बंद ठेवलेले बिंदुमाधव ठाकरे रुग्णालय सुरु करा -आम आदमी पक्षाची निदर्शने
दातृत्व हेच खरे कर्तुत्व : सई ताम्हणकर
कॅटलिस्ट फाऊंडेशनतर्फे झालेल्या नेत्र तपासणी शिबिरास उदंड प्रतिसाद
पुणे . :- “समाजाप्रती देण्याची भावना जपणारी आपली महान भारतीय संस्कृती आहे. पैसा आणि प्रसिद्धीने माणूस कितीही मोठा झाला तरी त्याच्यातील दातृत्वाची भावना हीच त्याचे खरे कर्तुत्व सिद्ध करते. अशा दानशूर आणि दायित्व जपणाऱ्या कर्तुत्ववान व्यक्तीमत्वांच्या उपक्रमास प्रोत्साहन देणे हे मी माझे कर्तव्य समजते. ” अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर यांनी भावना व्यक्त केल्या. मातोश्री हिराबाई माने यांच्या स्मरणार्थ कॅटलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांनी व्हिजन नेक्स्ट फाउंडेशनचे संचालक डॉ. अंबरीश दरक यांच्या सहयोगाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मधुमेह व नेत्र तपासणी शिबीर एकूण तीन केंद्रात भरवले होते.या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी आमदार विजय काळे, भाजप सरचिटणीस उज्वल केसकर, शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर, नगरसेवकअविनाश साळवे, उमेश गायकवाड, विजय शेवाळे, नगरसेवक प्रकाश ढोरे, आदित्य माळवे, डॉ. सुरेंद्र पाटील, माजी नगरसेवक श्रीकांत पाटील, बनी दालमिया, किरण साळी, विनोद सातव आदी उपस्थित होते. दळवी हॉस्पिटल (शिवाजीनगर), राजीव गांधी रुग्णालय (येरवडा) आणि व्हिजन नेक्स्ट फाउंडेशन आय हॉस्पिटल (बोपोडी) अशा एकूण तीन केंद्रावर हे शिबीर पार पडले. या शिबिरात सुमारे ५०० हून अधिक गरजू रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली.
यावेळी माने म्हणाले की, समाजाकडून आपण खूप काही घेतो, मात्र आपल्यात देण्याची प्रवृत्ती वाढली पाहिजे. ‘मरावे परी, अवयव रुपी उरावे’ ही मानसिकता समाजात रुजली पाहिजे. आज असंख्य रुग्णांना डोळे ,मूत्रपिंड, यकृत यांसारख्या अवयवांची गरज आहे. परंतु, लोकांच्यामध्ये आजही अवयवदानाबद्दल जागरुकता नाही. या परिस्थितीत बदल झाला पाहिजे. या भावनेने आईचे मरणोत्तर नेत्रदान केले, स्वत:चे देहदान केले. आपल्या कार्यातून गरजू रुग्णांना फायदा व्हावा, या उद्देशाने घेतलेले शिबीर डॉ. दरक यांच्या अमूल्य सहकार्यामुळे यशस्वी झाले. आजच्या तपासणीनंतर ज्या रुग्णांमध्ये मोतीबिंदू आढळला आहे, त्यांच्यावर आम्ही मोफत शस्त्रक्रिया करणार आहोत.
दरक हे स्वत: सुप्रसिद्ध नेत्रशल्यचिकित्सक आहेत. ८५ हजारांहून अधिक शस्त्रक्रिया करून त्यांनी वेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे. भविष्यातही कॅटलिस्ट फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही यासारखे लोकाभिमुख उपक्रम राबवणार आहोत.
दरक म्हणाले की, स्वत:चे वैयक्तिक रुग्णालय बंद करून त्याहून अधिक समर्पकपणे व्हीजन नेक्स्ट फाउंडेशनच्या माध्यमातून नेत्र रुग्णांच्या सेवेचा वसा हाती घेतला. नेत्रदानाची चळवळ अधिक व्यापक झाली पाहिजे, हे ओळखून सुनील माने यांनी या कार्याला हातभार लावला. गरजू नेत्र रुग्णांसाठी त्यांनी राबवलेला हा उपक्रम स्तुत्य असून मलाही याचा भाग होता आले याचे समाधान वाटते.
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने ‘कॅटलिस्ट फाऊंडेशनची’ स्थापना झाली असून खासदार गिरीश बापट हे या संस्थेचे पालक आहेत. लष्करी सेवेतून निवृत्त झालेले लेफ्टनंट जनरल डॉ. डी.बी. शेकटकर या संस्थेचे मेंटॉर आहेत. अण्णाभाऊ साठे यांच्यावरील पहिली वेबसाईट, सांगली पूरग्रस्तांना मदत, हृद्यरोगाची प्राथमिक लक्षणे याविषयी तज्ज्ञांचे व्याख्यान यांसारखे समाजपयोगी उपक्रम फाउंडेशनने राबवले आहेत.
नेत्रदानाच्या जनजागृतीसाठी पुढाकार : ताम्हणकर
रक्तदानाइतकेच नेत्रदान ही श्रेष्ठदान आहे. तुम्ही कमावलेला पैसा, संपत्ती नश्वर आहे परंतु, तुमच्या पश्चातही तुमच्या दृष्टीतून ही सुंदर सृष्टी कोणाला तरी अनुभवता येते, ही भावना चिरकाल टिकणारी आहे. सुनील माने आणि डॉ. दरक यांनी राबलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून त्यांच्या प्रेरणेतून मी ही नेत्रदानाचा निर्णय घेतला आहे. भविष्यात या कार्यात माझा सक्रीय सहभाग असेल, असे सई ताम्हणकर यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादी लबाड आणि फसविणारा पक्ष -अखेर हर्षवर्धन पाटलांनी चढविला हल्ला
इंदापूर- . “लबाड राष्ट्रवादीने शब्द देऊन फसवलं, आघाडीचा धर्म पाळूनही राष्ट्रवादीने अन्यायच केला. आमच्या सभ्यपणाचा फायदा राष्ट्रवादीने घेतला”, अशा शब्दात हर्षवर्धन पाटलांनी मनातली खदखद व्यक्त केली आहे. दहा तारखेनंतर ते पक्षांतराची घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश जवळ-जवळ निश्चित मानला जातोय. कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी त्यांनी इंदापूरमध्ये मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीवर त्यांनी सडकून टीका केली
“सगळ्या जनतेच्या ज्या भावना आहेत, त्याच माझ्या भावना आहेत. तुमच्या भावनांचा आदर केला जाईल. ज्याचं जळतं त्याला कळतं, म्हणून आता पुढचा निर्णय घ्यावा लागेल”, असे म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी पक्षांतराचे अप्रत्यक्ष संकेत दिले. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीसाठी प्रामाणिकपणे काम केले, पण काय मिळालं, असा सवाल त्यांनी व्यथित होऊन विचारला. मेळाव्यापूर्वी हर्षवर्धन पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली होती.
“लोकसभेच्या वेळी हर्षवर्धन पाटील हे सुप्रिया सुळेचे काम करतील मात्र तीन महिन्यांनंतर विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांचे काम त्यांना करावे लागेल, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पुण्यात सुप्रिया सुळे यांना बजावलं होतं, मग त्याचं काय झालं?” असा सवाल पाटील यांनी विचारला. “तुम्ही जर काँग्रेसला जागा सोडणार होतात, मग शिवस्वराज्य यात्रा इंदापुरात का आली? दौऱ्यात इंदापूर नव्हते मग कसे का आलात? आता यापुढे लबाड माणसांसाठी काम करायचं नाही”, असेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले.
“माझ्या पुस्तक प्रकाशनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन तासांचा वेळ दिला, पीएला सांगून कॅबिनेट बैठक रद्द करून प्रकाशनाला आले, एकीकडे शब्द पाळणारे हे लोक तर दुसरीकडे दगा देणारे”, असे म्हणत हर्षवर्धन पाटलांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. यावेळी, हर्षवर्धन पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशा जोरदार घोषणा दिल्या जात होत्या.
तारणाऱ्यांना डावलण्याचं राजकारण आणि त्यामुळेच सेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न …पुणे: विधानसभा
वॉटर लिली’या ‘इटीव्ही’चे नौवहन मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते जलावतरण
मुंबई-इमरजन्सी टोईंग वेसल (इटीव्ही) म्हणजेच आपतकाळामध्ये जहाजांच्या मदतीसाठी म्हणून तैनात कराव्या लागणा-या मोठ्या नौवहनाचे जलावतरण आज केंद्रीय नौवहन मंत्री (स्वतंत्र कार्यभार) मनसुख मांडवीय यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. या नौवहनाचे ‘वॉटर लिली’ असे नामकरण केले आहे. नौवहन महासंचालनालय आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वॉटर लिली’ची निर्मिती करण्यात आली आहे. दोन्ही संस्थांनी पाच वर्षांसाठी हा प्रकल्प हाती घेतला आहे.
सागरामध्ये हवामानामुळे काही अडचण निर्माण झाल्यास जहाजांना मदत करण्यासाठी अशा प्रकारच्या ‘इटीव्ही’ला तैनात करण्याचे कार्य भारत सरकारच्या वतीने 2011 पासून नौवहन महासंचालनायलाच्या मार्फत केले जाते.
यावर्षी नौवहन संचालनायाच्या वतीने इटीव्हीने सातत्याने केलेल्या कार्यपद्धतीच्या आधारे संपूर्ण वर्षभर अशी मदतीची सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता आगामी पाच वर्षे मुंबई, आणि चेन्नई या बंदरामध्ये वर्षभरासाठी ‘इटीव्ही’चा वापर करण्यात येणार आहे. इटीव्हीच्या तैनातीसाठी ‘टग’ भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
कलम ३७० हटवल्याने दहशतवाद बंद होईल – एम. एस. बिट्टा
पुणे फेस्टिव्हलमध्ये ‘रामायण बॅले’ सादर
पुणे -पुणे फेस्टिव्हल अंतर्गत आज दि. ३ सप्टेंबर रोजी ६.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘रामायण बॅले’ हा कार्यक्रम सादर झाला. डॉ. शशिकला रवी आणि त्यांचे विद्यार्थी यांनी भरतनाट्यम् बॅलेच्या माध्यमातून प्रभू रामाची कथा ‘रामायण’ सादर केली. याची संकल्पना आणि नृत्यदिग्दर्शन डॉ शशिकला रवी यांची होती. या सादरीकरणासाठी महाराजा स्वाती तिरुनाल यांची रचना ‘भावयामी रघुराम’ जी रागमालिका आणि रूपक तालामध्ये होती. ही गाणी संस्कृतमध्ये होती आणि समजण्यास सुलभ होती.
रामायणातील विविध प्रसंग, जसे राक्षकांचा विनाश करण्यासाठी विश्वामित्र अयोध्येस येऊन प्रभू रामास निमंत्रण देतात, सीतेचे स्वयंवर, श्रीरामाचा वनवास, भरत यांची चित्रकूटात भेट, पंचवटीतील शुर्पणखेशी सामना, रावणाकडून सीतेचे अपहरण, श्रीरामांची हनुमान व सुग्रीवाशी मैत्री, वालीची हत्या, समुद्रावर पूल बांधणे, रावणाचा मृत्यू, सीतेची अग्नी परिक्षा आणि श्रीरामाचा पट्टाभिषेक हे प्रसंग सादर केले गेले.
संगीतकार होते – एन.एन. शिवप्रसाद, मृदंगम – एस शंकरनारायणन, व्हायोलिन – अनंतरमन रवी, आणि नट्टुवंगम – कार्तिका प्रसाद यांनी साथ संगत केली. डॉ.शशिकला रवी यांच्यासमवेत कार्तिका प्रसाद, रिया थॉमस, दक्षता जोशी, अनु मेनन आणि दक्षा पाठक यांनी नृत्याविष्कार सादर केले. या कार्यक्रमास प्रेक्षकांनी मोठा प्रतीसाद दिला.
याप्रसंगी पुणे फेस्टिव्हलतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख मोहन टिल्लू, उगवते तारे आणि इंद्रधनुचे संयोजक रवींद्र दुर्वे, बालगंधर्व रंगमंदिराचे पुणे फेस्टिव्हलचे समन्वयक श्रीकांत कांबळे आणि रवी चौधरी यांचा हस्ते कलाकारांचे सत्कार करण्यात आले.
पुण्यातले गणपती एक चित्र झलक(व्हिडीओ)
पुणे- काल पुण्यात मोठ्या भक्तिभावाने गणराजाचे आगमन झाल्यानंतर आज विविध मंडळांची देखाव्यासाठी अंतिम लगबग सुरु होती तर प्रमुख गणपतींच्या दर्शनासाठी भाविकांच्या पहिल्या दिवसांपासूनच रांगा दिसू लागल्या होत्या . पुण्यातील फोटोग्राफर सुशील राठोड यांनी माय मराठी साठी पाठविलेली हि काही छायाचित्रे खास आमच्या दर्शकांसाठी …पहा
रोजगार मागणारे नाही तर रोजगार देणारे व्हा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 3 : तरूणांनी केवळ रोजगार न मागता रोजगार निर्मिती करावी यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेंतर्गत मदत मिळेल. यावर्षी या योजनेला पाचशे कोटीची तरतूद केली आहे. योजनेला मिळणारा प्रतिसाद बघता पुढच्या वर्षी एक हजार कोटी किंवा दोन हजार कोटी देण्याची तयारी आहे, कारण यातून मोठ्या प्रमाणात उद्योजक तयार होतील आणि रोजगाराला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
राज्यातील युवा उद्योजकांसाठी स्वयंरोजगारास प्रोत्साहन देणाऱ्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’चा शुभारंभ मुंबईतील वरळी येथील एन.एस.सी.आय. डोम, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडिअम येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री अतुल सावे, उद्योग सचिव तथा विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष पी.अन्बलगन आदी उपस्थित होते.
लघु उद्योजक, अंमलबजावणी यंत्रणा, बॅंकेचे अधिकारी व विविध औद्योगिक संघटना यांचे प्रतिनिधी यांच्यासह सुमारे 2000 युवक-युवती या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते.
उद्योग विभागाने महत्वाकांक्षी योजना मान्य केल्याबद्दल उद्योग विभागाचे आणि योजना, संकल्पना, कार्ययोजना तयार केल्याबद्दल डॉ. हर्षदीप कांबळे यांचे विशेष अभिनंदन करून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, सन 2014 पूर्वीच्या पाच वर्षांत महाराष्ट्राची औद्योगिक क्षेत्रात सातत्याने पिछेहाट होत होती. परंतु गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राने पहिला क्रमांक परत मिळवला आहे. एफडीआय, रोजगार निर्मितीत महाराष्ट्र पहिला आहे. नीती आयोगानेदेखील याची आकडेवारी दिली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक येत आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तरुणाई आहे. या तरुणाईला वर्क फोर्समध्ये परावर्तीत करू शकत नाही, तोपर्यंत देश प्रगती करू शकत नाही. प्रगतीची भारताला संधी मिळालेली आहे. विकसित राष्ट्राकडे वाटचाल करणे शक्य होणार आहे. तरूणांच्या या लोकसंख्येचा फायदा आपल्याला सदैव घेता येणार नाही. 2035 नंतर हा ग्राफ खाली येणार आहे.
महाराष्ट्रात 10 लाख 27 हजार लघुउद्योग मागील पाच वर्षांत सुरू झाले आहे. 59 लाख 42 हजार रोजगार निर्मिती क्षमता आहे. देशात तयार होणाऱ्या एकूण रोजगार निर्मितीपैकी 25 टक्के रोजगार निर्मिती राज्यात झाली आहे. मेक इन इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्रामुळे रोजगार निर्मिती वाढीला चालना मिळाली आहे. यात झालेल्या सामंजस्य करारापैकी कार्यान्वित झालेल्या प्रकल्पांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. आपल्या तरुणांना रोजगार देण्यासाठी चांगल्या योजनेची आवश्यकता होती. त्यामुळे ही योजना आणली आहे. यात प्रशिक्षणाचा महत्वाचा पैलू ठेवला आहे. व्यक्तीला उद्योजक बनवणे आणि त्याद्वारे रोजगार निर्मिती करणे या योजनेचा मुख्य हेतू आहे. बँकांची क्रेडीट गॅरंटी ट्रस्ट स्थापन झाल्याने तारणाची गरज भासणार नाही. या योजनेत बँकाची गुंतवणूक सुरक्षित झाली आहे. सर्वंकष अशी ही योजना झाली आहे. व्याजाचा भार कमी झाल्यास उद्योजक यशस्वी होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले की, नोकऱ्या वाढविण्यासाठी शासन प्रयत्न करते. गुंतवणूक वाढविण्यासाठी सहाय्य देत असते. विदेशी गुंतवणूक वाढावी यासाठी प्रयत्न सुरू असतात. महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत देशात सर्वप्रथम आहे. बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावे घेऊन उद्योजक आणि नोकऱ्या देणाऱ्यांना आम्ही एकत्र आणले. तरीही नोकऱ्या देताना मर्यादा आहे. म्हणून सर्वांनी नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराच्या माध्यमातून इतरांना रोजगार तयार करण्याची गरज ओळखून महाराष्ट्र शासनाने ही योजना तयार केली आहे. उद्योग उभारण्यासाठी उद्योजकांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत.
बँका कर्ज देताना तारण मागतात. तारण ठेवण्याची अट या योजनेतून रद्द केलेली आहे. उद्योजकांच्या कर्जफेडीची हमी आम्ही घेतली आहे. सोप्या सुटसुटीत पद्धतीने विनाअडथळा ही प्रक्रिया पूर्ण होईल. या योजनेसाठी पाचशे कोटींची तरतूद आहे. पहिल्या वर्षी पंधराशे कोटी रुपयांचे वाटप केले जाणार आहे. येत्या पाच वर्षात 10 लाख रोजगार निर्मिती होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
या कार्यक्रमाचे आयोजन सचिव उद्योग तथा विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते. यावेळी योजनेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 1600 उद्योग घटक स्थापन करण्याच्या प्रस्तावांना बॅंकांनी मंजूरी दिली आहे.
हा कार्यक्रम राज्यासाठी महत्वाकांक्षी असून या माध्यमातून राज्यातील युवक-युवतींना स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर बनविण्यासाठी, त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्यातून पुढील पाच वर्षात सुमारे 1 लाख सूक्ष्म व लघु उपक्रम स्थापित होतील व त्या माध्यमातून सुमारे 10 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
शासनाने नुकतेच नवीन औद्योगिक धोरण 2019 जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होण्यासाठी, सुलभ वित्तपुरवठा उपलब्ध करुन स्थानिक तरुणांना स्वयं-रोजगाराकडे आकर्षित करुन सूक्ष्म व लघु उपक्रम स्थापित करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (सीएमईजीपी) योजनेची अंमलबजावणी उद्योग संचालनालय आणि खादी व ग्रामोद्योग मंडळाद्वारे करण्यात येणार आहे.
सेवा क्षेत्रातील प्रकल्पांसाठी रु. 10.00 लाख तसेच उत्पादन क्षेत्रांतील प्रकल्पासाठी रु. 50.00 लाख गुंतवणुकीची मर्यादा असून, शासनाकडून प्रकल्प मंजूरीच्या 15 ते 35 टक्के इतके आर्थिक सहाय्य हे अनुदान स्वरुपात उपलब्ध करण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत प्रकल्पामध्ये लाभार्थीचा सहभाग 5 ते 10 टक्के व बँक कर्ज 60 ते 80 टक्के असून, योजना राष्ट्रीयकृत बँका तसेच खाजगी बँका यांच्या सहकार्याने अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
कृषीपूरक व कृषीवर आधारित उद्योग, उत्पादन उद्योग व सेवा उद्योग प्रकल्प योजने अंतर्गत लाभासाठी पात्र असून, लाभार्थीची वयोमर्यादा 18 ते 45 इतके असून याअंतर्गत महिला, अनुसुचित जाती-जमाती प्रवर्गासाठी 50 वर्ष पर्यंत राहिल. शैक्षणिक पात्रता रू.10 लाख च्या पुढील प्रकल्पांसाठी किमान 7 वी पास व रु.25 लाखाच्या पुढील प्रकल्पांसाठी किमान 10 वी पास असेल.
योजनेअंतर्गत 30 टक्के महिला उद्योजकांसाठी व 20 टक्के उद्दीष्ट अनुसूचित जाती जमातीच्या उद्योजकांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. राज्यातील नव उद्यमींना सूक्ष्म लघु उद्योग सुरु करण्यास सहाय्य व रोजगार निर्मितीस प्रोत्साहन देणारी व व्यापक प्रमाणावर अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे प्रथम क्रमांकाचे राज्य आहे.
सातव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेचे आयोजन
स्पर्धेत क्लबमधील 119 खेळाडू सहभागी
पुणे, दि. 3 सप्टेंबर 2019- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित सातव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यात सिद्धार्थ निवसरकर, तेजस किंजिवडेकर, सिद्धार्थ साठे, तन्मय चोभे, अमित देवधर, आर्या देवधर व केदार नाडगोंडे हे खेळाडू महागडे ठरले आहेत. ही स्पर्धा 4 ते 8 सप्टेंबर 2019 या कालावधीत पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर होणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव आनंद परांजपे आणि क्लबच्या बॅडमिंटन विभागाचे सचिव तन्मय आगाशे यांनी सांगितले की, स्पर्धेचे हे सातवे वर्ष असून स्पर्धेला ट्रूस्पेस यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. स्पर्धेत 15 वर्षाखालील गट, महिला गट, 45 वर्षावरील गट आणि खुला गट अशा विविध गटातून 119 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धकांची निवड लिलाव पध्दतीने करण्यातआली असून 8 संघांमध्ये याची विभागणी करण्यात आली आहे.
या स्पर्धेला पाठिंबा देऊन आम्हाला खूप आनंद झाला आहे. या स्पर्धेद्वारे खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी आम्ही एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ शकलो याचा आम्हाला आनंद असल्याचे ट्रूस्पेसचे मालक आश्विन त्रिमल यांनी सांगितले.
स्पर्धेमध्ये पुरूष खेळाडूंसह महिला व 45 वर्षावरील गटातील प्रत्येकी 3 खेळाडूंचा प्रत्येक संघात समावेश असणे अनिवार्य आहे. प्रत्येक सामन्यासाठी गटानुसार 1 गुण दिला जाणार आहे. ही स्पर्धा साखळी व बाद पध्दतीने होणार असून दोन गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीस पात्र ठरणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक पारितोषिक देण्यात येणार असल्याचे क्लबच्या बॅडमिंटन विभागाचे सचिव तन्मय आगाशे यांनी सांगितले.
या वर्षीच्या स्पर्धेचे वौशिष्ट म्हणजे या वर्षी स्पर्धेत सर्वाधीक 119 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. स्पर्धेतील प्रत्येक स्पर्धकाला खेळता यावे अशा पध्दतीने स्पर्धेचे स्वरूप करण्यात आले आहे. महिला व लहान मुलांचा जास्तीत जास्त सहभाग होण्यावर आमचा भर होता. संघातील प्रत्येक स्पर्धकाने किमान एक सामना खेळल्यास या वर्षी प्रत्येक संघाला शंभर टक्के सहभागासाठी 3 बोनस गुण देण्यात येणार आहेत.
स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स(कुणाल पाटील, आकाश सूर्यवंशी व श्रीतेज दरोडे), फाल्कन्स(रणजित पांडे व दीप्ती सरदेसाई), इम्पेरियल स्वान्स(आदित्य काळे, सारंग लागू व तुषार नगरकर), स्कॅव्हेंजर्स(तन्मय चोभे, नंदन डोंगरे व शताक्षी किणीकर), रिबाउंड ब्लॅक हॉक्स(आलोक तेलंग, सारंग आठवले व ईशान तळवळकर), पेलिकन स्मॅशर्स(विवेक लिमये, सचिन जोशी व सिद्धार्थ साठ्ये), ईगल्स(विनायक बापट, आर्या देवधर व बिपीन चोभे) आणि अर्बन रेवन्स(केदार नाडगोंडे, प्रीती सप्रे व श्रीदत्त शानबाग) हे 8 संघ झुंजणार असल्याचे परांजपे यांनी नमुद केले.
8 संघांची अ व ब अशा दोन गटांमध्ये प्रत्येकी 4 संघ अशी विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये साखळी सामन्यांमध्ये प्रत्येक संघ खेळेल. अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. सुवर्ण खुला दुहेरी, रौप्य खुला दुहेरी, सुवर्ण मिश्र दुहेरी, रौप्य मिश्रदुहेरी,रौप्य खुला दुहेरी, लहान वयोगटातील सामना, सुवर्ण 45 वर्षावरील दुहेरी व सुवर्ण खुला दुहेरी अशा गटांमध्ये सामने होणार आहेत.
स्पर्धेसाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे, यामध्ये तुषार नगरकर, तन्मय आगाशे, अभिषेक ताम्हाणे, सारंग लागू, सिध्दार्थ निवसरकर, बिपिन चोभे, देवेंद्र चितळे, रणजित पांडे, अभिजीत खानविलकर, कपिल खरे यांचा समावेश आहे. या स्पर्धेसाठी स्पर्धा संचालक विवेक श्रॉफ काम पाहणार आहेत.
स्पर्धेतील सहभागी संघांची व संघातील खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे
रिबाउंड ब्लॅक हॉक्स: आलोक तेलंग, सारंग आठवले, राधिका इंगळालीकर, अनया तुळपुळे, जयकांत वैद्य, बाळ कुलकर्णी, नरेंद्र पटवर्धन, अमोल मेहेंदळे, समीर जालन, हर्षल गंद्रे, सिद्धार्थ निवसरकर, अमर श्रॉफ, करण पाटील, विक्रांत पाटील, राहुल गांगल, आशुतोष सोमण, आशिष देसाई;
ब्लेझिंग ग्रिफिन्स: आकाश सूर्यवंशी, कुणाल पाटील, दीपा खरे, राजश्री भावे, राजेंद्र नाखरे, गिरीश करंबेळकर, प्रशांत वैद्य, कर्णा मेहता, प्रशांत कुलकर्णी, प्रथम पारेख, तुषार मेंगाळे, विनीत रुकारी, जयदीप गोखले, हर्षवर्धन आपटे, चिन्मय चिरपुटकर, सुधांशू मेडसीकर, आशय कश्यप;
फाल्कन्स: दीप्ती सरदेसाई, रणजीत पांडे, आरुषी पांडे, अनिल देडगे, आनंद घाटे, निलेश केळकर, निखिल चितळे, राजशेखर करमरकर, मधुर इंगळालीकर, सोहन वर्तक, पराग चोपडा, तन्मय आगाशे, रोहन छाजेड, प्रशांत कृष्णन, अभिषेक ताम्हाणे, मंदार विंझे, राहुल परांजपे, अभय राजगुरू;
इम्पेरियल स्वान्स: आदित्य काळे, तुषार नगरकर, आदिती रोडे, प्रीती फडके, हेमंत पाळंदे, विनायक भिडे, संदीप साठे, विश्वेश कटक्कर, तेजस किंजीवडेकर, ईशान भाले, मिहीर केळकर, विक्रम ओगले, अनिश राणे, केदार देशपांडे, अशिषकुमार राठी, अक्षय ओक, अभिजित गानू;
पेलिकन स्मॅशर्स: सिद्धार्थ साठ्ये, विवेक लिमये, चैत्राली नवरे, भाग्यश्री देशपांडे, सचिन जोशी, दत्ता देशपांडे, नितीन कोणकर, हर्षद बर्वे, प्रथम वाणी, सचिन अभ्यंकर, प्रतीक धर्माधिकारी, अंकुश मोघे, नितल शहा, प्रियदर्शन डुंबरे, समीर जोशी, मिथाली कुलकर्णी, शरयू राव;
स्कॅवेंजर्स: शताक्षी किणीकर, तन्मय चोभे, वृषी फुरिया, विरल देसाई, मनीष शहा, रमण जैन, अभिजित राजवाडे, अतुल बिनिवाले, तन्मय चितळे, मकरंद चितळे, अमोल दामले, अनिश रुईकर, मिहीर विंझे, अमित देवधर, अमेय कुलकर्णी, शुभांकर मेनन, कविता रानडे;
द ईगल्स: आर्या देवधर, बिपीन चोभे, गौरी कुलकर्णी, जय परांजपे, संजय फेरवानी, अविनाश दोशी, कौस्तुभ वाळिंबे, देवेंद्र चितळे, बिपीन देव, तेजस चितळे, पार्थ केळकर, चेतन वोहरा, अनिरुद्ध आपटे, शिवकुमार जावडेकर, अमोल काणे, आयुश गुप्ता, विमल हंसराज;
अर्बन रेवन्स: केदार नाडगोंडे, श्रीदत्त शानबाग, सारा नवरे, प्रांजली नाडगोंडे, विवेक जोशी, देवेंद्र राठी, अनिकेत सहस्त्रबुद्धे, चिन्मय चोभे, संग्राम पाटील, रोहन जमेनिस, सुदर्शन बिहानी, रोहित भालेराव, आनंद शहा, अनिकेत शिंदे, अजिंक्य मुठे, अद्वैत जोशी, गिरीश मुजुमदार.
3१व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये ‘कथक परंपरा’ सादर
पुणे-३१व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत आज दि. ३ सप्टेंबर रोजी सायं ५ वाजता ‘कथक परंपरा’ हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे सादर झाला. यामध्ये नृत्यांगना अबोली अभ्यंकर – थत्ते यांचा मुख्य सहभाग होता. अबोली या ऋजुता सोमण यांच्या ज्येष्ठ शिष्यांपैकी एक आहेत. कथकचे मुघल काळात असलेले रूप व आजचे कथकचे बदललेले रूप हे या प्रस्तुतीकरणामधून सादर केले गेले.
कार्यक्रमाची सुरुवात ‘त्रीदेवी’ स्तुतीने झाली. त्यानंतर कृष्णावर आधारित एक युगल कीर्तन. कथकचे तांत्रिक अंग दर्शवणारा ‘ताल नील’ देखील प्रस्तुत केले गेले. कथक मधील अनोखा ‘चैलू चतरंग’ प्रस्तुत केला ज्यामध्ये प्रियकराला भेटण्यासाठी आतुर असलेल्या नायिकेच्या अवस्थांचे वर्णन केले आहे. कार्यक्रमाची सांगता ‘तीश्र-चतुश्र’ नावाच्या विशिष्ठ प्रस्तुतीने झाली. यामध्ये अबोली यांना त्यांच्या गुरुभगिनी सानिका देवधर, पूर्वा देशपांडे, तुलसी कुलकर्णी यांनी साथ दिली, त्याच बरोबर ऋजुता सोमण कल्चरल अकॅडमीच्या सानिका जोशी, ईशानी अभ्यंकर, रेवा दिवेकर आणि श्रेया खाडिलकर यांचाही सहभाग होता.
याप्रसंगी पुणे फेस्टिव्हलतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख मोहन टिल्लू, उगवते तारे आणि इंद्रधनुचे संयोजक रवींद्र दुर्वे आणि बालगंधर्व रंगमंदिराचे पुणे फेस्टिव्हलचे समन्वयक श्रीकांत कांबळे यांचा हस्ते कलाकारांचे सत्कार करण्यात आले.
कॅटलिस्ट फाऊंडेशनतर्फे मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर
पुणे : ता. ३: कॅटलिस्ट फाऊंडेशन, भारतीय जनता पक्ष आणि व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, उद्या बुधवारी (४ सप्टेंबर) रोजी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरात गरजू रुग्णांसाठी मोफत मधुमेह व नेत्र तपासणी केली जाणार आहे. बोपोडी येथील व्हिजन नेक्स्ट फाउंडेशन, आय हॉस्पिटल येथे सकाळी ९.३० वाजता भाजप शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ व सिनेअभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या विशेष उपस्थितीत या शिबिराचे उदघाटन होणार आहे, अशी माहिती कॅटलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
मातोश्री हिराबाई माने यांच्या स्मरणार्थ हे शिबीर घेण्यात येत असून दळवी हॉस्पिटल (शिवाजीनगर), राजीव गांधी रुग्णालय(येरवडा) आणि व्हिजन नेक्स्ट फाउंडेशन आय हॉस्पिटल (बोपोडी) येथे सकाळी ९ ते ६ या वेळेत हे शिबीर होईल. शिबिरात सहभागी होण्यासाठी संबंधितांकडे आधार कार्ड सोबत असणे आवश्यक असेल. या शिबिरात करण्यात आलेल्या नेत्र तपासणीनंतर ज्या रुग्णांमध्ये मोतीबिंदू आढळेल, त्यांच्यावर तज्ञ नेत्रशल्यचिकित्सकांमार्फत मोफत शस्त्रक्रिया केली जाईल.
दृष्टी कमी होण्याच्या पाठीमागे मोतीबंदू हे एक कारण आहे. वयाच्या ६० व्या वर्षानंतर बहुतांशी लोकांना मोतीबिंदू आढळतो. चष्मा किंवा औषधाने हा आजार बरा होत नाही. यासाठी शस्त्रक्रिया हाच पर्याय आहे. डोळ्यांसबंधित आजाराकडे अनेकदा कानाडोळा केला जातो. आर्थिक परिस्थितीही देखील यास अनेकदा कारणीभूत असते. दुर्देवाने, समाजातही या विषयी म्हणावी, तशी जनजागृती होताना दिसत नाही म्हणून आम्ही हे शिबीर भरवत असल्याचेही माने यांनी नमूद केले आहे.
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने ‘कॅटलिस्ट फाऊंडेशनची’ स्थापना झाली असून खासदार गिरीश बापट हे या संस्थेचे पालक आहेत. लष्करी सेवेतून निवृत्त झालेले लेफ्टनंट जनरल डॉ. डी.बी. शेकटकर या संस्थेचे मेंटॉर आहेत. अण्णाभाऊ साठे यांच्यावरील पहिली वेबसाईट, सांगली पूरग्रस्तांना मदत, हृद्यारोगाची प्राथमिक लक्षणे याविषयी तज्ज्ञांचे व्याख्यान यांसारखे समाजपयोगी उपक्रम फाउंडेशनने राबवले आहेत.
ग्रामीण भागातील पाणी आणण्याचे कष्ट वाचविण्यासाठी ‘नीर चक्र ‘ चे वितरण !
पीवायसी बुद्धिबळ लीग 2019 स्पर्धेत गोल्डन किंग व 7 नाईट्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत
पुणे, 3 सप्टेंबर 2019- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित पीवायसी बुद्धिबळ लीग स्पर्धेत गोल्डन किंग, 7नाईट्स या संघांनी आपापल्या गटात अव्वल स्थान कायम राखत अंतिम फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत राउंड रॉबिन फेरीत निखिल चितळे, तन्मय चितळे, शुभांकर मेनन आणि सारंग उर्धवर्षे यांनी केलेल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर 7 नाईट्स संघाने किंग्ज 64 संघाचा 4-2 असा पराभव केला. 7 नाईट्स संघाने राउंड रॉबिन फेरीत 4 विजय, 1 पराभवासह 23.5 गुणांसह अव्वल क्रमांक पटकावत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर, गोल्डन किंग व वाडेश्वर विझार्डस यांच्यातील सामना 3-3 असा बरोबरीत सुटला. गोल्डन किंग संघाने 3 विजय व 1 बरोबरीसह 20.5 गुण पटकावत अंतिम फेरीत धडक मारली.
अन्य लढतीत द बिशप्स चेक संघाने गोल्डफिल्ड ट्रायडेंट्स संघाचा 4-2 असा पराभव करून विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: राउंड रॉबिन फेरी:
गोल्डन किंग बरोबरी वि.वाडेश्वर विझार्डस 3-3(हेमंत उर्धवर्षे वि.वि.आशिष राठी 1-0; प्रियदर्शन डुंबरे पराभूत वि. अक्षय साठ्ये 0-1; अजिंक्य जोशी वि.वि.अमोल मेहेंदळे 1-0; निरंजन गोडबोले वि.वि.रोनित जोशी 1-0; अर्णव कुंटे पराभूत वि.कौस्तुभ वाळिंबे 0-1; अभिषेक देशपांडे पराभूत वि.कुणाल भुरट 0-1);
किंग्ज 64 पराभूत 7 नाईट्स 2-4(राजन जोशी पराभूत वि. निखिल चितळे 0-1; जय केळकर पराभूत वि.तन्मय चितळे 0-1; आदित्य लाखे वि.वि.आदित्य भट 1-0; अद्वैत जोशी पराभूत वि.शुभांकर मेनन 0-1; रोहीन लागू पराभूत वि. सारंग उर्धवर्षे 0-1; राघव बर्वे वि.वि.विजय देशपांडे 1-0);
गोल्डफिल्ड ट्रायडेंट्स पराभूत वि.द बिशप्स चेक 2-4(अमेय कुलकर्णी पराभूत वि.अश्विन त्रिमल 0-1; अमोद प्रधान पराभूत वि. चारू साठे 0-1; राजशेखर करमरकर पराभूत वि. अभिषेक गोडबोले 0-1; ईशान लागू पराभूत वि. किरण खरे 0-1; विजय ओगळे वि.वि.असिम देवगांवकर 1-0; पराग चोपडा वि.वि.केतन रावल 1-0).
हे भाजपवाले ‘डबल ढोलकी ‘ -अमित शहांच्या वक्तव्याचा समाचार घेतला पवारांच्या नातवानं
पुणे: ‘गरज पडली की बारामतीत यायचं. साहेबांचं कौतुक करायचं. सल्ला घ्यायचा आणि निवडणूक आली की विचारायचं पवार साहेबांनी काय केले? दोन्हीकडून वाजणाऱ्या ढोलासारखं राष्ट्रवादीच्या विरोधकांचं राजकारण सुरू आहे. पण आता बस्स झालं,’ असा संताप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
रविवारी सोलापुरात भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा भाजप प्रवेश पार पडला. यावेळी अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवार 15 वर्ष सत्तेत असताना तुम्हा महाराष्ट्रासाठी काय केलं? असा सवाल अमित शाह यांनी विचारला होता. यावर शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी अमित शहांचा समाचार घेतला.
आपल्या फेसबुक पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात…
साहेबांचं राजकारण म्हणजे कुणीही उठावं आणि बोट दाखवावं असं निश्चितच नाही. गेल्या ५० वर्षात तीन पिढ्यांनी पाहिलेलं हे राजकारण आहे. साहेबांमुळे ज्याने शेतीतून चार पैसै कमावले त्यांच्या मुलाने तालुक्याच्या ठिकाणी चांगले शिक्षण घेवून नोकरी केली आणि त्याचा नातू आज IT कंपनीत नोकरी करु शकतो. शेती पासून ते IT पार्क उभा करण्यापर्यन्तची हि शृंखला आहे.
महिलांना समान संधी निर्माण करण्यापासून ते उपेक्षित व दिनदुबळ्या लोकांच्या पाठीमागे उभा राहण्याचा हा प्रवास आहे. प्रसंगी राजकारणाची तडजोड न करता साहेबांनी वंचित व अल्पसंख्याक समाजासाठी घेतलेले निर्णय उभा महाराष्ट्र जाणतो. जातीपाती, धर्माधर्मात भांडण लावणारा नाही तर माणसं जोडणारा हा इतिहास आहे.
सामान्य माणूस साहेबांच्या सोबत आहे तर घरात आमदारकी पासून खासदारकी आलेले नेतेमंडळी कुंपणावरून उड्या मारण्यात आघाडीवर आहेत. मध्यंतरी पिठ बदलण्याची भाषा आपण केली होती, जाड भरडं पीठ पण दूसऱ्या पक्षात गेलं. आत्ता जमिनच नांगरायची वेळ आलेय. चांगली मशागत करुन ठेवुया. एक लक्षात असू द्या. महाराष्ट्राच्या मातीत स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी रुजवेलेली विचारांची व विकासांच्या राजकारणाची श्रृखंला थोरामोठ्यांच्या आशिर्वांदाने आपणा तरुणांनाच पुढे घेवून जावी लागणार असल्याचे रोहित पवार म्हणाले.
