Home Blog Page 2538

ग्लॅमरस मोनालीसाचा गावरान हुबलाक

0

टोटल हुबलाक’ मधून मोनालीसाची एन्ट्री टीव्ही विश्वात

मराठी मनोरंजन सृष्टीत अनेक नवनवीन तरुण कलाकार आपल्या अभिनयाने छाप सोडत प्रेक्षकांची मन जिंकत आहेत. अशाच पैकी एक कलाकार म्हणजे मोनालीसा बागल. ‘टोटल हुबलाक’ ही लॉकडाऊन निमित्ताने नवीन मालिका सुरू झाली असून मोनालीसा या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
“सौ शशि देवधर” या २०१४ मध्ये आलेल्या चित्रपटामध्ये छोट्या सईची म्हणजे ‘छोट्या शशि’ची भूमिका मोनालीसाने निभावली होती. इथून तिच्या अभिनयाच्या आणि मनोरंजन सृष्टीच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. मनोरंजन सृष्टीत हुशार आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून तिची ओळख निर्माण झाली. त्यानंतर अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून नावारूपाला आलेल्या मोनालीसा बागलची प्रेम संकट, झाला भोभाटा, ड्राय डे, सोबत यासारख्या चित्रपटातून कारकीर्द चालूच राहिली. गेल्याच वर्षी परफ्युम या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. प्रदीर्घ काळ चित्रपट केल्यानंतर तिने आता आपला मोर्चा टिव्ही मालिकेच्या प्रेक्षकांकडे वळवला असून टोटल हुबलाक या नवीन विनोदी मालिकेतून तिने लॉकडाऊनमध्ये कंटाळलेल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा विडा उचलला आहे.

राज्यात ६ लाख १९ हजार व्यक्ती क्वारंटाईन

0

गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई, दि.२१ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ४ लाख ९९ हजार २८० पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ६ लाख १९ हजार व्यक्तींना क्वारंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते २० जून या कालावधीत  कलम १८८ नुसार  १,३३,३११ गुन्हे नोंद झाले असून २७,२६६ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ८ कोटी ३२ लाख २३  हजार ७११ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

कडक कारवाई

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.

या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या २७५ घटना घडल्या. त्यात ८५४ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

१०० नंबर वर १ लाख ३ हजार  फोन

पोलीस विभागाचा  १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो.       लॉकडाऊनच्या काळात या फोनवर  १,०३,९९६ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.

तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ७३४ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ६,१९,८१८  व्यक्ती Quarantine  आहेत, अशी माहिती श्री.देशमुख यांनी दिली.

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३३५ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ८३,४९७ वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून  झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.

पोलिस कोरोना कक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने   मुंबईतील ३१ पोलीस व १ अधिकारी अशा एकूण ३२, पुणे ३, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, ए.टी.एस. १, मुंबई रेल्वे २, ठाणे ग्रामीण २, जळगाव ग्रामीण १,

पालघर १ अशा ४७ पोलिस बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या ११८ पोलीस अधिकारी व ८८३ पोलिस कोरोना  बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रिलिफ कॅम्प

राज्यात सध्या एकूण १०९ रिलिफ कॅम्प आहेत. त्या ठिकाणी जवळपास ३,५४८

लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

सोशल डिस्टन्सिंग पाळा

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.  सर्वांनी नियम पाळून  सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

भोसरी येथील लघुउद्योजक वीजग्राहकास दिलेले 8 कोटींचे छापील वीजबिल नजरचुकीने

0

पिंपरी, दि. 21 जून 2020 : भोसरी ए-सेक्टरमधील महावितरणचे ग्राहक मेसर्स साई प्रोफाईल यांना पाठविण्यात आलेले 8 कोटी 58 लाख 985 रुपयांचे केवळ छापील वीजबिल नजरचुकीने वितरीत करण्यात आले आहे. हे बील सदोष असल्याचे अंतर्गत संगणकीय प्रणालीतून लक्षात आले होते. ते दुरुस्त देखील करण्यात आले होते व महावितरणच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आले. मात्र दुरुस्ती पूर्वीचे सदोष बील नजरचुकीने छापण्यात आल्याने ग्राहकास चुकीचे वीजबिल प्राप्त झाले आहेअसा खुलासा महावितरणकडून करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, भोसरी येथील मेसर्स साई प्रोफाईल (ग्राहक क्रमांक 170149073510) यांचे जून महिन्यांचे वीजबिल तयार झाल्यानंतर संगणकीय प्रणालीद्वारे ते सदोष असल्याचे दिसून आले. या वीजबिलाची पुन्हा तपासणी करण्यात आली व दुरुस्त केलेले 85 हजार 850 रुपयांचे नवीन बिल तयार करण्यात आले. हे बील महावितरणच्या वेबसाईटवर संबंधीत ग्राहक क्रमांकासाठी अपलोड करण्यात आले आहे. मात्र, प्रिटींगसाठी पाठविण्यात येणाऱ्या वीजबिलांच्या फाईलमध्ये या ग्राहकाच्या जुन्याच सदोष वीजबिलाची फाईल नजरचुकीने पाठविण्यात आली व बिलाची छपाई होऊन त्याची प्रत संबंधीत ग्राहकास देण्यात आली. मात्र हा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधीत ग्राहकास या चुकीच्या वीजबिलाबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच दुरुस्त केलेले वीजबिल सुद्धा त्यांना देण्यात आले आहे, असा खुलासा महावितरणकडून करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांचे कर्जवाटप होण्यासाठी सोमवारपासून भाजपाचे राज्यव्यापी आंदोलन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

0

पुणे-पावसाळा सुरू झाला तरी खरीप हंगामासाठीचे शेतकऱ्यांचे कर्जवाटप ठप्प आहे. शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेऊन ताबडतोब पीककर्जाचे वाटप सुरू करावे तसेच कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी सोमवारपासून राज्यात ठिकठिकाणी “कर्जमाफी करा, पीक कर्ज द्या,” आंदोलन करेल, अशी घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी केली.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, राज्यात कोरोनाचे संकट आहे म्हणून पाऊस, खरीप हंगाम आणि शेतीची कामे थांबत नाहीत. राज्य सरकारच्या ‘बांधावर खत आणि बियाणे’ या योजनेचा बोजवारा उडालेला आहे. पीककर्जाचे वाटप ठप्प झाले आहे. त्यामुळे भाजपाने आंदोलनाचा निर्णय घेतला. राज्य सरकारने प्रसंगी स्वतः कर्ज उभारणी करावी पण शेतकऱ्यांना पीककर्ज द्यावी व कर्जमाफीची अंमलबजावणी पूर्ण करावी, अशी भाजपाची मागणी आहे. पक्षाचे कार्यकर्ते राज्यभरात ठिकठिकाणी बँकांसमोर निदर्शने करतील. तसेच शेतकऱ्यांच्या सह्या गोळा करून त्यांचे निवेदन राज्य सरकारला सादर करण्यात येईल. या आंदोलनात कोरोनाच्या साथीमुळे योग्य काळजी घेतली जाईल.
ते म्हणाले की, राज्यात लाखाच्यावर शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून आहे. मजबुरीने व्यापाऱ्यांना कमी भावात विकावा लागत आहे. चणा खराब होण्याची वेळ आली तरी तरी खरेदी होत नाही. खरीप पिककर्ज नाही, कापसाचे, तुरीचे, चण्याचे पैसे आलेले नाही. बियाणे, खत, मजुरी भागवायची कशी, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यापुढे आहे. दागिने गहाण ठेवून शेतकरी सावकाराकडे विनवणी करतो आहे.
भाजपाने फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आंदोलन केले होते व त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती, याची आठवण त्यांनी करून दिली.
ते म्हणाले की, राज्यात शेतकऱ्यांची इतकी दयनीय अवस्था आजपर्यंत कधीही झाली नाही. तूर, चना, कापूस पडून आहे, कर्जमाफी कागदावरच आहे आणि पिककर्ज मागणाऱ्या शेतकऱ्यांचा बँकांमध्ये वारंवार अपमान होत आहे, यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतकऱ्याना दोन लाखापर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दोन लाखाच्या वरच्या कर्जासाठी ओटीएस लागू करु आणि नियमित कर्ज भरणाऱ्याना ५०,००० रु. प्रोत्साहनपर रक्कम देवू असे अर्थसंकल्पात जाहीर केले. प्रत्यक्षात या घोषणांची अंमलबजावणी झालेली नाही.
ते म्हणाले की, दोन लाखापर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पूर्ण यादी आलीच नाही आणि जी यादी आली त्यातील लाखो शेतकरी अजून वंचित आहेत. महाविकास आघाडी सरकारने २२ मे रोजी आदेश काढला व शासनाजवळ निधी नसल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात शासन रक्कम भरू शकत नाही, याची कबुली देवून ‘शासनाच्या नावे कर्ज मांडावे,’ असे बँकांना सांगितले. बँकांनी या शासन निर्णयाला केराची टोपली दाखवली. दोन लाखाच्या वर कर्ज असणाऱ्यांसाठी ओटीएसचा आणि नियमित कर्ज भरणाऱ्याच्या प्रोत्साहन अनुदानाचा आदेश निघाला नाही. मुख्यमंत्र्यांच्या ‘कर्जवितरणाबाबत तक्रारी नकोत’ या इशाऱ्याला बँका जुमानत नाहीत.
ते म्हणाले की, दुर्दैवाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करत नाहीत, हा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी कोरडवाहूला २५००० रु. फळबागांना ५०००० रुपयाची घोषणा सरकार विसरले. कोकणामध्ये आपद्ग्रस्तांची तातडीची मदत पोहोचलीच नाही. टोळधाळीच्या नुकसानीची दखलच घेतली नाही.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण 6 हजार 628

0

पुणे विभागातील 11 हजार 969 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 19 हजार 408 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 21 :- पुणे विभागातील 11 हजार 969 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 19 हजार 408 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 6 हजार 628 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 811 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 446 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.67 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 4.18 टक्के आहे,अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 15 हजार 511 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 9 हजार 257 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 670 आहे. कोरोना बाधित एकूण 584 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 342 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.68 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.77 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 876 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 786 , सातारा जिल्ह्यात 18, सोलापूर जिल्ह्यात 64, सांगली जिल्ह्यात 5 तर कोल्हापूर जिल्ह्यात 03 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 818 रुग्ण असून 624 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 155 आहे. कोरोनाबाधित एकूण 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 2 हजार 69 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 241 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 656 आहे. कोरोना बाधित एकूण 172 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील 276 कोरोना बाधीत रुग्ण असून 171 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 97 आहे. कोरोना बाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत 734 रुग्ण असून 676 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 50 आहे. कोरोना बाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 35 हजार 475 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 34 हजार 28 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 1 हजार 460 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 14 हजार 304 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 19 हजार 408 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

( टिप :- दि. 21 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

विकास कामांची गती वाढवा – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

सुपे येथील विविध कामांची केली पाहणी
बारामती दि.21 : ‘कोराना’च्या संकटाचा मुकाबला करतानाच तालुक्यात सुरु असणाऱ्या विविध विकास कामांची गती वाढविण्याबरोबरच कामे दर्जेदार करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.
बारामती तालुक्यातील सुपे येथे सुरु असणाऱ्या विविध कामांची पाहणी त्यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गट विकास अधिकारी राहूल काळभोर, तालुका कृषी अधिकारी डी. बी. पडवळ, सुपे गावच्या सरपंच स्वाती हिरवे, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘कोराना’च्या संकटाशी लढताना शासनाने घालून दिलेल्या आरोग्य विषयक सर्व निकषांचे पालन करावे. त्याच बरोबर तालुक्यात सुरु असणारी विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा. शासकीय इमारती शेजारी अतिक्रमण होणार नाही याची खबरदारी घ्यावी, काही अतिक्रमणे असल्यास ती तातडीने हटविण्यात यावीत. इमारतीच्या सभोवती झाडे लावावीत, मात्र ही झाडे देशी आणि ऊपयुक्त असावीत.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच कऱ्हाटी (ता. बारामती) येथे कृषी विभागाच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या शेतकरी गटाच्या माध्यमांतून शेतकऱ्यांना बांधावर खत व बियाणे वाटपाच्या कामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
त्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जळगाव सुपे-अंजनगाव शिव रस्त्याच्या कामाची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. पहिल्या टप्प्यातील दीड किलोमीटर रस्त्याचे काम सुरू असुन या योजनेअंतर्गत पुढील दीड किलोमीटर रस्त्याचे काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

कोरोना उपचारासाठी फेविपिराविरला डीजीसीआयने दिली मंजुरी; ‘फेबीफ्लू’ नावाने मिळेल

0

मुंबई. कोरोनाची हलकी आणि मध्यम लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्या उपचारासाठी फेव्हिपिराव्हिर औषधाच्या वापराला ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडियाची (डीजीसीआय) मंजुरी मिळाली आहे. ही माहिती औषध कंपनी ग्लेनमार्क फार्मास्युटिकलने बीएसई आणि एनएसईला लेखी दिली आहे.

ग्लेनमार्क फार्मास्युटिकलने म्हटले आहे की, ती भारतातील पहिली औषधी कंपनी आहे जिला डीजीसीआयने फेविपिराविर औषधाचा वापर कोरोनाबाधित रुग्णांवर करण्यासाठी मंजुरी दिली आहे. ते बाजारात “फेबीफ्लू’ नावाने उपलब्ध होईल. एका गोळीची किंमत १०३ रुपये ठेवण्यात आली आहे. या आधी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (सीआयआय) कोराेनाची लस लवकरच आणण्याची घोषणा केली आहे. या लसीची अंदाजे किंमत एक हजार रुपये आहे. ग्लेनमार्कच्या उपाध्यक्षा डॉ. मोनिका टंडन यांनी सांगितले की, फेव्हिपिराव्हिर औषधाच्या उत्पादनात लागणारा कच्चा माल देखील कंपनी स्वत: तयार करेल. टंडन यांनी सांगितले की, औषधाची वैद्यकीय चाचणी करण्याची विनंती आम्ही ४ एप्रिलला डीजीसीआयला केली होती. एप्रिल अखेरीस परवानगी मिळाली. त्यानंतर सर्व प्रकारच्या प्रोटोकॉलचे पालन करत आम्ही मे महिन्यात चाचणी सुरू केली. फेविपिराविर औषधावर चीन, रशिया आणि जपानमध्ये संशोधन झाले आहे.

प्रत्यक्ष वीजवापराचे तीन महिन्यांचे वीजबिल अचूकच; वीजग्राहकांवर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त भुर्दंड नाही

0

मुंबई, दि. 21 जून 2020 : लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहकांनी केलेल्या वीजवापराचे प्रत्यक्ष रिडींग घेतल्यानंतर संगणीकृत बिलिंग प्रणालीद्वारे एप्रिल, मे महिन्यासह जूनचे देण्यात आलेले तीन महिन्यांचे एकत्रित वीजबिल स्लॅब बेनिफीटसह योग्य व अचूक आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकाराचा अतिरिक्त भुर्दंड लावण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्राहकांनी वीजबिलांबाबत कोणताही संभ्रम बाळगू नये आणि कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमिवर वीजबिल दुरुस्तीसाठी कार्यालयांत गर्दी करू नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, दोन ते तीन महिन्यांच्या एकत्रित वीजबिलाची माहिती घेण्यासाठी तसेच स्लॅब बेनिफिट, भरलेल्या रकमेचे समायोजन, मासिक वीजवापर व स्लॅबप्रमाणे लावलेला वीजदर आदींची संपूर्ण पडताळणी करण्यासाठी महावितरणने वीजग्राहकांसाठी खास https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ ही लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. केवळ ग्राहक क्रमांक देऊन या लिंकद्वारे वीजबिलाचा संपूर्ण हिशोब व महावितरणकडून करण्यात आलेले विश्लेषण पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

कोरोना विषाणूमुळे राज्यात 23 मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे महावितरणकडून मीटर रिडींग, वीजबिल वितरण व बिल भरणा केंद्र बंद करण्यात आले होते. रिडींग बंद झाल्यामुळे राज्यातील लघुदाब ग्राहकांना सरासरी वीजबिल देण्यात आले तसेच वेबपोर्टल व मोबाईल अॅपद्वारे मीटरचे रिंडीग पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. यामध्ये 2 कोटी 30 लाख ग्राहकांपैकी केवळ 3 लाख 65 हजार वीजग्राहकांनी स्वतःहून मीटर रिडींग पाठविले. त्याप्रमाणे त्यांना वीजवापराचे अचूक मासिक वीजबिल देण्यात येत आहे. 

उर्वरित वीजग्राहकांना पाठविण्यात आलेली सरासरी वीजबिले दुरुस्त करण्यासाठी रिडींग घेणे आवश्यक होते. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर दि. 1 जूनपासून स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या भागात मीटर रिडींग, वीजबिल वितरण व बिल भरणा केंद्र सुरु करण्यात आले आहे. मीटर रिडींग प्रत्यक्ष उपलब्ध झाल्यानंतर वीजग्राहकांना लॉकडाऊन कालावधीमधील एप्रिल व मेसह जून महिन्याचे वीजबिल एकत्रित पाठविण्यात येत आहे. उदा. ग्राहकांना जूनमध्ये 3.07 महिन्यांचे 307 युनिटचे वीजबिल आले असेल तर एप्रिल, मे व जूनमध्ये प्रत्येकी 100 युनिटचा वीजवापर झाला आहे. मात्र जूनच्या बिलातील 307 युनिटला थेट 301 ते 500 युनिटचा स्लॅब दर न लावता तीन महिन्यांच्या प्रत्येकी 100 युनिटला 0 ते 100 युनिटचा स्लॅब दर लावण्यात येत आहे. याशिवाय 31 मार्चपर्यंत वापरलेल्या युनिटची संख्या दर्शवून 31 मार्च 2020 पूर्वी जे वीजदर लागू होत तेच दर लावण्यात आले आहेत. एवढी अचूकता महावितरणने संगणीकृत प्रणालीमध्ये वापरलेली आहे.

वीजग्राहकांनी लॉकडाऊनच्या कालावधीत सरासरी वीजबिलांचा भरणा केला असल्यास जूनमधील तीन महिन्यांच्या एकत्रित वीजबिलामध्ये एप्रिल व मे महिन्यांचा स्थिर आकार व विद्युत शुल्क वगळता उर्वरित रक्कम समायोजित करण्यात येत आहे. यासंबंधीची माहिती ग्राहकांसाठी वीजबिलामध्ये नमूद करण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये ग्राहकांना हिवाळ्यातील वीजवापराप्रमाणे सरासरी देयके पाठविण्यात आली होती. मात्र ऐन उन्हाळ्यात लॉकडाऊनमध्ये वाढलेला प्रत्यक्ष वीजवापर व दि. 1 एप्रिल 2020 पासून लागू झालेले नवीन वीजदर यामुळे एप्रिल, मे व जून महिन्यांचे मासिक परंतु एकत्रित दिलेले वीजबिल अधिक युनिटचे व रकमेचे असण्याची शक्यता आहे.

एप्रिल, मे व जून महिन्यांचे वीजबिल वीजग्राहकांना एकत्रित परंतु स्वतंत्र मासिक हिशोबानुसार देण्यात आलेले आहे. हे तीन महिन्यांचे जूनमध्ये देण्यात आलेले वीजबिल अतिशय अचूक आहे. योग्य स्लॅब व वीजदरानुसार तसेच प्रत्यक्ष वीजवापरानुसारच आहे. एका पैशाचाही अतिरिक्त भुर्दंड या वीजबिलामध्ये लावण्यात आलेला नाही. त्यामुळे वीजग्राहकांनी कोणताही संभ्रम न ठेवता वीजबिल दुरुस्तीसाठी कार्यालयात जाऊ नये तसेच महावितरणच्या अधिकृत वीजबिल केंद्र किंवा घरबसल्या अॉनलाईनद्वारे वीजबिलाच्या रकमेचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

कोरोनाने मृत्यु झाल्यास महावितरण कर्मचाऱ्यांच्या वारसांना ३० लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान

0

मुंबई, दि. २० : राज्यातील सुमारे २ कोटी ६० हजार ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा व दर्जेदार सेवा देण्यासाठी कोरोनाच्या जीवघेण्या प्रादुर्भावात अविश्रांत कार्यरत असणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊन  मृत्यू आल्यास त्यांच्या वारसांना ३० लाख  रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय महावितरणने  घेतला आहे. 
महावितरणमध्ये संचालन व दुरूस्तीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या  कंत्राटी कर्मचाऱ्यांना (बाह्यस्त्रोत) तसेच महावितरणच्या विविध कार्यालयात कार्यरत असणाऱे सुरक्षा रक्षक यांना देखील ३० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला असल्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले. 
       ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले की, कोरोनाच्या सार्वत्रिक प्रादुर्भामध्ये महावितरणचे  अभिंयते, कर्मचारी व बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचारी वेळीअवेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत.  राज्य प्रशासन कोरोनाचा पराभव करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत असतांना राज्यातील सामान्यांना घरातच  थांबणे आवश्यक आहे. अशा घरात राहणाऱ्या व घरूनच कामे करणाऱ्यांना महावितरणने २४ तास अखंडित वीजपुरवठा देऊन मोठा दिलासा दिला आहे. याद्दष्टिने महावितरणचे कर्मचारी देखील हे कोरोनायोध्दे ठरलेत. कर्मचाऱ्यांची सुरक्षा, तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याबाबत ऊर्जा विभागाने  गांभीर्य राखून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 
महावितरणचे तांत्रिक तसेच अतांत्रिक प्रवर्गात कार्यरत असणारे सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे सानुग्रह अनुदान लागू राहणार आहे.  कर्मचाऱ्यांचा  मृत्यू हा कोविड-१९ विषाणूने झाला  असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र हे शासकीय/पालिका/महानगरपालिका/आयसीएमआर नोंदणीकृत खासगी रुग्णालये/प्रयोगशाळा यांच्याकडून प्राप्त अहवालाच्या आधारे करण्यात आलेले असावे. हे सानुग्रह अनुदान अदा करण्यासाठी कामावरील उपस्थितीबाबत अटी व शर्ती या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार राहतील, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे.

नागरी रोषाला सामोरे जाण्याऐवजी भाजपा नेत्यांनी घेतला  काढता पाय  …(व्हिडीओ)

0

 आपत्तीने लोक हैराण असताना चौक सुशोभीकरणाचे उद्घाटन समयीची कथा 

पुणे-आपत्ती च्या काळात सुशोभीकरणाचा घाट घातल्याचा प्रकार आज खडकवासला येथील भाजपा आमदार आणि महापौर यांच्या चांगलाच अंगलट आला. कात्रज येथील लेक टाऊन च्या चौकात सुशोभिकारणासाठी बसविलेल्या शिल्पाचे उद्घाटन या दोन्ही नेत्यांच्या हस्ते होणार होते पण याच वेळी  राष्ट्रवादी चे नगरसेवक प्रकाश कदम आणि प्रगती फौंडेशनचे प्रतिक  कदम यांच्या नेतृत्वाखाली या परिसरातील नागरिकांनी येथे या नेत्यांना जाब विचारण्यासाठी येथे निदर्शने करणे सरू केल्याने आमदारांनी घाईत अवघ्या काही लोकांच्या उपस्थितीत पटकन फोटो पुरते उद्घाटन करून काढता पाय घेतला तर महापौर यांनी  या प्रकारची माहिती मिळाल्याने येथे येत येता मधूनच माघारी निघून जाणे पसंत केले .येथून जवळच असलेल्या आंबील ओढ्याला संरक्षक भिंत उभारण्याच्या प्रकरणी भाजप नेत्यांनी भेदभावाचे राजकारण करीत दुजाभावाने काही सोसायट्यांना जाणून बुजून वेठीस धरल्याने येथील राहिवाश्यात रोष पत्करला होता. पोलिसांनी मोठ्या संयमाने येथील परिस्थिती हाताळीत शांतता प्रस्थापित ठेवण्यात यश मिळविले .या प्रकरणाची हकीकत अशी कि , एकीकडे शहरात कोरोनाचे थैमान सुरु असताना , लॉक डाऊन ने लोक परेशान असताना ,आता पावसाळा सुरु झाल्याने , गेल्या वर्षी आंबील ओढ्याला आलेल्या पुराने घातलेल्या  थैमानाची  भीती हि त्यात पसरलेली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त स्वतः जातीने लक्ष घालून कात्रज तलावापासून च परिस्थितीची पाहणी करत आहेत . मात्र येथील काही सोसायट्यांमध्ये महापालिकेच्या कारभाराबाबत असंतोष आहे. महापालिकेने सत्ताधारी भाजपच्या दावणीला बांधून घेत भाजपचे नेते सांगतील तिथे त्या त्या सोसायट्यांना ओढ्यालगत संरक्षक भिंत पालिकेच्या खर्चाने  बांधून दिलेली आहे .आणि काही सोसायट्यांना मात्र वाऱ्यावर सोडले आहे. जाणून बुजून त्यांच्याबाबत दुजाभाव केला जातो आहे. भाजपचे मतदार आणि  हुजरेगिरी हा निकष लाऊन या संरक्षक भिंती  बांधून देण्याचे कारस्थान सत्ताधाऱ्यांनी केल्याचा आरोप होतो आहे.

यामुळे काही सोसायट्यांनी स्व खर्चाने संरक्षक भिंती उभारण्याचा मार्ग पत्करला तर त्यांना आडकाठी करून नोटीसा द्यायला सुरुवात केली आणि आता पावसाळ्याच्या तोंडावर त्यांना घरे खाली करण्याच्या हि नोटीसा देण्यात येत आहेत . एकीकडे हि स्थिती असताना त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार म्हणून त्यांच्या लगतच्याच चौकात सुशोभिकरणाच्या शिल्पाचे उद्घाटन समारंभ आयोजित केला होता . यामुळे नागरी रोष आणखी उफाळून आला . आणि त्याचे पर्यावसन महापौरांपुढे निदर्शने करयचा यत्न झाला पण आमदार आले आणि शांतपणे कुणाशी काही न बोलता , आंदोलकांची गाऱ्हाणी न विचारता , किंवा विचारपूस न करता नारळ फोडून पटकन निघून गेले तर महापौरांनी या स्थळी जाणे रहित करत माघारी परतणे पसंत केले. असे असले  तरीही  संरक्षक भिंतींचे  त्यांनी केलेले अर्धवट काम महापालिकेने थांबविल्याने आता पुन्हा येत्या पावसाळ्यात अशा सोसायट्यांमध्ये धोकादायक परिस्थिती राहील हे स्पष्ट झाले आहे. एक तर महापालिकेने त्यांना हे काम पूर्ण करवून द्यावे अशी मागणी होत आहे . कोरोना च्या संकट काळात या रहिवाश्यांवर आता दुहेरी तलवार चालविण्याचे कारस्थान आयुक्तांच्या मदतीने आपण हाणून पाडू असे नगरसेवक प्रकाश कदम यांनी सांगितले. अन्यथा हा विषय आपण तातडीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे घेऊन जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

आयुक्तांनाही वाटते 6 मीटर चे रस्ते 9 मीटर रुंद केल्यास बकालपणा काही अंशी दूर होईल

0

पुणे :मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये रस्त्यांचे नऊ मीटर रुंदीकरण करण्यावरून चर्चा झाली होती. मिळालेल्या सूचनांनुसार वस्तुस्थितीदर्शक अहवाल पालिकेने शासनाला पाठविला आहे. विकासाला चालना देणे, मोठे आणि प्रशस्त रस्ते, जुन्या इमारतींचा पुनर्विकास आदींबाबत या अहवालात सविस्तर बाजू मांडण्यात आली आहे. असे महापालिका आयुक्तशेखर गायकवाड यांनी सांगितले आहे.

शहरातील सहा मिटरचे सर्व रस्ते नऊ मीटर करणे आवश्यक असून यामुळे जुन्या इमारतींसह शहराच्या विकासाला चालना मिळेल. टीडीआर खर्ची पडून नवीन बांधकामे सुरू होण्याबरोबरच पालिकेला आर्थिक उत्पन्नही मिळेल. त्यामुळे शहराच्या विकासासाठी नऊ मीटर रस्ता होणेच योग्य असल्याचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल पुणे महापालिकेने शुक्रवारी राज्य शासनाला पाठविला.
प्रशासनाने शहरातील ३२३ रस्ते नऊ मीटर करण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता. विरोधी पक्षांनी त्याला आक्षेप घेतल्यानंतर शहरातील सहा मिटरचे सर्वच रस्ते नऊ मीटर करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. याविरुद्ध विरोधी पक्षांच्या खासदार, आमदार, गटनेते यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार केली होती. यासंदर्भात मुंबईमध्ये पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पालिकेच्या निर्णयाला तत्वत: स्थगिती देण्यात आली होती. तसेच सहा मीटर रस्त्यावर टीडीआर वापरास परवानगी देण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान, याच बैठकीमध्ये याविषयासंबंधी वस्तुस्थितीदर्शक अहवाल पाठविण्याच्या सूचना महापालिकेला करण्यात आल्या होत्या.
त्यानुसार, महापालिकेने शुक्रवारी अहवाल पाठविला. याबाबत पालिका आयुक्त म्हणाले, शहराचा विकास करावयाचा भूसंपादनासाठी रोखीने मोबदला न देता टीडीआर देणे स्थानिक स्वराज्य संस्थांना परवडते. पैसे खर्च न करता रस्त्यांचे रुंदीकरण करणे शक्य आहे. पूर्वी सहा मीटर रस्त्यांवर टीडीआर वापराला परवानगी होती. परंतु, शासनाने २०१६ साली त्याला मनाई केली. सहा मीटर रस्त्यापेक्षा नऊ मीटर रस्त्यावरच टीडीआरला परवानगी हवी. कारण, सहा मीटर रस्त्यावर उंचच इमारती उभ्या राहिल्या तर वाहतुकीचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. नियोजनबद्ध विकास होण्याऐवजी बकालपणा येण्याचीच अधिक शक्यता असते. हा बकालपणा येऊ द्यायचा नसल्यास पालिकेला रस्ते रुंदीकरणास परवानगी द्यावी असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अनेक इमारतींच्या सुरक्षा भिंती रस्त्यालगत आहेत. या इमारती त्यांच्या भिंती तीन मीटर मागे घेऊ शकतात. त्या पटीमध्ये त्यांना टीडीआर आणि एफएसआय वापरता येऊ शकणार आहे. अनेक इमारती जुन्या आहेत. लिफ्ट नाही की अन्य सुविधा नाहीत अशा इमारतींचा पुनर्विकास होऊ शकतो. तसेच जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाचा मार्गही मोकळा होईल. ज्या इमारती रुंदीकरणासाठी जागा देतील त्यांना तात्काळ टीडीआर देण्यात आल्यास पुनर्विकास लवकर होऊ शकतो. विकासाच्या प्रक्रियेला चालना मिळेल. टीडीआर वापरला गेल्यास मोठी घरे बांधता येऊ शकतात असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

फुलबाजारातील गाळ्यांचे भाड़े, विज बिल माफ करा

0

फुलबाजार आडते, व्यापारी संघटनेची बाजार समितीकडे मागणी

पुणे – करोनाच्या पार्श्‍वभूमीवर बाजार समितीचा फूलबाजार तब्बल तीन महिने बंद होता. या काळात शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे गाळ्यांचे मासिक भाडे आणि वीजबिल माफ करावे, अशी मागणी फूलबाजार आडते आणि व्यापारी संघटनेने बाजार समितीकडे केली आहे.

बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांच्याकडे संघटनेचे अध्यक्ष आप्पा गायकवाड यांनी याबाबत निवेदन दिले आहे. यावर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्‍वासन देशमुख यांनी दिल्याचे गायकवाड यांनी सांगितले.करोनाच्या पार्श्‍वभूमीवर दि.19 मार्चपासून फूलबाजार बंद झाला. तो दि. 18 जूनपासून सुरू करण्यात आला. या कालावधीत शेतकऱ्यांनी फूलशेती काढून टाकली.

तर, व्यापार बंद असल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. फूलबाजारातील गाळ्यांना मासिक भाडे आकारले जाते. तर, वीजबिलही बाजार समितीकडे जमा करावे लागते. ते माफ करावे, अशी मागणी केल्याचे गायकवाड म्हणाले

उद्धवसाहेब, आत्महत्यांचे प्रमाण वेगाने वाढते आहे …

0

पुणे-कोरोनामुळे आलेल्या लॉकडाउनने रोजगार गेल्याने नैराश्य वाढले असून आत्महत्यांचे प्रकार दुपटीने वाढले आहेत, एकीकडे कोरोना बाधित होण्याचा वेग 30 दिवसांनी दुप्पटी वर आला आहे, हळू हळू उद्योग व्यवसाय सुरु झाले असले तरी उद्योजक, व्यवसायिक यांनी या निमित्ताने कामगार कपातीचे मोठे षड्यंत्र सुरु केले आहे, ज्याकडे शासनाने अद्याप ढूंकूनही लक्ष दिलेले नाही, अगदी वृत्तपत्र क्षेत्रापासून सर्वच क्षेत्रात कोरोना च्या लॉकडाउन स्थितिचा ग़ैरफ़ायदा घेत कामगार कपात  मोठ्या प्रकारावर सुरु आहे. ज्या कामगारांच्या जीवावर वर्षानुवर्षे करोडों ची माया जमविली ते या 3 महिन्यात ढासळल्याचा आव आणित कामगारांना बिनधास्त बेरोजगारी च्या खाइत ढकलत आहेत. मात्र सरकारी पातळीवर याबाबत पूर्णतः अनास्था आहे, कामगार यूनियन्स, नेते, चळवळी मालकशाही च्या बटिक झाल्याचे चित्र आहे. त्यात लॉबी, कंपू शाही, जातीयवाद अशी स्थिति स्पष्ट असल्याने यापुढे आत्महत्या आणखी वाढन्याची मोठी भीति आहे.
पुणे शहर आणि परिसरात गेल्या ३४ दिवसांमध्ये 68 आत्महत्या प्रकरणातील मृतदेहांचे शव विछेदन ससून मध्ये झाले आहे.ससून रुग्णालयात १५ मे ते १९ जून या ३४ दिवसांमध्ये गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या ६८ जणांचे मृतदेह विच्छेदनासाठी आले. यापूर्वी ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यक शास्त्र विभागात दररोज एक याप्रमाणे गळफास घेतलेल्या व्यक्तीचा मृतदेह आणला जात असे
वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीमुळे येणारे नैराश्‍य, तसेच बदललेल्या जीवनशैलीतून येणाऱ्या ताणतणावांतूनच आत्महत्येसारख्या घटना घडत असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदवले आहे. त्यात सर्वाधिक प्रमाण तरुणांचेच असल्याचेही पुढे आले आहे. लॉकडाउनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले. छोटे व्यावसायिक, रोजच्या रोज मजुरी करून घर चालविणारे मजूर आर्थिक संकटात सापडले. त्यातून नैराश्‍य आल्याने काही जणांनी गळफास घेतला असल्याचे निरीक्षण पोलिस अधिकाऱ्यांनी नोंदविले.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाच्या हद्दीत मार्च ते मे या काळात सहा आत्महत्या झाल्या. गुरुवारी (ता. १९) मात्र, एकाच दिवसांत चार आत्महत्या उघडकीस आल्या. लॉकडाउनमुळे रोजगार बंद झाला, नोकरी गेल्यामुळे आलेल्या नैराश्‍यातूनही काही जण टोकाचे पाऊल उचलत असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांकडून बोलले जात आहे.

राज्यात ५८ हजार ५४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि.२०: कोरोनाच्या  ३ हजार ८७४ नवीन रुग्णांचे निदान आज झाले असून सध्या राज्यात ५८ हजार ५४ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५० टक्के एवढा आहे. राज्यात आज १३८० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून  एकूण संख्या  ६४ हजार १५३  झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ५४ हजार नमुन्यांपैकी १ लाख २८ हजार २०५ नमुने पॉझिटिव्ह (१७ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख  ९४ हजार  ७१९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २५ हजार ९९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १६० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५९८४ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे-१३६ (मुंबई १३६), नाशिक-१० (जळगाव १०), पुणे-६ (पुणे ५, सोलापूर १), औरंगाबाद-७ (औरंगाबाद ६, जालना १), लातूर-१ (बीड १)

.

जिल्हानिहाय तपशील

मुंबई: बाधित  रुग्ण- (६५,३२९), बरे झालेले रुग्ण- (३२,८६७), मृत्यू- (३५६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८,८९३)

ठाणे: बाधित  रुग्ण- (२३,२१२), बरे झालेले रुग्ण- (९२८४), मृत्यू- (६७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३,२५२)

पालघर: बाधित  रुग्ण- (३२२५), बरे झालेले रुग्ण- (१०४५), मृत्यू- (८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०९२)

रायगड: बाधित  रुग्ण- (२३९९), बरे झालेले रुग्ण- (१५१९), मृत्यू- (८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८९)

रत्नागिरी:  बाधित  रुग्ण- (४८२), बरे झालेले रुग्ण- (३३०), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३५)

सिंधुदुर्ग: बाधित  रुग्ण- (१६३), बरे झालेले रुग्ण- (१२५), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४)

पुणे: बाधित  रुग्ण- (१५,२८६), बरे झालेले रुग्ण- (८३२४), मृत्यू- (५८७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३७५)

सातारा:  बाधित  रुग्ण- (८२३), बरे झालेले रुग्ण- (५६५), मृत्यू- (३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१९)

सांगली: बाधित  रुग्ण- (२८२), बरे झालेले रुग्ण- (१५६), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११९)

कोल्हापूर: बाधित  रुग्ण- (७३९), बरे झालेले रुग्ण- (६६६), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६५)

सोलापूर: बाधित  रुग्ण- (२१७८), बरे झालेले रुग्ण- (१०००), मृत्यू- (१७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१००६)

नाशिक: बाधित  रुग्ण- (२६३५), बरे झालेले रुग्ण- (१४४९), मृत्यू- (१४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०४१)

अहमदनगर: बाधित  रुग्ण- (२७३), बरे झालेले रुग्ण- (२०८), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४)

जळगाव: बाधित  रुग्ण- (२१८३), बरे झालेले रुग्ण- (११३६), मृत्यू- (१८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८६५)

नंदूरबार: बाधित  रुग्ण- (८३), बरे झालेले रुग्ण- (३६), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२)

धुळे: बाधित  रुग्ण- (४८३), बरे झालेले रुग्ण- (३२१), मृत्यू- (४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (११५)

औरंगाबाद: बाधित  रुग्ण- (३२७३), बरे झालेले रुग्ण- (१७८७), मृत्यू- (१७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३१३)

जालना: बाधित  रुग्ण- (३६०), बरे झालेले रुग्ण- (२३०), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११९)

बीड: बाधित  रुग्ण- (८४), बरे झालेले रुग्ण- (६२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१९)

लातूर: बाधित  रुग्ण- (२१२), बरे झालेले रुग्ण- (१३६), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६५)

परभणी: बाधित  रुग्ण- (८४), बरे झालेले रुग्ण- (७४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६)

हिंगोली: बाधित  रुग्ण- (२५२), बरे झालेले रुग्ण- (२०३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८)

नांदेड: बाधित  रुग्ण- (२७९), बरे झालेले रुग्ण (१७५), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९३)

उस्मानाबाद: बाधित  रुग्ण- (१६९), बरे झालेले रुग्ण- (१२६), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७)

अमरावती: बाधित  रुग्ण- (४१६), बरे झालेले रुग्ण- (२७८), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११७)

अकोला: बाधित  रुग्ण- (११६४), बरे झालेले रुग्ण- (७५३), मृत्यू- (५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५१)

वाशिम: बाधित  रुग्ण- (७०), बरे झालेले रुग्ण- (१७), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१)

बुलढाणा: बाधित  रुग्ण- (१५६), बरे झालेले रुग्ण- (१०४), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७)

यवतमाळ: बाधित  रुग्ण- (२३०), बरे झालेले रुग्ण- (१५६), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७)

नागपूर: बाधित  रुग्ण- (१२७१), बरे झालेले रुग्ण- (८०९), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४९)

वर्धा: बाधित  रुग्ण- (१४), बरे झालेले रुग्ण- (११), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२)

भंडारा: बाधित  रुग्ण- (७१), बरे झालेले रुग्ण- (४८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२)

गोंदिया: बाधित  रुग्ण- (१०१), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२)

चंद्रपूर:  बाधित  रुग्ण- (५८), बरे झालेले रुग्ण- (४०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८)

गडचिरोली: बाधित  रुग्ण- (५४), बरे झालेले रुग्ण- (४३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०)

इतर राज्ये: बाधित  रुग्ण- (११२), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९२)

एकूण:बाधित  रुग्ण-(१,२८,२०५),बरे झालेले रुग्ण- (६४,१५३),मृत्यू- (५९८४),इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१४),ॲक्टिव्ह रुग्ण-(५८,०५४)

 (टीपआयसीएमआरपोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या १४८ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.हीमाहिती केंद्रसरकारच्या आय.सी.एम.आर.पोर्टलवरमान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे.प्रयोगशाळाअहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.राज्यातीलमुंबई,ठाणे,रायगडआणि पालघर जिल्हा वगळता इतर सर्व जिल्हा/मनपाक्षेत्रातील मृत्यूंचेरिकॉन्सिलिएशनकरण्यात आले आहे.यामध्येजिल्ह्यांकडून प्राप्त मृत्यूविषय्क माहिती,राज्यस्तरावरउपलब्ध माहिती आणि कोविड१९ पोर्टलवरील माहिती यांची पडताळणी करुन मृत्यूंची संख्या निश्चित करण्यात अलेली आहे.याप्रक्रियेमुळे मृत्यूंच्या आकडेवारीमध्ये बदल दिसून येत आहे.औरंगाबाद,नांदेड,नाशिक,जळगाव,पुणेया जिल्ह्यातील मृत्यूच्या ठिकाणानुसार मृत्यू नोंदविण्यात आले आहेत.तथापिसदर मृत व्यक्तीच्या मूळ पत्त्यानुसार बदल करण्याबाबत आय.सी.एम.आर.लाकळविण्यात येत आहे.-)

उद्याचे सूर्यग्रहण अद्भूत -ज्योतिषी दावा

0

उघड्या डोळ्याने पाहू नका;

सूर्यग्रहणावेळी ग्रहांच्या या स्थितीचा अद्भूत योग सुमारे ५०० वर्षांपूर्वी आला होता

सन 2020 मधील पहिले सूर्यग्रहण रविवार, 21 जून रोजी लागणार आहे. हे ग्रहण संपूर्ण भारतात दिसेल. काही ठिकाणी हे ग्रहण खग्रास, तर काही ठिकाणी कंकणाकृती स्वरुपात हे ग्रहण दिसेल. हे सूर्यग्रहण या वर्षातील सर्वांत मोठे सूर्यग्रहण असेल.भारतात सकाळी 9 वाजून 15 मिनिटांपासून सूर्यग्रहण लागेल आणि दुपारी 2 वाजून 58 मिनिटांनी संपेल. सूर्यग्रहणाचा स्पर्श होण्यापूर्वी सुमारे 12 तास आधी वेधकाळ सुरू होतात.अनेकार्थाने यंदाचे सूर्यग्रहण अद्भूत ठरणार आहे. या सूर्यग्रहणादिनी अनेक योग तयार होत आहेत. एक म्हणजे याच दिवशी जागतिक योग दिवस, जागतिक पितृदिन आहे.

21 जूनचे आणखीन एक महत्व म्हणजे आजचा दिवस हा वर्षातील सर्वांत मोठा दिवस असतो. सामान्यपणे दिवसातील 24 तासांपैकी 13 तासांहून अधिक काळ दिवस असतो. म्हणूनच आजचा दिवस हा वर्षातील सर्वांत मोठा दिवस असतो. हे सूर्यग्रहण सर्वांत मोठे सूर्यग्रहण असणार आहे.दरम्यान सूर्यग्रहणावेळी ग्रहांच्या या स्थितीचा अद्भूत योग सुमारे ५०० वर्षांपूर्वी आला होता. त्यानंतर आता तो सन २०२० मध्ये आला आहे. एका मतानुसार, हे सूर्यग्रहण मेष, सिंह, कन्या, मकर राशींना शुभफल देणारे वृषभ, तुळ, धनु, कुंभ राशींना मिश्रफल देणारे; तर, मिथुन, कर्क, वृश्चिक, मीन राशींना प्रतिकूल ठरू शकते, असे सांगितले जात आहे.

यंदाचे सूर्यग्रहण सकाळी सकाळी ९ वाजून १५ मिनिटांपासून होणार असून, त्याचे वेध आदल्यादिवशी रात्री म्हणजेच २० जून २०२० रोजी रात्री १० वाजून २० मिनिटांपासून लागतील, असे सांगितले जाते.

ज्येष्ठ अमावास्येला लागणारे या वर्षातील पहिले सूर्यग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे. हे सूर्यग्रहण २६ डिसेंबर २०१९ प्रमाणे मोठे सूर्यग्रहण असेल, असे सांगितले जाते.यापूर्वी २५ ऑक्टोबर १९९५ रोजी अशा प्रकारचे मोठे सूर्यग्रहण झाले होते. सूर्यग्रहणाचा मध्य सुरू झाला, तेव्हा एवढा अंधार झाला होता की, पशू-पक्षी सूर्यास्त झाल्याचा भास झाल्यामुळे आपापल्या घरट्यांमध्ये निघून गेले होते.दुसरे म्हणजे यावर्षीच्या सूर्यग्रहणाचे विशेष म्हणजे देशाच्या काही भागातून हे ग्रहण खग्रास आणि काही भागातून कंकणाकृती प्रकाराचे दिसेल. त्याचप्रमाणे या शतकातील हे सर्वांत मोठे दुसरे सूर्यग्रहण ठरणार आहे.

यावेळी ‘कंकणाकृती अवस्था’ पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि उत्तराखंड येथून सुमारे एक मिनिट दिसणार असून, उर्वरित भारतातून ‘खंडग्रास सूर्यग्रहण’ दिसणार आहे. विशेष म्हणजे जेथे भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली त्या कुरूक्षेत्रावरून दुपारी १२.०१ ते १२.०२ या वेळेत फक्त एक मिनिट कंकणाकृती अवस्था दिसणार आहे. कुरुक्षेत्रावर ब्रह्म सरोवर आहे.

कुरूक्षेत्र येथे १०.२१ ते १.४८ या वेळेत, जोशीमठ येथे १०.२८ ते १.५४, डेहराडून येथे १०.२४ ते १.५१ या वेळेत सूर्यग्रहण दिसणार आहे. या सर्व ठिकाणांहून सुमारे एक मिनिट ‘कंकणाकृती अवस्था’ दिसणार आहे. मुंबई १०.०१ ते १.२८, पुणे १०.०३ ते १.३१, औरंगाबाद १०.०७ ते १.३७, नाशिक १०.१८ ते १.५१, नागपूर १०.१८ ते १.५१ आणि जळगांव येथे १०.०८ ते १.४० या वेळेत ‘खंडग्रास सूर्यग्रहण’ दिसणार आहे. सूर्यग्रहण थेट पाहू नये. पाहिल्यास दृष्टीस इजा होते. ग्रहण चष्म्यातूनच पाहावे. दुर्बिणीलाही योग्य फिल्टर लावूनच सूर्यग्रहण पाहावे. त्यानंतर भारतातून दिसणारी कंकणाकृती सूर्यग्रहण २१ मे २०३१, १७ फेब्रुवारी २०६४, ८ डिसेंबर २११३ रोजी होणार आहे. महाराष्ट्रातून कंकणाकृती अवस्था दिसणारे सूर्यग्रहण खूप कालावधीनंतर ३ नोव्हेंबर २४०४ रोजी होणार आहे.

कोरोना आणि वादळामुळे लोक आधीच ग्रासलेले असताना अशी अवैज्ञानिक भाकिते चिंतेत भर टाकत आहेत. त्यामुळे ग्रहणविषयक गैरसमजुतींचे ग्रहण सुटणे आवश्यक झाले आहे.
चंद्रबिंब जेव्हा सूर्यबिंबाला झाकून टाकते, त्यावेळी सूर्यग्रहण दिसते. ज्यावेळी चंद्रबिंबामुळे सूर्यबिंबाचा काही भाग झाकला जातो, त्यावेळी ‘खंडग्रास सूर्यग्रहण’ दिसते. ज्यावेळी संपूर्ण सूर्यबिंब झाकले जाते त्यावेळी खग्रास सूर्यग्रहण दिसते. खग्रास सूर्यग्रहणावेळी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल, तर चंद्रबिंब आकाराने लहान दिसत असल्याने सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकून टाकू शकत नाही. त्यावेळी सूर्यबिंबाची गोलाकार कडा दिसते त्याला आपण ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ असे म्हणतो. चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण हे नैसर्गिक आविष्कार आहेत. प्राचीनकाळी ज्यावेळी विज्ञान प्रगत नव्हते, त्यावेळी जनसामान्यांना ग्रहणांची भीती वाटणे साहजिकच होते. त्यामुळे काही प्राचीन ग्रंथांमध्ये ग्रहणकाळात पाळावयाचे नियम सांगितले गेले; परंतु विज्ञानात प्रगती झाल्यामुळे ग्रहण हा चमत्कार नसून, तो एक नैसर्गिक खगोलीय आविष्कार आहे हे सर्वांना समजून आले आहे