Home Blog Page 2613

अरुण गवळी १० मे पर्यंत जेलबाहेर

0

मुंबईः माजी आमदार, अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १० मे पर्यंत जेल बाहेर राहण्यास सशर्त परवानगी दिली आहे. जेल बाहेर असताना कायद्याचे पालन करणे, पॅरोलच्या नियमांचे तंतोतंत पालन करणे अशा अटी त्याला घालण्यात आल्या आहेत.

शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी नागपूर मध्यवर्ती तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळीला नागपूर खंडपीठाने १३ मार्च रोजी ४५ दिवसांची पॅरोलची रजा दिली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार गवळीला २७ एप्रिलला तुरुंगात हजर व्हायचे होते. मात्र देशात लॉकडाऊन सुरू असल्यामुळे अरुण गवळीने पॅरोलची रजा वाढवून मागण्यासाठी अर्ज सादर केला. या अर्जावर नागपूर खंडपीठाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेतली. सुनावणीसाठी अरुण गवळी मुंबईतून हजर होता

आधीच्या सर्व फर्लो आणि पॅरोलच्या रजांचा कालावधी संपण्याच्या दिवशी तुरुंगात परतल्याचे कारण देत अरुण गवळीने ताज्या परिस्थितीची माहिती वकिलामार्फत नागपूर खंडपीठाला दिली. देशभर लॉकडाऊन सुरू आहे. मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. अशा परिस्थितीत मुंबईत घराबाहेर पडणेच कठीण झाले आहे. घरातून बाहेर पडून कोरोना पसरवण्यास कारणीभूत ठरू नये यासाठी घरातच आणखी काही दिवस राहू द्यावे अशी विनंती गवळीने केली. त्याने पॅरोलची रजा वाढवून मागितली. अर्जदाराची वागणूक, त्याने आधीच्या फर्लो आणि पॅरोलच्या रजांच्या काळात तुरुंगाबाहेर केलेले वर्तना याचा रेकॉर्ड तपासून न्यायालयाने निकाल दिला. अरुण गवळीला १० मे पर्यंत तुरुंगाबाहेर राहण्याची परवानगी मिळाली.

पत्नीच्या आजारपणाचे कारण पुढे करुन मागील काही वर्षांमध्ये वारंवार अरुण गवळीने फर्लो किंवा पॅरोलच्या रजा घेतल्या आहेत. यावेळीही गवळी पत्नीसाठीच तुरुंगाबाहेर आला. तुरुंगाबाहेर असताना त्याने बेकायदा वर्तन केल्याची नोंद आढळलेली नाही. ही बाब गवळीचे  वकील अॅडव्होकेट मीर नगमान अली यांनी न्यायालयासमोर मांडली. सर्व बाजू ऐकून घेऊन न्यायाधीश विनय जोशी यांनी अरुण गवळीच्या पॅरोलची मुदत वाढवली.

पुणे महानगरक्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांवर 19 हॉस्पीटलमध्ये उपचार

0

-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे दि.28:- पुणे महानगरक्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांवर 19 हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात वेगवेगळया 19 शासकीय व खाजगी हॉस्पीटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कांही खाजगी हॉस्पीटलबरोबर कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्याबाबत करार केलेला आहे.
तसेच राज्य शासन याबाबत धोरणात्मक निर्णय घेत असून खर्चाची प्रतिपूर्ती कशी करावी, याअनुषंगाने शासनाकडून मार्गदर्शक तत्वे अपेक्षित आहे; तथापि, तोपर्यत वेगवेगळया हॉस्पीटलच्या सेवा प्राप्त करून घेण्यात येत आहेत आणि या सेवांच्यामार्फत कोरोनाबाधित रुग्णांना सेवा देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोनाबाधित महिलांच्या प्रसूतीसाठी ससून हॉस्पीटल व महानगरपालिकेचे सोनवणे हॉस्पीटल या दोन हॉस्पीटलमध्ये व्यवस्था करण्यात आली असून या शिवाय कांही खाजगी हॉस्पीटलशी महापालिका करार करीत आहे. हे दोन हॉस्पीटल वगळता ज्या महिला कोरोनाबाधित नाहीत, त्यांच्या प्रसूतीची व्यवस्था करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले..

0000000

सर्वेक्षणाचे कामास अनुपस्थिती बारा उपशिक्षकांचे निलंबन

0

 

पुणे- कोरोना शी संघर्ष सुरु असताना पालिकेच्या सर्वेक्षण कामास ग़ैरहजर राहून नोटिसांना उत्तरे न देणाऱ्या 12 उप शिक्षकांना महापालिका अतिरिक्त आयुक्त रूबल अगरवाल यांनी निलंबित केले आहे .

कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत मनपा प्रशासनाकडून विविध कामे युद्धपातळीवर करण्यात येत आहेत,विविध स्तरावर महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी कामात व्यस्त आहेत,अशा परिस्थितीत विनासुचना रजा घेणे,कार्यालयीन आदेश न पाळणे याबाबत संबंधितांना वेळोवेळी सूचना देउनही त्यांचेवर सोपविण्यात आलेले सर्वेक्षणाचे कामे न केल्यामुळे कामकाजात अडथळे निर्माण झाले,
या कारणास्तव पुणे मनपा शिक्षण मंडळाकडील संबंधित उपशिक्षक यांनी कार्यालयीन आदेशानुसार परिमंडळ उपायुक्त विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रीय स्तरावर नागरी सर्वेक्षणाकरिता डॉ,वैशाली जाधव,सहायक आरोग्य अधिकारी यांचेकडे कामास हजर होणे आवश्यक होते,तथापि सदरचे उपशिक्षक हजर झाले नाही,व कारणे दाखवा नोटिसा दिल्यानंतरही खुलासे देण्यात आले नाही,अशाप्रकारचे शिस्तभंग व गैरवर्तनामुळे संबंधीत बारा उपशिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचे रुबल अगरवाल, अतिरिक्त महापालिका आयुक्त ( जनरल ) यांनी कळविले आहे.

 

राज्यातील राष्ट्रीय महामार्गांसाठी २० हजार कोटी द्या

0

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांची केंद्र शासनाकडे मागणी

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संवाद

नांदेड दि. २८ – राज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या महामार्गाच्या निर्मितीसाठी अनेक अडचणी येत आहेत, काही प्रश्न निर्माण झाले आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात यावी व त्यासोबतच राज्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम जलद गतीने होण्यासाठी २० हजार कोटी रूपयांचा निधी केंद्र सरकारने राज्यातील राष्ट्रीय महामार्गास द्यावा अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आज केली.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सचिव यांच्याशी दिल्ली येथून व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. महाराष्ट्राच्यावतीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ते निर्मितीतील विविध अडचणी आणि येणाऱ्या समस्या या विषयी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांना अवगत केले.

राज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परंतु अनेक ठेकेदार वेळेवर काम करीत नाहीत. त्यामुळे वाहतूक अडथळा निर्माण होत आहे. जे ठेकेदार विहित वेळेत काम करीत नाहीत अशांची कामे रद्द करावीत व त्यांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली. राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची कामे जलद गतीने होण्यासाठी व येणार्‍या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर समितीचे गठण करण्यात यावे व त्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना गती द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

महाराष्ट्रातील अंकलेश्वर-चोपडा-ब्राहणपूर-देवराई-शेवगांव-नेवासा-संगमनेर, कोल्हापूर-महाबळेश्वर-शिरूर, सागरी मार्ग-खोल-अलिबाग-रत्नागिरी-वेंगुर्ला-रेड्डी-गोवा या मार्गांना राष्ट्रीय महामार्गाची मान्यता देण्यात यावी अशी मागणी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली आहे.

पुणे विभागात केशरी शिधापत्रिकाधारकांना 25 एप्रिलपासूनच अन्नधान्याचे वाटप सुरू-15 टक्के वाटप झाले

0

पुणे दि.28:- कोरोना विषाणू प्रार्दूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येत आहे. 1 मे पासून अन्नधान्य वितरीत करण्याचे नियोजन होते, मात्र पुणे विभागात 25 एप्रिलपासूनच अन्नधान्याचे वाटप सुरू केले असून आतापर्यंत पुणे विभागात 15 टक्के धान्य वाटप झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे शहरात 14 टक्के, पुणे ग्रामीण 6 टक्के, सांगली 40 टक्के, सोलापूर 16 टक्के, कोल्हापूर 25 टक्के तर सातारा जिल्हयात 1 टक्के धान्य वाटप झाले आहे. सातारा जिल्ह्यात गती कमी आहे. एकंदर केशरीकार्डधारकांना धान्य वाटप नियोजनाप्रमाणे 10 मे पुर्वी सर्व अन्नधान्य वाटप करण्याचे नियोजन पुर्ण होईल, अशी खात्री असल्याचेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

देहविक्रयातील महिलांना रेशन, वैयक्तिक स्वच्छता साधनांचा पुरवठा

0

महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून वेळोवेळी आढावा

मुंबई, दि.२८: देहविक्रय करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांच्या समस्यांकडे एरवी समाजाचे लक्ष जात नाही. या व्यवसायात नाईलाजाने आलेल्या महिलांची परिस्थिती सुधारण्यासाठी, त्यांना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी महिला व बालविकास विभाग प्रयत्न करतो. सध्याच्या ‘कोविड-19’ परिस्थितीत लॉकडाऊनमुळे या महिलांचे उत्पन्न बंद झाल्याने कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी विभागाच्या सर्व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना सूचना देऊन देहविक्रय व्यवसायातील महिलांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू तसेच व्यक्तिगत स्वच्छता साधने पुरविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आतापर्यंत राज्यातील या व्यवसायातील सुमारे साडेबारा हजार महिलांपर्यंत पोहोचत त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था राज्य शासनाने केली आहे.

लॉकडाऊनमुळे संपूर्ण समाजालाच अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः हातावर रोज काम केल्याशिवाय उदरनिर्वाह होऊ न शकणारे मजूर, कारखान्यातील, बांधकामावरील मजूर आदींच्याबाबतीत दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झाला. देहविक्रय करणाऱ्या महिलांपुढेही गंभीर समस्या उभी राहिली आहे. हे लक्षात येताच मंत्री श्रीमती ठाकूर यांनी तात्काळ विभागाच्या सचिव, महिला व बालविकास आयुक्त आदींसह व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना या महिलांना मदत उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा त्वरित गतिमान करण्याचे निर्देश दिले. या कामात स्वयंसेवी संस्थांनीही शासनासोबत काम करत खूप चांगले सहकार्य केले आहे.

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर या शहरात देहविक्रय व्यवसायातील महिला मोठ्या संख्येने आहेत. मुंबई शहर जिल्ह्यातील कामाठीपुरा, फोकलँड, खेतवाडी, सिप्लेक्स बिल्डिंग, अँटॉप हिल, पारस रोड, दामोदर मॅन्शन या क्षेत्रात देहविक्रय करणाऱ्या महिला राहत आहेत. या महिलांच्या मुलांसाठी दिवसरात्र खुली निवारागृहे चालविली जात आहेत. शासनासोबतच १५-१६ सामाजिक संस्था त्यांच्यासाठी काम करत असून महानगरपालिकेमार्फत अन्नाचे डबे त्यांच्यापर्यंत पोहोचविले जात आहेत. या महिलांना पुढील १५ दिवस पुरेल इतके अन्नधान्याचे (रेशन) किट पुरविण्यात आले असून त्यानंतरही महिनाभराचे रेशन पुरविण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे. त्याचबरोबर सॅनिटायजर्स, सॅनिटरी किट, सोया बिस्किटे व इतर खाद्य वस्तू या वस्त्यांमध्ये पुरविण्यात येत आहेत. अन्नधान्य पुरवठ्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या वतीने मोफत सुलभ शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. ‘एचआयव्ही’ग्रस्त महिलांसाठी ‘एआरटी’ उपचारपद्धती सुरू असून नियमितपणे औषधे पुरविण्यात येत आहेत.

पुणे जिल्ह्यात सुमारे २ हजार ५०० महिला देहविक्रय व्यवसायात असून त्यांच्यासाठी काम करणाऱ्या १२-१३ संस्थांनी पोलिसांच्या मदतीने त्यांच्यापर्यंत अन्नधान्य, रेशन किट, सॅनिटरी किट पोहोच केले आहे. फरासखाना पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी या मदत कार्यात विशेष भूमिका बजावली आहे. तसेच आरोग्य विभागाकडून नियमित आरोग्य तपासणी केली जात आहे. बुधवार पेठमध्ये देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांची संख्या मोठी असून त्यांच्यासाठी शासकीय दूध योजनेतून दुधाचा पुरवठा करण्यात येत आहे. यासाठी कात्रज दूध संघाने मदत केली  आहे. ‘सहेली’ संस्थेने येथील महिलांचे मोबाईल रिचार्ज केले असून त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाशी संवाद साधता येत असल्याने  मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी त्याची मदत झाली आहे.

नाशिक, अहमदनगर, नागपूर आदी मोठ्या शहरांसोबतच सर्वच जिल्ह्यात या महिलांसाठी रेशन किट वाटप, सॅनिटरी किट वाटप आदी उपक्रम सुरू असून अनेक स्वयंसेवी संस्था तसेच या महिलांच्या मुलांसाठी चाईल्डलाईन संस्था काम करत आहे. काही जिल्ह्यात नोंदणी नसलेल्या छुप्या पद्धतीने देहविक्रय व्यवसायात महिला असून त्यांनाही मदत मिळावी यासाठी महिला व बालविकास विभाग अन्य शासकीय यंत्रणा तसेच स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. या व्यवसायातील शिधापत्रिका नसलेल्या महिलांनाही शासनाच्या वितरण व्यवस्थेमार्फत रेशन पुरवठा व्हावा यादृष्टीने पाठपुरावा सुरू आहे.

१३ वार्डात चिंता – आयुक्त गायकवाड

0

पुणे- शहरात कोरोनाचे संकट गंभीर होत आहे. त्यामुळे नागरिकांनी दररोज घराबहर पडू नये. दैंनदिन गरजेच्या वस्तू 5 दिवसांच्या एकदम आणून ठेवा, असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले आहे.

नागरिकांनी सहकार्य ठेवून कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण कमी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तरीही सध्या शहरातील 15 पैकी 13 वार्डमध्ये अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे. तर 2 वॉर्डमध्ये अतिशय कमी पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत जे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, त्यांच्यापैकी 5 ते 6 जण कुठेही बाहेर पडलेले नाहीत. मनापासून त्यांनी नियंत्रण ठेवले. मात्र, घरातील 1 व्यक्ती बाहेर भाजी घेण्यासाठी, विक्रीसाठी बाहेर गेला. किंवा समाजात मिसळला. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे लक्षात आले.

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/229982978091969/

त्यामुळे नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये. एकदम 5 दिवसांच्या गरजेच्या वस्तू एकत्र आणून ठेवा. त्यामुळे रोजच्या रोज बाहेर पडण्याची गरज भासणार नाही. तसेच कोरोनाची रिस्कही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.

दरम्यान, भवानी पेठ, कसबा – विश्रामबागवाडा, ढोले पाटील रोड, शिवाजीनगर – घुलेरोड, येरवडा – कळस – धानोरी, कोंढवा, हडपसर, मुंढवा, बिबवेवाडी, सहकारनगर, धनकवडी भागांत कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढतच आहेत.

कोथरुड मधील सोसायट्यांमध्ये पुस्तकांचे वाटप,वाचन संस्कृती वाढीस लागण्यासाठी आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार

0

पुणे-लॉकडाऊनच्या काळात नागरिकांकडून त्याचा फज्जा उडणे, विनाकारण फिरत राहणे यामुळे प्रशासनावरचा ताण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये लॉकडाऊनचे पालन व्हावे आणि वाचन संस्कृती वाढीस लागावी यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. श्री. पाटील यांनी कोथरुड मधील सोसायट्यांमध्ये पुस्तकांचे वाटप केले आहे.


सध्या पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यातच अनेक भागांत लॉकडाऊनचा फज्जा उडताना दिसत आहे. तसेच तरुण वर्ग विनाकारण रस्त्यांवर फिरत आहेत. तर अनेक ठिकाणी सोसायटीच्या आवारात विरंगुळ्यासाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे संचारबंदीच्या नियमांची पायमल्ली होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेत, आपल्या मतदारसंघात पुस्तकांचे वाटप केले आहे. मतदारसंघातील अनेक सोसायट्यांमध्ये पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत.

यासोबतच लॉकडाऊननंतर अडचणीत असलेल्यांसाठी भोजन व्यवस्था केली आहे. तसेच गरजू कुटुंबांना शिधा वाटप आणि वयोवृद्ध व्यक्तींना २५ टक्के सवलतीच्या दरात औषधे घरपोच देण्यात येत आहे. त्याचबरोबर पुण्यातील कोरोनाबाधितांची सेवा करणार्या डॉक्टर, परिणाम यांना स्वसंरक्षणासाठी पीपीई किटचे वाटप देखील करण्यात आले आहे.

राज्यात माध्यमांची मुस्कटदाबी चा भाजप नेत्यांचा आरोप – घेतली राज्यपालांची भेट

0

मुंबई – राज्यात अघोषित आणिबाणीसदृश आणि अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली असून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांची मुस्कटदाबी करुन त्यांच्यात प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण केले जात आहे. कुणी आपल्या विरोधात बोलूच नये अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे असा आरोप राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजपाने राज्य सरकारविरोधात केला.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह इतर भाजपा नेत्यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारविरोधात तक्रार करत जाब विचारण्याची विनंती राज्यपालांना केली. राज्यपालांना लिहिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, वाधवान प्रकरणात एबीपी माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी सरकारने दिलेलं पत्र सार्वजनिक केल्याने काही दिवसांतच वांद्र्यातील गर्दीचा ठपका ठेऊन त्यांना अटक करण्यात आली. मुंबईत हा गुन्हा नोंदवण्यात आला असल्याने अनेक संवेदनशील क्षेत्रातून प्रवास करुन उस्मानाबाद येथून मुंबईत आणण्यात आले. त्यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर हा संपूर्ण प्रसंग त्यांनी स्वत:च कथन केला आहे असं सांगण्यात आलं.

https://www.youtube.com/watch?v=8XgcA6fV_Po

त्यानंतर एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या संपादकांवर थेट एफआयआर दाखल करण्याची आणि चौकशी करण्याची धमकी स्वत: राज्याच्या गृहमंत्र्यांनी पत्र पाठवून दिली. वृत्त प्रतिकूल असेल तर त्याचा खुलासा करता येऊ शकतो. पण असे न करता थेट धमक्या देणे, गुन्हे दाखल करणे, अटक करणे, चौकशीचा ससेमिरा लावण्याची दहशत दाखवणे असे प्रकार सर्रास केले जात आहेत असा आरोप विरोधी पक्षाने केला आहे.

तसेच सोशल मीडियात सरकारविरोधात लिखाण करणाऱ्यांची सुद्धा मुस्कटदाबी केली जात आहे. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्याचे प्रकार राज्यभर सर्वत्र सुरु आहे. दुसरीकडे वृत्तपत्र वितरण सुरक्षित असल्याचं जागतिक आरोग्य संघटना आणि तत्सम संस्थांनी सांगितले असतानाही वृत्तपत्र वितरणावर बंदी टाकण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने सुद्धा आता याबाबत राज्य सरकारला जाब विचारला आहे. एकूणच हा प्रकार निष्पक्ष माध्यमांच्या अस्तित्त्वावरच घाला घालणारे आहेत. लोकशाही धोक्यात आणणारे आहेत आणि म्हणून अघोषित आणिबाणीसदृश आहेत या सर्व घटनांची गंभीर दखल घेऊन राज्य सरकारला जाब विचारावा अशी मागणी भाजपा नेत्यांनी राज्यपालांकडे केली आहे.

दरम्यान या बैठकीत उद्धव ठाकरेंच्या आमदारकीच्या मुद्द्यावरुनही चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचसोबत संध्याकाळी ६ च्या सुमारास महाविकास आघाडीचे नेतेही राज्यपालांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राजभवनातील हालचालींना वेग आल्याचं दिसून येत आहे.

पुणे विभागातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या समन्वयाकरीता समित्यांची स्थापना

0

पुणे दि.28 : – पुणे विभागामध्ये कोरोना विषाणू ( कोवीड -19) संसर्गजन्य आजाराची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत. हा विषाणू अतिसंसर्गजन्य असल्यामुळे त्यावर तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याने, राज्यात साथरोग अधिनियम -1897 च्या अनुषंगाने महाराष्ट्र कोव्हीड उपाययोजना नियम 2020 नियम अस्तित्वात आले आहेत व ते दि.15 मार्च 2020 पासून लागू झालेले आहेत.
कोरोना (कोवीड -19) प्रादुर्भाव नियंत्रित व प्रतिबंधित करण्याच्या अनुषंगाने पुणे विभागामध्ये कामाच्या समन्वयाकरीता अधिकारी / कर्मचा-यांच्या समिती गठीत करण्यात आल्या आहेत. त्यानुसार क्षेत्रीय स्तरावरील रुग्णालये व प्रयोगशाळा यांचे परिनिरीक्षण करणे तसेच प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात येणा-या नमुन्याची माहिती संकलित करुन समन्वय राखणेकरीता आरोग्य सेवा विभागाचे सहाय्यक संचालक आर.एस.आडकेकर व वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक रणदिवे तसेच आवश्यकता भासल्यास अतिरिक्त मानव संसाधन उपलब्ध करुन देण्याकरीता महसूल विभागाचे उपायुक्त् प्रताप जाधव व उपजिल्हाधिकारी स्नेहल बर्गे तसेच नायब तहसिलदार संजय शिंदे, त्याचप्रमाणे विभागातील पॅरामेडीकल, डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांना प्रशिक्षित करण्यासाठी उपायुक्त् ( विकास आस्थापना) पी.बी.पाटील, गट विकास अधिकारी (प्रशासन), आर.जी.खाडे व सहा.आयुक्त् (तपासणी) उदय पाटील इ.ची नेमणूक करण्यात आली आहे.
कोवीड-19 चा प्रादूर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने औषधे, वैद्यकीय उपकरणे यांची मागणी व उपलब्धतेबाबत समन्वय राखणेकरीता उपायुक्त (विकास योजना) राजाराम झेंडे, सहायक संचालक (लेखा) कैलास भोसले व सहा.आयुक्त् (तपासणी) संतोष हराळे, तसेच पायाभूत सुविधा व्यवस्थापन करणे व तद्अनुषंगीक कामकाज त्यामध्ये प्रामुख्याने विलगीकरण / अलगीकरण कक्ष व त्यामधील व्यवस्था करण्यासाठी उपायुक्त् (सामान्य प्रशासन) संजयसिंह चव्हाण, उपजिल्हाधिकारी जिल्हा मुद्रांक शुल्क प्रकाश अहिरराव व लेखाधिकारी ( लेखा शाखा) गणेश सस्ते तर प्रसार माध्यमात येणा-या बातम्या तसेच शासनाद्वारे प्रसारीत करण्यात येणारी माहिती योग्यरित्या प्रसारीत करण्यासाठी उपसंचालक ( माहिती) मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग व माहिती अधिकारी वृषाली पाटील तर प्रसार माध्यमांना अचूक माहिती उपलब्ध करुन देण्याकरीता नगरपालिका प्रशासनाचे प्रादेशिक उपसंचालक प्रशांत खांडकेकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.
कोवीड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने करण्यात येणा-या उपाय योजना, विविध बैठकांचे इतिवृत्त, शासनाकडून प्राप्त होणा-या मार्गदर्शक सूचना त्या अनुषंगाने करण्यात येणारी कार्यवाहीबाबत प्राप्त दस्तऐवज तयार करणेकरीता पशुसंवर्धन विभागाच्या उपायुक्त साधना सावरकर, पुनर्वसनचे तहसिलदार विवेक साळुंके तसेच खाजगी रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्णांची माहिती घेऊन संक्रमित रुग्ण शोधणे, खाजगी रुग्णालयाशी समन्वय साधणे,आवश्यकतेनुसार खाजगी रुग्णालये अधिग्रहण करणेकरीता आरोग्य विभागाचे उपसंचालक, संजय देशमुख व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक नंदापूरकर व वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय जठार तर रुग्णवाहिका तसेच औषधांची वाहतूक करणारे वाहन चालक यांना प्रशिक्षण देणे, रुग्णवाहिका सेवा 24 तास उपलब्ध करुन देणे,त्या अनुषंगाने इतर उपाययोजना करण्याकरीता रोजगार हमी योजनेच्या उप आयुक्त नयना बोंदार्डे, कृषि अधीक्षक विनयकुमार आवटे तर सर्व शासकीय विभागांशी संपर्क साधणे व माहितीची देवाण घेवाण करणेकरीता मागासवर्ग शाखेच्या सहा.आयुक्त रुपाली डंबे-आवले, नायब तहसिलदार अपर्णा कौलगेकर यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
0 0 0 0

बुलंद शहर येथील साधूंच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली चिंता

0

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशीही फोनवर बातचीत

मुंबई दि २८: उत्तर प्रदेशमधल्या बुलंद शहर येथे दोन साधूंच्या झालेल्या हत्येबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून बोलून चिंता व्यक्त केली.

या अशा अमानुष घटनेविरुद्ध आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राने अशा स्वरूपाच्या घटनेमध्ये ज्या रितीने तातडीने कठोर कायदेशीर कारवाई केली आहे, त्याचप्रकारे बुलंद शहर प्रकरणीदेखील  दोषींना कडक शिक्षा होईल अशी  अपेक्षा व्यक्त केली आहे.  कोणीही या घटनांना धार्मिक रंग देऊ नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.

निर्जंतुकीकरणासाठी मंत्रालय उद्यापासून दोन दिवस बंद

0

मुंबई, दि. २८: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय आणि त्यासमोरील नवीन प्रशासकीय इमारतीतील कार्यालयांच्या निर्जंतुकीकरणासाठी उद्या दि. २९ व ३० एप्रिल रोजी मंत्रालयातील कामकाज बंद राहणार आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली.

कोरोनामुळे महामारीची परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक ठिकाणी तसेच कार्यालयांच्या निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार मंत्रालय आणि नवीन प्रशासकीय इमारतीतील सर्व कार्यालयांच्या निर्जंतुकीकरणाचे काम २९ व ३० एप्रिल रोजी  करण्यात येणार आहे.

पुणे शहर तहसील कार्यालयामधील कर्मचाऱ्यांची पूर्व कोवीड 19 तपासणी

0

पुणे, दिनांक 28- जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांच्‍या सूचनेनुसार पुणे शहर तहसिल कार्यालयातील सर्वच कर्मचाऱ्यांची कोवीड 19 बाबतची पूर्वतपासणी करण्‍यात आली. मेट्रो मेडिकल फाऊंडेशन व पुनीत बालन ग्रुप यांच्या सहकार्याने आयोजित शिबीरात ही तपासणी करण्‍यात आल्याची माहिती तहसिलदार तृप्‍ती कोलते-पाटील यांनी दिली.

पुणे शहर तहसील कार्यालयांतर्गत अनेक झोपडपट्टया आहेत. त्यात वास्तव्य करणारे, हातावर पोट असणा-या अनेक नागरिकांवर ‘लॉकडाऊन’मुळे वाईट वेळ आली आहे. महाराष्ट्रातील इतर जिल्‍ह्यांबरोबरच परराज्यातील मजुरांचे प्रमाण जास्त आहे. गेले महिनाभर तहसिल कार्यालय पुणे शहर येथील क्षेत्रीय अधिकारी म्हणजेच गाव कामगार, तलाठी, कोतवाल, मंडळाधिकारी हे पुणे शहरातील गरजू, बेरोजगार मजुरांकरिता अन्नधान्याचे किट वाटप करतात. प्रसंगी अतिसंवेदनशील भागांमध्ये जाऊनही तलाठ्यांना नागरिकांसाठी कीट उपलब्ध करून द्यावी लागतात. कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे कार्यालय प्रमुखाचे आद्य कर्तव्य आहे. त्यामुळेच पालकमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्‍त डॉ. दिपक म्‍हैसेकर आणि जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांच्‍या सूचनेनुसार कार्यालयातील कर्मचाऱ्यांना नागरिकांची सेवा अक्षयपणे करता यावी म्हणून प्री कोविड 19 च्‍या तपासण्या करून घेतल्या. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत तसेच आत्‍मविश्‍वासात नक्कीच वाढ होणार असल्‍याचेही श्रीमती पाटील यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांच्या तपासणीबरोबरच त्यांना वैयक्तिक संरक्षणासाठी पीपीई कीट, सॅनिटायझर, मास्‍क, हातमोजे, द्रवरुप हँडवॉश असे सुमारे ६५०० रुपये किमतीचे किट देण्यात आले. तसेच प्रतिकारशक्ती वाढीकरि‍ता कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांकरीता कामधेनू व तत्वसेवा या संस्थेतर्फे मोफत होमियोपथी औषधे व डॉ. बनसोडे यांच्यातर्फे सुमारे २२०० रूपयांची मोफत आयुर्वेदिक औषधे देण्यात आली आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आत्मबल व मनोधैर्य वाढण्‍यास नक्‍कीच मदत होईल, असेही तहसिलदार तृप्‍ती कोलते-पाटील यांनी सांगितले.

कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणा-या डॉक्टरांची निवास व्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये

0

पुणे दि.28: आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र कोरोना बाधित रुग्णांवर उपचार तसेच रुग्णांची सेवा करणा-या डॉक्टरांना विश्रांतीची अत्यंत आवश्यकता असते, हीच बाब लक्षात घेवून या डॉक्टरांच्या राहण्याची व्यवस्था पुणे स्टेशन परिसरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली असून त्याठिकाणी त्यांना आवश्यक त्या सर्व सोईसुविधा देण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला असून या डॉक्टरांचीही विशेष काळजी घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिली.
पुणे शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेत डॉक्टरांची मोठी टीम अहोरात्र कार्यरत आहे. आपल्या कुटुंबापासून दूर राहणे आवश्यक असल्याने प्रशासनाने या डॉक्टरांची राहण्याची वेगळी व्यवस्था केली आहे. पुणे स्टेशन परिसरासह शहरातील व्हीव्हीआयपी विश्रामगृहासह हॉटेल ब्लू डायमंड, हॉटेल लेमन ट्री या पंचतारांकित हॉटेलमध्ये निवास व्यवस्था करण्यात आली आहे. डॉक्टरांसाठी दर्जेदार जेवण मिळावे, यासाठी नामांकित दोन केटर्सचीदेखील नियुक्ती करण्यात आली आहे.

नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या पाठपूराव्याला यश  -महापालिकेच्या शाळेत सुरु झाले रेशनचे दुकान (व्हिडीओ)

0

पुणे  :कोरोना च्या संकटामुळे हवालदिल झालेल्या जनतेला मदत करण्याची मोहीम उघडलेल्या भाजपच्या नगरसेवक दिलीप वेडे पाटलांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेरीस आज यश आले आणि चक्क महापालिकेच्या शाळेत रेशनचे दुकान सुरु झाले . वेडे पाटलांनी सुरुवातीला वार्डात फवारणी करणे, अन्नधान्याचे कीट वाटणे ,सनीटायझर वाटणे ,घरोघरी आरोग्य तपासणी व्हावी म्हणून  भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विध्यमानाने आज डाॅक्टर आपल्या दारी डिस्पेनसरी व्हॅन हा उपक्रम राबविणे असे विविध कामे हाथी घेतली .पण रेशनचे दुकान नसल्याने येथे शासकीय धान्यवाटप कसे करायचे हा प्रश्नच होता आज तो हि त्यांनी निकाली काढला . पुणे मनपा शाळा क्रं. 153, बावधन खुर्द येथे स्वस्त धान्याचे केंद्र सुरू झाले व प्रत्यक्ष धान्य वाटप सुरू झाले.

बावधन खुर्द हा तहसील मुळशी (पौड) या ग्रामीण भागात होता. परंतु तेथील रेशनिंगचा  हा भाग प्रभाग क्रं. 10 पुणे शहर विभागामध्ये समाविष्ट करण्यासाठी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या अथक प्रयत्न व तत्कालीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे याला मंजूरी मिळून रेशनिंग  कार्ड ग्रामीण भागातून पुणे शहर अन्न धान्य पुरवठा विभागात समाविष्ट करण्यात आला. आता या भागातील बंद व सुरू असलेल्या केशरी रेशन कार्ड धारकांना देखील केंद्र आणि महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार प्रत्येक व्यक्तीस 2 किलो तांदूळ 12 रुपये व 3 किलो गहू 8 रुपये दराने मिळणार आहे.यावेळी मं.विभागाचे परिमंडळ अधिकारी मा.गजानन देशमुख, पुरवठा निरीक्षक नागरगोजे, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, नगरसेवक किरण दगडे पाटील व आदि मान्यवर उपस्थित होते.