राज्यभरातील दिव्यांगांसाठी मोफत शिबिर

Date:

पुणे- राष्ट्रसंत आचार्य सम्राट परमपूज्य डॉ.शिवमुनीजी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातील दिव्यांग साठी 15 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत वर्धमान सांस्कृतिक भवन,कोंढवा ,पुणे येथे मोफत शिबीर आयोजित केले आहे .
या शिबिराचे वैशिष्ट्य प्रामुख्याने दिव्यांगांसाठी, ज्याला उभे राहता येत नाही, त्याला उभे करणे, ज्याला चालता येत नाही, त्याला पाय देऊन चालवणे व ज्याला पळता येत नाही त्याला ट्रायसिकल, व्हीलचेअर देऊन गतिमान करणे हा उद्देश आहे.
ह्या शिबिरा मध्ये आनंद अचल गुरु फाउंडेशन तर्फे तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर (५ ते १५ वर्षीय मुलां साठी) तसेच भारत विकास परिषद स्वारगेट शाखेतर्फे दिव्यांगांसाठी कृत्रिम हात व पाय – विकास फूट शिबिर तसेच सौ सुशीलाबेन मोतीलाल शहा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या प्रेरणेने ट्रायसिकल, व्हीलचेअर व अंधांना मॅजिक स्टीकचे वाटप करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजनसकल जैन संघ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे.
या कार्यक्रमातच लायन्स क्लब पुणे – मनस्वी, डिजिटल, प्राईम, सुप्रीम व नवचैतन्य यांच्यातर्फे दिव्यांगांची नेत्रचिकित्सा, डायबिटीस चाचणी व कॅन्सर तपासणीही केली जाणार आहे.
या शिबिराचा लाभ घेण्याकरता पूर्व नाव नोंदणी आवश्यक असून पुढील सामाजिक कार्यकर्ते यांचे कडे सम्पर्क करावे, शस्त्रक्रिया करिता – शशांक 9665083355,
कृत्रिम हात-पाय करिता जयंत जेस्ते – 9822510349 व ट्रायसिकल, व्हीलचेअर करिता – मोतीलाल शहा 9422303446 ,
रघुनाथ ढोक 9922116239 या क्रमांकावर नाव नोंदणी करता येईल.
या कार्यक्रमाची माहिती नुकतेच पत्रकार परिषद मधेय दीपक गुंदेचा,कुंदन दरडा ,भाग्यश्री चौंडे ,सौ.सुशीलाबेन शहा यांनी दिली यावेळी जेष्ठ समाजसेवक मोतीलाल शहा ,महात्मा फुले साहित्य प्रकाशन समिती महाराष्ट्र शासनाचे सदस्य रघुनाथ ढोक उपस्थित होते.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि जनजागृती मोहिमांमध्ये पुढाकार घ्यावा -वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

पुणे- महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत तोंडाच्या शस्त्रक्रियेशी संबंधित दंत...

नेतृत्वहीन पुण्याची दयनीय अवस्था : संगीता तिवारी यांची भाजपच्या नेत्यांवर जहरी टीका

पुण्याला नेतृत्वच राहीलं नाही ही पुण्याची आजची खरी मोठी...

नायब तहसीलदारांना जेसीबीला लटकवत 4 किलोमीटर फरफटत नेलं: नागपुरात कायद्यालाच खुलं आव्हान

नागपूर- जिल्ह्यातील कुही तालुक्यात अवैध मुरूम उत्खननाविरोधातील कारवाईदरम्यान महसूल...

पालकांनो सावधान .. या शाळांत प्रवेश घ्याल तर होईल नुकसान -महापालिकेचा इशारा

पुणे-आपल्या पाल्याचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी शाळा प्रवेशाची धावपळ...