Home Blog Page 3029

महाराष्ट्रातील वृत्तपत्रांच्या समस्या सोडविणार -प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य . के. डी. चन्दोलाजी यांची ग्वाही

0
कराड दि.२० (प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील वृत्तपत्रांच्या समस्याबाबत सघटनेच्या राज्य पदाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून व अडचणी समजावून घेवून त्या सोडवण्यासाठी स्वत: लक्ष घालून प्रयत्न करणार असल्याची हमी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य श्री. के. डी. चन्दोलाजी यांनी दिली.तर पत्रकार व वृत्तपत्रांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडियम न्यूजपेपर्स ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य श्री. के. डी. चन्दोलाजी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या बैठकीसाठी मुंबई येथे १६ ते २१ डिसेंबर या सहा दिवसांच्या महाराष्ट्र दौच्यावर आले होते. यावेळी महाराष्ट्रातील पदाधिकारी यांचेसोबत सह्याद्रि अतिथीगृहावर बैठक होऊन महाराष्ट्रातील छोटय़ा व मध्यम वृत्तपत्राबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेचे महाराष्ट्राभर सुरू असलेल्या कामाचा सविस्तर अहवाल सादर करण्यात आला. राज्य अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, उपाध्यक्ष प्रविण पाटील, संघटक गोरख तावरे, संघटन सचिव नेताजी मेश्राम, नागपुर विभागीय अध्यक्ष मुंकुंद जोशी उपस्थीत होते.
राज्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या आरएनआय, डीएव्हीपी, पोस्ट खाते इत्यादींच्या संदर्भात तसेच इतर प्रश्न, समस्या व अडचणीबाबत प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य श्री. के. डी. चन्दोलाजी यांचेशी चर्चा केली. तसेच यासंदर्भात पुणे येथे लवकरच कार्यशाळेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सन २०१९ ची करण्यात आलेली सभासद नोंदणीची यादी अध्यक्षांच्यांकडे सादर करणेत आली. असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर्स ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आप्पासाहेब पाटील व उपाध्यक्ष प्रविण पाटील यांनी श्री महालक्ष्मी व श्री गणेशाची मुर्ती देवून स्वागत केले.
असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडियम न्यूजपेपर्स ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य के. डी. चंडोलाजी यांचा मुंबई येथील सहय़ाद्री अतिथीगृहावर राज्य अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, उपाध्यक्ष प्रविण पाटील, संघटक गोरख तावरे, संघटन सचिव नेताजी मेश्राम, नागपुर विभागीय अध्यक्ष मुंकुंद जोशी यांनी शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ, झाडाचे रोप देवून यथोचित सत्कार केला.

महाराष्ट्र शासनाचे फुले चरित्र साधने समितीवर रघुनाथ ढोक यांची निवड…

0

पुणे–महाराष्ट्र शासना तर्फे महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती वर सामाजिक कार्यकर्ते सत्यशोधक रघुनाथ ढोक यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, तसेच उपाध्यक्ष  म्हणून राज्यमंत्री रविंद्र वायकर हे काम पाहणार आहेत.


ढोक हे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद,पुणे महानगर पश्चिम चे अध्यक्ष,फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष ,पुणे विद्यार्थी गृह सेवकांची पतसंस्था मर्यादित पुणे चे अध्यक्ष आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सरचिटणीस ,मुद्रण महर्षी डॉ.प.भ.कुलकर्णी प्रतिष्ठान चे सचिव,ह्यूमन राइट्स अ.ऑफ इंडिया चे महाराष्ट्र edu. सचिव, दत्तवाडी पोलीस स्टेशन पुणे शांतता कमिटी सदस्य हुजूरपागा गर्ल्स सोसा. आजीव सदस्य तसेच अनेक शैक्षणिक, सहकार,सामाजिक, संस्थेवर पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.त्याचप्रमाणे त्यांनी अनेक जाती धर्माचे विवाह जुळवून स्वतः महात्मा फुले याचे वेशभूषेत सत्यशोधक पद्धतीने विवाह देखील लावले व नियमितपणे लावीत असतात.सर्व जाती धर्मातील गरीब गरजू प्रथम , विधवा विधुर व इतर वधु वरांचे मोफत विवाह लावणेसाठी देखील सर्व सुविधाने बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्राची निर्मीती वावरहिरे,सातारा येथे केली आहे.ते लवकरच या केंद्रामध्ये सामाजिक न्यायाचे जनक राजर्षि छत्रपती शाहू महाराज,सामाजिक क्रांतिचे जनक सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले ,भारतीय स्त्री शिक्षणाच्या आध्येप्रनेत्या सत्यशोधक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्धपुतळा बसविणार आहेत.या पूर्वी नुकतेच हरियाणा ,कुरुक्षेत्र येथील -सावित्री – ज्योतीबा फुले ग्रंथालयास महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे अर्धपुतळे भेट दिले आहेत.त्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जीवनचरित्र 4रंगी मराठी,हिंदी,इंग्रजी आणि जर्मन भाषेत व दीनांची साउली पुस्तक व इतर साहित्य प्रकाशित केले आहे. त्यांचे सामाजिक कार्य महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर चालू असल्याने महात्मा फुले चरित्र साधने व प्रकाशन समिती वर महाराष्ट्र शासनाने निवड केल्याने त्यांचे मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.

विद्यार्थी सहायक समितीतर्फे पोपटराव पवार यांचे व्याख्यान

0
पुणे : विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व थोर गणितज्ञ डॉ. अच्युत शंकर आपटे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विद्यार्थी सहायक समिती आणि उचित माध्यम पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मासिक व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. या व्याख्यानमालेचे उद्घाटन व त्यातील पहिले व्याख्यान अहमदनगर येथील हिवरेबाजार या आदर्श गावाचे सरपंच पोपटराव पवार यांचे होणार आहे. 
 
शनिवार, दि. २२ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी ६.०० वाजता सेनापती बापट रस्त्यावरील विद्यार्थी सहायक समितीच्या लजपतराय विद्यार्थी भवन येथे हे व्याख्यान होणार असून, ते सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. डॉ. आपटे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यात या व्याख्यानमालेचा समावेश आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींचे दर महिन्याचा चौथ्या शनिवारी हे व्याख्यान होणार आहे, असे विद्यार्थी सहायक समितीतर्फे कळविण्यात आले आहे.

बंधुतेशिवाय स्वातंत्र्य, समता अर्थहीन-डॉ. श्रीपाल सबनीस

0
पुणे : “स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय या चार मूलभूत तत्वांवर भारताचे संविधान आधारले आहे. त्यातील केवळ स्वातंत्र्य व समता या दोन गोष्टींवरच अधिक भर दिला गेल्याने बंधुतेला दुय्यम स्थान मिळाले. परिणामी आज जाती-धर्म, गरीब-श्रीमंत अशा वर्गीय संघर्षात आपण अडकलो आहोत. बंधुतेशिवाय स्वातंत्र्य व समतेला अर्थ नाही. त्यामुळे संविधानाची मूलभूत तत्वे प्रत्यक्षात आणून मानवता रुजवायची असेल, तर समाजात बंधुता पेरण्याची आणि रुजविण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन विसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व काषाय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने विसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. श्रीपाल सबनीस यांचा ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे, भोसरी येथील भगवान महावीर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रकाश जवळकर, काषाय प्रकाशनचे संचालक व कवी चंद्रकांत वानखेडे, प्रीतम प्रकाश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक शिंदे उपस्थित होते.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “या चारही मूल्यांना सामान महत्व मिळायला हवे. जगभरातील आजची स्थिती पाहता बंधुता रुजविण्याची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. बंधुतेचा विचार काळजाला भिडला, तरच बंधुतेचा नकाशा आपल्याला कायम ठेवता येईल. दहशतवाद, नक्षलवाद आणि इतर अशा संकटाना सामोरे जाण्यासाठी बंधुता मोलाची ठरणार आहे. साहित्य क्षेत्रातील काही मंडळींनी आपले स्वतःचे कंपू बनवून स्वार्थ साधला. मात्र, बंधुतेचा विचार पेरण्याचे काम प्रकाश रोकडे आणि त्यांचे सर्व सहकारी करीत आहेत. त्यांच्या कार्यात जात-धर्म, स्त्री-पुरुष असा भेदाभेद नाही. त्यामुळेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापेक्षाही जास्त आनंद बंधुता साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाल्यानंतर वाटतो आहे.”
उल्हासदादा पवार म्हणाले, “वैचारिक मतभिन्नतेनंतरही परस्परांत आपुलकी जपण्याचा विचार बंधुतेमुळे रुजतो. आज भारतासह जगाला बंधुता जोपासण्याची गरज आहे. तसे झाल्यास खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय मिळाल्याची भावना जनमनात निर्माण होईल. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन ‘आम्ही भारतीय’ ही भावना आपल्या प्रत्येकाने ठेवली पाहिजे. स्वामी विवेकानंदानी एकोणिसाव्या शतकात मांडलेले विचार आजही आदर्शवत आहेत. त्याचे अनुकरण आपण केले पाहिजे.”
अध्यक्षीय भाषणात  प्रकाश रोकडे म्हणाले, “सगळ्या धर्मातील तत्वज्ञान मार्गदर्शक आहे. बंधुतेचा विचार घेऊन गेली अनेक वर्षे कार्य करताना माणूस जोडत गेलो आहे. तथागत गौतम बुद्ध, भगवान महावीर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या बंधुता साहित्याचे उगमस्थान आहेत. त्यांचा विचार घेऊन आपण प्रत्येकाने माणूस म्हणून जगले पाहिजे.”
डॉ. सबनीस यांच्या सत्कार सोहळ्याबरोबरच प्रबोधनयात्री कविसंमेलन आयोजिले होते. यामध्ये मुंबईचे संदीप कांबळे, दौंडचे बबन धुमाळ, ठाण्याचे विजय जाधव, पुण्याचे डॉ. भीम गायकवाड, संतोष घुले या कवींचा सहभाग होता. डॉ. अशोककुमार पगारिया यांनीही आपले विचार मांडले. प्रास्ताविक प्रकाश जवळकर यांनी केले. सूत्रसंचालन संगीता झिंजुरके यांनी केले. आभार डॉ. अशोक शिंदे यांनी मानले.

आकाशवाणीच्‍या माध्‍यमातून ग्रामीण विकासावर भर- उपसंचालक गोपाळ अवटी

0

पुणे- पाणीटंचाईमुळे आगामी काळ कृषी क्षेत्रासाठी महत्‍त्‍वपूर्ण असून शेती आणि पशुधनाबाबत    शेतक-यांसाठी  मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आकाशवाणीच्‍यावतीने नियोजन करण्‍यात आले आहे.  उपलब्‍ध पाण्‍याचा योग्‍य वापर, पशुधनाची काळजी याबाबत तज्ञ तसेच अनुभवी शेतक-यांच्‍या मुलाखती, व्याख्‍यानांच्‍या माध्‍यमातून जनजागृती केली जाईल, असे आकाशवाणीचे (कार्यक्रम) उपसंचालक गोपाळ अवटी यांनी सांगितले. आकाशवाणीच्‍या माध्‍यमातून ग्रामीण विकासावर भर देण्‍यात येत असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. ऊरळी कांचन येथील बायफ संस्‍थेमध्‍ये ग्रामीण कार्यक्रम सल्‍लागार समितीची बैठक आयोजित करण्‍यात आली होती. त्‍यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रम अधिकारी अनिलकुमार पिंगळे, बायफचे कृषी विभाग प्रमुख प्रमोदकुमार ताकवले, सहायक अभियंता रवींद्र रांजेकर, संशोधन संचालक जयंत खडसे, जिल्‍हा कृषी विकास अधिकारी बाळासाहेब पलघडमल, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, डॉ. धनंजय गावंडे, पशुसंवर्धनचे सहायक आयुक्‍त डॉ. सुनील गिरमे, राजाराम चौधरी, डॉ. महेंद्र घागरे, सुनील पोकरे, बाहुबली टाकळकर, ब्रम्‍हदेव सरडे, डॉ. महेंद्र मोटे,डॉ. मनोजकुमार आवारे, कुणाल पुंडे,डॉ. भरत रासकर, प्रिया बेल्‍हेकर आदींची उपस्थिती होती.

ग्रामीण कार्यक्रम सल्‍लागार समितीची दर तीन महिन्‍यांनी बैठक होत असते. गत तिमाहीत प्रसारित करण्‍यात आलेल्‍या कार्यक्रमांना मिळालेला प्रतिसाद तसेच आगामी तीन महिन्‍यांचे नियोजन याबाबत बैठकीत चर्चा होते.  पाणीटंचाई लक्षात घेवून  येणा-या तिमाहीत ग्रामीण भागातील जनतेसाठी प्रबोधनपर आणि मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे नियोजन करण्‍यात आले आहे. पाणीटंचाईमुळे कृषी उत्‍पादन तसेच कृषी पूरक उत्‍पादनांवर विपरित परिणाम होऊ शकतो. त्‍यामुळे उपलब्ध पाण्‍याचा काटकसरीने वापर करुन चारा उत्‍पादन, भाजीपाला उत्‍पादन करण्‍याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. पारंपरिक शेती व्‍यवसायाव्‍यतिरिक्‍त शेतीमध्‍ये नावीन्‍यपूर्ण प्रयोग करणा-या युवकांच्‍या, तरुणींच्‍या मुलाखतींचे  प्रसारण करण्‍याचे नियोजन करण्‍यात आले आहे. पशुधनाची काळजी, आरोग्‍यविषयक सल्‍ला, फोन इन कार्यक्रम, यशोगाथा, मनोरंजनपर लोकनाट्य, किर्तन, लोकसंगीत आदींचाही प्रसारणामध्‍ये समावेश करण्‍यात आला आहे. बैठकीत सदस्‍यांनी महत्‍त्‍वपूर्ण सूचना केल्या.

बोला आता …१ हजार ६५७ मोबाइल टॉवर्स अनधिकृत ..स्मार्ट पुण्याचा स्मार्ट कारभार

0

पुणे-महापालिका हद्दीत तब्बल १ हजार ६५७ मोबाइल टॉवर्स अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न बुडत आहे. विविध मोबाइल कंपन्यांचे केवळ २३८ अधिकृत टॉवर्स आहेत. शिवसेनेचे नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या प्रश्नोत्तरात विविध प्रश्न उपस्थित करून माहिती उघडकीस आणली आहे..

महापालिकेच्या हद्दीत विविध मोबाइल कंपन्यांचे इमारतींवर, छतांवर अनधिकृत टॉवरचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्नही बुडत आहे. अधिकृत मोबाइल टॉवरला परवानगी देण्यासाठी स्क्रुटिनी फी ६०० रुपये, एकरकमी प्रशासकीय शुल्क ३० हजार रुपये, बांधकाम विकसन शुल्क इमारतीवरील मोबाइल टॉवर बांधकामांसाठी शीघ्रसिद्धगणक दराच्या ४० टक्क्यांपैकी ८ टक्क्यानुसार आकारले जाते. मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर असल्यास ८ टक्केपैकी जागेचा शीघ्रसिद्धगणक दरानुसार आकारले जाते. .

महापालिकेला मोबाइल टॉवरच्या माध्यमातून ७ कोटी २४ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. मोबाइल टॉवरच्या माध्यमातून मिळकतकराच्या माध्यमातून ३१ कोटी ३६ लाखांचे उत्पन्न मिळाले. दरम्यान, जुना बाजार येथे पडलेल्या होर्डिंगच्या दुर्घटनेनंतर महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांकडून नोव्हेंबर अखेरपर्यंत १९२ बेकायदेशीर होर्डिंग पाडण्यात आली आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. .

 धार्मिक स्थळांवरील कारवाई थांबवा-गटनेत्यांच्या आदेशाने प्रशासन ‘कात्रीत’

0

 पुणे- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने सुरु केलेई धार्मिक स्थळांवरील कारवाई तात्पुरती थांबवण्याचे आदेश गटनेत्यांच्या बैठकीत प्रशासनाला देण्यात आले. या परिस्थितीत प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागून राहणार आहे . या प्रकारामुळे प्रशासन मात्र कात्रीत सापडले आहे .

धार्मिक स्थळांवर सुरु असलेल्या कारवाईचे सोमवारी मुख्य सभेत पडसाद उमटले होते. ही कारवाई थांबविण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली होती. त्यासंदर्भात महापौरांनी बुधवारी पक्षनेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला आयुक्त सौरभ राव, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे, मनसे गटनेते वसंत मोरे, शिवसेनेचे संजय भोसले, अश्‍विनी लांडगे, सुनिता वाडेकर, अतिक्रमण नियंत्रण विभागप्रमुख माधव जगताप आदी यावेळी उपस्थित होते.

या बैठकीत गटनेत्यांनी शहरात सुरू असलेली धार्मिक स्थळांवरील कारवाई थांबविण्याची मागणी केली. त्यात प्रामुख्याने प्रशासनाने अनधिकृत धार्मिक स्थळांची अ, ब आणि क अशी वर्गवारी केली आहे. त्यामधील क वर्गात जी 546 धार्मिक स्थळे आहेत, ती वाहतुकीला अडथळा ठरणारी नाहीत. त्यामुळे क वर्गातील धार्मिक स्थळांचे स्थलांतर करणे शक्य आहे का हे तपासावे व शक्य होत असल्यास गृहखात्याकडे पाठवलेल्या माहितीत प्रतिज्ञापत्राद्वारे बदल करणे शक्य आहे का, या सगळ्यांची शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या असल्याचे महापौर आणि गटनेत्यांकडून सांगण्यात आले.

वाजपेयी जयंतीदिनी रक्तदान महायज्ञ- रासने मित्रपरिवाराकडून  आयोजन 

0

 

पुणे- भारत रत्न माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९४ व्या जयंतीदिनी रक्तदान महायज्ञ आयोजित करून ५ हजार रक्दाते मिळवून ५ हजार बाटल्या रक्त गोळा करण्याचा संकल्प नगरसेवक हेमंत रासने मित्र परिवारातर्फे करण्यात आला आहे. हे शिबीर २३ डिसेंबर रोही सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बाजीराव रस्त्यावरील नूमवि प्रशालेमध्ये होणार आहे .आणू या शिबिराच्या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निमंत्रित करण्यात आले आहे अशी माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट  चे उत्सवप्रमुख नगरसेवक हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेतून दिली .
पालकमंत्री गिरीश बापट ,राज्यमंत्री दिलीप कांबळे,महापौर मुक्ता टिळक ,भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले,खासदार अनिल शिरोळे,आमदार विजय काळे,माधुरी मिसाळ,मेधा कुलकर्णी,सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आदी मान्यवर पदाधिकारी नगरसेवक यावेळी उपस्थित राहणार आहेत . ससून ब्लड बँक ,पी एस आय ब्लड बँक ,जनकल्याण रक्तपेढी -पुणे- नगर- जालना ,घोलप ब्लड बँक,भारती ब्लड बँक अशा विविध रक्तपेढ्या यात सहभागी होणार आहेत.गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते,महाविद्यालयीन तरुण आणि असंख्य नागरिक यावेळी रक्तदान करणार आहेत .

……अख्खे कुटुंब बेपत्ता ..पिंपरी पोलिसात तक्रार दाखल

0

पुणे– चिंचवडच्या मोहननगर परिसरातून एक व्यवसायिक कुटुंबासह गेल्या पंधरा दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

संतोष एकनाथ शिंदे (वय-47) त्यांच्या पत्नी सविता संतोष शिंदे (वय-41), मुलगा मुकुंद शिंदे (वय-22), मुलगी मैथाली शिंदे (वय-18) असे सर्व बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी संतोष यांचे भाऊ नितीन एकनाथ शिंदे (वय-38) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांच्या एकूण दहा गाड्या आहेत. शिंदे यांनी धंदा व इतर कामांसाठी विविध ठिकाणाहून तब्बल दोन कोटीच्या आसपास कर्ज काढले होते. यासाठी त्यांनी खासगी पतसंस्था तसेच कर्जदारांचे पैसे परत मागण्यासाठी फोन येत होते. या त्रासाला कंटाळून ते गेल्या अनेक दिवसांपासून अस्वस्थ होते. शिवाय त्यांनी राहत्या घरावर कर्ज काढण्याचा मानस देखील त्यांच्या नातेवाईकांना बोलून दाखवला.

मात्र, 5 डिसेंबर रोजी सारे कुटुंब घरातून जाण्यासाठी निघाले. यावेळी भावाने हटकले देखील मात्र त्यांनी फिरायला जातोय असे सांगितले. त्यांच्या ड्रायव्हरने त्यांचा चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ सोडले. त्यानंतर ते कुटुंबीय रिक्षाने बेपत्ता झाले. रात्री उशीर झाला तरी कुटुंबीय घरी न परतल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. मात्र त्यातील एकही जण फोन उचलत नव्हते. अखेर ते राहत असलेल्या खोलीचा दरवाजा उघडला असता चौघांचेही फोन घरातच होते. यावेळी घरच्यांना तेथे एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये शिंदे यांनी लिहिले होते की, माझ्या साऱ्या व्यवहाराचा तपशील डायरीत लिहून ठेवला आहे. मी माझा परिवार आत्महत्या करत आहोत. चिठ्ठी शेजारीच घरातील कपाटाच्या चाव्याही ठेवल्या होत्या.

मुलाची परीक्षा तोंडावर
मुकुंद हा मेकॅनिकल इंजिनिअरींग करत आहे. तर मुलगी मैथाली ही बारावीमध्ये शिक्षण घेत आहे. मुकंदची इंजिनिअरींगची परीक्षा तोंडावर असतानाच हे कुटुंब बेपत्ता झाले आहे. पोलीस सर्व बाजुंनी तपास घेत असून अद्याप तरी पोलिसांना कोणतीही माहिती मिळाली नाही. मात्र, या घटनेमुळे शिंदे यांचे नातेवाईक पूर्णपणे खचले आहे. त्यांनीही शोध सुरु केला असून कोणाकडेही या कुटुंबाची माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

कृषी व मत्‍स्य व्‍यवसाय विभागाने शेतक-यांसाठीच्‍या योजना समन्‍वयाने राबवाव्‍या- जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

0

पुणे,- कृषी विभाग आणि मत्‍स्य व्‍यवसाय विभागाने शेतक-यांसाठीच्‍या योजना एकत्रितरित्‍या आणि समन्‍वयाने राबवाव्‍यात, अशा सूचना जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्‍या. जिल्‍हाधिकारी कार्यालयात नीलक्रांती योजना जिल्‍हा सुकाणू समितीच्‍या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री, निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, मत्‍स्‍्यव्‍यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्‍त अभय देशपांडे, सहायक आयुक्‍त अविनाश नाखवा, मत्‍स्य  व्‍यवसाय विकास अधिकारी जनक भोसले, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, जिल्‍हा अग्रणी बँकेचे किरण अहिरराव, प्रशासन अधिकारी प्रशांत दीक्षीत, कृषी अधिकारी तुषार तांदळे आदी उपस्थित होते.

जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम म्‍हणाले,  शेतक-यांचे उत्‍पन्‍न वाढावे, यासाठी विविध योजना आहेत. कृषी विभाग, पशुसंवर्धन, मत्‍स्य व्‍यवसाय विकास आदी विभागांनी समन्‍वयाने आणि एकत्रितरित्‍या योजनांची अंमलबजावणी केल्‍यास शेतक-यांना त्‍याचा लाभ होऊ शकतो. शेतीबरोबरच पूरक व्‍यवसायामुळे उत्‍पन्‍नात  वाढ होऊ शकते. देशाला अन्‍न सुरक्षा प्रदान करण्‍यासाठी, शेती आणि शेतीपुरक उत्‍पादनांमध्‍ये वाढ होण्‍यासाठी विविध विभागांच्‍या योजना साह्यभूत ठरु  शकतात.

देशात उपलब्‍ध असलेल्‍या भूजलाशयीन व सागरी क्षेत्रातील संसाधनांचा पूर्ण क्षमतेने वापर करुन मत्‍स्योत्‍पादनात वाढ करणे हा नीलक्रांती योजनेचा उद्देश असल्‍याची माहिती सहायक आयुक्‍त अविनाश नाखवा यांनी दिली. नीलक्रांती योजनेंतर्गत गोड्या पाण्‍यातील योजना राबविण्‍यात येतात. नवीन तळी बांधकाम, तळ्यांची दुरुस्‍ती, नूतनीकरण व पुनरुज्‍जीवन, मत्‍स्यबीज उत्‍पादन केंद्रांची स्‍थापना, नवीन नौका व जाळी खरेदी करणे आदींचा त्‍यात समावेश आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, महिलांच्‍या सहकारी संस्‍था यांना प्रकल्‍प किंमतीच्‍या 60 टक्‍के मर्यादेपर्यंत अनुदान देय राहील, असे त्‍यांनी सांगितले.

महिंद्राची नवी S201गाडी XUV300 फेब्रुवारीत बाजारात येणार

0

ठळक वैशिष्ट्ये:

  • सर्वंकष पॅकेज समाविष्ट

(1) वेधक, चित्त्यापासून प्रेरित डिझाइन (2) गाडी चालवण्याचा पुरेपूर आनंद देणारी कामगिरी(3) श्रेणीतील पहिलीवहिली हाय-टेक वैशिष्ट्ये (4) श्रेणीतील सर्वोत्तम सुरक्षितता (5) श्रेणीतील ठळक इंटिरिअर

  • पेट्रोल व डिझेल अशा दोन्ही प्रकारांत उपलब्ध
  • फेब्रुवारी 2019 च्या पूर्वार्धात दाखल करणार

मुंबई: महिंद्रा अँड महिंद्रा लि. (एमअँडएम) या 20.7 अब्ज डॉलर उलाढाल असणाऱ्या महिंद्रा समूहाचा भाग असणाऱ्या कंपनीने मोठ्या प्रतीक्षेत असणाऱ्या आपल्या नव्या, S201 असे कोडनेम असणाऱ्या वाहनाचे नाव जाहीर केले आहे – XUV300 (XUV, 3 डबल ‘Oh’ असा उच्चार).

XUV300 ने 2015 मध्ये दाखल झाल्यापासून, 50+ देशांत 260,000 वाहनांची विक्री करणाऱ्या सांगयोंग तिवोली या जगभर प्रसिद्ध असणाऱ्या उत्पादनाच्या तोडीचे स्थान मिळवले आहे. तिवोलीनेही सुरक्षा व अर्गोनॉमी यासाठी विविध पुरस्कार जिंकले आहेत, जसे 2015 केएनसीएपी (कोरिअन न्यू कार असेसमेंट प्रोग्रॅम) कडून ऑटोमोटिव्ह सेफ्टी टेस्टमधील ग्रेड 1 (हायेस्ट) सेफ्टी अवॉर्ड.

XUV300 मध्ये चित्त्यापासून प्रेरित डिझाइन, चित्त्यासारखी चपळता, थरारक कामगिरी व आधुनिक तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये यामुळे, XUV500 चे गुणविशेष कायम ठेवण्यात आले आहेत. XUV300चे हेडलॅम्प फॉग लॅम्पशी एकात्मिक होत असल्याने चित्त्याप्रमाणे टिअर-डक्ट दिसून येते, तर व्हील आर्क चित्त्याच्या मागील भागापासून प्रेरित आहेत. आधुनिक ग्रिल, स्कल्पेड बॉनेट, दणकट शोल्डर व बॉडीलाइन, तसेच वेधक ऐट यामुळे XUV300 रस्त्यावर आकर्षक व राकट दिसते. याबरोबर, ड्युएल एलईडी डीआरएल व ठळक एलईडी टेल लॅम्प यामुळे गाडीचे रूप अधिक खुलते व तिची खास ओळख निर्माण होते.

नावाचे अनावरण करण्याच्या निमित्ताने बोलताना, एमअँडएम लि.चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन गोएंका यांनी सांगितले, “मराझ्झो व अल्तुरास जी4 या वाहनांनंतरची, महिंद्रा वाहनांच्या अत्याधुनिक वाहनांमधली XUV300 ही नवी गाडी आहे. आमच्या नव्या गाड्या उत्कृष्ट इंजिनीअरिंगमधून निर्माण झाल्या आहेत आणि त्या जागतिक व्यासपीठावर तयार करण्यात आल्या आहेत. XUV500 ने ग्राहकांच्या मनात स्थान मिळवले आहे आणि आता XUV300 च्या निमित्ताने, XUV या ब्रँडने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वाहनांचा संपूर्ण परिवारच सादर केला आहे.”

 एमअँडएम लि.चे ऑटोमोटिव्ह सेक्टरचे अध्यक्ष राजन वधेरा यांनी नमूद केले, “XUV300 हे पूर्णतः नवे उत्पादन असून ते जागतिक व्यासपीठावर साकारलेले आहे आणि त्यामध्ये या श्रेणीतील अनेक पहिलीवहिली वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. XUV300 चे आकर्षक, चित्त्यापासून प्रेरित असलेले डिझाइन, गाडी चालवण्याचा पुरेपूर आनंद देणारी कामगिरी, या श्रेणीतील सर्वोत्तम सुरक्षितता आणि या श्रेणीत उठून दिसणारा अंतर्भाग यामुळे ही गाडी आकर्षक व सर्वंकष असे परिपूर्ण पॅकेज ठरते आणि ते ग्राहकांना नक्की आवडेल. आम्ही XUV300 पेट्रोल व डिझेल अशा दोन्ही पर्यायांत उपलब्ध करणार आहोत.”

XUV300 चे उत्पादन महाराष्ट्रातील नाशिक येथील कंपनीच्या उत्पादन प्रकल्पामध्ये केले जाणार आहे आणि ही गाडी फेब्रुवारी 2019 च्या पूर्वार्धात दाखल केली जाणार आहे.

महिंद्राविषयी

20.7 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या या कंपन्यांच्या समूहाचा नेहमीच प्रयत्न असतो की, नावीन्यपूर्ण वाहतूक सुविधांद्वारे लोकांचा उदय होण्यासाठी सक्षम केले पाहिजे, ग्रामीण भागात भरभराट झाली पाहिजे, शहरातील जीवनशैली सुधारली पाहिजे आणि व्यवसायाची कार्यक्षमता वाढली पाहिजे. त्यामुळे लोकांना चालना मिळून त्यांचा विकास होईल. समूह भारतात युटिलिटी व्हेइकल्स, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा व व्हेकेशन ओनरशिप यामध्ये आघाडीच्या स्थानी आहे व व्हॉल्युमच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी आहे. कृषिव्यवसाय, एअरोस्पेस, कम्पोनंट्स, सल्ला सेवा, संरक्षण, ऊर्जा, औद्योगिक उपकरणे, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट, स्टील, रिटेल, व्यावसायिक वाहने व दुचाकी व्यवसायांतही अग्रेसर आहे. मुंबईत मुख्यालय असलेल्या महिंद्रामध्ये 100 देशांत अंदाजे 240,000 कर्मचारी आहेत.

मला निमंत्रण नसताना मेट्रो भूमिपूजन सोहळ्याला मी जाणार कसा ? : खा.संजय काकडे

पुणे-पुण्यातील मेट्रो ३ मार्गिकेच्या भूमिपूजन सोहळ्यात अनुपस्थित राहणारे भाजपाचे राज्यसभेतील सहयोगी खासदार संजय काकडे यांनी ,’मला पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्याचे निमंत्रण नव्हते तर मी कसा जाणार ..? असा प्रश्न उपस्थित केल्याने भाजपच्या अंतर्गत गोटातील ‘खेचाखेचीचे ‘ राजकारण स्पष्ट झाले  आहे .एकीकडे अशा पद्धतीने काकडे यांना डावलण्याचे कारस्थान भाजपमध्ये होता असताना भाजपचाच सूर आवळत काकडे यांनी ..मात्र …. ‘माझे मेरिट पाहता भाजपा लोकसभा लढविण्याची मलाच संधी देईल,’ असे वक्तव्य केले आहे . शेतकरी कर्जमाफी चा विषय भाजपने पूर्वीच करायला हवा होता ..असे यावेळी पष्ट करून  पक्षाच्या कार्यपद्धतीवर  एक प्रकारे नाराजीच व्यक्त केली आहे .

आज सकाळी पुण्यातील एका हॉटेल मध्ये नेहमी रंगणाऱ्या सर्वपक्षीय गप्पांच्या कट्ट्यावर खासदार संजय काकडे आणि अन्य पक्षांचे नेते,कार्यकर्ते जमले असताना एका वृत्त वाहिनीने यावेळी सर्वांना प्रश्न करीत लोकसभेच्या पुण्यातील जागांबाबत चर्चा घडविली .यावेळी संजय काकडे यांनी हि मते व्यक्त केली .

 पुण्याचा भावी खासदार कोण ? यावर  संजय काकडे, मोहन जोशी, राष्ट्रवादी प्रवक्ते अंकुश काकडे, शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे , भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक गोपाळ चिंतल आदी नेतेमंडळी उपस्थित होती. ‘ब्रेकफास्ट पे चर्चा’वर या नेत्यांमध्ये राजकीय गप्पांचा फड रंगला. पुण्याचा भावी खासदार कोण, याप्रश्नावर संजय काकडे म्हणाले, मी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून पुण्याची जागा लढवणार आहे. माझा मेरिट पाहता पक्ष मला संधी देईल आणि मी आता पर्यंत दीड लाख सभासद केले आहे. मी आता जनतेमधून संसदेत जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.मंगळवारच्या भूमिपूजन सोहळ्यात संजय काकडे अनुपस्थित होते. मुंबईतदेखील भाजपाने सहयोगी पक्षांना निमंत्रण दिले नव्हते आणि पुण्याच्या कार्यक्रमाला मला बोलवलं नाही म्हणून गेलो नाही, असे काकडे यांनी सांगितले.दरम्यान, संजय काकडे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. राम मंदिराचं राजकारण सोडून आता भाजपाने विकासाकडे वळलं पाहिजे असा घरचा अहेर त्यांनी दिला होता.

यावेळी ,त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना , राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या वाढदिवसाला आपण दरवेळी त्यांची भेट घेतो तशी यावेळी घेतली. त्यात काही राजकीय कारण नव्हते असे स्पष्ट करत …भाजप मलाच लोकसभेची उमेदवारी देईल ..त्यामुळे अन्य पक्षांकडे मला जाण्याची वेळ येआणार नाही याचा पुनरुच्चार हि त्यांनी केला .मी भाजपकडून इच्छूक आहे. माझे मेरिट पाहता माझ्याशिवाय निवडून येणारा भाजपमध्ये कोणी आहे असे मला वाटत नाही. त्यामुळे तिकीट मलाच मिळणार,” असे संजय काकडेंनी सांगितले. “मी काही सर्व्हे केला नाही पण माझ्या कार्यकर्त्यांनी तो केला आहे. त्यानुसार 72 टक्के पुणेकरांनी मला पसंती दिली आहे. उरलेल्या 28 टक्क्यांमध्ये इतर सर्व शिरोळे, बापट आदी उमेदवार आहेत,” असेही त्यांनी सांगितल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. तिकीट कोणाचेही घेऊन मी लढलो तरी तीन लाख मतांनी मी निवडून येणार. 2019 मध्ये पुण्याचा खासदार मीच होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संजय काकडे यांच्या या बॅटिंगनंतर राष्ट्रवादीचे अंकुश काकडे यांनी त्यांना चिमटा काढला. `निवडणूक आयोगाने परवानगी दिली तर संजय काकडे दोन तिकिटांवर निवडणूक लढवू शकतात, असा टोला त्यांनी लगावला. “उमेदवारी ठरवण्याची एक व्यवस्था भाजपकडे आहे. इच्छा कोणीही व्यक्त करू शकते. पक्ष ठरवेल त्यालाच उमेदवारी मिळेल,” असे भाजप नगरसेवक गोपाळ चिंतल यांनी सांगितले.

मोहन जोशी यांनी सांगितले की काँग्रेसमध्ये नेहमी निष्ठावंतांना संधी मिळते. त्यामुळे आता इच्छुकांची गर्दी वाढली असली तरी त्याची चिंता आम्हाला नाही. पुण्यात भाजपचा खासदार दुसऱ्यांदा निवडून येत नाही हा इतिहास आहे. अण्णा जोशी दुसऱ्यांदा उभे राहिले आणि पडले. प्रदीप रावत 99 ला निवडून आले 2004 ला पडले. अनिल शिरोळे देखील 2014 मध्ये निवडून आले 2019 मध्ये त्यांचा पराभव होईल.

आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत यार्डी, टिएटो संघांचा विजय

0
पुणे- आयडीयाज्‌ अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत यार्डी संघाने सिटी संघाचा तर टिएटो  संघाने सिनरझीप संघाचा पराभव करत विजय संपादन केला.

व्हिजन क्रिकेट अकादमी मौदान येथे झालेल्या सामन्यात अमित राडकरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर यार्डी संघाने सिटी संघाचा 9 गडी राखुन दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना मोद दवंडे व पंकज लालगुडे यांच्या अचूक गोलंदाजीने सिटी संघाचा डाव 20 षटकात सर्वबाद 101 धावांत रोखला. 101 धावांचे लक्ष अमित राडकरच्या 53 धावांसह यार्डी संघाने 14 षटकात  केवळ 1 गडी गमावत 102 धावांसह सहज पुर्ण केले. प्रतिक शिंदे नाबाद 28 धावा करून अमितला सुरेख साथ दिली. 46 चेंडूत 53 धावा करणारा अमित राडकर सामनावीर ठरला.
दुस-या लढतीत चेतन पिंगळेच्या अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर टिएटो  संघाने सिनरझीप संघाचा 34 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना गणेश अंब्रेच्या 36, अंकित जैनच्या नाबाद 31 व चेतन पिंगळेच्या 29 धावांसह टिएटो संघाने 20 षटकात 7 बाद 154 धावा केल्या. 154 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विक्रम माळीच्या आक्रमक गोलंदाजीपुढे सिनरझीप संघ 20 षटकात 8 बाद 120 धावांत गारद झाला. चेतन पिंगळे सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी  
सिटी- 20 षटकात सर्वबाद 101 धावा(अमित पांडे 25(17), रोहित उपाध्याय 21(19), फाजलीन अहमद 23(19), प्रमोद दवंडे 3-16, पंकज लालगुडे 2-15) पराभूत वि यार्डी – 14 षटकात 1 बाद 102 धावा(अमित राडकर 53(46), प्रतिक शिंदे नाबाद 28(29), फजलीन अहमद 1-15) सामनावीर- अमित राडकर
यार्डी संघाने 9 गडी राखुन सामना जिंकला.
 
टिएटो- 20 षटकात 7 बाद 154 धावा(गणेश अंब्रे 36(30), अंकित जैन नाबाद 31(30), चेतन पिंगळे 29(15), पंकज इसरका 2-28, रामेश्वर केंद्रे 2-15) वि.वि सिनरझीप- 20 षटकात 8 बाद 120 धावा(जगदीप पठारे 37(40), प्रसाद नागमणी 21(20), विक्रम माळी 2-23) सामनावीर- चेतन पिंगळे
टिएटो  संघाने 34 धावांनी सामना जिंकला.  

विशेष मुले,बालरुग्ण आणि दिव्यांगांनी अनुभवला ‘ ख्रिसमस पार्टी ‘ चा आनंद !

0
‘रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल ‘ चा सलग १५ व्या वर्षी उपक्रम 
पुणे :खेळ, संगीत, खाऊ आणि सांताक्लॉजने दिलेल्या गिफ्टस् अशा वातावरणात विशेष मुले ,बालरुग्ण आणि दिव्यांगांनी  आनंद लुटला !
निमित्त होते रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल आयोजित ‘ ख्रिसमस पार्टी ‘ चे.
कॅम्पमधील ‘ द लेडीज क्लब ‘ येथे ही ‘ ख्रिसमस पार्टी ‘ मंगळवार दि. १८ डिसेंबर रोजी सायंकाळी झाली.
विविध हॉस्पिटल मधील असाध्य विकारांनी पीडित लहान मुले, मूकबधीर शाळातील विद्यार्थी, दिव्यांग, मनोरुग्ण, तसेच अनाथगृहातील २५०  मुले या पार्टीत सहभागी झाली. नवक्षितीज, एकलव्य फाऊंडेशनमधील मुलेही सहभागी झाली.
रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल चे अध्यक्ष रवी कपूर, इनरव्हील क्लब च्या अध्यक्ष् आशा नायक, अनील बोरा यांनी स्वागत केले. ‘ द लेडीज क्लब ‘ तसेच सतीश शेट्टी यांनी सहकार्य केले.
या उपक्रमाचे हे पंधरावे वर्ष होते.

ख्रिश्चन लीगल असोसिएशन पुणेच्यावतीने ख्रिसमस आनंद मेळावा साजरा

0

पुणे-ख्रिश्चन लीगल असोसिएशन पुणेच्यावतीने वकील बांधवांचा आनंद  मेळावा साजरा झाला . रास्ता पेठ मधील सिटी चर्चमध्ये झालेल्या या ख्रिसमस आनंद मेळाव्याचे आयोजन ऍड जॉन रॉड्रिक्स , पास्टर बरनवाज  सुंदरराजन , ऍड संजय साळवी , ऍड के व्ही त्रिभुवन , ऍड सॅमसन अँड्रूज , ऍड प्रताप साबळे , ऍड एस एम देव , ऍड अनुपमा जोशी , डॉ मॅनवेल डिसोझा , ऍड फ्रान्सिस भोसले , ऍड अँथोनी बनसोडे, ऍड अँजीलिना कांबळे , ऍड मेरी जोसेफ , ऍड टी डी आयझॅक  , ऍड एस एस काळे , ऍड संपत  कांबळे , ऍड  जॉन रिजारू , ऍड बाजीराव दळवी , ऍड  बाळासाहेब चोकर , ऍड  संगीता मेनजेस , ऍड  मार्क परमार , ऍड अँथोन कदम , ऍड  लुईस तिलोरे , ऍड स्टेला मेंडीस , ऍड  आर जे डिसिल्वा , ऍड  समीर मनतोडे , ऍड  संगीता फर्नांडिस , ऍड  विजयन भास्करन , ऍड  ब्रिजेस मेंडिस , ऍड नॉवेल फर्नाडिस  आदी ख्रिस्ती समाजातील वकील बांधव व राजेश नायर , निकी मार्टिन , अँथोनी मस्किटा, दीपक कदम, स्मिता नायडू , मॅथ्यू आर्लेंड  आदी मान्यवर उपस्थित होते .

प्रत्येक चर्चमध्ये कायदेशीर सल्लागार या पदावर ख्रिस्ती वकिलाची नेमणूक झाली पाहिजे , तसेच चर्चच्या कायदेशीर अडचणी सोडविण्यासाठी ,  ख्रिश्चन लीगल असोसिएशन मदत करेल , ख्रिस्ती समाजबांधवांच्या कायदेशीर अडचणी सोडविण्यासाठी ख्रिश्चन लीगल असोसिएशन लीगल डेस्क सुरू करणार , सोशल मीडियाचा माध्यमातून ख्रिस्ती समाजातील वकील बांधवानी एकत्र आणले जाईल , तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून अडचणी सोडविण्यासाठी वकिलांनी संपर्कात राहावे . आदी विषयांवर चर्चा करण्यात आली .

ख्रिश्चन लीगल असोसिएशन हे देशात कार्यरत राहणार ख्रिस्ती वकील बांधवांची संघटना असून १८ राज्यात ९१ शहरात एक हजार व्यावसायिक वकील बांधव ख्रिश्चन लीगल असोसिएशनचे सदस्य आहेत . अशी माहिती  ऍड जॉन रॉड्रिक्स यांनी दिली .