विद्यार्थ्यांनी संशोधनावर भर द्यावा- उषा टिळेकर
मुनगंटीवार आणि लोढा यांच्या हस्ते शिल्पकार राम सुतार यांचा सत्कार
मुंबई-मुंबई. स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून जगातली सर्वात मोठी सरदार पटेल यांची मूर्ती बनवून पद्मभूषण राम सुतार यांनी जगातील भारताचा गौरव वाढवला आहे. सुतार हे ‘भारताचे कोहिनूर’ आहेत आणि आपल्याला सर्वांना त्यांचा जाहीर सत्कार करण्याची संधी मिळाली ही गर्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्राचे वित्त आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी असे वक्तव्य विश्व प्रसिद्ध शिल्पकार पद्मभूषण सुतार यांचा सन्मान करताना केले. सुतार यांचा मुंबईच्या ५० हून अधिक सामाजिक संस्थांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुनगंटीवार आणि भाजपचे वरिष्ठ आमदार मंगल प्रभात लोढा यांनी सुतार यांना सरस्वती देवीची प्रतिमा आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. प्रसिद्ध पुस्तक ‘परमवीर’च्या लेखिका श्रीमती मंजू लोढा यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
मकर संक्रातीच्या मुहूर्तावर हा सत्कार समारंभ ‘लोढा वर्ल्ड टॉवर’मध्ये आयोजित करण्यात आला होता. जगातील सर्वात मोठी मूर्ती निर्माण करणाऱ्या राम सुतार यांचा सत्कार ‘वर्ल्ड टॉवर’ बिल्डींगमध्ये होत आहे, ही एक अद्भुत गोष्ट असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले. आपल्या सत्कार प्रसंगी पद्मभूषण शिल्पकार राम सुतार यांनी सरदार पटेल यांची जगातील सर्वात उंच मूर्ती आणि आपल्या सर्व रचनांचं श्रेय भारतीय संस्कृती आणि परंपरेला दिलं. या समारंभात आमदार लोढा म्हणाले की, जगातील सर्वात उंच पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे शिल्पकार राम सुतार हे सरळ, सामान्य असूनही महान आणि उच्च व्यक्तिमत्वाचे धनी आहेत, यांचा सत्कार आमच्या सर्वांच्या हातून होत आहे. ही एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.
या कार्यक्रमात ५०हून अधिक देशातील प्रतिष्ठित व्यक्ती, सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला मुंबईतील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती. यावेळी युनियन बँक ऑफ इंडियाचे चेअरमन केवल हांडा आणि राजेंद्र जाधव व्यासपीठावर उपस्थित होते. लोढा फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली डॉ. द्वारकानाथ कोटणीस रिसर्च ब्यूरो आणि लाडले इन्फो यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात कला-संस्कृती समाजसेवक आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
नामदेव ढसाळ यांच्या साहित्याने आंबेडकर चळवळीला आकार देण्याचे महत्वपूर्ण काम केले-आमदार भाई जगताप
पुणे-पदमश्री नामदेव ढसाळ यांच्या साहित्याने आंबेडकर चळवळीला आकार देण्याचे महत्वपूर्ण काम केले असल्याचे कामगार नेते व आमदार भाई जगताप यांनी व्यक्त केले . दलित पँथरच्यावतीने पुणे कॅम्प भागातील नेहरू मेमोरियल हॉल मध्ये पदमश्री नामदेव ढसाळ यांच्या पाचव्या स्मृती अभिवादन सभेत ते बोलत होते . या अभिवादन सभेस दलित पँथरचे केंद्रीय कार्याध्यक्ष यशवंत नडगम , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ घनश्याम भोसले , कार्याध्यक्ष अल्ताफ सय्यद ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष व नगरसेवक चेतन तुपे , नगरसेविका लता राजगुरु , दादासाहेब सोनवणे , सुरेश केदारे , बाळासाहेब पडवळ , अमित जावळे , भीमराव जाधव , सुनील शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते .
आमदार भाई जगताप यांनी सांगितले कि , पदमश्री नामदेव ढसाळ यांनी शोषित पिढीत व कामगार चळवळीसाठी मोठा सामाजिक लढा दिला . त्यांनी पँथर्सचा दरारा निर्माण केला होता . त्या माध्यमातून त्यांनी दलित , कामगार चळवळीला न्याय मिळवून देण्याचे काम केले . त्यांची कार्याची महती या समाजात टिकवून ठेवण्यासाठी आपण त्यांचे आंबवडे येथील स्मारक उभारणीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले .
यावेळी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले कि , दलित पँथरची स्थापन नामदेव ढसाळ यांनी संघर्षातून झाली आहे . देशातल्या गोरगरीब , कष्टकरी जनता व दलित बांधवाना न्याय देण्याचे काम नामदेव ढसाळ यांनीदलित पँथरच्या चळवळीतून केले . समाजातील तळागाळातील माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क त्यांनी मिळवून दिला . त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण हा पँथर्सच्या भूमिकेतून काम करू लागला . त्यातुन समाजाला न्याय मिळवून देऊ लागला .
यावेळी दलित पँथरचे केंद्रीय कार्याध्यक्ष यशवंत नडगम यांनी सांगितले कि , पदमश्री नामदेव ढसाळ यांनी दलित पँथरच्या माध्यमातून समाजात समता प्रस्थापित करण्याचे काम केले . परंतु आताचे राज्यकर्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेली घटना बदलायला निघाले आहेत , परंतु दलित पँथर हे कदापिही होऊ देणार नाही . दलित पँथर समाजातील लोकांना त्यांच्या हक्कांसाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढतच राहिल.
या कार्य्रक्रमात उपस्थितांचे स्वागत व अभिवादन सभेचे प्रास्ताविक दलित पँथरचे केंद्रीय कार्याध्यक्ष यशवंत नडगम यांनी केले तर सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले तर आभार दलित पँथरचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष अल्ताफ सय्यद यांनी मानले .
मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल
संकटांना सामोरे जाणे यातच खरे शौर्य – मधुसूदन सुर्वे
‘यशस्वी’ संस्थेच्या शौर्य चक्र विजेत्यांशी थेट संवाद*
पुणे : संकटांना घाबरून न जाता धैर्याने त्याला सुमारे जाणे यातच खरे शौर्य असते, असे मत शौर्य चक्र विजेते मधुसूदन सुर्वे यांनी व्यक्त केले. यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या वतीने मकर संक्रातीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘वुई सॅल्यूट रिअल हिरोज’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, सीमेवर देशरक्षणासाठी लढत असताना शत्रूच्या रूपात स्वतःचा मृत्यू समोर असताना देखील भारतीय सैनिक आपल्या कर्तव्यापासून तसूभरसुद्धा ढळत नाही, उलट त्या क्षणी त्याच्यात जास्त प्रमाणात बळ संचारते आणि प्रसंगी प्राणांची आहुती देऊनही आपले देश रक्षणाचे कार्य सैनिक करत असतो,विद्यार्थी मित्रांनो अगदी त्याचप्रमाणे शिक्षण घेऊन जेव्हा तुम्ही आपल्या नोकरी व्यवसायात एखाद्या संकटाला सामोरे जाल तेव्हा तुमचा सामोर भारतीय सैन्याचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन शौर्य दाखवा, शुरपणा अंगी बाणवा तरच तुम्ही तुमच्यातील उत्तम जगाला देऊ शकाल. यावेळी त्यांनी मणिपूर येथील ऑपरेशन इफाजत च्या वेळेस आंतकवाद्यांशी झालेल्या चकमकीच्या प्रसंगाची आठवण सांगत आपल्या लष्करी जीवनातील विविध रोमहर्षक अनुभव सांगितले. त्यांचे हे अनुभव ऐकून विद्यार्थी व शिक्षक भारावून गेले. यावेळी यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सचे संचालक डॉ.मिलिंद मराठे, ‘यशस्वी’संस्थेचेअधिष्ठाताडॉ.राजेंद्र सबनीस, राष्ट्रीय सैनिक प्रांताध्यक्ष प्रताप भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते.
व्हॅस्कॉन व मनीषा कन्स्ट्रक्शन्स यांच्यातर्फे सायट्रॉन प्रकल्पाची दुसरी फेज सादर
‘सायट्रॉन’च्या विकास व्यवस्थापनात व्हॅस्कॉन व मनीषा कन्स्ट्रक्शन्स संयुक्तरीत्या सहभागी; सदनिकांसाठी नावनोंदणी 18 जानेवारीपासून सुरू; दोन टॉवर्समध्ये मिळून 1 व 2 बीएचकेच्या 258 सदनिका;470 चौरस फूट व 656 चौरस फुटांची वापरता येण्याजोगी जागा; सर्वसमावेशक किंमत – 1 बीएचकेः 30.5 लाख रु. आणि 2 बीएचकेः 42.30 लाख रु.
पुणे: व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि. (बीएसइ स्क्रिप VASCONEQ) आणि मनीषा कन्स्ट्रक्शन्स या पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रातील दोन नामवंत व विश्वासार्ह कंपन्यांनी वाघोली येथे होणाऱ्या त्यांच्या सायट्रॉन या गृहप्रकल्पाची घोषणा आज येथे केली. व्हॅस्कॉन व मनीषा कन्स्ट्रक्शन्स या दोन्ही कंपन्या ‘सायट्रॉन’च्या विकास व्यवस्थापनात संयुक्तरित्या सहभागी असणार असून त्यातील सदनिकांच्या नावनोंदणीचे कामकाज येत्या 18 जानेवारी रोजी सुरू होणार आहे. ‘सायट्रॉन’च्या ‘फेज-2’मध्ये दोन टॉवर्समध्ये मिळून 258 सदनिका असतील. बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असणाऱ्या 1 व 2 बीएचके स्वरुपाच्या या सदनिकांमधील वापरता येण्याजोगे क्षेत्रफळ अनुक्रमे 470 चौरस फूट व 656 चौरस फूट असणार आहे. 1 बीएचके सदनिकेची सर्व कर व शुल्कांसहीत किंमत 30.5 लाख आणि 2 बीएचके सदनिकेची किंमत 42.30 लाख रुपये असेल. वातानुकूलित क्लब हाऊस, अत्याधुनिक जिम्नॅशियम, स्विमिंग पूल, मुलांसाठी खेळण्याची जागा, पार्टी लॉन, स्पोर्ट्स फॅसिलिटी आणि बहुउद्देशीय हॉल अशा काही उत्तमोत्तम सुविधा या प्रकल्पात उपलब्ध असतील.
नव्या प्रकल्पाविषयी माहिती देताना ‘मनीषा कन्स्ट्रक्शन्स’चे संचालक अभिषेक खिंवसरा म्हणाले, ‘’पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये मनीषा कन्स्ट्रक्शन्स हे नाव गेल्या पाच दशकांहून अधिक काळ दबदबा राखून आहे. पुण्यात आमच्या कंपनीने अनेक वैशिष्ट्यपूर्ण बांधकामे केली आहेत. व्हॅस्कॉन इंजिनिअर्सशी आमचा सहयोग हाही पूर्वीपासूनचा आहे. सायट्रॉन प्रकल्पाच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा एकत्र आलो आहोत आणि ग्राहकांना उत्कृष्ट सदनिका देण्यास कटिबद्ध आहोत.’’
व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ वासुदेवन म्हणाले, ‘’सायट्रॉन प्रकल्पाच्या दुसऱ्या फेजमध्ये मनीषा कन्स्ट्रक्शनशी सहयोग करताना आम्हाला आनंद होत आहे. यापूर्वी सायट्रॉनच्या पहिल्या फेजला ग्राहकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आमचा हुरूप वाढून आम्ही दुसऱ्या फेजची निर्मिती करीत आहोत. गेली तीन दशके आमच्यासमवेत असणाऱ्या ग्राहकांचे आम्ही आभार मानतो. यापुढेही त्यांच्या पैशाचा मोबदला पुरेपूर देण्यासाठी आम्ही आमच्या प्रत्येक प्रकल्पामध्ये प्रस्थापित निकष राबवून त्यांना संपूर्ण समाधान देऊ.’’सायट्रॉन हा गृहनिर्माण प्रकल्प पाच एकर जागेत सामावला आहे. तीन फेजमध्ये तो पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पहिल्या फेजचे काम पूर्ण होऊन 2017 मध्ये तो ग्राहकांना वितरीत करण्यात आला. दुसऱ्या फेजचे काम 18 जानेवारी 2019 रोजी सुरू होईल. तिसऱ्या फेजचे काम काही काळाने हाती घेण्यात येईल.
वाघोली हा भाग पुणे-नगर महामार्गावर असून खराडी आयटी हबपासून जवळ आहे. या ठिकाणी रिअल इस्टेट, मूलभूत सोयी-सुविधा आणि शैक्षणिक संस्था यांचा जलद विकास झालेला आहे. एकेकाळी हा भाग औद्योगिक स्वरुपाचा होता, मात्र आता गुंतवणूकदार व ग्राहक या दोघांच्या प्रतिसादांमुळे येथे निवासी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर उभे राहिले आहे. वाघोली हा भाग नगर रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी असून येथून विमानतळ, पुणे रेल्वे स्थानक, सोलापूर महामार्ग आणि शिक्रापूर-चाकण रस्ता येथे सहजरित्या जाता येते. परवडणारे दर, सामाजिक सोयी-सुविधा आणि आयटी उद्योगांची नजीकता या वैशिष्टयांमुळे वाघोली परिसरात विकसक, गुंतवणूकदार व घर खरेदी करणारे ग्राहक यांचा नेहमीच राबता असतो.
‘व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि.’विषयी:‘व्हॅस्कॉन इंजिनीअर्स’चे मुख्य कार्यालय पुण्यात आहे. शेअर बाजारात नोंदणी असलेल्या पहिल्या काही रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये ‘व्हॅस्कॉन’चा समावेश होतो. गेल्या 30 वर्षांत कंपनीने निवासी, औद्योगिक बांधकामे, आयटी पार्क, मॉल, मल्टीप्लेक्स, हॉस्पिटॅलिटी व समाज विकास केंद्रे असे विविध दोनशेहून अधिक प्रकल्प देशभरातील सुमारे 30 शहरांमध्ये उभे केले आहेत. यातील काही कामे स्वतःची आहेत, तर काही ‘इपीसी’च्या माध्यमातून केलेली आहेत. यापुढे ‘इपीसी’ पध्दतीच्या कामांवर तसेच परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांवर भर देण्याचे ‘व्हॅस्कॉन’ने ठरविले आहे.
‘मनीषा कस्ट्रक्शन्स’ विषयी:
मनीषा कन्स्ट्रक्शन्सचे नाव ग्राहकांमध्ये दर्जेदार बांधकाम आणि विश्वासार्हता यांमुळे प्रस्थापित झाले आहे. पूर्ण बांधिलकी, ग्राहक केंद्रित धोरण, नावीन्यपूर्ण कल्पना आणि व्यावसायिक कौशल्याद्वारे अनेक वर्षांपासून ही कंपनी ग्राहकांना सेवा देत आहे. गेल्या काही दशकांमध्ये मनीषा कन्स्ट्रक्शन्सने अनेक महत्त्वाचे टप्पे ओलांडले, अनेक ठिकाणी यश मिळविले आणि शेकडो ग्राहकांना समाधान दिले आहे. स्थावर मालमत्ता, मॉल आणि मल्टीप्लेक्स, आतिथ्य आणि आयटी आणि व्यावसायिक क्षेत्रांत या कंपनीचा विस्तृत पोर्टफोलिओ आहे. लोकांच्या जीवनशैलीला अनुसरून योग्य ते बदल घडविण्याची या कंपनीची मानसिकता आहे. त्यामुळेच हा उद्योगसमूह उच्च जीवनशैलीच्या सध्याच्या युगामध्ये अग्रभागी आहे.
५५ विद्यार्थ्यांनी केले ; रंगतदार तबलावादन…
पुणे-भारतीय शास्त्रीय संगीतात तालाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. नुकतीच दि १३-१-१९ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळात व्यास मंदिर ,सदाशिव पेठ इथे जेष्ठ तबलावादक तालभूषण पं नचिकेत मेहेंदळे यांच्या ‘मधुमती संगीत विद्यालया’ तर्फे तबलावादन मैफल सादर झाली.
प्रथम कार्यक्रमाची सुरुवात निवेदिता मेहेंदळे यांनी रचलेल्या ‘देवी शारदे’ या सरस्वतीस्तवनाने झाली .तन्मयी मेहेंदळे हिने गाऊन केली.यावेळी तन्मयी यांना तबला सांगत नचिकेत मेहेंदळे यांची लाभली .तसेच यावेळी १६ मात्रांच्या तीनतालात सिद्धी कराडकर ,विश्वक्सेन होसूर ,सौमित्र देवधर ,अमेय मराठे ,अथर्व जोशी,ओंकार जोशी यांसह एकूण ३३ विद्यार्थ्यांनी ४ गटात सामुहिक वादन केले या मध्ये कायदे ,रेले ,परण ,चक्रधार, मुखडे तुकडे यांचे दमदार सादरीकरण झाले.या वेळी संपतलाल गादिया यांच्या तर्फे पं. नचिकेत मेहेंदळे यांचा सत्कार करण्यात आला.तसेच पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरीबद्दल पत्रकार सुनीत भावे यांचाही सत्कार करण्यात आला.
त्यानंतर ताल झपताल मध्ये मानस भावे ,कैवल्य देशपांडे ,रिषभ खळदकर ,कुणाल निरगुडकर ,पंचम परदेशी ,सोहम जोशी यांनी सामुहिक वादन करून रसिकांना जागीच खीळवले.त्यानंतर रमेश मंगळूरकर यांनी तीनतालात स्वतंत्र तबलावादन केले.त्याला जोडून तन्मयी मेहेंदळे हिने निघालो घेऊन दत्ताची पालखी हा अभंग सादर केला .त्यानंतर तीनतालात अतिशय अभ्यासपूर्ण वादन सिद्धेश साठे आणि ओंकार देवकुळे यांनी सादर करून रसिकांची वाहवा मिळविली.
त्यानंतर वाजवण्यास अतिशय अवघड असा १५ मात्रांच्या पंचम सवारी तालात मेहुल गादिया आणि निखील बोऱ्हाडे यांनी वादन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.त्यानंतर हेमंत गोडबोले आणि हृषीकेश खाडे यांनी तीनतालात वादन सादर केले.त्यात रेलेत तुकडे मुखडे परण पेशकार सादर केले.सर्व विदयार्थ्यांना लेहेर्याची साथसांगत हार्मोनियमवर पं प्रमोद मराठे यांचे शिष्य , देवेंद्र देशपांडे यांनी केली.या मैफलीचे सूत्रसंचालन तन्मयी मेहेंदळे यांनी केले.या मैफलीस सुनीत भावे, जेष्ठ उद्योजक संपतलाल गादिया,जेष्ठ तबला वादक पं.विजय दास्ताने यांची विशेष उपस्थिती लाभली .मैफलीची सांगता पसायदानाने झाली.
लायन्स व्याख्यानमालेचे रविवारी विजय कुवळेकर यांच्या हस्ते उद्घाटन
‘ सौर ऊर्जा आणि इन्व्हर्टर मधील नवे तंत्रज्ञान ‘ विषयावरील चर्चासत्राला चांगला प्रतिसाद
एम . सी . इ . सोसायटीमधील ‘ जॉब फेअर ‘ ला मोठा प्रतिसाद
शिवसेनेचे साखर संकुलसमोर ‘रसवंती आंदोलन’
पालिका आयुक्तांच्या चारचाकी गाडीला ट्रिपल सीटचा दंड-कारभार पुण्याच्या पोलिसांचा
पुणे-पुणे पोलीस हल्ली ‘वाटमारी ‘ वरून प्रचंड बदनाम होत आहेत . पुणे पोलिसांची कधी झाली नव्हती एवढी बदनामी आता वाहनचालकांकडून दंड वसुलीच्या कारभारामुळे होते आहे.त्यात पोलिसांचा आणखी एक अजब कारभाराची भर पडली आहे . पोलिसांनी चक्क चारचाकी गाडीला ट्रिपल सीटची पावती फाडली आहे. हा सर्व प्रकार निगडी मधील सूरज स्वीट येथे घडला असून ही चारचाकी गाडी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांची आहे. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरत आहे.
सविस्तर माहिती अशी की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या एम. एच-१४ सी.एल १५९९ चारचाकी गाडीला वाहतूक पोलिसांनी ट्रिपल सीटचा दंड ठोठावला आहे. यासाठी त्यांना २०० रुपडे दंड आकारण्यात आला. परंतु चारचाकी गाडीला ट्रिपल सीट दंड कसा हा प्रश्न सर्वांना पडला आहे. ही एक अक्षम्य चूक असून वाहतूक पोलिसांनी ती मान्य केली.महानगर पालिका आयुक्त यांच्या गाडीचा नंबर एम.एच-१४ सी.एल १५९९ हा असून सारखाच नंबर एका दुचाकीचा आहे. वाहतूक पोलिसांना सीरियल क्रमांकात डी.एल च्या जागी चुकून सी.एल लिहिले होते. त्यामुळेच आयुक्तांच्या गाडीला पावती फाडली गेली. हा सर्व प्रकार नजरचुकीने झाल्याची कबुली निगडी वाहतूक पोलीस निरीक्षक रवींद्र निंबाळकर यांनी दिली असून ती चूक दुरुस्त करून घेतली जाईल असं सांगितलं आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांच्या सह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
लहानपणाच्या आठवणी आणि कुटुंबांना जोडणारा एक विशेष फेस्ट पुणे स्ट्रीट फेस्ट
या स्ट्रीट फेस्टमध्ये लहान मुलांसाठी बर्याच प्रकारच्या खेळांचे आयोजन केले गेले आहे, ज्यात जिप जॅम अॉन सायकल, पेप्पी जुम्बा बीट्स, हॉपस्कॉचिंग, ड्रम सर्किल, विशाल साप-सीढ़ी, स्व निर्मित अॅडवेंचर, कॅनवास स्प्रे आदिंचा समावेश असेल.
माइंड व्हेंचर्स इंटरनॅशनलचे संस्थापक लकी सुराना द्वारा आयोजित या फेस्टिव्हलला राउंड टेबल इंडिया आणि अर्ली चाइल्डहुड असोसिएशन ने देखील सहयोग दिला आहे. माइंड व्हेंचर्स इंटरनॅशनल ने अधिकारी, प्रशासन, वाहतुक पोलिस आणि विभिन्न स्थानीक लोकांसोबत भागीदारी केली आहे.
महाराष्ट्र सायबर व ‘ॲम्बिस’प्रणालीस हरियाणा शासनाचा राष्ट्रीय डिजिटल इनोव्हेशन अँड सायबर सिक्युरिटी पुरस्कार
मुंबई : हरियाणा शासनातर्फे गुरुग्राम हरियाणा येथे झालेल्या ‘डिजिटल इनोव्हेशन अँड सायबर सिक्युरिटी’ विषयावरील राष्ट्रीय परिषदेत ‘स्मार्ट पोलिसिंग एनिशिएटीव्ह’ या गटात महाराष्ट्र शासनाच्या ‘ऑटोमेटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेटिफिकेशन सिस्टिम (ॲम्बिस) या प्रणालीस आणि महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पास व प्रशिक्षणातील उत्कृष्ट कार्याबद्दल दोन पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
गुडगाव (हरियाणा) येथे आज झालेल्या परिषदेत महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार महाराष्ट्र सायबर टीमने स्वीकारले. यावेळी झालेल्या परिसंवादात ‘नाविन्यपूर्ण संकल्पनेतून प्रशासन’ या विषयावर विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सिंह यांनी सहभाग घेत महाराष्ट्र सायबरच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. यावेळी आयोजित परिसंवादात ‘क्लाऊड कॉम्प्युटिंग, डाटा सेंटर आणि नवीन तंत्रज्ञान’ या विषयावर श्री. ब्रिजेश सिंह यांनी सहभागी होऊन मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र शासनाने सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबरची स्थापना केली आहे. याद्वारे राज्यातील पोलीसांना सायबर गुन्हे रोखण्यासंदर्भात प्रशिक्षण देण्याबरोबरच तांत्रिक सहाय्य केले जाते. गुन्हेगारांचा संपूर्ण डेटा एका ठिकाणी रहावा, गुन्हेगारांच्या ठशांची माहितीचे डिजिटल संकलन व्हावे, जेणेकरून गुन्ह्यांची उकल जलदगतीने होईल, यासाठी ऑटोमेटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेटिफिकेशन सिस्टिम (ॲम्बिस) ही प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीद्वारे सुमारे साडेसहा लाख बोटांचे ठसे डिजिटल स्वरुपात साठविले आहेत. त्याचबरोबर तळहातांचे ठसे, डोळ्यांचे बुबुळ व चेहरा यांचे बायोमेट्रिक नोंद ठेवण्यात आली आहे. सीसीटीएनएस, सीसीटीव्ही आदी यंत्रणांबरोबर ही यंत्रणा जोडण्यात येणार आहे. पोलीस स्टेशन स्तरापर्यंत ‘ॲम्बिस’ प्रणाली राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या सर्व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन इनोव्हेशन अँड सायबर सिक्युरिटी विषयावरील राष्ट्रीय परिषदेत ‘ॲम्बिस’ प्रणालीस व महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पास विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
महाराष्ट्र सायबर चमूतील पोलीस निरीक्षक लक्ष्मण कांबळे ,अविनाश सरवीर, सुरेश मुदगून कार्यालय अधीक्षक प्रविण शिखरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद जोशी, श्रीमती रुपाली गायकवाड, संदीप जाधव, पोलीस हवालदार जालिंदर जगताप, पोलीस शिपाई नवनाथ देवगुडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.








