Home Blog Page 2499

दिशाभूल करणारे अन्नघटक वेष्टनावर छापणाऱ्या कंपनीवर छापा

0

मुंबई: जनतेची दिशाभूल करणारे अन्नघटक पदार्थाच्या वेष्टनावर छापल्याने अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून 6 लाख रूपयांचा माल जप्त केला आहे.अन्न व औषध प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभागास मिळालेल्या माहितीनुसार अन्न व औषध प्रशासन, ठाणे व गुप्तवार्ता विभाग, मुंबई यांचे संयुक्त पथकाने दि 28 जुलै, 2020 रोजी मे. सतीया न्युट्रास्युटीकल्स, कोणगाव, ता. भिवंडी, जि. ठाणे यांच्या गोदामावर छापा घालून मे. नेवस लाईफ न्युट्रासायन्स, अहमदाबाद यांचेमार्फत उत्पादित मे. ओलेना हेल्थ (ओपीसी) प्रा. लि. 101 ए, पंचरत्न बिल्डींग, ऑपेरा हाऊस, मुंबई यांचेमार्फत मार्केटींग केला जाणाऱ्या ओलेना (1000 मिलीग्रॅम विटामिन सी) टॅबलेट्स तसेच मे. साई प्रो बायोटेक प्रा. लि., ता. मुळशी, जि. पुणे यांचेमार्फत उत्पादित मे. सतीया न्युट्रास्युटीकल्स., कोणगाव, ता. भिवंडी, जि. ठाणे यांचे मार्फत मार्केटींग केला जाणारा कार्डीओ (Plix) या अन्न पदार्थाचा साठा कारवाई करुन जप्त केला आहे.

  • ओलेना (1000 मिली ग्रॅम विटामिन सी) टॅबलेट्स – अन्न पदार्थाच्या वेष्टनावर विटामिन सी 1000 मिली ग्रॅम असा मजकूर छापला आहे. प्रत्यक्षात ही मर्यादा आयसीएमआर ( ICMR ) पेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे. आयसीएमआर (ICMR) नुसार विटामिन सी ची मर्यादा ही केवळ 40 मिली ग्रॅम असणे बंधनकारक आहे. हा मजकूर हा जनतेची दिशाभूल करणारा व मिथ्याछाप असल्याचे निदर्शनास आले आहे.
  • या ठिकाणी ओलेना (1000 मिली ग्रॅम विटामिन सी) टॅबलेट्सचे 784 युनिट्स एकूण किंमत रु.4,31,200/ – चा साठा जप्त.
  • कार्डिओ (Plix) अन्न पदार्थाच्या वेष्टनावर No Sugar Added असा मजकूर छापला आहे. तथापि वेष्टनावरील घटक पदार्थांच्या यादीत Fructose घातल्याचे नमूद आहे. हा मजकूर हा जनतेची दिशाभूल करणारा व मिथ्याछाप असल्याचे निदर्शनास आले आहे.
  • या ठिकाणी कार्डिओ ( Plix ) चे 106 युनिट्स एकूण किंमत रु.1,69,600/ – चा साठा जप्त.
  • या छाप्यात एकूण रु.6,00,800/ – चा साठा जप्त करण्यात आलेला आहे.

ही कारवाई ही कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, अन्न सुरक्षा आयुक्त, यांनी दिलेल्या निर्देशानुसार व  सह आयुक्त (गुप्तवार्ता),  सह आयुक्त (को.वि), अन्न व औषध प्रशासन, ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सहायक आयुक्त, भिवंडी, डॉ भूषण मोरे, अन्न सुरक्षा अधिकारी एम.ए.जाधव, निलेश विशे, बी.सी. बसावे यांनी सक्रिय सहभाग घेऊन कारवाई यशस्वी केली.

‘रोझरी’ची शंभर टक्के यशाची ४७ वर्षांची परंपरा

0

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत ४७ वर्षांची यशस्वी परंपरा जपत रोझरी स्कुलचा निकाल यंदाही १०० टक्के लागला आहे. विमाननगर, वारजे आणि कॅम्प शाखेतून एकूण ७५८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील सर्व विद्यार्थी उत्कृष्ट गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. ५८२ विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये, तर १६२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
रोझरी स्कुल विमानगरमधून श्रेयस भारती (९५.८%) प्रथम, ख़ुशी कालनकर (९४.४%) द्वितीय, तर रसिका फुटाणे (९४%) तृतीय आली आहे. रोझरी स्कुल वारजेमधून सुवीरा रुकडे (९७.८०%), पृथ्वीराज बनसोडे (९७.२०%), ईश्वरी जोशी (९६.४०%) गुण मिळवत अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आली आहे. तर झीनल पोटफोडे ९७.४% गुण मिळवून रोझरी स्कुल कॅम्पमधून पहिली आहे आहे. पृथ्वीराज बनसोडे (रोझरी, वारजे) याला संस्कृत विषयात, मुस्कान शेख (रोझरी, विमाननगर) हिला गणित विषयात १०० पैकी १०० तर देवर्षी गायकवाड (रोझरी, विमाननगर) हिला विज्ञान विषयात १०० पैकी ९८ गुण मिळाले आहेत.
रोझरी फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक विनय अऱ्हाना यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अऱ्हाना म्हणाले, “दहावीच्या परीक्षेतील या घवघवीत यशाबद्दल मला विद्यार्थी आणि शिक्षकांचा अभिमान वाटतो. कठोर परिश्रम, अभ्यासातील सातत्य यामुळे कठीण वाटणाऱ्या दहावीच्या परीक्षेतील या विद्यार्थ्यांचे यश म्हणजे भविष्यातील चमकते तारे आहेत. ‘रोझरी’ची यशाची ही परंपरा नव्या वर्षातही याच जोमाने सुरु राहील. विद्यार्थी व पालक यापुढेही आमच्यावर आधीप्रमाणेच विश्वास टाकतील. सत्यस्थितीत बदलेली शिक्षणपद्धती, तंत्रज्ञानाचा वाढत वापर आणि स्मार्ट एज्युकेशन यावर आम्ही काम करतो आहोत.”

रोहा व चाकण येथील बलात्कार व निघृण खून प्रकरणांची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात होणार

0

गृहमंत्री अनिल देशमुख यांचे
विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांना आश्वासन

मुंबई दि. २९ : रोहा येथील तांबडी गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि निघृण खून तसेच चाकण येथील एका युवतीला विवस्र करून खून केल्याच्या प्रकरणांमध्ये पंडितांना लवकर न्याय मिळावा, यासाठी हे खटले फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात येतील तसेच या दोन्ही प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची नियुक्त करण्यात येईल असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांना दिले.
माणुसकीला काळीमा फासणा-या या दोन्ही प्रकरणांमध्ये पिडितांच्या कुटुंबियांना न्याय मिळायाला हवा व हे क्रुर कृत्य करणा-या गुन्हेगारांना कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याची मागणी आज विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी आज गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रालयात भेट घेऊन केली.
सामान्यपणे न्यायालयात सुनावणीस दीर्घकाळ लागतो. अनेक वर्षे खटले चालतात. त्यामुळे पीडितांना लवकर न्याय मिळण्यास विलंब होतो. म्हणून या दोन्ही प्रकरणांची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात घेण्यात यावी, त्यासाठी राज्य सरकारच्या वतीने दोन्ही प्रकरणात विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची मागणीही दरेकर यांनी गृहमंत्री देशमुख यांच्याकडे केली. याप्रकरणी सविस्तर चर्चा झाल्यानंतर गृह मंत्री देशमुख यांनी या प्रकरणांची दखल घेत या दोन्ही प्रकरणांसाठी सकारच्यावतीने विशेष सरकारी वकील उपलब्ध करुन देऊन हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात घेण्यात येईल असे आश्वासन गृहमंत्री देशमुख यांनी दिल्याची माहिती विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी यावेळी दिली.

नॅशनल पब्लिक स्कुल चा दहावी परीक्षेत पहिल्याच वर्षी शंभर टक्के यश

0

पुणे :
कात्रज जाधवनगर येथील अक्सा चॅरिटेबल ट्रस्ट च्या  नॅशनल पब्लिक स्कुल चा दहावी परीक्षेत पहिल्याच वर्षी शंभर टक्के निकाल लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.अमर राजू गायकवाड याने ८३ टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर जयेश महादेव कलशेट्टी याने ८० टक्के गुण मिळवून द्वीतीय क्रमांक पटकावला. 

 मुख्याध्यापक सौ.अंजुम फिरदौस पटेल आणि संस्थापक एडव्होकेट टी ए पटेल यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. अक्सा चॅरिटेबल ट्रस्ट ही अल्पसंख्यक शिक्षण कायद्याखाली नोंद झालेली शिक्षण संस्था असून गरीब ,सर्व साधारण कुटुंबातील विद्यार्थी येथे शिकतात .संस्थेला यावर्षी प्रथमच दहावीच्या तुकडीला परवानगी मिळाली,आणि पहिल्याच वर्षी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले असे संस्थापक एडव्होकेट  टी ए पटेल यांनी सांगितले. 

महामेट्रोला मल्टी मॉडेल हबमधून होणाऱ्या वार्षिक नफ्यातून महानगरपालिकेला ४०-५० टक्के हिस्सा मिळावा- आबा बागुल

0

पुणे- पेठ पर्वती स्कीम क्रमांक ३ फायनल प्लॉट क्रमांक ४९९ व ५००अ  स्वारगेट येथील २८ हजार चौ. मीटर एवढ्या क्षेत्रात  महामेट्रोला  (महाराष्ट्र मेट्रो रेल कॉरपरेशन लिमिटेड) मेट्रोस्टेशन  करण्यासाठी रेडीरेकनर दराने महामेट्रोला पुण्याची सार्वजनिक वाहतूक सुखकर व्हावी यासाठी  महानगरपालिकेने  जागा दिली आहे. सार्वजनिक हितासाठी जागा देताना  रेडीरेकनर दराने जागा देणे योग्य आहे. परंतु मेट्रोस्टेशन उभारत असताना येथे  मल्टी मॉडेल हब व्यावसायिक संकुल देखील महामेट्रो करत आहे. सदर जागेचा वापर महामेट्रोने मेट्रो स्टेशन व्यतिरिक्त  मल्टी मॉडेल हब व्यावसायिक संकुल करून नफा मिळवत असेल तर यातून होणाऱ्या वार्षिक उत्पन्नातून ४०-५० टक्के हिस्सा महामेट्रोने पुणे महानगरपालिकेला देणे बंधनकारक केले पाहिजे अशी मागणी काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी केली  
ते म्हणाले,’ पुणे शहरात अनेक जागा मेट्रो स्टेशनसाठी देण्यात आल्या आहेत. त्यापैकी   तीन ठिकाणी  मोक्याच्या जागेत महामेट्रोचा  मल्टी मॉडेल हब व्यावसायिक संकुल उभारण्याचा विचार आहे. यासर्व ठिकाणच्या व्यावसायिक संकुल मधून येणाऱ्या उत्पन्नाच्या ४०-५० टक्के हिस्सा महानगरपालिकेला मिळावा. महानगरपालिकेने महामेट्रोला दिलेल्या क्षेत्राचे ताबे पावती केलेली आहे. परंतु करारनामा झालेला नाही. करारनामा करताना सदर जागेचा व्यावसायिक हेतूने  वापर केल्यास पुणे महानगरपालिकेला होणाऱ्या वार्षिक नफ्यातून ४०-५० टक्के हिस्सा मिळावा अशी अट घालण्यात यावी किंवा ४०-५० टक्के पार्टनरशिप करावी. व स्थायी समिती मार्फत मुख्य सभेत मान्यता घेऊनच करार करावा असे आबा बागुल म्हणाले. 
महानगरपालिकेचे  नफ्याच्या दृष्टीने कार्य करणे हे उद्धिष्ट नाही. परंतु शहराला मूलभूत सुविधा देत असताना उत्पन्न वाढीसाठी विविध पर्याय शोधणे देखील महानगरपालिकेचे कर्तव्य आहे.
महानगरपालिका सार्वजनिक हिताच्या वापरासाठी महामेट्रोला हिस्यापोटी ९५० कोटी रुपये देणार आहे. त्यापैकी काही पैशाच्या स्वरूपात  व उर्वरित जागेच्या स्वरूपात वळती करण्यात येणार आहे. परंतु  सार्वजनिक हेतू सोडून महामेट्रो व्यावसायिक हेतूने येथे  मल्टी मॉडेल हब व्यावसायिक संकुल  उभारत असेल तर महानगरपालिकेला नफ्यामध्ये ४० टक्के हिस्सा असणे गरजेचे आहे.  
पुणे महानगरपालिकेचे व्यावसायिक प्रकल्प पाहणी करिता महानगरपालिकेने स्वतंत्र  कंन्सल्टंट नेमून   महानगरपालिकेला जास्तीतजास्त कसा प्रॉफिट मार्जिन मिळेल यासाठी त्याची मदत घ्यावी. महामेट्रो  मल्टी मॉडेल हबचे प्लॅन पास करताना महानगरपालिकेच्या बांधकाम नियमावलीप्रमाणे चार्जेस भरून घ्यावे. हा प्लॅन सॅंक्शन करताना महानगरपालिकेचा अधिकार देखील राखून ठेवावा. यातून महानगरपालिकेला उत्पन्नाचा मोठा स्रोत निर्माण होईल.  यासाठी आपण भूमिका घेऊन पुणे महानगरपालिकेला महामेट्रोच्या व्यावसायिक संकुलमधील एकूण वार्षिक नफ्याच्या  ४०-५० टक्के हिस्सा मिळण्यासाठी करारनाम्यात अट घालावी अशी मागणी पुणे महानगरपालिका आयुक्तांना आबा बागुलांनी दिलेल्या पत्राद्वारे केली. 

हाजी अब्दुल कादीर मेमन इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावी च्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के

0

पुणे:

महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या हाजी अब्दुल कादीर मेमन इंग्लिश मिडीयम स्कूल (संतोषनगर ,कात्रज ) या शाळेचा  दहावी च्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. अनम तांबोळी हिने  ९२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. 
संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार आणि मुख्याध्यापिका तस्नीम बजाजवाला यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे  अभिनंदन केले. 

‘आनंदी हे जग सारे’ ३ ऑगस्टपासून

0

आनंदी हे जग सारे’ या मालिकेने काही वर्षांचा लीप अवकाश घेतला असून सगळ्यांची लाडकी आनंदी आता प्रेक्षकांना मोठी झालेली दिसणार आहे. एवढंच नाही तर मोठी आनंदी स्वतःच्या पायावर उभी आहे आणि आयुष्यात राजकुमाराची वाट बघतेय. तिच्या स्वप्नातला हा राजकुमार म्हणजे दुसरातिसरा कोणी नसून  छोट्या पडद्यवरचा चॉकलेट बॉय यशोमान आपटे आहे. आधी काही  मालिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या यशोमानची ही दुसरी मालिका आहे. आनंदीची व्यक्तिरेखा रूपल नंद ही अभिनेत्री करते आहे. या मालिकेच्या निमित्ताने यशोमान आणि रुपल ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

या मालिकेच्या नवीन प्रोमोला सुद्धा प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. आनंदीचे बाबा म्हणेजच आस्ताद करत असेलली आनंदीची काळजी आणि स्वप्नाळू आणि स्वछंदी आनंदी या प्रोमोमध्ये पाहायला मिळाली आणि आनंदीच्या स्वप्नांचा राजकुमाराची म्हणेजच यशोमानची एंट्री सुद्धा मालिकेत होणार आहे.

पुणे विभागात कोरोनाचे ॲक्टीव रुग्ण 36 हजार 77 : एकुण 2 हजार 585 रुग्णांचा मृत्यू

0

पुणे विभागातील 56 हजार 414 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 95 हजार 76 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 29 :- पुणे विभागातील 56 हजार 414 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 95 हजार 76 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 36 हजार 77 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 585 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 955 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.34 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.72 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 76 हजार 669 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 47 हजार 197 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 27 हजार 663 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 19 हजार488 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 6 हजार 327, जिल्हा शल्य चिकीत्सक यांचेकडील 93, पुणे कॅन्टोंन्मेंट 144 , खडकी विभागातील 24 , ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 587 , यांच्याकडील रुग्णांचा समावेश आहे.
पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 809 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 254 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 322 , जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 53, पुणे कॅन्टोंन्मेंट 31 , खडकी विभागातील 37, व ग्रामीण क्षेत्रातील 112 , रुग्णांचा समावेश आहे. तसेच 698 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.56 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.36 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 11 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 20, सातारा जिल्ह्यात 182 , सोलापूर जिल्ह्यात 263 , सांगली जिल्ह्यात 112 तर कोल्हापूर जिल्ह्यात 434 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 3 हजार 524 रुग्ण असून 1 हजार 865 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 540 आहे. कोरोनाबाधित एकूण 119 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 7 हजार 942 कोरोना बाधीत रुग्ण असून 4 हजार 648 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 824 आहे. कोरोना बाधित एकूण 470 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 1 हजार 765 रुग्ण असून 612 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 96 आहे. कोरोना बाधित एकूण 57 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 5 हजार 176 कोरोना बाधीत रुग्ण असून 2 हजार 92 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 954 आहे. कोरोना बाधित एकूण 130 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 4 लाख 69 हजार 420 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 4 लाख 64 हजार 547 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 873 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 68 हजार 625 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आहे.

( टिप :- दि. 29 जुलै 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

मुकुल माधव विद्यालयाचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

0

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत मुकुल माधव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. दहावीची परीक्षा देणारी विद्यालयाची ही पहिलीच तुकडी होती. एकूण २६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये उत्तम यश संपादन केले. २६ पैकी १९ विद्यार्थ्यांनी ७५% पेक्षा जास्त गुण प्राप्त करून विशेष श्रेणी प्राप्त केली. उर्वरित सात विद्यार्थ्यांना ६४% ते ७३% यादरम्यान गुण प्राप्त झाले. मुकुल माधव विद्यालयाची ही पहिलीच तुकडी असल्याने वर्षाच्या सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करण्यात येत होते. अभ्यासाबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुकुल माधव विद्यालयतर्फे विशेष लक्ष देण्यात आले होते.
शिक्षणाचा हा वसा पुढे नेण्याच्या दृष्टीने तसेच ग्रामीण भागातील मुलांना पुणे-मुंबई यासारख्या ठिकाणी देण्यात येणार्‍या उच्च प्रतीच्या शिक्षणाचा दर्जा कायम टिकवत मुकुल माधव विद्यालयातर्फे यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून (२०२०-२१) ज्युनिअर कॉलेजची मुहूर्तमेढ रोवण्यात येणार आहे. विज्ञान आणि वाणिज्य या दोन शाखासह जुनिअर कॉलेजची सुरुवात होणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयासाठी विद्यार्थ्यांना बाहेर जाण्याची गरज असून, मुकुल माधव विद्यालयाच्या जूनियर कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन विद्यालयातर्फे करण्यात येत आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुकुल माधव विद्यालयाच्या शिक्षकांचे अमुल्य मार्गदर्शन लाभले. मुकुल माधव फौंडेशनच्या व्यवस्थापक विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकवर्ग व पालकांचे अभिनंदन केले. 
रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, “आमचे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुकुल माधव विद्यालयाचा संपूर्ण कर्मचारीवृंद यांमुळे आम्हाला आज अभिमानाचा क्षण अनुभवता येत आहे. खरेतर आमची शाळा फक्त ११ वर्षांपूर्वी सुरू झाली आणि या दरम्यान अनेक संकटांना सामोरे जावे लागले. परंतु समाजाला जास्तीत जास्त चांगले देण्याचा आमचा प्रयत्न सफल झाला आहे. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल कौतुक करून त्यांना आनंदी आरोग्यदायी भविष्यासाठी शुभेच्छा देते.”

स्वस्त धान्य दुकानातील तांदळाच्या काळ्या बाजाराची ‘सीआयडी’मार्फत चौकशी – मंत्री छगन भुजबळ

0

मुंबई, दि.29 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना करत राज्यातील नागरिकांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच काळा बाजार करणाऱ्यांवर विशेष पथकांच्या माध्यमातून लक्ष ठेवून कारवाईदेखील करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मौजे सोनेगाव, ता. जामखेड, जिल्हा अहमदनगर येथील स्वस्त धान्य दुकानातील तांदळाच्या अवैध व्यवहाराबाबत तसेच शेगाव तालुक्यातील बुलढाणा-अकोला सीमेवर 410 कट्टे भरलेला तांदळाचा ट्रक पकडून जप्त करण्यात आला. या सर्व प्रकरणाची ‘सीआयडी’ मार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

राज्यातील एकही नागरिक अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही यासाठी राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. तसेच या काळामध्ये अन्नधान्याचा काळाबाजर करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या पथकातील पोलिसांनी जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथून गुजरातला जाणारा स्वस्त धान्य दुकानातील 24 टन तांदूळ भरलेला ट्रक पकडला होता. या तांदळाच्या अवैध विक्री व्यवहाराची तसेच शेगाव तालुक्यातील बुलढाणा-अकोला सीमेवर 410 कट्टे भरलेला तांदळाचा ट्रक पकडून जप्त करण्यात आला. या तांदळाच्या काळा बाजार व अवैध विक्री व्यवहाराची चौकशी सीआयडीमार्फत करण्यात येणार असून दोषींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात येईल. त्यामुळे राज्यातील गैरव्यवहारांना आळा बसणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.

मॉडर्न हायस्कूल वारजेचा १०० टक्के निकाल

0

पुणे – प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न हायस्कूल वारजे प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला असून प्रशालेत प्रथम क्रमांक गावडे रोहित पुंडलिक ९३.२०% द्वितीय मिरकले साक्षी रविकांत ९१.२०% तृतीय भिलारे हर्षल रामचंद्र ९०.६०%  या विद्यार्थ्यांनी प्रशालेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त केले.शाळेचा शंभर टक्के निकाल लागला.मुख्याध्यापिका रोहिणी काळे, शाळा समिती अध्यक्ष आणि कार्यवाह शामकांत देशमुख, प्रमुख्याध्यापक योगेश ठिपसे यांनी उत्तीर्ण विद्यार्थी,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे,उपकार्यवाह व नगरसेविका,महिला बालकल्याण सभापती पुणे म.न.पा.ज्योत्स्ना एकबोटे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थी, सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर,मुख्याध्यापक यांचे कौतुक केले.

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरीता अर्ज करण्याचे आवाहन

0

पुणे दि.29 : – सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इ.अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारीने गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील मांग, मातंग, मिनी मादिग, मादिग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा इत्यादी विद्यार्थी / विद्यार्थींनींना महामंडळाकडुन ज्येष्ठता व गुण क्रमांकानुसार जिल्हयातील प्रथम 3 ते 5 विद्यार्थ्यांस उपलब्ध निधींच्या अधीन राहुन साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजुर करण्यात येते. याकरीता 10 ऑगस्ट 2020 पर्यंत संपुर्ण कागदपत्रानिशी जिल्हा कार्यालयास संपर्क करुन खालीलप्रमाणे कागदपत्रे दोन प्रतीत सादर करावीत.
जातीचा दाखला, फोटो, मार्कशिट, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट इत्यादी जिल्हा व्यवस्थापकांच्या नावे शिष्यवृत्ती मिळणेबाबतचा अर्ज सोबत कार्यालयास अथवा ईमेलवर स्कॅनकरुन स्वस्वाक्षरीने पाठविण्याचे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास मंहामंडळ मर्या, पुणेचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ महाविद्यालयास १२ कोटी ७९ लाख रुपये निधी मंजूर

0

मुंबई, दि. २९ : मुंबई येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयास ग्रंथालय बांधकाम, ग्रंथालयातील सोयी सुविधा, वाणिज्य व विधी महाविद्यालयाची डागडुजी आणि महाड येथील सुभेदार संवादकर वसतिगृह बांधकाम यासाठी मिळून १२ कोटी ७९ लाख ७४ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून येत्या दोन दिवसात याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात येणार असल्याचे श्री. मुंडे यांनी सांगितले. या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे सचिव पराग जैन, सहसचिव दिनेश डिंगळे, समाज कल्याण आयुक्त प्रवीण दराडे यांसह विभागाचे  अधिकारी उपस्थित होते.

मुंबई येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयास ग्रंथालय बांधकाम, ग्रंथालयातील सोयीसुविधा, वाणिज्य व विधी महाविद्यालयाची डागडुजी आदी कामे प्रलंबित होती व ती तातडीने करण्याबाबत मोठ्या प्रमाणावर मागणी होत होती.

सामाजिक न्याय विभागाकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावांपैकी मुंबई स्थित पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाच्या ग्रंथालय बांधकामासाठी ४ कोटी ९४ लाख ३६ हजार ७०० रुपये, पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय व विधी महाविद्यालय या इमारतीच्या डागडुजी साठी १ कोटी ९९ लाख ७१ हजार ८७२ रुपये, तसेच सिद्धार्थ महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ४ कोटी ४९ लाख २५ हजार रुपये आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाड जि. रायगड येथे सुभेदार संवादकर वसतिगृह बांधकामासाठी १ कोटी ३६ लाख ४० हजार ६०३ रुपये इतकी रक्कम प्रस्तावित करण्यात आली होती.

श्री . धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या  बैठकीत या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली असून, या चार कामांसाठी मिळून १२ कोटी ७९ लाख ७४ हजार १७५ रुपये इतक्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात येणार असल्याची माहिती श्री . मुंडे यांनी दिली.

दरम्यान सिद्धार्थ महाविद्यालयातील गैरसोयीकडे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन लक्ष वेधले होते. तसेच यासंदर्भात  विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आमदार भाई गिरकर यांनीही मुंडे यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची आग्रही मागणी केली होती.  यावेळी त्यांच्या समवेत रमेश गायकवाड, चंद्रसेन कांबळे, प्राचार्य मस्के उपस्थित होते.

सिद्धार्थ महाविद्यालयात भेट देणार

दरम्यान पुढील आठवड्यात आपण सिद्धार्थ महाविद्यालयास भेट देऊन तेथील सोयी-सुविधांची स्वतः पाहणी करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना मिळणार ५०० नवीन रुग्णवाहिका – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि. २९: राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांना ५०० नवीन रुग्णवाहिका पुरविण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केलेल्या घोषणेची पूर्तता केली असून या नवीन रुग्णवाहिका महिनाभरात उपलब्ध होतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.

यासंदर्भात माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, मार्चमध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पाच्या भाषणात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी राज्यातील आरोग्य केंद्रातील जुन्या झालेल्या १००० रुग्णवाहिका टप्प्याटप्प्याने बदलून त्याजागी नवीन रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली होती. यावर्षी ५०० आणि पुढील वर्षी ५०० अशा नवीन रुग्णवाहिका देण्यात येणार असे त्यांनी जाहीर केले होते. बऱ्याच आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका जुनाट झाल्या आहेत. त्या दुरूस्तीयोग्य न राहिल्याने निर्लेखित करण्यात आल्या आहेत.

यावर्षी ५०० नवीन रुग्णवाहिका घेण्यासाठी ८९ कोटी ४८ लाख अंदाजित खर्चासाठी प्रशासकीय मान्यता नुकतीच देण्यात आली असून त्यानुसार एक महिन्याच्या कालावधीत नवीन रुग्णवाहिका उपलब्ध होणार असल्याचे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी सांगितले. या ५०० नवीन रुग्णवाहिका २५३ प्राथमिक आरोग्य केंद्र, १३७ ग्रामीण रुग्णालये, १०६ जिल्हा व उप जिल्हा तसेच स्त्री रुग्णालये आणि ४ प्रादेशिक मनोरुग्णालये यांना देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

गामीण भागातील शासकीय आरोग्य यंत्रणेच्या रुग्णवाहिका या कायमच टीकेचा विषय ठरतात. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्यात येत असून आता नवीन रुग्णवाहिका आल्यावर ग्रामीण व दुर्गम भागातील जनतेला अधिक चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी मदत होणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दहावीच्या परीक्षेतील यशस्वींचे अभिनंदन

0

मुंबई, दि. 29:- दहावीची परीक्षा शिक्षणाच्या वाटचालीतील एक टप्पा आहे. या टप्प्यावर प्रयत्नपूर्वक मिळवलेल्या यशाचा आनंद निश्चित मोठा असतो. त्यासाठी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे. तसेच या सर्वांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी अभिनंदन संदेशात म्हटले आहे की, कोणत्याही वाटचालीत एक महत्त्वाचा   टप्पा असतो. तशी ही दहावीची परीक्षा एक टप्पा आहे. त्यामध्ये क्षमता सिद्ध करण्यासाठी तुम्ही जाणीवपूर्वक प्रय़त्न करता. अशा प्रयत्नपूर्वक मिळवलेल्या यशाचा आनंद हा निश्चितच मोठा असतो. त्यामुळे या प्रयत्नांसाठी आणि यशासाठी तुमचे आणि पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन. तसेच भावी वाटचालीसाठीही शुभेच्छा.

काहींना या परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नसेलही. त्यांनी आणखी प्रयत्न करावेत. यश तुमचेच असेल, गरज असेल, ती फक्त आणखी जोमाने  प्रयत्न करण्याची. त्यासाठीही शुभेच्छा. निकाल काहीही असेल तो आनंदाने स्वीकारा. शिक्षणाने आपण समाजाचा, देशाचा विकास घडवून आणू शकतो. त्यासाठी कटिबद्ध राहूया.