Home Blog Page 2066

दिव्यांग नेमबाजी स्पर्धेचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते उद्घाटन

0

पुणे दि.1: दिव्यांग नेमबाजी स्पर्धेचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते उद्घाटन झाले. श्री.कडू यांनी नेमबाजी करून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले.

बालेवाडी क्रिडा संकुल येथे आयोजित स्पर्धेच्या उद्घाटनवेळी क्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडे, प्रशिक्षक संदीप तरटे, रफिक खान, दिलीप सोनवणे, आकाश कुंभार, भाग्यश्री मोरे,सुनंदा बाम्हणे, अमोल शेरेकर,संजू बनपट्टे उपस्थित होते.

अहमदाबादच्या अरविंद स्मार्ट स्पेसेसची पुण्यात ३५ एकर जमिनीच्या खरेदीसाठी १०० कोटी रुपयांची गुंतवणूक

अहमदाबाद, २८ फेब्रुवारी २०२२: भारतातील आघाडीची रिअल इस्टेट विकास कंपन्यांपैकी एक असलेल्या अरविंद स्मार्टस्पेसेस लिमिटेड (एएसएल)ने पुण्यात ३५ एकर जमिनीच्या खरेदीसाठी अंतिम करार करताना १०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. ही जमीन पुण्यातील छोटी बाजारपेठ असणाऱ्या भूगावमध्ये आहे. या नवीन प्रकल्पामध्ये १.३ दशलक्ष चौरस फूट इतकी विकास क्षमता असलेल्या आलिशान निवासी व्हिला असणार आहेत. जेव्हा हे तयार होईल तेव्हा हा प्रकल्प अरविंद स्मार्ट स्पेसेसचा पहिला मोठा क्षैतिज निवासी विकास प्रकल्प म्हणून ओळखला जाईल आणि हा शहरातला दुसरा निवासी प्रकल्प असेल.

भूगाव हा मुळशी रस्त्याला लागून असलेला महत्वाचा निवासी भाग असून पुण्यातील वेगाने वाढणाऱ्या आणि विकसीत होत असलेल्या भागांपैकी एक आहे. पुण्यातील लोकप्रिय आयटी हब असलेल्या हिंजवडीपासून हा प्रकल्प जवळच आहे. वेगाने विकसीत होत असलेली ही नवीन बाजारपेठ पुण्यातील कोथरूड, चांदणी चौक, औंध, पाषाण, बाणेर इत्यादी ठिकाणांच्या जवळ आहे. कंपनी या प्रकल्पाला इक्विटीमधील भाग, अंतर्गत जमा आणि नवीन कर्जातून निधी पुरवेल.

अरविंद स्मार्ट स्पेसेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कमल सिंगाल म्हणाले, “पुण्यातील निवासी प्रकल्पांचा पोर्टफोलिओ बळकट करताना भूगाव मधील नवीन प्रकल्पाची घोषणा करताना आम्हांला खूप आनंद होत आहे. कोथरूड मध्ये आमच्या पहिल्या प्रकल्पाच्या यशस्वितेनंतर या प्रकल्पामुळे पुण्याच्या आणखी एका नवीन बाजारपेठेत आमचा प्रवेश होत आहे. अलिशान आणि व्हिला पद्धतीच्या निवासी प्रकल्पांची मागणी वाढताना आम्ही बघत आहोत आणि आमच्या पोर्टफोलिओमध्ये या प्रकल्पाची भर घालताना आम्हांला खूपच आनंद होत आहे. हे ठिकाण शहरापासून जवळ असले तरी दाटीवाटीपासून लांब आहे. हिरवाईत, निसर्गाच्या जवळ जाणारे आणि क्षैतिज विकासासाठी आदर्श आहे. बंगळूरू आणि अहमदाबाद येथे स्वतःच्या कार्याचा ठसा उमटविल्यानंतर पुणे आणि एमएमआर सारख्या नवीन विकास होत असलेल्या बाजारपेठेत गुंतवणूक करण्याचे आमचे धोरण हे या जमीन अधिग्रहणाशी सुसंगत आहे.”

अरविंद स्मार्ट स्पेसेसने २०१९ च्या सुरुवातीला पुण्यातील एलनच्या सादरीकरणातून महाराष्ट्रातील बाजारपेठेत प्रवेश केला. हा प्रकल्प पुण्यातील कोथरूड भागातील १.३ लाख चौरस फूट एकूण बिल्टअप एरिया मध्ये स्थित आहे. अरविंद एलन मध्ये उच्च दर्जाच्या अलिशान वैशिष्ट्यांसह २ बीएचके अपार्टमेंटची १२० युनिट्स आहेत. या प्रकल्पाची रचना खास बाजारपेठ डोळ्यासमोर ठेऊन करण्यात आली आहे आणि जास्तीत जास्त जागेचा वापर करून यातून आधुनिक शैलीतील जीवनमान प्रतीत होते.

अरविंद स्मार्ट स्पेसेसने अलिकडेच दोन नवीन मोठ्या स्तरावरील प्रकल्पांची भर घातली. पहिला प्रकल्प बंगळूरू मधील देवनहल्ली येथे असून एचडीएफसी प्लॅटफॉर्म खाली त्याची अंमलबजावणी होईल आणि दुसरा निवासी व्हिला प्रकल्प बंगळूरू मधील सर्जापूर येथे आहे. अहमदाबाद, गांधीनगर, बंगळूरू आणि पुण्यात कंपनीचा साधारण २५ दशलक्ष चौरस फुटांचा बांधकाम विकास आहे.

अरविंद स्मार्ट स्पेसेस विषयी:

लालभाई समूहाच्या १२० वर्षे जुन्या वारशावर उभारलेली आणि २००८ मध्ये स्थापना झालेली अरविंद स्मार्ट स्पेसेस ही भारतातील आघाडीची बांधकाम व्यवसाय विकास कंपनी असून तीचे मुख्यालय अहमदाबाद येथे आहे. देशभरात जवळपास २५ दशलक्ष चौरस फूट बांधकाम व्यवसाय विकास कंपनीने केला असून ग्राहकांच्या आयुष्याला मोल प्राप्त करून देणाऱ्या बांधकाम व्यवसाय सुविधा पुरविण्यावर कंपनीचा भर आहे आणि देशातीलआघाडीची कॉर्पोरेट बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील कंपनी म्हणून ती वेगाने पुढे येत आहे. अहमदाबाद, गांधीनगर, बंगळूरू आणि पुण्यात कंपनीचा बांधकाम व्यवसाय विकास आहे. अरविंद समुहाचे मोठे पाठबळ आणि या आधीच्या प्रकल्पातून मिळविलेली विश्वासार्हता यातून सर्व भागधारकांना अधिकाधिक सेवा पुरवत आणखी मजबूत विकासाच्या कंपनीच्या योजना आहेत.

महाशिवरात्र: सुनेत्रा अजित पवार यांनी साकारली तब्बल ५१ किलो चक्क्याची पिंड

पुणे : बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी चक्क्याची महादेवाची पिंड साकारली. महाशिवरात्रीच्या निमित्ताने लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात सकाळी त्या दर्शनाकरिता आल्या होत्या. ट्रस्टतर्फे तब्बल ५१ किलो चक्क्याची पिंड साकारण्यात येत असताना पवार यांनी त्यामध्ये सहभाग घेत आपली सेवा देखील रुजू केली. 
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रुकारी, अ‍ॅड.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई, अ‍ॅड.रजनी उकरंडे, युवराज गाडवे, अ‍ॅड.प्रताप परदेशी, अ‍ॅड. शिवराज कदम जहागीरदार, महेंद्र पिसाळ आदी उपस्थित होते. 


सुनेत्रा पवार यांनी चक्क्याचा उपयोग करून सुमारे दहा मिनिटे चक्केश्वर महादेव साकारण्यात सहभाग घेत महाराजांच्या चरणी सेवा अर्पण केली. तसेच आरोग्यसंपन्न महाराष्ट्राकरिता दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना देखील केली. तीन तासात सुमारे ५१ किलो चक्का वापरून ही पिंड साकारण्यात आली असून त्यामध्ये द्राक्षे, विविध फळे, गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या, बेल, विविध फुले वापरुन पिंडीवर आकर्षक सजावट करण्यात आली. नंतर चक्क्याचा प्रसाद तयार करुन मंदिरात व सामाजिक संस्थाना वाटप करण्यात येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

प्रमोद भगवान, लता भगवान, लीना भागवत यांनी शंकराचा मुखवटा आणि मंदिरातील सेवक व पुजारी पुरुषोत्तम वैद्य, उमेश धर्माधिकारी, युवराज पवार, चंद्रकांत कासार, लक्ष्मीबाई पत्की, प्रभावती नांगरे, वैभव निलाखे, ॠषिकेश अभंग, सोमनाथ स्वामी यांनी संपूर्ण पिंड व सजावट तीन तासात साकारली. दत्तभक्त योगेश गोसावी व सोनाली गोसावी यांनी अभिषेक करण्यासाठी दत्तमहाराजांची दीड किलो चांदीची मूर्ती अर्पण केली. गोसावी परिवार यांच्या हस्ते सहकुटुंब माध्यान्य आरती झाली. 

प्रेम आणि रहस्याचा रंजक खेळ ‘रौद्र’

0

प्रत्येक गावाचा इतिहास असतो तसा माणसांचाही इतिहास असतो. याइतिहासाच्या गर्भात अनेक रहस्य दडलेली असतात. अशाच एका रहस्याचा शोध घेत असताना विविध भावभावनांचा खेळ रंगत जातो आणि त्यातून त्या रहस्याचं एक वेगळंच ‘रौद्र’ रूप समोर येतं. हे रूप नेमकं कोणाचं असणार? याची रंजक तेवढीच अकल्पित कथा म्हणजे ‘रौद्र’ हा मराठी चित्रपट. एम.जी पिक्चर्स निर्मित आणि रविंद्र शिवाजी लिखित-दिग्दर्शित‘रौद्र’ हा चित्रपट १ एप्रिललाप्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.‘अल्ट्रा मीडिया अॅन्ड एन्टरटेन्मेंट प्रा.लि’.कंपनीने या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.

वडगांव… एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं गाव….१९७० सालचा काळ…. त्रिंबक कुरणे नामक जनगणना अधिकारी जनगणनेच्या निमित्ताने वडगांवला येतो. त्रिंबकला इतिहासात रुची असते.नानासाहेब कुलकर्णीं हे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती. ते त्रिंबकची राहण्याची सोय त्यांच्या जुन्या वाड्यावर करतात. त्या वाड्याबद्धल चिक्कार अफवा असतात. वाडाही भव्य व भयानक असा असतो.काहीं दिवसात त्रिंबकला विचित्र व भयावह आवाज ऐकू येतात.नानासाहेबांकडे एक पुरातन बखर आहे ज्यात गावाबद्दल ऐतिहासिक माहिती आहे हेत्रिंबकला समजते. या बखरीतवेगवेगळी कोडी असतात ज्यामार्फत रहस्याचा उलगडा होणार असतो. नायिकेच्या मदतीनेकोडयामधील महत्त्वाचा धागा त्याचा हाती लागतो. मात्रया शोधाला अचानक विश्वासघाताचं ग्रहण लागतं, तेव्हा होणारा विनाश आणि त्याचं ‘रौद्र’ रूप या चक्रात कोण आणि कसं अडकणार? हे पहाणं अतिशय औत्सुक्यपूर्ण ठरणार आहे.या साऱ्याला एका अलवार प्रेमाच्यागोष्टीचीअनवट किनारही लाभली आहे.

राहुल पाटील आणि उर्मिला जगताप ही नवी फ्रेश जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. त्यांच्यासोबत  दीपक दामले, अनिता कोकणे, अमित पडवणकर,ईशान गटकळआदि कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत.चित्रपटाची कथा मंगेश बाळासाहेब गटकळ यांची असून पटकथा आणि संवाद रविंद्र शिवाजी यांचे आहेत. मंगेश बाळासाहेब गटकळ या चित्रपटाचे निर्माते तर सहनिर्माते समीर किसन गाडे आहेत. हर्षद गोलेसर, वैष्णवी अडोदे, शुभांगी केदार, शिरीष पवार या गायकांनी यातील गाणी गायली आहेत. संगीताची जबाबदारी अक्षय जाधव यांनी सांभाळली आहे. छायांकन स्वप्निल केदारे आणि संकलन आकाश मोरे यांचे आहे.

‘अल्ट्रा मीडिया अॅन्ड एन्टरटेन्मेंट प्रा.लि’.या कंपनीचे एमडी श्री. सुशिलकुमार अग्रवाल म्हणाले, कि, ‘मराठी रसिकप्रेक्षक चोखंदळ आहे. वेगवेगळ्या पठडीतल्या चित्रपटांच्याआशय-विषयाला त्यांनी नेहमीच चांगली दाद दिली आहे. मराठी चित्रपट प्रादेशिक गंध घेऊन राष्ट्रीय-आतंरराष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटवू लागला आहे. ‘रौद्र’ चित्रपटाची कथाउत्कंठावर्धक असून प्रेक्षकांना तीखिळवून ठेवेल आणि वेगळा अनुभव देईल’, असा विश्वास ते व्यक्त करतात.

नवोदित उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी डीईएसचे ‘डॉ. प्र. चिं. शेजवलकर उद्योजकता संशोधन केंद्र’

0

पुणे, ता. १ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) वतीने नवोदित उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘डॉ. प्र. चिं. शेजवलकर उद्योजकता संशोधन केंद्र’ सुरू करीत असल्याची घोषणा  डीईएसचे उपाध्यक्ष महेश आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, संचालक मिलिंद कांबळे, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्रसिंग परदेशी, ‘आयएमडीआर’च्या संचालिका डॉ. शिखा जैन या वेळी उपस्थित होत्या.

आठवले म्हणाले, व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांच्या स्मरणार्थ हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते येत्या शनिवारी (ता. ५ मार्च) सायंकाळी ५ वाजता फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अम्फिथिएटरमध्ये या केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे. स्पेल टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष राजेंद्र शर्मा. ल्युपिन रिसर्च पार्कचे वरिष्ठ उपाध्यक्ष गिरीप पाल सिंग, डॉ. सुषमा केसकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

आठवले पुढे म्हणाले, नावीन्यपूर्ण कल्पनांचे व्यवसायात रुपांतर करण्यासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन या केंद्राद्वारे केले जाणार आहे. नवोदित उद्योजकांच्या विचार प्रक्रियेला आकार देणे, व्यवसायाची योजना तयार करणे, कौशल्य विकसित करणे, बाजारपेठेचे सर्वेक्षण, वित्तपुरवठा योजनांची माहीती, विविध परवाने मिळविणे आदी उद्योजकाला आवश्यक असणारे गुण विकसित करण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. केंद्रासाठी आवश्यक मूलभूत सुविधा, संगणक कक्ष, प्रयोगशाळा आदी उपलब्ध करून देण्यात येणार असून, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळणार आहे.

तुळशीबाग राममंदिरात महाशिवरात्रीनिमित्त महारुद्र अभिषेक

0

सुमारे १५० वर्षांपूर्वीचे पुरातन शंकराचे मंदिर
पुणे : श्रीरामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने पेशवेकालीन तुळशीबाग राम मंदिर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त सुमारे १५० वर्षांपूर्वीच्या पुरातन शंकराच्या मंदिरात महारुद्र अभिषेक पूजेचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराच्या परिसरात मुख्य मंदिराशेजारील मांडवात हा सोहळा पार पडला. संस्थानचे कार्यकारी विश्वस्त रामदास तुळशीबागवाले यांच्या हस्ते महारुद्र अभिषेक करण्यात आला. 
यावेळी संस्थानचे भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होते. आराध्ये गुरुजी यांसह ब्रह्मवृंदांनी पौरोहित्य व मंत्रपठण केले. 
तुळशीबाग मंदिर परिसरातील शंकराचे मंदिर फुलांनी सजविण्यात आले होते. तसेच विद्युतरोषणाई देखील करण्यात आली होती. शंकराच्या पिंडीवर सकाळी ७ ते दुपारी १२.३० यावेळेत सलग साडे पाच तास अभिषेक करण्यात आला. दोन ते तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा तुळशीबागेत महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक कार्यक्रम उत्साहात होत असल्याने भाविकांनी देखील दर्शनाकरीता हजेरी लावली होती.

राज्यपाल कोश्यारींच्या छायाचित्राला जोड्याने बदडले ..

0

राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ शहर काँग्रेसचे आंदोलन

पुणे-महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत अवमानकारक वक्तव्‍य केल्याच्या निषेधार्थ आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली एस. एस. पी. एम. एस. शाळा, शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ ‘‘जोडो मारो आंदोलन’’ करण्यात आले. काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय जयकार करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. यावेळी बोलताना रमेश बागवे म्हणाले की, ‘‘महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी वक्तव्‍य केले की, ‘समर्थ रामदास नसते तर शिवाजींना कोणी विचारलं नसते’. अशा प्रकारे महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरी शब्दात उल्लेख करून महाराजांचा आणि देशाचा अपमान केला आहे. राज्यपांल सातत्याने वादग्रस्त विधाने करीत आहेत आणि मोदी सरकार त्यांची पाठराखण करीत आहे. भारतीय जनता पक्ष राज्यपालांच्या वक्तव्‍यावर मौन बाळगून आहेत. राज्यपालांनी त्वरीत माफी मागावी अन्यथा काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल.’’

     यावेळी बोलताना नगरसेवक अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘महाराष्ट्राचे राज्यपालांनी कुठलेही पुरावे नसताना असे सांगितले की, शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट झाली. खोटे बोलून जनतेची दिशाभुल करणे हा भाजपाचा अंजेडा राज्यपाल अतिशय चोखपणे राबवित आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरी शब्दात उल्लेख करण्याची मजाल राज्यपालांनी केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा घ्यावा. जर तसे झाले नाही तर आम्ही महाराष्ट्रात राज्यपालांचा कार्यक्रम होऊ देणार नाही याची नोंद मोदी सरकारने घ्यावी.’’

     यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, गटनेते आबा बागुल, कमल व्‍यवहारे, संजय बालगुडे, अनिल सोंडकर, शेखर कपोते, पुजा आनंद, विशाल मलके, नीता रजपूत, सोनाली मारणे, हाजी जाकीर शेख, नगरसेवक रविंद्र धंगेकर, लता राजगुरू, अविनाश बागवे, रफिक शेख, संगिता तिवारी, राजेंद्र शिरसाट, द. स. पोळेकर, रजनी त्रिभुवन, अरूण वाघमारे, राजाभाऊ कदम, प्रकाश पवार, रामदास मारणे, बाळासाहेब अमराळे, मुख्तार शेख, साहिल केदारी, यासीर बागवे, नारायण पाटोळे, राजू साठे, सचिन आडेकर, राजेंद्र भुतडा, प्रविण करपे, विजय खळदकर, रमेश सकट, विजय जाधव, वाल्मिक जगताप, अजित जाधव, अविनाश अडसूळ, मुन्नाभाई शेख, क्लेमेंट लाजरस, रॉर्बट डेव्हिड, परवेज तांबोळी, सुरेश कांबळे, विनोद रणपिसे गणेश भंडारी, बबलू कोळी, राजू गायकवाड, ॲड. राजश्री अडसूळ, सिमा महाडिक, शारदा वीर, फैय्याज शेख, रवी मोहिते आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मनु कुमार श्रीवास्तव राज्याचे मुख्य सचिव

0

मुंबई, दि. 28 : राज्याचे मुख्य सचिव म्हणून गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांची आज नियुक्ती करण्यात आली. त्यांनी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडून मुख्य सचिव पदाची सूत्रे स्वीकारली. श्री. चक्रवर्ती यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. श्रीवास्तव यांचे स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या.

श्री.मनु कुमार श्रीवास्तव यांचा जन्म १५ एप्रिल १९६३ रोजी झाला आहे. मूळचे लखनौ येथील श्री. श्रीवास्तव १९८६ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले. त्यांनी भौतिक शास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.

श्री. श्रीवास्तव यांनी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर जिल्हाधिकारी, नागपूर जिल्हाधिकारी, नागपूर महानगरपालिका आयुक्त, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, महसूल आणि वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अशा विविध पदांवर काम केले आहे.

यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप कुमार व्यास, ग्राम विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वित्त विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे यांनी मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांचे अभिनंदन केले.

रामदास स्वामींना महाराजांचा गुरु दाखवून बुद्धीभेद, कोश्यारींना केंद्राने परत बोलावावे-नाना पटोले

0


शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना राज्यातील भाजप नेते गप्प कसे?

मुंबई, दि. २८ फेब्रुवारी-छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत रामदास स्वामी नसते तर त्यांना कोणी विचारले असते? असे वादग्रस्त विधान करुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत असून जगभरात त्यांचा मोठा नावलौकिक आहे परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेल्या कोश्यारी यांनी छत्रपतींचा केलेला अपमान महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही, त्यांनी आपले विधान मागे घेत महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु नव्हते असे असतानाही काही विशिष्ट इतिहासकारांकडून इतिहासाची मोडतोड करुन रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु असल्याचे बिंबवण्याचा प्रयत्न मागील काही वर्षात जाणीवपूर्वक केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कतृत्व व त्यांची किर्ती महान आहे. त्यांच्या पराक्रमाची महती सातासमुद्रापार आहे परंतु रामदास स्वामींना महाराजांचा गुरु दाखवून बुद्धीभेद केला जात आहे. भगतसिंह कोश्यारी हे घटनात्मक पदावर बसून इतिहासाची मोडतोड करण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत आहेत. अशा व्यक्तीला राज्यपालपदावर बसण्याचा नैतिक अधिकार नाही, केंद्र सरकारने त्यांना परत बोलवावे.भारतीय जनता पक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांचा केवळ मताची पोळी भाजण्यासाठी वापर करत असतो हे वारंवार दिसून आले आहे. मागील आठवड्यात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीही शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होत असताना राज्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते गप्प कसे बसतात असा सवाल उपस्थित करुन ते महाराष्ट्रद्रोही असल्याचे दाखवून देत आहेत असे पटोले म्हणाले.

आणि वारज्याचा साहित्यिक कट्टा बहरला ….

0

पुणे-साहित्यिक कट्टा वारजे आयोजित जागतिक मराठी भाषा दिना निमित्त मराठी भाषा अध्यापकांचा सन्मान आणि ”मराठी आमची असे मायबोली” या विषयावर प्रा. मिलिंद जोशी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदिप धुमाळ ,प्रदिप उर्फ बाबा धुमाळ, वा दा. पिंगळे उपस्थित होते

यावेळी प्रा. मिलिंद जोशी बोलताना म्हणाले समाजाविषयी आस्था आणि आपुलकी असणारे नगरसेवक असतात पण इथे साहित्यिक उपक्रम झाले पाहिजे समाजाच्या वैचारिक भरण पोषण झालं पाहिजे असं वाटणारी लोकप्रतिनिधि फार कमी असतात प्रदीप धुमाळ आणि दिपाली धुमाळ हे समाजसेवेला संसार मानणारी मंडळी आहेत त्यामुळे त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित रहायला मिळाले याचा मला आनंद झाला

प्रा. जोशी पुढे म्हणाले मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्यापासून अजित पवार यांच्यापर्यंत आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून ते प्रकाश आंबेडकर यांच्यापर्यंत सगळ्यांच्या गाठीभेटी घेतल्या मला महाआघाडी सरकारचे खरोखरच कौतुक वाटते की आपले मंत्री मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा एवढा एकच मुद्दा घेऊन दिल्लीला जाऊन सांस्कृतिक मंत्रालयात भेटले ही गोष्ट मला फार महत्त्वाची वाटते आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असं वाटत असेल तर राजकीय इच्छाशक्तिचा प्रभाव जास्त महत्त्वाचा आहे आमच्या साहित्य क्षेत्रातील काही टीकाकार असे म्हणतात की आम्हाला अभिजात भाषेचा दर्जा मिळून काय करायचे त्यासाठी येणार पचाशे कोटी  त्याच्यावरती सगळ्यांचा डोळा असेल साहित्य परिषद म्हणून आम्ही नेहमीच भूमिका मांडत आलो त्या पाचशे कोटींशी आम्हाला काही घेणं देणं नाही शेवटी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा आमचा अभिमान आहे आणि तो आमच्या अस्मितेशी निगडित आहे असे मिलिंद जोशी यावेळी म्हणाले

आदर आणि विश्वास संपादन करणारे शिक्षक जुन्या काळामध्ये होते आणि आजही आहे मला त्याचा विशेष आनंद होतो आणि त्यामुळे मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती जपायची असेल तर तो संस्कार शालेय जीवनापासून होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी शिक्षकांची आणि पालकांची दोघांची जबाबदारी महत्त्वाची आहे असे ही मिलिंद जोशी यावेळी म्हणाले

आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण देणे खूप गरजेचे आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे आपली मातृभाषा, आपली मराठी भाषा आणि आपण मनापासून त्याविषयी प्रेम निर्माण केले पाहिजे मराठी भाषा दिन हा एका दिवसापुरता साजरा न होता वर्षभर साजरा व्हावा अशी अपेक्षा दिपाली धुमाळ यांनी यावेळी व्यक्त केलीआपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषा रुजविण्याचे काम शिक्षक करत असतात आणि त्यांनी या कामात खंड पडू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे प्रदीप धुमाळ यावेळी प्रस्ताविकात म्हणाले

मराठा समाजाच्या मागण्यांवर शासनाने घेतलेल्या या निर्णयांमुळे खासदार छत्रपती संभाजीराजेंचे उपोषण मागे

0

धिसंख्य पदनिर्मितीचा प्रस्ताव, सारथीमधील रिक्त पदांच्या भरतीसह अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला अतिरिक्त १०० कोटींचा निधी

मुंबई, दि.२८- मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी शिफारस झालेल्या एसईबीसी, ईएसबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अधिसंख्य पदे निर्मितीचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर आणण्याबरोबरच सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या संदर्भातील मागण्यांवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आले. दरम्यान, मंत्री दिलीप वळसे-पाटील, एकनाथ शिंदे आणि अमित देशमुख यांनी आझाद मैदान येथे उपोषणस्थळी जाऊन खासदार संभाजीराजे छत्रपती यांना या निर्णयांची जाहीर माहिती दिल्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी तीन दिवसांपासून सुरु केलेले आमरण उपोषण मागे घेतले आहे.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थानी तातडीची बैठक घेण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, खासदार राहुल शेवाळे आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह मुख्य सचिव देबाशिष चक्रबर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, नितीन करीर, सुजाता सौनिक, आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव सुमंत भांगे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मराठा समाज आंदोलनातील पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मराठा समाजाच्या मागण्यांवर निर्णय घेण्याची मागणी केली. दोन तासांपेक्षा अधिक वेळ चाललेल्या या बैठकीत या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले.

मराठा समाजाच्या मागण्यांवर शासनाने घेतलेले निर्णय खालीलप्रमाणे-

● सारथीकडून कौशल्य विकासाचे कार्यक्रम एका महिन्यात सुरु करण्यात येणार.

● सारथी संस्थेचे व्हिजन डॉक्युमेंट तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ३० जून २०२२ पर्यंत तयार करणार.

● सारथीमधील रिक्त पदे दि.१५ मार्च, २०२२ पर्यंत भरण्याचा निर्णय.

● सारथी संस्थेच्या राज्यभरातील आठ उपकेंद्रांसाठी जमीन देण्याचा प्रस्ताव दि.१५ मार्च २०२२ पर्यंत मंत्रीमंडळास सादर करुन मान्यता घेण्यात येणार.

● अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला चालू आर्थिक वर्षात मंजूर रु. १०० कोटीपैकी रु. ८० कोटी प्राप्त झाले आहेत. उर्वरित रु. २० कोटी उपलब्ध करुन देण्याबरोबरच पुरवणी मागणीव्दारे अतिरिक्त १०० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देणार.

● व्याज परताव्यासंदर्भात कागदपत्रांची पूर्तता करुन प्रस्ताव प्राप्त झाल्यास तातडीने व्याज परतावा देणार. क्रेडिट गॅरंटीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार.

● परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज परताव्याबाबत धोरण तयार करण्यात येत आहे.

● व्याज परताव्यासाठी कर्जाची मुदत रु.१० लाखांवरून रु.१५ लाख करण्यात येईल.

● अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व इतर दोन महामंडळांवर पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालकांची दि. १५ मार्च २०२२ पर्यंत नियुक्ती करणार. त्याशिवाय संचालक मंडळाची आणि आवश्यकतेनुसार इतर कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात येणार.

● जिल्ह्यांमध्ये स्थापन करावयाच्या वसतीगृहांची यादी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून आजच उपलब्ध करून घेऊन तयार असलेल्या वसतीगृहांचे येत्या गुढीपाडव्याच्या दिवशी उद्धाटन करण्यात येणार.

● कोपर्डी खून खटलाप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल अपिलाची सुनावणी तातडीने घेण्यासाठी महाधिवक्त्यांना विनंती करून दि. २ मार्च, २०२२ रोजी प्रकरण मेंन्शन करण्यात येईल

● रिव्ह्यू पिटीशनची सुनावणी खुल्या न्यायालयात घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पंधरा दिवसात अर्ज करण्यात येईल त्याबाबतचे प्रकरण सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे हाताळतील.

● मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याच्या कार्यवाहीचा दरमहा गृह विभागाकडून आढावा बैठक घेण्यात येईल. प्रलंबित प्रकरणाचा आढावा घेवून तसेच ज्या आंदोलनात व्हिडीओ फुटेजमध्ये ज्यांचा गुन्ह्यामध्ये सहभाग नव्हता त्यांचेवरील देखील गुन्हा मागे घेण्यासाठी प्रकरणनिहाय निर्णय घेण्यात येईल. तसेच जे गुन्हे मागे घेतलेले आहेत परंतु न्यायालयीन पटलावर प्रलंबित आहेत त्याचा आढावा घेवून प्रकरणनिहाय त्याचा निर्णय घेण्यात येईल.

● मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या ९ सप्टेंबर २०२० च्या स्थगिती आदेशापूर्वी नियुक्तीकरिता शिफारस झालेल्या परंतु ९ सप्टेंबर २०२० नंतर सुधारित निवड यादीनुसार जे एसईबीसी, ईएसबीसी व इडब्ल्युएस उमेदवार शासकीय सेवेतून बाहेर पडतील त्यांच्यासाठी मानवतावादी दृष्टीकोनातून अधिसंख्य पदे निर्माण करुन त्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव एक महिन्यात मंत्रीमंडळापुढे सादर करणार.

● मराठा आंदोलनात मृत पावलेल्यांच्या वारसदारांना एस. टी. महामंडळात नोकरी देण्याच्या उर्वरित प्रस्तावावर तात्काळ निर्णय घेऊन संबंधित उमेदवारांकडून कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर त्यांना तात्काळ नोकरी देण्याचा निर्णय.

उपोषणस्थळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासनाच्या निर्णयांचे केले जाहीर वाचन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाला, त्यानंतर त्या निर्णयांचे मागणीनिहाय इतिवृत्त तयार करुन सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आझाद मैदान येथे उपोषणस्थळी जाऊन खासदार संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेतली. शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांवर घेतलेल्या निर्णयांचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर वाचन केले. टाळ्यांच्या कडकडाटात आंदोलकांनी शासनाच्या या निर्णयांचे स्वागत केले. मराठा समाजाच्या मागण्या शासनाने मान्य केल्या असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण मंत्रीमंडळाच्या वतीने खासदार संभाजीराजे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानून खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे उपोषण मागे

मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन या मागण्या इतिवृत्तात आणल्या आहेत, नुसते आश्वासन दिलेले नाही तर हे निर्णय घेण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम दिला आहे, याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण मंत्रीमंडळाचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आभार मानले. एसईबीसी, ईएसबीसी आणि इडब्ल्यूएस उमेदवारांच्या नियुक्त्यांचा निर्णय ऐतिहासिक असून या निर्णयावर कोणताही न्यायालयीन वाद उद्‍भवल्यास शासनाबरोबर राहू, अशी ग्वाहीही यावेळी खासदार संभाजीराजे यांनी दिली. त्यानंतर तीन दिवसांपासून सुरु असलेले उपोषण मागे घेत असल्याची घोषणा त्यांनी केली.

शिवरायांबद्दलच्या वक्तव्याने शिवसेनेत राज्यपालांबद्दल संताप -आंदोलनाद्वारे केली राजीनाम्याची मागणी

0

पुणे-छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिह कोशारी यांचा शिवसेना पुणे शहराचे वतीने जाहिर निषेध करून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, नगरसेवक संजय भोसले, पल्लवी जावळे, विशाल धनवडे, गजानन पंडित, राजेंद्र शिंदे, मतदार संघ संपर्कप्रमुख रामभाऊ कदम, दिपक शेडे, प्रशांत राणे, भरत कुंभारकर, उत्तम भुजबळ, प्रविण डोंगरे, संजय डोंगरे, उमेश गालिंदे, अनिल दामजी, चंदन साळुंके, सुरज लोखंडे, राहुल जेकटे, जावेद खान, प्रसाद काकडे, योगेश पवार, नंदू येवले, संदिप गायकवाड, जगदिश दिघे, सागर बारणे, बाळासाहेब गरुड महिला आघाडीच्या सुनिता खंडाळकर, करूणा घाडगे, प्रज्ञा लोणकर, स्वाती कथलकर, धनश्री बोराडे, वैशाली दारवटकर, जयश्री भणगे, अनुपमा मांगडे, युवा सेनेचे आकाश शिंदे, युवराज पारिख, सनी गवते, परेश खांडके, अक्षय फुलसुंदर आदी सैनिक उपस्थित होते .

यावेळी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे म्हणाले कि,’ छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि पराक्रम संपूर्ण देशाला माहिती आहे, परदेशात त्यांच्या युद्धनीतीचा अभ्यास केला जातो. राज्यपालांना महाराष्ट्रातील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास व पराक्रमाची माहिती देउ शकेल. ती त्यांनी आत्मसात करावी. महाराष्ट्रात भाजप नेत्यांकडून छत्रपती शिवरायांचा कायम अवमान होत आहे. आणि इतर राज्यामधे देखील त्यामधे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, कर्नाटक सरकार, केंद्रीय मंत्री, राज्यपाल भगतसिंग कोशारी, पुणे शहर भाजप यासर्वांनी छ. शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे. महाराजांचा एकेरी उल्लेख करून त्यांना दुय्यम दर्जाचे स्थान देण्याचा भाजप नेत्यांकडून कायम प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे. कोशारींच्या वक्तव्यावर भाजप कडून राजीनामा घेतला जाणार का ? हे जाहिर करावे.

महाराष्ट्रातील सहा शिक्षकांना ‘राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार’

0

नवी दिल्ली ,दि. २८ : शालेय शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या सहा शिक्षकांना आज केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय आयसीटी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.पुणे, उस्मानाबाद, पालघर, नाशिक आणि यवतमाळ जिल्हयातील जिल्हा परिषद शाळेच्या सहा शिक्षकांना यावेळी गौरविण्यात आले.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी)वतीने येथील डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये “वर्ष २०१८ आणि २०१९ च्या राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार” वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या सहसचिव एल.एस.चांगसान,एनसीईआरटीचे संचालक प्रा. दिनेश प्रसाद यावेळी उपस्थित होते

.
शैक्षणिक मोबाईल ॲप,उच्च गुणवत्तापूर्ण ई-सामुग्री निर्मिती, दृष्य व श्राव्य सामुग्री निर्मिती,संगणक,दूरचित्रवणी,आकाशवाणी,सॉफ्टवेयर,हार्डवेयर आदिंचा उपयोग करून शालेय शिक्षण सुलभ, गुणात्मक आणि संशोधनात्मक बनविणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी देशभरातील २५ शिक्षकांना वर्ष २०१८ चे पुरस्कार प्रदान करण्यात आले यात महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा समावेश आहे. तर, देशभरातील २४ शिक्षकांना वर्ष २०१९ चे पुरस्कार प्रदान करण्यात आले, यातही राज्यातील तीन शिक्षकांचा समावेश आहे

राज्यातील तीन शिक्षकांचा २०१८ च्या पुरस्काराने सन्मान
महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना या समारंभात वर्ष २०१८चे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या शिक्षकांमध्ये पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील जांभूळधरा येथील जिल्हा परिषदेचे शिक्षक नागनाथ विभुते, उस्मानाबाद जिल्ह्याच्या कडोदरा तालुक्यातील जगदंबानगर येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक उमेश खोसे आणि पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील मल्यानराठी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आनंदा अनीमवाड यांचा समावेश आहे.
तीन शिक्षकांना २०१९ चा पुरस्कार प्रदान
राज्यातील तीन शिक्षकांना वर्ष २०१९चे पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील पिंपळगावतर्फे म्हाळुंगे येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका मृणाल गांजळे,नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील करंजवन येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक प्रकाश चव्हाण आणि यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील बिटरगाव जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शफी शेख यांचा समावेश आहे.
मुंबई येथील एैरोली भागातील आयसीएसई खाजगी शैक्षणिक संस्था पुरस्कृत शाळेच्या शिक्षिका प्रेमा रेगो यांनाही वर्ष २०१९ च्या राष्ट्रीय आयसीटी पुरस्काराने गौरविण्यात आले.

हिमालया वेलनेस कंपनीने अक्षय पात्र फाउंडेशनमार्फत सरकारी शाळांमधील मुलांना जेवू घालण्याची वचनबद्धता कायम राखली

0

मध्यान्ह भोजन योजनेमध्ये सरकारी शाळांमधील १३००० पेक्षा जास्त मुलांना जेवण पुरवून साहाय्य प्रदान केले जात आहे

हिमालया बंगलोरमधील अक्षय पात्र स्वयंपाकघराची केपेक्स आवश्यकता पूर्ण करण्यात देखील साथ देत आहे

पुणे  २८ फेब्रुवारी २०२२: प्रत्येक घरामध्ये आरोग्य व सुख नांदावे आणि प्रत्येक मन आनंदी राहावे यासाठी प्रयत्न करत राहण्याच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून हिमालया वेलनेस कंपनीने भारतातून भूकमारी आणि कुपोषण या समस्या कायमच्या दूर व्हाव्यात यासाठी काम करणाऱ्या, अक्षय पात्र फाउंडेशन या विना-नफा तत्त्वावर चालवल्या जाणाऱ्या संस्थेसोबत आधीपासून असलेली आपली भागीदारी अधिक मजबूत केली आहे. या उपक्रमामार्फत हिमालया सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या १३,००० पेक्षा जास्त मुलांना मध्यान्ह भोजन योजनेमार्फत साहाय्य प्रदान करत आहे. अक्षय पात्र फाउंडेशनच्या बंगलोर येथील स्वयंपाकघरामध्ये हेवी ड्युटी मिक्सर, रोस्टर मशीन आणि बेंच ड्रिलिंग मशीन पुरवून त्याठिकाणी अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी केपेक्स साहाय्य देखील हिमालयाने पुरवले आहे.

शाळेत जाणारी, खास करून ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुले रोजच्या जेवणातून पुरेसे पोषण मिळत नसल्याने कुपोषणाने ग्रस्त असतात. मध्यान्ह भोजन योजनेमध्ये मुलांना वेळेवर, आरोग्यवर्धक आणि पोषक जेवण पुरवले जाते. कुपोषणाची समस्या दूर व्हावी हा यामागचा उद्देश आहे. शालेय शिक्षण अर्धवट सोडून देणाऱ्या मुलांची संख्या कमी व्हावी आणि सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण वाढावे यासाठी देखील या योजनेचे खूप मोठे योगदान आहे.

चीफ ऑपरेटिंग ऑफिसर व चीफ फायनान्शियल ऑफिसर श्रीमती जयश्री उल्लाल यांनी सांगितले, अल्पपोषणलक्षात न येणारी भूक आणि स्थूलपणा हे असे महत्त्वाचे घटक आहेत जे मुले आणि वयस्कांच्या आयुष्यालावाढीला आणि विकासाला धोकादायक ठरतात.  मुलांचे भविष्य निरोगी राहायला हवे असेल तर त्यांना लहानपणापासून आवश्यक पोषण पुरवले जाणे अत्यंत गरजेचे आहे. लोकांनी अधिक निरोगी आणि अधिक आनंदी जीवन जगावे यासाठी त्यांना सक्षम बनवण्यासाठी हिमालया नेहमीच प्रयत्नशील असते.  आरोग्यशिक्षण आणि स्वच्छता याबाबतीत वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सकारात्मक व दीर्घकालीन प्रभाव निर्माण करण्यासाठी आम्ही झटत असतो. २०१६ पासून अक्षय पात्र फाउंडेशनसोबत सातत्याने अधिकाधिक दृढ होत असलेल्या आमच्या भागीदारीमागचा विचार देखील हाच आहे.  मुले आनंदी राहावीतउत्तम पोषणाच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्याचा भक्कम व निरोगी पाया रचला जावा यासाठी आवश्यक साहाय्य पुरवण्याचे काम आम्ही सुरूच ठेवू.”

कृतज्ञता व्यक्त करताना द अक्षय पात्र फाउंडेशनचे सीएमओ श्री. संदीप तलवार यांनी सांगितले, “लाखो मुलांना आरोग्य आणि पोषण पुरवण्याच्या आमच्या वाटचालीत गेली अनेक वर्षे आम्हाला हिमालयाची मोलाची साथ लाभत आहे याबद्दल आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत. आरोग्यवर्धक मध्यान्ह भोजन पुरवण्याच्या सत्कृत्यामध्ये हिमालया सातत्याने साहाय्य प्रदान करत आहे याबद्दल त्यांचे आभार! भारतभरातील वंचित समुदायांमधील मुलांना पोषक जेवण पुरवण्याचे आमचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या कामी हिमालयाचा सहयोग खूप महत्त्वाचा ठरत आहे.”

सरकारी आणि सरकारी अनुदान प्राप्त शाळांमधील मुलांना अक्षय पात्र फाउंडेशन पोषक जेवण पुरवते.  २०१६ पासून अक्षय पात्र फाउंडेशनचे कॉर्पोरेट पार्टनर म्हणून हिमालयाने आजवर सरकारी शाळांमधील ५०००० हुन जास्त मुलांना साहाय्य प्रदान केले असून गरजू शाळकरी मुलांना जवळपास ५० लाख जेवणे पुरवली गेली आहेत. याबरोबरीनेच लॉकडाऊनच्या काळात वाटप करण्यात आलेली ७१४६ “हॅप्पीनेस किट्स” किंवा सुक्या रेशनची किट्स देखील त्यांनी प्रायोजित केली होती. 

पुणे जिल्ह्यात वीजबिलांची थकबाकी ३१०९ कोटींवर

0

थकबाकीचा तात्काळ भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित होणार

पुणे, दि. २८ फेब्रुवारी २०२२: जिल्ह्यातील महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, पथदिवे तसेच सार्वजनिक सेवा व इतर सर्व वर्गवारीतील ९ लाख ४३ हजार ५६४ ग्राहकांच्या वीजबिलांची थकबाकी सद्यस्थितीत ३१०९ कोटींवर गेली आहे. या थकबाकीमुळे निर्माण झालेली आर्थिक कोंडी फोडण्यासाठी महावितरणकडून पुणे जिल्ह्यात वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई तीव्र करण्यात आली आहे.

वाढत्या थकबाकीच्या पार्श्वभूमिवर विजेची मागणी व पुरवठा यामध्ये महावितरणला वीजखरेदीचा आर्थिक ताळमेळ बसविण्यासाठी सध्या वीजग्राहकांच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे. दरमहा वसुलीच्या सुमारे ८० ते ८५ टक्के रकमेतून वीजखरेदी केली जाते. ‘कोरोना’ची तिसरी लाट ओसरल्यामुळे जनजीवन सुरळीत आहे. सोबतच वाढत्या उन्हामुळे सर्वच वर्गवारीमध्ये वाढत्या वापराने विजेच्या मागणीत मोठी वाढ होत आहे. दुसरीकडे थकबाकी वाढतच असल्याने वीजखरेदीसाठी पैसे कुठून आणायचे हा प्रश्न महावितरणसमोर निर्माण होत असल्याने थकबाकी वसूलीला वेग देण्यात आला आहे. वीजग्राहकांनी सहकार्य करून थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे.

पुणे जिल्ह्यात सद्यस्थितीमध्ये घरगुती ६ लाख ३० हजार ५८१ ग्राहकांकडे १३७ कोटी २७ लाख, वाणिज्यिक ८८ हजार ६६ ग्राहकांकडे ४३ कोटी ५० लाख, औद्योगिक ११ हजार ५८२ ग्राहकांकडे १८ कोटी ५६ लाख रुपये तसेच कृषी ३ लाख १२ हजार ९८३ ग्राहकांकडे २३२४ कोटी ३५ लाख आणि पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांकडे ५६८ कोटी १९ लाख व सार्वजनिक सेवा वर्गवारीसह सर्व ग्राहकांकडे एकूण ३१०९ कोटी ९ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये कृषी ग्राहकांनी दि. ३१ मार्च २०२२ पर्यंत २३२४ कोटी ३५ लाखांपैकी ५० टक्के थकबाकीचा भरणा केल्यास त्यांना उर्वरित थकबाकी माफ करण्यात येत आहे.

महावितरणच्या महसुलाचा आर्थिक स्त्रोत प्रामुख्याने वीजबिलांची वसुली हाच आहे. वीजखरेदी, दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च, कर्जांचे हप्ते, कंत्राटदारांची देणी, आस्थापनांचा खर्च आदींचा सर्व खर्च वीजबिल वसुलीवरच अवलंबून आहे. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांनी वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत व चालू वीजबिलांचा प्राधान्याने भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

या मोहिमेत थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्यानंतर संबंधित वीजजोडण्यांची स्वतंत्र पथकांद्वारे पडताळणी सुरु आहे. तसेच या वीजजोडण्यांची सायंकाळनंतर देखील विशेष तपासणी करण्यात येत आहे. या दोहोंमध्ये शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर आढळल्यास शेजारी व वीज वापरणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५/१३८ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. सोबतच थकीत बिलाची रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे.

घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना www.mahadiscom.in वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.