(जुन्नर /आनंद कांबळे ) -नुकत्याच झालेल्या जुन्नर नगर परिषदेच्या विषय समितीच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिनेश दुबे व राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नगरसेविका समीना अकिल शेख यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. नगरसेविका समीना शेख यांनी पक्षादेश डावलुन महिला व बालकल्याण समितीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराच्या सभापती पदासाठी केलेल्या अर्जावर अनुमोदक म्हणून सही केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिनेश दुबे यांनी केला होता. सदर निवडणुकीत गटनेते दिनेश दुबे यांनी माझ्यावरचे केलेले आरोप खोटे असून ते मला मान्य नाही त्याबद्दल त्यांचेवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे नगरसेविका समीना शेख यांनी निवेदनाद्वारे सांगितले. गटनेते दिनेश दुबे यांच्याकडुन या निवडणुकिसाठी मला कोणत्याही प्रकारचा पक्षादेश देण्यात आलेला नव्हता.दुबे हे एकतर्फी काम करत असतात .राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अतुल बेनके यांची लढाई आमदार शरद सोनवणे यांच्या बरोबर असताना आपण नगरपालिकेत मनसेच्या आघाडीबरोबर युती करण्याची नाही अशी भूमिका घेतली परंतु दुबे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी संपुर्ण पक्षाला वेठीस धरून चुकीचा पायंडा पाडला.माझी निष्ठा आजही अतुल बेनके यांच्यासमवेत आहे.दुबे माझी बदनामी करण्याचे षडयंत्र करत आहेत.माझे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी दुबे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अपील केल्याचे सांगितले आहे.जर माझे पद कायम राहिले तर दुबे यांनी सद्सद्विवेक बुद्धीने नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा असे आवाहन समीना शेख यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका- गटनेते यांच्यात आरोप प्रत्यारोप
Previous article
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/
पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल ..
C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079
मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com
- State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra
*1984 पासून पुण्यात पत्रकारिता,
*आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ,
*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद,
*पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ...
*स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले
*इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका .
*निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार
https://www.facebook.com/MyMarathiNews/
Popular
More like thisRelated
टाटा पॉवरची २०३० पर्यंत ३० गिगावॅट क्षमतेची झेप; ६६ टक्के ऊर्जा पोर्टफोलिओ स्वच्छ स्रोतांकडे
आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ५,२१२ कोटींचा निव्वळ नफा; भागधारकांसाठी...
दहा वर्षांत क्रेडिट कार्डधारकांची संख्या १.४ कोटींवरून ५.२ कोटींवर; क्रेडिट कार्डवरील थकीत रक्कम ३.१ लाख कोटींवर
भारतात पहिल्यांदा क्रेडिट कार्ड घेणाऱ्यांपैकी निम्मे ‘Gen...
भारतात वाढता उच्च रक्तदाब; रोजच्या आहारातील मीठ कमी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
भारतीयांचे सरासरी मीठ सेवन शिफारसीच्या दुप्पट; कमी-सोडियम मीठासह प्रक्रिया...
पाटबंधारे विभागाच्या अचूक नियोजनामुळे पूरधोका टळला
खडकवासला धरणातून तब्बल साडेचौदा तास नियंत्रित विसर्ग; प्रशासनाच्या समन्वयामुळे...


