Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

नागरी रोषाला सामोरे जाण्याऐवजी भाजपा नेत्यांनी घेतला  काढता पाय  …(व्हिडीओ)

Date:

 आपत्तीने लोक हैराण असताना चौक सुशोभीकरणाचे उद्घाटन समयीची कथा 

पुणे-आपत्ती च्या काळात सुशोभीकरणाचा घाट घातल्याचा प्रकार आज खडकवासला येथील भाजपा आमदार आणि महापौर यांच्या चांगलाच अंगलट आला. कात्रज येथील लेक टाऊन च्या चौकात सुशोभिकारणासाठी बसविलेल्या शिल्पाचे उद्घाटन या दोन्ही नेत्यांच्या हस्ते होणार होते पण याच वेळी  राष्ट्रवादी चे नगरसेवक प्रकाश कदम आणि प्रगती फौंडेशनचे प्रतिक  कदम यांच्या नेतृत्वाखाली या परिसरातील नागरिकांनी येथे या नेत्यांना जाब विचारण्यासाठी येथे निदर्शने करणे सरू केल्याने आमदारांनी घाईत अवघ्या काही लोकांच्या उपस्थितीत पटकन फोटो पुरते उद्घाटन करून काढता पाय घेतला तर महापौर यांनी  या प्रकारची माहिती मिळाल्याने येथे येत येता मधूनच माघारी निघून जाणे पसंत केले .येथून जवळच असलेल्या आंबील ओढ्याला संरक्षक भिंत उभारण्याच्या प्रकरणी भाजप नेत्यांनी भेदभावाचे राजकारण करीत दुजाभावाने काही सोसायट्यांना जाणून बुजून वेठीस धरल्याने येथील राहिवाश्यात रोष पत्करला होता. पोलिसांनी मोठ्या संयमाने येथील परिस्थिती हाताळीत शांतता प्रस्थापित ठेवण्यात यश मिळविले .या प्रकरणाची हकीकत अशी कि , एकीकडे शहरात कोरोनाचे थैमान सुरु असताना , लॉक डाऊन ने लोक परेशान असताना ,आता पावसाळा सुरु झाल्याने , गेल्या वर्षी आंबील ओढ्याला आलेल्या पुराने घातलेल्या  थैमानाची  भीती हि त्यात पसरलेली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त स्वतः जातीने लक्ष घालून कात्रज तलावापासून च परिस्थितीची पाहणी करत आहेत . मात्र येथील काही सोसायट्यांमध्ये महापालिकेच्या कारभाराबाबत असंतोष आहे. महापालिकेने सत्ताधारी भाजपच्या दावणीला बांधून घेत भाजपचे नेते सांगतील तिथे त्या त्या सोसायट्यांना ओढ्यालगत संरक्षक भिंत पालिकेच्या खर्चाने  बांधून दिलेली आहे .आणि काही सोसायट्यांना मात्र वाऱ्यावर सोडले आहे. जाणून बुजून त्यांच्याबाबत दुजाभाव केला जातो आहे. भाजपचे मतदार आणि  हुजरेगिरी हा निकष लाऊन या संरक्षक भिंती  बांधून देण्याचे कारस्थान सत्ताधाऱ्यांनी केल्याचा आरोप होतो आहे.

यामुळे काही सोसायट्यांनी स्व खर्चाने संरक्षक भिंती उभारण्याचा मार्ग पत्करला तर त्यांना आडकाठी करून नोटीसा द्यायला सुरुवात केली आणि आता पावसाळ्याच्या तोंडावर त्यांना घरे खाली करण्याच्या हि नोटीसा देण्यात येत आहेत . एकीकडे हि स्थिती असताना त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार म्हणून त्यांच्या लगतच्याच चौकात सुशोभिकरणाच्या शिल्पाचे उद्घाटन समारंभ आयोजित केला होता . यामुळे नागरी रोष आणखी उफाळून आला . आणि त्याचे पर्यावसन महापौरांपुढे निदर्शने करयचा यत्न झाला पण आमदार आले आणि शांतपणे कुणाशी काही न बोलता , आंदोलकांची गाऱ्हाणी न विचारता , किंवा विचारपूस न करता नारळ फोडून पटकन निघून गेले तर महापौरांनी या स्थळी जाणे रहित करत माघारी परतणे पसंत केले. असे असले  तरीही  संरक्षक भिंतींचे  त्यांनी केलेले अर्धवट काम महापालिकेने थांबविल्याने आता पुन्हा येत्या पावसाळ्यात अशा सोसायट्यांमध्ये धोकादायक परिस्थिती राहील हे स्पष्ट झाले आहे. एक तर महापालिकेने त्यांना हे काम पूर्ण करवून द्यावे अशी मागणी होत आहे . कोरोना च्या संकट काळात या रहिवाश्यांवर आता दुहेरी तलवार चालविण्याचे कारस्थान आयुक्तांच्या मदतीने आपण हाणून पाडू असे नगरसेवक प्रकाश कदम यांनी सांगितले. अन्यथा हा विषय आपण तातडीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे घेऊन जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्थानिक प्रश्नांसह राज्यस्तरीय प्रश्न सभागृहात मांडले – आ. अमित गोरखे

तालिका सभापती पदाचा सन्मान जीवनातील सर्वोच्च आनंद - आ....

ज्ञानोबा-तुकोबांचे विचारच भारताला विश्वगुरू बनवेल:डॉ. अविनाश धर्माधिकारी

‘श्री क्षेत्र आळंदीत ‘महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदे’ चे...

राज ठाकरेंसोबत जाणाऱ्यांचे राजकारण संपेल, मराठी मुद्द्यावरुन अभिनेता भाजप खासदार मनोज तिवारीचा इशारा

मुंबई-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मीरा-भाईंदरमध्ये मराठीचा मुद्दा पुन्हा...