महात्मा फुले समता परिषद पुणे शहर जिल्हामधील कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न

Date:

पुणे-अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पुणे शहर जिल्हामधील कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला . वानवडी येथील जांभुळकर गार्डनमध्ये झालेल्या या  कार्यकर्त्यांचा मेळावास रघुनाथ ढोक , पंढरीनाथ बनकर ,  प्रितेश गवळी , शिवराम जांभुळकर , शंभूसेठ जांभुळकर , अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद  महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मंजिरी धाडगे ,  समीर धाडगे ,  माजी नगरसेवक संदीप लडकत, रेखा जांभुळकर ,विठ्ठल सातव , प्रा . गौतम बेगाळे , माजी महापौर वैशाली बनकर , नगरसेविका मंजिरी धाडगे , सुनीता भगत , पिंपरी चिंचवड विभाग महिला अध्यक्षा वंदना जाधव , चंद्रशेखर भुजबळ , पोपट चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते .

समता परिषदेचे काम समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत  पोहचविले पाहिजे , महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी दिलेला समतेचा विचार समाजात रुजविण्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न केला पाहिजे . समता परिषदेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निर्माण झाले तरच समता सैनिकांना न्याय मिळेल असा विश्वास प्रा . गौतम बेगाळे यांनी व्यक्त केला .

ओ बी सी एकत्रित आले तर समता परिषदेची ताकद वाढणार आहे . या ताकदीचा उपयोग समाजाचा विकास करता येईल . असे विठ्ठल सातव यांनी सांगितले . यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याचा ठराव एकमताने समंत करण्यात आला .

या मेळाव्याचे प्रास्तविक व उपस्थितांचे स्वागत प्रितेश गवळी यांनी केले तर सूत्रसंचालन पंढरीनाथ बनकर व रघुनाथ ढोक यांनी केले तर आभार माजी नगरसेवक संदीप लडकत यांनी मानले . 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

निवडणुकीत लाडक्या बहिणी सूत्रधाराची भूमिका बजावणार

पुणे.दि.१४: महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या (१५...

“राणी मुखर्जीच्या 30 वर्षांच्या कारकिर्दीला अनिल कपूरचा सलाम”

बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर यांनी त्यांची सहकलाकार आणि जवळची...

अभय योजनेचा शेवटचा दिवस: मतदानामुळे ऑनलाईन भरणा करण्याचे प्रशासनाचे आवाहन 

पुणे- मिळकत कर विभागाच्या अभय योजनेचा उद्या शेवटचा दिवस आहे....