Home Blog Page 3005

मोदी सरकारकडून राज्यघटनेची पायमल्ली- डॉ. विकास आबनावे

0

पुणे : “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली भारतीय संविधान सर्वोत्कृष्ट निर्मिती आहे. मात्र, संपूर्ण देश भगवा करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मोदी सरकारकडून भारतीय संविधानाचे पालन होत नाही. स्वायत्त संस्थांवर मर्जीतील माणसांची नेमणूक करून संविधानाची मोडतोड करण्याचा प्रयत्न होत आहे. जातीयवाद्यांच्या हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी संविधानाचा अनादर करणाऱ्यांना आपण हटविणे गरजेचे आहे,” असे स्पष्ट पुरोगामी विचारवंत आणि महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, तेजस्विनी संस्था आणि आरके फाऊंडेशन आयोजित संविधान जागरण परिषदेत डॉ. आबनावे ‘विधी विधान से संविधान तक’ या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. कोरेगाव पार्क येथील भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद सभागृहात झालेल्या या परिषदेत ज्येष्ठ साहित्यिक आचार्य रतनलाल सोनग्रा, महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट, आरके फाऊंडेशनच्या अध्यक्ष आरती सोनग्रा, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार काळभोर, ऍड. राहील मलिक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘निखाऱ्यावर भाजलेल्या माझ्या मुलांनो’ या पुस्तकाच्या सातव्या आवृत्तीचे प्रकाशन झाले.

डॉ. विकास आबनावे म्हणाले, “सध्याचे सरकार दलित-मुस्लिमामांच्या भावनांशी खेळत आहे. केवळ घोषणाबाजी आणि लोकांची दिशाभूल करण्याचे काम मोदी व त्यांचे सहकारी करीत आहेत. संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. त्याचा योग्य वापर करीत आगामी काळात चांगली माणसे सत्तेवर बसविणे आपली जबाबदारी आहे. रांगेतल्या शेवटच्या माणसापर्यंत न्याय देण्याची दिशा संविधानाने दिली आहे. जातिमुक्त भारत आणि कल्याणकारी राज्य स्थापण्यासाठी संविधानाचे काटेकोरपणे पालन व्हावे. सद्यस्थितीत वैचारिक दिवाळखोरी आपल्याला पाहायला मिळत आहे.”

आचार्य रतनलाल सोनग्रा म्हणाले, “भारतीय संविधान हे फार मौलिक आहे. वैचारिक, मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचे काम संविधान करते. मात्र, अलीकडच्या काळात संविधानाला सुरुंग लावण्याचे काम काही समाजकंटक करीत आहेत. त्यांचा कुटील डाव समजून घेत संविधानाचे महत्व अबाधित ठेवण्यासाठी आपण जागरूक राहिले पाहिजे.”

भगवानराव वैराट यांनीही आपले मनोगत मांडले. आरती सोनग्रा यांनी प्रास्ताविक केले. राजकुमार काळभोर यांनी सूत्रसंचालन केले. अलका जोशी यांनी आभार मानले.

नृत्य आपल्या जीवनात परिवर्तन घडवते: परिसंवादाचा सूर

0

पुणे :’नृत्य आपल्या जीवनात परिवर्तन घडवते , त्यासाठी मेहनत, साधना खूप असली तरी आवड असल्याने आपण मेहनत करतो, आणि व्यक्तिमत्व बदलून जाते, ‘ असा सूर रविवारी उमटला.निमित्त होते आंतरराष्ट्रीय भारतीय नृत्य महोत्सवातील परिसंवादाचे !

‘ नृत्य क्षेत्रातील कारकिर्दीच्या संधी आणि आव्हाने ‘ या विषयावरील परिसंवादाला रविवारी सकाळी चांगला प्रतिसाद मिळाला.त्यात ज्येष्ठ नृत्य गुरु रोशन दात्ये, स्वाती दातार, प्राजक्ता राज या सहभागी झाल्या.नेहा मुथियान यांनी या सर्वांशी संवाद साधला.हा परिसंवाद भारतीय विद्या भवन ( सेनापती बापट रस्ता ) येथे २७ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता झाला.

ज्येष्ठ नृत्यगुरु रोशन दात्ये म्हणाल्या , ‘ जुनी पिढी समर्पित भावनेने काम करीत आली. नृत्य कार्यक्रमाच्या मानधनाबाबत जुनी पिढी आग्रही नव्हती. मात्र, मानधनाबाबत आपण अपेक्षा किमान बोलून दाखवली पाहिजे. ‘

स्वाती दातार म्हणाल्या, ‘ खूप लहान वयात नृत्याची आवड पालकांनी मुलांवर लादू नये. चिमुकल्या वयात नृत्याचा विक्रम वगैरे कल्पना घेऊन पालक येतात, तेव्हा समजावून सांगणे अवघड होते. ‘कारकिर्दीच्या अनेक संधी नृत्य क्षेत्रात उपलब्ध होत आहेत. त्यात मेहनत आणि साधना अधिक आहे. त्या तुलनेत पैसे मिळतीलच असे नाही.

नृत्य शिक्षणात आपल्या लय, ताल, सूर, मेहनत, समय व्यवस्थापनासह अनेक गोष्टी शिकतो. यापलिकडे व्यक्तिमत्व विकसन या पातळीवर बरेच परिवर्तन घडत असते. नृत्याबरोबर आपण भोवतालच्या अनेक गोष्टी शिकत जातो, असे प्राजक्ता राज यांनी सांगितले.भारतीय विद्या भवनचे मानद संचालक प्रा.नंदकुमार काकिर्डे तसेच नृत्य क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी , विद्यार्थिनी उपस्थित होते.

नृत्यप्रशिक्षणाला सुरवात केली की लगेच परीक्षा, स्टेज शो व्हाव्यात अशी अपेक्षा असते, त्याबाबत पालकांचेच समुपदेशन करावे लागते, असा अनुभवही मान्यवरांनी या परिसंवादात सांगितला.परिसंवादातील मान्यवरांचा सत्कार प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी केला.संयोजक रसिका गुमास्ते यांनी आभार मानलेदरम्यान,रविवारी सकाळी अकरा पासून सत्रात मयुरी हरिदास ( पुणे ) यांचे कथक, अक्षय श्रीनिवासन ( मुंबई ), अबोली धायरकर ( पुणे ) यांचे कथक, उन्नती अजमेरा ( मुंबई ) यांचे मोहिनी अट्टम, पूजा काळे यांचे ओडिसी,मिनाझ खान यांचे कथक, सुष्मिता बिस्वाई ( भुवनेश्वर ) यांचे ओडिसी नृत्य सादरीकरण आयोजित करण्यात आले हाेते . या सर्व नृत्य सादरीकरणांना चांगला प्रतिसाद मिळाला.

विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकातून साकारली सर्व राज्यांची संस्कृती !

0

पुणे :‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’, आझम कॅम्पसतर्फे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. आझम कॅम्पसच्या व्ही.एम.गनी स्पोेर्ट्स पॅव्हेलिनच्या क्रीडागंणावर सकाळी निवृत्त अतिरीक्त पोलीस महासंचालक अशोक धिवरे   यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष  डॉ पी.ए.इनामदार होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रात्यक्षिकांतून भारताच्या सर्व राज्यातील संस्कृतीचे सादरीकरण केले.आझम कॅम्पस परिवारातील सर्व संस्था ,ट्रस्ट चे पदाधिकारी ,शिक्षक ,प्राध्यापक ,२५ हजार विध्यार्थी उपस्थित होते .

एन.सी.सी. पथक, अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल, आबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज, स्कॉलर बॅच, पै  पब्लिक स्कुल ,आझम उर्दू स्कुल ,पै परवाझ ,गोल्डन ज्युबिली, इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळा, तैय्यबिय्या अनाथालय, ‘स्कूल ऑफ आर्ट’ आणि ‘आझम स्पोर्टस् अ‍ॅकडेमी’च्या खेळाडूंनी पाहुण्यांना मानवंदना दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ पी ए इनामदार  यांनी केले. संस्थेचे सचिव लतिफ मगदूम यांनी  आभार मानले .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा.रोशनआरा , प्रा. मजिद सय्यद व प्रा. दिलशाद सय्यद यांनी केले. संस्थेचे सचिव लतिफ मगदूम यांनी आभार मानले.

स्कुल ऑफ आर्ट अँड आर्ट अकेडमी च्या अकराव्या वार्षिक प्रदर्शनाचे उद्घाटन अशोक धिवरे यांच्या हस्ते झाले . गणेश कळसकर यांनी पोर्ट्रेट चे प्रात्यक्षिक दाखवले . हेमा जैन ,भरत लोंढे यांनी संयोजन केले .

 

डिसेंन्ट फाऊंडेशनला स्वच्छतेबाबत पुरस्कार

0
जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर -महाराष्ट्र राज्याचे कृषि -पणन व फलोत्पादन पाणीपुरवठा व
स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त जळगाव येथे डिसेंन्ट फाऊंडेशन चे संस्थापक जितेंद्र बिडवई याना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व  अकरा हजार रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.
डिसेंन्ट फाऊंडेशन च्या माध्यमातून ‘कळी उमलताना’ या उपक्रमा अंतर्गत ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींसाठी तज्ञ वैद्यकीय महीला अधिकाऱ्यांमार्फत  वैयक्तिक स्वच्छतेबाबत जाणीव जागृती करून ईको फ्रेंडली सॅनिटरी नॅपकिन चे मोफत वाटप करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे ‘संस्कार स्वच्छतेचा’ या उपक्रमा अंतर्गत आत्तापर्यंत ८० शाळांना स्वच्छता कीट वाटप केले आहे.
तसेच  ‘किटक नाशकांचा सुरक्षित वापर’ या उपक्रमा अंतर्गत अनेक शेतकर्यांना कृषी तज्ज्ञांचे मार्फत मार्गदर्शन करून मोफत संरक्षण पोषाख वाटप करण्यात आले आहे. याच कार्याची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला.

पुरंदरेंना पुरस्कार देवून सरकारने केला शिवप्रेमींचा अवमान- संतोष शिंदे

0
पुणे-ब. मो. पुरंदरे यांना  ‘पद्मविभूषण’ देणे हा तमाम शिवप्रेमींचा अपमान आहे… हा पुरस्कार बदनामी करण्याचे सरकारचे अधिकृत सर्टिफिकेट आहे… यामुळे महाराष्ट्रात वादळ निर्माण होईल असा स्पष्ट इशारा  संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी दिला आहे .
याबाबत शिंदे यांनी प्रसिद्धीस मेल द्वारे पाठविलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे कि,ब. म. पुरंदरे यांना कलाक्षेत्रात सर्वोच्च ‘पद्मविभूषण पुरस्कार’ जाहीर झाला परंतु पुरंदरे यांचे ‘कला व साहित्य’ क्षेत्रातील योगदान ‘विकत घेऊन दिलेले आहे, मोफत नाही.’ पुरंदरेनी एकही पोवाडा गायलेला नाही, ते शाहीर नाहीत. शाहिरीतून कुठलीही ‘कला’ त्यांनी आजपर्यंत प्रसिद्ध केलेली नाही. ‘राजा शिवछत्रपती’ नावाच्या पुस्तकात पान क्रं. १२६ वर ‘चुकीचा आणि घाणेरडा इतिहास लिहून साहित्यातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार ‘राजा शिवछत्रपती’ पुस्तकांमध्ये पुरंदरेंनी लिहिला आहे.’ याउलट खोटा इतिहास सांगून लोकांकडून पैसे घेतलेले आहेत. एकही कार्यक्रम किंवा पुस्तक पुरंदरेंनी फुकट दिलेलं नाही, किंवा ‘जाणता राजा’ फुकट दाखवलेला नाही. विकत घेतलेला योगदान यामुळे जर पद्म विभूषण, महाराष्ट्र भुषण मिळणार असेल तर महाराष्ट्रातला हा वद्रोही पुरस्कार म्हणून या पुरस्कारा कडे पाहिलं जाईल .’ म्हणजे समाजाला मोफत दिलेले योगदान हे राज्य सरकारने जाहीर करावे.
भारतरत्न, पद्मविभूषण हे ज्यांना दिले ते सर्व महाराष्ट्रातील ‘संघरत्न’ आहेत. केंद्र सरकारकडे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री छत्रपती शाहूजी महाराज यांना भारतरत्न मिळावा म्हणून शिफारस करण्यात आली होती. महाराष्ट्रातील तमाम लोकांची मागणी होती तरीही केंद्र सरकार आणि राज्य सरकारने भारतरत्न पुरस्कार या सन्माननीय समाजसुधारकांना दिलेला नाही. हाच वैचारिक खोटारडेपणा केंद्र आणि राज्य सरकारने स्पष्ट केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर आयुष्यभर जोगवा मागणे किंवा खोटा इतिहास सांगणे आणि लिहिणे यामुळे जर पद्मविभूषण मिळणार असेल तर त्या पुरस्कराची आज उंची खुंटली आणि महाराष्ट्र पुरस्कारा विना पोरका झाला असेच म्हणावे लागेल.
पुरंदरेंच्या या पुरस्कारामुळे राज्यातील नवे देशातील तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावण्याचा काम केंद्र सरकार व राज्य सरकारने केलेला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन शिवप्रेमींच्या आणि महाराष्ट्रामध्ये जो संताप निर्माण करण्यात आलेला होता त्याच्या त्या शिवप्रेमींच्या संतापला आग लावण्याचे काम केंद्र सरकारने आज केलेला आहे. या ‘पद्मविभूषण’ पुरस्काराचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो. सरकारने पुरंदरे यांना हा पुरस्कार देऊ नये, व तात्काळ पाठीमागे घ्यावा, अशी ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने विनंती करतो.

माणिकडोह धरणाच्या कुशीत ध्वजारोहण

0
जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर तालुक्यातील माणिकडोह धरणाच्या कुशीतील शिवेचीवाडी शाळेत माय मराठी चे पत्रकार आनंद कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
जिल्हा परिषदेची शिवेचीवाडी येथे इ .१ली ते इ.४थी पर्यंत शाळा असून सर्व विद्यार्थी आदिवासी ठाकर समाजाची आहेत.
प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम ,भाषणे व वयोवृध्द ग्रामस्थांंचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.
या कार्यक्रमासाठी वस्तीतील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रत्येक आदिवाशी व्यक्तीनी मुलांच्या करिता खाऊ आणला होता. शाळेच्या वतीने गावची पाटलीण हा उपक्रम राबवून शैक्षणिक उठाव कार्यक्रम राबविला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार आनंद कांबळे यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी धोंडू काळे,रंजना काळे, वसंत केदारी,कुसूम केदारी,धनंजय जाधव,रमेश काळे,शांताराम काळे,जीवन केदारी, सुवर्णा जाधव, संगिता जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचलन मुख्याध्यापक तुकाराम हगवणे यांनी केले तर आभार सरला दिवटे यांनी मानले.

डॉ.लहू गायकवाड यांना बेस्ट इनोव्हेटिव्ह टीचर पुरस्कार जाहीर

0
जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील प्रा.डाँ.लहू गायकवाड यांना बेस्ट इनोव्हेटिव्ह टिचर पुरस्कार जाहिर करण्यात आला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत दर वर्षी संशोधन अणि चौकटी बाहेरचे कार्य करणाऱ्या प्राध्यापकांना ‘बेस्ट इनोव्हेटिव्ह टीचर’ हा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येत असते.
    २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हे पुरस्कार जाहीर करण्यात येतात.
आज (दि. २६)जानेवारी २०१९ रोजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ नितीन करमळकर यांनी आपल्या भाषणा मध्ये हा पुरस्कार, नारायणगाव येथील  ग्रामोन्नती मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील इतिहास विषयाचे शिक्षक, ‘प्रा.डॉ. लहू कचरू गायकवाड’ यांना  पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
   डॉ.गायकवाड हे इतिहासाचे अभ्यासक, संशोधक व लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत.
जुन्नर तालुक्याच्या इतिहासाला त्यांनी संशोधनातून मोठे स्थान प्राप्त करून दिले आहे.
 डाँ.प्रा.लहू गायकवाड  यांना पुरस्कार  जाहीर झाल्याने ग्रामोन्नती मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नारायणगाव च्या शिरपेचात,पुन्हा एकदा मनाचा तुरा रोवला गेला.
 असल्याचे प्राचार्य शेवाळे  यांनी मत व्यक्त केले.
 डॉ लहू गायकवाड यांचे ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष  कृषिरत्न अनिल तात्या मेहेर यांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच  त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आम्ही दोघी

0

ब-याचदा  प्रवासात आपली अनेक व्यक्तींची अजाणता ओळख होते. निदान माझ्या बाबतीत तरी होतं. मग कधी-कधी फक्त स्माईल तर कधी-कधी इकडच्या तिकडच्या गप्पा. त्यात वेळ कसा निघून  जातो  ते ही कळत नाही.. असाच एक किस्सा खास स्मरणात राहिलेला…  कुठेही प्रवासाला गेले नव्हते तर नाटक बघायला गेले होते  आणि ते ही एकटीच गेले होते … ‘‘आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे डी रो मधली दुसरी सीट होती. पहिल्या सीट वर कोण असेल .. उगाचच कुतुहल होतं… जेंटस असेल की लेडीज… मी जशी एकटी .. तसं तो किंवा ती पण एकटीच असणार… सारखं आपलं बाई डोअरकडे लक्ष जास्त होतं… पण एकदाची माझी प्रतीक्षा संपली आणि एक बाई माझ्या बाजूला येऊन बसली…. हुश्श…. झालं…. एकदाच…. तसं म्हणा मला काही फरक पडत नव्हता… पण जेंटस् असता बाजूला तर अवघडून बसावं लागलं असतं…

नाटक चालू व्हायला तसा 5-10 मिनिटं अवधी होता. बसल्या-बसल्या त्या बाईंनी मला छानसं स्माईल दिलं. मी ही त्यांना मस्त स्माईल दिलं. 4.40 झाले तरी नाटक सुरु होईना… त्या बाईंनीच बोलायला सुरुवात केली.. हल्ली नाटक काही वेळेवर सुरु करत नाही. 10-15 मिनिटं उशीरच करतात. आपण मेलं  घरचं सगळं आवरुन धावत पळत यायचं आणि हे कुठे वेळेवर सुरुच करत नाही हो. मागल्या वेळेस पण असंच झालं’’… मी पण त्यांच्या बोलण्याला हो ला हो केलं.. तसं नाही हो खाली अजून करंट बुकींग चालू असेल म्हणून 10-15 मिनिटं उशीर झाला असेल. हल्ली मराठी नाटकांचा प्रेक्षक वर्ग तसा कमीच झालाय. हल्लीची पिढी कुठं नाटक बघते. माझ्या  या बोलण्याची तिने री ला री ओढली. ‘‘खरंय तसं तुमचं म्हणणं. पण घरुन झालेले संस्कारही महत्त्वाचे असतात हो. माझ्या दोन्ही सुना कॉनव्हेंटमध्ये शिकलेल्या पण मराठी नाटक आणि सिनेमाची आवड आहे.  लग्नात त्यांनी तशी अटच घातली होती मुळी आम्हाला.  आमच्या आवडी निवडी जपणारा मुलगा हवा.’’ मी म्हटलं‘‘वा खूप छान.’’

मग बाईंनी मस्त गप्पा मारायलाच सुरुवात केली.. ‘‘काल पण मला नाटक बघायचं होतं हो. पण नेमकं हाऊस फुल्ल, मग आजच्या नाटकाची तिकीट काढली. तसं हे नाटकही मला बघायचं  होतं  हो.  मग इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला लागली..

बोलता-बोलता मला कळलं की तिला 2 मुलं आहेत. दोन्ही मुलं इंजिनियर आहेत. त्यातील धाकटा मुलगा- सून  अमेरिकेला असतात. सून कथ्थक शिकली आहे तर मुलगाही पूर्वी तबला वाजवायचा…. तेवढ्यात नाटक सुरु झालं.. आणि आमच्या गप्पाही थांबल्या.

नाटकात फक्त दोनच पात्र.. प्रतिक्षा लोणकर आणि ऐश्‍वर्या नारकर.. एका वेगळ्या चाकोरी बाहेरच्या विषयावरचं  नाटक.. दोघींची अप्रतिम अभिनय आणि संवादांची जुगलबंदी… नाटक ऐन रंगात आलं असतांनाच  नेहमीप्रमाणे मध्यांतर झालं.. आणि माझ्या बाजूला बसलेल्या बाईंच्या गप्पा सुरु झाल्या..

बोलताना माझा मुलगाही तबला शिकतो आहे हे मी त्यांना सांगितलं. मग त्यांनी मला माझं आडनाव विचारलं…मी नार्वेकर सांगितलं .. पण पुढची प्रश्‍नावली गावं कुठचं… तेही सांगून झालं… पण तरी त्या बाईंना नक्की काय विचारायचं होतं  ते कळत नव्हतं… मग एकदाच माहेरचं नावही विचारून झालं.. मी पाटील सांगितलं … त्यावर माहेरचं गाव कुठलं… ते ही सांगून झालं… मग तुमचं इंटरकास्ट मॅरेज आहे का हेही विचारून झालं… मग कुठे तरी मला त्यांच्या प्रश्‍नाचा रोख कळायला लागला .. मग मीच सांगून टाकलं मी माहेरुन ब्राह्मण तर सासरवरुन भंडारी आहे… तेव्हा कुठं त्या बाईच्या मनातला गोंधळ थोडा कमी झाला.. मला म्हणाल्या,  तुम्ही म्हणालात मुलगा तबला शिकतो… क्लासिकलची पण आवड आहे.. आणि तुमच्या बोलण्यावरुन पण तुम्ही ब्राह्मण असाव्यात असं वाटत होतं पण विचारणार कसं ना डायरेक्ट?

मला या त्यांच्या बोलण्याचं  हसू आलं. खरं तर.. मग त्या स्वतः बद्दल सांगत होत्या.. आज त्या नाटकाला एकट्या का आल्या. त्यांचे मिस्टर काय करतात… मुलं- सुना काय करतात… त्या शिक्षिका होत्या… आणि बरचं काही.

मी शांतपणे त्यांचं  बोलणं ऐकतही होते आणि अधून-मधून  मान डोलवतही होते… मजा वाटली मला पण… खरचं एवढ्या थोडयाशा वेळात किती गप्पा मारल्या आम्ही. मध्‍यांतर  संपल्याची घंटा वाजली आणि आमच्या गप्पा संपल्या… ऐश्‍वर्या आणि प्रतिक्षाची अभिनयाची  जुगलबंदी पुन्हा सुरु झाली…

दोन तासाने नाटक संपलं… आम्ही अनोळख्या दोघी.. आपापली वाट धरुन चालू लागलो….

पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग,

दहिसर फाटक जवळ,

दहिसर (प.),

मुंबई – 400068

 

‘होय मी भारतीय’ ही प्रतिमा देऊन मान्यवरांचा सन्मान

0
पुणे-भारतीय जनता पार्टी पुणेशहर झोपडपट्टी आघाडीच्या व
गुलटेकडी एकता प्रतिष्ठान संयुक्त संयोजनाने, प्रजासत्ताक दिनाच्या सुरूवातील म्हणजेच सकाळच्या सत्रात प्रभागाच्या व्यापारी वर्गाला व प्रतिष्ठित व्यक्तिंना ‘होय मी भारतीय’ ही प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला
गुलटेकडी एकता प्रतिष्ठान च्या वतीने दरवर्षाप्रमाने यंदाही प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला …. ध्वजारोहणाचा व अल्पोपहार वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी पुणे म.न.पा. चे सभागृह नेते श्रीनाथजी भिमाले,स्वारगेट पोलिस स्टेशनचे निरीक्षक  मच्छिंद्र पंडीत,माजी  नगरसेविका वंदनाताई भिमाले,पर्वती अध्यक्ष हरिष परदेशी,नगरसेविका राजश्री शिळीमकर,नगरसेविका  कवितावैरागे ,नगरसेवक प्रविण चोरबेले, अविनाश शिळमकर, किरण वैष्णव, रिपब्लिकन  सरचिटणीस बाळासाहेब शेलार,सामाजिक कार्यकर्ते मेहबुब लांडगे, गौस बागी, शेखर वाघ,सामाजिक कार्यकर्ते रमेश जाधव,गुलटेकडी एकता प्रतिष्ठानचे सचिन खंडागळे, महेश साळुके, विनोद कांबळे, मनोज आण्णा कांबळे ,हरिष कोंडाळ,दिपक शेलकर, सागर नराल,मौलाना वसिम ,अशोक यादव,अविनाश सर्वेगोड,नझीर शेख, अनिल विसरे, अक्षय मदने, उपस्थितीत होते या कार्यक्रमचे संयोजन भारतीय जनतापार्टी च्या पुणेशहर झोपडपट्टी आघाडी चे सरचिटणीस गणेश शेरला यांनी केले.

आजपासून कोथरूडकरांना सांस्कृतिक नजराणा ..कोथरूड सांस्कृतिक महोत्सव (व्हिडीओ)

0


पुणे- आज पासून कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाला येथे प्रारंभ होतो आहे .महापालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे . दिग्गज कलाकारांचे भरगच्च कार्यक्रम ,दिगज्जांचा सन्मान सोहळा असा हा महोत्सव आज दिनांक 28 जाने ते 31 जानेवारीपर्यंत सुरु असणार आहे . या महोत्सवाची माहिती अगदी थोडक्यात संस्कृती  प्रतिष्ठानच्या वतीने मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे . पहा आणि ऐका नेमके त्यांनी या महोत्सवाबद्दल काय म्हटले आहे .

पुन्हा देशासाठीच लढण्याचं ‘त्यांचं’स्वप्न !*

 

*अमित बागुल आणि मित्रपरिवारातर्फे ९१ दिव्यांग जवानांचा विशेष सन्मान

पुणे:- त्यांचं ‘ आयुष्य आज ‘व्हीलचेअर’वर आहे… का तर देशासाठी त्यांनी आपल्या
प्राणांची बाजी लावताना त्यांना अपंगत्व आलंय . असे असूनही दुर्दम्य
इच्छाशक्ती आणि कठोर निर्धाराच्या बळावर आजही ते देशासाठी पुन्हा लढण्याचं
स्वप्न बाळगून आहेत. शरीर अपंग असले तरी मनाने तंदुरुस्त असलेल्या ९१
जवानांचा -लष्करी अधिकाऱ्यांचा विशेष सन्मान अमित बागुल मित्रपरिवारातर्फे
करून या जवानांच्या शौर्य, हिंमत,जिद्द आणि दुदर्म्य
इच्छाशक्तीला सलाम करण्यात आला.
निमित्त होते, प्रजासत्ताक दिनानिमित्त खडकी येथील पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन
सेंटर येथे माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल
यांच्या पुढाकारातून शहर काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागुल आणि मित्र
परिवारातर्फे ९१ जवानांचा -लष्करी अधिकाऱ्यांचा तिरंगी फेटे, शाल- श्रीफळ आणि
सन्मानचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला आणि शौर्य, हिंमत,जिद्द आणि
दुदर्म्य इच्छाशक्तीला सलाम करण्यात आला. यावेळी संयोजक अमित बागुल
म्हणाले कि,देशाच्या
सीमेवर तळहातावर प्राण घेऊन खडा पहारा देणारे सैनिक ,त्यांची देशसेवा आणि
प्रेम , जिद्द ही जितकी महत्वाची तितकीच त्यांची सहनशीलताही. आज व्हीलचेअरवर
त्यांचे आयुष्य आहे ;पण त्यांची विलपॉवर पाहिली कि, त्याग काय आहे हे समजते.
देशासाठी लढणाऱ्या सैनिकांप्रती त्यांच्या कुटुंबीयांप्रती आस्था ठेवण्याची
गरज आहे.
यावेळी पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटरचे वैद्यकीय संचालक डॉ. कर्नल आर. के.
मुखर्जी यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. या उपक्रमात सागर आरोळे,
इम्तियाज तांबोळी, अभिषेक बागुल, धनंजय कांबळे, राहुल जाधव,अप्पासाहेब
गायकवाड,समीर शिंदे,विक्रांत गायकवाड,शुभम डफळ,आकाश गायकवाड, मोहन
कदम,भाऊ दोडके आणि सहकारी उपस्थित होते.

भारतीय विद्या भवन – इन्फोसिस फाऊंडेशन च्या आंतरराष्ट्रीय भारतीय नृत्य महोत्सवात बहारदार सादरीकरण

0

चार ज्येष्ठ नृत्य गुरूंचा सत्कार

पुणे :आंतरराष्ट्रीय भारतीय नृत्य महोत्सवाचे संचालक शामहरी चक्रा व ‘संस्कृतीकी’ संस्था यांच्या सहयोगाने भारतीय विद्या भवन – इन्फोसिस फाऊंडेशन आयोजित सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमाअंतर्गत आंतरराष्ट्रीय भारतीय नृत्य महोत्सवाचे उद्घाटन दिनांक २६ जानेवारी सकाळी रोजी करण्यात आले .

भारतीय विद्या भवन च्या सेनापती बापट रस्त्यावरील सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात हा उद्वाटन समारंभ झाला.

महोत्सवाचा शुभारंभ ज्येष्ठ नृत्यांगना गुरु मनीषा साठे,शमा भाटे ,सुचेता भिडे -चापेकर, रोशन दाते यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. श्यामहरी चक्रा दुपारच्या सत्रात सहभागी झाले.

ज्येष्ठ नृत्यांगना गुरु मनीषा साठे,शमा भाटे ,सुचेता भिडे – चापेकर, रोशन दात्ये यांचा प्रा. नंदकुमार काकिर्डे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

भारतीय विद्या भवन चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले.महोत्सव संयोजक रसिका गुमास्ते यांनी सूत्रसंचालन केले.

भरत नाट्यम, कथ्थक, ओडिसी,मणिपुरी, कुचीपुडी, मोहिनी अट्टम , लावणी, फ्लेमेंको, सत्तरिया, छाऊ, कथ्थक, मोहिनी अट्टम इ. नृत्यप्रकार दोन दिवसात सादर केले गेले.

दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात चेन्नई, बंगलोर, भुवनेश्वर, मुंबई येथील अनुसुया राव, अमरनाथ घोष, प्रियांका भिडे आदी कलाकारांनी कला सादर केली.हा महोत्सव सर्वांसाठी खुला हाेता.

सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत महोत्सवाचे कार्यक्रम सुरू होते. सर्वच नृत्यप्रकारांना पुणेकर रसिकांनी चांगली दाद दिली.

शनिवारी दुपारच्या सत्रात प्रियांका भिडे ( मुंबई ) यांनी कथक नृत्य सादर केले. रुचिरा इंगळे आणि सहकाऱ्यांनी लोककला नृत्य सादर केले. गौरी गाडगीळ यांच्या समवेत शिल्प नृत्यालय ट्रस्टच्या विशेष दिव्यांग कलाकारांनी कथक तसेच अनेक नृत्यप्रकार सादर करून वाहवा मिळवली.

रविवारी सकाळी अकरा पासून सुरू झालेल्या सत्रात मयुरी हरिदास ( पुणे ) यांचे कथक, अक्षय श्रीनिवासन ( मुंबई ), अबोली धायरकर ( पुणे ) यांचे कथक, उन्नती अजमेरा ( मुंबई ) यांचे मोहिनी अट्टम, पूजा काळे यांचे ओडिसी,मिनाझ खान यांचे कथक, सुष्मिता बिस्वाई ( भुवनेश्वर ) यांचे ओडिसी नृत्य सादरीकरण आयोजित करण्यात आले होते .

राज्याच्या विकासामध्ये सर्वांनी योगदान द्यावे… पालकमंत्री गिरीश बापट

0

पुणे.दि२६:- आपण साजरा करीत असलेलाप्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचा उत्सव असून विविधप्रयत्नांमुळे लोकशाही अधिकाधिक मजबूत होत आहे.नागरिक व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्यशासनाच्यावतीने लोकोपयोगी योजना राबविण्यात येतात. शासनाबरोबर नागरिकांनीही राज्याच्याविकासामध्ये योगदान द्यावे, असे आवाहन अन्न वनागरी पुरवठा मंत्री तथा पालक मंत्री गिरीश बापट यांनी आजशिवाजीनगर येथील पोलीसमुख्यालयाच्या मैदनावर येथे  केले.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजीनगर येथील पोलीसमुख्यालयाच्या मैदानावर ध्वजारोहण समारंभआयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. समारंभास स्वातंत्र्य सैनिक, जिल्हा परिषदअध्यक्ष विश्वासराव देवकाते, आमदार मेधा कुलकर्णी,आमदार निलम गोऱ्हे, आमदार माधुरी मिसाळ,महापौर,मुक्ता टिळक, यशदाचे महासंचालक आनंद लिमये,विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर,जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासीउपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, पोलीस आयुक्तडॉ.के.वेंकटेशम, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील उपस्थित होते.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना .बापट म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला,शेततळे, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मानयोजनांच्या अंमलबजावणीमुळे शेतकऱ्यांना फायदाझाला आहे. स्वस्त धान्य दूकानांतून धान्यवितरणासाठी ई-पॉस मशिनचा वापर झाल्यामुळेगरीबांना योग्य प्रमाणात आणि वेळेवर धान्य मिळतअसून त्यामुळे केरोसीनची बचत झाली आहे.प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेद्वारे महिलांना गॅस जोडणीमिळाल्यामुळे महिलांचे जीवन सुखकर झाले असूनमोठया संख्येने नागरिकांनी गॅसवरील सबसीडी सोडूनदिली आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे लघु उद्योगांनाकर्ज पुरवठा करण्यात आला आहे. शहराच्यासभेावताली असलेल्या भागाचा पीएमआरडीएतर्फेकरण्यात येत असलेल्या विकास कामांमुळे आणिहिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पामुळे सभोवतालच्या परिसराचा विकास होणार असून हाभाग इकोनॉमीकल कॉरिडॉर म्हणून ओळखला जाईल,असे सांगितले. मतदारांनी सर्व निवडणूकांमध्ये राष्ट्रीयकर्तव्य भावनेतून मतदान प्रक्रियेत भाग घेण्याचेआवाहन त्यांनी यावेळी केले.

पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाजाहीर करण्यात आलेली पदके आणि अन्यपारितोषिके पालकमंत्र्यांच्याहस्ते वितरीत करण्यातआली. पोलीस दल, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल,एनसीसी व अग्नीशमन दलाने संचलन करुनपालकमंत्र्यांना मानवंदना दिली. यावेळी विविधशाळांतील मुला-मुलींनी आपल्या गुणदर्शनाचे प्रदर्शनकरुन सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमालाउपस्थित स्वातंत्र्य सैनिक व प्रमुख नागरिकांचीपालकमंत्र्यांनी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाला राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी,कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संघटनांचेपदाधिकारी,पत्रकार, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

व्यवसायात मराठी माणसाचा वाढणारा टक्का अभिनास्पद – आ. महेश लांडगे

0

पिंपरी -: भोसरी विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार महेश दादा लांडगे तसेच अभिनेता नितेश चव्हाण, अभिनेत्री शिवानी बावकर ( अजिंक्य आणि शीतल – लागीर झालं जी फेम ) यांच्या हस्ते मोशी ग्रांड’ या मोशी – देहू रोडवर नुकतेच उभारलेले व सर्वच बबतीत अत्याधुनिक असलेल्या हॉटेलचे उदघाटन करण्यात आले. यावेळी या हॉटेलचे संस्थापक संतोष बारणे, गणेश जाधव, गणेश कुटे त्याच बरोबर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आदी क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली होती.या प्रसंगी बोलताना लांडगे म्हणाले, की मोशी – आळंदी रोडच्या आजूबाजूचा परिसराचा सध्या झपाट्याने कायापालट होत आहे. या भागात व्यवसायासाठी सध्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत असून या भागात वाढणारी नागरी वस्ती व्यवसाय करण्यासाठी सुवर्ण संधी घेवून आली आहे. त्यात मराठी माणसाचा या भागात व्यवसायात वाढणारा टक्का हा अभिनास्पद आहे. मराठी माणूस सध्या या ठिकाणी विविध व्यवसाय करताना दिसत आहे. हॉटेल या क्षेत्रात ठराविकच वर्गाचा सहभाग आहे. मात्र या क्षेत्रात देखील मराठी माणसाचा वाढणारा सहभाग मराठी माणसाला व व्यवसायाला नवसंजीवनी देणारा आहे.

 यावेळी या ‘मोशी ग्रांड’ या हॉटेलचे संस्थापक संतोष बारणे, गणेश जाधव, गणेश कुटे यांनी त्याचे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, की ग्राहकांना सर्वोतम सेवा देण्याचा आमचा सदैव प्रयत्न राहील. तसेच या भागातील खवय्येगिरी ग्राहकांसाठी ‘मोशी ग्रांड’ चांगला पर्याय आहे. या सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

युवाशक्‍तीच देशविकासाची खरी शिल्‍पकार – आमदार मेधा कुलकर्णी

0

पुणे – : युवाशक्‍ती हीच देशविकासाची खरी शिल्‍पकार असून येथून पुढे कौशल्‍यात प्राविण्‍य मिळवणारे युवकच देश विकासात मोठ्या प्रमाणात योगदान देतील, असे प्रतिपादन आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी व्‍यक्‍त केले.

देशभरात सर्वत्र बेरोजगाराची समस्‍या चर्चिली जाता असताना ‘यशस्‍वी’ सारख्‍या संस्‍था कौशल्‍य प्रशिक्षणाच्‍या माध्‍यमातून युवकांना थेट कंपन्‍यांमध्‍ये ऑन द जॉब ट्रेनिंगची संधी उपलब्‍ध करून देत आहे आणि या रोजगारक्षम झालेल्‍या विद्यार्थ्‍यांना कंपन्‍यांमधून रोजगारसंधी उपलब्‍ध होत आहे. ही खरंच कौतुकास्‍पद बाब आहे, असेही मेधा कुलकर्णी यवेळी म्‍हणाल्‍या.

शिका व कमवा आणि ‘नीम’ योजनांच्‍या माध्‍यमांतून कौशल्‍य प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या युवकांना नोकरीची संधी देण्‍यासाठी उद्योगजगताने घेतलेला पुढाकार ही सुद्धा उल्‍लेखनीय बाब असल्‍याचे मेधाकुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.

तर, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्‍यक्ष राजेंद्र पाटील यांनी यावेळी आपल्‍या मनोगतात सांगितले की, युवक-युवतींना कौशल्‍य विकास प्रशिक्षण शिकवतानाच त्‍यांना स्‍टायपेंडद्वारे कमवण्‍याचीही संधी देणाऱ्या ‘यशस्‍वी’ सारख्‍या संस्‍थांमुळेच स्‍वतःच्‍या पायावर उभे राहू शकणारे स्‍वावलंबी युवक घडत आहेत, ही अभिनंदनीय बाब आहे.

याप्रसंगी आमदार मेधा कुलकर्णी व पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्‍यक्ष राजेंद्र पाटील या मान्‍यवरांच्‍या शुभहस्‍ते ‘यशस्‍वी’ संस्‍थेच्‍या ‘यशोगाथा’ या चतुःमासिकाचे प्रकाशन झाले.

तसेच शिका व कमवा योजना आणि नीम योजनेतून प्रशिक्षण पूर्ण केल्‍यानंतर विविध नामांकित कंपन्‍यांमधून ज्‍या विद्यार्थ्‍यांना रोजगाराची, नोकरीची संधी प्राप्‍त झाली अशा काही विद्यार्थ्‍यांचा प्रशस्‍तीपत्र व सुवर्णपदक प्रदान करून सत्‍कार करण्‍यात आला. तसेच दिल्‍ली येथे नुकत्‍याच झालेल्‍या ‘नॅशनल कन्‍व्‍हेन्‍शन ऑन क्वालिटी कन्‍स्‍पेटस्’ या राष्‍ट्रीय स्‍पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून जपान येथे होणाऱ्या ‘इंटरनॅशनल कन्‍व्‍हेन्‍शन ऑन क्‍वालिटी कन्‍स्‍पेट्स’साठी निवडण्‍यात आलेल्‍या प्रिकॉल लि. या कंपनीतील ‘यशस्‍वी’ च्‍या प्रशिक्षणार्थ्‍यांचाही यावेळी प्रशस्‍तीपत्र देऊन गौरव करण्‍यात आला. यावेळी विद्यार्थ्‍यांचे गायन, नृत्‍य, समूह नृत्‍य असे विविध कलाविष्‍कार सादर करण्‍यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक संस्‍थेच्‍या मनुष्‍यबळ व्‍यवस्‍थापिका मुग्‍धा हुप्रीकर यांनी तर आभार प्रदर्शन संस्‍थेच्‍या संचालिका स्मिता धुमाळ यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला ‘यशस्‍वी’ संस्‍थेचे अध्‍यक्ष विश्‍वेश कुलकर्णी, संस्‍थेचे संचालक राजेश नागरे, डॉ. मिलिंद मराठे, अधिष्‍ठाता डॉ. राजेंद्र सबनीस, संचालक संजय छत्रे, संजय सिंग,मकरंद कुलकर्णी, संस्‍थेचे सर्व अध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप ‘सामूहिक राष्‍ट्रगीता’ने करण्‍यात आला.