अहमदाबाद, २८ फेब्रुवारी २०२२: भारतातील आघाडीची रिअल इस्टेट विकास कंपन्यांपैकी एक असलेल्या अरविंद स्मार्टस्पेसेस लिमिटेड (एएसएल)ने पुण्यात ३५ एकर जमिनीच्या खरेदीसाठी अंतिम करार करताना १०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. ही जमीन पुण्यातील छोटी बाजारपेठ असणाऱ्या भूगावमध्ये आहे. या नवीन प्रकल्पामध्ये १.३ दशलक्ष चौरस फूट इतकी विकास क्षमता असलेल्या आलिशान निवासी व्हिला असणार आहेत. जेव्हा हे तयार होईल तेव्हा हा प्रकल्प अरविंद स्मार्ट स्पेसेसचा पहिला मोठा क्षैतिज निवासी विकास प्रकल्प म्हणून ओळखला जाईल आणि हा शहरातला दुसरा निवासी प्रकल्प असेल.
भूगाव हा मुळशी रस्त्याला लागून असलेला महत्वाचा निवासी भाग असून पुण्यातील वेगाने वाढणाऱ्या आणि विकसीत होत असलेल्या भागांपैकी एक आहे. पुण्यातील लोकप्रिय आयटी हब असलेल्या हिंजवडीपासून हा प्रकल्प जवळच आहे. वेगाने विकसीत होत असलेली ही नवीन बाजारपेठ पुण्यातील कोथरूड, चांदणी चौक, औंध, पाषाण, बाणेर इत्यादी ठिकाणांच्या जवळ आहे. कंपनी या प्रकल्पाला इक्विटीमधील भाग, अंतर्गत जमा आणि नवीन कर्जातून निधी पुरवेल.
अरविंद स्मार्ट स्पेसेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कमल सिंगाल म्हणाले, “पुण्यातील निवासी प्रकल्पांचा पोर्टफोलिओ बळकट करताना भूगाव मधील नवीन प्रकल्पाची घोषणा करताना आम्हांला खूप आनंद होत आहे. कोथरूड मध्ये आमच्या पहिल्या प्रकल्पाच्या यशस्वितेनंतर या प्रकल्पामुळे पुण्याच्या आणखी एका नवीन बाजारपेठेत आमचा प्रवेश होत आहे. अलिशान आणि व्हिला पद्धतीच्या निवासी प्रकल्पांची मागणी वाढताना आम्ही बघत आहोत आणि आमच्या पोर्टफोलिओमध्ये या प्रकल्पाची भर घालताना आम्हांला खूपच आनंद होत आहे. हे ठिकाण शहरापासून जवळ असले तरी दाटीवाटीपासून लांब आहे. हिरवाईत, निसर्गाच्या जवळ जाणारे आणि क्षैतिज विकासासाठी आदर्श आहे. बंगळूरू आणि अहमदाबाद येथे स्वतःच्या कार्याचा ठसा उमटविल्यानंतर पुणे आणि एमएमआर सारख्या नवीन विकास होत असलेल्या बाजारपेठेत गुंतवणूक करण्याचे आमचे धोरण हे या जमीन अधिग्रहणाशी सुसंगत आहे.”
अरविंद स्मार्ट स्पेसेसने २०१९ च्या सुरुवातीला पुण्यातील एलनच्या सादरीकरणातून महाराष्ट्रातील बाजारपेठेत प्रवेश केला. हा प्रकल्प पुण्यातील कोथरूड भागातील १.३ लाख चौरस फूट एकूण बिल्टअप एरिया मध्ये स्थित आहे. अरविंद एलन मध्ये उच्च दर्जाच्या अलिशान वैशिष्ट्यांसह २ बीएचके अपार्टमेंटची १२० युनिट्स आहेत. या प्रकल्पाची रचना खास बाजारपेठ डोळ्यासमोर ठेऊन करण्यात आली आहे आणि जास्तीत जास्त जागेचा वापर करून यातून आधुनिक शैलीतील जीवनमान प्रतीत होते.
अरविंद स्मार्ट स्पेसेसने अलिकडेच दोन नवीन मोठ्या स्तरावरील प्रकल्पांची भर घातली. पहिला प्रकल्प बंगळूरू मधील देवनहल्ली येथे असून एचडीएफसी प्लॅटफॉर्म खाली त्याची अंमलबजावणी होईल आणि दुसरा निवासी व्हिला प्रकल्प बंगळूरू मधील सर्जापूर येथे आहे. अहमदाबाद, गांधीनगर, बंगळूरू आणि पुण्यात कंपनीचा साधारण २५ दशलक्ष चौरस फुटांचा बांधकाम विकास आहे.
अरविंद स्मार्ट स्पेसेस विषयी:
लालभाई समूहाच्या १२० वर्षे जुन्या वारशावर उभारलेली आणि २००८ मध्ये स्थापना झालेली अरविंद स्मार्ट स्पेसेस ही भारतातील आघाडीची बांधकाम व्यवसाय विकास कंपनी असून तीचे मुख्यालय अहमदाबाद येथे आहे. देशभरात जवळपास २५ दशलक्ष चौरस फूट बांधकाम व्यवसाय विकास कंपनीने केला असून ग्राहकांच्या आयुष्याला मोल प्राप्त करून देणाऱ्या बांधकाम व्यवसाय सुविधा पुरविण्यावर कंपनीचा भर आहे आणि देशातीलआघाडीची कॉर्पोरेट बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील कंपनी म्हणून ती वेगाने पुढे येत आहे. अहमदाबाद, गांधीनगर, बंगळूरू आणि पुण्यात कंपनीचा बांधकाम व्यवसाय विकास आहे. अरविंद समुहाचे मोठे पाठबळ आणि या आधीच्या प्रकल्पातून मिळविलेली विश्वासार्हता यातून सर्व भागधारकांना अधिकाधिक सेवा पुरवत आणखी मजबूत विकासाच्या कंपनीच्या योजना आहेत.