Home Blog Page 2086

संजय राऊत यांची पत्रकार परिषद ठरली फुसका बार – विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

0


मुंबई, दि. १५ फेब्रुवारी – आम्ही सकाळीच बोललो होतो, डोंगर पोखरून उंदीर निघणार. संजय राऊत यांची पत्रकार परिषद फुसका बार ठरणार. आपटी बार तरी बरा असतो तसे या पत्रकार परिषदेचे झाले. केवळ इवेंटबाजी करून काहीतरी मोठे चित्र उभे करण्याचा प्रयत्न केला. परंतु संजय राऊत तोंडावर पुरते आपटले, अशी जोरदार टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रचंड आज पत्रकार परिषद घेतली. त्यावर प्रविण दरेकर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, पत्रकार परिषदेत राऊत यांनी ईडीचे काही अधिकारी नावे, मुलीच्या लग्नाचे थातुरमातुर काहीतरी सांगितले. तुमच्या लग्नापर्यंत ते पोहोचले म्हणून राऊत यांनी सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मुलीच्या लग्नाचा विषय काढला. पण महाविकास आघाडी सरकारची अडीच वर्षे तुमच्या हातात होती ना? तुम्ही किरीट सोमय्या यांच्याविरोधात तक्रार का नाही केली. यापूर्वीच त्यांना जेलमध्येही का नाही टाकले असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.
उलट सोमय्या यांनीच पीएमसीचा बँकेचा घोटाळा बाहेर काढला. किरीट सोमय्या यांचा एक पैशाचा वशिला नाही. ते भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन कधीही तडजोड करत नाहीत. पण तुमचा तसा दावा असेल तर महाविकास आघाडीचे सरकार तुमचे आहे, गृह खातेही तुमचे आहे. तक्रार करा, चौकशी लावा, त्यांना अटक करा. पण तुमच्या आरोपातच शून्य तथ्य आहे अशी टिकाही दरेकर यांनी केली.
सत्तेतल्या पक्षाने मागणी करायची नसते. मागणी विरोधकांनी करायची असते. इथे सत्तेतला पक्ष विरोधी पक्षनेत्याच्या घरावर मोर्चा काढतो. सत्तेतला नेता विरोधी पक्षातल्या नेत्याला अटक करा, अशी मागणी करतो. याचा अर्थ सरकार तुमचे ऐकत नाही असा टोलाही दरेकर यांनी लगावला..
संजय राऊत आता थकले आहेत. एकहाती किल्ला त्यांनी लढवू अशी त्यांचा भ्रम होता. परंतु त्या भ्रमाचा भोपळा फुटला व म्हणून त्यांना सांगावे लागले की, ही शिवसेनेची पत्रकार परिषद आहे. म्हणून शिवसैनिकांना बालवावे लागले, त्यांना शक्तीप्रदर्शन करावे लागले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नव्हते, काही ठराविक आमदार, खासदार होते, मुंबईचे शिवसैनिक कुठे दिसले नाही. नाशिकवरून शिवसैनिकांना बोलवावे लागले अशी टिकाही त्यांनी केली.
केंद्रीय तपास यंत्रणा चुकीचे करतात असा तुमचा दावा असेल तर तुम्हाला न्यायालयात जाण्यापासून कोणी अडवले. आपल्याला चुकीचे वाटते तर ते न्यायालयात संबंधित दोषींविरुध्द आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी आपल्यावर असते. पण यांना फक्त इवेंटबाजी करायची आहे. भावनिक वातावरण निर्माण करायचे आहे. आपल्या अंगाशी आलेल्या प्रकरणावरुन जनतेचे लक्ष दुसरीकडे कसे वळवायचे याच्या पलीकडे त्यांच्या बोलण्यात काडीमात्र तथ्य नाही, असे दरेकर यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांची पत्रकार परिषद केवळ आरोपापुरती होती. सरकार स्थापन करण्यामध्ये मुख्य भूमिका संजय राऊत यांची होती हे सर्वश्रृत आहे. सत्तेसाठी शरद पवार साहेबांचे मन वळवणे, आपल्या पक्षाला त्यांच्या दावणीला बांधणे हे सगळे राऊत यांनी केले आहे. त्यामुळे राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना किंवा गृहमंत्र्यांना सांगितले तर तातडीने अंमलबजावणी होऊ शकते. मग मोहित कंबोजच्या विरोधात आरोप करण्यापेक्षा यापूर्वीच तक्रार वा गुन्हा का नोंद केला नाही. परंतु राऊत यांना तक्रार करायची नाही, सत्य तपासून पाहायचे नाही. फक्त ढोल पिटण्याची व विरोधकांना केवळ दुषणे देत बसणे हेच त्यांचे आता काम असल्याचेही दरेकर यांनी सांगितले.

पण राऊत कोविड सेंटर घोटाळ्यावर का बोलत नाहीत ? सोमैय्यांचा सवाल: म्हणाले , मी कोणत्याही चौकशीला तयार..

0

मुंबई-

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपावर आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्यांनी स्पष्ट केले.

ट्वीटच्या माध्यमातून किरीट सोमय्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावर आरोप करणारे संजय राऊत कोविड सेंटर घोटाळ्याबाबत का बोलत नाहीत असाही सवाल त्यांनी विचारला आहे.

काय म्हणाले किरीट सोमय्या?

2017 साली सामनातून अशाच प्रकारे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये माझी पत्नी प्रा डॉ. मेधा सोमय्या यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. आता माझ्या मुलाचे नाव घेतलं आहे. आतापर्यंत ठाकरे सरकारने माझ्याविरुद्ध 10 खटले दाखल केले आहेत तर अजून तीन तीन खटले पाइपलाइनमध्ये आहेत. मला त्यांची परिस्थिती समजते. मी आणखी एका प्रकरणाचे स्वागत करतो. आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. कोणत्याही भ्रष्ट व्यवहारात गुंतलेलो नाही

संजय राऊतांनी काय केले आरोप?

निल सोमय्या पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाईडच्या कंपनीत डायरेक्टर आहे. त्यानेच निकॉन फेज वन आणि टू असे प्रकल्प उभे केले आहेत. या सर्वांना पर्यावरणाच्या परवानग्या नाहीत. हरित लवादाने जर यावर अॅक्शन घेतली तर त्यावर कारवाई होऊ शकते. मी आदित्य ठाकरेंना आवाहन आवाहन करतो की, याची ताबडतोब चौकशी करून निल सोमय्या आणि किरीट सोमय्या यांना अटक करा. यासोबतच पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडच्या अकाऊंटमधून भाजपला 20 कोटींचा निधी गेला असल्याचा आरोप देखील राऊतांनी केला आहे.

पीएमसी घोटाळ्यातील मास्टरमाईंड राकेश वाधवान हा किरीट सोमय्या यांचा पार्टनर आहे. त्या राकेश वाधवान यांना भाजपला 20 कोटी रुपयांचा निधी दिला होता असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

https://twitter.com/KiritSomaiya/status/1493469515996225540/photo/1

खोदा पहाड निकला चूहा-भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांचा टोला

0

एखादा माणूस अडचणीत आला की, थयथयाट करतो, तसा प्रकार

पुणे-गेले काही दिवस फार मोठे काही तरी प्रकरण बाहेर काढणार असे वातावरण निर्माण करून शिवसेना खा. संजय राऊत यांची पत्रकार परिषद मुंबईत झाली पण खोदा पहाड निकला चूहा असे झाले. असे नुसते आरोप करण्याने काही होत नाही. पुरावे असतील तर तपासी यंत्रणांना द्या आणि त्यांनी काम केले नाही तर न्यायालयात जा. असल्या पोकळ धमक्यांना कोणी घाबरत नाही, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी केले.
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेविषयी एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता चंद्रकांतदादा पाटील बोलत होते. ते म्हणाले की, या पत्रकार परिषदेसाठी खूप वातावरणनिर्मिती केली, पण गर्जेल तो पडेल काय, असे झाले. एखादा माणूस अडचणीत आला की, थयथयाट करतो, तसा प्रकार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत दिसला.

दिव्यांग व्यक्तींना महाशरद पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

0


पुणे, दि. 15: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दिव्यांग व्यक्ती व विद्यार्थ्यांसाठी महाशरद पोर्टल सुरु करण्यात आले असून त्यांनी https://www.mahasharad.in या पोर्टल वर नोदंणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवार यांनी केले आहे.

हे पोर्टल म्हणजे शासनाचा मंच (प्लॅटफॉर्म) असून त्यावर नोंदणीद्वारे राज्यातील दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमाद्वारे व्याख्या केलेल्या दिव्यांग व्यक्तींना मदत तसेच सहाय्य उपलब्ध करुन देण्याची मागणी करता येणार आहे. या पोर्टलवर राज्यातील दिव्यांग नागरिक सुलभतेने आपली नोंदणी करु शकतात.

महाशरद पोर्टल हे दिव्यांग आणि त्यांना देणगी देऊ इच्छिणारे देणगीदार, अशासकीय संघटना, सामाजिक संस्था, कंपन्या, समाजसेवक या सर्वांना विनामूल्य जोडणारा दुवा आहे. या सर्वांना एकाच व्यासपीठाखाली आणणे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांच्या दिव्यांग वित्त व विकास महामंडळांच्या योजनांची माहिती देणे. विविध प्रकारच्या माहितीच्या आधारे दिव्यांगांची परिस्थिती आणि गरजा समजून घेणे या बाबी या पोर्टलमुळे शक्य होणार आहेत, असेही श्री. कोरगंटीवार यांनी कळवले आहे.

‘देवेंद्र फडणवीसांचा फ्रंटमॅन’ मोहित कम्बोज काय म्हणाले

0

देवेंद्र फडणवीसांचा फ्रंटमॅन मोहित कम्बोज आहे. मोहित कंम्बोज देवेंद्र फडणवीस यांना बुडवणार आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन केले होते. मोहित कम्बोजच्या कंपन्यांमध्ये पैसा कुठून आला हे देवेंद्र फडणवीसांनाच माहिती आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यानंतर आता मोहित कम्बोज यांनी पत्रकार परिषद घेतली आहे पहा आणि ऐका त्यांनी काय म्हटले आहे , संजय राऊत यांना काय चालेंज केले आहे .त्यांच्याच शब्दात ऐका ..

संजय राऊत काय म्हणाले?

“देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक फ्रंटमॅन आहे मोहित कम्बोज. मोहित कंम्बोज देवेंद्र फडणवीस यांना बुडवणार आहे. पत्राचाळची जमीन खरेदी करणारे मोहित कम्बोज आहेत. त्यामध्येही पीएमसी बॅंकेचे पैसे लावलेले आहेत. पत्राचाळीमध्ये पीएमसी बॅंकेच्या गैरव्यवहारातील पैसे लावण्यात आले आहेत. तिथे मोहित कम्बोजचे एक बांधकाम सुरु आहे आणि आमच्याकडे बोट दाखवले जात आहे. राकेश वाधवानकडून मोहित कम्बोजच्या केबीजी ग्रुपने १२ हजार कोटी रुपयांची जागा फक्त १०० कोटी रुपयांना खरेदी केली आहे. मोहित कम्बोजच्या कंपन्यांमध्ये पैसा कुठून आला हे देवेंद्र फडणवीसांनाच माहिती आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

लहान मुले व महिलांसाठी काम करणाऱ्या स्वंयसेवी संस्थानी एकत्रित यावे

0
  • पोलीस उपायुक्त सागर पाटील
    बालकांसाठी एक पाऊल न्यायासाठी उपक्रमाचा शुभारंभ

पुणे,दि. १५ : पुणे शहर तसेच जिल्ह्यात लहान मुले व महिलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थानी बालकांच्या अधिकारासंदर्भात कार्य करण्यासाठी एकत्रित यावे असे आवाहन पोलिस उपायुक्त सागर पाटील यांनी केले.अल्पबचत भवन येथे ज्ञानशक्ती विकास वाहिनी व सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशनच्यावतीने आयोजित ‘बालकांसाठी एक पाऊल न्यायासाठी’ उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी श्री.पाटील बोलत होते. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, बाल कल्याण संरक्षण समितीचे सदस्य अर्जुन दांगट, बाल संरक्षण अधिकारी परमानंद, बालकल्याण समितीचे बीना हीरेकर, कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशनच्या व्यवस्थापक हेमंती पवार, प्रसाद ताटे उपस्थित होत्या.

श्री. पाटील म्हणाले, आपल्याकडे सद्यस्थितीत बालकांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसतात, ते सोडविण्यासाठी कुटुंबातील प्रत्येकाची मानसिकता बदलायला हवी. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये संस्कृतीची जपवणुक होत असल्याने या संस्कृतीला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.

लष्कर पोलीस स्टेशनने पहिले चाइल्ड फ्रेंडली पोलीस स्टेशनचा बहुमान मिळवला असल्याचा उल्लेख करून श्री. पाटील म्हणाले, व्यसनाधिन मुले तसेच न कळत घडणाऱ्या चुकांना सुधारण्याची संधी देण्यासाठी ‘चाइल्ड फ्रेंडली’ पोलीस स्टेशन काम करते. या सर्व उपक्रमात स्वयंसेवी संस्थांचा सहभागही महत्त्वाचा ठरणार आहे. संस्थांनी एकत्रित येत याकामी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

श्री. दांगट म्हणाले, बालकांच्या संरक्षणासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत. बालकांची सुरक्षा फक्त कायद्याने निर्माण होणार नाही, त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग असला पाहीजे.

श्री. परमानंद म्हणाले, बालकांची काळजी व संरक्षणाची गरज आहे. आपली सर्वांची ही सामाजिक जबाबदारी आहे. बालकांशी संवाद साधला पाहीजे, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहीजेत. पुणे जिल्ह्यात चाइल्ड फ्रेंडली पोलीस स्टेशनची संख्या वाढत असून चांगला उप्रकम असल्याचेही ते म्हणाले.

श्री. कदम म्हणाले, कुटुंबातील सुख महत्त्वाचे आहे. पालक व मुलांमधील संवाद महत्त्वाचा आहे. मुलांशी संवादातून मुलांना काय पाहीजे, याबाबत पालकांना सहज समजू शकेल.ज्ञानशक्ती संस्थेच्या कार्यकारी संचालिका गार्गी काळे पाटील यांनी संस्थेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या ‘बालकांसाठी एक पाऊल न्यायासाठी’ उपक्रमाबाबत माहिती दिली.15 फेब्रुवारी ते 8 मार्च 2022 या कालावधीत हा जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लखीमपूर हिंसाचारातील आरोपी केंद्रीय मंत्र्याच्या मुलाची,आशिष मिश्राची जामिनावर सुटका

0

लखीमपूर -लखीमपूर खीरी येथील शेतकर्‍यांना चिरडल्याचा आरोप असलेला गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा मोनू याची सुटका करण्यात आली आहे. 129 दिवसांनंतर तो आज तुरुंगातून बाहेर आला. उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर जिल्हा न्यायाधीशांनी त्यांची सुटका करण्याचे आदेश मंगळवारी सकाळी कारागृहाला दिले .3 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 3 च्या सुमारास लखीमपूर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 70 किमी अंतरावर असलेल्या नेपाळ सीमेला लागून असलेल्या टिकुनिया गावात शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलन करत असताना अचानक तीन वाहनांनी (थार जीप, फॉर्च्युनर आणि स्कॉर्पिओ) शेतकऱ्यांना चिरडण्यास सुरुवात केली. या घटनेने संतप्त शेतकऱ्यांनी एकच गोंधळ घातला. या हिंसाचारात एकूण 8 जणांचा मृत्यू झाला. त्यात चार शेतकरी, एक स्थानिक पत्रकार, दोन भाजप कार्यकर्त्यांचा समावेश होता.टिकुनिया येथे आयोजित दंगलीत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या आगमनापूर्वी ही घटना घडली. या घटनेनंतर उपमुख्यमंत्र्यांनी आपला दौरा रद्द केला होता. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्या गाडीने आंदोलक शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप आहे.

सोमवारी जिल्हा न्यायाधीशांनी अर्जावर सुनावणी करताना तीन लाख रुपयांचे दोन जामीन आणि समान रकमेचे दोन वैयक्तिक जातमुचलक दाखल करण्याचे आदेश दिले होते. ज्यावर आशिष मिश्रा यांचे वकील अवधेश सिंह यांनी कोर्टाची प्रक्रिया पूर्ण करून जामीन अर्ज दाखल केला आहे. आशिषला शहराबाहेर जाण्यावरही कोणतेही बंधन राहणार नाही.

आशिषला 9 ऑक्टोबर रोजी पकडण्यात आले
आशिषला एसआयटीने 9 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी पोलीस लाईन्स येथील गुन्हे शाखेत बोलावले होते. जिथे तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली. तेव्हापासून आशिष लखीमपूर कारागृहात बंद आहे. कारागृहात आशिषला विशेष वर्ग कक्षात ठेवण्यात आले होते. इतर कैद्यांना येथे जाण्यास मनाई होती. हे सर्व सुरक्षेसाठी केल्याचे जेल प्रशासनाचे म्हणणे आहे. 10 फेब्रुवारी रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने आशिषला जामीन मंजूर केला होता. त्यानंतर 14 फेब्रुवारी रोजी सुधारित जामीन आदेश जारी करण्यात आला.

5000 पानांचे आरोपपत्र
नुकतेच आशिषवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. एकूण 5 हजार पानांचे हे आरोपपत्र आशिष मिश्राविरुद्ध सबळ पुरावा मानले जात होते.


पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडशी किरीट सोमय्यांचे संबंध, निल सोमय्या मास्टरमाइंडच्या कंपनीत डायरेक्टर; दोघांनाही अटक करा – संजय राऊत

0
  • फडणवीसांच्या काळात महाराष्ट्रात सर्वात मोठा घोटाळा; किरीट सोमय्या ईडीचे दलाल-
  • देवेंद्र फडणवीसांचा फ्रंटमॅन मोहित कंबोज, कंबोज फडणवीसांना बुडवणार.
  • मला कुणीतरी म्हटले की, तुम्ही जिथे कपडे शिवले तिथेही गेले. ईडी हा काय प्रकार आहे हे तुम्हाला कळले पाहिजे म्हणून तुम्हाला सांगतो. टेलरकडेसुद्धा हे लोक गेले, किती पैसे दिले, किती सुट दिले. आता फक्त चप्पल वाल्याकडे जायचे बाकी राहिले आहे.
  • तुम्ही कुठेही जा पण सामना शिवसेनेशी आहे. एक दुधवाला आहे हरयाणाचा, एस नरवल, मी विचारतो ईडीला की तुम्ही त्याला ओळखता का, फक्त पाच वर्षात दुधवाला, 7 हजार कोटीचा मालक कसा बनतो, कुणाचा पैसा? जेव्हापासून महाराष्ट्रात भाजपचे सरकार आले. तेव्हापासून महाराष्ट्रात येणे जाणे सुरु झाले. भाजपच्या नेत्यांच्या घरात येणे जाणे सुरु होते आणि त्याची संपत्ती वाढली. कुणी केले मनी लाँड्रिंग, 7 हजार कोटी रुपयांपैकी साडे तीन हजार कोटी हे महाराष्ट्रातून गेली.
  • ईडीवाल्यांनो ऐका, हिंमत असेल तर माझ्या घरी या…मै नंगा आदमी हू, मै शिवसैनिक हू…तुम्ही कितीही मला अडकवण्याचा प्रयत्न करा, जितेंद्र चंद्रलाल नवलानी कोण आहे, हे नाव ऐकून मुंबई आणि ईडीच्या अधिकाऱ्यांचा श्वास बंद होईल.
  • चार महिन्यांपासून बिल्डर्सकडे वसुली सुरु आहे. ईडीच्या नावाने वसुली होत आहे. याची ईडीला सुद्धा माहिती आहे. हे कोण आणि कोणाची माणसे याचा डेटा आहे. मी सर्वात आधी पंतप्रधान मोदींना, अमित शहांना देणार आणि त्यानंतर तुम्हाला सांगेन…जितेंद्र नवलानी, फरिद शमा, रोमी आणि फिरोज शमा कोण?
  • महाराष्ट्रात जो घोटाळा, भ्रष्टाचार झाला त्यातून हे झाले. महाराष्ट्रात सर्वात मोठा घोटाळा आहे तो फडणवीस सरकारच्या काळातला आहे.
  • कोरलाईत जर 19 बंगले दिसले तर मी राजकारण सोडणे, पण जर कोरलाई 19 बंगले दिसले नाही तर त्या दलाला जोड्याने मारेण.
  • जे माझ्यावर आरोप झालेत, त्यातील एकही आरोप खरा नाही.
  • ईडीच्या कार्यालयासमोर आजची पत्रकार परिषदेत घेण्याची योजना करणार होतो. पण शेवट तिथे करण्याचा निर्णय घेतला.
  • सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्रात ठिणगी पाडू, आम्ही केंद्रीय पोलिस यंत्रणा आणून थंड करु.
  • अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणा ज्या पद्धतीने हल्ले करतायत ते देशावरचे संकट आहे. असेच संकट पश्चिम बंगालवरही आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. खोटे आरोप, बदनामी सुरु आहे.
  • मराठी माणसाविरुद्ध होणाऱ्या आक्रमणांच्या विरुद्ध रणशिंग फुंकणे गरजेचे आहे आणि ते काम आम्ही करत आहोत. आम्हाला संदेश द्यायचाय की, आम्ही घाबरणार नाही, असे संजय राऊत म्हणाले आहे.
  • महाराष्ट्र ….ची औलाद नाही हेच आजच्या पत्रकार परिषदेतून सांगायचे आहे. तुम्ही कितीही नामर्दानगी करुन आमच्या पाठीमागून वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही.
  • गेल्या काही दिवसांपासून तुम्ही पाहत आहात. शिवसेना असेल, ठाकरे परिवार असेल. आनंदराव अडसूळ असतील. अनिल परब असतील, भावना गवळी, पवार साहेबांचे कुटुंबीय अशा सर्वांवर केंद्रीय तपास यंत्रणा ज्या पध्दतीने हल्ले करत आहेत. मला असे वाटते की, हे महाराष्ट्रावरच नाही तर देशावरचं संकट आहे.

मुंबई-शिवसेना नेते संजय राऊतांनी आज पत्रकार परिषद घेऊन थेट भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे नगरसेवक पुत्र निल सोमय्या यांच्यावर बॉम्ब गंभीर आरोप केले आहेत. पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडशी किरीट सोमय्या यांचे संबंध आहेत. तर त्यांचा मुलगा या मास्टरमाइंडच्या कंपनीत डायरेक्टर आहे. असा आरोप राऊतांनी केला आहे.

याविषयी बोलताना राऊत म्हणाले की, निल सोमय्या पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाईडच्या कंपनीत डायरेक्टर आहे. त्यानेच निकॉन फेज वन आणि टू असे प्रकल्प उभे केले आहेत. या सर्वांना पर्यावरणाच्या परवानग्या नाहीत. हरित लवादाने जर यावर अॅक्शन घेतली तर त्यावर कारवाई होऊ शकते. मी आदित्य ठाकरेंना आवाहन आवाहन करतो की, याची ताबडतोब चौकशी करून निल सोमय्या आणि किरीट सोमय्या यांना अटक करा. यासोबतच पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडच्या अकाऊंटमधून भाजपला 20 कोटींचा निधी गेला असल्याचा आरोप देखील राऊतांनी केला आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, ईडीवाले तुम्ही ऐका. सीबीआयवाल्यांनी देखील ऐकावे. हा जो किरीट समोय्या आहे. तो एक फ्रॉड आहे. त्याने बँक घोटाळा केलेला आहे. तसेच लोकांचे पैसे देखील बुडवले आहेत. आता निकॉन इन्फ्रा कंन्स्ट्रक्शन कंपनी कुणाची? तर किरीटची आणि नील सोमय्याची. आणि हा राकेश वाधवानचा पार्टनर आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.

19 बंगले पाहायला बस करुन जाऊ, जर ते दिसले नाही तर अख्खी शिवसेना ‘दलाला’ला जोड्याने मारेल

संजय राऊत यांची पत्रकार परिषद सुरु असताना त्यांच्या समर्थनार्थ जमलेले सैनिक

2009 मध्ये अन्वय नाईकांनी कोर्लई गावात 19 बंगले बांधले. हे बंगले उद्धव ठाकरेंचे असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. यावर आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे.

या आरोपांना उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, ‘भाजपने महाराष्ट्रात नालायकपणा सुरु केला आहे. हा महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात असे कधी घडले नव्हते. या पध्दतीचे राजकारण राज्यात यापूर्वी कधीच झाले नव्हते. भाजपकडून उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांविषयी दर दिवशी काही आरोप केले जात आहेत. भाजपचा दलाल किरीट सोमय्या म्हणतात की, ठाकरे कुटुंबियांनी 19 बंगले बांधून ठेवले आहेत. माझे त्या दलालाला आव्हान आहे. कधीही सांगा. आपण चार बसेस करु आणि त्या 19 बंगल्यामध्ये पिकनिकला जाऊ. जर तुम्हाला ते बंगले दिसले तर मी राजकारण सोडीन. जर दिसले नाही. तर त्या दलालाला अख्खी शिवसेना जोड्याने मारेन.’

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, ‘दिशाभूल करायची, भंपकपणा करायचा असे काम भाजपचे सुरु आहे. चला दाखवा मग बंगले, आपण पार्टी करु. हा भंपकपणा सुरु आहे. ही महाराष्ट्राविषयी असूया आहे. मराठी भाषेविषयी असूया आहे. मुंबईतून मराठी भाषा शालेय शिक्षणात सक्तीची असू नये अशी पीटिशन किरीट सोमय्यांनी काही वर्षांपूर्वी केली होती. जो माणूस मराठी भाषेच्या विरोधात कोर्टात गेला. आणि काय तुम्ही सांगता की, मराठी भाषेचा अभिजात दर्जा आम्ही देतो म्हणून.’ असे म्हणत सोमय्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले, संजय राऊत म्हणाले की, माझ्यासारख्या राज्यसभा सदस्याला केंद्रीय तपास यंत्रणांचे लोक का त्रास देत आहेत, असा प्रश्न करून त्याचे उत्तर दिले. ते म्हणाले, भाजपचे काही प्रमुख लोक मला भेटले. वारंवार मला हेच सांगितले की, तुम्ही या सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा. कोणत्याही परिस्थिती आम्हाला हे सरकार घालवायचे. आमची सगळी तयारी झाली आहे. काही आमदार आमच्या हाताला लागलेत. तुम्ही बाहेर पडा. आम्हाला मदत करा. आम्ही राष्ट्रपती राजवट आणू. म्हटले हे कसे शक्यय? याच्यावर त्यांनी सांगितलं की, तुम्ही जर मदत केली नाही, तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करेल, असा दावाही त्यांनी केला.

भाजपकडून निर्घृणपणे राजकारण सुरु
बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला झुकू नका, असे सांगितले. मी त्यांना नाही म्हटले म्हणून माझ्या आणि नातेवाईकांच्या घरी छापा टाकला. त्यांनी जे आरोप केले आहेत ते खोटे आहेत. माझे मुले, नातेवाईक, मित्रपरिवार प्रत्येकाला बदनाम करायचे. मुलांना फोन करुन ईडी घडी येते, वडिलांना अटक करुन घेऊन जातील, असे सांगितले जाते. इतके निर्घृणपणे राजकारण भाजपकडून सुरु आहे.” असेही राऊत म्हणाले.

भारतीयांना युक्रेन सोडण्याचा सल्ला

0

भारताने आपल्या नागरिकांना तात्पुरते युक्रेन सोडण्याचा सल्ला दिला आहे. कीवमधील भारतीय दूतावासाने विशेषतः युक्रेनमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना तात्पुरते मायदेशी परतण्यास सांगितले आहे. युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या तणावाचे युद्धात रुपांतर होण्याची शक्यता असल्याने हा सल्ला देण्यात आला आहे. या तणावामुळे अमेरिका, ब्रिटन, नॉर्वे, जपान, लॅटव्हिया आणि डेन्मार्क या देशांनी आधीच आपल्या नागरिकांना युक्रेन सोडण्यास सांगितले आहे.

युक्रेनमध्ये 20 हजार भारतीय विद्यार्थी
युक्रेनमध्ये अभियांत्रिकी आणि मेडिकलचे 20 हजार भारतीय विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, पंजाब आणि राजस्थानमधील आहेत. या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी दिल्लीतील राष्ट्रपती सचिवालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.

भारतीय दूतावासाने जारी केली अ‍ॅडव्हायझरी
भारतीय दूतावासाने युक्रेनमध्ये उपस्थित भारतीयांना युक्रेन सोडण्यासाठी सल्लागार पत्र पाठवले आहे. युक्रेनमधील सध्याचे अनिश्चित वातावरण पाहता भारतीय नागरिकांना, विशेषत: विद्यार्थ्यांना युक्रेन सोडून तात्पुरते मायदेशी परतण्याचा सल्ला देण्यात येत असल्याचे पत्रात म्हटले आहे. पत्रात पुढे म्हटले आहे की, भारतीय नागरिकांनी कोणत्याही आवश्यक कामाशिवाय युक्रेनमध्ये जाऊ नये आणि तेथे उपस्थित नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये.

दूतावासाने युक्रेनमध्ये उपस्थित असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना त्यांच्या उपस्थितीची माहिती दूतावासाला देत राहण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून गरज पडल्यास त्यांना मदत करता येईल. आपल्या नागरिकांना मदत करण्यासाठी भारतीय दूतावास युक्रेनमधील आपले सामान्य कामकाज सुरू ठेवेल, असे त्यात म्हटले आहे.

रशिया-युक्रेन वादावर भारताची तटस्थ भूमिका
युक्रेनच्या मुद्द्यावरून रशियाच्या विरोधात अमेरिकेने मांडलेल्या ठरावावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मतदान करण्यापासून भारताने स्वतःला दूर ठेवले आहे. यासोबतच भारताने शांततापूर्ण चर्चेद्वारे तणाव तातडीने कमी करण्याचे आवाहन केले. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी स्पष्ट केले की, भारताचे हित सर्व देशांच्या कायदेशीर सुरक्षेचे हित लक्षात घेऊन तत्काळ तणाव निवळू शकेल आणि या प्रदेशात आणि त्यापलीकडे दीर्घकालीन शांतता आणि स्थैर्य प्राप्त करणे हा उपाय शोधण्यात आहे.

युक्रेन प्रकरणी रशियावर कठोर निर्बंध लादण्याच्या पाश्चात्य देशांच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाविरुद्धच्या कोणत्याही आर्थिक निर्बंधाचा पक्ष असू शकत नाही, असे स्पष्ट केले आहे.

रशिया आणि युक्रेनमधील तणावाचे हे आहे कारण
रशियाने युक्रेनच्या सीमेजवळ एक लाखाहून अधिक सैनिक जमा केले आहेत. त्यामुळे या भागात युद्धाची शक्यता बळावली आहे. युक्रेनवर हल्ल्याची योजना आखत असल्याचा रशियाने सातत्याने इन्कार केला आहे, मात्र रशिया युद्धाच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि त्यासाठी तयारी करत असल्याचे अमेरिका आणि त्याच्या नाटो सहयोगी देशांचे मत आहे. दुसरीकडे, रशियाच्या प्रमुख मागण्यांमध्ये युक्रेनचा नाटोमध्ये समावेश न करणे आणि रशियाला धोका निर्माण करणारी अशी शस्त्रे या प्रदेशातून काढून टाकणे यांचा समावेश आहे.

खरे सौंदर्य बुद्धिमत्तेचे-अविनाश धर्माधिकरी

0

एमआयटी डब्ल्यूपीयूत ‘ब्रिलियंटाईन डे’ साजरा
परम लखानी एमआयटी डब्ल्यूपीयू पीस कींग व पीस ऑफ क्वीनचा मुकुट सायली डोईफोडेला

पुणे, दि. १५ फेब्रुवारी:“खरे सौंदर्य हे बुद्धीमत्तेत आहे. त्यामुळे बुद्धिच्या सौंदर्यांनी सभ्यतेच्या मर्यादा सांभाळून प्रेम करा. प्रेम ही एक शाश्‍वत शक्ती असून संतांनीही त्याची व्याख्या केली आहे. या जीवनात सर्वांवरच प्रेमाचा वर्षाव व्हावा.” असे विचार माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे ‘ब्रिलियंटाईन डे’ साजरा करण्यात आला. त्यानिमित्याने आयोजित केलेल्या ब्रिलियंटाईन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. जगविख्यात संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा.कराड होते. याप्रसंगी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, सल्लागार डॉ. संजय उपाध्ये, पीस स्टडीजचे सहयोगी अधिष्ठाता प्रा.डॉ. मिलिंद पात्रे आणि सह्याद्री वाहिनीचे माजी संचालक मुकेश शर्मा उपस्थित होते.
भारतीय संस्कृती, परंपरा, पौराणिक कथा, अध्यात्म, धर्म, योग व इतिहास इ. विषयांवर निबंध स्पर्धा, प्रश्‍नमंजूषा आणि वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या मध्ये २५० विद्यार्थी सहभागी झाले होते.
‘ब्रिलियंटाईन’ स्पर्धेत परम लखानी (स्कूल ऑफ मिडिया अ‍ॅण्ड जर्नालिझम) यांना एमआयटी डब्ल्यूपीयू पीस कींग व सायली डोईफोडे (स्कूल ऑफ मॅथेमॅटिक अ‍ॅण्ड स्टॅटेस्टिक्स) यांना एमआयटी डब्ल्यूपीयू पीस ऑफ क्वीनचा मुकुट घालून विशेष सत्कार करण्यात आला. सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्र दिले. तसेच, या स्पर्धेतील पुरूष उपविजेते वेदांत काळे (स्कूल ऑफ मेकॅनिकल इंजिनियरींग), प्रणय करकाळेे(स्कूल ऑफ मेकॅनिकल इंजिनियरींग) आणि महिला उपविजेता सिद्धी देशमुख (स्कूल ऑफ मॅनेजमेंट यूजी, टीवाय बीबीए) व वैष्णवी बावठनकर (फॅकल्टी ऑफ लिबरल आर्ट) यांचाही सत्कार करण्यात आला. हे सर्व विजेते एमआयटी डब्ल्यूपीयूच्या विश्‍वशांती उपक्रमांचे नेतृत्व करतील व इतर महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये त्याचा प्रचार व प्रसार करतील.
अविनाश धर्माधिकारी म्हणाले,“ खरे नाते हे मित्राचे असते. या नात्याला अध्यात्मात सुद्धा खूप मोठे स्थान दिले गेले आहे. वर्तमान काळात व्हॅलेंटाईन डे ला मार्केटिंगचे स्वरूप आले आहे. त्यामुळे या पासून स्वतःचा सांभाळ करावा. माणसाच्या माणुसपणाचे खरे सौंदर्य हे बुद्धिमत्तेतच दिसून येते.”
डॉ. विजय भटकर म्हणाले,“आंतरिक परिवर्तन हे जीवनात मोठे बदल घडवितात. व्हॅलेंटाईन डे हा आंतरिक प्रेमाचा दिवस आहे. हा दिवस बुद्धिमत्तेचा म्हणजे विद्वतेसाठी साजरा केला जावा. ज्ञानमुळे जीवनात बदलत होत जातात. त्यासाठी ज्ञानला महत्व दिले जावे. भगवद गीतेसारख्या ग्रंथांचे अनुकरण केल्यास परिवर्तन नक्कीच घडते. त्यातून आनंद निर्माण होतो.”
डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“वर्तमानकाळात प्रेमाची भाषा बदलत चालली असून त्यात मन आणि बुद्धि महत्वाची आहे. आजची पिढी कोणत्या दिशेने वाटचाल करीत आहे हे पहाणे गरजेचे आहे. त्यातच कुटुंब व्यवस्था ही भरकटत आहे. या साठी ब्रिलियंटाईन डे ही संकल्पना समाजाला नवी दिशा देईल. जीवन कसे जगावे आणि कसे जगू नये हे आम्हाला धर्म शिकवितात. त्या आनंदाचा अनुभूव घ्यायचा असेल तर शाश्‍वतमार्गावर चालावे. विद्यार्थ्यांनी असा व्यवहार करावा की आपल्या आई वडिलांना त्यांचा अभिमान वाटावा.”
डॉ. संजय उपाध्ये यांनी प्रास्ताविकेत सांगितले की, ब्रिलियंटाइन स्पर्धा केवळ शारीरिक रुपाला व दिसण्याला महत्व न देता बुद्धिला व स्वतःच्या अस्तित्वाला महत्व दिले जावे यासाठी आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना व आव्हान देणे महत्वाचे होते.
परम लखानी म्हणाले,“स्पर्धेमुळे माझ्या ज्ञानात भर पडली आहे. यातून अनेक गोष्टी शिकण्याची संधी मिळाली. पुरस्कारामुळे मला खूप आनंद झाला.”
सायली डोईफोडे म्हणाल्या,“माझ्या जीवनात शिक्षकाची भूमिका महत्वाची आहे. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मिळालेला अनुभव भावी आयुष्यासाठी मैलाचा दगड ठरेल. ”
 यावेळी मुकेश शर्मा यांनी आपले विचार मांडले.
पीस स्टडीजचे प्रा.आशिष पाटील व प्रा.मृण्मयी गोडबोले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मिलिंद पात्रे यांनी आभार मानले.

चारा घोटाळ्यात लालूप्रसाद यादव दोषी-21 फेब्रुवारीला शिक्षा सुनावण्यात येणार

0

पटना -950 कोटी रुपयांच्या देशातील सर्वात मोठ्या चारा घोटाळ्याचा (डोरंडा ट्रेझरीमधून 139.35 कोटी रुपयांचा अपहार) मंगळवारी निकाल आला. विशेष सीबीआय न्यायालयाने आरजेडी सुप्रीमो लालू यादव यांच्यासह 75 आरोपींना दोषी ठरवले आहे. त्याचबरोबर 24 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 21 फेब्रुवारीला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. आरजेडी सुप्रिमोला दोषी ठरवल्याची माहिती समोर येताच पाटण्यापासून रांचीपर्यंतच्या त्यांच्या समर्थकांमध्ये निराशा पसरली आहे. न्यायालय परिसर आरजेडीच्या नेत्यांनी खचाखच भरला आहे. पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे.

याआधी लालूंना चारा घोटाळ्याच्या चार प्रकरणांमध्ये (देवघरमधील एक, दुमका कोषागारातील दोन वेगवेगळ्या कलम आणि चाईबासा कोषागाराशी संबंधित दोन प्रकरणांमध्ये) दोषी ठरवण्यात आले आहे. याआधीच्या सर्व खटल्यांमध्ये ते जामिनावर बाहेर होते, मात्र मंगळवारी न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांना पुन्हा एकदा तुरुंगात जावे लागणार आहे.

29 जानेवारी रोजी विशेष सीबीआय न्यायाधीश एसके शशी यांच्या न्यायालयाने युक्तिवादाच्या समाप्तीनंतर 15 फेब्रुवारी ही निकालाची तारीख निश्चित केली होती. सर्व आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. सुनावणीला हजर राहण्यासाठी लालू दोन दिवसांपूर्वी १३ फेब्रुवारीला रांचीला पोहोचले होते.

कोर्टात सुनावणीपूर्वी लालूंचे वकील प्रभात कुमार म्हणाले होते, “आरोपीचे वय 75 वर्षांपेक्षा जास्त आहे. लालू यादव तुरुंगात जाण्याच्या स्थितीत नाहीत. अशा परिस्थितीत न्यायालयाकडून दिलासा अपेक्षित आहे. पूर्वीची परिस्थिती वेगळी होती, आज वेगळी आहे. या प्रकरणात 10 महिलाही आरोपी आहेत.

काय आहे डोरंडा ट्रेझरी घोटाळा?
डोरंडा ट्रेझरीतून 139.35 कोटी रुपये बेकायदेशीरपणे काढल्याच्या या प्रकरणात, स्कूटरवरून बनावट जनावरांची वाहतूक केली जात असल्याची कहाणी आहे. बाईक आणि स्कूटरवरून जनावरांची वाहतूक केल्याची देशातील ही पहिलीच घटना असल्याचे मानले जात होते. हे संपूर्ण प्रकरण १९९०-९२ मधील आहे. अधिकारी आणि नेत्यांनी मिळून बनावट बनावटीचा अनोखा फॉर्म्युला तयार केल्याचे तपासात सीबीआयला आढळून आले. हरियाणा आणि दिल्ली येथून स्कूटर आणि मोटारसायकलवरून 400 बैल रांचीला नेण्यात आले. जेणेकरून बिहारमध्ये चांगल्या जातीच्या गायी आणि म्हशींचे उत्पादन होऊ शकेल. 1990-92 दरम्यान, पशुसंवर्धन विभागाने 50 बैल 2,35,250 रुपयात 163 बैल आणि 65 वासरू 14,04,825 रुपयांना खरेदी केले.

एवढेच नाही तर या कालावधीत संकरित गायी आणि म्हशीच्या खरेदीवर विभागाने 84 लाख 93 हजार 900 रुपये मुराह लाईव्ह स्टॉक दिल्लीचे दिवंगत मालक विजय मल्लिक यांना दिले होते. याशिवाय मेंढ्या खरेदीसाठी 27 लाख 48 हजार रुपये खर्च करण्यात आले.

अजितदादा ,हेल्मेटच्या नावाने होणारी लुट ;तुमची भूमिका स्पष्ट करा

0

पुणे- चोरांना पकडण्यासाठी, खुन्यांना पकडण्यासाठी शहरभर लावलेले सीसी टीव्ही प्रत्यक्षात सामान्य नागरिकांनाच , दुचाकी स्वारांवरच जास्त लक्ष केंद्रित करत असून त्याद्वारे हेल्मेट सक्ती करून हेल्मेट च्या नावाने पुण्यात करोडो रुपयांची लुट केली जाते आहे , हेल्मेट बाबत ची आपली भूमिका राष्ट्रवादीचे नेते आणि पालकमंत्री अजित पवार यांनी आता स्पष्ट करावी अशी मागणी आम आदमी पार्टीचे युवा नेते कृष्णा गायकवाड यांनी केली आहे.

ते म्हणाले,’भाजपाचे राज्यात सरकार असताना राष्ट्रवादी चे अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला यांच्यासह सर्वांनी हेल्मेट सक्तीला केलेला विरोध , भाजपचे संदीप खर्डेकर, ग्राहक पेठेचे सुर्यकांत पाठक आणि शिवसेनेसह अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हेल्मेट विरोधी सुरु केलेली चळवळ ‘नाटकी होती काय ?असा प्रश्न विचारला जाऊ शकेल अशी स्थिती आता निर्माण होऊ पाहते आहे. एकीकडे मेट्रो शहरात आणली जात असताना दुसरीकडे १ टक्का मुद्रांक अधिभार मेट्रो साठी दस्तनोंदणीवर तर लावणार आहेतच , पण गेली वर्षाहून अधिक काळ हेल्मेट च्या नावाखाली सीसी टीव्ही ला कार्यरत करून लाखो दुचाकी चालकांना एसएम एस पाठवून लोक अदालतीच्या नोटीसा पाठवून त्यांच्याकडून हजारो रुपयांची दंड वसुली करून सरकारने करोडो रुपये वसुलीचे तंत्र न्यायिक प्राधिकरण यात घेऊन जमा करण्याचे कारस्थान सुरु ठेवलेले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते ,राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असलेले अजितदादा पवार यांनी आता तरी तातडीने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे . हेल्मेट सक्ती राज्यात आहेच हे स्पष्ट असून त्यावर नागरिकांना सुट दिलेली नाही . मग आपले कार्यकर्ते जी आंदोलने भाजपा सेना युतीचे सरकार असताना करत होती ते सारे ढोंग होते काय ? असा सवाल देखील गायकवाड यांनी केला आहे .

बी आरटी येणार म्हणून, सायकल मार्ग उभारीत , बीआरटीचा वापर जास्त लोकांनी करावा म्हणून बीआरटीला स्वतंत्र लेन देत अगदी एसटी आणि मोठी वाहने देखील त्यातून बाजूला करत पुण्यात खाजगी वाहन चालकांना रस्ते अरुंद करून त्यांची गळचेपी करण्याचे कारस्थान राबविले गेले आता मेट्रो येणार म्हणून देखील हे दंड वसुलीचे प्रकार राबवून लोकांना मेट्रो कडे कसे वळविता येईल याचे षड्यंत्र राबविले जाते आहे . पुण्यात वाहन नाही तर नौकरी अगर कामधंदा करता येत नाही अशा स्थितीत चालविलेली हि पुणेकरांची लुट आणि ज्यांच्या पक्षांचे सरकार आहे आणि होते त्यांनी सुरु ठेवलेले हे प्रकार असल्याने आता त्यांच्या नेत्यांनाच आम आदमी पार्टीने जाहीर आव्हान केले आहे यावर आपली भूमिका स्पष्ट करा म्हणजे लोक हि आपली भूमिका मग मतदानातून व्यक्त करतील असे आम आदमी पार्टीच्या कृष्ण गायकवाड यांनी म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मार्गदर्शक सूचना जारी

0

मुंबई दि. १४ :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. १९ फेब्रुवारी रोजी हा उत्सव  नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन साजरा न करता आरोग्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती (शिवजयंती ) साजरी करत असताना शिवज्योत वाहण्याकरिता २०० भाविकांना व शिवजयंती उत्सवाकरिता ५०० भाविकांना परवानगी देण्यात आली आहे. अनेक शिवप्रेमी, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेल्या शिवनेरी अथवा इतर गड / किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार दि. १८ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री १२ वाजता एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करतात. परंतु, यावर्षी कोविड -१९ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करावा.

दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.

प्रभात फेरी, बाईक रॅली अथवा मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला/प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करावी.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती” च्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यु इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

कोविड-१९ च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे सर्वांवार बंधनकारक आहे, असेही या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

महालक्ष्मी मंदिरातील उत्सव मूर्तींची धान्यतुला व सोने-चांदी पुष्पअर्पण

0


श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजन ; संतुलन संस्थेला धान्य भेट

पुणे : श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली व श्री विष्णू भगवान यांच्या सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरातील उत्सवमूर्तींची धान्यतुला करुन ते धान्य दगडखाण कामगारांच्या मुलांसाठी कार्यरत संतुलन संस्थेला देण्यात आले. याशिवाय सुवर्णकमल व रजतकमल अर्चना कार्यक्रमांतर्गत सोने व चांदींची पुष्प अर्पण करुन देवीचरणी आरोग्यसंपन्न भारताकरीता प्रार्थना करण्यात आली.

श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त मंदिरात ब्रह्मोत्सव सुरु आहे. राजस्थान डिडवाना येथील अनंत श्री विभुषित जगतगुरु रामानुजाचार्य झालरिया पीठाधीपती पूज्य श्री श्री १००८ स्वामीजी घनश्यामाचार्याजी महाराज यांच्या आशिर्वादाने विविध धार्मिक कार्यक्रम मंदिरात होत आहेत. ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, विश्वस्त नगरसेवक प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा आदी उपस्थित होते.

धान्यतुला उपक्रमाचे चंदाबाई भुतडा, विशाल मेहता, विजया भुतडा, रोहित अरोरा, सुरेखा काबरा, प्रविण चोरबेले, अरुणा वट्टे, पूजा कांबळे, संगीता पोफलिया हे तर सुवर्णकमल व रजतकमल अर्चना कार्यक्रमाचे विशाल मेहता, रोहित अरोरा, प्रणाली भूमकर, ठाकू रदास बलसारा हे यजमान होते.

अमिता अग्रवाल म्हणाल्या, सामाजिक कार्यक्रमांमध्ये मंदिरातील उत्सव मूर्तीची धान्यतुला करुन ते धान्य वाघोली येथील संतुलन पाषाण या दगडखाण कामगारांच्या मुलांसाठी काम करणा-या संस्थेस देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. धान्यतुलेमध्ये विविध प्रकारचे धान्य, बिस्कीटे व खाऊ ठेवण्यात आला होता. याशिवाय सोने व चांदीची फुले देखील मान्यवरांच्या हस्ते उत्सवमूर्तीला अर्पण करण्यात आली.

सलग बारा तासांच्या स्वरयज्ञातून कलाकारांची लतादीदींना स्वरांजली

0

पुणे :  सलग १२ तासांच्या स्वरयज्ञात सतार, व्हायोलिन, तबला, हामोर्नियमन, सिन्थेसायझर, गिटार, माऊथ आॅर्गन, अ‍ॅकॉर्डियन, बासरी तर काही कलाकारांनी शिळ वादनातून, चित्रांतून गानसम्राज्ञी लतादीदींना श्रध्दांजली अर्पण केली. आपल्या स्वरांनी फक्त भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला मोहित करणाºया लतादीदींना पुणेकरांनी स्वरांच्या मैफलीतून अखेरचा दंडवत दिला. यावेळी अनेक दिग्गज कलाकारांनी लतादीदींच्या आठवणींना उजाळा दिला. 
पूना गेस्ट हाऊस स्नेहमंचच्यावतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना अभिवादन करण्यासाठी सलग १२ तासांच्या स्वरयज्ञाचे आयोजन लक्ष्मी रस्त्यावरील पूना गेस्ट हाऊस येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न.म.जोशी, माजी आमदार उल्हासदादा पवार, निवेदक सुधीर गाडगीळ, गायक उपेंद्र भट, गायिका मंजुषा पाटील, ज्येष्ठ समिक्षीका सुलभा तेरणीकर, शिरीष रायरीकर, लेखक राजन लाखे, पीएनजी सन्सचे अजित गाडगीळ, रेणू गाडगाळ यांच्यासोबत अनेक मान्यवर उपस्थित होते. 
पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार, साधना सरपोतदार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. या स्वरयज्ञात दिवसभरात तब्बल शंभरहून अधिक कलाकारांनी सहभाग घेतला. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नितीन करमाळकर यांनी देखील स्वरयज्ञ कार्यक्रमाला भेट देऊन लतादीदींना आदरांजली अर्पण केली. 
कार्यक्रमाची सुरूवात व्हायोलिन वादक रमाकांत परांजपे, सिंथेसायजर विवेक परांजपे, बासरी वादक निलेश देशपांडे, तबलावादक राजेंद्र दुरकर, गायिका मनिषा निश्चल यांच्या सादरीकरणाने झाली. त्यानंतर कलाकारांनी दीदींच्या भावगीत, बालगीत, शृंगारगीत, प्रेमगीत, देशभक्तीपर गीतांची स्वरमाळ गुंफली. त्याचबरोबर हेमंत गद्रे यांनी माऊथआॅर्गन मधून तर अनिल गोडे यांनी अ‍ॅकॉर्डियन वादनातून दीदींच्या अनेक अपरिचत गाण्यांनी उजाळा दिला. नगरचे शिल्पचित्रकार प्रमोद कांबळे यांनी चार चित्रे रेखाटली, तर इक्बाल दरबार यांनी सेस्कोफोनवर आणि स्वाती जोशी यांनी माऊथ आॅर्गनद्वारे सादरीकरण करीत स्वरांजली अर्पण केली. 
किशोर सरपोतदार म्हणाले, मंगेशकर घराण्याचे आणि सरपोतदार घराण्याचे जवळचे संबंध आहेत. लहान असताना मास्टर दिनानाथ मंगशेकरांबरोबर लतादीदी पूना गेस्ट हाऊसमध्ये येत असत. त्यावेळी तेरा वर्षांच्या असताना त्यांनी पूना गेस्ट हाऊस मध्ये गायन केले होते. त्यामुळे त्यांना अभिवादन करण्यासाठी या स्वरयज्ञाचे आयोजन केले असून अनेक कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केले असल्याचे त्यांनी सांगितले. मनिष गोखले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अजित कुमठेकर यांनी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम केले.