Home Blog Page 2095

शिवसेना शहरप्रमुख संजय मोरेंसह अनेक शिवसैनिक स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर

0

किरीट सोमैय्या हल्ल्याच्या तक्रारीचे प्रकरण : आज कोर्टात जामीन होण्याची शक्यता

पुणे : भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महापालिकेच्या आवारात झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी गुन्हा दाखल असलेले शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह शिवसेनेचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते आज सकाळी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत.या प्रकरणात मोरे, पदाधिकारी चंदन साळुंके, किरण साळी, सूरज लोखंडे, रूपेश पवार, राजेंद्र शिंदे, सनी गवते यांच्यासह ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रशांत लाटे यांनी या संदर्भात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दाखल झालेल्या गुन्ह्यात सोमवारी सनी गवते (वय ३२, रा. नाना पेठ) याला अटक करण्यात आली आहे. धक्काबुक्की झाल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देखील तक्रार केली आहे. गुन्हा दाखल झालेल्या अन्य शिवसैनिकांचा पोलिस शोध घेत होते. त्यामुळे शहर प्रमुखांसह अनेक शिवसैनिक स्वतःहून पोलिसांत हजर झाले आहेत. या सर्वांवर काय कारवाई होणार याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. सनी गवते यास कालच पोलिसांनी अटक केली होती .

दरम्यान भाजपचे शिष्टमंडळ आज पोलीस आयुक्तांना भेटणार आहे आणि त्यानंतर पुन्हा या प्रकरणी आक्रमक भूमिका भेणार आहे . असे भाजपच्या वतीने सांगण्यात आले आहे.

शिवसैनिक पोलिसात हजर होताच अजय भोसले यांनी त्वरित पोलीस ठाण्यात उपस्थिती लाऊन या संदर्भात माहिती घेतली .

भविष्यात सर्व हिशोब चुकते होणार!भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा शिवसेनेला इशारा

0

किरीट सोमय्या हल्ल्याप्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र- राज्यपालांकडे दाद मागणार

पुणे -किरीट सोमय्या यांच्यावर पुण्यातील हल्ल्याचे सर्व पुरावे समोर असतानाही, कारवाई होत नाही. त्यामुळे भविष्यात सर्व हिशोब चुकते होणार, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला.‌ पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. तसेच किरीट सोमय्या हल्लाप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून पाठविले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.दरम्यान, किरीट सोमय्या हल्ल्यातील आरोपींना तातडीने अटक करुन, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला नाही. तर भारतीय जनता पक्ष उच्च न्यायालय आणि राज्यपालांकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, “किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्यात पुणे पोलिसांनी जे गुन्हे दाखल केले आहेत, ते अतिशय हास्यास्पद आहेत. या घटनेचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत. पण तरीही पुणे पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद न करणं, यातून पुणे पोलिसांवर दबाव असल्याचंच सिद्ध होतं. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून घटनाक्रम कळवला असून, सर्व पुरावे दिले आहेत. तसेच या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे.”

ते पुढे म्हणाले की, “किरीट सोमय्यांवरील हल्ल्याच्या पाठिमागे कोण आहे, ते सर्वांना माहीत आहे. ज्यांची नावे एकेका प्रकरणातून समोर येत आहेत, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कोणत्याहीक्षणी तपास यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळे त्यावर उत्तर देता येऊ शकत नसेल, तेव्हा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो. पण त्यांनी कितीही प्रयत्न केले, तरी आमचा आवाज दाबू शकत नाहीत,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.पाटील पुढे म्हणाले की, अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटींच्या आरोपानंतर माननीय उच्च न्यायालयाने दखल घेत सीबीआय चौकशीचे आदेश दिले. आता परमवीर सिंह आणि अनिल देशमुख यांच्या ईडीला दिलेल्या जबाबातून मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंची नावे येत आहेत. त्याची दखल माननीय उच्च न्यायालयाने घ्यावी, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.

किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याचे विडंबन वृत्त सामनामधून प्रकाशित करण्याच्या कृतीवर बोलताना श्री. पाटील म्हणाले की, “सामना हा सवंग लोकप्रियतेसारखे आता गल्लीतले वृत्तपत्र झाले आहे. त्यामुळे आदरणीय रश्मी वहिनी यांनी सामनाचे संपादक पद सोडलं आहे का?” असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

रोल बॉल मैदान उभारणीसाठी आमदार निधीतून तरतूद-आ. चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

0

पुणे-देशाच्या नावलौकिकात भर घालण्यात खेळाडुंचे नेहमीच महत्त्वाचे योगदान असते. त्यामुळे कोथरुड मध्ये खेळाडुंना सर्वप्रकारच्या अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यावर नेहमीच भर असतो. रोलबॉलसारख्या क्रीडा प्रकारांचा विकास आणि खेळाडुंना सरावासाठी स्वतंत्र मैदान उभारण्यासाठी आमदार निधीतून तरतूद करणार असल्याची ग्वाही भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

रोल बॉल खेळाच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त सन २०२० आणि २०२१ मध्ये पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचा सत्कार भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते.

या प्रसंगी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सौ. मंजुश्रीताई खर्डेकर, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, रोलबॉलचे जनक आणि आंतरराष्ट्रीय रोल बॉल संघटनेचे सचिव राजू दाभाडे, अध्यक्ष सूर्यकांत काकडे, ऑल इंडिया रोल बॉल फेडरेशनचे सचिव श्री.चेतन भांडवलकर, रोल बॉल संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. गजानन थरकुडे, सचिव श्री. प्रमोद काळे आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले की, “देशाच्या नावलौकिकात भर घालण्यात खेळाडुंचे नेहमीच महत्त्वाचे योगदान असते. त्यामुळे कोथरुड मध्ये खेळाडुंना सर्वप्रकारच्या अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यावर नेहमीच भर असतो. माननीय देवेंद्रजींच्या कार्यकाळात राज्यात क्रीडा क्षेत्राच्या विकासावर सर्वाधिक भर देण्यात आला. तसेच मी स्वतः देखील क्रीडाप्रेमी असल्याने अनेक खेळाडुंना लोकसहभागातून मदत करत असतो. त्यामुळे रोलबॉलसारख्या क्रीडा प्रकारांचा विकास होणे गरजेचे आहे. या खेळाडुंना सरावासाठी अद्ययावत आणि सुसज्ज मैदानाची गरज आहे. ती गरज पूर्ण करण्यासाठी आमदार निधी उपलब्ध करून देऊ.” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सौ. मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या की, “माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना खेळाडूंना कोणत्याही प्रकारची कमतरता कधीही पडू दिली जात नाही. रोल बॉल साठी यापूर्वीच शाळांचे मैदान उपलब्ध करून दिले होते. मात्र, कोरोनाच्या निर्बंधांमुळे मैदान वापरावर क्षेत्रातील आली. आता निर्बंध शिथिल झाल्यास, मैदान वापरता येईल.”

दरम्यान, रोलबॉलचे जनक राजू दाभाडे यांची विशेष सत्कार आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रणय प्रवीण शिंदे यांचा भाजपात प्रवेश

0

पुणे – पुणे महापालिका निवडणुकीच्या पूर्वी महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचे पुतणे आणि समाजसेवक तुकाराम शिंदे यांचे नातू प्रणय शिंदे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांनी प्रणय शिंदे यांचे पक्षात स्वागत करुन, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपा पुणे शराध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे मनपा गटनेते गणेश बिडकर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र (बापू) मानकर, भाजपा पुणे शहर सरचिटणीस दीपक पोटे, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, युवा मोर्चा सरचिटणीस अभिजीत राऊत आदी उपस्थित होते.

पक्ष प्रवेशानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामामुळे आज प्रत्येकजण भारतीय जनता पक्षाशी जोडला जात आहे. त्यामुळेच भाजपा आज जगातील क्रमांक एकचा पक्ष झाला आहे. प्रणय शिंदे यांनी संघटन वाढीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कामे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी काम करावे.

शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले की, एखाद दुसऱ्या पक्षांतरामुळे भाजपाचे काहीही नुकसान होत नाही. उलट आगामी काळात शहरातील अनेक दिग्गज भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे संघटन मजबूत होण्यास अजून मदतच होणार आहे.

पक्ष प्रवेशानंतर प्रणय शिंदे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे विचार आणि नरेंद्र मोदी यांच्या कामामुळे प्रभावित होऊन आज पक्षात प्रवेश करत आहे. भविष्यात पक्षाचे संघटन वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणार.

दरम्यान, प्रणय शिंदे यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना भाजपा युवा मोर्चा पुणे शहरच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्याची घोषणा युवा मोर्चा शहर अध्यक्ष राघवेंद्र (बापू) मानकर यांनी केली.

100 नव्या सैनिकी शाळांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ई-समुपदेशन

0

नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2022

देशभरात 100 नवीन सैनिक शाळा स्थापन करण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाला अनुलक्षून, सैनिक स्कूल सोसायटी द्वारे (SSS) प्रवेशप्रक्रियेसाठी ई-समुपदेशन आयोजित करण्यासाठी स्वयंचलित प्रणाली विकसित केली जात आहे.  सैनिक शाळांमध्ये प्रवेशासाठी ई-समुपदेशन पध्दतीला  प्रथमच  आरंभ होत आहे. देशभरातील विद्यार्थ्यांसाठी सैनिकीशाळेच्या अभ्यासक्रमाबरोबरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगतपणे वाटचाल करण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या संकल्पनेचा भाग म्हणून स्थापन करण्यात आलेल्या सर्व नवीन शाळांसाठी ही प्रणाली लागू होईल.

प्रक्रिया

सैनिक स्कूल सोसायटी (SSS) विद्यार्थ्यांना ई-समुपदेशनासाठी अर्ज करण्याची माहिती देण्यासाठी वेळोवेळी व्यापकपणे प्रसिद्धी देईल.  सैनिक स्कूल सोसायटी (SSS) ने वेळोवेळी जाहीर केलेल्या पात्रतेपेक्षा अधिक गुण असणाऱ्या वैयक्तिक अर्जदार विद्यार्थ्यांना ई-मेल किंवा मोबाईल नंबर द्वारे एक लिंक पाठवली जाईल.  त्याच वेळी, नवीन सैनिक शाळांना श्रेणी आणि लिंगनिहाय माहिती तसेच रिक्त पदांची संख्या उपलब्ध करण्यासाठी योग्य ती संधी प्रदान केली जाईल. विद्यार्थ्यांना www.sainikschool.ncog.gov.in या वेब पोर्टलवर दिलेल्या लिंकद्वारे नोंदणी करण्यास आणि त्यांच्या तपशीलांची पडताळणी करण्यास सांगितले जाईल.  विद्यार्थ्यांना 10 शाळा निवडण्याचा पर्याय दिला जाईल.  त्यानंतर, विद्यार्थ्यांना शाळांचे वाटप त्यांच्या श्रेणी आणि शाळांच्या निवडीच्या आधारे केले जाईल आणि ई-समुपदेशन पोर्टलद्वारे निकाल घोषित केला जाईल. अर्जदार विद्यार्थ्याला  दिलेली शाळा स्वीकारणे आवश्यक आहे किंवा समुपदेशनाच्या दुसऱ्या फेरीच्यावेळी विचार केला जाणारा पर्याय सूचित करणे आवश्यक आहे किंवा पुढील विचारासाठी इच्छुक नाही, असे कळवावे लागेल. ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या निवडी स्वीकारल्या/नक्की केल्या आहेत त्यांना प्रत्यक्ष पडताळणीच्या तारखा कळवल्या जातील.

विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष पडताळणीनंतर त्यांचा डेटाबेस अद्ययावत करण्यासाठी नवीन सैनिक शाळांना रिअल टाईम आधारावर ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पर्यायाची  निवड नक्की केली आहे, त्यांची यादी दिसेल.  तसेच , निश्चित तारीख आणि वेळेनंतर जागा भरल्या नाहीत तर  पहिल्या  फेरी-I नंतर समुपदेशनाच्या दुसऱ्या फेरीद्वारे -II भरल्या जातील. ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरी-I मध्ये जागा स्वीकारल्या नाहीत/निवड निश्चित  केली नाही, त्यांना ई-समुपदेशनाच्या दुसऱ्या फेरीत -II उर्वरित जागा निवडण्याचा पर्याय दिला जाईल.

लाभ

 ई-समुपदेशनासाठी ही स्वयंचलित प्रणाली प्रवेश प्रक्रियेतील संपूर्ण पारदर्शकता सुनिश्चित करेल.  ही प्रक्रिया  सर्व हितसंबंधित शाळा, विद्यार्थी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासाठी कमी खर्चिक आणि वापरण्यास सानुकूल अशी असेल. यामुळे संपूर्ण प्रक्रियेचे रिअल-टाइम मॉनिटरिंग होईल आणि प्रत्येक टप्प्यावर आवश्यक कृती देखील करता येईल. 

चौथ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत दुहेरीत रोहन बोपन्ना व रामकुमार रामनाथन जोडीला विजेतेपद

0

पुणे, 6 फेब्रुवारी, 2022: चौथ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत दुहेरीत रोहन बोपन्ना व रामकुमार रामनाथन या भारतीय स्टार जोडीने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत या गटाचे विजेतेपद संपादन केले.   म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत दुहेरीत अंतिम फेरीत रोहन बोपन्ना व रामकुमार रामनाथन या भारतीय जोडीने लूक सॅव्हील व जॉन पॅट्रिक स्मिथ या ऑस्ट्रेलियन जोडीचा पराभव करून एटीपी स्पर्धेचे दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.  तर, रोहन बोपन्नाचे दुहेरीतील हे 21वे विजेतेपद असून पुण्यातील स्पर्धेतील त्याचे हे दुसरे विजेतेपद आहे. याआधी 2019मध्ये रोहन याने दिवीज शरणच्या साथीत विजेतेपद विजेतेपद पटकावले होते. दक्षिण आशियातील एकमेव एटीपी 250 स्पर्धा असलेल्या या चौथ्या मालिकेचे आयोजन महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या वतीने करण्यात आले आहे. 
रोहन व रामकुमार या भारतीय जोडीने वर्षाची सुरुवात चांगली करताना जानेवारी मध्ये ऍडलेड येथे पहिले विजेतेपद मिळवले होते. सामन्यात या जोडीने अव्वल मानांकित जोडीविरुद्ध सुरेख खेळ करताना 5-4 अशी आघाडी घेतली. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियन जोडीने कमबॅक करत बरोबरी साधली व हा सेट टायब्रेकमध्ये गेला. आपल्या पहिल्या विजेतेपदाच्या शोधात असलेल्या या ऑस्ट्रेलियन जोडीने पहिला सेट तासाभरात जिंकून आघाडी मिळवली.   अनुभवी खेळाडू रोहन बोपन्ना व युवा खेळाडू रामकुमार यांनी कडवी झुंज देत दुसऱ्या सेटमध्ये 4-2 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये आपली आघाडी कायम ठेवत रोहन व रामकुमार यांनी हा सेट जिंकून बरोबरी साधली. त्यानंतर सूपर टायब्रेकमध्ये रोहन व रामकुमार यांनी सुरेख खेळ करत हा सेट जिंकून विजय मिळवला.हि प्रतिष्ठेची स्पर्धा आयएमजी यांच्या मालकी ची असून राईज वर्ल्डवाईड इन इंडिया यांनी संचालित केली आहे.  
स्पर्धेचे पारितोषिक वितरण राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार, टाटा मोटर्सचे उपाध्यक्ष मोहन सावरकर, एआयटीएचे मानद सचिव अनिल धुपर, एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा, स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. 

दुहेरी गट: अंतिम फेरी: रोहन बोपन्ना/रामकुमार रामनाथन(भारत)वि.वि.लूक सॅव्हील/जॉन पॅट्रिक स्मिथ(ऑस्ट्रेलिया)6-7 (10-12), 6-3, 10-6  

पाऊस आणि लता मंगेशकर यांचे गाणे-स्वर लतेचा पाऊस…!!

0

डिसेंबर महिना सुरु होता, गारवा संपून थोडे दिवस झाले होते… वातावरणात ऊन सावल्याचा खेळ सुरु होता. त्या दिवशी तारीख होती 4 डिसेंबर 1976, लातूर जिल्ह्यातील कर्नाटक सीमेला लागून असलेल्या औराद ( शहाजानी ) या वैचारिक पुढारपण असलेल्या गावात 1972 ला गावातल्या खाऊन पिऊन सुखी असलेल्या लोकांनी शारदोपासक शिक्षण प्रसारक शिक्षण संस्थेच्या वतीने महाविद्यालय सुरु करण्याचा विचार केला. त्यावेळी देशभरात एक स्वर्गीय स्वर घराघरातले कान रेडीओच्या माध्यमातून तृप्त करत होते. त्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर, सर्वानुमते लता मंगेशकर यांच्या वडिलांचे नाव “मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय ” हे ठेवण्याचे निश्चित केले. महाविद्यालय इमारतीच्या भूमिपूजन सोहळा 1972 ला झाला. पुढे चार वर्षात ही इमारत तयार झाली. 1974 ला मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयाचे दुसरे प्राचार्य म्हणून सदाविजय आर्य आले. सदाविजय आर्य यांचे वडील बन्सीलाल आणि काका शामलाल आर्य यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात खूप मोठे काम होते. तसे सामाजिक भान असलेले सदाविजय आर्य प्राचार्य म्हणून आले होते.

मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयाची इमारत बांधून पूर्ण झाली. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते,स्व.शंकरराव चव्हाण.. ते उदघाटन कार्यक्रमाला येणार हे निश्चित झाले.लता मंगेशकर यांना या कार्यक्रमाला निमंत्रण देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाला त्यांनी येण्याचे कबूल केले पण आपण गाण म्हणणार नसल्याचे सांगितले. त्या प्रमाणे कार्यक्रमाचे नियोजन झाले. ठरल्या प्रमाणे चार डिसेंबर 1976 या दिवशी कार्यक्रमाला सुरुवात झाली. साक्षात स्वर्गीय आवाजाची देणगी लाभलेल्या आणि संपूर्ण देशात हा स्वर म्हणजे सरस्वती म्हणून पूजला आणि भजला जात होता, त्या गाणकोकिळेला बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी खूप खूप लांबून लांबून लोकं आली होती… जवळ पास सव्वा लाख लोकं त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. मंचावर तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आणि लता मंगेशकर होत्या… प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य सदाविजय आर्य यांनी केले, प्राचार्य प्रास्ताविक संपवून मागे वळतायत तितक्यात अचानक पावसाची सर आली… लोकं उठायला लागली आणि प्राचार्यांनी तिथल्या तिथे वेळेचे गांभीर्य ओळखून म्हणाले ” हा पाऊस स्वर्ग लोकातून लता मंगेशकरांचे स्वागत करायला पाठवला आहे, जागेवरून कोणीही उठू नये, लता मंगेशकर यांचे गाणे ऐकायचे नाही का? लोकांनीही एकच गलका केला, आणि गाणं म्हणणार नाही असं म्हणून आमंत्रण स्विकारलेल्या लता दीदींनी… त्यांच्या भाषणाच्या वेळी गाणं सुरु केलं ते गाणे होते संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ओवीचे ” मोगरा फुलला, मोगरा फुलला

फुलें वेचिता बहरू कळियांसी आला” आणि सव्वा लाख लोकं पावसाची सर विसरून मंत्रमुग्ध झाले.पुन्हा एकदा गाण्याच्या कार्यक्रमासाठी लता मंगेशकर आल्या, असा दोन वेळा त्यांचा सहवास लाभला अशी ही सगळी माहिती प्राचार्य सदाविजय आर्य मला सांगत होते… आणि माझ्या डोळ्या समोर हे सगळे काल्पनिक चित्र उभे राहिले.

मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय संगीत विषय शिकविणारे राज्यातले पहिले महाविद्यालय ठरले

प्राचार्य सदाविजय आर्य सांगत होते, मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय, लता, आशा, हृदयनाथ या सारख्या ज्यांच्या रक्तात संगीत असलेल्या व्यक्तींच्या वडिलांच्या नावाने आहे, त्यामुळे आम्ही बारावी मध्ये चार ऐच्छीक विषय घेऊन शिकता येत होते, असे करणारे आम्ही राज्यातले पहिले महाविद्यालय ठरलो ज्यांनी संगीत हा विषय आणला… त्यावेळी राज्याच्या संचालक चित्रा नाईक होत्या.. औरंगाबाद त्यांनी मराठवाड्यातील समस्या बद्दल बैठक ठेवली.. खूप महिन्या पासून प्रलंबित असलेला प्रश्न बैठकीच्या सुरुवातीला मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयाचे प्राचार्य कुठे आहेत म्हणून विचारणा केली आणि तो प्रश्न तिथल्या तिथे सोडविला.

लातूर जिल्ह्याला खूप मोठा इतिहास आहे. त्या इतिहासातील भारतरत्न लता मंगेशकर यांचा दोन वेळा लाभलेला सहवास आणि पावसात गाणे सुरु केल्या नंतर मंत्रमुग्ध झालेली सव्वा लाख लोक हे सगळा स्वर्ण इतिहास ज्यांच्या डोळ्यात साठवून राहिला आहे ते प्राचार्य सदाविजय आर्य हे मला सगळे सांगत होते.

या संस्मरणीय प्रवासाचा शेवट आज 6 फेब्रुवारी 2022  रोजी वसंत ऋतुच्या सुरुवातीला झाला… या ओळीने त्यांना शब्द सुमन वाहतो

आता विसाव्याचे क्षण

माझे सोनियाचे मणी

सुखे ओवीत ओवीत

त्याची ओढतो स्मरणी

भारत रत्न लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.. 

@युवराज पाटील

जिल्हा माहिती अधिकारी, लातूर

“मला मारहाण केल्याप्रकरणी शहराध्यक्षासह ‘या’ ८ शिवसेना नेत्यांना अटक होणार”, किरीट सोमय्यांचं ट्वीट

पुणे-काल शनिवारी (५ फेब्रुवारी) पुणे महानगरपालिका परिसरात शिवसैनिकांकडून झालेल्या हल्ल्यानंतर शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. तसेच ट्वीट करत पुण्याचे शिवसेना शहराध्यक्ष संजय मोरेंसह ८ शिवसेना नेत्यांना अटक होणार असल्याचा दावा केलाय. आपल्या या ट्वीटमध्ये किरीट सोमय्या यांनी शिवसैनिकांवर दाखल गुन्ह्यातील कोणती कलमं लावण्यात आली याचीही माहिती दिली.

किरीट सोमय्या म्हणाले, “मला मारहाण केल्याप्रकरणी पुणे अध्यक्ष संजय मोरे यांच्यासह ८ शिवसेना नेत्यांना पोलीस अटक करणार आहेत. FIR एफआयआर क्रमांक ००१२ आयपीसी कलम १४३, १४७, १४९, ३४१, ३३६, ३३७, ३२३, ५०४, ३७(१), १३५”किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्वीटमध्ये एफआयआरची कॉपी देखील पोस्ट केलीय. यात शिवसेनेच्या ८ स्थानिककार्यकर्त्यांच्या नावांचाही उल्लेख आहे.

एफआयआरमधील ८ शिवसेना नेत्यांची नावं खालीलप्रमाणे,

१. संजय मोरे (शिवसेना पुणे शहराध्यक्ष)
२. चंदन साळुंके (पदाधिकारी)
३. किरण साळी
४. सुरज लोखंडे
५. आकाश शिंदे
६. रुपेश पवार
७. राजेंद्र शिंदे
८. सनि गवते

दरम्यान तत्पूर्वी आणखी एक ट्वीट किरीट सोमैय्या यांनी सकाळी संचेती हॉस्पिटल मधून बाहेर पडतानाचे फोटो टाकून केले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे ,’ पुण्यातील संचेती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला पुणे महापालिकेत जाऊन संजय राऊत कौटुंबिक भागीदार सुजीत पाटकर लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरुद्ध कोविड सेंटर्स घोटाळ्यांबाबत तक्रार दाखल केली माफिया सेना मला ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश करण्यापासून रोखू शकत नाही.

स्वरयुगाचा अंत ..गहिवरला देश ..

0

लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी दिला अग्नी

मुंबई, 6 फेब्रुवारी 2022

भारतरत्न लता मंगेशकर यांनी आज सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतल्यानंतर, संध्याकाळी शिवाजी पार्क, मुंबई येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे बंधू ह्रदयनाथ मंगेशकर यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला.

सूरांची अनमोल देण लाभलेल्या लता मंगेशकर यांची गानकोकिळा अशी ओळख होती. 8 जानेवारी रोजी कोविड-19 संसर्गाची बाधा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई येथे येऊन लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले, तसेच पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधानांनी आशा भोसले यांच्यासह मंगेशकर कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

तत्पूर्वी सकाळी निधनवार्ता जाहीर केल्यानंतर, पंतप्रधानांनी ट्वीट संदेशातून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. आपल्या शोकसंदेशात पंतप्रधान म्हणाले, लतादिदींसोबतचा संवाद कधीही विसरता न येण्याजोगा आहे. त्यांच्या गाण्यांमध्ये सर्व प्रकारच्या भाव-भावनांचे प्रतिबिंब होते. त्यांनी भारतीय चित्रपट जगतातील स्थित्यंरे अगदी जवळून अनुभवली.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, खासदार शरद पवार, क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर, गायक शंकर महादेवन, अभिनेता शाहरुख खान यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांसह सामान्य नागरिकांची लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती होती.

सरकारने भारतरत्न लता मंगेशकर यांच्या सन्मानार्थ दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. राष्ट्रध्वज दोन दिवस अर्ध्यावर राहिल.

लता मंगेशकर यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. वेंकैय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, अनुराग ठाकूर यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

लता मंगेशकर यांच्या निधनावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रपती टवीट संदेशात म्हणाले,“लताजींचे निधन जगभरातील लाखो नागरिकांप्रमाणेच माझ्यासाठी हृदयद्रावक आहे. त्यांची असंख्य गीते भारताचे सार आणि सौंदर्य प्रस्तुत करतात, कैक पिढ्यांना आपल्या भावनांचे प्रतिबिंब त्यात आढळते. भारतरत्न लताजींची कामगिरी अतुलनीय राहिल”.

लतादीदी खऱ्या संगीत रत्न होत्या, असे उपराष्ट्रपती एम. वेंकैय्या नायडू म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “लता दीदींकडून नेहमीच अपार स्नेह मिळाला, हा मी माझा सन्मान समजतो. त्यांच्याशी झालेला संवाद अविस्मरणीय राहिल, असे पंतप्रधान शोकसंदेशात म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लता मंगेशकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “संगीत जगतातील त्यांचे योगदान शब्दांपलीकडले आहे. त्यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी आहे”.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. तसेच कुटुंबियांचे सांत्वन केले. ते आपल्या शोक संदेशात म्हणाले, “लतादिदी नेहमी आपणा सर्वांसाठी प्रेरणास्थान राहतील. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनीही ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या सूरांनी लोकांच्या ह्रदयावर राज्य केले. आज त्या आपल्यामध्ये नाहीत, मात्र, त्यांचा सूर अमर आहे, तो नेहमी गुंजेल, असे पीयूष गोयल आपल्या शोकसंदेशात म्हणाले.

केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी लतादिदींचे निधन म्हणजे कधीही न भरुन येणारी हानी असल्याचे म्हटले आहे. त्यांचे निधन हे प्रत्येक नागरिकांसाठी वैयक्तिक नूकसान असल्याचे अनुराग ठाकूर म्हणाले.

केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे (सीबीएफसी) अध्यक्ष, गीतकार आणि कवी प्रसून जोशी यांनी लता मंगेशकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.

भारतीय चित्रपट सृष्टीतील युगप्रवर्तक आणि सर्वश्रेष्ठ पार्श्वगायिका असा लौकिक मिळवलेल्या लता मंगेशकर यांना वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या कलेचा वारसा लाभला होता. बालवयातच त्यांनी संगीत नाटकात भूमिका केल्या.

मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्याप्रमाणेच ‘भेंडीबाजारवाले’ खाँसाहेब अमानअली आणि देवासच्या रजबअली घराण्याचे अमानतखाँ हे लता मंगेशकर यांचे शास्त्रीय संगीतातील प्रमुख गुरू होत. लता मंगेशकर वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी ‘किती हसाल’ या मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले होते, तर ‘पहिली मंगळागौर’ (1942) या चित्रपटामध्ये त्यांनी अभिनयही केला होता. 1946 साली वसंत जोगळेकर यांच्या संगीत दिग्दर्शनात त्यांनी आप की सेवा में या पहिल्या हिंदी चित्रपटासाठी गीत गायले. लता मंगेशकर यांनी 22 भाषांमधील, 1800 पेक्षाही अधिक चित्रपटांमधून 25 ते 30 हजार गाणी गायली आहेत. सर्व प्रकारच्या जागतिक विक्रमांची नोंद करणाऱ्या गिनीज् बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये ’जगातील सर्वांत जास्त गाणी ध्वनिमुद्रित करणारी गायिका’ असान त्यांचा गौरवास्पद उल्लेख आहे.

सरकारने लता मंगेशकर यांना 1987 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवले, तर 2001 साली त्यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला. लता मंगेशकर यांना तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच त्यांना ‘लिजन ऑफ ऑनर’ हा फ्रान्सचा पुरस्कारही प्राप्त आहे. सर्वोत्कृष्ठ गायिका म्हणून लता मंगेशकर यांना चार फिल्मफेर, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार प्राप्त आहे. 1984 मध्ये मध्य प्रदेश सरकारने त्यांच्या सन्मानार्थ पुरस्कार जाहीर केला, तर महाराष्ट्र शासनाने 1992 मध्ये संगीत क्षेत्रातील प्रतिभावानांना लता मंगेशकर पुरस्काराने जाहीर करण्याचा निर्णय घेतला.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. तसेच कुटुंबियांचे सांत्वन केले. ते आपल्या शोक संदेशात म्हणाले, “लतादिदी नेहमी आपणा सर्वांसाठी प्रेरणास्थान राहतील. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनीही ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या सूरांनी लोकांच्या ह्रदयावर राज्य केले. आज त्या आपल्यामध्ये नाहीत, मात्र, त्यांचा सूर अमर आहे, तो नेहमी  गुंजेल, असे पीयूष गोयल आपल्या शोकसंदेशात म्हणाले.

केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी लतादिदींचे निधन म्हणजे कधीही न भरुन येणारी हानी असल्याचे म्हटले आहे. त्यांचे निधन हे प्रत्येक नागरिकांसाठी वैयक्तिक नूकसान असल्याचे अनुराग ठाकूर म्हणाले.

केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे (सीबीएफसी) अध्यक्ष, गीतकार आणि कवी प्रसून जोशी यांनी लता मंगेशकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.

भारतीय चित्रपट सृष्टीतील युगप्रवर्तक आणि सर्वश्रेष्ठ पार्श्वगायिका असा लौकिक मिळवलेल्या लता मंगेशकर यांना वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या कलेचा वारसा लाभला होता. बालवयातच त्यांनी संगीत नाटकात भूमिका केल्या.

मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्याप्रमाणेच ‘भेंडीबाजारवाले’ खाँसाहेब अमानअली आणि देवासच्या रजबअली घराण्याचे अमानतखाँ हे लता मंगेशकर यांचे शास्त्रीय संगीतातील प्रमुख गुरू होत. लता मंगेशकर वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी ‘किती हसाल’ या मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले होते, तर ‘पहिली मंगळागौर’ (1942) या चित्रपटामध्ये त्यांनी अभिनयही केला होता. 1946 साली वसंत जोगळेकर यांच्या संगीत दिग्दर्शनात त्यांनी आप की सेवा में या पहिल्या हिंदी चित्रपटासाठी गीत गायले. लता मंगेशकर यांनी 22 भाषांमधील, 1800 पेक्षाही अधिक चित्रपटांमधून 25 ते 30 हजार गाणी गायली आहेत. सर्व प्रकारच्या जागतिक विक्रमांची नोंद करणाऱ्या गिनीज् बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये ’जगातील सर्वांत जास्त गाणी ध्वनिमुद्रित करणारी गायिका’ असान त्यांचा गौरवास्पद उल्लेख आहे.

सरकारने लता मंगेशकर यांना 1987 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवले, तर 2001 साली त्यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला. लता मंगेशकर यांना तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच त्यांना ‘लिजन ऑफ ऑनर’ हा फ्रान्सचा पुरस्कारही प्राप्त आहे.  सर्वोत्कृष्ठ गायिका म्हणून लता मंगेशकर यांना चार फिल्मफेर, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार प्राप्त आहे. 1984 मध्ये मध्य प्रदेश सरकारने त्यांच्या सन्मानार्थ पुरस्कार जाहीर केला, तर महाराष्ट्र शासनाने 1992 मध्ये संगीत क्षेत्रातील प्रतिभावानांना लता मंगेशकर पुरस्काराने जाहीर करण्याचा निर्णय घेतला.

लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पीएम मोदी शिवाजी पार्कवर दाखल

0

मुंबई-लता दीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी पार्कवर दाखल झाले आहेत. त्यांच्यासह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे हेदेखील पोहोचले आहेत.

दीदींच्या पार्थिवासोबत आशा भोसले आणि उषा मंगेशकर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सचिन तेंडुलकर, शरद पवार, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, राज ठाकरे, पियुष गोयल, छगन भुजबळ यावेळी तिथे उपस्थित आहेत. पद्मिनी कोल्हापुरे, श्रद्धा कपूर दीदींच्या अंत्यविधीला उपस्थित आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पचक्र अर्पण करून वाहिली श्रद्धांजली.

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेताना सचिन तेंडूलकर.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लता दीदींना वाहिली श्रद्धांजली.

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

0

मुंबई दि. ६ : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

लतादीदींच पार्थिव शिवाजी पार्कवर दाखल, मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवर उपस्थित, थोड्याच वेळात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

0
  • संध्याकाळी साडे सहा वाजता शिवाजी पार्कवर होतील अंत्यसंस्कार
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार
  • 2001 साली लता मंगेशकर यांना ‘भारतरत्‍न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 93 व्या वर्षी गानकोकिळेने या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे. त्यांचे पार्थिव आता त्यांच्या प्रभूकुंज निवासस्थानावरुन शिवाजी पार्कवर आणण्यात आले आहे. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यामुळे त्यांच्या पार्थिवावर भारतीय ध्वज ठेवण्यात आला आहे. प्रभूकुंजबाहेर फुलांनी सजवण्यात आलेल्या ट्रकमधून दीदींचे पार्थिव शिवाजी पार्कवर आणण्यात आले . दीदींच्या पार्थिवासोबत आशा भोसले आणि उषा मंगेशकर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, राज ठाकरे, पियुष गोयल यावेळी तिथे उपस्थित आहेत.

जिथून जिथून दीदींची अंत्ययात्रा गेली, तिथे रस्त्याच्या दुतर्फा दीदींच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमा झालेली दिसली.

  • स्वरकोकिळा यांच्या निधनाची बातमी मिळताच पंतप्रधान मोदींनी गोव्यातील त्यांची व्हर्च्युअल रॅली रद्द केली आहे.
  • भाजपने उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे.
  • महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर पोहोचून अंत्यसंस्काराच्या व्यवस्थेचा आढावा घेतला.
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर लताजींच्या अंत्यदर्शनासाठी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये पोहोचले

संध्याकाळी साडे सहा वाजता शासकीय इतमामात शिवाजी पार्कवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विद्युत दाहिनीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. लता दीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. दुपारी 4.30 वाजता ते मुंबईत दाखल होणार आहेत.

त्यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी रुग्णालयात जाऊन त्यांचे अंत्यंदर्शन घेतले आहे.

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा

0

मुंबई-भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. ९२ वर्षीय लता मंगेशकर यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना ८ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. लता मंगेशकर यांचा जन्म २९ सप्टेंबर १९२९ रोजी झाला. लता मंगेशकर यांनी त्यांच्या हयातीत अनेक संगीतकारांसोबत काम केले आहे.

राष्ट्रीय दुखवटा जाहीर करताना त्या व्यक्तीचे सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि योगदान लक्षात घेऊन सरकार याविषयी निर्णय घेत असतं. त्यामुळेच लता मंगेशकर यांच्या निधनानंतर दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी व्यक्त केला शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहताना म्हणाले की, ‘लता मंगेशकर यांच्या निधानामुळे झालेले दुःख हे शब्दांच्याही पलिकडचे आहे. लता दिदी आपल्याला सोडून गेल्या आहेत. त्यांच्या जाण्यामुळे देशामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती भरुन काढता येणे शक्य नाही. येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्या कायम स्मरणात राहतील. लता मंगशकर यांच्या आवाजामध्ये लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अशी क्षमता होती.’ 

शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली

गृहमंत्री अमित शाहांचे ट्विट

लता मंगेशकर यांचे पार्थिव प्रभूकुंजवर; मुख्यमंत्र्यांसह अनेकांनी घेतले अंत्यदर्शन, अंत्यविधीला पीएम मोदींची राहणार उपस्थिती

0

मुंबई- पार्थिव ब्रीच कँडी रुग्णालयातून प्रभूकुंज या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. येथे काही काळ त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. दीदींच्या घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,अमिताभ बच्चन हे देखील प्रभूकुंजवर हजर आहेत. सचिन तेंडुलकर, आशा पारेख, सुरेश वाडकर, जावेद अख्तर, अनुपम खेर यांसह अनेक मान्यवर दीदींच्या अंत्यदर्शनासाठी प्रभूकुंज येथे उपस्थित आहेत. दीदींचे निवासस्थान असलेला पेडर रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.गानसाम्राझी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच राज्यपाल भगत सिंग कोश्यारी तातडीने मुंबईला रवाना झाले. आपल्या नियोजित दुपारच्या वेळेत बदल करत पावणे बारा वाजता त्यांनी मुंबईकडे प्रयाण केले.राज्यपाल गेल्या 4 फेब्रुवारीपासून राज्याच्या दौऱ्यावर होते. आज 6 फेबुवारीला नियोजित 3 वाजता ते मुंबईला प्रयाण करणार होते.  तथापि, लतादीदींच्या निधनाची दु:खद बातमी ऐकल्यानंतर त्यांनी आपल्या दौऱ्यामध्ये बदल करत पावणे बारा वाजता मुंबईकडे प्रयाण केले.

अपडेट्स

  • स्वरकोकिळा यांच्या निधनाची बातमी मिळताच पंतप्रधान मोदींनी गोव्यातील त्यांची व्हर्च्युअल रॅली रद्द केली आहे.
  • भाजपने उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे.
  • महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर पोहोचून अंत्यसंस्काराच्या व्यवस्थेचा आढावा घेतला.
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर लताजींच्या अंत्यदर्शनासाठी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये पोहोचले.

संध्याकाळी साडे सहा वाजता शासकीय इतमामात शिवाजी पार्कवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विद्युत दाहिनीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. लता दीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. दुपारी 4.30 वाजता ते मुंबईत दाखल होणार आहेत.

त्यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी रुग्णालयात

जाऊन त्यांचे अंत्यंदर्शन घेतले आहे.

स्वर युगाचा अंत झाला मातृतुल्य आशीर्वाद हरपला– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील, अशा शोकमग्न भावनांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात की, आपल्या लाडक्या लतादिदी आज आपल्यात नाहीयेत, हे सून्न करणारं आहे. पण त्या स्वरांनी, सुरेल गाण्यांनी, चिरपरिचित आवाजाने त्या अजरामर आहेत आणि राहतील. आपल्या आयुष्यातील जवळपास सर्वच प्रसंग,क्षण लतादिदींनी आपल्या सुमधुर सुरावटींनी जिवंत केले आहेत. त्यांच्या स्वरांनी मंगल क्षण सजले. दुःखद क्षणी याच स्वरांनी सगळ्यांच्या मनाचा ठाव घेतला. लढाई, संघर्षात याच स्वरांनी उर्मी,स्फुर्ती जागवली. जगाचा क्वचितच एखादा कोपरा असेल,जिथे त्यांचा स्वर पोचला नसेल, ऐकला गेला नसेल. भाषा, सीमा-प्रांत, वंश-धर्म असे अनेक बंध तोडून त्यांच्या स्वरांचाच एक प्रदेश, भवताल निर्माण झाला आहे.

ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबियांचे जुने स्नेहबंध आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे लतादीदी, हृदयनाथ, आशाताई यांच्यासह सर्वांशीच जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. त्या निष्णात छायाचित्रकार होत्या. उत्तम कॅमेरे, वेगवेगळ्या लेन्सेस यांचा त्यांचा अभ्यास होता. त्यांच्याशी मध्यंतरी कधीमधी फोटोग्राफी, कॅमेरे याबाबत चर्चा व्हायची. माझ्या दोन्ही छायाचित्र संग्रहांविषयी त्यांनी आवर्जून दाद दिली होती. काही निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी, काही कारणांनी चौकशी करण्यासाठी, त्यांचा फोन येत असे. मध्यंतरी मी रुग्णालयात असतांना त्या सातत्याने माझी विचारपूस करून आशीर्वाद देत असत. त्यांचा तो आपुलकीचा सुमधुर स्वर आता पुन्हा कानी पडणार नाही. त्यांचा तो स्वर हे आमच्यासाठी परमसौख्य होते. हे सौख्य नियतीने हिरावून घेतले आहे. ही त्यांची उणीव जाणवत राहील.

लतादिदींचे जाणे केवळ मंगेशकर कुटुंबियांवरच नव्हे तर त्यांच्या करोडो रसिक चाहत्यांवर आघात आहे. कुणी कुणाचं सांत्वन करायचं?

संगीताचा भावस्पर्शी स्वर हरपला – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

आपले स्वरमाधुर्य आणि गानप्रतिभेने संपूर्ण विश्वाला मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन अत्यंत वेदनानदायी आहे. भारतीय संगीताचा भावस्पर्शी स्वर आज हरपला आहे.अशा शब्दात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शोक व्यक्त केला आहे.

लतादीदींच्या तजेलदार, भावमयी आवाजाच्या आनंदघनामध्ये रसिकांच्या पिढ्यानपिढ्या सुरात न्हाऊन निघाल्या आणि यापुढेही हा सूर भारतीय संगीतात अढळ राहील. गानसरस्वती लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली.

नितीन गडकरी – संगीत क्षेत्राची मोठी हानी
आपल्या भावना व्यक्त करताना नितीन गडकरी म्हणाले – लता मंगेशकर या देशाचा अभिमान होता. त्यांनी संपूर्ण विश्वात देशाचे नाव मोठे केले होते. लता मंगेशकर हे जगातील सातवे आश्चर्य आहे, असे म्हटले जाते. त्यांचा आवाज आपण कधीही विसरु शकत नाही. वयाच्या 60 ते 70 व्या वर्षी त्यांचा आवाज हा 20 वर्षांच्या तरुणीप्रमाणे होता. त्यांचे जाणे एक मोठा आघात आहे. आमचा एक मोठा आधार गेला आहे. अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गाऊन विश्वात एक रेकॉर्ड निर्माण केला. माझे त्यांच्या कुटुंबाशी खूप घनिष्ठ नाते होते. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. संपूर्ण देशाला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या जाणे संपूर्ण देशासाठी मोठा आघात आहे. मला खूप दुःख आहे, आजच मुंबईत आलो आणि सकाळीच मी दुःखद बातमी मिळाली. लता दीदींचे जाणे आपल्या सगळ्यांच्या जीवनाला मोठा धक्का आहे.

लतादिदींच्या जाण्यामुळे भारताचे वैभव हरपले…  कि. बा. तथा अण्णा हजारे

लतादिदींच्या जाण्यामुळे भारताचे सर्वात मोठे वैभव काळाच्या पडद्याआड गेले आहे. अशी गायिका पुन्हा होईल असे वाटत नाही. गाणारे लोक अनेक आहेत पण लतादिदींसारखा आवाज, गाण्यातील भाव आणि संदेश हे दुर्मिळ आहे. भारतातील सर्व भाषांमधून गाणी गाणाऱ्या त्या एकमेव गायिका असाव्यात. त्यांनी गायिलेली भक्तीगीते, भावगीते व देशभक्तीपर गीते ही सामान्य माणसांना आनंद आणि प्रेरणा देणारी होती. वेगवेगळ्या क्षेत्रात कष्ट करणाऱ्या श्रमिकांनी थकल्यानंतर लतादिदींचे गाणे ऐकले किंवा त्यांचा आवाज कानावर पडला की, क्षणात श्रमपरिहार होत असे.

            लतादिदींचा आणि माझा अनेक वेळा भेटण्याचा प्रसंग आला. त्यांच्या हस्ते मिळालेला जीवन गौरव पुरस्कार हा जीवनातील सर्वाधिक आनंदाचा क्षण होता. पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार मिळाला तेव्हाही एवढा आनंद झाला नसेल. त्यांनी गायिलेले ‘ए मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी, जो शहिद हुए हैं उनकी, जरा याद करो कुर्बानी’ हे गीत विसरणे कदापि शक्य नाही. हे गीत ऐकताना पंतप्रधानांच्या आणि उपस्थितांच्याही डोळ्यात पाणी आले होते. आजही ते गीत ऐकताना डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. हे गाणे ऐकून लाखो लोकांच्या मनात देशभक्तीची प्रेरणा जागृत होते.

            भगवतगीतेत श्रीकृष्णाने म्हटल्याप्रमाणे ‘अंतःकाळी जो माझे नामस्मरण करतो त्याचा पवित्र आत्मा मलाच येऊन मिळतो’ याप्रमाणे लतादिदींना चिरशांती मिळालेलीच आहे यात शंका नाही. लतादिदींना भावपूर्ण श्रद्धांजली.

“भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्वरात ईश्वराला जागवण्याची व तान्हुल्यांना निजवण्याची जादू होती”- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी महान पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन ही देशातील प्रत्येक कुटुंबाकरिता दुःखद बातमी आहे.  हा दिवस अटळ आहे हे माहिती असून देखील हा दिवस येऊच नये असे वाटत होते.भारतरत्न लता मंगेशकर यांचे संगीत देश, भाषा व काळ यांच्या सीमा उल्लंघून थेट अंतरात्म्याला जागवणारे होते.

आपल्या भावगीतांनी ईश्वराला जागविण्याची, प्रेमगीतांनी तरुणाईला खुलवण्याची, देशभक्तीपर गीतांनी जवानांना स्फुरण देण्याची तर प्रेमळ अंगाई गीतांनी तान्हुल्यांना निजविण्याची अद्भुत जादू त्यांच्या स्वरात होती.अभिजात भारतीय संगीत सुलभ करून लतादीदींनी ते समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचविले. आपल्या दैवी स्वरांनी त्यांनी असंख्य जनसामान्य, शेतकरी तसेच  कष्टकरी लोकांना सकारात्मक जीवन जगण्याची नित्यनवी उमेद, ऊर्जा व उत्साह दिला.लतादीदी या तब्बल आठ दशके भारतीय चित्रपट सृष्टीची ओळख होत्या.  चित्रपट व संगीत सृष्टीच्या सुवर्ण काळातील साक्षात हिरकणी होत्या.

भारतरत्न लतादीदी महाराष्ट्राच्या कन्या होत्या याचा संपूर्ण महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. त्या आपल्या जीवनकाळात झाल्या हे आपले सद्भाग्य होते.लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संगीत विश्वातील देव्हारा रिकामा झाला आहे. त्यांचा दैवी स्वरदीप मात्र मनामनात तेवतच राहील.या दुःखद प्रसंगी संपूर्ण राज्याच्या वतीने लतादीदींना आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना आशाताई, उषाताई, मीनाताई, पं. हृदयनाथ तसेच संपूर्ण मंगेशकर कुटुंबियांना कळवतो.

लतादीदींच्या देशविदेशातील करोडो चाहत्यांना देखील आपल्या शोकसंवेदना कळवतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

भारतीय संगीताचं अपरिमित नुकसान – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने भारतीय संगीताचं अपरिमित नुकसान झाले, या शब्दात  जगद्विख्यात पार्श्वगायिका लता मंगेशकर यांना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

श्री. थोरात आपल्या शोकसंदेशात म्हणतात, भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. त्यांनी आजीवन संगीताची साधना केली. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले आहे. 2001 साली लता मंगेशकर यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांना 1989 मध्ये ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देखील प्रदान करण्यात आला होता. संगीत क्षेत्रात भारताचे नाव वेगळ्या उंचीवर नेण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. संगीत साधनेतून जगभरात त्यांनी निर्माण केलेली कीर्ती त्यांच्या चाहत्यांच्या मनात कायम राहिल. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रात पोकळी निर्माण झाली असून संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

 संगीताचा आवाज लोपला- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

 गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे आज संगीताचे सूर हरपले असून संगीताचा आवाज लोपला आहे, त्यामुळे प्रत्येक चाहता आज नि:शब्द आहे, या शब्दांत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

तीन पिढ्यांशी समरस झालेल्या लतादीदी या ईश्वराची देण होत्या, त्या पुन्हा होणे नाही. “मेरी आवाज ही पहचान है”, हे त्यांचे शब्द अजरामर ठरणार आहेत. संगीत क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या लतादीदींच्या जाण्याने देशाची मोठी हानी झाली आहे असे सांगून मंत्री अशोक चव्हाण यांनी लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 एका सुरेल युगाचा अंत – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या दु:खद निधनामुळे पार्श्वगायन आणि संगीत क्षेत्रातील एका सुरेल युगाचा अंत झाल्याची शोकसंवेदना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे.

लतादीदींनी संगीत क्षेत्रातील आपल्या ७८ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये एकाहून एक सरस अशी तब्बल २५ हजार अजरामर गाणी गायिली. केवळ मराठी वा हिंदीच  नव्हे तर जवळपास सर्वच प्रमुख भारतीय भाषांमध्ये त्यांनी गायन करून कोट्यवधी रसिकांना अलौकिक   स्वरानंद दिला!

‘ए मेरे वतन के लोगो..जरा आँख मे भर लो पाणी..हे त्यांचे सुमधूर गाणे ऐकून आजही देशवासियांच्या हृदयात राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग पेटते.

लतादीदींनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर हे गाणे गायिले असता नेहरूजींच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. लतादीदींच्या निधनामुळे संगीत क्षेत्राची अपरिमीत हानी झाली असून जगभरातील त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दिवंगत लतादीदींना माझी विनम्र श्रद्धांजली अर्पण करीत  असून आपल्या अजरामर गाण्यांमधून लतादीदी रसिकांच्या हृदयात कायमच राहतील, अशा शब्दात डॉ. नितीन राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन

0

मुंबई : स्वरसम्राज्ञी, गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले.त्या 92 वर्षांच्या होत्या. सकाळी 8.12 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लतादीदींची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते.लता मंगेशकर यांची बहीण आशा भोसले, भाऊ हृदयनाथ, रश्मी उध्दव ठाकरे, सुप्रिया सुळे, मधुर भांडारकर, भाजपचे नेते मंगल प्रभात लोढा आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह त्यांच्या प्रक्रुतीची विचारपूर्वक करण्यासाठी सायंकाळपासून अनेक नामवंतांची रिघ लागली आहे.

पार्श्वगायिका लता मंगेशकर उर्फ ‘दीदी’ (वय 92) यांची प्रकृती शनिवारी दुपारी बिघडली. त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. लता मंगेशकर यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर जानेवारीच्या सुरुवातीपासून मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत.मंगेशकर आजही मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग, आयसीयूमध्ये उपचार घेत असून आठ दिवसांपूर्वी व्हेंटिलेटर काढण्यात आला. 8 जानेवारी रोजी त्यांना या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 27 जानेवारी रोजी सुधारणा दिसून आल्याने त्यांचा व्हेंटिलेटर काढून टाकण्यात आला होता.लता मंगेशकर यांचे आज सकाळी ८.१२ मिनिटांनी निधन झाले. त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्या बऱ्याही झाल्या होत्या. मात्र त्यानंतर सर्व अवयव निकामी होत गेले. त्यानंतर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.

लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. लता, आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांमध्ये लतादीदी सर्वात मोठ्या. लता मंगेशकर यांचे मूळ नाव हेमा असे ठेवण्यात आले होते. पण काही वर्षांनंतर दिनानाथ यांच्या नाटकातील ‘लतिका’ या पात्राच्या नावावरुन त्यांनी लता नाव ठेवल्याचे म्हटले जाते.

लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये होती आणि त्यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. त्यांनी ९०० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती. तसेच २० पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले होते. लता मंगेशकर यांचे संपूर्ण कुटुंबच संगीतासाठी प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.

लता मंगेशकर यांच्या वडिलांची झाली होती दोन लग्ने
लता मंगेशकर यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांची दोन लग्ने झाली होती. दोन सख्ख्या गुजराती भगिनींसोबत दीनानाथ यांचे लग्न झाले होते. दीनानाथ मुळचे मराठी होते. त्यांचे पहिले लग्न 1922 मध्ये गुजरातच्या थलनेर (तापी नदीच्या किना-यावर वसलेले) गावातील नर्मदाबेनसोबत झाले होते. नर्मदाबेन यांचे वडील हरीदास त्याकाळातील गुजरातमधील मोठे जमीनदार होते. त्यांना नगरसेठ म्हणून ओळखले जायचे. त्याकाळात गुजराती तरुणीचे मराठी तरुणासोबत लग्न होणे, ही मोठी गोष्ट होती

लता नव्हे हेमा आहे मुळ नाव
लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदोरमध्ये झाला. त्यांचे पाळण्यातील नाव ‘हृदया’ असे ठेवण्यात आले होते, मात्र नंतर वडिलांनी ते बदलून लता असे केले. लता हे नाव दीनानाथ मंगेशकर यांनी त्यांच्या ‘भवनबंधन’ या नाटकातील लतिका या पात्रावरुन प्रेरणा घेऊन ठेवले होते. इतकेच नाही तर हे नाव दीनानाथ यांच्या पहिल्या पत्नी नर्मदाबेन यांच्या नावावरुन ठेवण्यात आल्याचेही म्हटले जाते. नर्मदा यांना त्यांच्या मातोश्री लतिका म्हणून हाक मारायच्या. जेव्हा लता यांचा जन्म झाला, तेव्हा लतिका यांच्या स्मरणार्थ त्यांचे नाव लतिका ठेवण्यात आले होते, जे पुढे लता झाले.