पुणे दि.28 : – पुणे विभागामध्ये कोरोना विषाणू ( कोवीड -19) संसर्गजन्य आजाराची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत. हा विषाणू अतिसंसर्गजन्य असल्यामुळे त्यावर तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याने, राज्यात साथरोग अधिनियम -1897 च्या अनुषंगाने महाराष्ट्र कोव्हीड उपाययोजना नियम 2020 नियम अस्तित्वात आले आहेत व ते दि.15 मार्च 2020 पासून लागू झालेले आहेत.
कोरोना (कोवीड -19) प्रादुर्भाव नियंत्रित व प्रतिबंधित करण्याच्या अनुषंगाने पुणे विभागामध्ये कामाच्या समन्वयाकरीता अधिकारी / कर्मचा-यांच्या समिती गठीत करण्यात आल्या आहेत. त्यानुसार क्षेत्रीय स्तरावरील रुग्णालये व प्रयोगशाळा यांचे परिनिरीक्षण करणे तसेच प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात येणा-या नमुन्याची माहिती संकलित करुन समन्वय राखणेकरीता आरोग्य सेवा विभागाचे सहाय्यक संचालक आर.एस.आडकेकर व वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक रणदिवे तसेच आवश्यकता भासल्यास अतिरिक्त मानव संसाधन उपलब्ध करुन देण्याकरीता महसूल विभागाचे उपायुक्त् प्रताप जाधव व उपजिल्हाधिकारी स्नेहल बर्गे तसेच नायब तहसिलदार संजय शिंदे, त्याचप्रमाणे विभागातील पॅरामेडीकल, डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांना प्रशिक्षित करण्यासाठी उपायुक्त् ( विकास आस्थापना) पी.बी.पाटील, गट विकास अधिकारी (प्रशासन), आर.जी.खाडे व सहा.आयुक्त् (तपासणी) उदय पाटील इ.ची नेमणूक करण्यात आली आहे.
कोवीड-19 चा प्रादूर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने औषधे, वैद्यकीय उपकरणे यांची मागणी व उपलब्धतेबाबत समन्वय राखणेकरीता उपायुक्त (विकास योजना) राजाराम झेंडे, सहायक संचालक (लेखा) कैलास भोसले व सहा.आयुक्त् (तपासणी) संतोष हराळे, तसेच पायाभूत सुविधा व्यवस्थापन करणे व तद्अनुषंगीक कामकाज त्यामध्ये प्रामुख्याने विलगीकरण / अलगीकरण कक्ष व त्यामधील व्यवस्था करण्यासाठी उपायुक्त् (सामान्य प्रशासन) संजयसिंह चव्हाण, उपजिल्हाधिकारी जिल्हा मुद्रांक शुल्क प्रकाश अहिरराव व लेखाधिकारी ( लेखा शाखा) गणेश सस्ते तर प्रसार माध्यमात येणा-या बातम्या तसेच शासनाद्वारे प्रसारीत करण्यात येणारी माहिती योग्यरित्या प्रसारीत करण्यासाठी उपसंचालक ( माहिती) मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग व माहिती अधिकारी वृषाली पाटील तर प्रसार माध्यमांना अचूक माहिती उपलब्ध करुन देण्याकरीता नगरपालिका प्रशासनाचे प्रादेशिक उपसंचालक प्रशांत खांडकेकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.
कोवीड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने करण्यात येणा-या उपाय योजना, विविध बैठकांचे इतिवृत्त, शासनाकडून प्राप्त होणा-या मार्गदर्शक सूचना त्या अनुषंगाने करण्यात येणारी कार्यवाहीबाबत प्राप्त दस्तऐवज तयार करणेकरीता पशुसंवर्धन विभागाच्या उपायुक्त साधना सावरकर, पुनर्वसनचे तहसिलदार विवेक साळुंके तसेच खाजगी रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्णांची माहिती घेऊन संक्रमित रुग्ण शोधणे, खाजगी रुग्णालयाशी समन्वय साधणे,आवश्यकतेनुसार खाजगी रुग्णालये अधिग्रहण करणेकरीता आरोग्य विभागाचे उपसंचालक, संजय देशमुख व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक नंदापूरकर व वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय जठार तर रुग्णवाहिका तसेच औषधांची वाहतूक करणारे वाहन चालक यांना प्रशिक्षण देणे, रुग्णवाहिका सेवा 24 तास उपलब्ध करुन देणे,त्या अनुषंगाने इतर उपाययोजना करण्याकरीता रोजगार हमी योजनेच्या उप आयुक्त नयना बोंदार्डे, कृषि अधीक्षक विनयकुमार आवटे तर सर्व शासकीय विभागांशी संपर्क साधणे व माहितीची देवाण घेवाण करणेकरीता मागासवर्ग शाखेच्या सहा.आयुक्त रुपाली डंबे-आवले, नायब तहसिलदार अपर्णा कौलगेकर यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
0 0 0 0
पुणे विभागातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या समन्वयाकरीता समित्यांची स्थापना
Date: