Home Blog Page 2115

जाळ्यात अडकलेल्या ऑलिव्ह रिडले, ग्रीन सी कासव यासारख्या २६० संरक्षित प्रजाती पुन्हा समुद्रात

0

मुंबई, दि. २० : सागरी जैवविविधतेचे रक्षण करताना ऑलिव्ह रिडले कासव, बहिरीमासा लांजा मासा ग्रीन कासव अशा एकूण २६० संरक्षित सागरी प्रजाती ज्या मासेमारी करतांना मच्छिमारांच्या जाळ्यात अडकल्या होत्या त्यांना मच्छिमारांनी सुखरूपपणे समुद्रात सोडले आहे. असे करताना त्यांच्या झालेल्या जाळ्यांच्या नुकसानीपोटी कांदळवन प्रतिष्ठानने त्यांना ४० लाख ७८ हजार ०५० रुपयांची नुकसान भरपाईही दिली आहे.

सागरी जैवविवितधेच्या रक्षणासाठी कांदळवन कक्ष करत असलेले काम कौतुकास्पद असूनअशाचप्रकारे राज्यातील जैवविविधतेच्या जपणुकीसाठी गांभीर्याने प्रयत्न होण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे तसेच यासाठी आवश्यक असलेली व्यापक जनजागृती केली जावी, स्थानिकांना यासाठी विश्वासात घेऊन काम करावे असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

कांदळवन संरक्षणासाठी राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी पाऊले – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

राज्यातील कांदळवन संरक्षण आणि संवर्धनासाठी शासनाने अतिशय महत्त्वाकांक्षी पाऊले टाकली असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. ते म्हणाले की, यात कांदळवन उपजीविका निर्माण, कांदळवन वनीकरण, कांदळवन निसर्ग पर्यटन, कांदळवनावरील अतिक्रमणे हटवणे आणि इतर उपक्रमांचा समावेश आहे. राज्यात कांदळवनाचे ३२ हजार हेक्टर आच्छादन आहे. या समृद्ध कांदळवनाचे संरक्षण करताना कांदळवनांना राखीव वनाचा दर्जा देण्याचे काम सुरु असून भारतीय वन अधिनियमातील कलम ४ नुसार २५१४.११ तर कलम २० अंतर्गत ९७८५.३६ हेक्टर इतके कांदळवन राखीव वने म्हणून घोषित करण्यात आले आहे. एमएमआर क्षेत्रात कांदळवनांच्या संरक्षणासाठी संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया सुरु आहे.. या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणून भारतीय वन सर्व्हेक्षण अहवाल २०२१ नुसार राज्यातील राज्यातील कांदळवन क्षेत्रात ४ चौ.कि.मीची वाढ झाली आहे, विविध शासकीय व खासगी विभागाकडील कांदळवने हस्तांतरीत करून घेण्याची प्रक्रिया अजूनही काही ठिकाणी सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सागरी प्रजातींच्या संरक्षणासाठीची उपाययोजना

सागरी जैवविविधतेच्या संवर्धनात स्थानिक मच्छिमारांचा नेहमीच महत्त्वाचा सहभाग राहिला असून शाश्वत मासेमारी करताना दुर्मिळ आणि संरक्षित प्रजातींचे रक्षण होईल याकडेही विशेष लक्ष देण्यात येत आहे यासाठी वन व मत्स्यव्यवसाय विभाग यांनी संयुक्तरित्या नुकसान भरपाईची योजना डिसेंबर २०१८ पासून राबविण्यात सुरुवात केली. या योजनेंतर्गत आतापर्यंत १३८ ऑलिव्ह रिडले कासव, ६७ ग्रीन सी कासव, ५ हॉक्सबिल कासव, २ लेदरबॅक समुद्री कासव, ३७ बहिरी मासा (व्हेल शार्क), ६ लांजा (जाअंट गिटारफिश) एक गादा ( हंप ब्याक डॉल्फिन) ४ बुलीया (फिनलेस पोर्पोईस) अशा  २६० दुर्मिळ प्रजातींना पुन्हा समुद्रात सोडण्यात आले आहे.

मागील १५ दिवसात

मागील पंधरा दिवसात अशा ३८ प्रकरणात ५ लाख ३५ हजार रुपयांची रक्कम कांदळवनकक्षाकडून देण्यात आली आहे ज्यामध्ये २६ ऑलीव्ह रिडले कासव, ६ बहिरी मासे, २ लांजा मासे, १ ग्रीन सी कासव, १ हॉक्सबिल कासव व १ बुलीया यांना मच्छिमारांनी सुखरूप समुद्रात सोडले आहे. या आर्थिकवर्षात अशाप्रकारे ८६ प्रकरणात मच्छिमारांना ११ लाख ५२ हजार ५०० रुपयांची नुकसानभरपाई कांदळवन कक्षामार्फत देण्यात आली आहे

कोरोनापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाय आवश्यकच!

0

कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. त्यापासून बचाव करावयाचा झाल्यास प्रतिबंधात्मक उपाय आवश्यकच आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी स्वत:चे रक्षण करुन इतरांचे संरक्षण करता येऊ शकते. कोरोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेऊन स्वत:बरोबरच इतरांनाही सुरक्षित करा. लसीकरणामुळे कोरोना नियंत्रित होत असला तरी कोरोना होऊ नये यासाठी स्वत:सह, आपले कुटुंबीय, मित्र आणि सहकारी यांचे संरक्षण करण्यासाठी कामाच्या ठिकाणी, घरी आणि बाहेर जात असताना योग्य पद्धतीने मास्कचा वापर करणे, सुरक्षित अंतर पाळणे आणि हात वारंवार साबणाने धुणे आदी नियमांचे पालन करणे आवश्यकच आहे.

याबरोबरच आजारावर नियंत्रण मिळवायचे असेल तर जीवनशैलीमध्ये बदल करून नियमित व्यायाम, योग्य आहार हे उत्तम पर्याय आहेत.

आपल्याकडे परदेशातून येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण बरेच आहे. सध्या ओमायक्रॉन  या नवीन व्हेरीयंटचा प्रभाव वाढताना दिसतो. त्याचा प्रसार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवासी आगमनासाठी शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक नियमांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या आहेत. ओमायक्रॉनच्या अनुषंगाने विभागातील कोविड आरोग्य संस्था सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच आरोग्य विभागातील अधिकारी यांच्यासमवेत बैठका घेऊन अत्यावश्यक औषधांचा तुटवडा होऊ नये याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ऑक्सिजन सुविधांचा आढावा घेऊन सुस्थितीत कार्यान्वित ठेवण्याबाबत खात्री करण्यात आली. डॉक्टर्स व स्टाफ नर्स यांचे प्रशिक्षण सत्र घेण्यात आले.

‘त्रिसूत्री पालन’

कोरोना हद्दपार होईपर्यंत त्रिसूत्रीचे पालन करण्याची प्रत्येकाने सवय लावणे आवश्यक आहे. सण, उत्सव, लग्नसमारंभ, भाजीमंडई, मॉल अशा गर्दीच्या ठिकाणी नियमांचे पालन करावे. कोरोना कालावधीत शाळा, महाविद्यालये बंद असल्याने मुलांचे मोठे नुकसान झाले आहे. वयोवृद्धांना घरातून बाहेर पडणे कठीण झाले. अजूनही मुले आणि वृद्धांवर घराबाहेर जाण्यावर बंधने आहेत. याचा विचार करुन सर्वांनी आपली जबाबदारी समजून कोरोनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

दीड वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पर्यटक पुन्हा पर्यटनासाठी सज्ज झाले होते. पुणे विभागातील पर्यटनस्थळे पर्यटकांनी तुडुंब भरल्याचे दिसून यायला लागले होते. कोरोना लसीकरणाच्या दोन मात्रा घेतल्या म्हणजे फिरण्याची मुभा मिळाली या आविर्भावात पर्यटक सगळीकडे गर्दी करताना दिसत होते. ही बाब काहीशी चिंताजनकच आहे.  परंतु पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या राज्य शासनाने दिलेल्या सूचनांनुसार पर्यटनस्थळे, धरणे, गड-किल्ले, स्मारके, ऐतिहासिक वास्तू या ठिकाणी पर्यटकांना प्रतिबंध केला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार कमी होण्यास निश्चितच मदत होईल.

लसीकरणामुळे मला कोरोना होणार नाही या भ्रमात राहून चालणार नाही. पंढरपूर, आळंदी, भीमाशंकर, सिंहगड, शिवनेरी आदी स्थळांना भेटी देणारा युवा वर्ग आणि भाविक बेफीकिरीने वागताना दिसला. युवकांनी नियमांचे पालन तर करावेच त्याबरोबरच लसीकरण करुन घ्यावे. ‘मिशन युवा स्वास्थ्य’ अंतर्गत 18 वर्षावरील सर्व युवांना लसीकरण करण्यात येते. तर ‘हर घर दस्तक’ मोहिमेंअंतर्गत सर्व गाव कोरोनामुक्त होण्यासाठी घरोघरी जाऊन वयोवृद्ध, दिव्यांग तसेच आजारी व्यक्तींना लसीकरण करण्यात येते. सलग 75 तास लसीकरण मोहिमही राबविण्यात आली. त्यामुळे कोविड लसीकरणाचा पहिला डोस 100 टक्के पूर्ण झाला आहे. ज्यांनी पहिली मात्रा घेतली आहे त्यांनी दुसरी मात्राही विहित मुदतीत घेतल्यास कोरोनावर नियंत्रण आणणे शक्य होईल.

’15 ते 18 वयोगट लसीकरण’

3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटासाठी लसीकरण सुरू झाले आहे. 2007 किंवा त्यापूर्वी जन्मलेली मुले लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. कोविन पोर्टलवर 1 जानेवारीपासून नोंदणी सुरू असून 50 टक्के लस ही ऑनलाईन तर 50 टक्के थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी उपलब्ध असणार आहे. लसीकरणासाठी आधारकार्ड किंवा इतर ओळखपत्र आवश्यक असणार आहे.

लसीकरण मोहिमेला सर्वांनी प्रतिसाद देऊन प्रत्येक कुटुंबातील पात्र व्यक्तीला तसेच आपल्या गावातील, घराघरातील व्यक्तींच्या लसीकरणावर लक्ष देणे, गावा-गावात लसीकरणाचे महत्त्व पोहोचवून त्यांनाही या मोहिमेत सामील करून घेणे ही युवा वर्गाची मोठी जबाबदारी आहे. त्यांनी स्वत:चे रक्षण तर केलेच पाहिजे, शिवाय कोरोना संदर्भात सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना अंगिकारल्याच पाहिजेत. सध्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणीही लशीच्या दोन मात्रा असल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही.

संपूर्ण लसीकरणाबाबत जागरुकता दाखविणे गरजेचे आहे. धार्मिक स्थळे, पर्यटन केंद्रे, सिनेमागृहे, नाट्यगृहात या युवा वर्गाकडून सध्या पुरेशी काळजी घेतली जात नाही, असे याठिकाणच्या भेटी दरम्यान हे दिसून आले. त्यासंदर्भात युवा वर्गाचे प्रबोधन होणे आवश्यक वाटते.

10 जानेवारीपासून लशीच्या दोन मात्रा झालेले फ्रंटलाईन वर्कर, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व 60 वर्षावरील नागरिकांना प्रतिबंधक लशीचा डोस देण्यास सुरुवात झाली आहे. लस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. कोणत्याही शासकीय रुग्णालयात मोफत लसीकरण केले जाते. लसीकरण हा संरक्षणाचा प्रभावी उपाय आहे. कोरोना नियंत्रणासाठी पहिली मात्रा महत्त्वपूर्ण तर, पूर्ण नियंत्रणासाठी दुसरी मात्रा आवश्यक आहे. त्यामुळे लशीची एक मात्रा झाली असेल तर दुसरी मात्राही वेळीच घ्या व सुरक्षित व्हा! कोरोनापासून संपूर्ण बचाव करायचा असेल तर कोरोना प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घेऊन नियम पाळा व कोरोना टाळा.

0000000

  डॉ.राजू पाटोदकर

 उपसंचालक (माहिती), पुणे विभाग,पुणे

अपेक्षा आणि गरजांचे संतुलन:केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३

0

दोन वर्षे उलटून गेली पण अजूनही महामारीने काढता पाय घेतल्याची चिन्हे काही दिसत नाहीत. कोरोना विषाणूच्या व्हेरियंटने (ओमायक्रॉन) जगभरात धुमाकूळ घातलेला आहे.  पुरवठा शृंखलांमध्ये आणि आर्थिक कामकाजांमध्ये अडथळे निर्माण होऊ नयेत आणि आपापल्या देशातील जनतेच्या सामाजिक व आरोग्य गरजा पुरवल्या जाव्यात यासाठी सरकारे तारेवरची कसरत करत आहेत. जीवन आणि उपजीविका यांच्यात संतुलन राखणे ही बाब पुन्हा एकदा प्राधान्यक्रमात सर्वात पहिल्या क्रमांकावर आली आहे.

भारतात अनेक उद्योगक्षेत्रे अद्याप पुरती सावरलेली नाहीत, महामारीच्या आधीच्या स्तरावर अजूनही पोहोचू शकलेली नाहीत. जवळपास प्रत्येक क्षेत्रात ताणतणावाच्या खाणाखुणा स्पष्टपणे दिसून येत आहे, खासकरून लघु व्यवसायांची स्थिती फारच बिकट आहे. जर केसेस वाढत राहिल्या तर स्थानिक पातळीवर लॉकडाऊन आणि कठोर प्रतिबंध लावले जाण्याची शक्यता आहे.  भारतात तिसऱ्या लाटेमध्ये कोविड-१९ च्या केसेसमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता ध्यानात घेता, महामारीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि उद्योगक्षेत्राच्या प्रगतीला चालना देण्यासाठी सरकारकडून अतिरिक्त खर्च केला जाणे आवश्यक आहे. अनिश्चिततेचे प्रमाण अजूनही खूप जास्त आहे आणि बॅलन्स शीट्स (सरकार, उद्योग-व्यवसाय आणि कुटुंबे अशा सर्वांच्या) अजूनही ताणलेल्या आहेत, अशा परिस्थितीत २०२२-२३चा केंद्रीय अर्थसंकल्प अतिशय बिकट पार्श्वभूमीवर तयार केला जाणार आहे.

वित्तीय एकत्रीकरण योजना रोखणे: आमची अपेक्षा आहे की सरकार ६.८% चे वित्तीय तूट उद्धिष्ट पूर्ण करेल आणि आर्थिक वर्ष २०२३ साठी अधिक जास्त म्हणजे ६% चे उद्धिष्ट निश्चित करेल. १५व्या वित्त आयोगानुसार, आर्थिक वर्ष २०२६ पर्यंत केंद्र सरकारने वित्तीय तूट जीडीपीच्या ४% इतकी खाली आणली पाहिजे आणि राज्यांनी ती ३% इतकी कमी केली पाहिजे, ज्यामुळे आर्थिक वर्ष २०२६ पर्यंत केंद्र आणि राज्यांच्या देणेदारी ३२.५% इतक्या खाली येऊ शकतील.  पण महामारी सगळ्यांच्याच अपेक्षांपेक्षा जास्त काळपर्यंत सुरूच असल्याने सामाजिक व आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने उद्धिष्टांमध्ये बदल करावे लागतील.

पांढरा हत्ती पोसणे थांबवले गेले पाहिजे (नॉन-मेरिट सबसिडीज): नॉन-मेरिट सबसिडींबाबत पुन्हा एकवार विचार केला जाण्याची आणि अनेक पट प्रभाव असलेल्या योजनांमध्ये पुन्हा फंड्स वळवण्याची वेळ येऊन ठेपली आहे कारण सरकारवरील कर्ज आणि व्याज चुकते करण्याचे ओझे अद्याप देखील खूप मोठे आहे.  आर्थिक वर्ष २०२२ मध्ये जवळपास ४५% महसूल प्राप्ती ही व्याज चुकते करण्यासाठी वापरली गेली, महामारीच्या आधीच्या काळात याचे प्रमाण ३६% होते (आर्थिक वर्ष २०२० मधील वास्तविक आकडेवारीनुसार).  यावर्षी व्याजदरांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने यामध्ये अजून जास्त वाढ होऊ शकते. संशोधकांच्या अनुमानानुसार, नॉन-मेरिट सबसिडींचे प्रमाण जीडीपीच्या ५.५% पेक्षा जास्त असल्याने (केंद्र व राज्य) या फंड्सपैकी काही रक्कम इतर विकास योजनांमध्ये वळवण्यावर सरकार विचार करू शकते.  सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सबसिडींचे दोन प्रकारे वर्गीकरण केले जाऊ शकते – मेरिट सबसिडी ज्यामध्ये खाद्यपदार्थ, शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा आणि स्वच्छता यांचा समावेश असतो तर नॉन-मेरिट सबसिडीमध्ये खते, ऊर्जा (वीज), बंदरे, रस्ते इत्यादींचा समावेश असतो. यांच्यातील फरक मेरिट सेवांशी संबंधित बाह्य गोष्टींवर आधारित असतो.  

सामाजिक आणि आर्थिक गरजांचे संतुलन: सरकारचा सर्वसामान्य ऋण स्तर अजूनही जास्त आहे (आर्थिक वर्ष २०२१ मध्ये जीडीपीच्या ८९.६%) आणि यामुळे भविष्यातील धक्क्यांना सामोरे जाण्याच्या सरकारच्या क्षमतेवर मर्यादा येतात ही बाब लक्षात घेऊन सरकारने सामाजिक खर्च व कॅपेक्स यांच्यात चांगले संतुलन राखण्याचे उद्धिष्ट आखले पाहिजे, कारण या दोघांवरही योग्य प्रमाणात जोर दिला जाणे गरजेचे असणार आहे. सातत्याने प्रगत होत असलेल्या लोकसंख्येची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये संभाव्य उत्पादन वाढवण्यासाठी भांडवली खर्च आवश्यक आहे, तर आर्थिक स्थिती फारशी चांगली नसलेल्या लोकसंख्येला मदतीचा हात देण्यासाठी सामाजिक खर्च आणि तात्काळ उत्तेजन उपाययोजना गरजेच्या आहेत.

ग्रामीण भागांमध्ये नोकरी हमी योजनेवरील खर्च आणि भांडवली खर्च यांना प्राधान्य दिले गेले पाहिजे.  आमची अपेक्षा आहे की, मागणी आणि रोजगार निर्मितीसाठी सरकारने मनरेगा व प्रधानमंत्री-किसान कार्यक्रमांवरील खर्च वाढवला पाहिजे. अनौपचारिक कामगार बाजारपेठा खूपच दुबळ्या पडल्यामुळे चालू आर्थिक वर्षात मनरेगा योजनेखाली कामाची मागणी खूप जास्त होती. चालू आर्थिक वर्षात १०० अब्ज रुपयांचे अतिरिक्त वाटप करून देखील, वापर हा वाटप करण्यात आलेल्या रकमेच्या १००% पेक्षा जास्त आहे (जानेवारीच्या मध्यापर्यंतच्या आकडेवारीनुसार), यामुळे देणी चुकती केली जाण्यात विलंब होऊ शकतो आणि कामाची मागणी वाढलेली राहू शकते.

कर्मचारी पुरवठ्याच्या अपेक्षांचे व्यवस्थापन: कामाच्या नवीन हायब्रिड वातावरणाला अनुकूल ठरतील अशा उपाययोजना सरकारने आणाव्यात अशी आमची अपेक्षा आहे, कारण विविध क्षेत्रांमध्ये याच पद्धतीचे काम नवे नॉर्मल असणार आहे. कर्मचाऱ्यांनी एका जागेहून दुसऱ्या जागी जाणे ही बाब क्वचित कधीतरी घडण्याचे दिवस आता उरले नाहीत. कोविड-१९मुळे कुशल कर्मचारी उपलब्ध होण्यात खूप मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे आणि व्यवसायांसाठी कर्मचाऱ्यांवरील खर्चात वाढ झाली आहे.  कर्मचाऱ्यांना कामाकडे परत आणणे, ग्राम-शहरीकरण या गोष्टी निदान सेवा क्षेत्रासाठी तरी उपयुक्त ठरू शकतील.

फक्त बजेट नकोतर खर्च सुद्धा करा: आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यात सरकारने भांडवली खर्चासाठी बजेटमध्ये तरतूद केलेल्या रकमेपैकी फक्त ४९% रक्कम खर्च केली आहे. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केली आहे पण खर्च केलेली नाही अशी खूप मोठी रक्कम दरवर्षी जमा होत असते.  कॅगच्या अनुमानानुसार आर्थिक वर्ष २०२० मध्ये जीडीपीच्या जवळपास २.०% इतकी रक्कम खर्च न केलेल्या भांडवली खर्चात होती.   

येत्या अर्थसंकल्पाकडून प्रत्येक क्षेत्राच्या अपेक्षा  

सूक्ष्मलघु व मध्यम उद्योगक्षेत्र

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगक्षेत्राला अनेक आव्हानांचा सामना अजूनही करावा लागत आहे. उपभोग्य वस्तूंवरील खर्चाच्या प्रमाणात झालेली घट, कच्च्या मालाच्या किमतींमध्ये झालेली वाढ, वाहतुकीच्या खर्चात वाढ आणि पुरवठा शृंखलेमध्ये येणारे अडथळे, याबरोबरीनेच विषाणूच्या नवनवीन व्हेरियंट्समुळे व्यवसाय संचालनात येणारे अडथळे अशा अनेक बाधा त्यांच्या मार्गात उभ्या आहेत. व्यवसाय संचालनाचे वातावरण आणि बाजारपेठेची स्थिती देखील अतिशय बिकट व तणावग्रस्त असल्यामुळे, आमची अपेक्षा आहे की, सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये एमएसएमई क्षेत्राला लक्षणीय मदत पुरवावी. विशेषतः पुढील बाबींवर विचार व्हावा.

4  पेमेंट्स मिळण्यात उशीर होण्याची समस्या दूर व्हावी: ऑक्टोबर २०१७ मध्ये एमएसएमई समाधानची सुरुवात झाली, तेव्हापासून आजतागायत फक्त २२% अर्जांवर एकतर कार्यवाही झाली आहे किंवा आपापसांत सामंजस्याने प्रकरणे सोडवली गेली आहेत. २१% प्रकरणे फेटाळण्यात आली आहेत तर तब्बल ५७% अर्जांवर एकतर विचार केला जात आहे किंवा कौन्सिलने अद्याप त्यावर काहीही कार्यवाही केलेली नाही. ही प्रकरणे सोडवायला वर्षे नाही पण बरेच महिने तर नक्कीच लागू शकतात.  ही प्रक्रिया वेगाने व्हावी यासाठी काही उपाययोजना केल्या जाव्यात अशी अपेक्षा आहे. भविष्यात विलंब होणे कमी व्हावे यासाठी सरकारने एमएसएमईना वाणिज्यिक कंत्राटांची प्रमाण पद्धत अवलंबिण्यात मदत करावी आणि अर्ज दाखल करण्यापासून प्रकरण सोडवण्यापर्यंत संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित करण्यासाठी मार्ग शोधून काढावे. क्रेडिट ब्यूरोप्रमाणे एकीकृत ट्रेड पेमेंट डेटाबेस तयार केला जावा.

4  खेळत्या भांडवलावरील मर्यादा कमी केल्या जाव्यात: ट्रेड रिसिव्हबल्स डिस्काउंटिंग सिस्टिमवर (टीआरईडीएस) अपलोड केलेल्या इन्व्हॉयसेसपैकी ९०% जास्त इन्व्हॉयसेसना वित्तपुरवठा केला जातो. अपलोड केल्या जाणार्‍या इनव्हॉइसची संख्या आणि मूल्य या दोन्हीत झालेली वाढ यातून एक निरोगी कल दर्शवला जातो. सर्व सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे ऑनबोर्डिंग जलद करणे आणि सर्व मोठ्या कॉर्पोरेट्सना टीआरईडीएस प्लॅटफॉर्म सक्रियपणे वापरण्यासाठी प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे.

सध्या, नवीन कोविड-19 केसेसची संख्या भारतात पहिल्या लाटेचा उच्चांक असताना नोंदवलेल्या नवीन केसेसपेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. भारतीय रिझर्व बँकेकडील माहिती असे दर्शवते की ओमायक्रॉनचा उद्रेक होण्याच्या आधी सप्टेंबर २०२१ पासून बँकांवर एमएसएमईना दिलेल्या कर्जांचा ताण असल्याची चिन्हे आहेत.  परिस्थिती अधिक जास्त बिघडल्यास आणि उद्योगव्यवसायांमध्ये अजून जास्त बाधा आल्यास सरकार समर्थित आपत्कालीन क्रेडिट लाइन हमी योजना वाढवणे आवश्यक होईल. एनपीएच्या ताणाखाली असलेल्या एमएसएमईंना सबऑर्डिनेट कर्ज देण्याचाही सरकार विचार करू शकते. २०२० मध्ये, सरकारने आर्थिक प्रोत्साहन उपायांचा भाग म्हणून यासाठी 200 अब्ज रुपयांची तरतूद केली होती.

4  भांडवल सहजपणे उपलब्ध व्हावे: आमची अपेक्षा आहे की फंड ऑफ फंड्स योजनेची अंमलबजावणी जलद गतीने होण्यासाठी उपाययोजना केल्या जाव्यात. तिसर्‍या लाटेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक लॉकडाऊन लावण्यात आल्यामुळे व्यवसायांमध्ये बाधा आल्याने आधीच पुनर्रचित कर्जांसह कर्जाच्या पुनर्रचनेची मागणी पुन्हा केली जाऊ शकते. मागील दोन लाटांच्या काळात एमएसएमईंना गंभीर आर्थिक संकटांचा सामना करावा लागला आहे आणि त्यामुळे त्यांना विशेष प्रोत्साहन, कर्ज पुनर्रचना आणि मोरॅटोरियम यांची गरज आहे.  

4  निर्यातीच्या पायाभूत सोयीसुविधा मजबूत करणे: देशातील निर्यात सुविधा केंद्रे आणि व्यवसाय विकास  केंद्रांचे सध्याचे नेटवर्क विस्तारित करून त्यामध्ये अधिक औद्योगिक क्लस्टर्सचा समावेश केला जावा. योग्य व्यवसाय भागीदार अडचणींमुळे एमएसएमई इतर बाजारपेठांमध्ये निर्यात करत नाहीत.  बिझनेस इन्फॉर्मशन पोर्टल वापरण्यासाठी निर्यातदारांना प्रोत्साहन दिले जावे कारण अशा पोर्टलवर व्यतीत केलेल्या प्रत्येक अतिरिक्त दिवसासह कोणत्याही व्यवसायाची नवीन बाजारपेठेत निर्यात करण्याची संभाव्यता सुमारे ०.१%ने वाढते. त्याचप्रमाणे, उच्च-तंत्रज्ञान उत्पादनांची निर्यात करण्यासाठी सक्षम इकोसिस्टिम निर्माण करण्याच्या दृष्टीने सरकारने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

4  आत्मनिर्भर भारत अभियान अधिक मजबूत करणे: वस्तूंच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे गेल्या काही काळात कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत, त्या कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत, त्यामुळे एमएसएमईना आपली स्पर्धात्मकता टिकवून ठेवता येईल आणि आत्मनिर्भर भारत अभियानात योगदान देता येईल. ही समस्या सोडवण्यासाठी सरकार सक्रिय पावले उचलत आहे पण सीमाशुल्कात घट केली जावी आणि इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चरमधील सुधारणा इतर मूलभूत कच्च्या सामग्रींसाठी देखील लागू केल्या जाव्यात अशी आमची अपेक्षा आहे.    

येत्या अर्थसंकल्पाकडून प्रत्येक क्षेत्राच्या अपेक्षा  

बँकिंग

4  तणावग्रस्त संपत्तींमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे सरकारने खराब आणि संशयास्पद कर्ज तरतुदींसाठी १००% कर कपातीचा दावा करण्याची परवानगी वित्तीय संस्थांना देण्याबाबत सरकारने विचार केला पाहिजे.  

4  सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना भेडसावणाऱ्या प्रशासन, व्यवस्थापन आणि संचालनात्मक समस्यांचे निवारण करण्यासाठी धोरणात्मक उपाय केले जावेत अशी अपेक्षा आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील सरकारचा हिस्सा कमी करण्यासाठी आणि एकत्रीकरणाचा आराखडा देखील आखला गेला पाहिजे. 

विमा

4  महामारीच्या काळात विम्याचे फायदे आणि गरज (विशेषतः आरोग्य विमा) प्रत्येक भारतीयाला जाणवली. खाजगी विमा क्षेत्राला प्रोत्साहन देऊन निदान प्रत्यक्ष निधीद्वारे सरकार सार्वत्रिक आरोग्य विम्याचे लक्ष्य ठरवू शकते. सामाजिक संरक्षणात सुधारणा घडवून आणण्यासाठी कर कपात मर्यादेत वाढ आणि विमा प्रीमियमवरील जीएसटीमधून सूट अशा उपाययोजना केल्या जाव्यात अशी अपेक्षा आहे.

4  महामारीच्या काळात विमा उद्योगाला मोठा फटका बसला आहे. जेस्टेशन कालावधी वाढवून कॅरी फॉरवर्ड आणि नुकसान सेट-ऑफ करण्यासाठी आठ वर्षांची मर्यादा विमा व्यवसायांसाठी वाढवली जाऊ शकते.

4  अॅन्युइटी आणि पेन्शन योजनांचा स्वीकार करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी, सरकार अॅन्युइटी आयकर मुक्त करू शकते (एका विशिष्ट मर्यादेपर्यंत) किंवा खरेदी केली जाणारी अॅन्युइटी उत्पादने करमुक्त केली जाऊ शकतात. सध्या पेन्शन योजना खरेदी करताना, पॉलिसीधारक अॅन्युइटीवर कर भरतो आणि अॅन्युइटी मिळाल्यावर आयकर भरतो. याशिवाय, विमा प्रीमियमवर 18% दराने जीएसटी आकारला जातो त्यामुळे कोणताही गैर-गुंतवणूक विमा (टर्म लाइफ, आरोग्य, सामान्य विमा) खरेदी करण्याची किंमत वाढते. अशी पॉलिसी गुंतवणुकीच्या उद्देशाने केली जात नाही, त्यामुळे सरकार कमीतकमी कव्हर असलेल्या पॉलिसींसाठी सूट देऊ शकते.    

पायाभूत सोयीसुविधा

4  खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक पुन्हा पूर्ववत होण्यास वेळ लागेल त्यामुळे अर्थव्यवस्थेला सरकारी गुंतवणुकीचा आधार मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांवर जोर दिला जावा अशी अपेक्षा आहे. आरोग्यसेवा पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सरकार खूप मोठे योगदान देईल अशी अपेक्षा आहे. शिक्षण आणि आरोग्य सेवा पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी गुंतवणूक अपेक्षित आहे.

4  दररोज किमान ४० किमी या वेगाने २०२४ पर्यंत देशभरात ६०,००० किमी लांब जागतिक दर्जाचे महामार्ग बांधण्याचे उद्धिष्ट भारताने आखलेले आहे.  अर्थसंकल्पाने विकासाचा हा अजेंडा पुढे नेणे आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीवर जोर देणे आवश्यक आहे. पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये केवळ भौतिकच नव्हे तर डिजिटल कनेक्टिव्हिटीचा देखील समावेश करणे आवश्यक आहे.

4  अर्थसंकल्पामध्ये प्रमुख सार्वजनिक रस्ते, रेल्वे, महामार्ग व द्रुतगती मार्ग आणि डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासाचा समावेश असला पाहिजे. वाहतुकीच्या पायाभूत सुविधा वाढवण्याच्या आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी अधिक जास्त फंडिंग अपेक्षित आहे.   

[ Dr. Arun Singh, Global Chief Economist, Dun & Bradstreet ]

कुविख्यात गुन्हेगार निलेश घायवळ टोळीतील ६ जणांना मोका

0

सन 2022 या चालु वर्षातील पहिली व मोकाअंतर्गत एकुण 65 वी कारवाई

पुणे-कुविख्यात गुन्हेगार निलेश घायवळ याचे टोळीतील तथा कोथरुड पोलीस ठाणेरेकॉर्डवरील गुन्हेगार मयुर उर्फ राकेश गुलाब कुंबरे, वय 27 वर्षे, रा. 82/22, सागर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरुड पुणे
व त्याचे साथीदारअशा सहा जणांवर आज पुणे पोलिसांनी मोक्काखाली कारवाई केली .1) मयुर ऊ र्फ राकेश गुलाब कुंबरे (टोळी प्रमुख) वय 27 वर्षे रा. 82/22, सागर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरुड पुणे 2) ओंकार ऊर्फ चिक्या शाम फाटक वय 23 वर्षे, रा. माथवड चाळ, ज्ञानेश्वर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरूड, पुणे 3) मनिष रामकृष्ण माथवड वय 22 वर्षे, रा. गणेश कॉलनी, गणंजय सोसायटी, शोभा संकुल अपार्टमेंट, कोथरुड पुणे. 4) गणेश सतीश राउत वय-23 रा.नवएकता कॉलनी हमराज मित्र मंडळ समोर शास्त्र्ीनगर कोथरुड पुणे 5) समिर खेंगरे 6) रावण ऊर्फ तुषार पोळेकर अशी त्यांची नावे असून यांचेविरुद्ध कोथरुड पोलीस ठाणे, पुणे शहर येथे 273/2021, भा.दं.वि. 307, 385, 324, 427, 323, 504, 506(2), 143, 144, 147, 148, 149, सह आर्म अॅक्ट 4 (25) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37 (1) सह 135 व क्रिमिनिल लॉ अमेंडमेंन्ट अॅक्ट कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे.

या सर्वांवर कोथरुड पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल असुन, त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करुनदेखील त्यांनी पुन्हा-पुन्हा गुन्हे केलेले आहेत. आरोपी मयुर उर्फ राकेश गुलाब कुंबरे याने त्याचे साथीदारांसह स्वत:चे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी कोथरुड तसेच पौड परीसरात दहशत केली असुन संघटितपणे व वैयक्तीकपणे खुन, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणीसाठी धमकी देणे, गंभीर दुखापत करणे, नागरीकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, घातक शस्त्राव्दारे जखमी करणे, बेकायदेशीर घातक शस्त्र जवळ बाळगणे, पोलीसांचे आदेशाचा भंग करणे, नागरीकांना मारहाण करुन जखमी करणे यासारखे गंभीर व हिंसक गुन्हे केलेले आहेत.या आरोपीवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन सुध्दा ते धजावत नसल्यामुळे तसेच त्यांच्या वर्तनात काहीही सुधारणा होत नसल्यामुळे. नमुद गु.र.नं. 273/2021 या गुन्ह्रात महाराष्ट्र संघटित
गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3(1)(त्त्),3(4) चा अंतर्भाव करणेसाठी सदर कायदयाचे कलम 23(1)(अ)
अन्वये मंजुरी मिळणे करीता वरीष्ठ पोलीस निरीक्षक, महेंद्र जगताप, कोथरुड पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी
पोलीस उप आयुक्त, परीमंडळ 03 पुणे शहर श्रीमती पौर्णिमा गायकवाड यांचे मार्फतीने अपर पोलीस
आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर राजेंद्र डहाळे यांना प्रस्ताव सादर केला होता.त्यास
अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेंद्र डहाळे यांनी मंजुरी
दिलेली आहे व या आरोपींविरुध्द मोक्का कायद्याप्रमाणे पुढील कारवाई केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त,पुणे शहर, अमिताभ गुप्ता, .पोलीस सह आयुक्त, पुणे
शहर,श्री.डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त,पश्चिम प्रादेशिक विभाग,पुणे शहर,राजेंद्र डहाळे, पोलीस
उप आयुक्त,श्रीमती.पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त,श्रीमती.रुक्मिणी गलंडे यांचे मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,कोथरुड पोलीस ठाणे,पुणे शहर .महेंद्र जगताप, पोलीस निरीक्षक,गुन्हे,बाळासाहेब बडे,
पोलीस उपनिरीक्षक,रतिकांत कोळी, पोलीस उपनिरीक्षक प्रविण कुलकर्णी, पो.ना.भास्कर बुचडे व पो.शि.अजय
सावंत यांनी केली आहे.
पोलीस आयुक्त, पुणे शहरअमिताभ गुप्ता यांनी पुणे आयुक्तालयाचा कार्यभार
घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व
समाजामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समुळ
उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे
मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत सन 2022 या चालु वर्षातील पहिली व मोकाअंतर्गत केलेली एकुण 65 वी कारवाई
आहे.

सामाजिक विकासाचे ध्येय

0

          सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत राज्यातील अनुसूचित जाति जमाती, ज्येष्ठ नागरिक, निराधार, दिव्यांग या घटकांसाठी वैयक्तिक तसेच सामूहिक योजना राबवण्यात येत आहेत. तळागाळातील या समाजाचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास करून या समाजाला विकासाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी सामाजिक न्याय विभाग प्रयत्नशील आहे.

धनंजय मुंडे

मंत्री, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य

          राज्यातील वंचित व उपेक्षित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांत सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

भारतरत्न डॉबाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक

          इंदूमिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारक उभारणी कामाचे संनियंत्रण सामाजिक न्याय विभागाने घेतले आहे. या स्मारकाची उंची 100 फुटाने वाढवण्यात येणार आहे. हे स्मारक सर्वोत्कृष्ट व्हावे, तसेच याचे काम 2024 पूर्वी पूर्ण व्हावे, यासाठी विभाग प्रयत्नशील आहे.

स्वाधार योजना

          भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी मोठ्या शहरापासून महाविद्यालयाचे अंतर 5 कि.मी. वरून वाढवून 10 कि.मी. पर्यंत करण्याचा निर्णय प्रस्तावित आहे. त्याबरोबरच तालुकास्तरावर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

परदेश शिष्यवृत्ती योजना

        राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या निकषात बदल करून आता वेटिंग लिस्ट मधील विद्यार्थ्यांचाही विचार केला जात आहे. प्रथमच योजनेचा कोटा 100 टक्के पूर्ण झाला आहे. फाईन आर्ट्स, फिल्ममेकिंग या विषयांचा समावेश करून आणखी 50 जागा वाढवणे प्रस्तावित आहे. 2020-21 साठी पात्र विद्यार्थ्यांना लॉकडाऊन काळात देशात किंवा परदेशात अडचण येऊ नये, यासाठी ऑनलाईन शिक्षण ग्राह्य धरले आहे.

गाव वाड्यांना समताधिष्ठित नावे

          ग्रामीण व शहरी भागातील गाव वाड्या-वस्त्यांची जातिवाचक नावे रद्द करून त्यांना समताधिष्ठित किंवा महापुरुषांचीना वेदेण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामविकास, नगरविकास, महसूल या विभागांशी समन्वय साधून गाव-वस्त्यांची जातिवाचक नावे कायमची हद्दपार व्हावीत, या दृष्टीने कार्यपद्धती अंतिम करण्यात येत आहे.

तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात आले. विभागीय स्तरावर तृतीय पंथीयांसाठी काम करणार्‍या सेवाभावी संस्थांचा समावेश करून तृतीय पंथीयांची नोंदणी करणे सुरू आहे.

दिव्यांगासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

दिव्यांगांच्या सर्व शाळा ‘दिव्यांगत्वाचे शीघ्र निदान व शीघ्र उपचार केंद्र’ व्हाव्यात यासाठी दिव्यांग शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांना 5 दिवसीय विशेष प्रशिक्षण देण्यात आले. दिव्यांग व्यक्तींना विशेष साहाय्यक उपकरणे मोफत मिळावीत, यासाठी दानशूर व्यक्ती, संस्था व गरजू दिव्यांग यांची एकत्र सांगड घालणारे‘महाशरद’ पोर्टल सुरू करण्यात आले. या पोर्टलवर देण्यात येणाऱ्या देणग्या व मदत करमुक्त असावी, यासाठीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. दिव्यांगांच्या विविध योजना एका क्लिकवर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ॲपची निर्मिती करण्यात येणार आहे.
बार्टी तर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
   बार्टी तर्फे यूपीएससी व एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लॉकडाऊन काळात विशेष ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले आहेत. नागरी सेवा परिक्षेमध्ये (युपीएससी) 2020 मध्ये बार्टीचे 10 तर राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) च्या 2019 च्या परीक्षेत एकूण 14 विद्यार्थ्यी यशस्वी झाले आहेत.
बार्टी मार्फत बँकिंग, रेल्वे, पोलीस भरती तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकऱ्यांच्या दृष्टीने राज्यातील 30 केंद्रांवर विशेष प्रशिक्षण कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रति महिना 6 हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. तसेच पोलीस भरतीसाठी विद्यार्थ्यांना बूट व अन्य साहित्य खरेदीसाठी प्रत्येकी 3 हजार रुपये देण्यात येतील. 30 केंद्रावरून फोन सत्रात 600 प्रमाणे दरवर्षी एकूण 18 हजार विद्यार्थ्यांना असे पाच वर्षात 90 हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे.
अनुसूचित जातीतील आर्थिक दुर्बल कुटुंबातील दहावीच्या परीक्षेत 90% पेक्षा अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या पूर्व तयारीसाठी पुढील दोन वर्षात प्रत्येकी एक लाख प्रमाणे दोन लाख रुपये विशेष सानुग्रह अनुदान देण्यात येत आहेत. ‘बार्टी’ च्या सर्व योजना एका क्लिकवर मिळाव्यात, यासाठी ई-बार्टी हे मोबाईल ॲप सुरू केले आहे. एमफिल व पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांनादिलीजाणारीइअछठऋ (डॉ. बाबासाहेबआंबेडकरसंशोधनअधिछात्रवृत्ती) 2020-21 मध्येअर्जकेलेल्यासर्व 408 विद्यार्थ्यांनादेण्याचानिर्णयघेतला. दरवर्षीहीअधिछात्रवृत्ती 105 विद्यार्थ्यांना दिली जाते. 2019 व 2020 साठी प्रत्येकी 200 विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर केली आहे.

  जात प्रमाणपत्र पडताळणीची सर्व सुविधा ऑनलाईन आहे. पासपोर्टच्या धर्तीवर प्रक्रिया प्रस्तावित आहे. तसेच बार्टीमार्फत जिल्हा निहाय जात पडताळणी समित्या स्थापन केल्या आहेत.
अभ्यास आयोगांची स्थापना
मातंग, कैकाडी तसेच मेहतर (भंगी) समाजाचा सामाजिक, आर्थिक तसेच शैक्षणिक विकास व्हावा. तसेच मागासलेपण दूर व्हावे, यासाठी समाजाचा बारकाईने अभ्यास होऊन सद्य:स्थिती समोर यावी, यासाठी अभ्यास आयोग नेमले आहेत.
संविधान सभागृह
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत 500 पेक्षा अधिक अनुसूचित जातीतील लोकवस्ती असलेल्या ठिकाणी संविधान सभागृह बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये सभागृह, अभ्यासिका, ग्रंथालय आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
रमाई आवास
 अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबाचे राहणीमान उंचवावे व त्यांच्या निवारण्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागांमध्ये त्यांच्या स्वत:च्या जागेवर 269 चौरस फुटाचे घर बांधून देण्यासाठी रमाई आवास (घरकूल योजना) 2009-10 पासून सुरू आहे. महा आवास अभियान 2020-21 अंतर्गत दीड लाख घरकुलांना रमाई आवास योजनेचा प्रत्यक्ष निधी देऊन दोन वर्षांत 68,585 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालेआहे.
सफाई कामगारांसाठी स्वतंत्र कार्यासन
दूषित गटारांमध्ये काम करताना मृत्यू पावलेल्या, हाताने मैला उचलणार्‍या कामगारांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. हाताने मैला उचलणार्‍या कामगारांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई देण्यासाठी सक्षम प्राधिकारी (जबाबदार अधिकारी) निश्चित केले आहेत. सफाई कामगारांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी राज्यशासन स्तरावर स्वतंत्र कार्यासन निर्माण केले आहे.

ऊसतोड कामगार : महत्त्वपूर्ण निर्णय

ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. महामंडळाला इतर कोणत्याही योजनेचा निधी कपात न करता कायम निधी उपलब्ध व्हावा, यासाठी ऊस खरेदीवर प्रतिटन 10 रुपये अधिभार लावण्यात येणार आहे व यातून जितकी रक्कम जमा होईल तितकीच रक्कम राज्य सरकार देईल व याद्वारे महामंडळाचे कामकाज चालणार आहे. महामंडळाचे परळी व पुणे येथे कार्यालय होणार आहे.
महामंडळांतर्गत संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेला मंजुरी दिली आहे. राज्यातील 10 जिल्ह्यांत 41 मुलींसाठी व 41 मुलांसाठी अशी एकूण 82 वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. 100 मुले किंवा 100 मुली अशी वसतिगृहाची क्षमता असेल. ऊसतोड कामगारांना ग्रामसेवक किंवा तत्सम यंत्रणेकडून ओळख पत्र देण्यासाठी ही प्रक्रिया गतिमान करण्यासाठी डिजिटल यंत्रणेचा वापर होणार आहे.

शरदशतम आरोग्य कवच विमा योजना

राज्यातील 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून किमान एकदा आरोग्य तपासणी तसेच चाचण्या करणे अशा स्वरूपाची ‘शरदशतम आरोग्य कवच विमा योजना’ लवकरच कार्यान्वित होणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय
 कोविड-19 च्या लॉकडाऊन काळात श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तिवेतन या दोन्ही योजनेतील लाभार्थींना राज्य सरकारने तीन तीन महिन्यांचे आगाऊ मानधन एकत्रित दिले.
चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकासम हामंडळांतर्गत मेगा लेदर फूटवेअर ॲन्ड ॲक्सेसरीज क्लस्टर (चङऋअउ) प्रकल्प राबवण्यासाठी कार्यवाही सुरू आहे.
 पादत्राणे उत्पादन केंद्र कोल्हापूर येथे महामंडळाच्या उत्पादन केंद्राची इमारत असून, त्या ठिकाणी  कोल्हापुरी  चप्पल उत्पादनाचे काम सुरू आहे. तसेच तेथे 40 गुंठे मोकळी जागा असून तेथे सामाजिक सुविधा केंद्र व फुटवेअर प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याकरिता शासनाने मंजुरी दिली आहे.

शब्दांकन :संध्या गरवारे,

विभागीय संपर्क अधिकारी

भाजपला सर्वाधिक जागा पण महाविकास आघाडीची सरशी..

0

काँग्रेस ला खेचत राष्ट्रवादी सुसाट

मुंबई-

नगरपंचायत निवडणुकांमध्ये बुधवारी भाजपने राज्यभरात सर्वाधिक जागा मिळवल्या मात्र एकूण जागांची गोळाबेरीज करता सत्ताधारी महाविकास आघाडीची सरशी झाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकतील निकालाचीच नगरपंचायतमध्येही पुनरावृत्ती घडण्याची शक्यता आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे राज्यातील १०६ नगर पंचायतींसाठी दोन टप्यांमध्ये मतदान झाले.

त्याचा निकाल बुधवारी जाहिर झाला. यामध्ये सर्वाधिक ३८४ जागा भाजपने पटकावत राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ३४४ जागा जिंकून दुसरा क्रमांक प्राप्त केला. काँग्रेसला ३१६ जागा मिळाल्या असून राज्यात महाविकास आघाडीचे सारथ्य करत असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चौथ्या क्रमांकाच्या २८४ जागा मिळवता आल्या आहेत.

२०१४ ते १८ दरम्यान पार पडलेल्या नगरपंचायतींच्या निवडणुकांत राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष होता. पहिला क्रमांक भाजपचा तर दुसरा मोठा पक्ष काँग्रेस होता. यावेळी मात्र राष्ट्रवादीने आपली कामगिरी सुधारली असून काँग्रेसला मागे खेचत दुसरा क्रमांक पटकावला आहे. शिवसेना मागच्या वेळी चौथ्या क्रमांकावर होती.

यंदा ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्यामुळे गाजलेल्या या निवडणुकीवर कोरोनाचेही विघ्न होते परंतु राज्यभरात भरभरून मतदान झाले. राज्यातील १०६ नगर पंचायतींमधील १ हजार ८०२ जागांसाठी २१ डिसेंबर २०२१ आणि १८ जानेवारी २०२२ अशा दोन टप्प्यात मतदान झाले होते. यापैकी ९७ नगर पंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी होऊन १ हजार ६४९ जागांपैकी १ हजार ६३८ जागांचे निकाल जाहीर करण्यात आले.

ही निवडणूक चारही प्रमुख पक्ष स्वबळावर लढले. या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असला तरी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. दरम्यान, भाजप पुन्हा नंबर वन पक्ष असल्याचे सिद्ध झाल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली..तर भाजपला राज्यातील जनतेने नाकारले असून एकूण ८० टक्के जागा महाविकास आाघाडीच्याच पारडयात पडल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

माझा पुरस्कार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अर्पण : महापौर किशोरी पेडणेकर

0

महापौर किशोरी पेडणेकर यांचा नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स, महाराष्ट्र तर्फे गौरव ! आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे मुंबईत भव्य स्मारक उभारण्यात यावे : ज्येष्ठ पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी यांची महापौरांकडे मागणी पत्रकारांची नोंदणी करण्यासाठी शीतल करदेकर यांचा आग्रह

मुंबई,: मला मिळालेला पुरस्कार हा मुंबईच्या सव्वा कोटी जनतेचा असून हा पुरस्कार मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे लाडके, लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अर्पण करीत आहे, असे कृतज्ञतेचे उद्गार मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी आज काढले. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स, महाराष्ट्र तर्फे गेल्या दोन वर्षात कोरोनाविरोधात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल व धाडसी नेतृत्वाबद्दल मुंबईच्या महापौर सौ. किशोरी किशोर पेडणेकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांच्या हस्ते शिवालय येथील एका छोटेखानी कौटुंबिक वातावरणात शाल, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले, त्यावेळी महापौर किशोरी पेडणेकर या बोलत होत्या. एनयुजेमहाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर, अभिनेत्री अर्चना नेवरेकर, सामाजिक कार्यकर्त्या जॉय भोसले, पदाधिकारी संदिप टक्के, स्वप्नील शिंदे, अनिल गुरव, महेश चौगुले, संतोष राजदेव, राजू येरुणकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. दोन वर्षापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची तर मी महापौर पदाची जबाबदारी स्वीकारली. योगायोगाने कोविड १९ त्याचवेळी सुरु झाला आणि नियतीने आमच्यावर मुंबई महाराष्ट्राची जबाबदारी आली. बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांच्या स्वभावाचा सुंदर मिलाफ उद्धव ठाकरे यांच्या ठायी असल्याने त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कोविड वर आपण मात करु शकलो. मुंबईकरांनी मला संपूर्ण साथ दिली. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी वहिनींच्या मार्गदर्शनामुळे मला काम करणे शक्य झाले. त्यामुळे नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स, महाराष्ट्र यांनी जो माझा ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी यांच्या हस्ते सत्कार केला ते मी माझे भाग्य समजते आणि हा पुरस्कार मी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब यांना अर्पण करते. ओमायक्रॉनचा धोका कमी झाला असला तरी डेल्टा व्हायरस चा संसर्ग लक्षात घ्यावा लागेल. काळजी घ्या आणि सर्वच नियम काटेकोर पणे पाळा, असे माझे मुंबईकरांना आवाहन आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. योगेश वसंत त्रिवेदी यांनी आपल्या भाषणात नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स महाराष्ट्र या संस्थेने माझ्या हस्ते मुंबई च्या सव्वा ते दीड कोटी नागरिकांच्या प्रमुख, प्रथम नागरिक यांचा सन्मान करवून माझाच सन्मान केला आहे. पत्रकारितेत आपण ज्यांच्यामुळे आहोत ते आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांचे मुंबईत भव्य स्मारक उभे रहावे आणि महापौर किशोरीताई यांनी यासाठी पुढाकार घ्यावा तसेच सर्वच पत्रकार संघटनांनी त्यांच्या पाठीशी एकजुटीने उभे रहावे, असे आवाहन केले. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स महाराष्ट्र च्या धडाकेबाज अध्यक्षा शीतल करदेकर यांनी महापौरांच्या कार्याचा गौरव करुन पत्रकारांना त्यांचे न्याय्य हक्क मिळावेत, त्यांची सरकार दरबारी योग्य नोंदणी करण्यात यावी, सन्मानाने सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, बोगस पत्रकारांचा सुळसुळाट कमी करण्यासाठी काय करता येईल ते पहावे, अशी आग्रही भूमिका मांडली. सांस्कृतिक सामाजिक कार्यकर्त्या जॉय भोसले व अभिनेत्री अर्चना नेवरेकर यांनी ही पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

कलाकारांना एकरकमी आर्थिक सहाय्य मिळणार

0

अर्ज करण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे आवाहन

ठाणे : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कलाकारांना राज्य शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने एकरकमी पाच हजार आर्थिक सहाय्य मिळणार आहे. ठाणे जिल्हातील दोन हजार कलाकारांना या अर्थसहाय्याचा लाभ देण्यात येणार असून यासाठी कलाकारांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

कलाकारांनी हे अर्ज नजिकच्या तहसीलदार कार्यालयात सादर करायचे आहेत. यासाठी लागणारा अर्जाचा नमुना सर्व तहसीलदार कार्यालय तसेच www.mahasanskruti.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

एकरकमी आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी शासनाने ठरविलेल्या पात्रता अटींची पूर्तता करणे इष्ट आहे. एकल कलाकार सहाय्यासाठी कलेच्या क्षेत्रात १५ वर्ष कार्यरत असल्याबाबतचे पुरावे, महाराष्ट्रात १५ वर्ष वास्तव, वार्षिक उत्पन्न ४८ हजारांच्या कमाल मर्यादेत असणे आवश्यक आहे.

कलाकारांनी अर्ज सादर केल्यानंतर त्या अर्जावर छाननी समिती
अर्जांची पडताळणी करेल त्यानंतरच पात्र कलाकारच्या निवड याद्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांस्कृतिक कार्य संचालनाकडे अर्थ सहाय्यासाठी सादर करण्यात येईल अशी माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते यांनी दिली .

या कलाकारांना याचा लाभ मिळणार नाही

केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वृद्ध कलाकार मानधन योजनेतून मानधन घेणाऱ्या लाभार्थी कलाकारांना तसेच इतर वैयक्तिक शासकीय अर्थसहाय्यच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

आमदार मंगल प्रभात लोढा यांना पोलिसांनी केली अटक

0

मुंबई-

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केले या आरोपावरून त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी या मागणीसाठी मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वात मुंबई भाजपा तर्फे मंत्रालय परिसरातील गांधीजींच्या पुतळ्याजवळ साखळी उपोषण सरू असताना पोलिस प्रशासन हे साखळी उपोषण थांबवण्याचा प्रयत्न केला असून मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांना पोलिसांनी अटक केली आहे.

त्यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा, भाजपा मुंबई उपाध्यक्षआचार्य पवन त्रिपाठी, मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे, अनुसुचित जाती मोर्चा मुंबई अध्यक्ष शरद कांबळे, दक्षिण मुंबई भाजपा जिल्हा अध्यक्ष शरद चिंतनकर, दक्षिण मुंबई भाजपा जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष सनी सानप उपस्थित होते.

समित कक्कड पडद्यावर आणणार नार्को क्वीन शशिकला पाटणकर यांची कहाणी

0

‘नार्को क्वीन’ शशिकला उर्फ बेबी पाटणकर यांच्या जीवनावर आधारित असलेल्या आगामी वेब सिरीजची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध फिल्ममेकर संजय गुप्ता यांच्या व्हाईट फेदर फिल्म्सच्या बॅनरखाली या वेब सिरीजची निर्मिती करण्यात येणार आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी समित कक्कड आणि संजय गुप्ता सांभाळणार आहेत. समित यांनी आजवरच्या आपल्या चित्रपटांमधून खऱ्या मुंबईचं दर्शन घडवलं आहे.

चित्रपट व्यवसायातील सुमारे दोन दशकांच्या आपल्या प्रवासात, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक समित कक्कड यांनी पडद्यामागे स्थिरावत दिग्दर्शकाच्या रूपात आपली एक वेगळी इमेज तयार करण्यात यश मिळवलं आहे. ‘आश्चर्यचकित’, ‘हाफ तिकीट’, ‘आयना का बायना’ या चित्रपटांसोबतच ‘इंदोरी इश्क’ हा वेब शो आणि सध्या निर्मिती प्रक्रियेत असलेल्या ‘धारावी बँक’मध्ये समित यांचं मुंबईवरील प्रेम हा कॅामन फॅक्टर पहायला मिळतो. वादग्रस्त बार डान्सर स्वीटीवरील बायोपिकचं दिग्दर्शनही समित करत आहेत.

मुंबई शहराच्या प्रेमात असलेले समित म्हणाले की, “हे थोडंसं विचित्र वाटलं तरी मी किशोरवयीन असल्यापासून अनपेक्षितपणे यासारख्या विषयांकडे आकर्षित झालो होतो, तेव्हा मी कॉलेजमध्येही नव्हतो. तेव्हाही बार डान्सर्स, गुंड, पानवाले… प्रत्येकाची आपली एक वेगळी स्टोरी होती जी तुमचे अनुभव समृद्ध करत असते. मुंबई शहराच्या या अंतरंगाने मला नेहमीच आकर्षित केलं आहे. आजही या कथा जणू सोन्याची खाण आहेत. आपल्याला फक्त आपले कान उघडे आणि पाय जमिनीवर ठेवावे लागतत. मी बऱ्याच वर्षांपासून बार डान्सर्स, गँगलीडर्स यांसारख्या समाजातील घटकांना फॉलो करत होतो. त्यामुळं जेव्हा मी माझं स्वतःचं कंटेंट तयार करू लागलो, तेव्हा माझ्या गाठीशी जमा झालेल्या अनुभवांना आपोआप वाचा फुटणं स्वाभाविक होतं.”

मागील काही दशकांपासून चित्रपट निर्मात्यांना मुंबई शहराच्या जडणघडणीतील विविध घटकांनी भुरळ घातली आहे, ज्यात या अंडरबेलीचाही समावेश आहे. मुंबईच्या अंडरबेलीनंच अधिक आकर्षित करण्याबाबत सविस्तरपणे सांगताना समित म्हणाले की, ‘इथे तुम्हाला भेटणाऱ्या व्यक्तिरेखा तुमची विचारसरणी कायमची बदलणारी ठरतील. वरवर पाहता खूपच झगमगीत दिसणाऱ्या या शहराच्या अंधाऱ्या वास्तवाने माझ्या मनात कुतूहल जागवलं. माझ्या आशयातील सर्व व्यक्तिरेखा, सेटिंग्ज आणि चित्रण वास्तविक अनुभवातून आलेलं आहे. स्वीटीच्या जीवनावर आधारित असलेली पुष्कराज आणि शशिकला पाटणकर यांच्या जीवनावरील कथा हे दोन्ही आकर्षक असून, आपल्या प्रेक्षकांना त्यांनी यापूर्वी न पाहिलेले या शहराचे पैलू दाखवणाऱ्या ठरतील.

भाषा विभागाचा तीन वर्षांचा कृती आराखडा तयार करा-मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

0

मुंबई, दि. १९ राज्य शासनाच्या भाषा विभागाने मागील दोन वर्षांत उल्लेखनिय काम करत विविध उपक्रम यशस्वीरित्या राबविले. यापुढे मराठी भाषा विभागाला दिशा देणारा पुढील तीन वर्षांचा ठोस कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई य़ांनी आज येथे दिले.

मराठी भाषा विभागांतर्गत येत असलेल्या चार संस्थांच्या कामाचा आढावा व आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी विश्वकोष मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्य़क्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे, प्रा. लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासह भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, सहसचिव मिलिंद गवादे, मीनाक्षी पाटील, संजय पाटील, शमाकांत देवरे यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मराठी भाषा धोरणाच्या अमंलबजावणीसाठी सुधारित मसूदा तयार करणे, अभिजात मराठी भाषा जन अभियान मोहिमेची प्रभावी अमंलबजावणी, मराठी बोलीभाषा संबंधी नवे उपक्रम आयोजित, मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यावर चर्चा करण्यात आली. मराठी भाषा धोरण तयार असून ते लवकरच जाहीर करण्याची सूचना श्री. सदानंद मोरे यांनी मांडली. दरम्यान, काही सूचनांसह १५ फ्रेब्रुवारीपर्यंत हा अहवाल सादर करण्यात येईल, असे लक्ष्मीकांत देशमुख यांनी स्पष्ट केले. दरम्यान, २७ फेब्रुवारीपूर्वी मंत्रिमंडळाची प्रस्ताव मंजुरी घेण्यात यावी, असे नियोजन करण्याच्या सूचना श्री. देसाई यांनी केल्या.

मराठीच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक संस्था काम करतात. त्यासाठी आंतरराष्ट्रीय मंच तयार करण्यात आला आहे. भाषा विभागाने देश-विदेशातील मराठी संस्थांशी समन्वय ठेवण्यासाठी प्रणाली विकसित करण्याची सूचना यावेळी करण्यात आली.

मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी विभागाचा कारभार हाती घेतल्यानंतर विविध योजना पूर्ण केल्या आहेत. अनेक प्रलंबित विषय मार्गी लावले आहेत. मराठी भाषा विभागासाठी मरिन ड्राइव्ह परिसरात मोक्याचा भूखंड मिळाला. उपक्रेंद्राचा प्रश्न मार्गी लागला. अभिजात मराठीसाठी जनजागृती मोहिम राबविली जात आहे. पुस्तकांचे गाव योजनेचा विस्तार, मराठी पाट्यांची सक्ती, सर्व माध्यमांच्या शाळांमधून मराठी भाषा शिकविणे सक्तीचे आदी महत्वाचे निर्णय़ मागील दोन वर्षांत घेतल्याचे भूषण गगराणी यांनी सांगितले.

भाषा विभागांतर्गत असलेल्या चारही संस्थांनी आपल्या विभागाच्या बैठका घेऊन पुढील तीन वर्षांचा कार्यक्रम निश्चित करून भाषा विभागाला अधिक गतीमान करावे, असे श्री. देसाई यांनी सांगितले.

मराठी भाषेतील समृद्ध साहित्य हिंदीत भाषांतरित करण्यासाठी साहित्यिक, हिंदी सभेने पुढाकार घ्यावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0

मुंबई, दि. 19 : मराठी भाषा अतिशय समृद्ध आहे. मराठी वृत्तपत्रांमधील व विशेषतः पुरवण्यांमधील लेख अतिशय अभ्यासपूर्ण व अभिरुचीसंपन्न असल्याचे आपण पाहिले आहे. हे समृद्ध साहित्य व लेख हिंदी भाषिकांसाठी उपलब्ध करण्यासाठी राज्यातील पत्रकार, साहित्यिक तसेच मुंबई हिंदी सभेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने सन १९४४ साली सुरु झालेल्या मुंबई हिंदी सभा या संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षाचा शुभारंभ राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला मुंबई हिंदी सभेचे कुलपती तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय हिंदी संचालनालयातील उपसंचालक राकेश शर्मा, पत्रकार वर्षा सोळंकी, सभेचे कुलगुरु विजय परदेशी, महासचिव सूर्यकांत नागवेकर व कोषाध्यक्ष देवदत्त साळवी प्रामुख्याने उपस्थित होते.

हिंदी भाषा प्रचार व प्रसारात बिगर हिंदी भाषिकांचे योगदान मोठे

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, स्वामी विवेकानंद बंगाली भाषिक असले तरीही ते शिकागो येथे उत्कृष्ट इंग्रजी भाषेत बोलले व अल्मोडा येथे आले असताना लोकांशी हिंदी भाषेतून बोलले. महर्षी दयानंद यांनी देखील हिंदी भाषेत काम सुरु केले. महात्मा गांधी यांनी देशाला जोडण्यासाठी हिंदुस्तानी भाषेचा पुरस्कार केला, यावरून त्यांची दूरदृष्टी दिसून येते, असे सांगताना हिंदी भाषेच्या प्रचार प्रसारात बिगर हिंदी भाषिकांचे योगदान कितीतरी पटीने मोठे असल्याचे राज्यपालांनी सांगितले. महाराष्ट्रात मराठी भाषा बोलली पाहिजे, मात्र मराठी येत नसेल तर हिंदी बोलली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

हिंदी ही परस्परांना जोडणारी भाषा : छगन भुजबळ

हिंदी भाषा तोडणारी नसून परस्परांना जोडणारी भाषा असून हिंदी भाषेमुळे आपल्याला उत्तर प्रदेश, बिहार व इतर राज्यातील लोकांशी सहजपणे संवाद साधणे शक्य होत असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. हिंदी भाषा समृद्ध करण्यामध्ये अमृता प्रीतम, महादेवी वर्मा, मुन्शी प्रेमचंद आदी साहित्यिकांचे जसे योगदान आहे, तसेच हिंदी चित्रपट सृष्टी, हास्यकवी व सामान्य लोकांचे योगदान असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. हिंदी भाषेचा प्रचार प्रसार देशभर होऊन देश जोडला जावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते हिंदी भाषा प्रचार-प्रसाराकरिता समर्पित निवडक लोकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पुन्हा एकदा भाजपाच नंबर वन असल्याचे सिद्ध-प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

0

मुंबई-राज्यातील नगरपालिका – नगरपंचायती तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक जागा मिळविल्या असून पुन्हा एकदा ‘भाजपाच नंबर वन’ हे सिद्ध झाले आहे, असे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी सांगितले.
ते मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी आणि सुनील कर्जतकर उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीला पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरविल्याबद्दल आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी मतदारांचे आभार मानले आणि पक्षाच्या गावोगावच्या नेते – कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, भाजपाला या निवडणुकीत चारशेपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. स्वबळावर किंवा काही मदत घेऊन ३४ नगरपालिका – नगरपंचायतींमध्ये भाजपाची सत्ता असेल. गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता असेल तर भंडारा जिल्हा परिषदेत मदत घेऊन भाजपा सत्तेवर येईल.
त्यांनी सांगितले की, गेले २६ महिने भाजपा राज्यात सत्तेबाहेर आहे तरीही पक्षाचे संघटन मजबूत आहे. भाजपाच्या नेते – कार्यकर्त्यांची एकजूट आहे. त्यामुळे पक्षाला निवडणुकीत यश मिळाले आहे.
ते म्हणाले की, सत्ताधारी आघाडीमध्ये बेबनाव आहे. त्यांच्यात समन्वय नाही. कोरोनाचा सामना करणे आणि राज्यात विकासकामे करण्यापेक्षा आघाडीचे नेते कमाईमध्ये गुंतले आहेत. जनता या प्रकाराला कंटाळली आहे. जनतेची नाराजी नगरपालिका – नगर पंचायतींच्या निकालात दिसली.
राज्यात नोव्हेंबर २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले होते. त्यानंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुका, जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुका किंवा पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जनतेने भाजपाला कौल दिला होता. तसाच कौल नगरपालिका – नगरपंचायतींच्या निवडणुकीतही दिला आहे, असे त्यांनी सांगितले.

केरळ सफरनामा…भाग २

0

वेळेआधीच जरा विमानतळावर पोहोचावे कारण चेक-इनमध्ये वेळ जाईल या विचाराने आम्ही सर्वच दुपारी १ वाजता टर्मिनल १ वर पोहोचलो. कोचीसाठी एअर एशियाचे आमचे फ्लाईट दुपारी ३ चे होते. करोना काळात नियमांमध्ये बदल झाल्यामुळे चेक-इनसाठी काही अडचणी आल्या पण सर्व सोपस्कार पार पाडून एकदाचे चेक-इन निभावले. बाकी विमानतळावर टेम्परेचर फक्त चेक केले, सोबत नेलेल्या कागदपत्रांची काही गरजच पडली नाही.   

दुपारी 3 वाजता मुंबईच्या टी 1 टर्मिनलवरून एअर एशियाच्या विमानाने उड्डाण केले. आणि बरोबर दुपारी 5 वाजता कोची आतंरराष्ट्रीय विमानतळावर आम्ही उतरलो. विमानातूनच केरळची हिरवाई दृष्टीस पडत होती. विमानतळावर केरळच्या परंपरेचे आणि संस्कृतीचे दर्शन चित्राच्या स्वरूपात, कथकलिच्या मुखवट्यात आणि समईच्या प्रकाशात अधिक उजळून निघाले होते. प्रसन्नतेने भारलेले असे विमानतळावरील वातावरण अनुभवतच आम्ही बाहेर आलो. आमच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा ड्रायव्हर, राकेश आमची पार्कींगजवळ वाट पाहतच होता. आमची टेम्पो ट्रॅव्हलर एकदम भारी होती. गाडीचे नाव सौपारनिका होते. आम्ही तर गाडीच्या प्रेमातच पडलो. आम्हा ७ जणांसाठी गाडी होती १४ सिटरची. त्यामुळे सगळेच जाम खूष होतो, कारण प्रत्येकला विंडो सीट मिळणार होती. (असे भाग्य मुंबईतील प्रवासात मिळत नाही ना!). गाडीचा प्रवास सुरू झाला. गुरुवायूरला आम्ही प्रथम जाणार होतो. कारण २२ वर्षांपूर्वी गर्दीच्या कारणामुळे आम्हाला गुरुवायूरचे दर्शन झाले नव्हते. संध्याकाळ होत आली होती. सगळ्यांना प्रचंड भूकही लागली होती. वाटेतच एका ढाबा वजा हॉटेलवर थांबलो. त्यानंतर त्रिशूरला वडकुनाथन मंदिर बघायचे ठरवले. वडकुनाथन मंदिर हे त्रिशूरमधील एक प्राचीन शिवमंदिर आहे. वडकुनाथन म्हणजे ‘उत्तरेकडील देव’ म्हणजेच केदारनाथ. वडकुनाथन मंदिरात आदि शंकराचार्य यांची समाधी तसेच एक छोटे मंदिर देखील आहे. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे आदि शंकराचार्य यांची एक समाधी केदारनाथ मंदिराच्या मागेही आहे. मंदिराजवळ पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे ७.३० वाजले होते. आम्ही मंदिराच्या ज्या गेटजवळ होतो ते गेट तर बंद होते पण चौकशी केली असता कळलं की आता कोव्हिडच्या काळात फक्त मुख्य प्रवेशद्वारच उघडे आहे. मुख्य प्रवेशद्वाराची केरळ स्थापत्यशैलीतील रचना आणि कोरीवकाम पाहून आम्ही थक्कच झालो. आतमध्ये प्रवेश केला तर मोठे प्रांगण होते आणि पुढे जाऊन एका छोट्या दरवाजासमोर सर्वजण दर्शनासाठी रांग लावून उभे होते. थोड्या वेळाने दार उघडण्यात आले आणि आम्ही आत प्रवेश केला. अचंबित होऊन आम्ही सर्वत्र पाहत होतो. शिवमंदिराचे दर्शन घेऊन आतील अनेक मंदिरांचे दर्शनही घेतले. मंदिराच्या बाहेर जमिनीत छोटे गोल घुमट आणि साष्टांग नमस्कार घालतानाच्या दगडी प्रतिमा होत्या. आजूबाजूला चौकशी केल्यावर कळले की तिथे पवित्र लहरी एकवटलेल्या असतात तर त्या तिथेही नमस्कार करावा. मनासारखे दर्शन झाले आता बाहेर पडू, या विचारात असताना कोणीतरी आजूबाजूला कुजबुजले – आता आरती आहे. मग काय पुन्हा शिवमंदिरापाशी गेलो. आरती नव्हती मात्र ओम नमः शिवायचा १०८ वेळा मंत्रजागर होता. सर्वजण त्या पारंपरिक वाद्याच्या जल्लोषात मंत्रजागर करत तल्लीन झाले होते. त्या वेळचा अनुभव आणि मनस्थिती शब्दांत वर्णू शकणार नाही. त्याच तल्लीनतेत आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो.

कोची ते गुरुवायूरपर्यंतच्या प्रवासात कधी हायवे वरून तर कधी छोट्या छोट्या गावातून आमची गाडी जात होती. हायवेवर प्रवास करताना एक लक्षात आले की इकडे बऱ्याच गाड्यांना झगमगाटी लाइटिंग केलेली आहे. अन् रंगीत दिव्यांच्या रोषणाईने सजवलेली होती गावातील छोटी तर काही टुमदार केरळी स्थापत्यशैलीतील घरे. घरापुढे रांगोळी, त्यापुढे पणती किंवा छोटी समई आणि लामणदिवा. केरळी परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडत होते, सोबत रसिकताही होती. 

गुरुवायूरला पोहोचेपर्यंत रात्रीचे ८.४५ वाजले होते. हॉटेल सोपानामचे मॅनेजर मणिकांथा आमची वाटच पाहत होते. फ्रेश होऊन जेवण उरकले आणि गुरुवायूरचे मंदिर हॉटेलपासून किती अंतरावर आहे ते पाहण्यासाठी बाहेर पडलो. दर्शनाची चौकशी केली असता कळले की उद्या रविवार असल्यामुळे गर्दी असण्याची चिन्हं आहेत, त्यामुळे सकाळी लवकर ६ च्या आत दर्शन घ्यावे. मंदिर नजीकच्या एका दुकानात खरेदी केली. ते दुकान दोघे नवरा-बायको मिळून चालवत होते सकाळी ७ ते रात्री ११. केरळी माणूस  हाडाचाच कष्टकरी आहे याचे हे एक उत्तम उदाहरण.

दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच रविवारी पहाटे ४ ला उठून ५ वाजता दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो. गर्दी नसल्याने अर्धा तासात दर्शन झाले सुद्धा. बाहेरच सभामंडपात एक लग्नविधी सुरू होता. योगायोगाची गोष्ट म्हणजे २२ वर्षांपूर्वी ही याच देवळातील एका लग्नविधीचा सोहळा आम्ही पाहिला होता. तसाच सोहळा पाहण्याचा पुन्हा योग आला होता. अगदी मोजक्याच म्हणजे ८-१० नातेवाईकांच्या साक्षीने लग्नसोहळा पार पडत होता. गुरुवायूर म्हणजेच श्रीकृष्णाच्या साक्षीने आणि आशीर्वादाने होणारा हा लग्नसोहळा…याची अनुभूती काही वेगळीच असणार. त्या मांगल्यपूर्ण आणि प्रसन्न वातावरणात काही वेळ थांबून आम्ही निघालो.

पुढील प्रवासाचा टप्पा म्हणजे मुन्नारला जात जात थोड्या आडवाटेने जाऊन अथिरापल्ली धबधब्याला भेट देणे. सकाळी ९ वाजता गुरुवायूरहून निघालेलो आम्ही ११ वाजता अथिरापल्ली वॉटरफॉलला पोहोचलो. पायऱ्या उतरून खाली पाहतो तर शुभ्र धारा आवेशात खाली कोसळत होत्या. त्यातून उडणारे उंचच उंच तुषार! डोळ्यांचे पारणे फेडणारे हे विहंगम दृश्य पाहतच राहावे असे वाटले. बाहुबली या सिनेमाचे शूटिंगही इकडेच झाले होते. गच्च डोळे मिळून हे दृश्य डोळ्यांत साठवून घेतले आणि ११.३०च्या सुमारास मुन्नारच्या दिशेने कूच केले. दुपारी १ च्या सुमारास कुठे तरी पोटपूजा करण्यासाठी थांबावे म्हणून आजूबाजूला आणि गूगलवर रेस्टोरंट शोधणे चालू होते. गावागावातून आतून आमची गाडी जात होती. ओमकार राकेशच्या बाजूच्या सीटवर बसला होता. बाकी आम्ही मागे बसलेले सगळे झोपेच्या मूडमध्ये होतो. आणि एकदम मोठा आवाज झाला. क्षणभर काहीच कळेना. जोरदार ब्रेक लागून गाडी थांबली तेव्हा लक्षात आले की आपल्या गाडीला अपघात झाला आहे. समोरून चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करत येणारी कार आमच्या टेम्पो ट्रॅव्हलरवर आदळली होती. आमच्या गाडीतील काही जणांना किरकोळ दुखापत झाली. समोरची गाडी तर पुढून चक्काचूरच झाली. पण आतील दोघांना काही जास्त लागले नाही. घाबरलेल्या मनस्थितीत आम्ही सांगेल तसे पटापट गाडीबाहेर पडलो. समोर फार गर्दी जमा झाली होती. पोलिसांची गाडी आली होती. जवळजवळ संपूर्ण गावच लोटले होते. पण इकडे बघ्यांची नव्हे तर मदत करणाऱ्यांची गर्दी होती. येणारे जाणारे आपुलकीने चौकशी करत होते व काही मदत हवी आहे का म्हणून विचारात होते. आम्हाला एका दुकानासमोर नेऊन बसवले. पोलीस आमच्या आणि कारच्या ड्रायव्हरला घेऊन गेले. भाषेची खूप मोठी अडचण येत होती. हिंदी-इंग्रजी भाषेचा मेळ घालून संवाद साधत होतो. त्यातील एका व्यक्तीला हिंदी बोलता येत होते कारण तो काही काळ मुंबईत राहिला होता. त्याने ट्रॅव्हल कंपनीचा नंबर आमच्या ड्रायव्हरकडून घेतला आणि गाडीला अपघात झाल्याचे कळवले. त्या व्यक्तीकडून कळले की हे वळण धोक्याचे आहे, इकडे नेहमीच अपघात होतात. अपघात झालेले गाव कोट्टमंगलमधील थनकलम होते. आम्हाला मदत करणारा भला माणूस होता म्हणून त्याने संवाद साधून एका नवीन गाडीची सोय केली. आम्ही सगळे एका दुकानाच्या आडोशाला बसून समोर आमच्या आवडत्या गाडीची, सौपारनिकाची दशा पाहात होतो. नजरच लागली होती तिला. दीड तासाने ३ च्या सुमारास दुसरी टेम्पो ट्रॅव्हलर आली. राकेशही पोलीस स्टेशनमधून थोड्या काळासाठी आला. नवीन ड्रायव्हरशी, मुस्तफाशी आमची ओळख करून दिली, आमचा टूरचा प्लॅन त्याला समजावून सांगितला. आम्हाला मदत करणाऱ्या गावातील त्या भल्या माणसाने सामान गाडीत ठेवायला मदत केली. आम्हा सगळ्यांना धीर दिला. राकेशलाही खूप वाईट वाटत होतं. सगळं काही ठीक होईल, तू काळजी करू नकोस असं सांगून आम्ही पुढील प्रवासाला निघालो…

पूर्णिमा नार्वेकर, दहिसर

बनावट ‘एसएमएस’ला प्रतिसाद देऊ नये; महावितरणचे आवाहन

0

पुणे, दि. १९ जानेवारी २०२२: ‘मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज रात्री ९.३० वाजता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. करिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा’, असे बनावट ‘एसएमएस’ वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पाठविण्यात येत आहेत. अशा प्रकारचे कोणतेही ‘एसएमएस’ व व्हॉट्स अॅप मेसेज महावितरणकडून पाठविण्यात येत नाही. त्यामुळे या मेसेजला प्रतिसाद वा उत्तर देऊ नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

वेगवेगळ्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून पाठविण्यात येणाऱ्या परंतु महावितरणशी संबंधित ‘एसएमएस’ किंवा व्हॉट्स अॅप मेसेज किंवा कॉलला नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये. बिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून एखादी लिंक पाठविण्यात आली असेल तर संपूर्णपणे दुर्लक्ष करावे. अन्यथा यामधून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. महावितरणकडून केवळ मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच सिस्टीमद्वारे ‘एसएमएस’ पाठविण्यात येतात आणि त्याचा सेंडर आयडी (Sender ID) हा ‘एमएसईडीसीएल’ (MSEDCL) (उदा. VM-MSEDCL, VK-MSEDCL) असा आहे. तसेच या अधिकृत मेसेजमधून कोणालाही कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे क ळविले जात नाही.

महावितरणकडून केवळ ‘एसएमएस’द्वारे पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीतांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कमस्वतःहून मीटर रिडींग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहनमीटर रिडींग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्यावीजबिलाची रक्कमदेय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस आदींची माहिती पाठविण्यात येते. वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पाठविण्यात येणारे मेसेज हे बनावट आहे व त्यातून आर्थिक फसगत होऊ शकते असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

त्यामुळे वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या महावितरणशी संबंधित ‘एसएमएस’ किंवा अन्य मेसेज, कॉल तसेच पेमेंटच्या लिंकला नागरिकांनी प्रतिसाद किंवा कोणतेही उत्तर देऊ नये. मेसेजमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू नये. काही शंका व तक्रारी असल्यास वीजग्राहकांनी चोवीस तास सुरु असलेल्या १९१२, १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांक किंवा नजीकच्या कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.