Home Blog Page 2158

चौथ्या अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धेत पीवायसी डायमंड्स, एमडब्लूटीए 1, लॉ कॉलेज लायन्स संघांची विजयी सलामी

0

पुणे आयकॉन ग्रुप, पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित चौथ्या अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धेत गटसाखळी फेरीत पीवायसी डायमंड्स, एमडब्लूटीए 1, लॉ कॉलेज लायन्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली. 

पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत पहिल्या गटात श्रवण हार्डीकर, अमित नाटेकर, योगेश पंतसचिव, मिहीर दिवेकर, सारंग देवी, अमित लाटे यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर पीवायसी डायमंड्स संघाने टेनिस हॉक्सचा 18-03 असा पराभव करून शानदार सुरुवात केली.  अन्य लढतीत एमडब्लूटीए 1 संघाने टीएफएलचा 16-12 असा तर, लॉ कॉलेज लायन्स संघाने सोलारिस गो गेटर्सचा 16-10 असा पराभव करून धडाकेबाज सुरुवात केली. 

पीएमडीटीएचे अध्यक्ष व टेनिसप्रेमी कै. अरुण साने यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येत असून या अनोख्या संकल्पनेवर आधारित असलेल्या या स्पर्धेत  सध्याचा खेळाडू, माजी खेळाडू अथवा मार्कर्स यांचा सहभाग नसून हौशी स्पर्धक आपले कौशल्य पणाला लावणार असल्याचे पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे यांनी सांगितले. 

स्पर्धेत एकुण  40हजार रूपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे.  दोन्ही संघामध्ये होणाऱ्या लढतीत एकुण 3सामन्यांचा समावेश असून यात 2 सामने खुल्या दुहेरी गटात, तर उर्वरित एक सामना 80वर्षावरील(दोन्ही खेळाडूंचे मिळून वय 80वर्षवरील)गटात होणार आहे. शहरातील हौशी टेनिस खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी म्हणून हि स्पर्धा घेण्यात आल्याचे क्लबच्या टेनिस विभागाचे सचिव अभिषेक ताम्हाणे यांनी सांगितले.

स्पर्धेमध्ये पीवायसी डायमंड्स, एमडब्लूटीए 1, टेनिसनट्स, पीसीएलटीए, एफसी 2, डेक्कन 2, पीवायसी रुबी, पीवायसी पर्ल्स, डेक्कन 3, एफसी 1, डेक्कन 1, लॉ चार्जर्स, हॉक्स, टीएफएल, मॉँट व्हर्ट प्रीस्टाईन, द ईगल्स, लॉ कॉलेज लायन्स, एमडब्लूटीए 2, महाराष्ट्र मंडळ, एस डायमंड्स, पीवायसी सॅफायर, एसेस युनायटेड, एमडब्लूटीए 3, टी-20 महाराष्ट्र मंडळ, एफसी 3, सोलारिस गो गेटर्स, गोल्डन बॉईज, एमडब्लूटीए 4 हे 28 संघ झुंजणार आहेत. स्पर्धेचे उदघाटन नोंदणी महानिरीक्षक आणि नियंत्रक मुद्रांक शुल्क, महाराष्ट्रचे(आयजीआर) श्रावण हार्डीकर, पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, आशा साने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नमिता टेपण, नंदू रोकडे, अभिषेक ताम्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.  

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: 

गट 1: पीवायसी डायमंड्स वि.वि.टेनिस हॉक्स 18-03(80अधिक गट: श्रवण हार्डीकर/अमित नाटेकर वि.वि.मंदार कापशीकर/निलेश नाफडे 6-1; खुला गट: योगेश पंतसचिव/मिहीर दिवेकर वि.वि.सचिन कुलकर्णी/सुनील आहिरे 6-0; खुला गट: सारंग देवी/अमित लाटे वि.वि.अविनाश पवार/अनिरुद्ध जाधव 6-2);  

गट 2: एमडब्लूटीए 1 वि.वि.टीएफएल 16-12(80अधिक गट: जयदीप वाकणकर/संजय आशेर वि.वि.केदार राजपाठक/दिपक होनकर 6-2; खुला गट: भूषण जोशी/प्रणिल बाडकर वि.वि.अजय भांजे/विक्रांत गुणे 6-4; खुला गट: संतोष शहा/आदित्य जोशी पराभूत वि.अजिंक्य पाटणकर/कौस्तुभ देशमुख 4-6); 

गट 5: लॉ कॉलेज लायन्स वि.वि.सोलारिस गो गेटर्स 16-10(80अधिक गट: अभिजीत मराठे/शिवाजी यादव वि.वि.अमोल गायकवाड/आशिष कुबेर 6-3; खुला गट: तारक पारेख/केतन जाठर पराभूत वि.सचिन खिलारे/सुबोध पेठे 4-6; खुला गट:संतोष जयभाई/राहुल पंढरपुरे वि.वि.आश्विन हळदणकर/महेंद्र गोडबोले 6-1). 

सामाजिक संस्था व व्यक्तिंमुळे समाजाचा गाडा योग्यरितीने सुरु-ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सदानंद मोरे

0

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट, पुणे तर्फे गुरुमहात्म्य आणि लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार वितरण सोहळा

पुणे : दिवसेंदिवस अधिक आत्मकेंद्री होत चाललेल्या आजच्या समाजामध्ये दुस-यांचा विचार करून त्यांचे दु:ख दूर करण्याची वृत्ती अतिशय कमी झाली आहे. अशावेळी सामाजिक काम करणा-या संस्था आणि व्यक्तींमुळे समाजाचा गाडा योग्य रितीने सुरू आहे, अशा समाजकार्य करणा-यांना बळ देण्याची गरज आहे, अशी भावना ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सदानंद मोरे यांनी व्यक्त केले

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दत्तजयंती उत्सवांतर्गत देण्यात येणा-या पुरस्कारांचे वितरण बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात झाले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नितीन करमाळकर, ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई, अ‍ॅड.रजनी उकरंडे, युवराज गाडवे, अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, अ‍ॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ उपस्थित होते. ट्रस्टचे यंदा १२४ वे वर्ष आहे.

सामाजिक क्षेत्रात फासेपारधी समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणारे पद्मश्री गिरीश प्रभुणे, शैक्षणिक क्षेत्रात मराठवाडा मित्र मंडळाच्या माध्यमातून कार्यरत असलेले डॉ.बी.जी. उर्फ भाऊसाहेब जाधव आणि धार्मिक क्षेत्रातील योगदानाबद्दल प.पू. सद्गुरु प्रेमल माताजी यांना गुरुमहात्म्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार बालकामगारांसाठी कार्यरत असलेल्या कोल्हापूरच्या अवनी संस्थेच्या अनुराधा भोसले यांना प्रदान करण्यात आला. रुपये २५ हजार, सन्मानचिन्ह, महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरुप होते.

डॉ.सदानंद मोरे म्हणाले, लोकमान्य टिळक त्यांच्या कार्यामागे दगडूशेठ हलवाई यांनी आपले बळ उभे केले. हाच वसा पुढे नेत लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट समाजातील चांगल्या लोकांच्या पाठीशी उभे राहत आहे. या ट्रस्टचा आदर्श इतर व्यक्ती आणि संस्थांनी घेतला पाहिजे.

डॉ.नितीन करमाळकर म्हणाले, विद्यापीठ समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचू शकत नाही. विद्यापीठ जे काम करू शकत नाही, ते काम या सामाजिक संस्था अतिशय प्रामाणिकपणे आणि पोटतिडकीने करत आहे. अशा संस्थांमुळे ख-या अर्थाने समाज आणि आपला देश पुढे जात आहे.

पुरस्काराला उत्तर देताना गिरीश प्रभुणे म्हणाले, मला पद्मश्री पुरस्कार मिळाला तेव्हा माझ्या कार्याला राजमान्यता मिळाली. तर लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर तर्फे पुरस्कार मिळाल्यामुळे एक प्रकारे माझ्या कार्याला धर्माची देखील मान्यता मिळाली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. प्रेमल माताजी म्हणाल्या, समाजामध्ये सद््भावना आणि माणुसकी कायम जागृत राहावी, या उद्देशाने मी काम करत आहे. ट्रस्टच्या पुरस्कारामुळे मला काम करण्यासाठी ऊर्जा मिळाली आहे.

भाऊसाहेब जाधव म्हणाले, गरीब आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षण सर्वप्रथम देणे, हा आमच्या संस्थेचा उद्देश आहे. यामुळे शिक्षण हे आयुष्यात अतिशय महत्त्वाचे आह,े हा विचार आम्ही अनेक मुलांमध्ये रुजवू शकलो याचा मला आनंद आहे, असेही ते म्हणाले. अनुराधा भोसले म्हणाल्या, उसतोड कामगार आणि वीट भट्टी कामगारांच्या मुलांची अवस्था पाहिली, तर देश आजही ख-या अर्थाने स्वतंत्र झाला आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. या मुलांपर्यंत शिक्षण पोहोचले नाही तर आपला देश भविष्यात विकसित होऊ शकेल का? याचा विचार प्रत्येकाने गांभीर्याने करायला हवा, असेही त्यांनी सांगितले.

स्वरतीर्थ स्व.सुधीर फडके यांच्या चिरस्मरणीय श्रवणीय गीतांचा बहारदार कार्यक्रम असलेला बाबूजी व मी हा ज्येष्ठ गायक व संगीतकार श्रीधर फडके आणि सहका-यांनी सादरीकरण केले. प्रज्ञा देशपांडे यांनी पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन केले

महाविकास आघाडी सरकराचे अपयश सिध्द- विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

0


मुंबई, दि १४ डिसेंबर – भाजपाला महाराष्ट्रातील जनतेचा जनाधार असल्याचे विदर्भातील जनतेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे आणि ठाकरे सरकारवर जनता पूर्णपणे नाराज असल्याचे चित्र या निकालाच्या माध्यमातून दिसून आल्याचे सिद्ध झाले आहे. जनतेने भाजपावर दाखविलेल्या विश्वा्साला आम्ही तडा जाऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली.
नागपूर आणि अकोला विधान परिषद निवडणुकांत भाजपाने मिळवलेल्या विजयानंतर ते प्रसारमध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आजपर्यंत झालेल्या निवडणुकांत भाजपा प्रथम क्रमांकावर होती. परंतु जनतेमध्ये हा संदेश गेलाय की सरकार चालवण्याच्या क्षमतेचे तिन्ही पक्षाची लोक नाहीत. सरकार पूर्णपणे अपयशी ठरलंय याचेसुद्धा प्रत्यंतर या निकालाच्या माध्यमातून दिसून येत आहे. विदर्भातल्या जनतेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की विदर्भ हा भाजपाचा बालेकिल्ला आहेच. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसजी ज्या पद्धतीने विरोधी पक्षनेता असतानाही महाराष्ट्रातील जनतेमध्ये जात आहेत व त्यांची यापूर्वीची पाच वर्षांची कारकीर्द होती ती कारकीर्द आणि आताची कारकीर्द यामधील तुलनात्मक विचारसुद्धा जनतेने केला आणि त्याचे पडसाद निकालातून उमटले आहेत, असेही दरेकर यांनी सांगितले.
दोन्ही जागांवरच्या विजयाने महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा दाखवून दिलेले आहे की, महाराष्ट्रातील जनता आजही भाजपासोबत आहे. अकोल्याची शिवसेनेची गेली १५ वर्षे असणारी जागासुद्धा भाजपाने हिसकावून घेतली आहे. तिथल्या मतदारांनी भाजपावर विश्वास दाखवून राज्याचा जनाधार भाजपाच्या बाजूने असल्याचे दाखवले. जनतेमध्ये असणारी नाराजी तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये सरकार चालवण्याची अकार्यक्षमता आणि त्याच्यामुळे ते अयशस्वी झाल्याचेही दरेकर यांनी सांगितले.

…तर कॉंग्रेसने टयुशन लावावी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विदर्भाचे असूनही काँग्रेसच्या उमेदावाराची मते फुटली. कॉग्रेसला निवडणूक लढणे आणि राज्य सरकार चालवणे यातला फरक कदाचित कळत नसेल तर त्यांनी ट्युशन लावावी, असा खोचक टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लगावला.
प्रसारमध्यमांशी बोलताना दरेकर पुढे म्हणाले की, शिवसेना जागा जिंकू शकली नाही याचा अर्थ शिवसेनेचे काऊंटडाऊन सुरू आहे. तेथील लोकप्रतिनिधीनी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वसंत खंडेलवाल यांना मतदान केले याचा अर्थ स्पष्ट आहे. राज्यातील जनता या सरकारच्या कारभाराला कंटाळली आहे. त्याचे प्रतिबिंब या लोकप्रतिनिधींनी या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून दिले.
विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आवाजी मतदानाची पद्धत सरकारने काढण्याचा प्रयत्न केला आहे यावरून सरकार किती घाबरले, हे दिसून येत आहे. महाविकास आघाडीची आपल्या पक्षांतर्गत असणारी नाराजी, बंडखोरी समोर येईल ही भीती त्यांना निश्चितच होती असेही दरेकर यांनी सांगितले.

वर्षभरातील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये १ लाख ६७ हजार प्रकरणे तडजोडीने निकाली

0

एकाच दिवसात ४९ हजारावर प्रकरणांचा निपटारा

पुणे, दि.१४: पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे चालू वर्षात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तब्बल १ लाख ६६ हजार ९५७ एवढी दाखल व दाखलपूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्ह्याने तीन वेळा पहिले स्थान कायम ठेवले आहे.

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे नुकतेच ११ डिसेंबर रोजीच्या लोकअदालतमध्ये दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात नुकसान भरपाई कलम १३८ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट, भूसंपादन, कौटुंबिक प्रकरणे, औद्योगिक, कामगार व सहकार न्यायालयातील प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यामध्ये दिवाणी- ३३४ फौजदारी- ७ हजार ६०१ मोटार अपघात नुकसान भरपाईची ११९ कलम १३८ अंतर्गत १ हजार १००, भूमीसंपादनाची १४९, तसेच पुणे जिल्हयातील विविध बँका, वित्तीय संस्था तसेच विविध ग्रामपंचायतीकडील व पुणे मनपा आणि पिंपरी चिंचवड मनपा यांचेकडील घरपट्टी, पाणीपट्टीची एकुण ४० हजार ४७५ दाखलपूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.

तडजोड झालेल्या प्रकरणांपैकी दाखल प्रकरणांमध्ये ६२ कोटी ३० लाख ७८ हजार ६६२ रूपये आणि दाखलपूर्व प्रकरणांमध्ये ११० कोटी ९३ लाख ५० हजार ७८ रूपये अशी एकुण १७३ कोटी २४ लाख २८ हजार ७४० रूपये इतकी प्रकरणामधील तडजोड रक्कम झाली आहे.

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत २०२१ या वर्षात १ ऑगस्ट, २५ सप्टेंबर आणि ११ डिसेंबर २०२१ रोजी पुणे जिल्हयातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. तीन लोकअदालतीमध्ये प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्ह्याने कायम आघाडी घेतली आहे.

९२८ कायदेविषयक शिबीरांचे आयोजन
भारताच्या स्वातंत्र्यास ७५ वर्षानिमित्त आयोजित ‘पॅन इंडिया आउटरिच अॅन्ड अवेरनेस प्रोग्रॅम अंतर्गत २ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत विधी साक्षरता शिबीरे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून ९२८ विविध विषयांवर पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी कायदेविषयक शिबीरांचे आयोजन केले. विधी साक्षरता कार्यक्रमाद्वारे कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. ३३ हजार २०० पेक्षा जास्त लोकांना लाभ झाला.

पॅन इंडिया कार्यक्रमांतर्गत महाशिबीराद्वारे मार्गदर्शन
पॅन इंडिया कार्यक्रमांतर्गत वडगाव मावळ व बारामती येथे दोन महाशिबीरांचे आयोजन करण्यात आले. वडगाव येथील कार्यक्रम मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती ए. ए. सैयद, न्यायमूर्ती एस. पी. तावडे तसेच बारामती येथे न्यायमूर्ती नितीन जामदार, न्यायमूर्ती एस. पी. तावडे यांनी मार्गदर्शन केले. शासनाच्या विविध शासकीय योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी, त्या योजनांचा प्रचार व प्रसार होण्यासाठी ठेवण्यात आल्या. महाशिबीराद्वारे ४० हजारावर नागरिकांना लाभ झाला.

प्रमुख जिल्हा न्यायाधिश तथा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय देशमुख यांच्या नियोजनाखाली जिल्ह्यात झालेल्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला अशी माहिती विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पी. डी. सावंत यांनी दिली.

तीनही लोकअदालतीमधील प्रकरणांची माहिती
१ऑगस्ट २०२१ रोजी झालेल्या लोकअदालतीमध्ये प्रलंबित ३२ हजार ५२० व दाखलपूर्व ४८ हजार ६८० प्रकरणे ठेवण्यात आली, प्रलंबित प्रकरणांपैकी १५ हजार ५६२ तर दाखलपूर्व १७ हजार ४९९ अशी एकूण ३३ हजार ६१ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

*२५ सप्टेंबर २०२१ रोजीच्या लोकअदालतीमध्ये प्रलंबित ४९ हजार ७७ व दाखलपूर्व १ लाख १६ हजार ५५ प्रकरणे ठेवण्यात आली, प्रलंबित प्रकरणापैकी ८ हजार ७९७ तर दाखलपूर्व ७५ हजार ८५२ अशी एकूण ८४ हजार ६५० प्रकरणे निकाली काढण्यात आली.

*११ डिसेंबर २०२१ रोजीच्या लोकअदालतीमध्ये प्रलंबित ५३ हजार ७०६ व दाखलपूर्व २ लाख २४ हजार ५४७ प्रकरणे ठेवण्यात आली. प्रलंबित प्रकरणापैकी ८ हजार ७७१ तर दाखलपूर्व ४० हजार ४७५ अशी एकूण ४९ हजार २४६ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

*२०२१ या वर्षात झालेल्या तीन्ही लोकअदालतीमध्ये १ लाख ३५ हजार ३०३ प्रलंबित तर ३ लाख ८९ हजार २८२ दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी ३३ हजार १३० प्रलंबित तर १ लाख ३३ हजार ८२६ दाखलपूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली. एकूण १ लाख ६६ हजार ९५७ प्रकरणे तीन्ही लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आली.

दीपक दळवींवरील भ्याड हल्ला संतापजनक;हा तर संपूर्ण मराठी अस्मितेवर हल्ला -उपमुख्यमंत्री अजित पवार

0

मुंबई:- महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्यावर बेळगाव येथे झालेला भ्याड शाई हल्ला अत्यंत निंदनीय असून त्याचा तीव्र निषेध करतो. दळवी यांच्यावरील भ्याड हल्ला हा संपूर्ण मराठी अस्मितेवर जाणीवपूर्वक, सुनियोजित केलेला हल्ला आहे. या संतापजनक घटनेमुळे मराठी भाषक चळवळीवर कोणताही अनिष्ट परिणाम होणार नाही, उलट मराठीभाषक चळवळ आणखी जोमाने उसळी घेऊन पुढे जाईल. या घटनेमुळे मराठीभाषक एकदिलाने एकत्र येत लढा आणखी मजबूत करतील. एकीकरण समितीचे नेते दीपक दळवींसह मराठीभाषक चळवळीच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे, असे ठणकावून सांगत मराठीचा आवाज कदापी दबणार नाही, असा ठाम विश्वास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित यांनी आज व्यक्त केला.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्यावर झालेल्या शाई हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेचा निषेध केला, ते आपल्या प्रतिक्रियेत म्हणतात, सीमाागातील मराठीभाषकांचा हक्क जपणे, त्यांच्या अस्मितेचे संरक्षण करणे, सीमाागातील मराठी बांधव सनदशीर मार्गाने, लोकशाही मार्गाने लढत आहेत, त्यांच्या पाठीशी राहणे, हे आमचे कर्तव्य आहे. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या कोणत्याही मराठी सैनिकावर झालेला हल्ला खपवून घेतला जाणार नाही. मराठीभाषक चळवळीला धक्का देण्यासाठी हे भ्याड कृत्य सुनियोजित पध्दतीने करण्यात आले असावे. मात्र, अशा घटनांमुळे मराठीभाषक आंदोलनावर, चळवळीवर कोणताही अनिष्ट परिणाम होणार नाही. लढणं हे मराठी भाषकांच्या रक्तात आहे, त्यामुळे मराठी भाषकांना जेवढं दाबण्याचा प्रयत्न होईल, तेवढी मराठी भाषकांची चळवळ आणखी उसळी घेईल. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या मराठी सैनिकाच्यामागे महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस, महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हिंदू आहात तर मोगलांनी मंदिरांवर केलेल्या आक्रमणाचा निषेध करा

0

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांचे राहुल गांधी यांना आव्हान

पुणे-काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपण हिंदू असल्याचे सांगितले असले तरी हिंदू आणि हिंदुत्व असा त्यांचा संभ्रम झाला आहे. ते हिंदू असल्याचे सांगतात तर त्यांनी मोगलांनी हिंदू मंदिरांवर केलेल्या आक्रमणाचा निषेध करावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या प्रमाणे मंदिरांची पुनर्स्थापना करत आहेत त्याप्रमाणे कार्य करावे, असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी राहुल गांधी यांना दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काशी येथील विश्वनाथ मंदिराच्या परिसरातील भव्य विकास कामांचा लोकार्पण कार्यक्रम मोठ्या स्क्रीनवर पाहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. पुण्यात हडपसर परिसरात मांजराई देवी मंदिराच्या आवारात या कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राहुल गांधी यांनी आपण हिंदू आहोत पण हिंदुत्ववादी नाही, असे वक्तव्य केल्याबद्दल एका पत्रकाराने मा. प्रदेशाध्यक्षांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी वरील आव्हान दिले.

आ.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, राहुल गांधी यांचे वक्तव्य त्यांच्या संभ्रम दर्शविते. हिंदू आणि हिंदुत्ववादी यात काय फरक आहे ? हिंदू धर्म म्हणजे विशिष्ट एकच पूजा पद्धती नाही, तर हिंदू हा गुणवाचक शब्द आहे. जो हिंदू तत्त्वज्ञानाचा आग्रही असतो तो हिंदुत्ववादी असतो. या देशात हिंदू समाजात वेगवेगळ्या पूजा पद्धती निर्माण झाल्या आणि मंदिरे निर्माण झाली. त्यावर मोगलांनी आक्रमण केले. राहुल गांधी स्वतःला हिंदू म्हणत असतील तर त्यांनी मोगलांनी मंदिरांवर केलेल्या आक्रमणाचा निषेध केला पाहिजे.

त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सच्चे भारतीय आणि सच्चे हिंदुत्ववादी आहेत. काशीला गंगेत स्नान करून विश्वनाथ मंदिरात दर्शनाला येताना प्रचंड गर्दी होत होती आणि मंदिराभोवती प्रदूषण व सांडपाणी होते. ते हटविण्याचा संकल्प त्यांनी पूर्ण केला. आता मंदिराच्या भोवती पाच लाख चौरस फुटांचा सुंदर परिसर निर्माण झाला आहे. भाविकांना मोकळेपणाने वावरण्यासाठी जागा आहे. गंगेत स्नान करून भाविक थेट मंदिरात येऊ शकतात. मोदीजींनी अयोध्येतील राम मंदिराचा विषय मार्गी लावला आहे. केदारनाथ येथे शंकराचार्याचा पुतळा उभारून समाधीचे काम केले आहे तसेच मंदिर परिसरात मोठी विकास कामे केली आहेत. ते एका पाठोपाठ एका मंदिराचे काम करत आहेत. हा त्यांचा भावनिक अजेंडा आहे.

आ.चंद्रकांतदादा पाटील एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले की, म्हाडाच्या भरती परीक्षेत भ्रष्टाचाराची परिसीमा गाठली गेली. प्राथमिक अहवालानुसार म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फुटण्याचा संबंध थेट मंत्रालयापर्यंत आहे. महाविकास आघाडी सरकार सर्वांच्या आयुष्याशी खेळत आहे. एसटी कर्मचारी, एमपीएससीचे विद्यार्थी, आरोग्य विभाग भरती परीक्षा देणारे उमेदवार, म्हाडा भरतीसाठीचे उमेदवार, मराठा समाज, ओबीसी, अनुसूचित जाती – जमाती, शेतकरी अशा सर्वांच्या आयुष्याशी खेळ करून महाविकास आघाडी सत्तेचा उपभोग घेण्यात मग्न आहे.

नागपुरात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांचा दणदणीत विजय तर अकोल्यात भाजपच्या वसंत खंडेलवाल यांनी शिवसेनेला चारली धूळ

0

नागपूर-महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या नागपूरच्या जागेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाजी मारली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक मतमोजणीत ५४९ मते वैध ठरली. विजयी उमेदवारासाठी २७५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. पहिल्या मतांच्या मोजणीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२, रवींद्र भोयर यांना १, मंगेश देशमुख यांना १८६ मतं मिळाली. तर अकोल्यात भाजपच्या वसंत खंडेलवाल यांनी बाजी मारलीय.

राज्यातील विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकांची आज मतमोजणी होत आहे. निवडणूक आयोगाकडून या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यापैकी चार जागा बिनविरोध पार पडल्या आहेत तर नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यात आली आहे. दरम्यान अकोला आणि नागपुरात भाजपने बाजी मारली आहे. नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलढाणा या दोन्ही जागांवर भाजप उमेदवार हे विजयी झाले आहेत. दोन्ही उमेदवारांच्या विजयाची अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे.

विधान परिषदेच्या या दोन्ही जागांवर 10 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. आज या निवडणुकांची मतमोजणी करण्यात आली. यामध्ये दोन्हीही जागांवर भाजपने बाजी मारली आहे.

अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल हे दोघे निवडणुकींच्या रिंगणात उतरलेले होते. यामध्ये भाजपचे वंसत खंडेलवाल यांनी शिवसेनेला पराभवाची धूळ चारली झाले. शिवसेना गोपिकीशन बाजोरिया यांना 334 तर भाजप वसंत खंडेलवाल 443 मते पडली आहेत. गेल्या तीन टर्मपासून आमदार असलेल्या गोपिकिशन बाजोरिया यांचा पराभव झाल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

कैद्यांची मानसिकता बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आवश्यक – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

0

मुंबई दि. 13 : “सुधारणा आणि पुनर्वसन” असे ब्रीद असलेल्या महाराष्ट्र कारागृह प्रशासनाकडून कारागृहात असलेल्या बंदीजनांचे पुनर्वसन करण्याबरोबरच त्यांची मानसिकता आणि वर्तणूक बदलण्यासाठी  जाणीवपूर्वक प्रयत्न व्हावेत, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले.

महाराष्ट्रातील पाच मध्यवर्ती कारागृह आणि एक सुधारगृह येथील बंद्यांच्या (न्यायाधीन आणि शिक्षाधीन) कल्याण व पुनर्वसनाकरिता दि टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेसच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या पथदर्शी प्रकल्पाचे सादरीकरण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत झाले. महाराष्ट्र शासन आणि दि टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस यांच्यासोबत सामंजस्य करार करण्याच्या प्रस्तावास गृहमंत्री श्री.वळसे-पाटील यांनी यावेळी मान्यता दिली. नागपूर, तळोजा, येरवडा, नाशिक व औरंगाबाद या पाच मध्यवर्ती कारागृहांमध्ये आणि किशोर सुधारालय, नाशिक येथे हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

या सामंजस्य करारामुळे बंद्यांना कायदेविषयक सहाय्य, शारीरिक-मानसिक आरोग्य सेवा तसेच कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांच्यात मूलगामी परिवर्तन घडविण्यास निश्चित मदत होईल, असा विश्वास गृहमंत्री श्री.वळसे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

बंदी कारागृहात शिक्षा भोगत असतांना त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक अडचणी भासत असतात. हे लक्षात घेता त्यांच्या कुटुंबियांना शिक्षण, वैद्यकीय मदत तसेच सदस्यांच्या लग्नासाठी कर्जस्वरूपात आर्थिक मदत देण्यासाठी विशेष धोरण तयार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यामुळे शिक्षेदरम्यान केलेल्या कामातून त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहास मदत होऊ शकते असेही ते म्हणाले. गृह विभागाने यासंदर्भात पुढाकार घेऊन तात्काळ कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

या बैठकीस अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव आनंद लिमये, प्रधान सचिव संजय सक्सेना, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस चे प्राध्यापक डॉ.विजय राघवन यांसह गृह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आदिवासी पर्यावरण कार्यकर्त्या तुलसी गौडा मदर तेरेसा पुरस्काराने सन्मानित

0
  • पर्यावरण रक्षणासाठी कार्य करणाऱ्या निसर्ग रक्षकांचा हार्मनी फाउंडेशनतर्फे सन्मान

मुंबई, दि. 13 : वनराईचा चालता बोलता ज्ञानकोश म्हणून परिचित असलेल्या कर्नाटकातील ज्येष्ठ आदिवासी पर्यावरण कार्यकर्त्या तुलसी गौडा यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सामाजिक परिवर्तनासाठी मदर तेरेसा स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हार्मनी फाउंडेशनतर्फे सोमवारी (दि. १३) राजभवन येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते दुष्काळमुक्त महाराष्ट्र साकारण्यासाठी कार्य करीत असलेल्या ‘पानी फाउंडेशन’च्या डॉ.अविनाश पोळ यांना देखील सन्मानित करण्यात आले.

मुंबई येथील युवा पर्यावरण कार्यकर्ती आद्या जोशी तसेच मिशन ग्रीन मुंबईचे संस्थापक शुभोजीत मुखर्जी यांना देखील मदर तेरेसा स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी हार्मनी फाउंडेशनचे अध्यक्ष व अल्पसंख्यांक आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ.अब्राहम मथाई उपस्थित होते.

विद्यार्थ्याला पर्यावरणाविषयी जबाबदार नागरिक बनविणार – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

0

मुंबई, दि. 13 : शिक्षण म्हणजे केवळ शालेय अभ्यासक्रम नसून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक घडविणे याला अधिक महत्त्व आहे. वातावरणीय बदलांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये जागृतीसाठी पर्यावरण विभागाने अतिशय उपयुक्त अभ्यासक्रम तयार केला असून शालेय शिक्षण विभाग त्याची कालबद्ध अंमलबजावणी करून आपली जबाबदारी निश्चित पूर्ण करेल, असे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने युनिसेफच्या साहाय्याने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वातावरणीय बदल म्हणजे नक्की काय, त्याचे परिणाम आणि आपण काय करायला हवे याबाबत माहिती देणारा ‘माझी वसुंधरा’ अभ्यासक्रम तयार केला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या अभ्यासक्रमाची पुस्तके शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्याकडे सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात सुपूर्द केली. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे महासंचालक जयराज फाटक, युनिसेफचे श्रीमती राजलक्ष्मी, श्री.युसूफ, माझी वसुंधराचे अभियान संचालक सुधाकर बोबडे आदी यावेळी उपस्थित होते.

शालेय शिक्षण मंत्री प्रा.गायकवाड म्हणाल्या, पर्यावरण विभागाने माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून अतिशय चांगले उपक्रम राबविले आहेत. वातावरणीय बदलांविषयी भावी पिढीला जागरूक करण्यासाठी शालेय अभ्यासक्रम हा त्यातील अत्यंत उपयुक्त उपक्रम ठरेल. शालेय शिक्षण विभागामार्फत नववीपासून पुढे असा अभ्यासक्रम यापूर्वीच शिकविला जातो. आता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये जागृतीसाठी नवीन अभ्यासक्रम मोलाचा ठरेल. शालेय शिक्षण विभागामार्फत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अभ्यासक्रमासाठी समिती कार्यरत आहे. या समितीमध्ये पर्यावरणविषयक तज्ज्ञांचाही समावेश करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना मातृभाषेतून  शिक्षण अनिवार्य आहेच, तथापि भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर अडचण येऊ नये यादृष्टीने पहिलीपासून द्वैभाषिक अभ्यासक्रम शिकविण्याचे नियोजन असल्याचेही त्या म्हणाल्या.

आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेतंर्गत महाराष्ट्रात सर्वाधिक लाभार्थी

0

नवी दिल्ली,  दि. 13 ड‍िसेंबर : आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेतंर्गत सर्वाधिक लाभार्थी  राज्य म्हणून महाराष्ट्र अव्वलस्थानी असल्याची माहिती आज केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत दिली.

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना (एबीआरवाय) अंतर्गत कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या अर्जांनुसार महाराष्ट्रातून एबीआरवाय मधून सर्वाधिक लाभ घेतला असल्याचे श्री. तेली यांनी सांगितले. महाराष्ट्रातील एकूण 17,524 कंपन्यांमधील 6,49,560 कर्मचाऱ्यांनी 4,09,72,34,366 इतकी रकम वर्ष 2019-20 ते आर्थिक वर्ष 2021-22 या कालावधीत उचलली आहे.  महाराष्ट्र पाठोपाठ गुजरात, कर्नाटक या राज्यातील कामगारांनी रकम उचलली आहे.

केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) दाव्यांच्या निपटाऱ्यांची प्रक्रिया कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) जानेवारी 2020 मध्ये सुरु केली होती.

महामारी, पूर, भूकंप इत्यादी आपत्तीच्या वेळी इपीएफ सदस्यांना अखंड सेवा देण्यासाठी इपीएफओ मध्ये मल्टी-लोकेशन क्लेम सेटलमेंट सुविधा सुरू करण्यात आली होती. या व्यवस्थेमुळे ईपीएफ सदस्यांना अखंड सेवा पुरवण्यात मदत झाली आहे.

राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून १५ लाख २३ हजार ६३६ प्रकरणे निकाली; १४७७ कोटी रुपयांचा विक्रमी महसूल जमा

0

मुंबई, दि. १३ : राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मिटलेल्या प्रकरणांची संख्या ही देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाची आहे. या वर्षातील शेवटच्या राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून महाराष्ट्रात एकूण १५ लाख २३ हजार ६३६ प्रकरणे एका दिवसात निकाली निघाली आहेत. या प्रकरणांच्या माध्यमातून शासनाला १४७७ कोटी रुपयांचा विक्रमी महसूल मिळाला आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार मुख्य न्यायमूर्ती व प्रमुख आश्रयदाते, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण श्री. दिपाकर दत्ता व न्यायमूर्ती श्री. अमजद सय्यद, कार्यकारी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली दि.११ डिसेंबर २०२१ रोजी महाराष्ट्रातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्रातील ३४ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे, ३ उच्च न्यायालय विधी सेवा समिती/ उपसमित्या आणि ३०९ तालुका विधी सेवा समित्या येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीमध्ये एकूण १४८२ पॅनल ठेवण्यात आलेले होते. या पॅनलसमोर ४८ लाख ७ हजार ६३२ वाद दाखलपूर्व प्रकरणे आणि ४ लाख ५ हजार ६४७ प्रलंबित प्रकरणे अशी एकूण ५२ लाख १३ हजार २७९ प्रकरणे ठेवण्यात आलेली होती.

त्यापैकी एकूण १५ लाख २३ हजार ६३६ प्रकरणे ज्यामध्ये १४ लाख १८ हजार ९७० बाद दाखलपूर्व प्रकरणे, ५७ हजार २४७ प्रलंबित प्रकरणे आणि विशेष बैठकीमध्ये ४७ हजार ४१९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. १५ लाख २३ हजार ६३६ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

यामध्ये सोलापूर येथे २७ वर्षापासून प्रलंबित असलेला दावा राष्ट्रीय लोक अदालतीचे पॅनल सदस्य व वकील यांच्या प्रयत्नातून तडजोडीने निकाली निघाला. तसेच अंबेजोगाई तालुका विधी सेवा समितीसमोर भू-संपादन प्रकरण १० वर्षापासून प्रलंबित होते. ते राष्ट्रीय लोक अदालतीसमोर तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. या प्रकरणामध्ये ८० वर्षीय वयोवृद्ध पक्षकाराला न्यायालयीन इमारतीच्या पायऱ्या चढून पॅनलसमोर येणे शक्य नसल्याने लोक न्यायालयाचे पॅनलवरील न्यायाधीश व इतर सदस्यांनी न्यायालयीन इमारतीच्या बाहेर पक्षकाराकडे जाऊन तडजोड नोंद केली व न्याय तुमच्या दारी या उक्तीचा प्रत्यय आणून दिला.

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये महाराष्ट्रातील वाहतूक विभागाची ट्रॅफिक ई-चलानची ३६ लाखापेक्षा जास्त प्रकरणे वाद दाखलपूर्व स्वरुपात राष्ट्रीय लोक अदालतीसमोर ठेवण्यात आलेली होती. त्यामध्ये जवळपास १२ लाख (एकूण ११,९२,६६१) प्रकरणे तडजोड होऊन निकाली निघाली व त्यामधून महाराष्ट्र शासनाच्या वाहतूक विभागाला रु ५१ कोटीपेक्षा जास्ती रुपयाचा निधी वसूल होऊन मिळाला. या सर्व ३६ लाख प्रकरणांमध्ये संबंधित पक्षकारांना आभासी पद्धतीने नोटीस पाठविण्यात आलेल्या होत्या.

राष्ट्रीय लोक अदालत हे ‘कोविड-१९’ या पार्श्वभूमीवर आयोजीत करण्यात आलेले असल्याने सर्वांना ‘कोविड-१९ साठी शासनाने जारी केलेल्या आदेश व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत आदेशित केलेले होते. न्यायालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी पक्षकारांना आभासी पद्धतीने सुद्धा हजर राहण्याची मुभा देण्यात आलेली होती.

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोड झाल्यानंतर उभयतांच्या संमतीने लेखी तडजोड नोंद केली जाते व त्याआधारे अॅवार्ड पारीत केला जातो तो अॅवार्ड अंतिम असतो व त्याला हुकूमनाम्याचे स्वरूप प्राप्त होते. त्या अवार्डच्या विरुद्ध अपीलाची तरतूद नाही.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष, न्यायमूर्ती अमजद सय्यद,  यांनी महाराष्ट्रातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे, तालुका विधी सेवा समित्या यांच्यासोबत अनेकवेळा  बैठका घेतल्या. तसेच या सर्व प्राधिकरणांना व समित्यांना राष्ट्रीय लोक अदालतीच्या यशस्वीतेसाठी लोक अदालतीपूर्वी वेगवेगळ्या बैठका घेऊन पक्षकारांना त्यांच्या प्रकरणाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आवाहन केलेले होते. या सर्व प्रयत्नामुळे राष्ट्रीय लोक अदालतीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले.

त्यामुळे यावेळीच्या राष्ट्रीय लोक अदालतीत मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, बँकांचे वसुलीचे दावे, कोर्टात प्रलंबित असलेले तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, वैवाहिक प्रकरणे, धनादेश अनादर झाल्याचे खटले, वीज कंपन्यांनी दाखल केलेले खटले, वित्त संस्था तसेच भ्रमणध्वनी कंपन्या यांची रक्कम वसुली प्रकरणे व पोलीसांची वाहतूक चलनाबाबतची प्रकरणे मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेली होती,  अशी माहिती महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबईचे सदस्य सचिव, दिनेश सुराणा यांनी दिली.

पर्यटन संचालनालयाकडून ट्रॅव्हल गाईड बनन्याची संधी 31 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

0

पुणे दि. 13: पर्यटनवृद्धीला चालना तसेच स्थानिक युवकांना रोजगार अशा दुहेरी हेतूने राज्यातील 14 प्रसिद्ध पर्यटन स्थळी पर्यटन सुलभ मार्गदर्शक (ट्रॅव्हल गाईड) प्रशिक्षण कार्यक्रम महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्यावतीने राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याचा या 14 पर्यटन स्थळांमध्ये समावेश आहे. या प्रशिक्षणासाठी भाग घेऊ इच्छिणाऱ्या युवक- युवतींनी 31 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

आपल्या गावचे किल्ले, डोंगर, दऱ्या, मंदिरे, एखादे ऐतिहासिक संग्रहालय किंवा सामाजिक, सांस्कृतिक, नैसर्गिक वरदान लाभलेल्या कोणत्याही स्थळाची माहिती संकलित करण्याच्या आवडीला करिअर मध्ये रूपांतरित करण्याची चांगली संधी महाराष्ट्र पर्यटन संचालनालय (डीओटी) घेऊन आले आहे. स्थानिक प्रसिद्ध पर्यटन स्थळी पर्यटकांसाठी टूर गाईडची व्यवस्था करून या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार मिळवून देण्याच्या दुहेरी हेतूने राज्यातील तब्बल 14 प्रसिद्ध पर्यटन स्थळी पर्यटन सुलभ मार्गदर्शक (ट्रॅव्हल गाईड) प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये जुन्नर (पुणे) ठिकाणाचा समावेश असणार आहे.

सुलभ मार्गदर्शक प्रशिक्षण उपक्रमाच्या अंतर्गत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम व ट्रॅव्हल मॅनेजमेंट, ग्वाल्हेर तसेच महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातील तज्ज्ञ प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करतील. ज्यात मुख्यतः स्थानिक पर्यटनाची माहिती, नियम व सुरक्षा उपाययोजना पाळून पर्यटकांचा अनुभव परिपूर्ण कसा करावा तसेच पर्यटकांशी संवाद साधताना आपल्याकडील माहिती गोष्टीरूपाने कशी मांडावी याविषयी सविस्तर प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी स्थानिक पर्यटन स्थळांच्या ठिकाणी हे तज्ञ प्रात्यक्षिक मार्गदर्शन करतील. पाच दिवसांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यावर प्रशिक्षणार्थीना महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातर्फे प्रमाणपत्र व पुढे टूर गाईड म्हणून काम करण्यासाठी ओळखपत्र देण्यात येईल.

या प्रशिक्षणात भाग घेण्यासाठी उमेदवाराचे वय 18 वर्ष वा त्यापेक्षा अधिक असावे. शिक्षण 40 वर्षापेक्षा कमी वय असल्यास किमान 12 वी उत्तीर्ण आणि 40 वर्षापेक्षा अधिक वय असल्यास किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी https://www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी https://www.maharashtratourism.gov.in/web/mh-tourism/certified-guide-training या संकेतस्थळावर 31 डिसेंबर 2021 पूर्वी ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन पर्यटन संचालनालयाने केले आहे.

शिरुर येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

0

पुणे, दि.13 : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत गोलेगाव रोड शिरूर येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात 2021-2022 साठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ,अपंग आदी प्रवर्गाच्या विद्यार्थीनींना प्रवेश देण्याची प्रकिया सुरू करण्यात आली आहे.

प्रवेशासाठी विद्यार्थींनी ही बाहेरगावची परंतु शिरूरमध्ये शिक्षण घेणारी असावी. मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका, सक्षम प्राधिकाऱ्याच्या सहीचे जातीचे प्रमाणपत्र, तहसीलदारांच्या स्वाक्षरीचे वडिलांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र निवासाचे प्रमाणपत्र, तसेच महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, मुलीचे आणि वडिलांचे आधारकार्ड, शिधापत्रिकेची सत्यप्रत अर्जासोबत जोडावी. कोविड-19 आजाराबाबत वडिलांचे व विद्यार्थींनीचे लेखी संमतीपत्रक असावे. शाळा अथवा महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू असल्याबाबत मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांचे लेखी हमीपत्र देखील अर्जासोबत असणे आवश्यक आहे.

शासकिय वसतिगृहात विनामुल्य निवास व भोजनाची सुविधा आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दराने पुस्तके, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता आदीकरिता रक्कम आधार क्रमांक जोडलेल्या विद्यार्थ्याच्या बचत खात्यावर जमा होते.

कोविड-१९ महामारीमुळे रिक्त जागेच्या ५० टक्केच जागा भरल्या जाणार आहेत. बाहेरगावाकडील परंतु शिरूर जि. पुणे परिसरात शिक्षण घेणाऱ्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याकरिता वसतिगृहात येऊन नोंदणी करावी, असे आवाहन गृहपाल श्रीमती आर.व्ही.साखरे यांनी केले आहे.

तंत्रज्ञानाने सक्षम पिढी घडविण्यासाठी काम करा-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

0

पुणे,दि.१३: उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाची किमया ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यात येत आहे. शिक्षणसंस्थांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाने सक्षम पिढी घडविण्यासाठी काम करावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सभागृहात आयोजित शासकीय अभियांत्रिकी पदविका संस्थांच्या प्रायार्य व सहसंचालकांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक अभय वाघ, उपसचिव सतिष तिडके, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे (एमएसबीटीई) संचालक डॉ. विनोद मोहितकर, सहसंचालक प्रमोद नाईक, दत्तात्रय जाधव उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले, तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने नेणारी पिढी घडविण्यावर भर देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शासकीय महाविद्यालयात सर्व सोईसुविधा मिळाल्या पाहीजेत, यासाठीचा आराखडा तयार करावा. महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ आणि आवश्यक सुविधांनीयुक्त राहील यासाठी प्रयत्न करावे. विद्यार्थी आणि पालक आकर्षित होतील असा परिसर असाव. त्यासोबतच नवे ज्ञान आणि नव्या कल्पनादेखील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.

कोरोना कालावधीत उच्च व तंत्र शिक्षण विभागातील प्राचार्यांच्या नियोजनाने ऑक्सीजन ऑडीटचे अत्यंत चांगले काम केले आहे. त्यामुळे कोरोना कालावधीत ऑक्सीजनचे नियोजन सुलभ झाल्याचा उल्लेख करून मंत्री सामंत म्हणाले, महाविद्यालयाचा परिसर सुसज्ज असला पाहीजे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला शासनाचे सर्वाधिक प्राधान्य आहे. विद्यार्थी व पालकांना बरोबर घेत शैक्षणिक वातावरण अधीक चांगले करण्यासाठी प्राचार्यांनी भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल. कार्यशाळेत भविष्यातील शैक्षणिक प्रगती कशी असावी, तसेच शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाच्या विषयावर मंथन व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच कौशल्य आधारित शिक्षण मिळावे आणि नवीन कौशल्य आधारित तांत्रिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धीसाठी उपयोग व्हावा म्हणून उच्च व तंत्रशिक्षण विभागाने इन्फोसिस कंपनीसोबत सामंजस्य करार केला असल्याचेही मंत्री सामंत म्हणाले.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक अभय वाघ यांनी प्रास्ताविक करताना उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या उपक्रमाबाबत माहिती दिली. उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे रोजगारावर आधारीत अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्यातील अभियांत्रिकी पदविका संस्थांचे प्राचार्य, सहसंचालक तसेच ‘एमएसबीटीई’चे अधिकारी उपस्थित होते.