Home Blog Page 2096

पुण्यात किडक्या विचारांच्या लोकांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यावर घाण फेकली होती..नाना पटोले

पुणे: ”मी मोदी या गाव गुंडाबद्दल बोललो होतो, पण माझ्या विरोधात आंदोलन करून भाजपच्याच लोकांनी पंतप्रधान पदाची गरीमा राखली नाही. आपण संस्कृत असल्याच आव आणणारी पण दंगेखोर अशी भाजपची लोक आहेत. पुण्यात माझे पुतळे जाळले, चुकीचे फ्लेक्स लावले. याच पद्धतीने पुण्यात किडक्या विचारांच्या लोकांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यावर घाण फेकली होती.केंद्रीय यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षांच्या लोकांना केंद्र सरकार अटक करत आहेत. त्यापेक्षा पुणे महापालिकेचे आॅडिट करून येथील लोकांना जेलमध्ये घाला. पुणे आणि पिंपरीचिंचवड हे काँग्रेसच्या विचाराला मानणारी शहरे असून, या ठिकाणी पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता आणू, असा विश्‍वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

काँग्रेस तर्फे आयोजित परिवर्तन रॅलीमध्ये नाना पटोले बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार संजय जगताप, उल्हास पवार, दीप्ती चवधरी, आबा बागूल, अरविंद शिंदे , अभय छाजेड़, अविनाश बागवेआदी उपस्थित होते.पटोले म्हणाले, भाजपने बेरोजगारी, महागाई वाढवली. आता भाजपकडे पैसा आणि पॉवर असली तरी लोक भाजपला नाकारत आहेत. कॅनडाध्ये जसे तेथील पंतप्रधानांना पळ काढावा लागणार तशीच स्थिती भारतात देखील निर्माण होणार आहे. हा देश आणि संविधान फक्त काँग्रेसच वाचवू शकतो हाच संकल्प घेऊन प्रभागात जा, असे आवाहन पटोले यांनी केले.

पाण्यासाठी जादा दराने निविदा आणून भ्रष्टाचार

काँग्रेसने व्यवस्था केली पाहून आज पुण्याला पाणी मिळत आहे, भाजपने २४ तास पाणी देण्यासाठी योजना आणली, पण त्याची निविदा एक हजार कोटीने जास्त होती. काँग्रेसची महापालिकेत सत्ता आणा आम्ही कमी दराने निविदा आणून पाणी पुरवठा योजना करू. भाजपला जादा दराने निविदा आणून भ्रष्टाचार करायचा आहे, अशी टीक पटोले यांनी केली.गेल्या काही महिन्यांपासून नाना पटोले हे स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार असे सांगत असले तरी पुण्यातील ‘परिवर्तन रॅल’मध्ये आगामी महापालिका निवडणुकीत आघाडी करणार की स्वबळावर निवडणूक लढवणार यावर भाष्य केले नाही. तसेच त्यांच्या ३० मिनिटांच्या भाषणात आघाडीतील घटक पक्षांबद्दल देखील भाष्य केले नाही

भाजपच्या एका पदधिकाऱ्याने महिला शिवसैनिकांना हुसकावण्याचा प्रयत्न करताच झाली घोषणाबाजी अन केंद्रीय पोलिसानेच मागे खेचल्याने पडले सोमैय्या.. सेनेच्या शहर प्रमुखांचे स्पष्टीकरण

0

पुणे- आज रात्री सोशल मिडिया तुन शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.शिवसैनिकांनी धक्काबुक्की केलेली नाही, आम्ही केवळ निवेदन देऊन जाणार होतो, भाजपा पदधिकाऱ्याने महिला व शिवसैनिकाना हुसकावून लावू पाहिल्याने शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली, आणि घोषणा ऐकूनच केंद्रीय पोलिसाने मागे खेचल्याने सोमैय्या पडले ..असे सांगत
आज महापालिका बंद असताना सोमैया आले कशाला होते ?असा सवाल ही शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांनी केला आहे..पहा नेमके त्यांनी काय म्हटले आहे …

केंद्राची सुरक्षा नसती तर आज सोमय्यांना श्रद्धांजली व्हावी लागली असती- आ.चंद्रकांतदादा पाटील

0


पुणे- किरीट सोमैय्या ना हॉस्पिटल मध्ये भेटून आल्यावर भाजपा प्रदेश अध्यक्ष आ. चंद्रकांत पाटलांनी गंभीर आरोप लगावले आहेत. किरीट सोमय्या यांना ठार मारण्याचा हेतू होता, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.केंद्राची सुरक्षा नसती तर आज सोमय्यांना श्रद्धांजली व्हावी लागली असती, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले
पुणे महापालिकेची सुरक्षा कुठे होती? पोलीस कुठे होते? असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केलाय. एकजण दगड घेऊन धावत होता. सोमय्यांना मारण्याची पूर्ण योजना झाली होती, असा खळबळजनक दावा देखील त्यांनी केला आहे.
सत्य लपणार नाही. सोमय्या यांच्या हाताला दुखापत झालीये. कंबरेला मार लागला आहे. त्यांना ठार मारण्याचाच हेतू होता, असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं

सोमय्यांवरील हल्ला मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावरून झालाय का? चित्रा वाघ यांचा ट्विटर सवाल

0

पुणे – भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर आज पुणे महापालिकेत झालेला हल्ला मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावरून झालाय का? याबाबत चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.चित्रा वाघ यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून सोमय्यांना झालेल्या धक्काबुक्कीबाबत भूमिका मांडली आहे. चित्रा वाघ यांनी, ‘जनतेसमोर शिवसेनेच्या भ्रष्टाचाराचं पितळ उघडं पाडणा-या किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांनी हल्ला केलाय इथं लोकशाही नव्हे ठोकशाही सुरूहे.. मुख्यमंत्री तर शेतीतलं बुजगावणं बनून राहीलेत माझी मागणी आहे, मुख्यमंत्र्यांच्या इशा-यावरून शिवसैनिकांनी हल्ला केलाय का याचा तपास व्हायला पाहीजे.’ अशी भूमिका मांडली आहे.

दरम्यान, सोमय्यांना धक्काबुक्की झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या घटनेचा तीव्र निषेध केला असून जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा दिला आहे.

आम्ही कायदा पाळतो. पण याचा अर्थ गुंडागर्दी खपवून घेणार नाही! म्हणाले देवेंद्र फडणवीस?

फडणवीस यांनी याबाबत भूमिका मांडताना, ‘राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? आरोपांना उत्तर देऊ शकत नाही म्हणून थेट गुंडागर्दीवर उतरायचे? आम्ही कायदा पाळतो. पण याचा अर्थ गुंडागर्दी खपवून घेणार नाही! महाराष्ट्रात सातत्याने लोकशाहीचा मुडदा पाडू नका. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध!’ असं ट्विट केलं.

पुणे वन विभागात वनसंरक्षणासाठी तीन वाहने दाखल

0

            पुणे दि.५- उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वन राज्यमंत्री दत्तात्रय  भरणे यांनी वन विभागासाठी घेण्यात आलेल्या  तीन वाहनांना विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.

            यावेळी  विभागीय आयुक्त सौरभ राव,  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपवनसंरक्षक राहुल पाटील उपस्थित होते.

            या वाहनांचा वापर वन तथा वन्यजीव संरक्षणासाठी करण्यात येणार असून वाहनांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत  निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

बनावट खादी उत्पादने विक्रीप्रकरणी मुंबईतल्या डी एन मार्ग येथील खादी एम्पोरियमवर केव्हीआयसीने घातली बंदी

0

मुंबई -खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने  (KVIC),  अलिकडच्या वर्षांत बनावट/खादी नसलेल्या उत्पादनांच्या विक्रीविरुद्ध कडक धोरण अवलंबले आहे. त्यानुसार आयोगाने,  मुंबईतील डॉ. डी. एन. मार्ग इथल्या मेट्रोपॉलिटन इन्शुरन्स हाऊस, येथे 1954 पासून अत्यंत प्रतिष्ठित “खादी एम्पोरियम” चालवण्याऱ्या मुंबई खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज असोसिएशन (MKVIA) या सर्वात जुन्या खादीविक्री  संस्थेचे ‘खादी’ प्रमाणपत्र रद्द केले आहे.

डॉ. डी.एन. मार्ग  येथील खादी एम्पोरियम अस्सल खादी उत्पादनांच्या मिषाने,  खादी नसलेल्या उत्पादनांची विक्री करत असल्याचे आयोगाला  आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. नियमित तपासणी दरम्यान, आयोगाच्या अधिकार्‍यांनी एम्पोरियममधून गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये ही उत्पादने खादी नसल्याचे आढळून आले.  आयोगाने जारी केलेल्या “खादी प्रमाणपत्र” आणि “खादी प्रमाणचिन्ह  प्रमाणपत्र” च्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आयोगाने मुंबई खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज असोसिएशनला कायदेशीर नोटीस जारी केली. नोंदणी रद्द केल्यामुळे, खादी एम्पोरियमला अस्सल खादी विक्री केंद्र म्हणून मान्यता राहणार  नाही आणि यापुढे एम्पोरियममध्ये खादी उत्पादने विकण्याची परवानगीही नसेल. विश्वासार्हतेचा भंग केल्याबद्दल आणि खादी ब्रँडची विश्वासार्हता आणि लोकप्रियता यांचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर जनतेची फसवणूक केल्याबद्दल मुंबई खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज असोसिएशनविरुद्ध  (MKVIA)  कायदेशीर कारवाईचा विचार आयोग करत आहे.

एम्पोरियममधून फक्त “अस्सल खादी उत्पादनेच” विकण्याच्या सक्त अटीवर  आयोगाने 1954 मध्ये खादी एम्पोरियमचे संचालन आणि व्यवस्थापन MKVIA या नोंदणीकृत खादी संस्थेकडे सोपवले होते.  मात्र अलिकडच्या वर्षांत, MKVIA  बनावट खादी उत्पादने विकून अनुचित व्यापार पद्धतींमध्ये गुंतले होते. त्यामुळे हे एम्पोरियम खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडून चालवले जात असल्याचा समज असलेल्या लोकांची फसवणूक होत होती.

गेल्या काही वर्षांमध्ये  आयोगाने “खादी इंडिया” या आपल्या ब्रँड नावाचा गैरवापर आणि ट्रेडमार्कच्या उल्लंघनाविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. आयोगाने आत्तापर्यंत 1200 हून अधिक व्यक्ती आणि कंपन्यांना “खादी” या ब्रँड नावाचा गैरवापर केल्याबद्दल आणि “खादीच्या” नावाखाली  बिगर खादी उत्पादने विकल्याबद्दल कायदेशीर नोटीस बजावल्या आहेत. यात किरकोळ ब्रँड फॅबइंडियाचा समावेश असून आयोगाने फॅब इंडियाकडून 500 कोटी रुपयांच्या नुकसानीची मागणी केली असून प्रकरण  मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. गेल्या वर्षी, आयोगाने अमॅझॉन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील या ऑनलाइन शॉपिंग पोर्टल्सना, खादी नसलेली उत्पादने “खादी” म्हणून विकणाऱ्या 140 वेब लिंक्स काढून टाकण्यास भाग पाडले होते.

अशा अनेक प्रकरणांमध्ये,  उल्लंघन करणार्‍यांविरुद्ध आयोगाने न्यायालयात दाद मागितली असून  “खादी” या ब्रँड नावाचा गैरवापर करण्यास रोखणारे आदेश प्राप्त केले  आहेत. परिणामी, अनेक उल्लंघनकर्त्यांनी माफी मागितली आणि भविष्यात “खादी” या ब्रँड नावाचा वापर न करण्याची हमी दिली.

जसे सर्वधर्म समभाव, तसे माझ्यासाठी सर्व पक्ष समभाव- उदयनराजेंंचे विधान

0

पुणे-भाजप खासदार उदयनराजे भोसलेंनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट घेतली आहे. यावेळी अजित पवारांसोबत विकासकामांबाबत चर्चा झाल्याचे उदयनराजेंनी सांगितले आहे.यावेळी पत्रकारांनी त्यांना राष्ट्रवादीत जात आहात का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी छत्रपती शिवरायांचे ज्याप्रमाणे सर्वधर्वसमभाव हे धोरण होते तसे माझे सर्वपक्ष समभाव हे धोरण आहे, असे उत्तर दिले आणि हसले.

वाईन विक्रीचा निर्णय :लोकांनी आपापला विचार केला पाहिजे –
नुकतेच राज्य सरकारच्यावतीने वाईन विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत उदयनराजे भोसले यांना विचारले असता, ही लोकशाही आहे. या निर्णयाचा काही फायदा होणार की, नाही होणार हे निर्णय घेणाऱ्यांना विचारले तर बरे होईल. प्रत्येकाचे आयुष्य आहे, त्याने कसे वागावे हे त्याने ठरवावे. वाईन बंद करा, चालू करा, यापेक्षा लोकांनी आपापला विचार केला पाहिजे, असे यावेळी उदयनराजे भोसले म्हणाले.

दरम्यान, या भेटीनंतर उदयनराजे भोसले यांनी सोशल मिडियात एक पोस्ट लिहिली, सातारा नगरपरिषदेच्या नवीन वाढीव हद्दीतील विकास कामांना प्राथमिक सोयी सुविधा अंतर्गत अनुदान मिळणेबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन प्रस्तावाद्वारे मागणी केली आहे.

विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही – दिलीप वळसे-पाटील

0

पुणे, दि. ५: कोरोनाचे निर्बंध काही प्रमाणात सैल होत असताना राज्याची आर्थिक परिस्थितीदेखील हळूहळू पूर्वपदास येत आहे. त्यामुळे विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही असे प्रतिपादन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शिरूर तालुक्यातील हिवरे येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी केले.

सार्वजनिक बांधकाम (उत्तर) विभाग तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा निधी, स्थानिक विकास निधी, जिल्हा वार्षिक जनसुवधा अंतर्गत जिल्हा परिषदेचा सार्वजनिक बांधकाम (दक्षिण) विभाग, पंचायत समिती आदींच्या माध्यमातून शिरूर तालुक्यात करण्यात येणाऱ्या रस्ते, पूल, व्यायामशाळा, सभागृह आदी विकासकामांचे भूमिपूजन मंत्री वळसे पाटील यांच्या हस्त झाले. हिवरे येथे झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या श्रीमती सविता बगाटे, पंचायत समितीच्या उपसभापती सविता पऱ्हाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार आदी उपस्थित होते.

राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर लगेचच पूर्ण जगावर कोरोनाचे संकट आले त्यामुळे देशाची तसेच राज्याची अर्थव्यवस्था धोक्यात आली. उद्योग, शेती, व्यापार आदींवर गंभीर परिणाम झाला. राज्याचे उत्पन्न घटले असताना मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागाकडे निधी वळवावा लागला. त्यामुळे विकासकामांची गती काही काळ मंदावली होती. आता स्थिती आटोक्यात येत असल्याने राज्याचे उत्पन्नदेखील वाढत असून विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही. कोरोना अजून संपलेला नाही तरी सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शिक्रापूर ते पिंपळे खालसा या रस्त्यासाठी २ कोटी ४० लाख रुपये, खैरेवाडी ते कान्हूर मेसाई रस्त्यासाठी २ कोटी ५० लाख रुपये मंजूर केले असल्याची माहिती देऊन श्री. वळसे पाटील म्हणाले, हिवरे जवळून जाणाऱ्या कालव्यातून सिंचनाच्या पाणी उचल परवान्याचे प्रश्न, वाहतुकीसाठी पीएमपीएमएल बसची व्यवस्था, ग्रामसचिवाय सभागृहाच्या बांधकामासाठी निधीची तरतूद, हिवरे ते व्यंकटेशकृपा साखर कारखाना रस्ता आदी मार्गी लावण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील.

यावेळी श्रीमती बगाटे, सरपंच शारदा गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.

तत्पूर्वी हिवरे येथील रस्त्यावरील पूल, रस्ता, रस्त्याचे काँक्रीटीकरण, रस्ता सुधारणा, अंगणवाडी बांधकाम स्मशानभूमी सुधारणा, संरक्षण भिंत बांधकाम, समाज मंदिर दुरुस्ती आदी मंजूर करण्यात आलेल्या सुमारे १ कोटी ५० लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

याप्रसंगी उपसरपंच दीपक खैरे, तहसीलदार लैला शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. वाय. पाटील, उपअभियंता लक्ष्मीकांत पाटील, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आर. एस. चनाळे यांच्यासह पदाधिकारी, शासकीय अधिकारी उपस्थित होते.

मुखई येथील ४० लाख रुपये निधीची तरतूद केलेल्या रस्ता सुधारणा, काँक्रीटीकरण, प्राथमिक शाळा वर्ग खोली बांधणे, जातेगाव बु. येथील सुमारे १ कोटी ४० लाख रुपये निधीची तरतूद केलेल्या अंतर्गत रस्ता सुधारणा, ग्रामक्रीडांगण, रस्ता पूल कामांचे भूमिपूजनदेखील मंत्री वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

जातेगाव येथील कार्यक्रमात श्री. वळसे-पाटील यांनी पोट चारी खोलीकरण, पाणीप्रश्न रस्ते आदींबाबत आगामी काळातही प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन दिले.

यावेळी प्रकाश पवार यांनी वेळ नदीवरील बंधाऱ्यांची कामे वळसे-पाटील यांनी मार्गी लावण्याचा उल्लेख करून येथे चांगल्या शैक्षणिक सुविधा उभ्या करण्यात त्यांनी मदत केली असेही सांगितले.

सोमय्यांंवरील हल्ला – जशास तसे उत्तर देऊ-भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा शिवसेनेला इशारा

0


पुणे-हल्ला केला म्हणून किरीट सोमय्या स्वस्थ बसणार नाहीत, भारतीय जनता पार्टी कायदेशीर पद्धतीने जशास तसे उत्तर देईल, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिला.

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना चंद्रकांतदादा पाटील बोलत होते.ते म्हणाले की, सभ्यतेचा पांघरलेला बुरखा आता फाटला असून सर्व ठिकाणी राज्यातील सत्ताधाऱ्यांचा मूळ चेहरा दिसू लागला आहे. मुद्दे संपल्यामुळे ते गुद्द्यांवर आले आहेत. भावना गवळी यांच्या प्रकरणात यवतमाळमध्ये किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला करण्यात आला म्हणून ते घाबरून घरी बसले नाहीत. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रकरणात तर किरीट सोमय्या यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानीच स्थानबद्ध करायचा प्रयत्न झाला पण त्यामुळे ते घाबरून घरी बसले नाहीत. आजच्या शिवसैनिकांच्या हल्ल्यांमुळेही सोमय्या घाबरून गप्प बसणार नाहीत.

आ.चंद्रकांतदादादा पाटील म्हणाले की, आमचा कायद्यावर विश्वास आहे आणि आम्ही कायदेशीरपणेच उत्तर देऊ. पण जशास तसे उत्तर दिले जाईल.

येत्या सहा महिन्यात पाच लाख घरापर्यंत पाईप गॅस लाईन -खासदार गिरीश बापट

0


पुणे:एम एन जी एल च्या वतीने शहरामध्ये विनाखोदाई घरगुती गॅस च्या पाईपलाईन चे काम सध्या चालू आहे ते आता अंतिम टप्प्यात आले आहे ह्या कामाची तसेच ह्या कामासाठी विशेष मागविण्यात आलेल्या यंत्राची पाहणी आज पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी एम एन जी एल च्या अधिकाऱ्यांच्या व पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी यांच्या समवेत केली
या वेळी या कामासाठी horizontal directional ड्रील्लिंग मशीन HDDहे यंत्र आणण्यात आले आहे ह्या द्वारे रस्त्यावर कुठल्याही प्रकार ची खोदाई न करता ह्या मशीन द्वारे तीन मिटर खोल खड्डा करून त्याद्वारे सुमारे 300 मिटर लांब पर्यंत लाईन टाकता येते आता पर्यंत पू इ शहरात एकूण ४२३०५८घरापर्यंत ही सुविधा देण्यात आली आहे
या बाबत माहिती देताना खासदार बापट यांनी एम एन जी एल ने प्रस्ताव दिल्यावर आपण पाठपुरावा करून विविध विभागांच्या जवळ पास ३५०परवानग्या तसेच पुणे महानगरपालिकेच्या ५८पैकी ५५परवानगी मिळवून हे काम पूर्णवत्वास नेण्यासाठी प्रयनशील असल्याचे खासदार बापट यांनी सांगितले आगामी काळात ५लाख हुन अधिक घरात ही सुविधा देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला


या वेळी एम जी एन एल चे संचालक राजेश पांडे ,महापालिका उपयुक्त कुणाल खेमणार पुणे शहर भारतीय जनता पार्टी चे सरचिटणीस दत्ता भाऊ खाडे,संजय मयेकर,पुष्कर तुळजापूरकर ,अर्जुन खानापुरे आदी उपस्थित होते

संभाजी ब्रिगेड कडून सोमैय्यावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध

0

पुणे- संभाजी ब्रिगेड कडून सोमैय्यावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे या संदर्भात संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे यांनी म्हटले आहे कि,’किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला निषेधार्ह आहे. सत्ताधारी असले म्हणून तुम्ही इतर नेत्यांवर हल्ले करणार असाल तर अशाने महानगरपालिकेवर सत्ता मिळणार नाही. सोमय्या यांनी सुद्धा राजकारण करू नये. मनपा निवडणुकीचे राजकारण पाहता पुण्यात कायदा-सुव्यवस्था उरलेली नाही, याचं दर्शन आज झाले. पक्ष कोणताही असो, सूडबुद्धीने राजकारण कोणीही करू नये. मात्र किरीट सोमय्या यांना ‘पायऱ्यावर घसरून माकड हाडापर्यंत मार लागणे म्हणजे त्यांच्या जिवाला धोका होणारी घटना आहे. चक्क पिटाळून लावले.’ या तालिबानी हल्ल्याचा आम्ही निषेध करतो… मात्र शिवसेनेची सुद्धा भूमिका समजून घेतली पाहिजे.किरीट सोमय्या यांनी भाजपने पुणे महानगर पालिकेत केलेल्या भ्रष्टाचारावर सुद्धा बोललो पाहिजे. मात्र सूडबुद्धीने व सोयीने राजकारण करण्याच्या नादात ते खालच्या पातळीला जाऊन राजकारण करतात कदाचित त्याचीच शिवसेनेने किरीट सोमय्या यांना पोचपावती दिली असावी.स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून असाच प्रकार दिसतो…! असेही संतोष शिंदे यांनी म्हटले आहे.

“…त्यामुळं आम्ही राष्ट्रवादी-शिवसेनेच्या पाठीमागे फरफटत जाणार नाही”, नाना पटोलेंचं मोठं विधान

0

पिंपरी-पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सध्या आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. मात्र, राज्यात महाविकासआघाडी म्हणून एकत्र आलेले शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष या निवडणुकीत मात्र एकत्र येणार नसल्याचेच संकेत मिळत आहेत. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतः काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमागे फरफटत जाणार नसल्याचं म्हणत याला दुजोरा दिलाय. ते पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नाना पटोले म्हणाले, “पक्षांनी त्यांच्या भूमिका स्पष्ट केलंय आहेत. त्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीमागे फरफटत जाणार नाही. कोण मजबूत आहे हे ते नेते ठरवत नाहीत तर जनता ठरवेल. पिंपरी-चिंचवड आणि पुणे ही शहर काँग्रेस विचारधारेची आहेत. काँग्रेस त्याच ताकदीने जनतेसमोर जाणार आहे. पुणे, पिंपरी महानगर पालिका भ्रष्टचाराने बरबटलेल्या आहेत. स्थायी समितीच्या अध्यक्षाने लाच घेणे हे त्याचे उदाहरण आहे. या दोन्ही महानगर पालिका काँग्रेसच जिंकेल. कोणी प्रस्ताव दिल्यास यावर चर्चा करू.मी तेव्हा गावगुंडाबद्दल बोललो होतो. तो पुढे आला. देशाच्या पंतप्रधानांच्या पदाची गरीमा संपवण्याचं काम भाजपाने केले आहे. भाजपाकडून रस्त्यावर गुंडागर्दी केली गेली. माझ्या प्रतिमेची जाळपोळ केली, विटंबना केली. ही परंपरा, वृत्ती आजच्या भाजपाची नाही. महात्मा जोतिबा फुले, सावित्री बाई फुले यांना काय त्रास दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना काय त्रास दिला या सगळ्यांच्या इतिहासात नोंदी आहेत,” असं नाना पटोल यांनी म्हटलं.”“आज मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, संस्थानिक राजकारणी नाही. मी जनेतीची लढाई लढत आहे. त्यांच्या अधिकाराची लढाई लढतोय,” असंही यावेळी नाना पटोले यांनी नमूद केलं.

संजय राऊत मित्र परिवाराचा 100 कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा- सोमय्यांचा आरोप

0

पुणे-भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवारावर गंभीर आरोप केला आहे. संजय राऊत मित्र परिवाराने 100 कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

संजय राऊत यांची भागिदारी असलेली सुजीत पाटकर यांची बनावट कंपनी आहे. लाइफलाइन हॉस्पिटल मेनेजमेंट सर्व्हिस ही कंपनीच अस्तित्वात नाही. परंतु, या कंपनीला दहिसर, वरळी NSCI,महालक्ष्मी रेसकोर्स, मुलुंड आणि पुण्यातील कोविड सेंटरचे कंत्राट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. तसेच, या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी सोमय्या यांनी केली आहे.

सोमय्या आधी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गेले. तिथे त्यांनी पुणे जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत तक्रार केली. तिथून पालिकेत आयुक्तांना भेटण्यासाठी ते आले असताना शिवसेना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली आणि सगळा प्रकार घडला.

हल्ल्यावर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया

शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या यांनी स्वतः याची माहिती देत ट्वीट केलंय. ते म्हणाले, “माझ्यावर शिवसेनेच्या गुंडांनी पुणे महानगरपालिकेच्या आवारात हल्ला केला आहे.”

पुण्यात किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की, सोमय्या पायऱ्यांवरुन पडले,पळवून लावले …

0

पुणे-पुणे महापालिकेत आलेल्या भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेनेकडून अडविताना धक्काबुक्की करण्यात आली या धक्काबुक्कीदरम्यान सोमय्या हे पायऱ्यांवरुन कोसळले आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी अक्षरशः त्यांना उचलून गाडीत पुन्हा घातले आणि गाडी महापालिकेबाहेर काढण्याचा यत्न केला तेव्हा सेनेचे शहर प्रमुख संजय मोरे धावत जाऊन गाडीपुढे झोपल्याने चालकाला गाडी थांबवावी लागली अखेरीस सुरक्षा रक्षकांनी बळाच्या जोरावर शिवसैनिकांना बाजूला करत सोमैय्या यांना रुग्णालयात पोहोचविले आहे.त्यानंतर सायंकाळी संचेती हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी माध्यमांना सांगितले कि , सोमैय्या यांची तब्बेत चांगली आहे ,मुक्क मार लागला आहे , एक दिवस निरीक्षणाखाली ठेवून उद्या त्यांना रुग्णालयातून सोडता येवू शकेल असे वाटते आहे .

किरीट सोमय्या हे सध्या पुणे दौऱ्यावर असून, पुणे महानगरपालिकेत धक्काबुक्कीचा प्रकार घडला आहे. धक्काबुक्की झाल्याने सोमय्या यांनी पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.गेल्या काही दिवसांपासून सोमय्या हे शिवसेनेने कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप लावत आहेत. यासंदर्भात सोमय्या यांनी आज महानगरपालिकेत येण्याचे निश्चित केले होते .. मात्र यावेळी पुणे महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराचे निवेदन स्वीकारावे, अशी मागणी करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची वाट अडवली. यावेळी शिवसैनिकांनी प्रचंड गोंधळ घातला. झटापटीत किरीट सोमय्या चक्क पायऱ्यांवर कोसळले. अखेरीस त्यांना त्यांच्या रक्षकांनी तेथून घेऊन बाहेर जाणे पत्करले. पहा व्हिडीओ….

अण्णा हजारेंचा उद्धव ठाकरें,अजित पवारांना इशारा,आमरण उपोषण :वाचा अण्णांनी सीएम/डीसीएमला पाठविलेले पत्र जसेच्या तसे ….

0

दिनांक- 05.02.2022

जा.क्र.भ्रविज- 35/2021-22

प्रति,

मा. उद्धवजी ठाकरे साहेब,

मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,

मुंबई, मंत्रालय- 32

विषय- महाराष्ट्र सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला ठेवण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ प्राणांतिक उपोषण करण्याबाबतचे माझे दिनांक 03.02.2022 चे पत्र मिळाले असेल पुन्हा स्मरणपत्र पाठवित आहे.

महोदय,

            सरकारच्या सुपरमार्केट वाईन विक्रीच्या निर्णयामुळे राज्यातील मुलांच्यावर जी आमची खरी संपत्ती आहे. या बालकामध्येच उद्याचे महापुरूष निर्माण होणार आहेत. युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. ही युवाशक्तीच राज्य आणि राष्ट्र घडवू शकेल यावर आमचा विश्वास आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक परिवाराचे उज्वल भविष्य ज्या मुलींना, युवतींना घडवायचे, जिच्या हाती पाळण्याची दोरी। ती जगाला उद्धारी। या युवतींवर या वाईनच्या वातावरणाचा काय दुष्परिणाम होईल, एकूण समाजावर काय परिणाम होतील याचा सरकारने विचार केलेला दिसत नाही. फक्त मिळणाऱ्या महसुलाचा मर्यादीत विचार केलेला दिसतो. ज्या सत्तेमध्ये समाज, राज्य, राष्ट्र हिताचा विचार नसेल अशी सत्ता काय कामाची? ज्यांनी राज्य चालवायचे आहे त्यांनी जनतेचा सल्ला न घेता आपल्या मनाला जे योग्य वाटते असे निर्णय घेणे म्हणजे लोकशाही नव्हे. लोकशाही ही लोकांची आहे. ती लोकांची, लोकांनी, लोकसहभागातून चालविली पाहिजे अन्यथा इंग्रजांच्या आणि आमच्या हुकूमशाहीत फरक राहणार नाही.

            चौथी पाचवीतील विद्यार्थी सांगू शकेल की, वाईन ही समाजाला घातक आहे पण ज्यांनी राज्य चालवायचे आहे त्या सरकारला कळू नये ही बाब दुर्दैवी आहे. आमच्या पन्नास वर्षापूर्वी गावात पस्तीस दारूभट्ट्या होत्या. आज 22 वर्षात गावात कोणत्याही दुकानात बीडी, सिगारेट, तंबाखू, गुटखा सुद्धा विक्रीला नाही. आणि सरकार मात्र सुपरमार्केट आणि किराणा दुकानात वाईन ठेवण्याचा निर्णय करते.

            मी जीवनात वयाच्या पंचविसाव्या वर्षी निर्णय घेतला की, जोपर्यंत जगायचे ते गाव, समाज आणि देशाची सेवा करायची आणि ज्या दिवशी मरायचे ते गाव, समाज आणि देशाची सेवा करता करताच मरायचे. लग्न करावे तर चूल पेटवण्यात वेळ जाईल. मग गाव, समाज आणि देशाची निष्काम भावनेने सेवा करता येणार नाही. हा धोका दिसायला लागला म्हणून वयाच्या पंचविसाव्या वर्षी लग्न नाही करायचे हा निर्णय घेतला. अविवाहित राहून गाव, समाज आणि देशाची निष्काम भावनेने सेवा करण्याचा निर्णय घेतला. आज पर्यंत 84 वर्ष वयाच्या आयुष्यात फक्त गाव, समाज आणि देशाची सेवा करीत आलो आहे. गावात घर आहे, परिवार आहे, शेती आहे पण पंचेचाळीस वर्षात मी माझ्या घरात कधी गेलो नाही. भावांच्या मुलांची नावे काय आहेत ते मला माहित नाही. सैन्यातील पेन्शन मिळते त्यावर उदर निर्वाह  चालतो. आयुष्यात कोणाचीही कोणातीही आर्थिक मदत घेतली नाही. किंवा मदतीची कधी अपेक्षा ठेवली नाही.

मला अमेरिका, दक्षिण कोरीया, कॅनडा अशा वेगवेगळ्या देशामध्ये करोड रूपयांचे पुरस्कार मिळाले पण ते समाज सेवेसाठीच अर्पण केले. जवळ ठेवले नाहीत. गावात श्री संत यादवबाबा मंदीरामध्ये झोपण्याचे बिस्तर आणि जेवणाचे ताट याशिवाय काहीच ठेवले नाही. सुरूवातीला 1975 मध्ये मी माझ्या गावापासून गावच्या विकासाला सुरूवात केली. दहा वर्षात 1985 मध्ये ते राळेगणसिद्धी एक आदर्श गाव उभे झाले. त्यासाठी किती परिश्रम परिश्रम करावे लागले असतील ते फक्त शब्दाने सांगून कळणार नाही. राज्यातून, देशातून गाव पाहण्यासाठी लोक येऊ लागले. सोळा वर्षात महाराष्ट्र राज्य आणि विविध राज्यातून चौदा लाख लोकांनी गावाला भेटी दिल्या. प्रेरणा घेऊन काही कार्यकर्ते ग्रामविकासाचे काम करू लागले. ही बाब सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्ट्या मला महत्वाची वाटते. चार जणांनी पी.एच.डी केली. तीन जण पी.एच.डी. करत आहेत.

            विकास आणि विकासाला लागलेली भ्रष्टाचाराची गळती एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ही दोन्ही कामे केल्याशिवाय गाव, समाज, आणि देशाला उज्वल भविष्य मिळणार नाही. राज्यामध्ये विकास कामांना भ्रष्टाचाराची गळती लागली असल्याने ती गळती थांबवण्यासाठी 1997 मध्ये भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास नावाने संस्था स्थापन केली. महाराष्ट्र राज्यात हजारो कि.मी प्रवास करून अथक परिश्रम करून 33 जिल्ह्यामध्ये 252 तालुक्यामध्ये भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास नावाचे फक्त चारित्र्यशील कार्यकर्त्यांचे संघटन उभे केले. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी माहितीचा अधिकार, ग्रामसभेला जादा अधिकार, दप्तर दिरंगाई, बदल्यांचा कायदा, जनतेची सनद, लोकपाल कायदा, ग्रामरक्षक दल कायदा यासारखे दहा कायदे वेगवेगळ्या पक्ष पार्ट्यांच्या सरकारवर जनशक्तीचा दबाव निर्माण करून सरकारला भ्रष्टाचाराला आळा घालणारे दहा कायदे करायला भाग पाडले. भ्रष्टाचाराला ज्यांनी आळा घालायचा असे गृहमंत्रीच जर पैसे जमविण्याच्या विचार करत असतील तर काय होणार या राज्याचे प्रश्न आहे.

            नुकतेच महाराष्ट्र सरकारने राज्यातील सुपरमार्केट आणि किराणा दुकानामध्ये वाईन विक्रीला ठेवण्याचा परवाना देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय महाराष्ट्र राज्यासाठी अत्यंत दुर्दैवी निर्णय असल्याने आमच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी घातक असल्याने मी या सरकारचा निषेध करण्यासाठी प्राणांतिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधाने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना रजिस्टर पोस्टाने पत्रव्यवहार केला आहे. उत्तर नाही.

माझे राज्यात उपोषण होईल त्यावेळी कार्यकर्त्यांनी माझ्या प्रमाणे सर्वांनी उपोषण करू नये. कारण जनतेच्या हितासाठी मी वेळोवेळी बावीस वेळा उपोषणे केली आहेत. मी तारूण्यातच व्रत घेतले आहे की जोपर्यंत जगायचे आहे. तो पर्यंत समाज आणि देशाची सेवा करायची आहे. आणि ज्या दिवशी मरायचे ते समाज, राज्य आणि देशाची सेवा करता करताच मरायचे आहे. म्हणून मी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही विवाहित असल्यामुळे अण्णा हजारे ची उपोषणाची नक्कल करून चालणार नाही. मात्र समाज आणि देशाचे मी काही देणे लागतो ही जाणीव ठेवून होईल तेव्हढी सेवा करावी. समाज, राज्य आणि देशाची सेवा यासाठीच मनुष्य जन्म आहे.

राज्यातील बऱ्याच संस्था आणि संघटनांनी शासनाने घेतलेल्या वाईनच्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक संघटना संपर्कात येत आहे. लवकरच राज्यातील अशा संस्था आणि संघटनांनी कोणत्याही पक्ष पार्टीच्या विरोधात आंदोलन न करता समाज, राज्य आणि राष्ट्र हिताचा विचार करून अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी आंदोलनाची दिशा काय असावी. आंदोलन कुठपर्यंत करावे याचा विचार करण्यासाठी राज्यातील काही संस्था आणि संघटनांची बैठक आम्ही राज्याच्या वेगवेगळ्या विभागात घेण्याचा विचार करीत आहोत.

सुपरमार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगीच्या निर्णयाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी आंदोलन केले जाईल.

धन्यवाद.

आपला, 

कि. बा. तथा अण्णा हजारे