्टिकची होतेय चढ्या दराने विक्री

अन्याय न थांबल्यास किरकोळ व्यापारी आंदोलन करणार

पुणे: महाराष्ट्रात गेल्या 23 जूनपासून प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली. सुरूवातीला सर्व स्तरातून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. आमचे देखील प्लॅस्टिक बंदीला पूर्ण सहकार्य आहे. मात्र, आता सरकारच्या जाचक अटीमुळे राज्यातील किरकोळ व्यापार मोडीत निघण्याच्या मार्गावर असल्याचे मत पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे  यांनी व्यक्त केले आहे.

सरकारचा प्लॅस्टिक बंदीचा निर्णय फसला आहे. नेमकं सरकारला काय करायचं आहे. प्लॅस्टिक बंदी कशी राबवायची आहे याचाच अंदाज आलेला नाही. त्यामुळे त्यांनी अगोदर त्याचा अभ्यास करणे गरजेचे असून अभ्यास पुर्ण झाल्यावरच त्याची अंमलबजावणी करायला हवी होती. यासाठी सहकार्य करण्यास आम्ही नेहमीच तयार असल्याचे देखील निवंगुणे यांनी म्हटले आहे.

कॅरीबॅगच्या वापरावर शंभर टक्के बंदी हवी आहे यामध्ये शंकाच नाही. शासनाने निर्धारीत केलेल्या नियमानुसार 50 मायक्राॅन पेक्षा कमी प्लॅस्टिक मालाचे पॅकिंग करण्यासाठी व वापरण्यास बंदी आहे. तसेच जे प्लॅस्टिक आपण वापरणार आहोत त्याच्यावर नियम, अटी व उत्पादकाचा नंबर टाकणे नियमानुसार बंधनकारक आहे. या सर्व  नियमांचे पालन करुन प्लॅस्टिक वापरले तरीदेखील शासनाकडून ईपीआर नंबरच्या नावाखाली कारवाई करण्यात येत आहे. एवढंच नाही तर ईपीआर नंबर द्या अशी मागणी प्लॅस्टिक उत्पादकांनी शासनाकडे केली तर, नंबर दिला जात नाही. त्यामुळे हा संपूर्ण उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे सचिन निवंगुणे यांनी सांगितले.

परराज्यातून होतेय प्लॅस्टिकची आवक
शासनाने जर प्लॅस्टिक बंदीचा निर्णय संपूर्ण राज्यामध्ये लागू केला असेल तर राज्यामध्ये तयार होणाऱ्या मालाबरोबरच बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या मालाचं पॅकिंग करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उत्पादनावर देखील कारवाई करायला हवी. मात्र, सरकार असं न करता केवळ राज्यातील व्यावसायिकांना नियमांच्या चाैकटीत उभं करत आहे. त्यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांना एक नियम आणि बाहेरच्या व्यापाऱ्यांना एक नियम असं झालं तर एके दिवशी राज्यातील सर्व उद्योग बाहेरच्या राज्यात स्थलांतरीत होतील.

महाराष्ट्रामध्ये जरी प्लॅस्टिक बंदी असली तरी इतर राज्यामधून मोठ्याप्रमाणात लुज माल पॅकिंग करण्यासाठी प्लॅस्टिकची आयात राज्यात होतेय. त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांना गरजेपोटी ते खरेदी करावे लागत आहे. हाच प्रकार अोळखून जो माल कमी दरात मिळत होता तो आता येथील व्यापाऱ्यांना जवळपास दुप्पट दराने विक्री होत आहे. याचा परिणाम व्यापाऱ्यापासून सर्वसामान्य ग्राहकांवर देखील होणार आहे. ईपीआर नंबरच्या कारवाईखाली पुण्यातील 80 तर राज्यातील 250 प्लॅस्टिकच्या कंपन्या सरकारनं बंद केल्या आहेत.

कारवाई करण्याचे अधिकार अनेकांना; निर्णयाचा अधिकार मात्र नाही
प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणी नंतर कारवाई करण्याचे अधिकार सर्वांना दिले मात्र कारवाईनंतर निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला नाही. अनेकदा नियमांच्या संदर्भात काही अडचणी आल्या तर व्यापाऱ्यांनी नेमका संपर्क कोणाला करायाचा याची अडचण निर्माण होते. त्यामुळे सरकारने या संपुर्ण प्रश्नांचा गांभिर्यानं विचार करावा. व्यवसायाला एकदा का उतरती कळा लागली तर, त्याचा परिणाम वाईट होईल. अनेक हातांना आपला रोजगार गमवावा लागेल. लवकरात लवकर तोडगा नाही निघाला तर आम्हाला देखील संपावर जाण्याचा विचार करावा लागेल असा इशारा पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे.

सईची पहिली वेबसीरिज ‘डेट विथ सई’

0

सैफ अली खान, आर माधवन, भूमी पेडणेकर, नवाजुद्दीन सिद्दिकी अशा बॉलीवूड ए-लिस्टर सेलेब्सनी वेबसीरिजमध्ये काम केल्यावर आता मराठीतली सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर लवकरच ‘डेट विथ सई’ ह्या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.

डिसेंबरपासून सुरू होणा-या ह्या वेबसीरिजविषयी सध्या खूप उत्कंठा आहे. ह्या वेबसीरिजशी निगडीत सूत्रांच्या अनुसार, ही एक थरार मालिका असणार आहे. ह्यामध्ये सई स्वत:च्याच म्हणजेच सई ताम्हणकरच्याच भूमिकेत असेल. सई ही पहिलीच भारतीय अभिनेत्री आहे, जी वेबसीरिजमध्ये स्वत:च्याच भूमिकेत दिसेल.

ह्या सूत्रांच्या अनुसार, ह्या वेबसीरजमध्ये सईचा वेडसर फॅन तिचा पाठलाग करत असतो. जो सईच्या नकळत तिचे आपल्या मोबाइल कॅमे-यात चित्रीकरण करत असतो. ही थरारक वेबसीरिज पाहताना तुमच्या अंगावर काटा येईल.

सई ताम्हणकर म्हणली, “डेट विथ सई सारखी थरारशैलीचा चित्रपट वा मालिका मी कधीच केली नव्हती. त्यामूळे ही वेबसीरिज माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. एका फॅनचं तुमच्यावरच प्रेम कसं जीवघेणंही ठरू शकतं, त्याची अनुभूती देणारी ही वेबसीरिज आहे. वेबसीरिजच्या विश्वात डेट विथ सईने मी पाऊल ठेवत आहे. आणि डिसेंबरमध्ये येणा-या ह्या वेबसीरिजची मी खूप उत्सुकतेने वाट पाहत आहे.”

बिग बींच्या हस्ते अवी च्या ‘मैं हुआ तेरा’ गाण्याचे अनावरण!

0
तो तरुण आहे. तो सुसंस्कृत आहे. तो प्रतिभावान आहे. आणि विशेष म्हणजे त्याच्या नसानसांत संगीत भिनलेलं आहे असा, संगीतकार आदेश श्रीवास्तव आणि अभिनेत्री विजयता पंडित यांचा सुपुत्र अवीतेश श्रीवास्तव उर्फ अवी ‘मैं हुआ तेरा’ ह्या आपल्या पहिल्या-वहिल्या गाण्याद्वारे गायक-संगीतकार-कलाकार म्हणून जागतिक संगीत क्षेत्रात पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे.
दोन वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेते ज्योर्जियो तुइन्फोर्ट यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेले गाणे, आणि रेमो डी’सुझा यांनी दिग्दर्शित केलेल्या व्हिडीओचे अनावरण जगविख्यात अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या हस्ते कोर्टयार्ड बाय मॅरीएट, अंधेरी येथे करण्यात आले.
लॉस एंजल्समधील हॉलीवूड अकादमीचा विद्यार्थी, अवी याने शुजीत सरकारच्या ‘पिकू’ व ‘रंगून’ चित्रपटात विशाल भारद्वाजला सहकार्य करुन आपल्या कलेचे दर्शन घडविले होते. त्याने अमिताभ बच्चन यांच्या ‘जिंदगी’ चित्रपटाचे ‘आज की बात है’ हे शीर्षक गीत फक्त संगीतबद्धच केले नाही, तर ‘वन फॉर द वर्ल्ड’ मधे एकॉन आणि आदेश श्रीवास्तव यांच्यासोबत ‘प्रदर्शन’ देखील केले असून ग्लोबल साउंड ऑफ पीस या अल्बम शिवाय टी-पेन व फ्रेंच मोंटान सह संगीत कला सादर केलेली आहे.
“हा माझ्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे. माझे वडील या दिवसाची खूप वाट पाहत होते.” भावनिक झालेला अवितेश आपल्या गोंडस चेहऱ्यामुळे मिळणाऱ्या अनेक चित्रपटांच्या ऑफर्स बद्दल सांगताना म्हणतो की, . “आम्ही अद्याप त्यांचा विचार करीत आहोत. मी माझ्या चित्रपटासाठी अभिनेता म्हणून योग्य ब्रेक शोधत आहे, म्हणून मी माझा वेळ घेतो आहे. “
यापुढे पुरस्कार विजेते संगीतकार तसेच वाद्य प्रतिभा असलेले आंतरराष्ट्रीय एकल यांच्या सह काम करण्याकडे कल ओढवत “मी या क्षणी इतर कलाकारांना प्लेबॅक देण्याकडे पाहत नाही” हे तो कबूल करतो.

मंगेश पाडगावकर यांच्या कवितांवर डॉ .कल्याणी हर्डीकर यांचे व्याख्यान

0
पुणे :रसिक मित्र मंडळ ‘तर्फे कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या कवितांवर डॉ . कल्याणी हर्डीकर यांचे  व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे . ‘एक कवी -एक भाषा ‘ या व्याख्यानमाले अंतर्गत हे व्याख्यान    २३ नोव्हेंबर २०१८,शुक्रवारी सायंकाळी साडेपाच  वाजता पुणे श्रमिक पत्रकार संघ सभागृह  येथे होणार आहे .
‘रसिक मित्र मंडळ ‘चे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली .
मंगेश पाडगावकर यांच्या जीवनावरील काही दुर्मिळ ध्वनी -चित्रफिती तसेच अरुण दाते यांनी गायलेली पाडगावकर यांची भावगीते या वेळी दाखविण्यात येणार आहेत .
‘एक कवी -एक भाषा ‘ या व्याख्यानमाले अंतर्गत हे  59 वे व्याख्यान   आहे

पुणे टाइम्स फॅशन वीकचे भव्य समापन

0
पुणे:  विशेष स्टाइलिश आणि ग्लॅमरस फॅशन शो, पुणे टाइम्स फॅशन वीक- 2018या वर्षी पुण्याील वेस्टिन हॉटल,कोरेगाव पार्क मध्ये आयोजित करण्यात आला होता. पुणे टाइम्स फॅशन वीक अंतर्गत पुण्यामध्ये  तीन दिवसीय फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते.
फॉशन शोचे उद्घाटन प्रिआ कटारियाच्या शो ने झाले. शैना एन सी, प्रणव प्रताप भागवत, सोफी, स्नेहा अदवानी, शालाका पंडित, उल्का बाफना वोहरा, डिंपल मजीठिया, वैशाली कराड, आशीष आणि शेफाली, श्रुति मंगाेश आणि अर्चना कोचर सारख्या डिजाइनर ने यावेळी अपले नवीनतम कलेक्शन सादर केले. याव्यतरिक्त पीएनजी ज्वेलर्स आणि आईएसएएस इंटरनॅशनल ब्यूटी स्कूलचा शो देखील यावेळी पहावयास मिळाला.
पुणे टाइम्स फॅशन वीक मध्ये बॉलीवुड आणि फॅशन जगतातील  आकर्षक चेहरे देखील  शो स्टॉपर्सच्या रूपात उपस्थित होते.  ज्यात स्वरा भास्कर, सोनाली कुलकर्णी, चित्रांगदा सिंह, कुणाल कपूर, भारती सिंह, प्रिया बापट, संस्कृती बालगुडे, सई तमजंकर, अलंक्रिता सहाई, नॉयनीता लोध होते. याचबरोबर प्रसिद्ध डिज़ाइनर आणि सुपर मॉडल दीप्ति गुजराल आणि  कैंडिस पिंटो देखील इस कार्यक्रमावेळी दिसले.

पीवायसी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाची विजयी सलामी

0
पुणे- पीवायसी हिंदु  जिमखाना क्लब यांच्या  तर्फे  पीवायसी करंडक 14 वर्षाखालील   निमंत्रित    क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाने डेक्कन जिमखाना संघाचा पराभव करत स्पर्धेचा उद्घाटनाचा दिवस गाजवला. 
 
पीवायसी हिंदू जिमखाना येथे आजपासुन सुरू झालेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत घरच्या मैदानावर खेळताना पीवायसी हिंदू जिमखाना संघाने डेक्कन जिमखाना संघाचा  16 धावांनी पराभव करत विजयी सुरूवात केली. पहिल्यांदा खेळताना मिहिर देशमुखच्या अफलातून 44 धावांच्या बळावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 44 षटकात 9 बाद 186 धावा केल्या. यात  समर्थ काळभोरने 37 तर सुफीयाना सय्यदने 26 धावा करून मिहिरला सुरेख साथ दिली. 186 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मिहिर देशमुख , कुश पाटील , पार्थ शेवाळे व रोहित कांबळे यांच्या अचूक गोलंदाजीपुढे डेक्कन जिमखाना संघाचा डाव 44 षटकात 8 बाद 170 धावांत अटोपला. 44 धावा व 2 गडी बाद करणारा मिहिर देशमुख सामनावीर ठरला.
 
स्पर्धेचे उद्घाटन पीएमआरडीचे प्रमुख व आयुक्त किरण गिते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यामध्ये पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ.सुधीर भाटे , क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, अभिषेक ताम्हाणे, स्पर्धा नियोजन समितीचे सदस्य  रणजीत पांडे, इंद्रजीत कामटेकर,  पराग शहाणे, शिरिष गांधी व कपिल खरे  आदी मान्यवर उपस्थित होते. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
पीवायसी हिंदू जिमखाना- 44 षटकात 9 बाद 186 धावा(मिहिर देशमुख 44, समर्थ काळभोर 37, सुफीयाना सय्यद 26, करण जगवाडे 3-27, अथर्व सनस 2-30, आदित्य कुलकर्णी 1-37, वेदांत सनस 1-28, सर्वेश सुर्वे 1-39) वि.वि डेक्कन जिमखाना- 44 षटकात 8 बाद 170 धावा(अथर्व सनस 47, कृष्णा देवतरसे 29, सर्वेश सुर्वे 22, मिहिर देशमुख 2-25, कुश पाटील 1-26, पार्थ शेवाळे 1-32, रोहित कांबळे 1-7) सामनावीर- मिहिर देशमुख
पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 16 धावांनी सामना जिंकला. 

पुणे व सिंगापूर या दरम्यान जेट एअरवेजची नवी नॉन-स्टॉप सेवा सुरू

0

मुंबई– जेट एअरवेज या भारतातील प्रीमिअर, परिपूर्ण सेवा देणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानकंपनीने प्रवाशांकडून वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी डिसेंबर 2018 पासून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय मार्गांवर 18 अतिरिक्त फ्रिक्वेन्सी सुरू करून, आपले नेटवर्क सक्षम करायचे ठरवले आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला, जेट एअरवेजने मुंबई आणि यूकेतील मँचेस्टर या दरम्यान देशातील पहिली नॉन-स्टॉप सेवा सुरू केली. 1 डिसेंबरनंतर, कंपनी पुण्याहून नवी, नॉन-स्टॉप सेवा सुरू करून, सिंगापूरशी कनेक्टिविटी अधिक वाढवणार आहे. पुण्याने सिंगापूर येथे सर्वाधिक अराइव्हलची नोंद केली आहे आणि जेट एअरवेजची नवी सेवा मुंबई, दिल्ली व बेंगळुरू या हबद्वारे सिंगापूरला दिल्या जाणाऱ्या सध्याच्या सेवेला पूरक ठरणार आहे. वाढते व्यवसाय व कॉर्पोरेट सेंटर आणि आघाडीचे शैक्षणिक केंद्र असणाऱ्या पुण्यासाठी ही नवी सेवा म्हणजे, विमानकंपनीचे शहरातून दुसरे आंतरराष्ट्रीय ठिकाण असणार आहे.

सिंगापूरमार्गे फार इस्ट, आशिया-पॅसिफिक व ऑस्ट्रेलिया येथे जाणाऱ्या प्रवाशांनाही पुण्यातून सुरू होणारी ही नवी सेवा फायदेशीर ठरणार आहे. या प्रवाशांना, गरूडा इंडोनेशिया, जेटस्टार एशिया व कंटास अशा कंपनीच्या कोडशेअर व इंटरलाइन पार्टनर्सच्या सेवेच्या मदतीने पुढील प्रवास सुरळीत करता येईल. भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी सेवा अतिशय सोयीची ठरेल व वेळेमध्ये मोठी बचत करेल.

डिसेंबरच्या सुरुवातीला, जेट एअरवेजने वाढती मागणी विचारात घेऊन, बँकॉक, काठमांडू व सिंगापूर या आशियायी व दोहा व दुबई या आखाती देशांतील ठिकाणांमध्ये नव्या फेऱ्या समाविष्ट करायचे ठरवले आहे. लवकरच, कंपनी दिल्लीहून बँकॉक व सिंगापूर येथे प्रत्येकी तिसरी दैनंदिन फ्रिक्वेन्सी आणि मुंबईहून सिंगापूरला तिसरी दैनंदिन सेवा सुरू करणार आहे. यामुळे सध्याच्या सेवेमध्ये वाढ होणार आहे. भारत व आशियायी परिसरातील वाढत्या वाहतुकीचा हा थेट परिणाम आहे. सिंगापूर व भारत या दरम्यानची इंडस्ट्री एअर पॅसेंजर वाहतूक 2017 मध्ये 17% वाढली.

आखाती देशांसाठी आणखी फ्रिक्वेन्सी सुरू केल्या जाणार आहेत आणि या प्रदेशासाठी व या प्रदेशाकडून सेवा देणारी एक सर्वात मोठी कंपनी म्हणून विमानकंपनीचे स्थान अधिक बळकट होणार आहे. मुंबई व दिल्ली यांना दोहाशी जोडणारी प्रत्येकी दुसरी सेवा डिसेंबरमध्ये सुरू केली जाणार आहे. मुंबई व दुबई यादरम्यान सातवी दैनंदिन सेवा सुरू केल्याने, बिझनेस व लिजर प्रवाशांसाठी दैनंदिन जास्तीत जास्त विमान सेवा उपलब्ध करून आखातातील लोकप्रिय ठिकाणी 24 तास कनेक्टिविटी देणारी जेट एअरवेज ही एकमेव विमानकंपनी ठरणार आहे.

जेट एअरवेज दिल्ली आणि नेपाळची राजधानी काठमांडू यादरम्यान चौथी दैनंदिन फ्रिक्वेन्सीही सुरू करणार आहे.

किफायतशीर नसणाऱ्या ठिकाणांपेक्षा अधिक उत्पादक व किफायतशीर मार्गांवर सेवा देण्याच्या कंपनीच्या धोरणाचा भाग म्हणून, मुंबई व दिल्ली या केंद्रांमध्ये आपले नेटवर्क बळकट करण्याच्या उद्देशाने, कंपनीने नेटवर्कचा सर्वंकष आढावा घेतल्यावर या अतिरिक्त सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मध्यवर्ती केंद्रांच्या मार्फत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय जाळ्याशी इतकी व्यापक कनेक्टिविटी उपलब्ध केल्यावर विमानकंपनीला आपले कार्य वाढवणे शक्य होईल, प्रवाशांसाठी अधिक पर्याय व कनेक्टिविटी देणाऱ्या अतिरिक्त फ्रिक्वेन्सी सुरू करता येतील. या निर्णयांमुळे, विशिष्ट बाजारातील मागणीच्या अनुषंगाने क्षमता वापरण्यासाठीही मदत होईल.

जेट एअरवेजने या हबमध्ये देशांतर्गत कनेक्टिविटी वाढवण्याचेही ठरवले आहे. त्यानुसार, मुंबई व अमृतसर यांच्यातील सेवा दैनंदिन केली जाणार आहे, तसेच डिसेंबरमध्ये दिल्ली – अमृतसर मार्गावर चौथी दैनंदिन सेवा सुरू केली जाणार आहे. दिल्ली व बेंगळुरू – वडोदरा मार्गांवर नव्या विमानसेवा, मुंबई – गुवाहाटी व मुंबई – पाटणा येथे अधिक फ्रिक्वेन्सी आणि दिल्ली – जोधपूर मार्गावर क्षमतेमध्ये ATR वरून 737 पर्यंत वाढ, अशा हिवाळी वेळापत्रकाच्या सुरुवातीला सुरू करण्यात आलेल्या नव्या सेवांच्या व्यतिरिक्त या सेवा सुरू केल्या जाणार आहेत.

जेट एअरवेजचे जगभरातील विक्री वितरणाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राज शिवकुमार यांनी सांगितले, “या धोरणामुळे जेट एअरवेजला दक्षिण व पश्चिम भारतातील बहुतेकशा नेटवर्कशी मुंबईद्वारे अधिक कनेक्टिविटी देता येईल. तसेच, दिल्लीसाठीच्या नव्या सेवेमुळे उत्तर व पूर्व भारताशी सुरळीत कनेक्टिविटी मिळेल. दोन्ही हब आंतरराष्ट्रीय नेटवर्कच्या वाढत्या कनेक्शनसह, देशांतर्गत विस्तृत सेवेचा लाभ घेण्यासाठी पूरक ठरतील. कारण, कंपनीने पूर्व व पश्चिम यादरम्यान आणखी सेवा देण्यासाठी, तसेच आशियातील वाढते प्रादेशिक केंद्र म्हणून प्रगती करण्यासाठी पावले उचलली आहेत.”

नुकत्याच घेण्यात आलेल्या नेटवर्कच्या आढाव्यानुसार जाहीर करण्यात आलेल्या वरील सेवांमुळे विमानकंपनीला उत्पन्न वाढवण्यासाठी, तसेच नव्या, इंधनक्षम B737 MAX ताफ्याचा पूर्णतः लाभ घेण्यासाठी मदत होईल. त्यापैकी आणखी 6 या आर्थिक वर्षात समाविष्ट होण्याची शक्यता आहे. एकत्रित, नव्या एअरक्राफ्टमुळे कंपनीला उत्पन्न वाढवता येईलच, शिवाय खर्चातही कपात करता येईल.

ग्रामीण पोलीस ठाणी सुधारण्याचा वसा…..

0
आळेफाटा पोलिस निरिक्षक पदी टी.वाय.मुजावर यांचे  जनमानसातून कौतुक
ओतूर  (संजोक काळदंते)-
पोलिस खाते म्हणजे अगदीच धकाधकीचे मानले जाते या खात्यात नुसतीधावपळ,दगदग आणि यातुन होणारी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची ससेहोलपटत्यातून पोलीस वर्गाची चिडचीड अशा सेवेत काम करताना जनतेच्या नाही त्या
प्रश्नांची सोडवनुक समाधानकारक करावी लागते.येथे गट तट दबाव अशागोष्टींना न जुमानता जनतेविषयी न्यायक भुमिका ठेवावी लागते.पोलिस ठाण्यातयेणा-या प्रत्येक तक्रारदाराचे म्हणने ऐकून घेऊन त्यावर न्याय निवाडाकरावा लागतो अशावेळी निःपक्षपातीपने काम करण्यासाठी पोलिसांची अगदीचकसोटी लागते अशा कसोटीला उतरुन सर्वाची मने राखावी लागतात त्यातूनगुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी कर्तव्यदक्ष रहावे लागते आणि सामाजीक कोणाचाही रोष न पत्करता सामाजिक भान ही जपावे लागते अशी तारेवरची कसरत करणारे अधिकारी नगण्य असतात ..पण निश्चित ते जनमानसात आपल्या कामाचा ठसा उमटवून जातात .

असाच कर्तव्यदक्ष अधिकारी जुन्नर तालुक्यात लाभलाय अशी संपुर्णपरिसरात चर्चा आहे पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणा-या प्रत्येक गावात याअधिकाऱ्यांच्या कामाविषयी स्तुत्य चर्चा आहे.एव्हाना पोलिस म्हणजे
टीकेचा धनी ,निंदेचा वाटेकरी अशी काहीशी चर्चा असते मात्र जेव्हापासून जुन्नरतालुक्याला सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून टी.वाय.मुजावर यांनी पदभारघेतला पोलिस या शब्दाविषयी संज्ञाच बदलून गेलीय गुन्हेगारीला चाप आणि
चांगल्या कामाला शाबासकिची थाप मारनारा अधिकारी या भागाला मिळाला.ओतुर नारायणगाव येथे सहाय्यक  पोलिस निरिक्षक पदावर काम करुन आता जुन्नर तालुक्यात पोलिस निरिक्षक पदावर आळेफाटा येथे नियुक्त झालेले टी.वाय मुजावर म्हणजे जनतेचे  सिंघम आता रिटर्न झालेत.अगदीहोळीपासून ते गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव सारख्या तसेच रमजान ईद बकरी ईदअशा सर्व धर्माच्या उत्सवात अतिउत्साहाने जनतेला शुभेच्छा देऊन त्यांच्यासुख दुःखात सहभागी होणारा अधिकारी अतिऊत्साही कार्यपद्धती बाळगून याअधिकाऱ्यांने अनेक गुन्हे आपल्या अनुभवाने आणि आपल्या सहकार्याच्या
मदतीने ऊघडकीस आणलेत.छोट्या छोट्या गोष्टी देखील गांभीर्य ओळखून मनावरघेऊन त्यातून एखादी गंभीर घटना टाळण्यासाठी नियोजनबद्ध बंदोबस्त केले तरगुन्हेगारीला चांगलीच चपराक बसते.शेतकऱ्यांचा कांदा चोरीस गेला आणि
साहेबांनी आपल्या स्टाफसह तो तात्काळ शोधून काढून त्या शेतकऱ्याला परतदिला अशा अधिकाऱ्याचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे असेच म्हणावे लागेलअशा अनेक घटनांचे तपास लावून त्यांनी आपली ईमेज राखली आहे या कामांमुळे
पोलिस ठाण्याचे नाव उंचावले तर डी.जे.बंदी सारख्या विषयाला त्यांनीहसतमुखाने जनतेला विशेष करुन युवकांना डी.जे.च्या तोटे आणि फायद्यांविषयीसमजावून संपुर्ण परिसर डी.जे.मुक्त केला आणि सर्वोच्च न्यायालयानेदिलेल्या आदेशाचे पालन परिसरातील जनतेकडून झाले.ग्रामस्वच्छता सारख्याविषयात मुजावर यांनी आपल्या पोलिस फौजफाट्याला घेऊन स्वच्छता मोहीमराबवीली.पोलिस कर्मचारी आणि जनतेची अडचण लक्षात घेता सर्वांच्यासहकार्याने ओतुर पोलिस ठाण्याच्या नुतन ईमारत आणि स्थलांतर करण्यासाठीत्यांनी आतोनात प्रयत्न केले.आता हे पोलिस स्टेशन नविन जागेत नव्या जोमात
कार्यरत आहे याचे सर्वस्वी श्रेय फक्त टी.वाय.मुजावर यांनाच जाते.तसेच मढयेथील आउट पोस्टचे बांधकाम करून याही ठिकाणी ग्रामस्थांच्या सहकार्यानेपोलीस ठाण्याची ईमारत उभी केली  मुजावर यांनी नारायणगाव पोलीस ठाण्याचेसहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना येथेही त्यांनी वाहतूकव्यवस्था ठेवण्यासाठी वाहतूक कर्मचाऱ्यांना एक खोली चौकी म्हणून बांधली त्यांनी नारायणगाव पोलीस ठाण्याची ईमारत सुधरवण्याचे काम हातीघेतले आणि ते पुर्ण केले त्यांच्या मते ग्रामीण पोलीस कर्मचारी यांची व्यथा आणि पोलीसठाण्यांची अवस्था अतिशय मरगळलेली आहे मात्र एवढ्या सगळ्या दगदगीतून देखीलग्रामीण पोलीस कर्मचारी आपली कर्तव्ये अगदीच सचोटीने पार पाडतअसतात
म्हणूनच त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रसन्नतेचे वातावरण असावे अशी ईमारतअसणे आवश्यक असल्याने प्रथम हे कार्य हाती घेतले आणि जुन्नर तालुक्यातीलओतूर,मढ,आणि आता नारायणगाव या ठिकाणी पोलीस ठाणी सुधारण्याचे कार्य करीत
आहे असे ते सांगतात. आता सर्वांना आदर देनारा आणि वेळप्रसंगी आपला खाक्यादाखवनारा शिस्तप्रिय व रुबाबदार अधिकारी टी.वाय.मुजावर म्हणजे ग्रामीणपोलीस ठाणी सुधारण्याचा वसा घेणारे ‘सिंघमच’ आहेत.पोलिसांची राहण्याची
व्यवस्था आणि पोलीस ठाणी सुधारली तर ही यंत्रणा सुधारू शकेल असे त्यांचेमत आहे.

नारायणगडावर मशाल पेटवून दीपोत्सव साजरा…!

0
ओतुर – संजोक काळदंते)
विविध सुविधांपासून आणि पुरातत्व खात्यापासून  दुर्लक्षित असलेला मात्र शिवाजी ट्रेल व दुर्गप्रेमी निसर्गमित्र ग्रुप च्या माध्यमातून कायापालट होऊन पर्यटकांना माहीत होतं असलेल्या किल्ले नारायणगडावर दुर्गप्रेमी कडून मशाल,दिवट्या,पणत्या पेटवून दीपोत्सव साजरा करण्यात आला.
         दुगप्रेमी निसर्ग मित्र ग्रुप ,शिवाजी ट्रेल, सह्याद्री प्रतिष्ठान यांचे वतीने नारायणगडावर संवर्धनाचे कार्य सुरू आहे. यामध्ये हिवरे, गडाची वाडी खोडद परिसरातील तरुणांचा सहभाग महत्वाचा आहे. जेव्हापासून दुर्गसंवर्धनाचे कार्य ग्रुप च्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे, तेव्हापासून किल्ले नारायणगडावर प्रत्येक दिवाळीत दीपोत्सव करण्यात येतो. यावेळेसचे हे चौथे वर्ष असून अनेक दुर्गप्रेमी यावेळी उपस्थित होते.
           नारायणगड दुर्ग संवर्धन समितीचे अध्यक्ष शिवदास खोकराळे यावेळी म्हणाले की,गडकोट ,दुर्ग हे आपले खरे वैभव आहे त्यांचे जतन करणे गरजेचे आहे. आसपासच्या तरुणांच्या माध्यमातून खरा नारायणगडाचा विकास होत आहे , नाहीतर हा किल्ला दुर्लक्षितच होता. आता मात्र पर्यटकांची संख्या सध्या वाढत आहे. नारायणगडावर खूप जैविक संपदा आहे, दुर्मिळ वनस्पती, प्राणी , पक्षी या परिसरात आहेत, पर्यटकांनी संवैधानिक आचारसंहीतेत राहिल्यास निसर्गाची हानी होणार नाही. दुर्लक्षित नारायणगड राज्याच्या काना कोपऱ्यात नेण्याचे कार्य पत्रकार बंधूनी केले आहे. दिवाळीत घरे प्रकाशाने तेजस्वी होतात मात्र आपले वैभव असणारे किल्ले अंधारातच असतात. त्यामुळे गडावर दीपोत्सव करणारे शिवाजी ट्रेल व दुर्गप्रेमी निसर्गमित्र ग्रुप या मोहिमेचा उद्गाता आहे.
         यावेळी खोडदचे सरपंच विश्वास काळे, नारायणगड दुर्गसंवर्धन समितीचे अध्यक्ष शिवदास खोकराळे, शिवाजी ट्रेलचे संचालक सचिन तोडकर, रवी वामन, भालचंद्र वामन,  संजय रणदिवे, अशोक खरात, तुषार आंधळे, दत्ता वामन, राहुल वामन,  कैलास काळे,  सुरेश काळे,  गोरख खिलारी,  सचिन आत्रे, निखिल डोंगरे, अभिजित खैरे, राजू भोर, रंगनाथ कुंडलिक, तुषार रणदिवे, निलम खोकराळे, वंदना शिंदे, नंदाताई खोकराळे, सायली आंधळे, पल्लवी काशिकेदार, केतन साळवे, कदील पठाण आदी उपस्थित होते.

सत्यनिष्ठा हाच फेकन्यूजच्या प्रतिबंधाचा उपाय -ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे

0

पुणे : माध्यमांनी तंत्रज्ञानाचा वापर जरूर करावा. मात्र त्यांनी सामान्य लोकांशी आणि भारतीय संविधनाशी बांधिल राहून काम करावे. माध्यमांनी सत्याची बाजू घेवून त्याचा पाठपुरावा करावा, सत्यनिष्ठा हाच फेकन्यूजला प्रतिबंध करण्याचा उत्तम मार्ग असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे यांनी आज केले.

विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून येथील माहिती केंद्राच्या सभागृहात “डिजीटल युगातील पत्रकारिता :अचारनिती आणि आव्हान” या विषयावर आयोजित चर्चासत्रात श्री. अरुण खोरे बोलत होते. यावेळी उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग उपस्थित होते.

श्री अरूण खोरे म्हणाले, मागणी तसा पुरवठा हा सध्याच्या बाजारपेठेचा नियम आहे. त्यामुळे काही अनावश्यक वाटणाऱ्या गोष्टीही माध्यमातून समोर येत असतात. तंत्रज्ञानाच्या बदलामुळे माध्यमांचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. समाजमाध्यमांचा अधिक प्रभाव जनमानसांवर होत आहे. सामाजिक माध्यमांद्वारे सामान्य लोकांच्या मनात गोंधळ आणि संभ्रम पसरविला जातो. समाजमाध्यमावर येणाऱ्या माहितीची कोणतीही खातरजमा न करता तो पुढे पाठविण्याच्या सवयीमुळे यात आणखी वाढ होत आहे. त्यामुळे समाजमाध्यमावर येणाऱ्या प्रत्येक माहितीची खात्री करूनच ती पुढे पाठविली पाहिजे.

माध्यमांची आणि माध्यमकर्मींची सामान्य लोकांशी आणि त्यांच्या प्रश्नांशी बां‍धिलकी असणे आवश्यक आहे. माध्यमकर्मींनी वाचन आणि व्यासंग वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. डिजीटल माध्यमांसाठी नियमावली तयार करण्याची आवश्यकता असल्याचे, श्री. खोरे यांनी सांगितले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय शासकीय ध्येयधोरणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन जनसामान्यांपर्यत प्रभावीपणे पोहोचवीत असल्याबद्दल श्री.खोरे यांनी समाधान व्यक्त केले.

श्री. मोहन राठोड म्हणाले, पत्रकारितेच्या क्षेत्रात काही दिवसात मोठा बदल झाला आहे. माहितीचा मोठा खजिनाच सर्वांना खुला झाला आहे. गेल्या काही काळात माध्यमांची संख्या झपाट्याने वाढत असून लोकशाहीच्यादृष्टीने ही अत्यंत चांगली बाब आहे. पत्रकारिता करताना सामाजिक भान ठेवून काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राजेंद्र सरग यांनी राष्ट्रीय पत्रकार दिनाचे महत्व विषद केले. सूत्र संचालन वृषाली पाटील यांनी केले. आभार संग्राम इंगळे यांनी मानले.

यावेळी माहिती सहाय्यक जयंत कर्पे, पत्रकार विजयकुमार म्हस्के, शिवाजीराव शिंदे, संतोष काळे, अजय पाटील, किशोर भिडे यांच्यासह माहिती कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

मेहनतीनेच भाग्याचे दारे खुली होतील- जैन मुनीश्री पुलकसागरजी महाराज

0

दोन अक्षराचा शब्द लाभ, अडीच अक्षराचा शब्द भाग्य, तीन अक्षराचा शब्द नशिब, साडेतीन अक्षराचा शब्द किस्मत आहे. त्याला’मेहनत’ या चार अक्षराच्या शब्दाची जोड दिली तर तुमच्या भाग्याचे सर्व दारे खुली होतात असे सांगत मेहनतीचे आणि आपल्याजीवनाचे नाते दृढ असणे आवश्यक आहे, विद्यार्थ्यांनी हाच मंत्र आपल्या जीवनात अंगिकारला तर जीवनात उच्चपदी आपण नक्कीपोहचाल असा संदेश जैन मुनीश्री पुलकसागरजी महाराज यांनी विद्यार्थ्यांना दिला.
आर. एम. धारिवाल फौंडेशनतर्फे ६२४ विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान करण्याचा कार्यक्रम पुण्यातील माणिकचंद हाऊस येथेजैन मुनीश्री पुलकसागरजी महाराज यांच्या मंगल सानिध्यात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. आर. एम. धारिवाल फौंडेशनच्याप्रमुख शोभाताई धारिवाल, फौंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारिवाल, भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू युसुफ पठाण, प्रणीतसागरजी,महाराज पुनीत बालन यावेळी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुनीश्री पुलकसागरजी महाराज "हसण्याचा हक्क त्यांनाच असतो जे दुसर्याचे अश्रू पुसतात. तुम्ही तुमच्या जीवनात कोणी बना अगरबनू नका परंतु एक चांगला माणूस बना. देवाचा शोध घेत बसू नका. आज चांगल्या आणि खऱ्या माणसांची आवश्यकता आहे. कारणहीच माणसे भविष्यातील देव आहेत.
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अनेकजण देतात. मात्र, शोभाताई धारिवाल यांनी केवळ शिष्यवृत्ती नाही तर त्याबरोबरच शाकाहार आणिअहिंसेची, दुसऱ्याच्या पोटावर पाय देऊ नका, दुसऱ्याचे जीवन खराब करू नका अशी शिकवण दिली. शिष्यवृत्तीच्या रूपाने तुम्हालाजी मदत झाली आहे त्याची परतफेड जीवनात काहीतरी बनून करा असे आवाहनही मुनीश्री पुलकसागरजी महाराज यांनी यावेळीकेले. तसेच रसिकलाल धारिवाल यांनी मेहनत करून साम्राज्य उभारले त्याचबरोबर समाजातील दुर्बल घटकांसाठी शैक्षणिक,वैद्यकीय व धार्मिक मदत करून आदर्श घालून दिला असे ते म्हणाले.
शोभा धारिवाल म्हणाल्या, रसिकशेठ धारिवाल त्यांच्या कार्याने मोठे झाले. मी आणि जान्हवी कार्यातून रसिकलाल यांना जिवंत ठेऊव त्यांचे कार्य पुढे सुरु ठेऊ. गरिबी आपल्या चेहऱ्यावर दाखवू नका. प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते. न्यूनगंड येऊ देऊ नका. सध्याइंग्रजीचा जमाना आहे त्यामुळे लिहिण्याबरोबरच विद्यार्थ्यांनी इंग्रजी अस्खलित बोलण्याचे ज्ञान प्राप्त करावे असे आवाहन त्यांनीकेले.
जान्हवी धारिवाल म्हणाल्या, जैन मुनीश्री पुलकसागरजी महाराज यांची तीन महिन्यांपूर्वी भेट झाली. ते कठीण परिस्थितीत धर्माचेपालन करतात. धर्माचे पालन केल्याने आपले कर्म आपोआप सुधारते. आपले वडील रसिकलाल धारिवाल यांनी कधीही हिम्मतसोडली नाही , कोणासमोर मान झुकवली नाही. एखादी गोष्ट मी करू शकत नाही असे त्यांच्या तोंडून मी कधीही ऐकले नाही. तेस्वत: मोठे झाले परंतु ते दानशूरही होते.युसुफ पठाण म्हणाले, जीवनात जे काही आत्ताचे माझे स्थान आहे. ते माझ्या आई-वडिलांमुळे आहे. आपले आई-वडील दोघेही कामकरायचे. वडील एका कंपनीत काम करून नंतर मशिदीत साफसफाईचेही काम करायचे. त्यांनी कधीही कुठली तक्रार करायची नाहीअशी शिकवण आम्हा भावंडांना दिली. त्यामुळे आज मी यश मिळवू शकलो. तुम्हीही तुमच्या जीवनात जेवढ्या तक्रारी कमी करालतेवढे मोठे तुम्ही व्हाल असे त्याने नमूद केले.
प्रारंभी जितेंद्र भूरूक व सहकार्यांनी प्रार्थना सादर केली प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ. रणजित जगताप यांचा विशेष सत्कार यावेळी
करण्यात आला. याप्रसंगी पाच विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मंचावर शिष्यवृत्तीचे चेक देण्यात आले. याप्रसंगी निवडकविद्यार्थ्यांनी कृतज्ञतेच्या भावना व्यक्त केल्या. सर्व विद्यार्थ्यांना याप्रसंगी चेक देण्याची व्यवस्था करण्यात आली होती.सीमा गंगवाल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.