Home Blog Page 2100

जागतिक कर्करोग दिन

0

कर्करोग हा एकच आजार नसून विविध रोगांचे मिश्रण आहे. कर्करोगाचे १०० पेक्षाही जास्त प्रकार आहेत. साधारणतः ज्या अवयवास अथवा ज्या प्रकारच्या पेशींना हा रोग होतो त्याचेच नाव कर्करोगाला दिले जाते. उदा. आतड्यांमध्ये सुरू होणाऱ्या कर्करोगास आतड्याचा कर्करोग किंवा त्वचेखालील बेसल पेशींमध्ये उगमस्थान असलेल्या कर्करोगास बेसल सेल कार्सिनोमा म्हणतात. ज्या आजारांमध्ये असामान्य पेशींचे अनियंत्रित विभाजन होऊन त्या इतर ऊतींवर हल्ला करू शकतात, अशा सर्व आजारांसाठी कर्करोग हा शब्द वापरला जातो. कर्करोगाच्या पेशी रक्त तसेच लसिका प्रणालीमार्फत शरीराच्या इतर भागांमध्ये पसरु शकतात.

कर्करोगाचे मुख्य प्रकार-

कार्सिनोमा: त्वचेमधून किंवा इतर अंतर्गत अवयवांच्या आवरणातील ऊतींमधून उगम पावणारा कर्करोग.

सार्कोमा: हाडे, कूर्चा, चरबी, स्नायू, रक्तवाहिन्या अथवा इतर आधारिक ऊतींमध्ये सुरू होणारा कर्करोग.

ल्यूकेमिया: रक्त तयार करणाऱ्या ऊतींमध्ये (उदा. अस्थिमज्जा) उगम पावणारा कर्करोग,

यामुळे फार मोठ्या संख्येने असामान्य रक्तपेशी तयार होऊन त्या रक्त प्रवाहात मिसळतात.

लिंफोमा आणि मायलोमाः शरीराच्या प्रतिकार यंत्रणेमध्ये उगम पावणारा कर्करोग.

सेंट्रल नर्वस सिस्टिम कॅन्सर: मेंदू आणि पाठीच्या कण्यातील ऊतींना होणारा कर्करोग.

कर्करोगाचे मूळ-

आपल्या शरीराचे मूलस्थान असलेल्या जीवनदायी पेशींमध्ये (सेल्स) सर्व प्रकारचे कर्करोग जन्म घेतात. आपल्या शरीरात अनेक प्रकारच्या पेशी असतात. ह्या पेशी वाढून त्यांचे नियंत्रित पद्धतीने विभाजन होते आणि त्यामधून नवीन पेशी तयार होतात. आरोग्य टिकवण्यासाठी ही क्रिया होणे गरजेचे असते. पेशी म्हाताऱ्या होतात किंवा खराब होतात तेव्हा त्या मरतात आणि त्यांची जागा नवीन पेशी घेतात. परंतु, कधीकधी ही नीट चाललेली प्रक्रिया बिघडते. एखाद्या पेशीमधील जनुकीय (DNA) नकाशा बदलतो किंवा खराब होतो आणि त्यामध्ये उत्परिवर्तन (म्युटेशन्स) निर्माण होते. ह्या म्युटेशन्समुळे पेशीची सर्वसाधारपणे होणारी वाढ आणि विभाजन यावर परिणाम होतो. अशा पेशी म्हाताऱ्या होऊन मरत नाहीत आणि परिणामी तेथे नवीन पेशी येत नाहीत. ह्या अतिरिक्त पेशींचा एक गठ्ठा बनतो. त्याला ट्युमर (गाठ) असे नाव आहे. सर्व ट्युमर कर्करोगजन्य नसतात. ट्युमर निरुपद्रवी किंवा जीवघेणा असून शकतो.

निरुपद्रवी (बेनाइन) ट्युमर: कर्करोगजन्य नसतात. ते काढून टाकता येतात आणि बहुतांश प्रकरणांमध्ये ते पुनः वाढत नाहीत. निरुपद्रवी ट्युमरमधील पेशी शरीरात इतरत्र पसरत नाहीत.

जीवघेणा (मॅलिग्नंट) ट्युमर: कर्करोगजन्य असतो. अशा ट्युमरमधील पेशी त्यांच्या आसपासच्या पेशींवर हल्ला करून शरीरात इतरत्र पसरतात, कर्करोगाच्या अशा पसरण्याला मेटास्टॅटिस असे म्हणतात.

रक्तक्षय (ल्युकेमिया): हा अस्थिमज्जा आणि रक्ताचा कर्करोग असतो. त्याचा ट्युमरशी संबंध नाही.

लक्षणे-

छाती किंवा शरीराच्या इतर भागात गाठ जाणवणे. त्वचेवर नवीन तीळ उद्भवणे किंवा असलेल्या तिळात बदल होणे. बरी न होणारी जखम. आवाज बसणे किंवा खोकला बरा न होणे. पचनसंस्थेत किंवा लघवी होण्याच्या सवयींमध्ये बदल.खाल्ल्यानंतर अस्वस्थ वाटणे. गिळताना फार त्रास होणे. विनाकारण वजन वाढणे अथवा घटणे. अनैसर्गिक रक्त अथवा इतर स्त्राव होणे. फार थकल्यासारखे वाटणे.

बहुतेक वेळा ही लक्षणे थेट कर्करोगामुळे उद्भवत नाहीत. निरुपद्रवी ट्युमर वा इतर काही कारणांमुळेही अशी लक्षणे दिसू शकतात. याबाबत फक्त डॉक्टरच खात्रीने सांगू शकतात. वरील लक्षणे दाखवणाऱ्या किंवा आरोग्य विषयक समस्या असलेल्या व्यक्तीने शक्य तितक्या लवकर डॉक्टरांकडून तपासून घ्यावे. कर्करोगाच्या सुरूवातीला दुखत नाही. त्यामुळे ही लक्षणे असल्यास, दुखू लागण्याआधी, डॉक्टरांना भेटा.

प्राचार्या

डॉ. एस. एफ. देशमुख

आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्र,

कोल्हापूर

डोंबिवली एमआयडीसीतील १५६ कारखाने स्थलांतराचा निर्णय हुकुमशाहीचा -विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

0

रायगड-डोंबिवलीच्या औद्योगिक व कामगार संघटना व लोकप्रतिनिधींची बैठक घेण्याची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
मुंबई, दि. ३ फेब्रुवारी – डोंबिवलीतील १५६ रासायनिक कारखान्यांचे स्थलांतर रायगडमधील पाताळगंगा येथे करण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने हुकुमशाही पद्धतीने, कुणालाही विश्वासात न घेता घेतलेला आहे. विविध मुद्यांवर, प्रश्नांवर, अडचणींवर संबंधित घटकांशी चर्चा करून, त्यांना विश्वासात घेऊन सर्व संबंधित घटकांबरोबर तसेच रायगड व डोंबिवलीतील सर्व लोकप्रतिनिधींबरोबर चर्चा करून हा निर्णय घेतलेला नाही, अशी जोरदार टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. तसेच या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात डोंबिवली एमआयडीसीतील १५६ कारखाने स्थलांतराची अमलबजावणी करण्यापूर्वी संबंधित औद्योगिक व कामगार संघटना, रायगड लोकप्रतिनिधींची आपल्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करावी, अशी मागणीही केली आहे. डोंबिवली येथील कारखान्यांत काम करणाऱ्या कामगारांचे स्थलांतराविषयी अनेक प्रश्न आहेत, उद्योजकांच्या अनेक अडचणी आहेत, कोरोनामुळे त्यांचे कंबरडे मोडले असताना आता एमआयडीसी त्यांच्याकडून नवीन भूखंडासाठी प्रचलित दराने आकारणी करणार असून ती त्यांना परवडणारी नाही. नव्याने कारखान्यांचा सेटअप करणे व तो क्रियाशील करणे, ही व्यवस्था दिसते तेवढी सोपी नाही. त्यामुळे अशा सर्व विविध मुद्यांवर, प्रश्नांवर, अडचणींवर संबंधित घटकांशी चर्चा करून, त्यांना विश्वासात घेऊन सर्व संबंधित घटकांबरोबर तसेच रायगड व डोंबिवलीतील सर्व लोकप्रतिनिधींबरोबर चर्चा करून यामधून मार्ग काढावा, डोंबिवली एमआयडीसीमधील कारखान्यांतून होणाऱ्या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्यामुळे डोंबिवलीतील १५६ रासायनिक कारखान्यांचे स्थलांतर रायगडमधील पाताळगंगा येथे करण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने घेतला आहे. परंतु, एमआयडीसीने हुकुमशाही पद्धतीने कुणालाही विश्वासात न घेता हा निर्णय घेतलेला आहे.
डोंबिवलीतील कारखान्यांचे ज्या पाताळगंगा क्षेत्रात स्थलांतर करण्यात येणार आहे, त्या परिसरातील सध्याच्या अडचणी व प्रश्नदेखील एमआयडीसीने विचारात घेतलेले नाहीत. वायू आणि जलप्रदूषणाने नवी मुंबईसह रायगड जिह्यातील पशु-पक्षांसह नागरिकांनाही मोठ्या प्रमाणावर त्रास भोगावा लागत आहे. तळोजा, रसायनी व पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कंपन्यांमुळे या परिसरातील प्रदूषणात दिवसेंदिवस भर पडत आहे. या तिन्ही औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांकडून रात्री प्रदूषित सांडपाणी खाडीत सोडले जाते व त्यामुळे मासे मरण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडतात. याचा परिणाम मच्छिमारांच्या रोजगार व उदरनिर्वाहावर होतो. रासायनिक कारखान्यांतून निघणाऱ्या दूषित वायू व सांडपाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याने इथल्या रासायनिक कंपन्यांविरोधात नागरिकांनी यापूर्वी अनेक वेळा आंदोलने केली आहेत. तळोजा, पनवेल, खोपोली, रसायनी, पाताळगंगा व उरण क्षेत्रात प्रदूषणाची केंद्रे तयार झालेली आहेत. एमआयडीसीने घेतलेल्या या निर्णयाला औद्योगिक संघटनांनी, कामगार संघटनांनी विरोध केला आहे. त्यांच्या अडचणी विचारात घेतलेल्या नाहीत, विश्वासात घेतले नाही, अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे.
परिणामी, या निर्णयाची अंमलबजावणी होण्यात अनेक अडथळे निर्माण होतील. सर्व संबंधित घटकांना विचारात घेऊन हा निर्णय होण्याची अपेक्षा होती परंतु हा निर्णय एकतर्फी असल्यामुळे त्याचे दूरगामी अनिष्ट परिणाम होतील. म्हणून या एकतर्फी निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी संबंधित औद्योगिक व कामगार संघटना तसेच रायगड जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात यावी, अशी मागणी दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

स्टील कंपनीच्या मालकाला अटक,10.68 कोटी रुपयांचे बनावट इनपूट टॅक्स क्रेडीट्सचे जाळे उद्ध्वस्त.

0

मुंबई -नवी मुंबईच्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालयाने 10.68  कोटी रुपयांचे बनावट इनपूट टॅक्स क्रेडीट्सचे जाळे उद्ध्वस्त केले. या प्रकरणी मेसर्स नवनीत स्टील्स (GSTIN: 27AEXPD3871K1ZV) च्या संचालकाला बुधवार 2 फेब्रुवारी 2022 रोजी अटक करण्यात आली. कंपनीने 60 कोटी रुपयांच्या बनावट पावत्या तयार करून त्यावर बनावट इनपूट टॅक्स क्रेडीट्सच मिळवून त्याआधारे सरकारची आर्थिक फसवणूक केली आहे.

केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालयाच्या हेराफेरीविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीवर चौकशी कारवाई केली. ही कंपनी अल्युमिनियम व स्टील या धातूंचा कच्चा माल व तयार मालाच्या व्यापारात आहे, असे या कंपनीच्या मालकाने जबाबात म्हटले आहे. तपासांतर्गत या करदात्याने वेगवेगळ्या अस्तित्वात नसलेल्या/खोट्या कंपन्यांकडून बनावट इनपूट टॅक्स क्रेडिट्स मिळवून त्या मंजूर करून घेतल्याचे आढळून आले. आरोपीला केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा-2017 च्या कलम 69 (1) अंतर्गत अटक करण्यात आल आणि त्याच्यावर सदर कायद्याच्या कलम 132 (1) (b) &(c) अन्वये गुन्हा दाखल करुन वाशी, बेलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे 03.02.2022  रोजी हजर करण्यात आले. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर व केंद्रीय अबकारी कर कार्यालय, नवी मुंबईचे आयुक्त प्रभात कुमार यांनी ही माहिती दिली.

केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालय, मुंबई यांनी फसवणूक करणारे व करचोरांविरूध्द चालवलेल्या हेराफेरीविरोधी मोहिमेचा हा एक भाग होता.  अशा व्यक्ती सरकारी तिजोरीचे नुकसान करत प्रामाणिक करदात्यांना असमान स्पर्धा निर्माण करतात. या मोहिमेचा भाग म्हणून नवी मुंबई आयुक्तालयाने नुकतेच 425 कोटींची करचोरी उघडकीस आणली,  20 कोटी रुपयांची वसूली केली आणि 11 जणांना अटक केली आहे.

करचुकव्यांचा छडा लावण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभाग माहिती विश्लेषणाचा उपयोग करतो. ही माहिती विश्लेषण आणि नेटवर्क विश्लेषण याआधारे मुंबई विभागाच्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिकाऱ्यांनी गेल्या पाच महिन्यांमध्ये 625 करचोरी प्रकरणांचा शोध लावला आणि 5500 कोटी रुपयांची करचोरी पकडली आहे तसेच 48 जणांना अटक केली आहे. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभाग फसवेगिरी आणि करचोरांविरुद्धची मोहिम तीव्र करणार आहे. त्यामुळे येत्या काळात प्रामाणिक करदात्यांना असमान स्पर्धेला सामोरे जावे लागणार नाही तसेच सरकारला आपल्या हक्काचा महसूल मिळेल.

ओमायक्रॉन संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत तीव्र वाढ -राष्ट्रीय विषाणू शास्त्र संस्था, पुणेच्या संचालक प्रा.प्रिया अब्राहम

0

मुंबई/पुणे – 3 फेब्रुवारी 2022

कोविड19 च्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जनतेला याविषयी योग्य माहिती उपलब्ध व्हावी तसेच यासंदर्भातील विविध शंकांचं निरसन व्हावं या उद्देशाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालय, मुंबई आणि गोवा यांच्या वतीने आज एका वेबिनारचे आयोजन करण्यात आले.

‘कोविड 19 च्या तिसऱ्या लाटे बाबत मूलभूत तथ्ये’ हा या वेबिनारचा विषय होता.

राष्ट्रीय विषाणू शास्त्र संस्था, पुणेच्या संचालक प्रा.प्रिया अब्राहम आणि डॉक्टर राजीव जयदेवन या वेबिनारला वक्ते म्हणून उपस्थित होते.

‘कोविड 19 च्या तिसऱ्या लाटे बाबत मूलभूत तथ्ये’ याविषयीचे प्रश्न आणि शंकाचे त्यांनी उपयुक्त माहिती, मार्गदर्शन आणि सल्ले देऊन निरसन केले.

ओमायक्रॉन व्हेरियंट हा 5 वा ‘चिंताजनक व्हेरियंट’ आहे.

अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा आणि आता ओमायक्रॉन हा सध्याचा व्हेरियंट ऑफ कन्सर्न आहे, असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या पुण्यातील राष्ट्रीय विषाणू शास्त्र संस्थेच्या संचालक प्रा.प्रिया अब्राहम यांनी सांगितले. ओमायक्रॉनला जनूकामध्ये अनेक उत्परीवर्तने झाली- 50 पेक्षा जास्त उत्परीवर्तने, त्याच्या स्पाईक प्रोटीन मध्ये 30 अमिनो ऍसिड बदलातून ते प्रतीत होतात असे त्या म्हणाल्या. कोविड19 विषाणूच्या कोणत्याही प्रकाराला प्रतिबंध केलाच पाहिजे असे स्पष्ट करत प्रा.प्रिया अब्राहम म्हणाल्या की हा विषाणू जितक्या जास्त प्रमाणात लोकांमध्ये पसरेल तितका तो स्वतःमध्ये जनुकीय परिवर्तन करण्याचा आणि त्याच्यावरील प्रतिबंधांनुसार सक्षम बनण्याचा प्रयत्न करेल. ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे सौम्य संसर्ग होतो हे आपल्याला माहीत आहे, मात्र म्हणून आपण काळजी घेणे अजिबात कमी करता कामा नये, काळजी घेण्यात कुठेही कसर राहता कामा नये, कोविड अनुरूप वर्तनाचे नियम पाळले पाहिजेत असे आवाहन अब्राहम यांनी यावेळी केले. या कोविड19 महामारीमध्ये आपल्या देशाच्या चाचण्या करण्याच्या क्षमतेत लक्षणीय सुधारणा झाली असून शेकडो सरकारी त्याच बरोबर खाजगी प्रयोगशाळांनी RT-PCR चाचण्या करण्याची क्षमता विकसित केली आहे, असेही अब्राहम यांनी स्पष्ट केले. आपण करत असलेल्या बहुतेक आरटी-पीसीआर चाचण्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा माग काढू शकतात. तसेच इन्साकॉग एक समग्र जनुकीय निर्धारणाद्वारे त्यावर देखरेख करत आहे- लक्ष ठेवत आहे आणि अतिशय बारकाईने हे पहात आहे की काही नवे उत्परिवर्तक तर तयार होत नाहीत ना, आपल्या प्रयोगशाळा भविष्यातील काही आव्हाने आल्यास, ती पेलण्यासाठी देखील पुरेशा प्रमाणात सज्ज आहेत असेही त्यांनी नमूद केले.

फ्लू सदृश आजाराविषयी बोलताना डॉ. राजीव जयदेवन म्हणाले की युवा वर्गामध्ये फ्लू सदृश आजार दिसून आला, फ्लू हा सर्दीसारखा नाही. फ्लू हा गंभीर आजार आहे, ज्यात काही दिवसांसाठी आपण शारीरिक दृष्ट्या दुर्बल होतो, सांध्यांमध्ये, स्नायूंमध्ये तीव्र वेदना, अशक्तपणा आणि एखादे वेळा उठण्यासाठी अशक्य होते. वयोवृद्धांमध्ये त्यांची खालावलेली प्रकृती, ओमायक्रॉन व्हेरियंट अधिकच तीव्र करतो आणि काही मोजक्या लोकांमध्ये विशेषकरून ज्यांचे लसीकरण झालेले नाही अशांचे या विषाणूने बळीही घेतले आहेत, असे सांगत डॉ जयदेवन यांनी लसीकरणाचे महत्व नमूद केले. ताप, घसा दुखी, श्वसन विषयक तक्रारी, अंगदुखी तसेच बऱ्याचश्या लहान मुलांमध्ये 2 दिवस ताप येऊन तो झटकन बरा होतो ही ओमायक्रॉन व्हेरियंट चा संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये सर्वसाधारण पणे आढळणारी लक्षणे आहेत अशी माहिती डॉ जयदेवन यांनी यावेळी दिली. सौम्य कोविड लक्षणे असलेल्या आणि सुदृढ व्यक्तींमध्ये जे घरीच उपचार घेत आहेत, त्यापैकी बहुतांश जणांच्या शरीरामध्ये या संसर्गाला प्रतिकार करण्याची क्षमता असते त्यामुळे विषाणूपासून सुटका व्हावी यासाठी गोळ्या/इंजेक्शनचा मारा करण्याची आवश्यकता नाही असा सल्ला डॉ.राजीव जयदेवन यांनी यावेळी दिला. गृह विलगीकरणात असताना घ्यावयाच्या काळजी विषयी बोलताना डॉ राजीव जयदेवन म्हणाले की जेव्हा तुम्ही गृह विलगिकरणात असाल तेव्हा शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्याकडे लक्ष द्या आणि त्यासाठी ओआरएस तयार करा आणि नियमितपणे ते पीत रहा कारण ज्यावेळी शरीराला संसर्ग होतो, त्यावेळी शरीरातील पाण्याची पातळी कमी होत जाते असे ते म्हणाले. याशिवाय जोपर्यंत विशिष्ट लक्षणे नाहीत तोपर्यंत प्रतिजैविके घेण्याची आवश्यकता नाही असेही त्यांनी सांगितले.

या विषाणूच्या उच्च संसर्ग क्षमतेविषयी बोलताना डॉक्टर जयदेवन म्हणाले ‘अजिबात चूक करू नका’ हा धडा ओमायक्रॉन या विषाणूमुळे आपल्याला शिकवला आहे. हा विषाणू आपल्याकडे पुन्हा येत आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला याची जाणीव झाली पाहिजे. तुम्हाला संक्रमित करण्याची संधी या विषाणूला देऊ नका. ओमायक्रॉन सौम्य विषाणू नाही पण तीव्रता कमी असलेला आहे. मलेरिया पासून बचावासाठी तुम्ही डासांचा बंदोबस्त करता, कॉलरा पासून बचावासाठी स्वच्छ पाणी पिता, त्याच प्रकारे आपल्या सर्वांना हे माहीत आहे की कोविड-19 हवेतून पसरतो, त्याला आपल्या नाकावाटे किंवा तोंडावाटे प्रवेश करता येऊ नये म्हणून सर्वात महत्त्वाचा उपाय आहे मास्कचा वापर करणे.

रोगप्रतिकारक क्षमता कमी असलेल्या आणि गर्भधारणा नियोजन करणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला. गर्भधारणा झालेल्या अवस्थेत कोविड19 चे दुष्परिणाम जास्त होण्याचा धोका असल्याचा इशारा त्यांनी दिला.

तसेच या आजाराविषयी भीती निर्माण करणाऱ्या बातम्या/लेख यापासून दूर राहा आणि पचण्यासाठी हलके असे घरचे अन्न घ्या असा सल्लाही त्यांनी दिला. ओमायक्रॉन व्हेरियंट बरोबरच युवा वर्गाच्या संसर्गात लक्षणीय वाढ झाल्याचे डॉ. राजीव जयदेवन यांनी सांगितले. कोविड19 महामारीचा युवा वयोगटातल्या लोकांवर परिणाम झाला तर सर्व साधारण प्रभाव सौम्य राहील हे आपण जाणतो कारण गंभीर आजारासाठी वय हा मोठा जोखमीचा घटक आहे, असे त्यांनी नमूद केले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाचे महासंचालक मनीष देसाई यांनी महामारीविरोधात लढा देण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांविषयी माहिती दिली. कोविड19 संदर्भात एका राज्यातल्या उत्तम पद्धतीचे इतर राज्यांनीही अनुकरण करावे, यासाठी इतर राज्यांसमवेत त्या सामायिक करत केंद्र सरकारने एकप्रकारे मध्यस्थाची भूमिका बजावली असे महासंचालक मनीष देसाई यांनी सांगितले. कोविड19 काळात, एम्स टेलिमेडिसीन यु ट्यूब चॅनेल म्हणजे उपयुक्त भांडार ठरले.

ऑनलाईन सल्ल्याची सुविधा पुरवणारे ई संजीवनी ओपीडी टेलिमेडिसीन पोर्टल यासारख्या स्तुत्य उपक्रमाद्वारे सुमारे 2.5 कोटी टेली कन्सलटेशन झाल्याची माहिती मनीष देसाई यांनी दिली.

पत्र सूचना कार्यालय, गोवा चे संयुक्त संचालक विनोद कुमार यांनी या वेबिनारचे आभार प्रदर्शन केले तर पत्र सूचना कार्यालय, मुंबईच्या माहिती अधिकारी श्रीयंका चॅटर्जी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

असदुद्दीन ओवेसी यांच्या ताफ्यावर गोळीबार-एकाला अटक

0

या घटनेनंतर ओवेसी म्हणाले की, मी सुरक्षित आहे.

गाझियाबाद -उत्तर प्रदेशमध्ये AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आला आहे. हापूर जिल्ह्यातील पिलखुवा येथून सभा आटोपून ते गाझियाबादला परतत होते. गाझियाबादमधील छीजारसी टोल प्लाझाजवळ त्यांच्या ताफ्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. त्यांच्या गाडीवर गोळ्यांच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत.

दरम्यान, या प्रकरणात वापरलेली शस्त्र सापडली असून एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.आज मेरठच्या किथौध भागातून दिल्लीला जात असतानाकाही जणांनी त्यांच्या ताफ्यावर गोळ्या झाडल्या.

एएनआयशी बोलताना ओवेसी म्हणाले, “मी किथौध, मेरठ येथील एका मतदान कार्यक्रमानंतर दिल्लीला निघालो होतो. छाजरसी टोल प्लाझाजवळ दोन लोकांनी माझ्या वाहनावर सुमारे तीन ते चार गोळ्या झाडल्या. ते एकूण ३-४ लोक होते. माझ्या वाहनाचे टायर पंक्चर झाले, त्यानंतर मी तेथून दुसऱ्या वाहनाने निघालो,” असं त्यांनी सांगितलं.

“या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी. या घटनेमागे कुणाचा हात होता, याचा तपास करावा. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मोदी सरकारने याची चौकशी करावी. एका खासदारावर उघडपणे गोळीबार होणं, कसं शक्य होते आहे,” असा सवाल ओवेसी यांनी केला.

रत्नागिरी विमानतळावरून प्रवाशी वाहतूक सुरु व्हावी असे नियोजन करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

0

मुंबई,  दि. ३ : रत्नागिरी विमानतळावरून लवकरात लवकर प्रवाशी वाहतूक सुरू व्हावी यासाठी पायाभूत सुविधांकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. याअनुषंगाने विमानतळाच्या परिसरातील विकास कामांचे सुनियोजन करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

रत्नागिरी विमानतळ विकासाबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते.

बैठकीस परिवहन मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, सामान्य प्रशासन विमानचालन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विमानचालन संचालनालयाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील, तटरक्षक दलाचे अधिकारी आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, कोकणातील पर्यटन आणि उद्योग-व्यवसायवाढीसाठी रत्नागिरी विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरु होणे आवश्यक आहे. याठिकाणाहून लवकरात लवकर प्रवाशी वाहतूक सुरू व्हावी यासाठी आवश्यक अशा पायाभूत सुविधांसाठीचे सुनियोजन करण्यात यावे. त्यासाठी आवश्यक निधीची उपलब्ध करून देण्यात येईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळानंतर रत्नागिरी जिल्ह्यात सुरु होणारे हे विमानतळ कोकणच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. परब यांनी पर्यटन व उद्योग वाढीसाठी रत्नागिरी विमानतळ महत्त्वाचे आहे. त्याचा विस्तार आणि विकास यासाठी नियोजन असल्याची माहिती दिली.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. सामंत यांनी नुकताच या विमानतळ परिसराला भेट देऊन, तेथील पायाभूत सुविधांसाठी आवश्यक अशी पाहणी केल्याचे तसेच स्थानिकांशी चर्चा केल्याचे सांगितले.

सुरुवातीला विमानतळ विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. कपूर यांनी रत्नागिरी विमानतळाचा विकास व विस्ताराच्या अनुषंगाने जमिनीचे भूसंपादन, विस्तार कामे, विविध सुविधा तसेच आवश्यक निधी यांची माहिती दिली. जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनीही विमानतळ परिसरातील प्रगतीपथावरील कामांची माहिती दिली.

स्वीडनच्या येमेरचा सनसनाटी विजयासह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

0
  • जागतिक क्र.15 असलेल्या कारास्तेवर येमेरचा धडाकेबाज विजय

पुणे, 3 फेब्रुवारी 2022: चौथ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत स्वीडनच्या क्वालिफायर एलियास येमेर याने अव्वल मानांकित व जागतिक क्रमवारीत 15व्या स्थानी असलेल्या रशियाच्या ऍस्लन कारास्तेवचा सरळ सेटमध्ये पराभव करून दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 

दुसऱ्या फेरीत येमेरने कारास्तेवचा 6-2, 7-6 (7-3) असा पराभव करत अवघ्या 1तास 36 मिनिटात त्याचे आव्हान संपुष्टात आणले. 
25 वर्षीय पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या येमेरने सामन्यात सुरेख सुरुवात करत कारास्तेवविरुद्ध 3-1 अशी आघाडी घेतली. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या दक्षिण आशियातील एकमेव 250 एटीपी स्पर्धेत आपला पहिला सामना खेळत असलेल्या कारास्तेवला लय गवसण्यात अडचणी येत होत्या. 
कारास्तेवच्या 47टक्के सरासरी सर्व्हिस गुणांच्या तुलनेत येमेरने 76टक्के सर्व्हिस गुणांच्या जोरावर पहिला सेट सहजपणे विजय मिळवला. यामध्ये कारास्तेवने पाच डबल फॉल्ट केले. 

रशियाचा स्टार खेळाडू कारास्तेवने गतवर्षी सर्बिया ओपन टेनिस स्पर्धेत जागतिक अव्वल मानांकित खेळाडू नोव्हाक जोकोविचवर सनसनाटी विजय मिळवला होता. पण येमेरने दुसऱ्या सेटमध्ये देखील सुरेख खेळ करत 4-4 अशी बरोबरी साधली. यानंतर येमेरने आपली सर्व्हिस राखत 2021मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन या ग्रँड स्लॅम स्पर्धेत पदार्पणातच उपांत्य फेरी गाठणाऱ्या कारास्तेवविरुद्ध बरोबरी साधली व हा सेट टायब्रेकमध्ये गेला. 

यावेळी येमेर विजयानंतर आनंद व्यक्त करताना म्हणाला की, मी सामन्यात विशेषकरून माझ्या सर्व्हिसवर अधिक भर दिला. ज्यावेळी आपण सर्व्हिस योग्य करतो त्यावेळी नेहमीच सामन्यात विजय हा निश्चित असतो. सर्व्हिस ही महत्त्वाची गोष्ट आहे असे मला वाटते. 
जागतिक क्रमवारीत 163व्या स्थानी असलेल्या येमेर याने टायब्रेकमध्ये वरचढ खेळ करत 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवली आणि आपली आघाडी कायम ठेवत कारास्तेवविरुद्ध विजय मिळवला.
यावेळी कारास्तेव म्हणाला की, एलियास हा चांगला खेळाडू आहे. सामन्याला माझ्याकडुन फारशी चांगली सुरुवात झाली नाही. दुसऱ्या सेटमध्ये मी त्यावर तोडगा काढत कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. 
याशिवाय, अन्य लढतीत पहिल्या फेरीत पुढे चाल मिळालेल्या गतविजेत्या जेरी व्हेसलीने बर्नाबी झपाटा मिराईल्सचा 6-3, 6-4 असा सहज पराभव करून विजयी सलामी दिली. 
सहाव्या मानांकित एमिल रुसूवोरी याने क्वालिफायर वित कोप्रिव्हाचा 6-3, 6-3 असा पराभव करून आगेकूच केली. आयएमजीच्या मालकीच्या आणि राईज वर्ल्डवाईद इन इंडिया संचालित या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत आज संध्याकाळी भारताचा स्टार खेळाडू युकी भांब्री समोर आठव्या मानांकित स्टेफनो ट्रॅव्हालियाचे आव्हान असणार आहे. 

याआधीच्या दुहेरीच्या बुधवारी रात्री उशिरा झालेल्या सलामीच्या लढतीत एन श्रीराम बालाजी व विष्णू वर्धन या जोडीने अर्जुन कढे व पूरव राजा यांचा 6-1, 6-4 असा पराभव करून विजय मिळवला. बालाजी व वर्धन या भारतीय जोडीला जियानलुका आणि एमिल रुसूवोरी यांनी दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली असल्यामुळे थेट उपांत्य फेरीत प्रवेश देण्यात आला आहे. 

निकाल: एकेरी: दुसरी फेरी: 
एलियास येमेर(स्वीडन)वि.वि.ऍस्लन कारास्तेव(रशिया)[1] 6-2, 7-6(7-3);
एमिल रुसूवोरी(फिनलँड)[6]वि.वि.वित कोप्रिव्हा(चेक प्रजासत्ताक)6-3, 6-3;
जेरी व्हेसली(चेक प्रजासत्ताक)[4]वि.वि.बर्नाबी झपाटा मिराईल्स(स्पेन)6-3, 6-4;

अरारा… कसले नगरसेवक अन कसले अधिकारी.. शौचालये धड ठेवता येईनात , सेनेचे आंदोलन ..

0

दांडेकर पूल परिसरातील सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था

पुणे, दि. ३ फेब्रुवारी : दांडेकर पूल परिसरातील सार्वजनिक शौचालय दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यासाठी शिवसेनेतर्फे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. अकार्यक्षम पुणे मनपा प्रशासन, अकार्यक्षम स्थानिक नगरसेवकांमुळे विकासपुरुषाची महाआरती करण्यात आली.

दांडेकर पूल परिसरात काही वर्षांपूर्वी महिलांसाठी सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. मात्र त्यांना कुलूप लावून ठेवल्यामुळे त्या वापराविना पडून आहेत. तसेच याठिकाणी काही शौचालयांना दारे नाहीत तर काहींना कड्या नाहीत. पाण्याच्या टाकीत आठ-पंधरा दिवस पाणी नसते. शौचालयाच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी कचरा साचल्यामुळे परिसरात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याठिकाणच्या समस्या अनेकवेळा क्षेत्रिय कार्यालय तसेच स्थानिक नगरसेवकांना सांगून देखील जाणीवपूर्वक या भागात दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

यावेळी असंघटीत कामगार सेनेचे अध्यक्ष अनंत घरत, शिवसेनेचे शहर संघटक राजेंद्र शिंदे, उपशहरप्रमुख बाळासाहेब मालुसरे, विभाग संघटक नंदू येवले, माजी नगरसेवक अशोक हरणावळ,  प्रभाग समन्वयक प्रतीक आल्हाट, शाखाप्रमुख रवी भोसले, युवती सेनेच्या मीनल भोसले, नितीन रावलेकर, गणेश घोलप, सागर ढावरे, राहुल शिंदे, स्थानिक महिला शिवसैनिक उपस्थित होते.

जुने सचिवालयातील कार्यालय शोधणे झाले सुलभ

0

नागपूर,दि.03:जुने सचिवालय या ऐतिहासिक आणि ब्रिटीशकालीन इमारतीमध्ये विभागीय आयुक्तासह विविध विभागांची कार्यालये आहेत. शंभर वर्षांपेक्षा जास्त  झालेल्या या ऐतिहासिक वास्तूत चार प्रवेशद्वार असून तळमजला व  पहिल्या मजल्यावरील कार्यालयाचा शोध घेणे सुलभ झाले आहे. प्रत्येक कार्यालयासमोर तसेच चारही प्रवेशद्वाराच्या बाजूने अत्यंत आकर्षक व सहज दिसतील अशा स्वरुपात दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत.

जुने सचिवालय या ऐतिहासिक इमारतीच्या संवर्धनासोबतच अंतर्गत सुविधा तसेच आवश्यक दुरुस्तीसाठी 14 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या इमारतीच्या दुरुस्ती तसेच सुविधांचा दर्जा वाढविण्यासाठी विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा  यांनी पुढाकार घेतला असून सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या इमारतीच्या संवर्धनासोबतच  संरक्षणालाही प्राधान्य दिले आहे.

प्राचीन तसेच वास्तूकलेचा आदर्श म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वास्तूमध्ये विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासोबतच अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र भूमी संपादन आणि पुनर्स्थापना प्राधिकरण, ॲण्टीकरप्शन ब्यूरो, भूमी अभिलेख, राज्य गुप्त वार्ता विभाग, विदर्भ पुरालेखागार तसेच विभागीय आयुक्त कार्यालयाच्या विविध शाखा यामध्ये महसूल, सामान्य प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, नगरपालिका प्रशासन, भूसुधार, पुरवठा, रोजगार हमी योजना आदी विविध कार्यालये तळमजल्यावर आहेत. तसेच पहिल्या मजल्यावर माहिती व जनसंपर्क, वस्त्रोद्योग, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, विमा संचालनालय, मृदू व जलसंधारण, भागीदारी संस्था, वन  जमाबंदी विभाग, लोहमार्ग पोलीस, मागासवर्ग कक्ष, उड्डाण विभाग, वैधमापन विभाग आदी महत्त्वाची कार्यालये आहेत.

विभागीय आयुक्तालय तसेच संबंधित सर्व कार्यालयाशी संबंधित कामासाठी  सर्वसामान्य जनतेसह शेतकरी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर नेहमीच विविध कारणाने भेट देतात. जुने सचिवालयाच्या ऐतिहासिक इमारतीची रचना बघून कार्यालय शोधणे अनेकवेळा शक्य होत नाही. त्यामुळे विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ कार्यालयाच्या माहितीचे दिशादर्शक फलक तसेच कार्यालयासमोर संबंधित कार्यालयाबाबत माहिती फलक लावल्यामुळे या इमारतीतील कार्यालय शोधणे आता सुलभ झाले आहे.

ऐतिहासिक इमारतीच्या संरक्षण व  संवर्धनासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कालबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये प्राचीन तसेच वास्तूकलेचा आदर्श असलेल्या इमारतीच्या रचनेमध्ये कुठलाही बदल न करता संवर्धनाला प्राधान्य देण्यात आले आहे.

ऐतिहासिक इमारतीच्या छताची गळती तसेच अंतर्गत असलेल्या सुविधांचा दर्जा वाढविणे, संपूर्ण इमारत स्वच्छ ठेवणे यासोबतच बाह्य स्वरुपातही इमारतीच्या संवर्धनासाठी आवश्यक असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करणे आवश्यक आहे. ही संपूर्ण इमारत सॅण्डस्टोन या दगडापासून बांधण्यात आली आहे. शंभर वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाल्यामुळे पाण्यापासून संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यासोबतच भींतीवरील झाडांपासून इमारतीला धोका होणार नाही यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दुरुस्तीची कामे प्रस्तावित आहेत. या कामांना हेरिटेज समितीच्या पूर्व परवानगीनंतरच सुरुवात करण्यात येणार आहे.

जुने सचिवालय इमारतीमध्ये अभ्यागतांची तसेच शासकीय कार्यालयात येणाऱ्यांची संख्या लक्षात घेवून पिण्याचे पाणी, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, इतर वापरासाठी पाण्याची सुविधा,  कॅरिडोर येथील स्वच्छता, दरवाजे व खिडक्या यांची विशेष दुरुस्ती, अति महत्त्वाच्या व्यक्ती व अभ्यागत यांच्यासाठी सुविधा, विद्युतीकरण तसेच अंतर्गत रंगरंगोटी आदी सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.

जुने सचिवालय या ऐतिहासिक इमारतीच्या संवर्धन व दुरुस्तीसाठी विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केल्यामुळे 14 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीमधून इमरातीच्या अत्यावश्यक तसेच मूलभूत सुविधांवर खर्च करण्यात येणार आहे. इतर सुविधांसाठी दुसऱ्या टप्प्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिली.

परंडवाल, चंद्रोज्, 30 यार्डस् संघांचा विजय

0


पुणे, 3 फेब्रुवारी 2022: लायन्स क्लब ऑफ रहाटणी आणि लिओ क्लब ऑफ रहाटणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लायन्स क्लब ऑफ रहाटणी करंडक 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत परंडवाल क्रिकेट अकादमी, चंद्रोज् क्रिकेट अकादमी, 30 यार्डस् क्रिकेट अकादमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.
हजारे मैदान, मोशी येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत आयुष येलवंडेच्या अचूक गोलंदाजीच्या बळावर परंडवाल क्रिकेट अकादमी संघाने कॅनन क्रिकेट क्लब संघाचा 8 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना कॅनन क्रिकेट क्लब संघाने 22 षटकात सर्वबाद 104 धावा केल्या. श्लोक घोगरेने 35 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. आयुषने 14 धावात 4 गडी बाद केले. 104 धावांचे लक्ष प्रथमेश वाघमारेच्या नाबाद 48 धावांसह परंडवाल क्रिकेट अकादमी संघाने 17.2 षटकात 2 बाद 107 धावांसह पुर्ण करत स्पर्धेत विजय मिळवला. आयुष येलवंडे सामनावीर ठरला.


दुस-या लढतीत चंद्रोज् क्रिकेट अकादमी संघाने एसएनबीपी क्रिकेट अकादमी संघाचा 127 धावांनी दणदणीत पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. पहिल्यांदा खेळताना चंद्रोज् क्रिकेट अकादमी संघाने 25 षटकात 4 बाद 215 धावा धावांचा डोंगर रचला. यात चैतन्य कोंडभरने आपल्या फलंदाजीत सातत्य राखत 68 चेंडूत 17 चौकारांसह नाबाद 119 धावा करून संघाचा डाव बळकट केला. दिप पाटीलने 40 धावा करून चैतन्यला सुरेख साथ दिली. 215 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पार्थ सोनावणेच्या अचूक गोलंदाजीपुढे एसएनबीपी क्रिकेट अकादमी संघ 17.3 षटकात सर्वबाद 88 धावांत गारद झाला. चैतन्य कोंडभर सामनावीर ठरला.
अन्य लढतीत प्रचित भालगटच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर 30 यार्डस् क्रिकेट अकादमी संघाने तिकोने क्रिकेट गुरूकुल संघाचा 23 धावांनी पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. 


स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरीकॅनन क्रिकेट क्लब- 22 षटकात सर्वबाद 104 धावा(श्लोक घोगरे 35(56, 4×4), कृतार्थ मैद 19(29, 2×4), आयुष येलवंडे 4-14, अथर्व 1-4) पराभूत वि परंडवाल क्रिकेट अकादमी- 17.2 षटकात 2 बाद 107 धावा(प्रथमेश वाघमारे नाबाद 48(53, 8×4), अयुष म्हाळसकर नाबाद 22 (32, 4×4), वर्धन सपकाळ 1-6) सामनावीर- आयुष येलवंडेपरंडवाल क्रिकेट अकादमी संघाने 8 गडी राखून सामना जिंकला.

चंद्रोज् क्रिकेट अकादमी- 25 षटकात 4 बाद 215 धावा(चैतन्य कोंडभर नाबाद 119(68, 17×4), दिप पाटील 40(32, 5×4), निरंजन वाघमारे 1-27, संयोग नांदेडकर 1-27) वि.वि एसएनबीपी क्रिकेट अकादमी- 17.3 षटकात सर्वबाद 88 धावा(ओजस अर्जून 21(33, 1×4), सुर्यवंश प्रतापसिंग 19(28, 3×4), पार्थ सोनावणे 4-15), जय पाटील 1-3, समीक्षा 1-3) सामनावीर- चैतन्य कोंडभरचंद्रोज् क्रिकेट अकादमी संघाने 127 धावांनी सामना जिंकला.30 यार्डस् क्रिकेट अकादमी- 22.5 षटकात सर्वबाद 135 धावा(वैभव मोरे 23(31, 1×4), ओम राणे 23(17, 1×4), साहिल शेख 18(23, 2×4), सोहम वनारे 3-17, व्रिशांक राय 4-28, प्रचित भालगट 2-19) वि.वि तिकोने क्रिकेट गुरूकुल- 25 षटकात 7 बाद 112 धावा(प्रचित भालगट नाबाद 52(47, 7×4), साहिल शेख 2-12, विहान सुतार 2-24, वैभव मोरे 1-7) सामनावीर- प्रचित भालगट30 यार्डस् क्रिकेट अकादमी संघाने 23 धावांनी सामना जिंकला. 

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी 31 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन

0

पुणे दि.3: बारावी विज्ञान शाखेत व पदविका अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात शिकत असलेल्या २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या शिफारसीसह 31 मार्च 2022 पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी संतोष जाधव यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राखीव प्रवर्गात लाभ घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया नोंदणी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. जात वैधता प्रमाणपत्राकरिता अर्जदारांनी bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विहीत नमुन्यातील ऑनलाईन अर्ज भरावा.

महाविद्यालयाचे शिफारस पत्र, 15 A फॉर्मवर प्राचार्यांची सही, शिक्का व चालू वर्षांचे बोनाफाईड प्रमाणपत्र जातीविषयक सर्व पुरावे व विहित नमुन्यातील शपथपत्रासह सर्व मूळ कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक आहे. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची हार्डकॉपी कागदपत्रांच्या पुराव्यांच्या साक्षांकित प्रतीसह समितीकडे सादर करावी. अर्ज सादर करतेवेळी अर्जदार किंवा पालक यांनी समक्ष मूळ कागदपत्रांसह उपस्थित रहावे. ऑनलाईन फॉर्ममध्ये जातीच्या दाखल्याचा जो तपशील भरला जातो त्यानुसारच जात वैधता प्रमाणपत्राची ऑनलाईन प्रणालीमध्ये निर्मिती होते. त्यामुळे जातीच्या दाखल्यावरील तपशील व ऑनलाईन फॉर्म भरतेवेळी दिलेली माहिती सारखीच असल्याची खात्री अर्जदाराने करावी, असे आवाहनही जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत अभिग्यान कुंडूची त्रिशतकी खेळी

0

पुणे, दि. 3 फेब्रुवारी 2022: अजिंक्य क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित स्वर्गीय अण्णा नेवरेकर(सर) स्मृती करंडक  14 वर्षाखालील क्रिकेट करंडक स्पर्धेत साखळी फेरीत अभिग्यान कुंडूने दणदणीत त्रिशतक करत आदिनाथ क्रिकेट क्लब संघाला मोठा विजय मिळवून दिला.  
ए के क्लब, साळुंबरे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत अभिग्यान कुंडूच्या तुफानी 320 धावांसह आदिनाथ क्रिकेट क्लब संघाने अजिंक्य  क्रिकेट क्लब संघाचा 289 धावांनी दणदणीत पराभव करत स्पर्धेत आपले आव्हान बळकट केले. पहिल्यांदा खेळताना आदिनाथ क्रिकेट क्लब संघाने 20 षटकात केवळ 4 गडी गमावत दमदार 375 धावा केल्या.  एकट्या अभिग्यानने तुफानी फलंदाजीचे प्रदर्शन करत 26 षटकार व 38 चौकारांसह 320 धावांची त्रिशतकी खेळी केली. अभिग्यानने यापुर्वीही असा पराक्रम केला आहे. 375 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेदांत गोरे व सुरज गुप्ता यांच्या अचूक गोलंदाजीपुढे अजिंक्य क्रिकेट क्लब संघ 16.2 षटकात सर्वबाद 86 धावांत गारद झाला. अभिग्यान कुंडू  सामनावीर ठरला.


दुस-या लढतीत अनिकेत कुडूकच्या अष्टपैलू बळावर चंद्रोज् संघाने एस्.एस् अकादमी संघाचा 104 धावांनी पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. पहिल्यांदा खेळताना चंद्रोज् संघाने 20 षटकात 9 बाद 188 धावा केल्या. यात अनिकेत कुडूकने 42 चेंडूत 10 चौकार व एका षटकारासह 70 धावा केल्या तर चैतन्य कोंडभरने आपल्या यशस्वी फलंदाजीत सातत्य राखत 35 चेंडूत 4 चौकार व 3 षटकारांसह 54 धावा करून संघाचा डाव बळकट केला. 188 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अनिकेत कुडूक व गगनदिप पलाहेच्या अचूक गोलंदाजीने एस्.एस् अकादमी संघ 20 षटकात 9 बाद 84 धावांत गारद झाला. 70 धावा व 3 गडी बाद करणारा अनिकेत कुडूक सामनावीर ठरला.  
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: 
आदिनाथ क्रिकेट क्लब- 20 षटकात 4 बाद 375 धावा
(अभिग्यान कुंडू नाबाद 320(94, 38×4, 26×6), सोहम साळवे 2-39, सिध्दांत छाजेड 2-57) वि.वि अजिंक्य क्रिकेट क्लब- 16.2 षटकात सर्वबाद 86 धावा(ऋषिकेश शिंदे 27(32, 4×4), वेदांत गोरे 4-12, सुरज गुप्ता 2-0) सामनावीर- अभिग्यान कुंडू आदिनाथ क्रिकेट क्लब संघाने 289 धावांनी सामना जिंकला.
चंद्रोज्- 20 षटकात 9 बाद 188 धावा
(अनिकेत कुडूक 70(42, 10×4, 1×6), चैतन्य कोंडभर 54(35, 4×4, 3×6), राज पडवळ 4-35, निल रोडगे 3-17) वि.वि एस्.एस् अकादमी- 20 षटकात 9 बाद 84 धावा(समर्थ आर 25(50, 4×4), अनिकेत कुडूक 3-23, गगनदिप पलाहे 2-8) सामनावीर- अनिकेत कुडूकचंद्रोज् संघाने 104 धावांनी सामना जिंकला

लोकसेवा आयोगाच्या सन २०२२ च्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

0

मुंबई, दि. ०३ : लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निश्चित करण्यात आले असून, या वेळापत्रकाची सविस्तर माहिती आयोगाच्या http://www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा राज्यातील खेड्यापाड्यातील गरीब व होतकरु उमेदवारांना जास्तीत जास्त माहिती व्हावी यासाठी खालील प्रमाणे अंदाजित वेळापत्रक आयोगाचे सह सचिव सुनिल अवताडे यांनी दिली आहे.

बाल पुरस्कार विजेती जिया राय हिची कामगिरी बालकांना प्रेरणा देणारी – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

0

मुंबई, दि. 3 : जिया राय दिव्यांग असून अपंगत्वावर मात करत तिने ओपन वॉटर पॅरा स्विमिंग आणि ओपन वॉटर स्विमिंगमध्ये जागतिक विक्रम केला आहे. बाल पुरस्कार विजेती जिया राय हिची कामगिरी बालकांना प्रेरणा देणारी असल्याचे मत, महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.

क्रीडा श्रेणीमध्ये ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ ने सन्मानित जिया राय हिचा सत्कार महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर यांनी केला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, जियाला ऑटिझम आहे, तरीही ती उत्तम जलतरणपटू बनली आहे. अवघ्या तेरा वर्षाच्या जियाने आज हा विश्वविक्रम केला आहे. पालकांनी आपल्या मुलांमध्ये काय कमी आहे, हे न पाहता ते काय करू शकतात याकडे लक्ष दिले पाहिजे. जियाच्या या यशात तिच्या पालकांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे त्यांचाही सत्कार आणि अभिनंदन मंत्री ॲड. ठाकूर यांनी केले. जियाला भविष्यात जी काही मदत लागेल त्याबाबत शासन म्हणून आम्ही नेहमीच तिच्या पाठीशी असू, असे मंत्री ॲड. ठाकूर यांनी सांगितले.
या सत्कार समारंभास जियाचे वडील मदन राय आणि आई रचना राय उपस्थित होते.

“कुछ मिला क्या?”; निकटवर्तीयांवरील ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांचा सवाल

0

मुंबई- “या सरकारमध्ये विरोधकांचे नातेवाईक यांच्यावर कारवाई होत असतात आणि आमच्या सारखे लोक नेहमी सहन करत असतात. २०२४ पर्यंत आम्ही हे सहन करु. राजकीय सुड बुद्धीच्या या कारवाया होत आहेत. त्यांचा तपास आमच्याभोवती सुरु आहे. मी त्यांना विचारतो कुछ मिला क्या. हा एक खेळ सुरु आहे,”अशी प्रतिक्रिया प्रवीण राऊत यांच्यावर इडी ने केलेल्या कारवाईनंतर खासदार संजय राऊत यांनी दिलीआहे. .

काल अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गोरेगावमधील एका भूखंडाच्या फसव्या एफएसआय (फ्लोअर स्पेस इंडेक्स) विक्रीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाची नोंद केल्यानंतर प्रवीण राऊत यांना अटक केली. एक हजार ३४ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात ही अटक करण्यात आली आहे. प्रवीण राऊत हे एचडीआयएलची उपकंपनी असलेल्या गुरुआशिष कन्स्ट्रक्शनचे संचालक आहेत. यापूर्वी डिसेंबर २०२० मध्ये पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात प्रवीण यांचे नाव समोर आले होते. प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी यांनी २०१० मध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ५५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिल्याचे यंत्रणेच्या तपासात समोर आले होते. ज्याचा वापर मुंबईतील दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला गेला होता. त्यानंतर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.