ताललयीला रसिकांकडून टाळ्यांची उत्स्फूर्त दाद ‘अर्पण’
‘आनंदवन ‘ फॉरेस्ट येथे औषधी वनस्पतींची लागवड -अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी चा पुढाकार
एकही पूरग्रस्त मालकी हक्कापासून वंचित राहणार नाही -आमदार माधुरी मिसाळ
पुणे-पानशेत पूरग्रस्तांच्या गृहनिर्माण संस्थांच्या मालकी हक्कासाठी वैयक्तिक प्रस्ताव दाखल करण्याची मुभा देण्यात आली आहे. ज्या १३ संस्थांना शासनाने ३० वर्षांच्या भाडेपट्ट्याने जमिनी दिल्या होत्या, त्यांच्या मालकी हक्काबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांमार्फत शासनाकडे दाखल केला आहे. त्यामुळे एकही पूरग्रस्त कुटुंब मालकी हक्कापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली.
१२ जुलै १९६१ मध्ये पानशेत पुरामुळे अनेक कुटुंबे बेघर झाली होती. या पूरग्रस्तांसाठी गृहनिर्माण सहकारी निर्माण संस्था स्थापन करून ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने भूखंड प्रदान करण्यात आले होते. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या नावे जमिनीची मालकी नसल्याने गृहनिर्माण संस्थेतील सभासदांना मालमत्तेवरील कर्जाचा लाभ मिळत नव्हता.
हा प्रश्न तब्बल तब्बल ५८ वर्षे प्रलंबित होता. आमदार मिसाळ यांच्या पाठपुराव्यानंतर या वर्षी मार्च महिन्यात मंत्रिमंडळाने मालकी हक्काच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मालकी हक्काच्या प्रस्तावाबाबत पूरग्रस्तांमध्ये अनेक शंका होत्या. त्याचे निरसन करण्यासाठी पानशेत पूरग्रस्त सहकारी गृहरचना संस्थांच्या विकास मंडळाने आयोजित केलेल्या १०३ सोसायट्यांच्या पदाधिकार्यांच्या मेळाव्यात आमदार मिसाळ मार्गदर्शन करीत होत्या.
नगरसेवक महेश वाबळे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, नायब तहसिलदार संजय मधाळे, तलाठी प्रज्ञा बोरगावकर, कोतवाल सज्जाउद्दीन शेख, स्वाती ढोले, पानशेत पूरग‘स्त सहकारी गृहरचना संस्थांंचे विकास मंडळाचे अध्यक्ष सुरेश टांगसाळे, सचिव महादेव वारे, उपाध्यक्ष अरुण भालेराव, सहसचिव शशिकांत बडदरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार मिसाळ पुढे म्हणाल्या, ‘मालकी हक्क मिळविण्यासाठी शुल्क भरण्याबाबत नागरिकांमध्ये संभ‘म आहे. १ फेब्रुवारी १९७६ च्या बाजारभावानुसार शुल्क भरून प्रस्ताव दाखल करायचे आहेत. प्रस्ताव दाखल करण्याची अंतिम तारीख ८ सप्टेंबर आहे. गेल्या दोन महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे प्रस्ताव दाखल करण्याची प्रकि‘या रेेंगाळली होती. त्यामुळे या प्रकि‘येसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.’
पूरग्रस्तांचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी मामलेदार कचेरी आणि दत्तवाडीतील तलाठी कार्यालयात व्यवस्था करण्यात आल्याची माहिती श्री. गलांडे यांनी यावेळी दिली. पूरग्रस्तांना मार्गदर्शन करण्यासाठी सहकारनगर येथील पानशेत पूरग्रस्त सहकारी गृहरचना संस्थांच्या विकास मंडळात सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
११०० तुळशीच्या रोपांतून साकारला भारत
पुणे : देशात शांतता, सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे, तसेच आपल्याला शुद्ध हवा आणि पवित्र वातावरण मिळावे, या भावनेतून तुळशीच्या रोपांतून भारताचा नकाशा साकारण्यात आला. बावधन येथील सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या या उपक्रमात शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत तुळशीच्या रोपांपासून भारतीय नकाशा साकारला.
चंद्रभागा किनारी उसळला वारकऱ्यांचा सागर, उभी पंढरी आज नादावली
पंढरपूर – करिता देवार्चन, घरा आले संतजन…देव सारावे परते, संत पुजावे आरते…या संतवचनाप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराज व जगद््गुरू संत तुकाराम महाराज यांच्यासह विविध संतांच्या पालख्या दशमीच्या दिवशी संध्याकाळी तीर्थक्षेत्र पंढरीत दाखल झाल्या. विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच शेजारील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि मध्य प्रदेशातून रेल्वे, एसटी आणि खासगी वाहनांमधून लाखोंच्या संख्येने वारकरी येथे दाखल झालेले आहेत.
यंदा सुमारे १५ लाखांहून अधिक भाविक येण्याचा अंदाज बांधून प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे. दरम्यान, ज्ञानेश्वर माउली व तुकोबारायांच्या पालख्यांचे गुरुवारी संध्याकाळी पंढरीनगरीत आगमन झाले. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सर्व पालख्यांचे विसावा येथील विठ्ठल मंदिराजवळ स्वागत करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा
विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गुरुवारी पंढरपुरात सपत्नीक आगमन झाले. शुक्रवारी पहाटे २.१० मिनिटांनी त्यांच्या हस्ते महापूजा होईल. मध्यरात्री १२.४५ वाजता पदस्पर्श दर्शन बंद केले जाईल. महापूजेनंतर ३.३० ते ४.१५ वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानाच्या वारकरी दांपत्याचा सत्कार व विविध दिंडीप्रमुखांना निर्मलवारी पुरस्कार प्रदान केला जाईल. मात्र, या कार्यक्रमाचा पदस्पर्श दर्शनाला कोणताही अडथळा होणार नाही, असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी ढोले यांनी सांगितले.
चंद्रभागेतीरी लोटला अथांग जनसागर
आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर चंद्रभागा नदीवरील स्नानाला विशेष महत्त्व असते. त्यामुळे चंद्रभागेच्या तीरावर लाखो वारकऱ्यांनी गर्दी केली आहे. गर्दीमुळे पुण्यनगरी पंढरीत वैष्णवांचा अथांग महासागर वाहत असल्याची अनुभूती येत आहे. सर्व प्रमुख रस्ते गर्दीने फुलून गेलेले आहेत.
दर्शनासाठी २० तासांचा कालावधी
विविध ठिकाणांहून विठ्ठलाच्या ओढीने आलेल्या भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी सुमारे २० तासांहून अधिक कालावधी लागत आहे. मात्र, यंदा मंदिर प्रशासनाने चोख व्यवस्था केल्याने भाविकांचे दर्शन सुलभरीत्या होत आहे.
संजय तिसऱ्या वेळी इस्टोनिया रॅलीत सहभागी
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सह संचालक पदी मीनल जोगळेकर यांची नियुक्ती,
लवकरच संचालक पदाचा अतिरिक्त पदभार मिळण्याची शक्यता..!
मुंबई- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वरिष्ठ सहायक संचालक श्रीमती मीनल जोगळेकर यांची सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सह संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.लवकरच त्यांच्याकडे संचालक पदाचा अतिरीक्त पदभार मिळण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून समजते.
गेले अनेक महिन्यापासून सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सह संचालक पद रिक्त होते.त्यामुळे दैनंदिन कामकाजाचा भार हा सर्व संचालकांवर येत होता.
सध्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयामध्ये जोरदार शीतयुद्ध सुरू आहे.संचालनायच्या कारभारावर मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी प्रचंड नाराज असल्याचे कळते.म्हणून या मनमानीला चाप लावण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री कार्यालयाने आपले वजन वापरून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातून प्रतिनियुक्तवर श्रीमती जोगळेकर यांची सह संचालक पदी तातडीने नियुक्ती केली आहे.
लवकरच त्यांच्याकडे सांस्कृतिक कार्य संचालनालायच्या संचालक पदाचा अतिरिक्त पदभार येण्याची शक्यता असल्याची जोरदार चर्चा मंत्रालयात सुरू आहे.
ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची लवकरच स्थापना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई / सोलापूर. ( शाहरुख मुलाणी ) – ब्राह्मण समाजातील विविध समस्या सोडवण्यासाठी लवकरात लवकर परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती समस्त ब्राह्मण समाज समन्वय समितीचे समन्वयक प्रा. काकासाहेब उर्फ मनोज कुलकर्णी यांनी दिली.
मुख्यमंत्री सोलापूर दौर्यावर आले असता प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. 22 जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणे, पौरोहित्य करणार्या ब्राह्मणांना मानधन देणे, ब्राह्मण विरोधी लिखाणावर बंदी घालणे, पंढरपुरातील बडवे आणि उत्पात यांना पुन्हा मंदिरात सामावून घेणे यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन केले होते. त्यावेळी आपण सर्व मागण्या मान्य केल्या. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही, असे कुलकर्णी यांनी सांगत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मागण्या लवकरच मान्य करण्यात येतील असे सांगत परशुराम आर्थिक विकास महामंडळ लवकरात लवकर सुरू करू असे आश्वासन दिल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांचे सचिव अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी सहकार्य केले. यावेळी शहर समन्वयक विक्रम डोनसळे, पौरोहित्य आघाडीचे मधुकर कुलकर्णी, उमेश काशीकर, युवा नेते अजित कुलकर्णी, सचिन वेणेगुरकर, श्याम पुजारी, अक्कलकोटचे योगेंद्र पुजारी यांच्यासह बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते.
ब्राह्मण समाजाच्या वतीने 3 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात घंटानाद आंदोलन
मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण समाजाच्या मागण्या तत्वतः मान्य केल्याचे सांगितले असताना देखील अद्याप कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे मागण्या मान्य होण्यासाठी समस्त ब्राह्मण समाजाने पुन्हा एकदा कंबर कसली असून आता खुद्द मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात नागपूर येथील संविधान चौकात 03 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता घंटानाद आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून यात एकूण 80 संघटनांनी एकत्र असल्याची माहिती आमच्या सूत्रांकडून मिळालेली आहे.
समस्त ब्राह्मण समाज महाराष्ट्र च्या वतीने नागपूर येथे सर्व संघटना प्रतिनिधींची बैठक आयोजीत करण्यात आली होती. ब्राह्मण समाजाच्या वतीने दि. 22 जानेवारी 2019 रोजी मुंबई येथे आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण समाजाच्या मागण्या तत्वतः मान्य केल्याचे सांगितले होते. परंतु, आजतागायत या मागण्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही. ब्राह्मण समाजाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ, पुरोहितांना मानधन, महापुरुषांच्या बदनामी विरोधी कायदा, वर्ग 2 जमिनी वर्ग 1 करण्यासाठी कायदा, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार, श्री दादोजी कोंडदेव व श्री राम गणेश गडकरी यांचे पुतळे पुन्हा सन्मानाने प्रस्थापित करणे, प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह, पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे श्रीवर्धन येथील स्मारकाचे काम पूर्ण करणे, छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक लवकरात लवकर पूर्ण करणे, शनिवार वाडा येथे श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या 44 लढायांचे युद्ध स्मारक निर्माण करणे या सर्व मागण्या मान्य होण्यासाठी समस्त ब्राह्मण समाजाने पुन्हा एकदा कंबर कसली असून आता खुद्द मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात नागपूर येथील संविधान चौकात 03 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता घंटानाद आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे या आंदोलनात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समन्वय समिती च्या वतीने विश्वजीत देशपांडे, सौ. अर्चना देशमुख, मनीष द्विवेदी, रामनारायण मिश्रा आदींनी केले असल्याचे कळत आहे.
ब्राह्मण समाजाच्या मागण्यांबाबत 04 निवेदनाद्वारे राजस्थान, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक आदी राज्यांनी काय काय योजना केला आहेत त्याचे अभ्यास पूर्ण असे त्याच धर्तीवर 130 पानांचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजित देशपांडे यांनी दिले आहे. तसेच एकूण 13 ब्राह्मण समाजाचे आमदार असून त्यापैकी 04 आमदारांची बैठक मुंबई मध्ये आमदार मनीषा कायंदे, सुधीर गाडगीळ, संजय केळकर, राज पुरोहित यांच्या सहित झाली होती. अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.
पुण्यात गाड्या पेटवण्याचे सत्र सुरुच; ७ दुचाकी जाळल्याने खळबळ
पुणे- शहरात गेल्या काही महिन्यांत दुचाकी जाळणाच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहे. अशीच घटना बालाजीनगर भागात घडली असून यामध्ये तब्बल ७ दुचाकी पेटवून देण्यात आल्या आहेत. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजीनगर येथील एलोरा पॅलेस जवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ७ दुचाकींना मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानुसार घटनास्थळी पोहोचेपर्यंत यामध्ये ७ दुचाकी जळून खाक झाल्या होत्या.
या दुचाक्या कोणीतरी पेटवून दिल्या असाव्यात असा संशय या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
अखंडित वीजसेवेसाठी काम करा ; कामचुकारांवर कारवाई : ऊर्जामंत्री
मुंबई:
कोणत्याही कारणांनी वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन गेल्या तीन-चार वर्षांत वीज वितरण क्षेत्रात झालेल्या चांगल्या कामांच्या बळावर ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी काम करा, अशा सूचना ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. तसेच या कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
महावितरणच्या राज्यभरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आज मुंबई मुख्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत ना. ऊर्जामंत्री बोलत होते. या बैठकीस प्रधान ऊर्जा सचिव श्री. अरविंद सिंग, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार, महाराष्ट्र राज्य वीज मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक श्री. विश्वास पाठक, संचालक (संचालन) श्री. दिनेशचंद्र साबू, संचालक (प्रकल्प) श्री. भालचंद्र खंडाईत, संचालक (मा.सं) ब्रिगेडियर श्री. पवन कुमार गंजू उपस्थित होते. ऊर्जामंत्री ना. श्री. बावनकुळे म्हणाले, सध्या अतिरिक्त वीज उपलब्ध असतांनाच्या कालावधीत मोठ्या शहरातील खंडित विजेचे प्रमाण शून्यावर आले पाहिजे. त्यादृष्टीने नियोजन करून प्राधान्यक्रम ठरवावेत व त्यानुसार काम करावे. मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात दौरे करून वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घ्याव्यात व स्थानिक अधिकाऱ्यांच्या समन्वयातून त्या सोडवाव्यात. ग्रामीण भागात यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात विजेचे खांब पडले आहेत. यापुढे ग्रामीण भागातही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विजेचे खांब उभारण्याची कामे करावीत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी सांगितले की, मोठ्या वीज ग्राहकांचा वीजपुरवठा थोड्या कालावधीसाठी खंडित झाला तरी त्यांचे प्रचंड नुकसान होते. त्यामुळे अशा ठिकाणी महिन्यातून एकदाच देखभाल-दुरुस्तीची कामे करावीत व यासंदर्भात संबंधित ग्राहकांना प्रणालीद्वारे माहिती द्यावी. तसेच बैठकीत एकात्मिक ऊर्जा विकास, पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती, उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे कृषिपंपांना जोडणी, मुख्यमंत्री सौर कृषिपंप आदी योजनांच्या कामांचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
महावितरणच्या पेमेंट वॉलेटचे लोकार्पण
वीज ग्राहकांना विशेषतः ग्रामीण भागात वीजबिल भरणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी महावितरणने स्वतःचे डिजिटल पेमेंट वॉलेट तयार केले आहे. या वॉलेटचे ऊर्जामंत्री ना. श्री. बावनकुळे यांच्या हस्ते प्रकाशगड मुंबई येथे महावितरणच्या मुख्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकार्पण करण्यात आले. वॉलेटमुळे ग्राहकांना वीजबिल भरण्याच्या सोयीसोबतच देयकाच्या वसुलीतून मिळणाऱ्या कमिशनच्या माध्यमातून अनेकांना उत्पन्नाचे नवीन साधन उपलब्ध होणार आहे.
साहसी क्रिडा प्रकारातील अपघात टाळण्यासाठी समिती गठीत
पुणे .-साहसी क्रिडा प्रकारातील होणारे अपघात टाळण्यासाठी शासनाने दि. 26 जुलै 2018 रोजी साहसी क्रिडा प्रकारातील गिर्यारोहण, माऊंटनिअरिंग, स्कीईंग, पॅरासेलिंग, हवाई क्रिडा स्पर्धा (हॅग्लायडींग, पॅराग्लायडिंग) जलक्रिडा आयोजित करणाऱ्या संस्थांसाठी सुधारीत नियम व मार्गदर्शन सुचना निर्गमित करण्यासाठी आणि साहसी प्रकारातील कार्य करणाऱ्या संस्थांची नोंदणी जिल्हास्तरावर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार संस्थांच्या नोंदणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ हे सदस्य सचिव असून जिल्हा क्रिडा अधिकारी हे सह सदस्य सचिव आहे. तसेच पोलीस आयुक्त, कार्यकारी अभियंता सिंचन विभाग, विभागीय वनअधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आणि साहसी क्रिडा प्रकाराचे आयोजन करणाऱ्या जिल्हयातील अनुभवी संस्थांचे 2 प्रतिनिधी हे सदस्य आहेत.
साहसी क्रिडा प्रकारातील गिर्यारोहण, माऊंटनिअरिंग, स्कीईंग, पॅरासेलिंग, हवाई क्रिडा स्पर्धा (हॅग्लायडींग, पॅराग्लायडिंग,) जलक्रिडा आयोजित करणाऱ्या संस्थाना मंजूरी देणेबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली दि. 10 जुलै 2019 रोजी दुपारी 12 वाजता बैठक संपन्न झाली.
विना परवाना साहसी क्रिडा आयोजक हे क्रिडा प्रकाराचे आयोजन करताना अपघात होतात. अपघात हे मुख्यत: अप्रशिक्षित कर्मचारी तसेच दुय्यम दर्जाचे साहीत्याचा वापर यांमुळे होत असतात. त्यामुळे साहसी क्रिडा प्रकारातील होणारे अपघात टाळण्यासाठी साहसी क्रिडा प्रकारातील आयोजन करीत असलेल्या संस्थांनाही या बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. बैठकीत साहसी क्रिडा प्रकारांच्या आयोजनाबाबत आणि सदरच्या संस्थांना नोंदणी करण्याबाबत सविस्तर सूचना देऊन शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला अध्यादेश देण्यात आला आहे. साहसी क्रिडा प्रकारातील संस्थांची रितसर नोंद, वापरण्यात येणाऱ्या साहीत्याची तज्ञांकडून तपासणी, क्रिडा प्रकारात भाग घेणाऱ्या व्यक्तींचा विमा, स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच वनविभाग आणि पोलीस विभागाकडे नोंदणी या बाबी आवश्यक असल्याचे सदर बैठकीत सांगण्यात आले. साहसी क्रिडा प्रकाराचे आयोजन करणाऱ्या संस्थांनी या समितीकडे संस्थेची नोंदणी करणे अनिवार्य आहे. या बाबतच्या अधिक माहीतीसाठी जिल्हा क्रिडा अधिकारी, पुणे़ किंवा प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पुणे यांचे कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी केले आहे.
पुणे व पिंपरी-चिचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गोठेधारकांना गुरे पाळण्याकरीता लायसन्स परवाना बंधनकारक
पुणे दि.11-पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व गोठेधारकांना कळविणेत येते कीं, महाराष्ट्र शासन, गुरे नियंत्रण कायदा-1976 च्या कलम 13 अन्वये महानगरपालीका हद्दीतील गुरे पाळणे व त्याची ने आण करणे करिता लायसन्स/परवाना घेणे व त्याचे दरवर्षि नुतनीकरण करणे बंधनकारक असुन विना परवाना गुरे पाळणे व त्याचे ने आण करणे हा कायद्याने गुन्हा आहे, अशी माहिती जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधीकारी प्रविण परब यांनी दिली आहे.
कायदा पुणे व पिंपरी-चिचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गोठेधारकांसाठी सन-2004 पासून लागू करणेत आलेला आहे. याबाबत वारंवार नोटीसा तसेच वृत्तपत्रातून निवेदन देवून त्याचप्रमाणे आकाशवाणी,पुणे यांचेमार्फत वारंवार आवाहन करुन लायसन्स घेणेबाबत कळविणेत आलेले आहे.
जे गोठेधारक परवाना घेणार नाहीत, तसेच घेतलेल्या परवान्याचे नुतनीकरण करणार नाहीत अशा गोठेधारकांवर महाराष्ट्र गुरे नियंत्रण कायदा-1976 मधील कलम क्र. (3) व (7) नुसार पोलीस कारवाई केली जात आहे.
ज्या गोठेधारकांनी अद्याप परवाना घेतलेला नाही त्यांनी जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी,पुणे यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. दुरध्वनी क्र. 020-25812890 असा आहे.
नविन अनुज्ञाप्तीसाठी खालील प्रमाणे कागदपत्रे सोबत आणावीत.
गोठेधारकांचा फोटो, रेशनकार्डाची झेरॉक्स प्रत,कोर्ट फी स्टॅप रु.5 तसेच ज्यांनी यापूर्वी अनुज्ञाप्ती घेतलेली आहे त्यांनी सन 2019-20 पर्यंत अनुज्ञाप्ती नुतनीकरणाकरिता संपर्क साधावा. अन्यथा वरील कलमांन्वये कारवाई केली जाईल, याची नोंद घ्यावी. तसेच या परवान्याचे नुतनीकरण करणार नाहीत अशा गोठेधारकांवर शासनाची थकबाकी म्हणून घोषित करण्यांत येणार आहे, असेही श्री.परब यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
17 जुलै रोजी पुणे येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा
पुणे – कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, 481, रास्ता पेठ, व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ महाविद्यालय, कला, वाणिज्य आणि विज्ञान, 48/1-अ, एरंडवणा, पौड रोड, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. 17 जुलै रोजी सकाळी 10 वाजता, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ महाविद्यालय, कला, वाणिज्य आणि विज्ञान, 48/1-अ, एरंडवणा, पौड रोड, पुणे येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे, उमेदवारांनी या मेळाव्याअतंर्गत खाजगी क्षेत्रातील उपलब्ध असणा-या विविध प्रकारच्या जागांसाठी प्रत्यक्ष मुलाखतीस (Walk-in-Interview) उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक संचालीका अनुपमा पवार यांनी केले आहे.
पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, पिरंगुट, शिंदेवाडी या औद्योगिक परिसरातील एकूण – 32 उद्येाजकांनी सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून एकूण -2 हजार 809 रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत. पुणे जिल्हयातील जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांना रोजगार तसेच स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्याकरिता या रोजगार मेळाव्यामध्ये संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यास्तव किमान 8 वी, 9 वी पास, नापास, 10 वी, 12 वी पास, नापास व एमसीव्हीसी, पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा, बीई, बीबीए, एमबीए इ. पात्रता धारण केलेल्या उमेदवारांनी बुधवार, दिनांक 17 जुलै 2019 रोजीच्या मेळाव्याअतंर्गत खाजगी क्षेत्रातील उपलब्ध असणा-या विविध प्रकारच्या जागांसाठी प्रत्यक्ष मुलाखतीस (Walk-in-Interview) उपस्थित राहावे. तसेच या मेळाव्यांतर्गत महिला उमेदवारांनाही प्राधान्याने नामांकित उद्योजकांकडे रोजगार मिळण्याच्या दृष्टीने संधी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. येताना उमेदवारांने आपली सर्व मुळ शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट साईज फोटो, अर्जाच्या (Resume) व मुलाखतीस आधारकार्डाच्या प्रती सोबत आणाव्यात, असेही श्रीमती पवार यांनी कळविले आहे.
आषाढी…मनात आठवणींची वारी (लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)
“आषाढीला काय करायचं आहे उपवासाचं?…ते आधीच सांग, म्हणजे त्याप्रमाणे मला तयारी करून ठेवता येईल.” सासूबाईंच्या या प्रश्नाने आषाढी जवळ आल्याचे प्रकर्षाने जाणवले. गेले काही दिवस कामाच्या गडबडीत भिंतीवरच्या कॅलेंडरकडे लक्षच गेले नव्हते. आज सासूबाईंनी विचारल्यावर मात्र एक नजर कॅलेंडरवर गेली आणि आषाढीच्या आठवणींत रमून गेले. आषाढी – उपवास केला नाही तरी उपवासाचे पदार्थ मात्र चवीचवीने खायचे हा लहानपणापासूनचा नेम. आजी खूप काही पदार्थ बनवायची. घरी सगळ्याच मोठ्या माणसांचा उपवास असायचा. राजगिऱ्याच्या पुऱ्या, बटाट्याची भाजी, वरीची खिचडी आणि दाण्याची आमटी, हा सकाळचा मेन्यू तर संध्याकाळी उपवासाचे थालीपीठ, चटणी, दही, चिकवड्या असा सगळा आवडीचा बेत असायचा.
शाळा सुरू झाल्यानंतर पहिली अर्धा दिवस सुट्टी मिळायची ती आषाढीची. मधली सुट्टी झाली की एक पिरिअड होऊन शाळा सुटायची. सगळ्याच मैत्रिणींच्या डब्यात आवडती साबुदाण्याची खिचडी. कुणाची हिरवी मिरची घालून केलेली, तर कुणी लाल तिखटात केलेली. सगळ्यांच्या डब्यातील एक एक चमचा खिचडी खाण्यात मजा काही औरच होती. आजही खिचडी खाताना ही आठवण हमखास होतेच. शाळा सुटण्याची आतुरतेने मी वाट पाहायचे; कारण घरी गेल्यावर बाबांबरोबर वडाळ्याला आषाढीच्या जत्रेला जायचे असायचे. वडाळ्याला विठुरायाचे देऊळ आहे, मुंबईतील ते प्रतिपंढरपूरच! पंढरपूरला येतात तसा मुंबईचा वारकरी विठुनामाचा गजर करत दिंडी घेऊन येतो. सकाळी दिंडीचा टाळ-चिपळ्यांच्या गजर ऐकू आला की सहदेव काकाबरोबर आम्ही बघायला जायचो. दादरला रानडे रोडवरून नामाचा गजर करत जाणारी दिंडी बघताना तिच्याशी एकरूप कधी व्हायचो ते कळायचेच नाही. संध्याकाळी वडाळ्याला तर खूप साऱ्या दिंड्या दिसायच्या. देवळात अर्थातच खूप गर्दी असायची. बाबा सांगायचे, आता पुढच्या गल्लीत देऊळ आहे; आपण जाणार नाही कारण खूप गर्दी असते तिकडे. जत्रेत फिरून, खेळणी घेऊन घरी परतायचो.
वर्षं सरत गेली आणि काही गोष्टीही बदलत गेल्या. काही वर्षांनी अजित कडकडे यांच्या भक्तीगीतांचा कार्यक्रम आषाढीला बघण्याचा नेम सुरू झाला. आषाढी – दिंडी – आणि विठुनामाचा गजर. ‘बोलावा विठ्ठल’ हा आषाढीला होणारा भक्तीरसाचा कार्यक्रम…आम्ही आणि पै कुटुंबीय आजही हा भक्तीगीताचा सोहळा बघतो. वारीची उत्सुकता आणि अप्रूप आजही मनात घर करून आहे. दरवर्षी ठरवते पण ‘योग’ काही येत नाही. यावर्षी सरग सरांनाही त्याबद्दल विचारून झाले, त्यांनी माहितीही दिली. संपदाचे वारीचे फोटो बघून आपण यावर्षीही वारीला जाऊ शकलो नाही, याबद्दल खंत वाटली. ‘एकदा तरी वारी अनुभवावी’ – वर्तमानपत्रात आलेला हा लेख वाचून मनाची हुरहुर अधिक वाढली. अशी माझी आषाढी त्या दिवशी मनात आठवणींची वारी करून येते, पुढच्या वर्षी वारीला नक्की नक्की जायचे हे ठरवून…
पूर्णिमा नार्वेकर
पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
भिकाजी लाड मार्ग,
दहिसर फाटक जवळ,
दहिसर (प.),
मुंबई – 400068






