पुणे : “समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव मिलाफ सादर करताना भारतीयांचे प्रेम आणि मिळणारा प्रतिसाद पाहून भारावलो आहे. भारतीय प्रेक्षकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद नेहमीच प्रेरणादायी असतो,” अशी भावना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांनी व्यक्त केली. भारत दौऱ्याच्या निमित्ताने पुण्यात दाखल झाल्यानंतर झुआन ले यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अलायन्स फ्राँसेस पुणेच्या संचालिका अॅमेलि वायगेल उपस्थित होत्या.
अलायन्स फ्राँसेस पुणे, फ्रेंच दूतावासाच्या सहयोगाने आणि पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने झुआन ले यांचा बहुप्रशंसित कार्यक्रम ‘रिफ्ले’ शनिवारी (ता. ६) संध्याकाळी ७.३० वाजता कलाग्राम, सिंहगड रोड पुणे येथे पुणेकरांसाठी सादर होत आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. ‘रिफ्ले’ हा झुआन ले आणि नृत्यांगना शिह-या पेंग यांनी साकारलेला दुहेरी समकालीन नृत्यप्रयोग आहे. यात नृत्य, हिप-हॉप, फ्रीस्टाइल स्केटिंग आणि दृश्यशैली यांचा संमिश्र वापर करून ओळख, स्मृती, संतुलन आणि मानवी संबंध यांसारख्या विषयांचे प्रभावी चित्रण केले आहे.
झुआन ले यांनी सांगितले की, हा त्यांचा भारत दौऱ्याचा दुसरा प्रवास असून स्वत:च्या नृत्यसंस्थेचा पहिलाच दौरा आहे. जयपूर, मुंबई आणि पुणे या शहरांना भेट दिली असून त्यात्या ठिकाणी नृत्य सादरीकरण केले आहे. तसेच फ्रेंच नृत्यसंदर्भात कार्यशाळा घेतल्या आहेत. भारतामधील प्रत्येक शहराचा स्वतःची एक ओळख आहे. प्रेक्षकांची जिज्ञासा, खुलेपणा आणि भावनिक प्रतिसाद कलाकाराला नवी ऊर्जा देतात.” भारतातील कलापरंपरा, कथा आणि मानवी नात्यांमध्ये असलेली विविधता कलाकारांसाठी समृद्ध करणारी असल्याचे सांगत त्यांनी सांस्कृतिक देवाणघेवाणीचे महत्त्व अधोरेखित केले. झुआन ले यांनी १५ वर्षांपासून आययंगार योगाचा सराव करत असल्याचेही सांगितले. या योगप्रकारातील शिस्त, शरीर-भान आणि संतुलन त्यांच्या नृत्यभाषेला आकार देतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
अॅमेलि वायगेल यांनी सांगितले की, महानगरपालिकेसोबतच्या सहयोगातून ‘रिफ्ले’ पुण्यात सादर करणे हे इंडो-फ्रेंच सांस्कृतिक संबंध अधिक घट्ट करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. पुणेकरांना जागतिक दर्जाचा नृत्यप्रयोग मोफत अनुभवता यावा, हा अलायन्स फ्राँसेसचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक स्तरावर प्रभावी प्रकाशयोजना, नेमकी हालचाल आणि ओळख निर्माण करणारे प्रकाशगोळ्याचे दृश्य यांसाठी प्रसिद्ध असलेला ‘रिफ्ले’ हा कार्यक्रम पुणेकरांना संतुलन, हालचाल आणि मानवी नात्यांच्या काव्यमय विश्वात घेऊन जाणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी २० शाळांमध्ये जनजागृती उपक्रम पुणे : एका कष्टकरी, शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या कुटुंबातील मुलाचा आणि दुसऱ्या दारूच्या व्यसनाने त्रस्त कुटुंबातील मुलाचा जीवनप्रवास…दारू पिणाऱ्या वडिलांमुळे बिघडलेले घरगुती वातावरण, तसेच पैशासाठी दुकानात अपमान सहन केल्यानंतर गुन्हेगारीकडे वळणाऱ्या मुलाची मानसिक घुसमट… पुढे एका सुजाण मित्राने केलेल्या योग्य प्रबोधनामुळे तो मुलगा चुकीच्या मार्गावरून परत येतो आणि शिक्षण-संस्कारांच्या दिशेने वाटचाल सुरू करतो, असा सकारात्मक संदेश पथनाट्यातून देत बाल गुन्हेगारीचे गंभीर परिणाम शालेय विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
धनकवडीतील आदर्श मित्र मंडळाच्या वतीने पर्वती येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूल येथे पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सचिव प्रमिला गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई, मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप, शाळेचे मुख्याध्यापक अजित माने, संजय भैलुमे उपस्थित होते. किशोर साव व विशाल भैलुमे ह्यांनी पथनाट्याचे दिग्दर्शन केले.
प्रमिला गायकवाड म्हणाल्या, मुलांना लहान वयात गुन्हेगारी प्रवृत्तीचे आकर्षण वाटू शकते. यासाठी काही वेळा पालक आणि प्रामुख्याने नेते मंडळी जबाबदार असतात. फक्त मुलांनाच याबद्दल जागृत करून उपयोग नाही पालकांना देखील जागृत केले पाहिजे. मुलांमध्ये संयम आणि ताकद निर्माण करणे गरजेचे आहे.
नंदकुमार गायकवाड म्हणाले, मोबाईल मुळे बाल गुन्हेगारांची संख्या वाढली आहे. ती कमी व्हावी यासाठी शासन, पोलीस प्रशासन आणि सामाजिक संस्था खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. परंतु आई-वडिलांनी देखील लहान वयात मुलांना मोबाईल देऊ नये. गुन्हेगारीतील मुलांना प्रकाशवाट दाखवण्यासाठी उदय जगताप जे प्रयत्न करत आहेत ते कौतुकास्पद आहेत, त्यांच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल.
डॉ. मिलिंद भोई म्हणाले, पुण्यातील गणेशोत्सव मंडळे बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी काम करत आहेत. परमेश्वराची सेवा ही मंदिरामध्ये नाही. समाजामधील गरजूंची सेवा करण्यातच परमेश्वराची सेवा आहे. परमेश्वराची मंदिरे ही केवळ देव देवतांच्या मूर्तींची न राहता समाजसेवेची महा मंदिरे व्हावीत.
उदय जगताप म्हणाले, धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळ हे गुन्हेगारी कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबवत असते. पुण्यातील गुन्हेगारी वाढू नये यासाठी आदर्श मित्र मंडळाने पुण्यातील २० शाळांमध्ये प्रकाशवाटा गुन्हेगारी मुक्तीच्या असा उपक्रम राबवत आहे. संवाद परिवर्तन यात्रा देखील पुणे शहरात काढण्यात येणार आहे. शहरातील गणेश मंडळे या उपक्रमात मदत करत आहेत. शाळा, समाज आणि पोलीस एकत्र आले तर शहरातील गुन्हेगारी नक्कीच कमी होईल.
पुणे- शेती, पायाभूत सुविधा, सिंचन, उद्योग, रोजगार निर्मिती, सामाजिक न्याय, सुरक्षा या प्रत्येक क्षेत्रात महायुती सरकारने क्रांतीकारी निर्णय घेऊन विकासाची गती वाढवली आहे. महायुती सरकारमुळे महाराष्ट्राची शाश्वत विकासाच्या दिशेने दमदार वाटचाल सुरू आहे असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रदेश सह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, रघुनाथ पांडे, प्रतिक करपे आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकसित महाराष्ट्र 2047 चे व्हीजन निश्चित करून त्या दिशेने पावले उचलली जात आहेत. सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य दिले जात आहे. अतिवृष्टीग्रस्तांना 32,000 कोटींचे पॅकेज, दुष्काळी उपाययोजना लागू तसेच पीककर्ज वसुलीला स्थगिती देण्याचे आदेश देऊन शेतक-यांना दिलासा दिला. पीकविमा आणि भरपाई प्रक्रियेला गती देण्यात आली. पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यात आला. सिंचनक्षमता वाढवण्यावर भर देण्यात आला. नदीजोड प्रकल्पांना मान्यता देऊन निधीची तरतूद करण्यात आली. उपसा सिंचन प्रकल्पांना कोट्यवधींचे निधी मंजूर करण्यात आले. जलयुक्त शिवार 2.0 अंतर्गत वर्षभरात 37,166 कामे पूर्ण करण्यात आली.
पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून पायाभूत यंत्रणा सक्षम करण्याला प्राधान्य दिले. समृद्धी महामार्ग पूर्णत: खुला करण्यात आला. शक्तीपीठ महामार्ग, वाढवण बंदर, ऑफशोअर विमानतळ यांचे नियोजन करण्यात आले. 100 गावांत सौरग्राम योजना, नागपूरमध्ये राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था, मेट्रो 11 ला मान्यता, मुंबईत 238 लोकल गाड्यांच्या खरेदीसाठी 4826 कोटींचा निधी, रेल्वे सेवेच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला असेही श्री. बावनकुळे यांनी नमूद केले.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध निर्णय आणि योजना महायुती सरकारने आखल्या आहेत. लाडकी बहिण योजना दमदारपणे सुरु आहे. तसेच राज्यातील 10 जिल्ह्यात महिला बचत गटांसाठी उमेद मॉल सुविधा देण्यात आली. उद्योगक्षेत्राच्या वाढीसाठी नवीन औद्योगिक धोरण, इलेक्ट्रॉनिक्स धोरण, जेम्स अँड ज्वेलरी धोरण या आणि अशा अनेक नवीन धोरणांची घोषणा करण्यात आली. दावोसमध्ये विक्रमी 16 लाख कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले असून, 80 टक्के अंमलबजावणीसह महाराष्ट्र सध्या आघाडीवर आहे. महाराष्ट्रात 2024-25 मध्ये गेल्यावर्षीपेक्षा 34 टक्के अधिक म्हणजे 1,64,875 कोटींची परदेशी गुंतवणूक झाली असल्याची माहिती श्री. बावनकुळे यांनी दिली.
महाराष्ट्राचा समृद्ध वारसा जपण्यासाठी देखील अनेक निर्णायक पावले उचलण्यात आली. आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, पानिपतला मराठा शौर्य स्मारक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीवर्षात तीर्थक्षेत्र विकासासाठी 5503 कोटींचा निधीही देण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुकर करून जीवनमान उंचावण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्व ग्राहकांच्या वीजदरात आगामी पाच वर्षात कपात करण्याचा आदेश ‘एमईआरसी’ने दिला आहे. महावितरणने इतिहासात प्रथमच वीजदरात कपात करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला होता. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत 2399 आजारांचा समावेश करण्यात आला. प्रधानमंत्री आवासमध्ये महाराष्ट्राला 30 लाख घरे मंजूर त्यातील 4,91,278 घरे बांधून पूर्ण झाली आहेत. तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याचा निर्णय तसेच ग्रामीण कुटुंबांना नळजोडण्या देण्यात आल्या.
डिजिटल सेवांच्या माध्यमातून पारदर्शकता वाढवण्याचे महत्त्वपूर्ण कामही महायुती सरकारने केले. मागच्या एक वर्षात महाराष्ट्रात प्रत्येक क्षेत्रात विकासाचे नवे मापदंड स्थापित केले जात आहेत, असे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतांना दक्षता घ्या- प्रादेशिक परिवहन कार्यालय
पुणे, दि.५: प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत शालेय बस नियमावलीचे उल्लघंन करणाऱ्या वाहनांची १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत तपासणी करण्यात आली, या कारवाईत १ हजार ४६४ वाहनांची तपासणी करुन त्यापैकी २४९ वाहनांवर कारवाई करण्यात आली; यामाध्यमातून २२ लाख २२ हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
शालेय विद्यार्थी वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीच्या तसेच सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळा तसेच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या शालेय बस चालकांनी नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे, जिल्हा शालेय बस सुरक्षितता समितीचे अध्यक्ष तथा पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी वेळोवेळी दिले आहेत. त्यानुसार शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत संबंधित शाळा व्यवस्थापन व वाहन मालकांनी दक्षता घ्यावी. शाळेच्या बसमध्ये ६ वर्षाखालील मुलांना ने-आण करण्याकरिता महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती तसेच पोलीस विभागामार्फत वाहनचालक, वाहक, मदतनीस यांच्या पोलीस चारित्र्य पडताळणी करावी. शाळा व्यवस्थापन व शालेय परिवहन समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती यांनी स्कुल बस नियमावली व नविन अटी शर्तीचे पालन होत असल्याबाबत तपासणी करण्याबाबत यापूर्वी कळविण्यात आले आहे.
सर्व शाळांमध्ये शासन निर्णय क्रमांक संकिर्ण ११२५/प्र.क्र. २४१/२५/ एसएम-१, दि. १६ एप्रिल २०२५ नुसार सर्व शाळांमध्ये शालेय परिवहन समिती, विद्यार्थी सुरक्षा व भैतिक सुविधा विकसन समिती यांची स्थापना करण्याची दक्षता शालेय शिक्षण विभागाने घ्यावयाची आहे. सर्व शालेय परिवहन समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समित्यांनी शालेय बसवर कार्यरत असणाऱ्या वाहन चालकांची दरवर्षी नेत्र तपासणी झाली असल्याचे प्रमाणपत्राची तपसणी करावी. ज्या वाहन चालकांनी प्रमाणपत्र प्राप्त केले नसेल अशा वाहन चालकांना शालेय विद्यार्थी वाहतुकीचे वाहन चालविण्यास दिले जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
शालेय विद्यार्थ्यांवरील अनुचित प्रकार रोखण्याबाबत धोरण निश्चित करण्याकरिता २३ ऑगस्ट २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये शालेय शिक्षण व महिला बाल विकास विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालातील प्रकरणः क्रमांक १० मध्ये समितीने दिलेल्या निष्कर्ष व शिफारशीमध्ये विद्यार्थी वाहतुकीबाबत पुढील शिफारशी करण्यात आल्या आहेत.
शालेय विद्यार्थी वाहतूक करणारी बस व इतर वाहने मुलांकरिता सुरक्षित राहतील याबाबत शाळेने खबरदारी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक बस व इतर वाहनात सीसीटीव्ही असणे अनिवार्य आहे. शाळेच्या बसमध्ये 6 वर्षाखालील मुलांना ने-आण करणेकरिता महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती आवश्यक आहे. तसेच मुली असणाऱ्या शाळांतील वाहनांमध्ये महिला कर्मचारी बंधनकारक आहेत. वाहनचालक, वाहक, क्लीनर यांची पोलीस पडताळणी होणे आवश्यक आहे.
परिवहन विभाग व पोलीस विभागामार्फत शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची संयुक्त तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. तपासणी मोहिमेत दोषी आढळणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्यात येईल, शाळांनी शैक्षणिक सहलीदरम्यान विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षीतपणे होईल याची विशेष खबरदारी घ्यावी. वाहनाची वैध कागदपत्रे सोबत बाळगावीत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
पिंपरी, पुणे (दि. ०५ नोव्हेंबर २०२५) विद्यार्थिनींनी प्रवास करत असताना, सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना स्वसंरक्षणाबाबत जागरूक राहिले पाहिजे. प्रत्येकीने आपल्या मोबाईल मध्ये सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाचा नंबर सेव्ह करून ठेवावा. रिक्षा, टॅक्सी सारख्या सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्याअगोदर ‘पॅनिक बटन’ कसे वापरावे हे समजून घ्यावे. वैयक्तिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर हक्क वापरा असे आवाहन ॲड.अक्षता नेटके यांनी केले. आहार आणि मानसिक स्वास्थ चांगले असल्यास करिअर वर लक्ष केंद्रित करता येते. आपला आहार उत्तम असेल तर रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी उपयोग होतो, असे मार्गदर्शन डॉ. मिताली मोरे यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) तर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बोर्ड ऑफ स्टुडंट्स डेव्हलपमेंट विभागाच्या सहकार्याने ‘निर्भया जनजागृती’ सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एसबीपीआयएमच्या संचालिका डॉ. किर्ती धारवाडकर, डॉ. मिताली मोरे, समन्वयक डॉ. रूपाली कुदारे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. काजल महेश्वरी आदी उपस्थित होते. या सत्रात ॲड.अक्षता नेटके यांनी वैयक्तिक सुरक्षितता आणि डॉ. मिताली मोरे यांनी मानसिक स्वास्थ्य या विषयावर मार्गदर्शन केले. एसबीपीआयएमच्या संचालिका डॉ. किर्ती धारवाडकर यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, पीसीईटीच्या एसबीपीआयएम महाविद्यालयात विद्यार्थिनींमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात. स्वागत, प्रास्ताविक डॉ. किर्ती धारवाडकर, सूत्रसंचालन विद्यार्थिनी श्रावणी कनोरे आणि वर्षिणी गिरीश यांनी केले. आभार डॉ. काजल महेश्वरी यांनी मानले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते.
खुनासाठी दिली साडेतीन लाखांची सुपारी मुरादाबाद-विमा दाव्याच्या लोभापायी एका वडिलांनी आपल्या मुलाची हत्या घडवून आणली. स्वतःच्या मुलाला मारण्यासाठी वडिलांनी भाडोत्री मारेकऱ्यांना साडेतीन लाख रुपयांची सुपारी दिली. हत्या केल्यानंतर संपूर्ण घटनेला अपघाताचे स्वरूप देण्यासाठी मृतदेह मुरादाबादमध्ये रस्त्याच्या कडेला फेकून दिला.मृत्यू झालेला तरुण अनिकेत शर्मा संभलचा रहिवासी होता. त्याच्या नावावर 2.10 कोटी रुपयांचा अपघाती विमा होता. मुरादाबाद पोलिसांनी या संपूर्ण गुन्ह्यात सहभागी असलेल्या अनिकेतच्या वडिलांना आणि तिन्ही भाडोत्री मारेकऱ्यांना अटक केली आहे. या गुन्ह्याची पटकथा लिहिणाऱ्या अमरोहा येथील वकिलाचा आणि त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस पथके दोघांना अटक करण्यासाठी संभाव्य ठिकाणांवर छापे टाकत आहेत.16 नोव्हेंबर रोजी मुरादाबादच्या कुंदरकी येथे एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीच्या चौकशीत हे प्रकरण अपघाताचे वाटले. पण जेव्हा पोलिसांनी शवविच्छेदन केले, तेव्हा तरुणाच्या डोक्यावर एखाद्या जड वस्तूने वार करून त्याची हत्या करण्यात आल्याचे समोर आले.
यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला, तेव्हा तरुणाची ओळख अनिकेत शर्मा (30 वर्षे) पुत्र बाबू राम शर्मा (50) अशी झाली. बाबू राम संभल दुर्गा कॉलनी, बहजोई येथे राहतो.पोलिसांनी मृत अनिकेतच्या कुटुंबीयांना बोलावून त्याचा मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला. त्यानंतर पोलिसांनी जेव्हा शवविच्छेदन अहवालात हत्येचा उल्लेख समोर आल्याचे अनिकेतचे वडील बाबूराम यांना सांगितले, तेव्हाही बाबूराम यांनी पोलिसांचे म्हणणे नाकारून तो अपघातच असल्याचे सांगितले.बाबूराम यांनी पोलिसांना सांगितले – माझ्या मुलाची हत्या कोणी का करेल? त्याचे कोणाशीही वैर नव्हते. त्याला मारून कोणाला काय मिळणार? हा अपघातच आहे.यावर पोलिसांना बाबूरामवरही संशय आला. पोलिसांनी तपास सुरू ठेवला. तेव्हा असे निष्पन्न झाले की मृत अनिकेत शर्माच्या नावावर 2.10 कोटी रुपयांचा एक अपघात विमा आहे. याबद्दल बाबूराम पोलिसांपासून लपवत होता.
पोलिसांनी बाबूरामला ताब्यात घेऊन चौकशी केली, तेव्हा तो बोलू लागला. त्याने पोलिसांना सांगितले की अनिकेत दारू पिऊन घरात रोज गोंधळ घालत असे. त्याच्या कृत्यांमुळे मी खूप त्रस्त होतो.याच दरम्यान मी माझा वकील मित्र आदेश कुमार याला मुलाच्या कृत्यांविषयी सांगितले. जो अमरोहा जिल्ह्यातील नौगावां सादात येथील रतनपूर गावात राहतो. तेव्हा त्याने मुलावर कायमचा उपाय करण्याची गोष्ट केली.नंतर २ जानेवारी २०२४ रोजी अधिवक्ता आदेशने बहजोई येथील HDFC बँकेत अनिकेतचे बँक खाते उघडले. त्यानंतर टाटा कंपनीत त्याचा २.१० कोटी रुपयांचा अपघात विमा काढला. पण मला सांगितले की त्याने फक्त २५ लाखांचा विमा काढला आहे.
या दरम्यान २०२४ मध्ये मी बाबूराम शर्मा दरोड्याच्या एका प्रकरणात तुरुंगात गेलो . तुरुंगात गेल्यानंतर अधिवक्ता आदेश कुमारच विम्याचे हप्ते भरत राहिला.मी जेव्हा जामिनावर सुटलो तेव्हा अधिवक्त्याने मला माझ्या मुलगा अनिकेतच्या हत्येसाठी प्रवृत्त केले.
बाबूरामने पोलिसांच्या चौकशीत सांगितले- अधिवक्ता आदेशने मला सांगितले- की जर तू मुलाची हत्या केलीस तर विम्याचे २५ लाख रुपये तुला मिळतील.25 लाख रुपयांच्या विमा दाव्याच्या लोभापायी बाबूराम शर्माने मुलाची हत्या करण्याचा कट रचला. त्याने रामपूरच्या शाहबाद पोलीस स्टेशन हद्दीतील नटियाखेडा येथील रहिवासी असलम उर्फ सुलतानला साडेतीन लाख रुपयांमध्ये मुलाच्या हत्येची सुपारी दिली.असलमने त्याचा साथीदार तहब्बुर मैवाती आणि रामपूरच्या शाहबाद रुस्तमपूर येथील रहिवासी साजिद यांच्यासोबत मिळून अनिकेतच्या डोक्यात रॉड मारून त्याची हत्या केली. त्यानंतर त्याच्या मृतदेहाला अपघाताचे स्वरूप देण्यासाठी कुंदरकी येथे फेकून दिले. जेणेकरून हत्येला अपघाताचे स्वरूप देता येईल.
एसपी ग्रामीण कुंवर आकाश यांनी सांगितले- अनिकेतचे वडील बाबूराम शर्मा आणि भाड्याने घेतलेल्या तिन्ही मारेकऱ्यांना अटक करून गुन्ह्याचा उलगडा करण्यात आला आहे. या घटनेत सहभागी असलेले वकील आदेश कुमार आणि विजयपाल सिंह यांचाही पोलीस शोध घेत आहेत.
नागरी हवाई उड्डाण मंत्र्यांनी केवळ व्यक्त केली नाराजी, म्हणाले- लवकरच समस्या सोडवा नागरिक उड्डयन मंत्री राममोहन नायडू यांनी गुरुवारी आढावा बैठक घेतली. नवीन नियमांसाठी तयारीसाठी इतका वेळ होता, तरीही परिस्थिती कशी बिघडली, अशी नाराजी मंत्र्यांनी व्यक्त केली.नायडू यांनी एअरलाईनला निर्देश दिले की, विमानसेवा लवकरात लवकर सामान्य करावी आणि विमान भाड्यात कोणत्याही प्रकारची वाढ करू नये. याव्यतिरिक्त, विलंब किंवा रद्द झाल्यास प्रवाशांना हॉटेल, जेवण आणि इतर सुविधा वेळेवर उपलब्ध करून द्याव्यात.पण प्रत्यक्षात याची अंमलबजावणी होते कि नाही हे पाहण्यासाठी कोणतीही यंत्रणा नव्हती
नवी दिल्ली- सरकारने देशातील सर्वात मोठ्या एअरलाइन कंपनी इंडिगोला रोस्टर (ड्यूटी चार्ट) नियमांमधून सूट दिली आहे. एअरलाइन शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी क्रू मेंबर्सच्या (पायलटसह इतर फ्लाइट स्टाफ) कमतरतेमुळे त्रस्त दिसली. यामुळे शुक्रवारी दिल्ली, बेंगळूरु, पुणे, हैदराबादसह अनेक विमानतळांवर 500 हून अधिक विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत.विमानतळावर परिस्थिती बिकट आहे. प्रवाशांना विमानांच्या उड्डाणांची माहिती मिळत नाहीये. पाणी, जेवण आणि आवश्यक वस्तूंसाठी लोक कर्मचाऱ्यांशी भांडताना दिसले. अनेक ठिकाणी मारामारीची परिस्थिती निर्माण झाली. अनेक विमानतळांवर लोक 24-24 तासांपासून विमानाची वाट पाहत आहेत. पायऱ्यांवर आणि खुर्च्यांवर बसून रात्र काढण्यास भाग पडले आहेत.लहानग्या मुलांसह गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सह सर्वच प्रवाश्यांच्या हालापेष्टांना पारावर उरला नाही अशी स्थिती होती.
दिल्ली विमानतळावर इंडिगोची सर्व देशांतर्गत उड्डाणे आज रात्री 12 वाजेपर्यंत रद्द करण्यात आली आहेत. गोवा विमानतळावर एका महिला प्रवाशाने सांगितले, ‘आम्ही सकाळी 5 वाजेपासून वाट पाहत आहोत. विमानतळावर आल्यावर कळले की विमान रद्द झाले आहे. ना कोणताही मेल आला, ना मेसेज.’ दिल्ली विमानतळ: सर्व विमानांची उड्डाणे रद्द, जाणून घ्या कुठे-कशी परिस्थिती आहे
दिल्ली IGI: दिल्लीत सर्वाधिक २२५ विमानांच्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत. इंडिगोने दिल्ली विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या सर्व देशांतर्गत विमानांच्या फेऱ्या आज रात्री १२ वाजेपर्यंत रद्द केल्या आहेत. टर्मिनलवर हजारो सुटकेस पडून होते. अनेक प्रवाशांना १२ तासांपेक्षा जास्त वेळ त्यांचे सामान घेण्यासाठी लागला. गर्दी इतकी वाढली की प्रवासी जमिनीवर आणि पायऱ्यांवर बसून तासनतास विमानांची वाट पाहत राहिले. मुंबई: अनेक विमानांच्या फेऱ्या रद्द झाल्यानंतर इंडिगो काउंटरवर लांबच लांब रांगा लागल्या. रायपूर: वृद्ध आणि लहान मुलांना खुर्च्यांवर तासनतास वाट पाहावी लागली. काही प्रवासी कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांशी वाद घालताना दिसले. पुणे:येथील विमानतळावर आज सकाळपासून ३२ विमानांच्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत. रद्द झालेल्या विमानांच्या फेऱ्यांनंतर प्रवाशांचे सामान ट्रॉलीमध्ये जमा झाले होते. प्रवाशांना सामान परत घेण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागली. हैदराबाद: येथे ३२ विमानांच्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत. विमान रद्द झाल्यामुळे आणि उशीर झाल्यामुळे देशभरातील हजारो प्रवासी त्रस्त आहेत. बंगळूरु: बंगळूरुमध्ये 102 विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत. येथेही लोक विमानतळावर तासन्तास वाट पाहून परत फिरताना दिसले. दरम्यान, इंडिगोने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे (DGCA) फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) च्या नियमांमधून 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत सूट देण्याची विनंती केली आहे. कंपनीने आश्वासन दिले आहे की, तीन महिन्यांच्या आत तिची परिचालन स्थिती पुन्हा सामान्य होईल. प्रवासी म्हणाले- इतर एअरलाईन्सने भाडे दुप्पट केले
गोवा विमानतळावर एका प्रवाशाने सांगितले- मला रायपूरला जायचे होते. विमानतळावर कळले की आमचे विमान रद्द झाले आहे. ते आम्हाला एक्सचेंज ऑफर देत आहेत. ते म्हणत आहेत की आम्ही ज्या विमानाने जाऊ शकतो, पण ते विमान उडेल की नाही हे निश्चित नाही. उद्याच्या विमानाची वेळही सांगत नाहीत. आता गोव्यात आणखी एक दिवस थांबणे भाग पडले आहे.
गोव्यामध्ये एका अन्य प्रवाशाने सांगितले- आम्ही नुकतेच दिल्लीहून गोवा विमानतळावर पोहोचलो आहोत. येथून लक्षद्वीपसाठी आमची कनेक्टिंग फ्लाइट होती, पण उशिरा पोहोचल्यामुळे ती फ्लाइट सुटली. हे सर्व इंडिगोमुळे झाले आहे. ते आम्हाला कोणतीही मदत करत नाहीत. दिल्ली विमानतळावरही कोणी काहीही सांगितले नव्हते.
गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावर एका प्रवाशाने सांगितले, ‘काल (4 डिसेंबर) दुपारी अहमदाबादहून वाराणसीसाठी माझी फ्लाइट होती. अनेक वेळा उशीर झाल्यानंतर फ्लाइट रद्द करण्यात आली, पण अजूनही आमचे सामान परत मिळालेले नाही.’
DGCA ने इंडिगोकडून दर 15 दिवसांनी प्रगती अहवाल मागवला
DGCA अधिकाऱ्यांनी गुरुवारी इंडिगो एअरलाइनच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. एअरलाइनने आपल्या A320 ताफ्यातील विमानांसाठी फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) च्या काही तरतुदींमध्ये तात्पुरती सूट मागितली आहे आणि सांगितले की कामकाज सामान्य होण्यास तीन महिने लागू शकतात.
DGCA ने इंडिगोला सुधारणांसाठी काही महत्त्वाच्या पैलूंवर काम करण्यास सांगितले आहे. DGCA ने इंडिगोला क्रूची भरती, प्रशिक्षण रोडमॅप, रोस्टर पुनर्रचना, सुरक्षा योजना सादर करण्यास आणि दर 15 दिवसांनी प्रगती अहवाल पाठवण्यास सांगितले.
दरम्यान, इंडिगोच्या विमानांच्या रद्द होण्याचा आकडा सातत्याने वाढत आहे. आता दररोज सुमारे 170-200 उड्डाणे रद्द होत आहेत. गुरुवारी दिल्ली-मुंबईसह 10 हून अधिक विमानतळांवर 550+ उड्डाणे रद्द झाली. इंडिगोने प्रवाशांची माफीही मागितली आणि सांगितले की ते लवकरच कामकाज पूर्ववत करण्यावर काम करत आहेत.
DGCA चे नवीन नियम, ज्यामुळे इंडिगोमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता निर्माण झाली
DGCA ने 1 नोव्हेंबरपासून वैमानिक आणि इतर क्रू मेंबर्सच्या कामाशी संबंधित नियमांमध्ये बदल केले आहेत. याला फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) असे नाव देण्यात आले आहे. हे दोन टप्प्यांत लागू करण्यात आले. पहिला टप्पा 1 जुलै रोजी लागू झाला.
तर 1 नोव्हेंबरपासून दुसरा टप्पा लागू झाला. नवीन नियमांमध्ये प्रवाशांची सुरक्षा वाढवण्यासाठी वैमानिक आणि क्रूला पुरेसा आराम देण्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे एअरलाइन कंपन्यांकडे वैमानिक आणि क्रू मेंबर्सची अचानक कमतरता निर्माण झाली आहे. DGCA ने सांगितले की, नोव्हेंबरमध्ये इंडिगोच्या एकूण 1,232 उड्डाणे रद्द करण्यात आली, ज्यात FDTL नियमांमुळे रद्द झालेल्या 755 उड्डाणांचा समावेश आहे.
इंडिगोकडे सर्वाधिक विमाने, त्यामुळे जास्त परिणाम
एअरलाइन दिवसभरात सुमारे 2,300 देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवते. ही संख्या एअर इंडियाच्या एका दिवसात चालवल्या जाणाऱ्या उड्डाणांच्या जवळपास दुप्पट आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर जर 10–20 टक्के उड्डाणे देखील उशिराने धावली किंवा रद्द झाली, तर याचा अर्थ 200–400 उड्डाणांवर परिणाम होणे. हजारो प्रवाशांसाठी मोठ्या अडचणी निर्माण होणे. बुधवारीही इंडिगोच्या 200 हून अधिक उड्डाणांवर परिणाम झाला होता.
DGCA नुसार, कर्मचाऱ्यांची (क्रू) कमतरता हे याचे मुख्य कारण आहे. इंडिगोमध्ये ही समस्या गेल्या महिन्यापासून सुरू आहे. नोव्हेंबरमध्ये त्याची 1232 उड्डाणे रद्द झाली. मंगळवारी 1400 उड्डाणे उशिराने धावली.
पुणे : केंद्र सरकारच्या धिसाडघाईने आणि कोणतीही पूर्वतयारी न ठेवता लागू केलेल्या नागरी विमान वाहतूक धोरणांमुळे देशभरातील विमानसेवा कोलमडली असून, त्यामुळे देशभरातील विमान प्रवाशांना प्रचंड मनःस्तापाचा सामना करावा लागत आहे, असा आरोप माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आज (शुक्रवारी) प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केला आहे.
इंडिगो विमानसेवा सलग दुसऱ्या दिवशी देशभरात विस्कळित राहिली. सुमारे ५५०हून अधिक विमान उड्डाणे रद्द झाली. पुणे, मुंबई विमानतळावर शेकडो प्रवासी अडकले. काहींची नोकरीची मुलाखत हुकली, काहींचे लग्नसमारंभात जाणे राहिले, काही जणांना गंभीर आजारी नातेवाईकांना भेटणे शक्य झाले नाही, तर अनेकांना अंत्यदर्शनालाही पोहोचता आले नाही. हे सर्व पाहता, केंद्र सरकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे धोरणात्मक अपयश स्पष्ट होते, असे जोशी म्हणाले.
डीजीसीएचा एकतर्फी निर्णय — आणि नंतर मागे घेण्याची घाई!
डीजीसीएने अचानकपणे फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिटेशन (FDTL) चे नवीन नियम लागू केले. नियम लागू करताना विमान कंपन्यांशी कोणतीही चर्चा नाही, मनुष्यबळ उपलब्धतेचा अभ्यास नाही, संक्रमण काळ देण्याची जबाबदारी नाही, प्रवाशांच्या हिताचा विचार नाही. अचानक लागू केलेल्या नियमांमुळे इंडिगोला मोठ्या प्रमाणात क्रू कमतरतेचा सामना करावा लागला आणि शेकडो उड्डाणे रद्द झाली. परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर डीजीसीएने घाईघाईने एक सर्क्युलर मागे घेतले — परंतु नुकसान आधीच झाले होते, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
लाखो प्रवाशांचे आर्थिक व मानसिक नुकसान — जबाबदार कोण?
गेल्या आठवडाभरात लाखो प्रवाशांचे तिकिटांचे आर्थिक नुकसान झाले. अनेकांचे कार्यक्रम, नोकरीच्या मुलाखती, आपत्कालीन प्रवास कोलमडले, कुटुंबीयांच्या भावनिक प्रसंगांना उपस्थित राहता न आल्याची वेदना सहन कराव्या लागल्या. हे सर्व “केंद्र सरकारच्या तुघलकी कारभारामुळे” घडले असल्याचे जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
जबाबदारी ठरवून कारवाई करा — जोशी यांची मागणी
या परिस्थितीसाठी डीजीसीएतील निर्णय घेणारे अधिकारी, तसेच केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हे थेट जबाबदार आहेत. देशभर गोंधळ माजवणाऱ्या आणि लाखो प्रवाशांना त्रास देणाऱ्या निर्णयांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी मोहन जोशी यांनी केली.
तसेच, नियमावलीतील बदल करताना विमान कंपन्यांशी चर्चा करावी, मनुष्यबळ विश्लेषण, संक्रमण कालावधी, प्रवाशांच्या हिताचे संरक्षण या गोष्टी अपरिहार्य असून केंद्र सरकारने पुढील काळात ही जबाबदारी पार पाडावी, अशीही मागणी मोहन जोशी यांनी केली आहे.
पुणे, ५ डिसेंबर ः नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या जलतरणपटूंनी विभागीय व जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत सोनेरी कामगिरी करत डंका पेटविला आहे. स्पर्धेत एकूण १० कांस्य पदके जिंकली. या यशाबद्दल ध्रव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी व प्राचार्य संगीता राऊतजी यांनी सर्व खेळाडू तसेच प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. जिल्हा क्रीडा संचालनालया च्या वतीने अहिल्यानगर येथील वाडिया स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये विभागीय व जिल्हास्तरीय स्पर्धां आयोजित करण्यात आल्या होत्या. ही स्पर्धा १४, १७ आणि १९ वर्षाखालील वयोगटात होती. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ध्रुव ग्लोबल स्कूलच्या जलतरणपटूंचा दबदबा राहिला. यात १४ वर्षाखाालील मुलींच्या गटात धाडसी खेळाडू अनया वानखेडे हिने ५० मी, १०० मी व २०० मी. बॅकस्ट्रोक शर्यतीत उत्कृष्ट कामगिरी करत कास्यपदक जिंकले. १७ वर्षाखालील गटात निया पतंगे हिने १०० मी. बॅकस्ट्रोक, २०० मी फ्रीस्टाईल व ५० मी. बॅकस्ट्रोक शर्यतीत कांस्यपदकची कमाई केली. १४ वर्षाखाालील मुलींच्या गटात अनया वानखेडे हिने ५० मी, १०० मी व २०० मी. बॅकस्ट्रोक शर्यतीत कास्यपदक जिंकले तर १७ वर्षाखालील गटात निया पतंगे हिने १०० मी. बॅकस्ट्रोक, २०० मी फ्रीस्टाईल व ५० मी. बॅकस्ट्रोक शर्यतीत कांस्यपदकची कमाई केली. तसेच मुलांच्या १४ वर्षाखालील गटात ध्रुव ग्लोबल स्कूल, नांदेच्या खेळाडूंनी ४ बाय १०० मीटर्स रिले शर्यतीत कास्यपदक जिंकले. यावेळी संघात अद्विक भालेकर, खुश मुंदडा, द्रोणा बेंदाळे व श्लोक चिलेकर यांचा समावेश होता. तसेच स्कूलच्या जलतरणपटूंनी विविध गटात उल्लेखनीय कामगिरी करत पदके पटकावली. खेळाडूंच्या या कामगिरी मध्ये स्मिता काटवे, उमा जोशी, केशव हजारे आणि रुपाली अनाप यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन मिळाले.
प्रत्येकी 2 रु. दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 154रुपये ते 162 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित (“Equity Share”)
· बोली/ऑफर बुधवार 10डिसेंबर 2025रोजी खुली होईल आणि शुक्रवार, 12 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक मंगळवार 09 डिसेंबर 2025आहे.
· बोली किमान 92इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 92 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल
पार्क मेदी वर्ल्डलिमिटेड (“कंपनी”)ने इक्विटी शेअरसाठी बुधवार 10डिसेंबर 2025पासून प्राथमिक समभाग विक्रीबोली/ऑफर खुली करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे
इक्विटी शेअर्सच्या 9,200 दशलक्ष रु. (920 कोटी रु.) पर्यतच्या एकूण ऑफर साईजमध्ये 7,700 दशलक्ष रु. (770 कोटी रु.) पर्यंतचे फ्रेश इश्यू आणि डॉ. अजित गुप्ता (प्रवर्तक विक्री समभागधारक) यांच्याद्वारे 1,500 दशलक्ष रु. (150 कोटी रु.) पर्यतची ऑफर फॉर सेल समाविष्ट आहे. (“The Total Offer Size”).
प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक मंगळवार 09 डिसेंबर 2025आहे. बोली/ऑफर बुधवार 10डिसेंबर 2025रोजी खुली होईल आणि शुक्रवार, 12 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल.
प्रति इक्विटी शेअरसाठी 154रुपये ते 162 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 92इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 92 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल
कंपनीने इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यूमधून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा वापर खालीलप्रमाणे करण्याचा प्रस्ताव दिला आहे: (i) कंपनी आणि तिच्या उपकंपन्यांनी घेतलेल्या प्रलंबित कर्जाची पूर्णतः किंवा अंशतः परतफेड करण्यासाठी; (ii) उपकंपनी पार्क मेडिसिटी(NCR) द्वारे नवीन रुग्णालयाच्या विकासासाठी लागणाऱ्या भांडवली खर्चासाठी निधी; (iii) आमची कंपनी आणि आमच्या उपकंपन्या ब्लू हेव्हन्स आणि रतनगिरी यांनी वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी लागणाऱ्या भांडवली खर्चासाठी निधी; आणि (iv) उर्वरित रक्कम अजून कार्यरत न झालेल्या इनऑर्गनिक अधिग्रहणांसाठी आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी (“ऑब्जेक्ट ऑफ इश्यू”).
ऑफर फॉर सेल मध्ये प्रवर्तक विक्री भागधारकाकडून 1500.00 दशलक्ष रु. (150 कोटी रु.) पर्यतच्या 2 रु. दर्शनी मूल्य असलेल्या संख्येतील इक्विटी शेअर्सचा समावेश आहे,
नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड, CLSA इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, DAM कॅपिटल ॲडव्हायर्स लिमिटेड आणि इंटेसिव्ह फिस्कल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (The “BRLMs”) आहेत.
या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे 4 डिसेंबर 2025 (the “RHP”) रोजी सादर केलेले इक्विटी शेअर्स नवी दिल्लीतील रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, दिल्ली आणि हरयाणा (the “RoC”) येथे सादर करण्यात आले असून BSE लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडवर (“NSE”) सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.
पिंपरी-चिंचवडच्या दीपाली अमृतकर-तांदळे यांना’मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स’ किताबसमृद्ध भारतीय संस्कृती व वारशाचे जागतिक व्यासपीठावर सादरीकरण पुणे: थायलंड येथे नुकत्याच झालेल्या ‘मिस अँड मिसेस हेरिटेज इंटरनॅशनल-२०२५’ स्पर्धेत पुण्याच्या दीपाली अमृतकर-तांदळे यांनी अभिमानास्पद कामगिरी करीत ‘मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स’ हा किताब जिंकला. समृद्ध अशा भारतीय संस्कृती व वारशाचे कलात्मक सादरीकरण त्यांनी जागतिक व्यासपीठावरून केले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हा किताब जिंकून भारतात परतल्यानंतर दीपाली अमृतकर-तांदळे यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत आपल्या यशाचा खडतर प्रवास उलगडला. नवी पेठेतील पत्रकार भवनात झालेल्या या संवादावेळी दीपाली यांचे पती संतोष, आई सुनंदा व वडील बाळकृष्ण अमृतकर, मुलगा रेयांश उपस्थित होते. दीपाली या पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळेगुरव येथील राहिवासी असून, आयटी क्षेत्रात नोकरी करतात. पत्नी व आई म्हणूनही त्या अतिशय उत्तम पद्धतीने आपली जबाबदारी सांभाळत आहेत.
दीपाली अमृतकर-तांदळे म्हणाल्या, “जागतिक व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करताना अभिमानाचा क्षण होता. किड्स, मिस आणि मिसेस या प्रकारांत विविध २५ देशांतील ४० स्पर्धक यामध्ये आले होते. त्यामधून माझे सर्वोत्तम योगदान देत जागतिक स्पर्धेत मिळवलेले हे यश नक्कीच आनंद देणारे आहे. जागतिक दृष्टिकोनातून शांतता, पर्यावरण, पर्यटन, संस्कृती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जागतिक वारसा यांना प्रोत्साहन देणारी ही स्पर्धा एप्लानेट प्रायव्हेट लिमिटेड (टर्निंग इव्हेंट्स इनटू इंडिमबल मेमरीज) संस्थेच्या वतीने आयोजिली जाते.”
“या स्पर्धेत विविध देशांतील स्पर्धकांनी सहभागी होत आपापल्या देशातील वारसास्थळे, संस्कृतींची झलक सादर करत जागतिक ऐक्याचा संदेश दिला. बंगाली पेहराव, राजस्थानी संस्कृती व नववारी साडीतील मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडवत गणेशस्तवन सादर केले. भारतीय संस्कृती पाहून उपस्थित सर्वानी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यावेळी भारतीय म्हणून माझा ऊर अभिमानाने भरून आला. आत्मविश्वास, सौंदर्य आणि भारतीय संस्कृतीच्या सादरीकरणातून अव्वल स्थान मिळवत ‘मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स’ हा किताब मिळवला,” अशी आनंदी प्रतिक्रिया दीपाली यांनी यावेळी दिली.
आयटी क्षेत्रात नोकरी करतानाच माझे हे ध्येय पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली. हा प्रवास खडतर होता. पण अनेक गोष्टी शिकवणारा, भारतीय म्हणून मान-सन्मान देणारा होता. पत्नी व आई म्हणून जबाबदारी पार पाडत असताना ‘पेजेंट ऑफ हेरिटेज’ या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व करत हा किताब मिळवणे हे अभिमान व स्फूर्ती देणारे आहे. – दीपाली अमृतकर-तांदळे, ‘मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स’
पुणे- ३९ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन रविवार दिनांक ७ डिसेंबर रोजी ‘नाईट मॅरेथॉन’ म्हणून आयोजित करण्यात आली आहे. या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे ‘एक्सपो’ प्रदर्शन आणि टी-शर्ट्स आणि बीब नंबर्स वाटप शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर रोजी सुरू झाले. या ‘एक्स्पो’ चे उद्घाटन शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर रोजी मॅरेथॉन भवन मैदान येथे सकाळी १०.३० वाजता सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार आणि महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षा नेहा दामले यांच्या हस्ते आणि अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू शकुंतला खटावकर, शांताराम जाधव, जॉईंट रेस डायरेक्टर गुरबंस कौर यांच्या उपस्थितीत झाले.. यावेळी मॅरेथॉन ट्रस्टचे विश्वस्त अॅड. अभय छाजेड, रेस डायरेक्टर सुमंत वाईकर, जॉईंट रेस डायरेक्टर रोहन मोरे, खो-खो वर्ल्ड कप कप्तान प्रतिक वाईकर, अक्षय जैन, सचिन अडेकर व असंख्य धावपटू उपस्थित होते. हे प्रदर्शन दि. ५ ते ७ डिसेंबर या कालावधीत दुपारी १२ ते सायंकाळी ६ यावेळी सर्वांसाठी खुले असेल.
विवध खेळांच्या संबंधी असणाऱ्या या प्रदर्शनात एकूण १० फुट x १० फुट आकाराचे १७ स्टॉल्स असून त्यामध्ये टी-शर्ट्स, स्पोर्ट्स शूज, एनर्जी ड्रिंक, एनर्जी जेल्स, सायकल, सॅाक्स ,स्पोर्ट्स वॉचेस, पेन रिलीफ,चॅाकलेट व ज्युस यांचे स्टॉल्स आहेत. लीप जेल, अग्वान्ते ऍक्टिव्हवेअर, सॉर्गेन, अॅन्टोमेक, ओ 7 स्पोर्ट्स, आयबीएस, रगड् इंडियन, मॅप्रो, टू काईंड न्यूट्रिशन, बँक ऑफ बडोदा, झिक्सा, महेश व्हॅल्यू प्रॉडक्ट्स लिमिटेड, एक्स्ट्रीम अॅडव्हेंचर स्पोर्ट्स इव्हॉल्व्ह, भन्साळी बिझग्रो एलएलपी, पोकारी या कंपन्यांनी यात सहभाग घेतला आहे.
नवी दिल्ली- राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची मतदान प्रक्रिया सुरू असतानाच मतमोजणीला अनपेक्षित अडथळा आला असून, हा प्रश्न आता थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार मतमोजणी पुढे ढकलण्यात आली होती. या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. मुख्य न्यायाधीश सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठापुढे प्रकरणी सुनावणी पार पडली. सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत मतमोजणी थेट 21 डिसेंबरलाच करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे मतदारांचे लक्ष आता आगामी मतमोजणीकडे लागले असून अनेक शहरांतील सत्तांतराविषयीची उत्सुकता वाढली आहे. न्यायालयाच्या या हस्तक्षेपामुळे निवडणूक प्रक्रियेतील अनिश्चितता काही काळ वाढल्याचे चित्र आहे. मात्र आता अंतिम मतमोजणी दिनांक निश्चित झाल्याने राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेत महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून, मतमोजणी आता 21 डिसेंबर रोजी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 2 डिसेंबर रोजी हा आदेश जारी केला होता. त्यावर आता सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे. 264 नगरपालिका व नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडले होते आणि 3 डिसेंबरला मतमोजणी होणार होती. मात्र, निवडणूक कार्यक्रमात केलेल्या बदलामुळे परिस्थिती बदलली. आता उर्वरित 24 नगरपालिका व नगरपंचायतींमध्ये आणि 76 नगरपालिका व नगरपंचायतींतील 154 सदस्यपदांसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याने, सर्वच निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबर रोजी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
न्यायालयाने मतदानानंतर होणाऱ्या मतदानोत्तर चाचण्यांचे निकालही 20 डिसेंबर रोजी मतदान संपल्यानंतर पुढील अर्धा तास होईपर्यंत जाहीर करता येऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे मतमोजणीसाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षा वाढली असली, तरी सर्व निकाल एकाच दिवशी जाहीर होणार असल्याने राजकीय क्षितिजावर उत्सुकता अधिक वाढली आहे. राज्यातील स्थानिक सत्तेचे चित्र कोणत्या दिशेने बदलते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे- अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या ओबीसी सेलच्या राष्ट्रीय समन्वयक म्हणून पुण्याच्या माजी महापौर व माजी आमदार दीप्ती चवधरी यांची नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे. कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षांच्या शिफारसीनुसार अ.भा. कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस खा. वेणूगोपाल यांनी याची घोषणा करून तसे पत्र दीप्ती चवधरी यांना दिले आहे. दीप्ती चवधरी या प्रथम पुणे महानगर पालिकेच्या नगरसेवक व नंतर पुण्याच्या महापौर बनल्या. तसेच विधान परिषदेच्या आमदार म्हणूनही एक शब्द त्यांनी प्रभावी कार्य केले. पुण्याच्या महापौर असताना विकासाचे अनेक प्रकल्प त्यांनी मार्गी लावले. महाराष्ट्रील अनेक क्रीडा संघटनांवर पदाधीकारी म्हणून त्यांनी काम केले आहे. कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून ओ.बी.सी. समाज संघटीत करण्यात त्यांनी मोठे योगदान दिले. मानसी महिला उन्नती केंद्र स्थापून त्यांनी शेकडो महिलांना स्वयंरोजगार मिळवून दिला. ‘कॉंग्रेस पक्षाने राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारी दिल्याबद्दल माझ्यावरील जबाबदारी अधिक वाढल्याचे सांगून पक्षअध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खर्गे, खा. सोनिया गांधी, खा. राहुल गांधी, खा. प्रियांका गांधी, प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व सर्व नेत्यांचे त्यांनी आभार मानले. राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म समभाव, सामाजिक एकता व महिलांचे सबलीकरण या कॉंग्रेस पक्षाच्या विचारांची शिदोरी सोबत घेऊन मी देशपातळीवर प्रभावी काम करेन’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवी दिल्ली- रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे राष्ट्रपती भवनात २१ तोफांच्या सलामीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. थोड्याच वेळात ते महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यासाठी राजघाटला भेट देतील. पुतिन यांच्यासोबत सात मंत्र्यांचे एक मोठे शिष्टमंडळ आहे.
मोदी आणि पुतिन यांच्यात आज दोन महत्त्वाच्या बैठका होणार आहेत, त्यापैकी एक बंद दाराआड होणार आहे. द्विपक्षीय बैठकीदरम्यान, भारत आणि रशिया यांच्यात २५ हून अधिक करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे.