Home Blog Page 2985

शीतलीला आहे मराठी भाषेचा अभिमान

0

‘लाखात एक आपला फौजी’ असं म्हणायला लावणाऱ्या ‘लागीरं झालं जी’ या ‘झी मराठी’ वरील मालिकेने गेल्या दीड वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर केलं आहे. या मालिकेतील अजिंक्य आणि शीतल या व्यक्तिरेखा महाराष्ट्रातील कुटुंबातील एक झाल्या आहेत. शीतल म्हणजे अभिनेत्री शिवानी बावकर हि खऱ्या आयुष्यात जर्मन भाषेत निपुण आहे पण मालिकेसाठी तिने सातारी भाषा शिकण्यासाठी देखील तितकीच मेहनत घेतली.

मराठी भाषा दिनानिमित्त शिवानीने आपल्या मातृभाषेविषयी तिचं मत व्यक्त केलं. मराठी भाषेविषयी बोलताना शिवानी म्हणाली, “मराठी माझी मातृभाषा असल्याचा मला अभिमान आहे कारण आपली संस्कृती खूप जुनी आहे आणि अजूनही आपण ती बऱ्यापैकी जपली आहे. मुंबईत राहायचं तर मराठी आलच पाहिजे या मतची मी आहे. कारण भाषेचा अभिमान हा सगळ्यांना असावा आणि आपण आपली भाषा सोडून नवीन भाषा शिकण्यापेक्षा आपल्या भाषेबरोबर दुसरी भाषा शिकावी. माझं शिक्षण कॉन्व्हेन्ट मध्ये झालं असल्यामुळे शाळेत मराठीवर जास्त भर नव्हता. पण घरी मात्र मराठीतच बोलायचं असा मला आणि माझ्या धाकट्या बहिणीला सांगितल होतं. अजूनही मराठीतले अवघड शब्द मी आईला फोन करून विचारते. मी इंग्लिश पुस्तकं वाचते. ह्या मराठी दिनापासून मी जरा मराठी पुस्तकही  वाचायला सुरुवात करीन असा मी ठरवलय. मालिकेमुळे सातारी ही भाषा असते हे मी शिकले. शहरात  अनी- पानी, घाटी, असं कोणाला चीडवण किंवा नावं ठेवणं चुकीचं आहे कारण भाषा म्हणजे एकमेकांशी संवाद साधण्यासाठी चा एक माध्यम आहे. शुद्ध भाषा अस काही नसतं आणि कुठलीही भाषा ही भाषाच असते.”

दहशतवाद्यांवरील कठोर कारवाईबद्दल सैनिकांचे अभिनंदन – भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे

0

मुंबई ( शाहरुख मुलाणी ) – भारतात दहशतवादी हल्ले करणाऱ्या जैश ए महंमदचा पाकव्याप्त काश्मीरमधील तळ उध्वस्त करणाऱ्या भारतीय हवाई दलाचे आपण अभिनंदन करतो. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतीय सैन्याने दाखविलेल्या या शौर्याला आपण सलाम करतो, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी व्यक्त केली.

खा. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, पुलवामा येथे दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर हा हल्ला करणारे व त्यांना मदत करणारे, यांच्यावर कारवाई करण्यास सरकारने सैन्याला पूर्ण मोकळीक दिल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. गुप्तचरांनी दिलेल्या अचूक माहितीच्या आधारे भारतीय हवाई दलाची विमाने यशस्वी कामगिरी करून सुरक्षित परतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भक्कम नेतृत्वात देश सुरक्षित असल्याचे या वेळी दिसून आले. त्यांनी सांगितले की, भारत कोणत्याही परिस्थितीत दहशतवादी कारवाया सहन करणार नाही आणि नवा भारत दहशतवादमुक्त असेल हे या कारवाईवरून दिसून आले.

नैराश्य टाळता येऊ शकते ; लेट्स टाँक डिप्रेशन कार्यशाळेचे आयोजन

0

पुणे : देशातील सुमारे २३ टक्के लोकसंख्या उदासीनता डिप्रेशन व नैराश्यामुळे त्रस्त आहे.

त्यामुळे भारतात  दररोज होणाऱ्या आत्महत्यांची सख्या २०० पेक्षा जास्त आहे . यावर उपाय सुचाविण्यासाठी आणि दुख : नैराश्य व डिप्रेशनने ग्रासलेल्या रुग्णांना त्यातून बाहेर काढण्यासाठी पुण्यातील सीडर संस्थेच्या वतीने लेट्स टाकँ डिप्रेशन या मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले आहे .

दिनांक ३ मार्च रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत सुमन मुळगावकर ऑडिटोरियमआय. सी. सी टॉवर्ससेनापती बापट रोडपुणे येथे ही कार्यशाळा होणार आहे. यात प्रवेश विनामुल्य असून पुण्यातील प्रसिद्ध मनोवैज्ञानिक सोनल सोनवणी या मार्गदर्शन करणार आहेत.

उदासीनता दूर करण्यासाठी मनोवैज्ञानिक हस्तक्षेप हा या व्याख्यानाचा विषय आहे. यामुळे उदासीनते मुळे निर्माण होणाऱ्या समस्या व परिणामावर ५० टक्के नियंत्रण ठेऊ शकतो हे संशोधन व प्रयोगातून सिद्ध झाले आहे. भारतात जे आत्महत्या करतात त्यापैकी ९० टक्के रुग्ण हे गृह कलह , नातेसंबधात आलेले वितुष्ट , समाजात खालावलेली पत , प्रतिष्ठा , ढासळलेली आर्थिक परिस्थिती यामुळे आत्महत्या करतात असे एका पाहणीतून समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जगातील सर्वात जास्त मनोरुग्णाची संख्या भारतात आहे. पण ही परिस्थिती सुधारण्यासाठी सामुहिक पातळीवर कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाही. रुगांवर वेळीच औषधोपचार होतात तरीदेखील त्यांचे योग्य समुपदेशन होत नसल्याने वैफल्य ग्रस्त परिस्थितीत ते आत्म्हत्येसारखे टोकाचे पाउल उचलतात .   किवा तो धुम्रपान ,मद्यपान ड्रग्स अशा व्यसनाच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होतो . यात किशोर वयीन युवक युवतींची संख्या मोठी आहे. म्हणूनच नैराश्य उदासीनता यावर नियंत्रण ठेवण्यासाठी रुग्णाच्या सभोवताली असलेल्यांनी मार्गदर्शित हस्तक्षेप करणे आवश्यक आहे . निराशा कशी ओळखावी ? आपल्या आसपासचा जो कोणी उदास, वैफल्यग्रस्त होत असल्याचे जाणवल्यास काय करावे ? त्याला सल्ला कसा द्यायचा ? निराश झालेल्या व्यक्तीस कोणते प्रश्न विचारले जावेत . या विषयी या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. केडर या संस्थेने आतापर्यत १५०० पेक्षा जास्त वैफल्यग्रस्त रुग्णांना चिंता , नैराश्यातून बाहेर काढले आहे. त्यासाठी सिडर  संस्थेने निराशेशिवाय जग निर्माण करण्याचा संकल्प केला असून सीडरच्या संशोधकांनी मनोवैज्ञानिक हस्तक्षेप करून चिंता निराशा कशी टाळता येईल याबाबतचा एक यशस्वी कार्यक्रम तयार केला आहे . याची देखील माहिती या कार्यशाळेत देण्यात येणार आहे. तरी मनोरुग्ण , वैफल्य ग्रस्त व्यक्ती पालक , मित्र व नातेवाईकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे. लेट्स टॉक डिप्रेशन”  या कार्यशाळेत सहभागी  होण्यासाठी नोंदणी आवश्यक असून  9892003248  व्हाँट्स अप मेसेज करा   किंवा   020- 29707248 या नंबरवर फोन करावा .

अपंग कल्याण आयुक्तपदी प्रेरणा देशभ्रतार यांची नियुक्ती…

0
पुणे-यशदाच्या उप महासंचालक प्रेरणा देशभ्रतार यांची अपंग कल्याण आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. देशभ्रतार यांनी या पूर्वी पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पहिले आहे .अपंग कल्याण आयुक्तालयातील अवघ्या ५२ दिवसांचा कालावधी संपवून बालाजी मंजुळे  यांनी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी पदाची सूत्रे  सॊमवारी स्वीकारली..
राज्यात सन  २००० मध्ये अपंग कल्याण आयुक्तालयाची स्थापना करण्यात अली .त्यानंतर गेल्या साडेअठरा वर्षांमध्ये या आयुक्तालयाने तब्बल १३ अधिकारी पहिले आहेत..त्यातील दोनच अधिकारी आपला कार्यकाल पूर्ण करू शकले आहेत..अपंग कल्याणच आयुक्तालयातील अधिकाऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांविरोधात विविध संघटनांनी सरकारकडे आपला रोष व्यक्त केला आहे. सोमवारी (दि.२५) अपंग कल्याण आयुयक्तालयाबाहेर कर्णबधिर युवकांना पोलिसांनी मारहाण केल्याची घटना घडली.त्यात खुद्द मुख्यमंत्र्यांना लक्ष घालावे लागले.केंद्र सरकारचा २०१६ चा पनाग हक्क कायद्याची अंमलबजावणी ,दिव्यांग कल्याणकारी योजनांसाठी स्थानिक स्वराज संस्थांना स्वनिधीच्या ५ टक्के निधीचा करावा लागणारा खर्च दिव्यांग रोजगार आणि शिक्षणा  विषयीचे प्रश्न अशी आव्हाने नव्याने नियुक्त होत असलेल्या आयुक्तांन समोर  असतील

लहुजी स्मारक आणि शिवसृष्टी बाबत अंदाजपत्रकातून निव्वळ फसवणूक -सुभाष जगताप

0

पुणे-यंदाचे महापालिकेचे अंदाजपत्रक हे फसवे आणि फुगविलेले अंदाज पत्रक असून … एका चांगल्या सदृढ महापालिकेचे …मरण मी उघड्या डोळ्याने पाहतो आहे अशी खंत आज अंदाजपत्रकावर बोलताना नगरसेवक सुभाष जगताप यांनी व्यक्त केली. लहूजी वस्ताद साळवे आणि आणि कोथरूड ची शिवसृष्टी गेल्या वर्षी आणि पुन्हा या वर्षी नुसती तरतूद नोंदवून फसवणुकीचा कारभार पुन्हा पुन्हा करण्यात येतो आहे असाही आरोप त्यांनी यावेळी केला … नेमके सुभाष जगताप यांनी काय म्हटले आहे ..ते ऐका त्यांच्याच शब्दात ..

जैशचा म्होरक्या मसूद अझरच्या नातेवाइकांचा खात्मा

0

नवी दिल्ली -भारतीय हवाई दलाने मंगळवारी भल्या पहाटे पाकमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. पहाटे 3.30 वाजता झालेल्या या कारवाईला हवाई दलाने अधिकृत दुजोरा दिला आहे. पत्रकार परिषदेत संवाद साधताना हवाई दलाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली. पाकिस्तानला दहशतवाद्यांच्या या ठिकाणांची माहिती देण्यात आली होती. परंतु, त्यांनी कारवाईस नकार दिला. त्यानंतरच भारताने तीन ठिकाणी फक्त दहशतवाद्यांना लक्ष्य करून हवाई हल्ले केले. हे कॅम्प जैश ए-मोहम्मदचा कमांडर मौलाना युसूफ अझर चालवत होता. तो जैशचा म्होरक्या मसूद अझरचा नातेवाइक होता. तो देखील या हवाई हल्ल्यात ठार झाला आहे. यासोबत, इतर शेकडो दहशतवाद्यांचा देखील खात्मा झाला.

नागरिकांना त्रास होऊ दिला नाही -हवाई दल

भारतीय हवाई दलाने पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानला वारंवार दहशतवादावर कारवाईचे आवाहन केले. तरीही पाकिस्तानने त्यावर दुर्लक्ष केले. याच दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या वाहनावर हल्ला केला. पुलवामा येथे झालेल्या या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. अशात दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक होते. ही कारवाई फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर करण्यात आली आहे. यात कुठल्याही स्वरुपाने नागरिकांना त्रास देण्यात आला नाही. सोबतच, पाकव्याप्त काश्मीरात ही कारवाई झाली नाही. त्यामुळे, आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीचे भारताने उल्लंघन केले नाही असे हवाई दलाने स्पष्ट केले.

डॉ . पतंगराव कदम राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत ऋषिकेश पखाले ,किरण कीर्तिकर प्रथम

0
पुणे :भारती अभिमत विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी ) आयोजित ‘ डॉ . पतंगराव कदम राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत ‘  ऋषिकेश पखाले ,किरण कीर्तिकर  यांनी प्रथम क्रमांक पटकावला  . निकिता पाटील , उद्देश कृष्णा पवार यांना द्वितीय तर  अंजली रावत ,सागर यांना तृतीय क्रमांक मिळाला . वैभव  मेहता ,अलिशा मेमन यांना   उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले .
आयएमईडी चे संचालक आणि भारती विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ . सचिन वेर्णेकर यांनी ही माहिती दिली .
भारती अभिमत विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी )तर्फे  महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी डॉ . पतंगराव कदम राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचे २२ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते  . आयएमईडी च्या पौड रस्ता येथील कॅम्पस मध्ये ही स्पर्धा झाली .
डॉ . पतंगराव कदम  -एक द्रष्टा नेता ,भारताचे अर्थशास्त्र :समस्या आणि उपाय ,धर्म आणि राजकारण ,बेरोजगारीचा राक्षस ,स्वच्छतेतून विकास ,भारतीय शिक्षण पद्धतीसमोरील आव्हाने व उपाय असे विषय या वक्तृत्व स्पर्धेसाठी होते  . प्रथम क्रमांक विजेत्याला दहा हजार रोख ,द्वितीय क्रमांकासाठी ७ हजार ,तृतीय क्रमांकासाठी ५ हजार अशी पारितोषिके ,सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र डॉ . सचिन वेर्णेकर  यांच्या हस्ते देण्यात  आली .

कर्मचाऱ्यांचे पाय धुण्यापेक्षा सेवेत कायम समायोजन करा – शाहरुख मुलाणी

0
म. रा. कंत्राटी कर्मचारी महासंघाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कडे साकडे
मुंबई – देशात तसेच राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी सफाई कामगार स्वच्छतादूत म्हणून देशाची स्वच्छता करत आहेत त्यांना आधी सेवेत कायम समायोजन करावे अशी लेखी मागणी ई-मेल द्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कडे म. रा. कंत्राटी कर्मचारी महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी केली आहे.
महासंघाचे मंत्रालयीन सचिव मुलाणी म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र शासनांतर्गत “ स्वच्छ भारत अभियान ” सुरु केले आणि दिल्ली पासून गल्ली पर्यंत सर्वत्र लोक हातात झाडू घेऊन स्वच्छता करत आहेत. इतर देशाप्रमाणे आपल्या देशात स्वच्छता व्हावी हि सर्वांची भावना आहे. संत गाडगेबाबा यांनी सुद्धा स्वच्छतेचा संदेश दिला. कंत्राटी सफाई कामगारांना यांना नोकरी ची कोणतीही प्रकारचे हमी नाही. कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय सुविधा नाहीत. तरी सुद्धा कंत्राटी सफाई कामगार गटर, नाले आदी घाणीत उतरून स्वच्छता करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. घरातील कचरा डम्पिंग ग्राऊंड पर्यंत घेऊन जाण्यात याच कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सफाई कामगारांचे पाय धुवून सम्मान व सत्कार केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद ! परंतू, देशात तसेच प्रामुख्याने राज्यात मंत्रालय ते ग्रामपंचायत पर्यंत त्यात विविध महानगरपालिका, नगरपरिषदा आदीं मध्ये सर्वत्र स्वच्छतादूत म्हणून कंत्राटी सफाई कामगार देशाची स्वच्छता करत आहेत. फक्त सफाई कामगारांचे पाय धुवून चालणार नाही तर कंत्राटी सफाई कामगार यांना आहे त्या ठिकाणी सेवेत कायम समायोजन केल्यास खरा सम्मान आणि सत्कार होईल असे मुलाणी म्हणाले.
यावेळी कंत्राटी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष तथा याचिकाकर्ते मुकुंद जाधवर, सरचिटणीस शहाजी नलवडे, कार्याध्यक्ष सचिव जाधव, कोषाध्यक्ष विकास डेकाटे, राज्य सचिव बाबासाहेब कोकाटे, मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी, प्रवक्ते भगवान भगत आदी उपस्थित होते.

पाकमधील भारतीयसेनेच्या कारवाईने महापालिकेत आनंदोत्सव

0

पुणे-पाक मधील जैश च्या तळावर भारतीय सेनेने हल्ला करून दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा आनंद आज महापालिकेत व्यक्त करण्यात आला . भाजपच्या नगरसेवक धीरज घाटे ,महेश वाबळे आणि कार्यकर्त्यांनी यावेळी तिरंगा हाथी घेऊन जोरदार घोषणा देवून आनंद व्यक्त केला .यावेळी फटाके फुटले, पेढे वाटले .. आणि मुख्य सभेत हि भारतीय सेनेचे अभिनंदन करण्यात आले .

चांदोरकर, कुरेशी आणि भंडारे यांना’माध्यम रत्न’ पुरस्कार जाहीर

0

 

पुणे-‘मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठान’ तर्फे महाकवी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी म्हणजे २७ फेब्रुवारी रोजी ‘माध्यम
रत्न’पुरस्कार दिले जाणार आहेत. यंदा चैत्राली चांदोरकर (महाराष्ट्र टाईम्स ), हलिमाबी अब्दुल कुरेशी
(बी.बी.सी.वर्ल्ड न्यूज – मराठी) आणि दीपा भंडारे (आकाशवाणी) यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
बुधवार २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता ‘पत्रकार भवन’नवी पेठ, पुणे येथे हा कार्यक्रम संपन्न होईल.
५००० रुपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यासोबतच ‘नाद-संवाद’या प्रामुख्याने
कलावंताच्या छोट्या मुलाखतींवर आधारित तन्मयी मेहेंदळे यांच्या पुस्तकाचे प्रकाशनही संपन्न होईल, अशी
माहिती ‘मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठान’चे अध्यक्ष प्रवीण प्र. वाळिंबे यांनी दिली.
मराठी पत्रकारिता अथवा मराठी साहित्य यामध्ये सातत्याने योगदान देणाऱ्या व्यक्तीस प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी
‘माध्यम रत्न’अथवा ‘;मराठी रत्न’ पुरस्कार देऊन गौरविले जाते. यापूर्वी सुधीर गाडगीळ, प्रल्हाद सावंत, सतीश
कामत, डॉ. शैलेश गुजर, सुलभा तेरणीकर, अरविंद गोखले, मुकुंद संगोराम, प्रभाकर खोले, सुजाता देशमुख, मधू
पोतदार, देविदास देशपांडे, चारुहास पंडित, प्रभाकर वाडेकर, श्रीधर लोणी, अशांना ‘माध्यम रत्न’अथवा ‘मराठी
रत्न’पुरस्कार देऊन गौरविले गेले आहे.
चैत्राली चांदोरकर – या पुण्यात दै. महाराष्ट्र टाईम्स मध्ये गेली ८ वर्षे वरिष्ठ वार्ताहर म्हणून काम करीत आहेत.
पर्यावरण, हवामान बदल, तसेच महिला व बालकल्याण या विषयात त्यांचा विशेष अभ्यास आहे. यापूर्वी बेळगाव
तरुण भारतची पुणे प्रतिनिधी व दै. सकाळ मध्ये वार्ताहर म्हणून त्यांनी काम केले. ‘युरोपिअन कमिशन’तर्फे महिला
पत्रकारांसाठी आयोजित ‘वूमन इन मिडिया’ या प्रकल्पात सहभाग व त्यासाठी युरोपचा अभ्यास दौरा. तसेच पॅरीस
येथे २०१५ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक हवामानबदल परिषदेमध्ये सहभाग. पॅरीस कराराचे प्रत्यक्ष
जाऊन वार्तांकन करणारी पुण्यातील एकमेव महिला पत्रकार. पाठोपाठ अमेरिका पॅरीस करारातून बाहेर पडल्यावर
जर्मनीमध्ये बर्न येथील ‘जागतिक हवामान बदल’ परिषदेतही उपस्थित राहून वार्तांकन.’;इको जर्नालिस्ट’
पुरस्काराने सन्मानित.
हलिमाबी अब्दुल कुरेशी – या बी.बी.सी. वर्ल्ड न्यूज – मराठी विभागात पश्चिम महाराष्ट्राच्या प्रतिनिधी म्हणून
काम करीत आहेत. यापूर्वी सुमारे ६ वर्षे त्यांनी न्यूज १८ लोकमत चॅनेलमध्ये वरिष्ठ पुणे प्रतिनिधी म्हणून काम केले.
मानवी सफाई कामगारांवरील वृत्तांत, बीफ बंदीवरील महाराष्ट्रातील परिणाम, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील
दुष्काळग्रस्त भागांवरील वृत्तांत, एम.आय.टी. रॅगिंग प्रकरण, माळीण दुर्घटना, मुस्लीम जातपंचायत वरील वृत्तांत,
ट्रिपल तलाक व हलाला वरील वृत्तांत, पंढरपूरवारी वृत्तांत असे त्यांचे अनेक वृत्तांत गाजले’रामनाथ गोयंका
एक्सलन्स अवॉर्ड इन जर्नेलीझम’ हा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांना
मिळाला.

दीपा भंडारे – या गेली सुमारे २० वर्षे पुणे आकाशवाणीवर वृत्तनिवेदक म्हणून काम करीत असून कीर्तन,
शास्त्रीय गायन आणि तबला वादन यात त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. सवाईगंधर्वसह शेकडो सांस्कृतिक
कार्यक्रमांचे रसग्रहण व वार्तांकन त्यांनी विविध मराठी वृतपत्रांमध्ये केले आहे. शेकडो कलाकारांच्या मुलाखती
त्यांनी वृत्तपत्रासाठी घेतल्या असून कीर्तन आणि अध्यात्म यावर विपुल लेखन केले आहे. मराठवाडा मित्रमंडळाच्या
वाणिज्य महाविद्यालयात पत्रकारिता विभागात गेली ८ वर्षे त्या शिकवत आहेत. अनेक पुरस्कारांनी त्यांना
सन्मानित केले गेले आहे.
‘नाद-संवाद’ या पुस्तकाचे प्रकाशन या कार्यक्रमात होणार असून गेल्या अनेक वर्षांमध्ये तन्मयी मेहेंदळे यांनी
घेतलेल्या निवडक कलावंतांच्या मुलाखतींवर आधारित हे पुस्तक आहे. यातील अनेक मुलाखती यापूर्वी दै. सकाळ,
दै. प्रभात व दै. सामना मध्ये प्रकाशित झालेल्या असून त्याचे संकलन या पुस्तकात आहे. ज्येष्ठ निवेदक व
मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांची प्रस्तावना या पुस्तकास लाभली आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण भ्रष्टाचाराचे कुरण :आबा बागुल

0
पक्की दुमजली घरे असतानाही योजना :शाहू वसाहतीतील रहिवाशांचा मोर्चा 
 
पुणे
 राज्यशासनाने ज्या धोरणाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची निर्मिती केली त्या धोरणालाच पुण्यात हरताळ फासला जात आहे. शासनाच्या  जागेवरील घोषित झोपडपट्टी ;पण पक्की दुमजली घरे असतानाही केवळ भ्रष्टाचारासाठी बेकायदेशीर एसआरए योजनेचा घाट घातला जात असल्याचा  प्रकार माजी उपमहापौर आबा बागुल यांनी उघडकीस आणला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण आणि दहशतीचे केंद्र बनल्याच्या  वस्तुस्थितीकडे    आबा बागुल यांनी  लक्ष वेधून ”एसआरए”च्या कारभाराच्या  चौकशीची मागणी केली आहे.
बेकायदेशीररित्या राबविण्यात येत  असलेल्या प्रस्तावित एसआरए योजनेला पर्वतीतील  सर्व्हे क्रमांक 92 अ शाहू वसाहतीमधील नागरिकांनी तीव्र  आक्षेप घेत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कार्यालयावर माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांच्या नेतृत्त्वाखाली  सोमवारी  मोर्चा  काढला.
  यावेळी प्रस्तावित एसआरए योजनाच बोगस असल्याचे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या निदर्शनास आणून देण्यात आले  आणि  केवळ विकसकाच्या हितासाठी एसआरए योजनेचा घाट घातला जात असल्याची ठाम भूमिका मांडून कोणत्याही स्थितीत एसआरए योजना होऊ देणार नाही असा निर्धारही यावेळी   रहिवाशांनी केला. यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना माजी उपमहापौर आबा बागुल, पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागुल तसेच साधू  नवाडे, चंद्रकांत सिद्धे , भाऊ कुंभार,महेंद्र चव्हाण ,विलास आंबळे,सलीम शेख, बबलू शेख,सोंडे,अंजु गायकवाड यांच्या  उपस्थितीत शाहू वसाहतमधील रहिवाशांनी निवेदन देऊन प्रस्तावित योजना तातडीने रद्द करून चौकशीची मागणी केली. निवेदनात म्हटले आहे कि ,  पर्वती येथील सर्व्हे क्रमांक 92 अ  शाहू वसाहत येथे वास्तव्यास  आहोत. गेल्या पन्नास वर्षांपासून आम्ही  येथे राहत असून  येथील घरे ही पक्की स्वरूपाची असून दुमजली आहेत. मात्र एका बिल्डर्ससाठी  एसआरए स्कीम राबविण्यासाठी झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाचे अधिकारी बेकायदेशीररीत्या झोपडपट्टी पुनर्वसन योज़ना राबविण्याचा घाट घालत आहेत. त्यासाठी बिल्डर्सचे लोक  आणि संबंधित अधिकारी यांच्या संगनमताने  आम्हा रहिवाशांना धमकाविण्याचे प्रकार वारंवार  होत आहेत . आमचा येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला विरोध आहे,आणि आम्ही तसे स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेले असताना अधिकारीवर्ग संबंधित  बिल्डर्सचा स्वार्थ आणि भ्रष्टाचारासाठी दहशतीचे वातावरण निर्माण करून आम्हाला येथील एसआरए योजनेत सामील होण्यासाठी भाग पाडण्याचे कारस्थान करीत आहेत. त्यात संबंधित बिल्डर्स / विकसक आणि अधिकाऱ्यांनी येथील रहिवाशांचा एसआरए योजनेत समावेशाबाबत खोट्या सह्या दाखविलेल्या आहेत . त्यामुळे बिल्डर्स  आणि एसआरएचे अधिकारी यांच्यावर कलम ४२० अंतर्गत आणि दहशत निर्माण करीत असल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करावा यासाठी आम्ही अनेकवेळा पत्रव्यवहार केला आहे मात्र कुणीच दखल घेत नाहीत.
  याबाबत माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि, शासनाच्या  जागेवर सुमारे ५० वर्षांपासून शाहू वसाहत ही झोपडपट्टी निर्माण झाली आहे . जरी घोषित झोपडपट्टी केली तरी ओपन स्पेसचे स्टेटस बदलत नाही. येथे पुर्नवसनातून  पक्की दुमजली  घरे उभारण्यात आलेली आहे. असे असताना काही बिल्डर्स आणि अधिकारी टीडीआर मिळवण्यासाठी संगनमताने येथे एसआरए योजना राबविण्याचा घाट घालत आहेत आणि त्यासाठी नागरिकांना नोटिसा बजावून दहशतीचे वातावरण निर्माण करीत आहेत ही अत्यंत  गंभीर बाब असून बेकायदेशीर आहे.  वास्तविक कुठल्याही आरक्षणावर पालिकेची एनओसी आवश्यक असते. असे असतानाही पुनर्वसन झालेल्या ठिकाणी एसआरए योजना राबविण्यामागे बिल्डर्स वर्गाला टीडीआर मिळवून देण्याचे षडयंत्र आहे.एकप्रकारे मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार याद्वारे होणार आहे.त्याचप्रमाणे सरकारची जागा असताना जाहीर प्रकटन प्रसिद्ध न करता परस्पर येथील जागेवर बेकायदेशीर एसआरए योजना राबविण्याचा डाव अधिकारी व  बिल्डर्सच्या संगनमताने  होत आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी व्हावी यासाठी  मुख्यमंत्री, पालकमंत्री, विरोधी पक्षनेता यांच्याकडे दाद मागितली जाणार  आहे. 

मेघालयचे राज्यपाल तथागत राॅय यांच्या बडतर्फीसाठी धरणे आंदोलन

0
पुणे :काश्मीरच्या रहिवाशांवर आणि त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार टाकावा असे असंवेदनशील ,असंवैधानिक विधान करणाऱ्या मेघालयाचे राज्यपाल तथागत रॉय यांचा निषेध करण्यासाठी ,राजीनामा मागण्यासाठी ‘मतदार जागृती परिषद ‘ या मंचातर्फे आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले .
परिषदेच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी जयश्री कटारे यांना निवेदन दिले .या शिष्टमंडळात सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन ,जांबुवंत मनोहर ,संजय बालगुडे ,मुख्तार शेख ,सचिन पांडुळे ,मयुरी शिंदे यांचा समावेश होता .
‘ देश भारतीय संविधानाच्या अनुसार चालणे अपेक्षित असताना मेघालयाचे राज्यपाल तथागत रॉय यांनी पुलवामा हल्ल्यानंतर कश्मिरी लोकांचा आणि त्यांच्या व्यवसायाचा बहिष्कार करावा ,अशा प्रकारचे संवेदशील ,संवैधानिक विधान केले आह‌‌े .
भारतीय संविधानाने दिलेल्या पदावर आसनस्थ व्यक्तीने अशाप्रकारचे विधान करणे हे भारताच्या संविधानाला हरताळ फासण्याचे षडयंत्र मानले जाऊन त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई व्हावी ‘ असे या निवेदनात म्हटले आहे .

पुणेकरांच्या पैशाची लुट भाजपाने थांबवावी – चेतन तुपे पाटील

0

पुणे- महानगरपालिका पुणे शहरात एक उद्यान तयार करीत असून त्या उद्यानात लावण्यासाठी पुणे महानगरपालिका १४ लाखांचे झाड खरेदी करणार आहे. पुणेकरांच्या पैशांची चाललेली उधळपट्टी थांबवण्यासाठी तसेच पुणे महानगरपालिकेने पुणे शहरांमधील तलावामध्ये नसलेली जलपर्णी काढण्यासाठी निविदा काढली आहे या सर्व प्रकारात मोठा भ्रष्ट्राचार झाल्याचे दिसत आहे तरी या निविदाप्रकियेची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करून दोषींवर कारवाई करावी. या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील म्हणाले की महापौरांनी जलपर्णी निविदेच्या चौकशीचा अहवाल लवकरात लवकर जाहीर करावा आणि त्यातील दोषींवर कारवाई करावी. स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराचा आव आणून सत्तेत आलेल्या भाजपाने पुणे महानगरपालिकेत फक्त भ्रष्ट्राचार चालविलेलां आहे. जिथे जलपर्णी च नाहीये तिथे जलपर्णी काढण्याची निविदा काढली जात आहे. पुणे महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये देशी झाडाना प्राधान्य देण्याचा नियम असताना सुध्दा परदेशी झाडे आणण्याचा घात घालण्यात येत असून त्या झाडांची किंमत १४ लाख रुपये आहे. पुणेकरांच्या पैशांची उधळपट्टी भाजपाने त्वरीत थांबवावी. यावेळी विरोधीपक्षनेते दिलीप बराटे, निलेश निकम,रुपाली चाकानाकर , ,प्रदीप देशमुख,विजय खराडे यांची भाषणे झाली. यावेळी प्रशांत जगताप, महेंद्र पाठारे, श्रीकांत पाटील,राकेश कामठे,संतोष नांगरे,नंदा लोणकर,नितीन कदम ,गणेश नलावडे, वासंती काकडे, राजेंद्र खांदवे, गफुर पठाण,सुमन पठारे, राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

‘अभि चॅरिटेबल’तर्फे रक्तदान, अवयवदान जागृती शिबीर

0
पुणे : सामाजिक जाणिवेतून कार्यरत असलेल्या अभि चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे रक्तदान व अवयवदान जागृती शिबिराचे नुकतेच आयोजन केले होते. अभि ग्रुप उद्योग समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. जितेंद्र जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त बाणेर येथे हे शिबीर आयोजिले होते. पुलवामा येथील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहुन शिबिराची सुरुवात झाली.
वाढदिवसानिमित्त प्रत्येकजण केक कापून जल्लोषाने वाढदिवस साजरा करतात. मात्र, डॉ. जितेंद्र जोशी यांनी याला फाटा देत प्रत्येक वाढदिवसाला अभि चॅरिटेबल फौंडेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविले आहेत. या शिबिराचे उद्घाटन आमदार मेधाताई कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. तरुणांनी समाजासाठी व देशसेवेसाठी पुढाकार घेऊन एकत्रित यायला हवे, अशी भावना मेधाताई कुलकर्णी यांनी व्यक्त केली. या शिबिरात ७५ पेक्षा अधिक जणांनी रक्तदान केले. वाय. सी. एम. पिंपरी-चिंचवड ब्लड बँकच्या मदतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले.
रक्तदानाबरोबरच अवयवदान हेही महत्वाचे आहे. एका व्यक्तीच्या अवयवदानाने इतर ७ व्यक्तींचे जीव वाचू शकतात. मृत्यूनंतर सारे शरीर नष्ट होते. मात्र, अवयव जिवंत असतात. हे अवयव दान केल्याने इतर व्यक्ती जिवंत राहू शकतात. त्यामुळे अवयवदानाबाबत असलेले गैरसमज काढून टाकावेत व अवयवदानाचे महत्व तळागाळापर्यंत पटवून देण्याचे काम व्हावे, अशी भावना डॉ. जितेंद्र जोशी यांनी व्यक्त केली. अवयवदानाचे महत्व पटवून देण्यासाठी तेजपाल सिंग यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरास कंपनीचे पदाधिकारी, कर्मचारी व या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———————-

‘शिवार्पणम’या शिवस्तुतीपर नृत्य कार्यक्रमाचे भारतीय विद्या भवनमध्ये २ मार्च रोजी आयोजन

0

पुणे :‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ शिवार्पणम’या शिवस्तुतीपर नृत्य कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले आहे.

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम दि. २ मार्च रोजी , शनीवारी सायंकाळी  वाजता ‘भारतीय विद्या भवना’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता येथे होणार आहे. ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.

या कार्यक्रमात भरतनाट्यम ,कथक ,कुचिपुडी या भारतीय शास्त्रीय नृत्यशैलींमध्ये शिवस्तुतीपर विविध  रचना सादर केल्या जाणार आहेत.

  संकल्पना अनुजा बाठे यांची असून शिवांजली डान्स अकॅडमी हा कार्यक्रम सादर करणार आहे . अनुजा बाठे ,साक्षी पासकंठी ,दर्शना पासकंठी ,अनुष्का भंडारी ,मैथली बहिरट,अनुजा  चव्हाण ,धनश्री पुणतांबेकर ,वैष्णवी पुणतांबेकर ,राजलक्ष्मी बागडे  या भरतनाटयम रचना सादर करणार आहेत . चिन्मयी गोडबोले ,अतिशा हर्षे कथक रचना  आणि  गौतमी गोडसे कुचीपुडी रचना सादर करणार आहेत . 

 ‘ भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत होणारा हा ७० वा कार्यक्रम असून सर्वांसाठी  विनामूल्य आहे.