Home Blog Page 2157

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नका- फडणवीस

0

मुंबई-ओबीसी आरक्षणावरुन सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका लढवण्याची नामुष्की ओढवल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

राज्य सरकारने गेली दोन वर्ष फक्त केंद्राकडे बोटं दाखवली असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. या दोन वर्षात सरकारने खरंच ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न केले असते, इम्पेरीकल डेटा तयार केला असता, तर आज ओबीसी आरक्षण गमावण्याची वेळ आली नसती, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

दरम्यान, ओबीसी आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायायलयात झालेल्या सुनावणीत राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. ओबीसी आरक्षणासंदर्भात इम्पिरिकल डेटा केंद्राने उपलब्ध करून द्यावा, अशी राज्य सरकारची वारंवार मागणी होती. केंद्र सरकारकडून सुनावणीआधी सर्वोच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्र देण्यात आले होते. तसेच सर्वोच्च न्यायालयाकडून ते मान्य करण्यात आले होते. मात्र 2011 च्या डेटामध्ये काही सदोष गोष्टी घडून आल्या होत्या. या डेटामध्ये अनेक चुका देखील झाल्याचे सांगितले जात आहे.

राज्य सरकारने इम्पिरिकल डेटा केंद्र सरकारने गोळा करून द्यावा आणि माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केंद्र सरकारला केली होती. परंतु केंद्राने डेटा उपलब्ध करून देण्यासाठी नकार दिल्याने राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे.

आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घ्या; सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश

0

नवी दिल्ली-स्थानिक स्वराज्य निवडणुका ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय खुल्या प्रवर्गातून घ्या असे असे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. आता राज्य सरकारने निवडणुका पुढे ढकलाव्या अशी मागणी विरोधकांकडून होत आहे.

पुढील सुनावणी 17 जानेवारीला

एक तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन महिन्यांनी घ्या, त्या दरम्यान डेटा गोळा करा. किंवा दुसरे म्हणजे ओबीसी राजकीय आरक्षण रद्द करून प्रवर्ग खुले करा असे पर्याय न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जानेवारी 2022 रोजी होणार आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारने इम्पिरिकल डेटा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे केली होती. परंतु, केंद्राने हा डेटा राज्यांना देता येणार नाही असे म्हटले होते. यानंतर राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. केंद्राने कोर्टात दिलेल्या नवीन प्रतिज्ञापत्रात सुद्धा इम्पिरिकल डेटा देण्यास नकार दिला आहे.

काँग्रेसमुळे इम्पिरिकल डेटा सदोष

आता महाराष्ट्र सरकारचे पुढील पाऊल काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी आरक्षण निवडणूक आयोगाने रद्द करण्याचा निकाल दिला होता. त्यानंतरच राज्य सरकारने केंद्र सरकारकडे ओबीसी समाजाच्या इम्पिरिकल डेटाची मागणी केली होती. 2011 ची आकडेवारी सदोष आहे असे केंद्राने म्हटले होते. पुन्हा नकार देताना केंद्राकडून तेच कारण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, 2011 चा इम्पिरिकल डेटा सदोष असण्यासाठी त्यावेळी असलेल्या काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सरकार जबाबदार आहे असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, येत्या काही दिवसांत राज्यात काही ठिकाणी महानगरपालिका निवडणुका होणार आहेत. अशात सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला डेटा तयार करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत द्यावी अशी विनंती बुधवारी झालेल्या सुनावणीत करण्यात आली आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कुठे आणि कधी?

येत्या 21 डिसेंबरला 105 नगरपंचात निवडणुका होणार आहेत. याच दिवशी भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद आणि त्याच्या अंतर्गत येणार्‍या 15 पंचायत समित्यांच्या निवडणुका देखील आहेत. औरंगाबाद, नवी मुंबई, वसई-विरार आणि कल्याण-डोंबिवलीसह कोल्हापूर महानगरपालिकांची मुदत आधीच संपली. तर फेब्रुवारीमध्ये मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला, नागपूर अशा 10 मोठ्या महानगपालिकांची मुदत संपुष्टात येत आहे.

मार्च 2022 मध्ये एकूण 25 जिल्हा परिषदांची मुदत संपणार आहे. यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.

इतर राज्यांनाही फटका

केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर याचा फटका मध्यप्रदेश आणि तामिळनाडूसह कर्नाटकला देखील बसला असून त्यांनी सुद्धा याचिका दाखल केल्या आहेत. त्यांना देखील डेटा मिळत नसल्याने त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली.

इम्पिरिकल डेटा म्हणजे काय?

देशात एखादा समुदाय मागास आहे की नाही याचे निकष ठरवण्यासाठी त्या समुदायाची विशलेषणात्मक माहिती गोळा केली जाते. यामध्ये असलेल्या विषयांची माहिती ही वैयक्तिक विचार किंवा मतांवर आधारित नसते तर त्यात तथ्य तपासले जातात. आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक यासोबतच राजकीय मागासलेपण स्पष्ट करणारी ही आकडेवारी असते. त्यालाच इम्पिरिकल डेटा असे म्हटले जाते.

या माहितीमध्ये एखाद्या विशिष्ट समुदायात किती लोक शिक्षित आहेत, नोकरीला आहेत, त्यांचा उदरनिर्वाह काय आहे, आरोग्य कसे आहे या सर्व गोष्टी तपासल्या जातात. परंतु, 2011 च्या जनगणनेनुसार गोळा केलेली माहिती ही सदोष असल्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे.

पुण्यातल्या कोणत्या मनसे नेत्यांमुळे रुपाली पाटलांना झाला त्रास …(व्हिडीओ)

पुणे । माजी नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे यांची संपूर्ण अनकट पत्रकार परिषद.वाघिणीने का सोडले मनसेला …?पुण्यातील ‘कोणत्या’मनसे नेत्यांमुळे त्रास झाला ? त्या कोणाला योग्य वेळी उत्तर देणार? …जास्त वेळ बोलले तर मी भावनिक होईल ..आणि .. असे का म्हटल्या रुपाली पाटील ?..१४ वर्षे काम केल्यावरही पक्ष सोडण्याची वेळ का आली ?

”मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे.. आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देत. यापुढेही आपले आशीर्वाद आणि “श्री.राज ठाकरे” हे नाव ह्रदयात कोरलेले कायम राहिल’ अशी भावना व्यक्त करत रुपाली पाटील  यांनी मनसेचा राजीनामा दिला आहे.रुपाली पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. बुधवारी मनसेच्या सदस्याचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला असून पक्षातील वरिष्ठ नेत्यांना कारण सांगितले असल्याचे रुपाली पाटील यांनी सांगितले. रुपाली पाटील म्हणाल्या, ”मी पक्षाला नाव ठेवून जाणार नाही, मला राजसाहेब, मनसे कार्यक्रर्त्यांनी मला भरभरुन प्रेम दिलं. मनसे सैनिक खूप भावनिक, जीव लावणारे आहेत, त्यांना ही गोष्ट माहिती आहे. राजकारणात काम करीत असताना चुका होत असतात. मी काही देव नाही, की चुकणार नाही, असे नाही. मी चुकले तर मला समजून घेणारे नेतेही असतात. मनसेतील रिकामटेकड्या नेत्यामुळे मी जात आहे. याबाबत मला वाद घालायचा नाही. प्रत्येक पक्षाची ध्येय धोरणं असतात. मी ज्या पक्षात जाईल त्या पक्षाच्या ध्येयधोरणानुसार काम करणार आहे. मला लोकांची कामे करायची आहेत,” ”मनसे सोडताना भावनिक होणारच पण शेवटी निर्णय घ्यावा लागणारच होता. रामाच्या वनवासाप्रमाणे माझाही ही चैादा वर्षांचा वनवास संपल्यानंतर मी ‘जय श्रीराम’म्हणून मी पुढे जात आहे. आहे. मी कुठल्याही पक्षात गेले तरी माझी शैली तीच राहिल, तुम्हाला तिचं रुपाली पाटील दिसेल,” असे त्या म्हणाल्या. ”माझ्या मनात कुठेही कुटता नाही. राज ठाकरे माझे दैवत आहेत,” असे रुपाली पाटील म्हणाल्या”मनसे अध्यक्ष राज ठाकरे कायम ह्रदयात राहतील मनसेतून बाहेर पडल्यानंतर सध्या दोन राजकीय पक्षांकडून ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भूमिका जाहीर करणार असल्याचे रुपाली पाटील यांनी सांगितले.उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच शिवसेनेचे नेते वरुण देसाई यांना काल मी मुंबई भेटले. मात्र पक्ष प्रवेशाबद्दल अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे रूपाली पाटील यांनी सांगितले. पक्षाने मला सन्मान आणि पदे दिली , त्यामुळे मला काय दिले नाही हा माझा वादाचा मुद्दाच नाही, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

रुपाली पाटील यांची पुण्यात मनसेच्या आक्रमक नेत्या आणि डॅशिंग नेत्या म्हणून ओळख होती. महिला, युवक-युवतींच्या प्रश्नांवर त्यांनी विशेष कामं केली. स्थानिक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरील आंदोलनात त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यामध्ये त्यांनी तुरुंगवास देखील भोगला आहे.याआधी त्यांनी पुणे महापालिकेत त्या माजी नगरसेविका होत्या. मनसेत प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उपाध्यक्षा आणि पुणे मनसेच्या महिला शहराध्यक्षापदही भुषावले होते. तसंच पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सुद्धा रुपाली पाटील यांनी लढवली होती. पण, यात त्यांचा पराभव झाला.

मनसेच्या वाघिणीने का सोडला पक्ष ?

पुणे- ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातील मनसेची वाघीण म्हणून ओळखली जाणारी माजी नगरसेविका रुपाली पाटील यांनी मनसे का सोडली ? या प्रश्नाचे खरे उत्तर अजूनही मिळू शकलेले नाही . घरात दोनच कर्त्या व्यक्ती असतात पण देखावा मात्र ४/५ व्यक्ती करत असतात आणि अशा स्थितीतही जे घर चालवितात त्यातील एकाने घर सोडून जावे अशी पुण्यातील मनसेची अवस्था झाली आहे. नेतृत्वातील आपसातील रस्सीखेच या मागे कारणीभूत आहे कि ,अन्य काही कारण आहे ? असे अनेक प्रश्न यामुळे राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहेत . मनसे सोडल्यावर त्या कुठल्या पक्षात जातील या पेक्षा त्यांनी पक्ष का सोडला हा प्रश्न मनसे च्या कार्यकर्त्यांनाच नाही तर मनसे च्या जे काही असतील त्या चाहत्यांनाही भेडसाविणार आहे . आता शहरात त्यांच्या नंतर त्यांची उणीव भरून काढणारी दुसरी कोणी महिला कार्यकर्ती आहे काय ? याकडेही लक्ष वेधले जाणार आहे .

सभांना प्रचंड गाजविणारा, सोशल मिडियातून अफाट प्रसिद्धी मिळविणारा हा पक्ष कधीही आपली हीच ताकद मतांमध्ये परावर्तीत करू शकलेला नाही त्यामुळे कोणत्याही स्तरावरून गोर गरीब आणि प्रामाणिक माणसापर्यंत किती खोलवर रुजला ? कि अफाट माया गोळा करण्यासाठी संसारे उधवस्त करणारे धंदे किंवा बेकायदा बांधकामे करणारे यांनी काबीज करून ठेवलाय ? अशा विविध प्रश्नांचा खल रुपाली पाटलांच्या प्रश्न सोडण्याने निर्माण होत आहेत .

पुण्यात जेव्हा मनसे ने सुरुवातीलाच भरारी घेतली तेव्हाचे अनेक जण आता प्रवाहात दिसत नाहीत अर्थात आता ती माणसे ला आत्ता किरकोळ वाटत असली तरी त्यांनीच मनसेचे हे नेते येथे घडविले होते आणि तेच नेते आपल्याला , नेता बनविणाऱ्या कार्यकर्त्यांना दूर सारत नव्यांना स्वीकारत , कधी बदल घडवीत स्व वर्चस्व मात्र कायम राखत आले . आणि आपल्याहून मोठा इथे कोणी नको या वर्चस्वातून रुपाली पाटलांची घुसमट झाली काय ? असा हि प्रश्न उपस्थित होतोच आहे. महापालिका गाजविणारी , शहरातील काय राज्यातील महिलांची भक्कम आघाडी निर्माण करणारी रुपाली पाटील यांच्या जाण्याने मनसे नेतृत्वाने काहीही म्हटले तरी मनसे ला नुकसान तर सहन करावे लागणारच आहे. पण मनसे ला अजूनही यापुढेही आपल्यात असे कार्यकर्ते टिकवून ठेवता येतील काय ? असेही प्रश्न या निमिताने पुढे यत आहेत .

आगामी महापालिका निवडणुकीत रुपाली पाटलांना स्वतःचेच काय अन्य महिला/ पुरुष कार्यकर्त्यांसाठी मनसेची उमेदवारी मिळविणेही कठीण नव्हते आणि त्या ज्या पक्षात जाणार असतील तिथे हि त्यांना उमेदवारी मिळणार आहेच .त्यांना त्यांच्या राजकीय परिस्थितीत पक्ष बदलाने काही विशेष फरक पडेल असा दावा कोणी करतही नाही . मग त्यांनी पक्ष का सोडला ? या प्रश्नावर जास्त भर दिला जाऊ शकणार आहे .

विजयस्तंभ शौर्यदिनाचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना

0

मुंबई, दि. 14 : शौर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाच्या परिसरात मूलभूत सोयी-सुविधा, सुशोभिकरण व अन्य विकासाची कामे तसेच शौर्य दिन, अन्य अल्पकालीन व दीर्घकालीन उपक्रमांचे आयोजन व नियोजन यापुढे सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात येणार आहे. येत्या 1 जानेवारी रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात झालेल्या बैठकीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली.

        सामाजिक न्याय मंत्री श्री.मुंडे म्हणाले, दरवर्षी 1 जानेवारी रोजी देशभरातून कोरेगाव भीमा येथे अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात, त्यांना आवश्यक सोयी-सुविधा तसेच विजयस्तंभ व परिसराचा विकास कमीत कमी वेळेत केला जावा यासाठी व्यापक प्रयत्न केले जातील, या अनुषंगाने नियोजन करण्यात यावे. विजयस्तंभ ऐतिहासिक असून लाखो अनुयायांचे प्रेरणास्थळ आहे. या स्थळाचा विकास व सुशोभीकरण यासाठी 100 कोटी रुपयांचा बृहत विकास आराखडा तयार करून मान्यतेसाठी एक महिन्याच्या आत सादर करावा, असेही श्री.मुंडे यांनी सांगितले.

         विजयस्तंभ व परिसराचा विकास करताना भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जावी यासाठी जिल्हाधिकारी, पुणे, यांच्यामार्फत भूसंपादन प्रक्रियेचा 30% निधी तातडीने वितरित करण्याच्या सूचनाही सामाजिक न्याय मंत्री श्री.मुंडे यांनी दिल्या.

        यापुढे 1 जानेवारी शौर्यादिनाचे आयोजन व नियोजन देखील सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत केले जाणार असून, 1 जानेवारी, 2022 च्या शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाचे काटेकोरपणे नियोजन केले जावे, तसेच या अभिवादन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्याचे नियोजन करण्यात यावे, अशा सूचना देखील श्री.मुंडे यांनी पोलीस, महसूल व अन्य संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

        बृहत विकास आराखडा तयार करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी व समाज कल्याण आयुक्त यांची समितीही गठीत करण्यात आली आहे. याशिवाय एक जानेवारीच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठीही एक समिती स्थापन करण्यात आली असून या समितीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, पुण्याचे पोलीस आयुक्त, बार्टीचे महासंचालक धम्मज्योति गजभिये, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.  

        बैठकीस अपर मुख्य सचिव श्रीमती जयश्री मुखर्जी, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सहसचिव दिनेश डिंगळे, गृह विभागाचे सहसचिव संजय खेडकर, पुणे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्रीमती संगीता डावखरे  आदी उपस्थित होते.

एकीकडे पुण्यात नदीतून मेट्रो जात असताना दुसरीकडे राज्यपालांनी गणेश मंडळांनी करावी पर्यावरण जागृती असे केले वक्तव्य

0

मुंबई, दि. 14 : गणेश मंडळांनी मोठ्या आकाराच्या मूर्तीचा आग्रह न धरता आपल्या कार्याची उंची व व्याप्ती वाढवावी तसेच  मंडळांच्या माध्यमातून पर्यावरण जागृतीचे कार्य करावे असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

राज्यपालांच्या हस्ते राज्यस्तरीय पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धा व सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेतील निवडक विजेत्यांचा राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन लोकशाही न्यूज चॅनेल तर्फे करण्यात आले होते.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला गणेशोत्सव आता महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून देशाच्या कानाकोपऱ्यात तसेच विदेशातही साजरा केला जातो. गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून पर्यावरण जागृतीचे कार्य सर्वदूर  झाले पाहिजे. गणेश मंडळांनी पर्यावरण रक्षणासोबतच स्वच्छतेचेही काम केले पाहिजे, असेही राज्यपालांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते ठाणे येथील संदीप गाढवे, विले-पार्ले येथील प्रकाश महाडिक, बदलापूर येथील पुंडलिक नरेकर, ठाणे येथील गौरव गावंड, विरार येथील दिलीप माने, रविंद्र आणि साक्षी चौघुले, भांडुप येथील आकाश चंद्रशेखर उद्धारकर, रत्नागिरी येथील संजय वर्तक, कुर्ला येथील प्रकाश कटके व आग्रीपाडा येथील प्रेतेश राजेश शिंदे यांना पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धेतील पुरस्कार देण्यात आले.

हिमांशु वसंत पवार, संकल्प मित्र मंडळ, अभिषेक नामदेव जोरी, बालगोपाल मित्र मंडळ, अलिशा दीपक भोगले, युवा गणेशोत्सव मंडळ, दादर, लौकिक श्रीरंग चव्हाण, नायगाव जयभवानी मित्र मंडळ व अक्षय अशोक पाटील शिवछत्रपती मंडळ यांना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.यावेळी लोकशाही न्यूज चॅनेलच्या विविध पदाधिकाऱ्यांचादेखील राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  

पुण्यात गुरुवारपासून तर मुंबईत उद्यापासून सुरू होणार सर्व शाळा

0

पुणे/मुंबई -ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 1 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आता हळूहळू राज्यातील महापालिका हद्दीतील शाळा सुरू करण्यास मनपाने परवानगी दिली आहे. मुंबईत उद्यापासून म्हणजे 15 डिसेंबरपासून पहिली ते सातवी पर्यंत शाळा सुरू करण्यास मुंबई महानगरपालिकेने मंजुरी दिली आहे.तर पुण्यात देखील गुरुवारपासून शाळा सुरू होणार आहेत. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतला आहे. कोरोना नियमांचे पालन करत शाळा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता शाळेत किलबिलात पाहायला मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील शाळा एक डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.मात्र दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभुमीवर अनेक जिल्ह्यात शाळा सुरू करण्यास स्थानिक प्रशासनाने मंजुरी दिली नव्हती. त्यात, मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील शाळा काही दिवस बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ

मार्केट यार्डात सुरक्षा रक्षक ठेवा ;आमदार माधुरी मिसाळ यांची मागणी

0

पुणे : मार्केट यार्डातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नियुक्त करावेत अशी मागणी आमदार माधुरी मिसाळ यांनी केली.पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती (मार्केट यार्ड) येथील मुख्य बाजार आणि परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत मिसाळ मार्गदर्शन करीत होत्या.

परिसरातील वाढते अतिक्रमण, वाहनतळ व्यवस्था, शिवनेरी रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी याबाबत मिसाळ यांनी सूचना केल्या.बाजार समितीचे प्रशासक मधुकर गरड, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप, उपायुक्त अविनाश सपकाळ, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा अरुण हजारे, सहाय्यक आयुक्त गणेश सोनुने, विभागीय अतिक्रमण निरीक्षक डी. आर लंधे यांची प्रमुख उपस्थिती होती.

एकीकडे थकबाकीदारांसाठी अभय योजना तर दुसरीकडे अग्निशमन सेवा शुल्कात वाढ -स्थायी समितीचे निर्णय

0

पुणे- ज्यांची मिळकत कराची थकबाकी १कोटी रुपयांच्या आत आहे अशांना दंड आणि व्याज रकमेत ७५ टक्के सुट देणारी अभय योजना मंजूर करताना स्थायी समितीने दुसरीकडे मात्र अग्निशमन सेवा शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव संमत केला आहे.

मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना राबविण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.रासने म्हणाले, ज्या मिळकतकरधारकांची मूळ मिळकतकर आणि २ टक्के शास्ती अशी एकूण थकबाकी १ डिसेंबर २०२१ रोजी एक कोटी रुपयांपेक्षा कमी आहे अशांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे. मोबार्इल टॉवरच्या थकबाकीसाठी ही योजना लागू होणार नाही. थकबाकीदाराला २० डिसेंबर ते २६ जानेवारी २०२२ या कालावधीत एकरकमी थकबाकी भरावी लागणार आहे. त्या थकबाकीदारांना शास्तीच्या रकमेत ७५ टक्के सवलत देण्यात येणार आहे.रासने पुढे म्हणाले, सद्यस्थितीत मिळकतकराची थकबाकी सात हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यामध्ये चक्रवाढ व्याजाने दोन टक्के शास्तीची रक्कम मूळ मागणीपेक्षा जास्त म्हणजेच चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मागील वर्षी २ ऑक्‍टोबर ते २६ जानेवारी या कालावधीत अक्षय योजना पन्नास लाख रुपयांपर्यंत थकबाकी असणार्यांसाठी अभय योजना राबविण्यात आली होती. या योजनेत एक लाख एकोणपन्नास हजार मिळकतधारकांनी सहभागी होत ४८५ कोटी रुपयांचा कर महापालिकेकडे जमा केला. तथापी अद्याप थकबाकी असलेल्या मिळकतधारकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नव्याने अभय योजना राबविण्यात येत आहे.
अग्निशमन सेवा शुल्क मान्यता
अग्निशमन दलाकडून उंच इमारतींना तसेच विशेष वापराच्या विविध इमारतींना आग प्रतिबंधक उपाययोनांच्या दृष्टीने करावयाच्या यंत्रणेसाठी प्राथमिक आणि अंतिम ना हरकत प्रमाणपत्र देताना अग्निशमन सेवा शुल्काच्या सुधारीत दरांना स्थायी समितीने मान्यता दिली.याबाबत रासने म्हणाले, पंधरा मीटर उंचीपर्यंतच्या विशेष वापराच्या विविध प्रकारच्या भोगवटा असणार्या ५०० चौरस मीटरपर्यंत क्षेत्रफळ असणार्या आणि ५०० चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असणार्या इमारतींना अनुक्रमे २५ रुपये प्रती चौरस मीटर (किमान पंचवीस हजार रुपये) आणि ५० रुपये प्रती चौरस मीटर (किमान पन्नास हजार रुपये) शुल्क आकारले जाणार आहे. ही शुल्कवाढ आयुक्तांनी सुचविल्या प्रमाणे केली आहे.रासने पुढे म्हणाले, १५ ते ४० मीटर उंचीच्या इमारतींसाठी प्रती चौरस मीटर १०० रुपये (किमान एक लाख रुपये), ४० ते ७० मीटर उंचीच्या इमारतीसाठी प्रती चौरस मीटर २५० रुपये (किमान अडीच लाख रुपये), ७० ते १०० मीटर उंचीच्या इमारतींसाठी प्रती चौरस मीटर ४०० रुपये (किमान चार लाख रुपये), १०० ते १५० मीटर उंचीच्या इमारतीसाठी प्रती चौरस मीटर ५०० रुपये (किमान साडे सात लाख रुपये) आणि १५० मीटर पेक्षा जास्त उंचीच्या इमारतीसाठी प्रती चौरस मीटर ६०० रुपये (किमान दहा लाख रुपये) शुल्क आकारण्यात येणार आहे. आयुक्तांनी सुचविलेल्या शुल्कात निम्म्याने कपात करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.

बेघरांसाठी दिवस-रात्र निवारा प्रकल्पाला मंजुरी- हेमंत रासने

0

पुणे-पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान योजनेअंतर्गत पुणे महापालिका क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने बेघर नागरिकांसाठी दिवस-रात्र निवारा प्रकल्प राबविण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.रासने म्हणाले, सध्या येरवडा, सेनादत्त पेठ, बोपोडी, पुणे स्टेशन भागात बेघरांसाठी निवारा प्रकल्प राबविण्यात येतात. त्यांची मुदत संपल्याने नव्याने निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार जॉन पॉल स्लम डेव्हलपमेंट, ओबीसी सेवा संघ, जान्हवी फाउंडेशन, अक्षरसृष्टी ग्रंथालय या संस्थांची निवड करण्यात आली आहे.रासने पुढे म्हणाले, या प्रकल्पांसाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून द्यायचा आहे. तो उपलब्ध झाला नाही तर दोन कोटी रुपयांची तरतूद असललेल्या युवक कल्याण निधी अंतर्गत हा खर्च केला जार्इल. नगर विकास विभागाच्या आदेशानुसार प्रत्येकी एक लाख लोकसंख्येमागे एक बेघर निवारा केंद्र उभे करायचे आहे. त्यानुसार ३८ लाख लोकसंख्या असलेल्या पुणे शहरात ३८ निवारा केंद्र उभी करण्याची योजना आहे. जशी जागा उपलब्ध होर्इल त्यानुसार आगामी काळात ही केंद्र उभी केली जातील.

घसेटी पुलावरील मनपा शाळेत विविध अभ्यासक्रम

महात्मा फुले पेठेतील घसेटी पुलावरील महापालिकेच्या दगडी शाळेत शैक्षणिक, सांस्कृतिक आणि कला क्षेत्रांतील विविध अभ्यासक्रम शिकविण्यासाठी शिवसाई फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेशी करार करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती रासने यांनी दिली.रासने म्हणाले, ही शाळा अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. या परिसरात आर्थिकदृष्ट्या अल्प उत्पन्न असणारे, मागासवर्गीय आणि विडी कामगारांची संख्या मोठी आहे. या सर्व समाजघटकांना उद्योग, व्यवसायाचे प्रशिक्षण, समुपदेशन करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला. पुणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने पंधरा वर्षांसाठी शिवसाई फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबविला जाईल. आस्थापना, प्रशिक्षक, शिक्षक आदी खर्च फाउंडेशनच्या वतीने केला जाईल. पाणी, विद्युत व्यवस्था आदी सुविधा महापालिकेतर्फे पुरविल्या जातील.

भवानी पेठेत इंग्रजी माध्यमाची शाळा

भवानी पेठेत महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत रेवकाई नॉलेज फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने पूर्व प्राथमिक ते इयत्ता पाचवी पर्यंतची इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यासाठी करार करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती रासने यांनी दिली.रासने म्हणाले, महापालिका क्षेत्रात इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आकांक्षा फाउंडेशनसारख्या संस्थांबरोबर करार करण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर रेवकाई नॉलेज फाउंडेशन या संस्थेला परवानगी देण्यात आली आहे. भवानी पेठेत अत्यल्प उत्पन्न असणार्र्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यांच्या मुलांना इंग्रजी शिकण्याची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला. शिक्षक, शिक्षकेतर आणि आस्थापना खर्च फाउंडेशन करणार आहे. विद्युत, पाणी आदी आवश्यक सेवा महापालिका पुरविणार आहे.

मनपा निवृत्त कर्मचार्यांना मिळणार तातडीने पेन्शन

पुणे महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचारी आणि अधिकार्यांना तातडीने तात्पुरत्या स्वरुपात दहा हजार रुपये सेवानिवृती वेतन (पेन्शन) देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती त्यांनी दिली.रासने म्हणाले, कर्मचार्यांना सेवा निवृत्तीच्या दिवशी सेवानिवृत्ती वेतन देणे बंधनकारक असते. मात्र सेवा पुस्तकातील नोंदी वेळच्या वेळी न केल्याने तांत्रिक कारणाने कर्मचार्यांना निवृत्ती वेतन मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे सेवकांच्या कुटुंबियांना आर्थिक हाल-अपेष्टा सहन कराव्या लागतात. सेवानिवृत्त कर्मचार्यांना निवृत्तीनंतर हक्काचे पैसे मिळेपर्यंत तातडीने आणि तात्पुरती उपाययोजना म्हणून प्रतिमहिना दहा हजार रुपये पेन्शन चालू करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

शिवछत्रपती सन्मान विजेत्यांचा होणार गौरव

पुणे शहरातील राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या ६ खेळाडू आणि १३ क्रीडा मार्गदर्शकांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये आणि सन्मान चिन्ह देऊन महापालिकेच्या वतीने गौरव करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती रासने यांनी दिली.ते म्हणाले, या पूर्वी महापालिका हद्दीतील खेडाडू आणि मार्गदर्शकांचा गौरव करण्यास मान्यता देण्यात आली होती. १९ जणांनी नव्याने अर्ज केले होते. त्यांचा गौरव करण्यासाठी १२ लाख रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.

शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासाठी डीबीटी

महापालिकेच्या शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वस्तू स्वरुपात मिळणार्या लाभांचे हस्तांतरण रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बॅंक (डीबीटी) खात्यावर जमा करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहितीहि त्यांनी येथे दिली.ते म्हणाले, महापालिकेच्या शिक्षण विभागातील प्राथमिक, माध्यमिक, विद्या निकेतन, क्रीडा निकेतन शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य पुरविले जाते. गणवेश, पुस्तके, वह्या, दप्तरे, चित्रकला साहित्य, लेखन साहित्य, ट्रॅक सूट, बूट, स्वेटर असे साहित्य या योजनेअंतर्गत दिले जाते. या साहित्याचे किमान दरपत्रक ठरविण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार आवश्यक असणार्या सर्व शालेय साहित्यांच्या किमान दरांना स्थायी समितीने मान्यता दिली आहे. सन २०१७ पासून लाभांचे हस्तांतरण रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात केले जाते. गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या टाळेबंदीच्या स्थितीतशाळा बंद होत्या. त्यामुळे शालेय साहित्यासाठी आवश्यक असणारा निधी पालकांच्या खात्यावर जमा करण्यात आला नव्हते. या शैक्षणिक वर्षात अजूनही शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाहीत. परंतु नजिकच्या काळात शाळा सुरू करण्याचा निर्णय झाल्यास आवश्यकतेनुसार शालेय साहित्याचे वितरण करण्यासाठी डीबीटी पद्धतीने निधी जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारे शालेय साहित्याच्या किमान दरांना आज स्थायी समितीने मान्यता दिली.

पाकविरुद्धच्या लढाईचे ‘ते’ धगधगते स्मरण; जलपडद्यावर थ्रीडी मध्ये 16 डिसेंबरला बागुल उद्यानात

0

पुणे-1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील भारताच्या विजयाला 16 डिसेंबर रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त या युद्धावर आधारित 120 फूट लांब आणि 40 फूट रुंद अशा पाण्याच्या पडद्यावर थ्रीडी मल्टिमीडिया चित्रफितीचे लोकार्पण दि. 16 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी पाच वाजता कै. वसंतराव बागुल उद्यान, शिवदर्शन पुणे येथे संपन्न होत आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा संपन्न होईल. पुण्याचे
महापौर मुरलीधर मोहोळ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून, माजी आमदार उल्हास पवार, माजी आमदार मोहन जोशी, मनपा आयुक्त विक्रमकुमार यांच्यासह पुणे मनपा पदाधिकारी, नगरसेवक व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. तसेच निवृत्त लष्करी अधिकार्‍यांचा गौरवही यावेळेस केला जाणार आहे. अशी माहिती पुणे मनपा काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल यांनी दिली.

पुणे मनपा काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा कार्यक्रम पुणे महानगरपालिका सादर करणार आहे. याप्रसंगी लष्करी बँड व पोलिस बँडही असेल. या कार्यक्रमात एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त), ब्रिगेडियर अजित आपटे (निवृत्त), ब्रिगेडियर प्रकाश घोगले (निवृत्त) आणि कमांडर इंद्रजित रॉय (निवृत्त) हे उपस्थित राहणार असून, त्यांचा विशेष सत्कार याप्रसंगी केला जाणार आहे. 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर 1971 या काळात झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताने विजय मिळवला त्यास 50 वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्त पुणे मनपा काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल यांनी 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2021 असा ‘सुवर्ण विजय’ द्विसप्ताह आयोजित केला. त्यातील उद्घाटन व समारोपास पुणे महानगरपालिकेचा सहयोग लाभला. सैन्यदलाने पुणे महानगरपालिकेस भेट दिलेल्या प्रदर्शनीय रणगाड्याचे लोकार्पण, 1971 भारत-पाक
युद्धातील छायाचित्रांचे प्रदर्शन, ‘1971’ या विषयावर खुली निबंध स्पर्धा, पुण्यातील 25 नामवंत चित्रकारांनी ‘इंदिरा गांधी आणि 1971 चे युद्ध’ या विषयावर साकारलेली पेंटिंग्ज, घोरपडी येथील युद्ध स्मारकास आदरांजली, ‘एक स्वाक्षरी शहीद जवानांच्या अभिवादनासाठी’ उपक्रम असे विविध कार्यक्रम या द्विसप्ताहात साजरे केले गेले. या द्विसप्ताहाचा समारोप 16 डिसेंबर रोजी भव्यतेने साजरा होत आहे. 120 फूट लांब आणि 40 फूट रुंद पाण्याच्या पडद्यावर 1971 च्या युद्धावर आधारित 20 मिनिटांची थ्रीडी मल्टिमीडिया चित्रफीत हे प्रमुख आकर्षण असेल. ही
चित्रफीत त्यानंतर रोज सायंकाळी कै. वसंतराव बागुल उद्यान येथे नागरिकांना दाखवली जाईल,

शांतताप्रिय समाजासाठी कायदे व नियम गरजेचेः न्या. दीपक मिश्रा

0

एमआयटी डब्ल्यूपीयूत पहिल्या अंतरराष्ट्रीय कायदा आणि शांतता परिषदेचे उद्घाटन

पुणे,दि.१४ डिसेंबर:“सृष्टीवर शांतता निर्मिती व समाज स्थिरतेसाठी काही नियम आणि कायद्यांची गरज आहे. आपले जीवन सुंदर, सुखमय व आनंदी करण्यासाठी भारतीय पौराणिक कथांमध्ये सुद्धा काही नियम व कायदे सांगितले आहेत. कायदे हे सुंदर नागरिकत्वाचे तत्व आहे.” असे विचार सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे भारत तर्फे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या ‘आंतरराष्ट्रीय कायदा आणि शांतता परिषदे’च्या ऑनलाइन उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ‘जगात शांती संस्कृतीच्या प्रचार आणि प्रसारासाठी कायद्याची भूमिका’ हा या परिषदेचा मुख्य विषय होता.
यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती डॉ. अरिजीत पसायत, सर्वोच्च न्यायलयाचे वकील डॉ. ललित भसीन, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती डॉ. भारतभूषण प्रसून, हायकोर्टाच्या अ‍ॅड. बासुरी स्वराज, राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा.डॉ. बिमल पटेल आणि अ‍ॅड.हेमंत बत्रा हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे होते.
तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्‍वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, लिबरल ऑर्ट विभागाच्या अधिष्ठाता प्रा.डॉ.अनुराधा पराशर आणि स्कूल ऑफ लॉ च्या प्रमुख डॉ. पोर्णिमा इनामदार हे उपस्थित होते.
न्या.दीपक मिश्रा म्हणाले,“समाजाच्या ऐक्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून जीवनमान व्यतीत करावे. समाजाच्या सर्वांगिण विकासातून शांतता प्रस्थापित करता येईल. आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवी हक्क आणि शांती यासाठी कार्य होत आहे. कायदयाच्या माध्यमातून चांगला सुसंवाद साधल्यास शांतताप्रिय समाज निर्माण होण्यास मदत होईल. शाश्‍वत विकासातून मानवाचा उत्कर्ष होईल. विद्यापीठांनी पुढाकार घेऊन शांतीसाठी कार्य करावे.”  
न्या. डॉ. अरिजित पसायत म्हणाले,“आंतरराष्ट्रीय विवाद, सीमा प्रश्‍नांसारख्या गोष्टींसाठी कडक कायद्यांच्या माध्यमातून विश्‍वात शांती निर्माण करु शकतो. मानव अधिकारांचा उपयोग करुन समाज कल्याणासाठी जे कार्य केले जाईल, त्यातूनच शांती निर्माण होईल. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी कायदे गरजेचे आहेत. एमआयटी डब्ल्यूपीयूने अशा प्रकारची परिषद आयोजित करुन एक अद्वितीय कार्यक्रम सर्वांसमोर ठेवला आहे.”
अ‍ॅड. डॉ. ललित भसीन म्हणाले,“धर्म म्हणजे न्याय आहे. त्यात काय चुकीचे आणि काय बरोबर हे सांगितले आहे. धर्मानी सांगितलेल्या तत्वानुसारच या सृष्टीवर शांती निर्माण होऊ शकते. लोक हे धर्मातील कायदे स्वतःहून पाळतात. त्यामुळे सृष्टीवर अध्यात्माच्या आधारे शांती निर्माण होऊ शकते. पण जीवन जगतांना कायदयामध्ये राहुन त्याचे पालन करावे. आज पंचायत व जिल्हा परिषदेमध्ये वेगवेगळे कायदे आहेत. देशाची व्यवस्था सुरळीत करण्यासाठी कायदे खूप महत्वाचे आहेत. हेच कायदे कुटुंब, समाज आणि राष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. सामाजिक एकतेसाठी न्याय महत्वाचा आहे.”
अ‍ॅड हेमंत बत्रा,“४.४ कोटी केसेस पेंडिंग आहेत. हे पाहता नवीन न्यायाधिशांची भरती करणे गरजेचे आहे. तसेच, व्हर्च्युअल कोर्टाचीही गरज आहे. भारतीय न्याय व्यवस्थेत तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दिमत्तेचा उपयोग करुन घ्यावा. वर्तमान काळात ऑनलाइनच्या माध्यमातून दर वर्षी ६ कोटी वाद मिटवले जातात.”
न्या.डॉ. भारतभूषण प्रसून म्हणाले,“आजच्या काळात कायदे, शांती आणि आंतरराष्ट्रीय शांती खूप गरजेचे आहे. नागरिकांसाठी सुख, शांती, आनंद, समानता यासाठी नियम आणि कायदे गरजेचे आहे. शांती ही आंतरिक व बाह्य स्वरूपाची असते. बाह्य स्वरुपाच्या शांतीसाठी म्हणजेच समाजिक शांतीसाठी कायदे गरजेचे आहेत. जागतिक स्तरावर ट्रेड लॉ, मानव कायदे, शांतीसाठी अशाप्रकारच्या कायद्यांची निर्मिती केली आहे. कुटुंब, समाज, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय प्रगतीसाठी शांती सर्वात महत्वाची आहे.”  
प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“संत ज्ञानेश्‍वर महाराज यांनी ७३० वर्षापूर्वी जीवन जगण्याचे काही मानवी नियम सांगितले आहेत. भारतीय तत्वज्ञान हे ‘एकम् सत् विप्रा बहुधा वदन्ती’ आणि ‘वसुधैव कुटुम्बकम’ची आहे. जगाला सुख, समाधान आणि शांतीचा मार्ग दाखविण्याचे दायित्व भारताकडे आहे. त्यानंतरच भारत हा विश्‍वगुरू बनेल.”
अ‍ॅड. बासुरी स्वराज म्हणाल्या,“चांगल्या समाज निर्मितीसाठी नियम आणि कायदे अतिशय गरजेचे आहेत. वेद, भगवद्गीता, महाभारत आणि रामायण या सारख्या ग्रंथामध्ये सुद्ध नियम आणि कायद्याचा उल्लेख दिसून येतो. त्याच्या आधारे देशातील सर्वोच्च न्यायालय हे समाजाचे संतुलन ठेवण्याचे कार्य करीत आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय वाद मिटविण्यासाठी आंतरराष्ट्रीय कोर्टाची स्थापना केली गेली आहे.”
प्रा.डॉ. बिमल पटेल म्हणाले,“वेदिक गोष्टींचा उपयोग करुन आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. आधुनिक काळात सायबर कायदे बनविणे गरजेचे होते म्हणून त्यांची निर्मिती झाली. मानवाच्या शाश्‍वत विकासासाठी काही नियम व न्याय गरजेचे आहे. सरकारने आणि राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी कार्य करणे गरजेचे आहे”
राहुल विश्‍वनाथ कराड म्हणाले,“कायदे हे लोकशाहीसाठी अतिशय महत्वाचे आहेत. यांच्या माध्यमातून समाजात मोठे बदल घडविता येतील. आता युवकांनी ब्रिटिशांची विचारधारा सोडून भारतीय विचारधारेचे पालन करावे. देशाला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता वसाहतवादी मानसिकता बदलावी. त्यासाठी स्वतंत्रता दिवस हा राष्ट्रीय दिवस म्हणून का साजरा करावा. न्यायक्षेत्रात कालानुरूप बदल करावा.”
कुलगुरू डॉ.आर.एम.चिटणीस यांनी प्रास्ताविक केले.
डॉ. अनुराधा पराशर यांनी स्वागतपर भाषण केले.
प्रा.डॉ गौतम बापट यांनी सूत्रसंचालन व डॉ. पोर्णिमा इनामदार यांनी आभार मानले.

हिंमत असेल तर विधानसभा अध्यक्ष निवडणूक गुप्त मतदानाने घ्या-भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे महाविकास आघाडीला आव्हान

0

विधान परिषद निवडणुकीतील यशाबद्दल बावनकुळे व खंडेलवाल यांचे अभिनंदन
पुणे-सर्वसामान्य लोकांप्रमाणेच महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधीसुद्धा या सरकारला कंटाळले असल्याने गुप्त मतदानाची संधी मिळताच त्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केले आणि विधान परिषदेच्या नागपूर आणि अकोला – बुलढाणा – वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये भाजपाचे उमेदवार मोठ्या आघाडीने विजयी झाले. हिंमत असेल तर महाविकास आघाडीने विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक मूळ नियम आणि परंपरेप्रमाणे गुप्त मतदानाने घ्यावी, असे आव्हान भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिले.विधान परिषद निवडणुकीत नागपूर मतदारसंघातून विजयी झालेले भाजपाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे आणि अकोला – बुलढाणा – वाशिम मतदारसंघातून विजयी झालेले वसंत खंडेलवाल यांचे मा. प्रदेशाध्यक्षांनी हार्दिक अभिनंदन केले. विधान परिषद निवडणुकीत यापूर्वीच भाजपाचे मुंबईतून राजहंस सिंह आणि धुळे – नंदूरबार मतदारसंघातून अमरिश पटेल बिनविरोध विजयी झाले असून पक्षाने एकूण सहापैकी चार जागा जिंकल्या आहेत. भाजपाला मुंबई आणि अकोला – बुलढाणा – वाशिम या जागा नव्याने मिळाल्या आहेत. मा. प्रदेशाध्यक्षांनी सर्वच विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, राज्यातील जनता महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराला कंटाळली असून निवडणुकीत मतदानाची संधी मिळताच जनता भाजपाला मतदान करते. त्याच पद्धतीने महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधीसुद्धा या सरकारच्या कारभाराला कंटाळले आहेत. सदस्य म्हणून अपात्र ठरण्याच्या भितीने ते त्या त्या पक्षासोबत राहत असले तरी गुप्त मतदानाची संधी मिळताच त्यांनी भाजपाला मतदान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाचा विकास होणार नाही याची या लोकप्रतिनिधींना विशेषतः शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना जाणीव आहे.त्यांनी सांगितले की, विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आमदारांच्या गुप्त मतदानाने करावी, असा विधानसभेचा मूळ नियम आहे आणि तसा प्रघातही आहे. आघाडीला आपल्याच आमदारांची खात्री नसल्याने नियम बदलून आवाजी मतदानाने निवडणूक करण्याचा प्रयत्न चालू आहे. आपले महाविकास आघाडीला आव्हान आहे की, त्यांनी मूळ नियमानुसार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी आणि आमदारांना गुप्त मतदानाची मुभा द्यावी, मग त्यांना कळेल की अध्यक्ष कोण होतो.
भाजपाने सहकार्य केल्यामुळे राज्यसभा आणि विधान परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. ही विधान परिषद निवडणूकही बिनविरोध करावी असे ठरले होते व त्यासाठी आम्ही कोल्हापूरमध्ये उमेदवार मागे घेतला पण काँग्रेसने ठरल्याप्रमाणे पूर्ण सहकार्य केले नाही. त्या पक्षाने नागपूरच्या जागेवर निवडणुकीचा आग्रह धरला आणि अखेरीस पोरखेळ केला, अशी टीका त्यांनी केली.

महापालिकेस कोटयावधींचा भुर्दंड देणारे ‘ते’ ३८५ मिळकतधारक कोण ? यांचे भाजपशी काय हितसंबंध ?- आबा बागूलांचा खणखणीत सवाल

0

प्रामाणिक करदात्यांवर अन्याय: करबुडव्यांना सवलत : अभय योजनेस काँग्रेस पक्षाचा विरोध

पुणे- ५० लाखापासून पुढे मिळकतकराची थकबाकी असलेल्या ३८५ थकबाकीदारांकडून व्याज दंडासह २७१ कोटी रुपयांची येणी थकीत असून हि मंडळी नेमकी कोण कोण ? आणि यांचा प्रत्यक्षात सत्ताधारी भाजपशी नेमका काय संबध ? असे मार्मिक सवाल करत कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी सत्ताधारी भाजपच्या वर्मी घाव घातला आहे .आणि एवढ्या बड्या धेंडाना मिळकत कराच्या कारवाईतून ‘अभय ‘ देण्यास पूर्णतः विरोध दर्शविला आहे .

या संदर्भात आबा बागुल यांनी म्हटले आहे कि,’आजच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये बहुमताच्या जोरावर .१ कोटी रुपयांपर्यंत थकबाकी असणा-या मिळकतींचा दंड माफ करणेसाठी भाजपने मिळकत कराची अभय योजनेचा प्रस्ताव मांडला, यावेळी काँग्रेस पक्षाने मागील पाच आर्थिक वर्षात प्रतिवर्षी वेळेत कर भरणा-या निवासी मिळकतधारकांचा सन २०२२-२०२३ चा संपूर्ण मिळकत कर माफ करण्यात यावा अशी उपसूचना दिली असता ती देखील सुसंगत नाही असे कारण दाखवत फेटाळण्यात आली.

बागुल यांनी पुढे असेही म्हटले आहे कि,’र.रू.५० लक्ष वरील र.रू.१ कोटी पर्यंत थकबाकी असणा-या ३८५ मिळकती असून यांची निव्वळ थकबाकी ५६.३५ कोटी असून दंडाची रक्कम २१५.०६ कोटी असून एकूण थकबाकी २७१.४२ कोटी इतकी आहे. तसेच ५० लक्ष पेक्षा कमी थकबाकी असलेल्या मिळकतींची संख्या ४,२३,४३७ असून त्यांची निव्वळ थकबाकी १३७२.९८ कोटी असून २ टक्के दंडाची रक्कम २१५०.५९ कोटी असून एकूण थकबाकी असून ३५२३.५७ कोटी इतकी आहे.वरील आकडे पाहता सत्ताधारी भाजप प्रामाणिकपणे प्रतिवर्षी मिळकत कर भरणा-या पुणेकरांवर अन्याय करणारी, महापालिकेला कोटयावधींचा भुर्दंड देणारी व करबुडव्यांना सवलत देणारी अशी ही योजना आहे. पुणे मनपा प्रशासन वेळेवर कर वसूल करणेस असमर्थ ठरत असून सत्ताधारी पक्षाकडून ५० लक्ष ते १ कोटी पर्यंत थकबाकी असणा-या ३८५ मिळकत धारकांना सवलत देण्यासाठी हा उदयोग सुरू आहे असे दिसत असून हे ३८५ मिळकत धारक कोण ? यांचे सत्ताधारी पक्षाबरोबर काय लागेबांधे आहेत याचे उत्तर पुणेकरांना दयावे लागणार आहे.

बागुल यांनी पुढे असेही म्हटले आहे कि,पुणे मनपाचे मिळकत कर हे प्रमुख उत्पन्न असून हा कर वेळेत भरून महापालिकेडून मूलभूत सेवा व सुविधांची कामे वेळेवर व्हावीत या हेतूने हा कर वेळेत भरला जावा म्हणून कायदयामध्ये २ टक्के शास्तीची तरतूद करण्यात आली असून ही शास्ती माफ करण्याचा अधिकार कायदयाने कोणासही नाही. पूर्वी गोरगरीबांसाठी अभय योजना आणली ही बाब आम्ही समजू शकतो. परंतू कोटयावधींची थकबाकी असलेल्या मिळकतींना अभय योजना देणे महापालिकेच्या हिताचे नाही. या सर्व बाबींचा विचार करून महापालिकेच्या हितासाठी काँग्रेस पक्षाने प्रामाणिक करदात्यांवर अन्याय करत, महापालिकेस कोटयावधींचा भुर्दंड देणारी व करबुडव्यांना सवलत देणा-या अभय योजनेस विरोध केला असून महापालिका आयुक्तांकडे या प्रस्तावाची अंमलबजावणी करू नका अशी मागणी आबा बागूलांनी केली आहे.

‘म्हाडा’ मार्फत 5 हजार 183 कुटुबांना हक्काचे घर

0


पुणे, दि.14 :- पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत (म्हाडा) विविध उत्पन्न गटाअंतर्गत सदनिकांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून जिल्ह्यातील अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटातील 5 हजार 183 पात्र कुटुंबाला हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ‘2022 पर्यंत सर्वांना हक्काचे घर’ उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून त्याच ध्येयाच्या दिशेने पडलेलं एक आश्वासक पाऊल आहे.

राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि माफक दरात हक्कांची घरे मिळवून देण्याचे काम सुरु आहे. घरे उपलब्ध करुन देण्याची प्रक्रिया संगणकीय असून पारदर्शक आहे. कोविड काळातही म्हाडाच्या घरासाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देवून जनतेने ‘म्हाडा’वर विश्वास दाखविला आहे.

खेड तालुक्यात म्हाळुंगे (इंगळे) येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटातील 648 व अल्प उत्पन्न गटातील 620 अशा एकूण 1 हजार 268 तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात सर्व्हे क्रमांक-309 पिंपरी-वाघिरे येथे अल्प उत्पन्न गटातील 308, मध्यम उत्पन्न गटातील 595 आणि उच्च उत्पन्न गटातील 340 अशा एकूण 1 हजार 243 कुटुंबांना हक्काची घरे उपलब्ध करुन देण्यासाठी सदनिकांची गृहनिर्माण योजना राबविण्यात आली होती. पात्र लाभार्थ्यांना सदनिकांचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

शासनाच्या धोरणानुसार 15 टक्के एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत (इंटिग्रेटेड हाऊसिंग) 1 हजार 80 अत्यल्प व अल्प उत्पन्न गट सदनिका तसेच 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत अंदाजे 1 हजार 592 अत्यल्प व अल्प उत्पन्न गट सदनिका अशा एकूण 2 हजार 672 सदनिका उपलब्ध झाल्या असून त्यांची जाहिरात देऊन अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना सदनिकांचे वाटप करण्यात येत आहे.

तळेगाव दाभाडे येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटाकरीता 762 सदनिकांची गृहनिर्माण योजना राबविण्यात येत आहे. तसेच 35 दुकाने व 31 कार्यालये अशा वाणिज्य व विविध गृहनिर्माण योजना राबविण्यात येत असून योजनेचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याची माहिती पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांनी दिली आहे.