Home Blog Page 27

महायुतीत जागेसाठी भीक मागावी लागते, शिवसेना-NCP चा पर्याय खुला

पुणे: महायुतीतून जागा मिळवण्यासाठी आरपीआयला भीक मागावी लागते, अशी खंत केंद्रीय राज्यमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. आगामी निवडणुकांमध्ये जागावाटपावरून त्यांनी आपल्याच पक्षावर नाराजी व्यक्त केली असून, युती न झाल्यास शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा इशाराही दिला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपकडे युतीसाठी आठवले यांनी ८-९ जागांची मागणी केली आहे.

रामदास आठवले यांनी महायुतीतील जागावाटपाच्या मुद्द्यावरून आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. निवडणुका जवळ आल्यावर सर्वच पक्ष जागा लढवण्याच्या तयारीत असतात, मात्र आरपीआयच्या बाबतीत तसे नाही, असे त्यांनी म्हटले आहे. “महायुतीतून जागा मिळाव्या म्हणून आपल्याला भीक मागावी लागते,” असे खंतजनक विधान रामदास आठवले यांनी केले आहे. या विधानामुळे आरपीआय आगामी निवडणुकांसाठी स्वबळावर तयारी करत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आठवले यांनी पिंपरी-चिंचवड शहरात आयोजित एका कार्यकर्ता मेळाव्यात हे वक्तव्य केले.पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांनी भाजपकडे युतीचा हात पुढे केला. मात्र, त्यांच्यासोबत युती न झाल्यास शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा पर्यायही त्यांनी खुला ठेवला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये युतीसाठी त्यांनी ८-९ जागांवर दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीने रामदास आठवले यांच्या पक्षाला अडगळीत टाकले आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना, आरपीआयच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. या निवडणुकांसाठीचा प्रचार आज दुपारी पाच वाजता संपुष्टात येईल आणि त्यानंतर मतदानाची प्रक्रिया पार पडेल. महाराष्ट्रामध्ये एकूण २८० जागांवर निवडणूक होत आहे. यापैकी २५६ जागांवर भाजप कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. अनेक ठिकाणी महायुतीतील मित्रपक्ष एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपकडे युतीचा हात पुढे करतानाच, त्यांनी युती न झाल्यास शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याची तयारी दर्शवली आहे. पिंपरीत युतीसाठी त्यांनी ८-९ जागांवर दावा केला आहे. यामुळे आता महायुतीत आरपीआय गटाची मनधरणी केली जाते का, की रामदास आठवले ‘ऐकला चलो रे’ चा नारा देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

रामदास आठवले यांच्या या भूमिकेमुळे आगामी निवडणुकांमध्ये महायुतीच्या जागावाटपावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरपीआयची स्वबळावर तयारी सुरू आहे का, याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. महायुतीतील जागावाटपावरून आठवले यांनी व्यक्त केलेली खंत ही आरपीआयच्या कार्यकर्त्यांमध्येही चर्चेचा विषय ठरली आहे. युतीमध्ये आरपीआयला योग्य स्थान मिळत नसल्याची भावना त्यांच्यात आहे.या सर्व घडामोडींमुळे महायुतीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रामदास आठवले यांच्या पुढील भूमिकेवर बरेच काही अवलंबून असणार आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे महायुतीतील इतर घटक पक्षांमध्येही अस्वस्थता पसरण्याची शक्यता आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावर सर्वच पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. रामदास आठवले यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपकडे युतीचा हात पुढे केला असला तरी, त्यांनी इतर पर्यायांचाही विचार केला आहे. यामुळे भाजपवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे आगामी काळात महायुतीमध्ये आणखी काही घडामोडी घडण्याची चिन्हे आहेत. आरपीआयला किती जागा मिळतात आणि त्यांची भूमिका काय राहते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

अनुपम खेर यांना डीएव्ही रत्न पुरस्कार प्रदान

0

मुंबई दि.३० – शिमला येथील डीएव्ही पब्लिक स्कूलचे माजी विद्यार्थी असलेले प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांना राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते डीएव्ही रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते डीएव्ही व्यवस्थापन समितीतर्फे संस्थेच्या प्रथितयश माजी विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच करण्यात आला. राज्यपालांनी यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच विविध क्षेत्रांच्या माध्यमातून देशाला योगदान देत असल्याबद्दल त्यांना कौतुकाची थाप दिली.

शिमला येथील डीएव्ही पब्लिक स्कूल येथे आपण पहिली ते अकरावी इतकी वर्षे शिक्षण घेतले. या संस्थेने आपल्याला भारतीय मूल्ये तसेच देश भक्तीचे संस्कार दिले, असे सांगताना आपल्या जीवनात डीएव्ही पब्लिक स्कूलचे महत्व अनन्य साधारण असल्याचे अनुपम खेर यांनी सांगितले. त्या काळातले शिक्षक विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा द्यायचे, परंतु ते प्रेम व संस्कार देखील द्यायचे असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला राज्यपालांच्या पत्नी दर्शना देवी, डीएव्ही कॉलेज व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पूनम सुरी, डीएव्हीच्या संचालिका डॉ. निशा पेशीन तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

राजेश अग्रवाल यांनी स्वीकारला मुख्य सचिव पदाचा पदभार

0

मुंबई, दि. ३० : मावळते मुख्य सचिव राजेशकुमार यांच्याकडून नवनियुक्त मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज पदभार स्वीकारला. शासनाने राज्याच्या मुख्य सचिव पदावर श्री. अग्रवाल यांच्या  नियुक्तीचे आदेश निर्गमित केले होते.

मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, कौशल्य विकास,  रोजगार व उद्योजकता विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा वर्मा, सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा, कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव (अ.व.सु) राधिका रस्तोगी, मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वैद-सिंगल, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव पंकज कुमार, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव रामास्वामी एन, दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी  यांच्यासह मुख्य सचिव कार्यालय व अन्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्राचा विकास आणि गौरव वाढविण्यासाठी प्रभावीपणे कार्यरत राहीन असे मुख्य सचिव पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर श्री. अग्रवाल म्हणाले.

राजेश अग्रवाल यांचा अल्प परिचय

राजेश अग्रवाल हे भारतीय प्रशासकीय सेवेतील महाराष्ट्र कॅडरचे 1989 चे अधिकारी असून त्यांचे मूळ गाव पंजाबमधील जालंधर हे आहे. त्यांनी कॉम्प्युटर सिस्टिम विषयामध्ये बी.टेक केले आहे.

आपल्या सेवाकाळात त्यांनी सहायक जिल्हाधिकारी रत्नागिरी, जिल्हा परिषद जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला येथे जिल्हाधिकारी, महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे उप विशेष आयुक्त, केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, भारत निवडणूक आयुक्त कार्यालयात संचालक, मंत्रालय मुंबई येथे सामान्य प्रशासन विभागाचे सचिव, इंटर्नल एक्स्चेंज ऑफ इंडिया नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मंत्रालय मुंबई येथे कृषी, मत्स्यव्यवसाय विभागात सचिव, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागात सचिव (अतिरिक्त कार्यभार), वित्त विभागात सचिव, सामान्य प्रशासन विभागात प्रधान सचिव (माहिती तंत्रज्ञान), वित्त विभागात लेखा व कोषागारे विभागात सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार, वित्त विभागात सचिव (लेखा व कोषागारे)(व्यय – अतिरिक्त कार्यभार), केंद्र सरकारच्या वित्त सेवा विभागात सह सचिव, केंद्र सरकारच्या आदिवासी विकास विभागात सह सचिव, केंद्र सरकारच्या कौशल्य विकास विभागाचे महासंचालक (प्रशिक्षण), पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस विभागात अतिरिक्त सचिव आणि वित्त सल्लागार, केंद्र सरकारच्या कौशल्य विकास विभागात सचिव, केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागात सचिव, मंत्रालय मुंबई येथे सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव अशा विविध पदांवर काम केले आहे.

उद्याचे जग एआयवर नव्हे ज्ञानोबा – तुकोबांच्या मंत्रावर चालेल:विश्वास पाटील


३० व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचा समारोप समारंभ

पुणे, दि. ३० नोव्हेंबर: ” सध्याचे जग हे एआयचे बनत आहे. एआय तंत्रज्ञानाला मर्यादा आहेत. मानवी बुद्धिमत्ता महत्वाची असून उद्याचे जग हे एआय च्या तंत्रावर नव्हे ज्ञानोबा – तुकोबांच्या मंत्रावर चालेल.” असे विचार ज्येष्ठ लेखक आणि ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ३० व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या समारोप समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी  एमकेसीएलचे वरिष्ठ सल्लागार व शास्त्रज्ञ डॉ. विवेक सावंत हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड, कुलगुरू डॉ. रविकुमार चिटणीस, प्र. कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, अधिष्ठाता डॉ. मिलिंद पात्रे हे यावेळी उपस्थित होते.
यावेळी विश्वशांतीच्या जीवन कार्यासाठी उपस्थित सर्वांच्या वतीने डॉ. विश्वनाथ कराड यांचा विशेष सत्कार करण्यात आला.  योगगुरू अनंत कोंडे व मारूती पाडेकर गुरूजी यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच पीस स्टडीज च्या वतीने ‘सेंटर फॉर एक्सेलेन्स इन संस्कृत अँड आयआरएस स्टडीज’ कोर्सच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.

विश्वास पाटील म्हणाले, ” शिवाजी महाराजांना जिजाऊंनी विश्वशांतीची प्रेरणा दिली. त्यांच्यावर संतांच्या विचारांचा प्रभाव होता. शक्ती, युक्ती आणि भक्तीचा संगमातून स्वराज्य निर्माण केले. हिंदवी स्वराज्यातून मानवी जातीचे कल्याण केले. म्हणून शिवाजी महाराज सर्वश्रेष्ठ राजे झाले.”

डॉ. विवेक सावंत म्हणाले, ” विज्ञान आणि अध्यात्म यांच्यामधील अद्वैत कल्पना ही आपली संतपरंपरा आहे. ती पुढे नेण्याचे काम डॉ. कराड सरांनी केले.आज  बहुविद्याशाखीय शिक्षण व्यवस्थेची गरज असून त्यातूनच भारत आत्मनिर्भर होईल. विद्यार्थ्यांना स्व चा शोध घ्यायला शिकवा. स्व च्या शोधाच्या साधनेतून विश्वशांती प्राप्त होईल.”

प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, ” भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचा संदेश जगभर पसरविण्यासाठी या व्याख्यानमाला महत्वपूर्ण आहेत. ज्ञानोबा तुकोबा टाळकुट्यांचा विषय नाही, हे एक चांगले जीवन जगण्याचे सारं आहे. माणूस म्हणून समृद्ध होण्यासाठी संतांचाच एकमेव मार्ग आहे.”

डॉ.आर. एम. चिटणीस यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. मिलिंद पात्रे यांनी सूत्रसंचालन केले.डॉ. मिलिंद पांडे यांनी आभार मानले.

भोर येथील तरुणाच्या आत्महत्या प्रकरणाची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीने घेतली दखल

0

पुणे, दि.30: भोर येथील मयूर संपत खुंटे वय १९ या तरुणाने केलेल्या आत्महत्त्या प्रकरणी समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयास प्राप्त झालेल्या अहवालानुसार भोर पोलीस स्टेशनमध्ये सदस्य सचिव जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती तथा सहायक आयुक्त, समाज कल्याण विशाल लोंढे यांच्यासह पोलीस विभागाचे अधिकारी आणि गट विकास अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी यांचे समवेत रविवारी भेट दिली.

भोर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा क्रमाक १७८/२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून घडलेल्या घटनेबाबतची माहिती घेतली तसेच पिडीत व्यक्तीच्या घरी जावून त्यांच्या कुटुंबियांचे सात्वंन केले. अॅट्रोसिटी कायद्यानुसार आवश्यक ती सर्व मदत तात्काळ करण्याबाबत आश्वासन देण्यात आले.

या प्रकरणी केससाठी विशेष वकीलाची नियुक्ती करण्याकरिता उपविभागीय अधिकारी, भोर विभाग, सासवड यांना जिल्हास्तरीय समितीमार्फत निर्देश देण्यात येतील, पोलीस विभागानेही कोणताही भेदभाव न करता, कोणत्याही गोष्टीला बळी न पडता योग्य पध्दतीने पारदर्शक पद्धतीने तपास करुन पिडीत व्यक्तीना न्याय द्यावा, असे श्री. लोंढे पोलीस विभागाला सूचना दिल्या आहेत.

आत्महत्येच्या प्रकरणात जादूटोणा विरोधी कायद्याची वाढीव कलमे; डॉ. नीलम गोऱ्हे आणि अंनिस यांच्या पाठपुराव्याला यश

0

नाशिक: पंचवटी येथील नेहा पवार आत्महत्या प्रकरणाला निर्णायक कलाटणी मिळाली आहे. महिलेच्या सात पानी चिठ्ठीत नमूद केलेल्या गंभीर बाबींचा अभ्यास करून नाशिक पोलिसांनी महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा २०१३ मधील कलम २(क) आणि २(ख) आता प्रकरणात समाविष्ट केले आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) आणि विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही महत्त्वाची कारवाई शक्य झाली.

नेहा पवार यांच्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत कौमार्य चाचणी आणि अंधश्रद्धेचा थेट उल्लेख होता. तरीही सुरुवातीच्या एफआयआरमध्ये या मुद्द्यांचा समावेश नव्हता. त्यानंतर अंनिसने पोलिसांना निवेदन देऊन जादूटोणा विरोधी कायद्याची लागू कलमे तातडीने लावण्याची मागणी केली. तसेच डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक आणि नाशिक पोलीस आयुक्तांना पत्र लिहून कठोर कारवाईची विनंती केली.

यानंतर तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्याकडे सुपूर्त झाली. तपासादरम्यान आरोपीच्या घरातून जादूटोणेसाठी वापरले जाणारे साहित्य पोलिसांना मिळाले. तसेच चिठ्ठीत नमूद केलेली कौमार्य चाचणी—जी २०१९ मध्ये गृह विभागाने डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्यामुळे गुन्हा घोषित केली आहे—ही बाबही तपासासाठी महत्त्वाची ठरली.

सर्व पुराव्यांचा विचार करून पोलिसांनी संबंधित जादूटोणा विरोधी कलमे जोडली. न्यायालयाने पुढील तपासासाठी आरोपींची पोलिस कोठडी ३ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे.

या निर्णायक कारवाईबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने डॉ. नीलम गोऱ्हे आणि नाशिक पोलिसांचे विशेष आभार मानले आहेत.

स्त्रीची सर्जनशीलता शारीर मर्यादांनी सीमित नाही : डॉ. सविता सिंह

साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या हीरक महोत्सवी वर्षाची सांगता

साहित्यप्रेमी भगिनी मंडळ आयोजित ४१ वे स्त्री साहित्य संमेलन उत्साहात

पुणे : पुरुषप्रधानता, पितृसत्ताक समाजव्यवस्थेमुळे स्त्रीचे कायम दमन करण्यात आले. त्याचे अवशेष आजही टिकून आहेत. मात्र स्त्री ही स्वतः ऊर्जारूप आहे. तिची सर्जनशीलता शारीर सीमेपुरती मर्यादित करण्यात पुरुषप्रधान सामाजिक ढाचा कारणीभूत आहे. या मर्यादा स्त्रीने प्रत्यक्षात उल्लंघून सर्जनाची कित्येक क्षेत्रे आपलीशी केली आहेत आणि यापुढेही हे स्त्रिया करत राहतील, असे प्रतिपादन प्रसिद्ध हिंदी कवयित्री, विचारवंत डॉ. सविता सिंह यांनी केले. शिक्षण आणि आर्थिक सत्ता, हे दोन महत्त्वाचे घटक स्त्रिया हाताळू लागतील, तशी परिस्थिती अधिक अनुकूल होत जाईल, असेही त्या म्हणाल्या.

स्त्रियांच्या साहित्यावर सातत्याने अभ्यास करणारी साहित्यिक व सांस्कृतिक संस्था असा लौकिक संपादन केलेल्या साहित्यप्रेमी भगिनी मंडळ या संस्थेच्या हीरक महोत्सवी वर्षाची सांगता ४१व्या स्त्री साहित्य संमेलनात डॉ. सिंह अध्यक्षपदावरून बोलत होत्या. संमेलन आज (दि. ३०) सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळात मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज, टिळक रोड येथे आयोजित करण्यात आले होते. मराठवाडा मित्रमंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब जाधव या संमेलनाचे उद्घाटक होते तर ज्येष्ठ अनुवादक उमा कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या अध्यक्ष, ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी, मंडळाच्या कार्यकारी विश्वस्त डॉ. मंदा खांडगे, कार्यवाह शलाका माटे, ज्योत्स्ना आफळे, मंजिरी ताम्हणकर हे मान्यवरही व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. सिंह पुढे म्हणाल्या, खिस्तपूर्व काळापासून उपलब्ध साहित्यिक संदर्भांमध्ये थेरीगाथांमधून तत्कालीन स्त्रियांनी स्वतःचे जगणे आणि अपेष्टामय जीवन वर्णन केले आहे. पुरुषप्रधानता आणि आर्थिक सत्ता, यांच्या जोरावर समाजात सदैव पुरुषी वर्चस्ववाद दिसत आहे. स्त्रीला वस्तू मानण्याची कुप्रथा तेव्हापासून आहे. स्त्रीला व्यक्त होण्याच्या शक्यता नव्हत्या. अल्पवयात विवाहामुळे तिला स्वतंत्र भवितव्यच उरले नव्हते. हे चित्र बदलायला फार वेळ लागला. पण ते हळूहळू बदलत गेलेले दिसते. हे बदल स्वागतार्ह आहेत. शिक्षणाने आणि आर्थिक स्वातंत्र्यामुळे आता हे बदल गतिमान होत आहेत. साहित्यनिर्मितीच्या संदर्भात तीन स्तरांवरचे लेखन विचारात घ्यावे लागेल. पुरुष लेखकांनी स्त्रियांसंबंधी केलेले लेखन, स्त्रियांनी मनोरंजनापलीकडे जात केलेले गंभीर लेखन आणि कुठल्याही बाह्य दबावाशिवाय निःसंकोचपणे व्यक्त झालेले स्त्रीचे मनोविश्व. हा तिसरा मुद्दा महत्त्वाचा आहे. स्त्रीच्या जीवनाशी पुरातन काळापासून सर्जनशीलतेचा जो मुद्दा अविभाज्यपणे जोडला गेला आहे, त्या शारीरभावापलीकडे जाणारे स्त्रीचे विकार-वासनांचे भावविश्व, त्याचे स्वरूप, तिची ऊर्जा महत्त्वाची आहे, असेही त्या म्हणाल्या. हाच भाव मांडणाऱ्या स्वलिखित दोन कविताही त्यांनी सादर केल्या.

उमा कुलकर्णी यांनी कन्नड साहित्यातील स्त्रियांच्या लेखनाचा मागोवा घेत, विविध कालखंडातील स्त्रियांची लेखनवैशिष्ट्ये कथन केली. मराठी लेखिकांनीही भाषेपलीकडे जात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या.

भाऊसाहेब जाधव यांनी संशोधनाधारित ग्रंथनिर्मिती सातत्याने करणारे मंडळ, अशा शब्दांत साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा गौरव केला. शिक्षणाचा प्रसार होत असल्याने आता ग्रामीण जीवनातील प्रश्नांचे व्यापक स्वरूप मुलींनी लेखनातून मांडावे, असे त्यांनी सुचवले.

स्वागतपर प्रास्ताविकात अंजली कुलकर्णी यांनी मंडळाच्या ६० वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. लिहिणाऱ्यांनी एकत्र यावे, लिहिण्याचा प्रवृत्त करावे आणि एकमेकींच्या साथीने परस्पर जाणिवा लख्ख, समृद्ध होत जाव्यात, हा उद्देश आहे. मंडळ साहित्यिक, संशोधनपर आणि सेवाभावी उपक्रमांतून वाटचाल करत असल्याचे त्या म्हणाल्या.

वीणा जोगळेकर यांनी सरस्वतीस्तवन गायिले. संमेलनाला साहित्य, संशोधन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. शलाका माटे यांनी सूत्रसंचालन केले.

‘सप्तधारा’चे प्रकाशन …

डॉ. सविता सिंह, डॉ. उमा कुलकर्णी आणि प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांच्या हस्ते साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त सात लेखिकांच्या कलाकृतींचा रसास्वाद मांडणाऱ्या ‌‘सप्तधारा‌’या ग्रंथाचे प्रकाशन साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा संशोधन विभाग व संस्कृती प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने झाले. इरावती कर्वे, दुर्गा भागवत, इंदिरा संत, गोदावरी परुळेकर, डॉ. विजया राजाध्यक्ष, अनुराधा पाटील आणि आशा बगे या लेखिकांच्या साहित्याचा मागोवा या ग्रंथात ११ लेखिकांनी घेतला आहे. या लेखिकांचे अल्पपरिचयही ग्रंथात समाविष्ट आहेत. डॉ. मंदा खांडगे आणि डॉ. सुजाता शेणई यांनी संपादन केले आहे. ग्रंथाची माहिती देताना डॉ. सुजाता शेणई म्हणाल्या, केंद्र सरकारने १९५५ पासून साहित्य अकादमी पुरस्कारांचे वितरण सुरू केले. आजवर ६९ मराठी ग्रंथांना अकादमी पुरस्कार मिळाले. त्यापैकी ७ लेखिकांच्या साहित्यिक कर्तृत्वाचा रसज्ञ मागोवा, आस्वाद, संशोधनपर विश्लेषण आणि संदर्भ यांनी ग्रंथ परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. या वेळी ज्येष्ठ लेखिकांचे प्रातिनिधीक सत्कार तसेच वार्षिक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

दुसऱ्या सत्रात प्राचार्य डॉ. हे. वि. इनामदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‌‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी जीवन‌’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून होता. यात डॉ. दीपक शिकारपूर आणि डॉ. सुजाता महाजन यांचा सहभाग होता. त्यांच्याशी डॉ. प्रांजली देशपांडे यांनी संवाद साधला. प्रबंध एकादशी समिती पुरस्कृत डॉ. हे. वि. इनामदार पुरस्काराने प्रा. डॉ. आशालता कांबळे यांना गौरविले जाणार आहे.

तिसऱ्या सत्रात ज्येष्ठ साहित्यप्रेमी भगिनींचा सत्कार करण्यात आला. त्यांनतर आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक, अभिनेते अभिराम भडकमकर यांची मुलाखत शैला मुकुंद यांनी घेतली.‘गोष्टीवेल्हाळ तात्या‌’ या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक व्यंकटेश माडगुळकर यांच्या कथांचे अभिवाचन अक्षय वाटवे आणि सहकाऱ्यांनी केले तर संमेलनाच्या समारोप डॉ. कीर्ती मुळीक यांच्या उपस्थितीत झाला.

पुण्यातील पंचतारांकित हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी अन साऱ्यांची धावपळ …

पुणे-“हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला आहे, तात्काळ हॉटेल रिकामे करा,” शुक्रवारी दुपारी हॉटेलच्या लँडलाईनवर खणखणलेल्या या एका फोनमुळे कोरेगाव पार्कमधील एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये एकच खळबळ उडाली. या धमकीमुळे पोलिस यंत्रणा आणि बॉम्ब शोधक पथकाची चांगलीच धावपळ झाली. मात्र, हॉटेलची कसून तपासणी केल्यानंतर हा फोन बनावट असल्याचे स्पष्ट झाले आणि हॉटेल प्रशासन व ग्राहकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, शुक्रवारी (ता. 29) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कोरेगाव पार्क भागातील एका नामांकित पंचतारांकित हॉटेलच्या लँडलाईनवर एका अज्ञात मोबाइल क्रमांकावरून फोन आला. फोनवरील व्यक्तीने हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देत हॉटेल रिकामे करण्यास सांगितले. या प्रकारामुळे हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली.

व्यक्तीने धमकी देताच, हॉटेलच्या सिक्युरिटी मॅनेजरने तत्काळ पुणे पोलिसांना याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून कोरेगाव पार्क पोलिस आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पथकाने संपूर्ण हॉटेल परिसर पिंजून काढला, प्रत्येक कोपरा तपासला. मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटके आढळून आली नाहीत. अखेर हा खोडसाळपणा असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी हॉटेलच्या सिक्युरिटी मॅनेजरने दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धमकी देण्यासाठी 9832252517 या मोबाइल क्रमांकाचा वापर करण्यात आला होता. पोलिस आता सायबर सेलच्या मदतीने संबंधित कॉलरचे लोकेशन ट्रेस करत असून लवकरच त्याला अटक करण्यात येण्यात असल्याची माहिती मिळत आहे.

राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचार मोठी गंभीर समस्या बनली असून पुणे शहरातील गुन्हेगारीही पोलिसांपुढे मोठे आव्हान बनले आहे. त्यामुळे, पुणे पोलिसांकडूनही सातत्याने सतर्कता बाळगली जाते. त्यातच अशा बनावट फोन कॉल्समुळे पोलिस यंत्रणेवर नाहक ताण येत आहे. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, मात्र सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

भाजपकडून वारंवार ऑफर,पण एकनाथ शिंदेंचे उपकार मी मरेपर्यंत विसरू शकत नाही. त्यामुळे त्यांना सोडून भाजपमध्ये जाणार नाही

:नीलेश राणे
मालवण -“मी निवडून आल्यापासून भाजप नेत्यांकडून मला वारंवार पक्षात येऊन निवडणूक लढवण्याच्या ऑफर मिळत होत्या. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर केलेले उपकार मी मरेपर्यंत विसरू शकत नाही. त्यामुळे मी त्यांना सोडून भाजपमध्ये जाणार नाही,” असा मोठा राजकीय गौप्यस्फोट शिवसेना शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांनी केला आहे. दुसरीकडे, मालवणमधील ‘स्टिंग ऑपरेशन’ प्रकरणी गुन्हा दाखल होताच राणे यांनी पोलिसांना “हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा,” असे उघड आव्हान दिल्याने कोकणातील वातावरण चांगलेच तापले आहे.

राज्यात नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच नुकतेच शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांनी मालवणमधील एका भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी जाऊन स्टिंग ऑपरेशन केले. तेव्हा संबंधित भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात पैशांनी भरलेली एक बॅग आढळून आली होती. तसेच हे पैसे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मतदारांना वाटायला दिल्याचा आरोप नीलेश राणे यांनी केला. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. यानंतर आता या प्रकरणात आमदार नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घडामोडींवर बोलताना नीलेश राणे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.

आमदार नीलेश राणे यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना मोठा गौप्यस्फोट केलाय. तिकीट वाटपाच्या वेळी घडलेला किस्सा सांगताना “मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तिकीट मागत होतो. तेव्हा त्यांनी ‘एका घरात तीन तिकिटे कशी देणार?’ असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर मी त्यांच्या पायाला हात लावून तिथून निघालो, असे नीलेश राणे म्हणाले.

आता निवडून आल्यावर भाजपचे नेते मला पक्षात येण्याचा आग्रह करत आहेत. ‘तू लोकसभा किंवा विधानसभा भाजपमधूनच लढव’, अशा ऑफर दिल्या जात आहेत. पण मी शिंदेंशी गद्दारी करणार नाही. मला मंत्रिपदाची किंवा मोठ्या पदाची लालसा नाही असे त्यांना स्पष्ट सांगितले,” असा गौप्यस्फोट नीलेश राणे यांनी केला.

नीलेश राणे यांनी यावेळी काही भाजप नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केली. मी प्रामाणिकपणे काम करतोय. शिवसेना ठाकरे गटातील लोकांना सहभागी करून घेतोय. भाजप नेत्यांना त्याचा त्रास होतोय. तू यांना का घेतोय? तुला तर भाजपमध्ये यायचे आहे. तर त्यांनी तू का घेतोय असे विचारले. मी ‘येणार नाही, घरी बसेन,’ असे सांगितले. जर मी एकनाथ शिंदेंना सोडले, तर मला देव माफ करणार नाही. मग मला राजकारणात काही नाही मिळालेमला कोणत्याही मंत्रिपदासाठी, मोठ्या पदात अजिबात रस नाही,” असे नीलेश राणे म्हणाले.

स्टिंग ऑपरेशन प्रकरणात नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत बोलताना नीलेश राणे यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “देशात हे पहिल्यांदाच घडत असेल की, ज्याने चोरी पकडून दिली, त्याच्यावरच गुन्हा दाखल झाला आहे. समोरच्या व्यक्तीला (भाजप पदाधिकारी) साधी नोटीस नाही, आणि माझ्यावर थेट एफआयआर? मी व्हिडिओत कुठेही तोडफोड केली नाही, हे लाईव्ह दिसले आहे. तरीही माझ्यावर गुन्हा दाखल झालाय. आता मला फक्त नोटीस नको, पोलिसांनी मला अटकच केली पाहिजे. मी पोलीस ठाण्याच्या बाजूलाच बसलो आहे, पाहूया पोलीस काय करतात,” असे थेट आव्हान त्यांनी दिले.

कथक नृत्यांगना श्रद्धा मुखडे हिला नृत्यगुरू पंडित बिरजू महाराज युवा पुरस्कार

देशपातळीवर घेण्यात आलेल्या स्पर्धेत बहुमान

पुणे : दिल्लीतील पंडित बिरजू महाराजजी कलाश्रमतर्फे देशपातळीवर घेण्यात आलेल्या नृत्य स्पर्धेत नृत्यगुरू शभा भाटे यांची शिष्या आणि पुण्यातील युवा कथक नृत्यांगना श्रद्धा मुखडे हिला पहिल्या नृत्यगुरू पंडित बिरजू महाराज युवा पुरस्काराने गौरविण्यात आले.

लखनऊ घराण्याचे प्रसिद्ध कथक नर्तक, पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांनी कलाश्रम ही संस्था स्थापन केली. पंडित बिरजू महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती चिरंतन रहाव्यात यासाठी संस्थेतर्फे पंडित बिरजू महाराज कलाश्रमतर्फे साधना महोत्सवात १८ ते २५ वयोगटातील कथक नृत्य कलाकारांसाठी देशपातळीवर कथक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संस्थेतर्फे अर्ज मागविण्यात आले होते. देशाच्या विविध भागातून या स्पर्धेत सहभागी झालेल्या कलाकारांमधून २० कलाकारांची अंतिम फेरीसाठी निवड झाली. अंतिम फेरी दिल्ली येथील त्रिवेणी कलासंगम ऑडिटोरिअम येथे घेण्यात आली. महाराष्ट्रातील केवळ तीन स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले होते.

नृत्यगुरू शभा भाटे यांच्याकडे गेल्या १० वर्षांपासून श्रद्धा मुखडे नृत्याचे प्रशिक्षण घेत असून त्यांच्या समवेत विविध नृत्य महोत्सवांमध्ये सहभागी होत आहे. कथक गुरू मंजुश्री चॅटर्जी आणि कथक गुरू डॉ. पद्मश्री शोभना नारायण यांच्या हस्ते श्रद्धा मुखडे हिला पंडित बिरजू महाराज युवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

गुरू मंजुश्री चॅटर्जी, गुरू गीतांजली लाल, संगीता सिन्हा, कल्पना वर्मा, अनिता कुलकर्णी यांनी स्पर्धेचे परिक्षण केले.

डिझेल भरण्यासाठी थांबलेला कंटेनर पेटला-कंटेनरमधील 40 न्यू ब्रँड ई-स्कुटर जळून खाक

पुणे – चाकण परिसरात पहाटेच्या सुमारास एक मोठी दुर्घटना टळली आहे. तळेगाव-चाकण रस्त्यावरील खराबवाडी गावात असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ डिझेल भरण्यासाठी आलेल्या एका मोठ्या कंटेनरला अचानक आग लागण्याची घटना घडली. या कंटेनरमध्ये 40 नवीन इलेक्ट्रिक दुचाकी ठेवण्यात आल्या होत्या. कंटेनर पूर्णपणे पेटल्याने या सर्व बाइक काही क्षणातच जळून खाक झाल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी या घटनेत झालेली नाही. मात्र रात्री शांत असलेल्या या परिसरात अचानक पेटलेल्या मोठ्या आगीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही आग नेमकी कशी लागली याचा तपास सुरू असून, प्राथमिक माहितीनुसार आग लागण्याचं कारण समजू शकलेले नाही.

ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. NL-01AE-7346 असा क्रमांक असलेला हा कंटेनर डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आला होता. कंटेनर चालकाने त्यासाठी आपल्या मालकाला फोन केला होता. मात्र मालकाने फोन न उचलल्याने चालकाने कंटेनर पंपाच्या शेजारीच उभा केला. तो काही काळ तिथेच थांबून मालकाशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात एका रस्त्याने जाणाऱ्या नागरिकाने कंटेनरमधून धूर येत असल्याचे चालकाला सांगितले. सुरुवातीला चालकाला काहीतरी किरकोळ दोष वाटला. पण धूर वाढत चालल्याने त्याने तातडीने परिस्थिती बघण्यासाठी कंटेनरचा मागील दरवाजा उघडला आणि क्षणाचा अवधी न लागता आगीच्या प्रचंड लाटा बाहेर पडल्या. समोर पेटलेल्या दुचाक्या पाहून तो हादरून गेला. चालकाने लगेच मदतीसाठी आरडाओरडा केला. कामगारांनीही स्वतःचे जीव वाचवणेच पसंत केले.

ही आग पेट्रोल पंपाच्या अगदी शेजारी लागल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती. पेट्रोल पंपावर इंधनाचे मोठे टँक असतात. थोडा जरी विलंब झाला असता किंवा आग पंपापर्यंत पोहोचली असती तर मोठा स्फोट होऊन व्यापक हानीकारक घटना घडली असती. मात्र पंपावरील कर्मचारी आणि चालकाने तातडीने पोलिस व अग्निशमन दलाला कळवले. काहीच मिनिटांत महाळुंगे MIDC पोलिस ठाण्याचे पथक तसेच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग पसरू न देण्याचा प्रयत्न केला आणि अखेरीस आगीवर नियंत्रण मिळवले.

ज्या इलेक्ट्रिक बाइक्स जळून नष्ट झाल्या त्या सर्व नवीन

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांची एकच धांदल उडाली. पहाटेचा वेळ असल्याने गावात शांतता होती. पण अचानक आगीचा धूर आणि आवाज ऐकूण जागे झालेले लोक घटनास्थळी धावले. मात्र पोलिसांनी सुरक्षा लक्षात घेऊन त्या परिसरात गर्दी रोखली. विशेष म्हणजे ज्या इलेक्ट्रिक बाइक्स जळून नष्ट झाल्या त्या सर्व नवीन होत्या. त्यांची डिलिव्हरी विविध ठिकाणी करण्यासाठी हा कंटेनर निघाला असल्याचे समोर आले आहे. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मालक आणि संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले असून, नुकसान भरपाईसंदर्भातही चर्चा होत आहे.

K रहेजा कॉर्पकडून पुण्या मुंबईतील 2,916 कोटी किंमतीची मालमत्ता अधिग्रहित करण्याची घोषणा

0

मुंबईमाइंडस्पेस बिझनेस पार्क्स REIT (BSE: 543217 | NSE: MINDSPACE) (‘माइंडस्पेस REIT’) — भारतातील 4 प्रमुख कार्यालयीन बाजारपेठांमध्ये स्थित उच्च गुणवत्तेच्या ग्रेड A ऑफिस पोर्टफोलिओचा मालक — यांनी आज K रहेजा कॉर्पकडून सुमारे ₹2,916 कोटी किंमतीची तीन प्रीमियम सीबीडी (सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट) मालमत्ता अधिग्रहित करण्याची घोषणा केली. माइंडस्पेस बिझनेस पार्क्स REIT च्या मॅनेजरच्या संचालक मंडळाने ही खरेदी तसेच ₹1,820 कोटीपर्यंतच्या प्रेफरेंशियल युनिट इश्यूला, युनिटहोल्डर्सची आणि आवश्यक नियामक मंजुरींच्या अधीन राहून, मंजुरी दिली आहे.

REIT नेखालीलअधिग्रहणांचीघोषणाकेलीआहे:

प्रमाणप्रॉपर्टीजप्रायव्हेटलिमिटेड (“प्रमाण”)  ही कंपनी मुंबईतीलवर्ली या अत्यंत प्रतिष्ठित मायक्रो-मार्केटमधील अॅसेंट – वरली या नव्याने पूर्ण झालेल्या प्रीमियम कमर्शियल टॉवरमध्ये सुमारे 0.45 मिलियनचौफूट क्षेत्रफळाची मालमत्ता मालकीची आहे. याशिवाय, पुणेच्याकल्याणीनगर या वाढत्या मायक्रो-मार्केटमध्ये सुमारे 0.1 मिलियनचौफूट क्षेत्रफळाची एक ऑफिस इमारतही प्रमाणच्या मालकीची आहे.

सनड्यूरिअलइस्टेटप्रायव्हेटलिमिटेड (Sundew Real Estate Private Limited – “सनड्यू RE”) ही कंपनी दी स्क्वेअर अव्हेन्यू 98 (बीकेसीअॅनेक्स) येथे सुमारे 0.2 मिलियनचौफूट प्रीमियम ऑफिस स्पेसची मालकी राखते. ही मालमत्ता मुंबईच्यावित्तीयकेंद्रात — बीकेसीआणिबीकेसीॅनेक्स — अत्यंत धोरणात्मक ठिकाणी असलेली ग्रेड ए ऑफिस इमारत आहे.

या अधिग्रहणांमुळे मिळणारे एकूण सुमारे 0.8 मिलियन चौ. फूट प्रीमियम लीज़ेबल क्षेत्रफळ स्वतंत्र मूल्यांकनकर्त्यांनी सुमारे ₹3,106 कोटी इतके सकल मालमत्ता मूल्य (Gross Asset Value – GAV) ठरवले आहे. अधिग्रहणाची अंतिम किंमत सुमारे ₹2,916 कोटी असेल, जी दोन्ही स्वतंत्र मूल्यांकनांच्या सरासरीपेक्षा सुमारे 6.1% कमी (डिस्काउंट) आहे. हे अधिग्रहण पूर्ण झाल्यानंतर, माइंडस्पेस REIT चे एकूण पोर्टफोलिओ सुमारे 39 मिलियन चौ. फूट इतके होईल आणि भारतातील सर्वात प्रभावशाली व्यावसायिक कॉरिडॉरमध्ये त्याची उपस्थिती आणखी मजबूत होईल.

प्रोफॉर्माआधारावरयाअधिग्रहणातूनखालीललाभअपेक्षितआहेत:●        NOI मध्येसुमारे 9% वाढ●        DPU मध्येसुमारे 1.7% वाढ (accretion)

●        Front-office पोर्टफोलिओव्हॅल्यूचाहिस्सावाढूनसुमारे 7.9% पर्यंतजाणे●        मार्कीटेनंट्समुळेसततआणिस्थिरउत्पन्नाचीखात्री

माइंडस्पेस REIT च्या या प्रीमियम प्रॉपर्टीज त्याच्या मुख्य ऑफिस पोर्टफोलिओला अधिक सक्षम बनवतात, तसेच महत्त्वाच्या बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये त्यांची उपस्थिती वाढवतात. या अधिग्रहणामुळे कंपनीची दीर्घकालीन रणनीती — म्हणजेच भारतातील सर्वात गतिमान शहरी बाजारांमध्ये स्थिर, उत्पन्न देणाऱ्या मालमत्तांचे मजबूत पोर्टफोलिओ तयार करणे — आणखी वेग घेते. या ग्रेड ए+ प्रॉपर्टीजमध्ये मार्क टू मार्केटची चांगली संधी असून, मजबूत रेंटल वाढ आणि व्हॅल्यू-ऍड करण्याची क्षमता स्पष्ट दिसते. या व्यवहारानंतर माइंटस्पेस REIT चा ग्रॉस अॅसेट व्हॅल्यू (GAV) अंदाजे 41,020 कोटी रुपयां वरून वाढून सुमारे 44,126 कोटी रुपये होणार आहे.

अधिग्रहणाबद्दलबोलतानामाइंडस्पेस REIT चेएमडीआणिसीईओश्रीरमेशनायरम्हणाले“या प्रीमियम मालमत्ता माइंडस्पेस REIT च्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करणे म्हणजे मुंबईतील सर्वाधिक मागणी असलेल्या सीबीडी ऑफिस डिस्ट्रिक्टमध्ये आमची उपस्थिती आणखी मजबूत करण्याचा धोरणात्मक निर्णय आहे. या उच्च-गुणवत्तेच्या, संस्थात्मक मालमत्ता आहेत, ज्यांना मजबूत कॅशफ्लो आहे आणि वॉल स्ट्रीटमधील काही मोठे अँकर टेनंट्स येथे आहेत. या व्यवहारामुळे आमच्या पोर्टफोलिओचा आकार, स्थिरता आणि दीर्घकालीन वाढ अधिक बळकट होते. आमच्यासाठी सूत्र सोपे आहे — उत्तम ठिकाणी गुंतवणूक करा, उत्कृष्ट टेनंट्ससोबत काम करा आणि आमच्या युनिटहोल्डर्ससाठी टिकाऊ मूल्य निर्माण करा. हे अधिग्रहण आमच्या ‘लव्ह्ड वर्कस्पेस, मॅक्सिमायझिंग व्हॅल्यू’ या दृष्टीकोनाशी पूर्णपणे सुसंगत आहे आणि भारताच्या ऑफिस रिअल इस्टेट क्षेत्रातील माइंडस्पेस REIT ची नेतृत्वस्थानी भूमिका आणखी मजबूत करते.”

ट्रान्झॅक्शनहायलाइट्स :

अॅसेट्सवरएकनजर :

●        एकूण लीझेबल क्षेत्रफळ अंदाजे 0.8 msf.

●        स्वतंत्र मूल्यांकनानुसार एकूण ग्रॉस व्हॅल्यू अॅसेट (GAV) सुमारे 3,106 कोटी रुपये.

●        मालमत्तांमध्ये वॉल स्ट्रीटवरील सर्वात मोठ्या दोन कंपन्यांसह अनेक मार्क्यू टेनंट्स.

●        निश्चित व्यापलेली जागा : अॅसेंट-वरळी : अंदाजे 86% (इमारत वर्ष 2025 मध्ये पूर्ण), दी स्क्वेअर अव्हेन्यू 98 (बीकेसी अॅनेक्स): 100%, ऑफिस बिल्डिंग (पुणे): 100%

पोर्टफोलिओएन्हान्समेंट

●        मुंबईतील प्रमुख फ्रंट-ऑफिस सी.बी.डी. बाजारपेठांमध्ये माइंडस्पेस REIT.ची उपस्थिती अधिक मजबूत होते.

●        सुमारे 7 वर्षांचा डब्ल्यू.ए.एल.ई. (WALE), ज्यामुळे स्थिर उत्पन्नासोबत वाढीचीही शक्यता निर्माण होते.

●        द स्क्वेअर अव्हेन्यू 98 (बी.के.सी. अ‍ॅनेक्स) मध्ये मार्क-टू-मार्केट क्षमतेमुळे आणि एरिया एन्हान्समेंटच्या संधीमुळे मूल्यवर्धन शक्य आहे.

फायनान्शियलहायलाइट्स

●        सुमारे ₹2,916 कोटी (एंटरप्राइज व्हॅल्यू) इतक्या किंमतीत अधिग्रहण; दोन स्वतंत्र व्हॅल्युएशन्सच्या सरासरीपेक्षा अंदाजे 6.1% डिस्काऊंट.

●        खरेदी मूल्य सुमारे ₹1,820 कोटी (१००% इक्विटीसाठी).

●        वित्त वर्ष 26 साठी एन.ओ.आय.मध्ये सुमारे ₹226 कोटींची वाढ (प्रो-फॉर्मा आधारावर); म्हणजेच अंदाजे 9% वाढ.

पोस्टअधिग्रहणपोर्टफोलिओमेट्रिक्स

●        पोर्टफोलिओ आकार सुमारे 38.2 एम.एस.एफ. (msf) वरून सुमारे 39 एम.एस.एफ. पर्यंत वाढणार.

●        ग्रॉस अ‍ॅसेट व्हॅल्यू (GAV) सुमारे ₹41,020 कोटींवरून सुमारे ₹44,126 कोटीं पर्यंत वाढणार.

●        लोन-टू-व्हॅल्यू रेशो (LTV) 24.2% वरून किंचित वाढून 24.7% होणार; वाढीसाठी पुरेशी क्षमता उपलब्ध.

वर्षानुवर्षे, माइंडस्पेस REIT (Mindspace REIT) ने धोरणात्मक अधिग्रहणांद्वारे आपला पोर्टफोलिओ सातत्याने वाढवला आहे. यामध्ये पहिले स्पॉन्सर अधिग्रहण म्हणून सुमारे 1.82 एम.एस.एफ. (msf) क्षेत्रफळाचा कॉमर्जोन रायडुर्ग प्रकल्प; माइंडस्पेस माधापूर येथे थर्ड-पार्टी युनिट्सची पुनर्खरेदी; चेन्नईतील कॉमर्जोन पोरूर येथे पूर्ण मालकीसाठी केलेले एकत्रीकरण; पुण्यातील कॉमर्जोन येरवडा येथे निवडक विस्तार; तसेच आपल्या पोर्टफोलिओ पार्क्सच्या बाहेर केलेले पहिले थर्ड-पार्टी अधिग्रहण — सुमारे 0.81 एम.एस.एफ. क्षेत्रफळाचा ‘द स्क्वेअर, 110 फायनान्शियल डिस्ट्रिक्ट’ (पूर्वीचे Q-City) ह्यांचा विशेष समावेश आहे. सद्यचा व्यवहार हा माइंडस्पेस REIT. चा दुसरा स्पॉन्सर अधिग्रहण व्यवहार ठरतो, ज्यामुळे त्यांची शिस्तबद्ध, मूल्यवर्धक वाढ धोरण अधिक दृढ होते आणि युनिटहोल्डर्सना सातत्याने मूल्य देण्याची त्यांची वचनबद्धताही अधोरेखित होते. ही व्यवहार-शृंखला आतापर्यंत झालेल्या अंदाजे 3.2 एम.एस.एफ. अधिग्रहणांवर आधारित असून, माइंडस्पेस REIT.च्या सातत्यपूर्ण आणि शिस्तबद्ध वाढ प्रवासातील आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरते.

शिक्षण हेच परिवर्तनाचे मोठे साधन : डॉ. गजानन एकबोटे

दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीतर्फे डॉ. अ. ल. देशमुख यांना ‌‘आबासाहेब अत्रे पुरस्कार‌’ तरविनया देसाई, संजय भैलुमे यांचा ‌‘इंदिरा आबासाहेब अत्रे पुरस्कार‌’

पुणे : शिक्षण हे परिवर्तनाचे मोठे साधन आहे. शिक्षणामुळे केवळ स्वतःमध्ये नाही तर समाज आणि देशामध्येही बदल घडून येण्यास मदत होते. त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले तर समाज परिवर्तन होणार नाही. त्यामुळे शिक्षणाला कायमच विशेष महत्त्व असायला हवे, असे मत सर्जनशील शिक्षणतज्ज्ञ व प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी व्यक्त केले.

दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीतर्फे किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत ‌‘आबासाहेब अत्रे पुरस्कार‌’ ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांना तर ‌‘इंदिरा आबासाहेब अत्रे पुरस्कार‌’ क्रीडा क्षेत्रातील निवृत्त शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते संजय भैलुमे तसेच कर्णबधिर मुलांच्या शिक्षिका, निवेदक, लेखिका विनया देसाई यांना डॉ. एकबोटे यांच्या हस्ते आज (दि. २९) प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. संस्थेच्या खुल्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्काराचे हे १४ वे वर्ष आहे.

डॉ. देशमुख यांना दिल्या गेलेल्या पुरस्काराचे स्वरूप पंधरा हजार रुपये व मानचिन्ह तर संजय भैलुमे व विनया देसाई यांना दिल्या गेलेल्या पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी दहा हजार रुपये व मानचिन्ह असे आहे. दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष संजीव महाजन, सचिव प्रफुल्ल निकम, डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनचे मानद अध्यक्ष अशोक वळसंगकर मंचावर होते. पुरस्कार संयोजन समिती प्रमुख प्रसाद भडसावळे, डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनच्या सचिव डॉ. भारती एम. डी. यांची उपस्थिती होती.

डॉ. एकबोटे म्हणाले, आबासाहेब अत्रे हे माझ्या वडिलांचे जवळचे मित्र होते, त्यामुळे त्या काळात प्रतिकूल परिस्थितीत आबासाहेबांनी ही शाळा उभी करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी काय कष्ट घेतलेत ते मी जवळून पाहिले आहेत. अशा व्यक्तींमुळेच शिक्षणाचे महत्त्व टिकून आहे. आपला देश हा राजकारण्यांमुळे चालत नाही, तर समाजात विविध क्षेत्रात मनापासून काम करणाऱ्या व्यक्तींमुळे हा देश चालत आहे. अशा व्यक्ती समाजातील आदर्श आणि हिरे असतात.

शिक्षणावर विश्वास ठेवायलाच हवा..

शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख म्हणाले, सध्या शिक्षणाची मोठ्या प्रमाणात ससेहोलपट झाली आहे. पूर्वीच्या काळातील शिक्षण आणि आताचे शिक्षण यामध्ये खूप मोठी दरी निर्माण झाली आहे. शिक्षणाशिवाय देश, समाज मोठा होऊ शकत नाही, त्यामुळे शिक्षणावर विश्वास ठेवायलाच हवा.

विनया देसाई आणि संजय भैलुमे यांनीही मनोगत व्यक्त केले. उदय जगताप यांनी संजय भैलुमे यांचा, सुप्रिया गोडबोले यांनी विनया देसाई यांचा आणि स्नेहल दामले यांनी डॉ. अ. ल. देशमुख यांचा परिचय करून दिला. अपर्णा डोळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

जगाला भारताने शिक्षणाची परंपरा दिली असून आजही भारतीय शिक्षण पद्धतीमुळे देश अनेक क्षेत्रात उंचीवर आहे. शिक्षणाच्या माध्यमातून प्रेरणा आणि प्रोत्साहन द्यायला हवे, हे सांगत असताना लाडकी बहिण योजनेसोबतच सरकारने लाडका शिक्षक योजना राबवायला हवी. राजकारण्यांनी शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा.

–        डॉ. अ. ल. देशमुख

मराठी साहित्य आणि प्रकाशन व्यवसायात उत्थानाची गरज : भारत सासणे

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे अशोक मुळे यांचा जीवनगौरव तर ल. म. कडू यांचा साहित्यसेवा कृतज्ञता  पुरस्काराने गौरव

पुणे : नव्या काळाची आव्हाने स्वीकारत मराठी भाषा, साहित्य आणि प्रकाशन व्यवसायाला उत्थानाची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक,  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी भारत सासणे यांनी केले.

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ आयोजित उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती, दिवाळी अंक निर्मिती पुरस्कार, जीवनगौरव आणि साहित्यसेवा पुरस्कार वितरण सोहळ्यात सासणे अध्यक्षपदावरून बोलत होते. टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथील सभागृहात  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  ज्येष्ठ बालसाहित्यकार ल. म. कडू, डिंपल प्रकाशनाचे अशोक मुळे, प्रसिद्ध लेखक, नाटककार,  दिग्दर्शक, अभिनेते योगेश सोमण, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, पराग लोणकर व्यासपीठावर उपस्थित होते.

या समारंभात डिंपल पब्लिकेशनचे संचालक अशोक मुळे यांना जीवनगौरव पुरस्काराने तर बालसाहित्यकार ल. म. कडू यांना साहित्यसेवा कृतज्ञता  पुरस्काराने गौरविण्यात आले. सुप्रसिद्ध अभिनेते, लेखक, दिग्दर्शक योगेश सोमण यांची प्रमुख उपस्थिती होती.

सासणे पुढे म्हणाले, आपली प्राचीन ज्ञानपरंपरा पोहोचणारे ऋषी, हे प्रकाशन व साहित्याचे आद्य रूप म्हटले पाहिजे. लेखकाचे शब्द रसिकांसमोर, वाचकांसमोर आणणारा दुवा, प्रकाशक असतो. नव्या काळात वाचक कमी होणे, मराठी वाचन घटणे अशी आव्हाने आहेत.  त्यासाठी मराठीमधील अभिजात साहित्य पुन्हा प्रकाशित करण्याची आवश्यकता आहे. मराठी साहित्य आणि प्रकाशन व्यवसायाने कात टाकून उभे राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.

योगेश सोमण यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम या वेळी आयोजित करण्यात आला होता. त्यांच्याशी अमृता कुलकर्णी आणि पराग लोणकर संवाद साधला. सोमण म्हणाले, मी लेखन, दिग्दर्शन, प्रशिक्षण आणि अभिनय क्षेत्रात काम करतो. यापैकी लेखकाची आणि प्रशिक्षकाची भूमिका मला सर्वांत जवळची वाटते. सोमण यांनी त्यांच्या जडणघडणीची माहिती या वेळी दिली. पं. सत्यदेव दुबे, वासुदेव पाळंदे, प्रकाश पारखी यांच्यामुळे अभिनयाचे मार्गदर्शन मिळाले. लेखक म्हणून मी अनेक साहित्यप्रकार हाताळले असले तरी एकांकिका लेखनात मी मनापासून रमतो. एकांकिका लेखन हा साहित्याचा स्वतंत्र प्रकार आहे, असे मत सोमण यांनी व्यक्त केले. हिंदी चित्रपटसृष्टीत काम करताना, तेथील व्यावसायिकतेचे कौतुक वाटते. ही मंडळी मराठी रंगभूमीवरील कलावंतांना अतिशय मानतात, हे जाणवते.  

मनोगत मांडताना ल. म. कडू म्हणाले, मी गेल्या ४० वर्षांपासून मुलांत मूल होऊन रमत आलो आहे. मूल समजून घेणे अवघड असते. ते मूलपण समजून, त्यांच्या वृत्ती, भावनांचा वेध लेखकांनी घेतला पाहिजे. वयोगट लक्षात घेऊन बालसाहित्यिकांनी लिहिले पाहिजे. मुलांशी संवाद साधून, त्यांना पुनरावृत्ती आवडते, हे जाणून लेखकांनी लिहावे. तसेच मनोरंजनाला प्राधान्य, प्रबोधन नंतर, हा क्रम लक्षात घ्यावा, असेही ते म्हणाले. प्रकाशन व्यवसाय माझ्यासाठी व्यवसाय नाही. माझ्यासाठी ते व्रत आहे, हे मानूनच मी आजवरची वाटचाल केली आहे, असे त्यांनी सांगितले.

अशोक मुळे यांनी डिंपल प्रकाशनाच्या माध्यमातून गेली ५० वर्षे केलेल्या साहित्यसेवेचा गौरव झाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शाळकरी वयात वाचनालयात नोकरी केल्याने पुस्तकांविषयी आस्था निर्माण झाली. नंतर सतत चांगलीच माणसे भेटत गेल्याने व्यावसायिक क्षेत्रात दखलपात्र काम केल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

चक्रीवादळ दितवाह आज तामिळनाडू-पुदुच्चेरीला धडकणार:वादळासह पावसाचा इशारा, शाळा बंद; श्रीलंकेत 150 लोकांचा मृत्यू, 300 भारतीय अडकले

0

चेन्नई- ‘दितवाह’ चक्रीवादळ रविवारी तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टीवर धडकेल. हवामान विभागाने कुड्डालोर, नागपट्टिनम, मयिलादुथुराई, विल्लुपुरम, चेंगलपट्टू यासह अनेक भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.तामिळनाडूच्या किनारी जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्यासाठी NDRF आणि SDRF सह 28 हून अधिक आपत्कालीन प्रतिसाद पथके तैनात करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त, महाराष्ट्र आणि गुजरातच्या NDRF तळावरून 10 पथके चेन्नईला पोहोचली आहेत.

तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे शनिवारी 54 विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली होती. पुद्दुचेरी सेंट्रल युनिव्हर्सिटीने चक्रीवादळामुळे सुट्टी जाहीर करून सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. पुद्दुचेरी, कराईकल, माहे आणि यनममधील सर्व शाळा आणि महाविद्यालये सोमवारपर्यंत बंद राहतील.

श्रीलंकेत ‘दितवाह’मुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे 123 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 150 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. चेन्नईची विमानांची उड्डाणे रद्द झाल्यामुळे कोलंबो विमानतळावर सुमारे 300 भारतीय प्रवासी गेल्या तीन दिवसांपासून अडकले आहेत. हे सर्व दुबईहून श्रीलंकेमार्गे भारतात येणार होते.दितवाह चक्रीवादळाच्या प्रभावामुळे 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत आंध्र प्रदेशच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, चक्रीवादळ नैऋत्य बंगालच्या उपसागरात आणि उत्तर श्रीलंकेजवळ तयार झाले आहे. हे गेल्या सहा तासांत 10 किमी प्रति तास वेगाने उत्तरेकडे सरकले आणि सकाळी 11:30 वाजेपर्यंत तेथेच केंद्रित होते.

हवामान विभागाने सांगितले की, उद्या म्हणजेच 30 नोव्हेंबर रोजी प्रकाशम, नेल्लोर, कडप्पा आणि अन्नामय्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल.

भारताने श्रीलंकेच्या मदतीसाठी ‘ऑपरेशन सागर बंधू’ सुरू केले

दितवाह चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसामुळे श्रीलंकेला मदत करण्यासाठी भारताने शनिवारी ‘ऑपरेशन सागर बंधू’ सुरू केले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी X वर सांगितले की, भारतीय वायुसेनेचे IL-76 विमान कोलंबो येथे पोहोचले आहे. NDRF च्या 80 कर्मचाऱ्यांच्या पथकांसह हवाई आणि सागरी मार्गाने आतापर्यंत सुमारे 27 टन मदत सामग्री पोहोचवण्यात आली आहे.
भारतीय हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आनंद कुमार दास म्हणाले, “चक्रीवादळ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या जवळ येताच, वाऱ्याचा वेग ताशी ९० किमीपर्यंत पोहोचू शकतो. नंतर, त्यांचा वेग कमी होऊन तो ताशी ६०-७० किमीपर्यंत कमी होईल. त्यानंतर उत्तर तामिळनाडूच्या किनारी भागात खूप मुसळधार पाऊस पडेल. तेलंगणाच्या काही जिल्ह्यांमध्येही पाऊस पडू शकतो.”