पुणे- राज्य सरकार एकीकडे महिला सुरक्षेसाठी विविध कामे नियोजनबद्धरीत्या करत असताना दुसरीकडे महावितरण मात्र वारंवार वीजपुरवठ्यात व्यत्यय आणीत ,प्रसंगी कित्येक तास अंधाराचे साम्राज्य पसरवून महिलांना जेरीस आणीत आहे. महावितरण च्या संबधित अधिकाऱ्यांनी वेळीच सुरळीत वीजपुरवठा देण्याबाबत योग्य ती पावले उचलावीत अन्यथा तीव्र आंदोलनाचे पडसाद उमटतील असा खणखणीत इशारा राष्ट्रवादीच्या नगरसेविका आणि स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी नितीन कदम यांनी महावितरण ला दिला आहे .
त्या म्हणाल्या ,’मंगळवार दिनांक 8 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 नंतर साधारण आठ ते दहा तास तावरे कॉलनी अरण्येश्वर, परिसरांमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला होता. यामध्ये एलआयसी कॉलनी, जीवन प्रकाश सोसायटी, पार्वती हॉल लेन, सुरभी कार्यालय, अरण्येश्वर नगर व नवरत्न हॉटेल च्या गल्लीतील सर्व परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. माहिती घेत असता असे समजले हाय टेन्शन केबलच्या फॉल्ट मुळे सदरचा बंद विद्युत पुरवठा बंद झाला होता. अचानक कोणतीही पूर्वकल्पना न देता विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे या परिसरातील हजारो नागरिकांना नाहक मनस्ताप सोसायला लागला. तसेच खंडित झालेला पुरवठा पूर्ववत तातडीने करणे आवश्यक असताना सदर कामाला आठ ते दहा तास अवधी लागला. पर्यायी लाईन्स वरून विद्युत पुरवठा करणे(backfeed) उपलब्ध नसला मुळे तोपर्यंत या भागातील नागरिकांन अंधाराशी सामना करण्यास लागला.तसेच मार्केटयार्डकडुन सदरच्या भागास विद्युत पुरवठा होत असल्यामुळे वारंवार नागरिकांच्या तक्रारी येत आहेत यासाठी पर्यायी व्यवस्था सुद्धा तातडीने करणे आवश्यक आहे. जीवन प्रकाश सोसायटीच्या गार्डन पासून सांबर हॉटेल, पार्वती हॉल, अजिंक्य हॉल ते सांबर हॉटेल ही हाय टेन्शन (high tension) केबल भूमिगत करणे अत्यंत गरजेचे आहे. सदरचे काम पूर्ण झाल्यास या ठिकाणी असलेल्या नागरिकांना विद्युत पुरवठा वारंवार खंडित होण्यापासून निश्चित दिलासा मिळेल.
पुणे, दि. १० डिसेंबर: ‘मिस्टर अँड मिस पुणे एलिट’ दुस-या पर्वाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. एका वेगळ्या प्रकारची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १०० हून अधिक स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला असून त्यापैकी २०तरुण आणि २०तरुणी यामध्ये अंतिम फेरीत पोहचल्या आहेत. खेड शिवापूर येथील नक्षत्र हॉल येथे रविवार दि. १३ डिसेंबर रोजी सायंकाळी स्पर्धेची अंतिम फेरी पार पडणार आहे.
स्टार्सट्रीम एन्टाईनमेंटचे डायरेक्टर सोहेल सय्यद म्हणाले की, तरुण आणि तरुणींना सक्षम बनविणे आणि सकारात्मक स्व-प्रतिमा विकसित करण्याची संधी देणे हे आमच्या कंपनीचे लक्ष आहे. आम्ही तरुण पिढीला त्यांची कौशल्ये आणि वकृत्व क्षमता जोपासण्याची संधी उपलब्ध करुन देत आहोत. या स्पर्धेद्वारे आयुष्यभर आठवणी निर्माण करणार्या संधींची पूर्तता आणि अनुभव देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यात मदत करतो. पुण्यात दुस-यांदा मिस्टर अँड मिस एलिट स्पर्धा आयोजित होत आहे. प्रश्नोत्तरांची फेरी, परिचय फेरी, रॅम्प वॉक आणि टॅलेंट राऊंड अशा विविध प्रक्रियेतून विजेत्यांची निवड केली जाणार आहे. विजेत्यांना रोख पारितोषिक , पोर्टफोलिओ शूट, ब्रँड शूट, मॉडेलिंग असाईनमेंट, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र मिळणार असल्याची माहिती सोहेल सय्यद यांनी दिली.
यावेळी पत्रकार परिषदेत प्रिया राणा, डिजायनर पार्टनर कॉस्मोग्लिट्जच्या ममता मंगलाणी, व्हेन्यू पार्टनर नक्षत्र द रॉयल वेडींग, मेकअप पार्टनर लॅक्मे अॅकाडमी खराडी, सेलेब्रिटी फोटोग्राफर अर्णब घोष उपस्थित होते.
प्रिया राणा, स्टार्सट्रीम एन्टाईनमेंटच्या मॅनेजिंग पार्टनर म्हणाल्या, हि स्पर्धा ऑनलाइन ऑडिशन्सने सुरू झाली आणि आम्हाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. ज्यामध्ये शंभरहून अधिक स्पर्धकांनी ऑनलाइन ऑडिशनमध्ये भाग घेतला. अंतिम फेरीसाठी 20 पुरुष आणि 20 महिलांची निवड झाली. अंतिम फेरीसाठी हे सर्व स्पर्धक 2 दिवस कठोर प्रशिक्षण घेत आहेत. पुणे एलिट २०२० च्या प्रतिष्ठित विजेतेपदासाठी या स्पर्धकांची लढत होणार आहे. त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वावर आधारित स्पर्धकांचा निवाडा केला जाईल. विजेते ठरविण्यासाठी प्रश्न उत्तरांची फेरी, परिचय फेरी, रॅम्प वॉक आणि टॅलेंट राऊंड, पोशाख आणि मेकअपवर लक्ष देण्यात येईल. केवळ 1 पुरुष स्पर्धक आणि 1 महिला स्पर्धकच विजेतेपद मिळवू शकेल.
पुणे- आज पुण्याच्या महापौरांनी गदिमा स्मारकाची घोषणा केली खरी .पण या मागे त्यांचं मोठं राजकारण दडलं असल्याचा आरोप सांस्कृतिक क्षेत्रातून होतो आहे. या क्षेत्रातून असंही सांगितलं जातंय कि ,गदिमा स्मारक, जागा, आराखडा सगळं जुनं आहे त्यात नवीन काही नाही.सुमित्र माडगूळकर यांनीच स्मारकाचा आराखडा दिला होता.पण महापालिकेला त्याचा सोयीस्कर विसर पडला. आताचे महापौर पद हि औट घटकेला आलेय . बातमी ही आहे की 14 डिसेंम्बर ला गदिमा स्मारक न झाल्याच्या निषेधार्थ जे राज्यभर आंदोलन होणार होते . ते होऊ नये अन्यथा निव्वळ घोषणाबाजी बाबत सर्व खापर आपल्यावर फोडले जाईल म्हणून त्यापूर्वीच ही जाहीर घोषणा करण्यात आली आहे. असा आरोप या क्षेत्रातून होतो आहे. विद्यमान महापौरांचे मराठी सिनेसृष्टीतील दिग्गजांशी कायमचे संबध असून या स्मारकाचा आणि आणि बालगंधर्व रंगमंदिरात गडकरी यांचा पुतळा बसविण्याबाबत का दिरंगाई झाली हे गूढ अनेक कलाकारांना उकललेले नाही .
आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आली जाग ….आताच्या आमदार , महापौर असताना त्यांच्याकडे या स्मारकाचे काम रखडल्याने लेखी मागणी करण्यात आली होती. खुद्द सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्त यांना भेटून तसे तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांना लेखी पत्र देऊन मागणी केली होती. गदिमांच्या स्मारकासाठी लिखाण झाले अपार …
पुणे : सिद्धहस्त लेखणीतून ‘गीतरामायण’ अजरामर करणारे आधुनिक वाल्मिकी ग.दि. माडगूळकर यांच्या नियोजित स्मारकाचे येत्या महिनाभरात भूमीपूजन केले जाणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. गदिमांच्या 101 व्या जयंती वर्षात डिजिटल स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा मानस असल्याचेही मोहोळ यांनी स्पष्ट केले. नियोजित स्मारकाच्या नियोजनाविषयी माहिती देण्यासाठी महापौर बंगल्यावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माडगूळकरांचे नातू सुमित्र माडगूळकर, नातसून प्राजक्ता माडगूळकर, संवाद पुणेचे सुनील महाजन आणि नगरसेविका माधुरी सहस्त्रबुध्दे उपस्थित होते. मोहोळ म्हणाले, कोथरूड परिसरातील महात्मा सोसायटीतील 6.27 एकरमध्ये महापालिकेतर्फे प्रदर्शन केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. या इमारतीचे क्षेत्रफळ 25110 चौ.मी. असणार आहे. इमारतीच्या समोरच्या बाजूला गदिमांचे स्मारक उभाण्यात येणार आहे. या स्मारकात बांधकाम क्षेत्र सुमारे 931 चौ.मी. असणार आहे. स्वतंत्र इमारतीच्या पहिल्या मजल्यावर गदिमांचा जीवनप्रवास आणि त्यांनी लिहिलेले साहित्याची माहिती देणारे दालन, गदिमांनी वापरलेल्या वस्तूंचे दालन, गदिमांच्या मराठी आणि हिंदी चित्रपटांचे दालन, डिजिटल दालन, सभागृह आणि व्यवस्थापन कक्षाचा समावेश असणार आहे. हे प्रदर्शन केंद्र तळमजला अधिक त्यावर तीन मजले असे असणार असल्याचेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.
कर्मभूमीत स्मारक ही तर कुंटूबाची इच्छा मागील 43 वर्षांपासून माडगूळकर कुंटूब गदिमांच्या स्मारकासाठी झगडत होते. 2019 हे गदिमांचे जन्मशताब्दिवर्ष होते. त्या वर्षात स्मारक उभारले असते, तर अधिक आनंद झाला असता. मात्र गदिमांच्या 101 जयंती वर्षात या स्मारकाच्या कामाला प्रारंभ होत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्या कर्मभूमीत स्मारक उभारले जावे. ही माडगूळकर कुंटूबाची इच्छा होती. गदिमांच्या 101 व्या स्मृतीदिनानिमित्त राज्य, देश आणि विदेशातील साहित्यिक त्यांच्या साहित्याचे सामुहिक वाचन करणार आहेत. त्यातही माडगूळकर कुंटूंब सहभागी होणार आहे. महापौरही त्यात सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. अशी भावना गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी व्यक्त केली.
गेल्या नऊ महिन्यांपासून कोविडच्या महामारीमुळे नाटय व्यवसाय संपूर्णत: ठप्प झाला होता तो पूर्ववत सुरु करण्याच्या दृष्टीने ‘जागतिक मराठी नाटयधर्मी निर्माता संघाने’ सतत प्रयत्न सुरु ठेवले. प्रयत्नाला यशही आले. ‘जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघा’च्या वतीने सर्व प्रथमत: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार , नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख राज ठाकरे, ठाणे महापौर नरेश म्हस्के , , लोकसभा सदस्य सुप्रिया सुळे तसेच ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पुणे या सर्व महानगर पालिकांचे आयुक्त या सर्वांचे मन:पूर्वक आभार. कारण नाटक अनलॉक करताना उपरोक्त सर्वांनीच सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन संपूर्णपणे सहकार्य केले. त्यामुळे सर्व निर्मात्यांना परत एकदा नाटक सुरु करताना फार मोठा दिलासा मिळाला. ‘जागतिक मराठी नाटयधर्मी निर्माता संघ’ या सर्वांचा खूप खूप आभारी आहे.
१४ मार्च २०२० पासून नाटयगृह बंद झाली. आलेल्या जागतिक संकटावर मात करण्यासाठी काही कठोर पावले सरकारच्या वतीने उचलण्यात आली. आणि आपणा सर्वांचा नाटयकला व्यवसाय ठप्प झाला. व्यवसायावरच पोट असणाऱ्या हजारो बांधवांवर उपासमारीची वेळ आली आणि निर्माता म्हणून आमची त्यांना मदत करण्याची धडपड सुरु झाली. आमच्या परीने जितकी जमेल तितकी जास्तीत जास्त मदत आर्थिक तसेच धान्यपुरवठा या स्वरुपात करण्यात आली. पण निव्वळ मदतीवर किती काळ जगणार? व्यवसाय सुरु करणं हेच प्रामुख्याने गरजेचं आहे, हे लक्षात घेऊन संघाने त्यादृष्टीने विचार करून पाऊले उचलण्यास सुरुवात केली.
व्यावसायिक नाटक आणि त्यावर अवलंबून असणारा खूप मोठा वर्ग लक्षात घेऊन प्रायोगिक रंगकर्मी तसेच महाराष्ट्रातील व्यवस्थापक संघाशी संवाद साधून पुढील येणाऱ्या अडचणींविषयी चर्चा केली. लॉकडाऊन काळात OTT प्लॅटफॉर्म हे जिंवत कलेवर येणार फार मोठं संकट असू शकतं याचा अंदाज बांधत खूप गांभीर्याने विचार करून संघाने काही ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली.
१) दि. १८ सप्टेंबर २०२० रोजी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख साहेब यांची भेट घेऊन खूप गांभीर्याने चर्चा करून नाटक अनलॉक करण्याबाबतचा प्रस्ताव आणि सरकारकडून अपेक्षित असणाऱ्या ठोस मदतीची मागणी करण्यात आली. सांस्कृतिक मंत्र्यांची भेट झाल्यावर मुख्यमंत्री यांची भेट घ्यावी व दिलेल्या प्रस्तावातील काही मुद्द्यांबाबत त्यांच्याशी बोलावे असे अमित देशमुख यांनी सुचवले.
२) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना संघातर्फे नाटक व इतर रंगमंचीय कला सादरीकरणासाठी परवानगी आणि मदत मिळणे बाबतचा प्रस्ताव देण्यात आला. संघाच्या पत्रानंतर मुख्यमंत्र्यांनी एक व्हर्चुअल मिटिंग द्वारे संवाद साधला व त्यात आमच्या मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करू असे सांगितले.
३) दि.४ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री ठाकरे साहेबांनी ५ नोव्हेंबरपासून नाटयगृह ५०% प्रेक्षक उपस्थितीचे बंधन घालून सुरु करण्याची परवानगी दिली. पण ५०% प्रेक्षक उपस्थिती मध्ये येणारे उत्पन्न व होणारा खर्च याची कुठलीच सांगड बसत नव्हती. टी. व्ही. माध्यम व OTT प्लॅटफॉर्म यांच्या पूर्णतः आहारी गेलेला प्रेक्षक वर्ग नाटककलेकडून टिकवून ठेवणं ही फार मोठी जबाबदारी आम्हां निर्मात्यांवरच होती व हे शिवधनुष्य आम्ही उचलण्याचे मनोमन ठरवले.
४ ) सद्यपरिस्थितीत नाटय प्रयोगांसाठी होणारा खर्च हा कमी करणं अत्यावश्यक होते म्हणून शासन मदत तसेच आपणही खर्च कमी करून त्याची सांगड घालावी असे ठरले व आम्ही त्या दृष्टीने जोरदार प्रयत्न सुरु केले.
५) ९ नोव्हेंबर २०२० रोजी राज ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा करून असलेल्या अडचणींवर त्यांची मदत मिळवली. त्यांनाही तत्परतेने आमच्या समोरच काही वर्तमानपत्रातील संपादकांना तसेच त्यांच्या संबंधातील वरिष्ठांना फोन करून निर्मात्यांना मदत करण्याची गळ घातली. टोल संबंधीची आमची एक प्रमुख मागणी त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना फोनवर सांगितली व त्याचे गांभीर्य विस्तृत केले.
६ ) दि. १५ नोव्हेंबर २०२० रोजी एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना टोल माफी का गरजेची आहे हे सांगितले आणि तद्संब्धीच्या गाड्यांचे नंबर त्यांचे मालक याची संपूर्ण माहिती दिली त्यांनी ही तत्परतेने पावले उचली आणि आत्यंतिक आनंदाची गोष्ट अशी की, ७ डिसेंबर २०२० रोजी त्या सर्व वाहनांच्या टोल माफीचे पासेस सुद्धा आम्हाला मिळाले. एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार दि. २१ नोव्हेंबर २०२० रोजी ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई महानगरपालिकांच्या आयुक्तांच्यां भेटी घेण्यात आल्या आणि पुन्हा एकदा संघाच्या प्रयत्नांना खूप मोठे यश मिळाले. तसेच ठाणे महापौर नरेश म्हस्के यांचीही भेट घेतली. ७५% भाडे सवलत देऊन नाटयगृहे उपलब्ध झाली आणि आम्ही व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्नांना यशस्वी ठरलो.
७) दि. १९ नोव्हेंबर २०२० रोजी पुणे महापालिकेतील पदाधिकारी,अधिकारी यांची भेट घेऊन त्यांचीही मदत मिळावी ही अपेक्षा ठेवली तर त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देऊन पुणे येथील सर्व नाटयगृह तत्परतेने स्वच्छतेचे आदेश देऊन तातडीने उपलब्ध करून दिली.
८) दि. २३ नोव्हेंबर २०२० रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार व सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन नाटय व्यवसाय अडचण व मदतीची अपेक्षे संदर्भातील पत्र दिले.
मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे ‘यूपीए’च्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू असताना आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पवारांबाबत मोठं विधान केलं आहे. “शरद पवार यांच्यात देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्यासह काँग्रेस नेते राहुल गांधी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. त्यानंतर विरोधकांची पुन्हा एकदा मोट बांधली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
यूपीएचं अध्यक्षपद आता शरद पवारांकडे देण्याबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आलं. “शिवसेना यूपीएचा घटक पक्ष नाही. त्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यावा आणि त्याबाबत मी बोलणं योग्य नाही. यूपीएच्या अध्यक्षपदाची घोषणा झाल्यानंतर मी बोलणं योग्य ठरेल”, असं संजय राऊत म्हणाले.
शरद पवारांच्या राष्ट्रीय नेतृत्त्वाबाबत संजय राऊत यावेळी भाष्य केलं. “शरद पवार हे देशाचे नेते आहेत. त्यांच्याकडे राष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे. राजकारणातला दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि जनतेची जाण असलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे. देशाचे प्रश्न हाताळण्यासाठी त्यांचा अनुभव नक्कीच कामी येईल. यापुढील काळात देशाच्या राजकारणात काय बदल होतील हे मी आताच सांगू शकत नाही”, असं संजय राऊत म्हणाले.
नवी दिल्ली- काँग्रेस आणि यूपीएचे नेतृत्व सोनिया गांधींनंतर कुणाकडे द्यावे यावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. सोनिया गांधी यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ती जबाबदारी स्वीकारणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
बिहारच्या निवडणुका आणि त्यानंतर हैदराबाद महानगरपालिका निवडणुका पार पडल्यानंतर यूपीएच्या अध्यक्षपदी पुन्हा कोण याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. सोनिया गांधी रिटायरमेंट घेतल्यानंतर ही जबाबदारी कोणाकडे द्यायची याबाबत चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे नाव पुढे करण्यात आले होते. मात्र यूपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यास राहुल गांधी यांनी नकार दिल्याची माहिती मिळाली आहे.
महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी एकत्र आलेल्या शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी या भिन्न विचारसरणीच्या पक्षांचे सरकार वर्षभर टिकले. ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त तिन्ही पक्षांनी पाचच नव्हे, तर पंचवीस वर्ष सत्तेत एकत्र राहण्याचा मानस बोलून दाखवला. त्यामुळे शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रासारखी महाविकास आघाडी केंद्रीय स्तरावर करण्याची मागणी केली जात आहे. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या संबंधीचा प्रस्ताव शरद पवार यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विरोधी पक्षाला एकत्र करुन आगामी लोकसभा निवडणुकीचे नेतृत्व करावे, असा प्रस्ताव काँग्रेसने दिला असल्याचे समजते.
कोलकाता-पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर गेलेल्या भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर गुरुवारी तृणमूल (TMC)च्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली आहे. नड्डा कोलकातावरुन डायमंड हार्बर शहराकडे जात होते, यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. दरम्यान, नड्डांच्या सुरक्षेप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाने ममता सरकारकडून रिपोर्ट मागितली आहे.
#WATCH Protestors pelt stones at the vehicle of BJP leader Kailash Vijayvargiya in Diamond Harbour
He is on his way to South 24 Paraganas. Protestors also attempted to block the road from where BJP President JP Nadda's convoy was passing
नड्डा यांच्यासोबत असलेल्या भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांच्या गाडीवरही दगडफेक करण्यात आली. यादरम्यान एक मोठा दगड त्यांच्या गाडीचा काच फोडून अंगावर आला आणि यात विजयवर्गीय जखमी झाले आहेत. त्यांच्यासोबत मुकूल रॉय यांनादेखील मार लागला आहे.
बंगाल भाजपाध्यक्षांनी अमित शाहना पत्र लिहीले
पश्चिम बंगालचे भाजपाध्यक्ष दिलीप घोष यांनी राज्य सरकारच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांना पत्र लिहीले आहे. घोष यांनी सांगितले की, बुधवारी नड्डा यांच्या कार्यक्रमात पोलिसांचा बंदोबस्त नव्हता. राज्य सरकारकडून नड्डा यांच्या सुरक्षेत मोठी चुक झाली.
नवी दिल्ली -नवीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाचा आज 15 वा दिवस आहे. 6 राऊडच्या चर्चेनंतर शेतकऱ्यांना पटवून देण्याचा सरकारचा लेखी प्रयत्नही बुधवारी अपयशी ठरला. शेतकरी आता आंदोलन तीव्र करण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी म्हटले आहे की केवळ सरकारचा निषेध संपवण्यातच रस आहे. मात्र तिन्ही कायदे मागे घेतल्याशिवाय आंदोलन संपणार नाही. टिकैत यांनी किमान समर्थन मूल्य (MSP) वर स्वतंत्र विधेयक मागितले आहे.
‘सरकारला आंदोलन कमकुवत करायचे आहे’ देशभरातील शेतकरी महामार्गाला जाम करण्याची तयारी करीत आहेत. भारतीय शेतकरी संघटनेचे नेते मनजितसिंग म्हणाले आहेत की सरकारला आमचे आंदोलन कमकुवत करायचे आहे. पण, त्यात सहभागी होण्यासाठी बरेच शेतकरी दिल्ली येथे पोहोचत आहेत. आम्ही दिल्लीकरांना पाठिंबा देण्याचे आवाहन करत आहोत.
आज आंदोलन संपण्याचे आवाहन सरकार करणार आहे न्यूज एजेंसीने सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर हे आंदोलन संपवून एकत्रित तोडगा काढण्यासाठी आज शेतकऱ्यांना आवाहन करतील. कृषीमंत्री पत्रकार परिषद घेतील.
केंद्रीय मंत्री म्हणाले- शेतकरी आंदोलनात चीन-पाकिस्तानचा हात सरकार कायदा मागे न घेण्यावर ठाम असेल तर शेतकरीही ठाम आहेत. यावर मोठी मोठी वक्तव्य समोर येत आहे. केंद्रीय अन्नपुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, शेतकरी आंदोलनात पाकिस्तान आणि चीनचा हात आहे. दानवे म्हणाले की, CAA आणि NRC विषयी सर्वप्रथम मुस्लिमांना भडकवले. हे प्रयत्न अयशस्वी झाले तर आता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. औरंगाबादमध्ये आरोग्य केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री यांनी बुधवारी हे वक्तव्य केले.
मुंबई, दि. 10 : हाफकिन इन्स्टिट्यूट येथील इमारतीचे काम करीत असताना या इमारतीचे हेरिटेज महत्त्व लक्षात घेऊन बांधकाम करणे आवश्यक आहे. त्यामुळे याबाबत पुढील काम करीत असताना याबाबतचा एकत्रित आराखडा तयार करणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
हाफकिन इन्स्टिट्यूटच्या कामांबाबतचा आढावा घेण्याबाबत बैठक मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या बैठकीस हाफकिन इन्स्टिट्यूटच्या संचालक सीमा व्यास यांच्यासह वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने यांच्यासह हाफकिन इन्स्टिट्यूटचे संचालक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, हाफकिन इन्स्टिट्यूट येथे काम करीत असताना बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या निधीबाबत सुधारीत पुरवणी मागणी करणे आवश्यक असून यासाठी सुधारीत प्रस्ताव तयार करणे आवश्यक आहे. तसेच बांधकाम करण्यापूर्वी आपण स्वत: हाफकिन इन्स्टिट्यूट येथे भेट देऊन पाहणी करणार आहोत. नियोजित वेळेत काम पूर्ण करण्यासाठी एकत्रित आराखडा हाफकिन इन्स्टिट्यूटने तयार करुन वैद्यकीय शिक्षण विभागास सादर करावा, असे निर्देशही श्री.देशमुख यांनी दिले.
पुणे विभागातील 5 लाख 17 हजार 150 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 5 लाख 45 हजार 340 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे,दि.10 :- पुणे विभागातील 5 लाख 17 हजार 150 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 45 हजार 340 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 12 हजार 958 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 232 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.83 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 49 हजार 644 रुग्णांपैकी 3 लाख 31 हजार 100 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 99 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 445 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.42 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.70 टक्के आहे. सातारा जिल्हा सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 52 हजार 260 रुग्णांपैकी 49 हजार 983 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 533 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 744 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 90 रुग्णांपैकी 43 हजार 724 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 726 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 640 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हा सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 125 रुग्णांपैकी 45 हजार 34 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 378 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 713 रुग्णांचा मृत्यू झाला आहे कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 221 रुग्णांपैकी 47 हजार 309 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 222 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 690 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 80 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 782 , सातारा जिल्ह्यात 133, सोलापूर जिल्ह्यात 118, सांगली जिल्ह्यात 26 तर कोल्हापूर जिल्ह्यात 21 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे. कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण – पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 366 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 28, सातारा जिल्हयामध्ये 62, सोलापूर जिल्हयामध्ये 222, सांगली जिल्हयामध्ये 21 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 33 रुग्णांचा समावेश आहे. पुणे विभागातील सर्व्हेक्षण आजपर्यत विभागामध्ये एकुण 30 लाख 5 हजार 833 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 45 हजार 340 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 9 डिसेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
पुणे, दि.१०:-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या नवीन मार्गिकेच्या बांधकामाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर प्रकल्प कॅम्प कार्यालयात सादरीकरणाद्वारे सुरु असलेल्या बांधकामाच्या कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची माहिती जाणून घेतली. यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, परिवहन मंत्री अनिल परब, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनिल शेळके, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी खोपोली ते कुसगाव नवीन मार्गिकेच्या बांधकामाची माहिती दिली.
प्रकल्पाचा तपशील
◻️मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या लांबीतील नवीन मार्गिकेच्या (मिसिंग लिंक) प्रकल्पांतर्गत खालापूर पथकरनाका ते लोणावळा (सिंहगड संस्था) पर्यंत मुंबई पुणे द्रुतगती मार्गाची क्षमता वाढ करणे प्रस्तावित आहे.
◻️या प्रकल्पाची एकूण लांबी १९.८० कि.मी. असून या प्रकल्पांतर्गत खालापूर ते खोपोली इंटरचेंज या अस्तित्वातील ५.८६ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे ८ पदरीकरण करणे.
◻️खोपोली एक्झिट ते कुसगांव (सिंहगड संस्था) या भागातील १३.३ कि. मी. राहिलेल्या लांबीमध्ये दोन बोगदे व दोन व्हायाडक्ट बांधणे.
प्रकल्पाची गरज
◻️आडोशी बोगद्याजवळ मुंबई पुणे द्रुतगती मार्ग (६ लेन) व राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ (४ लेन) एकत्र येतात व खंडाळा एक्झीट येथे वेगळे होतात.
◻️आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झीट या लांबीत घाट व चढ उताराचे प्रमाण जास्त असून दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार होत असतात, त्यामुळे मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन ही पावसाळयात वाहतुकीसाठी बंद ठेवावी लागत असल्यामुळे वाहतूक कोंडी होते. प्रकल्पाची वैशिष्ट्ये
पॅकेज १ – खोपोली एक्झीट ते कुसगाव (सिंहगड संस्था) या लांबीमध्ये ८ पदरी २ बोगद्यांसह नवीन रस्ता करणे
▫️बोगदा क्र. १- १.७५ कि.मी. लांबीचे दोन समांतर बोगदे
▫️बोगदा क्र.२ – ८.९२ कि.मी. लांबीचे दोन समांतर बोगदे ▫️बोगद्यांची रुंदी २१.४५ मीटर असून भारतातील सर्वात जास्त रुंदीचा बोगदा होणार आहे. ▫️मुंबई व पुणे कडे जाणारे दोन्ही बोगदे दर ३०० मीटर अंतरावर एकमेकांस क्रॉस पॅसेज व्दारे जोडण्यात येत आहेत. पॅकेज २ – खोपोली एक्झीट ते कुसगाव (सिंहगड संस्था) या लांबीमध्ये ८ पदरी २ व्हायाडक्टसह नवीन रस्ता व खालापूर पथकर नाका ते खोपोली एक्झीट या रस्त्याचे ८ पदरीकरण करणे. ▫️व्हायाडक्ट क्र. १- ९०० मीटर लांबीचे दोन समांतर पूल ▫️व्हायाडक्ट क्र. २ – ६५० मीटर लांबीचे दोन समांतर केबल स्टे पूल. ▫️८ पदरीकरण – ५.८६ कि.मी. खालापूर टोलनाका ते खोपोली एक्झिट प्रकल्प बांधकाम सद्यस्थिती
पॅकेज १ -खोपोली एक्झीट ते कुसगाव (सिंहगड संस्था) या लांबीमध्ये ८ पदरी २ बोगद्यांसह नवीन रस्ता
▫️बोगदा क्र. २ एक्झिटच्या दोन समांतर बोगद्यांपैकी उजव्या बोगद्याचे १९७९ मीटर (मुंबईकडे) खोदकाम पूर्ण झाले असून डाव्या बोगद्याचे १५५२ मीटर (पुणेकडे) खोदकाम पूर्ण झाले आहे. ▫️ बोगदा क्र. २ ला जोडणाऱ्या अडिट नंबर १ चे १३४० मीटर इतके खोदकाम पूर्ण झाले असून नंबर २ चे ११५३ मीटर इतके खोदकाम पूर्ण झाले आहे. ▫️बोगदा क्र. १ च्या पोर्टल पर्यंत पोचण्यासाठीच्या पोचरस्त्याचे काम सध्या प्रगती पथावर आहे.
पॅकेज २- खोपोली एक्झीट ते कुसगाव (सिंहगड संस्था) या लांबीमध्ये ८ पदरी २ व्हायाडक्टसह नवीन रस्ता व खालापूर पथकर नाका ते खोपोली एक्झीट या रस्त्याचे ८ पदरीकरण करणे.
▫️सध्याच्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूर टोलनाका ते खोपोली एक्झिटचे ८ पदरीकरण करण्याचे काम प्रगती पथावर आहे. या ८ पदरीकरणांतर्गत येणाऱ्या मेजर ब्रिज नं. १. २ व ३ या तीनही पुलांचे रुंदीकरणाचे काम प्रगती पथावर आहे. ▫️व्हायाडक्ट क्र. १ च्या पायाभरणीचे काम देखील प्रगती पथावर आहे. ▫️व्हायाडक्ट क्र. २ च्या आखणीपर्यंत पोचवण्यासाठीच्या पोचरस्त्यासाठी इतर काम पूर्ण झाले असून पोचरस्ता बांधकाम सद्यस्थितीत प्रगती पथावर आहे. : मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग (मिसिंग लिंक)
■ मुंबई पुणे द्रुतगती मार्ग (मिसिंग लिंक) प्रकल्पांतर्गत सध्याच्या द्रुतगती मार्गावरील खालापूर ते खोपोली इंटरचेंज या ५.८६ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे ८ पदरीकरण होणार आहे.
■ खोपोली एक्झिट ते कुसगांव (सिंहगड संस्था) या भागातील १३.३ कि. मी. च्या राहिलेल्या लांबीसाठी दोन बोगदे (अनुक्रमे १.६८ कि.मी. व ८.८७ कि.मी.) व दोन व्हायाडक्टचे (अनुक्रमे ०.९०० कि.मी. व ०.६५० कि.मी.) बांधकाम करण्यात येणार आहे.
■ या प्रकल्पामुळे सध्याचे खोपोली एक्झिट ते सिंहगड संस्था हे १९ कि.मी. चे अंतर ६ कि.मी. ने कमी होवून १३.३ कि.मी. इतके होईल व प्रवासाच्या वेळेत २० ते २५ मिनिटांची बचत होण्यास मदत होणार आहे.
■ या प्रकल्पास ४ जून २०१९ रोजी वन विभागामार्फत मान्यता देण्यात आली आहे.
■ या प्रकल्पास २४ ऑगस्ट २०१८ रोजी राज्य पर्यावरण समितीमार्फत मान्यता देण्यात आली आहे.
■ या प्रकल्पांतर्गत पॅकेज १ करीता (बोगद्याचे काम) मे. नवयुगा इंजिनिअरींग कं. लि. यांना २१ फेब्रुवारी २०१९ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे.
■ या प्रकल्पांतर्गत पॅकेज २ करीता (व्हायाडक्टचे काम) मे. एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि. यांना १ मार्च २०१९ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे.
■ पॅकेज १ व पॅकेज २ चे काम डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करणे नियोजित आहे.
■ या प्रकल्पाची एकूण किंमत रु.६६९५.३७ कोटी इतकी आहे.
मुंबई, दि. १०: ‘म्हाडा’च्या माध्यमातून सर्वसामान्यांना माफक दरात हक्कांची घरे मिळवून देण्याचे काम सुरु आहे. लोकांच्या मनात विश्वास निर्माण केल्याने ‘म्हाडा’च्या योजनांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. पुणे विभागात ५ हजार ६४७ सदनिकांसाठी ‘म्हाडा’च्यावतीने सोडत काढण्यात आली आहे, ही प्रक्रीया अत्यंत पारदर्शक असून या कामासाठी कोणाही मध्यस्थाची नेमणूक करण्यात आलेली नाही, त्यामुळे सर्वसामान्यांनी कोणाच्याही फसवणुकीला बळी पडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केले. येथील उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ५ हजार ६४७ सदनिकांसाठी अर्ज नोंदणी शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील ५ हजार ६४७ सदनिका व भूखंडांच्या ऑनलाईन नोंदणीची सुरुवात झाली आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना हक्काची घरे माफक किंमतीत मिळणार आहेत. राज्यातील सर्वांना हक्काची घरे मिळण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात विविध योजनांची अंमलबजावणी सुरु आहे. राज्यातील सर्व शहरे झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. ‘कोरोना’च्या संकटामुळे राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसविण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात मोठी सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा चांगला परिणाम दिसत असून घरांच्या खरेदी-विक्रीत वाढ झाली आहे. सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरे मिळवून देण्यासाठी ‘म्हाडा’च्या माध्यमातून काम सुरु आहे. यापुढेही ‘म्हाडा’ने सर्वसामान्यांना परवडतील अशी पर्यावरणपूरक घरे निर्माण करावीत. त्यासाठी विविध प्रकल्प हाती घ्यावेत. ‘म्हाडा’च्या योजनांच्या माध्यमातून दर्जेदार आणि माफक किंमतीत घरे मिळण्यासाठी अधिकाधिक लोकांनी या योजनेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘म्हाडा’च्या पुणे मंडळाचे मुख्याधिकारी नितीन माने यांनी केले. तर आभार मिळकत व्यवस्थापक विजय ठाकूर यांनी मानले.
पुणे – येरवडा येथील गोल्फ क्लब चौक उड्डाणपुलाचे काम मार्च 2022 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती शहर भाजपचे अध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक यांनी आज दिली.
जगदीश मुळीक यांनी आज या प्रकल्पाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. यावेळी नगरसेवक योगेश मुळीक, बापूराव कर्णे, राहुल भंडारे, महापालिकेचे मुख्य अभियंता (प्रकल्प) श्रीनिवास बोनाला, कार्यकारी अभियंता अभिजित आंबेकर, अभियंता राकेश शिंदे, प्रकल्प प्रमुख राजेश शिंदे, भाजपचे पदाधिकारी संतोष राजगुरू, अर्जुन जगताप, महेश गलांडे, संतोष घोलप, विकास घोडके, अमोल तारू, पुनजी जगताप यावेळी उपस्थित होते.
मुळीक पुढे म्हणाले, ‘उड्डाणपुलाच्या दहा पीलरपैकी ७ पीलरचे काम पूर्ण झाले आहे. तीन पीअर कॅप आणि दोन स्लॅबची कामे पूर्ण झाली आहेत. गोल्फ क्लब चौक ते विमानतळ या भागातील रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, त्यानंतर उर्वरीत तीन पीलरचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असणारा २८ कोटी ५० लाख रुपयांचा निधी पुणे महापालिकेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रकल्पाचे काम वेगाने आणि निर्धारीत वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून मार्च 2022 पर्यंत ते पूर्ण करण्यात येणार आहे.’
मुळीक पुढे म्हणाले, ‘गुंजन टॉकिज ते विमानतळ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते शास्त्रीनगर चौक हे रस्ते एकमेकाला क्रॉस होतात. आंबेडकर चौक ते शास्त्रीनगर चौक या रस्त्यावर पिंपरी-चिंचवड, भोसरी, आळंदी, खडकी तसेच मुंबईकडून नगर रस्त्याकडे येणारी वाहतूक आहे. त्यात मोठ्या प्रमाणात जड वाहतुकीचा समावेश आहे. तसेच गुंजन चौक ते विमानतळ या रस्त्यावर पुणे शहरातून मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सदर चौकात केलेल्या वाहनांच्या सर्वेक्षणानुसार प्रति दिन सुमारे १ लाख ७० हजार इतकी वाहने या चौकातून जातात. त्यामुळे सदर चौकात वारंवार वाहतुकीची कोंडी होत असून त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी दोन वर्षांपूर्वी नगरसेवक योगेश मुळीक स्थायी समितीचे अध्यक्ष असताना उड्डाणपुलाचे काम प्रस्तावित केले आणि आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे या भागातील वाहतुकीची कोंडी सुटण्यासाठी मदत होणार आहे. २८० मीटर लांबी आणि १५.६ मीटर रुंदीच्या उड्डाणपुलाचे काम मार्च 2022 पर्यंत पूर्ण होईल.’
पुणे- पुण्यातील सामजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी शिर्डीत जाऊन संस्थानच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार केल्यानंतर ,शिवसेनेचे काही कार्यकर्ते आणि ब्राम्हण महासंघाचे काहीजण यांनी तृप्ती देसाई यांच्या विरोधात शिर्डीत काउंटर आंदोलनाची तयारी सुरु करताच त्यांना विरोध न करता पोलिसांनी तृप्ती देसाई यांना मात्र शिर्डीच्या प्रचंड अलीकडे १०० किलोमीटर अंतरावर सुप्याजवळ अडवून धक्काबुक्की करत ताब्यात घेतले आणि सुपे पोलीस ठाण्यात नेले .
काय आहे प्रकरण
शिर्डीमधील साई मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं असून भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शिर्डी साई संस्थानकडून ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. मंदिरात येताना भक्तांनी सभ्य पोषाख परिधान करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भक्त छोटे कपडे घालून मंदिरात येत असल्याची तक्रार आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थानकडून सांगण्यात आलं आहे.देवस्थानकडून दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या ड्रेसकोडसंबंधी एक फलक लावण्यात आला होता. या निर्णयाच्या फलकाविरोधात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आक्रमक झाल्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी देवस्थानच्या पुजाऱ्यांबद्दल ‘ते कसे अर्ध कपड्यात चालतात ‘ असे विधान केलं. त्यानंतर आज तृप्ती देसाई पुण्याहून शिर्डीला निघाल्या आणि तिथे साई संस्थानाने लावलेला आवाहनाचा फलक काढण्याच्याबाबत ठिय्या आंदोलन करणार होत्या . या फलकावरून वातावरण तापलेले असतानाच शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी तृप्ती देसाई यांना इशारा दिला होता. ब्राम्हण महासंघाने देखील त्यांना प्रती आव्हान दिले होते.