Home Blog Page 2011

श्री लक्ष्मी माता मंदिरात उत्सवानिमित्त फळांची आरास

पुणे-अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त या दिवशी शिवदर्शन वसाहतीच्या श्री लक्ष्मी मातेचा उत्सव  पुण्यनगरीचे माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या पुढाकारातून दरवर्षी विविध उपक्रमातून हा मातेचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो.
श्री लक्ष्मी माता उत्सवानिमित्त शिवदर्शन येथील मंदिरात फळांची आरास करण्यात आली होती. संपूर्ण मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिरात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मंदिराच्या गाभाऱ्यात मोगऱ्याच्या फुलांची विशेष सजावट करण्यात आली होती.

सकाळी 9 वाजता आबा बागुल यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला असून संध्याकाळी पालकी सोहळा संपन्न झाला या वेळी मंदिराचे ट्रस्टी नंदकुमार बानगुडे,घनश्याम सावंत,नंदकुमार कोंढाळकर,रमेश भंडारी, अमित बागुल व  शिवदर्शन वसाहतीमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विश्वशांती व मानवतेचा संदेश देणारे डॉ.कराड-डॉ. श्रीपाल सबनीस

‘विश्वशांती की खोज में: विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड’ ग्रंथाचे प्रकाशन

पुणे,दि.३ मे: “ भितीमय व युध्दजन्य वातावरणात विश्वशांती व मानवतेचा संदेश डॉ. विश्वनाथ कराड देत आहेत. जगात सर्व देशांचे वेगवेगळे झेंडे आहेत. परंतू माणुसकीचा झेंडा मात्र डॉ.कराड यांच्या हदयात तेवत आहे. दुसरीकडे राजकीय पक्षांचे भोंगे मात्र स्वार्थापोटी वाजतांना दिसत आहे. तर डॉ. कराड हे वसुधैव कुटुम्बकम आणि विश्वकल्याणाचा भोंगा वाजवितांना दिसत आहेत.” असे मत ज्येष्ठ लेखक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
 माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ज्येष्ठ साहित्यिक आचार्य रतनलाल सोनग्रा लिखित ‘विश्वशांती की खोज में : विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड’या हिंदी ग्रंथाचा प्रकाशन एमआयटीतील संत ज्ञानेश्वर सभागृहात झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
 मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार अनुराग त्रिपाठी विशेष सन्माननीय पाहुणे होते. अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.
तसेच, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, प्र कुलगुरू प्रा. डॉ. मिलिंद पांडे, सल्लागार डॉ. संजय उपाध्ये व विश्वशांती केंद्राचे सल्लागार डॉ. एस.एन.पठाण हे उपस्थित होते.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले,“ संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज यांच्या कार्यांचा आदर्श घेऊन ते सतत शांतीसाठी कार्य करीत आहेत. या पुस्तकातील विचार राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहचविणे गरजेचे असून इंग्रजी भाषेत अनुवाद व्हावा. शांततेचे वातारवण निर्मितीसाठी डॉ. कराड यांनी रामेश्वर रुई येथे राम रहिम सेतू, बुद्ध विहार, आळंदीत घाटांची उभारणी व जगातील सर्वात मोठ्या विश्वशांती घुमटाची निर्मिती केली. ब्रदिनाथ येथे श्री. सरस्वती मंदिराची उभारणी करुन संपूर्ण मानवजातीला एकत्रित आणण्याचे कार्य त्यांनी केले आहे.”
अनुराग त्रिपाठी म्हणाले,“ हा ग्रंथ समाजाला आदर्श दाखवून देण्याचा प्रयत्न करेल. महाराष्ट्राला संंतांची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. त्यांनी जीवन संघर्ष शिकविला. संघर्षातूनच व्यक्तीमत्व मोठे होते. यांचे उत्तम उदाहरण डॉ. विश्वनाथ कराड आहेत. विचारांनी व्यक्तिमत्व घडते तीच व्यक्ति सर्व धर्म समभावाचा संदेश देऊ शकतो. डॉ. कराडांनी वसूधैव कुटुम्बकमचा संदेश दिला आहे.”
डॉ. रतनलाल सोनाग्रा म्हणाले,“ जगाला दिशा दाखविणारे सर्व महान व्यक्ति आणि संत श्री ज्ञानेश्वर माऊली-संत तुकाराम महाराज यांच्या नावांने जगातील सर्वात मोठा विश्वशांती घुमट साकारणारे विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या विश्वात्मक तत्त्वाचे दर्शन या ग्रंथात घडते. सर्व धर्म समभावाचा संदेश व ५४ पुतळ्यांचे काव्यमय लेखन यामध्ये रचले गेले आहे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७०० व्या समाधी सोहळ्या निमित्त पहिल्या जागतिक तत्वज्ञान परिषदेत विश्वशांतीच्या शोधामध्ये पुस्तक प्रकाशित झाले होते. त्या क्षणापासून भारतीय संस्कृती, परंपरा व तत्वज्ञानाचे स्वरूप जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. स्वामी विवेकांनदांनी भाकीत केल्याप्रमाणे विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून जगात सुख, शांती आणि समाधान नांदेल हा उद्देश ठेऊन कार्य करत आहे. आता समाजामध्ये हळूहळू परिवर्तन होतांना दिसत आहे.”
डॉ. संजय उपाध्ये आणि डॉ.एस.एन.पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी प्रास्ताविक व स्वागत पर भाषण केले.
डॉ. महेश थोरवे यांनी सूत्रसंचालन केले. आरती सोनाग्रा यांनी आभार मानले.

एसपी गोसावी मेमोरियल पुणे आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत इलाईट गटात पीवायसी 1 संघाला विजेतेपद

पुणे, 3 मे 2022: पीवायसी हिंदू जिमखाना आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या वतीने एसपी गोसावी मेमोरियल पुणे आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत पीवायसी 1 संघाने पीवायसी 2 संघाचा 24-14 असा पराभव करत विजेतेपद संपादन केले.  
पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीच्या लढतीत 100 अधिक गटात पीवायसी 1 संघाच्या राधिका कानिटकर व जयंत कढे यांनी पीवायसी 2 संघाच्या प्रशांत गोसावी व सुंदर अय्यर यांचा 6-2 असा तर,  90अधिक गटात पीवायसी 1 संघाच्या डॉ.अभय जमेनीस व ऋतू कुलकर्णी यांनी राहुल मुथा व योगेश पंतसचिव यांचा टायब्रेकदमध्ये 6-5(3) असा पराभव करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. खुल्या गटात पीवायसी 1 संघाच्या अभिषेक ताम्हाणेने केतन धुमाळच्या साथीत रोहित शिंदे व नरहर गर्गे यांचा 6-3 असा तर, दुसऱ्या खुल्या गटाच्या लढतीत पीवायसी 1 संघाच्या जयंत कढे व अनुप मिंडा  या जोडीने प्रशांत गोसावी  व अमोघ बेहेरे यांचा 6-4 असा पराभव करून संघाला सहज विजय मिळवून दिला. 
स्पर्धेतील विजेत्या पीवायसी 1 संघाला एसपी गोसावी स्मृतीकरंडक प्रदान करण्यात आला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, क्लबचे मानद सचिव सारंग लागू, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, तनया गोसावी  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीएमडीटीएचे मानद सचिव अभिषेक ताम्हाणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 
निकाल: अंतिम फेरी: 
पीवायसी 1 वि.वि.पीवायसी 2  24-14(100अधिक गट: राधिका कानिटकर/जयंत कढे वि.वि.प्रशांत गोसावी/सुंदर अय्यर 6-2; 90अधिक गट: डॉ.अभय जमेनीस/ऋतू कुलकर्णी वि.वि.राहुल मुथा/योगेश पंतसचिव 6-5(3); खुला गट: अभिषेक ताम्हाणे/केतन धुमाळ वि.वि.रोहित शिंदे/नरहर गर्गे 6-3; खुला गट: जयंत कढे/अनुप मिंडा वि.वि.प्रशांत गोसावी/अमोघ बेहेरे 6-4);  उत्कृष्ट खेळाडू: अभय जमेनीस.    

4 मेचाअल्टिमेटम: मनसेचे महेंद्र भानुशालींना अटक:पहिली कारवाई

0

मुंबई-मनसेचे नेते महेंद्र भानुशाली यांना पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईत सर्वप्रथम त्यांनी भोंगे लावले होते. भानुशाली हे चांदिवली मनसेचे विभाग अध्यक्ष आहेत. राज ठाकरेंनी सांगिल्या प्रमाणे त्यांनी सर्व प्रथम भोंग्यांवर हनुमान चालिसा लावली होती. पोलिसांनी कारवाई दरम्यान त्यांच्याकडील काही भोंगे घेतले ताब्यात घेतले आहेत. पोलिसांनी मनसे सैनिकांना ताब्यात घेण्याची सुरूवात केली आहे.

उद्या रिपब्लिकन पक्ष मशिदींवरील भोंग्यांचे संरक्षण करेल, राज्यात कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही

0

मुंबई-राज ठाकरे यांनी 3 मे रोजी ईद असल्यामुळे भोंग्यांना हात लावणार नाही मात्र 4 मेला ऐकणार नसल्याचा इशारा दिलेला आहे. राज ठाकरे यांची ही भूमिका संविधान विरोधी असल्याचे सांगत रिपब्लिकन पक्ष मशिदींवरील भोंग्यांचे संरक्षण करील. पोलिसांनी सुद्धा रिपब्लिकन कार्यकर्त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे. राज ठाकरे यांनी ईशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजातील काही व्यक्ती भडकाऊ उत्तर देऊन अधिक तेढ निर्माण होईल, अशी भूमिका कोणीही घेऊ नये असे आवाहनही रामदास आठवले यांनी केले आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, मनसे आणि राष्ट्रवादीच्या मोठ्या जाहीर सभा नुकत्याच पार पडल्या. निवडणुकीसाठी सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करीत असताना आता केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षही अॅक्टिव्ह मोड मध्ये आला आहे.उद्या 4 मे रोजी मशिदीवरील भोंगे कोणी जबरदस्ती उतरविण्यासाठी पुढे येतील तर त्यांना रोखण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे भीमसैनिक पुढे उभे राहतील. संविधानाचे राज्य असून इथे कुणाचे दादागिरी आम्ही चालू देणार नाही, असा ईशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला आहे. तसेच, रिपब्लिकन कार्यकर्त्यांना आक्रमक होण्याचे आवाहनही केले आहे.

भोंगे प्रकरण-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पोलिसांना आदेश“कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका”; DGP ना केला फोन

0

एसआरपीएफच्या ८७ तुकड्या आणि ३० हजारांपेक्षा जास्त होमगार्ड :१५ हजार लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई

मुंबई-मनसे मशिदींवरील भोंग्यांविरोधात उद्या राज्यभर आंदोलन करणार असल्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील स्थितीचा आढावा घेतला असून पोलिसांना योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी पोलिसांना कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती पावलं उचलण्याचे आदेश दिले. तसंच कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका असंही सांगितलं आहे.गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली.यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना राज्यातील कायदा सुव्यवस्थेविषयी माहिती दिली.

https://twitter.com/ani_digital/status/1521465959336517632

सध्या पोलिसांकडून कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. बुधवारी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत चर्चा केली. यानंतर पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईची माहिती दिली. कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करु. आम्ही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाई केली असून नोटीस पाठवल्या आहेत. एसआरपीएफच्या ८७ तुकड्या आणि ३० हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात आहेत. कोणत्याही प्रकारे कायदा सुवयवस्था राखावी यासाठी त्यांना सूचना करण्यात आल्या आहेत,” असं रजनीश सेठ यांनी सांगितलं.१५ हजार लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली असून १३ हजार लोकांना नोटीस पाठवण्यात आली असल्याची माहिती रजनीश सेठ यांनी दिली आहे.

चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी राज ठाकरेंवर औरंगाबादेत गुन्हा दाखल: 16 पैकी 12 अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप

0

औरंगाबाद –

चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर औरंगाबदेतील सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादेत मनसेची सभा झाली या सभेत 16 पैकी 12 अटींचे उल्लंघन राज ठाकरे आणि आयोजकांनी केले असा आरोपही ठेवण्यात आला आहे.औरंगाबादेत गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक बोलावली आहे. गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर आणि चार मे रोजी दिलेल्या अल्टीमेटवर चर्चा यात होणार असून उद्या राज्यभरात मनसे रस्त्यावर उतरण्याची शक्यता लक्षात घेता यावरही बैठकीत दिशा ठरणार आहे.औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचा आणि नियमभंग केल्याबाबतचा अहवाल गृहखात्याकडे पाठवला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर तो मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या बैठकीत ठेवण्यात आला. या अहवालाचा आढाव घेतल्यानंतर राज ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.या प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गजानान इंगळे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यानुसार कलम 116, 117, 153 भारतीय दंड विधान 1973 सह कलम 135 महाराष्ट्र पोलिस कायदा 1951 सुधारीत 31 जुलै 2017 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

रोलबॉल ला राजाश्रय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – संदीप खर्डेकर

राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धा संपन्न

पुणे-रोलबॉल ह्या खेळाचा जनक पुण्यातील तरुण राजू दाभाडे आहे याचा तर सार्थ अभिमान आहेच पण जिद्दीने आणि कष्टाने या तरुणाने वा त्याच्या टीमने रोलबॉल ह्या खेळाला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून दिली असून आज 57 देशात हा खेळ खेळला जातो या यशाने ऊर भरून येतो असे गौरवोदगार संदीप खर्डेकर यांनी काढले. ह्या खेळाला पुण्यात, महाराष्ट्रात आणि देशातच नव्हे तर जगभर राजाश्रय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे ही खर्डेकर म्हणाले.पायाला स्केट्स बांधून मैदानात गोल करणे जिकिरीचे असून ह्या खेळाला लोकमान्यता मिळाली असून आता ह्या खेळाडूंच्या कौशल्याचे ही कौतुक होणे गरजेचे असल्याचे ही खर्डेकर म्हणाले.

महाराष्ट्र रोल बॉल संघटना आणि पुणे जिल्हा रोल बॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन दिनांक 1 व 2 मे 2022 रोजी, पवार पब्लिक स्कूल, नांदेड सिटी, पुणे इथे करण्यात आले होते त्याच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.
लवकरच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून केंद्र सरकारच्या क्रीडा विभागाने यांस सहकार्य करावे अशी अपेक्षा रोलबॉल चे जनक राजू दाभाडे यांनी व्यक्त केली. तसेच ह्या खेळाच्या प्रचार वा प्रसारासाठी साठी शासनासह विविध उद्योजकांनी ही पुढाकार घ्यावा असे आवाहन ही त्यांनी केले.

स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ चेतन भांडवलकर सचिव रोल बॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या हस्ते आणि आनंद यादव तांत्रिक समिती अध्यक्ष रोल बॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या अध्यक्षतेखाली झाला.

या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबई, ठाणे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, धुळे, बीड, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, पुणे ई. जिल्ह्यातील मुले व मुलींच्या संघानानी सहभाग घेतला होता.

मुलांच्या गटांमध्ये तृतीय क्रमांका सामना जळगाव विरुद्ध अहमदनगर या दोन संघांमध्ये झाला हा सामना अहमदनगर संघाने ५-० असा एकतर्फी जिंकला अहमदनगर संघाकडून हर्षल घुगे तीन तर वेदांत घुगे, विराज बिंगी यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविले.

अंतिम सामना पुणे आणि कोल्हापूर यांच्यामध्ये झाला. हा सामना पुणे संघाने ६–४ असा जिंकला पुणे संघाकडून अथर्व धायगुडे श्रेयश बोंबले यांनी प्रतेकी दोन तर मधुसूदन रत्नपारखी, आदित्य गणेशवाडे यांनी प्रत्येकी एक गोल केला, कोल्हापूर संघाकडून आदित्य सुतार दोन तर रोनक कणसे व आदित्य मगदूम यांनी प्रत्येकी एक गोल केले.

मुलींच्या गटामध्ये तृतीय क्रमांकाचा सामना ठाणे विरुद्ध अहमदनगर यांच्यात झाला हा सामना अहमदनगर संघाने २-१ असा जिंकला अहमदनगर संघाकडून संजना ठुबे हिने दोन गोल करून विजय मिळवून दिला, ठाणे संघाकडून आशा नागाला हिने एक गोल केला. अंतिम सामना पुणे विरुद्ध कोल्हापूर या दोन संघांमध्ये झाला, अतिशय चुरशीच्या सामन्यामध्ये कोल्हापूरच्या अपूर्वा पाटील हिने एकमेव गोल करून कोल्हापूर संघाला विजय मिळवून दिला.

स्पर्धेचा बक्षीस समारंभ संदीप खर्डेकर उपाध्यक्ष महाराष्ट्र रोल बॉल संघटना गजानन थरकुडे अध्यक्ष पुणे जिल्हा रोल बॉल संघटना, नांदेड सिटीचे संचालक ॲड श्री नरसिंह लगड, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश गोरे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद काळे पुणे जिल्हा संघटना यांनी केले आभार प्रदर्शन एडवोकेट अमोल काजळे पाटील यांनी केले

भारतासह सर्व आशियायी देशांनी जागतिक पातळीवरील महत्त्वपूर्ण संस्कृती म्हणून स्थापित होण्यासाठी ही अत्यंत योग्य वेळ आहे : शेखर कपूर

मुंबई, 3 मे 2022

सुप्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या हस्ते आज मुंबईत आयसीसीआर अर्थात भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने आयोजित केलेल्या भारतीय चित्रपट आणि सुप्त सामर्थ्य या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्‌घाटन झाले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसेच आयसीसीआरचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांची मुंबईत राजभवन येथे झालेल्या उद्‌घाटन सोहोळ्याला उपस्थिती होती.

याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना शेखर कपूर म्हणाले की, भारतासह सर्व आशियायी देशांनी जागतिक पातळीवरील महत्त्वपूर्ण संस्कृती म्हणून स्थापित होण्यासाठी ही अत्यंत योग्य वेळ आहे. ते म्हणाले, “माझ्या आयुष्यात अशीही एक वेळ आली होती जेव्हा, केवळ अमेरिकी माध्यमांच्या प्रभावामुळे मी अमेरिकन माणसांसारखे होण्याची आकांक्षा बाळगली होती.” मात्र आता आपली वेळ आली आहे, भारत आणि चीन हे दोन देश त्यांच्यातील सुप्त सामर्थ्याची  जोपासना करू शकतात, आणि चीनने हे साध्य करण्यासाठीचे सर्व प्रयत्न सुरु केले आहेत,” असे ते पुढे म्हणाले.

तंत्रज्ञानाच्या आधुनिकीकरणाच्या गरजेवर भर देताना शेखर कपूर म्हणाले की, जर भारताला आपले सुप्त सामर्थ्य म्हणून चित्रपटाचा वापर करायचा असेल तर आपल्याला पुढच्या पिढीचे मन आणि हृदय जिंकून घ्यावे लागेल. आज अमेरिकेतील 90 टक्के युवक सिनेमा किंवा इतर आभासी व्यासपीठांवरील निर्मिती पाहत नसून ते गेमिंग तसेच युट्युबवर निर्मित खासगी कथानक पाहत असल्याचे नमूद करून जगातील मोठा युवा देश असलेल्या भारताकरिता सध्याचा काळ ही आपले कथानक जगभर पोहोचविण्याची सुवर्ण संधी आहे. युवकांमधील सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी त्यांना तंत्रज्ञान सक्षम करणे आवश्यक असल्याचे शेखर कपूर यांनी यावेळी सांगितले. भारताकडे जगाला सांगण्यासाठी फार मोठे कथानक असून त्याच्या प्रचार प्रसारासाठी आपण मार्ग शोधले पाहिजे असे ते म्हणाले.

आयसीसीआरचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे म्हणाले, “आज जगभरात भारतीय संस्कृतीबद्दल सद्भावना आणि आकर्षणाची भावना निर्माण झालेली दिसते पण आपल्याला त्यांच्यामध्ये भारताविषयी अधिक सखोल जाणीव निर्माण करण्याची गरज आहे आणि त्यासाठी चित्रपट हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे.” ते पुढे म्हणाले की, गेल्या काही काळात आपल्याकडे तयार झालेले चित्रपट नकारात्मक बाजूवर अधिक प्रमाणात केंद्रित झालेले दिसतात; आपल्याला आपल्या संस्कृतीचे सकारात्मक पैलू देखील सर्वांसमोर आणायला हवेत.

भारतीय चित्रपटसृष्टीची लोकप्रियता पाहता जागतिक सिनेमाशी स्पर्धा करु शकते, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केली. योग आणि जगभर साजरा करण्यात येणारा योग दिन ही सुद्धा भारताची सुप्त शक्तीच आहे, असे राज्यपाल म्हणाले.

सुभाष घई, रुपा गांगुली, भारत बाला, अंबरिश मिश्र, अरुणाराजे पाटील, अशोक राणे, मीनाक्षी शेडे, मनोज मुन्तासिर, परेश रावल आणि जी पी विनय कुमार या नामवंत व्यक्तिमत्वांचा चर्चासत्रात सहभाग आहे.

सिनेमॅटिक वसाहतवादः जागतिक आणि भारतीय सिनेमा पाश्चात्यांच्या नजरेतून, परदेशामध्ये भारत या संकल्पनेबाबत जागरुकतेचा प्रसार करण्यासाठी भारतीय सिनेमाचा एक वाहक म्हणून उपयोग, प्रादेशिक सिनेमा आणि त्याचा जागतिक प्रभाव, भारतीय सिनेमाचा परदेशी प्रेक्षकांसोबत वाढीव संपर्क आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर उद्या फिल्मस डिवीजन येथे आयोजित समारोपाच्या सत्राला संबोधित करणार आहेत.

1 दशलक्ष बेरोजगार भारतीय तरुणांना रोजगार देण्यासाठी ग्रामसेवक.कॉमचा उपक्रम

0

नवी दिल्ली, 3 मे 2022: महाग्राम ही तंत्रज्ञानावर चालणारी फिनटेक कंपनी आहे जिने फिनटेक सोल्यूशन्सद्वारे जवळपासच्या मॉम-अँड-पॉप स्टोअरमधून बँकिंग सक्षम केले आहे. ग्रामीण महिलांना जवळच्या बँकेच्या शाखेत मैलांचा प्रवास करण्याऐवजी स्थानिक किराणा स्टोअरमध्ये पैसे वाचविण्यास सक्षम करणे हे कंपनीचे ध्येय आहे.

अलीकडेच, महाग्रामने भारतातील ग्रामीण आणि शहरी भागात राहणाऱ्या सर्व नागरिकांना मूलभूत बँकिंग आणि ई-गव्हर्नन्स सेवा प्रदान करण्यासाठी “GramSevak.com” नावाचे नागरिक सेवा वितरण पोर्टल सुरू केले आहे. अलीकडील ग्रामीण आणि शहरी चौकटीत राहाणे, सर्व स्थानिक बँकिंग आणि ई-अर्नन्स सेवा प्रदान करण्यासाठी “GramSevak.com” नावाने नागरिक सेवा वितरण सुरू केले आहे.

या उपक्रमावर भाष्य करताना, महाग्रामचे सीईओ श्री राम श्रीराम म्हणतात की, प्रकल्पावर काम करणार्‍या सर्व “ग्रामसेवकांना” ग्रामसेवक डॉट कॉम पोर्टलद्वारे नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांसाठी कमिशनच्या स्वरूपात भरपाई दिली जाईल. नागरिक त्यांच्या स्थानिक “ग्रामसेवक” प्रतिनिधींच्या मदतीने ई-गव्हर्नन्स, बँकिंग आणि विमा सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी “GramSevak.com” प्लॅटफॉर्म वापरू शकतात. नागरिकांच्या “ग्रामसेवक” सदस्यांच्या ई-गव्हर्नन्स, बँकिंग आणि विमा सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी “GramSevak.com” प्लॅटफॉर्म फॉर असू शकतात.

आर्थिक साक्षरता आणि आर्थिक सुलभता झपाट्याने वाढेल कारण भारतातील फिनटेक क्षेत्र वाढत आहे आणि मोठ्या नवकल्पनांचा साक्षीदार आहे. भारतातील बहुसंख्य लोकसंख्येला अजूनही बँकांमध्ये प्रवेश नाही किंवा मूलभूत बँकिंग सेवांसाठी बँकांकडे जाण्यासाठी आर्थिक साक्षरतेचा अभाव आहे. महाग्राम, तंत्रज्ञानावर आधारित फिनटेक स्टार्टअप म्हणून, अशा लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते जेणेकरून त्यांना उर्वरित लोकसंख्येप्रमाणेच महत्त्वाच्या बँकिंग सेवांचा लाभ घेता येईल. महाग्रामचा असा विश्वास आहे की कोविड नंतरच्या काळात लोक उत्पन्नाच्या दुसऱ्या स्त्रोताकडे गंभीर झाले आहेत. महाग्राम, तंत्रज्ञानावर आधारित फिनटेक स्टार्टअप म्हणून, अशा लोकांचा उल्लेख करण्याचा प्रयत्न करते, त्यांना विशेषतः लोकसंख्येप्रमाणे बँकिंग सेवांचा लाभ घेता येईल. महाग्रामचा असा विश्वास आहे की कोविड नंतर लोकांच्या उत्पन्नाचे प्रमाण क्रेडिट गंभीर आहेत.

GramSevak.com पोर्टल ग्रामीण ग्राहकांना लक्षात घेऊन डिझाइन आणि विकसित केले आहे आणि सहाय्यक मॉडेलद्वारे नागरिकांना कोणतीही तांत्रिक किंवा आर्थिक माहिती नसतानाही या सेवांचा लाभ घेता येईल. 300 दशलक्ष बँक नसलेल्या जनतेला आर्थिक समावेशाखाली आणण्याचे आमचे ध्येय आहे.

ग्रामपंचायत पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

पुणे, दि. 3: राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 5 जून रोजी मतदान तर 6 जून रोजी मतमोजणी होणार आहे.तहसिलदारांनी निवडणूकीची नोटीस 5 मे 2022 (गुरुवार) प्रसिद्ध करावी
उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे 13 मे ते 20 मे या कालावधीत 14 मे, 15 मे तसेच 16 मे ची सार्वजनिक सुटी वगळून सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत या वेळेत सादर करता येणार आहे.
नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 मे रोजी सकाळी 11 वाजल्यापासून होईल आणि छाननी संपेपर्यंत ही प्रक्रीया चालेल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक 25 मे असून वेळ दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. त्याच दिवशी दुपारी 3 वाजल्यानंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येऊन अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

मतदान 5 जून रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत राहील. मतमोजणी 6 जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत 9 जून 2022 पर्यंत निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.

जिल्हयात 222 ग्रामपंचायतीमधील एकूण 243 रिक्त जागेची पोट निवडणूक होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिली आहे.

हर्षदाच्या ‘सुवर्ण’ कामगिरीचा देशाला अभिमान – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

मुंबई, दि. 3:- जागतिक ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या पुण्याच्या हर्षदा गरुड हिचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात, हर्षदाच्या सुवर्ण कामगिरीचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे. ग्रीस-हेरकिलॉन येथे झालेल्या जागतिक ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेत हर्षदाने देशासाठी पाहिले सुवर्णपदक जिंकले आहे. पुणे जिल्ह्यातील मावळमधील हर्षदाने देशाच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवला असून तिच्या या कामगिरीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हर्षदाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

निरामयच्या प्रशिक्षण शिबिरात ७०० युवतींचा सहभाग

पुणे, ता. ३ : ‘निरामय’ संस्थेच्या वतीने किशोरी शक्ती प्रकल्पाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘रंग भावनांचे’ या तीन दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिरात सातशेहून अधिक युवतींनी सहभाग घेतला.

शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, शैक्षणिक, समुपदेशन, स्वसंरक्षण आणि आरोग्य विषयक शिबिरात मार्गदर्शन करण्यात आले. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या संकल्पनेवर प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

आमदार माधुरी मिसाळ, पश्चिम विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, ए. जी. डायग्नोस्टिकच्या डॉ. विनंती पाटणकर, संस्थेचे अध्यक्ष अड एस. के. जैन, प्रकल्प प्रमुख साधना पवार, उद्योजक गजेंद्र पवार, ज्योतिकुमार कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.

मिसाळ म्हणाल्या, ‘उच्च ध्येय, मनाची क्षमता, सातत्यपूर्ण कष्ट करण्याची तयारी, सकारात्मकता, सहनशीलता आणि संघर्ष करण्याची तयारी हे गुण मुलींना यशस्वी करतात. यश मिळविल्यानंतरही जे जमिनीवर राहातात तेच उंच भरारी घेऊ शकतात. त्यासाठी संकटातील संधी ओळखून यश मिळविले पाहिजे.’

साखर आयुक्त कार्यालासमोर भाजपा बेमुदत धरणे आंदोलन करणार

वासुदेव काळे (प्रदेशाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा) यांची घोषणा

पुणे-ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे,त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत साखर आयुक्त महाराष्ट्र यांच्या कार्यालयासमोर ५ मे पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.अशी घोषणा भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी केली आहे .

ते म्हणाले ,’ महाराष्ट्रातील गाळपाविना शिल्लक उभ्या असलेल्या उसाचे तातडीने नियोजन करावे यासाठी किसान मोर्चा मागील एक महिन्यापासून पाठपुरावा करीत आहे. परंतु एफ आर पी दोन टप्प्यात देण्याचा डाव रचण्यासाठी जाणीव पूर्वक अतिरिक्त उसाच्या समस्या आणखी तीव्र करण्याचा राज्य सरकार व साखर सम्राट प्रयत्न करत आहेत. यामुळे भाजपा किसान मोर्चा आक्रमक झाला आहे
संपूर्ण महाराष्ट्रात या वर्षी उसाचे लागण क्षेत्र व चालू कारखाने यांची गाळप क्षमता याचा विचार करता या वर्षी योग्य नियोजन न झाल्याने आज रोजी ५०लाख टन इतका ऊस गाळपाविना शिल्लक असून ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. फेब्रुवारी महिन्यात जाणारा ऊस मे महिना आला तरी तोडला गेला नाही. यामुळे वजनात कमालीची घट झाली आहे. आता तीव्र उन्हामुळे एक एक दिवस ऊस जगवणे मुश्कील होत चालले आहे. व यातच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी स्वतः ऊस तोडून कारखान्यावर आणावा असे बजावले जात आहे. जखमेवर मीठ चोळण्यासाठी कारखानदार सरकारच्या मदतीने शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. हे भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही.
या जाचाला आता ऊस उत्पादक शेतकरी कंटाळला आहे. सरकारच्या या आडमुठेपणामुळे आता ऊस उत्पादक शेतकरी देखील आत्महत्या करण्याच्या मार्गावर आहे.
या प्रकरणी दिनांक ०५ मे पासून खालील मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत साखर आयुक्त महाराष्ट्र यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

  1. राज्यातील ऊस गाळपाविना शिल्लक राहणार नाही याची हमी द्यावी.
  2. अतिरिक्त ऊसाचे नियोजन करताना वाहतुकीचा खर्च शेतकऱ्याच्या बिलातून कपात करू नये. अतिरिक्त लागणारा खर्च राज्यशासनाने साखर कारखान्यांना द्यावा.
  3. गाळप झालेल्या जळीत उसाला व तोडणी कार्यक्रम पेक्षा उशिरा तोडलेल्या उसाला प्रती हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान द्यावे.
  4. गाळपाविना ऊस शिल्लक राहिल्यास शिल्लक ऊसाचे पंचनामे करून हेक्टरी ७५ हजार रूपये अनुदान द्यावे.

रा.स्व. संघाच्या घोष विभागाची महात्मा बसवेश्वर यांना मानवंदना

हिंदू वीरशैव लिंगायत मंचातर्फे जगतज्योति महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी 
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी दिलेली घोष मानवंदना… महिलांच्या हस्ते प्रतिमेचे केलेले पूजन व औक्षण आणि धान्य रंगावलीतून साकारलेले महात्मा बसवेश्वर यांचे रेखाचित्र अशा उत्साही वातावरणात बाजीराव रस्त्यावरील जगतज्योति महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यासमोर त्यांची जयंती साजरी झाली. 
हिंदू वीरशैव लिंगायत मंचाच्या पुणे महानगर शाखेतर्फे बाजीराव रस्त्यावरील जगतज्योति महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यासमोर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  रा. स्व. संघाचे प्रांत कार्यवाहक डॉ. प्रविण दबडगाव, महानगर कार्यवाहक  महेश करपे, हेमंतराव हरहरे, शरद गंजीवाले, अतुल सरडे यांसह कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वेश्वर बँकेचे अध्यक्ष अनिल गाढवे,  सुनील रुकारी, डॉ.राजेंद्र हिरेमठ, विजयराव पानगावे, वीरशैव लिंगायत समाज पुणेचे अध्यक्ष विलास मारटकर, किशोर कडेकर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

महाराणा प्रताप उद्यान येथे बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या घोष विभागातर्फे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे महिलांच्या हस्ते पूजन झाले. यावेळी कलाकार अमोल काळे यांनी तांदूळ, मसूर, मूग, हरभरा, मीठ, गोडा मसाला इत्यादी साहित्य वापरून ४ बाय ३ आकारातील धान्य रंगावली २ तासात साकारली. हे धान्य वंचित विकास संस्थेला देण्यात येणार आहे.