शिक्षकव संस्थाचालक दोघांपुढे आव्हाने आणि समस्या -रसाळे
सॅक्रेड गेम्सच्या कलाकारांना मिळतेय, डिजीटलजगतात सर्वाधिक पसंती
सॅक्रेड गेम्सचा दूसरा सिझन चांगलाच लोकप्रिय झाला. ह्या वेबसीरिजच्या भूमिका आणि त्यांचे संवादसुध्दा लोकांच्या पसंतीस पडले. काही संवाद तर प्रेक्षकांना मुखोद्गतच झाले. सरताज सिंग आणि गणेश गायतोंडे ह्या दोन भूमिकांसोबतच सॅक्रेड गेम्सच्या पहिल्या आणि दुस-या पर्वातल्या इतरही भूमिकांना आणि त्या निभावणा-या कलाकारांना चांगलीच प्रसिध्दी मिळाली.
अमेरिका स्थित मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेंड्स इंडियाने सॅक्रेड गेम्सच्या अभिनेत्यांच्या लोकप्रियतेची एक लिस्ट नुकतीच काढली आहे. त्यानुसार, सरताजच्या भूमिकेत दिसलेल्या सैफ अली खानच्या लोकप्रियतेत सॅक्रेड गेम्सचे दूसरे पर्व रिलीज झाल्यानंतरच्या आठवड्यात (15 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट) 78 गुणांवरून 100 गुणांपर्यंत वाढ झालेली दिसून आलीय. ज्यामूळे सैफ अली खान लोकप्रियतेत प्रथम क्रमांकावर आहे. गणेश गायतोंडे बनलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीचीही लोकप्रियता 55 गुणांवरून 59 गुणांपर्यंत पोहोचलीय. ज्यामूळे नवाज लोकप्रियतेत दूस-या क्रमांकावर पोहोचलाय.
बात्या एबेलमॅन बनलेली कल्कि कोचलिन लोकप्रियतेत तिस-या स्थानावर आहे. सुरूवातीला 39 गुणांवर असलेली कल्कि लोकप्रियतेत 47 गुणांवर पोहोचली आहे. पूर्व आयएसआय प्रमुख शाहिद खानच्या खतरनाक भूमिकेत अभिनेता रणवीर शौरी होता. त्याच्या ह्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाल्याने तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
सीझन 2 मधल्या सर्वाधिक लोकप्रिय ठरलेलियी गुरुजींच्या भूमिकेत दिसलेला प्रतिभावान अभिनेता पंकज त्रिपाठी पाचव्या स्थानावर आहे. तर पहिल्या पर्वात दिसलेली अभिनेत्री राधिका आपटे सहाव्या स्थानावर आहे. पहिल्या सिझननंतर दूस-या पर्वातही राधिका असेल का, ह्याविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. त्यामूळेच सॅक्रेड गेम्स रिलीज होण्याच्या आठवड्यात आणि त्या आठवड्यानंतर राधिकाच्या लोकप्रियतेत वाढ झालेली दिसून आलीय.
सुरवीन चावला उर्फ जोजो, अमृता सुभाष उर्फ केडी यादव मॅडम, एलनाज़ नौरोज़ी उर्फ जोया मिर्ज़ा आणि ल्यूक केनी उर्फ मलकोम ह्या कलाकारांनांही सॅक्रेड गेम्सच्या रिलीजनंतर चांगलीच प्रसिध्दी मिळाली.
स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात, “पहिल्या सहा अभिनेत्यांच्या लोकप्रियतेत सॅक्रेड गेम्सच्या रिलीजच्या सुमारास चांगलीच वाढ झालेली दिसून आलीय. सॅक्रेड गेम्सच्या पहल्या सिझननंतर दूस-या सिझनची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यामुळेच ऑगस्ट महिन्यात ह्या कलाकारांच्या लोकप्रियतेत वाढ झालेली दिसून आलीय. सोशल, व्हायरल न्यूज़, डिजिटल न्यूज़ आणि न्यूज़पेपर्समध्ये ह्या कलाकारांची चांगलीच फॅन फॉलोविंग दिसून आलीय.”
अश्वनी कौल पूढे सांगतात, “आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”
चौथ्या मालाज् रवाईन रन माउंटन मॅरेथॉन 2019 स्पर्धेचे आयोजन
पाचगणी, 10 सप्टेंबर 2019- हॉटेल रवाईन यांच्या तर्फे व मालाज् पुरस्कृत चौथ्या मालाज् रवाईन रन माउंटन मॅरेथॉन 2019 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 21 व 22 सप्टेंबर 2019 या कालावधीत पाचगणी येथे ही मॅरेथॉन स्पर्धा पार पडणार आहे.
पाचगणी टेबललँड येथील संजीवन स्कुल येथुन या स्पर्धेला सुरूवात होईल. विशेष म्हणजे ‘स्टेअर वे टू रन’ या संकल्पने अंतर्गत स्पर्धेत अजय देसाई,सुशील शर्मा, युसुफ देवासवाला, विशाल गुलाटी, श्यामल मोंडल, सतनाम सिंग, अझिझ मास्टर, नरेश ठाकुर, मुरली पिल्ले, प्रिती मस्के हे 10 अल्ट्रा रनर धावपटू पुणे ते पाचगणी अशी 101 किलोमीटरची स्पर्धा पार करणार आहेत. सह्याद्रीपर्वत रांगेतील कात्रज, खंबाटकी व पसरणी अशा तीन घाटरस्त्यावरून ही खडतर धाव हे दहा धावपटू पार करणार आहेत. सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे संस्थापक डॉ. संदिप काटे यांची या स्पर्धेचे संचालक म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. हि स्पर्धा 21 कि.मी(18 वर्षावरील), 10 कि.मी(16 वर्षावरील) आणि 5 कि.मी या प्रकारात पार पडणार आहे.
स्पर्धेसाठी नावनोंदणी आवश्यक असून स्पर्धक आपली नावनोंदणी www.ravinerun.com अथवा www.TownScript.com या संकेत स्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
डॉ भरत वाटवाणी यांना यंदाचा जीवन गौरव पुरस्कार
पुणे: मनोदय मेंटल हेल्थ फोरम, कर्वे समाज सेवा संस्था पुणे च्या वतीने मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस देण्यात येणारा यावर्षीचा प्रतिष्ठेचा जीवन गौरव पुरस्कार २०१९ हा प्रथितयश मनोविकार तज्ञ व रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी काम करीत असलेले तसेच गतवर्षीच्या रँमन मँगसेसे पुरस्काराचे मानकरी डॉ भरत वाटवाणी यांना जाहीर झाला असून दि. ०४ ऑक्टोबर रोजी त्यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती मनोदय मेंटल हेल्थ फोरम, पुणे चे कार्याध्यक्ष प्रा. चेतन दिवाण यांनी दिली.
मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मानसोपचार तज्ञ, मनोसामाजिक कार्यकर्ते, सायकॉलॉजीस्ट व इतर सर्व मानसिक आरोग्य कार्यकर्त्यांच्या विचारांची देवाण- घेवाण व्हावी तसेच मानसिक आरोग्यासंबंधी समाजामध्ये जनजागृती व्हावी यासाठी एकत्र येऊन २०१६ मध्ये पुणे येथील कर्वे समाज सेवा संस्थेच्या पुढाकाराने मनोदय मेंटल हेल्थ फोरम ची स्थापना करण्यात आली असून मानसिक स्वास्थ्यावर आधारित जनजागृतीपर विविध उपक्रम राबविने तसेच मानसिक आरोग्य क्षेत्रामधील कार्यकर्त्यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणे हा या फोरम चा मुख्य उद्देश असून फोरम च्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये अनन्य साधारण कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा दरवर्षी जीवन गौरव पुरस्कार देऊन यथोचित गौरव करण्यात येतो.
जीवन गौरव पुरस्कार्थींची निवड करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीचे सदस्य प्रा. चेतन दिवाण, डॉ मोहन आगाशे, डॉ सुप्रकाश चौधरी, डॉ वासुदेव परळीकर, डॉ महेश ठाकूर व डॉ जयदीप पाटील यांनी एकमताने यावर्षीचा मनाचा जीवन गौरव पुरस्कार हा रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या व आजपर्यंत आठ हजाराहून जास्त मनोरुग्णांचे पुनर्वसन करणाऱ्या डॉ भरत वाटवाणी यांना देण्याचा निर्णय घेतला. डॉ भरत वाटवाणी यांना त्यांच्या याच अतुलनीय कामगिरीबद्दल गतवर्षी मनाच्या रँमन मँगसेसे पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे.
सर्वप्रथम २०१६ मध्ये पुणे येथील जेष्ठ मानसोपचार तज्ञ डॉ उल्हास लुकतुके तसेच २०१७ मध्ये जेष्ठ मानसोपचार तज्ञ व प्रसिद्ध सिने अभिनेते डॉ मोहन आगाशे तसेच गतवर्षी २०१८ मध्ये इंडीयन सायकीयाट्रीक सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉ विद्याधर वाटवे व मानसिक आरोग्यावर आधारित सिनेमा निर्मिती करणाऱ्या सुमित्रा भावे यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.
यावर्षी कर्वे समाज सेवा संस्थेच्या समुपदेशन अभ्यासक्रमाच्या दि ०४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या उद्घाटन समारोह प्रसंगी डॉ भरत वाटवाणी यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल.
डॉ भरत वाटवाणी यांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी मानसिक आरोग्य क्षेत्रामधील व्यक्तींनी उपस्थित राहण्याचे आवाहन मनोदय मेंटल हेल्थ फोरम, पुणे च्या वतीने फोरम चे कार्याध्यक्ष प्रा. चेतन दिवाण मुख्य सल्लागार डॉ मोहन आगाशे व संस्थेचे प्र संचालक डॉ. महेश ठाकूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
‘सप्त चक्रयोग-यु आर मोअर’ मोफत कार्यशाळेचे १४ सप्टेंबरला पुण्यात आयोजन
पुणे : आंतरराष्ट्रीय स्तरावरील चक्रयोग फाउंडेशच्या संस्थापिका नीता सिंघल यांच्या ‘सप्त चक्रयोग – यु आर मोअर’ मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. नीना नाहटा यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले असून, शनिवार, दि. १४ सप्टेंबर २०१९ रोजी दुपारी २ ते ६ या वेळेत सातारा रस्त्यावरील हॉटेल उत्सव, भापकर पेट्रोल पंपासमोर ही कार्यशाळा होणार आहे.
या कार्यशाळेत सप्तचक्र साधना, त्याचा उपयोग, व्यक्तीगत व व्यावसायिक प्रगतीसाठी योगसाधना, योगसाधनेद्वारे चक्रसाधनेचा समतोल आदींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला विशेष उर्जास्त्रोत असलेले रुद्राक्ष व चक्रसाधनेची माहितीपुस्तीका मोफत दिली जाणार आहे. कार्यशाळेदरम्यान नीता सिंघल यांच्याकडून व्यक्तिगत सल्ला घेण्याची संधी मिळणार आहे. शहरातील लोकप्रतिनिधी, डॉक्टर, शिक्षणतज्ज्ञ, उद्योगपती यासह इतर नामवंत व्यक्तीना निमंत्रित करण्यात आहे.
पुण्यात प्रथमच होत असलेल्या या सप्त चक्रयोग कार्यशाळेला अधिकाधिक पुणेकरांनी उपस्थिती लावावी. या कार्यशाळेसाठी प्रवेश विनामूल्य आहे. मात्र, नियोजनासाठी नोंदणी अनिवार्य असून, त्याकरिता व अधिक माहितीसाठी नीना (९८९२०६१०६२) किंवा राजेश सिंग (९९३०२८०२९३) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच www.rudraksh-ratna.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
राज्यभरातील दिव्यांगांसाठी मोफत शिबिर
पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या १०८ च्या डॉक्टर व पायलट यांचा शिंदे यांच्या हस्ते सत्कार
पुणे : अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत करण्यासाठी
सुरू झालेली १०८ ही सेवा महाराष्ट्राची जीवनदायिनी असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री
एकनाथ शिंदे यांनी केले. आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या वतीने पूरग्रस्तांना मदत करणारे १०८ चे डॉक्टर व
पायलट यांचा सत्कार सभारंभ सांगवी येथिल मुख्यालयात नुकताच संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. या वेळी
बीव्हीजीचे उपाध्यक्ष डॉ. दत्ता गायकवाड, महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.
ज्ञानेश्वर शेळके उपस्थित होते.
मंत्री शिंदे पुढे म्हणाले, १०८ या रुग्णवाहिकांमुळे हजारो नागरिकांना मदत झाली आहे. राज्यात ९३७
रुग्णवाहिकांद्वारे २०१४ पासून ऑगस्ट २०१९ पर्यंत ४३ लाख १५ हजार ९ रुग्णांना जीवनदान देण्याचे काम या
सेवेमुळे शक्य झाले आहे.अपघाताच्या ठिकाणावरून कोणीही १०८ या क्रमांकावर फोन केल्यावर तातडीने वैद्यकीय
मदत दिली जाते. ही सेवा नागरिकांसाठी मोफत आहे. आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचारासाठी सुरु करण्यात
आलेल्या रुग्णवाहिकेत राज्यात सुमारे ३३ हजार बाळंतपण सुखरुपपणे पार पडले आहेत. सांगली, कोल्हापूर, सातारा,
पुणे या पूरग्रस्त भागात देखील या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून हजारो नागरिकांना पूरग्रस्त भागातून रुग्णालयांमध्ये
दाखल करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती
राज्यात २०१४ ते ऑगस्ट २०१९ पर्यंत सुमारे 3 लाख ४९ हजार १६ रस्ते अपघातातील जखमींना रुग्णालयात
दाखल करण्याचे काम या रुग्णवाहिकेमुळे शक्य झाले आहे. अपघातानंतर लगेचच आवश्यक ती प्राथमिक उपचार
सेवा मिळाल्याने लाखोंचे प्राण वाचले आहेत. आतापर्यंत विविध १३ प्रकारच्या वैद्यकीय आपत्कालीन स्थितीतील
रुग्णांना वेळेत उपचार मिळाले आहेत. रस्ता अपघात, नैसर्गिक आपत्ती, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला
गोल्डन अवरमध्ये उपचार मिळण्याकरिता अत्याधुनिक रुग्णवाहिकेची ही सेवा सुरु करण्यात आलेली आहे. त्यासाठी
१०८ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला असून राज्यातील लाखो नागरिकांसाठी हा क्रमांक जीवनदायी ठरला आहे.
गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत आलेल्या लाखो कॉल्सच्या माध्यमातून रुग्णांना तातडीची वैद्यकीय उपचाराची
सुविधा या रुग्णवाहिकेने दिली आहे.
डॉ. शेळके म्हणाले, मागील पाच वर्षांत राज्यात सुमारे ३३ हजार ३२८ गर्भवतींचे सुखरुप बाळंतपण करण्यात यश
मिळाले आहे. या सेवेंतर्गत ९३७ रुग्णवाहिका राज्यात चालविल्या जात आहेत. तसेच दोन वर्षांपूर्वी राज्यात
मुंबईमध्ये बाईक ॲम्बुलन्स सुरु करण्यात आली. त्या माध्यमातून आतापर्यंत २२ हजार रुग्णांना सेवा देण्यात आली
आहे. या सेवेचा विस्तार करीत मुंबईमध्ये १८, पालघर, अमरावती येथे प्रत्येकी पाच तर सोलापूर आणि गडचिरोली
येथे प्रत्येकी एक अशा एकूण ३० बाईक ॲम्बुलन्स सध्या कार्यरत आहेत.
पूरग्रस्तांना अशी केली मदत
महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या वतीने सांगली जिल्ह्यात २४ रुग्णवाहिका कार्यरत आहे. कोल्हापूर
जिल्ह्यात ३६ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्याच बरोबर सातारा जिल्ह्यात ३२ रुग्णवाहिका कार्यरत आहेत.
कोल्हापूर, सांगली व साताऱ्याला पुराचा वेढा बसल्याने १० अतिरिक्त रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या होत्या.पूरस्थिती
असताना ५८१९ रुग्णांना आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली होती. यात एका गोंडस बाळाचा सुद्धा जन्म
झाला होता.
‘गंगा भाग्योदय’मध्ये रंगली ‘सुखकर्ता’ मैफल
प्रशांत दामले, मधुरा दातार यांच्या गीतांनी रसिक मंत्रमुग्ध
पुणे. १०: श्री गणेशाच्या आगमनाने सर्वत्र उत्सावाचे आणि उत्साहाचे वातावारण असतानाच ऋतू हिरवा-ऋतू बरवा, धुंदी कळ्यांना-धुंदी फुलांना,जाळीमंदी पिकली करवंद, रन्जीशेही सही यांसारख्या सदाबहार गीतांची सुरेल मैफल रसिक पुणेकरांनी अनुभवली. निमित्त होते गोयल गंगा फाउंडेशनतर्फे झालेल्या सुखकर्ता मैफलीचे. मराठी रंगभूमीचे सुपरस्टार प्रशांत दामले आणि प्रसिद्ध गायिका मधुरा दातार यांनी मराठी हिंदी चित्रपटातील गाजलेली गाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. सिंहगड रस्त्यावरील ‘गंगा भाग्योदय’ ही मैफल पार पडली. यावेळी गोयल गंगा फाउंडेशनचे विश्वस्त अतुल गोयल उपस्थित होते.
‘श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर’ या मंगलमूर्तींच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मराठी-हिंदी चित्रपटातील गाजलेली गाणी सादर करत त्यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. ‘रूप तेरा मस्ताना’ या गाण्याला रसिकांची विशेष वाहवा मिळाली. मधुरा दातार यांच्या ‘पिया बावरी’ या गाण्याला रसिकांची विशेष दाद मिळाली या गाण्याची खास आठवण सांगताना कुलकर्णी म्हणाले कि, एका मैफिलीत मधुराने हे गाणे सादर केले होते तेव्हा स्वत: ह्रदयनाथ मंगेशकर यांनी मधुराच्या गाण्याला कौतुकाची थाप देत मधुराने आशाच्या गाण्याची आठवण करून दिली असे सांगितले. प्रशांत दामले यांनी ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत’ या गाण्यातून रसिक श्रोत्यांची फर्माईश पूर्ण केली. यावेळी केदार परांजपे (की बोर्ड), सचिन जांबेकर (संवादिनी), अजय अत्रे आणि विक्रम भट (तबला) यांनी समर्पक साथसंगत केली.
निवेदक मिलिंद कुलकर्णी यांनी आपल्या खुमासदार शैलीतून प्रशांत दामले यांचा अभिनेते, गायक, निवेदक असा जीवनप्रवास रसिकांसमोर उलगडला. यात ब्रम्हचारी, एका लग्नाची गोष्ट, टूर टूर यांसारख्या नाटकातील अनेक गमतीदार किस्से त्यांनी रसिकांना समोर उलगडले. “माझी जडणघडण, या क्षेत्रातला प्रवासदेखील संघर्षातूनच झाला. पोटाला जोपर्यंत चिमटा बसत नाही तोपर्यंत चांगले काम करता येत नाही. त्यामुळे तुमचे कार्यक्षेत्र कोणतेही असो संघर्ष हा हवाच. मला या क्षेत्रात अनेक दिग्गज, नामवंत कलाकारांच्या सान्निध्यात काम करण्याची संधी प्राप्त झाली. मी जे काही अल्प योगदान या क्षेत्रासाठी देऊ शकलो ते या महान कलाकारांमुळेच.” असे सांगत दामले यांनी आपला प्रवास उलगडला.
‘मिशन विधानसभा 2019’साठी मुख्यमंत्र्यांकडून खासदार काकडेंवर विशेष जबाबदारी?
रेल्वेओव्हरब्रीजसाठी १० वर्षे झगडलो मी अन बोलण्याची संधी मात्र ‘त्या ‘आमदारांना – सेनेच्या माजी खासदाराची खंत (व्हिडीओ)
इंदापूर विधानसभेची जागा मुळात शिवसेनेची – आढळराव पाटील
‘ गंगा बॅले’ शब्द, सूर,नृत्य यांचा अनोखा संगम-हेमामालिनी यांचा पुणे फेस्टिव्हल मध्ये उत्कट नृत्यविष्कार
पुणे- प्रख्यात नृत्यांगना अभिनेत्री हेमामालिनी यांनी पुणे फेस्टिवलमध्ये बॅले सादर करण्याची परंपरा यावर्षीही
कायम राखत त्यांनी सादर केलेल्या ‘गंगा’ या नृत्यनाट्य आविष्काराने रसिकांवर आनंदाची बरसात केली. गंगा
नदीच्या प्रकटण्याची पौराणिक कथा मांडतानाच आजच्या घडीला गंगा नदीसह सर्वच नद्यांचे रक्षण आणि
संवर्धन करण्याचा संदेशही त्यांनी दिला.
भगवान विष्णूंच्या पायातून प्रकट झालेल्या गंगेला पृथ्वीवर मानवकल्याणासाठी येण्याची गरज निर्माण झाली.
ती पुढे निघाल्यावर शंकराने तांडवनृत्य करीत तिला आपल्या जटांमध्ये बंदिस्त केले. तिचा वेग नियंत्रित करून
तिला भूतलावर धाडले. सतयुग, त्रातायुग, द्वापरयुग असा कठीन प्रवास करीत गंगा आता कलियुगात आली
आहे. पण या काळात विविध खलपुरुषांनी गंगेवर आणि त्यायोगे समाजावर अत्याचार केले. गंगेला पुन्हा
स्वर्गात जावेसे वाटले तरी मानव उद्धाराचे कार्य करण्यासाठी ती पृथ्वीवर आहे. तिचे रक्षण करणे हे आपले
काम आहे असा संदेश या बॅलेतून मिळतो.
हेमामालिनी यांच्या नाट्यविहार कलाकेंद्र या संस्थेच्या वतीने या बॅलेची निर्मिती करण्यात आली आहे. अत्यंद
भव्य अशा मंचावर दृकश्राव्य पद्धतीने सादर होणाऱ्या या कार्यक्रमाचे सौंदर्यच आगळेवेगळे होते. भव्यता हा
कार्यक्रमाचा आत्मा आहे तर शब्द, सूर, ताल याचा अनोखा संगम प्रेक्षकांनी अनुभवला. गंगेच्या रुपात
हेमामालिनी प्रकट होतात तो झुला १० फुट उंचीवर आहे. तेथून स्वत:चा तोल सांभाळतानाच एकंदर
कार्यक्रमाचा ताल सांभाळणे हे कठीण काम कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी केले तेव्हा क्षणाक्षणाला आनंदाच्या
लहरी निर्माण होत होत्या.
रंगमंचावर क्षणाक्षणाला बदलणारा प्रसंग सादर करताना राखलेला ताल अप्रतिम होता. गंगेचा प्रवास
वेगवेगळ्या युगात कसा होत होता याचे तपशील निवेदन आणि नृत्य यातून उलगडत होते. त्याला देखण्या
नृत्याची जोड क्षणोक्षणी मिळत होती.
आज हयात नसलेले गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन यांनी शब्द आणि सूर यांचा सुरेख संगम साधला
असून कविता कृष्णमुर्ती आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजांचा सुरेख संगम या कार्यक्रमाची रंगत वाढवतो.
शंकर महादेवन, मिका सिंह, रेखा राव, हेमा देसाई आणि आलाप देसाई यांच्याही आवाजाचा सुंदर उपयोग
करून घेतलेला आहे. रवींद्र जैन यांना आशीत देसाई आणि आलाप देसाई यांची साथ मिळाली आहे. नृत्य
दिग्दर्शन भूषण लखांद्री यांनी प्रत्येक पात्रास प्रकट करणाऱ्या सुंदर स्टेप्स दिल्या आहेत. वेशभूषा तर कमालाच
असून राम गोविंद यांच्या संशोधनातून खरे तपशील रसिकांपुढे येतात. शेखर आसीव यांनीही काही गीते
लिहिली आहेत.
हेमामालिनी यांनी पुणे फेस्टिवलमध्ये सादर केलेला हा २८ वा बॅले होता. हेमा मालिनी सादर केलेली नृत्ये
आणि साधलेला ताल विलोभनीय होता. त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधताना पुणे शहराने आजवर जो स्नेह दिला
त्यामुळे आपण भारावून गेल्याचे सांगितले.
पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्या हस्ते हेमामालिनी आणि अन्य कलाकारांचा सत्कार करण्यात
आला. डॉ. सतीश देसाई यांनी महोत्सवाच्या आजपर्यंतच्या प्रवासाचा आढावा सादर केला. यावेळी सौ. मीरा
कलमाडी, फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, या बॅलेचे कोरीओग्राफर भूषण लखांद्री हे यावेळी उपस्थित
होते.
प्रेक्षकांनी कार्यक्रमाला प्रचंड गर्दी केली होती.
हास्यधारांमध्ये भिजून चिंब झाले पुणेकर रसिक
पुणे-मानवी जीवनातील वास्तवावर भाष्य करतानाच राजकीय सामाजिक परिस्थितीवर
प्रकाशझोत टाकणाऱ्या हास्य कवींनी रसिकांना मनमुराद हसवतानाच विचार करायला लावणारे
संदेशही दिले. पुणे फेस्टिवलमध्ये शनिवारी हिंदी हास्य कवि संमेलन झाले. बाहेर पावसाची
रिमझिम सुरू असतानाच गणेश कला क्रीडा रंगमंच येथे प्रेक्षक हास्य लहरींनी सुखावत होते.
खडकी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्षव सदस्य मनीष आनंद, सदस्य पूजा आनंद
आणि पुणे शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष संगीता तिवारी यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले होते.याप्रसंगी दैनिक आज का आनद चे संपादक श्याम आगरवाल आणि कार्यकारी
संपादक आनंद आगरवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांचा व सर्व कवींचा सत्कार
पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकांत गोयल, डॉ, सतीश देसाई, काका धर्मावत, मोहन टिल्लू
तसेच मनीष आनंद, पूजा आनंद , संगीता तिवारी यांच्या हस्ते करण्यात आला.
नवी दिल्लीच्या तरुण कवयित्री पद्मिनी शर्मा यांच्या सरस्वती वंदनेने कार्यक्रमाचा प्रारंभ
झाला. त्यानंतर मुंबईचे महेश दुबे यांनी हास्य हा मानवी जीवनातील सर्वात सुंदर अनुभव आहे
असे सांगताना
‘हसने वाले स्वर्ग नही जाते है
वह जहॉ होते है वहा स्वर्ग बनाते है’
असे सांगून रसिकांशी संवाद साधला. जीवनात अनेक गोष्टींची कमतरता असते पण अहंकार
बाजूला ठेवला तर जीवन छान जगता येते हे त्यांनी कवितांमधून मांडले.
गजब है मेरा देश महान
यही है प्यारा हिंदुस्तान
खाने को रोटी ना मिले
मगर उडते है मंगलयान ..
या त्यांच्या कवितेने टाळ्या मिळवल्या.
पुण्याच्या मीनाक्षी भालेराव यांनी देशाची संस्कृती त्यांच्या कवितांमधून मांडली
मै राजस्थान की बेटी
मुझे महाराष्ट्र ने पाला
उठाकर चूम लेती हूँ
धरती से थोडीस मिट्टी ..
ही कविता पेश करताना इथल्या परंपरांशी महिलांचे नाते कसे आहे हे सुंदर शब्दांत मांडले.
रतलाम या छोट्याशा गावातून आलेले अशोक सुंदरानी यांनी ब्रेकिंग न्यूज आणि बातम्यांच्या
निवडीवर व्यंगात्मक बोट ठेवले. त्यांच्या निवेदनाने प्रेक्षक सुखावले. मुंबईवर हल्ला करणाऱ्या
कसाबने काय खाल्ले याची बातमी वारंवार येते पण कसाबला पकडताना छातीवर गोळ्या
झेलणाऱ्या तुकाराम ओंबाळेंना आपण विसरतो. संसदेत होणाऱ्या संघर्षाची बातमी होते पण
संसदेवरील हल्ला परतवून लावताना बलिदान करणाऱ्या कमलेशकुमारीला आपण विसरतो, हे
सांगताना त्यांनी रसिकांना विचारात पाडले.
लष्करातून निवृत्त झालेले कर्नल व्ही. पी. सिंह यांच्या जबरदस्त कविता अंगावर रोमांच उभे
करणाऱ्या होत्या.
मै भारत का एक सिपाही
यही मेरा परिचय है
जब तक ये झेंडा उंचा है
तब तक मेरा सर है ..
अये सांगताना त्यांनी शत्रूदेशाला इशाराही दिला. कर्ज काढून शस्त्रे खरेदी करणाऱ्या पाकिस्तानला
उद्देशून ते म्हणाले,
कर्ज से हिम्मत नही मिलती
और बाजारमे इज्जत नही मिलती
त्यांनी भारताची दैदीप्यमान परंपरा आणि इथल्या नामवंतांच्या नावांना एकत्र गुंफवून सादर
केलेल्या प्रदीर्घ कवितेने प्रेक्षकांना अचंबित केले.
महाआलसी या नावाने ओळखल्या जाणारे इटारसीचे राजेंद्र मालवीय यांनी पतीपत्नीच्या
रोमांचकारी आणि तितक्याच विनोदी नात्यावर सादर केलेल्या कवितांनी प्रेक्षकांना लोटपोट केले.
रुखी सुखी रोट देना
उसपर चटणी राब की
परसनेवाला ऐसी देना
जैसे कली गुलाब की..
जीवनाचे वास्तव सांगताना ते म्हणतात की
जब मेरा वक्त था
तब मेरे पास वक्त नही था
आज मेरे पास वक्त है
मगर मेरा वक्त नही है ..
पद्मिनी शर्मा यांनी तरुण प्रेक्षकांशी संवाद साधताना जोरदार टाळ्या मिळवल्या.
गम की घटा को
ऑंख का काजल बना दिया
यादोंको यु समेटा की
आचल बना दिया
जिने को और क्या चाहिये
सुद्को तुम्हारे प्यारमे
पागल बना दिया..
गेली अनेक वर्षे हिंदी हास्य कवी संमेलनाचे सूत्रसंचालन करणारे कवी सुभाष काब्रा यांनी
वेळोवेळी सदर केलेल्या कविता आणि त्यांनी काढलेले चिमटे यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
बाभळीला बोरं झाली की, माकडाला पोरं झाली… ‘अच्छेदिन’;मन की बात’ वांझोटीची थेरं झाली
हास्य, वेदना, सामाजिक प्रबोधन आणि राजकीय विडंबनाने गाजले मराठी कवी संमेलन
पुणे—सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि पक्षांतरावर विडंबनातून केलेल्या कोट्या त्यातून उडालेल्या
हास्यफवाऱ्यांबरोबरच अंतर्मुख करायला लावणारे समाजातील, राजकारणातील वास्तव, स्रीच्या जीवनातील
वास्तव यांवर केलेल्या रचना आणि प्रेम कवितांना श्रोत्यांकडून प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात मिळालेला
उत्स्फूर्त प्रतिसाद, वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी प्रसंगानुरूप कोट्या करीत केलेले सूत्रसंचालन यामुळे
पुणे फेस्टिव्हल अंतर्गत मराठी कविसंमेलन गाजले.
पुणे फेस्टिवलचे माजी मुख्य संयोजक स्व. कृष्णकांत कुदळे यांच्या आठवणींना उजाळा देत आणि त्यांना
श्रद्धांजली अर्पण करून संमेलनाला प्रारंभ झाला.
पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि पुणे फेस्टिवलचे डॉ. सतीश देसाई यांच्या हस्ते पहिला स्व.
कृष्णकांत कुदळे पुरस्कार कवी नितीन देशमुख यांना यावेळी प्रदान करण्यात आला. पाच हजार रुपये रोख,
शाल आणि स्मृतीचित्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी निश्चल आनंद, नीला अहुवालिया, राहुल
वंजारी, काका धर्मावत, दिपाली पांढरे, रवी चौधरी, अतुल गोंजारी, श्रीकांत कांबळे, राज्य महामार्गाचे पोलीस
अधीक्षक मोहिते, श्रीकांत आगस्ते यांच्या हस्ते कवींचा सत्कार करण्यात आला.
रामदास फुटाणे यांच्या प्रारंभीच
ऐकून घेणे आजकालच्या राज्यकर्त्यांना जमत नाही
ऐकून फक्त एकाचेच घेतात, ज्यांना ते पक्षात घेतात
आणि
जेव्हा जेव्हा मन भूतकाळाकडे वळतं
मोगलांनी धर्मांतरे कशी केली, ते पक्षांतरामुळे कळतं..
या सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरील केलेल्या कोटीला प्रेक्षकांनी टाळ्या व शिट्या वाजवून
दाद दिली.
बुडत्या जहाजातून उंदीर उडी मारून बाहेर पडत होता
ते पाहून गणपती पायाजवळच्या उंदराला म्हणाला
दहा दिवसानंतर मला बुडवणार आहे तू का जात नाहीस
उंदीर म्हणाला बुडण्याची भीती नाही, मी पक्षांतरासारखे कसे वागेन
मी बुडेपर्यंत जगेन..
या फुटाणे यांच्या पक्षांतर करणाऱ्या नेत्यांच्या प्रवृत्तीवर मार्मिक टिप्पणी करणाऱ्या रचनेला प्रेक्षकांनी
जोरदार प्रतिसाद देत सभागृह टाळ्यांनी डोक्यावर घेतले.
शिक्रापूर येथील भरत दौंडकर यांनी,
कावळे उडाले स्वामी,
पक्ष श्राद्धाला थांबूनही निवद मिळत नाही,याची कोण देतो हमी,
नवीन पिंडाच्या शोधात कावले उडाले स्वामी…
ही रचना सदर करत येत्या काही वर्षांत सामाजिक, राजकीय बदल आपल्याला कुठे घेवून जाणार आहे यावर
प्रकाश टाकला व रसिकांना अंतर्मुख केले.
अनिल दिखित यांनी, ‘मिश्कील नेत्याची, मिश्कील पत्र’ही रचना सादर केली.
जीव लावतो कमळाबाई आम्ही तुमच्यावर
जागा वाटपावरून बसता आमच्या मानगुटीवर
मी घरात राहू की नको, काय ते पत्रात लिव्हा.
दुसर्यांच्या कार्यकर्त्यांनी भरले आपले घर
भिती वाटते आपलीच पोरं येतील रस्त्यावर
त्यांना दत्तक घेवू का नको, काय ते पत्रात लिव्हा
या त्यांच्या राजकीय कैफियतीला रसिकांनी भरभरून दाद दिली.
प्राचार्य सुरेश शिंदे यांनी
बाभळीला बोरं झाली की, माकडाला पोरं झाली
‘अच्छेदिन’;मन की बात’ वांझोटीची थेरं झाली
‘सबका साथ, सबका विकास’
तहानलेल्याला नाही पाणी, भुकेलेल्याला नाही घास... ही रचना सादर करून प्रेक्षकांना
अंतर्मुख केले.
अशोक थोरात यांनी सा दर केलेल्या
धोधो पाणी वाहत आहे तिच्या घरी
ती न्हात आहे, इथे मनाच्या खिडकीमधून मी सारे काही पाहत आहे
दिसतो तरी असा मी साधा म्हणू नको,
मरतो तुझ्यावरती गं, दादा म्हणू नकोस..
या प्रेम कवितेला प्रेक्षकांनी टाळ्या व शिट्या वाजवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी
निळ्या मखमली पंखाचे, शुभ्र नाजूक नक्षीचे
गाणे गुनगावे तसे फुलपाखरू खिडकीतून आले
गरगरणाऱ्या पंख्याच्या पंख्यांच्या पात्यांनी
त्याचे इवलेशे पंख कापले..
भेलकांडत, गिरक्या घेत.. फुलपाखरू जमिनीवर पडले…..
दुसर्या दिवशी उकीरड्याचे धन झाले.
ही इमारत बांधण्यापूर्वी पुष्कळ फुलपाखरे होती म्हणतात..
ही सामाजिक आशयाची रचना सादर करून प्रेक्षकांना अंतर्मुख केले.
अरुण म्हात्रे यांनी
नुसतेच दिवे जळतात, नुसतेच हात हलतात
नुसत्याच मुक्या भिंतींना सावल्या तुझ्या छळतात
नुसत्याच तुझ्या हाकेने मी पुरात झोकून देतो
नुसताच तुझ्या वेणीला मी मलाच खोचून घेतो
ही प्रेमकविता सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.
नितीन देशमुख यांनी सादर केलेल्या
आज माझे दुख:ही हरवून गेले
दोन अश्रू लोचनी तरळून गेले
ऐकला आवाज मी पाकळ्यांचा
फुल माझ्या एवढे जवळून गेले
ही गझल सादर केली.
कवियत्री मृणाल कानेटकर- जोशी, महेश केळुस्कर, नारायण पुरी, तुकाराम धांडे, बंडा जोशी, रमजान मुल्ला,
यांनी सादर केलेल्या रचनांनाही रसिकांनी भरभरून दाद दिली.
पुणे फेस्टिव्हल अंतर्गत रोल बॉल स्पर्धा;डर्ट ट्रॅक स्पर्धा संपन्न
पुणे-
दरवर्षी प्रमाणे यंदा ही ३१व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत जिल्हास्तरीय रोल बॉल स्पर्धेचे आयोजन
कोथरूड येथील महेश विद्यालयाच्या मैदानावर रविवार दि. ८ सप्टेंबर रोजी झाले. यामध्ये पुण्यातील ६
मुलींच्या आणि १० मुलांच्या शाळांमधून सुमारे 200 मुले व मुली सहभागी झाले होते. याप्रसंगी पुणे जिल्हा
रोल बॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष शैलेश पोतनीस, सचिव प्रमोद काळे, नगर मल्लखांब असोसिएशनचे
अध्यक्ष अनिल उत्पत आणि विखे पाटील इन्स्टिट्यूटचे फिजिकल डायरेक्टर संतोष सत्पाल आणि पुणे
फेस्टिव्हलचे क्रीडा स्पर्धांचे समन्वयक प्रसन्ना गोखले यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत
मुलांची शाळा विभागामध्ये प्रथम महेश विद्यालय (सेमी इंग्लिश), द्वितीय परांजपे हाय स्कूल आणि तृतीय
महेश विद्यालय (इंग्लिश) तसेच मुलींची शाळा विभागा मध्ये परांजपे हाय स्कूल कोथरूड प्रथम, PCRBA
स्कूल द्वितीय आणि महेश विद्यालय (सेमी इंग्लिश) तृतीय विजयी ठरले. महाराष्ट्र रोलबॉल असोसिएशनचे
अध्यक्ष राजू दाभाडे यांनी याचे आयोजन केले आहे.
डर्ट ट्रॅक स्पर्धा संपन्न
३१व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये डर्ट ट्रॅक स्पर्धा गोळीबार मैदान येथे रविवार, दि. ८ सप्टेंबर रोजी
संपन्न झाली. १३ विविध गटात ही स्पर्धा उत्साहात पार पडली. यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या
वळणांचा 1 किमी लांबीचा स्पर्धात्मक डर्ट ट्रॅक तयार करण्यात आला होता. प्रत्येक स्पर्धकाने १२
लॅपस् द्वारे स्पर्धा पूर्ण करायची होती. या स्पर्धेत 100 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.
त्यामध्ये पुण्याबरोबरच सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, मुंबई, बंगलोर येथील खेळाडूही सहभागी
झाले होते.
प्रारंभी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी फ्लॅग ऑफ करून स्पर्धेचा शुभारंभ केला
आणि स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेत अपाचे १५०, इम्पल्स, वाय बी एक्स, यामाहा, आर एक्स, के टी एम १५०, कावासाकी
के एक्स २५०, हिमालयन अशा विविध मोटरसायकल्सचा समावेश होता. हि स्पर्धा १२ वर्षा खालील,
१५ वर्षा खालील आणि १८ वर्षा पुढील अशा तीन वयोगटात पार पडली. याप्रसंगी फेडरेशन ऑफ मोटर
स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाचे मनोज वैद्य, पुष्कराज केंजळे, अरविंद पासलकर, ए.आर.एम.एस. चे
कमलेश दवे, विक्रांत राउत आणि पुणे फेस्टिव्हलचे क्रीडा स्पर्धांचे समन्वयक प्रसन्ना गोखले
उपस्थित होते आणि यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेचे आयोजन ए.आर.एम.एस.
ने केले असून फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ इंडियाची या स्पर्धेस मान्यता
होती.
















