Home Blog Page 2883

यंदा ३ दिवस चालणार अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव (व्हिडीओ)

0

पुणे- जन्मशताब्दी निमित्त यंदा साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयन्ती महोत्सव ३ दिवस चालणार असून या महोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे . आज यासंदर्भात महोत्सवाचे स्वागताध्यक्ष नगरसेवक अविनाश बागवे यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली .
पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने होणार्या या महोत्सवाचा प्रारंभमंगळवार दिनांक ३० जुलै पासून होतो आहे .सावित्रीमाइ फुले विद्यापीठाचे कुगुरू डॉ .नितीन करमळकर,एम पी एस सी टाॅप्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांती कुमार पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांच्या हस्ते प्रथम दिनी १० वी १२ वी उत्तीर्ण ,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच समाजात विशेष कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. ३१ जुलै रोजी अण्णाभाऊंच्या जीवन चरित्रावर आधारित शाहिरी ,पोवाडे,आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत .1 ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार यादव साधू सोनावणे अंकल यांना देवून सन्मानित करण्यात येणार आहे. सत्यशोधक मुक्ता साळवे विद्याभूषण पुरस्काराने मोनिका रोहिदास कांबळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.तर लढवय्या फकीरा पुरस्काराने विनोध भगवान वैरागर यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

वृद्धेला मारहाण करून मोलकरणीने पळवले १० तोळे सोने ..जुन्नर मधील प्रकार

0
जुन्नर /आनंद कांबळे : – जुन्नर शहरातील भर वस्ती असणाऱ्या सदाबाजार पेठ येथील एका राहत्या घरात ७६ वर्षीय ज्येष्ठ नागरिक महिलेला त्यांच्या राहत्या घरात धुणीभांडी करणार्‍या महिलेने डोळ्यात काहीतरी टाकून, तोंडात रुमाल कोंबून, डोके भिंतीवर आपटुन जबरदस्तीने ज्येष्ठ महिलेच्या अंगावरील एकूण १०३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले.
नलिनी दत्तात्रय गाटे( वय ७६ राहणार सदाबाजार पेठ ,जुन्नर) या ज्येष्ठ नागरिक महिला त्यांच्या घरात एकट्या राहत असून शुक्रवार दिनांक २६ रोजी सकाळी ११ वाजायच्या दरम्यान त्यांच्या घरी धुणीभांडी चे काम करणाऱ्या शोभा शंकर शेटे (राहणार सदाबाजार पेठ, जुन्नर) ही त्यांच्या घरी कामासाठी आलेली असताना तिने गाटे यांचे डोके भिंतीवर आपटुन, तोंडामध्ये रुमाल कोंबून, छातीवर पाय ठेवून त्यांच्या अंगावरील सोन्याच्या ४ बांगड्या,२ पाटल्या,१ सोन्याचे गंठण आसा एकूण १०३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने लंपास केले. ज्येष्ठ महिला जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची फिर्याद त्यांनी जुन्नर पोलिसांकडे नोंद केली असून पोलिसांनी शेटे या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बेदरे, पोलीस हवालदार भरत सूर्यवंशी करीत आहेत.
संजय शंकर पवार मृतावस्थेत आढळले –
– जुन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निमगाव म्हाळुंगे येथील ४० वर्षीय इसमाचा मृतदेह वडगाव सहानी येथील कॅनॉलमध्ये शनिवारी दुपारी आढळून आला आहे.
संजय शंकर पवार (वय 40) यांचा मृतदेह कळसुबाई मंदिर, वडगाव सहानी येथील कॅनॉल मध्ये शनिवारी दुपारी आढळून आला. कॅनॉलच्या पाण्यात बुडून ते मयत झाले. त्यांना दारूचे व्यसन होते याबाबतची खबर संदीप पवार यांनी जुन्नर पोलिसांना दिली. अकस्मात मयत म्हणून या घटनेची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास जुन्नर पोलीस करीत आहेत.

सई ताम्हणकर बनतेय New Age मराठी सिनेमाचा चेहरा

0

अभिनेत्री सई ताम्हणकरला नाविन्याची सातत्याने ओढ असते, हे तिच्या सिनेमाच्या निवडीने तिने दरवेळी दाखवून दिलंय. ह्यामुळेच सई नव्या दिग्दर्शकांसोबतही काम करताना दिसतेय. प्रसिध्दीच्या शिखरावर असलेल्या अभिनेत्री क्वचितच असे, एक्पिरिमेन्ट करताना दिसत असताना, सई मात्र न कचरता नव्या दिग्दर्शकांना भक्कम सपोर्ट देतेय. आणि ह्याचं लेटेस्ट उदाहरण म्हणजे उपेन्द्र सिधये आणि मोहित टाकळकर.

यंदा दोन फस्ट टाइम फिल्ममेकर्ससोबत मराठी सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री असलेल्या सईचे सिनेमे येत आहेत.  गर्लफ्रेंड सिनेमातून सिनेसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पाऊल ठेवणा-या उपेंद्र सिधये आणि मिडीयम स्पाईसी सिनेमातून दिग्दर्शक म्हणून डेब्यू करणा-या मोहित टाकळकरसोबत काम करण्याचा निर्णय सईने घेतला. पण नव्या फिल्ममेकर्ससोबत सई ताम्हणकर पहिल्यांदाच सिनेमा करत नाही आहे. ह्याअगोदरही सईने मनवा नाईक (पोर बाजार), हर्षवर्धन कुलकर्णी (हंटर),  गिरीश कुलकर्णी (जाऊ द्या ना बाळासाहेब), दिपक भागवत (3.56 किल्लारी),  ज्ञानेश झोटिंग (राक्षस), अशा फस्ट-टाइम दिग्दर्शकांच्या सिनेमांतून काम केले आहे.

सईच्या जवळच्या सूत्रांनुसार, आपलं स्टारडमचं बॅगेज बाजूला ठेवून एखाद्या प्रोजेक्टला सामोरे जाण्यामध्ये सई विश्वास ठेवते. जेव्हा जेव्हा ती फस्ट-टाईम दिग्दर्शकांसोबत काम करते. तेव्हा स्वत: पहिल्यांदा सिनेमात काम करत असल्याचा हुरूप सईच्या चेह-यावर नेहमी दिसतो. जिथे जिथे पहिली वेळ असते तिथे सई असतेच. ती पहिली मराठी अभिनेत्री आहे जी स्पोर्ट्स टीमची ओनर आहे. ती पहिली मराठी ए-लिस्टर अभिनेत्री आहे जी स्टँडअप कॉमेडी करते. तिला नाविन्याची ओढ आहे. त्यामुळेच नव्या फिल्ममेकर्सकडून तिला फिल्ममेकिंगचा नवा अप्रोच शिकायला खूप आवडतं. तिच्या ह्याच दृष्टीकोणामूळे ती आज यशाच्या शिखरावर आहे. ती न्यु एज सिनेमाचा चेहरा आहे.

सई ह्याविषयी म्हणते, “नव्या दिग्दर्शकांमध्ये फिल्ममेकिंगचा एक नवा दृष्टिकोण आणि फ्रेशनेस असतो. सिनेमा बनवतानाच्या नव्या दिग्दर्शकांच्या अप्रोचला अभिनेत्री म्हणून मॅच करण्यासाठी किंवा त्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना मी आपसूकच स्वत:ला आव्हान देत असते. स्वत:ला ‘ऑन टोज’ ठेवण्यासाठीची ही एक्टर म्हणून माझी एक्सरसाइज असते. भारतीय सिनेमा पूढे जायला हवा असेल, आणि एक्टर म्हणून प्रगल्भ व्हायचं असेल तर नव्या दिग्दर्शकांसोबत काम करायला हवं असं मला वाटतं. “

‘देवदूत’च्या भ्रष्टाचाराचे गौडबंगाल कायमच …दिलीप बराटे (व्हिडीओ)

0

पुणे-आयुक्त म्हणाले, ३ दिवसात चौकशी करून अहवाल सादर करतो, महपौर सभागृहात म्हणाल्या, अहवाल आलाय पण ज्यांना हवाय त्यांनी नगरसचिव कार्यालयातून घ्या ..पण प्रत्यक्षात नगरसचिव कार्यालयात बसल्यावर म्हणाले, अहवाल आलाच नाही … .. खोटारडे पणाचा कळस झाला ,अवघ्या तेरा लाखाची गाडी म्हणे सव्वा कोटी रुपयात खरेदी केली ..भ्रष्टाचाराचाही कळस झाला .. अखेर अहो सांगा काहीतरी …खरे काय, खोटे काय ? असे ओरडूनही निलाजरेपणाचा कळस दिसला … दूध का दुध , पाणी का पाणी ..महापालिकेत कधी होणारच नाही काय ? जर घोटाळा नसेल तर आयुक्त आणि महापौर तसा हवाला का देत नाहीत ?… अशा अनेक प्रश्नांवर आता हळू हळू कालाय तस्मै नमः प्रमाणे पडदा पडू पाहत असताना हा विषय पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी उपस्थित केला आहे. यात खरे काय खोटे काय ते त्यांनी सांगितले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे . पहा आणि ऐका नेमके बराटे यांनी काय म्हटले आहे त्यांच्याच शब्दात …

राज्य सरकारी कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर जाणार

0
– काय आहेत मागण्या 

– जुनी पेन्शन योजना सुरु करावी
– 02 लाख रिक्त पदे तातडीने भरावीत
-अनुकंपा नियुक्त्या द्याव्यात.
-7 वेतन आयोगात केंद्र प्रमाणे भत्त्यांचे दर निश्चित करावेत
-महिला कर्मचाऱ्यांना केंद्र प्रमाणे 02 वर्षाची बाळ संगोपन रजा द्यावी
-05 दिवसाचा आठवडा करण्यात यावा
-सेवा निवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यात यावे
-वारसा हक्क विना अट द्यावेत.

मुंबई.– विविध मागण्यांसाठी 20 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी लाक्षणिक संप करण्यात येणार असल्याचे मुंबईत झालेल्या राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पुढाकाराने समन्वय समितीच्या बैठकीत 64 संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कार्याध्यक्ष मिलिंद सरदेसाई यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.

यावेळी अंशदायी पेन्शन योजना बंद करून सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सरकारी विविध खात्यांमधील दोन लाख पदे तातडीने भरावीत, पाच दिवसांचा आठवडा करावा, सेवानिवृत्तीचे वय विनाविलंब 60 वर्षे करावे, केंद्रासमान वाहतूक आणि शैक्षणिक भत्ता मिळावा, बक्षी समितीचा खंड 2 तातडीने प्रसिद्ध करावा, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्र्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा, महिला कर्मचाऱ्यांना 02 वर्षे बालसंगोपन रजा मिळावी, खाजगीकरण आणि कंत्राटीकरण रद्द करावे आदी मागण्यांसाठी सरकारी कर्मचारी दि. 20 ऑगस्ट रोजी लाक्षणिक संप करणार आहेत. राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि राज्य सरकारी गट – ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र (मान्यताप्राप्त) अध्यक्ष भाऊसाहेब पठाण म्हणाले की, चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वारसा, अनुकंपा विना अट करा, कंत्राटीकरण बंद करून तात्काळ सरळ सेवा भरती करावी तसेच कर्मचाऱ्यांचे  जिव्हाळ्याचे प्रश्नांसाठी या संपात सहभागी असणार आहोत असे सांगितले. बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी सांगितले की, राज्यातील सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक, शिक्षकेतर आणि महामंडळाचे 17 लक्ष कर्मचारी संपावर जाणार आहेत. संघटना कार्याध्यक्ष मिलिंद सरदेशमुख म्हणाले की, शासनाचे संपली दाखल घेतली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद महासंघ, शिक्षक भारती संघटना, टी. डी. एफ. शिक्षक संघटना, विदर्भ शिक्षक संघटना, माध्यमिक शिक्षक संघटना, शिक्षकेतर संघटना, म्हाडा, आणि इतरही राज्य संघटनांचे प्रतिनिधी  उपस्थित होते.

त्यावेळी आमचा अंत आम्ही स्वत: करू-डाॅ. गणेश देवी

0
पुणे, दि. 28 जुलै : संविधानाच्या सूर्यावर काळे ढग येत असताना ते नाहीसे करण्याचे काम आम्ही सर्व शक्तीनिशी करतोय. आणि शेवटपर्यंत तो करीत राहणार आहोत. ज्यावेळी हे काम करण्याची शक्ती अंगात राहणार नाही त्यावेळी आमचा अंत आम्ही स्वत: करू, असे उद्गार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषातज्ञ व समाजसेवक डाॅ. गणेश देवी यांनी आज येथे काढले.
डीपर, सर फाउंडेशन व साद माणुसकीची या संस्थांच्या वतीने डॉ. गणेश देवी व डॉ. सुरेखा देवी यांना महापालक राष्ट्रीय सन्मानाने गौरवण्यात आले. पुण्यातील कोथरुड येथील जे पी नाईक सेंटर येथे हा कार्यक्रम झाला. एक लाख रुपये, सन्मान चिन्ह, सन्मान पत्र असे सन्मानाचे स्वरूप होते. याप्रसंगी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, आयोजक संस्थापक अध्यक्ष हरीश बुटले, डॉ. रोहिणी बुटले आदी मान्यवर उपस्थित होते.
आम्ही दोघे पती व पत्नी एकाच वर्षी जन्माला आलो. एकाच वेळी शिकलो आणि पीएचडी एकाचवेळी पूर्ण झाली. डॉ. आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या पर्वात आम्ही वाढत होतो. त्यामुळे त्यांच्या विचारांचे संस्कार आमच्यावर झाल्याचे डॉ. गणेश देवी यांनी सांगितले. ते म्हणाले की, सॉक्रेटिस, गांधी व आंबेडकर यांच्यात असलेली शक्ती कालातीत व सीमाहीन असते. ती शक्ती आपल्याला उत्क्रांतीकडे घेऊन जाते. हरीश बुटले यांनी सुरु केलेले काम असेच उत्क्रांती कडे घेऊन जाणारे आहे.
शिक्षक, सेवक, भाषातज्ज्ञ म्हणून सेवाभावी वृत्तीने काम करणारे देवी दांपत्य प्रत्येक क्षण समाजासाठी जगताहेत. पुरस्काराचे धंदे सुरू असताना हरीश बुटले व त्यांच्या संस्था अशा चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत. भाषा जगली पाहिजे तरच माणूस जगेल. आणि म्हणूनच डॉ. देवी दांपत्य उच्चशिक्षित असूनही त्यांचे भाषेसाठीचे व आदिवासींसाठींचे काम महत्वाचे ठरते, असे डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी यावेळी सांगितले.
सध्या गांधीऐवजी गोडसे यांना माननारे वाढत आहेत ही चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीत डॉ. देवी यांच्यासारख्या संशोधकांचे संशोधन समाजाला आवश्यक आहे, असे सांगून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी इतिहासातले अनेक दाखले देत सध्याच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीचे विवेचन केले.
डीपर, सर फाउंडेशन व साद माणुसकीची या संस्थांच्या माध्यमातून सुरु असलेल्या शैक्षणिक व सामाजिक कामांबाबत आयोजक संस्थापक अध्यक्ष हरीश बुटले यांनी प्रास्ताविकादरम्यान माहिती दिली.
शैक्षणिक व्यवस्थेची पुनर्बांधणी विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सिद्धगिरी मठाचे मठाधिपती अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज, सामाजिक कार्यकर्ते किशोर देशपांडे, सिस्कॉमचे राजेंद्र धारणकर, विज्ञानाश्रमाचे योगेश कुलकर्णी, शिक्षणतज्ज्ञ अभिजीत पाटील, सुधीर दाणी, अभ्यासक प्राचार्य डॉ. चंद्रकांत रागीट, श्यामची आई फाउंडेशनच्या शीतल बापट आणि आयआयटी प्रतिष्ठानचे दुर्गेश मंगेशकर सहभागी झाले होते. श्रमाला प्रतिष्ठा मिळणे अत्यंत आवश्यक असून तरच कौशल्य आधारित शिक्षणाला महत्व प्राप्त होईल, असे मत मान्यवरांनी मांडले.
युवा कार्यकर्ता संवाद व प्रशिक्षण कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते किशोर देशपांडे, रयत सेवक संघाचे प्रशांत खांडे पाटील, आकार फाउंडेशनचे राम वाघ, अनाम प्रेमचे अजित कुलकर्णी, ज्ञानदीप संस्थेचे आनंदा थोरात, सोशल नेटवर्कींग फोरमचे प्रमोद गायकवाड सहभागी झाले होते. याबरोबरच कार्यकर्त्यांचे अनुभवकथन, कार्यकर्ता संवाद, पुढील वाटचाल यासंबंधी कार्यक्रमही झाले.

शिक्षणाबरोबरच कला आत्मसात केली पाहिजे -डॉ. नंदकिशोर कपोते

0

पुणे : “शिक्षणाबरोबर नृत्य, गायन, वादन आदी कला शिकणे आवश्यक आहे. शास्त्रीय नृत्य प्रकार आज शिक्षणामध्ये समाविष्ट केले आहेत. यावरून आपल्याला कला किती महत्त्वाचे आहे, हे जाणवते. त्यामुळे प्रत्येकाने आयुष्यात शिक्षणाबरोबरच एखादी तरी कला आत्मसात करायला हवी,” असे प्रतिपादन अखिल भारतीय कथ्थक तज्ज्ञ डॉ. नंदकिशोर कपोते यांनी केले.

तान्हुराम कल्याणकारी संस्थेच्या वतीने आयोजित पेरीयार ई. व्ही. रामास्वामी नायकन (दक्षिणेचे ज्योतिबा फुले) सामाजिक पुरस्कार व कर्मवीर भाऊराव पाटील शैक्षणिक पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. कपोते बोलत होते. सावित्रीबाई फुले सभागृहात झालेल्या या सोहळ्यावेळी सर्वोच्च न्यायालयातील वकील ऍड. आशुतोष रानडे, प्रसिद्ध वक्ते आणि महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे, माजी सिनेट सदस्य डी. जी. कांबळे, संस्थेचे सचिव म्हस्कू अडागळे, संचालक अॅड. वैशाली भोसले, नितीन भोसले आदी उपस्थित होते.

डॉ. नंदकिशोर कपोते म्हणाले, “अलीकडे विद्यार्थ्यांना कोणताही कला प्रकार शिकला, तर परीक्षेत त्याचे १५ ते २० गुण दिले जात आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी कलेकडे वळत असून, भरतनाट्यम, कथक शिकत आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर कला जोपासल्यामुळे त्याचा सर्वांगीण विकास होतो. त्यामुळे कलेला महत्व देणे गरजेचे आहे. पेरियार रामास्वामी आणि भाऊराव पाटील यांचे कार्य आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.”

डॉ. विकास आबनावे म्हणाले, “रामास्वामी नायकन यांनी दक्षिणेतील अनिष्ट प्रथांविरोधात लढा उभारला. त्यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने तरुणांना सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळेल. भाऊराव पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात उभारलेले काम अतुलनीय आहे. काम करुन शिका, असा संदेश देत कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून समाज घडविला. त्यांनी मूलभूत शिक्षण देऊन समाजाला शहाणे केले. आज मात्र शिक्षणाचे बाजारीकरण होत आहे, हे दुर्दैव आहे. पेरीयार रामास्वामी आणि भाऊराव पाटील दोघेही शापित गंधर्व होते.”

अॅड. आशुतोष रानडे म्हणाले, “शिक्षणाबरोबर काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कष्टाची जाणीव होते, तसेच अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांनी इतर गोष्टीचाही आनंद घेतला पाहिजे. नाट्य, चित्रपट किंवा छंद, आवडीनिवडी अश्या गोष्टीही जपल्या पाहिजेत. अभ्यास एक अभ्यास अशा गोष्टी न करता इतर गोष्टींनाही आयुष्यात महत्त्व देणे गरजेचे आहे. कमवा आणि शिका हाच खरा आयुष्य घडविण्याचा मार्ग आहे.”

सामाजिक, कृषी, शिक्षण आदी क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम केलेल्या मान्यवरांचा सन्मान या दोन्ही पुरस्कारांनी करण्यात आला. वैशाली भोसले यांनी प्रास्ताविक केले. भैरवनाथ कानडे यांनी सूत्रसंचालन केले. नितीन भोसले यांनी आभार मानले.

प्रियांका याच काँग्रेस अध्यक्षपदाच्या सर्वोत्तम उमेदवार: थरूर

0

नवी दिल्ली: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींमध्ये नैसर्गिक करिश्मा आहे. त्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या सर्वोत्तम उमेदवार ठरतील, असं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये आता प्रियांका गांधींकडे पक्षाची धुरा देण्याची चर्चा जोर धरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शशी थरुर यांनी यावेळी तरुण चेहराच काँग्रेसचा अध्यक्ष असावा या पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या मताशी सहमतीही दर्शवली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर अध्यक्षपदाचा उमेदवार कोण हे अद्यापही ठरले नाही. ही परिस्थिती पक्षासाठी घातक आहे, असं थरूर यांनी स्पष्ट केलंय. काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची घोषणा होईल तेव्हा प्रियांका गांधी अध्यक्षपदासाठी त्यांचं नाव पुढे करतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केलीय. मात्र प्रियांका यांनी निवडणूक लढवावी वा लढवू नये हा निर्णय गांधी घराण्याने घ्यायचा आहे, असं सांगतानाच प्रियांका गांधी यांच्यात नैसर्गिक करिश्मा आहे. त्यामुळेच त्यांची तुलना इंदिरा गांधींसोबत केली जाते. त्या अध्यक्षा झाल्यास मतदार आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत केलं जाईल आणि हे सर्वजण त्यांच्या नेतृत्वात काम करतील. प्रियांका गांधींना राजकीय अनुभव आहे, त्या प्रभावशाली व्यक्तीही आहेत आणि लोकसभा निवडणुकीत त्यांनी उत्तर प्रदेशात प्रत्यक्ष कामही केलं आहे, याकडेही थरूर यांनी लक्ष वेधलं. तसंच नव्या अध्यक्षांसमोर दुहेरी आव्हाने असतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.

३ नावांवर एकमत केवळ खडकवासल्यात-राष्ट्रवादी च्या मुलाखती

0

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून खडकवासला विधानसभा मतदारसंघ लढविण्यासाठी 8 जण इच्छूक होते. मात्र, प्रदेशाध्यक्षांनी ऐन मुलाखती वेळी सूचना करत मतदारसंघातून केवळ तीनच जणांची नावे सर्वानुमते देण्याची सूचना केल्याने या मतदारसंघातील इतर पाच इच्छूकांची चांगलीच कोंडी झाली. त्यानंतर सर्वानुमते, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, महापालिकेचे विरोधीपक्ष नेते दिलीप बराटे आणि नगरसेवक सचिन दोडके यांची नावे देण्यात आली, तसेच या सर्वांनी मुलाखतीही दिल्या. मात्र, इतर सात मतदारसंघातील इच्छूकांचे एकमत न झाल्याने त्यां सर्वांनी मुलाखती दिल्या. त्यात माजी महापौर तसेच पक्षाचे पदाधिकारी राहिलेल्या इच्छूकांची संख्या लक्षणीय होती. तर मुलाखती असलेल्या उमेदवारांनीही यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी पुण्यात राष्ट्रवादीच्या आठ विधानसभा मतदारासंघातील इच्छूकांच्या मुलाखती घेतल्या, आमदार विद्या चव्हाण यांच्यासह, शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी या मुलाखती घेतल्या. यावेळी प्रत्येकच मतदारसंघात उमेदवारांची संख्या जास्त असल्याने प्रदेशाध्यक्षांनी प्रत्येक मतदारसंघातील इच्छूकांना एकत्र बसून प्रत्येकी 3 नावे सुचविण्याच्या सूचना केल्या. खडकवासला मतदारसंघतील आठही इच्छूकांच्या मुलाखती झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी यांनी या सर्वांना तुम्ही एकत्र बसून एक नाव निश्‍चित केले तर चांगले होईल तसेच एक नाव निश्‍चित होत नसेल तर तीन नावे निश्‍चित करावी अशा सूचना केल्या. त्यानंतर हे सर्व इच्छूक एकत्र बसून त्यांनी ही तीन नावे निश्‍चित केली.

 

निवडणूक प्रचारात सर्व भाजप कार्यकर्त्यांना सहभागी करून घेण्याच्या सूचना

0

मुंबई दि. 28 (प्रतिनिधी) :  भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव डॉ. सरोज पांडे आणि राष्ट्रीय संघटनेचे सचिव व्ही. सतीश यांनी सर्व खासदार, आमदार, नगरसेवक आणि पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र येऊन विधानसभा निवडणुकीच्या तयारीत सहभागी होण्याचे निर्देश दिले. मुंबई प्रदेश भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी स्मृती भवन दादर येथे प्रथमच कार्यकारी समितीची बैठकी आयोजित केली होती. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारात एकत्र येण्यासाठी पक्षातील सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना संबोधित केले.

यावेळी बोलताना मुंबईचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा म्हणाले की, “ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा यांच्या नेतृत्वात भाजपा हा देशातील सर्वात मोठा आणि बलाढ्य पक्ष बनला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पक्षाला बळकटी मिळाली आहे. आणि म्हणूनच आपण पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्ता संपादन करणार आहोत. परंतु प्रत्येक स्तरावर जबाबदारीने काम केल्यानेच ही सत्ता संपादन करणे शक्य होणार आहे .” असेही त्यांनी सांगितले. या बैठकीत पक्षाच्या महासचिव डॉ. सरोज पांडे यांनी खासदार, आमदार, नगरसेवक आणि जिल्हाध्यक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीत विजयाचे लक्ष्य निश्चित करण्याचा सल्ला दिला. राष्ट्रीय संघटनेचे सचिव व्ही. सतीश म्हणाले की, “पुन्हा एकदा विधानसभा निवडणुका जिंकून पक्षाला सत्तेत आणण्याचा संकल्प पक्षाने घ्यावा. कार्यकारी समितीच्या बैठकीत नवनियुक्त मंत्री आशिष शेलार आणि योगेश सागर तसेच नवनिर्वाचित खासदार मनोज कोटक आणि खासदार गोपाळ शेट्टी यांचे स्वागत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली केले गेले.

भाजपचे सदस्यता अभियान, युवा शक्ती अभियान आणि शक्ती सन्मान अभियान कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला आणि या तीन कार्यक्रमांच्या संचालनाचा तपशील जिल्हास्तरावर घेण्यात आला. त्याच बरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात १ ऑगस्टपासून सुरू होणारी ‘महा जनादेश’ यात्रा यशस्वी करण्यासाठी बूथ स्तरावर संघटना अधिक मजबूत करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीत मुंबईचे सर्व आमदार, नगरसेवक जिल्हाध्यक्ष तसेच मुंबई प्रदेश भाजपा कार्यकारिणीतील सर्व सदस्यांना आणि युवा मोर्चाच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष, उत्तर भारतीय मोर्चा आणि सर्व विभागातील पदाधिकाऱ्यांना या बैठकीत आमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीचे सूत्र संचालन नगरसेवक सुनील यादव यांनी केले तसेच नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

मराठी पञकार परीषदेचे नांदेडला 42 वे अधिवेशन

0

मुंबई — मराठी पञकार परीषदेच्या नांदेड येथे 17 व 18 आॕगस्ट रोजी होणाऱ्या 42 व्या राष्ट्रीय अधिवेशनास पञकार बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थीत राहावे जिल्हाअध्यक्ष यांनी उपस्थीत राहणारे आपेक्षीत पञकाराची संख्या खालील क्रंमाकावर कळवावी असे अवाहन सरचिटणीस अनिल महाजन यांनी केले आहे.
मराठी पञकार परीषदेचे द्विवार्षीक 42 वे राष्ट्रीय अधिवेशन नांदेड जिल्हा पञकार संघाचे संयोजना खाली 17 व 18 आॕगस्ट रोजी मराठी पञकार परीषदेचे मुख्यविश्वस्त पञकाराचे नेते एस एम देशमूख यंचे मार्गदर्शना खाली संपन्न होत असून दोन दिवसा मध्ये भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून राज्या सह गोवा कर्नाटक आशा विवीध राज्यातून मोठ्या संख्येने पञकार बांधव उपस्थीत राहणार आहेत दोन ते अडीच हजार पञकार या अधिवेशनास येतील असा अंदाज आहे .निवासा व भोजन व्यवस्था व्यवस्थीत करता यावी या साठी सर्व जिल्हा व तालूका पञकार संघानी आपल्या जिल्ह्यातून व तालूक्यातून येणाऱ्या पञकाराची संख्या खालील मोबाईल वर संपर्क करून कळवावी जिल्हा निहाय निवास व्यवस्था करण्यात येणार असून येणाऱ्या प्रतीनीधीचे गैरसोय होऊ नये या साठी नांदेड जिल्हा संघाचे पदाधीकारी नियोजन करत आहेत .या व्यवस्था नियोजन बध्द करण्या साठी जिल्हाध्यक्ष यांनी जिल्ह्यातून येणारी संख्या तात्काळ कळवावी संपर्क करण्या साठी सरचिटणीस अनिल महाजन 9922999671 प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रकाश कांबळे 9422873373 नांदेड जिल्हाध्यक्ष प्रदीप नागापूरकर 9422174774 जिल्हा सरचिटणीस सुभाष लोणे 9049060289 या क्रमाकावर तात्काळ संपर्क साधून कळवावी व पञकार बांधवाणी मोठ्य संख्यृने या अधिवेशशनासा उपस्थीत राहवे पञकाराची ताकद एकजूटीने दाखवावी असे आवाहन परीषदेचे सरचिटणीस अनिल महाजन व विभागीय सचिव विजय जोशी यांनी केलेआहे

लोक राष्ट्रवादी का सोडताहेत , पवारांनीच आत्मचिंतन करावे – देवेंद्र फडणवीस

0

पवारांच्या आरोपाला मुख्यमंत्र्यांचे उत्तर
मुंबई- “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकांची राहण्याची इच्छा नाहीये, याचे आत्मचिंतन शरद पवार आणि त्यांच्या पक्षाने करावे.” असा जोरदार टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. त्यासोबतच “विरोधी पक्षाला आमचे आकर्षण आहे, त्यामुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक जण आमच्याकडे येण्यास तयार आहेत, पण त्यातील काही निवडक लोकांना आम्ही पक्षात घेऊ. सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक जण आमच्याकडे येण्यास तयार आहेत. पण यात ज्या लोकांची ईडीची चौकशी सुरु आहे अशा लोकांना आम्ही पक्षात घेणार नाही. तसेच अशा लोकांची आम्हाला गरजही नाही अशी टीका त्यांनी केली.” असे मुख्यमंत्री म्हणाल
“निवडणुका आल्या की सर्वच पक्ष तयारीला लागतात. त्यानुसार विविध पक्षातील नेते पक्षांतर करत असतात. पण काही नेत्यांना पक्षांतर करण्यासाठी भाग पाडले जात आहे. त्यांना ईडी, सीबीआय यासारख्या संस्थांचा वापर करत धमकावले जात आहे. तसेच त्यांच्यावर दडपण आणून राजकीय सत्तेचा गैरवापर केला जातोय अशी टीकाही शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांवर केली होती.”
तसेच, पक्ष सोडण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना धमकावले जात आहे. धमकी देण्यासाठी राज्य बँकेचाही वापर केला जात असल्याचेही खळबळजनक वक्तव्य पवारांनी केले. तसेच संस्था चालकांवर दबाव आणून पक्षांतर करण्यास भाग पाडले जात आहे. विशेष म्हणजे सत्तेचा इतका टोकाचा गैरवापर होताना आतापर्यंत मी पाहिलेला नाही असेही टीका शरद पवारांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली.

पुणे कात्रज परिसरात गांजाची तस्करी -धनंजय जाधव ला अटक

0

पुणे  :- गांजाची तस्करी करण्याच्या आरोपावरून कात्रज परिसरात काल भारती विद्यापीठ पोलिसांनी धनंजय जाधव नावाच्या व्यक्तीला सुमारे साडेसात किलो गांजासह रंगेहात पकडले .

पो उप निरीक्षक सुबराव लाड, पो हवालदार बढे, कुंदन शिंदे, सर्फराज देशमुख, पो नाइक  पवार ,पो. शिपाई . राहुल तांबे, चिचंकर, मंडलीक, अभिजीत जाधव, व रत्नपारखी असे पोलीस मांगडेवाडी, गुजरवाडी भागात खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना मुस्तान हॉटेलच्या जवळ, जाधवनगर येथे आले असता, एक ग्रे रंगाचे जाकीट घातलेला इसम हा त्याच्या पाठीवर काळे रंगाची बॅग घेवुन संशयीत रित्या दिसला. त्या इसमास पोलीसाची चाहुल लागताच तो पोलीसांना पाहुन तो पळु लागल्याने त्याला थोड्याच अतंरावर  त्याचा पाठलाग करुन पकडले. त्याला त्याचे नाव पत्ता विचारले असता ना त्याने त्याचे नाव घंनजय रामा जाधव,वय २५ वर्षे, रा. साळुखे यांच्या भारतनगर येथील खोलीत, निंबाळकरवस्ती, कात्रज पुणे मूळ रा.सिध्दनाथवाडी, ता वाई, जि. सातारा असे सांगितले.त्याच्या बॅग मध्ये काहीतरी संशयास्पद वस्तू असल्याचा संशय आल्याने बॅगची तपासणी केली असता, त्याच्या बॅग मध्ये खाकी रंगाच्या चिकट पटी चिटकविलेले तीन बॉक्स मिळुन आले, तसेच त्याच्या खाली निळ्या रंगाची कापडी लहान आकाराचे पिशवी व त्याच्या आत हिरवा सुका-ओला बोंडासह पाला दिसला, त्याचा वास घेऊन पाहिला असता, गांजाचा वास येऊ लागला.सदरच्या पिशवीमध्ये गजा हा अंमली पदार्थ असल्याचे दिसल्याने लगीच पोलीस निरीक्षक गुन्हे श्री विष्णु ताम्हाणे यांना तपास पथकाने ब त्या ठिकाणी बोलावुन घेवुन त्यांनी खात्री करुन त्यांनीआरोपीच्या ताब्यातुन ०७ किलो ३९६ ग्रॅम वजनाचा गांजा, रेडमी कंपनीचा मोबाईल व रोख पंधराशे रुपये असा एकुण १, लाख ऐकोणिस हजार ४४० रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा तपास पो उप निरीक्षक सुबराव लाड हे करीत आहेत.सदरची कारवाई हि मा.श्री श्रीकांत तरवडे सो अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, मा.श्री सरदेशपांडे सो पोर्न स उप-आयुक्त परि-२ पुणे शहर, माएम एम पाटील सहा.पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे, यांचे मार्गदर्शनाखाली व विष्णु ताम्हाणे पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांच्या दिमतीत तपास पथकाचे अधिकारी पो.उप-निरीक्षक श्री. सुबराव लाड पोलीसहवालदार कृष्णा बढे, कुदंन शिंदे, सराज देशमुख,राहुल तांबे, गणेश चिंचकर, सचिन पवार,महेश मंडलिक, अभिजित जाधव, आणि अभिजित रत्नपारखी यांचे पथकाने कारवाई केलेली आहे.

हे तीन आमदार राष्ट्रवादी सोडून जाणार नाहीत, शरद पवारांना विश्वास

0

पुणे-साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे, अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप आणि श्रीगोंदयाचे आमदार राहुल जगताप हे तिनही आमदार राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाहीत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली. पुण्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले, साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे कालच मला भेटले आणि आपण पक्ष सोडून जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगरचे आमदार संग्राम जगताप आणि श्रीगोंदयाचे आमदार राहुल जगताप यांनीही फोन करून पक्ष सोडणार नसल्याचे सांगितले. माढ्याचे आमदार बबनदाद शिंदे हे मला लवकरच भेटणार आहेत..तर बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे कालच माझ्यासोबत होते असे पवार यांनी स्पष्ट केले.

पवार म्हणाले, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सत्तेचा टोकाचा गैरवापर सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर भाजप दबाव टाकत आहे..अडचणीत सापडलेल्या सहकारी संस्थांना मदत करण्याच्या नावाखाली त्यांच्यावर
भाजप प्रवेशासाठी दबाव टाकला जात आहे. हसन मुश्रीफ यांनी भाजपमध्ये जाण्यास नकार देताच त्यांच्या घरावर ईडी मार्फत छापे टाकले गेले. सत्ताधाऱ्यांकडून ईडी, सीबीआय, एसीबी यांचा वापर लोकप्रतिनिधींनी धमकवण्यासाठी केला जातो. अशाप्रकारे भाजप सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप पवार यांनी केला.

छगन भुजबळ यांनी झोपडपट्टीच्या जागेवर टीडीआर देऊन महाराष्ट्र सदन बांधल्याचा आरोप करत त्यांना अटक केली होती. आता त्याच महाराष्ट्र सदनात भाजपकडून बैठका घेतल्या जात आहेत. सुंदर महाराष्ट्र सदन बांधूनही सरकारने छगन भुजबळ यांना तुरुंगात डांबल्याचा आरोप करत पवारांनी सरकारवर टीका केली.

 

पुणे जिल्हयात ‘हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची’ योजनेची अंमलबजावणी सुरु

0

पुणे – महाराष्ट्रातील महिलांमध्ये उद्योजकता व व्यवसायासंबंधी नवकल्पनांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने ‘हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची’ ही योजना शासनामार्फत सुरु करण्यात आली आहे. या योजनेमध्ये भाग घेण्यास राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (NRLM), राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियान (NULM), महिला आर्थीक विकास महामंडळ (MAVIM) व उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान (MSRLM) या अंतर्गत तयार केलेले पंचसूत्रीचे पालन करणारे ग्रामीण व शहरी भागातील महिला बचत गट पात्र असतील. या संधीचा लाभ सर्व महिला बचतगटांनी घ्यावा, असे आवाहन सहायक संचालक अनुपमा पवार यांनी केले आहे.

पुणे जिल्हयामध्ये या योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली असून पहिल्या टप्प्यांतर्गत जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये माहिती सत्रांद्वारे स्पर्धेविषयी माहिती देण्यात येत आहे. या योजनेचा दुसरा टप्पा हा तालुकास्तरीय कल्पना सादरीकरणाचा असून यामध्ये विजयी होणा-या बचतगटांना प्रत्येकी रु.52 हजार 500 अर्थसहाय्य (रु.2 हजार 500 भत्त्यासह) उपलब्ध होणार आहे. तसेच जिल्हास्तरावरील कल्पना सादरीकरण सत्रात सहभागी होण्यास तालुकास्तरावरील विजयी बचतगट पात्र असणार आहेत.

जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये सादरीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हास्तरावर कल्पना सादरीकरण आयोजित करण्यात येईल व त्याद्वारे विजयी होणा-या बचतगटांना प्रत्येकी रुपये 2 लाख अर्थसहाय्य व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. तरी, या संधीचा लाभ सर्व महिला बचतगटांनी घ्यावा, असेही पुणे कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता विभागाच्या सहायक संचालक तथा हिरकणी योजनेच्या नोडल अधीकारी अनुपमा पवार यांनी कळविले आहे.