Home Blog Page 2212

कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सांगा -केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा पुणे महापालिकेला सवाल

0

पुणे- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज पुणे महानगरपालिकेला भेट दिली. कोरोनाच्या काळात महापालिकेने केलेले काम आणि कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना यांच्याबाबत विविध प्रश्न विचारत माहिती घेतली आणि त्यांनी आढावाही घेतला. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ,  पदाधिकारी आणि महापालिकेचे वरीष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.देशात कोरोनाची दुसरी लाट अजून संपली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन येत्या काळात आणखी सतर्कता बाळगावी लागेल असेही आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांनी यावेळी सांगितले. कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेच्या सामना करण्यासाठी केंद्र सरकारने विविध उपाय योजना केल्या असून जिल्ह्याच्या ठिकाणी कोरोना उपचारांबाबतच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. असेही त्यांनी सांगितले

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. पवार यांनी सांगितले की, पुणे महापालिकेने शहरी गरीब योजनेच्या माध्यमातून कोविड काळात उत्तम काम केले आहे. राज्यातील इतर महानगरपालिकांनी अशी योजना राबवावी. ‘जंम्बो’ कोविड सेंटर उभारुन रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यात आल्या. महानगरपालिकेने कोविड प्रतिबंधक लसीबाबत प्रभावी जनजागृती केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले. तसेच कोरोनामुळे मृत झालेल्या कर्मचाऱ्यांना पुणे महानगरपालिकेनं स्वतःच्या अर्थसंकल्पातून मदत केली याबाबत राज्यमंत्री डॉ. पवार यांनी महापालिकेचं अभिनंदन केले.

 कोरोना प्रतिबंधक लसीकरण (corona vaccination) मोहिमेत लहान मुलांच्या (१८ वर्षांखालील) लसीकरणाबाबत अद्याप अंतिम निर्णय केंद्राच्या आरोग्य विभागाकडून घेण्यात आलेला नाही़ तसेच लहान मुलांच्या लसीकरणासाठी आणखी किती काळ लागेल हे आज निश्चित सांगता येणार नाही, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharti Pawar) यांनी सोमवारी स्पष्ट केले. दरम्यान लहान मुलांच्या लसीकरणासाठी सुरक्षितेतच्या चाचण्या सध्या सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.”पुणे जिल्ह्याने आतापर्यंत एक कोटी लसीकरण पूर्ण केले आहे. येथील रुग्ण संख्या वाढू नये यासाठी केंद्र सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे. लहान मुलांच्या बाबतीत विशेष खबरदारी घेतली जात असून त्यांच्या लसीकरण चाचण्या सुरू आहेत. आता जरी कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाली असली तरी महापालिकेकडून जनजागृती प्रभावीपणे राबवली जात आहे. सणासुदीच्या काळात काळजी घेण्याचे आवाहनही केले जाते. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला 220 कोटींचा निधी आलेला आहे असेही पवार यावेळी म्हणाल्या आहेत.’

पुस्तकांचं बदलतंय रूप ……

पुस्तकं हातात घेऊन वाचणं हा छंद अनेकांना आजही असला तरीही आताच्या पिढीला कानात हेडफोन लावून हीच पुस्तकं सहज ऐकता येतील अशा ऑडिओबुक्सची निर्मिती देशात विविध संस्थाद्वारे करण्यात येत असून हजारोंच्या संख्येने आज आपल्या इथे हे साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. ऑडिओबुक्सच्या माध्यमातून आपल्याला हवी हवीशी वाटणारी पुस्तकं कधीही, कुठेही उपलब्ध झाल्याने फक्त तरुण पिढीचं नव्हे तर अनेक पुस्तकप्रेमींचा याकडे कल पाहायला मिळत आहे. तंत्रज्ञानाच्या जोरावर पुस्तकांच्या विश्वात आमूलाग्र बदल घडून ऑडिओबुक्स नव्या पर्वाची नांदी असल्याचे आपल्याला पहायला मिळत आहे. याच ऑडिओबुक्सच्या विश्वात आघाडीवर असलेल्या स्टोरीटेल मराठीने महाराष्ट्रात लॉकडाऊन दरम्यान हजारो पुस्तकांचे ऑडिओबुक्समध्ये रूपांतर केलं. यासाठी पन्नासहून अधिक मराठी कलाकारांनी या ऑडिओबुक्सना आपला आवाज देत ही पुस्तकं डिजिटलबद्ध केली आहेत. यानिमित्ताने अशाच काही कलाकारांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न….

पुस्तकं संस्कृती जतन करण्यासाठी ‘ऑडिओ बुक’ हा उत्तम पर्याय!
– अभिनेते सचिन खेडेकर

मला पुस्तकं वाचण्याची आवड आहे म्हणून खरंतर मी हे केलं, मी काही व्हाईस आर्टिस्ट नाही, पण मला ती ऑडिओबुक्सची एकूण कल्पनाच आवडली. आता वाचन संस्कृती कमी होतेय, वाचकांना चांगलं पुस्तक वाचायला मिळत नाही, किंवा वेळ मिळत नाही हे जे कारण आहे त्याला ऑडिओबुक्स हा उत्तम पर्याय आहे म्हणून खरंतर हे करावंसं वाटलं. मला नट म्हणून किंवा मराठी भाषेचा भक्त म्हणून ते करायला आवडतं. मला एका बाजून असंही वाटतं कि हा माझ्यादृष्टीने भाषा टिकविण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे, आपली पुस्तकं टिकवण्याचा ऑडिओबुक्स हा चांगला मार्ग आहे असं मला वाटतं. आणि मी जी स्टोरीटेलसाठी पुस्तकं वाचली आहेत ती मला मनापासून आवडली आहेत म्हणूनच मी ती वाचली आहेत. ऑडिओबुक्स ऐकण्यातून आपला छंदही जोपासला जाऊन लोकांना चांगलं ऐकण्याची सवयही लागेल असे मला वाटते.

ऑडिओबुक्स हे प्रेक्षकांना इनव्हॉल्व करणारं माध्यम– अभिनेता ललित प्रभाकर

एकतर पूर्णपणे नवीन माध्यम. इथे फक्त तुम्ही ऐकू शकता आणि त्या ऐकण्यातूनच तुम्हाला तुमची गोष्ट इमॅजिन करायची असते. मला वाटते कि ऑडिओ बुक्स हे खूप पावरफुल्ल माध्यम आहे, जे प्रेक्षकांनाही चॅलेंज करतं, इन्व्हॉल करून घेतं. कारण त्यांना त्या गोष्टी इमॅजिन कराव्या लागतात, नुसत्या ऐकून गोष्टी सोडून चालत नाहीत. प्रत्येक व्यक्ती त्याच्या त्याच्या इमॅजीननुसार बघू शकते. ऑडिओ बुक्समध्ये एकच गोष्ट मी जेव्हा बोलतो, साकारतो किंवा प्रेझेन्ट करतो तेव्हा ती ऐकणाऱ्या प्रत्येकापर्यंत वेगवेळी पोहचते आणि दिसते, मला वाटतं कि हि खूपच कमाल गोष्ट आहे स्टोरीटेल या ऍपची आणि त्यासाठीच मी खूप उत्सक होतो. मला असं वाटतं कि अभिनेता म्हणून मला माझा रियाझ करण्यासाठी आणि लर्न करण्यासाठी अश्या काही गोष्टी करत राहणं खूप गरजेचं असतं. मला एकाच वेळी आठ दहा कॅरेकटर्स प्ले करायचे होते आणि त्यातून माझं कॅरेक्टर वेगळं, शिवाय गोष्टही कळली पाहिजे असं सगळं करायचं होतं. हे सगळं आम्हाला चित्रपट – मालिकेत काम करताना करायची सवय नसते, आम्ही काम करताना एकच कॅरेक्टर करीत असतो. मात्र इथे हे सगळं करताना कलाकार म्हणून अधिक कस लागते, तुम्हाला थोडं पुश करावं लागतं स्वतःला.

ऑडिओ बुक्स रसिकांसाठी पर्वणी!– अभिनेता उमेश कामत

ऑडिओबुक रेकॉर्ड करण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो, कारण माझा पहिला अनुभवच खूप विलक्षण होता. मी माझा पहिला ऑडिओ ड्रामा ६१ मिनिट्स रेकॉर्ड केला त्याचा रिस्पॉन्स आणि एकंदर त्याच्या रेकॉर्डिंग प्रोसेस मजेदार होती. सो जेव्हा माझ्याकडे ६१ मिनिट्स हि ऑडिओ कथा रेकॉर्डिंगसाठी आली तेव्हा मी खूपच एक्ससाईट, खूप पॉझिटिव्ह होतो. एकतर मला ती गोष्ट फार आवडली होती. मला सस्पेन्स आणि थ्रिल्लर गोष्टी फार आवडतात तश्याच रोमँटिक गोष्टीही आवडतात. त्यातलीच हि एक आयटी क्राईमच्या संदर्भातील गोष्ट स्टोरीटेल मराठी कडून विचारण्यात आली आणि ती मी वाचल्यानंतर मजा आली. मला जसं वाचताना पुढे काय पुढे काय होणार याची उत्सुकता होती, तीच उत्सुकता रेकॉर्डिंग करतानाही होती. सर्वच कॅरेक्टर्स खूप इंटरेस्टिंग होती. हा माझ्यासाठी खूप मस्त अनुभव होता. मी स्वतः रेकॉर्ड करताना त्या व्यक्तिरेखा खूप एन्जॉय केल्या आणि मला असं वाटतंय गोष्ट इतकी इंटरेस्टिंग झाली आहे कि ती लोकांना नक्की ऐकायला आवडेल. आणि मला असं वाटतंय सध्याच्या काळात आपलं ट्रॅव्हलिंग टायमिंग इतकं असतं, प्रत्येक वेळेला टिव्ही पाहणं किंवा सध्याच्या काळात चित्रपट, नाट्यगृहे बंद आहेत त्यामुळे स्टोरीटेल जी ऑडिओबुक्स तयार करताहेत ती मराठी रसिकांसाठी एक पर्वणीआहे असे मला वाटते आहे. सगळ्या प्रकारच्या कथा, लघुकथा, कादंबऱ्या, ऑडिओ सिरीज अश्या मुबलक ऑडिओबुक्सचा खजिना आपल्या सगळ्यांसाठी आहे, त्याचा सगळ्यांनी आनंद घ्यावा.

वाचनाची हॅबिट ऑडिओबुक्स मुळे पूर्ण करता येते!– अभिनेता आस्ताद काळे

मी ऑडिओ बुक करण्यासाठी खूपच उत्सुक होतो. मला डबिंग या क्षेत्रात काहीतरी सुरु करण्याची इच्छा होती. नशिबाने स्टोरीटेल हा चांगला प्लॅटफॉर्म आर्टिस्ट्ससाठी उपलब्ध झाला आहे. तुम्ही नट असलात तरी ह्या माध्यमात तुमचा चेहरा किंवा अभिनय दिसणार नाही, फक्त वाचिक अभिनयावर सगळं निभावून न्यायाचे आहे, हे चॅलेंज मला स्वतःहून स्वीकारायचं होत आणि हि संधी स्टोरीटेलने दिल्याने खरंतर मी खूप खुश झालो आहे. मला ऑडिओ बुक करायला खूप मजा आली. कारण जवळ जवळ सात आठ पात्र वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये एकमेकांशी बोलताहेत, एकाचवेळी चारपाच लोक बोलताहेत, या सगळ्या प्रकारे आवाज मॉड्युलेट करणं, प्रत्येकाचा लहेजा, पीच, वाणी वेगळी असणं हे सगळं मॅनेज करीत हे करण्याचा अनुभव खूपच मजेदार आणि चॅलेंजिंग अनुभव होता. माझ्या पिढीच्या आणि कामासाठी सतत प्रवास करणाऱ्यांना आपली वाचनाची हॅबिट ऑडिओबुक्समुळे पूर्ण करता येते. वाचनाचा अखंड आनंद ऐकण्यातून मिळविण्याची संधी ऑडिओबुक्स देतात.

ऑडिओबुक्स मनोरंजन आणि ज्ञानाचे उत्तम साधन!– अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी

आवाज आणि त्याचा वापर आणि गोष्ट सांगणे हे मला एक अभिनेत्री म्हणून खूप चॅलेंजिंग वाटते. ऑडिओबुक्स हे नुसतं एकच माध्यम असं आहे ज्याच्यातून तुम्हाला पूर्ण वातावरण, पात्र उभं करायचं असतं. गोष्ट सांगणं हि अगदी मूलभूत कला आहे, अभिनेता अभिनेत्री म्हणून त्यात तुमचा हातखंडा असणं फार गरजेचं असतं. ऑडिओबुक ध्वनिमुद्रणाचा अनुभव अर्थातच खूप मजेशीर होता कारण तुम्ही एका बंद स्टुडिओत असता, पण तुम्हाला ती सगळी जी सिच्युएशन आहे ती तुम्हाला क्रिएट करायची असते. त्यात जो थरार असेल, भीती असेल, प्रेम प्रसंग असेल, जे काही भाव आहेत ते सगळे त्या स्टुडिओच्या आत फक्त माईक आणि तुम्ही आणि तुमची जी संहिता असते त्याच्या मार्फत तयार करायचे असते. त्यामुळे मला फार मजा येते. मला अनेकदा असे वाटते कि आपण जेव्हा ते करीत असतो, आपणच आपल्याला ऐकत असतो, आणि आपल्याला सुधारत असतो आणि ते अगदी मेडिटेटिंग आहे. मला वाटते आहे स्टोरीटेल खूप चांगली संधी देतेय ऑडियन्सला सुद्धा. अनेकदा आपल्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला वाचायला मिळत नाही. आपण गाडी चालवीत असताना, प्रवास करताना, स्वयंपाक करीत असताना, घरातील कामं करत असताना आपण वाचू शकत नसलो तरी ऐकू शकतो आणि त्यामुळे हि खूप चांगली संधी असते. अगदी नावाजलेल्या लेखकांच्या कथा कादंबऱ्यांपासून ते अगदी नव्या दमाच्या होतकरू लेखकांनी लिहिलेली मालिकांपर्यंत अगदी इरॉटिका पासून ते थरारचित्त गोष्टी, सस्पेन्स हे सगळं ऑडिओबुकमध्ये स्टोरीटेलवर आहे. ज्यांची जी आवड आहे, त्यांच्यासाठी तिथं सर्व उपलब्ध असल्याने तुम्ही इतर तुमच्या कामात व्यस्त असता तेव्हा इअर फोन लाऊन ऐकू शकता आणि आसपासच्या लोकांना कळणार नाही. हे उत्तम साधन आहे मनोरंजन आणि ज्ञानाचेही असे मला वाटते आहे.

ऑडिओबुक नेस्ट जनरेशनचं अपरिहार्य गॅजेट!– गौतमी देशपांडे

मला खूप दिवसांपासून ऑडिओबुकसाठी काम करण्याची इच्छा होती, आणि मला जेव्हा विचारलं आणि ऑडिओबुक बद्दल सांगितलं तेव्हा मी खूपच एक्सईट होते, ती कथाही तशी नवीन होती, खूप छान आणि गोड होती त्यामुळे मी ती वाचण्यासाठी खूप उत्सुक होते. हा माझ्यासाठी पहिला आणि छान अनुभव होता. मी फार पूर्वी कॉलेजमध्ये असताना नाट्यवाचन स्पर्धा केल्या आहेत पण कधी प्रोफेशनल ऑडिओबुक साठी काम केले नव्हते. पण खूप बरं वाटलं, कम्पलीटली नाट्यरूपात ते छान रेकॉर्ड झालं आहे. मी आणि ललितने ते केलं आहे. खूप मजा अली ते करताना आणि खूप छान अनुभव होता. अशी अनेक ऑडिओबुक्स प्रेक्षकांपर्यंत पोहचवायची खरच इच्छा आहे. लोकांनी या ऑडिओबुक्सचा आनंद घ्यावा कारण आताच्या काळातली सुंदर कथा आहे. प्रत्येक बेस्ट फ्रेंड मुलगा, मुलगी कि कथा ऐकताना स्वतःला रिलेट करू शकेल. त्यामुळे प्रत्येकाने हे ऑडिओबुक ऐकून त्याचा आस्वाद घ्यावा.

पन्नासहून अधिक लोकप्रिय कलाकारांच्या आवाजात ऑडिओबुक्स!– प्रसाद मिरासदार, मराठी पब्लिशिंग, स्टोरीटेल

स्टोरीटेलने गेल्या चार वर्षांपासून मराठी ऑडिओबुक्स क्षेत्रात एक नवी क्रांती आणली आहे. दोन हजारहून अधिक मराठी ऑडिओबुक्स, त्यातील शंभरहून अधिक लोकप्रिय आणि अभिजात पुस्तके प्रकाशित केली आहेत. यातील अनेक ऑडिओबुक्स पन्नास हून अधिक लोकप्रिय अभिनेत्यांच्या आवाजात रेकॉर्ड करणे हा एक विक्रमच आहे! या सर्वांमुळे मराठीत ऑडिओबुक्स प्रकाशन व्यवसाय रूजतो आहे आणि दिवसेंदिवस वाढतो आहे. अनेक मराठी कलावंत उत्तम पुस्तके वाचायला स्वतःहून पुढाकार घेत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे!

गरीब कामगारांचे पगारही खाणारी महापालिका अशी प्रतिमा बनवू नका – नितीन कदम

0

पुणे- गेली ३ महिने पगार न झाल्याने आर्थिक तणावाखाली काम करणाऱ्या महापालिकेतील एका महिलेला हृदयविकाराचा झटका आल्याचा आरोप करत , गोरगरीब कामगारांचे पगार देखील खाणारी महापालिका अशी पुणे महापालिकेची प्रतिमा बनवू नका असा स्पष्ट इशारा देत नुसत्या बड्या बड्या बाता मारणारे सत्ताधारी कामगारांच्या पोटावर ही मारत असल्याचा घणाघात राष्ट्रवादीचे नितीन कदम यांनी केला आहे.

ते म्हणाले ,’ कंत्राटी पद्धतीने असलेल्या सुरक्षारक्षक महिलेला तीन महिने पगार न मिळाल्यामुळे आलेल्या दडपणामुळे ऑन ड्युटी असताना आला हृदयविकाराचा झटका आला. गणेश कला क्रिडा येथे कार्यरत असलेल्या या महिलेला गेले तीन महिने पगार झाल्यामुळे घरातील आर्थिक परिस्थिती मध्ये प्रचंड दडपण आले होते त्यामुळेच तीन साडेतीनच्या दरम्यान तिला हृदयविकाराचा झटका आला. त्यांना भारती हॉस्पिटल येथे दाखल केले असता तातडीने उपचार मिळाल्यामुळे जीव वाचला. परंतु पगार न झाल्यामुळे आर्थिक अडचणीमुळे पुढील उपचार मिळणे जिकिरीचे झाले आहे.कोट्यावधी खर्चाचे मोठे मोठे प्रकल्पांचे पुणेकरांना स्वप्न दाखवणाऱ्या सत्‍ताधारी भाजपच्या पुणे महानगरपालिकेच्या कारभाराचे यामुळे वाभाडे निघाले आहे.

महापालिकेत कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक -आयुक्तांना रिपब्लिकनचा घेरावो

0

पुणे – गेली कित्येक वर्षे महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक आणि बेकायदेशीर पिळवणूक करणाऱ्या पुण्याच्या महापालीकेविरोधात आता आवाज उठू लागला आहे . महापालिकेच्या विविध खात्यात ठेकेदारा मार्फत काम करणारे ४ हजार कर्मचारी यांना वेळेवर पगार होत नाही म्हणून रिप्ब्लिकन पक्षा च्या वतीने आज आयुक्तांना घेराव घालण्यात आला. अखेरीसमहापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या दालनात बैठक बोलवली या बैठकी मधे आयुक्त यांनी पुढिल दोन दिवसात सुरक्षा रक्षक यांचे पगार होतील व पुढिल आठवडा मधे इतर सर्व खात्या मधिल कर्मचारी यांचे पगार होतील हे आश्वासन दिले.
तसेच जे ठेकेदार वेळेवर पगार करत नाही त्यांना काळ्या यादीत टाकायचे आदेश दिले व पुढिल महिण्यात या पद्धती मधे एक नियमावली करून ते मान्य करुन प्रत्येक कर्मचारी यांचा महिन्या च्या ७ तारखे च्या आत त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील असे आश्वासनही त्यांनी दिले
स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने , गटनेत्या फरझाना शेख, नगरसेविका हिमालीताई कांबळे, शहराध्यक्ष संजय सोनवणे , राज्याचे सहसचिव बाळासाहेब जानराव , अशोक कांबळे, अशोक शिरोळे,नगरसेवक अयुब शेख, बसवराज गायकवाड, बाबुराव घाडगे , शैलेश चव्हाण, वसंतराव बनसोडे , महिला अध्यक्ष शशीकला वाघमारे व सर्व पदाधीकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महापालिका कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के सानुग्रह अनुदान

0

पुणे- पुणे महापालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी सेवकांना पुढील पाच आर्थिक वर्षांसाठी मूळ पगार, महागाई भत्ता आणि ग्रेड पे यावर एकत्रित ८.३३ टक्के सानुग्रह अनुदान देण्यासाठी महापालिकेच्या मान्यताप्राप्त कामगार संघटनांसाठी करार करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, ‘सानुग्रह अनुदानासंदर्भातील संघटनांबरोबरचा पाच वर्षांचा करार या वर्षी संपुष्टात आला. त्यामुळे सन २०२१-२०२२ ते सन २०२४-२०२५ या कालावधीतील आर्थिक वर्षांसाठी प्रशासनाने संबंधित संघटनांबरोबर नवीन करार करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच सानुग्रह अनुदानासह दर आर्थिक वर्षी अनुक्रमे सतरा हजार, एकोणीस हजार, एकवीस हजार, तेवीस हजार आणि पंचवीस हजार जादा रक्कम अतिरिक्त सानुग्रह अनुदान म्हणून अदा करण्यासाठी करार करण्यासाठी आणि फक्त या आर्थिक वर्षासाठी महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचार्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये कोविड प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यास मान्यता देण्यात आली आहे.’

रासने पुढे म्हणाले, ‘महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, रोजंदारीवरील कर्मचारी, शिक्षण विभागामधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बालवाडी शिक्षिका, सेविका, माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागातील शिक्षक, शिक्षकेतर सेवक यांना सानुग्रह अनुदाना योजनेचा लाभ मिळणार आहे.’

फुरसुंगी, उरुळी देवाची पाणीपुरवठा योजनेसाठी निधी मंजूर

फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या विविध कामांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती रासने यांनी दिली.

रासने म्हणाले, ‘या दोन्ही गावांतील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी सन २०१७ पासून तुकाई टेकडी फुरसुंगी येथे ३३ एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प, या प्रकल्पाला पाणीपुरवठा करणारी लष्कर जलकेंद्रापासूनची मुख्य जलवाहिनी, अंतर्गत वितरण नलिका, तेरा साठवण टाक्या आदी विकासकामे सुरू आहेत. या गावांचा नुकताच महापालिकेच्या हद्दीत समावेश झाल्याने पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेवर आली आहेत. या ठिकाणची पाणीपुरवठ्याची अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी तीन कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली.’

राजीव गांधी प्राणी संग्रहालयात आशियाई सिंह खंदकासाठी निधी

कात्रज येथील महापालिकेच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात आशियाई सिंह खंदक उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, ‘केंद्रीय प्राणी संग्रहालयाच्या निकषानुसार खंदक उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व करांसहित सुमारे तीन कोटी सहा हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याशिवाय रॉयल्टी आणि चाचणीचा खर्च अनुक्रमे ३४ हजार आणि ८४ हजार रुपये इतका होणार आहे.’

आरोग्य विभागातील करार पद्धतीतील सेवकांना मुदतवाढ

कोरोना विषाणू संसर्गामुळे येणार्या संभाव्य तिसर्या लाटेचा धोका लक्षात घेऊन आरोग्य विभागातील करार पद्धतीतील सेवकांना मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, महापालिकेच्या आरोग्य विभागात वर्ग एक ते चार मध्ये सेवकांची एकूण मान्यता पदांची संख्या सोळाशे एकोणसत्तर इतकी आहे. मात्र केवळ आठशे ऐशी सेवक कार्यरत आहेत. म्हणजेच रिक्त पदांची संख्या सातशे एकोणनव्वद इतकी मोठी आहे. कोविड रुग्णालय आणि फ्ल्यू क्लिनिक सेंटरचा वाढता ताण वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्यांवर येतो.’

रासने पुढे म्हणाले, ‘त्यामुळे कंरार पद्धतीने सेवेत असलेल्या बधिरीकरण तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, ज्युनिअर नर्स, सेवक, आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, दंतशल्यचिकित्सक अशा एकूण ७३ सेवकांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.’

डी. पी. रस्ते आणि पूल विकसित करण्यासाठी सल्लागार नियुक्तीस मान्यता

शहराच्या विविध भागांतील मान्य विकास आराखड्यातील डी. पी. रस्ते आणि पूल विकसित करण्याच्या उद्देशाने विविध टप्प्यांवरील कामे पूर्ण करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, ‘बालेवाडी येथील मुळा नदीकाठच्या २४ मीटर डी. पी. रस्ता आणि बाह्य वळण रस्ता ते ज्युपिटर हॉस्पिटलजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूल, मुंढव्यातून जाणारा २४ मीटरचा रस्ता, कोंढवा बुद्रुक, कोंढवा खुर्द, उंड्रीतून जाणारे १८ मीटर आणि २४ मीटरचा रस्ता विकसित करण्यासाठी प्रकल्पांसाठी तज्ज्ञ सल्लागारांची नियुक्ती करणे, भूसंपादन करणे, पाठपुरावा करणे आणि सुलभ व सुरक्षित वाहतुकीसाठी विविध उपाययोजना करणे आदी विकासकामे करण्यासाठी आज मान्यता देण्यात आली.’

रासने म्हणाले, ‘शहरातील विकास आराखड्यातील रस्ते ताब्यात आलेल्या जागेनुसार आणि उपलब्ध तरतुदीनुसार दरवर्षी टप्प्याटप्प्याने विकसित केले जातात. रस्ते विकसनाचा खर्च, तुलनेने कमी उपलब्ध तरतूद आणि जागा ताब्यात घेताना जागा मालकांची रोख मोबदल्याची मागणी अशा कारणांमुळे डी. पी. रस्ते आणि पूल विकसित करण्यात मर्यादा येतात. अशा परिस्थितीत रस्ते विकसन खासगी सहभागातून करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाअंतर्गत रस्त्यांच्या जागा एफएसआय आणि टीडीआर यांच्या मोबदल्यामध्ये ताब्यात घेता येत आहेत.’

रासने म्हणाले, ‘रस्ते विकसनाचा खर्च विकसकास किंवा ठेकेदारास क्रेडिट नोट स्वरूपात देण्याचे प्रस्तावित करण्यात येते. ही क्रेडिट नोट पुणे महापालिकेकडे असलेल्या बांधकाम परवानगी शुल्काच्या अंतर्गत वापरता येते. तसेच ती क्रेडिट नोट हस्तांतरणीय असते, या वर्षी ११ रस्ते आणि दोन उड्डाणपूलांची कामे प्रस्तावित करण्यात आली होती. पीपीई अंतर्गत रस्ते विकसित करण्याच्या तरतुदींना गेल्या वर्षी मुख्य सभेने आणि स्थायी समितीने मान्यता दिली होती. या प्रस्तावामुळे महापालिकेला थेट गुंतवणूक न करता क्रेडिट नोटच्या बदल्यात रस्त्यांची व पुलांची कामे विकसित करण्यात येणार आहेत.’

सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीसाठी संयुक्त समिती स्थापन करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि. १८ : – सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. त्यासाठी संयुक्त समिती स्थापन करण्यात यावी. जेणेकरून प्रश्न, अडचणींच्या सोडवणुकीसाठी विभागनिहाय आढावा घेऊन निर्णय घेणे सुलभ होईल, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज  मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन आपल्या मागण्या सादर केल्या. या शिष्टमंडळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टांक, प्रदेशाध्यक्ष जयसिंग कछवा आदींचा समावेश होता.

यावेळी झालेल्या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, सामाजिक न्याय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत निश्चितच सकारात्मक विचार करण्यात येईल. यातील प्रलंबित, प्रश्न अडचणींच्या सोडवणुकीसाठी समिती स्थापन करण्यात यावी. या समितीमध्ये संघटनेचे पदाधिकारी तसेच संबंधित विभागांचे प्रशासकीय अधिकारी यांचा समावेश करण्यात यावा. या समितीने प्रलंबित प्रश्न, अडचणींचा आढावा घेऊन, त्यांच्या सोडवणुकीसाठी पर्याय, शिफारशी कराव्यात. ज्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेणे शक्य आहे, ते मार्गी लावण्याचे प्रस्ताव, पर्यायही सादर करावेत.

यावेळी शिष्टमंडळाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले, तसेच मुख्यमंत्री श्री. ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री. पटोले यांचा सत्कारही करण्यात आला.

नागपूर अधिवेशनाच्या तयारीसाठी विशेष कोविड प्रतिबंधात्मक नियोजन

0

नागपूर, दि.18 : महाराष्ट्र विधिमंडळाचे यंदाचे तिसरे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सात डिसेंबरपासून  प्रस्तावित आहे. याबाबतच्या तयारीचे नियोजन करण्यासाठी आज सर्व संबंधित विभागांची उच्चस्तरीय बैठक विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. कोविडच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनासाठी विशेष प्रतिबंधात्मक तयारी करण्यात येणार आहे.नागपूर येथे विधानभवनातील मंत्रीपरिषद दालनात प्रधान सचिव श्री.भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे- वर्मा,  जिल्हाधिकारी विमला आर , नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यांसह विविध संबंधित विभागांचे प्रमुख  उपस्थित होते.महाराष्ट्र विधान परिषद सभापतींचे सचिव म. मु. काज, उपसचिव राजेश तारवी,अवर सचिव रविंद्र जगदाळे, महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अनिल महाजन, विधानभवनाचे मुख्य सुरक्षा अधिकारी प्रदीप चव्हाण, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी तथा व सचिव सुनील झोरे, विधान भवनाच्या वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने, विधीमंडळाचे पध्दती विश्लेषक अजय सर्वणकर यांचीही यावेळी उपस्थिती होती.मुंबई येथे पुढील आठवड्यात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे.त्यादृष्टीने आजच्या बैठकीत अनुषंगिक तयारीसाठी सर्व विभागाने केलेल्या प्राथमिक तयारीचा आढावा घेण्यात आला.  यंदाचे हिवाळी अधिवेशन कोरोना पार्श्वभूमीवर होत आहे. त्यामुळे त्यात सहभागी होणाऱ्या विधिमंडळ सदस्यांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यत लसीकरणाचे दोन डोस पूर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे.  त्यामुळे अधिवेशनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला आपल्यासोबत दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणणे आवश्यक करण्यात आले आहे. याशिवाय दोन्ही डोस घेतल्यानंतरही या  अधिवेशनादरम्यान प्रत्येकाला पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट करणे अनिवार्य असेल. त्यामुळे विधीमंडळ सदस्य, त्यांचे स्वीय सहायक, सर्व अधिकारी-कर्मचारी, वृत्तसंकलनासाठी येणारे माध्यम प्रतिनिधी, सुरक्षेसाठी तैनात असणारे पोलीस, राज्यभरातून येणारे वाहन चालक या सर्वांच्या आरटीपीसीआर टेस्ट अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याची महत्त्वपूर्ण सूचना श्री. भागवत यांनी आरोग्य विभागाला आज केली. कोरोना पार्श्वभूमीवर मर्यादित प्रवेश राहील. त्यामुळे विधिमंडळ परिसरात  सभागृह सदस्यांच्या स्वीय सहायकांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यांच्यासाठीची आवश्यक व्यवस्था परिसरात करण्यात यावी. याशिवाय सभागृहामध्ये ‘सोशल डिस्टंसिंग’  राखायचे असल्यामुळे सदस्यांना एक आसन सोडून बसण्याची व्यवस्था लक्षात घेता यावेळी अभ्यागतांना कामकाज बघण्यासाठी प्रवेश दिला जाणार नाही.तत्पूर्वी, विधिमंडळ परिसरात सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात सर्वप्रथम चर्चा झाली. विधिमंडळ परिसरात नवीन इमारत कार्यान्वित झाली आहे. या  इमारतीसाठी आवश्यक असणारी सुरक्षा व्यवस्था व अनुषंगिक उपाययोजना करण्याची सूचना यावेळी करण्यात आली. यासोबतच विधान भवन, विधान भवनाबाहेर परिसर, आमदार निवास, रविभवन, 160 खोल्यांचे गाळे, सुयोग पत्रकार निवास या ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेबाबतचे निर्देश देण्यात आले. आमदार निवासामध्ये महिला आमदारांसाठी एक मजला राखीव ठेवण्यात यावा व विशेष पोलीस सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी, असे निर्देशित करण्यात आले.अधिवेशन काळात करण्यात आलेल्या वाहन व्यवस्थेबाबत तसेच पार्किंग व्यवस्थेबाबत सूचना करण्यात आल्या. दूरध्वनी व्यवस्था, वाहन व्यवस्था, अखंडित वीज पुरवठा, अहोरात्र वैद्यकीय सुविधा, नैसर्गिक आपत्तीमध्ये आपत्कालीन व्यवस्था, अग्निशमन दलाची उपलब्धता, विनाअडथळा इंटरनेट, वाय-फाय सुविधा, रेल्वे आरक्षण, खानपान व्यवस्था, अन्नपदार्थ व पेय यांची तपासणी तसेच उत्तम स्वच्छता या संदर्भातही सर्व विभाग प्रमुखांशी चर्चा करण्यात आली.

आज पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 412

0

  पुणे विभागातील 19 लाख 57 हजार 128 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

विभागात कोरोना बाधित 20 लाख 6 हजार 54 रुग्ण –विभागीय आयुक्त सौरभ राव

        पुणे दि. 18 :- पुणे विभागातील 19 लाख 57 हजार 128 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 20 लाख 6 हजार 54 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 412 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 41 हजार 514 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.07 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.56 टक्के आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

            पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 11 लाख 47 हजार 29 रुग्णांपैकी 11 लाख 23 हजार 470 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 4 हजार 630 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 929 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  1.65 टक्के इतके आहे तर बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  97.95 टक्के आहे.

सातारा जिल्हा

              सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 50 हजार 452  रुग्णांपैकी 2 लाख 42 हजार 255 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 812 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 385 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

              सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण  2 लाख 2 हजार 988 रुग्णांपैकी 1 लाख 97 हजार 324  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 610 आहे. कोरोनाबाधित एकूण  5  हजार 54  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

               सांगली  जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 99 हजार 112 रुग्णांपैकी 1 लाख 93 हजार 547 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 208 आहे.  कोरोनाबाधित एकूण 5 हजार 357 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा         

            कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण  2 लाख 6 हजार 473  रुग्णांपैकी 2 लाख 532 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 152 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 789 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 560 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 398, सातारा जिल्ह्यात 72, सोलापूर जिल्ह्यात 57, सांगली जिल्ह्यात  28 तर  कोल्हापूर जिल्ह्यात 5 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ  झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या  रुग्णांमध्ये  एकूण  1026 आहे. पुणे जिल्हयामध्ये 523, सातारा जिल्हयामध्ये 369, सोलापूर जिल्हयामध्ये 82, सांगली जिल्हयामध्ये 36 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 16 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण                           

आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 76 लाख 96 हजार 957 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  20 लाख  6  हजार 54 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

                       ( टिप :- दि. 17 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार ) 

फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम देतो सांगून पुण्यात महिलेवर अत्याचार

0

पुणे : फिल्म इंडस्ट्रीमध्ये शॉर्ट फिल्ममध्ये काम देतो, असे सांगून एका महिलेला आपल्या वासनाची शिकार करण्याचा प्रकार समोर आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील एका ३१ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी समीर बाळू निकम (वय ३२, रा. जिजाऊ बिल्डींग, नर्हेगाव) याला अटक केली आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०१७ पासून १६ ऑक्टोबर २०२१ पर्यंत फिर्यादी व आरोपीच्या घरी सुरु होता.समीर निकम हा यु ट्युबवर शॉर्ट फिल्म बनवितो. त्याने काही गाणीही बनविली आहेत. या शॉर्ट फिल्ममध्ये काम देण्याच्या बहाण्याने त्याने फिर्यादी यांच्याशी ओळख वाढविला. युट्युबवर बनविलेल्या शॉर्ट फिल्मची गाणी त्यांना दाखवून त्यात काम मिळवून देण्याचा बहाणा करुन त्यांच्याशी शारीरीक जवळीक साधली. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना मारहाण करुन वारंवार जबरदस्तीने बलात्कार केला. या त्रासाला कंटाळून त्यांनी शेवटी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे.
पोलीस उपनिरीक्षक खेतमाळस अधिक तपास करीत आहेत.

राज्यातील उपाहारगृहे, दुकाने यांच्या वेळा वाढविणार; अम्युझमेंट पार्क देखील सुरू करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि 18 : कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने  राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसेच अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्याचे ठरले. पार्क्समधील पाण्यातल्या राईड्सबाबतीत नंतर निर्णय घेण्याचे ठरले. वर्षा येथे झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  होते. या वेळी लहान मुलांच्या टास्क फोर्सचे सदस्य देखील उपस्थित होते. अम्युझमेंट पार्क देखील 22 ऑक्टोबर पासून सुरू होतील.

कोविडव्यतिरिक्त डेंग्यू, चिकनगुनिया यांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून त्यांच्या उपचारांकडे देखील पुरेसे लक्ष द्यावे, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, आपण हळूहळू निर्बंध शिथिल करीत असून रुग्णसंख्या कमी होतांना दिसते आहे. 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहेही सुरू करीत आहोत. उपाहारगृहे व दुकाने यांच्या देखील वेळा वाढवून देण्याची सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे त्यांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुलांच्या लसीकरणासंदर्भात केंद्राच्या संपर्कात राहून लस उपलब्ध करून घेणे तसेच याबाबतीत निर्णय झाल्यावर लसीकरणाची तयारी ठेवण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागास केल्या.

दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम असून नियमित मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे व हात स्वच्छ धूत राहणे खूप आवश्यक आहे असे सांगून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, याबाबतीत लोकांनी बेसावध राहू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी.

कोरोनावरील उपचारांसाठी जगात नवनवीन प्रयोग होत असून येणाऱ्या नवीन औषधांच्या बाबतीतही त्यांची परिणामकारकता, किंमत, उपलब्धता याबाबत आत्तापासूनच माहिती घेत राहावी व संबंधितांच्या संपर्कात राहावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर, मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार डॉ.दीपक म्हैसेकर, पालिका उपायुक्त सुरेश काकाणी, टास्क फोर्सचे डॉ.संजय ओक, शशांक जोशी, डॉ.राहुल पंडित, डॉ.खुसराव्ह, डॉ.अजित देसाई, डॉ.सुहास प्रभू आदी उपस्थित होते.

तेव्हा १० दिवस संसदेचं काम बंद पाडलं. आता जगात किमती कमी झाल्या तरी पेट्रोल डिझेलचे दर वाढविले – शरद पवारांचा हल्लाबोल

पुणे दि. 17

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशातील इंधन दरवाढ आणि महागाईवरून मोदी सरकारवर हल्ला चढवलाय. “मनमोहन सिंग यांच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती वाढल्यानं काही दरवाढ करावी लागली, तर आत्ता सत्तेवर असलेल्यांनी तेव्हा १० दिवस संसदेचं काम बंद पाडलं. मात्र, आज जगात या किमती कमी झाल्या तरी दर कमी झाले नाहीत,” असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं. तसेच केंद्र सध्या जो कर लावतंय त्यातील २५ टक्के कर कमी केला तरी सर्वसामान्यांना महागाईला तोंड देता येईल, असंही नमूद केलं. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी – चिंचवड शहर (जिल्हा) कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला.

मेळाव्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, वैशाली काळभोर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर मंगला कदम, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, प्रशांत शितोळे, जगदीश शेट्टी, प्रवक्ते फजल शेख आदी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, “मनमोहन सिंग  पंतप्रधान असताना मीही त्यांच्या मंत्रिमंडळात होतो. तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढले म्हणून मनमोहन सिंग यांना नाईलाजाने इंधन दरवाढ करावी लागली. आज ज्यांच्या हातात देशाची सूत्रं आहेत त्यांनी तेव्हा १० दिवस संसदेत काम करू दिलं नाही. काम बंद पाडलं. तेव्हा जगात किंमत वाढली म्हणून इथं किंमत वाढली हे कारण सांगायला होतं. आता जगात किंमत कमी झाली तरी इथं काही दर कमी झाले नाही. इथं वाढत्याच किमती ठेवल्या.”

“देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितलंय की केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवर जो कर बसवला आहे त्यातील २५ टक्के कर कमी केला तरी या वाढत्या महागाईला सामान्य नागरिकांना तोंड देता येईल. पण हे सरकार त्यावर विचार करायला तयार नाही,” असं शरद पवार यांनी नमूद केलं.वाढत्या महागाईवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. देशात रोज पेट्रोल डिझलचे दर वाढत आहेत. जगात तेलाच्या किंमती वाढल्या म्हणून भारतात वाढल्या हे सांगायला कारण झाले. मात्र जगात कींमती कमी झाल्या तरी भारतात कमी केल्या नाहीत, येथे वाढीव दरचं ठेवण्यात आले, असे पवार म्हणाले. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाची भूमिका कामगारांविरोधात आहे. जे कामगारांचे रक्षण करत नाहीत. त्या लोकांना सत्तेत बसायचा अधिकार नाही, अस म्हणत शरद पवार यांनी केंद्रावर निशाणा साधला. ईडी-सीडी लावा हे सरकार ५ वर्ष हटणार नाही, असा इशारा देखील शरद पवार यांनी विरोधकांना दिला. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. त्यासाठीची आचारसंहिता डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लागू शकते. त्यामुळे निवडणुकीला केवळ अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी राहिला आहे. महापालिकेची निवडणूक तीन सदस्यीय पद्धतीने होणार आहे. प्रभाग रचनेच्या कच्चा प्रारुप आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपल्याने राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजोग वाघेरे यांनी केले. प्रास्ताविकेच्या वेळी वाघेरे म्हणाले, प्रकृती अस्वास्थ्य असतानाही पवार साहेब नागरिकांचे, शेतकऱ्यांचे, कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करत आहेत आणि या बाबत आढावा म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील विविध प्रश्नांवर शनिवारी सुमारे सहा तास याबाबत पवार साहेबांनी चर्चा केली.

विरोधकांवर ताशेरे ओढत वाघेरे म्हणाले, पूर्वी एक रुपयाने जरी इंधन दरवाढ झाली तरी रस्त्यावर येऊन भाजपवाले आंदोलन करायचे. आता तर पेट्रोल, डिझेल शंभरीपार गेले आहे; मात्र तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि अन्य केंद्रीय मंत्री इंधन दरवाढ, शेतकरी आंदोलन, कायदे याबाबत बोलत नाहीत.

दरम्यान, महापालिकेच्या भ्रष्टाचारी व्यवस्थेचा समाचार घेत वाघेरे पुढे म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार वाढला आहे. भाजपच्या स्थायी समिती अध्यक्षाला लाच घेतल्याप्रकरणी अटक झाली, परंतु भाजपने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. शास्तीकर आणि अन्य बाबतीत भाजपने केवळ आश्वासने दिली. पवार साहेबांच्या येण्याने आम्हा कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे. आगामी महापालिका निवडणुकीत याचा चांगला परिणाम दिसेल, असे म्हणत संजय वाघेरे यांनी कार्यकर्यांना शाब्दिक बळ दिले.

तर, कार्यक्रमप्रसंगी माजी आमदार विलास लांडे म्हणाले, पवार साहेबांना भेटण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची आम्ही चौकशी करण्यापूर्वी त्यांनी शहराबद्दल चौकशी केली. त्यांना पिंपरी चिंचवड शहराबद्दल एवढी आत्मीयता आहे. तरुणांना लाजवेल असे काम त्यांनी केले आहे. पिंपरी चिंचवड शहरात आयटी, उद्योग क्षेत्र आणण्यासाठी पवार साहेबांनी काम केले आहे. आपलीच काही जित्राबं दुसरीकडे गेली. ज्यांची लायकी नाही त्यांना मोठं केलं असे म्हणत लांडे यांनी खेद व्यक्त केला तसेच शहरातील जनता भाजपच्या कारभाराला कंटाळली असल्याचे सुद्धा पुढे म्हणाले.

आजचा कार्यकर्ता मेळावा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नसून शेतकरी कायदे, शेतकरी आंदोलन, लखीमपूर येथील दुर्दैवी घटना अशा विविध मुद्द्यांवर भाष्य करण्यासाठी हा मेळावा असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले. देशातील अन्यायकारी वागणूकीवर उत्तरादाखल कोल्हे म्हणाले, इंधन दरवाढ, शेतकरी आंदोलन यावर सध्या केंद्राचे ‘मौनुम खलम सर्वार्थ साधनम’ असे धोरण आहे पण या विरोधात 80 वर्षांचा तरुण मैदानात उतरला आहे.

वाढच्या इंधन दरवाढीचा समाचार घेताना कोल्हे म्हणाले, मोफत लस देण्यासाठी इंधन दरवाढ केली जात असल्याचे केंद्र सरकार उत्तर देत आहे. प्रत्येक खरेदीवर सर्वसामान्य नागरिक चार टक्के कर देतो. त्यातून हजारो कोटींचा निधी जमला आहे. तरीही केवळ लसीसाठी इंधन दरवाढ केली जात आहे, ही लाजिरवाणी गोष्ट आहे.

शहरातील सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारावर टीका करताना कोल्हे पुढे म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराचा पुढील 75 वर्षांचा विचार करून नियोजन केले आहे. 2017 पूर्वी पिंपरी – चिंचवडची ओळख प्रगतीबाबत होत होती. पिंपरी चिंचवड शहरात संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक स्थायिक झाले आहेतस त्यामुळे त्यांना शहरात चांगले वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. महापालिकेत भाजपने केलेली भ्रष्टाचारमुक्त केवळ 10 कामे दाखवा, पुन्हा शहरात येणार नाही, त्यामुळे या शहरात राहून आपली स्वप्नं साकार करणाऱ्यांसाठी ही कामे सांगा, असे आवाहन कोल्हे यांनी केले. 2017 च्या निवडणुकीत भाजपने लोकांच्या हाती केवळ गाजर दिले, असेही कोल्हे म्हणाले.

दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधात बसायचं ठरलं होतं. पण शरद पवार साहेबांनी समीकरणे जुळवून आणली आणि महाविकास आघाडीचे सरकार बनवले. अडीच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदी यांनी जनतेला स्वप्न दाखवलं होतं. पण आज केंद्र सरकर शेतकरी कामगारांच्या विरोधात काम करत आहे.

विरोधकांना धारेवर धरत पाटील म्हणाले, नैसर्गिक आपत्ती, कोरोना काळात हात आखडता घेऊन भूल भुलैय्या करायचे काम चालू आहे. महागाई वरील जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी काहीतरी कारण काढून विरोधी पक्षाला नामोहराम करण्याचे काम सुरू आहे.

शहराबद्दल बोलताना गृहमंत्री म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरात मागील महापालिका निवडणुकीपूर्वी इथल्या जनतेला आश्वासने दिली. त्यापूर्वी पिंपरी चिंचवड शहरात पिण्याचे पाणी, कचरा प्रश्न, टाऊन प्लॅनिंग, वाहतूक कोंडी हे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसने काही अंशी सोडवले, पण पुढील काळात आपल्याला आणखी जास्त काम करायचं आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा घेतला जात आहे का, असे विचारले जाते. पण ताकाला जाऊन गाडगं लपवायचे कारण नाही, असे म्हणत काही चुकलं असेल तर त्यावर वरिष्ठांनी बसून नियोजन करायला हवं. सर्वसामान्य कार्यकर्त्याला देखील निवडणुकीत आपला नंबर लागावा अशी इच्छा आहे. ती इच्छा पूर्ण होईपर्यंत काम करायचं आहे. शहरातील सर्व प्रश्नांच्या बाबतीत आम्ही सगळे सर्वसामान्य जनतेच्या सोबत आहोत असे दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रम प्रसंगी अरुण बोराडे यांनी कामगारांच्या समस्या मांडल्या. कामगारांबद्द बोलताना बोराडे म्हणाले, हिंदुस्थान अँटिबायोटिक सारख्या कंपनीला सुरू ठेवण्यासाठी पूर्वीच्या सरकारने कोट्यावधींचा निधी दिला. त्यावेळी सरकार कामगारांच्या पाठीशी असल्याने कामगारांना पाहिजे तेवढे उत्पन्न देत होते. परंतु सन 2014 साली केंद्रातील नेतृत्व बदलले आणि एच ए कंपनीतील कामगारांचे तब्बल 16 महिने पगार रखडले.

मात्र पवार साहेबांना याबाबत मध्यरात्री मेल करून सांगितले असता मध्यरात्रीच साहेबांनी रिप्लाय देऊन मुंबईला बोलावून घेतलं. साहेबांनी मोदींना फोन केला आणि मोदींनी त्यांच्या सचिवांना आदेश दिले की पवार साहेब म्हणतील तसं करा. त्यानंतर केंद्राने 100 कोटी रुपये कामचलाऊ म्हणून दिले. पण हा निधी कमी होता. त्यानंतर 280 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव साहेबांनी पुन्हा केंद्राकडे पाठवला. बजाज, सेंच्युरी एन्का अशा अनेक कंपन्यांचे प्रश्न आहेत. कामगार कायद्याने कामगारांना वाली राहिला नाही. नव्या कायद्यानुसार कंपनीला वाटेल तेंव्हा कंपनी कामगारांना काढू शकते, असे बोराडे म्हणाले.

“मोदीजी, आता कुणाच्या नशीबाने इंधनाचे भाव वाढतायत, तुमच्या की जनतेच्या ?”

0

मुंबई – देशात मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढ झाली आहे. वास्तविक पाहता, आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कमीच आहेत. मात्र केंद्र सरकारने लावलेल्या अवाच्या सव्वा करांमुळे पेट्रोल-डिझेलने शंभरी पार केली. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खोचक सवाल केला आहे.

देशात पेट्रोलचे दर वाढून ११० रुपये प्रति लिटर झाले आहे. डिझेलही शंभरी गाठत आहे. सीएनजी आणि एलपीजीचे भाव वाढत आहेत. जगात क्रूड ऑईलच्या तुलनेत देशातील इंधनाची दरवाढ नाही. युपीएचे सरकार असताना भाजपचे नेते सांगायचे की, आम्हाला सत्ता द्या आम्ही इंधनदर कमी करु. “बहुत हुई मंहगाई की मार, अब की बार मोदी सरकार”. पेट्रोल दरवाढीचे भांडवल करुन मोदी सरकार सत्तेवर आले. सत्तेवर आल्यानंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीच्यावेळी जागतिक स्तरावर क्रूड ऑईलचे दर कोसळल्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले. त्यामुळे मोदी साहेब दिल्ली निवडणुकीच्या प्रचारात म्हणत होते की, “मेरे नसीबसे दाम कम हो रहे है”, असं बोलणारे मोदीजी आता कुणाच्या नशीबाने भाव वाढत आहेत. तुमच्या नशीबाने की जनतेच्या नशीबाने? कोण कमनशीबी आहे? देशातील जनता की तुम्ही? याचे उत्तर मोदींनी द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

पुण्यात जात पडताळणी समिती उपायुक्ताच्या घर झडतीमध्ये तब्ब्ल ‘२ कोटींची मालमत्ता’

0

पुणे : जात प्रमाणपत्र पडताळणी करुन ते वैध करण्यासाठी ८ लाख रुपयांची लाच मागून प्रत्यक्षात १ लाख ९० हजार रुपये स्वीकारताना (Anti Corruption Bureau) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उपायुक्ताला आज सकाळी रंगेहाथ पकडले होते. नितीन चंद्रकांत ढगे (वय ४०) असे या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्ताचे नाव आहे. वानवडी येथील ढगे यांच्या निवासस्थानाजवळ शनिवारी रात्री रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या निवासस्थानाच्या घर झडतीमध्ये १ कोटी २८ लाख ४९ हजारांच्या मालत्तांच्या कागदपत्रांसहित २ कोटी ८१ लाख ८९ हजार इतक्या किंमतीची मालमत्ता मिळून आली आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात नितीन ढगे हे उपायुक्त तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य आहेत. तक्रारदार यांच्या पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. ते प्रमाणपत्र वैध करण्याकरीता ढगे याने ८ लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदारांनी याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात ढगे यांनी तडजोड करुन २ लाख रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तक्रारदार यांना ढगे यांनी पैसे देण्यासाठी वानवडीतील आपल्या निवासस्थानाजवळ बोलाविले होते. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदाराकडून १ लाख ९० हजार रुपयांची लाच घेताना ढगे यांना पकडण्यात आले. वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली आहे.

4 कोटींपेक्षा अधिक असंघटित कामगारांची ई – श्रम पोर्टलवर नोंदणी, असंघटित कामगारांवरील भारताचा पहिला राष्ट्रीय डेटाबेस

0

ई – श्रम मध्ये नोंदणी केल्यास असंघटित कामगारांना सरकारी योजनांचा लाभ सहज मिळू शकेल : भूपेंद्र यादव

नवी दिल्ली-दोन महिन्यांपेक्षा कमी काळात, 4 कोटींपेक्षा अधिक कामगारांनी ई–श्रम पोर्टलवर नोंदणी केली आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयाचे मंत्री भूपेंद्र यादव यांनी द्विट द्वारे ही माहिती दिली. ते म्हणाले, नोंदणी करून असंघटित कामगारांना सरकारी योजनांचा लाभ सहज मिळू शकेल.बांधकाम, वस्त्रोद्योग, मासेमारी, गिग आणि प्लॅटफॉर्म(ई-कंपन्या)  काम, रस्त्यावरील विक्री, घरगुती काम, शेती आणि संलग्न, वाहतूक क्षेत्र अशा विविध व्यवसायातील कामगारांनी पोर्टलवर नोंदणी केली आहे. यापेकी काही क्षेत्रांमध्ये स्थलांतरित कामगारांचा देखील समावेश आहे. स्थलांतरित कामगारांसह सर्व असंघटित कामगार आता ई–श्रम पोर्टलवर केलेल्या नोंदणीच्या माध्यमातून विविध सामाजिक सुरक्षा आणि रोजगारावर आधारित योजनांचा लाभ घेऊ शकतात.

ताज्या अद्ययावत माहितीनुसार कामगारांनी (77 %) खूप मोठ्या प्रमाणात सीएससी द्वारे आपली नोंदणी केली आहे. सीएससीचा प्रसार कमी सुविधा असलेल्या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण घटक म्हणून पाहिला जात आहे.कामगारांना पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी त्यांच्या जवळच्या सीएससीला भेट देण्यास प्रोत्साहित केले जाते आणि या योजनेचा लाभ त्यांनी घ्यावा, जेणेकरून विविध कल्याणकारी कार्यक्रम राबविताना अखेरच्या व्यक्तीपर्यंत ते पोचविणे सहज शक्य होऊ शकेल.

राज ठाकरे यांच्या नावाखाली खंडणी मागण्याचा प्रकार उघडकीस

0

तीन जणांना अटक; एका मराठी अभिनेत्रीला देखील बजावली नोटीस

मुंबई-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या एका टोळीचा मुंबई पोलीसांनी पर्दाफाश केला असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्दर्शक मिलन वर्मा, निर्माते युवराज बोराडे आणि त्यांचे चालक सागर सोलंकर याचा देखील समावेश आहे. तसेच राज ठाकरे यांच्या नावाखाली खंडणी मागितल्या प्रकरणी एका मराठी अभिनेत्रीला देखील नोटीस बजावली आहे. ही अभिनेत्री मनसेची कार्यकर्ता असल्याची माहिती मिळत आहे.

आरोपींनी महाड परिसरातील एका इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला खंडणीवरून मारहाण केली होती. त्यानंतर सदरील प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. त्या व्हिडीओमध्ये महिला त्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करतांना दिसत आहे. तसेच “राजसाहेबाला नाही ओळखत, महाराष्ट्रात आहेस तू… तुला मराठी येत नाही” असे म्हणत त्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आली होती. सुरक्षा रक्षकाने सदरील प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानंतर पोलीसांनी चौकशी करून राज ठाकरे यांच्या नावाने खंडणी मागणाऱ्या टोळीला अटक केली आहे. तर सदरील महिलेला नोटीस देखील बजावण्यात आली आहे.