पुणे :‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’, आझम कॅम्पसतर्फे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. आझम कॅम्पसच्या व्ही.एम.गनी स्पोेर्ट्स पॅव्हेलिनच्या क्रीडागंणावर सकाळी निवृत्त अतिरीक्त पोलीस महासंचालक अशोक धिवरे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ पी.ए.इनामदार होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रात्यक्षिकांतून भारताच्या सर्व राज्यातील संस्कृतीचे सादरीकरण केले.आझम कॅम्पस परिवारातील सर्व संस्था ,ट्रस्ट चे पदाधिकारी ,शिक्षक ,प्राध्यापक ,२५ हजार विध्यार्थी उपस्थित होते .
एन.सी.सी. पथक, अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल, आबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज, स्कॉलर बॅच, पै पब्लिक स्कुल ,आझम उर्दू स्कुल ,पै परवाझ ,गोल्डन ज्युबिली, इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळा, तैय्यबिय्या अनाथालय, ‘स्कूल ऑफ आर्ट’ आणि ‘आझम स्पोर्टस् अॅकडेमी’च्या खेळाडूंनी पाहुण्यांना मानवंदना दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ पी ए इनामदार यांनी केले. संस्थेचे सचिव लतिफ मगदूम यांनी आभार मानले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रोशनआरा , प्रा. मजिद सय्यद व प्रा. दिलशाद सय्यद यांनी केले. संस्थेचे सचिव लतिफ मगदूम यांनी आभार मानले.
स्कुल ऑफ आर्ट अँड आर्ट अकेडमी च्या अकराव्या वार्षिक प्रदर्शनाचे उद्घाटन अशोक धिवरे यांच्या हस्ते झाले . गणेश कळसकर यांनी पोर्ट्रेट चे प्रात्यक्षिक दाखवले . हेमा जैन ,भरत लोंढे यांनी संयोजन केले .