राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका- गटनेते यांच्यात आरोप प्रत्यारोप
शाळेचे ते दिवस मौजेचे…..
शाळा… आपल्या सगळ्यांच्याच मनातील एक सुखद आठवण. शाळेचे दिवस आजही आठवले तर त्या सुखद सुंदर आठवणींनी मन भरुन येतं. खरंच ते शाळेचे दिवस एखाद्या स्वच्छंदीपणे बागडणा-या फुलपाखरासारखे होते. दादरमधील शारदाश्रम विद्यामंदिर म्हणजे माझी शाळा. दत्तमंदिराचे भव्य सभागृह लाभलेली माझी शाळा. त्याच सभागृहात आमचा पी.टी. चा तास व्हायचा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आणि वार्षिक स्नेहसंम्मेलन सुद्धा.
मे महिना संपून जून महिना सुरु झाला की वेध लागायचे ते 13 तारखेचे. शाळेचा पहिला दिवस कधी येतोय आणि मैत्रिणी कधी भेटताहेत असे झालेले असायचे. वर्गात मैत्रिणीच्या बाजूचीच जागा अडवली जायची आणि मग काय गप्पांना वेळ पुरायचा नाही. मे महिन्यात तू काय केलं आणि मी काय केलं, कुठे कुठे जाऊन आलो अशा खूप काही गप्पा गोष्टी चालायच्या. पण मग काही दिवसांनी वर्गशिक्षिका उंची प्रमाणे जागेवर बसवायच्या. बाईंनी जागा बदलली की मन कुठेतरी खट्टु ही व्हायचे. हिरवा, लाल. पिवळा, निळा, काळा पांढरा अशा रंगांच्या इयत्तेप्रमाणे बदलत जाणा-या रिबीनी आजही आठवतात. त्या रिबीनींच्या रंगावरूनच लगेच ओळखायला यायचं की ती मुलगी कुठल्या इयत्तेत आहे.
खेळांमध्ये जिंकल्यांवर साजरा केलेला आनंद आणि हरल्यावर संपूर्ण वर्गाला झालेले दुःख आजही आठवते. मध्यल्या सुट्टीत मी आणि माझ्या दोन मैत्रिणींनी (माधवी आणि अंबालिका) वाचून काढलेली वि. स. खांडेकरांची उल्का कादंबरी आजही स्मरणात आहे. आमचा अ वर्ग मस्ती करण्यात पटाईत तसाच खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि अभ्यासातही तेवढाच हुशार.
गणित आणि विज्ञानासारखे अवघड विषय सोपे करुन शिकवणा-या भांडारकर बाई, भिडे बाई, पाटील बाई, मराठी आणि संस्कृत शिकवणा-या ताटकर बाई, इंग्रजीची भीती घालवणा-या आमच्या मुख्याधापिका कोल्हटकर बाई, तर शिस्तीचे धडे देणारे शेट्टी सर या सगळयांचे आणि शाळेचे संस्कार नकळत आमच्यावर झालेत. खरचं
शाळेचे ते दिवस मौजेचे
नकळत घडलेल्या संस्काराचे
अभ्यासाचे आणि खेळण्याचे
आठवणीत त्या हरवून जाण्याचे
पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
दहिसर फाटक जवळ,
दहिसर (प.),
मुंबई – 400068
‘कर्करोग निदानाची नवी तंत्रे’ विषयावर व्याख्यान
‘पक्षी संवर्धन ‘ शोधनिबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण
बक्षीस समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून विज्ञान लेखक आनंद घैसास, ‘वनराई’ चे अध्यक्ष रवींद्र धारिया, रोटरी (३१३१)चे माजी प्रांतपाल श्री. प्रशांत देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गर्शन केले.
या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांच्या सदर निबंधांपैकी निवडक निबंधाचे सादरीकरण स्पर्धकांनी या संमेलनात केले . ह्यातील निवडक विद्यार्थ्यांना एकूण 4 लाख रुपयांची शिष्यवृत्ती ह्या स्पर्धेच्या निमित्ताने स्कायसायक्यु संस्थेने दिली.
ज्येष्ठ भरतनाट्य नृत्यांगना श्रीमती सुचेता भिडे -चाफेकर यांचा अरुण फिरोदिया यांच्या हस्ते सत्कार
गिरीश बापटांनी राजीनामा दिलाच पाहिजे – शिवसेना
पुणे -पालकमंत्री व महाराष्ट्र प्रदेशचे नागरी अन्न पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर करून कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी न्यायालयाने त्यांच्यावर ठपका ठेवला आहे.यामुळे त्यांनी नैतिकता स्वीकारून तातडीने मंत्रिपदासह आमदारकीचा राजीनामा द्यायलाच हवा . असे सांगत त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी आज पुण्यात शिवसेनेने केली .कसब्यातील शिवसेनेचे विधानसभेसाठी इच्छुक असलेले उमेदवार आणि नगरसेवक विशाल धनवडे यांनी या निदर्शनाचे आयोजन केले होते .स्वारगेट येथे जेथे चौकात हि निदर्शने करण्यात आली .यावेळी
जिल्हा प्रमुख रमेश कोंडे ,गटनेते संजय भोसले ,सहसंपर्क प्रमुख शाम देशपांडे , गाजनन पंडित ,गाजनन थरकुडे ,उमेश गलींदे ,चंदन साळुंके ,मयूर कडू ,ज्योतिबा शिर्के ,सुरज लोखंडे ,आनंद दवे ,योगेश काकडे ,महेश पोकळे ,कुणाल धनवडे ,राजेश बरगुजे ,राजेंद्र शिंदे ,स्वाती कथलकर ,सुलभा तळेकर ,अमोल देवळेकर ,निरंजन दाभेकर ,रुपेश पवार संदीप गायकवाड संतोष भूतकर ,निलेश ढवळे ,जितू निजमपूरकर, राजेश पळसकर ,उमेश भेलके ,प्रवीण डोंगरे ,हेमंत डाबी ,मकरंद केदारी ,शिरीष आपटे मुकुंद चव्हाण, राहुल जेकटे ,योगेश खेंगरे,निलेश राऊत ज्ञानद कोंढरे परेश खांडके विजया मोहिते मनीषा धारणे ,विनायक धारणे ,हनुमंत दगडे ,वृषाली दुबय्ये ,रेहान खान ,अजिंक्य पांगरे ,सागर भोसले ,योगेश एनपुरे ,आबा कुंभरकर ,स्मिता रांजणे सलमा भाटकर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते .
नारायण राणेंना कॉंग्रेसमध्ये घेण्याचा कोणताही प्रस्ताव नाही : अशोक चव्हाण
सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या कॉंग्रेसमधील स्वगृही परतण्याच्या बातम्या वेगात पसरत असतानाच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.राणे यांना कॉंग्रेसमध्ये घेण्याचा कोणताही प्रस्ताव नाही,असे चव्हाण यांनी आज स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून राणे कॉंग्रेसमध्ये परतणार असल्याच्या चर्चेने जोर पकडला होता.कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीच राणे कॉंग्रेसमध्ये ल़वकरच परततील,असे संकेत दिले होते.पण चव्हाण यांनी असा काही प्रस्तावच नाही,असे सांगत या चर्चांमधील हवा काढून टाकली.राणे यांच्या कॉंग्रेस प्रवेशाबाबत पक्षाने कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही.तसेच थोरात यांनीही माझ्याकडे खुलासा पाठवला असून आपण असे काही बोललो नाही,असे म्हटले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.राणे यांच्यासाठी कॉंग्रेस पायघड्या घालून तयार आहे,असा समज ज्या बातम्या येत होत्या त्यावरून झाला होता.परंतु राणे यांनी कॉंग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी आणि अशोेक चव्हाण यांच्यावर जहरी टीका केली. कॉंग्रेस ती टीका विसरणे शक्यच नाही.त्यामुळे कॉंग्रेसची दारे राणे यांच्यासाठी बंद झाली आहेत,असेच सध्याचे चित्र आहे.
भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी माझी नांदेड मध्ये चर्चा झाली होती परंतु काँग्रेस बाबत प्रकाश आंबेडकर यांनी विधान केले असेल तर दुर्दैवी आहे असल्याचे सांगतानाच आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चेची तयारी दाखवली आहे आता त्यांनी ही चर्चेची तयारी दाखवावी असेही चव्हाण म्हणाले.राज्याला कर्जाच्या खाईत घालण्याचे काम या सरकारने केले आहे.केवळ कोट्यावधी रुपयांच्या घोषणा हे चुनावी जुमले आहेत असा टोला लगावतानात राज्यात लोकसभा विधानसभा निवडणूका एकत्र घेतल्या तरीही आम्ही निवडणुकीसाठी तयार असून, या निवडणूकीत भाजपचा पराभव निश्चित आहे असेही चव्हाण म्हणाले.
जिजाऊंचा आदर्श घेतल्यास संपन्न समाजाची निर्मिती शक्य
माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे प्रतिपादन
‘आऊसाहेब’ पुरस्काराचे वितरण
पुणे, : राजमाता जिजाऊंनी पती शहाजीराजे, सुपूत्र शिवाजीराजे व नातू संभाजीराजे अशा तीन पिढ्यांसोबत काम केले. यावेळी त्यांनी सर्वगुण संपन्न स्वराज्य निर्माणासाठी कार्य केले. त्यामुळे आजच्या माता-भगिनींनी जिजाऊंचा आदर्श घेतल्यास सर्वगुण संपन्न समाजाची निर्मिती शक्य आहे, असे प्रतिपादन सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले.
आदिशक्ती फाउंडेशनच्या वतीने समाजातील कर्तुत्ववान व्यक्तींचा श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते ‘आऊसाहेब’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. हा पुरस्कार राजमाता जिजाऊंच्या नावाने दिला जातो. यावेळी रक्तदाब मोजण्यासाठी लागणारा स्फिग्मोमिटर आणि त्यासाठीची पिशवीची निर्माण करणाऱ्या डायमंड ग्रुपच्या सुलभा भाटे, मधुमेही रुग्णांची औषधांपासून मुक्ती करणाऱ्या व त्यासाठीच्या लेझर मशीनची निर्मिती करणारे डॉ. शैलेंद्र पाटील, तांदळाचे प्रसिद्ध व्यापारी राजेंद्र बाठिया, प्लंबर ते बिल्डर असा प्रवास असणाऱ्या मितेश कन्स्ट्रक्शनच्या नीता गजानन जाधव आणि गीर गायींचे पालक व प्रसिद्ध सराफ व्यावसायिक कृष्णा राजाराम अष्टेकर यांचा ‘आऊसाहेब’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी आदिशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ता पवार, सचिव गिरीश शिंदे, कोषाध्यक्ष संदीप शेळके, कैलास कदम, संभाजी तळेकर, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत, डॉ. सुरेश गंगावणे आदी मान्यवर उपस्थित होते.
आदिशक्ती फाउंडेशन नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवित असते. समाजामध्ये आपल्या कामाने आदर्श निर्माण करणाऱ्या व्यक्तींच्या सहा माता- पित्यांना ‘आऊसाहेब’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. आता पर्यंत फाउंडेशनतर्फे 96 आदर्श व्यक्तींना गौरविण्यात आले असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ता पवार यांनी यावेळी प्रास्ताविकादरम्यान दिली.
गावाकडची माणसं शहरात येऊन जेव्हा कर्तृत्व सिद्ध करतात तेव्हा त्या गोष्टीचा अभिमान वाटतो. रात्रंदिवस केलेल्या कष्टाचे चीज झाल्याचं समाधान लाभते. पुरस्कार प्राप्तींना आता साक्षात राजमाता जिजाऊंचाच पुरस्काराच्या रुपाने आशीर्वाद मिळाला आहे. त्यामुळे त्यांचे कार्य यापुढे अधिक जोमाने होईल, असे श्रीनिवास पाटील म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले. आदिशक्ती फाउंडेशनचे कोषाध्यक्ष संदीप शेळके यांनी आभार मानले.
कौशिकीच्या रागदारीने स्वरोत्सवाला स्वर-सौंदर्याचा साज
लीला पुनावाला फाउंडेशनमध्ये पेरेंट्स डे साजरा
पुणे–लीला पूनावाला फाउंडेशने ( एलपीएफ ) नुकतेच पुण्यातील नूर अल बसम हॉल, पुणे येथे पेरेंट्स डे चे आयोजन केले होते. एलपीएफ गरजू मुलींना शिष्यवृत्ती सोबतच स्वताला वेगळ्या पद्धत्तीने सिद्ध करण्याची संधी देतो. यात त्यांचे व्यक्तिमत्व विकास आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचे देखील आयोजन करतो.

शिक्षणाचा भाग म्हणून आशा सेंटर यूकेच्या सहयोगने लीला पूनावाला फाऊंडेशनने २००८ पासुन पीस अॅम्बेसेडर प्रॉग्राम सुरू केला आहे. या अंतर्गत दर वर्षी्प्रमाणे या वर्षी देखील लीला पूनावाला फाऊंडशनने आपल्या आठव्या बॅचच्या २४ मुलींना ३ आठवड्यासाठी (अॉगस्ट सप्टेंबर महिण्यात )यूकेस पाठविले होते. 2018 मध्ये आठव्या बॅचने या उपक्रमाचा लाभ घेतला.
आशा सेंटर, यूके येथे 3 आठवड्यांच्या प्रशिक्षणानंतर सामाजिक नेतृत्व, जागतिक, संस्कृतिक असा समृद्ध वारसा घेऊन भारतात परल्यानंतर या मुली विविध प्रकल्प आणि उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभाग घेतात. या वर्षी पेरेंट्स डेच्या निमित्ताने त्यांना पीस अॅम्बेसेडर प्रॉग्राममध्ये त्या जे काही शिकल्या ते दाखवण्याची संधी मिळाली, यावेळी या मुलींनी आपले विभिन्न अनुभव शेयर केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या रुकिया खातून , ज्या समेना फाउंडेशनसाराठी कार्य करतात आणि त्या यूकेच्या प्रवासादरम्यान देखील सोबत होत्या, तसेच सन्माननिय अतिथी म्हणुन स्नेहा निकुम (लिला फेले २०१५ आणि पीस अम्बेसेडर ), उपस्थीत होत्या.
ग्रॅविटस फाऊंडेशन आणि हॅलो मॅगझिन प्रस्तुत ऊर्जा अवॉर्ड २०१९ संपन्न…!!!
मुंबई – उषा काकडे यांच्या ग्रॅविटस फाऊंडेशन आणि हॅलो मासिकाने ऊर्जा अवॉर्ड २०१९ आयोजन केले होते. विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि मनोरंजनविश्वातील अग्रगण्य सेलिब्रिटीजना या पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. यानिमित्त मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि शिक्षण अशा सर्व क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींनी रविवारी मुंबई उपनगरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ऊर्जा अवॉर्ड २०१९ चा पाचव्या सिझनमध्ये आपल्या यशाचा उलघडा केला.
ग्रेविटस फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा उषा काकडे सांगतात, “ऊर्जा अवॉर्डचे हे पाचवे वर्ष आहे. ह्यामुळे आज मला फार आनंद व अभिमान वाटत आहे. समाज हित करण्यासाठी निःस्वार्थ योगदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आपण आभार मानले पाहिजेत. आपल्या समाजाला जगण्यासाठी एक चांगले स्थान बनविण्याच्या हेतूने कार्यरत असलेल्या व्यक्तींचे सतत समर्थन वाढविणे ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमचे मीडिया पार्टनर हेल्लो! यांनी या अवॉर्ड सोहळ्याला समर्थन केल्याबद्दल मी खूप आभारी आहे.”
मनीषा कोइराला, आदिती राव हैदरी, आयुष शर्मा, सरोदसम्राट उस्ताद अमजद अली खान, अरमान जैन आणि मुख्य पाहुणे अमृता फडणवीस, हर्ष गोयंका, उषा काकडे आणि रुचिका मेहता यांच्यासारख्या दिग्गजांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न झाला.

१४ श्रेण्यांमध्ये हे अवॉर्ड विभाजित केले होते. बॉलिवूडमध्ये केलेल्या योगदानाबद्दल अभिनेत्री आदिती राव हैदरी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच शहीद मेजर कौस्तुभ राणे यांनी शौर्य पुरस्काराने देण्यात आला तर हरभजनसिंग आणि हिना सिद्धू यांना क्रमशः योगदान क्रीडा पुरस्काराने गौरवण्यात आले. आयुष शर्माला बॉलिवूडमधील पदार्पणासाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संजीव बजाज यांना बिझनेस लीडर ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळाला तर समाजहितासाठी लक्षणीय कामगिरी करत असल्याबद्दल रुबल नागी यांना सन्मानित केले गेले. नीरजा बिर्ला यांना त्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल सुरु केलेल्या जागृकतेमोहिमेसाठी विशेष पुरस्कार देण्यात आला . तसेच शिक्षणक्षेत्रातील उत्कृष्टत कामगिरीचा पुरस्कार असीम चौहान यांना बहाल करण्यात आला.
स्त्री आणि बाल सशक्तिकरणाच्या पुढाकारासाठी ओळखल्या जाणाऱ्या ग्रेविटस फाऊंडेशनने डॉक्टर फिरोजा पारख यांचा मेडिसिन श्रेणीत सन्मान केला. शौना चौहान सलुजा यांना कॉन्ट्रब्युशन टू कॉरपोरेट एक्सेलन्स अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. जगप्रसिद्ध सरोद वादक उस्ताद अमजद अली खान यांना या पुरस्कार सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेल्या जीवनगौरव पुरस्काराचे गौरवण्यात आले.
यु.एस.के फाउंडेशनबद्दल थोडक्यात :
ऊर्जा पुरस्कार हा यूएसके फाऊंडेशनचा एक प्रकल्प आहे ज्यामध्ये आम्ही विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या समाजातील योगदानाबद्दल सन्मानित करतो. २६ ऑगस्ट २०१४ रोजी आम्ही उर्जा पुरस्काराचा प्रवास सुरू केला. आजवर आम्ही साराभाई वाघमारे (सामाजिक), शीतल चव्हाण (बहारी), विद्या लाढके (व्यवसाय), राही सरनोबत (क्रीडा), अभिनेत्री आशा पारेख (कला) यांना देवेंद्र फडणवीस अशा अनेक दिग्गजांना सन्मानित केले आहे. ९ सप्टेंबर २०१५ रोजी उर्जा पुरस्कारांचे दुसरे संस्करण झाले ह्यात अरुणिमा सिन्हा (शौर्य), नसीमा हर्जुक (सामाजिक), वीणा पाटील (व्यवसाय), रेशमा माने (क्रीडा), अभिनेत्री हेलन (कला), डॉ. रवींद्र आणि स्मिता कोले (जीवनगौरव) यांना श्रीमती टीना अंबानी (अध्यक्ष कोकीलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पीटल) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
महात्मा फुले समता परिषद पुणे शहर जिल्हामधील कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न
पुणे-अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पुणे शहर जिल्हामधील कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला . वानवडी येथील जांभुळकर गार्डनमध्ये झालेल्या या कार्यकर्त्यांचा मेळावास रघुनाथ ढोक , पंढरीनाथ बनकर , प्रितेश गवळी , शिवराम जांभुळकर , शंभूसेठ जांभुळकर , अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मंजिरी धाडगे , समीर धाडगे , माजी नगरसेवक संदीप लडकत, रेखा जांभुळकर ,विठ्ठल सातव , प्रा . गौतम बेगाळे , माजी महापौर वैशाली बनकर , नगरसेविका मंजिरी धाडगे , सुनीता भगत , पिंपरी चिंचवड विभाग महिला अध्यक्षा वंदना जाधव , चंद्रशेखर भुजबळ , पोपट चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते .
समता परिषदेचे काम समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविले पाहिजे , महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी दिलेला समतेचा विचार समाजात रुजविण्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न केला पाहिजे . समता परिषदेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निर्माण झाले तरच समता सैनिकांना न्याय मिळेल असा विश्वास प्रा . गौतम बेगाळे यांनी व्यक्त केला .
ओ बी सी एकत्रित आले तर समता परिषदेची ताकद वाढणार आहे . या ताकदीचा उपयोग समाजाचा विकास करता येईल . असे विठ्ठल सातव यांनी सांगितले . यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याचा ठराव एकमताने समंत करण्यात आला .
या मेळाव्याचे प्रास्तविक व उपस्थितांचे स्वागत प्रितेश गवळी यांनी केले तर सूत्रसंचालन पंढरीनाथ बनकर व रघुनाथ ढोक यांनी केले तर आभार माजी नगरसेवक संदीप लडकत यांनी मानले .
अहमद फैयाज यांचे नविन पुस्तक ‘बेस्टसेलर’ प्रकाशित
चनाजोर गरम (देवघेवीचा भावनिक व्यवहार)
माझ माहेर दादरसारख्या मराठी मध्यमवर्गीय वस्तीतलं. दोन बिल्डिंगच्यामध्ये राणेबाईंची शाळा. पुढे आणि मागे लहानसे पटांगण असा हा परिसर.
सकाळची उन्हें पडल्यावर साधारणतः फेरीवाल्यांची ये-जा सुरु व्हायची. त्यात प्रामुख्याने बिस्कीटवाला, बोहारीण, वासणवाला. आणि दुपारनंतर संध्याकाळी येणारे चनाचोर गरम विकणारा चाचा आणि भेळवाला भय्या.
चनाचोर गरम ओरडत येणारा तो चाचा म्हणजे एक मजेदार व्यक्ती होती. बिल्डींगच्या आवारातच शाळा असल्याने शाळा सुटायच्या आधी तो यायचा. पुढं त्याच्या पोटाला अॅल्युमिनियमच टोपलीसारख भांड एका मोठ्या दोरीने गळ्याला बांधलेलं असायचंय. तो त्यामुळे चालायचा पोट पुढे असलेल्या माणसांसारखा. आम्ही दोघ बहीण भाऊ त्याच्या चालण्याची आणि बोलण्याची नक्कल करत असू. तो आला की मोठयाने ओरडायचा-
‘चनाजोर गरम…
खाये गा तो मजा आयेगा..’
त्याचं ते गाण ऐकून खूप मजा वाटायची आणि गंमतही.‘’मजा आएगा…’ ’ तो म्हणायचा पण हे म्हणणा-या चाचाचा चेहरा मात्र सदैव मख्खच असायचा.
आठवड्याला 2-1 दिवसाआड दुपारच्या वेळी जुन्या कपड्यांवर भांडी विकणा-या मावशी यायच्या. नऊवारी पातळ, कपाळावर ठसठशीत मोठ्ठ कुंकू. आल्या की भांड्यांचं टोपल आणि कपड्यांचं गाठोड बाजूला ठेऊन गॅलरीत बसायच्या. चहाची वेळ असायची. मग आजीही तिला घोटभर चहा द्यायची. घरच्या सुख-दुःखाच्या चार गोष्टी ती आजीला सांगायची. थोडावेळ निवांतपणे बसून परत गाठोडं उचलून आपल्या कामाला जायची. असाच भांडी विकणारा एक वासणवाला काकापण यायचा. कितीही कपडे दिले तरी त्याची हाव काही संपायची नाही. खूप किटकिट करायचा त्यामुळे आम्ही त्याला काही कपडे देत नसू. आजही ते दिवस त्या आठवणी येतात.
संध्याकाळी 6 वाजता येणा-या भेळवाल्या चाचाचा नेम आजही चुकलेला नाही. आता म्हतारपणामुळे आतमध्ये बिल्डींगच्या आवारात येता येत नाही. पण बाहेर रोडवर भेळचा स्टँड घेऊन भेळवाला चाचा उभा रहातो. घरचे कोणी भेटले की आवर्जून चौकशी करतो. लड़की कैसी है? मजे मै है ना? बोलना चाचाने याद किया था.’’
खरंच हा त्यावेळी असणारा व्यवहार फक्त देव-घेवीचा नव्हता तर तो भावनिकही तितकाच होता. फेरीवाले तर खूप यायचे पण त्यातील काही जणांशी एक आगळं-वेगळं स्नेहाचं नातं जोडल गेलं. काळानुरुप सगळं बदलत चाललं आहे पण त्या बालपणीच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत.
पूर्णिमा नार्वेकर
पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
भिकाजी लाड मार्ग,
दहिसर फाटक जवळ,
दहिसर (प.),
मुंबई – 400068








