Home Blog Page 2449

राज्यसभेने आज भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था कायदे (दुरुस्ती) विधेयक, 2020 मंजूर केले

0

नवी दिल्‍ली, 22 सप्‍टेंबर 2020


राज्यसभेने आज नवी दिल्लीत भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था कायदे (दुरुस्ती) विधेयक, 2020 मंजूर केले.  2014 चा भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था कायदा आणि भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (सार्वजनिक-खाजगी भागीदारी) कायदा 2017 हे देशाला भेडसावणाऱ्या आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ज्ञान देण्यासाठी केंद्र  सरकारचे विशिष्ट  उपक्रम आहेत. भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था कायदे (दुरुस्ती) विधेयक, 20 मार्च 2020.रोजी लोकसभेत मंजूर झाले आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली , ज्यांच्या नेतृत्वात भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था कायदे (संशोधन) विधेयक, 2020 आज राज्यसभेत मंजूर झाले. हे विधेयक मंजूर करण्यात दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सदस्यांचे आभार मानले. पोखरियाल म्हणाले की, विधेयक आयआयआयटींना त्यांच्या नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार पद्धतींद्वारे देशातील माहिती आणि तंत्रज्ञानाच्या अभ्यासाला प्रोत्साहित करण्यास  चालना देईल.

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था कायदे (दुरुस्ती) विधेयक 2020 मंजूर झाल्यामुळे 2014 आणि  2017 मधील मुख्य कायद्यांमध्ये सुधारणा होईल. हे विधेयक सूरत, भोपाळ, भागलपूर, आगरतला आणि रायचूर येथील सार्वजनिक-खासगी भागीदारी पद्धतीत 5 आयआयआयटी राष्ट्रीय महत्वाच्या संस्था म्हणून घोषित करेल. आयआयआयटी (पीपीपी) कायदा 2017 अन्वये विद्यमान 15 आयआयआयटीसह  त्यांना वैधानिक दर्जा दिला जाईल असे ते म्हणाले. 

पोखरियाल पुढे म्हणाले की आयआयआयटी कायदे (दुरुस्ती) विधेयक, 2020 राष्ट्रीय महत्त्व असलेले विद्यापीठ किंवा संस्था द्वारा जारी केल्याप्रमाणे बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (http://B.Tech) किंवा मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी (http://M.Tech) किंवा पीएचडी पदवी या नावांचा वापर करण्याचे संस्थांना अधिकार देईल. या विधेयकामुळे माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशात मजबूत संशोधन पाया विकसित करण्यासाठी पुरेशा विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी संस्था सक्षम होतील.

पार्श्वभूमी:

  1. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात  उच्च शिक्षण आणि संशोधनाला  प्रोत्साहन देण्याची आयआयआयटीं मागील संकल्पना  
  2. केंद्रीय मंत्रिमंडळाने 26.11.2010 रोजी मंजूर केलेल्या सार्वजनिक-खासगी भागीदारी  (आयआयआयटी पीपीपी) मध्ये 20 नवीन आयआयआयटी स्थापन करण्याच्या योजनेंतर्गत आयआयआयटी (पीपीपी) कायदा  2017अंतर्गत 15 आयआयआयटी आधीपासून समाविष्ट आहेत. 

अंमलबजावणीची रणनीती आणि उद्दिष्टे 

सध्याच्या प्रस्तावाचे उद्दीष्ट सूरत, भोपाळ, भागलपूर, अगरतला आणि रायचूर येथे आयआयआयटीचे औपचारिकरण करणे आहे. हे आयआयआयटी यापूर्वीच  सोसायटी नोंदणी कायदा 1860.च्या अंतर्गत नोंदणीकृत संस्था म्हणून कार्यरत आहेत. आता त्यांना आयआयआयटी (पीपीपी) 2017, कायद्यांतर्गत समाविष्ट केले जाईल.

मोठा प्रभाव

हा कायदा उर्वरित 5 आयआयआयटी-पीपीपी तसेच सार्वजनिक खासगी भागीदारी मोडमधील विद्यमान 15 भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था ‘राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था’ घोषित करेल आणि त्यांना पदवी प्रदान करण्याचे अधिकार देईल. त्यांना बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी.टेक) किंवा मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी (एम.टेक) किंवा विद्यापीठ किंवा राष्ट्रीय महत्त्व संस्थेने जारी केलेल्या पीएच.डी पदवी नावाचा वापर करता येईल. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मजबूत संशोधन पाया  विकसित करण्यासाठी पुरेशा विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी संस्था सक्षम करेल.

लाभार्थी संख्या 

संपूर्ण तांत्रिक मनुष्यबळासाठी उद्योग आणि अर्थव्यवस्थेच्या उदयोन्मुख गरजा संस्थेच्या प्रशिक्षित कर्मचार्यांच्या कौशल्यातून पूर्ण केल्या जाण्याची अपेक्षा आहे.

राज्ये / जिल्हा समाविष्ट

राज्ये: गुजरात (सूरत), मध्य प्रदेश (भोपाळ), बिहार (भागलपूर), त्रिपुरा (अगरतला), कर्नाटक (रायचूर).

प्रत्येक संस्था लिंग, जाती, पंथ, अपंगत्व, अधिवास, वंश, सामाजिक किंवा आर्थिक पार्श्वभूमी याकडे लक्ष न देता  सर्वांसाठी खुली असेल

संसदेकडून अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) विधेयक 2020 मंजूर

0

हा कायदा फक्त शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर ग्राहक आणि गुंतवणूकदारांसाठी ही सकारात्मक वातावरण निर्माण करेल : रावसाहेब दादाराव दानवे

नवी दिल्‍ली, 22 सप्‍टेंबर 2020- अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) विधेयक 2020 आज राज्यसभेत मंजूर झाले. कडधान्य , डाळी, तेलबिया खाद्यतेल, कांदे आणि बटाटे यासारख्या वस्तू अत्यावश्यक वस्तू सेवा कायद्यातून वगळण्याची तरतूद या विधेयकात आहे.

त्यापूर्वी हे विधेयक ग्राहक सेवा अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री दानवे रावसाहेब दादाराव यांनी लोकसभेत 14 सप्टेंबर 2020 ला हे विधेयक मांडले.  या आधीच्या 5 जून 2020 चा अध्यादेशाची जागा या विधेयकाने घेतली. लोकसभेत 15 सप्टेंबर 2020 ला हे विधेयक मंजूर झाले.

आपल्या व्यावसायिक कामकाजात नियामक संस्थांचा अवाजवी हस्तक्षेप होईल ही खाजगी गुंतवणूकदारांची धास्ती दूर करणे हे अत्यावश्यक सेवा (सुधारणा)विधेयक 2020  चे उद्दिष्ट आहे. 

धान्य उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि पुरवठा या बाबींमध्ये मोकळीक मिळाल्याने त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल आणि त्यामुळेच खाजगी क्षेत्र किंवा कृषिक्षेत्रात थेट परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल. शीतगृहे किंवा अन्नधान्य पुरवठ्याची सुधारित व्यवस्था या गोष्टींना चालना मिळण्यासाठी याची मदत होईल.

नियामक संस्थाचे नियंत्रण दूर करतानाच  ग्राहकांचेही हित जपले जाईल याची व्यवस्था सरकारने केली आहे. युद्ध, दुष्काळ, अनावश्यक भाववाढ , निसर्गाचा प्रकोप अशा अनियमित परिस्थितीत धान्य पुरवठ्याबाबत नियंत्रण आणले जाईल. मात्र संबंधितांनी मूल्य साखळीत केलेली गुंतवणूक आणि निर्यातीसाठी नोंदवलेली मागणी ह्या गोष्टींना अशा प्रसंगी साठा करण्याच्या मर्यादेतून वगळले जाईल, जेणेकरून या क्षेत्रात येणाऱ्या गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल.

विधेयक मंजूर होण्यापूर्वी राज्यसभेत झालेल्या चर्चेत ग्राहक सेवा, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे राज्यमंत्री रावसाहेब दादाराव दानवे म्हणाले की शीतगृहांची सोय नसल्यामुळे होणारे कृषिमालाची नासाडी टाळण्यासाठी या सुधारणांची गरज होती. फक्त शेतकरीच नाही तर ग्राहक आणि उत्पादक यांच्यासाठीही सकारात्मक वातावरण निर्माण करणाऱ्या या कायद्यामुळे आपला देश स्वावलंबी होईल. कृषी क्षेत्रातील पुरवठासाखळी व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी या सुधारणा उपयोगी पडतील असं ते म्हणाले.  ह्या सुधारणा म्हणजे  सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे दिलेले आश्वासन पाळण्याचा प्रयत्न आहे. या क्षेत्रात गुंतवणुकीला प्रोत्साहन आणि व्यापारासाठी आवश्यक सुविधा यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट होईल. 

पार्श्वभूमी:

बरीच कृषी उत्पादने ही भारतात जास्त प्रमाणात घेतली जातात.  असे झाले की शेतकऱ्यांना शीतगृहे आणि साठवणुकीच्या जागांचा अभाव यामुळे या मालाला चांगली किंमत मिळणे अशक्य होऊन बसते. या शिवाय आवश्यक सेवा कायद्यांमुळे त्यांना व्यापार करता येत नाही.  यामुळे भरपूर पीक आले.  विशेषतः  नाशवंत माल असेल तर  शेतकऱ्यांना मोठा तोटाही सहन करावा लागतो. ह्या कायद्यामुळे शीतगृहातील तसेच धान्य पुरवठा साखळीतील आधुनिकीकरणाला चालना मिळेल यामुळे शेतकऱ्यांना तसेच ग्राहकांनाही फायदा होऊन वस्तूच्या किमती स्थिर राहतील याची परिणीती स्पर्धात्मक वातावरण तयार होण्यात येईल आणि साठवण्याच्या जागा नसल्यामुळे होणारी कृषिमालाची  नासाडीसुद्धा टाळता येईल.

नवीन शैक्षणिक वर्ष स्वागतार्ह : डॉ. संजय चोरडिया

0

पुणे : कोरोनामुळे लांबलेले यंदाचे नवीन शैक्षणिक वर्ष नोव्हेंबर ते ऑगस्ट असे करण्याचा विद्यापीठ अनुदान आयोगाचा निर्णय स्वागतार्ह आहे. २०१९-२० या वर्षांच्या लांबलेल्या पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा यामुळे प्रथम वर्षाचे वर्ग कधी चालू होणार, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र, आयोगाने १८ नोव्हेंबरपासून प्रथम वर्षाचे वर्ग चालू होतील, असे सांगत शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर केल्याने विद्यार्थ्यांसह शैक्षणिक संस्था आणि पालकांनाही दिलासा मिळाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, अशी प्रतिक्रिया सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी दिली.
कोरोनामुळे अभियांत्रिकीसह वैद्यकीय आणि इतर शाखांच्या परीक्षा खोळंबल्या होत्या. शिवाय सर्वच शाखांचे प्रथम वर्षाचे प्रवेश अडकले होते. आता या सर्व परीक्षा ऑक्टोबरअखेरपर्यंत संपणार असून, त्याचे निकालही लगेच जाहीर होणार आहेत. त्यामुळे नवीन वर्ष नोव्हेंबरपासून सुरु होते आहे. गेल्या चार-पाच महिन्यात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणाचे धडे गिरवले आहेत. त्यामुळे यूजीसीने केलेल्या ऑनलाईन-ऑफलाईन शिक्षणाच्या संबंधीच्या सूचनांचे पालन होईल. आवश्यक त्या पायाभूत सुविधा आणि शिकवण्याच्या नव्या पद्धती वापरल्या जातील. दुर्गम भागात इंटरनेट पोहोचत नसल्याने ऑनलाईन शिक्षणात व्यत्यय येतो आहे. अशावेळी तिथे त्या सुविधा पोहोचवण्यावर भर द्यावा लागणार आहे.
उन्हाळी शिबिरे आणि विविध उपक्रम यांना अभ्यासक्रमाशी जोडून घेऊन विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक अनुभवांचे शिक्षण देण्यावर आपण भर द्यायला हवा. मुलांमध्ये स्वावलंबन, परिश्रम याचे बीज रुजवावे लागतील. संस्था आणि उद्योग यांनी एकत्रित येत विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे. १०-१५ मुलांमागे एका शिक्षकाने मेंटॉर म्हणून काम करावे व त्यांना प्रोत्साहित करावे. विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक संस्था यांच्या एकत्रित प्रयत्नातून हे नवीन शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल, असा विश्वास वाटत असल्याचे प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितले.

सोमवारी दिवसभरात ३ हजार ९०७ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री

0

मुंबई दि. 22 : राज्यात 15 मे २०२०  पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. काल दिवसभरात 3 हजार 907  ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. यापैकी मुंबई शहर आणि  मुंबई उपनगरात 3 हजार 709  ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा  देण्यात  आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर, राज्यात एकूण 10,791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी 9,322 अनुज्ञप्ती सुरू  आहेत. राज्य शासनाने 3 मे, 2020 पासुन लॉकडाऊन कालावधीत सीलबंद  मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. राज्यात 15 मे 2020  पासून घरपोच मद्यविक्री योजनाअंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येतआहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार केलेल्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर मद्यसेवन परवाना ऑनलाईन प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे. १ एप्रिल २०२०  ते 18 सप्टेंबर २०२० या काळात एक लाख 56 हजार 085  ग्राहकांनी मद्यसेवन परवाने मिळवण्यासाठी अर्ज केले होते; यापैकी एक लाख 50 हजार 955 ग्राहकांना परवाने मंजूर करण्यात आले आहे.

ऑनलाईन मद्यसेवन परवाना घेताना येत असलेल्या सर्व तांत्रिक अडचणींची सुधारणा करण्यात आली असूनआता इच्छुक व्यक्ती संगणक, लॅपटॉप, अँड्रॉइड फोन, तसेच IOS प्रणालीव्दारे ऑनलाईन परवाने घेऊ शकतात. तसेच कोणाला ऑनलाईन परवाना घ्यायाचा नसेल तर राज्य उत्पादन शुल्कविभागाच्या सर्व अधीक्षक/निरीक्षक/दुय्यम निरीक्षकांच्या कार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने Offline पध्दतीने सुध्दा उपलब्ध आहेत. मद्यसेवन परवाने एक वर्षाकरिता रु.100/- किंवा आजीवन परवान्याकरीता रु.1,000/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकतात.

वर्ष 2020-2021 करिता विभागाला 19,225 कोटी रु. महसूल उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. माहे एप्रिल ते ऑगस्ट 2020 पर्यत विभागाला 3842.32 कोटी रु महसूल मिळाला असून गतवर्षीच्या तुलनेत 37%  घट झालेली आहे.

माहे एप्रिल ते ऑगस्ट 2020 या कालावधीत देशी मद्याची 9.40 को. ब.लि., विदेशी मद्याची 5.88 को. ब.लि., बियर 5.23 को.ब.लि. आणि वाईनची 17.62 लाख ब.लि. विक्री झाली असून गतवर्षीच्या तुलनेत देशी मद्य 38%, विदेशी मद्य 33% बियर मद्य 63%, तर वाईन मद्य 39% घट झालेली आहे.

24 मार्च, 2020 पासून राज्यात लॉकडाऊन सुरु आहे.महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधुन होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असुन 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातीलअधिकारी/कर्मचारी तैनात आहेत. काल 21 सप्टेंबर २०२०  रोजी राज्यात 65 गुन्हे नोंदविण्यात आले असून 47 आरोपींना अटक करण्यात आली असून 07 लाख 79 हजार रूपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

01 एप्रिल, २०२० पासुन 21 सप्टेंबर २०२० पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण 18,587 गुन्हे नोंदविण्यात आले असून 10,104 आरोपींना अटक करण्यात आली असून  1718  वाहने जप्त करण्यात आली असून ४2 कोटी 76 लाख रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलाआहे.

अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24X7  सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.  यासाठी टोल फ्री क्रमांक –  १८००८३३३३३३  व्हाट्सअप क्रमांक – ८४२२००११३३ हा असून 

गुणी, चतुरस्त्र कलावंताला मुकलो – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना श्रद्धांजली

0

मुंबई, दि. 22 : मराठी रंगभूमी, चित्रपट आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या कसदार अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या निधनामुळे गुणी आणि चतुरस्त्र अशा कलावंताला मुकलो आहोत,अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, मराठी कुटुंबातून आलेल्या आशालताजींनी मराठी संगीत रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीत आपले असे स्थान निर्माण केले होते. कवयित्री, गायिका, लेखन अशा क्षेत्रात गती असलेल्या आशालता यांनी अजरामर अशा भूमिका साकारल्या. मराठी आणि हिंदी चित्रपटांतील या भूमिका केवळ त्यांच्यासाठीच असाव्यात इतक्या त्या उत्कृष्ट अभिनेत्री होत्या. मराठी रंगभूमीही त्यांनी गाजविली. संगीत नाटक आणि व्यावसायिक नाट्यसृष्टीत त्यांचा उत्कृष्ट कलाकार म्हणून दबदबा होता. नव्या होतकरू कलाकारांनाही त्या जवळच्या मार्गदर्शक वाटत. त्यामुळे त्यांनी या पिढीतही जिव्हाळ्याचे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनामुळे आपण गुणी आणि चतुरस्त्र अशा कलावंताला मुकलो आहोत. त्यांचे कला क्षेत्रातील योगदान विसरता येणार नाही, असेच आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना विनम्र श्रद्धांजली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस

0

मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती खुद्द पवारांनीच दिली आहे. यामध्ये त्यांना निवडणुकीच्या प्रतिज्ञपत्रात नमूद केलेल्या माहितीविषयी स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. 2009, 2014 आणि 2019 या निवडणुकांमध्ये दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस असल्याचे वृत्त आहे. यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आयकरविभागाने नोटीस पाठवल्याची माहिती आहे.

पवार म्हणाले की, ‘सुरुवातीला मला नोटीस आली, आता सुप्रियाला येणार असल्याचे कळाले आहे, चांगली गोष्ट आहे. संपूर्ण देशातील एवढ्या सदस्यांपैकी आमच्यावर विशेष प्रेम असल्याचा मला आनंद आहे. असा टोलाही पवारांनी लगावला आहे. ते पुढे म्हणाले की, ‘मला काल नोटीस आली आहे. या नोटीशीत काही बाबतीत स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.’

लवकरच उत्तर देईल
शरद पवार म्हणाले की, 2009, 2014 आणि 2019 या निवडणुकांमध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस आहे. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरुन मला ही नोटीस आली असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच या नोटीशीचे उत्तर मी लवकरच देईल असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले आहे.

यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही आयकर विभागाने नोटीशी पाठवल्या आहेत. निवडणुकांमध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत या नोटीशी असल्याची माहिती आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

0

मुंबई, दि. 22 : ज्येष्ठ अभिनेत्री आशालताताई वाबगावकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून रंगभूमीची प्रदीर्घ काळ सेवा करणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्रीला आज आपण मुकलो आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आशालताताई या शास्त्रीय संगीताचं ज्ञान, जाण असलेल्या चतुरस्त्र अभिनेत्री होत्या. कोकणी, मराठी, हिन्दीसह त्यांनी शंभरहून अधिक नाटक, चित्रपट, मालिकांमध्ये अभिनय केला. त्यांच्या नाटक व चित्रपटांनी लोकप्रियतेचा इतिहास घडवला आहे. जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी रंगभूमीची, कलाक्षेत्राची सेवा केली. त्यांचं निधन धक्कादायक, मनाला चटका लावणारं आहे. नाटक, चित्रपट, मालिकांमधून काम करणाऱ्या सर्व कलावंत बंधू-भगिनींनी, यापुढच्या काळात अधिक सावध राहून, स्वत:ची, कुटुंबाची, सहकाऱ्यांची, समाजाची काळजी घ्यावी, सुरक्षित राहावं, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 78 हजार 239

0

पुणे विभागातील 2 लाख 96 हजार 367 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले,
विभागात कोरोना बाधित 3 लाख 84 हजार 635 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे, दि.22 :- पुणे विभागातील 2 लाख 96 हजार 367 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 लाख 84 हजार 635 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 78 हजार 239 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 10 हजार 29 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.61 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 77.05 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 54 हजार 506 रुग्णांपैकी 2 लाख 6 हजार 514 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 42 हजार 329 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 663 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.23 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 81.14 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 30 हजार 824 रुग्णांपैकी 21 हजार 125 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 793 आहे. कोरोनाबाधित एकूण 906 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 29 हजार 309 रुग्णांपैकी 20 हजार 462 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 800 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 30 हजार 22 रुग्णांपैकी 19 हजार 664 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 223 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 135 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 39 हजार 974 रुग्णांपैकी 28 हजार 602 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 94 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 278 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 962 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 338, सातारा जिल्ह्यात 732, सोलापूर जिल्ह्यात 523, सांगली जिल्ह्यात 690 तर कोल्हापूर जिल्ह्यात 679 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 16 लाख 67 हजार 710 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 84 हजार 635 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.


( टिप :- दि. 21 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

शरद पवारांचे आज दिवसभर अन्नत्याग आंदोलन

0

मुंबई-राज्यसभा सभासदांच्या आंदोलनात सहभाग म्हणून राष्ट्रवादी चे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार हे आज स्वतः देखील दिवसभर अन्नत्याग करत आहेत .

राज्यसभेत नुकतीच कृषी संबंधीत दोन विधेयक मंजूर करण्यात आली आहेत. दरम्यान राज्यसभेत प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. अजूनही हा गदारोळ सुरूच आहे. विरोधकांनी हे विधेयक मंजूर होत असताना गोंधळ घातल्यामुळे आठ खासदारांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केले आहे. आता या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवारांनी भाष्य केले. उपसभापतींचे वर्तन सदनाच्या प्रतिष्ठा आणि पदाचे अवमूल्यन करणारे असल्याचे म्हणत त्यांनी उपसभापतींवर तोफ डागली. तसेच कृषी विधेयके तात्काळ रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

राज्यसभेतील गदारोळाच्या प्रकरणावर बोलताना पवार म्हणाले की, ‘राज्यसभेच्या उपाध्यक्षांनी कृषीविधेयकावर सदस्यांना बाजू मांडू दिलेली नाही. उलट सदस्यांचा विरोध डावलून तात्काळ आवाजी मतदानानं हे विधेयक मंजूर केले आहे. उपसभापतींचं वर्तन सदनाच्या प्रतिष्ठा आणि पदाचे अवमूल्यन करणारी होती असंही ते म्हणाले आहेत. तसेच आपल्या भावना व्यक्त करणाऱ्या सदस्यांना त्यांनी निलंबितही केले. मी गेली 50 वर्षे संसदीय राजकारण करत आहे. एवढ्या वर्षात मी राज्यसभेच्या उपाध्यक्षांचे असे वर्तन पाहिले नाही, असे म्हणत शरद पवारांनी राज्यभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह यांच्यावर टीका केली आहे.

पुढे पवार म्हणाले की, ही विधेयके तातडीने मंजूर करावी असा सत्ताधारी पक्षाचा आग्रह होता असे दिसत होते. यामुळे् विरोधकांना काही आक्षेप होते, सरकारकडून काम रेटून नेण्याचा‌ प्रयत्न करण्यात आल्याची टीका शरद पवारांनी केलीय. तसेच सभासदांनी सदनासमोर अन्नत्याग आंदोलन सरू केले आहे. मी देखील यामध्ये सहभागी होऊन दिवसभर अन्नत्याग करणार असल्याचे पवारांनी सांगितले आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मराठा आरक्षणावर म्हणाले…
सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाच्या आरक्षणावर स्थिगिती आणली यानंतर मराठा बांधवांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेत आंदोलनांना सुरूवात केली आहे. यावर बोलताना पवार म्हणाले की, ‘मराठा आरक्षणासाठी तातडीने सर्वोच्च न्यायालयात अपील करायची होती. याच कारणामुळे मी दिल्लीला गेलो नाही. मराठा आरक्षणप्रश्नी तरुणांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळे हे आरक्षण टिकायला पाहिजे. मराठा आरक्षणावरील स्थिगिती उठवण्यात आली पाहिजे ही सर्वांचीच भूमिका आहे. सरकारनेही आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे.

बारामतीत ३१२ किलो गांजा जप्त

0

बारामती- येथील पोलिसांनी सोमवारी रात्री केलेल्या कारवाईत तब्बल ४६ लाखांचा गांजा असलेला टेंपो मुद्देमालासह ताब्यात घेतला. यामध्ये जवळपास ३१२ किलो गांजा जप्त केला आहे.  भरधाव पावसात बारामती पोलिसांनी पाटस-बारामती मार्गावर टॅम्पो (एमएच.१०. सीआर. ४३२६) पकडून ही मोठी कारवाई केली आहे. यातील चार अरोपींना अटक केली आहे. विजय जालिंदर कणसे (वय २६, रा. कानरवाडी, ता. कडेगांव जि. सांगली) , विशाल मनोहर राठोड (वय १९ रा. नागेवाडी, विटा, ता, खानापूर जि. सांगली),निलेश तानाजी चव्हाण (वय ३२, रा. आंधळी, ता. माण, जि. सातारा) व योगेश शिवाजी भगत (वय २२, रा. साबळेवाडी, शिर्सूफळ, ता. बारामती) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 सांगली जिल्ह्यात विक्री करण्यासाठी विशाखापट्टणम येथून , ३१२ किलो गांजा येणार होता. याची माहिती मिळाल्याने पुणे ग्रामिण पोलिसांनी नाकाबंदी केली होती. पण, इतके करुनही टेम्पो निघुन गेला. त्यावेळी पोलिसांनी सरकारी वाहनासह खासगी कारमधुन टेम्पोचा चित्रपटात शोभेल असा पाठलाग करुन टेम्पो अडवला. अन् गांजा अन् आरोपींना अटक केली. पुणे जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आसल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी सांगितलं आहे.

राजीव सातव यांनी वाढदिवसाची रात्र काढली संसदेच्या आवारात

0

नवी दिल्ली -कृषी बिल मंजूर करून देशातील शेती क्षेत्र बड्या उद्योगपतींच्या हातात देण्याचा केंद्र शासनाचा डाव असून त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे अशी मागणी करत खासदार ॲड. राजीव सातव यांनी आपल्या वाढदिवसाची रात्र संसदेच्या आवारात व्यतीत केली .

खासदार ॲड. राजीव सातव यांचा सोमवारी ता. २१ वाढदिवस होता. मात्र वाढदिवसांच्या दिवशीही शेतकऱ्यांचा प्रश्‍न राज्यसभेत प्रखरतेने मांडला.केंद्र शासनाने मंजूर केलेल्या कृषी बिलातून किमान आधारभूत किंमत संपवून टाकणार आहे. किमान आधारभूत किंमती पेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी करू नये असे या बिलामध्ये कुठेही नमुद केले नाही. त्यामुळे आधारभूत किंमतीपेक्षाही कमी दराने शेतीमाल खरेदी झाल्यास शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार आहे. शेतकऱ्यांना संपवून टाकण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. केंद्राचा डाव पंजाब, चंडीगढ भागातील शेतकऱ्यांच्या लक्षात आला असून आगामी काळात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या लक्षात येईलच. असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले .

आठ निलंबित खासदारांचं संसद परिसरात रात्रभर धरणे आंदोलन

0

नवी दिल्ली -राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी विधेयकाना विरोध व आठ खासदरांच्या निलंबनामुळे सुरू झालेला राजकीय गोंधळ अद्यापही थांबलेला नाही. निलंबीत झालेल्या आठ खासदारांनी या कारवाईच्या निषेधार्थ संसद परिसरात धरणे आंदोलन सुरू केले आहे. या सर्व आठ खासदरांनी काल रात्रभर जागरण करून आपले आंदोलन सुरूच ठेवले. हे आंदोलन थांबवणार नसल्याचे या खासदरांकडून सांगण्यात आले आहे.

आंदोलन सुरू झाल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, जेडीएसचे देवेगौडा, समाजवादी पक्षाच्या जया बच्चन, काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह विरोधी पक्षनेते यांनी देखील आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थिती लावत आंदोलकांना पाठिंबा दिला.

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह हे तर जवळपास चार तास आंदोलक खासदारांबरोबर बसून होते. यातील एका खासदाराने सांगितले की, त्यांनी देशभक्तीची गाणी गायली, शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत फलक दर्शवले.

यातील काँग्रेसचे रिपुन बोरा व सीपीआयएमचे ए करीम यांचे वय ६५ च्याही पुढे असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न होता. मात्र आमच्याकडे पुरसे पाणी ठेवले होते व त्या दृष्टीने वेळोवेळी काळजी घेतली असल्याचे टीएमसीचे डेरेक ओ ब्रायन यांनी सांगितले.

आमच्या शरीरातील साखरेची पातळी कमी होऊ नये म्हणून वेळोवेळी मध्यंतराच्या काळात आम्ही काळजी घेत होतो. हे अतिशय चांगले टीम वर्क आहे आणि आम्ही हे थांबवणार नाही. असे एका खासदाराने सांगितले. जर आंदोलकांची अचानक प्रकृती खराब झाली तर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका देखील त्या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आलेली आहे.

सध्या संसदेचे सत्र सुरू आहे तोपर्यंत हे आंदोलक खासदार राज्यसभेतील स्वच्छतागृहांचा वापर करू शकतात. मात्र, त्यानंतर त्यांना रिसेप्शनच्या ठिकाणच्या स्वच्छतागृहांचा वापर करावा लागेल, अशी माहिती देण्यात आली . आंदोलक खासदारांनी त्यांच्यासोबत केवळ त्यांचं अंथरूण, पांघरूण व उशाच आणल्या नाहीत, तर डासांपासून बचाव करण्यासाठी देखील काळजी घेतली आहे.

कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी सभागृहावर टाकला बहिष्कार

0

 खासदारांचं निलंबन रद्द करण्याची मागणी

नवी दिल्ली -कृषि बिलांच्या निषेधार्थ कॉंग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी राज्यसभा अधिवेशनावर बहिष्कार टाकला आहे. कॉंग्रेसचे खासदार गुलाम नबी आझाद म्हणाले, ‘सरकारने अशी व्यवस्था करावी की ज्यायोगे कोणताही खाजगी खरेदीदार एमएसपीच्या खाली शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करू शकणार नाही. असे विधेयक येईपर्यंत आम्ही संसदेचे अधिवेशन बायकॉट करु.’ तसेच 8 खासदारांचे निलंबन मागे घ्यावे अशी मागणीही आझाद यांनी केली आहे.

विरोधकांच्या 4 मागण्या

  1. सरकारने असे बिल आणावे ज्यामुळे कोणताही खासगी खरेदीदार एमएसपी खाली शेतकऱ्यांचा माल खरेदी करु शकणार नाही.
  2. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे एमएसपीचा निर्णय घ्यावा.
  3. एफसीआयसारख्या सरकारी संस्थांनी शेतकऱ्यांचा माल एमएसपीच्या खाली खरेदी करु नये.
  4. आठ खासदारांचे निलंबन मागे घेण्यात यावे

व्यंकय्या नायडू म्हणाले – खासदारांच्या निलंबनामुळे आनंदी नाही
राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी रविवारी कृषि विधेयकेबाबत सभागृहात गोंधळ घालणारे 8 विरोधी खासदारांना संपूर्ण अधिवेशनाच्या कामकाजापर्यंत निलंबित केले. हे खासदार रात्रभर संसद कॉम्प्लेक्समध्ये धरणे आंदोलन करत बसले, अजूनही त्यांचे आंदोलन सुरूच आहे. व्यंकय्या नायडू म्हणाले, “खासदारांच्या वागण्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. आम्ही कोणत्याही सदस्याविरूद्ध नाही. त्यांच्या निलंबनाच्या कारवाईमुळे मीसुद्धा खूष नाही.”

कृषि बिलावरून होणार्‍या गदारोळात सरकारने रब्बी पिकांचे एमएसपी वाढले
कृषि विधेयकाला विरोध होत असताना, केंद्राने पहिल्यांदाट वेळेपूर्वीच सप्टेंबर मध्येच 6 रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये 6% वाढ केली आहे. गव्हाचे एमएसपी 50 रुपये वाढवून 1975 रुपये प्रति क्विंटल केले आहे. लोकसभेच्या कार्यकाळात कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी सोमवारी सांगितले की हा निर्णय अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीने घेतला आहे.

दुसरीकडे कॉंग्रेससह 18 विरोधी पक्षांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना पत्र लिहून कृषि बिलावर सही न करण्याचे आवाहन केले. तिकडे, देशातील कृषि बिलाविरोधात निदर्शनेही तीव्र झाली आहेत. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील शेतकरी संघटनांनी 25 सप्टेंबर रोजी शेतकरी कर्फ्यू असल्याचे म्हटले आहे. राजस्थानातील शेतकरी त्यात सहभागी होण्याबाबत 23 सप्टेंबरला निर्णय घेतील. मात्र, सोमवारी राज्यात सर्व 247 कृषि मंडळे बंद ठेवण्यात आल्या.

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन, मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती कोरोनाची लागण

0

सातारा-ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन झाले. सातारा येथील फलटण तालुक्यात ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती. प्रकृती बिघडल्यानंतर आशालता यांना 16 सप्टेंबर रोजी वाई येथील प्रतिभा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आशालता वाबगावकर यांची ऑक्सिजन लेव्हल कमी जास्त होत होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर पहाटे 4.30 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. वाबगावकर यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

साताऱ्याजवळ असलेल्या वाई जवळच्या हिंगोली या गावात एका फार्म हाऊसमध्ये या मालिकेचे शुटिंग सुरू होे. आशालता या गेली काही दिवस या शुटिंगसाठी तिथेच होत्या. या मालिकेत एका गाण्याचे शुटिंग सुरू होते. तिथे मुंबईवरून काही कलाकारांचा ग्रुप आला होता. त्याच वेळी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असावा अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

आशालता वाबगांवकर यांचा जन्म 31 मे 1941 रोजी गोव्यात झाला. त्या मुळच्या गोव्याच्या असल्याने त्यांनी कोंकणी आणि मराठी नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. आशालता वाबगांवकर यांनी आतापर्यंत जवळपास 100 हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केले आहे. अपने पराये या हिंदी चित्रपटातून त्यांनी सिने सृष्टीत पदार्पण केले. तर रायगडाला जेव्हा जाग येते हे त्यांचे पहिले नाटक होते.

गुंतता हृदय हे, वाऱ्यावरची वरात, चिना, मोहनंदा यासारख्या अनेक नाटकात त्यांनी काम केले. तसेच उंबरठा, सुत्रधार, नवरी मिळे नवऱ्याला, वहिनीची माया हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट होते.

जनतेचे हाल वाढले ,सभागृहात भाजपाला उघडे पाडण्याचा कॉंग्रेसचा निर्धार

0

पुणे- पुण्याच्या आणि आसपासच्या अनेकांच्या घरातील कर्त्या माणसांच्या नौकऱ्या गेल्यात ,असंख्य कुटुंबे बेरोजगारीच्या खाईत कोरोना मुळे सापडलीत,आरोग्याची होणारी प्रचंड हेळसांड आणि त्यामुळे खर्चाच्या वादळाने हैराण झालेली आणि दुसरीकडे दारात पुराची भीती आणि घरात प्यायला पाण्याची कमतरता,रस्त्यांची दुरावस्था ,अतिक्रमण कारवाया अशा विविध मार्गांनी जनतेच्या हालअपेष्टा वाढतच चालल्या आहेत . अशा जनतेशी थेट संबधित असलेल्या प्रश्नावरून महापालिकेच्या मुख्य सभेत सत्ताधारी भाजपा आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना धारेवर धारा ,त्यांना उघडे पाडावे असा निर्धार काल महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांच्या दालनात शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत करण्यात आला . सत्ताधारी शासन आदेशाचा मनाप्रमाणे अर्थ लावून ,आणि आदेश न जुमानता मुख्य सभा गुंडाळून टाकीत आहेत हे जनतेला समजले पाहिजे . अशा पद्धतीने वेळप्रसंगी सभागृहात कामकाज व्हावे ,असे यावेळी ठरविण्यात आले.    बऱ्याच वर्षांनंतर काँग्रेसच्या नगरसेवकांची काल महापालिकेत बैठक झाली. यावेळी  शहराच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा झाली.

यावेळी पुणे शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेस पक्षाचे पुणे महानगरपालिकेचे गटनेते आबा बागुल, नगरसेवक अरविंद शिंदे,अविनाश बागवे,रविंद्र धगेकर, नगरसेवक रफिक शेख, नगरसेविका सुजाता शेट्टी, वैशाली मराठे, चाँदबी नदाफ, स्वीकृत नगरसेवक अजित दरेकर आदी उपस्थित होते.बऱ्याच वर्षानंतर महापालिका काँग्रेस पक्षाची बैठक सोमवारी गटनेते आबा बागुल यांच्या दालनात झाली. पुणेकरांपुढील असलेले प्रश्न, महापालिकेचा कारभार यावर बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली, असे आबा बागुल यांनी सांगितले.

महापालिकेचा कारभार, सभांपुढील कार्यपत्रिका यावर पक्षाची बैठक घेऊन निर्णय आखणे, व्यूहरचना ठरविणे अशी पद्धत माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी अवलंबिली होती तीच पद्धत आबा बागुल यांनी पुन्हा चालू केली आहे. तर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.पुणेकरांना चांगल्या आरोग्याच्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे, त्यासाठी आवाज उठविण्याचे आदेश रमेश बागवे यांनी नगरसेवकांना दिले आहेत. सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले होते.