पुणे :कोरोना च्या संकटामुळे हवालदिल झालेल्या जनतेला मदत करण्याची मोहीम उघडलेल्या भाजपच्या नगरसेवक दिलीप वेडे पाटलांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेरीस आज यश आले आणि चक्क महापालिकेच्या शाळेत रेशनचे दुकान सुरु झाले . वेडे पाटलांनी सुरुवातीला वार्डात फवारणी करणे, अन्नधान्याचे कीट वाटणे ,सनीटायझर वाटणे ,घरोघरी आरोग्य तपासणी व्हावी म्हणून भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विध्यमानाने आज डाॅक्टर आपल्या दारी डिस्पेनसरी व्हॅन हा उपक्रम राबविणे असे विविध कामे हाथी घेतली .पण रेशनचे दुकान नसल्याने येथे शासकीय धान्यवाटप कसे करायचे हा प्रश्नच होता आज तो हि त्यांनी निकाली काढला . पुणे मनपा शाळा क्रं. 153, बावधन खुर्द येथे स्वस्त धान्याचे केंद्र सुरू झाले व प्रत्यक्ष धान्य वाटप सुरू झाले.
बावधन खुर्द हा तहसील मुळशी (पौड) या ग्रामीण भागात होता. परंतु तेथील रेशनिंगचा हा भाग प्रभाग क्रं. 10 पुणे शहर विभागामध्ये समाविष्ट करण्यासाठी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या अथक प्रयत्न व तत्कालीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे याला मंजूरी मिळून रेशनिंग कार्ड ग्रामीण भागातून पुणे शहर अन्न धान्य पुरवठा विभागात समाविष्ट करण्यात आला. आता या भागातील बंद व सुरू असलेल्या केशरी रेशन कार्ड धारकांना देखील केंद्र आणि महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार प्रत्येक व्यक्तीस 2 किलो तांदूळ 12 रुपये व 3 किलो गहू 8 रुपये दराने मिळणार आहे.यावेळी मं.विभागाचे परिमंडळ अधिकारी मा.गजानन देशमुख, पुरवठा निरीक्षक नागरगोजे, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, नगरसेवक किरण दगडे पाटील व आदि मान्यवर उपस्थित होते.