Home Blog Page 2065

पुणे विद्यापीठातील बस सेवा पूर्ववत सुरु

0

भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांच्या प्रयत्नाला यश

पुणे ता.३ : गेल्या दोन वर्षांपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएमपीएमएलची खंडीत असलेली बससेवा आजपासून पुन्हा सुरु करण्यात आली. भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने व पीएमपीएमएलचे संचालक प्रकाश ढोरे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते डेक्कन जिमखाना या बसला हिरवा झेंडा दाखवून ही बस मार्गस्थ केली.

यावेळी भाजप शिवाजीनगर मंडल सरचिटणीस आनंद छाजेड, शिवाजीनगर युवा मोर्चा सरचिटणीस रोहित भिसे, खडकी युवा मोर्चा अध्यक्ष अजित पवार, पीएमपीएमएलचे डेपो मॅनेजर नारायण कर्डे, समीर अत्तार प्लानिंग ऑफिसर चंद्रकांत वरपे, संजय शिवले, चालक ज्ञानेश्वर बाविस्कर, वाहक बाळासाहेब तिकोने,   दैनिक सकाळचे बाबा तारे,बातमी डॉट इनचे राजेश माने, सोनाली निकाळजे, वर्षा शिंदे, नंदा खंडागळे, मीरा काकडे, सोनाली तुंडलायत, आशा लोट, स्वीटी दुसाने, लीना पगारे, कल्पना देवरे, मीरा काकडे, बाबुराव बावधाने, सुरेश काशीद,नंदू वाडिया, ऋषिकेश करोते, संदीप बोत्रे, महेंद्र उर्फ बंडू कदम, बुद्धभूषण मंडळाचे उपाध्यक्ष शशिकांत भालेराव, अरुण बागडी, संदीप चौरे, नितीन गायकवाड (एच.एम.), संतोष भिसे, रोहित लोखंडे, हिमांशू मुथय्या, ऋषभ काळे, सिद्धांत जगताप, सुनील कांबळे,राहुल कांबळे,संकेत कांबळे, अनिल माने, प्रतिक वाघमारे, आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुनील माने म्हणाले, भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएमपीएमएलची बससेवा गेल्या दोनवर्षांपासून खंडीत करण्यात आली होती. विद्यापीठातील बस सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांना अथवा स्थानिक महिलांना शहरात जाण्यासाठी जवळपास तीन किलोमीटर पायी प्रवास करावा लागत होता. पुणे शहराचा महत्वाचा भाग असूनही येथे वाहतुकीची समस्या असल्याने याबाबत मी पीएमपीएमएलचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा व पीएमएलचे संचालक प्रकाश ढोरे यांना पत्र देऊन ही बस सेवा तातडीने सुरु करण्याविषयी विनंती केली होती. यानुसार आज पासून बससेवा सुरु करण्यात आली.

प्रकाश ढोरे म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अनेक लोकपयोगी कामे आम्ही सातत्याने करत असतो. या पूर्वी औंध रोड, बोपोडी भागात अनेक विकास कामे केली आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये बस सेवा पूर्ववत सुरु करणे ही सुरुवात असून येणाऱ्या काळात अनेक विकास कामे आम्हाला या भागात करायची आहेत. ही बससेवा पूर्ववत सुरु झाल्याने येथील महिला व विद्यार्थ्यांची गैरसोय कमी होईल.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अनेक समस्या आहेत मात्र ते जाणून घेण्यासाठी आजवर आमच्या पर्यंत कोणी आले नव्हते. पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या भागातील समस्या सोडवण्यासाठी नगरसेवक प्रकाश ढोरे व सुनील माने यांनी पुढाकार घेतला आहे. असे मत या भागातील महिलांनी व्यक्त केले. 

संतांचे वाड्.मयच जीवनात सकारात्मकता आणते

0

कीर्तनभूषण ह.भ.प. पूजा देशमुख ; श्रीरामजी संस्थान तुळशीबागतर्फे भागवत एकादशीनिमित्त कीर्तन
पुणे : समर्थ रामदास स्वामींनी आदर्श जीवनपद्धती सांगितली आहे. दासबोधात याबाबत सुरेख मार्गदर्शन देखील करण्यात आले आहे. माणसाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दासबोधात मिळते. मनाच्या श्लोकांतून समर्थांनी मनाला बोध दिला आहे. असे संतांचे वाड्.मय फक्त पाठांतराकरीता नसून आचरणाकरीता आहे. ख-या अर्थाने जीवनात सकारात्मकता आणणारे संतांचे वाड्.मय आहे, असे मत ह.भ.प. पूजा देशमुख यांनी व्यक्त केले. 
श्रीरामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने तुळशीबाग राम मंदिरात भागवत एकादशीनिमित्त कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त रामदास तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. 
ह.भ.प.पूजा देशमुख म्हणाल्या, हरिभक्ती आचरताना कोण काय म्हणेल, याचा विचार भक्त करीत नाहीत. हरिभक्तीत जे आपले आयुष्य सार्थकी लावतात, तेच जीव धन्यता मिळवितात. संतांच्या अनेक गोष्टी, विचार, साहित्याकडे दुर्लक्ष होत असून संतांचे वाड्.मय हीच आपली खरी संपत्ती आहे. परमार्थिक वृत्ती घडविण्याचे काम हरिभक्ती करते. 
त्या पुढे म्हणाल्या, गरीबाची झोप ही ख-या अर्थाने श्रीमंत असते. मात्र, श्रीमंताला अनेक चितांमुळे झोप येत नाही. मनाचा संतोष हा हरिभक्तीमध्ये असतो. मनाचा संतोष हे आपले भाग्य, धन आणि परमेश्वर आहे. त्यामुळे जीवनात धन्यता मिळण्यास हरिभक्तीशिवाय पर्याय नाही, असेही त्यांनी सांगितले.

पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा ७ मार्चपासून

0

पुणे : पूना क्लबच्या वतीने पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पूना क्लब येथे दिनांक ७ ते १२ मार्च दरम्यान होणार आहे. जेट सिंथेसिस, देसाई ब्रदर्स, फिनलॅंड इंटरनॅशनल स्कूल हे स्पर्धेचे मुख्य प्रायोजक तर ब्रिहन नॅचरल प्राॅडक्टस हे सहयोगी प्रायोजक आहेत. अशी माहिती स्पर्धा समितीचे अध्यक्ष शशांक हळबे  यांनी दिली. 
स्पर्धेचे यंदा ८ वे वर्ष आहे. क्लबमधील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते. स्पर्धेचे उद्घाटन सोमवार, दिनांक ७ मार्च  रोजी सायंकाळी ४ वाजता होणार असून यावेळी  पूना क्लबचे अध्यक्ष नितीन देसाई, उपाध्यक्ष सुनील हांडा, अमेय कुलकर्णी, मुख्य प्रायोजक राकेश नवाणी, तारीक पारवानी, उमेश पिल्लई,रणजित पांडे उपस्थित राहणार आहेत. 
स्पर्धेत क्लबमधील १२ ते ५५ वयोगटातील सदस्य सहभागी होणार आहे. या खेळाडूंची लिलावाद्वारे विभागणी करण्यात आली आहे. अर्जून मोटाडू या खेळाडूला लिलावात सर्वाधिक बोली लागली. त्याला टायगर्स संघाने ७  हजार ८०० रुपये बोली लावून संघात घेतले. 
शशांक हळबे म्हणाले, प्रत्येक संघात १२ ते १४ खेळाडू असणार आहेत. यातील ९ खेळाडू मैदानात असतील. ही स्पर्धा साखळी आणि बाद फेरी स्वरुपात होणार आहे. प्रत्येक सामना ६ षटकांचा असणार आहे. स्पर्धेत दहा संघ सहभागी होणार असून, या संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. या दोन गटांतून चार संघ उपांत्य फेरीत दाखल होतील आणि त्यानंतर अंतिम सामना १२ मार्चला खेळला जाणार आहे. 
स्पर्धेतील विजेत्या संघाला ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू, सर्वोत्तम यष्टिरक्षक, सर्वोत्तम फलंदाज, सर्वोत्तम गोलंदाज यांनाही वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहे. आॅल स्टार्स, जॅग्वार्स, जेटस्, किंग्ज, माॅव्हरिक, सेलर्स, टायगर्स, टायफून्स, वेलकिन ईगल्स, वाॅरियर्स हे संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. 

आर्यन पम्प्स एमएसएलटीए 15000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत झील देसाई, वैदेही चौधरी, समा सात्विका यांचे सहज विजय

0

नागपुर, 2 मार्च 2022: नागपुर जिल्हा हार्ड कोर्ट टेनिस संघटना यांच्या वतीने आयोजित व आयटीएफ, एआयटीए, एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या आर्यन पम्प्स एमएसएलटीए 15000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत पहिल्या फेरीत झील देसाई, वैदेही चौधरी, समा सात्विका या मानांकित खेळाडूंनी सहज विजय मिळवत आगेकूच केली. 
नागपूर,रामनगर येथील एमएसएलटीए टेनिस कोर्टवर सुरू झालेल्या या स्पर्धेत एकेरीच्या मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत अव्वल मानांकित झील देसाई हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत सौम्या विजचा 6-0, 6-1  असा, तर दुसऱ्या मानांकित रशियाच्या ऍना उरके हिने भारताच्या क्वालिफायर निधित्रा राजमोहनचा 6-3, 6-1 असा सहज पराभव केला. जर्मनीच्या तिसऱ्या मानांकित एमिली सेबोल्ड हिने भारताच्या निधी चिलूमुलाचे आव्हान 6-4, 6-1 असे संपुष्टात आणले.  पाचव्या मानांकित वैदेही चौधरीने सोहा सादिकला 6-3, 6-4 असे पराभूत केले.  
पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या श्रेया तातावर्तीने क्वालिफायर जगमीत कौर ग्रेवालचा 6-3, 5-7, 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली.  हा सामना 2 तास 13 मिनिटे चालला. माजी राष्ट्रीय विजेती साई संहिता चमर्तीने आपल्या अनुभवाचा वापर करत वंशिता पठानियाचा 4-6, 6-3, 6-1 असा संघर्षपूर्ण पराभव केला. उभारती टेनिसपटू श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती हिने क्वालिफायर शर्मदा बाळूला 6-4, 6-3 असे नमविले.  

निकाल: एकेरी: महिला: पहिली फेरी:

वैदेही चौधरी(भारत)[5]वि.वि.सोहा सादिक(भारत)6-3, 6-4; 

श्रेया तातावर्ती(भारत)वि.वि.जगमीत कौर ग्रेवाल(भारत)6-3, 5-7, 6-3; 
एमिली सेबोल्ड(जर्मनी)[3] वि.वि.निधी चिलूमुला(भारत) 6-4, 6-1; 
साई संहिता चमर्ती(भारत)वि.वि.वंशिता पठानिया(भारत)4-6, 6-3, 6-1;

ऍना उरके(रशिया)[2]वि.वि.निधित्रा राजमोहन(भारत)6-3, 6-1;

झील देसाई(भारत)[1]वि.वि.सौम्या विग(भारत)6-0, 6-1; 
श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती(भारत)वि.वि. शर्मदा बाळू(भारत)6-4, 6-3;

समा सात्विका(भारत)[7]वि.वि.आदिती अरे(भारत) 7-5, 6-2; 


दुहेरी: 
जेनिफर लुईखेम(भारत)/मिहिका यादव(भारत)[2]वि.वि.श्रीया अत्तुरू(यूएसए)/प्रत्युशा रचापुडी(भारत) 7-6(2), 6-3;

हुमेरा बहारमूस(भारत)/युब्रानी बॅनर्जी(भारत)वि.वि.कशिश भाटिया(भारत)/बेला ताम्हणकर(भारत)6-3, 2-6, 10-2; 

स्टेफनी और(ऑस्ट्रिया)/इलारिया स्पोशेट्टी(इटली) वि.वि.लालित्या कल्लुरी(भारत)/मैथिली मोठे(भारत)7-6(1), 6-1; 

वैदेही चौधरी(भारत)/एमिली सेबोल्ड(जर्मनी)[1]वि.वि.स्मृती भसीन(भारत)/सहजा यमालापल्ली(भारत)6-0, 6-2.

जगातील सर्वात मोठा ‘तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर-तुकाराम महाराज विश्‍वशांती घुमट’

0

डॉ. राजीव श्रीवास्तव यांचे मत, डॉ. विश्‍वनाथ कराड यांना डब्ल्यू.बी.आर.ने दिले प्रमाणपत्र

पुणे, दि.२ मार्च: “एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी संकल्पना, डिझाईन, नियोजन करून तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर-तुकाराम महाराज विश्‍वशांती घुमट या अद्वितीय अशा वास्तूशिल्पाची निर्मिती ही राजबाग, लोणीकाळभोर, पुणे, महाराष्ट्र येथे केली आहे. या घुमटाचा व्यास १६० फूट व उंची २६३ फूट आहे. आणि २४ पिलर्स आहेत. याची आम्ही सर्व प्रकारे पहाणी केली. आमच्या असे लक्षात आले की, हा घुमट जगातील सर्वात मोठा विश्‍व शांतीचा घुमट आहे. म्हणूनच वर्ल्ड बुक ऑफ रेकार्डसतर्फे हे प्रमाणपत्र दिले आहे.” असे उद्गार लंंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसचे उपाध्यक्ष डॉ. राजीव श्रीवास्तव यांनी काढले. एमआयटी वर्ल्ड पीस युुनिव्हर्सिटीतर्फे कोथरुड येथील संत श्री ज्ञानेश्‍वर सभागृहात  आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी लंंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसचे उपाध्यक्ष डॉ. राजीव श्रीवास्तव, डब्ल्यू.बी.आर.महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मेहबूब चांदभाई सय्यद यांनी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी डॉ. विजय दास, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं.वसंतराव गाडगीळ, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, विश्‍वशांती केंद्र(आळंदी)चे सल्लागार व माजी कुलगुरू डॉ. एस.एम.पठाण, डब्ल्यूपीयूचे सल्लागार डॉ. संजय उपाध्ये आणि डॉ. मिलिंद पात्रे उपस्थित होते.
डॉ. राजीव श्रीवास्तव म्हणाले,“आमची संस्था जगातील अशा काही घटनांचा शोध घेऊन त्याची पहाणी करते आणि त्यानंतर त्यांना संस्थेतर्फे प्रमाणपत्र देते. त्यातच डॉ. विश्‍वनाथ कराड यांनी उभा केलेला जगातील सर्वात मोठा विश्‍वशांती घुमट हा जगातील संपूर्ण मानवजातीला विश्‍वशांती आणि मानवकल्याणाचा संदेश देईल. ३ हजार लोक बसतील असे विश्‍वशांती प्रार्थना सभागृह आहे. ६२ हजार ५०० स्केअर फूट असलेले विश्‍वशांती ग्रंथालय आहे. म्हणून हा घुमट अद्वितीय असा आहे. या सर्व गोष्टींचा अंतर्भाव असल्यामुळे आम्ही त्यांना हे प्रमाणपत्र देऊन गौरव करीत आहोत.”
डॉ. विश्‍वनाथ कराड म्हणाले,“या अद्वितीय घुमटातून जागतिक दर्जाची तत्वे समोर येणार आहेत. एकीकडे रशिया आणि युक्रेनची लढाई सुरू असतांना विश्‍वशांतीसाठी कार्य करणार्‍या या डोमला असा बहुमान मिळणे हे अभिनंदनीय आहे. आता संपूर्ण जगाला भारतच सुख, समाधान आणि शांतीचा मार्ग दाखवेल.”
डॉ. एस.एन.पठाण म्हणाले, “१२ वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे डॉ. कराड यांनी विश्‍वशांती घुमटाची निर्मिती केली आहे. जगातील सर्वात मोठा हा घुमट असला तरी यातून दिला जाणारा संदेश संपूर्ण जगात शांतीसाठी कार्यरत असेल.”
डॉ. विजयकुमार दास म्हणाले,“शिक्षण क्षेत्रात कार्य करीत असतांना डॉ. कराड  शांती, मानवता धर्म आणि सहिष्णूतेसाठी जे कार्य करीत आहेत ते अलौकिक आहे.”
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले, “जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी खूप लोकांनी कार्य केले आहे. परंतू डॉ. कराड यांनी संत ज्ञानेश्‍वर व तुकाराम महाराज यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या घुमटाच्या माध्यमातून शांतीसाठी कार्य सुरू केले आहे. आजच्या काळात सर्वात महत्वाचे आहे.”
प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मिलिंद पात्रे यांनी आभार मानले.

कुलगुरु आणि गुरुकुल पद्धतीतून चांगले एकत्रित करुन भारताचे शैक्षणिक मॉडेल तयार व्हावे

0

पुणे : संशोधनाची सुरुवात पाश्चात्य गोष्टींवर होते, ते आपल्याकडील गोष्टींवर देखील व्हायला हवे. पाश्चात्य विज्ञान कमी नाही, मात्र आपल्या ज्ञानपरंपरा देखील मोठया आहेत. भारतात 14 विद्या आणि 64 कला आहेत, असे आपण म्हणतो. त्यामुळे भारतीय ज्ञानपरंपरेची ओळख प्रत्येकाला होणे गरजेचे आहे. त्यामुळे कुलगुरु आणि गुरुकुल पद्धतीतील जे चांगले आहे, त्यावर आधारित भारताचे शैक्षणिक मॉडेल तयार व्हावे, असे मत राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेचे (नॅक) नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केले.  
सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार, मुख्य वैज्ञानिक सल्लागार समिती भारत सरकार यांचे कार्यालय आणि विज्ञान प्रसार यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान सर्वत्र पूज्यते या विज्ञान प्रसार महोत्सवाचे आयोजन शिक्षण प्रसारक मंडळीचे सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे करण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून त्याचा समारोप लेडी रमाबाई हॉलमध्ये सोमवारी झाला. यावेळी शि.प्र.मंडळीचे अध्यक्ष अ‍ॅड.सदानंद फडके, शि.प्र.मंडळी नियामक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.एस.के.जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, सचिव राधिका इनामदार, विज्ञान भारतीचे जयंत सहस्त्रबुद्धे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कै.प्राचार्य बी.व्ही.भिडे फाऊंडेशनतर्फे प्रा.डॉ.प्रशांत दुराफे आणि डॉ. गौरी साठे यांच्या क्रोनो बायोलॉजी या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी झाले. तसेच महोत्सवातील विजेत्यांना पारितोषिके देखील देण्यात आली. 
शि.प्र. मंडळीच्या नियामक मंडळाचे सदस्य अ‍ॅड. मिहीर प्रभुदेसाई, राजेंद्र पटवर्धन, पराग ठाकूर, प्राचार्य डॉ.सविता दातार, विज्ञान भारतीच्या मानसी मालेगावकर, विज्ञानमंडळ प्रमुख डॉ.संदीप काकडे, समन्वयक डॉ.गीतांजली फाटक, डॉ.सुचेता गायकवाड, मंदार उपासनी आणि सर्व प्राध्यापकांनी महोत्सवाचे नियोजन केले होते.
डॉ.भूषण पटवर्धन म्हणाले, आपल्या मनावर, मेंदूवर वेळोवेळी प्रहार होत गेले आहेत. पाश्चात्यांकडून येते, तेच विज्ञान असा विशिष्ट विचारधारेचे प्रभाव आपण आजपर्यंत मानत आलो आहोत. आपल्याकडील ज्ञान कमी दर्जाचे नसून भारतीय विचारांची मोठी परंपरा आपल्याकडे आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील त्याकडे काणाडोळा झाला आहे. भारतीय ज्ञानपरंपरेबद्दल विकिपिडायावर देखील उल्लेख नाही. 
ते पुढे म्हणाले, संस्कृती नष्ट करीत भाषेवर हल्ला चढविण्याची ब्रिटिशांची पद्धती होती. त्याला हद्द््पार करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. आत्मसन्मान पुन्हा मिळविण्याचे प्रयत्न देखील आता सुरु आहेत. आयुर्वेद आणि योग याकडे आपण गांभीर्याने पहात नाही. कोविडने आपल्याला धडा दिला आहे की उपचारापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजना गरजेच्या आहेत. त्यामुळे त्याचा अवलंब आपण करायला हवा. 
अ‍ॅड.सदानंद फडके म्हणाले, ब्रिटिशांचे आपल्यावरील गारुड बाजूला काढून आपल्याला सद््विचार जगभरात पोहोचवायचा आहे. ब्रिटिशांनी सांगितलेल्या गोष्टी आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपूर्वी सांगितलेल्या आहेत. आपले संशोधन व शोध कितीही चांगला असला, तरी देखील पाश्चात्य चष्म्यातून असल्याशिवाय त्याला मान्यता नाही. त्यामुळे आपले विसरलेले तत्वज्ञान आपण पुन्हा एकदा विज्ञानाने प्रज्वलित करुया. 
महोत्सवात ७५ शास्त्रज्ञ आणि ७५ वैज्ञानिक शोध यांची भित्तिचित्रे बघण्यासाठी उपलब्ध होती. तसेच डीआरडीओ यांच्यातर्फे भित्तिचित्रे आणि मॉडेल्स देखील प्रदर्शित करण्यात आली. विज्ञान महोत्सवात विज्ञान व्याख्याने, विज्ञान प्रदर्शन, विज्ञान चित्रपट महोत्सव, विज्ञान पुस्तक मेळा, विज्ञान साहित्य उत्सव, वैज्ञानिक रांगोळी, वक्तृत्व स्पर्धा, विज्ञानामृत प्रश्नमंजुषा अशा नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचा समावेश होता. अ‍ॅड.मिहिर प्रभुदेसाई यांनी प्रास्ताविक केले.  

जगातील युद्धजन्य परिस्थितीत आचार्य तुलसींचे अणुव्रत महत्त्वाची – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0

मुंबई, दि. १ : आज जगात युद्धजन्य परिस्थिती उद्भवली असताना तसेच वैयक्तिक स्तरावर मनुष्य अशांत असताना जैन आचार्य तुलसी यांनी सुरु केलेली अणुव्रत चळवळ शांतीच्या पुनर्स्थापनेसाठी अतिशय महत्वाची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
आचार्य तुलसी यांनी सन १९४९ मध्ये सुरु केलेल्या अणुव्रत आंदोलनाच्या वर्धापन दिनानिमित्त ‘शंखनाद अणुव्रताचा’ हा कार्यक्रम राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन अणुव्रत समिती मुंबईतर्फे करण्यात आले होते.
यावेळी आचार्य महाश्रमण यांचे शिष्य मुनिश्री डॉ अभिजित कुमार, मुनिश्री जागृत कुमार, अणुव्रत विश्वभारतीचे अध्यक्ष संचय जैन, अणुव्रत समिती मुंबईच्या अध्यक्षा कंचन सोनी, समाजसेवक रविंद्र संघवी व राजकुमार चपलोट आदी उपस्थित होते.
राज्यपाल श्री कोश्यारी म्हणाले, दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बमुळे प्रचंड नरसंहार झाला त्यावेळी आता विश्वशांतीसाठी ॲटम बॉम्ब नाही तर आत्मभान आवश्यक असल्याचे आचार्य तुलसी यांनी जगाला पटवुन दिले. या पार्श्वभूमीवर जनसामान्यांना करता येईल असे अणुव्रत म्हणजे शांततेसाठी लघुसंकल्प करण्यास त्यांनी सांगितले होते. आज जगभर युद्धाची परिस्थिती उद्भवली असताना सर्वांनी शांततेच्या दिशेने लहानसाही प्रयत्न केला तर एक निरोगी समाज व सुखी जग निर्माण करता येईल, असे राज्यपालांनी सांगितले.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी ‘उत्थान गीत’ तसेच पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले.
मुनिश्री जागृत कुमार यांनी तणाव मुक्त जगण्याचे सूत्र सांगितले तर मुनी डॉ अभिजित कुमार यांनी संबोधन केले.
कंचन सोनी व संचय जैन यांनी प्रास्ताविक केले. राजकुमार चपलोट यांनी सूत्रसंचालन केले तर वनिता बाफना यांनी आभार प्रदर्शन केले.
0000

महापालिका निवडणुकीत ‘रिपाइं’ला २५ जागा हव्यात

0

रामदास आठवले यांची पत्रकार परिषदेत मागणी; ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वयंभू राजे’

पुणे : “आगामी महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांची युती होणार असून, आम्हाला २५ जागा द्याव्यात, अशी आमची मागणी आहे. तसेच सत्ता आली आणि अनुसूचित जातीचे आरक्षण पडले, तर ‘रिपाइं’ला महापौर पद देण्याची मागणी करणार आहे,” असा पुनरुच्चार रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.नवीन विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ‘रिपाइं’चे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, उपमहापौर सुनीता वाडेकर, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी, नगरसेविका हिमाली कांबळे, असित गांगुर्डे, अल्पसंख्याक आघाडीचे ऍड. आयुब शेख, महिला आघाडीच्या संगीता आठवले, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, संजय सोनवणे, सरचिटणीस महिपाल वाघमारे, शाम सदाफुले आदी उपस्थित होते.

‘…म्हणून परेशान युक्रेन-रशिया-युक्रेन युद्धावर भाष्य करताना आठवले यांनी चारोळी करत ‘पुतीन यांचा बिघडला आहे ब्रेन, म्हणून परेशान आहे युक्रेन’ अशी टिपण्णी केली. त्याचबरोबर केंद्र सरकार युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केवळ टीका करू नये. सरकारला सूचना जरूर कराव्यात. एका भारतीय विद्यार्थ्याचा युक्रेनमध्ये मृत्यू झाला, ही दुःखद बाब आहे, असे आठवले यांनी नमूद केले.

शिवाजी महाराज स्वयंभू राजे-
छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते, यावरून विनाकारण वाद घालण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वयंभू राजे होते. शौर्य आणि धैर्याचे महामेरू होते. रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, तर राजमाता जिजाऊ या महाराजांच्या गुरू होत्या. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत राज्यपालांना भेटून माझे मत सांगणार आहे. समर्थ रामदास स्वामी त्यांच्या जागी श्रेष्ठ असले, तरी छत्रपती शिवाजी महाराजांना कोणत्याही गुरूची आवश्यकता नव्हती. संपूर्ण देशात छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानले जात असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.

ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चक्रव्यूहात-रामदास आठवले म्हणाले, “केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून भाजप महाविकास आघाडी सरकार पडण्याचा प्रयत्न करतेय, यात तथ्य नाही. या यंत्रणा त्यांचे काम करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही. ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडत भाजपसोबत यावे आणि युतीचे सरकार स्थापन करावे. ठाकरे यांच्याशी माझे चांगले संबंध असून, याबाबत त्यांच्याशी बोलणार आहे.”
पाचही राज्यात भाजपाची सत्ता-“देशात होत असलेल्या पाचही राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपची सत्ता येईल. उत्तरप्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या राज्यातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या कामावर समाधानी असून, या निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळेल. सर्व अनुसूचित जाती-जमातीमधील लोकांसाठी मोदींनी घेतलेले निर्णय, आणलेल्या योजना यामुळे त्यांचा फायदा होत आहे. भाजप प्रणित एनडीएला निर्भेळ यश मिळणार आहे,” असे आठवले यांनी नमूद केले.

युद्ध थांबावे,विश्वशांतीसाठी पुण्यातून शंभोनारायणाला साकडे ….

0

देशो,देशीच्या सीमा पुसू देत ,हे विश्व मानवाचे घर राहू देत….

पुणे- काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी पार्टी च्या महिलांनी खडकी येथील शिवमंदिरात युद्ध थांबून जगात शांतता स्थापित व्हावी, आणि आमचे सर्व भारतीय विद्यार्थी सुखरूप परत यावे म्हणून श्री भोलेनाथ भगवान यांना साकडे घातले.युक्रेन येथे अडकलेल्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांन च्या सुटके साठी आणि सुखरूप भारतात परत येण्यासाठी आज महाशिवरात्री च्या दिवशी महामृत्युंजय मंत्रा च्या जाप करण्यात आला ह्या प्रसंगी शिवमंदिरात वायुदल, स्थलदल, नौदल चे माजी अधिकारी ही उपस्थित होते, ह्या वेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्ष संगीता तिवारी. राष्ट्रवादी च्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे, पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्ष पूजा आनंद ,शोभना पणीकर , आरती साठे, सुनीता नेमुर्, कांता ढोणे, शुभांगी वखारे, सुंदरा ओव्हाळ, चिमटे, ज्योती परदेशी आदी महिला कार्यकर्त्यांनी शिवपूजा केली.

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचं भाषण संपल्यावर युरोपच्या संसदेत मिनिटभर टाळ्या थांबल्याच नाहीत!

0

“मला माफ करा मी तुम्हाला गुड डे असं म्हणू शकत नाही,”

रशियानं युक्रेनवर हल्ला करून आता सहा दिवस उलटले आहेत. जगभरातल्या देशांनी वारंवार आवाहनं करून देखील आणि निर्बंध टाकून देखील रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन युद्धात माघार घ्यायला किंवा युद्ध थांबवायला तयार नाहीत. त्यामुळे आता हे युद्ध अटीतटीचं होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संयुक्र राष्ट्रांशी संबंधित २८ देशांनी युक्रेनला मदत देऊ केली आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी आज युरोपियन संसदेच्या विशेष बैठकीसमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भाषण केलं. त्यांनी दिलेल्या भावनिक भाषणानंतर युरोपियन संसदेतल्या सर्व सदस्यांनी त्यांना उभं राहून अभिवादन केलं. भाषण संपल्यानंतर तब्बल मिनिटभर टाळ्या थांबल्याच नाहीत!

वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी यावेळी आवेशपूर्ण भाषण केलं. या भाषणानं युरोपियन संसदेतल्या सगळ्यांनाच प्रभावित केलं होतं. “आम्ही आमच्या जमिनीसाठी आणि आमच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहोत. आमची सर्व शहरं बंद झाली आहेत. पण तरी देखील कुणीही आम्हाला तोडू शकत नाही. आम्ही मजबूत आहोत. आम्ही युक्रेनचे नागरिक आहोत. आमच्या मुलांना जिवंत ठेवण्याची आमची इच्छा आहे. माझ्या मते ही अगदीच रास्त इच्छा आहे”, असं झेलेन्स्की म्हणाले.यावेळी बोलताना झेलेन्स्की यांनी पुतीन यांच्यावर कठोर शब्दांत निशाणा साधला. “काल इथे १६ मुलं मारली गेली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन वारंवार हेच सांगत आहेत की ते एक प्रकारची लष्करी कारवाई करत आहेत ज्यात फक्त लष्कराची ठाणीच टार्गेट केली जात आहेत. पण तिथे मुलं होती. ते नेमकी कोणत्या प्रकारची लष्करी कारवाई करत आहेत? कोणते टॅंक ते घेऊन जात आहेत. मिसाईल्स डागत आहेत. त्यांनी काल १६ मुलांना मारलं”, अशा शब्दांत झेलेन्स्की यांनी पुतीन यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली.“आमचा निर्धार पक्का आहे. आमचं मनोधैर्य प्रचंड उंचावलेलं आहे. आम्ही लढत आहोत. आमच्या हक्कांसाठी, आमच्या स्वातंत्र्यासाठी, आयुष्यासाठी. आम्ही जिवंत राहण्यासाठी लढत आहोत. तीच आमच्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. यासोबत आम्ही लढा देत आहोत युरोपचे बरोबरीचे सदस्य होण्यासाठी. आज आम्ही लोकांना दाखवून देत आहोत की आम्ही नेमके कोण आहोत”, अशा शब्दांत झेलेन्स्की यांनी युरोपियन संसदेसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या.दरम्यान, यावेळी झेलेन्स्की यांनी युरोपला मदतीचं आवाहन केलं आहे. “आम्ही जोडले गेलो, तर युरोपियन युनियन अजून सक्षम होईल. पण तुमच्याशिवाय युक्रेन एकटं पडेल. आम्ही आमचं सामर्थ्य सिद्ध केलं आहे. आम्ही किमान हे तरी सिद्ध केलं आहे की आम्ही देखील तुमच्यासारखेच आहोत. त्यामुळे हे सिद्ध करा की तुम्हीदेखील आमच्यासोबत आहात. हे सिद्ध करा की तुम्ही आम्हाला एकटं सोडणार नाहीत. हे सिद्ध करा की तुम्ही खरंच युरोपियन आहात. मग जीवन हे मृत्यूसमोर विजयी होईल. प्रकाशाचा अंधारावर विजय होईल”, असं झेलेन्स्की म्हणाले. “मला माफ करा मी तुम्हाला गुड डे असं म्हणू शकत नाही,” असं म्हणत वोलोडिमिर झेलेन्स्की हात उंचावून स्क्रीनसमोरुन निघून गेले.झेलेन्स्की यांचं भाषण संपताच युरोपच्या संसदेतले सर्व सभासद उठून उभे राहिले. पुढा मिनीटभर युरोपच्या संसदेत फक्त तिथल्या सदस्यांनी केलेला टाळ्यांचा कडकडाट ऐकू येत होता. शेवटी जेव्हा झेलेन्स्की यांनी स्वत:हून संसदेचा निरोप घेतला आणि ते स्क्रीनमधून बाहेर पडले, तेव्हा कुठे हा कडकडाट कमी होत थांबला!

फेब्रुवारी 2022 मध्ये एकूण 1,33,026 कोटी रुपये जीएसटी महसूलाचे संकलन

0

नवी दिल्‍ली, 1 मार्च 2022

फेब्रुवारी 2022 महिन्यात जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करापोटी एकूण 1,33,026 कोटी रुपये महसूल संकलित करण्यात आला आहे. यामध्ये सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी 24,435 कोटी रुपये, एसजीएसटी अर्थात राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोटी 30,779 कोटी रुपये, आयजीएसटी Rs 67,471 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवरील करापोटी जमा झालेले 33,837 कोटी रुपये धरून) आणि अधिभार 10,340 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवरील करापोटी संकलित झालेले 638 कोटी रुपये धरून) यांचा समावेश आहे.

सरकारने नियमित सामंजस्य म्हणून आयजीएसटीमधून 26,347 कोटी रुपये सीजीएसटीला आणि 21,909 कोटी रुपये एसजीएसटीला दिले आहेत. सर्व देणी दिल्यानंतर, फेब्रुवारी 2022 मध्ये केंद्र आणि राज्य सरकारांना अनुक्रमे सीजीएसटीपोटी 50,782 कोटी रुपये आणि एसजीएसटीपोटी 52,688 कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे.

गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात संकलित झालेल्या जीएसटी महसुलापेक्षा फेब्रुवारी 2022 मध्ये 18% अधिक महसूल गोळा झाला आहे तर फेब्रुवारी2020 मधील जीएसटी संकलनापेक्षा या वर्षी फेब्रुवारी महिन्यात 26% अधिक जीएसटी संकलित झाला आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये आयात केलेल्या वस्तूंवरील करापोटी 38% अधिक महसूल जमा झाला असून देशांतर्गत व्यवहारांमधून (सेवांच्या आयातीसह) मिळणारा महसूल गेल्या वर्षी याच महिन्यात याच स्त्रोतांद्वारे संकलित महसुलापेक्षा 12% अधिक आहे.

फेब्रुवारी हा 28 दिवसांचा महिना आहे त्यामुळे दर वर्षीच या महिन्यातील जीएसटी संकलन जानेवारी महिन्यापेक्षा नेहमीच कमी असते हे लक्षात घेतले पाहिजे. या वर्षी 20 जानेवारीच्या दरम्यान देशात आलेल्या ओमायक्रॉन विषाणू संसर्गाच्या लाटेमुळे विविध ठिकाणी लावावी लागलेली अंशतः टाळेबंदी, सप्ताहाच्या शेवटी तसेच रात्री लागलेली संचारबंदी आणि लागू झालेले  इतर प्रतिबंधात्मक नियम या संदर्भात हे फेब्रुवारी महिन्यातील जीएसटी संकलनातील वाढ लक्षात घ्यायला हवी.

या वर्षात पाचव्यांदा मासिक जीएसटी संकलनाच्या आकडेवारीने 1.30 लाख कोटींचा टप्पा पार केला आहे. देशात जीएसटी लागू झाल्यापासून पहिल्यांदाच जीएसटी अधिभार संकलनाने 10,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.यातून अर्थव्यवस्थेतील महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये आर्थिक व्यवहार विशेषतः वाहन उद्योगातील विक्री पुन्हा पूर्वपदावर येत असल्याचे संकेत मिळत आहेत.

फेब्रुवारी 2021 मध्ये महाराष्ट्रात 16,104 कोटी रुपये तर गोव्यात 344 कोटी रुपये जीएसटी महसूल संकलन झाले होते, तर फेब्रुवारी 2022 मध्ये महाराष्ट्रात 19,423 कोटी रुपये तर गोव्यात 364 कोटी रुपये जीएसटी महसुलाचे संकलन झाल्यामुळे गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत या वर्षी फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्राच्या जीएसटी महसूल संकलनात  21%  तर गोव्याच्या महसूल संकलनात 6%ची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

खाली दिलेला तक्ता विद्यमान आर्थिक वर्षातील मासिक जीएसटी महसूल संकलनाचा कल दर्शवितो.

खाली असलेल्या तक्त्यामध्ये फेब्रुवारी 2021 मधील जीएसटी संकलनाच्या तुलनेत फेब्रुवारी 2022 महिन्यातील जीएसटी महसूल संकलनाची प्रत्येक राज्यातील आकडेवारी दिली आहे –

फेब्रुवारी 2022[1] मध्ये झालेली जीएसटी महसूल संकलनातील राज्यनिहाय वाढ

State NameFeb-21Feb-22Growth
Jammu and Kashmir330326-1%
Himachal Pradesh663657-1%
Punjab1,2991,48014%
Chandigarh14917820%
Uttarakhand1,1811,1760%
Haryana5,5905,9286%
Delhi3,7273,9225%
Rajasthan3,2243,4698%
Uttar Pradesh5,9976,5199%
Bihar1,1281,2067%
Sikkim2222220%
Arunachal Pradesh6156-9%
Nagaland3533-6%
Manipur323920%
Mizoram212415%
Tripura63664%
Meghalaya14720137%
Assam9461,0087%
West Bengal4,3354,4142%
Jharkhand2,3212,5369%
Odisha3,3414,10123%
Chhattisgarh2,4532,78313%
Madhya Pradesh2,7922,8532%
Gujarat8,2218,8738%
Daman and Diu30-92%
Dadra and Nagar Haveli23526011%
Maharashtra16,10419,42321%
Karnataka7,5819,17621%
Goa3443646%
Lakshadweep0174%
Kerala1,8062,07415%
Tamil Nadu7,0087,3935%
Puducherry15817813%
Andaman and Nicobar Islands2322-5%
Telangana3,6364,11313%
Andhra Pradesh2,6533,15719%
Ladakh91672%
Other Territory1341361%
Center Jurisdiction12916729%
Grand Total88,10298,55012%

[1] वस्तूंच्या आयातीवरील जीएसटीचा यात समावेश नाही

युक्रेन वरील हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या

0

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या सहाव्या दिवशी खार्किव शहरात नवीन या भारतीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. नवीन शेखरप्पा असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. या घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी नवीन शेखरप्पाच्या घरी फोन केला आणि त्याच्या वडिलांशी बोलले. पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त करत कुटुंबीयांचं सांत्वन केलं आहे. दुसरीकडे खारकीव्हमधील परिस्थिती अतिशय बिकट असल्याचे समोर आले आहे. तिथे अडकेल्या भारतीयांची सुरक्षा आणि त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रधान्याने सरकार काम करत आहे, असे केंद्र सरकारमधील सुत्रांनी सांगितले.परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली. मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सोशल मीडियावर सांगितले- कळवताना आम्हाला अत्यंत दु:ख होत आहे की, खार्किव येथे झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. आम्ही त्याच्या कुटुंबाच्या संपर्कात आहोत.मिळालेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थी नवीन हा कर्नाटकचा रहिवासी होता. तो 21 वर्षांचा होता आणि जेवण घेण्यासाठी बाहेर गेला होता. तो युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत होता.नवीनचे पार्थिव मिळवण्यासाठी पीएमओ आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे आम्ही विनंती केली आहे, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले.

रशियाकडून व्हॅक्युम बॉम्बचा वापर
रशियाने युक्रेनविरोधातील युद्धात प्रतिबंधित केलेल्या व्हॅक्यूम बॉम्बचा वापर केल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. युक्रेनचे अमेरिकेतील राजदूत ओकसाना मार्कारोव्हा यांनी हा दावा केला. व्हॅक्युम बॉम्ब सह इतरही प्रतिबंधित शस्त्रांचा वापर रशिया करत असल्याचा युक्रेनमधील मानवी हक्क संघटनांचा आणि युक्रेन सैन्याचा दावा आहे.

भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरूच
बागची म्हणाले- युक्रेनमधील भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला रशिया आणि युक्रेनच्या राजदूतांच्या संपर्कात आहेत. नागरिकांचे त्वरित आणि सुरक्षित परतणे हे आमचे प्राधान्य आहे. रशिया आणि युक्रेनमधील आमचे राजदूत तेच करत आहेत.

युक्रेनमध्ये रशियन सैन्याचे हल्ले तीव्र
येथे, रशियाने कीव्ह, खार्किव आणि चेर्निहाइव्हमध्ये तोळफखाना (तोफांनी) हल्ले तीव्र केले आहेत. युक्रेनमधील भारतीय दूतावासाने सर्व भारतीय नागरिकांना तात्का कीव्ह सोडण्यास सांगितले आहे. दूतावासाने जारी केलेल्या आपत्कालीन सल्लागारात असे म्हटले आहे – भारतीयांनी ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत त्वरित शहर सोडावे.

खारकीव्हमध्ये भारतीय विद्यार्थ्याचा हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या बातमीने भारताची चिंता वाढली आहे. कारण अजूनही ३ हजार भारतीय विद्यार्थी खारकीव्हमध्ये अडकले आहेत. डेलीमेलने सोमवारी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. खारकीव्हवर रशिया क्लस्टर बॉम्बचे हल्ले करत आहे, असे ष्करी सूत्रे सांगत आहेत. हे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार बेकायदेशीर आहे. एवढेच नाही तर रशियाचे सैन्य खारकीव्हवर व्हॅक्यूम बॉम्बने हल्ला करत असल्याचा दावा अमेरिकेतील युक्रेनच्या राजदूताने केला आहे. रशिया आज व्हॅक्यूम बॉम्बचा वापर केला आहे. जो जिनिव्हा करारानुसार प्रतिबंधित आहे, असे राजदूत म्हणाले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करुन साधला संवाद

0

मुंबई, 01 मार्च 2022


युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याचे भारत सरकारचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. युक्रेनमधील 182 भारतीय विद्यार्थ्यांना बुकारेस्टवरुन घेऊन येणारे सातवे विशेष विमान आज सकाळी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर दाखल झाले. केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याचे मंत्री नारायण राणे यांनी विमानतळावर विद्यार्थ्यांचे स्वागत केले. 

मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत नारायण राणे यांनी विद्यार्थ्यांना धीर दिला. अतिशय कठीण प्रसंगातून आल्यामुळे विद्यार्थी दडपणाखाली दिसत होते, आता तुम्ही मायदेशी परत आला आहात, आता काळजी करण्याचे कारण नाही. सर्व विद्यार्थ्यांना सरकार मायदेशी परत आणेल, असे नारायण राणे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. 

पंतप्रधानांनी भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याच्या मोहिमेत सुलभत यावी, यासाठी चार केंद्रीय मंत्र्यांना विशेष दूत म्हणून युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये पाठवले आहे. त्यामुळे अद्यापही तिथे असलेल्या विद्यार्थ्यांनी काळजी करु नये, असे नारायण राणे म्हणाले. 

मायदेशी परतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कुटुंबियांच्या भेटीनंतरचा आनंद दिसून येत होता. मुंबई विमानतळावर विविध राज्यांतील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी हेल्पडेस्कची व्यवस्था करण्यात आली आहे.  

आज सकाळी 7.05 वाजता मुंबई विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसचे विशेष विमान दाखल झाले. या विमानाने हेन्री कोनाद आंतरराष्ट्रीय विमानतळ, बुकारेस्टवरुन काल संध्याकाळी 11.10 वाजता मुंबईसाठी उड्डाण केले होते. ‘ऑपरेशन गंगा’ या विशेष मोहिमेअंतर्गत भारतीय नागरिकांना मायदेशी आणणारे हे सातवे विमान होते. 

एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो आणि स्पाईसजेट या विमान कंपन्या ऑपरेशन गंगा मोहिमेत झाल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमधून दिल्ली आणि मुंबईकडे आणण्यात येत आहे. 

एअर मार्शल एस प्रभाकरन यांनी भारतीय हवाई दलाच्या पश्चिम हवाई कमांडची स्वीकारली सूत्रे

0

नवी दिल्‍ली, 1 मार्च 2022

एअर मार्शल श्रीकुमार प्रभाकरन यांनी आज दिनांक  01 मार्च 2022 रोजी दिल्ली स्थित पश्चिम हवाई कमांड (WAC) ची सूत्रे स्वीकारली.   

एअर मार्शल श्रीकुमार प्रभाकरन हे राष्ट्रीय संरक्षण अकादमी, पुणे येथील  पदवीधर आहेत आणि त्यांना 22 डिसेंबर 1983 रोजी भारतीय हवाईदलात लढाऊ वैमानिक म्हणून नियुक्त करण्यात आले. ते डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज (DSSC) वेलिंग्टन आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज, नवी दिल्लीचे माजी विद्यार्थी आहेत.  अनुभवी मिग-21 पायलट आणि श्रेणी ‘A’ पात्र उड्डाण प्रशिक्षक असलेल्या  एअर मार्शल एस.प्रभाकरन यांना जवळपास 5000 तासांच्या उड्डाणाचा अनुभव आहे.

आपल्या 38 वर्षांच्या सेवा कारकिर्दीत, एअर मार्शल श्रीकुमार प्रभाकरन यांनी  महत्त्वाच्या कमांड आणि अधिकारीक पदांच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेत. सध्याच्या नियुक्ती आधी ते हैदराबाद येथील एअर फोर्स अकादमी, येथे कमांडंट पदावर होते.

हवाई अधिकारी श्री.श्रीकुमार प्रभाकरन हे हवाई दल पदक आणि अति विशिष्ट सेवा पदक प्राप्त केलेले मानकरी आहेत.

एअर मार्शल अमित देव हे 28 फेब्रुवारी 2022 रोजी भारतीय वायुसेनेतून 39 वर्षांहून अधिक वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले, त्यानंतर एअर मार्शल एस प्रभाकरन,या पदावर रुजू झाले आहेत.

नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही तर भाजपा अधिवेशन चालू देणार नाही-भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील

कोल्हापूर -मुंबई बॉम्बस्फोटात शेकडोंचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्यासाठी मनी लाँडरिंग केल्याच्या आरोपावरून अटक झालेले मंत्री नवाब मलिक यांना महाविकास आघाडीने पाठिंबा देणे म्हणजे दाऊद इब्राहिमला साथ देणे आहे. देशद्रोही गुन्ह्यात अटक झालेल्या नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा उद्या बुधवार दि. २ मार्चपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील अशी अपेक्षा आहे. पण राजीनामा घेतला नाही तर भारतीय जनता पार्टी विधिमंडळाचे अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत दिला.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिने तीनशे कोटींची मालमत्ता बळकावली व ती तांत्रिकदृष्ट्या नवाब मलिक यांच्या कंपनीच्या मालकीची असल्याचे दाखविले. दाऊदसाठी मनी लाँडरिंग केल्याच्या गंभीर आरोपाखाली सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने नवाब मलिक यांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले. न्यायालयाने पुराव्यांचा विचार करून अधिक तपासासाठी मलिक यांना ईडी कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. अशा स्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रिमोट कंट्रोलने महाविकास आघाडी सरकार चालविणारे शरद पवार हे तातडीने नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतील अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मलिक यांच्या राजीनाम्यास नकार देऊन मंत्रिमंडळ त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले हे धक्कादायक आहे.

 ते म्हणाले की, १९९२ व १९९३ च्या मुंबईतील दंगल व बॉम्बस्फोटाच्या वेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देशाच्या आणि समाजाच्या रक्षणासाठी प्रखर भूमिका घेतली होती. आज त्याचे चिरंजीव मुख्यमंत्री असताना मात्र त्या बॉम्बस्फोटाच्या गुन्हेगारांना साथ देणाऱ्या मंत्र्याची पाठराखण करतात हे धक्कादायक आहे. ही त्यांची राजकीय तडजोड असली तरी आम्ही ते सहन करणार नाही. उद्यापर्यंत नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा आला नाही तर भाजपा विधिमंडळाचे अधिवेशन चालू देणार नाही. आम्ही सतत आवाज उठवू. नवाब मलिक यांचा राजीनामा होईपर्यंत भाजपाचे आंदोलन चालू राहील.

 त्यांनी सांगितले की, मराठा समाजासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने शिक्षण व रोजगाराच्या अनेक योजना सुरू केल्या. त्या महाविकास आघाडी सरकारने बंद पाडल्या. त्या पुन्हा चालू होण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी उपोषण केले, त्याबद्दल आपण त्यांचे अभिनंदन करतो.

 सहज होण्यासारख्या कामांसाठी छत्रपतींना प्राण पणाला लावावे लागले. आता सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे खरंच कारवाई होईल यासाठी राजेंनी पाठपुरावा करावा नाही तर तोंडाला पाने पुसल्यासारखे होईल, असा इशारा त्यांनी दिला. भाजपाही राजेंच्या साथीने पाठपुरावा करेल, असे ते म्हणाले.

 त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना आलेले भरमसाठ वीजबिल आणि त्यांचे वीज कनेक्शन कापणे या मुद्द्यांवर भाजपाने यापूर्वी राज्यव्यापी आंदोलन केले आहे. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आंदोलन सुरू केले आहे. भाजपाचा राजू शेट्टी यांच्या आंदोलनास पाठिंबा आहे. गरज पडल्यास भाजपा आंदोलनात सक्रीय सहभागी होईल.