Home Blog Page 2964

मावळ गोळीबारात दोषी आढळलो तर राजकारण सोडेन : अजित पवार

पुणे : मावळ येथील गोळीबारासंदर्भात माझ्या विरोधात कोणतेही संभाषण विरोधकांकडे असल्यास राजकारणातून निवृत्ती घेईल असे खळबळजनक विधान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले. पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये आघाडीच्या संयुक्त बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मावळ गोळीबाराच्या संदर्भात भाजपने केलेल्या आरोपांचा कडक शब्दात समाचार घेताना ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सध्या पोलीस यंत्रणा आहे.त्यात सीआयडी, सीबीआय सगळ्यांचा समावेश होतो. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे.जीवात जीव असेपर्यंत शेतकऱ्यांच्या विरोधात कोणतेही काम माझ्याकडून होणार नाही. मावळच्या गोळीबाराच्या संदर्भात माझे प्रशासनाशी कोणतेही संभाषण विरोधकांकडे असेल तर अजित पवार राजकारणातून निवृत्त होईल. माझ्यावर हे बिनबुडाचे आरोप सातत्याने होत आहेत.जे आरोप करत आहेत त्यांनीही त्यांची राजकीय कारकीर्द पणाला लावून चौकशी अहवाल जनतेसमोर ठेवावा असे  खुले आव्हान त्यांनी दिले.

‘ह.म. बने तु.म. बने’ ची हाक, “मतदारा जागा हो”

0

सोनी मराठीवरील ‘ह.म. बने तु.म. बने’ ही लोकप्रिय मालिका नेहमीच आपल्या खुमासदार विनोदी शैलीत दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या प्रश्र्नांबद्दल भाष्य करत असते. मालिकेतील प्रत्येक भाग हा मनोरंजनासोबतच नकळत एक संदेश देऊन जातो. ‘ह.म.बने तु.म.बने’च्या या अस्सलपणा मुळेच ती प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. आता सर्वत्र निवडणूकीची धामधूम असताना अतिशय योग्य वेळ साधून ‘ह.म.बने तु.म.बने’ प्रेक्षकांना आपल्या मतदानाच्या कर्तव्याची जाणीव करून देणारा भाग प्रसारित करत आहे. एक नागरिक म्हणून आपण मतदार ओळखपत्र काढून घेतले आहे का, आपण ते व्यवस्थित हाताळतो का, आणि महत्त्वाचे म्हणजे आपला मतदानाचा हक्क बजावतो का, अशा प्रश्नांवर विनोदी कोपरखळ्या या भागात ‘ह.म.बने तु.म.बने’ प्रेक्षकांना देणार आहे. आजच्या काळात ही मालिका मनोरंजनाबरोबरच नागरिकांमधे जागरुकता निर्माण करत आहे ही कौतुकास्पद गोष्ट आहे. आपल्या मताचा फरक पडेल का, आपण मत दिलेला उमेदवार निवडून येईल, की अन्य कुणी.. असा विचार न करता प्रत्येकाने मतदान केले पाहिजे व त्याकरता आपले मतदार ओळखपत्र आवर्जून बनवून घेतले पाहिजे. हाच संदेश घेऊन येत आहे ‘ह.म.बने तु.म.बने’चा खास एपिसोड “मतदारा जागा हो”, उद्या ३ एप्रिल रोजी रात्री १० वाजता,  सोनी मराठीवर.

काँग्रेसने पुण्यात डिपॉजिट वाचवावे – संजय काकडे

0

पुणे-
पुणे लोकसभा मतदार संघात भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीचे उमेदवार गिरीश बापट तीन ते साडेतीन लाख मताधिक्याने निवडून येतील असं वाटत होतं परंतु, काँग्रेसचा उमेदवार पाहता पुण्यातील लढत एकतर्फी होईल. काँग्रेसच्या उमेदवाराचं डिपॉजिट जप्त होईल आणि गिरीश बापट पाच लाखांंहून अधिक मताधिक्याने निवडून येतील, असा अंदाज खासदार संजय काकडे यांनी  सांगितले.महाराष्ट्रातील 48 पैकी 46 जागांवरील भाजप, शिवसेना, रिपाइं, रासप व शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार आजच विजयी झाले आहेत. बारामती व नांदेड लोकसभेची जागा जिंकण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम घेऊ आणि मतदानाच्या दिवसापर्यंत या दोन्ही जागाही महायुतीच्या उमेदवारांसाठी सकारात्मक करुन तिथेही महायुतीचाच उमेदवार निवडून आणू. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी महाराष्ट्रातून 48 खासदार लोकसभेत जातील आणि बारामतीत सुप्रिया सुळे एक लाख मतांनी पराभूत होतील. महाराष्ट्रात यावेळी नक्की इतिहास घडेल, असा आत्मविश्वास पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी आज व्यक्त केला.

पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार गिरीश बापट आणि बारामती लोकसभेच्या उमेदवार कांचन कुल यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खासदार काकडे यांना पत्रकारांनी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसंदर्भात प्रश्न केल्यानंतर खासदार काकडे यांनी हा अंदाज व्यक्त केला.

देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्व 48 लोकसभा मतदार संघ जिंकण्यासाठी उत्तम पद्धतीने प्रचार मोहिम राबविली आहे. यामुळेच महायुतीला यश मिळणार असून पश्चिम महाराष्ट्रातल्या दहा जागांपैकी नऊ जागांवर आताच महायुतीचा विजय झाला आहे. तर, 22 एप्रिलपर्यंत बारामतीची जागाही महायुतीच्या उमेदवारासाठी सकारात्मक होईल व कांचन कुल सुप्रिया सुळे यांना एक लाख मताधिक्याने पराभूत करतील.

दरम्यान, महायुतीचे उमेदवार गिरीश बापट व कांचन कुल यांचा उमेदवारी अर्ज आज भरण्यात आला. यावेळी खासदार संजय काकडे यांची कार्यकर्त्यांसोबत दुचाकी रॅलीबरोबर ‘ग्रँड एंट्री’ झाली. याप्रसंगी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेना प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे, रासपचे अध्यक्ष व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री दिलीप कांबळे, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, महापौर मुक्ता टिळक, शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे आदी मान्यवर आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

अजितदादांचा भाजप प्रवेश?
महसूल मंत्री चंद्रकांत दादांचा उल्लेख दादा असा करताना खासदार संजय काकडे यांनी पुण्यातल्या दादांची आठवण सभेत बोलताना केली. सभेत बोलताना खासदार काकडे म्हणाले की, पुण्यातही एक दादा आहेत व तेदेखील लवकरच आपल्या व्यासपीठावर दिसतील, असे सांगताच भाजपमध्ये सुरु असलेल्या इनकमिंग मध्ये अजित दादांचंही नाव आहे की काय? अशी चर्चा खासदार काकडे यांच्या भाषणानंतर उपस्थितांमध्ये रंगली.

८२ टक्के भारतीय उच्च तणावाखाली -अमेरिका आणि भारतातील संयुक्त वेल अँड बियाँड सर्वेक्षण

0

मुंबई – सिग्ना टीटीके हेल्थ इन्शुरन्स या अमेरिकेतील ग्लोबल हेल्थ सर्व्हिसेसमधील आघाडीची सिग्ना कॉर्पोरेशन (NYSE:CI) (NYSE:CI) आणि भारतातील आघाडीचे समूह असणारे टीटीके समूह व मणिपाल समूह यांच्या संयुक्त भागीदारी कंपनीने 2019 सिग्ना 360 वेल-बीइंग सर्व्हे – वेल अँड बियाँड या सर्वेक्षणाचे निष्कर्ष आज जाहीर केले. अमेरिका, यूके, जर्मनी, फ्रान्स व ऑस्ट्रेलिया अशा विकसित व उदयोन्मुख देशांच्या तुलनेत भारतातील ताणाचे प्रमाण उच्च आहे, असे सर्वेक्षणामध्ये आढळले आहे. भारतातील जवळजवळ 82 टक्के लोकसंख्येला ताणाने ग्रासले आहे आणि मध्यम वयाच्या पिढीतील (वय 35-49 वर्षे) बहुसंख्य जणांना ताणाचा सामना करावा लागत असून, अंदाजे 89 टक्के जणांनी कोणता ना कोणता ताण असल्याचे नमूद केले. काम, आरोग्य व आर्थिक समस्या ही देशामध्ये ताण निर्माण करणारी प्रमुख कारणे आहेत.

यंदाचे पाचवे वर्ष असणाऱ्या सिग्ना 360 वेल-बीइंग सर्व्हेचे उद्दिष्ट शारीरिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक व काम या पाच मुख्य निर्देशांकांच्या बाबतीत लोकांचा दृष्टिकोन जाणून घेणे, हे आहे. आरोग्याशी संबंधित अनेक विषयांचा समावेश करण्यात आल्याने हे सिग्नाचे आजवरचे सर्वात सर्वंकष सर्वेक्षण ठरले आहे. या वर्षीच्या सर्वेक्षणामध्ये भारतातील वर्कप्लेस वेलनेस प्रोग्रॅमवर भर देण्यात आला आहे. हे प्रोग्रॅम व्यापक स्वरूपात दिसून येतात आणि अन्य ठिकाणांच्या तुलनेत त्यामध्ये सहभाग मोठ्या प्रमाणात आहे.

हृदयाच्या आरोग्याबाबत कमी जागृती

स्वतःच्या बॉडी मास इंडेक्सविषयी (बीएमआय) व ब्लड प्रेशरच्या आकडेवारीविषयी माहीत आहे का, असे विचारताच, हृदयाचे आरोग्य दर्शवणाऱ्या घटकांबद्दल जगभरातील सरासरीच्या तुलनेत भारतातील सहभागींमध्ये अधिक जागृती असल्याचे आढळले. 61% जणांना त्यांचा बीएमआय माहीत होता (या तुलनेत जागतिक प्रमाण 51%) व 76% जणांना त्यांचे ब्लड प्रेशर माहीत होते (या तुलनेत जागतिक प्रमाण 66%).

परंतु, हृदयाच्या समस्या निर्माण होऊ शकतात, हे दर्शवणारी सरासरी 2.2 लक्षणे त्यांना माहीत आहेत, तर या तुलनेत जागतिक सरासरी मात्र 2.4 आहे. यापेक्षा वाईट म्हणजे, गेल्या सहा महिन्यांत, सर्वेक्षणातील सहभागींनी सरासरी 2.3 लक्षणे अनुभवली, या तुलनेत जागतिक सरासरी 1.8 आहे. जीवनशैलीमध्ये बदल केल्यास हाय ब्लड प्रेशर बरे होऊ शकत, हे 3 पैकी 1 व्यक्तीला वाटत नाही. यातून, हृदयाच्या आरोग्याबाबत असलेली तफावत स्पष्ट होते. हृदयाच्या आरोग्याचा मागोवा घेण्यासाठी व व्यवस्थापन करण्यासाठी केवळ 38% जण वेअरेबल्सचा वापर करतात.

“जीवनशैलीमध्ये बदल केल्यास हाय ब्लड प्रेशर बरे होऊ शकत, हे 3 पैकी 1 व्यक्तीला वाटत नाही, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. कारण, या त्रासांवर उपचार न केल्यास त्यातून हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक असे गंभीर त्रास होऊ शकतात. चिंताजनक निष्कर्ष म्हणजे, गेल्या 25 वर्षांत हृदयाचे विकार व हार्ट अटॅक यांचे प्रमाण कमलीचे आहे. हृदयासाठी आरोग्यदायी ठरणाऱ्या जीवनशैलीविषयी जागृती वाढवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, तेही सध्या आरोग्याचे प्रश्न असणाऱ्यांनाच नाही, तर सर्वांनीच हृदयाच्या विकारांना असलेला धोका कमी करणे व कल्याणामध्ये वाढ करणे गरजेचे आहे”, असे सिग्ना टीटीके हेल्थ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुध्य कार्यकारी अधिकारी प्रसुन सिकदर यांनी सांगितले.

मध्यम वयातील पिढीची स्थिती गंभीर

अन्य पिढ्यांच्या तुलनेत, भारतातील मध्यमवयीन पिढीने (वय 35-49) एकंदर निर्देशांकामध्ये सर्वात कमी स्कोअर नोंदवले आहेत, तसेच त्यांना त्यांच्या शारीरिक, आर्थिक व वर्क वेलनेसची चिंता आहे. यातून, या पिढीवरील ताण व ताणव यावर उपाय करण्याची गरज अधोरेखित होते.

या श्रेणीतील 89% जण ताणाचा सामना करतात, या तुलनेत तरुणांचे प्रमाण 87% आहे व 50+ वरील वयोगटाचे प्रमाण 64% आहे. परिणामी, त्यांच्यासाठी आरोग्यदायी वजन राखणे, हे एक मोठे आव्हान ठरते आणि त्यांच्यापैकी केवळ निम्म्या जणांना हे शक्य होते. या तुलनेत, तरुणांमध्ये प्रमाण 58% आहे व वयस्कर वयोगटामध्ये 55% आहे. आर्थिक स्थिती चांगली असल्याचे निम्म्यापैकी कमी जणांना वाटते. पालकांच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करण्याच्या आर्थिक क्षमतेबाबत त्यांना शंका आहे. या क्षमतेबाबत आत्मविश्वास केवळ 51% जणांना आहे. या तुलनेत तरुणांमध्ये हे प्रमाण 58% व 50+ हून अधिक वयामध्ये हे प्रमाण 62% आहे.

महिलांना हवेत टेलर्ड वर्कप्लेस वेलनेस प्रोग्रॅम

जागतिक स्तरावरील निष्कर्षांच्या उलट, भारतीय महिलांपेक्षा (82%) भारतातील पुरुषांवर (85%) अधिक ताण येतो. परंतु, न हाताळण्यासारखा ताण विचारात घेता, स्त्रिया व पुरुष यांना येणारा अनुभव जवळजवळ सारखाच आहे. अन्य देशांप्रमाणेच, बहुसंख्य स्त्रियांना (87%) वाटते की वर्कप्लेस वेलनेस प्रोग्रॅमने स्त्रिया व पुरुष यांच्या विशिष्ट गरजा विचारात घ्याव्यात, तर वरिष्ठ व्यवस्थापन अशा कार्यक्रमांना पाठिंबा देत नाही, असे 63% जणांना वाटते. प्रचंड काम, कुटुंबाच्या आर्थिक बाबींची चिंता व वैयक्तिक आरोग्याचे प्रश्न, हे घटक महिलांच्या ताणासाठी कारणीभूत ठरतात.

भारतातील वेलनेसची आकडेवारी तुलनेनेचांगली असली तरी वर्कप्लेस वेलनेस प्रोग्रॅममध्ये आणखी सुधारणा करण्याचे अनेक मार्ग आहेत. मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे व लवचिक स्वरूपाच्या कामाची अंमलबजावणी करणे यापासून सुरुवात करून, काम करणाऱ्या महिलांचे त्यांच्या जीवनातील टप्प्याच्या दृटीने वेगळेपणे समजून घेणे आणि एकट्या महिलांच्या गरजा विवाहित व मुले असणाऱ्या महिलांपेक्षा कशा वेगळा आहेत ते समजून घेणे गरजेचे आहे.

वर्कप्लेस वेलनेस साधणे

 जगभर, केवळ 36% जणांनी वर्कप्लेस वेलनेस प्रोग्रॅम असल्याचे नमूद केले आहे; भारतात 66% जणांनी असा प्रोग्रॅम असल्याचे व 56% जणांनी सहभागी होत असल्याचे म्हटले आहे. परंतु, 71% जणांना वाटते की, हे कार्यक्रम मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करून केवळ शारीरिक आरोग्यावर भर देतात. 71% जणांना ताणाबाबत एम्प्लॉयरकडून पाठिंबा मिळतो, तर जगभरातील 28%च्या तुलनेत समाधानाचे प्रमाण  59% आहे (“पाठिंबा पुरेसा आहे असे त्यांना वाटते”). परंतु, अजूनही सुधारणेसाठी बराच वाव आहे. कारण, 85% काम “नेहमीच सुरू” अशा पद्धतीचे असते व 64% या जागतिक सरासरीपेक्षा हे प्रमाण अधिक आहे.

सहभागी झालेल्यांपैकी 96% जणांच्या मते, सहकाऱ्यांच्या ताणाचा परिणाम कामाच्या ठिकाणावर झाला आहे. या तुलनेत जागतिक सरासरी 91% आहे. विशेष म्हणजे, भारतात महत्त्वाचा परिणाम सकारात्मकतेकडे झुकणारा आहे आणि जागतिक स्तरावरील चित्रापेक्षा वेगळा आहे. सहकाऱ्यांचा ताण पाहून भारतीय स्वतःच्या ताणाचे व्यवस्थापन करण्याबाबत अधिक सावध होतात आणि एकमेकाची अधिक काळजी घेतात. जागतिक स्तरावर याउलट चित्र दिसून येते. तेथे लोकांना कामाच्या ठिकाणचे वातावरण निराशाजनक, खचवणारे व कमी उत्पादक वाटते. जागतिक स्तराच्या तुलनेत, भारतात अधिक समाधान व कमी निराशावाद असल्याने भारतातील एम्प्लॉयर योग्य कृती करत असल्याचे दिसते.

या वर्षी सिग्नाने वेल अँड बियाँड ही संकल्पना ठरवली होती. सर्वांनी वेलनेसला प्राधान्य द्यावे, यासाठी यामार्फत आवाहन करण्यात आले. सिग्नाला लोकांना त्यांच्या वेलनेसच्या प्रवासामध्ये, त्यांच्या वेलनेसविषयक गरजांचे व पर्यायांचे नियंत्रण करण्यामध्ये सबल करायचे आहे आणि आरोग्यविषयक मुद्द्यांच्या बाबतीत जागृती वाढवण्यास मदत करण्यासाठी त्यांना साधने द्यायची आहेत. संपूर्ण अहवाल वाचण्यासाठी पाहा 2019 Cigna 360 Well -Being Survey- Well and Beyond.

सिग्नाटीटीके हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडविषयी

सिग्नाटीटीके हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही अमेरिकेतील ग्लोबल हेल्थ सर्व्हिसेसमधील आघाडीची सिग्ना कॉर्पोरेशन (NYSE:CI) (NYSE:CI) आणि भारतातील आरोग्यसेवा व उच्च शिक्षण या क्षेत्रांतील आघाडीचे समूह असणारे टीटीके समूह व मणिपाल समूह यांची संयुक्त भागीदारी कंपनी आहे. आरोग्य व वेलनेस यावर भर देणारी सिग्ना टीटीके एक स्टँडअलोन कंपनी म्हणून वैयक्तिक ग्राहक, एम्प्लॉयर-कर्मचारी व नॉन-एम्प्लॉयर-कर्मचारी समूह यांच्या आरोग्यविषयक वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी आरोग्य, वैयक्तिक अपघात, प्रमुख आजार, रवास व ग्लोबल केअर अशी विविध प्रकारची विमा उत्पादने उपलब्ध करते.

कंपनीचे मुख्यालय मुंबई येथे असून प्रमुख महानगरे व मोठी शहरे यामध्ये 19 शाखा कार्यालये आहेत. सध्या, सिग्ना टीटीकेच्या देशभरातील नेटवर्कमध्ये 20000 हून अधिक एजंट, 250+ प्रमुख ब्रोकर व 7,000 पॉइंट ऑफ सेल यांचा समावेश आहे. सिग्ना टीटीकेने आरोग्य विमा उत्पादनांचे वितरण करण्याच्या हेतूने 15 प्रमुख बँक व एनबीएफसी यांच्याशी विशेष सहयोग केला आहे. सिग्ना टीटीकेच्या ग्राहकांना भारतातील सर्व शहरांती आणि टिअर 2 व 3 शहरांतील 6500 हून अधिक विश्वासार्ह रुग्णालयांमध्ये सेवेचा लाभ घेता येईल. अधिक माहितीसाठी पाहा www.cignattkinsurance.in

गेल्या ५ वर्षात स्टॅम्प ड्युटी ४० टक्क्यांनी वाढवण्यात आली त्याचा पुनर्विचार करावा-शांतीलाल कटारिया

0

यंदा रेडीरेकनरच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून तो निश्चितच स्वागतार्ह आहे.  त्यात आवश्यक त्याठिकाणी घटही केली पाहिजे . आमच्या काही इतर मागण्या आहेत त्यापुढीलप्रमाणे प्रकल्प मूल्यांकन निर्णय पद्धत चालू करणे , पार्किंगच्या मूल्यमापनमधील विसंगती दूर करणे , रेडी रेकनर निश्चित करण्यासाठी सूक्ष्म नियोजन प्रक्रिया अवलंबिणे, ३ ते ५ वर्षांत एकदा रेडीरेकनरचे प्रकाशन, तळ टीपांमध्ये दुरुस्त्या, मूल्यांकन मूल्य कराराचे  निराकरण यागोष्टी प्राधान्याने सरकारने करणे आवश्यक आहे त्याचवेळी गेल्या ५ वर्षात स्टॅम्प ड्युटी ४० टक्क्यांनी वाढवण्यात आलीये त्याचा पुनर्विचार केला पाहिजे. बांधकाम क्षेत्राला उभारी देण्यासाठी याचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे.

शांतीलाल कटारिया (उपाध्यक्ष, क्रेडाई नैशनल)

घर खरेदीस उत्तम काळ-अतुल गोयल

0

रेडीरेकनर संदर्भात प्रतिक्रिया

गेल्या दोन वर्षांपासून जागेच्या कागदोपत्री मूल्यात वाढत झाली नसल्याचा सकारात्मक संकेत या निर्णयातून होतो. ग्राहकांनी हे लक्षात घेऊन  आता घरांच्या वाढत्या किमतीबद्दल चिंता करू नये. घरांचा दर आज मितीला असणारा नीच्चांकी दर असून इथून पुढे याहून हा दर अजून कमी होण्याची शक्यता नाही. कारण गेल्या दोन वर्षांपासून बांधकाम खर्च, कर वाढ आणि मागणीतील घट यामुळे प्रचंड तोटा बांधकाम व्यावसयिकांना सोसावा लागला आहे. त्यामुळे द्रष्ट्या ग्राहकांनी आता अजून वाट न पाहता घर खरेदी करावे. वित्तसंस्थामार्फतही मोठ्या प्रमाणात कर्जांची उपलब्धता होत असल्याने याचा लाभ इच्छुक ग्राहक घेतील, अशी आशा आहे.

अतुल गोयल (व्यवस्थापकीय संचालक, गोयल गंगा डेव्हलपर्स (इं) प्रा. लि.)

रेडीरेकनरचे दर जैसे थे-दिलासा देणारा निर्णय -राजीव परीख  (अध्यक्ष,क्रेडाई महाराष्ट्र)

0

राजीव परीख  (अध्यक्ष,क्रेडाई महाराष्ट्र)

 

महाराष्ट्र शासनाने सन २०१९-२०२० करिता रेडीरेकनरचे दर जैसे थे ठेवण्याचा घेतलेला निर्णय सर्व बांधकाम व्यावसायिंकाना दिलासा देणारा आहे. गेली ३ वर्षे बांधकाम व्यवसायामध्ये खुपच स्थिरता असल्याने कोणत्याही शहरामध्ये फ्लॅटच्या, दुकानगाळ्याच्या व जमिनीच्या विक्री किंमतीत वाढ झाली नव्हती उलटपक्षी कांही ठिकाणी विक्रीचे दर कमी झालेले देखील दिसून येत होते. रेडीरेकनरमधील दर हे बांधकाम परवानावेळी भरावयाचा प्रीमीयम, परवाना फी तसेच आयकर मुल्यांकन यासाठी देखील वापरले जात असलेमुळे रेकनर वाढीचा फरक बांधकाम खर्चावर देखील होत असतो.

यामुळे क्रेडाई महाराष्ट्रातर्फे मा. महसुल मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील व नोंदणी महानिरीक्षक यांना प्रत्यक्ष भेटून रेडीरेकनर दर वाढवू नयेत अशी आग्रही मागणी केली होती अन्यथा बांधकाम व्यवसायिकांना उपोषण करावे लागेल असा इशारा दिला होता.

शासनाने याचा गाभिर्याने विचार करुन दरवाढ न करण्याचा  घेतलेला निर्णय अत्यंत योग्य असून बांधकाम व्यवसायावर सकारात्मक परिणाम करणारा ठरेल तसेच व ग्राहकांच्या देखील अत्यंत फायद्याचा ठरणार आहे.

मानाचा मुजरा “अमृतयोग” कलर्स मराठीवर !

0

विविध कला, संस्कृती आणि साहित्याचादेदीप्यमानवारसा महाराष्ट्राला लाभला आहे.या कला परंपरेतअग्रणी असलेले साहित्य आणि संगीताच्या प्रांतातील दिग्गज म्हणजेच महाराष्ट्राचे वाल्मिकी ज्येष्ठ गीतकार ग.दि.माडगूळकर, अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसविणारेअष्टपैलू लेखक ‘महाराष्ट्र भूषण’ पु.ल.देशपांडे आणि मराठी माणसाच्या हृदयावर आपल्या सुरांनीआपले नाव कोरणारे‘बाबूजी’ म्हणजेच लाडके संगीतकार सुधीर फडके…  या त्रयीने आपल्या प्रतिभेनेमहाराष्ट्रात आपले युग निर्माण केले आणि कित्येक दशके मराठी मनावर कायम अधिराज्य गाजवले.महाराष्ट्रातील या तिन्ही सारस्वतांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्तमानवंदनादेण्यासाठीकलर्स मराठीने “मानाचा मुजरा – अमृतयोग”या कार्यक्रमातूनसाहित्य, संगीत आणि सुरांची मैफल अनुभवण्याची सुवर्णसंधी रसिकांनादिली आहे. गीत, संगीत, नाट्य आणि नृत्याविष्काराची ही अनोखी मैफल रविवारी७ एप्रिल रोजी पूर्वार्धदु.१२ आणि उत्तरार्ध संध्या.७वा. फक्तआपल्याकलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पृहा जोशी आणिसुमीत राघवन यांनी केले आहे.

 ग.दि.माडगूळकरयांनीवयाच्या अवघ्या १६ व्या वर्षीचित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि अल्पावधीतअनभिषिक्त सम्राटपद मिळवले.ग.दि.माडगूळकर आणिसुधीर फडके यांनी मिळून तर मराठी चित्रसृष्टीत आपले एक युग निर्माण केले. त्या दोघांचीअनेक अजरामर गीते “मानाचा मुजरा – अमृतयोग”या कार्यक्रमात पुन्हा अनुभवता येणार आहेत.राहुल देशपांडे यांनी “कानडा राजा पंढरीचा”आणि“शब्दावाचून कळलेसारे” हीगाणीसादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.या बरोबरच हृषिकेश रानडे याने“ऊठ पंढरीच्या राजा”हे गाणे सादर केले. अजितपरब यांनी बाबूजींची काही अजरामर गाणी या कार्यक्रमात सादर केली.‘मुंबईचा जावई’ या चित्रपटातील “आज कुणीतरी यावे” हे गाणे सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमातील शरयू दाते हिने सादर केले. तसेच“त्या तिथे पलीकडे” हे चित्रगीत भावगीत गायनात स्वत:चा अनोखा ठसा उमटवलेल्या मालतीपांडे बर्वे यांची नात म्हणजेचप्रियांका बर्वे हिने सादर केलेय.सूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीर या पर्वाची विजेती स्वराली जाधव हिने “फड सांभाळ” ही लावणी आपल्या खास शैलीत सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. सूरनवा ध्यास नवाछोटेसूरवीर मधील चैतन्यदेवढे आणि सई जोशी यांनी देखील सुंदर गाणी सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. साक्षात पु.ल साकारण्यासाठी प्रसिध्द असलेले अतुल परचुरे आणि आनंद इंगळे यांनी पु.लं.चे नाट्यप्रवेश सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.तर सोनिया परचुरे आणि नकुल घाणेकर यांनी गीतरामायणातीलनिवडक गाणी नृत्यबद्ध केलीत.

 कार्यक्रमामध्ये ग.दि.माडगूळकर, सुधीर फडके आणि पु.ल.देशपांडे यांच्याबद्दलच्याआठवणी, किस्से त्यांच्या जवळच्या व्यक्तींनीम्हणजेच शरतकुमार माडगूळकर, श्रीधर फडके, ज्येष्ठ नेते शरद पवार, ज्येष्ठसंगीतकार आणि व्हायोलीनवादक पं.प्रभाकर जोग, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, प्रसिध्द अभिनेते सचिन पिळगावकरया मान्यवरांनीजागवल्या आहेत. “मानाचा मुजरा – अमृतयोग”ही शब्दसुरांची मैफल रविवारी ७ एप्रिल रोजी पूर्वार्धदु.१२ आणि उत्तरार्ध संध्या.७वा.

निवडणुकीच्या धामधूमीतही पिण्याच्या पाण्यासाठी ,शिवसेनेच्या नगरसेवक भानगिरे यांच्यावर आंदोलनाचा इशारा देण्याची वेळ

0
 पुणे:- एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम आहे आणि अशा धामधुमीत देखील पिण्याच्या पाण्यासाठी शिवसेना नगरसेवकाला रस्त्यावर येवून आंदोलनाचा इशारा द्यावा लागला .पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये काळेपडळ,हांडेवाडी रोड,चिंतामणीनगर,दुगड चाळ,बडदे मळा परिसरात आठ-आठ  दिवस पाणी येत नसल्याने नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे,शिवसेनेच्या वतीनं नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी पदरखर्चाने रोज 15 पाण्याचे टँकर नागरिकांकरिता मोफत सुरू केले आणि नियमित पाणीपूरवठा व्हावा  याकरिता वारंवार लष्कर पाणीपुरवठा विभागाकडे पाठपुरावा केला,पण तरीही पाणी पुरवठा सुरळीत न झाल्याने दि.3/4/2019 बुधवार रोजी सायंकाळी 4.30 ला शहीद सचिन फराटे चौक काळेपडल येथे सर्व शिवसैनिक व ग्रामस्थ रस्ता रोको आंदोलन करणार असल्याची घोषणा अखेर नगरसेवक भानगिरे यांनी केली
      यानंतर लष्कर पाणी पुरवठा विभाग,पुणे मनपा विभाग सतर्क झाला,लष्कर पाणी पुरवठा विभाग अभियंता श्री पावरा यांनी पाणी पुरवठा नियमित व पुरेसा करण्याचे आश्वासन दिले,तर वानवडी पोलीस प्रशासनाने आचारसंहिता असल्याने आंदोलनास परवानगी देता येणार नाही अशी माहिती दिल्याने आंदोलन स्थगित केले असल्याचे नगरसेवक भानगिरे यांनी सांगितले.प्रभाग 26 मध्ये पाणी टंचाईची झळ नागरिकांना पोहोचू नये याकरिता स्वखर्चाने रोज 15 टँकर पाण्याचे वाटप सुरू असून लष्कर पाणी पुरवठा विभागाने उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेऊन नियमित पाणी पुरवठा करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

उमेदवारी मिळताच काय म्हणाले मोहन जोशी …

0

पुणे-उमेदवारी मिळताच मध्यरात्री नंतर २ वाजता काय म्हणाले मोहन जोशी …त्यांच्याच शब्दात …

पुणे लोकसभा मतदार संघासाठी, सांगोपांग विचार करून माझी उमेदवार म्हणून निवड करण्यात आली, त्याबद्दल मी कॉंग्रेस पक्ष, पक्षाध्यक्ष श्री. राहुल गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते श्री. मल्लिकार्जून खरगे, पदेशाध्यक्ष श्री. अशोकरावजी चव्हाण आणि सर्व संबंधितांचे मनापासून आभार मानतो.

माझ्या मते, लोकसभेची ही निवडणूक म्हणजे लोकशाही आणि संविधानाच्या दृष्टीने जीवन-मरण्याची आहे. ज्या पद्धतीने केंद्र सरकारने मागील पाच वर्षात ज्या एककल्ली, असंवेदनशील आणि एकाधिकारशाही कारभार केला, त्यामुळे लोकशाही, संविधान, मूलभूत स्वातंत्र्य, या सारख्या शाश्वत मूल्यांच्या रक्षणाची जबाबदारी कॉंग्रेस पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि सर्व मित्रपक्षांच्या आघाडीवर आली आहे. या विचारांच्या आणि संविधानाच्या रक्षणासाठीच्या लढाईत, कॉंग्रेस पक्षाने माझ्यासारख्या तळागाळातून वर आलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवड करून माझ्यावर मोठी जबाबदारी सोंपवली आहे.
मागील ४० वर्षांहून अधिक काळ एक कामगार, श्रमिक पत्रकार, युवक कॉंग्रेसचा कार्यकर्ता आणि पक्षाचा पदाधिकारी म्हणून मी जे कार्य केले आहे, त्याचा आणि कॉंग्रेस पक्षाच्या आणि आघाडीतील सर्व मित्रपक्षांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचाच सन्मान झाला आहे, अशी माझी विनम्र भावना आहे.

आजवर पक्षासाठी केलेले कार्य आणि पुणेकरांना ग्रासणा-या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी केलेल्या प्रयत्नांच्या आणि पक्का पुणेकर म्हणून असलेल्या माझ्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील कार्यानुभव लक्षात घेता, पुणेकर मला पुणे शहराचे लोकसभेत प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करतील, असा मला आत्मविश्वास वाटतो.

प्रचंड आर्थिक ताकद, सत्तेची मगरूरी आणि मागील पाच वर्षातील गैरकारभाराला कंटाळलेले मतदार, मोदी सरकारच्या दिखाऊ, खोट्या आणि प्रचारकी कार्यावर नापसंतीची मोहोर उठवतील, याची मला खात्री वाटते. माझ्या उमेदवारीमुळे, शहरातील सर्व वयोगटातील आणि विशेषतः युवक-युवतींमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळत आहे.

समाजातील विविध धर्म, जात, पंथ, भाषा, प्रांतातील लोकांना बरोबर घेऊन, विकासाच्या वाटेवर चालण्याची क्षमता फक्त कॉंग्रेस पक्षातच आहे. या कार्यात मला लोकनेते आदरणीय श्री. शरदरावजी पवार, माननीय श्री. अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते; तसेच रिपब्लिकन पक्षासारखे मित्रपक्षांच्या नेत्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभल्यामुळेच, देशाचे भवितव्य ठरविणा-या निवडणुकीच्या संग्रामात मला उत्तम यश मिळेल, याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. या सर्वांच्या बळावर मी मोदी सरकारच्या गैरकारभाराची लक्तरे मतदारांपुढे प्रभावीपणे मांडत असतानाच, पुण्याच्या आणि समाजातील सर्व घटकांच्या समग्र विकासाचा शहर पातळीवरील संयुक्त जाहीरनामा देखील मांडणार आहे.

पुणेकरांच्या सादेला प्रतिसाद देणारा मी कार्यकर्ता असून, या निमित्ताने शहराच्या कानाकोप-यात पोहोचून लोकांशी संवाद साधण्याची आम्ही पराकाष्ठा करून, विजयश्री खेचून आणू, असा आम्हा सर्वांनाच विश्वास वाटतो.

 

काँग्रेसकडून मोहन जोशी यांना उमेदवारी

पुणे- अखेरपर्यंत उत्सुकता ताणत काँग्रेस पक्षाने माजी आमदार मोहन जोशी यांना पुण्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्री गिरीश बापट आणि जोशी यांच्यात सामना रंगणार आहे. जोशी यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने निष्ठावंत गटाला न्याय दिल्याचे बोलले जात आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीची झाकली मूठ काँग्रेसने अखेरपर्यंत कायम का ठेवली, हे मात्र कोडे अनेकांना उलगडू शकले  नाही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने पुणे सोडून राज्यातील सर्व ठिकाणची उमेदवारी जाहीर केले होते. महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि शेतकरी कामगार पक्षातून नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रवीण गायकवाड; तसेच अभय छाजेड यांचीही नावे चर्चेत होती. उमेदवार जाहीर होत नसल्याने शहरातील काँग्रेसजन व आघाडीतील मित्रपक्षाच्या वतीने उमेदवाराविनाच प्रचार सुरू करण्यात आला होता. अखेर सोमवारी रात्री उशिरा जोशी यांची उमेदवारी पक्षाकडून जाहीर करण्यात आली. जोशी हे काँग्रेसचे निष्ठावंत असून, युवक काँग्रेसपासून ते पक्षात कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी शहर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्याबरोबरच ते विधान परिषदेवर आमदारही होते. यापूर्वी १९९९ मध्ये जोशी यांनी भाजपचे प्रदीप रावत यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढविली होती. त्या वेळी तिरंगी लढतीमध्ये रावत निवडून आले, तर जोशी यांना दुसऱ्या क्रमांकाची सव्वादोन लाख मते मिळाली होती. ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार विठ्ठल तुपे यांना सुमारे दोन लाख मते मिळाली.
जोशी हे काँग्रेसचे १९७२ पासूनचे निष्ठावान कार्यकर्ते असून, पुण्याच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील विविध संस्थांशी ते संबंधित आहेत. विधान परिषदेचे माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे माजी सरचिटणीस, महाराष्ट्र हरिजन सेवक संघाचे अध्यक्ष, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष, शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष अशी पदे त्यांनी भूषविली आहेत. १९६८ मध्ये स्थानिक मराठी दैनिकात बातमीदार म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर १९७२-७३ च्या काळात राजकारणात प्रवेश केल्यानंतर ते युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. शहराध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षातर्फे विविध कार्यक्रम राबविले. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत पुण्यातील सर्व निवडणुका काँग्रेसने जिंकल्या आणि महापालिकेतही पूर्ण सत्ता काँग्रेसला मिळाली होती. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांच्या फळीत जोशी यांचा समावेश होता. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९८६ मध्ये त्यांची युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. तो त्यांच्या राजकीय कारकिर्दीला वळण देणारा प्रसंग ठरला. जोशी यांनी ‘तहलका’ प्रकरणानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक के. सुदर्शन यांना विमानतळावर घेराव घालून दोन तास अडवून ठेवले होते. या आंदोलनानंतर त्यांचे नाव राज्यभरात झाले; तसेच जोशी यांनी राजस्थान, छत्तीसगड, बिहार, झारखंड, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश येथील निवडणुकांमध्ये पक्षाच्या वतीने काम केले आहे.

‘काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दुय्यम दर्जाच्या वागणूकीने अस्वस्थता-राधाकृष्ण विखे पाटील

0

मुंबई – डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर काँग्रेसच्या प्रचारापासून लांब राहिलेले काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर आपले मौन सोडलं आहे. माझी भूमिका मी पक्षाकडे पत्राद्वारे स्पष्ट केली आहे. निर्णय पक्षश्रेष्ठींना घ्यायचा आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचे जे वास्तव आहे ते पक्षश्रेष्ठींकडे मांडलं आहे. कार्यकर्ते काँगेसवर नाराज आहे. पक्षनेतृत्वाने ही स्थिती जाणून घ्यायला हवी. लोकसभेपेक्षा विधानसभेत महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी घडतील असा दावा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत विखे पाटील यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, माझ्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही. मी भाजपात जाणार आहे ही चर्चा आमच्याच पक्षांतील काही नेत्यांनी सुरु केली आहे. विधिमंडळ काँग्रेस नेता म्हणून मी काम करतो तेव्हा वाटतं पक्षनेतृत्वाने आपल्या मागे ठाम उभं राहायला हवं अशी अपेक्षा होती पण तसं झालं नाही.संयुक्त पत्रकार परिषद झाली ती अचानक घेण्यात आली. आमचे काही कार्यक्रम नियोजित असतात. त्यामुळे नाराज वैगेरे काही नाही. पक्षाने जी जबाबदारी दिलीय ती पार पडेन मात्र महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळतेय हे चित्र आहे अशी खंत विखे पाटील यांनी बोलून दाखवली.

राष्ट्रवादीशी आघाडी करण्यावर नाराजी

आघाडी केल्याशिवाय पर्याय नाही अशा भूमिकेत वावरणार असाल तर पक्षातील कार्यकर्ते सक्षम होणार नाही. आघाडी करायची की नाही हे पक्षनेतृत्वाने ठरवायचं असतं. पक्षातील ज्येष्ठ नेते पक्षासाठी काम करतायेत असं वाटत नाही. नेत्यांकडून पक्षाला भक्कम करण्याची भूमिका दिसत नाही. काँग्रेसने कार्यशैलीत सुधारणा केली नाही तर लोकसभेपेक्षा विधानसभेत अधिक फटका बसू शकतो असा इशारा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.

तसेच राज्यातील नेते कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करु शकले नाहीत. नेतृत्व करण्याची क्षमता ज्यांच्यात नव्हती त्यांना नेतृत्व दिलं तर पक्ष उभा कसा राहणार? काँग्रेस पक्षाचा इतका दारुण पराभव महाराष्ट्रात कधीच झाला नाही. ज्या सुधारणा करणं गरजेचे आहे त्या केल्या गेल्या नाही असा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव घेता केला.

तसेच दिलीप गांधी यांच्या भेटीबाबत विखे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. दिलीप गांधी यांच्याशी जुना स्नेह आहे. राजकीयदृष्या भेटायचं असतं तर लपून भेटलो असतो. दोघांचे संबंध स्नेहपूर्ण आहे. गांधी यांच्या मुलाने उभं राहावं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. व्यक्तिगत संबंधातून आम्ही नेहमीच भेटतो. त्यातून राजकीय अर्थ काढला पाहिजे असं नसतं.

शरद पवारांनी अहमदनगरच्या उमेदवाराच्या डोक्यात हवा गेली आहे अशी टीका सुजय विखेंवर केली होती या प्रश्नावरही विखे पाटील यांनी भाष्य करत सुजय हा पवारांच्या नातवासारखा आहे. काँग्रेस पक्षाशी उमेदवारी सुजय मागत होता. शरद पवारांनी अशी वक्तव्य टाळावी. विखे कुटुंबाबाबत जो विद्वेक आहे त्यातून शरद पवार असं वक्तव्य करतात असं त्यांनी सांगितले

काँग्रेस कार्यकर्ते करणार भाजपाचा प्रचार

दरम्यान भाजपासोबत जाण्याची अहमदनगरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आहे. विखे पाटील कुटुंबाबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात प्रेम आहे. ही निवडणूक पक्षीय पातळीवर राहिली नाही. कार्यकर्त्यांनीच डॉ. सुजय विखे पाटील यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाकडून कारवाई झाली तरी चालेल अशी मानसिकता कार्यकर्त्यांची आहे. पक्ष कार्यकर्त्यांच्या बाजूने उभा राहत नाही अशी नाराजी त्यांच्यात आहेत असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

पवार हे जातीय द्वेषी; मराठ्यांना आजवर आरक्षण का दिले नाही? चंद्रकांत पाटील यांची टीका

0

अकलूज -शरद पवार हे खूप जातीय द्वेषी आहेत. त्यांच्या सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही? ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणून ज्यांच्या नावाने बोंब मारली जाते त्या ब्राह्मण मुख्यमंत्र्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. मराठा नेत्यांनी आपल्या शिक्षण संस्थांत मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याची तसदी आजवर घेतली नसल्याची टीका महसूल व बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी  केली.
पाटील म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी १९६८ पासून अनेक आयोग नेमले गेले. मात्र, भाजप सरकारने घटनेच्या तरतुदीप्रमाणे आयोग नेमून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्या आरक्षणाला कसलाही धक्का लागणार नाही. आम्ही ज्या वेळी छत्रपती संभाजी महाराजांना राज्यसभेवर घेतले तेव्हा शरद पवार म्हणाले होते, आता पेशवे राजे नेमू लागले आहेत. त्यांच्या विधानातून त्यांचा जातीय द्वेष स्पष्ट झाला आहे. भाजप सरकारने धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातही महत्त्वपूर्ण धोरणे घेतली आहेत. याचे परिणाम तुम्हाला भविष्यात नक्की दिसतील. ज्या सवलती आदिवासींना दिल्या जात आहेत त्या सवलती धनगरांनादेखील देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आम्ही घेतला आहे. आदिवासींसाठी सात हजार कोटींची तरतूद केली आहे. त्यातील एक हजार कोटी दिलेही आहेत. परंतु ब्राह्मणांचे सरकार, ब्राह्मण मुख्यमंत्री अशा बोंबा मारल्या जात आहेत. हे साफ चुकीचे असल्याचे पाटील यांनी या वेळी सांगितले.

५ एप्रिल पासून घुमणार ‘धुमस’चा आवाज

0

लोकप्रिय नेते उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर यांचे निर्मिती आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण

 चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद

महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर हे ‘धुमस’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनयात पदार्पण करत आहेत. रोमान्स आणि ऍक्शन चे मिश्रण असलेल्या ‘धुमस’च्या ट्रेलरमुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. गरुड फिल्म्स निर्मित ‘धुमस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले आहे.

आजच्या तरुणाईची कथा सांगणाऱ्या ‘धुमस’च्या संवाद, गीते आणि ट्रेलरला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. चित्रपटात असलेली गोपीचंद पडळकर – साक्षी चौधरी आणि रोहन पाटील – कृतिका गायकवाड या दोन जोड्यांची रोमँटीक  केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालते. तर वास्तव जीवनात नेते असलेले उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर या चित्रपटात अभिनेत्याच्या रूपाने सुद्धा सर्वसामान्य जनतेवर होणाऱ्या अन्याया विरुद्ध संघर्ष करताना दिसणार आहेत. याशिवाय विशाल निकम, भारत गणेशपुरे, कमलाकर सातपुते, अनिल नगरकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका ‘धुमस’ मध्ये आहेत.

गरुड फिल्मस् निर्मित ‘धुमस’ या चित्रपटाचे निर्माते उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर असून डी. गोवर्धन सहनिर्माते आहेत. चित्रपटासाठी गीतलेखन अविनाश काले यांनी केले असून पी. शंकरम यांचे संगीत लाभले आहे. या गीतांना सोनू निगम, श्रेया घोषाल, अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, आदर्श शिंदे, दिव्य कुमार, वैशाली माडे, कविता राम यांचा स्वरसाज लाभला आहे.

हिंदी आणि दक्षिणात्य सिनेमांमध्ये दिसणारी भव्यता आणि प्रभावी अॅक्शन सिन्स ‘धुमस’ च्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. सामाजिक परिस्थितीवर अतिशय हटके अंदाजात सडेतोड भाष्य ‘धुमस’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी (५ एप्रिल) संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

बहुचर्चित ‘बाबो’चा फर्स्ट लुक प्रदर्शित

0

यंदा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मराठी प्रेक्षकांना एका रंगतदार सिनेमाची मेजवानी मिळणार आहे. मल्हार फिल्मस् क्रिएशन निर्मित ‘बाबो’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘इरसाल नमुन्यांनी भरलंय गाव, खुळचट गोष्टींना इथं फुल वाव’ असं मजेशीर वर्णन या चित्रपटाचे करता येईल. महाराष्ट्रातील अनेक हास्यवीर ‘बाबो’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘बाबो’ या चित्रपटाची निर्मिती सचिन बाबुराव पवार आणि तृप्ती सचिन पवार यांनी केली असून रमेश साहेबराव चौधरी हे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर चित्रपटाची कथा अरविंद जगताप यांची आहे. या चित्रपटात आजवर अनेक मनोरंजक भूमिका साकारणाऱ्या कलावंतांची मांदियाळी बघायला मिळेल, या नमुनेदार गावातील नमुन्यांची ओळख नुकतीच सोशल मिडीयावर करून देण्यात आली आहे. यामध्ये प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे, संवेदनशील कवी, अभिनेते किशोर कदम यांच्यासह भारत गणेशपुरे, किशोर चौगुले, प्रतिभा मुणगेकर, निशा परुळेकर, विजय निकम, जयवंत वाडकर, रमेश चौधरी, विनोद शिंदे, अमोल कागणे, मंजिरी यशवंत, स्मिता डोंगरे, प्रिया उबाळे, अरुण शिंदे, पुष्पक चौधरी, प्रकाश भागवत, वैशाली दाभाडे, आकाश घरत आदी कलाकार या चित्रपटात आहेत. ‘बाबो’च्या लक्षवेधी फर्स्ट लुकची जोरदार चर्चा असून कलाकारांच्या मांदियाळीने नेमकी काय धमालमस्ती केली आहे? हे  येत्या ३१ मे २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्राला समजणार आहे.