‘गंगा भाग्योदय’मध्ये रंगली ‘सुखकर्ता’ मैफल

Date:

 प्रशांत दामले, मधुरा दातार यांच्या गीतांनी रसिक मंत्रमुग्ध

पुणे. १०: श्री गणेशाच्या आगमनाने सर्वत्र उत्सावाचे आणि उत्साहाचे वातावारण असतानाच ऋतू हिरवा-ऋतू बरवा, धुंदी कळ्यांना-धुंदी फुलांना,जाळीमंदी पिकली करवंद, रन्जीशेही सही यांसारख्या सदाबहार गीतांची सुरेल मैफल रसिक पुणेकरांनी अनुभवली. निमित्त होते गोयल गंगा फाउंडेशनतर्फे झालेल्या सुखकर्ता मैफलीचे. मराठी रंगभूमीचे सुपरस्टार प्रशांत दामले आणि प्रसिद्ध गायिका मधुरा दातार यांनी मराठी हिंदी चित्रपटातील गाजलेली गाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. सिंहगड रस्त्यावरील ‘गंगा भाग्योदय’ ही मैफल पार पडली. यावेळी गोयल गंगा फाउंडेशनचे विश्वस्त अतुल गोयल उपस्थित होते.

‘श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर’ या मंगलमूर्तींच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मराठी-हिंदी चित्रपटातील गाजलेली गाणी सादर करत त्यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. ‘रूप तेरा मस्ताना’ या गाण्याला रसिकांची विशेष वाहवा मिळाली. मधुरा दातार यांच्या ‘पिया बावरी’ या गाण्याला रसिकांची विशेष दाद मिळाली या गाण्याची खास आठवण सांगताना कुलकर्णी म्हणाले कि, एका मैफिलीत मधुराने हे गाणे सादर केले होते तेव्हा स्वत: ह्रदयनाथ मंगेशकर यांनी मधुराच्या गाण्याला कौतुकाची थाप देत मधुराने आशाच्या गाण्याची आठवण करून दिली असे सांगितले.  प्रशांत दामले यांनी ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत’ या गाण्यातून रसिक श्रोत्यांची फर्माईश पूर्ण केली. यावेळी केदार परांजपे (की बोर्ड), सचिन जांबेकर (संवादिनी), अजय अत्रे आणि विक्रम भट (तबला) यांनी समर्पक साथसंगत केली.

निवेदक मिलिंद कुलकर्णी यांनी आपल्या खुमासदार शैलीतून प्रशांत दामले यांचा अभिनेते, गायक, निवेदक असा जीवनप्रवास रसिकांसमोर उलगडला. यात ब्रम्हचारी, एका लग्नाची गोष्ट, टूर टूर यांसारख्या नाटकातील अनेक गमतीदार किस्से त्यांनी रसिकांना समोर उलगडले. “माझी जडणघडण, या क्षेत्रातला प्रवासदेखील संघर्षातूनच झाला. पोटाला जोपर्यंत चिमटा बसत नाही तोपर्यंत चांगले काम करता येत नाही. त्यामुळे तुमचे कार्यक्षेत्र कोणतेही असो संघर्ष हा हवाच. मला या क्षेत्रात अनेक दिग्गज, नामवंत कलाकारांच्या सान्निध्यात काम करण्याची संधी प्राप्त झाली. मी जे काही अल्प योगदान या क्षेत्रासाठी देऊ शकलो ते या महान कलाकारांमुळेच.” असे सांगत दामले यांनी आपला प्रवास उलगडला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरण अजिंक्यपदाकडे; खो-खोमध्ये (महिला) विजेतेपद

पुणे, दि. ७ मे २०२४: अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या ४७ व्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरणने सलग दुसऱ्या दिवशीही दबदबा ठेवत अजिंक्यपदाकडे वाटचाल सुरु केली आहे. यामध्ये महावितरणच्या खो-खोच्या महिला संघाने विजेतेपद मिळवले आहे. तर कबड्डीमध्ये उपांत्य फेरीत तर खो-खो व बास्केटबॉलमध्ये पूर्वउपांत्य फेरीत महावितरणच्या संघाने प्रवेश केला आहे. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात एमएसईबी होल्डिंग कंपनीद्वारे आयोजित या राष्ट्रीय स्पर्धेत गुरुवारी (दि. ७) खो-खोच्या महिला गटात महावितरण विरुद्ध राजस्थान असा अंतिम फेरीचा सामना झाला. यात महावितरणच्या कर्णधार भाग्यश्री फडतरे, सारिका जाधव, श्रेया जाधव, मोनिका भोसले यांनी आक्रमण व संरक्षणामध्ये दमदार कामगिरी करीत सामन्यावरील वर्चस्व कायम ठेवले. पहिल्या डावात १२ विरुद्ध ५ गुणांची आघाडी घेत दुसऱ्या डावात महावितरण संघाने सहा मिनिटे राखून खो-खोचे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. तर राजस्थानला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. खो-खोच्या पुरुष गटामध्ये महावितरण संघाने (१५) हरियाणा संघाचा (४) ११ गुणांनी सहज पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मात्र राजस्थान (६) विरुद्ध महापारेषण (५) संघात तुल्यबळ लढत झाली व राजस्थानने एक गुणाने निसटता विजय मिळवला. आता महावितरण विरुद्ध महापारेषण आणि हरियाणा विरुद्ध राजस्थान अशी अंतिम फेरीसाठी लढत होणार आहे. भारतीय खो-खो संघाचा कर्णधार प्रतिक वाईकर याच्यासह निशिकांत शिंदे, विराज कोटमकर, महेंद्र पाटील यांनी आक्रमण व संरक्षणामध्ये सातत्य कायम ठेवले असून सर्व साखळी सामन्यांत वर्चस्व मिळवले आहे. महापारेषणचा उत्कृष्ट खेळाडू विशाल सावंत व इतर सहकाऱ्यांवर आता बलाढ्य महावितरण संघाचा पराभव करण्याचे आव्हान आहे. कबड्डीच्या पुरुष गटामध्ये पूर्वउपांत्य फेरीत बीएसईएस राजधानी दिल्ली संघ (४९) विरुद्ध महापारेषण (३९) यांच्या अतिशय अटीतटीची लढत झाली. केवळ तीन गुणांनी महापारेषणला पराभव पत्कारावा लागला. दिल्लीच्या संजीव छिकारा, हरदेव शर्मा, रवी प्रकाश व अनिल यांनी आक्रमक पवित्रा घेत महापारेषणचे शेवट्या मिनिटापर्यंत सुरु असलेले आक्रमण थोपवून धरले. यानंतर हिमाचल प्रदेश संघाने (३२) मध्यप्रदेश पॉवर मॅनेजमेंट संघाचा (७) सहज पराभव करून उपांत्य फेरी गाठली. तर महावितरण संघातील (३०) दीपक माने, अमित जाधव, नीलेश ठाकूर, अभिषेक नर, अजय शिंदे यांच्या आक्रमक पवित्र्याने तेलंगणा ट्रान्समिशन संघाचा (११) १९ गुणांनी आणि हरियाणा संघाने (४८) टाटा पॉवर मुंबई संघाचा (१७) पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. बास्केटबॉलच्या साखळी सामन्यांनी या स्पर्धेत दुसऱ्या दिवशी रंगत वाढली. यात महावितरण (३४) विरुद्ध तेलंगणा (२४) लढतीत महावितरणच्या पंकज गेडे, शिवछत्रपती पुरस्कार विजेता शत्रुघ्न गोखले, आशिष खानापुरे यांनी सामन्यावर नियंत्रण ठेवत विजय मिळवला. यासोबतच सुरजितसिंग, हरप्रितसिंग, सतेंदरसिंग यांच्या आक्रमणामुळे पंजाब संघाने (२१) उत्तराखंड संघाचा (८) पराभव केला. तर हरियाणा संघ (५४) विरुद्ध महापारेषण (६) लढतीत हरियाणाने एकतर्फी विजय मिळवला.

‘प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या प्रसारासाठी महावितरणचा पुढाकार,शुक्रवारी पुणे परिमंडलात एकाच दिवशी मेळावे

पुणे,दि. ७ मे, २०२६:- केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी 'प्रधानमंत्री...