Home Blog Page 2547

मन सून्न करणारी बातमी -अक्षयकुमार

0

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. ही बातमी कळल्यानंतर अभिनेता अक्षय कुमारने ट्विट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय म्हणतो.. सुशांतच्या आत्महत्येची बातमी मन सून्न करणारी आहे. या बातमीमुळे धक्का बसला. मी काय बोलू? शब्दच फुटत नाहीत. मला आठवतंय सुशांतचा छिछोरे सिनेमा पाहिला आणि माझा मित्र साजिद याला फोन करुन सांगितलं की मला हा सिनेमा पाहताना किती मजा आली. मी देखील या सिनेमात असतो तर मजा आली असती. एका गुणी अभिनेत्याचा शेवट झाला. त्याच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो असं अभिनेता अक्षय कुमारने म्हटलं आहे.बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. २००९ मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं. आज त्याने आत्महत्या केल्यानंतर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. आपल्याला हा धक्का न सहन होणारा आहे असं अभिनेता अक्षय कुमारने म्हटलं आहे.

इंजिनिअरिंग सोडून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण

0

आणि एकता कपूरने त्याला हेरले

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मुंबईत राहत्या घरी आत्महत्या केली. या वृत्ताने संपूर्ण कलाविश्वावर दु:खाचं डोंगर कोसळलं आहे. एकेकाळी गाजलेल्या ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतील मानव म्हणजेच सुशांत तरुणींच्या गळ्यातील ताईत होता. काही काळापूर्वी क्रिकेटपटू एम.एस.धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपटात त्याने मुख्य भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. खरंतर सुशांत याआधीपासूनच चित्रपटसृष्टीत सक्रिय होता. पण, त्याला धोनीच्या भूमिकेने एक वेगळी ओळख दिली. छोट्या पडद्यापासून सुरु झालेला त्याचा प्रवास अगदी हेवा वाटेल असाच आहे.

सुशांत सिंह राजपूत मूळचा बिहारचा असून तो दिल्लीमध्ये लहानाचा मोठा झाला होता. ऑल इंडिया एन्ट्रन्स एक्झाम देऊन त्यात सातव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या सुशांतने केमिकल इंजिनिअरींगला प्रवेशही घेतला. मात्र यामध्ये आपले मन रमत नसल्याचे लक्षात आल्यावर त्याने दुसऱ्या वर्षी हे शिक्षण सोडून दिले आणि अभिनयाच्या क्षेत्रात पुढे करियर करायचे असे ठरवले होते.

इंजिनिअरींगचे शिक्षण घेत असताना त्याने शामक दावरकडे नृत्याचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. २००६मध्ये ऑस्ट्रेलिया येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याला ऐश्वर्या रायसोबत नृत्य करण्याची संधी मिळाली होती.

मुंबईमध्ये नादिरा बब्बरसोबत अभिनयाच्या क्षेत्रात काम करुन एलन-अमीनकडून तो काही अॅक्शन शिकला. यावेळी एका नाटकाच्यावेळी एकता कपूर त्याठिकाणी उपस्थित होती. तिने त्याच्या टॅलेंटला हेरले आणि त्याचे नशीबच बदलले. त्यानंतर ‘पवित्र रिश्ता’मधून त्याने आपल्या छोट्या पडद्यावरील अभिनयाला सुरुवात केली आणि ‘झलक दिख ला जा’ मध्येही आपल्यातील चमक दाखवून दिली होती.

पवित्र रिश्ता मालिका गाजल्यानंतर सुशांतला बॉलिवूडमध्ये प्रवेश मिळाला. ‘काई पो चे’ या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवडूमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘शुद्ध देसी रोमान्स’ या यशराज फिल्म्सच्या चित्रपटातही त्याने काम केले. डिटेक्टीव्ह ब्योमकेश बक्षी आणि एम.एस.धोनी या चित्रपटांनी त्याला अभिनेता म्हणून खरी ओळख मिळवून दिली.

अंकिता लोखंडेसोबत त्याची पवित्र रिश्तामध्ये अतिशय चांगली केमिस्ट्री जुळली होती. हीच केमिस्ट्री प्रत्यक्ष आयुष्यातही जुळत होती. मात्र कालांतराने त्यांच्यामध्ये वाद व्हायला लागले आणि या वादांची जागा ब्रेक-अपने घेतली. त्यानंतर त्याने समोर येत माध्यमांना याबाबतचे स्पष्टकरणही दिले होते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई. बॉलिवूडमधून अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पवित्र रिश्ता या मालिकेतून अभिनयाची सुरुवात करणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मुंबईमधील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अद्याप या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. त्याच्या घरातील नोकराने सुशांतचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहिला आणि पोलिसांना या घटनेची सूचना दिली. सुशांतला महेंद्रसिंग धोनीचा जीनवपट ‘एम. एस.धोनी’ चित्रपटातून खरी ओळख मिळाली होती.

सुशांतने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीमधून केली होती. सुशांतने सर्वात आधी ‘किस देश में है मेरा दिल’ नावाच्या मालिकेत काम केले होते, पण त्याला खरी ओळख एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’मधून मिळाली. त्यानंतर त्यांनी आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात ‘काय पो छे’मधून केली होती. त्यानंतर ‘शुद्ध देसी रोमांस’ आणि भारतीय क्रिकट कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा बायोपिक ‘एम एस धोनी’, आमिर खानसोबत ‘पीके’ आणि ‘छिछोरे” चित्रपटात काम काम केले होते. विशेष म्हणजे, छिछोरे चित्रपटात सुशांतने आत्महत्या न करण्याचा संदेश दिला होता. पण, त्यानेच आज आत्महत्या करुन आपले आयुष्य संपवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

12 चित्रपटात केले काम

काय पो छे, शुद्ध देसी रोमांस, पीके, डिटेक्टिव व्योमकेश बख्शी, एमएस धोनी: अनटोल्ड स्टोरी, राब्ता, वेल्कम टू न्यू यॉर्क, केदारनाथ, सोनचिड़िया, छिछोरे, ड्राइव आणि दिल बेचारा चित्रपटात काम केले.

मागील काही दिवसात बॉलिवूडमधील अनेक कलाकार जग सोडून गेले आहेत. एप्रिल महिन्यात इरफान खान आणि ऋषी कपूरसारख्या मोठ्या कलाकारांचे निधन झाले. तर, नुकतच सिंगर आणि म्यूजिक कंपोजर वाजिद खानचे 42 व्या वर्षी निधन झाले.

8 जूनला माजी मॅनेजरने केली आत्महत्या

पाच दिवसांपूर्वीच सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सलियनने 8 जूनला मुंबईतील एका इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. दिशाने मुंबईच्या मालाडमधील 14 मजली इमारतीवरुन उडी मारली.

श्रीमंत नानासाहेब पेशवा यांनी रोवली स्मार्ट पुण्याची मुहूर्तमेढ – संदीप खर्डेकर.

0

पुणे-श्रीमंत नानासाहेब पेशवा हे आधुनिक पुण्याचे निर्माते होते व खऱ्या अर्थाने स्मार्ट पुण्याची मुहूर्तमेढ त्यांनीच रोवली या शब्दात क्रिएटिव्ह फौंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी नानासाहेबांना आदरांजली अर्पण केली.आज तिथीने नानासाहेब पेशवा यांची पुण्यतिथी – यानिमित्ताने कोथरूडच्या मृत्युंजय मंदिरात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात देवदेवेश्वर संस्थान च्या सर्व मंदिरांसाठी आधुनिक हॅंड सॅनिटायझर यंत्र भेट देण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी देवदेवेश्वर संस्थान चे प्रमुख विश्वस्त सुधीर पंडित,प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अमोल रावेतकर,नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,नगरसेविका माधुरीताई सहस्त्रबुद्धे,भाजपच्या कोथरूड मंडलाच्या महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे,गौरीताई करंजकर,सुवर्णाताई काकडे,माणिकताई दीक्षित,जयश्रीताई तलेसरा,अपर्णाताई लोणारे,श्रीपाद गोहाड,सुमीत दिकोंडा इ पदाधिकारी उपस्थित होते.
बालाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवा यांनी नाना पेठ,सोमवार पेठ,शनिवार पेठ,बुधवार पेठ अश्या पेठा उभारतानाच लाकडी पूल,कात्रज तलाव,पर्वती देवस्थान यासह अनेक प्रकल्पांची उभारणी केली.खऱ्या अर्थाने आधुनिक पुण्याची निर्मिती त्यांच्याच काळात झाली व त्यांच्या कारकीर्दीत मराठेशाहीने उत्तुंग उंची गाठली असेही संदीप खर्डेकर म्हणाले.अश्या या महान विभूतीस आदरांजली अर्पण करण्यासाठी त्यांनी उभारलेल्या सर्व मंदिरात आज यंत्र भेट देताना मनस्वी आनंद होत आहे असे बांधकाम व्यवसायिक अमोल रावेतकर म्हणाले.सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेतून नगरसेविका मंजुश्री खर्डेकर आणि क्रिएटिव्ह फौंडेशनच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे असेही श्री.रावेतकर यांनी स्पष्ट केले.
नानासाहेबांच्या पुण्यतिथीदिनी मी सर्वांचे स्वागत करताना आणि कृतज्ञता व्यक्त करताना आपल्या कोरोनाच्या संकटातून लवकरच मुक्ती मिळो आणि मंदिरे भाविकांसाठी उघडली जावी हीच प्रार्थना करत असल्याचे देवदेवेश्वर संस्थान चे मुख्य विश्वस्त सुधीर पंडित म्हणाले.मंदिरे उघडण्यास परवानगी मिळाल्यावर भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवताना सोशल डिस्टिंसिंग रहावे आणि मंदिर परिसर व वैयक्तिक स्वच्छतेचा जागर व्हावा यासाठी ही भेट उपयुक्त ठरेल असेही ते म्हणाले.
यावेळी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,माधुरीताई सहस्त्रबुद्धे आणि हर्षदाताई फरांदे यांनीही मनोगत व्यक्त केले.

ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका देऊळ वाड्यात विसावल्या..

0

आळंदी- देवाच्या आळंदीमध्ये अगदी मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. करोनाचं संकट असल्याने यावर्षीची पायी वारी रद्द करण्यात आली. त्यामुळे ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून आजोळ घराच्या देऊळ वाड्यात विसावणार आहेत. ३० जूनला शासनाने दिलेल्या पर्यायांपैकी एकाचा अवलंब करून, पादुका पंढरपूरला घेऊन जाण्यात येणार आहेत.

आळंदीमध्ये दरवर्षी वैष्णवांचा मेळा भरला जातो. मात्र, करोना महामारीमुळे या वर्षीची आषाढी वारी सोहळा रद्द करण्यात आला असून, अगदी मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थित ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांनी प्रस्थान ठेवले आहे.

यावेळी इंद्रायणी काठी अत्यंत शांततामय वातावरण पहायला मिळाले. दरवर्षी आळंदीमध्ये लाखो वारकरी दाखल होतात. मात्र, यावर्षी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालायकडून अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला करोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदीत न येण्याचे आवाहन केले होते. वारकरी संप्रदायाने त्या आवाहनाला प्रतिसाद देत घरातूनच थेट प्रक्षेपणाद्वारे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पाहिला डोळ्यात साठवला.

काँग्रेस नेत्यांची नाराजी सोमवारी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली जाणार

0

मुंबई- मागील काही दिवसातील विविध प्रकारचे निर्णय आणि विधानपरिषदेची जागा, इतर अधिकाराच्या प्रश्नावरून काँग्रेस मंत्र्यांमध्ये नाराजी पसरली आहे. यासंदर्भात काँग्रेसचे नेते सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान काँग्रेस नेत्यांची नाराजी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी आपल्याला भेटीसाठी वेळ दिला असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

थोरात म्हणाले, की आमचे काही विषय आहेत त्यासंदर्भाने चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वेळ मागितली होती. त्यामुळे आज सकाळी मुख्यमंत्री यांचा फोन आला आणि त्यांनी आपल्याला सोमवारी वेळ देणार असल्याचे सांगितले आहे. सोमवारी मी आणि मंत्री अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत.

शुक्रवारी दादर येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकात काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली होती. परंतु, या भेटीत काँग्रेसमधील नाराजीवर कोणती चर्चा झाली नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेसकडून देण्यात आले. त्यावेळी केवळ मंत्री सुनील केदार यांच्या विभागातील कामाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलो होतो. मात्र , महाराष्ट्रविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून चर्चा बाकी असून ती सोमवारी केली जाणार असल्याची माहिती थोरात यांनी दिली.

विधान परिषदेच्या जागेवरून काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर आहे. दुसरीकडे महामंडळाच्या जागावाटपाचा निर्णय ही घेतला जात नसल्याने यावरुनही काँग्रेसमध्ये मागील अनेक दिवसांपासून नाराजी आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने यासंदर्भात निर्णय घ्यावेत.आघाडी म्हणून काही निर्णय घेताना काँग्रेसला डावलले जात असल्याची भावना काँग्रेस नेत्यांमध्ये निर्माण झाली आहे. यावरही सोमवारी होणाऱ्या भेटीत चर्चा केली जाणार असल्याचे सांगण्यात आलेय.

घरकामगार महिलांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर सोसायट्यांनी दिलासा द्यावा :अमित बागुल

0

उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर 

पुणे -जीवघेण्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकजण आज खबरदारी घेत आहे. लॉक डाऊनच्या  कडक अंमलबजावणीला गरिबांपासून ते श्रीमंतापर्यंत सर्वचजण सामोरे गेले . आज प्रादुर्भाव कमी होत आहे आणि प्रशासनाने अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी शिथिलता दिली आहे ;पण घरकामगार महिलाच त्यापासून वंचित राहत असल्याने, ते त्यांच्या कोलमडलेल्या संसाराला कसे सावरणार या गंभीर वास्तवतेकडे पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व सामाजिक  कार्यकर्ते अमित बागुल यांनी लक्ष वेधले असून प्रशासनाने याप्रश्नी तोडगा काढावा असे आवाहनही केले आहे. 

याबाबत अमित बागुल म्हणाले कि, कोरोनाचा प्रादुर्भाव आज कमी होत आहे. त्यामुळे अनेक भागात जनजीवन आता पूर्वपदावर येत आहे. सॅनिटायझर, मास्क आणि सामाजिक अंतर या महत्वपूर्ण बाबींचा अवलंब प्रत्येक जण करत दैनंदिन कामकाजाला सुरुवातही केली आहे. मात्र हातावर पोट असणाऱ्या अनेक घरकामगार महिलांना अजूनही बहुतांश सोसायट्यांमध्ये प्रवेश दिला जात नसल्याची वस्तुस्थिती आहे. गेले दोन – अडीच महिने लॉकडाऊनमुळे उत्पनाअभावी घरकामगार महिलांना आज घर कसे चालवावे या प्रश्नाने घेरले आहे. त्यात गेली दहा -पंधरा वर्षे ज्यांच्याकडे काम केले ,त्यांनीच  आता कोरोनाच्या भीतीने पाठ फिरवली आहे मग जगायचे कसे असा सवाल या घर कामगार महिलांचा आहे. आम्हालाही सुरक्षितता महत्वाची आहे, आम्हालाही कुटुंब आहे मग कोरोनाविषयी दक्षता आम्हीही घेत आहोत  . असे असतानाही  आज अनेक सोसायट्यांमध्ये आम्हाला प्रवेश नाकारला जात आहे मग  आमच्या रोजीरोटीचे  काय असा प्रश्न घरकामगार महिला उपस्थित करत आहेत असेही  अमित बागुल यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले, आज पुण्यात घर कामगार  महिलांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे सोसायट्यांनी या घरकामगार महिलांचा विचार करावा,त्यांना कामापासून वंचित ठेवू नये. घर काम करणाऱ्या महिला ह्या आपल्या कुटूंबातील एक सदस्य असल्या प्रमाणे त्यांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे
माझी सर्व सोसायटी सभासद आणि कमिटीला हात जोडून विनंती आहे आपण घर काम करणाऱ्या महिलांना कामावर घ्या त्यांना कामावरून काढू नये आता खरी माणुसकीची गरज आहे आपण नक्की या सगळ्या गोष्टींचा विचार करताल अशी अपेक्षा व्यक्त करतो

केंद्राने परवानगी दिल्यास सलून व्यवसाय सुरू करण्याची राज्य शासनाची तयारी : मंत्री छगन भुजबळ

0

नाशिक, दि.13 : कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत गेल्या चार महिन्यांपासून सलून व्यवसाय पूर्णपणे बंद असल्यामुळे नाभिक समाज अडचणीत आला आहे. मात्र सलून व्यवसाय सुरु करण्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी नसल्यामुळे राज्य सरकारने सलून शॉप सुरु करण्यासाठी अद्याप परवानगी दिलेली नाही. मात्र केंद्राने परवानगी दिल्यास राज्यात सलून व्यवसाय सुरु करण्यासाठी राज्य शासनाची तयारी असल्याचे राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री  छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

राष्ट्रीय नाभिक महासंघ संलग्न महाराष्ट्र नाभिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज मंत्री श्री. भुजबळ यांची नाशिक येथील कार्यालयात भेट घेऊन निवेदन देत चर्चा केली. त्यावेळी मंत्री श्री. भुजबळ यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत सलून व्यावसायिकांच्या प्रश्नाबाबत महाराष्ट्र शासन सकारात्मक असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यावसायिकांच्या प्रश्नाबाबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी आमदार हिरामण खोसकर  महाराष्ट्र नाभिक महासंघाचे पदाधिकारी नारायण यादव, अशोक सूर्यवंशी, सुरेश सूर्यवंशी, नाना वाघ, गणपत सोनवणे, ज्ञानेश्वर बोराडे, रमेश आहेर, संजय गायकवाड, विनोद गरुड, संतोष वाघ आदी उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या परिस्थितीत गेल्या चार महिन्यांपासून सलून व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे नाभिक समाज त्रस्त झाला असून कर्जबाजारी होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या सर्व बाबींचा विचार करून नाभिक समाजाचे सलून व पार्लर सुरु करण्यास परवानगी द्यावी तसेच त्यांना आर्थिक सहाय्य देण्यात यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.

५१ हजार ३७९ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि.१३: राज्यात आज १५५० रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार ३४६ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३४२७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५१ हजार ३७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९७ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत.आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ लाख ४१ हजार ४४१ नमुन्यांपैकी १ लाख ०४ हजार ५६८ नमुने पॉझिटिव्ह (१६.३ टक्के ) आले आहेत. राज्यात ५ लाख ८३ हजार ३०२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५८० संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७९ हजार ७४ खाटा उपलब्ध असून सध्या २८ हजार २०० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ११३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे.आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ८७ (मुंबई ६९, ठाणे ३, नवी मुंबई ८, पनवेल ६, कल्याण-डोंबिवली १), पुणे- १९ (पुणे १०, सोलापूर ८, सातारा १), औरंगाबाद-३ (औरंगाबाद ३), लातूर -३ (लातूर २, नांदेड १), अकोला-१ (यवतमाळ १).

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७३ पुरुष तर ४० महिला आहेत. आज नोंद झालेल्या ११३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६५ रुग्ण आहेत तर ३८  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १० जण ४० वर्षांखालील आहे. या ११३ रुग्णांपैकी १० रुग्णांच्या इतर अतिजोखमीच्या आजाराबद्दल माहिती उपलब्ध नाही.  उर्वरित १०३ रुग्णांपैकी ८३ जणांमध्ये ( ८०.६ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३८३० झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ७३ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू  २७ मे ते १० जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ४० मृत्यूंपैकी मुंबई १९, नवी मुंबई -८, सोलापूर -४, ठाणे -३, पनवेल -३, कल्याण डोंबिवली – १, पुणे -१ आणि सातारा १ मृत्यू  असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (५६,८३१), बरे झालेले रुग्ण- (२५,९४७), मृत्यू- (२११३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव रुग्ण- (२८,७६३)

ठाणे: बाधित रुग्ण- (१७,३०६), बरे झालेले रुग्ण- (६८१८), मृत्यू- (४२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव रुग्ण- (१०,०६२)

पालघर: बाधित रुग्ण- (२२१६), बरे झालेले रुग्ण- (७१४), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१४५४)

रायगड: बाधित रुग्ण- (१७८१), बरे झालेले रुग्ण- (११४८), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव रुग्ण- (५६७)

नाशिक: बाधित रुग्ण- (१८५२), बरे झालेले रुग्ण- (११७०), मृत्यू- (१०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५८०)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (२३५), बरे झालेले रुग्ण- (१६६), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६०)

धुळे: बाधित रुग्ण- (३५३), बरे झालेले रुग्ण- (१९९), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव रुग्ण- (१२७)

जळगाव: बाधित रुग्ण- (१६३३), बरे झालेले रुग्ण- (६५३), मृत्यू- (१२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (८६०)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (४८), बरे झालेले रुग्ण- (३०), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१४)

पुणे: बाधित रुग्ण- (११,७२२), बरे झालेले रुग्ण- (६५६७), मृत्यू- (४६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४६८६)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१७३८), बरे झालेले रुग्ण- (६५४), मृत्यू- (१२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (९५६)

सातारा:  बाधित रुग्ण- (७३१), बरे झालेले रुग्ण- (४१९), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२८४)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (६९२), बरे झालेले रुग्ण- (५२१), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१६३)

सांगली: बाधित रुग्ण- (२२१), बरे झालेले रुग्ण- (११४), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१००)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१५०), बरे झालेले रुग्ण- (७६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (७४)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (३९२), बरे झालेले रुग्ण- (२५६), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१२१)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२५६०), बरे झालेले रुग्ण- (१४००), मृत्यू- (१२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१०३२)

जालना: बाधित रुग्ण- (२५८), बरे झालेले रुग्ण- (१५६), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (९६)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२३६), बरे झालेले रुग्ण- (१८४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५१)

परभणी: बाधित रुग्ण- (८१), बरे झालेले रुग्ण- (६८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१०)

लातूर: बाधित रुग्ण- (१६३), बरे झालेले रुग्ण- (११८), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३७)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१४३), बरे झालेले रुग्ण- (१००), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४०)

बीड: बाधित रुग्ण- (७४), बरे झालेले रुग्ण- (४९), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव रुग्ण- (२३)

नांदेड: बाधित रुग्ण- (२०४), बरे झालेले रुग्ण- (१३७), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५७)

अकोला: बाधित रुग्ण- (९९०), बरे झालेले रुग्ण- (५०९), मृत्यू- (४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव रुग्ण- (४४०)

अमरावती: बाधित रुग्ण- (३३५), बरे झालेले रुग्ण- (२४३), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (७१)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१७६), बरे झालेले रुग्ण- (१३४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३९)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (११७), बरे झालेले रुग्ण- (७३), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४१)

वाशिम: बाधित रुग्ण- (४१), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३३)

नागपूर: बाधित रुग्ण- (९८२), बरे झालेले रुग्ण- (५३९), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४३१)

वर्धा: बाधित रुग्ण- (१४), बरे झालेले रुग्ण- (७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६)

भंडारा: बाधित रुग्ण- (४९), बरे झालेले रुग्ण- (३८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (११)

गोंदिया: बाधित रुग्ण- (६९), बरे झालेले रुग्ण- (६८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (४६), बरे झालेले रुग्ण- (२६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२०)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (४९), बरे झालेले रुग्ण- (३९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (९)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (८०), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६०)

एकूण: बाधित रुग्ण-(१,०,४५६८), बरे झालेले रुग्ण- (४९,३४६), मृत्यू- (३८३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१३),ॲक्टिव रुग्ण-(५१,३७९)

(टीप- आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या १४७ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.

चक्रीवादळग्रस्तांसाठी शासकीय मदतीच्या वाटपाला गती द्या – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

0

अलिबाग,जि.रायगड, दि. 13 :- जिल्ह्यात दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे मुरुड, श्रीवर्धन, अलिबाग तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, झाडांची, विजेच्या खांबांची पडझड झालेली आहे. गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे.  या नुकसानग्रस्तांचे जनजीवन सुरळीत करण्यासाठी शासनाकडून प्राप्त झालेल्या मदत निधीचे वाटप गतीने करावे, असे निर्देश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले. 

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज पाहणी केली, नागाव, काशिद येथील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री कु.आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार माणिक जगताप, जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी  दिलीप हळदे, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर आदी उपस्थित होते

वेधशाळेने चक्रीवादळाचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिलेल्या आदेशानुसार प्रशासन सज्ज होते.  याआधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, खा.शरद पवार व अन्य मंत्री महोदयांनी नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली आहे. यामध्ये खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधीही सहभागी झाले होते.  नुकसानग्रस्तांसाठी आधी जे मदतीचे निकष होते त्यात शासनाने बदल करुन शासनाकडून वाढीव मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांच्या घरांचे पूर्णत: नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी  1 लाख 50 हजार व कपडे, भांडी यासाठी 10 हजार असे एकूण 1 लाख 60 हजार रुपयांची तातडीची मदत दिली जाणार आहे.  याआधी आपत्तीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना हेक्टरी 18 हजार रुपये मदत दिली जात होती. आता त्यामध्ये शासनाने वाढ करुन हेक्टरी 50 हजार रुपये केले आहेत, असेही महसूलमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

कोकणातील शेतीचे मोजमाप हे गुठ्यांमध्ये होत असल्यामुळे प्रति गुंठ्यासाठी अधिकाधिक मदत कशी देता येईल, यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगून नुकसानग्रस्तांना  मदतीचे वाटप गतीने करण्याची  शासन काळजी घेत आहे. लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल अशी ग्वाहीदेखील यावेळी महसूलमंत्री श्री. थोरात यांनी दिली.  

रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबद्दल जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी आग्रहाने भूमिका केंद्र शासनाकडे मांडून अधिक निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील. चक्रीवादळात ज्यांच्या घराचे, फळबागांचे, मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी ही केवळ मदत नसून हे माझे कर्तव्य आहे, या भावनेतून शासनाकडून दिली जाणारी मदत तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविली जाईल, असेही महसूलमंत्री यावेळी म्हणाले.

यावेळी नागाव ग्रामपंचायतीमधील काही नुकसानग्रस्त नागरिकांना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आदी मान्यवरांच्या हस्ते नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले. पालकमंत्री कु.आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, आमदार महेंद्र दळवी , माजी आमदार माणिकराव जगताप यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

‘निसर्ग’च्या नुकसानग्रस्तांना अद्याप एक रुपयाची मदतही मिळाली नाही-फडणवीस (व्हिडीओ)

0

मुंबई-निसर्ग चक्रीवादळानंतर एक रुपयाची मदत आजपर्यंत नुकसानग्रस्तांना मिळालेली नाही. सरकारचं अस्तित्त्व आहे असं दिसत नाही. लोकांच्या निवाऱ्याची सोय बस स्टँडच्या शेडमध्ये करण्यात आली आहे. काहींना शाळांमध्ये कोंबून ठेवण्यात आलेलं आहे. जेवणाची व्यवस्था नाही, सोशल डिस्टन्सिंग नाही. हे सगळं विदारक चित्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर आम्ही मांडलं आहे अशी माहिती आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. देवेंद्र फडणवीस हे दोन दिवस कोकण दौऱ्यावर होते. तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आज त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अद्याप कोकणात एक रुपयाचीही मदत मिळाली नसल्याचं म्हटलं आहे.

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/600811817307727/

विशेषतः निसर्ग वादळात ज्यांचं नुकसान झालंय त्या नुकसानग्रस्तांना रोख मदत मिळाली पाहिजे. ज्या लोकांना केरोसीन मिळत नाही त्यांना ते मिळालं पाहिजे. घरांवरचे जे पत्रे आहेत त्याचा काळाबाजार सुरु आहे. हा काळा बाजार तातडीने बंद झाला पाहिजे आणि लोकांना हे पत्रे उपलब्ध करुन दिले पाहिजेत. वीजेचे खांब अनेक ठिकाणी पडले. वीजेचं रिस्टोरेशन अत्यंत महत्त्वाची बाब आहे, या सगळ्या गोष्टींकडे आम्ही मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पिण्याच्या पाण्याचीही सोय करावी लागेल. मासेमारी करणारे जे मच्छिमार बंधू आहेत त्यांचा डिझेलचा परतावा दिला तर काही पैसे त्यांच्या खिशात येतील. त्यांच्या बोटींचंही नुकसान झालंय त्यासाठीही त्यांना पैसे द्यावे लागतील. त्यांचं कर्ज माफ करावी, दीर्घकाळाची मदत कशी करता येईल याचा विचार करावा अशीही मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

शेतकऱ्यांच्या संदर्भातही काही मागण्या केल्या आहेत. ५० हजार रुपये हेक्टरी मदत ही अत्यंत तोकडी मदत आहे. त्यापेक्षा जास्त मदत आपण त्यांना केली पाहिजे अशीही मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ५०० रुपये प्रति गुंठा अशी मदत मिळणार आहे. पिकाचं नुकसान झालं तर पुढच्या वर्षी पिक येतं. झाडं उन्मळून पडली तर पुढच्या वर्षी ती येत नाहीत. त्यामुळे त्यांचं कर्ज माफ करा आणि दीर्घ काळासाठी कर्ज कसं देता येईल याचा विचार झाला पाहिजे अशीही मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

राज्यात लॉकडाऊनच्या काळात ४७५ गुन्हे दाखल; २५६ लोकांना अटक

0

मुंबई दि.१३ : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ४७५ विविध गुन्हे महाराष्ट्र  सायबरने दाखल केले असून २५६ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.

राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ४७५ गुन्ह्यांची नोंद कालपर्यंत झाली आहे. जिल्हानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे-

आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे दाखल

 ■ व्हॉट्सॲप- १९५ गुन्हे

■ फेसबुक पोस्ट्स – १९४ गुन्हे दाखल

■ टिकटॉक व्हिडिओ- २४ गुन्हे दाखल

■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – ८ गुन्हे दाखल

■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट-  ४ गुन्हे

■ अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर –  ५० गुन्हे दाखल

■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत  २५६ आरोपींना अटक.

■ १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश

■ पुणे ग्रामीण मध्ये एका नवीन गुन्ह्याची नोंद

पुणे विभागात नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ४१ वर

■ सदर गुन्ह्यातील आरोपीने आपल्या फेसबुक प्रोफाईलवर कोरोना महामारीबाबत सरकार ज्या उपाययोजना करत आहेत त्यावर टिपणी करताना त्यास राजकीय रंग देणाऱ्या आशयाचा मजकूर असणारी पोस्ट शेअर केली होती .त्यामुळे परिसरातील शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

महाराष्ट्र सायबरचे आवाहन

डेबिट व क्रेडिट कार्ड वापर

सध्याच्या काळात इंटरनेटचा वापर वाढत असल्याने सायबर भामटे वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर करून सामान्य नागरिकांना फसवित आहेत . कधी ते नागरिकांना खोट्या ऑफर्सच्या मोहात पाडून एखादे मोबाईल ॲप डाउनलोड करायला लावतात व त्यांच्या फोनचा ताबा मिळवतात . तर कधी sms किंवा ई-मेल करून एखाद्या बक्षिसाचे आमिष दाखवून नागरिकांना एखद्या लिंकवर क्लिक करायला लावतात व त्यातून सर्व वैयक्तिक माहिती व बँक खात्याची माहिती घेऊन फसवितात . तर कधी फोन करून व अतिशय गोड भाषेत बोलून बेमालूमपणे नागरिकांकडून त्यांची सर्व बँक डिटेल्स, डेबिट व क्रेडिट कार्ड पिन क्रमांक ,CVV क्रमांक घेतात व तसेच बोलण्यात गुंतवून फोनवर आलेला OTP पण काढून घेतात व फसवितात . तर कधी कधी तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये एक malware डाउनलोड करून तुमच्या सर्व फाइल्सला पासवर्ड टाकतात व त्या फाइल्स अनलॉक करण्यासाठी खंडणी मागतात .

महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते कि, तुम्ही  इंटरनेट वापरताना सावध राहा . आपल्या सोशल मिडिया अकाउंटचा पासवर्ड,इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड ,आपले डेबिट व क्रेडिट कार्डसचे पिन क्रमांक ,CVV क्रमांक ,ईमेलचे पासवर्ड,UPI ,Paytm इत्यादी मोबाईल wallet चे पिन नंबर कोणाला देऊ नका . शक्यतो प्रत्येक नेट बँकिंग अकाउंटचा पासवर्ड वेगळा ठेवा . कोणत्याही  व्यक्तीने एखादे नवीन किंवा अनोळखी मोबाईल अँप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करायला सांगितले तर शक्यतो तसे करणे टाळा . तुम्हाला sms किंवा इमेलवर येणाऱ्या अनोळखी लिंकवर क्लीक करून आपली सर्व माहिती कुठेही देऊ नका .

जर काही औषध किंवा खाण्याचे पदार्थ ऑनलाईन ऑर्डर करणार असाल तर शक्यतो Cash on delivery चा पर्याय निवडा . जर वेबसाईटवर क्लिक करणार असाल तर ती वेबसाईट https या पासून सुरु होत असेल व त्याचा डाव्या बाजूला बंद कुलुपाची खूण असेल तर ती वेबसाईट शक्यतो फेक नसते . तसेच कुठल्याही paytm ,UPI किंवा तत्सम wallet मधून एक रुपया ट्रान्सफर करायचे transaction करू नका . तसेच कोणतीही payment wallet कंपनी त्यांच्या ग्राहकांचे KYC (Know Your Customer ) documents फोनवर उपडेट करत नसते . नागरिकांनी हे पण लक्षात ठेवणे तितकेच गरजेचे आहे कि तुमच्या खात्यात जर काही रक्कम जमा होणार असेल तर त्यासाठी कोणी OTP मागत नसतो.

मुख्यमंत्री रविवारी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर; आपद्‍ग्रस्तांना मदतीचे वाटप

0

मुंबई दि. १५: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या, रविवारी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून चौल, बोर्ली, मुरुड येथे भेट देणार आहेत.  निसर्ग चक्रीवादळाने बाधित झालेल्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मदत साहित्य आणि अनुदानाचे वाटप केले जाणार आहे.

सकाळी १० वाजता मुख्यमंत्री मांडवा जेट्टी येथे पोहचतील. त्यानंतर चौल येथे जाऊन ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतील, ११ वाजता चौलमधील घरे, पिके नुकसानीची पाहणी करून नंतर त्यांच्या हस्ते सानुग्रह अनुदान, सौर कंदील, इतर साहित्याचे वाटप करण्यात येईल. दुपारी १२ वाजता मुख्यमंत्र्यांचे बोर्ली येथे आणि साडेबारा वाजता मुरुड येथे आगमन होईल. दोन्ही ठिकाणी नुकसानीची पाहणी करून मदतीचे वाटप करण्यात येईल. मुरुड येथे मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे. दुपारी ३ वाजता मांडवा जेट्टी येथून बोटीने मुख्यमंत्री मुंबईकडे रवाना होतील. 

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या झाली 4 हजार 887

0

पुणे विभागातील 9 हजार 105 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 14 हजार 650 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 13 :- पुणे विभागातील 9 हजार 105 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 14 हजार 650 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 04 हजार 887 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 658 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 271 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.15 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 11 हजार 397 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 7 हजार 110 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 811 आहे. कोरोनाबाधित एकूण 476 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 263 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.38 टक्के आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 573 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 424, सातारा जिल्ह्यात 14, सोलापूर जिल्ह्यात 108, सांगली जिल्ह्यात 21 तर कोल्हापूर जिल्ह्यात 6 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील 718 कोरोना बाधीत रुग्ण असून 472 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 215 आहे. कोरोनाबाधित एकूण 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 1 हजार 612 कोरोना बाधीत रुग्ण असून 814 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 661 आहे. कोरोना बाधित एकूण 137 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील 213 कोरोना बाधीत रुग्ण असून 106 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 101 आहे. कोरोना बाधित एकूण 06 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 710 कोरोना बाधीत रुग्ण असून 603 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 99 आहे. कोरोना बाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 14 हजार 118 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 01 लाख 10 हजार 148 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 980 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 95 हजार 241 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 14 हजार 650 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

( टिप :- दि. 13 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

कोरोना चाचण्यांसाठी आता सर्वात कमी दर महाराष्ट्रात! खासगी प्रयोगशाळेतील कोरोना चाचण्यांसाठी २२०० रुपये दर निश्चित- आरोग्यमंत्री

0

मुंबई, दि. १३: राज्यातील खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी आता जास्तीत जास्त २२०० रुपये इतका दर आकारला जाणार असून रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास त्यासाठी २८०० रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे. सर्वसामान्य रुग्णांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे जाहीर केले.

कोरोना चाचण्यांच्या दरासंदर्भात अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागाने चार सदस्यांची समिती गठीत केली होती, या समितीने शासनाला अहवाल सादर केला असून त्यांच्या शिफारशीनुसार दरनिश्चित करण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

समितीने निर्धारित वेळेत अहवाल दिल्याने सामान्यांना दिलासा
२ जून रोजी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्य आरोग्य हमी सेवा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुल्क निश्चिती समिती गठीत केली होती. त्यात आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सहसंचालक अजय चंदनवाले, ग्रॅंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रा. अमिता जोशी यांनी सदस्य म्हणून काम पाहिले. या समितीला आठवडाभराचा कालावधी देण्यात आला होता. निर्धारित केलेल्या कालावधीत समितीने आपला अहवाल सादर करून सामान्यांना दिलासा दिल्याचे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.

कोरोना चाचण्यांसाठी सर्वात कमी दर महाराष्ट्रात
याबाबत अधिक माहिती देतांना आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले की, राज्यात खासगी प्रयोगशाळा कोरोना चाचणीसाठी ४५०० रुपये आकारत होते. घरी जाऊन स्वॅब घेतला त्यासाठी पीपीई कीटचा वापर यामुळे ५२०० रुपये आकारले जात होते. मात्र समितीने केलेला अभ्यास आणि काढलेल्या निष्कर्षावरून आता राज्यात कोरोना चाचणीसाठी जास्तीत जास्त २२०० रुपये आकारले जातील तर घरी जाऊन केलेल्या चाचणीसाठी २८०० रुपये आकारले जातील. संपूर्ण देशात एवढे कमी शुल्क अन्यत्र कुठेही नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. या दर निश्चितीमुळे सामान्यांना दिलासा मिळणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या
देशात महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या केल्या जात आहेत, सध्या राज्यात ५३ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९५ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आतापर्यंत ६ लाख २४ हजार ९७७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १ लाख १ हजार १४१ नमुने पॉझिटिव्ह (१६.१८ टक्के ) आले आहेत. मुंबईमध्ये सर्वाधिक चाचण्या झाल्याचे सांगून राज्यात आयसीएमआरच्या मार्गदर्शिक सूचनांनुसारच चाचण्या होत असून त्यात कुठलीही तडजोड केली जात नसल्याचे आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.