स्वतःला रोजगारक्षम बनविणे आवश्यक- सचिन खेर यांचा सल्ला
रोजगार आणि अर्थव्यवस्था वृद्धिंगत करण्यासाठी बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन
पुणे-अर्थमंत्री पियुष गोयल यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पातून बांधकाम क्षेत्रास व्यावहारिक प्रोत्साहन दिले असल्याचे दिसून आले. शेतीनंतर रोजगार उपलब्ध करण्यात बांधकाम क्षेत्र हे दुसऱ्या स्थानी असून देशाच्या जीडीपीत जवळपास १० टक्के योगदान याच क्षेत्राचे आढळते. त्यामुळेच रोजगार आणि अर्थव्यवस्था वृद्धिंगत करण्यासाठी बांधकाम क्षेत्राला चालना देणाऱ्या तरतुदी या अर्थसंकल्पात करण्यात आल्या.
स्वस्त घरांच्या योजनेत सहभागी होऊन उभारण्यात येणाऱ्या गृह प्रकल्पांना १ वर्ष आयकरात सवलतीचा महत्वपूर्ण निर्णय देखील या बजेटमधून घेण्यात आला. या निर्णयामुळे स्वस्त घरांच्या उभारणीसाठी विकासकांना प्रोत्साहन मिळेल. तसेच २ आणि ३ दर्जाच्या शहरांमध्ये प्रचंड गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीची क्षमता उपलब्ध होईल.
2 कोटी रुपयांपर्यंत भांडवली नफ्यावर करातून सवलत मिळविण्यासाठी आता एकाऐवजी दोन घरांमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याचा मध्यमवर्गीय ग्राहकांना फायदा होईल. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना याचा विशेष लाभ होईल. जुने घर विकून त्यातून उपनगरांमध्ये दोन घरे त्यांना घेता येतील. एक घर स्वतः साठी ठेऊन दुसरे घर भाडेतत्वावर देता येईल.व त्यातून घरबसल्या उत्पन्न मिळवता येईल.
स्वयं पुनर्विकासात गृहनिर्माण संस्थांना मिळणार जास्तीचे फायदे !
हेल्मेटसक्ती विरोधी सर्वपक्षीय आंदोलनात राजकीय हमरीतुमरी
पुणे-पुण्यातील महात्मा फुले मंडई येथे हेल्मेट सक्तीच्या निषेधार्थ सर्वपक्षीय घंटानाद आंदोलन करण्यात आले. आंदोलन सुरु होताच आंदोलनात सहभागी होण्यासाठी सुमारे तासाभरात भाजपा आमदार मेधा कुलकर्णी या येथे येताच राष्ट्रवादी -मनसे च्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या विरोधात घोषणा सुरु केल्या आणि अशा घोषणा देणार असाल तर मी येथून निघून जाईल असे म्हणताच शिवसेनेसह अन्य विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घंटानाद करून घोषणाबाजी करत विरोध करायला सुरुवात केली मेधा कुलकर्णी यांनी मी पहिल्यापासून सक्तीच्या विरोधात आहे आणि पालकमंत्री तुमच्या सोबत आहेत असे सांगण्याचा प्रयत्न केला मात्र विरोधी पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरूच ठेवली आणि अखेर मेधा कुलकर्णी यांना भाजपचे संदीप खर्डेकर आणि धनंजय जाधव तसेच कृती समितीचे बाळासाहेब रुणवाल यांनी त्यांना त्याच्या मोटारीपर्यंत नेले आणि तेथून अखेर त्या निघून गेल्या .
पुणे वाहतुक पोलिसांनी १ जानेवारीपासून हेल्मेट सक्ती केली आहे. त्या निषेधार्थ शहरातील अनेक राजकीय पक्ष आणि संघटना एकत्रित आल्या असून मागील महिनाभरात अनेक वेळा हेल्मेट सक्तीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले आहे. या हेल्मेट सक्तीला आज महिना झाल्याच्या निमित्ताने हेल्मेट विरोधी कृती समितीच्या वतीने महात्मा फुले मंडई चौकात घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीचे संयोजक माजी महापौर अंकुश काकडे, भाजपा आमदार मेधा कुलकर्णी, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, राजेंद्र कोंढरे,बाळासाहेब अमराळे ,नगरसेवक विशाल धनवडे, माजी नगरसेविका रूपाली पाटील, माजी नगरसेवक धनंजय जाधव,एडविन रॉबर्ट, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे तसेच शहरातील विविध संघटनाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना आमदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, मी हेल्मेट सक्तीच्या विरोधात असल्याने आंदोलनामध्ये सहभागी होण्यास आले. पुणे शहरात ज्याप्रकारे हेल्मेट सक्ती पोलिसांकडून राबवली जात आहे, त्याबाबत येत्या महिनाभरात राज्य सरकार नागरिकांसक्ती करू नये अशा स्वरूपाचा निर्णय घेईल …
पूजा पांडे आणि हिंदू महासभा देशद्रोही -कारवाई करा-कॉंग्रेसची निदर्शने (व्हिडीओ)
पुणे-महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीदिनी गांधीजींच्या प्रतिमेवर बंदुकीने गोळ्या झाडून नथूरामच्या विचाराचे जाहीर उदात्तीकरण सुरु केलेल्या पूजा पांडे आणि हिंदू महासभेला देशद्रोही घोषित करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी आज पुण्यातील नरपत गिरी चौकात पुणे शहर कॉंग्रेसने जोरदार निदर्शने केली .
शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे,महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे ,अविनाश बागवे,लता राजगुरू ,अजित दरेकर ,रफिक शेख ,संगीता तिवारी ,शेखर कपोते ,राजेंद्र भुतडा ,अनिल सोंडकर ,सुजाता शेट्टी ,सदानंद शेट्टी,समीर शेख आदी कार्यकर्ते या निदर्शने आंदोलनात सहभागी झाले होते .
यावेळी माजी गृहराज्यमंत्री आणि शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, जगभरात महात्मा गांधींच्या विचाराला आदराचे स्थान देण्यात आले आहे. मात्र भारतातील काही हिंदू महासभा असे स्वतःला म्हणवून घेत काही मंडळी गांधीजींचे विचार संपत नाहीत म्हणून अस्वस्थ झाली आहेत. ती नथुरामच्या विचाराचे उदात्तीकरण करून जातीयवाद पसरवित आहेत . या शक्तींना देशद्रोही घोषित करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे पण या उलट मोदी सरकार याबाबत ‘मौन ‘ पाळून त्यांना साथ देत आहे . याविरोधात आम्ही येथे निदर्शने करत आहोत.
कोयता गँगच्या उन्मादानंतर पोलिसांना जाग, जुन्या बाजारातून शेकडो कोयते जप्त
पुणे – शहरात कोयत्याने वार करून खून, मारामाऱ्या होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर पोलिसांना आता जाग आली आहे. शहरातील जुना बाजार परिसरात पोलिसांनी धडक कारवाई करून तब्बल २३२ कोयते जप्त केले आहेत. या कारवाईवेळी पोलिसांनी ५ कोयते विक्रत्यांनाही अटक केली असून त्यांच्यावर आर्म ऍक्टनुसार कारवाई केली आहे.
जयसिंगज शामराव पवार (वय २४), निलेश तानाजी साळुंखे (वय ३८), दिनेश सुखलाल साळुंखे (वय ४०), फकरुद्दीन जैनुद्दीन लोखंडवाला (४२) आणि कासीम नमुद्दीन छावणीवाला (वय ४२) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पुणे शहरात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. हाणामारी, गंभीर दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे अशा घटनांमध्ये सर्रास कोयत्याचा वापर होताना दिसून येत आहे. शहरातील दत्तवाडी अलंकार सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या खुनाच्या घटनांमध्ये कोयत्याचा वापर करण्यात आला होता. यातील आरोपींकडे विचारणा केली असता, त्यांनी जुना बाजारातून कोयते खरेदी केल्याची दिली होती. त्यानंतर पोलिसांनी जुना बाजारातील ५ दुकानांवर धाड टाकून विक्रीसाठी ठेवलेले तब्बल २३२ कोयते व सत्तुर जप्त केले.शस्त्रास्त्र कायद्यान्वये ठराविक आकारापेक्षा मोठे कोयते विकता येत नाहीत. परंतु, जुना बाजार परिसरात हे बंदी असलेले कोयते सर्रासपणे विकले जातात. हे कोयते रविवार आणि बुधवारी भरणाऱ्या मंगळवार पेठेतील जुन्या बाजारात सहज उपलब्ध होत आहेत.
गोयल गंगा ग्रुपच्या नावावर फसवणूक करणारा अटकेत
पुणे : गोयल गंगा ग्रुपचे संचालक अमित व अतुल गोयल यांचा नातेवाईक असल्याचे सांगून गोयल गंगा ग्रुपच्या गंगा ग्लिट्झ या गृह प्रकल्पामध्ये फ्लॅट मिळवून देतो असे सांगून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्याला कोंढवा पोलिसांनी अटक केली असून पुणे लष्कर न्यायालयाने त्याला १ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अभिषेक गोयल (रा. ३०७ गोदरेज हरिसन सोसायटी, उंड्री, पुणे ) असे त्याचे नाव आहे. अभिषेकने ‘गंगा ग्लिट्झ’ मध्ये फ्लॅट मिळवून देण्याच्या बहाण्याने विविध ग्राहकांकडून सुमारे २१ लाख रुपये घेतले होते. ही रक्कम घेऊन तो पसार झाल्याची तक्रार गोयल गंगा ग्रुपच्या वतीनेसेल्स विभागाचे सीईओ किरणकुमार देवी यांनी दिली होती.
याबाबतची अधिक माहिती अशी, गोयल गंगा ग्रुपच्या ‘गंगा ग्लिट्झ’या प्रकल्पाचे कामगेल्या चार वर्षांपासून उंड्री येथे सुरु आहे. अभिषेक गोयल या प्रकल्पाच्या प्रोजेक्ट हेड म्हणून कार्यरत होता. तीन डिसेंबर रोजी कंपनीच्या वतीने त्याला त्याच्या पदाचा पदभार सोडून दुसऱ्या प्रकल्पावर रुजू होण्यास सांगितले होते. मात्र अभिषेक कंपनीच्या दुसऱ्या प्रकल्पावर हजर झाला नाही. दोन दिवसानंतर ग्राहक कंपनीकडे प्रत्यक्ष भेटून आणि फोन वरून अभिषेकने पैसे घेतल्याची तक्रार करू लागले.
त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याचे दोन्ही मोबाईल नंबर बंद येत होते. त्याच्या उंड्री येथील घरी चौकशी केली असता तो तेथून निघून गेल्याचे समजले. त्याने अनेकांची फसवणूक केली असल्याचे समजल्या नंतर त्यातील सात जणांनी कंपनीकडे तक्रार केली. फ्लॅट मिळवून देतो, फ्लॅटच्या मुळ किमतीत सवलत देतो असे सांगून त्याने प्रत्येकाकडून दोन ते तीन लाख रुपये घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत त्याने २१,६३,९०० रुपयांचा अपहार केल्याचे लक्षात आले. या फसवणूक प्रकरणी कंपनीच्या वतीने किरणकुमार देवी यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलीस तपासाअंती या गुन्ह्याची व्याप्ती अजून वाढण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी कोंढवा पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.
१५ वे ‘महाटेक २०१९’ भव्य व्यावसायिक प्रदर्शन ७ फेब्रुवारीपासून सुरु..
- दि. ७ ते १० फेब्रुवारी २०१९ दरम्यान कृषी महाविद्यालय पटांगण (नवीन), सिंचननगर, शिवाजीनगर, पुणे येथे सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत.
- महाटेक’चे हे १५वे वर्ष आहे. या प्रदर्शनात ३०० पेक्षा जास्त कंपन्या सहभागी होणार असून तीस ते चाळीस हजार उद्योजक भेट देणार आहेत.
- या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे उद्योग आणि खनन मंत्री श्री. सुभाष देसाई, अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री श्री. गिरीश बापट, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, थर्मॅक्स लिमिटेड चे कार्यकारी उपाध्यक्ष श्री. प्रवीण कर्वे, बीएसई एसएमई बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे प्रमुख श्री. अजय ठाकूर हे उपस्थित राहणार आहेत.
- हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत असून, ऑनलाईन नोंदणी सेवा उपलब्ध आहे.
पुणे- १५वे ‘महाटेक- २०१९’ हे व्यावसायिक प्रदर्शनात दि.७ ते १० फेब्रुवारी दरम्यान कृषी महाविद्यालय पटांगण (नवीन), सिंचननगर, शिवाजीनगर, पुणे येथे सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत पार पडणार आहे. या चार दिवसाच्या व्यावसायिक प्रदर्शनात अत्याधुनिक उत्पादने, यंत्रे व उपकरणे विपणनासाठी आणि विक्रीसाठी प्रदर्शनात उपलब्ध ठेवण्यात येणार आहे.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे उद्योग आणि खनन मंत्री श्री. सुभाष देसाई, अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री. गिरीश बापट, पुण्याच्या महापौर मुक्त टिळक, थर्मॅक्स लिमिटेड चे कार्यकारी उपाध्यक्ष श्री. प्रवीण कर्वे, बीएसई एसएमई बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे प्रमुख श्री. अजय ठाकूर हे उपस्थित राहणार आहे.
‘महाटेक– २०१९’
या प्रदर्शनासाठी उद्योग मंत्रालय, महाराष्ट्र राज्य आणि इंडो – आफ्रिकन चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्री, स्कूल ऑफ इन्स्पिरेशनल लिडरशिप , COSIA (चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशन), TSSIA (ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन) यांचे सहकार्य लाभले आहे.या प्रदर्शनात ३०० पेक्षा अधिक कंपन्या सहभागी होणार असून तीस ते चाळीस हजार उद्योजक भेट देणार आहेत. हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत असून, ऑनलाईन नोंदणी सेवा उपलब्ध आहे.
या वेळी मराठे इन्फोटेक प्रा. लि च्या संचालिका गौरी मराठे म्हणाल्या की ‘महाटेक- २०१८’ प्रदर्शकांच्या प्रतिक्रिया आणि प्रेक्षकांनच्या अभिप्रायामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. त्यामुळे या वर्षीचे महाटेक हे अधिक चांगले व भव्य असेल. दरवर्षी आमचे लक्ष नवीन उपक्रमांवर असते. आम्ही आनंदी आहोत की आम्ही नवीन उत्पादने आणि तंत्रज्ञान लॉन्च करण्यासाठी आणि त्याचे प्रमोशन करण्यासाठी एक उत्कृष्ट मंच प्रदान करतो. ”
तसेच मराठे इन्फोटेक प्रा. लि चे संचालक श्री. विनय मराठे म्हणाले की, “महाटेक ने अनेक वर्षापासून पुण्यातील उत्पादनाच्या उद्योगीक क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. महाराष्ट्रातील अनेक प्रमुख कंपन्या महाटेक प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत.” त्या पुढे ते म्हणाले की “महाटेक उद्दीष्ट हे उत्पादन क्षेत्राच्या वाढीस प्रोत्साहन देणे आणि यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही प्रदर्शनासह एसएमईसाठी 4 वेगवेगळ्या परिषदेचे आयोजन देखील केले आहे. तसेच आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदिजींचे व्हिजन ‘मेक इन इंडिया’ला पाठींबा हा महाटेक २०१९ चा मूळ उद्देश आहे.”
महाटेक’ मध्ये आधुनिक तंत्रज्ञान, आणि उपकरणे भारतीय सेवा क्षेत्रातील संधी यांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक विभागातील आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रदर्शनाच्या माध्यमातून आपली उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध करणार आहेत.
महाटेक २०१९ या प्रदर्शनात ३०० पेक्षा अधिक कंपन्या सहभागी होणार असून त्याला तीस ते चाळीस हजार उद्योजक भेट देतील असा अंदाज आहे. या प्रदर्शनात प्रत्येक क्षेत्रातील उद्योजक सहभागी होत असून मोठ्या उद्योजकांपासुन ते लघु उद्योजकांपर्यत आणि आंतरराष्ट्रीय ब्रॅंडपर्यंत सर्व घटकांचा समावेश आहे. प्रक्रिया, उपकरणे, इलेकट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक, मशिनरी आणि मशीन टूल, इन्स्त्रूमेंटेशन आणि ऑटोमेशण उपकरणे या चार प्रकारामध्ये प्रदर्शनाचे वर्गीकरण करण्यात आले आहे .
‘महाटेक २०१९’ हे प्रदर्शन उद्योजकांसाठी उत्पादने आणि सेवांचा प्रचार करण्यासाठी एक प्रमुख माध्यम आहे. महाराष्ट्र इंडस्ट्रीज डिरेक्टरी आपल्या अद्वितीय प्रकाशनाच्या आधारे औद्योगिक क्षेत्रातील विविध मेळाव्या आणि तांत्रिक परिषदेचा या क्षेत्रातील उद्योजकांना फायदा मिळत असतो.
आयुक्त साहेब , पुरे झाली …हेल्मेटगिरी ..जरा पहा वाढतेय गुन्हेगारी …
पुणे- एकीकडे अट्टाहास करून चौकाचौकात पोलीस शिपाई उभे करून त्यांना वसुलीचे टार्गेट देणाऱ्या पुण्याच्या पोलीस आयुक्तांना आता लगाम घालण्याची वेळ आली आहे .वाहतूक नियमन तर हे करत नाहीच ,नाही वाहतुकीची कोंडी सोडवीत मात्र सामान्य दुचाकीस्वारांना पळून चालेलला गुन्हेगार समजून ..धावत जाऊन पकडा ,अरेरावी करा आणि त्याच्याकडून वसुली करा अशी हेल्मेट गिरी चालविलेल्या या पोलीस आयुक्तांना लगाम घालून .. आता पुरे झाली …हेल्मेटगिरी ..जरा पहा वाढतेय गुन्हेगारी …असे सुनावण्याची वेळ आली आहे. हेल्मेट वापरूनच पुण्यात गुन्हेगार चेहरा लपवून मोकाट फिरत असावेत याकडे त्यांचे लक्ष वेधण्याची वेळ आली आहे .तर दुसरीकडे जे आमदार, खासदार आणि नगरसेवक मौन पाळून हेल्मेट सक्तीच्या विरोधात रस्त्यावर येत नाहीत त्यांना पुणेकरांनी ‘व्यवस्थित ध्यानात’ ठेवण्याची देखील वेळ येवून ठेपली आहे.
नागपुरातून खास जणू मुख्यमंत्र्यांनीच सोशिक आणि नेतृत्व हरवलेल्या पुणेकरांकडून वसुलीसाठी पाठविलेल्या, यासांस्कृतिक शहरात मागील २० दिवसांत १२ पेक्षा जास्त खून झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्याआहेत .रात्रीच्या वेळी लुटमार प्रकार हि वाढते आहेत .हे धक्कादायक आहे. सार्वजनिक ठिकाणी खून आणि हल्ले झाले आहेत, .एकीकडे अशा घटना आणि दुसरीकडे पोलिसांकडून होणारी वसुली अशा कचाट्यात सोशिक पुणेकर सापडला आहे .नागरिकांमध्ये भीतीआणि दहशत निर्माण झाली आहे.पुणे नेहमीच शांतताप्रिय शहर म्हणून ओळखले जाते आणि अशा ठिकाणी ह्या घटना घडणेम्हणजे शहराच्या प्रतिमेस कलंक लावणारे आहे.पुण्याचे पालकमंत्री आणि खासदार ..मुख्यमंत्र्यांच्या या पोलिसी अवतारापुढे मान तुकवून शेपूट हलवीत निमूटपणे पडून आहेत .एकीकडे उच्च वर्गात शिक्षित आणि प्रतिष्ठेचा टेंभा मिरविणाऱ्या विरोधीपाक्षाच्या महिला खासदारांनी देखील पोलिसांच्याकडून हेल्मेटगिरी च्या नावाने होणाऱ्या लुट्मारीला विरोध न करण्याचीच भीष्मप्रतिज्ञा केली आहे. सुर्यकांत पाठकांसारखे ग्राहक चळवळीतील प्रभावी नेते वैयक्तिक शाररीक व्याधी आणि राजकारण यामुळे प्रभावहीन ठरू लागले आहेत. .
संसाराच्या रहाटगाडग्यात अडकलेली ,सोशिक जनता ५०० रुपये खर्च करून ससेमिरा चुकवू पाहत असली तरी वाहतूक कोंडी आणि गुन्हेगारीची भीती यातून सुटका करवून घेवू शकलेली नाही . दुटप्पी भूमिका घेणारे राजकीय पक्ष ,आणि सत्ताधाऱ्यांची गुलामी करणारे अधिकारी या चक्रात पुणेकरांची अडकलेली मान सोडून काढायला ..पुणेकरांचे नेतृत्व करू पाहणारे ..कोण कोणते भावी खासदार,आमदार उद्याच्या हेल्मेट सक्ती विरोधातील आंदोलनात सहभागी होताहेत हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे . उद्या जे आमदार ,खासदार या आंदोलनात सहभागी होणार नाहीत ..त्यांना मात्र धडा शिकवायला ..सोशिक पुणेकरांनी तयार राहायला हवेच एवढे मात्र निश्चित ….
गोवा खाद्यपदार्थ आणि संस्कृती महोत्सव -अनुभवा वेगवेगळे खाद्यास्वाद
पणजी – गोवा सध्या वार्षिक गोवा खाद्यपदार्थ आणि संस्कृती महोत्सव २०१९ साठी सज्ज होत असून या महोत्सवात राज्याचे खाद्यपदार्थ आणि देशभरातील जीवनशैली खाद्यपदार्थांची अनुभूती घेता येणार आहे. देशांतर्गत आणि परदेशी प्रवाशांसाठी गोव्याच्या कलाकारांतर्फे स्थानिक तसेच राष्ट्रीय असे दोन्ही नृत्य सादरीकरण केले जाणार आहे. हा कार्यक्रम ६ ते १० फेब्रुवारी २०१९ दरम्यान संध्याकाळी सहानंतर रंगणार आहे.
समुद्रकिनारे आणि सुशेगात स्वभावानंतर गोव्याकडे आकर्षित होण्यामागे बहुधा इथले खाद्यपदार्थ महत्त्वाचे कारण असावेत. या पाच दिवसीय दिमाखदार कार्यक्रमासाठी दूरदूरहून लाखो पर्यटक राज्यात गोव्याचे खास खाद्यपदार्थ चाखण्यासाठी आणि गोव्यातील धमालमस्ती अनुभवण्यासाठी येतात. यंदाही या महोत्सवात शाकाहारी व मांसाहारी प्रकारचे कित्येक खाद्यपदार्थ, गोड पदार्थ व इतर खास खाद्यपदार्थांचे ७० पेक्षा जास्त स्टॉल्स असतील. या कार्यक्रमासाठी खवैय्ये दूर ठिकाणांवरून नेहमीच्या फिशकरी आणि भाताशिवाय अस्सल पदार्थ चाखायला येतात. या पाच दिवसीय सोहळ्यात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळ्या समूहांद्वारे लाइव्ह सादरीकरण, पाककृती स्पर्धा आणि नृत्य सादरीकरण केले जाणार आहे. या लाइव्ह सादरीकरणामध्ये स्थानिक तसेच प्रसिद्ध राष्ट्रीय नावे उदा. अंतरिक्ष, थैक्कुडम ब्रिज, बॅड ब्लड, पायनॅपल एक्सप्रेस आणि लगोरी यांचा समावेश असेल. या कार्यक्रमात भरपूर आतषबाजी, बक्षिसे आणि बरंच काही अनुभवायला मिळेल. हा कार्यक्रम डी. बी. बांदोडकर मैदान, कंपाळ, पणजी येथे संध्याकाळी ६ नंतर आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश मोफत आहे.
शीख समाजाला सर्वोपतरी मदत करणार – अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी हराफात शेख
पुणे-शीख समाजाला सर्वोपतरी मदत करणारअसल्याचे आश्वासन अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी हराफात शेख पुणे शहरातील शीख समाजाच्या शिष्टमंडळाला दिले . क्वीन्स गार्डन मधील नवीन शासकीय विश्रामगुहात झालेल्या अल्पसंख्यांक समाजबांधवांच्या बैठकीस पुणे शहरातील शीख समाजामधील गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे अध्यक्ष चरणजितसिंग सहानी , गुरुद्वारा दशमेश दरबारचे अध्यक्ष दर्शनसिंग ढिलोह , गुरुद्वारा गुरुसिंग सभाचे सचिव रणजितसिंग अजमानी व शीख बांधव उपस्थित होते .
यावेळी अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी हराफात शेख यांना पुणे शहरातील गुरुद्वारांची माहिती देण्यात आली . तसेच गुरुद्वार मार्फत चालणारे धार्मिक सामाजिक कार्याची माहिती देण्यात आली . येरवडा येथील यु पी हॉटेलजवळ असणाऱ्या गुरुद्वारा दशमेश दरबार जागेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू . आगामी काळात येणाऱ्या गुरुनानक देवजींच्या ५५० व्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली .
महावितरणच्या चित्ररथाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक
मुंबई-
प्रजासत्ताक दिनानिमित्त महावितरणच्या वतीने तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून महावितरणने या चित्ररथात विजेमुळे शेती आणि शेतीमुळे प्रगती या संकल्पनेवर आधारित देखावा तयार केला होता.
प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी 2019 ला मुंबई येथील शिवाजीपार्क येथे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत असणाऱ्या विविध विभागांच्या वतीने चित्ररथाचे प्रदर्शन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मॉरिशियसचे पंतप्रधान श्री. प्रवींद जुगनॉथ, महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. विद्यासागर राव, मुख्यमंत्री ना. श्री. देवेद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी महावितरणने विजेमुळे शेती आणि शेतीमुळे प्रगती या मुख्य संकल्पनेवर आधारलेला देखावा चित्ररथासाठी तयार केला होता. यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, इलेक्ट्रिकल व्हेईकल चार्जिंग स्टेशन्स्, मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना, सौभाग्य योजना, उच्चदाब वीज वितरण प्रणाली या योजनेंच्या यशस्वीतेवर आधारित देखाव्यांचा समावेश होता. चित्ररथाच्या देखाव्याचे मान्यवरांनी कौतुक केले होते.
महावितरणच्या या चित्ररथाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून सर ज. जी. उपयोजित कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता श्री संतोष क्षिरसागर, सर जे. जे. स्कुल ऑफ आर्टचे अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे व मुंबई विद्यापीठाच्या अकॅडेमी ऑफ थिएटर आर्टस्चे संचालक डॉ. मंगेश बनसोड यांच्या निवड समितीने चित्ररथाचे नामांकन निश्चित केले. हा चित्ररथ कन्सेप्ट कम्युनिकेशन या एजन्सीच्या माध्यमातून तयार करण्यात आला. महावितरणच्या यशाबद्दल ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव श्री अरविंद सिंह, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री संजीव कुमार यांनी सर्वसंबंधितांचे कौतुक केले आहे.
सेवापूर्तीनिमित्त मंदाकिनी रोकडे यांचा ‘बालभारती’तर्फे सत्कार व निरोप समारंभ
पुणे : महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम व संशोधन मंडळातर्फे (बालभारती) वरिष्ठ लघुलेखिका मंदाकिनी प्रकाश रोकडे यांच्या सेवापूर्तीनिमित्त जाहीर सत्कार करण्यात आला. ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मंदाकिनी रोकडे बालभारतीमधून सेवानिवृत्त झाल्या. ‘बालभारती’चे वित्त व लेखा अधिकारी अंकुश नवले यांच्या हस्ते त्यांचा शाल, पुष्पगुच्छ व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.
सेनापती बापट रस्त्यावरील बालभारतीच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्याला मंदाकिनी यांचे पती बंधुताचार्य प्रकाश रोकडे, प्रसिद्ध कवी चंद्रकांत वानखेडे, किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे, बालभारतीच्या साठा व वितरण विभागाचे व्यवस्थापक दत्तात्रय केंज, रेणुका पिल्लई, चंद्रकांत शिंदे, जालिंदर भापकर यांच्यासह सहकारी, नातेवाईक व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेवापूर्तीनिमित्त मिळालेल्या रकमेतून मंदाकिनी रोकडे यांनी ‘काषाय प्रकाशन’ या संस्थेला २५ हजार रुपयांची देणगी दिली. ‘काषाय’च्या वतीने प्रा. चंद्रकांत वानखेडे यांनी धनादेश स्वीकारला. यावेळी बालभारतीने आपले आयुष्य घडविल्याची, तसेच कायम ऋणात राहणार असल्याची भावना मंदाकिनी यांनी व्यक्त केली. प्रकाश रोकडे यांनी घर आणि बालभारती या दोहोंवर मंदाकिनी यांनी तितकेच प्रेम केल्याचे सांगितले. नवले यांनी रोकडेंच्या कामाचे कौतुक केले. इतर सहकाऱ्यांनीही त्यांच्या स्नेहाविषयी भावना व्यक्त केल्या. किरण केंद्रे यांनी सूत्रसंचालन केले.
दोनशे गरजू विद्यार्थिनींना इनरव्हील क्लब, झूमकार यांच्या वतीने मोफत सायकल वाटप
येरवडा परिसरात ८ भटकी कुत्री व १० मांजरांचा संशयास्पद मृत्यू
पुणे: .येरवड्यातील त्रिदलनगर सोसायटी परिसरात ८ कुत्री व १० मांजरे मृत अवस्थेत आढळली आहे. ही घटना संशयास्पद असून मुक्या प्राण्यांची विषप्रयोगातून हत्या करण्यात आली असल्याची आरोप प्राणीमित्रांकडून करण्यात येत आहे. बुधवारी ही घटना समोर आली आहे. त्यानंतर येरवडापोलिसांनी घटनेची संपुर्ण माहिती घेऊन सदर मृत कुत्री व मांजरांचे शासकीय पशु रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात पाठविले. या प्राण्यांचा मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. ते शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच समोर येईल अशी माहिती पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील महिन्यातील २८ डिसेंबर २०१८ रोजी त्रिदलनगरमध्ये ५ कुत्रे आणि ९ मांजरी असे एकूण १४ भटके प्राणी एकाच वेळी संशयास्पद मरण पावल्याची घटना घडली होती. त्यानंतर काही दिवसांच्या आतच आणखी ४ प्राण्यांचा येथे मृत्यू झाला होता. त्यावेळी एकूण १८ प्राण्यांच्या मृत्यूमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली होती. ही भटकी कुत्री आणि मांजरं सोसायटीच्या परिसरात सतत भुंकत तसेच घाण करीत असल्याने सोसायटीमधील कोणीतरी व्यक्तीने अन्न पदार्थांमध्ये विषारी औषध घालून त्यांना मारले असल्याची शक्यता प्राणीमित्रांनी व्यक्त केली आहे.
मात्र या घटनेमुळे येरवडा परिसरात खळबळ उडाली आहे.मागील महिन्यात या परिसरातल कुत्री व मांजरांचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याची माहिती येरवडा पोलिसांना मिळाली होती. या प्राण्यांचा म्रृत्यू विषबाधेतून झाला असल्याचा आरोप प्राणीमित्रांनी केला होता.याप्रकरणी येरवडा पोलिसांचा तपास सुरु आहे.


