Home Blog Page 2059

ओबीसी राजकीय आरक्षण सुधारणा विधेयक एकमताने विधानसभेत मंजूर-निवडणूक आयोगाचे काही अधिकार राज्य सरकारकडे

मुंबई-ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अडसर दुर होण्याची चिन्हे असून मध्यप्रदेश सरकारने विधेयकात केलेल्या दुरुस्तीप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर केले.या सुधारणा विधेयकामुळे निवडणूक आयोगाचे अधिकार राज्य सरकारने त्यांच्याकडे घेतले आहेत. विरोधक आणि सत्ताधारी यांच्या एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आले. निवडणूक आयोगाकडे आता फक्त निवडणूक घेण्याचे अधिकार ठेवण्यात आले आहेत. प्रभाग रचना करणं, कुठे आरक्षण देता येईल याबाबतचे अधिकार सरकारकडे घेण्यात आले आहेत. या कालावधीत सरकार ओबीसी राजकीय आरक्षणासाठी लागणारा इम्पेरिकल डाटा गोळा करु शकतं. यामुळं सरकारला वेळ मिळेल त्यामुळं आगामी काळातील निवडणुका लाबंणीवर पडतील.

सरकारला हे नवीन अधिकार
– नव्या सुधारणा विधेयकामुळे निवडणूक आयोगाचे काही अधिकार राज्य सरकारला मिळणार
– प्रभागरचन, आरक्षण ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारकडे
-राज्य निवडणूक आयोगाला फक्त निवडणुका घेता येतील.
-सरकार प्रभाग रचनेचा अहवाल निवडणूक आयोगाला दिल्यानंतरच आयोगाला निवडणूक जाहीर करता येईल.
-राज्य सरकारला प्रभाग रचना आणि आरक्षण ठरवण्याचे अधिकार
– ओबीसी राजकीय आरक्षणासाठी इम्पेरिकल डाटा गोळा करण्यासाठी वेळ मिळणार.

नवी नांदी ः नाना पटोले
राज्य निवडणूक आयोगाच्या हाती काही सूत्र होती. त्यानुसार राज्य सरकारची तयारी नसताना निवडणुका लावल्या जात होत्या. मध्यप्रदेशच्या धर्तीवर मागास समाजाला आरक्षण मिळावं म्हणून एक विधेयक विधानसभेत आणलं. आज एक नव्या इतिहासाची सुरुवात झाली. 73 व्या घटनादुरुस्तीसंदर्भातील दुरुस्त्या राज्याने केल्या नव्हत्या. मध्य प्रदेश सरकारने या दुरुस्त्या केल्या होत्या. आता महाराष्ट्र सरकारनेही दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला.

निवडणुक आयोगाचे अधिकार गोठविले नाही – छगन भुजबळ

एक समिती स्थापन करून इंपिरिकल डाटा कसा मिळेल यासाठी प्रयत्न करू. लोकशाहीत न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे, आयोगाचे अधिकार घेतले नाहीत. जे आरक्षणासाठी करावे लागेल ते करीत आहोत. राज्य सरकारची तयारी झाल्यानंतर ते निवडणुक आयोगाला कळवतील. त्यानंतर आयोगच निवडणुकीची तारीख ठरवेल असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. दोन ते तीन महिण्यात डाटाचे काम पुर्ण होऊ शकते असेही ते म्हणाले.

दोन तीन महिण्यातच निवडणुका घ्याव्या लागतील – उल्हास बापट

निवडणुकीला दोन -तीन महिने वेळ आहे, त्यावेळेतच निवडणुका घ्यायला हव्या. निवडणुका लांबणीवर जातील हे सर्वोच्च न्यायालय व निवडणुक आयोग मान्य करेल असे वाटत नाही असे मत घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केले.

राज्यात ८ ते १२ मार्च दरम्यान महिला दिन सप्ताह; शाळांमध्ये विविध उपक्रम राबविणार – शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

0

मुंबई, दि. 7 :- राज्यात दि. ८ ते दि. १२ मार्च २०२२ पर्यंत महिला दिन सप्ताह साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यानिमित्त राज्य, जिल्हा आणि शाळास्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.

दि. ८ मार्च, १९०८ रोजी अमेरिकेतील महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या सन्मानार्थ संपूर्ण जगभरात दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी ज्ञानाची कवाडे खुली करत लाखो स्त्रियांना नवे क्षितीज दाखवले आणि नवी पहाट उगवली. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये सर्वांचा सहभाग मिळावा व त्या दिशेने प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून राज्यात ‘जागतिक महिला दिन’ साजरा केला जातो. यावर्षी कोविड १९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सामाजिक अंतर राखणे व स्वच्छतेच्या आवश्यक त्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करून हे उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

यावर्षी महिला दिन सप्ताहाअंतर्गत विविध उपक्रम साजरे करण्यात येत आहेत. यामध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषादेमार्फत राज्यस्तरावर ऑनलाईन/ ऑफलाईन आयोजित करावयाच्या कार्यक्रमामध्ये 8 मार्च रोजी ‘जागर जाणिवांचा’ या उपक्रमात शालेय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते मुलींच्या सक्षमीकरणास पोषक उपक्रमांचे उद्घाटन होईल. 9 मार्च रोजी महिला सक्षमीकरण व समाजाचा बदलता दृष्टीकोन उपक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या श्रीमती श्रुती तांबे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात येईल. 10 मार्च रोजी ‘घे भरारी’- करिअरच्या नवीन संधींबाबत मुरूड येथील प्रशासन अधिकारी दिपाली दिवेकर आर्थिक स्त्रोतांची माहिती देऊन मार्गदर्शन करतील. 11 मार्च रोजी महिलांविषयी कायदे आणि जाणीव जागृती बाबत ॲड. दिव्या चव्हाण मार्गदर्शन करतील. तर 12 मार्च रोजी ‘माझी सखी, माझी सहचारी’ उपक्रमांतर्गत सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये योगदान दिलेले स्नेहग्राम संस्थेचे श्रीमती विनया निंबाळकर व महेश निंबाळकर यांची मुलाखत आयोजित करण्यात येईल.

याचप्रमाणे जिल्हा, तालुका आणि शाळास्तरावर वक्तृत्व स्पर्धा, अनुभव कथन, समुपदेशन, चर्चासत्र, महिला सक्षमीकरणावर आधारित चित्रपट/ चित्रफितीच्या साहाय्याने अभिव्यक्ती तसेच जिल्ह्यातील प्रेरणादायी महिलेचे व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहेत.

या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन #महिलादिन२०२२ #womensdaymh2022 या #hashtag चा उपयोग करून उपक्रमाशी संबंधित व्हीडिओ व साहित्य विविध समाजमाध्यमांवर (Facebook, Instragram, Twitter) अपलोड करावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.गायकवाड यांनी केले आहे.

महिला दिनानिमित्त आदिशक्ती प्रेरणा पुरस्कार सोहळ्याचे ८ मार्च रोजी आयोजन

0

मुंबई, दि. 7 : समाजातील गरीब, उपेक्षित, निराश्रीत व्यक्तीला आपापल्या शक्तीनुसार मदत करण्याची परंपरा वैदिक काळापासून भारत देशात आहे. जे कार्य आपल्या वाट्याला आले आहे, ते सर्वोत्तम प्रकारे करणे ही देखील एक प्रकारे ईशसेवाच आहे. स्वतः सोबत दुसऱ्याच्या उत्कर्षाचा विचार केल्यास समाज प्रगती करेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय करणाऱ्या ३१ व्यक्तींना ‘समाजरत्न’ पुरस्कार करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती तसेच गौ रक्षा फाउंडेशन तर्फे समाजरत्न पुरस्कार देण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष राजू सुदाम शेठ, आयोजक डॉ.प्रमोद पाण्डेय, सहआयोजिका शैलजा मलिक व सूत्रसंचालिका नीता बाजपेयी व्यासपीठावर उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते यावेळी जीएसटी सहआयुक्त पियुष शुक्ल यांनी लिहिलेल्या ‘द लॉकडाऊन स्टोरीज’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

जगात चागंल्या कार्यासाठी मदत देणाऱ्यांची आजही वानवा नसून घेणारेच कमी आहेत असे सांगताना कोविड समूह संसर्गाच्या विपरीत काळात मोठ्या अधिकाऱ्यांपासून स्वच्छता कर्मचाऱ्यापर्यंत सर्वांनी अद्भुत प्रकारचे काम केले, त्यामुळेच जगाच्या तुलनेत भारतात जीवितहानी कमी झाली असे राज्यपालांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते ब्रहाकुमारी गोदावरीबेन, विक्रम प्रताप सिंह, हरीश शेट्टी, संगीता तपश गुहा, संजीव निगम, कपिलदेव पांडेय, भावना रघुनाथ कोडियाल, सुजित महाजन, निशित शहा, मनोज वरुडे, श्रीप्रकाश सिंह, नम्रता पमनानी, अरुण रोडे, डॉ. कमलेश राऊत, डॉ. जनार्दन वानखेडे, महाडिक, जयंत आहेर, थोरात, प्रकाश शिरसाठ, सौम्या पाण्डेय, डॉ. वाघमारे, डॉ. फुरकां शेख, रिना बालमुरूगन साळुंखे, सुलतान पटेल डॉ. दत्तात्रय बेटमोगरेकर, दशरथ अर्जुन कांबळे, अरविंद प्रभू, ज्ञानेश्वर भोसले, अँथनी मस्करेन्हस, डॉ अफझल कासम देवळेकर व सुनील शेट्टी यांना समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

दुसऱ्याच्या उत्कर्षाचा विचार केल्यास समाज प्रगती साधेल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0

मुंबई, दि. 7 : समाजातील गरीब, उपेक्षित, निराश्रीत व्यक्तीला आपापल्या शक्तीनुसार मदत करण्याची परंपरा वैदिक काळापासून भारत देशात आहे. जे कार्य आपल्या वाट्याला आले आहे, ते सर्वोत्तम प्रकारे करणे ही देखील एक प्रकारे ईशसेवाच आहे. स्वतः सोबत दुसऱ्याच्या उत्कर्षाचा विचार केल्यास समाज प्रगती करेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय करणाऱ्या ३१ व्यक्तींना ‘समाजरत्न’ पुरस्कार करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती तसेच गौ रक्षा फाउंडेशन तर्फे समाजरत्न पुरस्कार देण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष राजू सुदाम शेठ, आयोजक डॉ.प्रमोद पाण्डेय, सहआयोजिका शैलजा मलिक व सूत्रसंचालिका नीता बाजपेयी व्यासपीठावर उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते यावेळी जीएसटी सहआयुक्त पियुष शुक्ल यांनी लिहिलेल्या ‘द लॉकडाऊन स्टोरीज’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

जगात चागंल्या कार्यासाठी मदत देणाऱ्यांची आजही वानवा नसून घेणारेच कमी आहेत असे सांगताना कोविड समूह संसर्गाच्या विपरीत काळात मोठ्या अधिकाऱ्यांपासून स्वच्छता कर्मचाऱ्यापर्यंत सर्वांनी अद्भुत प्रकारचे काम केले, त्यामुळेच जगाच्या तुलनेत भारतात जीवितहानी कमी झाली असे राज्यपालांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते ब्रहाकुमारी गोदावरीबेन, विक्रम प्रताप सिंह, हरीश शेट्टी, संगीता तपश गुहा, संजीव निगम, कपिलदेव पांडेय, भावना रघुनाथ कोडियाल, सुजित महाजन, निशित शहा, मनोज वरुडे, श्रीप्रकाश सिंह, नम्रता पमनानी, अरुण रोडे, डॉ. कमलेश राऊत, डॉ. जनार्दन वानखेडे, महाडिक, जयंत आहेर, थोरात, प्रकाश शिरसाठ, सौम्या पाण्डेय, डॉ. वाघमारे, डॉ. फुरकां शेख, रिना बालमुरूगन साळुंखे, सुलतान पटेल डॉ. दत्तात्रय बेटमोगरेकर, दशरथ अर्जुन कांबळे, अरविंद प्रभू, ज्ञानेश्वर भोसले, अँथनी मस्करेन्हस, डॉ अफझल कासम देवळेकर व सुनील शेट्टी यांना समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

पुण्याच्या पोलिस अधीक्षकांना तात्काळ निलंबित करा – विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

0

मुंबई, दि. ७ मार्च – मी पुण्यात भाषणात एक वक्तव्य केले होते. त्याचा विपर्यास करत माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याच पोलिस आधीक्षकांनी हा गुन्हा दाखल केला. जी गोष्ट मी बोललो त्याचा विपर्यास करत गुन्हा दाखल केला. त्यामुळे त्या एसपीला केवळ समझ देऊन सोडणे योग्य नाही तर त्यांना तातडीने निलंबित करा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी विधान परिषदेत केली.
प्रश्नोत्तराच्या तासात पुणे जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाचे अध्यक्ष तथा पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्यावरील बदली आदेशातील अपमानास्पद उल्लेख प्रकरणी कारवाई करण्याचा प्रश्न विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला. यावेळी दरेकर यांनी सांगितले की, मंत्री महोदय उत्तर देतायत की, त्यांना समज देण्यात आली आहे, ते आम्हाला मान्य नाही. एसपीने एका बदलीच्या आदेशामध्ये लिहिलेय की त्या महिलेचे कुणाशी तरी संबंध आहेत. आणि तुम्ही सांगताय की समझ दिली, दिलगिरी व्यक्त केली. तुम्ही काहीही केलेले चालते. या प्रकरणीही संबंधित एसपीच जबाबदार आहे. एसपीला निलंबित करण्याची मागणी दरेकर यांनी केली.

तरुण शेतक-याची आत्महत्या हे सरकारसाठी लज्जास्पद

सोलापूरातील मगरवाडी येथे सुरज जाधव नावाच्या एका शेतकऱ्याने चार मार्चला फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली. ‘पुन्हा शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येणार नाही’, असं म्हणत या तरुण शेतकऱ्याने आपलं जीवन संपवलं आहे. ही बाब महाविकास आघाडी सरकारसाठी लज्जास्पद असल्याची टीका करत महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत असंवेदनशील असल्याचा आरोप केला आहे.
विधानपरिषदेत हा महत्त्वाचा विषय माडंताना दरेकर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्येला तोंड द्यावं लागतंय. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जगणं मुश्कील झालं आहे. यातच सूरज जाधव नावाच्या तरुण शेतकऱ्यांने केलेल्या आत्महत्या केली. शेतकऱ्यांची विज तोडणी करू नये, शेतकरी आत्महत्या करताना सरकार वीज तोडणी करत असून त्यांना अवाजवी वीज बिल पाठवित आहेत, त्यामुळे शेतक-यांची वीज तोडणी थांबवणार नाही तोपर्यंत कामकाज होऊ देणार नाही, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
सूरज जाधवने आत्महत्येपूर्वी व्हिडिओ केला आहे त्यात त्याने म्हटलंय, मला पुन्हा शेतकरी म्हणून जन्म घ्यायचा नाहीए, कारण शेतकरी हा असमर्थ, दुबळा असतो. या सरकारला शेतकऱ्याची काळजी नाहीए, असं म्हणत त्याने शेतकरी धोरणाचा निषेध केला. आणि त्यानंतर त्याने आत्महत्या केली. सुरजने वीज तोडणी केल्यामुळे, वीज खंडित केल्यामुळे आत्महत्या केली आहे. आत्महत्येला महाविकास आघाडी सरकारचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे सांगत सरकारवर दरेकर टीकेची झोड उठविली.

मुंबई -गोवा महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करा
काम पूर्ण होईपर्यंत वाहतकीची पर्यायी व्यवस्था करावी
होळी किंवा अन्य सणाला कोकणात जाताना चाकरमान्यांना ८-१० तास लागतात, लहान मुलांना घेऊन ट्रॅफिकमध्ये ताटकळत राहावे लागते. तेव्हा मुंबई- गोवा महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पर्यायी सर्विस रोड किंवा पर्यायी वाहतूक व्यवस्थेसंदर्भात ट्रॅफिक अधिकारी आणि कोकणातील संबंधितांशी तातडीने संयुक्त बैठक घेऊन कोकणवासीयांचा प्रवास सुखकर करावा, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी अधिवेशनात केली. सभापतींच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी बैठक घेण्याचे विधानपरिषदेत मान्य केले.
विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या सदस्थितीबाबत तसेच कोकणवासीय आणि चाकरमान्यांचे प्रवासात होणारे हाल याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावर बोलताना दरेकर म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणाच्या विकासाला गतीने पुढे नेणारा अत्यंत महत्त्वाचा महामार्ग आहे. राज्यकर्त्यांनी ठरवले तर हा महामार्ग वेळेत पूर्ण होऊ शकतो. समृद्धी महामार्ग हे त्याचे उदाहरण आहे. मंत्रीमहोदय यांनी ही जबाबदारी केंद्राची की राज्याची हा प्रश्न न उपस्थित करता याबाबतच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे दरेकर यांनी सांगितले.
दरेकर पुढे म्हणाले की, होळीला मोठ्या प्रमाणावर लोक कोकणात जातात. मुंबई-गोवा महामार्गाचा हा विषय कोकणवासियांसाठी जिव्हाळ्याचा आहे. कंत्राटदाराला तीन वेळा मुदतवाढ दिली. अजूनही या महामार्गाची कामे पूर्ण झालेली नाहीत. नेमकी त्यामागची काय कारणे आहेत? आतापर्यंत किती खर्च झाला? आणि काम कधी पूर्ण होणार आहे? तसेच ठरलेल्या वेळेपेक्षा कामाला विलंब झाल्याप्रकरणी कंत्राटदारावर कारवाई करणार का? असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.
मागील पावसाळ्यात या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात घडले. आता दोन महिन्यांनंतर पाऊस सुरू होईल. मागे पाऊस पडला तेव्हा रस्त्यावर पाणी तुंबले होते. अर्धवट कामांमुळे हायवेला चिखल निर्माण होतो व अपघात घडतात यासंदर्भात सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत? त्यासंदर्भात काय दक्षता घेतली आहे? सिमेंटचे रस्ते तयार करताना या रस्त्याखालील पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्या नादुरुस्त झाल्या आहेत. उन्हाळा सुरू झाल्यावर कोकणात अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई यामुळे निर्माण झाली आहे असेही दरेकर यांनी निर्दशनास आणून दिले.
शासनाने अशा प्रकारच्या क्रॉस होणाऱ्या नादुरुस्त वाहिन्यांचे सर्वेक्षण केले आहे का? त्याचा काही आराखडा तयार केलाय का? हा खर्च कंत्राटदाराकडून वसूल करणार का? या नादुरुस्त वाहिन्यांमुळे गावागावात आज पाणी मिळत नाही. केंद्र शासन, राज्य सरकार आपण बैठका खूप घेताय. प्रामाणिक प्रयत्नही होतायत पण आता या महामार्गाबाबतची नेमकी सद्यस्थिती काय आहे? कोकणच्या जनतेला आपण कधीपर्यन्त हा महामार्ग उपलब्ध करून देणार आहात, असा प्रश्न लक्षवेधीद्वारे दरेकर यांनी विचारला आणि कोकणवासीयांचा प्रवास सुखकर व्हावा अशी व्यवस्था सरकारने तातडीने करावी, अशी मागणीही केली.
सार्वजनिक बांधकाम विभाग व कोकणच्या संबंधितांसोबत संयुक्त बैठक घ्यावी. यंदाच्या होळीसाठी प्रवाश्यांना सुखरूप चार ते पाच तासात पोहचता येईल अशी व्यवस्था करावी अशी मागणी असल्याचे दरेकर यांनी सांगितले. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी बैठक घेतली जाईल, जिथे जिथे ट्रॅफिकच्या समस्या आहेत त्या जागा शोधून पर्यायी मार्ग कसा उपलब्ध करता येईल याकडे लक्ष दिलं जाईल असे आश्वासन चव्हाण यांनी दिले आहे.

बोगस खेळाडू प्रमाणपत्र आधारे नियुक्त्यांवर आळा घालण्यासाठी सॉफ्टवेअर निर्मिती करणार – क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे

0

मुंबई –

वर्ग 3 आणि वर्ग 4 या पदांकरिता 34 खेळाडूंची नियुक्ती करण्यात आली होती. यापैकी 12 जणांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या असून उर्वरित 22 जणांच्या नियुक्त्या लवकरच रद्द करण्यात येणार असून भविष्यात अशा बोगस खेळाडू प्रमाणपत्राच्या आधारे भरती होऊ नये यासाठी क्रिडा विभागामार्फत एक आज्ञावली (सॉफ्टवेअर) विकसित केली जाईल, अशी माहिती क्रीडा राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत दिली.

शासन सेवेत ज्या 258 कर्मचाऱ्यांनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारे नियुक्ती मिळवली, त्यांच्यावर पोलीस कार्यवाही करण्यात आली विभागामार्फत त्यांच्यावर एफ.आय.आर. दाखल करण्यात आला आहे.  याबाबतची पूतर्ता बैठक लवकरच घेण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री तटकरे यांनी सांगितले.

विधान परिषद सदस्य श्रीमती मनिषा कायंदे, श्री.सदानंद खोत यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.

पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांकरिता आरोग्य योजनेची व्याप्ती वाढविणार  गृहराज्यमंत्री सतेज पाटील

महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेंतर्गत पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरिता शासनाने विशेष भूमिका घेतली आहे. त्यांना विशेष आरोग्य यंत्रणा मिळावी यासाठी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पोलिसांकरिता 39 रोगांवर उपचार केले जात आहे. या योजनेत जवळपास 10 हजार पोलीस व कुटुंबांवर उपचार केले असून या उपचाराच्या खर्चापोटी या वर्षात 60 कोटी रूपयांची प्रतिपूर्ती दिली आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी विधान परिषदेत दिली.

सध्या पोलीसांकरिता 39 प्रकारच्या रोगांवर उपचार केले जात आहे. भविष्यात आणखी काही रोगांवर उपचार करण्याचा अंतर्भाव करण्यासंदर्भात बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेतले जाईल. केंद्र सरकारच्या योजना आणि महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्याबरोबर यात असलेल्या काही त्रुटीही दूर करण्यात येतील, असेही श्री.पाटील यांनी सांगितले.

राज्यातील पोलीस आणि कुटुंबियांच्या आरोग्य सेवेबाबतचा प्रश्न विधानपरिषद सदस्य सर्वश्री सुनील शिंदे, शशिकांत शिंदे, डॉ.रणजीत पाटील यांनी उपस्थित केला होता.

 भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील भात पिकांचे ऑक्टोबर व नोव्हेंबर 2021 या महिन्यात 786 हेक्टर बाधित झाले असून बाधित 1862 शेतकऱ्यांना 117 लक्ष रूपयांची नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. यापैकी 63 लक्ष रूपयांचा निधी वितरित करण्यात आला असून उर्वरित निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.

विधान परिषद सदस्य सर्वश्री. डॉ.परिणय फुके, गोपिचंद पडळकर यांनी यासंदर्भातील प्रश्न विचारला होता.

000

कळमनुरी तालुक्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या अनुदानात गैरव्यवहार नाही  कृषीमंत्री दादाजी भुसे

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत निवड झालेल्या 42 गावांकरिता ठिबक/तुषार, मोटार व पाईप इत्यादी साहित्यांकरिता मिळालेल्या अनुदानात गैरव्यवहार झाल्याची तक्रार गजानन प्रभाकर लासिनकर व राजकुमार केवलसिंग जाधव यांनी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे केली होती. या प्रकरणी तक्रारदारांनी केलेल्या सहाही मुद्यांची चौकशी करण्यात आली असून यात गैरव्यवहार झाला नसल्याची माहिती कृषीत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत दिली.

तक्रारदारांनी उपस्थित केलेल्या सहाही मुद्यांची माहिती कृषी विभागाने दिली असून तक्रारदारांचे समाधान झाले असल्याचे श्री.भुसे यांनी सांगितले.

यासंदर्भातील प्रश्न विधानपरिषद सदस्य सर्वश्री अभिजित वंजारी, जयंत पाटील, गोपिनाथ पडळकर यांनी उपस्थित केला होता.

000

बीड जिल्ह्यातील देवस्थान  वक्फ बोर्ड जमिनी चौकशी प्रकरणी एस.आय.टी.ची व्याप्ती वाढवणार – गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई

बीड जिल्ह्यातील देवस्थान व वक्फ बोर्डाच्या जमीन खरेदी-विक्री अपहार प्रकरणी एकूण 5 गुन्हे दाखल झाले असून या 5 गुन्ह्यांपैकी 3 गुन्ह्यात आय.पी.एस.अधिकारी श्री.कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

जमीन अपहारप्रकरणी काही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यापैकी अन्य आरोपी हे शासकीय अधिकारी असल्याने त्यांना न्यायालयाकडून 8 मार्च 2022 पर्यंत अटक मनाई आदेश असल्याने त्यांना अटक करण्यात आली नाही. तसेच या गुन्ह्यातील दोन उपजिल्हाधिकारी यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडून कागदपत्रे उपलब्ध करून घेतली जातील, तसेच गुन्ह्यांची व्याप्ती जास्त असेल तर एस.आय.टी.मध्ये आणखी कर्मचारी वर्ग उपलब्ध करून जलद गतीने तपास करण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.

याबाबत प्रश्न विधानपरिषद सदस्य सर्वश्री विनायक मेटे, अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता.

000

अंमलदार बदली आदेशातील चुकीबद्दल पुणे पोलीस अधक्षकांकडून दिलगिरी  गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई

पुणे पोलीस अधीक्षक यांनी पोलीस अंमलदार रामचंद्र कानगुड यांची बदली करताना बदली आदेशात अनावधानाने झालेल्या चुकीबद्दल पोलीस अधीक्षक यांनी संबधित महिलेच्या घरी जाऊन त्या महिलेची आणि तिच्या कुटुंबाकडे दिलगिरी व्यक्त केली असल्याची माहिती गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

तसेच अशा प्रकारच्या प्रशासकीय चुका वारंवार होऊ नये व त्यांची चूक सुधारावी यासाठी संबंधितांना लेखी समज दिली असल्याचेही श्री.देसाई यांनी सांगितले.

यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य गोपिनाथ पडळकर यांनी उपस्थित केला होता.

000

शिष्यवृत्ती योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर 31 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

0

पुणे दि.7: उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या 14 शिष्यवृत्ती योजनांसाठी 31 मार्च 2022 पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईनपद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन पुणे विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांनी केले आहे.राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे उच्च शिक्षण विभागाच्या 14 शिष्यवृत्ती योजनांची ऑनलाईन अंमलबजावणी करण्यात येते. https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर या शिष्यवृत्तीबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना, एकलव्य आर्थिक सहाय्य, गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य योजना (कनिष्ठ स्तर) व (वरिष्ठ स्तर), राज्यशासनाची दक्षिणा अधिछात्रवृत्ती, शासकीय संशोधन अधिछात्रवृत्ती, जवाहरलाल नेहरु विद्यापीठ शिष्यवृत्ती, राज्यशासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती, गणित व भौतिकशास्त्र विषयातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती, शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती, राज्यशासनाची अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती (भाग-2), माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य, स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य या योजनांचा समावेश आहे. जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी मुदतपूर्व या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहनही डॉ. बोंदर यांनी केले आहे.

नायिकांनी एकत्र साजरा केला ‘जागतिक महिला दिन’

0

सोनी मराठी वाहिनी नेहेमीच स्त्रीची निरनिराळी रूपे प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्नात असते. प्रसंगी कणखर, तर कधी मायाळू तर वेळ पडल्यावर जगदंबेच रूप सुद्धा बघायला मिळतं. सोनी मराठी वाहिनीवरील याच प्रतिभाशाली नायिकांनी एकत्र जागतिक महिला दिन साजरा केला. सेटवर केक आणून नायिकांनी सर्व महिलांना शुभेच्छा दिला.
यावेळेस ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ मधल्या ताराराणी अर्थातच स्वरदा थिगळे, बॉस माझी लाडाची मधील राजेश्वरी म्हणजेच भाग्यश्री लिमये, तुमची मुलगी काय करते मालिकेतील श्रद्धा म्हणजे मधुरा वेलणकर, सावनी म्हणजे जुई भागवत, ज्ञानेश्वर माऊली मालिकेतील मुक्ताई म्हणजेच मिथिला पाटील तर नवीन मालिका ‘ असे हे आमचे घर ‘ मालिकेतील सुभद्रा, काव्या, नारायणी अर्थातच सुकन्या मोने, संचिता पाटील, उषा नाडकर्णी आणि महिला निर्माती मानवा नाईक देखील उपस्थित होत्या.
औरंगजेबाशी लढणारी ताराराणी, भावांच्या पाठीशी उभी राहणारी मुक्ताई, घर सक्षमपणे हाताळणाऱ्या सासू सून, नोकरी सांभाळणारी राजेश्वरी आणि मुलींसाठी वेळप्रसंगी वाघीण होणारी श्रद्धा, अशी अनेक रूप सध्या वाहिनीवर बघायला मिळताय.

सक्षम महिला समृद्ध राष्ट्र

0

महिलांचा आर्थिक विकास आणि त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा म्हणजे महिलांचे सक्षमीकरण नव्हे. आर्थिक विकासाबरोबर त्यांचा सामाजिक विकास घडवून आणणे, त्यांना त्यांचे हक्क व जबाबदारीची जाणीव करून देणे, त्यांना नियोजन व निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणे, त्यांच्या क्षमतेचे संवर्धन करून आर्थिक क्षमता प्राप्त करण्यास सबळ बनविणे तसेच महिला या समाजाचा घटक असल्यामुळे समाजाच्या विकास प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घेणे म्हणजे खऱ्या अर्थाने महिलांचे सक्षमीकरण होय. लोकसंख्येचा अर्धा भाग असलेल्या महिलांचे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सक्षमीकरण करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून सातत्याने नवनवीन उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत.

महिला धोरण

महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांच्या विकासासाठी राज्याने पहिले महिला धोरण सन 1994 मध्ये जाहीर केले. महिला धोरण आणणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. त्यानंतर सन 2001 व 2014 मध्ये दुसरे व तिसरे महिला धोरण विभागामार्फत जाहीर करण्यात आले. आता चौथ्या महिला धोरणाचा मसूदा अंतिम टप्यात आहे. या वर्षीचे धोरण हे केवळ मार्गदर्शक सूचनांच्या स्वरुपात मर्यादित न राहता त्याला कृती आराखड्याची व संनियंत्रणाची जोड पहिल्यांदाच देण्यात येत आहे. अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीच्या उपाययोजना कोणत्या असतील आणि त्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य शासनाच्या कोणत्या विभागाची असेल, या मुद्यांचा समावेश धोरणातच करण्यात आला आहे.

महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 3 टक्के निधी

राज्यातील  महिला व बालकांच्या सर्वांगीण  विकासाकरिता प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला व बाल सशक्तीकरण या सर्वसमावेशक योजनेकरिता (Umbrella Scheme) जिल्हा नियोजन समितीस नियोजन विभागाकडून मिळणाऱ्या एकूण निधीच्या किमान 3% इतका निधी कायमस्वरुपी महिला व बालविकास विभागाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांच्या विकासासाठी शासनातर्फे त्रिस्तरीय धोरण राबविण्यात येत असून महिला सबलीकरण आणि बालकांचा विकास, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बचतगटाच्या महिलांच्या शेतमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध

महिला बचत गट चळवळीमुळे महिलांचे एक जाळे निर्माण झाले असून त्यांच्यातील आत्मविश्वासामुळे कुटुंबात त्यांच्या मताला मान दिला जातो. या बचत गटांना अधिक सक्षम करण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी मी महत्त्वाचे‍ निर्णय घेत आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाने स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी बचतगटासारख्या माध्यमांचा उपयोग केला आहे. मविमही राज्यातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करणारी त्यांना सक्षम करणारी महत्त्वाची यंत्रणा आहे. बचतगटाच्या महिलांच्या शेतमालाला बाजारपेठ व उत्कृष्ट दर मिळवून देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे. माविम आपल्या ई-बिझनेस प्लॅटफॉर्मद्वारे महिला सक्षमीकरणासाठी काम करत असून त्यासाठी बाजारपेठेतील संबंध विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे.त्याच्या अनुषंगाने, वर्ल्ड एक्स्पो दुबई येथे सामंजस्य करार केले आहेत.

सायबर सखी उपक्रमातून महाविद्यालयातील मुलींना प्रशिक्षण

मोबाईल, इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबतच महिलांविरोधातील सायबर गुन्हे फसवणूक यातही वाढ होते आहे. मुलींना सायबर विश्वातील सुरक्षित वापर आणि वावर याकरिता प्रशिक्षित करण्यासाठी डिजिटल स्त्री शक्ती उपक्रम 16 ते 25 वयोगटातील महाविद्यालयीन तरूणींना इंटरनेटचा सुरक्षित उपयोग, गैरप्रकार झाल्यास कायदेशीर बाबी, मानसिक परिणाम, तांत्रिक फसवणूक आदी बाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येईल.

मिशन मुक्ता

कारागृहात बंदी असलेल्या महिला कैदी मुक्ततेसाठी मिशन मुक्ता ही मोहीम राबविण्यात येणार आहे. किरकोळ कारणासाठी कारागृहात बंदी असलेल्या महिला कैदी, त्यांना न्यायव्यवस्थेत कायदेशीर मदत मिळत नसल्यामुळे किंवा बोर्ड ऐकत नसल्यामुळे कारागृहात रहावे लागते, अशा महिलांना कायदेशीर मदत करून त्यांना कारागृहातून सोडवणुकीसाठी कोर्टामध्ये सहकार्य करणे व त्यांचे समुपदेशन करणे याकरिता महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण संचालक, महाराष्ट्र अभिवक्ता संचालक, जेल प्रिझम यांच्या समवेत महिलांच्या कायदेशीर सहकार्याकरिता राज्य महिला आयोगाच्या वतीने ‘मिशन मुक्ता’ ही मोहीम राबविण्यात येत आहे.

नवतेजस्विनी अंतर्गत महिला बचत गटांना 523 कोटींचा निधी

ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नवतेजस्विनी अंतर्गत महिला बचत गटांना 523 कोटींचा निधी दिला आहे. सर्वांगिण प्रगती साधण्यासाठी महिला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पात अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पाच्या उपक्रमांना सुरुवात झालेली असून यामध्ये प्रामुख्याने प्रकल्पासाठी बेसलाईन सर्व्हे पूर्ण करण्यात आला आहे. 241 उपप्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे.

अंगणवाड्यांच्या माध्यमातून परसबाग

राज्याच्या महिला आणि बालविकास विभागामार्फत परसबाग ही संकल्पना राबवण्यात येत आहे. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अंगणवाडीच्या परिसरात परसबागांचा उपक्रम घेण्यात येतो आहे. यामध्ये विविध पालेभाज्या आणि फळभाज्या यांची पिके घेतली जातात. पोषण आहार योजनेअंतर्गत अंगणवाड्यांमध्ये राबवण्यात येत असलेली परसबाग योजना आता कुटुंबांसाठी वरदान ठरते आहे, यामुळे अनेक कुटुंबांची दररोजची थाळी चौरस आहाराने सजते आहे. परसबाग या सुंदर संकल्पनेला घराघरापर्यंत पोहोचवण्याचे काम केलं, ते अंगणवाडी सेविकांनी.

पोषण माह

कुपोषित आईच्या पोटी कुपोषित बालक जन्माला येणार, त्यामुळे सुदृढ बालके, सुदृढ कुटुंब, सुदृढ समाज आणि सुदृढ राष्ट्र घडवायचे असेल तर महिलांच्या मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक पोषणाकडे लहानपणापासून लक्ष देणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्र व महाराष्ट्र शासनाने सप्टेंबर हा महिना पोषण माह म्हणून घोषित केला आहे. अंगणवाड्यांमधून योग्य आहार गरोदर व स्तनदा माता, मुले यांना पुरविण्यात येत आहे. कोरोना काळातही यात खंड पडू दिला गेलेला नाही.

राज्य महिला आयोग

राज्यातील पीडित महिलांना आपल्या तक्रारी इत्यादी प्रकरणात जलद न्याय मिळणे हे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने आवश्यक आहे. राज्यभरातील महिलांना आपल्या तक्रारी घेऊन मुंबईला येणे सोयीचे नाही, हे लक्षात घेऊन राज्य महिला आयोगाची कार्यालये सर्व विभागीय आयुक्तालयांच्या मुख्यालयांच्या ठिकाणी सुरू करण्यात आली आहेत. त्याप्रमाणे ही सर्व कार्यालये कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभागाची मदत घेऊन पीडितांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आयोग काम करत आहे.

महिलांसाठीच्या विविध योजना

वंचित, पीडित महिलांच्या सहाय्यासाठी महिला आणि बालविकास विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या निवारा योजना, राज्य महिला गृहे, आधारगृहे, अनाथालय, महिला स्वीकृती केंद्रे आणि संरक्षित गृहे यामधील निराधार आणि परित्यक्ता विधवांच्या मुलींच्या विवाहाकरीता अनुदान, देवदासींना निर्वाहाकरीता आणि त्यांना व त्यांच्या मुलींना विवाहाकरिता अनुदान देण्याची ‘देवदासी कल्याण योजना’,महिला समुपदेशन केंद्र, अत्याचारग्रस्त पीडित महिलांसाठी सावित्रीबाई फुले बहूउद्देशीय महिला केंद्र आदी योजना राबविण्यात येतात. खऱ्या वंचीत, पीडितांपर्यंत या योजनांच्या माध्यमातून मदत पोहोचविणे हे आमचे उद्दिष्ट असून त्यासाठी काही महत्त्वपूर्ण पाऊले उचलण्यात येत आहेत.

महिलांचे मालमत्ताविषयक हक्क संरक्षित

कोविड प्रादुर्भावामुळे घरातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन विधवा झालेल्या महिलांचे योग्य पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने व त्यांचे न्याय्य हक्क अबाधित राखण्याच्या अनुषंगाने जिल्हा कृती दलाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. मागील दोन वर्षात कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना त्यांच्या मालमत्ताविषयक हक्कापासून वंचित ठेवल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे या महिलांचे मालमत्ताविषयक व अन्य आर्थिक हक्क संरक्षित करण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.

महिला आर्थिक विकास महामंडळ

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) हा महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम आहे. आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या निमित्ताने 24 फेब्रुवारी 1975 साली या महामंडळाची स्थापना झाली. महाराष्ट्र शासनाने दि.20 जानेवारी 2003 नुसार महामंडळाला महिला विकासाची राज्यस्तरीय “शिखर संस्था” म्हंणून घोषित केले आहे. महिलांच्या क्षमता विकसित करणे, त्यांच्यात आत्मविश्वास वाढविणे व उद्योजकीय विकास घडवून आणणे, रोजगाराच्या संधी व बाजारपेठ यांची सांगड घालणे. महिलांचा शिक्षण, संपत्ती व सत्तेत सहभाग वाढविणे, स्थायी विकासासाठी स्वयंसहाय्यता बचत गटांना संस्थात्मक स्वरूप देऊन बळकट करणे यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ काम करते.

महिलांच्या सक्षमीकरणाचे आणि सशक्तीकरणाचे काम महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. महिलांचा जीवन स्तर उंचावण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत. मुलांच्या बरोबरीने मुली शिक्षण घेत आहेत. सक्षम आणि सशक्त समाजनिर्मितीकडे आपली वाटचाल सुरू आहे, असे मला वाटते.

– ॲड. यशोमती ठाकूर,

मंत्री, महिला आणि बालविकास

शब्दांकन : शैलजा पाटील

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा यासाठी कायदा आणणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई

0

मुंबई, दि. 07 : रायगड जिल्ह्यात ‘बल्क ड्रग पार्क’ प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पांची उभारणी करताना स्थानिकांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा हा शासनाचा मानस असून शासनाकडून अधिग्रहण करण्यात येणाऱ्या जमिनीचा मोबदला मालकाला मिळण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याकरिता या अधिवेशनात नवीन कायदा आणणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य जयंत पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील विविध प्रकल्प व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यावेळी ते बोलत होते.

उद्योगमंत्री श्री.देसाई म्हणाले की, जेएसडब्ल्यु स्टील उत्पादक कंपनी ही भारतातील जास्तीत जास्त स्टील उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. कोविडच्या कालावधीत ऑक्सिजन टंचाई भासली होती. या कंपनीच्या माध्यमातून तातडीने ऑक्सिजन उपलब्ध झाला. डोलवी औद्योगिक क्षेत्र (जेएसडब्ल्यु) या प्रकल्पासाठी गावठाणचे क्षेत्र वगळून भूसंपादनाखालील जमीन अधीसूचीत केली असल्यामुळे कोणत्याही गावाचे स्थलांतर होणार नाही.

तसेच येथील शेतकऱ्यांना कुठलीही जबरदस्ती केली जाणार नाही. त्यांच्या सहमतीने व त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या जमिनीला योग्य मोबदला दिला जाणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार तीन हजार कोटी देऊ इच्छित आहे. अनेक राज्य आपल्याकडे उद्योग यावेत यासाठी इच्छुक आहेत. हा एक महत्त्वाकांक्षी व भव्य प्रकल्प असून या ठिकाणी एमआयडीसीच्या माध्यमातून कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. याचा लाभ येथील स्थानिकांना होईल.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मानांकन प्रक्रिया अधिक कठोर करण्यात आली आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणाबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही. उद्योग आणि पायाभूत सुविधा हे एकमेकास पूरक असून विरार, अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉर रायगड जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी होणे गरजेचे आहे. भूसंपादनाचा प्रश्न जिव्हाळ्याचा असून भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या अधिवेशनात किंवा पुढील अधिवेशनात याबाबत कायदा करण्यात येईल, असेही श्री. देसाई यांनी सांगितले.

यासंदर्भात काही गैरसमज असतील तर ते दूर करु. तसेच भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी काहीजण कमी दरात जमीन घेतात मात्र ती पूर्ण झाल्यावर जमिनीचा जास्त नफा घेतात. शासनाने नवीन कायदा तयार केला असून ज्या दिवशी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होईल त्या दिवसापासून शेतकऱ्यांना मोबदला मिळेल. याबाबतचा कायदा लवकरच विधिमंडळात आणण्यात येईल, असे श्री. देसाई यांनी सांगितले.

मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प अंतर्गत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत विरार ते अलिबाग 125 कि.मी. लांबीची बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका वसई, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, पनवेल, उरण, पेण अलिबाग अशी प्रस्तावित आहे. या प्रकल्पाकरिता भूसंपादन हे महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1955 नुसार करण्यात येत आहे. पालघर, ठाणे व रायगड जिल्ह्यातील 106 गावांपैकी 81 गावांमध्ये संयुक्त मोजणीचे काम पूर्ण झाले आहे.

औषध निर्माण विभागाने औषध निर्माण उद्योग समूह विकसित करण्याकरिता प्रोत्साहन देण्यासंदर्भात योजना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील मुरुड व रोहा तालुक्यातील 17 गावांच्या जमिनीवर ‘बल्क ड्रग पार्क’ स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. याकरिता केंद्र शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. याप्रकरणी औद्योगिक विकास महामंडळातर्फे भूसंपादनाची प्रक्रिया चालू आहे. यांना बल्क ड्रग पार्क रायगड जिल्ह्यात प्रस्तावित असून प्रकल्प उभारणी करताना स्थानिकांना शेतकरी व ग्रामस्थ विश्वासात घेऊन काम करावे. तसेच प्रत्यक्ष जमिनीचे सर्वेक्षण करुन स्थानिकांना जास्तीत जास्त मोबदला मिळाला पाहिजे असा शासनाचा मानस आहे, असेही श्री. देसाई यांनी सांगितले.

या लक्षवेधीमध्ये सदस्य अनिकेत तटकरे, शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला होता.

जिल्हा रुग्णालय व नगरपालिकांना नगरविकास विभागाकडून शव वाहिका उपलब्ध करुन देणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री यांच्यासोबत बैठक घेणार

मुंबई, दि. 07 : नगरपालिकेने शव वाहिका उपलब्ध करुन देणे हा त्यांचा जबाबदारीचा विषय आहे. मोठ्या महानगरपालिकेमध्ये शव वाहिका उपलब्ध आहेत. नगरपालिकामध्ये शव वाहिका उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री यांच्यासोबत बैठक घेण्यात येईल. तसेच जिल्हा रुग्णालय व नगरपालिकांना शव वाहिका उपलब्ध करुन देण्यासाठी नगरविकास विभागाला विनंती करु, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

याबाबत सदस्य सुनिल शिंदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना श्री. टोपे बोलत होते.

आरोग्य मंत्री श्री. टोपे म्हणाले, पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील पायरवाडीतील पहिलीत शिकणाऱ्या 6 वर्षीय बालकाला मोखाडा येथून जव्हार कुटीर रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान बालकाचा मृत्यू झाला. संबंधित मुलाचा मृतदेह दुचाकीवर स्वत:च्या घरी नेण्यात आला. ही गंभीर बाब आहे. वाहनचालक उशिरा आल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच परिचारक व डॉक्टर यांच्या हलगर्जीपणाबाबत अधिक खातरजमा करुन चौकशी केली जाईल, असे आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्यात आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी 200 खाटांच्या रुग्णालयाचे बांधकाम चालू असून यासाठी लागणारा निधी प्राधान्याने देण्यात येईल व हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. प्रसुतीसाठी जाणाऱ्या महिलांना कुठलाही मोबदला न घेता मोफत सोनोग्राफी केली जाईल. नगरपालिकेने शव वाहिका उपलब्ध करुन देणे हा त्यांचा जबाबदारीचा विषय आहे. आमदारांना आपल्या मतदारसंघात शव वाहिका उपलब्ध करुन देण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा मानस आहे. प्रत्येक नगरपालिका, महानगरपालिकेत शव वाहिका असली पाहिजे. याबाबत शासन लवकरच निर्णय घेईल, असेही श्री. टोपे यांनी सांगितले.

आरोग्य विभागातील रिक्त जागांपैकी अ आणि ब वर्गाची पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. क आणि ड पद भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल. पी.जी. डॉक्टरांच्या ग्रामीण भागात सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभाग लवकरच समन्वयाने निर्णय घेईल.

जुन्या रुग्णवाहिकांना शववाहिकेत परिवर्तीत करण्याचे विचाराधीन आहे. तसेच पालघर जिल्ह्यासाठी किती शववाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या, आरोग्य विषयक प्रलंबित बाबी राहिल्या असल्यास या प्रक्रियेला जलदगती देण्यासाठी पालघर जिल्ह्याचा आढावा घेण्यात यावा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

या लक्षवेधीमध्ये विलास पोतनीस, रविंद्र फाटक, मनिषा कायंदे यांनी सहभाग घेतला.

व्यवसाय कराचे प्रलंबित विवरणपत्र 31 मार्चपर्यंत दाखल करण्याचे आवाहन

0

पुणे, दि. 7: व्यवसाय कर डिसेंबर २०२१ पर्यंत न भरलेल्या जिल्ह्यातील नोंदणीधारक व्यापारी, मालक व आस्थापनांनी कर आणि व्याजासह प्रलंबित विवरणपत्र 31 मार्च 2022 पर्यंत दाखल केल्यास त्यासाठीचे संपूर्ण विलंब शुल्क माफ करण्यात येणार आहे, असे व्यवसाय कर विभागाने कळवले आहे.

करदात्यांनी व्यवसाय कराचा भरणा व विवरणपत्र ऑनलाईन पद्धतीनेच दाखल करावे. याकरीता www.mahagst.gov.in संकेतस्थळ अथवा ‘MAHAPT’ मोबाईल ॲपचा वापर करावा. करभरणा करताना अडचणी असल्यास राज्यकर सहआयुक्त (व्यवसायकर) वस्तू व सेवा कर भवन, तळमजला, विमानतळ मार्ग, येरवडा, पुणे-411006 (दूरध्वनी क्रमांक 020-26609329/31) या पत्त्यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन राज्यकर सहआयुक्त रामदास शिंदे यांनी केले आहे.

कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्यासाठी संबंधित बॅंकांना सूचना देणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

0

मुंबई, दि. 7 :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची नव्याने कर्ज घेण्यासाठी अडचण होऊ नये, त्यांना कर्ज मिळावे, यासाठी सर्व संबंधित बॅंकांना सूचना देऊ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले.विधानसभेत देवेंद्र फडणवीस, नाना पटोले यांचेसह विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले आदी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९

३१.७१ लाख कर्जखात्यांना २० हजार २५० कोटींचा लाभ

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत ३२.८२ लाख पात्र कर्ज खाती असून आधार प्रमाणिकरण झालेल्या ३२.२९ लाख कर्जखात्यांपैकी ३१.७१ लाख कर्जखात्यांना २० हजार २५० कोटी रुपयांचा लाभ देण्यात आल्याचे सहकारमंत्री शामराव उर्फ बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

आधार प्रमाणिकरण झालेले नसल्याने काही शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत तर काही बॅंकांचे राष्ट्रीयकृत बॅंकांत विलिनीकरण झाल्यामुळे अडचणी आल्याचे सांगून या योजनेसाठी पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद केली असल्याचेही सहकारमंत्र्यांनी सांगितले. कर्जमुक्ती योजनेत कोणत्याही तालुक्यातून बोगस प्रकरणे झाली नाहीत असे निदर्शनास आलेले आहे. असे स्पष्ट करुन पीककर्ज घेण्याचे प्रमाण वाढले आहे, असेही सहकारमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्रातल्या तीन महिलांना ‘नारी शक्ती पुरस्कार’

0

राष्ट्रपतींच्या हस्ते, उत्कृष्ट कार्य करणा-या 29 महिलांना 2020 आणि 2021 यावर्षांचे ‘नारी शक्ती पुरस्कार’ आंतरराष्ट्रीय महिला दिनी प्रदान केले जाणार

नवी दिल्ली -स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून, आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा सप्ताहभराचा उत्सव, 1 मार्च, 2022 रोजी नवी दिल्ली येथे सुरू झाला आहे. या कार्यक्रमाचा समारोप 8 मार्च, 2022 रोजी राष्ट्रपती भवनमध्ये होणार आहे. या विशेष समारंभामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणा-या 29 महिलांना 2020 आणि 2021 यावर्षांचे नारी शक्ती पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. कोविड-19 महामारीमुळे 2020 चा पुरस्कार प्रदान सोहळा 2021 मध्ये होऊ शकला नव्हता. हे पुरस्कारा आता उद्या प्रदान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार असून महिला सशक्तीकरण आणि विविध संबंधित क्षेत्रामध्ये कार्य करणा-या आणि उत्कृष्ट कामगिरी बजावणा-या महिलांकडून लोकांनी प्रेरणा घ्यावी, यासाठी पुरस्कारप्राप्त महिलांबरोबर आयोजित संवादात्मक सत्रामध्ये पंतप्रधान सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमामध्ये एकूण 28 पुरस्कार (वर्ष 2020 आणि 2021 साठी प्रत्येकी 14) एक पुरस्कार संयुक्तपणे दोन महिलांना देण्यात येणार आहे. समाजातल्या असुरक्षित आणि उपेक्षित महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष सेवा कार्य करणा-या महिलांच्या बहुमोल कार्याची घेतलेली दखल म्हणून 29 महिलांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

केंद्र सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्यावतीने ‘नारी शक्ती पुरस्कार’ दिले जातात. व्यक्ती आणि संस्थांनी केलेल्या असामान्य कार्याला पोहोचपावती म्हणून त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. अनेक महिला समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणतात, महिला ‘गेम चेंजर्स’ म्हणून अनेकदा भूमिका बजावतात, त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

या पुरस्कार विजेत्यांच्या कार्यामध्ये त्यांचे वय, भौगोलिक स्थिती कधीच अडथळा बनली नाही. तसेच संसाधने, स्त्रोत यांचा असलेला अभाव त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या मार्गात आडवे आले नाहीत. त्यांच्याकडे असलेल्या दुर्दम्य भावनेमुळे समाजाला आणि तरूण भारतीयांच्या मनांना लिंग भेदभावाच्या विरोधात उभे राहण्यासाठी प्रेरणा देत राहणार आहे. या पुरस्कारामुळे समाजाच्या प्रगतीमध्ये महिलांचीही समान भागीदारी आहे, हे अधिक स्पष्ट केले जात आहे. 2020 च्या नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांमध्ये उद्योजकता, कृषी, नवोन्मेषी उपक्रम, सामाजिक कार्य, कला आणि हस्तकला, एसटीईएमएम आणि वन्यजीव संवर्धन अशा विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या महिलांचा समावेश आहे. तसेच 2021च्या नारी शक्ती पुरस्कार विजेत्या महिलांमध्ये भाषाशास्त्र, उद्योजकता, कृषी, सामाजिक कार्य, कला आणि हस्तकला, मर्चंट नेव्ही, एसटीईएमएम, शिक्षण आणि साहित्य, दिव्यांग अधिकारासाठी कार्य करणा-या महिला यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातल्या तीन महिलांनाही उद्या राष्ट्रपतींच्या हस्ते ‘नारी शक्ती पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये 2020 या वर्षासाठी दिव्यांग कथक नर्तिका सायली नंदकिशोर आगवणे यांना आणि पहिल्या महिला सर्पमित्र वनिता जोगदेव बोराडे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. तर वर्ष 2021 च्या सूचीमध्ये सामाजिक उद्योजिका कमल कुंभार यांचा समावेश आहे.

2020 आणि 2021 या वर्षांच्या नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांच्या सूची पुढीलप्रमाणे आहे.

Sl. NoNameState/ UTDomain
 Anita GuptaBiharSocial Entrepreneur
 Ushaben Dineshbhai VasavaGujaratOrganic farmer & Tribal Activist
 Nasira AkhterJammu & KashmirInnovator – Environmental Conservation
 Sandhya DharJammu & KashmirSocial Worker
 Nivruti RaiKarnatakaCountry Head, Intel India
 Tiffany BrarKeralaSocial Worker – Working for Blind people
 Padma YangchanLadakhRevived the lost cuisine & clothing in Leh region
 Jodhaiya Bai BaigaMadhya PradeshTribal Baiga Art Painter
 Saylee Nandkishor AgavaneMaharashtraDown syndrome affected Kathak Dancer
 Vanita Jagdeo BoradeMaharashtraFirst Women Snake Rescuer
 Meera ThakurPunjabSikki Grass Artist
 Jaya Muthu, Tejamma  (Jointly)Tamil NaduArtisans – Toda embroidery
 Ela Lodh (Posthumous)TripuraObstetrician & Gynecologist
 Arti RanaUttar PradeshHandloom Weaver & Teacher
 Nari Shakti Puruskar 2021 
 Sathupati Prasanna SreeAndhra PradeshLinguist – preserving minority tribal languages
 Tage Rita TakheArunachal PradeshEntrepreneur
 Madhulika RamtekeChhattisgarhSocial Worker
 Niranjanaben Mukulbhai KalarthiGujaratAuthor & Educationist
 Pooja SharmaHaryanaFarmer & Entrepreneur
 Anshul MalhotraHimachal PradeshWeaver
 Shobha GastiKarnatakaSocial Activist – Working for ending Devadasi system
 Radhika MenonKeralaCaptain Merchant Navy – First woman to receive award for Exceptional Bravery at Sea from IMO
 Kamal KumbharMaharashtraSocial Entrepreneur
 Sruti MohapatraOdishaDisability Rights Activist
 Batool BegamRajasthanMaand & Bhajan Folk Singer
 Thara RangaswamyTamil NaduPsychiatrist & Researcher
 Neerja MadhavUttar PradeshHindi Author – working for rights for transgenders and Tibetan refugees
 Neena GuptaWest BengalMathematician

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याशी साधला संवाद ..

0

नवी दिल्‍ली, 7 मार्च 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याशी दूरध्वनीव्दारे संवाद साधला.

उभय नेत्यांनी युक्रेनमधल्या बदलत्या परिस्थितीवर चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान मोदी यांना युक्रेन आणि रशिया यांच्यामधील वाटाघाटींच्या स्थितीची माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या वाटाघाटींचे स्वागत केले आणि आता संघर्ष थांबेल, अशी आशा व्यक्त केली. राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यामध्ये सुरू असलेल्या थेट संभाषणाव्दारे चालू असलेल्या शांततेच्या प्रयत्नांना आपण मोठ्या प्रमाणावर मदत करू शकतो, असे पंतप्रधान मोदी यांनी  यावेळी सुचवले.

सुमीमध्ये अद्याप भारतीय विद्यार्थी अडकले आहेत, त्यांच्या सुरक्षेविषयी पंतप्रधान मोदी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. भारतीय विद्यार्थी आणि नागरिक यांच्या सुरक्षिततेसाठी मानवतावादी ‘कॉरिडॉर’संबंधित सुरू ठेवण्यात आलेल्या उपाय योजनांची माहिती राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान मोदी यांना यावेळी दिली.