Home Blog Page 2531

शहीद जवान सचिन मोरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

0

मालेगाव:  इंजिनिअरींग रेजीमेंट-115 मध्ये अभियंता पदावर कार्यरत असलेले शहीद वीरजवान सचिन विक्रम मोरे यांच्यावर सकाळी 12:00 वाजता त्यांच्या मुळगावी साकुरी (झाप) ता.मालेगांव जिल्हा नाशिक येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ.सुभाष भामरे, डॉ.भारती पवार, आमदार सुहास कांदे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.आरती सिंग, महानगरपालिकेचे उपमहापौर निलेश आहेर, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उप विभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, तहसिलदार चंद्रजित राजपूत, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद जाधव, पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे, डॉ.तुषार शेवाळे यांच्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शहीद जवान सचिन मोरे यांना श्रद्धांजली वाहिली.

सैन्यदलाचे दोन मेजर, एक ज्युनिअर कमिशन ऑफीसर आणि वीस जवान यांनी मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण केले. राज्य शासनाच्या वतीने पालकमंत्री छगन भुजबळ व कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे, तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी सूरज मांढरे व सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने कल्याण संघटक अविनाश रसाळ यांनी पुष्पचक्र अर्पण केले.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील साकुरी या गावचे सचिन मोरे हे 17 वर्षापासून भारतीय सेनेत अभियंता पदावर कार्यरत होते. दोन्ही देशांच्या सीमेवर पूल व रस्ते बनवण्याचे काम सुरू असतांना अचानक चीनकडून गलवाण नदीत पाणी सोडण्यात आल्यामुळे सोबतचे काही जवानांना वाचविण्याच्या प्रयत्नात सचिन मोरे यांना वीरमरण आले होते. शुक्रवारी रात्री त्यांचे पार्थिव पुणे येथे आणल्यानंतर तेथे लष्कराच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. तेथून त्यांचे पार्थिव त्यांच्या मालेगाव येथील साकुरी मूळगावी शनिवारी सकाळी आणण्यात आले. शनिवारी साकुरी गाव व पंचक्रोशीतील तसेच तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी केली होती. यावेळी गावकऱ्यांनी ‘भारत माता की जय’ ‘अमर रहे’ यासारख्या घोषणा देऊन विरपुत्राला दुपारी 12:00 वाजता अखेरचा निरोप दिला.

शहीद जवान सचिन मोरे यांच्या पश्चात वडील विक्रम मोहन मोरे, आई जिजाबाई विक्रम मोरे, पत्नी सारिका सचिन मोरे, मुलगी आर्या, अनुष्का व अवघ्या सात महिन्याचा मुलगा कार्तिक तर भाऊ योगेश व नितीन असा परिवार आहे. अलिबाग येथे 2003 मध्ये झालेल्या सैनिक भरतीमध्ये सैन्यदलात भरती झालेला शहीद जवान सचिन मोरे सध्या एस.पी.115 रेजीमेंटमध्ये कार्यरत होता. सैनिकीसेवेत 17 वर्ष पूर्ण झाल्याने नुकताच फेब्रुवारी महिन्यात आपल्या मूळगावी आला होता. सेवेचा कार्यकाळ वाढवून मिळणार असल्याने आपण यापुढेही देशसेवा करणार असल्याच्या भावनाही त्यांनी कुटूंबाकडे व्यक्त केल्या होत्या. मनमिळावू स्वभावाचे शहीद जवान सचिन मोरे अचानक निघून गेल्यामुळे संपूर्ण साकुरीसह पंचक्रोशीतील गावकऱ्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला. ‘अमर रहे अमर रहे सचिन भाऊ अमर रहे’, ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’ च्या जयघोषात संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला होता.

शहीद जवानाच्या कुटुंबाच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासन अग्रेसर : पालकमंत्री भुजबळ

यावेळी बोलतांना पालकमंत्री श्री.भुजबळ म्हणाले, हिमालयाच्या कुशीत ज्या ठिकाणी पाणी व रक्त गोठून जाते अशा ठिकाणी भारतमातेच्या संरक्षणासाठी आमचे जवान सदैव कार्यरत आहेत, ते सीमेवर आहेत म्हणून आज आपण इथे स्वातंत्र्य भोगत आहोत. आज युद्धजन्य परिस्थिती उभी ठाकली असतांना आमचे नवजवान चीनी गनिमाला ठणकावून सांगतात, खबरदार जर टाच मारूनी याल पुढे, चिंधड्या उडविन राई राई. अशा भावना उराशी बाळगून आपले सैनिक आज देशाच्या सीमेचे रक्षण करीत असून अशा सर्व सैनिकांना अभिवादन करतांना शहीद जवान सचिन मोरे यांच्या कुटूंबाच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासन अग्रेसर राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र शासनासह मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यावतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी श्रद्धांजली वाहिली.

शहीद जवान मोरे यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही : मंत्री दादाजी भुसे

गलवान खोऱ्यात आपल्या सहकार्यांचा जीव वाचवितांना वीरमरण आलेले शहीद जवान सचिन विक्रम मोरे यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. याचा भारतीय लष्करातर्फे निश्चित बदला घेतला जाईल आणि हीच खरी शहीद सचिन मोरे यांना श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी आज व्यक्त केले.

मंत्री श्री.भुसे म्हणाले, मालेगांव तालुक्याचे भूमिपुत्र शहीद जवान सचिन मोरे यांच्यावर चीनने केलेल्या कुरघोडीचा मी निषेध करतो, शहीद सचिन विक्रम मोरे यांना सैन्य दलात भरती करणारे वीरपिता विक्रम मोरे व वीरमाता जिजाबाई मोरे यांचा मालेगांव तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी खासदार तथा माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे व खासदार डॉ.भारती पवार यांनी यावेळी मनोगत व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.

कोरोना मुकाबल्‍यासाठी नियोजन

0

पुणे शहरात  9 मार्च 2020 ला प्रथम रुग्ण मिळाल्‍यानंतर जिल्‍ह्यातील यंत्रणा सतर्क झाली होती. पुण्‍यामध्‍ये रुग्‍ण वाढत असतांना ग्रामीण भागात 16 एप्रिलपर्यंत फक्‍त 20 रुग्‍ण होते. 3 मे आणि 17 मे रोजी टाळेबंदी (लॉकडाऊन) शिथील झाल्‍यानंतर ग्रामीण भागात मुंबई आणि पुणे तसेच इतर रेड झोनमधून लोकांचे स्‍थलांतर झाले. ग्रामीण भागात स्‍थलां‍तरित झालेल्‍या व्‍यक्‍तींमध्‍ये कोरोना संसर्ग आढळून आला आणि त्‍यामुळे रुग्‍णसंख्‍या वाढली.

       ग्रामीण भागाची स्थिती लक्षात घेवून प्रतिबंधित क्षेत्रात विविध उपाय योजण्‍यात आले. जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम मार्गदर्शनाखाली जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी दैनंदिन सर्वेक्षणाचा निर्णय घेतला. आशा स्‍वयंसेविकांमार्फत प्रत्‍येकी दररोज 50 गृहभेटी सुरु करण्‍यात आल्‍या. आरोग्‍य कर्मचारी आणि खाजगी डॉक्‍टरांमार्फत खाजगी केमिस्‍ट सर्वेक्षण आणि संशयित रुग्‍णांची नोंद करण्‍यात येवू लागली. वैद्यकीय अधिका-यांमार्फत खाजगी रुग्‍णालयांना भेटी देवून संशयित रुग्‍णांची नोंद व पाठपुरावा सुरु करण्‍यात आला. इतर ठिकाणांहून म्‍हणजे परदेशातून आणि रेडझोनमधून प्रवास करुन आलेल्‍या व्‍यक्‍तींवर विशेष लक्ष ठेवून त्‍याबाबतची नोंद आणि पाठपुरावा करण्‍यात आला. अतिजोखीम व सहव्‍याधी असलेल्‍या सर्व व्‍यक्‍तींचे नियमित सर्वेक्षण करण्‍यात येत आहे. ज्‍येष्‍ठ नागरिक व गरोदर मातांचे  विशेष सर्वेक्षण केले जात आहे.

       जिल्‍ह्यांच्‍या सीमांवर 20 ठिकाणी आरोग्‍य तपासणी नाक्‍यांची उभारणी करण्‍यात आली असून तपासणी करण्‍यात आलेल्‍या प्रत्‍येक व्‍यक्‍तीची रजिस्‍टरमध्‍ये नोंद घेण्‍यात आली आहे. आतापर्यंत 20 लक्ष लोकांची तपासणी करण्‍यात आली आहे. कोरोना विशेष नियंत्रण कक्षाद्वारे 37 हजारांहून अधिक कॉल्‍स हे कोरोना समन्‍वयासाठी झालेले आहेत. पुणे ग्रामीण भागात 26 जूनपर्यंत एकूण 811 रुग्‍ण होते त्‍यापैकी 508 बरे झालेले तर 270 एकूण क्रियाशील रुग्‍ण आहेत. 33 रुग्‍णांचा मृत्‍यू झालेला आहे. पुणे ग्रामीण भागातील रुग्‍ण बरे होण्‍याचे प्रमाण 62.63 टक्‍के तर ग्रामीण भागातील मृत्‍यूचे प्रमाण 4.06 टक्‍के इतके आहे. जिल्‍ह्यातील 9 लक्ष 34 हजार 538 कुटुंबांचे ‘आशा सर्वेक्षण’ करण्‍यात आले असून त्‍यामध्‍ये फीवर क्लिनीक एकूण बाह्यरुग्‍ण संख्‍या 2 लक्ष 89 हजार 690 तर सर्दी, ताप, खोकला इतर रुग्‍ण 11 हजार 206 होते. संदर्भित केलेल्‍या रुग्‍णांची संख्‍या 696 इतकी होती.  अतिजोखमीच्‍या व्‍यक्‍तींना शिक्‍के मारुन घरी विलगीकरण करण्‍यात आले. विलगीकरण झालेल्‍या व्‍यक्‍तींवर आशा व ग्रामपंचायतीमार्फत विशेष लक्ष ठेवण्‍यात आले.

       पुणे ग्रामीण जिल्‍ह्यात एकूण 306 प्रतिबंधात्‍मक क्षेत्रांपैकी 173 क्षेत्रात यशस्‍वी कार्यवाही पूर्ण झाली. उरलेल्‍या 133 क्रियाशील क्षेत्रामध्‍ये 3055 पथके कार्यरत आहेत. एका पथकाकडून दररोज 50 ते 100 घरांचे सर्वेक्षण केले जात असून आतापर्यंत 11 लक्ष 43 हजार 215 नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. 141 बाधित ग्रामपंचायत आणि 11 बाधित नगरपालिकांमध्‍ये झालेल्‍या सर्वेक्षणामध्‍ये 2699 अतिजोखीम संपर्क असलेले आणि 4914 कमी जोखीम संपर्क असलेले होते. प्रत्‍येक पथकाकडे थर्मल गन व पल्‍स ऑक्‍सीमीटर असून ‘सारी’ रुग्‍णांचा शोध घेतला जातो. लक्षणे असलेल्‍या रुग्‍णांची वैद्यकीय           अधिका-यामार्फत तपासणी होते. शेवटचा रुग्‍ण आढळल्‍यापासून 14 दिवसांपर्यंत सर्वेक्षण चालते. बाधित रुग्णाच्‍या संपर्कातील एकूण 345 केसेस ह्या सर्वेक्षण उपक्रमाच्‍या मदतीने शोधून काढण्‍यात आलेल्‍या आहेत. सहव्‍याधी सर्वेक्षणामध्‍ये (कोमॉर्बिड सर्वेक्षण) ग्रामीण भागात 60 वर्षांवरील 6 लक्ष 28 हजार 36 तर इतर व्‍याधी असलेल्‍या व्‍यक्‍ती 2 लक्ष 9 हजार 30 आढळून आल्‍या.

       समर्पित कोविड रुग्‍णालये 5 कार्यान्वित असून 1130 खाटा, 117 आयसीयू खाटा, 32 व्‍हेंटीलेटर्स आणि 496 ऑक्सिजन खाटांची उपलब्‍धता आहे. समर्पित कोवीड आरोग्‍य केंद्र 19 कार्यान्वित असून 1054 खाटा, 124 आयसीयू खाटा, 36 व्‍हेंटीलेटर्स आणि 293 ऑक्सिजन खाटा उपलब्‍ध आहेत. ग्रामीण भागात 48 कोविड केअर सेंटरची स्‍थापन करण्‍यात आली असून 9399 खाटांची उपलबधता आहे. अशा प्रकारे एकूण 72 रुग्‍णालयांची व्‍यवस्‍था असून 11 हजार 583 खाटांची उपलब्धता आहे. एकूण 241 आयसीयू, 68 व्‍हेंटीलेटर्स व 789 ऑक्सिजन खाटांची सोय उपलब्‍ध आहे.

       पुणे जिल्‍हा परिषद, जिल्‍हा आरोग्‍य सोसायटी, राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियान यांच्‍या मार्फत विप्रो समर्पित कोविड आरोग्‍य केंद्र कार्यान्वित करण्‍यात आले असून मुख्‍यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्‍या हस्‍ते 11 जून रोजी हस्‍तांतरण सोहळा संपन्‍न झाला. या केंद्रात 504 खाटा, 10 आयसीयू खाटा आणि 5 व्‍हेंटीलेटर्सची उपलब्‍धता आहे. म्‍हाळुंगे इंगळे समर्पित कोविड केअर सेंटर सुध्‍दा पुणे जिल्‍हा परिषद, जिल्‍हा आरोग्‍य सोसायटी, राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियान यांच्‍या मार्फत कार्यानिव्‍त करण्‍यात आले असून येथे 1400 खाटांची सोय उपलब्‍ध आहे. संशयित व बाधित रुग्णांसाठी येथे वेगळी व्‍यवस्‍था आहे. म्‍हाडा इमारतीच्‍या सदनिकेमध्‍ये स्‍वतंत्र सोय आहे. हा सदनिका परिसर लोकवस्‍तीपासून दूर असून रुग्‍णाकडून स्‍थानिक जनतेकरिता संसर्गाचा धोका नाही. खासदार डॉ. अमोल कोल्‍हे यांच्‍या हस्‍ते 15 मे रोजी हस्‍तांतरण सोहळा संपन्‍न झाला. याशिवाय उपमुख्‍यमंत्री तथा पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्‍या हस्‍ते 20 जून रोजी रोगप्रतिकारकशक्‍ती वाढीसाठी व्‍हीटॅमिन डी, सी, झिंक गोळ्या, आर्सेनिक 30 आणि आयुर्वेदीक प्रातिनिधीक स्‍वरुपात वाटप करण्‍यात आले.

       पुणे ग्रामीण कोरोना बाधित रुग्‍णांकरिता भविष्‍यातील नियोजन करण्‍यात आले आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील वाढती रुग्‍णसंख्‍या लक्षात घेता ग्रामीण भागातील रुग्‍ण पुणे शहराबाहेर उपचारास ठेवण्‍याकरीता तालुकास्‍तरीय कोविड केअर सेंटर (सीसीसी) कार्यान्वित करणे आवश्‍यक आहे.  केंद्र शासन आणि राज्‍य शासनाकडील सुधारित मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करुन बाधित रुग्‍णाला जवळच्‍या कोविड रुग्‍णालयात उपचारासाठी  ठेवणे आवश्‍यक आहे. सद्यस्थितीत विप्रो हॉस्‍पीटल (504 खाटा, 10 आयसीयू खाटा), नवले हॉस्‍पीटल (100 खाटा, 20 आयसीयू खाटा) येथे समर्पित कोविड उपचार केंद्र असून नवले हॉस्‍पीटल येथे अधिक 100 खाटांची उभारणी करणे आवश्‍यक आहे. भविष्‍यातील कोरोनाबाधित रुग्‍णांची वाढती संख्‍या लक्षात घेता व पुणे शहरावरचा ताण कमी करण्‍याकरिता उप जिल्‍हा रुग्‍णालय बारामती, मंचर आणि भोर येथे 50 खाटांचे समर्पित कोविड रुग्‍णालय तात्‍काळ सुरु करणे आवश्‍यक आहे. औंध येथील जिल्‍हा रुग्‍णालयात ग्रामीण रुग्‍णांकरिता अधिक 100 खाटांची सोय तात्‍काळ करणे आवश्‍यक आहे. ससून रुग्‍णालय, ग्रामीण रुग्‍णालय, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी यांना कोरोना प्रतिबंधाकरिता आवश्‍यक उपाययोजना करण्‍यासाठी जिल्‍हा वार्षिक नियोजनातून एकूण 65. 78 कोटी रुपयांचा निधी उपलब्‍ध करुन देण्‍यात आला आहे.

       कोरोना बाधितांवर उपचाराबरोबरच माहिती-शिक्षण-संवाद उपक्रमाचाही वापर करण्‍यात येत आहे. यामध्‍ये 2700 बॅनर्स, 14 हजार 336 पोस्‍टर्सद्वारे प्रसिध्‍दी करण्‍यात आली.6 लक्ष माहितीपत्रके वाटण्‍यात आली. सोशल मिडीयावरुन व्हिडीओ फील्‍म्‍स, ऑडिओ क्लिप्स प्रसारित करण्‍यात आल्‍या. एलइडी वाहनाद्वारेही प्रचार करण्‍यात आला.

       पुणे जिल्‍हा परिषदेच्‍यावतीने महाराष्‍ट्र नॉलेज कार्पोरेशनच्‍या (एमकेसीएल) सहकार्यातून इंटीग्रेटेड डीसीज सर्वेलन्‍स प्रोग्राम (आयडीएसपी) समर्पित वेबपोर्टल 12 मार्चपासून संपूर्ण जिल्‍ह्यासाठी कार्यरत आहे. जिल्‍ह्यातील 68 संनियंत्रित अधिका-यांची टीम या वेबपोर्टलचा प्रभावी वापर करीत आहे. यावर 1094 हून अधिक डॉक्‍टरांची नोंदणी तसेच 1 लक्ष 43 हजारांहून अधिक नागरिकांच्‍या होम क्‍वारंटाईनचे यशस्‍वी व्‍यवस्‍थापन करण्‍यात आले आहे.

       ‘पुनश्‍च हरि ओम’ म्‍हणजेच ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत टाळेबंदी (लॉकडाऊन) हळूहळू उठवण्‍यात येत आहे.  तथापि, कोरोनाचा धोका संपलेला नाही, हेही नागरिकांनी यानिमित्‍ताने लक्षात घेणे आवश्‍यक आहे. कोरोनाचा संसर्ग रोखणे अवघड नाही, मात्र त्‍यासाठी वैयक्तिक दक्षता आणि काळजी घेतली पाहिजे.

राजेंद्र सरग, जिल्‍हा माहिती अधिकारी, पुणे

फिनोलेक्स, मुकुल माधव फाउंडेशन व हिंदुजा फाउंडेशतर्फे रत्नागिरी, रायगडमध्ये चक्रीवादळग्रस्तांना ५० लाखाची मदत

0

पुणे : फिनोलेक्स पाईप्स, मुकुल माधव फाउंडेशन व हिंदुजा फाउंडेशतर्फे रत्नागिरी, रायगडमध्ये चक्रीवादळग्रस्तांना ५० लाखाची मदत करण्यात आली. काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे कोकणातील अनेक गावांना मोठा तडाखा बसला होता. अनेकांचे संसार उघड्यावर पडले होते. या दोन जिल्ह्यातील ३३३ कुटुंबाना उभे करण्याचे काम मुकुल माधव फाउंडेशनच्या पुढाकारातून झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली व मंडणगड तालुक्यातील १२०, तर रायगड जिल्ह्यातील ताळा, श्रीवर्धन व दिवेआगार या तालुक्यातील २१३ कुटुंबाना घरावरील पत्रे, सोलर लाईट, ब्लॅंकेट, धान्य आदी वस्तू देण्यात आल्या. प्रत्येकी २० पत्रे याप्रमाणे जवळपास सहा हजार पत्रे, मोबाईल चार्जरची सोय असणारे सोलर दिवे आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्यातील अत्यंत गरीब कुटुंबाना मदत दिल्यानंतर रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी श्रीवर्धन व ताळा तालुक्यातील निराधार कुटुंबाना मदत करण्याचे आवाहन केले. त्यानुसार या दोन्ही तालुक्यात ११३ व दिवेआगारमधील १०० कुटुंबाना दुसऱ्या टप्प्यात मदत देण्यात आली.
मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, “निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील अनेक गावांना मोठा फटका बसला आहे. त्यांना काहीसा दिलासा देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला. ज्यांना काहीच आधार नाही, अशा गरजू कुटुंबाना ही मदत स्थानिक प्रशासनाच्या मदतीने देण्यात आली आहे. यापुढेही गरजू कुटुंबाना फाउंडेशनच्या वतीने मदत केली जाणार आहे.”

रितू छाब्रिया यांनी सामाजिक जाणिवेतून फिनोलेक्स पाईप्स, मुकुल माधव फाउंडेशन आणि हिंदुजा फाउंडेशनच्या माध्यमातून जवळपास रायगडमधील २१३ कुटुंबाना मदतीचा हात दिला आहे. ज्यांचे घर पडले आहे, लाईट्स गेल्यात त्यांना पत्रे, सोलर लाईट व अन्य साहित्य देण्यात आले आहे. या मदतीसाठी रायगड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून सर्वांचे ऋण व्यक्त करते.  – आदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड

आषाढी एकादशी, संतांच्या पादुका पंढरपूरला नेण्यासाठी इन्सीडेंट कमांडरच्या नेमणूका -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

0

पुणे दि.27 : – आषाढी वारीची परंपरा चालू ठेवण्यासाठी प्रतिकात्मकरित्या व प्रतिनिधीक स्वरुपात काही महत्वाच्या संतांच्या पादुका ज्या परंपरेने विठ्ठल – रुक्मणीच्या भेटीस जातात. त्यांना मर्यादित स्वरुपात व केवळ संतांच्या पादुका एसटी्द्वारे अथवा वाहनाद्वारे आषाढी एकादशीच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच 30 जून 2020 रोजी दशमीला श्री क्षेत्र पंढरपुर येथे नेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे जिल्हयातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी देवाची, जि.पुणे , श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू, ता.हवेली, जि.पुणे, श्री संत सोपानदेव महाराज संस्थान, श्रीक्षेत्र सासवड, ता.पुरंदर, जि.पुणे व श्री संत चांगवटेश्वर देवस्थान,श्रीक्षेत्र सासवड, जि.पुणे या चार पालखी संतांच्या पादुका घेवून परत प्रस्थानाच्या ठिकाणी सुरक्षित येतील याबाबत योग्य ते नियोजन करण्याकरीता आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार इन्सीडेंट कमांडर म्हणून नेमणूका करण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
दरवर्षी आषाढी वारीमध्ये संपुर्ण महाराष्ट्रातून मोठया प्रमाणात लाखोंच्या संख्येने भाविक संतांच्या पालखी सोबत पंढरपूर येथे जात असतात. सध्या महाराष्ट्रात मोठया प्रमाणात कोरोना संसर्गाच्या वाढीस आळा घालणेसाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सर्वसामान्य नागरीकांना व जनतेला होऊ नये यासाठी पायी-पालखी वारी करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी देवाची, जि.पुणे करीता उपविभागीय अधिकारी, खेडचे संजय तेली (मो.नं.9405583799), श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू, ता.हवेली, जि.पुणे करीता महसूल नायब तहसिलदार, हवेलीचे संजय भोसले (मो.नं.9960171046), श्री संत सोपानदेव महाराज संस्थान, श्रीक्षेत्र सासवड, ता.पुरंदर, जि.पुणे करीता निवासी नायब तहसिलदार, दौंडचे सचिन आखाडे (मो.नं.7875078107), श्री संत चांगवटेश्वर देवस्थान,श्रीक्षेत्र सासवड, जि.पुणेकरीता महसूल नायब तहसिलदार, पुरंदरचे उत्तम बढे ( मो.नं.9402226218) अशा प्रकारे नुसार इन्सीडेंट कमांडर म्हणून नेमणूका करण्यात आल्या आहेत.
नेमणुका करण्यात आलेल्या इन्सीडेंट कमांडर यांनी पादुका प्रस्थान केल्यापासून ते परत प्रस्थानाचे ठिकाणी येईपर्यंत नेमून दिलेल्या पालखी संस्थांच्या सोबत राहणे आवश्यक असून संबंधित उपविभागीय अधिकारी व संस्थानच्या प्रमुखांशी विचार विनिमय करुन पादूकांचा मार्ग निश्चित करावा व सदर पादुका घेवून जाणा-या बसेस पंढरपूर येथे रात्री 11.00 वाजेपर्यंत पोहचतील याबाबत योग्य ते नियोजन करण्यात यावे. प्रवासा दरम्यान दर्शनाला कोणत्याही ठिकाणी बस थांबविण्यात येऊ नये. तसेच संतांच्या पादुकांसोबत जाणा-या सर्व व्यक्तींनी मास्क वापरणे, दोन व्यक्तींमध्ये अंतर राखणे, वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे.
तसेच या पादुकांचे प्रस्थान झालेपासून पंढरपूर येथे पोहचेपर्यंत व परत पंढरपूरहून प्रस्थानाचे ठिकाणी येईपर्यंत सुरक्षित पोहचतील याबाबत जिल्हा पोलीस प्रशासन व जिल्हाधिकारी सोलापूर यांनी नियुक्त केलेल्या विनोद पाटील, श्री रुक्मणीच्या मंदिर समिती, पंढरपूर ( संपर्क क्र. 8408026069) यांच्याशी समन्वय करुन योग्य ते नियोजन करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.

डायल १०८ सेवेतील कोरोनायोद्ध्यांच्या कामातून मानवतेचं दर्शन – टोपे

0

पुणे (दि. 27) : महाराष्ट्रातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र्र आपत्कालिन वैद्यकीय मदत सेवा (डायल १०८) हीमुंबईसारख्या ठिकाणी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या सेवेतील कर्मचारी कोरोनायोद्धे आहेत. त्यापैकी अनेकांनाकोरोनाची बाधा झाली होती. मात्र, कोरोनामुक्त होऊन त्यांनी पुन्हा सेवा सुरु केलेली आहे. त्यांच्या या उदंडउत्साहातून मानवतेचं दर्शन घडतं, अशा शब्दांत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी डायल १०८ सेवेबद्दल कौतुकोद्गार काढले.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यावतीने महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आपत्कालिन वैद्यकीय मदत सेवा राबविली जाते. ही सेवा भारत विकास समूहाद्वारे संचलित केली जाते. या सेवेच्या नियंत्रण कक्षाला नुकतीच टोपे यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, “आधुनिक तंत्रज्ञान आणि कार्यपद्धतींवर आधारलेली महाराष्ट्र आपत्कालिन वैद्यकीय मदत सेवा महाराष्ट्रात मोलाचे कार्य करत आहे. आतापर्यंत
४९ लाख २२ हजार ९३६ रुग्णांना उपचार करण्याचे आणि व्यवस्थितपणे रुग्णालयात पोहोचविण्याचे काम या सेवेच्या माध्यमातून झालेले आहे. जवळपास ३५,२६१ बाळांचा जन्म या सेवेच्या रुग्णवाहिकेत झालेला आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत जवळपास एक कोटीहून अधिक फोन कॉल्स प्राप्त झालेले आहेत. चांगली आरोग्य सेवा देणे ही आजच्या काळाची गरज आहे.”

राज्यात कोरोनाच्या ६५ हजार ८२९ रुग्णांवर उपचार सुरू

0

राज्यभरात आतापर्यंत सुमारे पावणेनऊ लाख चाचण्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि.२६: राज्यात आज कोरोनाच्या ५०२४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ६५ हजार ८२९ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत.आज २३६२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ७९ हजार ८१५ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.२५ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८ लाख ७१ हजार ८७५ नमुन्यांपैकी १ लाख ५२ हजार ७६५ नमुने पॉझिटिव्ह (१७.५२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ५८ हजार  ४८८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ९०३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १७५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ९१ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ८४ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर  ४.६५ टक्के एवढा आहे.

मागील ४८ तासात झालेले ९१ मृत्यू हे मुंबई मनपा-४४, कल्याण-डोंबिवली मनपा-२, नाशिक-१. नाशिक मनपा-७, पुणे मनपा-१४, कोल्हापूर-१, औरंगाबाद मनपा-१४, लातूर-२, नांदेड मनपा-२, अकोला-१, अकोला मनपा-१, नागपूर मनपा-१, गोंदिया-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राज्यातील जिल्हानिहायॲक्टिव्हरुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (७२,१७५), बरे झालेले रुग्ण- (३९,७४४), मृत्यू- (४१७९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८,२४४)

ठाणे: बाधित रुग्ण- (३०,८७१), बरे झालेले रुग्ण- (१३,०९४), मृत्यू- (८१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६,९६०)

पालघर: बाधित रुग्ण- (४५३६), बरे झालेले रुग्ण- (१३८२), मृत्यू- (९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०५५)

रायगड: बाधित रुग्ण- (३२४८), बरे झालेले रुग्ण- (१८३०), मृत्यू- (९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३२२)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (५३७), बरे झालेले रुग्ण- (३९८), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११४)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१९२), बरे झालेले रुग्ण- (१४८), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०)

पुणे: बाधित रुग्ण- (१९,०३१), बरे झालेले रुग्ण- (१०,०२५), मृत्यू- (६७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८३३१)

सातारा:  बाधित रुग्ण- (९१५), बरे झालेले रुग्ण- (६८७), मृत्यू- (४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८५)

सांगली: बाधित रुग्ण- (३२३), बरे झालेले रुग्ण- (१९६), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११८)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (७८७), बरे झालेले रुग्ण- (७०७), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७१)

सोलापूर: बाधित रुग्ण- (२५००), बरे झालेले रुग्ण- (१३७१), मृत्यू- (२३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८९३)

नाशिक: बाधित रुग्ण- (३४३३), बरे झालेले रुग्ण- (१८५२), मृत्यू- (२०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३७६)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (३०४), बरे झालेले रुग्ण- (२४०), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२)

जळगाव: बाधित रुग्ण- (२८०६), बरे झालेले रुग्ण- (१४९६), मृत्यू- (२०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११०६)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (१५३), बरे झालेले रुग्ण- (५२), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९४)

धुळे: बाधित रुग्ण- (६६३), बरे झालेले रुग्ण- (३९१), मृत्यू- (४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२३)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (४३५४), बरे झालेले रुग्ण- (२१२६), मृत्यू- (२२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२००२)

जालना: बाधित रुग्ण- (४१८), बरे झालेले रुग्ण- (२९२), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११४)

बीड: बाधित रुग्ण- (१०२), बरे झालेले रुग्ण- (७५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२४)

लातूर: बाधित रुग्ण- (२५६), बरे झालेले रुग्ण- (१७६), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६५)

परभणी: बाधित रुग्ण- (९२), बरे झालेले रुग्ण- (७५), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२६६), बरे झालेले रुग्ण- (२३२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३)

नांदेड: बाधित रुग्ण- (३०९), बरे झालेले रुग्ण (२३१), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६५)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१९४), बरे झालेले रुग्ण- (१४७), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९)

अमरावती: बाधित रुग्ण- (४९९), बरे झालेले रुग्ण- (३४७), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२८)

अकोला: बाधित रुग्ण- (१३७०), बरे झालेले रुग्ण- (८५८), मृत्यू- (७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३८)

वाशिम: बाधित रुग्ण- (८७), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (१८६), बरे झालेले रुग्ण- (१३४), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (२८०), बरे झालेले रुग्ण- (१८१), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९०)

नागपूर: बाधित रुग्ण- (१४२४), बरे झालेले रुग्ण- (१००५), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०५)

वर्धा: बाधित रुग्ण- (१५), बरे झालेले रुग्ण- (११), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३)

भंडारा: बाधित रुग्ण- (७९), बरे झालेले रुग्ण- (५६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१०४), बरे झालेले रुग्ण- (१००), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (७२), बरे झालेले रुग्ण- (४८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (६१), बरे झालेले रुग्ण- (५०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१२३), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१००)

एकूण:बाधित रुग्ण-(१,५२,७६५),बरे झालेले रुग्ण- (७९,८१५),मृत्यू- (७१०६),इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१५),ॲक्टिव्ह रुग्ण-(६५,८२९)

(टीप-आजराज्यात एकूण नोंदविलेल्या १७५ मृत्यूंपैकी ९१ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि ८४ मृत्यू हे त्या पूर्वीच्या कालावधीतील आहेत.यामृत्यूंमध्ये मुंबईतील ७३,नाशिक-३,ठाणे-२,उल्हासनगर-१,मीराभाईंदर-१,पुणे-१,पिंपरीचिंचवड-१,नंदूरबार-१आणिऔरंगाबाद-१यांचा समावेश आहे.हे८४ मृत्यू दैनंदिन स्वरुपात न दाखविता प्रगतीपर आकडेवारीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत.हीमाहिती केंद्रसरकारच्या आय.सी.एम.आर.पोर्टलवरमान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे.प्रयोगशाळाअहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

सलून केशकर्तनालये आणि ब्युटी पार्लर्स सुरु करण्यासाठी या आहेत अटी शर्ती

0

मुंबई, दि २६ : शासनाने मिशन बिगिन अगेन टप्पा चारची घोषणा केली असून त्यानुसार काही अटी आणि शर्तींसह राज्यात सलूनची दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या महापालिकांमध्ये कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रात केशकर्तनालये, सलून्स, आणि ब्युटी पार्लर्स दि. २८ जून २०२० पासून सुरु करता येतील. मात्र या दुकांनामध्ये प्रवेश मर्यादित स्वरुपाचा राहील व त्यासाठी पूर्व नियोजित वेळ ग्राहकाला घ्यावी लागेल. या दुकानांनी पुढील अटींचे बंधन पाळणे आवश्यक आहे. 

  • केशकर्तन, हेअर डाय, वॅक्सिंग, थ्रेडींग याच मर्यादित सेवा ग्राहकांना देता येतील. त्वचेशी संबंधित इतर कृती करण्यासाठी सध्या संमती नाही. ही बाब दुकानामध्ये ठळकपणे प्रदर्शित करावी लागेल.
  • दुकानातील कर्मचाऱ्यांनी ग्लोव्हज, ॲप्रॉन आणि मास्कसारख्या सुरक्षित साधनांचा वापर करणे बंधनकारक आहे.
  • ग्राहकाला सेवा दिल्यानंतर प्रत्येक खुर्ची किंवा यासारखी प्रत्येक वस्तू सॅनिटाइज करावी लागेल. अशा दुकानातील वापराचा सर्वसाधारण भाग, पृष्ठभाग हा दर २ तासांनी सॅनिटाइज करणे गरजेचे आहे.
  • फक्त एकदाच वापरता येतील असे टॉवेल, नॅपकिन्स यांचा ग्राहकांसाठी वापर करावा लागेल. ज्या वस्तूंची तत्काळ विल्हेवाट लावता येणे शक्य नाही अशी वस्तू प्रत्येक ग्राहकास सेवा दिल्यानंतर  सॅनिटाइज करावी लागेल.
  • उपरोक्त नमूद सावधगिरीबाबत प्रत्येक दुकानामध्ये ग्राहकांच्या माहितीसाठी नोटीस लावण्यात यावी.

राज्यातील उर्वरित भागांमध्ये केश कर्तनालये, सलून आणि ब्युटी पार्लर्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी सुध्दा उपरोक्त नमूद सर्व अटींचे पालन करणे बंधनकारक आहे.

एक नाही तर तीन ठिकाणी चीननं भारतीय जमीन बळकावली ? राहुल गांधींंचा मोदींना सवाल (व्हिडिओ)

0

नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांच्या हल्ल्यात २० भारतीय सैनिकांना हौतात्म्य आल्यानंतर विरोधकांकडून सातत्यानं मोदी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चीन विवादावरून निशाणा साधलाय. शुक्रवारी पुन्हा एकदा सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना काही प्रश्न विचारले आहेत. ‘पंतप्रधानजी, देशाला तुमच्याकडून सत्य ऐकायचंय’ असं या व्हिडिओ पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी म्हटलंय. ‘चीननं   भारतीय जमिनीवर ताबा मिळवलाय आणि आम्ही त्यावर कारवाई करत आहोत, असं पंतप्रधानांनी न घाबरता सांगावं. या परिस्थितीत संपूण देश तुमच्यासोबत आहे’ असं पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी या व्हिडिओत म्हटलं.

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/255051085796031/

‘संपूर्ण देश एकत्रितपणे सरकारसोबत उभा आहे. परंतु, एक प्रश्न वारंवार उपस्थित होतोय. काही दिवसांपूर्वी आपल्या पंतप्रधानांनी म्हटलं होतं की हिंदुस्तानात कुणीही घुसखोरी केलेली नाही, आपल्या जमिनीवर कुणीही ताबा मिळवलेला नाही. परंतु, सॅटेलाईट फोटो काही वेगळंच सांगत आहेत. सेनेचे माजी जनरल बोलत आहेत तसंच लडाखचे रहिवासी सांगत आहेत की आपली जमीन एका ठिकाणी नाही तर तीन ठिकाणी चीनकडून बळकावण्यात आली आहे’ असं राहुल गांधी यांनी या व्हिडिओत म्हटलंय.  

कोरोना संकटकाळात नाविन्यता सोसायटीमार्फत ५२ कोटींहून अधिक रकमेची मदत

0

मुंबई, दि. २६ : कोरोना संकटकाळात कौशल्य विकास विभागाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीने सीएसआर देणगी समन्वयाचे उत्कृष्ट काम करुन लाखो आपत्तीग्रस्तांना मोठी मदत मिळवून दिली आहे. यासाठी सोसायटीमार्फत धैर्य मोहीम राबविण्यात आली. याअंतर्गत विविध कॉर्पोरेट्स आणि खाजगी देणगीदारांकडून सुमारे ५२ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकारच्या मदत साहित्याची उभारणी आणि त्याचे गरजूंना वाटप करण्यात आले, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. आतापर्यंत मिळालेल्या मदत साहित्यात सुमारे ८ लाख सर्जिकल मास्क, ४६ व्हेंटिलेटर्स, ८५ हजार पीपीई किट्स, २ लाख २५ हजार एन ९५ मास्क, ३८ हजार लिटर सॅनिटायझर इत्यादी सामग्रीचा समावेश आहे. त्याचबरोबर मागील तीन महिन्यांमध्ये नाविन्यता सोसायटीने ३५ लाखाहून अधिक लोकांना जेवण, १ लाख किराणा सामान किटस, १४ लाख सॅनिटरी पॅडची व्यवस्था केली आहे

नाविन्यता सोसायटीमार्फत धैर्य मोहिमेमधून सीएसआर निधीअंतर्गत आवश्यक उपकरणे आणि अन्न वितरण खरेदीसाठी समन्वय करण्यात आला. मार्च २०२० मध्ये सोसायटीने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इंडियन ह्यूम पाईप कंपनी लिमिटेडच्या सहकार्याने जे. जे. हॉस्पिटलमध्ये कोविड – १९ चाचणी प्रयोगशाळेची स्थापना देखील केली आहे.

सर्जिकल मास्कपीपीई किट्ससॅनिटायझरचे वाटप

आतापर्यंत मिळालेली सर्जिकल मास्क, व्हेंटिलेटर्स, पीपीई किट्स, एन ९५ मास्क, सॅनिटायझर ही सामग्री हाफकीन संस्था, जे. जे. हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस दल, बृहन्मुंबई महानगरपालिका, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका यांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मुख्य देणगीदारांमध्ये कॅस्ट्रॉल इंडिया, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे, विप्रो फाउंडेशन, एचटी पारेख फाउंडेशन, नोव्हार्टिस इंडिया, फाइझर लि., डीएल शाह ट्रस्ट, गोदरेज ग्रुप, अमेरिकेअर्स, पेटीएम, रेकिट बेनस्कीसर इत्यादींचा समावेश आहे. यातून नाविन्यता सोसायटीला ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची मदत उभारण्यात यश आले आहे.

३५ लाखापेक्षा अधिक लोकांना जेवण१ लाख किराणा सामान किट्स

वैद्यकीय उपकरणांव्यतिरिक्त नाविन्यता सोसायटीने स्थलांतरित मजूर, दैनंदिन मजुरी करणारे नागरिक, झोपडपट्टीवासीय, कंटेंनमेंट झोनमधील नागरिक तसेच फ्रंटलाइन कामगारांना मुबलक प्रमाणात अन्न पुरवण्याच्या कामातही योगदान दिले. मागील तीन महिन्यांमध्ये ३५ लाखापेक्षा अधिक लोकांना जेवण, १ लाख किराणा सामान किट्स, १४ लाखाहून अधिक सॅनिटरी पॅडची व्यवस्था केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, नवी मुंबई महानगरपालिका, रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई पोलिस या क्षेत्रातील लाभार्थ्यांचा यात समावेश आहे. सर नेस वाडिया फाऊंडेशन, युनिसेफ, डीएल शाह ट्रस्ट, बीसीजी ग्रुप, सीआयआय, टेस्टी बाइट्स, गोदरेज ग्रुप, क्रेडो फाऊंडेशन, प्रोजेक्ट मुंबई, सीएसीआर फाऊंडेशन, जायन्ट्स ग्रुप ऑफ भायखळा, श्री रेणुका शुगर्स लिमिटेड, अदानी ग्रुप यांसारख्या प्रमुख देणगीदार आणि भागीदारांचा समावेश आहे. यामाध्यमातून नाविन्यता सोसायटीला २२ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची मदत उभारण्यात यश आले आहे.

युनिसेफच्या जीवन रथ प्रकल्पाद्वारे स्थलांतरित कामगारांना मदत

युनिसेफद्वारे स्थलांतरित कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या जीवन रथ प्रकल्पासही नाविन्यता सोसायटीकडून सहकार्य करण्यात आले. जास्तीत जास्त स्थलांतरित लोकांपर्यंत पोहोचून त्यांना अन्न व जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. वेगवेगळ्या रेल्वे स्थानक आणि टोलनाक्यांवर सुमारे १.५ कोटी रुपये किंमतीच्या मदत साहित्याचे वाटप करण्यात आले. यात श्रमिक एक्स्प्रेस आणि राज्य परिवहन बसेसमधून प्रवास करणारे अतिथी कामगार आणि त्यांचे कुटुंबीयांना थेपला, शिरा, कुकीज, बिस्किटे, ताक, पाणी, औषधे आणि पादत्राणे इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले.

12वीच्या विद्यार्थ्यांना दोन पर्याय, अंतर्गत मूल्यांकनातून गुण किंवा नंतर परीक्षा द्या

0

नवी दिल्ली. सीबीएसई आणि सीआयएससीईने दहावी आणि बारावीच्या १ ते १५ जुलैदरम्यान होणाऱ्या उर्वरित विषयांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. दोन्ही मंडळांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाची माहिती दिली. मात्र, मंडळाच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीबाबत दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी कोणताही निकाल दिला नाही. न्यायालयाने शुक्रवारी १०.३० वाजेपर्यंत पर्यायी परीक्षा आणि निकालाशी संबंधित विविध बाबींवर सरकारकडून माहिती मागवली आहे. त्याआधारे अंतिम सुनावणी होईल.

ईशान्य दिल्लीतील हिंसाचारामुळे दहावीची परीक्षा रद्द झाली होती. तर कोरोनामुळे १२वीची परीक्षा थांबवावी लागली. ती जुलैमध्ये होणार होती. मात्र त्या रद्द कराव्या व अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे निकाल जाहीर करण्याची मागणी करत काही पालक सुप्रीम कोर्टात गेले होते.

आयआयएम रोहतकची प्रवेश परीक्षा स्थगित करण्याची मागणीही फेटाळली

– सरकारच्या स्पष्टीकरणातून समाधान न झाल्याने कोर्टाने शुक्रवारी सकाळपर्यंत सुनावणी स्थगित करत सीबीएसईला कोणतेही निर्देश देण्यास नकार दिला. सरकारकडून सर्व मुद्द्यांवर नव्याने म्हणणे मागवले.

– एका वकिलाने २८ जूनची आयआयएम रोहतकची प्रवेश परीक्षा स्थगित करण्याची मागणी केली. यावर न्या. खानविलकर यांनी सुनावले की, संबंधितांना येऊ द्या. आम्ही येथे बसून संस्था चालवू शकत नाही.

केंद्राने सांगितले-मूल्यांकनाच्या आधारे १०वी-१२वीचा निकाल १५ जुलैपर्यंत लागेल

न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली. वाचा सुप्रीम कोर्टातील सुनावणी लाइव्ह…

– तुषार मेहता : दहावी आणि बारावीच्या जुलैत होणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. महामारीत परिस्थिती भयावह आहे. दिल्ली, महाराष्ट्र आणि तामिळनाडूनेही परीक्षा घेणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. विद्यार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाची स्थिती सुधारल्यानंतर १२वी उर्वरित परीक्षा होऊ शकते.

– ऋषी मल्होत्रा (पालकांचे वकील): यामुळे शैक्षणिक सत्राला उशीर होईल. स्पर्धा परीक्षेत सहभागी होण्याची संधी विद्यार्थ्यांना गमवावी लागेल.

– न्या. खानविलकर: निकाल केव्हा जाहीर होईल हे सरकारने सांगावे. नवे शैक्षणिक सत्र कसे निश्चित केले जाईल? जर तुम्ही १२ची परीक्षा भविष्यात पुन्हा कधी घेणार असाल तर इतर परीक्षादेखील स्थगित कराव्या लागतील. परीक्षा ऑगस्टमध्ये झाली तर शैक्षणिक सत्र सप्टेंबरमध्ये सुरू होईल.

– मेहता : नामांकन आता केवळ अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे होईल. विद्यार्थी त्याआधारे फॉर्म भरू शकतील. मूल्यांकनाच्या आधारे निकाल १५ जुलैपर्यंत जाहीर केले जातील.

कोर्टाने परीक्षा घेण्याबद्दल, निकालाबाबत माहिती मागवली

– आयसीएसई: १०वी आणि १२वी या दोन्ही वर्गांतील विद्यार्थ्यांना आता नंतर परीक्षा देण्याची गरज नाही.

– कर्नाटकात गुरुवारी इयत्ता दहावीची परीक्षा सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी सुमारे ८.४० लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दुसरीकडे लखनऊ विद्यापीठाच्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी ७ जुलैपासून सुरू होणाऱ्या परीक्षांना विरोध करत त्या स्थगित करण्याची मागणी केली.

शिक्षण मंडळाच्या निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे

सीबीएसई : दहावीची परीक्षा होणार नाही, बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन पर्याय

दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यांना आता परीक्षा द्यावी लागणार नाही. अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे त्यांना गुण दिले जातील.

– बारावीची १ ते १५ जुलैदरम्यान होणारी परीक्षा स्थगित. विद्यार्थ्यांना मागील तीन परीक्षांच्या आधारे अंतर्गत मूल्यांकन करून गुण दिले जातील. ज्यांना हा पर्याय मान्य नसेल त्या विद्यार्थ्यांना परिस्थिती सामान्य झाल्यावर होणारी परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

आयसीएसई : दहावी आणि बारावी अशा दोन्ही परीक्षा रद्द. बारावीच्या विद्यार्थ्यांना नंतर परीक्षा द्यावी लागणार नाही.

शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर

सीबीएसईने शिक्षकांच्या नियुक्तीसाठी घेण्यात येणारी केंद्रीय पात्रता परीक्षा सीईटी पुढे ढकलली. मंत्री रमेशकुमार पोखरियाल यांनी ही माहिती दिली.

पुणे विभागात आता ॲक्टीव रुग्ण 8 हजार 283

0

पुणे विभागातील 13 हजार 917 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 23 हजार 159 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 26 :- पुणे विभागातील 13 हजार 917 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 23 हजार 159 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 8 हजार 283 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 959 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 463 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.09 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 4.14 टक्के आहे,अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 18 हजार 840 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 10 हजार 889 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 294 आहे. कोरोनाबाधित एकूण 657 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 373 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 57.80 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.49 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 110 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 935, सातारा जिल्ह्यात 24, सोलापूर जिल्ह्यात 131, सांगली जिल्ह्यात 7 तर कोल्हापूर जिल्ह्यात 13 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 888 रुग्ण असून 689 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 158 आहे. कोरोनाबाधित एकूण 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 2 हजार 340 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 425 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 673 आहे. कोरोना बाधित एकूण 242 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 313 रुग्ण असून 204 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 99 आहे. कोरोना बाधित एकूण 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 778 कोरोना बाधीत रुग्ण असून 710 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 59 आहे. कोरोना बाधित एकूण 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 56 हजार 476 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 55 हजार 40 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 1 हजार 436 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 31 हजार 554 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 23 हजार 159 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

( टिप :- दि. 26 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
0000

भूतानने अडवले असाममध्ये येणारे पाणी ?

0

नवी दिल्ली. भूतानकडून असामच्या शेतात यावर्षी पाणी येत नाहीये. 1953 पासून असामच्या बक्सा आणि उदालगुरी जिल्ह्यातील 25 गावांना सिंचनासाठी भूतानकडून पाणी मिळत आलाय. कोरोनामुळे भूतानने आपल्या सीमा बंद केल्यात आणि त्यातच पाणीदेखील बंद केल्याच्या चर्चा समोर आल्या आहेत. भूतानच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी म्हटले की, याप्रकारच्या बातम्या योग्य नाहीत. आम्ही पाणी अडवले नाही, कालव्यांच्या डागडुजीचे काम सुरू असल्यामुळे पाणी सोडण्यात अडचणी येत आहेत.

असामच्या शेतकऱ्यांनी पाणी अडवल्यामुळे काही दिवसांपूर्वी कालीपुर-बोगाजुली-कालंदी आंचलिक डोंग बांध समितीच्या बॅनरअंतर्गत प्रदर्शन केले होते. शेतकऱ्यांनी मागणी केली होती की, केंद्र सरकारने भूतानला बोलून आम्हाला पाणी मिळवून द्यावे. वेळेवर पाणी न मिळाल्यास अंदाजे 5 हजार शेतकऱ्यांच्या शेतीवर परिणाम पडू शकतो.

भूतानने कोरोनामुळे सीमा बंद केल्या

भूतानने म्हटले की, आम्ही कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सीमा बंद केल्या आहेत. बाहेरुन आलेल्या कोणत्याही व्यक्तीला क्वारेंटाइन राहावेच लागेल. दरवर्षी असामचे शेतकरी भूतानला जाऊन पाणी डायव्हर्ट करतात. परंतू, सध्याची परिस्थिती पाहता, असे करणे शक्य नाही. तरीदेखील पाण्याचा सप्लाय सुरुच ठेवण्यात आला होता. आमच्याकडे असामच्या शेतकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध आहे, आम्ही विश्वास देतो की, शेतकऱ्यांना पाणी मिळून जाईल.

भूतानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, भारताच्या दिशेने जाणारे नदीचे पाणी अडवले असल्याचे वृत्त चुकीचे आहे. भूतानने असे कोणतेही आदेश दिले नव्हते. पाणी अडवल्याची बाब समोर आल्यानंतर या ठिकाणची पाहणी करण्यात आली. माती, दगडांमुळे पाण्याचा प्रवाह रोखला गेला होता. भूतानच्या नागरिकांनी, कर्मचाऱ्यांनी प्रवाह सुरळीत केला असून आसाममधील नागरिकांना पाणी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. भूतानच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबातचे निवदेन सोशल मीडियावर दिले असून काही छायाचित्रेही पोस्ट केले आहेत. भूतान सरकारने कोणतीही अडवणूक केली नसून काही नैसर्गिक कारणांमुळे पाणी अडवले गेले असल्याचे त्यांनी म्हटले.

व्यावसायिक अभ्याक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

0

मुंबई, दि. २६: राज्यात अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या (सत्राच्या) परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याच धर्तीवर राष्ट्रीय संस्थांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या (सत्राच्या) परीक्षा रद्द करण्यासंदर्भात राष्ट्रीय संस्थांना व विद्यापीठांना सूचित करावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात व्यावसायिक अभ्यासक्रमाशी संबंधित राष्ट्रीय स्तरावरून नियंत्रित होणाऱ्या काही संस्थांचा उल्लेख देखील केला आहे. यामध्ये ऑल इंडिया काऊंसिल फॉर टेक्निकल इज्युकेशन, काऊंसिल ऑफ आर्किटेक्चर, फार्मसी काऊंसिल ऑफ इंडिया, बार काऊंसिल ऑफ इंडिया, नॅशनल काऊंसिल ऑफ टिचर्स एज्युकेशन, नॅशनल काऊंसिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री पत्रात म्हणतात, कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसमोर  अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. आपणास माहीत आहेच की,  कोविड १९ च्या सर्वाधिक केसेसची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, (मुंबई महानगरपालिका क्षेत्र),  पुणे महापालिका क्षेत्र, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, अकोला, पालघर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.  राज्यातील विद्यार्थी आणि पालक हे २०१९-२० या वर्षाच्या अंतिम परीक्षेबाबत तसेच नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाबाबत चिंतेत आहेत.

सध्याचे वातावरण हे कोणत्याही परीक्षांसाठी आणि वर्ग सुरु करण्यासाठी अनुकूल नाही. विषाणू प्रादुर्भावाच्या सध्याच्या परिस्थितीत परीक्षा घेणे हे विद्यार्थी आणि पालकांबरोबरच स्थानिक जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासन, परीक्षा घेणारी ॲथॉरिटी, वाहतूक प्रशासन या सर्वांवरचा ताण वाढविणारे आहे.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिनांक १६ जून रोजी पंतप्रधानांशी साधलेल्या संवादाची आठवण करून देताना म्हटले की, या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्येही मी आपल्याला अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करून राष्ट्रीय स्तरावरील या अभ्यासक्रमाशी संबंधित सर्वोच्च संस्थांनी एकसमान मार्गदर्शक सूचना निर्गमित कराव्यात, त्यासाठी आपण त्यांना निर्देश द्यावेत, अशी विनंती केली होती.

अंतिम वर्ष वगळता इतर विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि नवीन शैक्षणिक वर्षाच्या कॅलेंडर संदर्भात युजीसीने लागू केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे राज्य तंतोतंत पालन करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच अंतिम वर्षाच्या परीक्षा यापूर्वी जुलैमध्ये घेण्याचे ठरविण्यात आले होते. परंतु, कोविड १९ ची राज्यातील सध्याची परिस्थिती विचारात घेता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या १८ जूनच्या बैठकीत व्यावसायिक तसेच अव्यवसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठ ठरवतील त्या फॉर्म्यूल्यानुसार त्यांना पदवी प्रदान करण्यात येईल. यावरही जे विद्यार्थी परीक्षा देऊ इच्छितात त्यांच्यासाठी जेव्हा परीक्षा घेता येतील तेव्हा त्या घेण्याचा पर्यायही खुला ठेवण्यात आला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

त्यामुळे राज्य शासनाने व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्यावर राष्ट्रीय स्तरावरील संस्थांना निर्देश देऊन त्यास मान्यता देण्याचे निर्देश द्यावेत व तशा एकसमान सूचना विद्यापीठांसाठी निर्गमित कराव्यात, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.

कोरोना चाचण्‍यांचे प्रमाण वाढवा- शरद पवार

0

पुणे- ज्‍येष्‍ठ नेते व खासदार शरद पवार यांनी इंडियन कौन्‍सील ऑफ मेडीकल रिसर्चच्‍या मार्गदर्शक सुचनांनुसार कार्यवाही करण्‍यात यावी, तसेच कोरोनाविषयक चाचण्‍यांचे प्रमाण वाढविण्‍याच्‍या सूचना आज येथे केल्‍या. प्रतिबंधीत क्षेत्राचाही नियमित आढावा घ्‍यावा. खाजगी रुग्‍णालयातील कोरोनाच्‍या रुग्णांवरील उपचारांसाठी अवाजवी शुल्‍क आकारणी होणार नाही यासाठी आवश्‍यक ती कार्यवाही करावी, असेही ते म्‍हणाले.

विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक ज्‍येष्‍ठ नेते तथा खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.

बैठकीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, खासदार वंदना चव्हाण, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह आमदार शरद रणपिसे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार सुनील शेळके, आमदार सिद्धार्थ शिरोळे हे लोकप्रतिनिधी तसेच विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड चे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, साखर आयुक्त सौरभ राव, पीएमआरडीए चे आयुक्त विक्रम कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य सेवा व अभियान विभागाचे संचालक डॉ.अनुप कुमार यादव, शासनाचे वैद्यकीय सल्‍लागार डॉ. सुभाष साळुंखे, संचालक डॉ. अर्चना पाटील, ससून चे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्या सह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या सूचनेच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांनी लोकप्रतिनिधींना नियमित संपर्क करावा. तसेच अधिकाऱ्यांनी त्‍यांना नेमून दिलेल्या जबाबदारीप्रमाणे काम करावे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध राबवावे, अशा सूचनाही श्री. पवार यांनी दिल्या.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, कोरोनाच्‍या लढाईत पुणे महानगरपालिकेने आर्थिक भार सहन केला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन योग्य निर्णय घेण्यात येईल. कोरोना प्रतिबंधासाठी कॅन्टोमेंट बोर्डसाठी आणखी एक कोटी रुपयांचा निधी देण्‍यात येत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. सर्वांनी समन्‍वयाने काम केल्यास आपण कोरोनाची लढाई निश्चितपणे जिंकू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पुणे शहरासह जिल्ह्यात ‘मुंबई पॅटर्न’ राबवा – आरोग्य मंत्री राजेश टोपे

कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनेचा भाग म्हणून मुंबई शहराच्या धर्तीवर पुणे शहरासह जिल्ह्यात ‘मुंबई पॅटर्न’ राबवा, असे निर्देश राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिले. आरोग्य मंत्री टोपे म्हणाले, पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोना चाचण्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची वाढ होत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई शहराच्या धर्तीवर पुण्यात उपाययोजना करण्याची गरज आहे. मुंबई महानगरपालिकेने खासगी रुग्णालयातील बेड्स ताब्यात घेतली आहेत. त्या रुग्णालयात एक जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली आहे. त्या अधिकाऱ्यांनी रुग्णालय व्यवस्थापनाच्या मदतीने एक फ्लोचार्ट करावा. त्यामध्ये रुग्णालयात किती बेड्स उपलब्ध आहेत, त्यापैकी आयसीयूचे बेड, व्हेंटीलेटर बेडस्, पीपीई कीट, मास्क इत्यादी बाबी नमूद कराव्यात. जेणेकरुन नागरिकांना त्याचा लाभ होईल. कोरोनाबाधित रुग्णांकडून जादा पैसे घेणाऱ्या व शासकीय निर्देशाचे पालन न करणाऱ्या खासगी रुग्णालयावर कारवाई करण्याच्या सूचना केल्या. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून रुग्णावर मोफत उपचार करावा अशा सूचनाही दिल्या.आरोग्य मंत्री टोपे म्हणाले, स्थानिक प्रशासनाने लोकप्रतिनिधींना सोबत घेवून काम करावे, लोकांच्या मनात कोरोना विषाणूविषयीची भीती कमी करण्यासाठी सोशल मिडीया तसेच दूरचित्रवाणी, होर्डिग्ज, भिंतीपत्रके, रेडीओ यांचा वापर करण्याबरोबरच लोकप्रतिनिधींना विचारात घेवून जनजागृती करण्यावर भर द्यावा. लहान बाळापासून ते वयोवृध्द आजीपर्यंत अनेकजण कोरोना आजारातून बरे झाले आहेत. त्यांच्या अनुभवातून ‘यशकथा’ तयार कराव्‍यात. राज्यात ॲण्टीजेन चाचणी पाठोपाठ अॅण्‍टीबॉडीज चाचण्या करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये किती लोकांना संसर्ग झाला याची माहिती या चाचणीद्वारे मिळणार आहे. नागरिक हा केंद्रबिंदू मानून माणुसकी आणि मानवतेच्‍या दृष्टिने सर्वांनी एकत्र येवून कोरोना विषाणूवर मात करण्याचे आवाहनही टोपे यांनी केले.

प्रतिबंधित क्षेत्रात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध राबबावे -गृहमंत्री अनिल देशमुख

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून पुणे जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाच्या वतीने निश्चित करण्यात आलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात नागरिक विनाकारण फिरतांना आढळून येत असल्‍याच्‍या तक्रारीच्‍या पार्श्‍वभूमीवर महानगरपालिका व पोलीस विभागाने प्रतिबंधित क्षेत्रात कडक निर्बंध राबवावेत, असे स्पष्ट निर्देश राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी आज दिले.गृहमंत्री देशमुख म्हणाले, लॉकडाऊन कालावधीत तसेच लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर सोशल मिडीयाचा फार मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडून वापर करण्यात येत आहे. त्यामुळे काही प्रमाणात सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढतांना दिसून येत आहे. त्यामुळे फेकन्यूज, नागरिकांचे फसवणुकीचे प्रकार इत्यादी बाबी घडतांना दिसून येत आहे. यावर आळा घालण्यासाठी एका सायबर विषयक तज्ञ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे सायबर गुन्हे कमी होण्यास मदत होणार आहे. कोरोनाच्या लढाईत कोरानाचा संसर्ग होवून मृत्यू पावलेल्या पोलीसांच्या कुटुंबाला सेवानिवृत्त काळापर्यंत शासकीय निवासस्थानात वास्तव्य करता येईल, असा महत्वपूर्ण निर्णय गृह विभागाने घेतला आहे, असेही त्‍यांनी सांगितले. लॉकडाऊन कालावधीत परप्रांतीय मजूर राज्याबाहेर गेले होते. आता ते परत राज्यात येत आहेत. याबाबत प्रशासनाने सतर्क राहून कार्यवाही करावी, अशा सूचनाही गृहमंत्री देशमुख यांनी दिल्या

खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, कोरोना रुग्णांच्या अडचणी सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि अधिकाऱ्यांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये महापालिकेच्या समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. संस्थात्मक क्वारंटाईन सेंटरमध्ये आवश्यक सोयी- सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाचे आदेश, सूचना नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात, असेही त्‍यांनी सांगितले.

खासदार गिरीश बापट यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग प्रभावीपणे करायला हवे, अशी सूचना केली. खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षम करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. या केंद्रांमध्ये डॉक्टर उपलब्ध करुन देणे, वैद्यकीय सोयी सुविधा द्यायला हव्यात, असे त्‍यांनी सांगितले.आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार शरद रणपिसे,आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार सुनील शेळके आदी लोकप्रतिनिधींनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सूचना केल्या.

आता तरी मोटर ड्रायव्हिंग स्कूल सुरु करा हो … असोसिएशनची मागणी

0

पुणे- आता तरी शहरातील मोटर चालक प्रशिक्षण केंद्रे सुरु करा हवे तर एका मोटारीत प्रशिक्षक व १ च प्रशिक्षणार्थी ठेऊ ,सर्व प्रकारची काळजी घेऊ पण आता अंत पाहू नका अशी आर्त विनंती आज पुणे शहर मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष यशवंत कुंभार आणि अध्यक्ष राजू घाटोळे तसेच निलेश गांगुर्डे, निखिल बोराडे ,इत्यादी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांसह ,विभागीय आयुक्तांना निवेदन दिले आहे .

या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे कि, Covid-19 च्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील सरकार मान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल संस्थांकडून गेले नव्वद दिवस मोटार वाहन चालकांना प्रशिक्षण देणे बंद आहे संपूर्ण लॉक डाऊन परिपूर्ण पालन आम्ही सर्वांनी केले आहे अनलॉक वन च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त यांनी दिनांक 16 जून 2020 त्या परिपत्रक प्रमाणे परिवहन कार्यालयाचे कामकाज अंशता सुरू करण्यात आले आहे आपणास आमची अशी विनंती आहे की लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर असंख्य ड्रायव्हिंग शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे ट्रेनिंग अर्धवट राहिले आहे व गेले नव्वद दिवस त्यांचे प्रशिक्षण होऊ शकले नाही म्हणून आम्हाला सरकारमान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालकांना मोटार वाहन प्रशिक्षण देण्यासाठी आपण परवानगी द्यावी महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार covid-19 च्या पार्श्‍वभूमीवर सरकार मान्य मोटर स्कूल कडून सर्व विद्यार्थी व प्रशिक्षक मास्कचा वापर व हात मोजे याचा वापर करू तसेच मोटार ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी वापरणारी वाहने प्रत्येक विद्यार्थ्याने नंतर निर्जंतुकीकरण केले जातील तसेच प्रशिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे तापमान तपासणी मशीन द्वारे तपासणी केली जाईल शासनाने सांगितल्याप्रमाणे एकावेळी एकाच विद्यार्थ्याला वाहनांमध्ये बसून त्याबरोबर एकच प्रशिक्षक अशी एकूण दोनच व्यक्ती मोटार ड्रायव्हिंग स्कूल च्या वाहनांमध्ये असतील ऑफिसमध्ये सहा फुटाचे फिजिकल डीस्टन्स आम्ही पालन करु अशा प्रकारची खबरदारी प्रत्येक ड्रायव्हिंग स्कूल कडून घेण्यात येईल माननीय महोदय पुणे शहरातील सरकारमान्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल च्या विद्यार्थ्यांना मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या प्रशिक्षण देण्यासाठी वापरणाऱ्या वाहनावर प्रशिक्षण देण्यासाठी परवानगी मिळावी ही विनंती