Home Blog Page 2614

राज्यात आज ५२२ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण संख्या ८५९० – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि. २७: राज्यात आज कोरोनाबाधित ५२२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ८५९० झाली आहे. आज ९४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२८२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ६९३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख २१ हजार ५६२ नमुन्यांपैकी १ लाख १२ हजार ५२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर ८५९० जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ४५ हजार ६७७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ९ हजार ३९९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात २७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३६९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे १५, अमरावती शहरातील ६, पुणे शहरातील ४ तर जळगाव येथील १ आणि औरंगाबाद शहरातील १ आहे. अमरावती शहरात झालेले मृत्यू हे दिनांक २० ते २५ एप्रिल २०२० या कालावधीतील आहेत.

आज झालेल्या मृत्यूंपैकी १५ पुरुष तर १२ महिला आहेत. आज झालेल्या २७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १३ रुग्ण आहेत तर ८  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ६ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या २७ रुग्णांपैकी २२ जणांमध्ये (८१ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यातील एकाला एचआयव्ही आणि आणखी एक रुग्णाला कर्करोग होता.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: ५७७६ (२१९)

ठाणे: ४० (२)

ठाणे मनपा: २९५ (४)

नवी मुंबई मनपा: १३५ (३)

कल्याण डोंबिवली मनपा: १४५ (३)

उल्हासनगर मनपा: २

भिवंडी निजामपूर मनपा: १४

मीरा भाईंदर मनपा: १२१ (२)

पालघर: २५ (१)

वसई विरार मनपा: १२१ (३)

रायगड: १८

पनवेल मनपा: ४३ (१)

ठाणे मंडळ एकूण: ६७३५ (२३८)

नाशिक: ४

नाशिक मनपा: १९

मालेगाव मनपा:  १२३ (१२)

अहमदनगर: २६ (२)

अहमदनगर मनपा: १६

धुळे: ४८(२)

धुळे मनपा: १७ (१)

जळगाव: १८ (४)

जळगाव मनपा: २ (१)

नंदूरबार: ११ (१)

नाशिक मंडळ एकूण: २४४ (२३)

पुणे:५८ (३)

पुणे मनपा: ९६९ (७४)

पिंपरी चिंचवड मनपा: ७२ (३)

सोलापूर: ६

सोलापूर मनपा: ५९ (५)

सातारा: २९ (२)

पुणे मंडळ एकूण: ११९३ (८७)

कोल्हापूर: ७

कोल्हापूर मनपा: ४

सांगली: २६

सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)

सिंधुदुर्ग: १

रत्नागिरी: ८ (१)

कोल्हापूर मंडळ एकूण: ४७ (२)

औरंगाबाद:१

औरंगाबाद मनपा: ५१ (६)

जालना: २

हिंगोली: ८

परभणी: ०

परभणी मनपा: १

औरंगाबाद मंडळ एकूण: ६३ (६)

लातूर: १० (१)

लातूर मनपा: ०

उस्मानाबाद: ३

बीड: १

नांदेड: ०

नांदेड मनपा: ३

लातूर मंडळ एकूण: १७ (१)

अकोला: ११ (१)

अकोला मनपा: १८

अमरावती: १

अमरावती मनपा: २१ (७)

यवतमाळ: ६२

बुलढाणा: २१ (१)

वाशिम: १

अकोला मंडळ एकूण: १३५ (९)

नागपूर: ४

नागपूर मनपा: १२३ (१)

वर्धा: ०

भंडारा: १

गोंदिया: १

चंद्रपूर: ०

चंद्रपूर मनपा: २

गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: १३१ (१)

इतर राज्ये: २५ (२)

एकूण: ८५९०  (३६९)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ५७२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ७८६१  सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ३२.२८ लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

‘हॉट स्पॉट’ भागातील 72 हजार कुटुंबांचे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करण्याचा प्रयत्न

0

पुणे : शहरातील सर्वाधिक रुग्ण आढळून आलेल्या ‘हॉट स्पॉट’ भागातील रुग्ण संख्या नियंत्रित करण्याकरिता महापालिकेने ‘रेमिडी’ शोधून काढली असून या भागातील तब्बल साडेतीन लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे स्थलांतर केले जाणार आहे. जवळच्या पालिकेच्या शाळा, मंगल कार्यालये आणि वसतिगृहांमध्ये जवळपास 72 हजार कुटुंबांचे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर केले जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.
शहरातील कोरोना रुग्ण संख्या एक हजाराच्या घरात पोचली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण भवानी पेठ, ढोले पाटील रस्ता, कसबा-विश्रामबाग, शिवाजीनगर-घोले रस्ता आणि येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे. एकूण रुग्णसंख्येच्या जवळपास ७० टक्के रुग्ण याच भागातील आहेत. यातील बहुतांश भाग हा झोपडपट्टीबहुल असून अत्यंत दाटीवाटीचा हा परिसर आहे. त्यामुळे सामाजिक संक्रमणाचा धोकाही वाढला आहे. हा धोका अधिक वाढू नये याकरिता येथील कुटुंबांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एका आड एक अशी कुटुंब स्थलांतरित केली जाणार आहेत.
महापालिकेने या भागावर लक्ष केंद्रित केले आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह पालिकेच्या आणि पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी या ठिकाणांना भेट देत व्यवस्था करण्यात आलेल्या शाळा, वसतिगृह आणि मंगल कार्यालयांची पाहणी केली. यासोबतच एसआरएच्या रिकाम्या इमारतींमध्ये काही कुटुंब हलविली जाऊ शकतात का याचाही अंदाज घेतला जात आहे.
महापालिकेने ७२ हजार कुटुंबे स्थलांतर करण्याचे नियोजन केले असून टप्प्याटप्प्याने या शाळांमध्ये ही कुटुंब १५ ते २० दिवसांसाठी ठेवण्यात येणार आहेत. सामाजिक संसगार्चा धोका टाळण्याकरिता दाटीवाटी कमी करण्याचा विचार यामागे आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे २५ हजार कुटुंबे स्थलांतरीत केली जाण्याची शक्यता असून या शाळांची शनिवार-रविवार अशा दोन दिवसात स्वच्छता करण्यात आली असून याबाबतचे आदेशही काढण्यात आल्याचे आयुक्त गायकवाड यांनी संगीतले. शाळांमध्ये आणि मंगल कार्यालयांमध्ये स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, वीज पुरवठा आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर, खासगी वसतिगृहे ताब्यात घेण्याची तयारी पालिकेने चालविली आहे. या शाळा, मंगल कार्यालये आणि वसतिगृहांमध्ये ठेवण्यात येणा?्या नागरिकांना स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमांतून जेवण, न्याहारी पोचविण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

महाराष्ट्रात ठिकठिकाणी अडकलेल्या सर्व भूमिपुत्रांना त्यांच्या घरी जाण्यासाठी विशेष बसेसची व्यवस्था करा

0

विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची मागणी
मुंबई दि. २७ एप्रिल- विविध राज्यांमधील परप्रांतिय मजूरांना आपल्या गावी पाठविण्याची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मागणी योग्य आहे. आमचा त्या मागणीला पाठिंबा आहे. पण कोरोनाच्या या संकटांत जो महाराष्ट्रांतर्गत भूमिपूत्र जिल्हा-जिल्हा मध्ये अडकला आहे. जे कोणी स्थानिक भूमिपुत्र व्यवसाय, नोकरी, धंदा, शिक्षण, वैदयकीय कारणांसाठी विविध ठिकाणी लॉकडाऊनमुळे अडकले आहेत त्या सर्व स्थानिक भूमिपुत्रांना त्यांच्या घरी जाण्यासाठी राज्य सरकारने विशेष बसेसेची व्यवस्था करण्याची आग्रही मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केला आहे.
कोरोनो च्या लॉकडाऊन मुळे आपला स्थानिक भूमिपूत्र जिल्ह्यामध्ये अडकला आहे, लॉकडाऊन मुळे जिल्हांतर्गत बंदी असल्यामुळे त्या भूमिपुत्रांना आपापल्या जिल्ह्यात जाता येत नाही ,त्यामुळे आज त्या भूमिपूत्रांचे कुटुंबिय चिंतेत आहे, मग या स्थानिक भूमिपुत्रांचा वाली कोण आहे. असा सवाल प्रविण दरेकर यांनी केला आहे.
राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी तात्काळ व प्राधान्याने विशेष बस व्यवस्था करावी अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे स्थानिक भूमिपुत्र बांधव व भगिंनींनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये जाता यावे यासाठी राज्य सरकारने युध्द पातळीवर बसेसची व्यवस्था करुन एक विशेष अभियान राबवावे असेही दरेकर यांनी नमुद केले आहे.

लॉकडाऊनचे उल्लंघन- एकाच दिवसात १०३७ गुन्हे दाखल

0

मुंबई, दि. २७ – लॉकडाऊन लागू झाल्यापासून कलम १८८चे उल्लंघन केल्या प्रकरणी काल सायंकाळपासून ते आज दुपारपर्यंतच्या काळात १०३७ नवीन गुन्हे दाखल करण्यात आले असूऩ आतापर्यंत एकूण ७३ हजार ७३५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

राज्यात २२ मार्चपासून लॉकडाऊनची परिस्थिती आहे. या काळात कोविड १९ च्यासंदर्भात लागू केलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलीस विभागाने कारवाई केली आहे. आजपर्यंत कोविड १९ च्या अनुषंगाने पोलिसांच्या १०० क्रमांकावर ७८ हजार ४७४ एवढ्या तक्रारी आल्या होत्या. क्वारंटाईनचे उल्लघंन केल्याप्रकरणी ६१० जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात कुठेही पोलिसांवर हल्ला झाल्यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत.

गेल्या चोवीस तासात अवैध वाहतुकीची नवीन आठ प्रकरणे दाखल झाली असून आतापर्यंत त्यांची संख्या ११०० झाली आहे. नव्या आठ प्रकरणात नव्या ४११ जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत ४८ हजार १७७ वाहने जप्त करण्यात आली आहेत. तर २ कोटी ७८ लाख ६४ हजार २९४ रुपये दंड आकारण्यात आला असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.

रुग्णांना नाकारल्यास कारवाई – विभागीय आयुक्तांनी रुग्णालयांना दिला इशारा ..

0

पुणे-कोणत्याही रुग्णाला नाकारू नये. गंभीर रुग्णाला दाखल करवून घ्यावे .तथापि आमच्या निदर्शनास याबाबत काही रुग्णालये टाळांटाळ करीत असल्याची माहिती आली आहे म्हणून आपण सर्वांना विनिणती आणि सूचना करीत आहोत कि रुग्णाला टाळू नका , आपल्याकडे सुविधा असताना गंभीर रुग्णाला टाळलयास  कारवाईस पात्र ठराल असा इशारा विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर यांनी येथे दिली

अविनाश भोसले यांच्याकडून ससून रुग्णालयाला प्लाझ्मा फोरेसेस मशीन भेट

0

प्लाझ्मा  फोरेसेस मशिन वापरण्यासाठीचा प्रस्ताव आयसीएमआरकडे सादर

पुणे दि.27:- कोरोनाच्या रुग्णांवर प्रायोगिक तत्वावर प्लाझ्मा उपचाराबाबत प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर मात करण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ससून रुग्णालयाला उद्योजक अविनाश भोसले यांनी प्लाझ्मा फोरेसेस मशीन भेट दिली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज दिली.

प्लाझ्मा फोरेसेस मशिन वापरण्यासाठी परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव आयसीएमआरकडे पाठविण्यात आला असून परवानगी प्राप्त झाल्यावर उपचार सुरु करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे. या मशिनव्दारे प्लाझ्मा वेगळा काढला जावू शकतो आणि हा प्लाझ्मा कोविड रुग्णाच्या उपचारासाठी वापरला जावू शकतो. असा प्लाझ्मा 18 वर्षावरील पुरुष किंवा महिला व्यक्ती देवू शकते. तथापी संबंधित महिला अद्यापर्यंत गर्भवती राहिलेली नसावी. तसेच त्या व्यक्तीचे वजन 55 किलो पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
प्लाझ्मा देणाऱ्या व्यक्तीच्या कोविड-19 च्या शेवटच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह असणे आवश्यक आहे. यानंतर 14 दिवसांनी संबंधित व्यक्ती कोरोनाच्या रुग्णाला प्लाझ्मा देवू शकतात. तथापी प्लाझ्मा डोनेट करण्यापूर्वी मागील 28 दिवसात या व्यक्तीमध्ये कोविड-19 ची कोणतीही लक्षणे आढळलेली नसावीत. संबंधित व्यक्ती हिपॅटाइटिस- बी तसेच एचआयव्ही बाधित नसणे आवश्यक आहे. त्याचबरोबर रक्तदान करताना तपासणी करण्यात येणारा रक्तगट व आवश्यक त्या सर्व बाबींची काळजी देखील घेण्यात येईल असेली डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले.

अत्यावश्यक दुकानांसाठी आता सकाळी १० ते दुपारी २ वेळ !

0

पुणे- महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलेली मागणी पुणे पोलिसांनी मान्य  केली असून अत्यावश्यक सेवेसाठी आता सकाळी १० ते दुपारी २ अशी वेळ वाढवण्यात आली असून याची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे. या संदर्भात पुणे पोलिसांशी कालच चर्चा झाली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.असे महापौर यांनी सांगितले तर तसा आदेश पोलीस अधिकारी रवींद्र शिसवे यांनी काढला आहे

पुणे विभागात कोरोना बाधित 1 हजार 457 रुग्ण

0

पुणे विभागातील  230 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि.27:- पुणे विभागातील 230 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 हजार 457 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 139 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 88 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 48 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
विभागात 1 हजार 457 बाधित रुग्ण असून 88 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 1 हजार 319 बाधीत रुग्ण असून 80 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 33 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 65 बाधीत रुग्ण असून 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 29 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 11 बाधीत रुग्ण आहेत.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 15 हजार 811 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 14 हजार 935 चा अहवाल प्राप्त झाला आहे. 877 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 13 हजार 428 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 1 हजार 457 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील 54 लाख 35 हजार 546 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2 कोटी 6 लाख 3 हजार 94 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 131 व्यक्तींना अधीक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

वो ना आयेंगे पलटकर जिन्हे लाख हम बुलाये…..

0

वो ना आयेंगे पलटकर जिन्हे लाख हम बुलाये…..

“देवदास “ही शरदचंद्र चॅटर्जी यांची अजरामर कलाकृती…!!!!यावरून १९२८मध्ये पहिला मूक पट निघाला ,त्यात “फणींद्रनाथ बर्मन” हे देवदास झाले होते.१९३१ मध्ये जेव्हा चित्रपट बोलू लागला ,तेव्हा १९३५मध्ये न्यू थिएटर्स च्या वतीने देवदास यावर हिंदी आणि बंगाली अशा दोन भाषेत चित्रपट निर्माण झाला.बंगालीत “बारुआ”यांनी तर हिंदीत सुप्रसिद्ध महान गायक “श्री कुंदनलाल सैगल” यांनी देवदासची भूमिका रंगविली..या चित्रपटाने तुफान लोकप्रियता मिळविली आणि सैगल याना खूप यश मिळवून दिले.बिमल रॉय यांनी न्यू थिएटर्स च्या देवदास चे छायाचित्रण केले होते.या कादंबरीतील सबळ व्यक्तिरेखा,वातावरणनिर्मिती,साहित्य मूल्य याची त्यांना भुरळ पडली होती.अखेरीस बिमल रॉय यांनी यावर चित्रपट करण्याचे ठरविले ,सचिनदेव बर्मन यांचे संगीत दिग्दर्शन लाभलेला हा चित्रपट म्हणजे अविस्मरणीय अशी अनुभूती देणारा ठरला…

नायक देवदास हा धनाढ्य जमीनदाराचा मुलगा…त्याची बालमैत्रिण “पार्वती” जी त्याचे पहिले प्रेम असते आणि त्याच्यावर नितांत निरपेक्ष प्रेम करणारी चंद्रमुखी ,जी कोठ्यावरील नर्तकी असते….हे या कथानकाचे तीन बिंदू आणि चुनीलाल जो तळीरामाची भूमिका बजावतो आणि देवदास ला चंद्रमुखी कडे नेतो ,हेही मुख्य पात्र…. प्रेमभंग झाल्याने भग्न हृदयी देवदास दारूच्या प्याल्यात आपले दु:ख विसरण्याचा प्रयत्न करतो…पार्वतीवर सच्चे प्रेम करणारा देवदास नियतीपुढे हतबल ठरतो… मदिरेच्या घोटात आपले दु:ख विसरण्याचा प्रयत्न करतो…..चंद्रमुखी त्याला सावरते, औषधोपचार करते, त्याची सेवा करते आणि मग येतो तिच्या
निरोपाचा प्रसंग…..देवदास चंद्रमुखीचा निरोप घेऊन निघतो…”फिर कब मिलना होगा… कौन जाने” ….हे त्याचे उत्तर…यातील लांबविलेल्या “कौन” चा उच्चार मनावर ठसतो….आयुष्याची आसक्ती उरलेली नसते…पुनः आपली भेट घडेल की नाही याबाबत साशंक असलेली चंद्रमुखी त्याला नमस्कार करते आणि पार्श्वभागी एक गीत ऐकू येते…..वो ना आएंगे पलटकर,जिन्हे लाख हम बुलाये…….!!!!!!!तेच आजचे गीत….!!!!

मुबारक बेगम यांचे हे गीत थेट काळजाला भिडते….खरच तो आता परतणार नाही हे माहीत असूनही त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली चंद्रमुखी वेड्या आशेवर जगत असते….भाबडेपणी त्याच्यावर प्रेम करत राहते….. साहिरजी….मनस्वी कवी असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा त्यांचे शब्द देतात !या शब्दांनी मनात दु:खाचा सागर उसळतो….!!!!

वो ना आएँगे पलट कर उन्हे लाख हम बुलायें
मेरी हसरतो से कह दो की ये ख्वाब भूल जायें

ही व्यथा आहे निरपेक्षपणे देवदासवर प्रेम करणाऱ्या ,नव्हे त्याच्या प्रेमासाठी आपला पेशा बंद करून एखाद्या जोगीणीप्रमाणे जीवन व्यतीत करणाऱ्या चंद्रमुखीची…..साहिर यांचे चपखल आणि हृदय विकल करणारे शब्द पहा…..कितीही वेळा बोलावले ,तरी आता तो परत नाही येणार….मेरी हसरतो से कह दो की ये ख्वाब भूल जाये…..”हसरत”कधीही पूर्ण न होणारी अशी इच्छा….देवदास हे चंद्रमुखीसाठी एक गोड स्वप्न असते ,जे सत्यात कधीच येणार नसते….!!!!!

अगर इस जहाँ का मलिक कही मिल सके तो पूछे

मिली कौन सी ख़ता पर हमे इस कदर सजायें

मिली कौन सी ख़ता पर हमे इस कदर सजायें

वो ना आएँगे पलट कर उन्हें लाख हम बुलायें

पराकोटीचे दु:ख सोसल्यावर आपल्या तोंडून येतेच की भेटला तो देव तर विचारीन की हे दु:ख माझ्याच पदरी का…???असे काय पाप घडले माझ्या हातून…..????नेमके हेच साहिरजींच्या लेखणीतून प्रकटले आहे….कौन सी खता हुई जीसकी सजा हमे मिल रही है…..पण काही प्रश्नांना उत्तरे नसतात……..!!!!!

तेरी बेरूख़ी के सदके

तेरी बेरूख़ी के सदके मेरी जिंदगी की खुशियाँ

तू अगर इसी मे खुश है तो खुशी से कर जफायें

तू अगर इसी मे खुश है तो खुशी से कर जफायें

वो ना आएँगे पलट कर उन्हे लाख हम बुलायें

मेरी हसरतो से कह दो की ये ख्वाब भूल जायें

देवदासवर नितांत प्रेम करणारी चंद्रमुखी…. त्याच्यावरून जीव ओवाळून टाकते….त्याच्या सुखासाठी जीवाचे रान करते…सदके….किती समर्पक शब्द….तिच्या जीवनाचा आनंद ती त्याच्यावरुन ओवाळून टाकते….त्याचे प्रेम आपण नाही हे माहीत असूनही तो सुखी व्हावा हीच मनी कामना धरते….पारोबरोबर त्याचा आनंद निघून गेला….हे माहीत असूनही त्याचे हे शुष्क वागणेही ती समजून घेते.भाषेची समृद्धी पहा…वफा ,जफा …परस्पर विरोधी शब्द….जर तुला सुखाशी उभा दावाच मांडायचाय ,तर तसे होऊदे ,कारण त्यात तुझे सुख आहे…पार्वती त त्याचा जीव गुंतलाय आणि आता जगातील सर्वोच्च सुखही त्याला आनंद देऊ शकत नाही हे चंद्रमुखी ओळखते….तरीही त्याच्यावर प्रेम करत राहते…..!!!!

खरं तर या गीताशी माझी ओळख घडवणारे श्री सुधीर मोघे….!!!!त्यांच्याच एका व्हीसीडीत हे गीत ऐकले आणि मनाला भिडले ते त्याचे शब्द आणि ते प्रकट करणारा स्वर….!!!!”मुबारक बेगम” यांच्या स्वराने या गीतास असीम उंची दिली आहे…गीतातील दर्द रसिकांपर्यंत त्यांनी अचूक पणे पोचविले आहे…त्यांची प्रामुख्याने “हमारी याद आयेगी” आणि “मुझको अपने गले लगा ले” ही गीते आपल्याला माहीत होती…पण राजस्थानातील या कोकिळेने हे गीतही तितक्याच उत्कटतेने सादर केले आहे…त्यांच्या स्वरात जात्याच असलेली दु:खाची किनार गीतातील भाव अधिक गडद करते….!!!!लाख लाख सलाम त्यांना…साहिरजींना आणि सचिनदेव बर्मन यांना…….!!!!

 

कभी तनहाईयों में यूँ हमारी याद आयेगी…..

0

कभी तनहाईयों में यूँ हमारी याद आयेगी
अंधेरे छा रहे होंगे, के बिजली कौंध जायेगी

ये बिजली राख कर जायेगी तेरे प्यार की दुनियाँ
ना फिर तू जी सकेगा और ना तुझ को मौत आयेगी

एखाद्या गीताचे भाग्य असे कि ते आपल्याबरोबर गीतकार , संगीतकार आणि गायक यांना अमर बनविते१९६१ साली आलेल्या ”हमारी याद आयेगी ”या चित्रपटासाठी केदार शर्मा यांनी लिहिलेले हे गीत . संगीतकार स्नेहल भाटकर यांनी संगीताने सजविले .आणि मुबारक बेगम यांनी ते आपल्या भावपूर्ण आवाजात गायिले आहे .हे गीत आही रसिकांच्या मनावर राज्य करत आहे……….या गीताने जणू मुबारक बेगम या नवा अमरपद लाभले आहे…………एकटेपणाच्या अंधारलेल्या जगाने मनाला घेरून टाकले असताना कधी कधी अचानक एखाद्या आठवणीची वीज चमकून आते…….मन कासावीस करते………..त्या आठवणीतील दर्द,व्याकुळता मन अस्वथ करते……….या गीतातील नायिकेच्या नशिबी असेच दु;ख आले आहे..केवळ एकाच कडव्याचे गाणे आजही मनात घर करून राहिले आहे………..आजही डोळ्यात पाणी आणणारे गीत ………..!!!!!!!!

केंद्राने विजेला अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करून राज्याला विशेष आर्थिक पॅकेज द्यावे – ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत

0
नागपूर – केंद्र शासनाने वीज क्षेत्राला अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट करून लॉकडाउनच्या  कठीण काळात राज्याला विशेष आर्थिक पॅकेज देऊन मदत करावी. ह्या काळात, महावितरणची वीज बिल वसूली कमालीची कमी झाली असून वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन शासकीय आणि खाजगी वीज उत्पादकांची देणी द्यावी लागत असल्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.
लॉकडाऊनच्या काळात वीजपुरवठयाची स्थिती जाणून घेण्यासाठी 27 एप्रिल रोजी महावितरणच्या विद्युत भवन, काटोल रोड नागपूर येथून ऊर्जामंत्री, डॉ. नितीन राऊत यांनी खाजगी वीज उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यामध्ये ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, अदानी पॉवरचे विनीत जैन , जे.एस.डब्ल्यूचे शरद महिंद्रा , टाटा पॉवरचे प्रवीण सिन्हा, रतन इंडियाचे समीर दर्जी आणि जी. एम.आर.चे समीर बरडे यांनी प्रामुख्याने सहभाग घेऊन संवाद साधला.
लॉकडाऊनच्या काळात राज्यात अखंडीत वीजपुरवठा व्हावा, उन्हाळा, रमजान, पावसाळ्यापूर्वीची कामे आणि लॉकडाऊन कालावधी वाढल्यास त्याची तयारी याबाबत या व्ही.सी. मध्ये तपशीलवार कंपनीनिहाय चर्चा झाली. लॉकडाऊनमुळे ग्राहकांकडून वीज बिल वसुली कमालीची कमी होत असल्याने महावितरणला आर्थिक काटकसर व नियोजन करून पुढची वाटचाल करावी लागत आहे. आर्थिक बाबींचे नियोजन करताना, कमी दराने कर्ज देणाऱ्या बँका, वित्तीय संस्था व एनटीपीसीकडून बिल डिस्काउंट आदी बाबी करण्यात येत असल्याचे डॉ.नितिन राऊत यांनी सांगितले.
वीज अत्यावश्यक घटक असल्याने केंद्र शासनाने वीजेला अत्यावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये समाविष्ट केल्यास केंद्र शासनाकडून राज्याला भरीव आर्थिक मदत मिळू शकते आणि पर्यायाने खाजगी तथा शासकीय वीज उत्पादक कंपन्यांची देणी नियमित अदा करण्यास मोठा हातभार लागेल, असे ऊर्जामंत्री, डॉ.नितीन राऊत यांनी सांगितले.
————————

डाकिया ‘कॅश’ लाया!

0

डाक विभागाने १ कोटींहून अधिक रक्कम पोहोचवली घरपोच

अकोला,दि. २७ (जिमाका) – गावगाड्यातल्या दैनंदिन जीवनाशी एकरुप झालेला हा ‘डाकिया अर्थात पोस्टमन’  हल्लीच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात  ई-मेल, व्हॉट्स ॲप, फेसबुक या संदेशवहन सुविधांच्या गजबजाटात  काहीचा मागे पडला होता. पण ‘लॉक डाऊन’च्या काळात पोस्टमनची गावगाड्याशी तुटलेली नाळ पुन्हा जोडली गेली आहे. डाकिया आता टपालासोबत  ‘कॅश’ आणि गरजेच्या वस्तूही आणू लागलाय. याला निमित्त ठरलंय ते  लॉक डाऊन!

डाकिया हा पोस्टमनचा हिंदी पर्यायी शब्द! फार जुनं नाही, पण १९७७ मध्ये आलेल्या ‘पलकोंकी छांव’ या चित्रपटातलं ‘डाकिया डाक लाया, खुशी का पयाम, कही दर्दनाक लाया’ हे गुलजार यांचं गीत खूप गाजलं होतं. हे गीत पोस्टमनचं गावातल्या जीवनाशी  एकात्म नातं अधोरेखित करतं.

कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधाचा एक भाग म्हणून गेले महिनाभरापासून अधिक काळ आपण सारे लॉकडाऊन मध्ये आहोत. या ‘लॉकडाऊन’ मध्ये अनेक घटकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांमधून मार्ग काढत मार्गक्रमण करण्यात प्रशासन सर्वतोपरी मदत करीत आहे.

त्यातलाच एक भाग म्हणजे भारतीय डाक विभागाची  ‘आधार संलग्नित पेमेंट व्यवस्था’(AEPS) ही सेवा. या सेवेमुळे ४८९१ लोकांना एक कोटी पाच लक्ष ६५ हजार ९३६ रुपयांची रक्कम घरपोच पोहोचविण्यात आली आहे. यात रक्कम व सेवेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांच्या संख्येपेक्षाही ‘पोस्टमन वरचा ग्राहकांचा विश्वास’ हा महत्त्वाचा आहे.  या सेवेत  बॅंक खात्यात जमा होणारी पेन्शन,  प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा लाभ, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना दिले जाणारे लाभ यांचा समावेश आहे.

अकोला डाक विभागाअंतर्गत अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यांचा समावेश  होतो. त्यात अकोला येथील विभागीय कार्यालय, प्रधान डाकघर कार्यालय, मुख्य डाकघर कार्यालय, ४३ उपडाकघर कार्यालये व ३५४ शाखा डाकघर कार्यालये आहेत.  या सर्व कार्यालयांमार्फत ही सुविधा लोकांना पुरविली जात आहे.

सेवेचा लाभ कसा घ्याल?

याबाबत अकोला डाक विभागाचे सहाय्यक अधिक्षक व्ही. के. मानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सेवेत जे नागरिक घराबाहेर येऊ शकत नाहीत त्यांना त्यांच्या राष्ट्रीय बॅंक खात्यातून  दहा हजार रुपयांपर्यंत रक्कम पोस्टमन मार्फत घरपोच अदा केली जाते. या सोबतच किराणा माल इत्यादीही पोहोचविला जातो. त्यासाठी ज्यांचे राष्ट्रीयकृत बॅंकेत खाते आहेत त्या व्यक्तींनी प्रवर अधिक्षक डाक घर अकोला विभाग अकोला यांच्या  दूरध्वनी  ०७२४-२४१५०३९ या क्रमांकावर सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन या वेळात आपले नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक तसेच आवश्यक रक्कम  आणि हवे असलेले किराणा सामान याची माहिती द्यावी. पोस्टमन मार्फत घरपोच रोख रक्कम व किराणा सामान पोहोचविले जाते.

बायोमेट्रिक पडताळणी आवश्यक

हेल्पलाईन नंबरवर भारतीय डाक विभागाकडे ग्राहक आपल्या बॅंक खात्यातील  रकमेची मागणी नोंदवतात. त्याप्रमाणे पोस्टमन  त्या ग्राहकाकडे घरी जाऊन बॅंक खात्याशी  ऑनलाईन जोडून घेतो. ग्राहकाचे बॅंकेशी आधार क्रमांकावरुन बायोमेट्रीक पडताळणी होते. ती खातरजमा झाल्यावरच ग्राहकाला त्यांनी मागणी केल्याप्रमाणे रक्कम पोहोचविली जाते. हे सगळे करताना शारीरिक अंतर पाळण्याची तसेच सॅनिटायझेशन पाळण्याची खबरदारी घेतली जाते.

औषधे आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूही

या सोबतच टपाल विभाग हा ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तूही पुरविण्याची सेवा देत आहे. त्यात ग्राहकाला फक्त वस्तूची रक्कम अदा करावी लागते. त्यात विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना लागणारी औषधे व त्यांच्या अन्य आवश्यकतांनुसार वस्तूंची उपलब्धता सशुल्क केली जाते. यात ने-आण साठी कोणतेही पैसे आकारले जात नाहीत मात्र वस्तूची किंमत मात्र ग्राहकाला अदा करावी लागते.

डाक ऑफिस सुविधांचे आगार

आतापर्यंत डाक विभागाच्या अन्य सेवा जसे  पोस्ट ऑफिसच्या बचत सेवे मार्फत २८ हजार ७२० लोकांनी २६ कोटी ७३ लाख ६३ हजार २०८ रुपये जमा केले आहेत. तर १० हजार ८८८ लोकांनी २४ कोटी ६२ लाख २३ हजार ९०० रुपये खात्यातून आपल्या दैनंदिन गरजांसाठी काढून वापरले आहेत. अर्थात हे त्यांनी  पोस्टाच्या एटीएम सुविधेतून ४२३ लोकांनी १४ लक्ष ५८ हजार १०० रुपये रक्कम काढून आपली गरज भागविली आहे. तसेच स्पीड पोस्ट व पार्सल सुविधेमार्फत १०७ लोकांना वैद्यकीय सामुग्री (औषधी व अन्य) पोहोचविण्यात आली आहे. ही सामुग्री त्वरित वितरित केली जाते.   या साठी डाक विभागाची आरएमएस स्पेशल व्हॅन सेवा सुरु आहे. ही सेवा देतानाच पोस्टाचे कर्मचारी गरजूंना अन्नदानही करत असून आतापर्यंत ३१० लोकांना अन्नदान केले आहे. याशिवाय  ३० लोकांना अन्नधान्य किट वाटप केले आहे, हे अर्थातच सेवाभावी वृत्तीने.

कधीचा काहीसा दुरावलेला पोस्टमन यानिमित्ताने  पुन्हा कुटुंबाचा, गावगाड्याचा भाग होतोय, ते ही आपल्या पूर्वापार विश्वासाच्या बळावर, हे या आपत्तीतही नक्कीच सुखावणारे आहे.

कोरोनामुक्त झालेल्या सहा नागरिकांना आज सुटी

0

नागपूर, दि. २७ :  कोरोनाबाधित सहा नागरिकांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात यशस्वी उपचारानंतर तसेच त्यांच्या दोन्ही तपासणीमध्ये कोरोना विषाणू आढळून न आल्याने आज सुटी देण्यात आली. कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्याने टाळ्या वाजवून निरोप दिला.

इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयामध्ये जबलपूरचे चार, संतरजीपुरा व कामठी येथील सहा नागरिकांना 12 एप्रिल रोजी तपासणीमध्ये कोरोना विषाणू आढळून आल्यानंतर भरती करण्यात आले होते. तत्पूर्वी त्यांना आमदार निवास येथे कॉरान्टाईनमध्ये ठेवण्यात आले होते. 25 एप्रिल रोजी त्यांचे तपासणी केली असता व त्यानंतरही दुसऱ्यांदा तपासणी केली असता त्यांची चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे आज त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

मेयो रुग्णालयात कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर भरती करण्यात आले असून या काळात डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांने अत्यंत चांगल्या वातावरणात उपचार केले. त्यामुळेच कोरोनामधून बाहेर पडणे शक्य झाले. कोरोनाबाधित रुग्णांनी डॉक्टरांना संपूर्ण सहकार्य केल्यास कोरोनापासून सहजपणे बरे होऊ शकतो असे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता अजय केवलिया, डॉ.सागर पांडे, मेडिसीन विभागाचे डॉ. पराते, कोविडच्या प्रमुख डॉ.राखी जोशी, डॉ. रवि चव्हाण आदी उपस्थित होते.

पुणे शहर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती

0

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आणखी एक पाऊल

मुंबई, दि. 27 :- पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणखी एक पाऊल टाकलं असून त्यांच्या निर्देशानुसार श्री.अनिल कवडे, श्री,सौरभ राव, श्री. सचिंद्र प्रतापसिंग आणि श्री.कौस्तुभ दिवेगावकर या चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची पुणे शहरासाठी विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे विभागीय आयुक्त आणि पुणे महापालिका आयुक्तांना कोरोनाविरुद्धच्या लढाईत हे अधिकारी सहाय्य करतील.
राज्याच्या मुख्य सचिव कार्यालयातर्फे आज यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले. श्री.अनिल कवडे हे राज्याचे सहकार आयुक्त आहेत. श्री. सौरभ राव यांच्याकडे साखर आयुक्तपदाची जबाबदारी आहे. श्री. सचिंद्र प्रतापसिंग यांच्याकडे पशुसंवर्धन आयुक्त तर, श्री.कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे भूजल सर्व्हेक्षण संचालकपदाचा कार्यभार आहे. हे चारही अधिकारी मूळ जबाबदारी सांभाळून पुणे महापालिका क्षेत्रातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी सेवा देणार आहेत. या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी आणि व्यापक होऊन शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव लवकर नियंत्रणात येण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
0000000

डॉक्टरांनी खाजगी दवाखाने ताबडतोब सुरू करावेत

0

पुणे दि.27 : – सामान्य रुग्णांच्या उपचारासाठी खाजगी डॉक्टरांनी आपापले दवाखाने सुरू करण्याबाबत निर्देश देवूनही बहुतांशी डॉक्टरांनी अद्याप क्लिनीक सुरू केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. तेव्हा वैद्यकीय अधिका-यांनी त्वरित हॉस्पिटल सुरू करून नागरिकांना सेवा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद करण्यात आले असले तरी क्लिनीकला यातून सुट देण्यात आली आहे. सामान्य नागरिकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आले असल्याचे स्पष्ट करून डॉ. म्हैसेकर म्हणाले की, ज्या डॉक्टरांचे वय जास्त आहे आणि त्यांना कुठलाही दुर्धर विकार असेल तर त्यांनी क्लिनीक सुरू केले नाही तरी चालेल, मात्र जे डॉक्टर तंदुरूस्त आहेत ,पण अद्याप दवाखाने सुरू केले नाहीत, ही गंभीर बाब आहे. कोवीड व्यतिरिक्त जे रुग्ण आहेत, त्यांना सेवा देणे आवश्यक आहे. महानगरपालिकेने बंद रुग्णालयाची माहिती घ्यावी, म्हणजे प्रशासन कार्यवाहीबाबत निर्णय घेईल. कोविडकडे लक्ष देत असताना, अन्य आजाराकडे दुर्लक्ष होता कामा नये, टेली मेडीसीनच्या माध्यमातून डॉक्टरांनी रुग्णांशी संपर्क ठेवावा, असे आवाहनही डॉ. म्हैसेकर यांनी केले