Home Blog Page 2001

मुंबईत ४८३ किलो दर्जाहीन पनीर जप्त

0

मुंबई, दि. 11 : बृहन्मुंबई, अन्न  व औषध प्रशासन शाखेच्या अन्न सुरक्षा अधिकारी आणि गुन्हे नियंत्रण शाखा यांनी संयुक्त कारवाई करत कमी दर्जाचे पनीर जप्त केले. जप्त केलेल्या 483 किलोग्राम पनीरची किंमत 1,00,680/- रुपये एवढी असून संबंधितांविरोधात चेंबूर पोलिसांत ‍फिर्याद देण्यात आली आहे, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

6 मे रोजी गुन्हे नियंत्रण शाखा पोलिसांना प्राप्त माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबई या कार्यालयाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी 1) मे.डेअरी पंजाब, चेंबुर कॉलनी, चेंबुर , मुंबई, 2) वाहन क्र. एमएच 05 डिके 1059 (मे.यशोदा ओर्गनिक फूड प्रा.ली., बदलापूर , ठाणे यांचे वाहन) 3) वाहन क्र. एमएच 04 केएफ 1546 (मे.दिशा डेअरी, पिम्प्लास,भिवंडी, ठाणे यांचे वाहन) या आस्थापनांची तपासणी केली असता तेथे मे.यशोदा ओर्गनिक फूड प्रा. ली., बदलापूर , ठाणे व मे. दिशा डेअरी, पिम्प्लास,भिवंडी, ठाणे यांनी उत्पादित केलेला पनीरचा साठा वाहतूक व विक्रीसाठी साठविला असल्याचे आढळले.

हा साठा कमी दर्जा असल्याच्या संशयावरुन पनीरचे नमुने घेवून उर्वरित 483 किलोग्रॅमचा साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या पनीरचे अन्न नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. तथापि, पनीरचे नमुने योग्य नसल्याचे प्रयोगशाळेने सांगितले. त्यामुळे संबंधित विक्रेता, पुरवठादार व उत्पादकाविरुद्ध चेंबुर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.

सदरची कारवाई सह आयुक्त (अन्न),अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबई म.ना.चौधरी, व सहायक आयुक्त (अन्न), परिमंडळ ७  रा. दि. पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी, सु.स.खांडेकर, सं.शा.सावंत, ता.ग.लोखंडे, स.दा.तोरणे, अन्न सुरक्षा अधिकारी यांनी केली.

राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी आमच्या पाठीत खंजीर खुपसला -नाना पटोले

भंडारा: राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रयोगाला बाजूला सारत भंडारा जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि भाजपच्या नाराज गटाने  हातमिळवणी करत काँग्रेसने परिषदेचे अध्यक्षपद, तर भाजपच्या या गटाने उपाध्यक्षपद पदरात पाडून घेतले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याला जबाबदार राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक ठिकाणी आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, म्हणूनच आम्हाला असा निर्णय घ्यावा लागला असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. या निमित्ताने महाविकास आघाडीतील स्थानिक पातळीवरील खदखद बाहेर आल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. 

मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे. आमच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरू आहेत. याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू, असे ट्विट काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केले आहे. गोंदियात झालेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपची साथ दिल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षासोबत युती करून सत्ता स्थापन केलेली आहे. याबाबत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा देखील केलेली आहे. या चर्चेनंतर देखील स्थानिक पातळ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशीच युती केल्याचे दिसले आहे. गोंदिया जिल्हा परिषदेत देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपशीच युती केली, असे सांगत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेसची साथ सोडत भाजपशी जवळीक केली. मात्र भंडारा जिल्ह्यात नाना पटोले यांनीही भाजपमधील एक गट फोडला. येथे भाजपचे चरण वाघमारे यांच्या गटाने काँग्रेस पक्षाला साथ दिली. या प्रयोगामुळे काँग्रेसकडे परिषदेचे अध्यक्षपद आले. तर चरण वाघमारे गटाला परिषदेचे उपाध्यक्षपद मिळाले आहे.
माजी आमदार चरण वाघमारे यांनी काँग्रेसला साथ दिल्यामुळे भाजपने कारवाईचा बडगा उगारत त्यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भंडारा जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल

काँग्रेस- २१ सदस्य
भाजप- १२ सदस्य
राष्ट्रवादी काँग्रेस- १३ सदस्य
शिवसेना – १ सदस्य

…तोपर्यंत 124 ए अंतर्गत(राजद्रोह)गुन्हा दाखल करू नका -सर्वोच्च न्यायालयाची राजद्रोह कायद्याला स्थगिती

0

नवी दिल्ली-राजद्रोहाच्या कायद्यावर केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल केले. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आयपीसीच्या कलम 124 एच्या तरतुदींवर पुनर्विचार करण्याची परवानगी दिली आहे. जोपर्यंत फेरपरीक्षेची प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत 124 ए अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहे.राजद्रोहाच्या घटनात्मकतेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने आपल्या ऐतिहासिक निकालात राजद्रोह कायद्यातील तरतुदींचा पुनर्विचार होईपर्यंत त्याच्या वापरावर बंदी घातली आहे. 152 वर्षांत प्रथमच राजद्रोहाच्या कायद्यातील तरतुदींना स्थगिती देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने राजद्रोह कायद्याच्या घटनात्मकतेवर सुनावणी करताना हा निकाल दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात होणार आहे.

तत्पूर्वी, सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, आयपीसीच्या कलम 124A वर बंदी घालू नये. भविष्यात या कायद्यांतर्गत एफआयआर पोलीस अधीक्षकांच्या संमतीनंतरच नोंदवावेत, असा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे.

केंद्राने म्हटले आहे की, प्रलंबित खटल्यांचा संबंध आहे, संबंधित न्यायालयांना आरोपींच्या जामिनावर त्वरित विचार करण्याचे निर्देश दिले जाऊ शकतात. विशेष म्हणजे, राजद्रोहाच्या खटल्यांमध्ये कलम 124A शी संबंधित 10 हून अधिक याचिकांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.देशद्रोह कायद्याला आव्हान देणारी याचिका एडिटर गिल्ड ऑफ इंडिया, तृणमूल खासदार महुआ मोईत्रा यांच्यासह पाच पक्षांच्या वतीने दाखल करण्यात आली होती. आजच्या काळात या कायद्याची गरज नसल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. सरन्यायाधीश एनव्ही रमना यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या खंडपीठात न्यायमूर्ती सूर्यकांत त्रिपाठी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांचाही समावेश आहे.

 सरकारचे वतीने काय म्हणाले…

  • अदखलपात्र गुन्ह्याची नोंदणी थांबवता येणार नाही, असे केंद्राने म्हटले आहे. कायद्याचा प्रभाव रोखणे योग्य नाही, त्यामुळे तपासासाठी जबाबदार अधिकारी असावा. कायद्यांतर्गत विहित केलेल्या मानकांशी सुसंगत असेल तरच गुन्हा नोंदविला जावा.
  • एसजी तुषार मेहता म्हणाले की, प्रलंबित राजद्रोहाच्या खटल्यांच्या गांभीर्याची माहिती नाही. यामध्ये कदाचित दहशतवादी किंवा मनी लाँड्रिंग अँगल आहे. ते न्यायालयाच्या विचाराधीन आहेत आणि त्यांच्या निर्णयाची आपण वाट पाहिली पाहिजे.
  • घटनापीठाने कायम ठेवलेल्या राजद्रोहाच्या तरतुदींवर स्थगितीचा आदेश देणे हा योग्य मार्ग असू शकत नाही.

मंगळवारी न्यायालयाने विचारले होते, नवीन गुन्हे दाखल होणार की नाही?

मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारले होते की, या कायद्यांतर्गत नवीन गुन्हे दाखल केले जातील की नाही? न्यायालयाने असेही विचारले होते – देशात आतापर्यंत IPC 124-A कायद्यांतर्गत असलेल्या प्रकरणांचे काय होईल? या कायद्यावरील पुनर्विलोकन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 124A अंतर्गत खटले स्थगित ठेवण्याचे निर्देश ते राज्य सरकारांना का देत नाहीत?

केंद्र सरकारने देशद्रोह कायद्यावर पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे की, सरकार IPCच्या कलम 124A च्या तरतुदींचा पुनर्विचार करेल आणि त्याचे परीक्षण करेल. केंद्राने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले आहे. यामध्ये सरकारकडून चौकशी होईपर्यंत या प्रकरणाची सुनावणी करू नये, असे आवाहन न्यायालयाला करण्यात आले आहे.

यापूर्वी केंद्राने म्हटले होते – कायदा रद्द करू नये

मागच्या गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात राजद्रोह कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी झाली. दरम्यान, हा कायदा रद्द करू नये तर त्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत, असा युक्तिवाद केंद्राच्या वतीने करण्यात आला होता.

असे आहे कायद्याचे सध्याचे स्वरूप

राजद्रोहाच्या याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी, मणिपूरचे पत्रकार किशोरचंद्र वांगखेमचा, छत्तीसगडमधील कन्हैयालाल शुक्ला यांचा समावेश आहे. या कायद्यात अजामीनपात्र तरतुदी आहेत. म्हणजेच भारतात कायद्याने स्थापन केलेल्या सरकारविरुद्ध द्वेष, तिरस्कार, असंतोष पसरवणे हा गुन्हा मानला जातो. शिक्षा म्हणून आरोपीला जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते.

राजद्रोह कलमाचा गैरवापर होत असल्याचे केंद्रालाही पटले -उज्जवल निकल

राजद्रोह कलमाचा गैरवापर राज्य किंवा केंद्र सरकारने केला हे विद्यमान केंद्र सरकारला पटले आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय त्यांनी घेतला. ज्यांच्यावर राजद्रोहाचा आधी गुन्हा दाखल झाला त्याचा फारसा उपयोग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने् होईल असे वाटत नाही. कारण त्यांना संबंधित न्यायालयात आपल्यावरील आरोप चुकीचे कसे आहेत हे सिद्ध करावे लागेल त्यानंतर त्यांना याचा लाभ मिळु शकेल असेही ते म्हणाले.

लेखक, राजकीय व्यक्ती, पत्रकार या कलमांत होरपळले त्यामुळे या कलमात सुधारणा करण्याची गरज आहे. सुधारणा अनेक असून केंद्र सरकार यावर निर्णय घेईल. केंद्राकडे दिग्गज लोक आहेत, मी फुकटचा सल्ला वृत्तवाहिन्यावर देत नाही असा टोलाही यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ उज्जवल निकम यांनी लगावला.

राजद्रोह कायदा काय आहे, तो कधी बनवला गेला, शिक्षा किती?

भारतीय दंड संहितेच्या कलम 124A मधील राजद्रोहाच्या व्याख्येनुसार, जर एखाद्या व्यक्तीने राष्ट्रीय प्रतिकांचा किंवा संविधानाचा अपमान केला किंवा विटंबना करण्याचा प्रयत्न केला किंवा सरकारविरोधी साहित्य लिहिले किंवा बोलले, तर IPC कलम 124A अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. याशिवाय, देशात सरकारविरुद्ध द्वेष, खळबळ किंवा असंतोष भडकावू पाहणारे कोणतेही भाषण किंवा अभिव्यक्तीही राजद्रोहाच्या कक्षेत येते. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीने जाणूनबुजून किंवा नकळत राजद्रोही संघटनांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले तर तोही राजद्रोहाच्या कक्षेत येतो.

इंग्रजी शिक्षण भारतात आणणाऱ्या मॅकॉलेने केला होता राजद्रोहाचा कायदा

हा कायदा ब्रिटिश राजवटीत म्हणजेच 1870 मध्ये ब्रिटिशांनी केला होता. थॉमस मॅकॉले यांनी कलम 124Aचा मसुदा तयार केला होता, त्यांनाच इंग्रजी शिक्षण भारतात आणण्याचे श्रेय जाते. 1897 मध्ये स्वातंत्र्यसैनिक बाळ गंगाधर टिळक यांच्या विरोधात ब्रिटिशांनी पहिल्यांदा याचा वापर केला होता.

जन्मठेपेपर्यंत शिक्षा

राजद्रोहाच्या प्रकरणात दोषी आढळलेल्या व्यक्तीला 3 वर्षांपासून ते जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते. राजद्रोह हा अजामीनपात्र गुन्ह्याच्या श्रेणीत येतो. राजद्रोहाच्या गुन्ह्यात दोषी आढळलेली व्यक्ती सरकारी नोकरीसाठी अर्ज करू शकत नाही. तसेच त्याचा पासपोर्टही रद्द करण्यात येतो. गरज भासल्यास त्यांना न्यायालयात हजर राहावे लागते.

ब्रिटनने 13 वर्षांपूर्वी हटवला राजद्रोहाचा कायदा

भारतात राजद्रोहाचा कायदा करणाऱ्या ब्रिटिशांचा देश असलेल्या ब्रिटनने 2009 मध्ये हा कायदा रद्द केला आहे. भारताशिवाय जगातील अनेक देशांमध्ये हा कायदा लागू आहे. या देशांमध्ये इराण, अमेरिका, सौदी अरेबिया, ऑस्ट्रेलिया, मलेशिया अशा अनेक देशांचा समावेश आहे.

या प्रसिद्ध व्यक्तींवर दाखल झाला राजद्रोहाचा गुन्हा

कन्हैया कुमार : JNUSU नेता राहिलेले कन्हैया कुमार यांच्यावर संसदेवरील हल्ल्याचा दोषी अफझल गुरूवर एका वादग्रस्त कार्यक्रमादरम्यान भारतविरोधी घोषणा दिल्याबद्दल राजद्रोहाचा आरोप आहे.

विनोद दुआ : हिमाचल प्रदेशातील एका स्थानिक भाजप नेत्याने त्याच्या यूट्यूब शोसाठी दुआविरोधात गुन्हा दाखल केला होता. 3 जून 2021 रोजी सुप्रीम कोर्टाने दुआ विरुद्ध दाखल केलेला राजद्रोहाचा खटला फेटाळला.

शशी थरूर : जानेवारी 2021 मध्ये नोएडा पोलिसांनी काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्यासह सहा पत्रकारांविरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. राष्ट्रीय राजधानीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारासाठी या लोकांच्या सोशल मीडिया पोस्ट आणि डिजिटल प्रसारणे जबाबदार असल्याचा आरोप करणाऱ्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

पत्रकार सिद्दीक कप्पन : ऑक्टोबर 2020 मध्ये यूपी पोलिसांनी केरळचे पत्रकार सिद्दीक कप्पन आणि इतर तिघांवर राजद्रोहासह विविध आरोपांवर गुन्हा दाखल केला. कप्पन कथित सामूहिक बलात्कार प्रकरणाची तक्रार करण्यासाठी हाथरसला जात होते.

दिशा रवी : शेतकरी चळवळीला पाठिंबा देणाऱ्या जागतिक ऑनलाइन मोहिमेसाठी टूलकिट शेअर केल्याबद्दल पर्यावरण कार्यकर्त्या दिशा रवी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

असीम त्रिवेदी : 2012 मध्ये कानपूरस्थित व्यंगचित्रकार असीम त्रिवेदी यांना मुंबई पोलिसांनी संविधानाची खिल्ली उडवल्याप्रकरणी राजद्रोहाच्या खटल्यात अटक केली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना फटकारले की, असीम त्रिवेदीला क्षुल्लक कारणांवरून आणि कोणताही विचार न करता अटक करण्यात आली. या कारवाईमुळे व्यंगचित्रकाराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली आहे.

हार्दिक पटेल : गुजरातमध्ये पाटीदारांना आरक्षणाची मागणी करणारे नेते हार्दिक पटेल यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 25 ऑगस्ट 2015 रोजी अहमदाबादमध्ये पाटीदार समर्थक आरक्षण रॅलीनंतर राज्यात तोडफोड आणि हिंसाचार झाला होता. आरोपपत्रात पोलिसांनी हार्दिक यांच्यावर आरोप केला आहे की, त्यांनी राज्यात हिंसाचार पसरवण्याचा आणि निवडून आलेले सरकार पाडण्याचा कट रचला होता.

राणा दाम्पत्य : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यावर महाराष्ट्रात राजद्रोहाच्या कलमान्वये गुन्हा दाखल आहे. राणा दाम्पत्य सध्या जामिनावर बाहेर आहे. ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा वाचण्याची त्यांनी घोषणा दिली तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले होते. त्यादरम्यान राज्यात मोठा गदारोळ उडाला होता. मुंबईत मातोश्रीबाहेर तसेच राणा दाम्पत्याच्या खार येथील निवासस्थानी शिवसेना समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून राणा दाम्पत्याला अटक केली होती. 12 दिवसांनंतर न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला होता.

हे चर्चित व्यक्तीही राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात

उमर खालिद आणि शरजील इमामसारखे विद्यार्थी कार्यकर्ते, सिद्दीक कप्पन आणि गौतम नवलखांसारखे पत्रकार, रोना विल्सन आणि शोमा सेन यांच्यासारखे कार्यकर्ते आणि बरेच लोक अजूनही राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. वरवरा राव यांच्यासारखे वृद्ध कवी-कार्यकर्तेही आहेत. मात्र, प्रकृती खालावल्याने राव वैद्यकीय जामिनावर बाहेर आहेत. सर्वोच्च न्यायालयाने राजद्रोहाच्या कायद्याला स्थगिती दिल्याने हे सर्व लोक तुरुंगातून बाहेर येतील अशी अपेक्षा आहे.

जगण्यापेक्षा इथे मरण स्वस्त- अतुल लोंढे, मुख्य प्रवक्ते, प्रदेश कॉंग्रेस

पुणे- मोदी सरकारच्या कारकिर्दीत वारंवार होणारी गॅस दरवाढ व दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाईच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटचे प्रवक्ते अतुल लोंढे यांची संभाजी उद्यान येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार- प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, गटनेते आबा बागुल, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, अरविंद शिंदे, संजय बालगुडे, अविनाश बागवे,गोपाळ तिवारी, पुजा आनंद, , सुजाता शेट्टी, रफिक शेख, वैशाली मराठे, रमेश अय्यर, संगिता तिवारी, द. स. पोळेकर, शानी नौशाद, रजनी त्रिभुवन, प्रविण करपे, सतिश पवार, रमेश सोनकांबळे, अजित जाधव, प्रियंका रणपिसे, ॲड. राजश्री अडसूळ, राहुल तायडे, शिलार रतनगिरी, अविनाश अडसूळ, सुरेखा खंडागळे, ताई कसबे, नंदा ढावरे, ज्योती परदेशी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होया पत्रकार परिषदेत पत्रकारांना संबोधित करताना मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, ‘‘मोदी सरकारने अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून जनतेला फसवले आहे. युक्रेन आणि रशियाचे युध्दाचे कारण सांगून पेट्रोल – डिझेलची दरवाढ केली. या आधीही कच्चे तेलाचे भाव कमी असताना सुध्दा सातत्याने पेट्रोल – डिझेलची दरवाढ करीत होते. पेट्रोल डिझेलच्या दरवाढी मुळे जीवनावश्यक वस्तूंचेही भाव वाढले आहे. गव्‍हाचा साठा सप्टेंबर पर्यंत पुरेल एवढाच शिल्लक आहे. त्यानंतर त्याचीही टंचाई होणार आहे. गुजरात सरकारला १ हजार कोटी केंद्र सरकारने दिले परंतु महाराष्ट्राला काही दिले नाही. अशा पध्दतीने केंद्रातील मोदी सरकार भेदभाव करत आहे. मोठ्या गाजावाज्याने उज्वला गॅस योजनेची घोषणा केली आणि गरीबांना सबससिडी दिली परंतु निवडणुकी नंतर काही घोषण न करता परस्पर सबसिडी बंद केली. काँग्रेस सरकारच्या राजवटीत ज्या गोरगरीबांना गॅस परवडत नव्‍हते ते रॉकेलचा वापर करून आपला उदरनिर्वाह करीत होते. मोदी सरकारने रॉकेल बंद केले व वारंवार घरगुती गॅस वाढवण्याचा विडा उचलला आहे. त्यामुळे आता गोरीब महिलांना चूल पेटविण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. एप्रिल महिन्यामध्ये देशाची महागाई 7.5 % पर्यंत गेली होती आणि पुढेही वाढणार. मोदी सरकार लोकांची हाडे मोडून कबड्डी खेळण्याचा प्रयत्न आहे. मोदी सरकारचे अच्छे दिन फक्त १० ते १२ उद्योगपतींसाठीच आहे. देशाच्या अर्थव्‍यवस्थेकडे दुर्लक्ष करून जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्यात मग्न आहेत. तरुणांना रोजगार नाही. सामान्य माणासाच्या अन्न, वस्त्र व निवारा या तीन प्रमुख गरजा आहेत. मोदी सरकारच्या राजवटीत या प्रमुख गरजा सुध्दा मिळत नाही हे अत्यंत खेदजनक आहे. काँग्रेस पक्षाने सातत्याने ससंदेत व संसदेच्या बाहेर महागाईवर सरकारला जाब विचारला आहे. आज ही पत्रकार परिषद पुणेकरांच्या उपस्थित घेवून मोदी सरकारने सरकारने केलेल्या महगाईला काँग्रेस पक्षातर्फे निषेध करीत आहोत.

तर भारताची स्थिती श्रीलंकेपेक्षा भीषण होईल

मशिदीवरील भोंगे, देशद्रोह कायद्याचा वापर, अतिक्रमणांच्या कारवाया आदी मुद्द्यांवरून देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. संबंधित मुद्द्यांवरून पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्रातील सत्ताधारी पक्ष भाजपावर निशाणा साधला आहे. देशात निर्माण झालेला सामाजिक तणाव वेळीच थांबवला नाही, तर भारताची स्थिती श्रीलंकेपेक्षा भीषण होईल, अशा शब्दांत त्यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

एनआयए वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी म्हटलं की, “एखाद्यानं जरा काही बोललं तरी त्याच्याविरोधात देशद्रोहाचं कलम लावलं जात आहे. वर्तमानपत्रात काही लिहिलं तर त्याच्याविरोधातही देशद्रोहाचं कलम लावलं जात आहे. राजकीय नेत्यांचं तर काही बोलूच नका. अशा कृत्यांना आताच थांबवलं नाही, तर जी स्थिती आता श्रीलंकेची आहे, त्यापेक्षा वाईट स्थिती भारताची होईल. कारण तेथील सत्ताधारी पक्षानं देखील प्रखर राष्ट्रवादाचा मुद्दा रेटून धरला होता. तेथील बुद्ध, मुस्लीम आणि ख्रिश्चनांना आपसात लढवलं जात होतं. पण आज आपण पाहातोय त्यांची काय स्थिती झाली आहे.”

“मला आशा आहे की, सध्या देशातील भाजपा सरकार श्रीलंकेच्या स्थितीतून योग्य धडा घेईल. आणि ते ज्या दिशेनं जाऊ इच्छित आहेत, त्या दिशेनं जाणं ते थांबवतील. देशात जो सामाजिक तणाव वाढवला ते थांबवतील,” असंही त्या यावेळी म्हणाल्या. त्यांनी पुढे म्हटलं की, “सध्या देशात अल्पसंख्यांकावर विशेषत: मुस्लिमांवर हल्ले वाढले आहेत. त्यांची घरं पाडली जात आहेत. अशा घटनांबाबत न्यायालय देखील पुढे येवून कारवाई करत नाहीये, ही दुर्दैवाची बाब आहे.”

दुसरीकडे, भाजप सरकारकडे जनतेला देण्यासारखं काहीच नाही, असा टोलाही पीडीपी प्रमुखांनी लगावला आहे. बेरोजगारी, महागाई या सगळ्यात वाढ होत आहे. देशाची संपत्ती विकली जात आहे. आपला देश आता गरिबीच्या बाबतीत बांगलादेश, पाकिस्तान आणि नेपाळच्या मागे पडला आहे

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून कोल्हापुरात श्रीअंबाबाई मंदिर पाहणी व दर्शन

0

कोल्हापूर, दि.10: विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन मंदिर परिसराची पाहणी केली. तसेच मंदिरात सुरु असणाऱ्या विविध विकास कामांचा आढावा घेतला.

श्री अंबाबाई मंदिरात सध्या सुरु असणाऱ्या संगमरवरी फरशी काढण्याच्या कामाबद्दल उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी माहिती घेऊन या अनुषंगाने असणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली. पिण्याचे पाणी व स्वच्छतेच्या समस्यांविषयीही त्यांनी जाणून घेतले. श्रीअंबाबाई मंदिर विकास आराखड्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. विकास आराखड्याच्या अनुषंगाने संपूर्ण मंदिर परिसराची पाहणी करुन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याशी चर्चा केली.  मंदिरातील अभिषेक पद्धती व पूजा विधी याबाबत माहिती जाणून घेतली. कोरोना परिस्थितीत लॉकडाऊन काळात मंदिरात केलेल्या उपाययोजना, सध्या सुरु असलेली विकास कामे या संदर्भातील  माहिती व ऑनलाईन देणगी संदर्भात सुरु असणाऱ्या  सुलभ प्रक्रियाबाबत सचिव श्री नाईकवाडे यांनी माहिती दिली.

यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी मंदिरासाठी देणगी दिली. तसेच देवीला महावस्त्र अर्पण केले. यावेळी त्यांच्यासोबत भगिनी आणि स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी उपस्थित होत्या. देवस्थान समितीमार्फत राबविण्यात येत असलेल्या देवस्थान सेवा योजनेमध्ये सहभागी होण्याची इच्छा डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केली. याबाबत  मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करण्यासाठी पाठपुरावा करु, असेही त्यांनी सांगितले.

करवीर तहसीलदार शीतल मुळे- भामरे,  पन्हाळा नायब तहसीलदार विनय कौलवकर, देवस्थान सचिव शिवराज नाईकवाडे,  मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, आदी यावेळी  उपस्थित होते.

एप्रिल 2022 मध्ये कोळशाचे उत्पादन 29% ने वाढून 66.58 दशलक्ष टन झाले

नवी दिल्‍ली, 10 मे 2022

कोळसा मंत्रालयाच्या अंदाजित आकडेवारीनुसार, एप्रिल, 2021 च्या 51.62 मेट्रिक टनाच्या तुलनेत एप्रिल, 2022 मध्ये एकूण कोळसा उत्पादन 29% वाढून 66.58 दशलक्ष टन (एमटी) इतके झाले आहे. एप्रिल, 2022 दरम्यान, कोल इंडिया लि. (सीआयएल), सिंगरेनी कोलीरीज कंपनी लिमिटेड (एससीसीएल) आणि कॅप्टिव्ह माईन्स/इतर यांनी अनुक्रमे 53.47 मेट्रीक टन, 5.32 मेट्रीक टन आणि 7.79 मेट्रीक टन कोळशाचे उत्पादन करून 27.64%, 9.59% आणि 59.98% ची वाढ नोंदवली.

त्याच वेळी, एप्रिल 2020 च्या तुलनेत एप्रिल, 2022 मध्ये कोळसा पाठवण्याच्या प्रमाणात 8.66% ने वाढ झाली. ते 65.62 मेट्रिक टनावरून 71.30 मेट्रीक टन झाले. एप्रिल 2022 मध्ये सीआयएल, एससीसीएल आणि कॅप्टिव्ह/इतर यांनी अनुक्रमे 57.50 मेट्रीक टन, 5.74 मेट्रीक टन आणि 8.06 मेट्रीक टन कोळसा पाठवून 6.01%, 5.53% आणि 35.69% ची वाढ नोंदवली.  

शीर्ष 37 कोळसा उत्पादक खाणींपैकी 22 खाणींनी 100% पेक्षा जास्त कामगिरी केली आहे आणि इतर 10 खाणींचे उत्पादन 80 ते 100 टक्क्यांच्या दरम्यान आहे.

एप्रिल 2020 मधील 52.32 मेट्रीक टनाच्या तुलनेत एप्रिल, 2022 मध्ये उर्जेसाठी पाठवलेल्या  कोळशाचे प्रमाण  18.15% ने वाढून 61.81 मेट्रीक टन वर गेले  आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या अखेरीपासून कोळशाच्या आयात किमतीत घसरण दिसून आली आहे.  मात्र, आंतरराष्ट्रीय किमती अजूनही उच्च पातळीवर आहेत. कोळशावर आधारित वीजनिर्मितीत एप्रिल 2021 च्या तुलनेत गेल्या महिन्यात 9.26% वाढ झाली आहे आणि मार्च 2022 च्या तुलनेत 2.25% वाढ झाली आहे. एप्रिल 2022 मधील एकूण वीजनिर्मिती एप्रिल 2021 मधील वीजनिर्मितीपेक्षा 11.75% जास्त आहे.  आणि मार्च 2022 मध्ये निर्माण झालेल्या उर्जेपेक्षा 2.23% जास्त आहे.

विविध मागण्यांसाठी ‘रिपाइं’चा मोर्चा व आंदोलन


पुणे : इंधनाचे वाढलेले भाव, महागाईला चाप लावावा, पदोन्नतीतील आरक्षण, ओबीसी आरक्षण, मागासवर्गीय अनुशेष भरून काढावा, झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करावे, भीमनगर एसआरए रद्द करावे, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कारवाई करावी, दलितांवरील अत्याचार थांबवावेत, अशा विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (रिपाइं) आठवले गटाच्या वतीने मंगळवारी भव्य मोर्चा काढत आंदोलन करण्यात आले. 

पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत ‘रिपाइं’ कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा, तसेच राज ठाकरे यांचा निषेध केला. ‘रिपाइं’चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार राज्यभर सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. पुण्यात शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी निवेदन स्वीकारले.
यावेळी ‘रिपाइं’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, पश्चिम युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, अशोक शिरोळे, सरचिटणीस महिपाल वाघमारे, श्याम सदाफुले, बाबुराव घाडगे, राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी, मोहन जगताप, माजी नगरसेविका हिमाली कांबळे, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, संजय सोनवणे, निलेश आल्हाट, जयदेव रंधवे, शशिकला वाघमारे, युवा नेते श्याम गायकवाड, संजय धिवार,  रामभाऊ कर्वे, भगवान गायकवाड, शुभम चव्हाण, वसीम शेख, विशाल शेवाळे, राजेश गाढे, राहुल कांबळे, संतोष खरात, विनोद टोपे, मुकेश काळे, वसंत बनसोडे, परेश बनसोडे, निनाद मेनन, संतोष गायकवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
शैलेंद्र चव्हाण म्हणाले, “दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. पेट्रोलचे दर केंद्रातून कमी असले तरी राज्य सरकार जास्त करआकारणी करत असल्याने राज्यात महागाई वाढली आहे. त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. त्याचप्रमाणे मशिदींवरील भोंगे उतरविण्याच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेचा विरोध करतो. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अटकेची कारवाई करण्याचे धाडस दाखवावे. रेल्वेच्या जागी असणाऱ्या झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन तेथेच व्हावे, प्रत्येक झोपडपट्टी धारकास ५०० चौरस फुट जागेची सदनिका मिळावी. अनुसूचित जाती-जमातींमधील अनुशेष भरला जावा. भूमिहीनांना पाच एकर जमीन लवकरात लवकर द्याव्यात. महाविकास आघाडी सरकारने या मागण्यांची त्वरित पूर्तता करावी. अन्यथा आगामी काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल.”
या आहेत ‘रिपाइं’च्या मागण्या
 २०१९ पर्यंतच्या झोपडपट्ट्यांना अधिकृत मान्यता मिळावी.- रेल्वे जागेतील झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करावे.- भूमिहीनांना प्रत्येकी पाच एकर जमीन द्यावी. – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण मिळावे.- अजानवरील अघोषित बंदी हटवावी.- नोकरभरतीतील अनुशेष त्वरित भरावा.- पदोन्नतीत एससी व एसटी आरक्षण द्यावे.- भूमिहीनांचे गायरान जमिनीवरील अतिक्रमण अधिकृत करावे.- मराठा समाजाला शैक्षणिक व नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यात यावे. 
– दलितांवरील वाढते अत्याचार रोखावेत.- अनुसूचित जातीचा दाखला काढण्यासाठी १९५० पूर्वीचा पुराव्याची जाचक अट रद्द करावी.- पेट्रोल/डिझेल वरील अधिभार कमी करावा.- वाढीव वीजबिल व डिपॉजिट रद्द करावे.

एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस एआयटीए 18 वर्षांखालील सुपर सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या आकृती सोनकुसरेचा मानांकित खेळाडूवर विजय

 
पुणे, 10 मे 2022: डेक्कन जिमखाना व महाटेनिस यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस एआयटीए 18वर्षांखालील सुपर सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात बिगरमानांकीत सोलापूरच्या आकृती सोनकुसरे हिने सातव्या मानांकित औरंगाबादच्या मृण्मयी जोशीचा 6-2, 6-1 असा सहज पराभव करून आगेकूच केली.  
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉ दुसऱ्या फेरीत मुलींच्या गटात अव्वल मानांकित रुमा गायकवारीने रजिथा राजेशचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव केला. क्वालिफायर प्रिशा शिंदेने श्रेया पठारेचे आव्हान 6-3, 6-1 असे संपुष्टात आणले. आठव्या मानांकित नागपूरच्या सेजल भुतडाने आपली राज्य सहकारी कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. कर्नाटकाच्या तिसऱ्या मानांकित श्रीनिधी बालाजी हिने लकी लुझर ठरलेल्या देवांशी प्रभुदेसाईचा 6-4, 3-6, 6-1 असा तीन सेटमध्ये पराभव केला. 
मुलांच्या गटात अव्वल मानांकित तेलंगणाच्या तरुण कोरवारने आपली विजयी मालिका कायम ठेवत कर्नाटकाच्या आर्य कळंबेल्लाचा 6-4, 6-4 असा पराभव केला. सार्थ बनसोडेने आर्यन कोटस्थानेचा टायब्रेकमध्ये 6-3, 1-6, 7-6(1) असा पराभव केला.  
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(दुसरी फेरी): मुले:तरुण कोरवार(तेलंगणा)[1]वि.वि.आर्य कळंबेल्ला(कर्नाटक)6-4, 6-4; सार्थ बनसोडे(महा)वि.वि.आर्यन कोटस्थाने(महा)6-3, 1-6, 7-6(1);निशित रहाणे(महा)वि.वि.साहिल तांबट(महा)7-6(3), 6-2; अर्णव पापरकर(महा)वि.वि.ओजस दबस(महा)6-4, 1-2 सामना सोडून दिला; अभिराम निलाखे(महा)वि.वि.प्रद्युम्न तोमर 2-6, 6-2, 6-4;  तनिष्क जाधव(महा)वि.वि.प्रणव गाडगीळ(महा)7-6(5), 6-3; अजमीर शेख(महा)[3]वि.वि.मनन चितानिया(महा)6-1, 6-1;जय दिक्षित(महा)वि.वि.नमित मिश्रा(महा)6-2, 6-1; 

मुली: 
रुमा गायकवारी[1](महा)वि.वि.रजिथा राजेश 6-0, 6-0;प्रिशा शिंदे(महा)वि.वि.श्रेया पठारे(महा) 6-3, 6-1; प्रेशा शंथामूर्ती(कर्नाटक)[4]वि.वि.रितिका मोरे(महा)6-1, 6-1;आकृती सोनकुसरे(महा)वि.वि.मृण्मयी जोशी(महा)[7] 6-2, 6-1;
सेजल भुतडा(महा)[8]वि.वि.ऐश्वर्या जाधव(महा)6-3, 6-2;श्रीनिधी बालाजी(कर्नाटक)[3]वि.वि.देवांशी प्रभुदेसाई(महा)6-4, 3-6, 6-1;एन हर्षिनी(कर्नाटक)[6]वि.वि.डेन्सिया फर्नांडो 6-3, 6-3;आस्मि आडकर(महा)वि.वि.मेहक कपूर(महा)6-3, 6-1;
दुहेरी: मुले: पहिली फेरी: अजमीर शेख/साहिल तांबट[1] वि.वि.अर्जुन गोहड/अर्णव पापरकर 6-2, 7-6(4);सार्थ बनसोडे/सिद्धार्थ मराठे वि.वि.अर्जुन कीर्तने/अभिराम निलाखे 7-6(4), 6-0;पार्थ देवरुखकर/जय पवार[4] वि.वि.अनमोल नागपुरे/वेद ठाकूर 7-5, 6-3;अनिष रांजळकर/अर्जुन अभ्यंकर वि.वि.ईशान गोधभरले/नमित मिश्रा 6-3, 6-1; 

महाराष्ट्रात सलग १९ दिवसांपासून भारनियमन नाही;मात्र ८ राज्यांमध्ये अद्यापही विजेचे भारनियमन सुरु.. महावितरणचा दावा.

0

मुंबई, दि. १० मे २०२२: कोळसा टंचाईचे संकट व उन्हाच्या तडाख्यामुळे विजेची वाढती मागणी कायम असताना महावितरणने गेल्या १९ दिवसांपासून राज्यात कोणत्याही वाहिनीवर विजेचे भारनियमन केले नाही. भारनियमन टाळण्यासाठी तासागणिक सुरू असलेल्या यशस्वी नियोजनाद्वारे ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्याचा सुखद दिलासा दिला आहे. याऊलट देशात उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश आदींसह आठ राज्यांमध्ये अद्यापही विजेचे भारनियमन सुरु असल्याची स्थिती कायम आहे. 

दरम्यान, मंगळवारी (दि. १०) दुपारच्या सुमारास राज्यात एकूण २६ हजार ७०० मेगावॅट विजेची मागणी होती. यामध्ये मुंबई वगळता उर्वरित राज्यामधील महावितरणच्या कार्यक्षेत्रात २३ हजार ४०० मेगावॅट विजेची मागणी होती. त्यानुसार महावितरणने सुरळीत वीजपुरवठा केला आहे. तसेच गेल्या दि. २१ एप्रिलपासून राज्यात कोणत्याही भागातील वीजवाहिनीवर भारनियमन करण्यात आलेले नाही. सोबतच कृषिपंपांना देखील वेळापत्रकानुसार चक्राकार पद्धतीने दिवसा व रात्री ८ तास वीजपुरवठा सुरळीत आहे.

गेल्या मार्चपासून उन्हाच्या वाढत्या तडाख्यांमुळे विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचवेळी कोळसा टंचाई व इतर कारणांमुळे विजेचे देशव्यापी निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात एप्रिलमध्ये विजेची मागणी २४५०० मेगावॅटवर गेल्यामुळे व त्यातुलनेत वीज उपलब्ध होत नसल्याने ८ ते १० दिवसांमध्ये विजेच्या भारनियमनाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री ना. श्री. प्राजक्त तनपुरे, प्रधान सचिव (ऊर्जा) श्री.दिनेश वाघमारे यांच्या पाठपुरावा व सकारात्मक पाठबळामुळे तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे गेल्या दि. २१ एप्रिलपासून राज्यात विजेचे भारनियमन टाळण्यात महावितरणला यश आले आहे. विजेच्या मागणीचे विक्रमी उच्चांक होत असताना देखील भारनियमन करण्यात आले नाही हे विशेष.

महावितरणकडून सूक्ष्म नियोजन करून विजेची मागणी आणि त्या तुलनेत विविध स्त्रोत व वीज निर्मिती कंपन्यांकडून किती प्रमाणात वीज उपलब्ध होत आहे यावर तासागणिक बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. मागणीनुसार पुरेशी वीज उपलब्ध करण्यासाठी तत्परतेने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याची फलश्रृती म्हणून एकीकडे देशातील १५ राज्यांमध्ये विजेचे भारनियमन सुरु असताना मात्र महाराष्ट्रात सलग १९ दिवसांपासून भारनियमन करण्यात आलेले नाही. सद्यस्थितीत वीजसंकटामुळे भारनियमनाला सामोरे जाणाऱ्या राज्यांची संख्या १५ वरून ८ वर आली आहे. यामध्ये मंगळवारी (दि. १०) देखील उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, हरियाणा, उत्तराखंड, जम्मू काश्मीर व लडाख, झारखंड, मेघालय या राज्यांमध्ये विजेच्या भारनियमनाची स्थिती कायम होती.

महावितरणच्या कार्यक्षेत्रात मंगळवारी दुपारच्या सुमारास २३ हजार ४०० मेगावॅट विजेची मागणी होती. त्यासाठी महानिर्मितीच्या औष्णिक प्रकल्पांतून ७३०० मेगावॅट, गॅस प्रकल्प- २५०, अदानी- २३८८, रतन इंडिया- १२००, सीजीपीएल- ५६३, केंद्राकडून- ५६३०, सौर, पवन व इतर स्त्रोतांच्या नवीन व नवीकरणीय प्रकल्पांकडून ५०४५ मेगावॅट वीज उपलब्ध झाली. तर उर्वरित विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी कोयना जलविद्युत प्रकल्प आणि आवश्यकतेनुसार खुल्या बाजारात वीज खरेदी करून राज्यात विजेच्या मागणीनुसार सुरळीत व अखंडित वीजपुरवठा करण्यात आला. 

महावितरणच्या यशस्वी प्रयत्नांमुळे राज्यात सध्या विजेचे भारनियमन बंद आहे. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्याचे वीज संकट पूर्णतः दूर होईपर्यंत यापुढेही भारनियमन टाळण्याचे महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

सिंबायोसिस विद्यापीठाची दर्जेदार शिक्षणासाठी ओळख-आरोग्य मंत्री राजेश टोपे

पुणे दि.१०-सिंबायोसिस विद्यापीठाने काळानुरूप अभ्यासक्रमातील अनुकूल बदल आणि परिश्रमाच्या बळावर दर्जेदार शिक्षणाचा ‘ब्रँड’ तयार केला आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री राजेश टोपे यांनी केले.

सिंबायोसिस विद्यापीठाच्या १५ वा वर्धापन दिन आणि सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक डॉ. शां.ब.मुजुमदार, प्र-कुलपती डॉ.स्वाती मुजुमदार, कुलगुरू डॉ.अश्विनी कुमार आदी उपस्थित होते.

श्री.टोपे म्हणाले, दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक अभ्यासक्रमासह अनेक महत्वाच्या बाबी विद्यापीठाने मुर्तरुपात आणल्या. उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर आणि ज्ञानाच्या बाबतीत अद्ययावत राहण्यामुळे विद्यापीठाने स्वत:ची वेगळी ओळख ‍निर्माण केली. अध्यापनासाठी उपयुक्त तंत्रज्ञानाचा वापर, सातत्याने मूल्यांकन प्रक्रीया राबविणे, पात्र कर्मचारी वर्ग तयार करणे अशा बाबींमुळे विद्यापीठाने शिक्षण क्षेत्रात वेगाने प्रगती साधली आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करीत शैक्षणिक क्षितीजात संस्था अधिक जोमाने प्रगती साधत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या सुविधा निर्माण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ.स्वाती मुजुमदार म्हणाल्या, सिंबायोसिस कम्युनिटी महाविद्यालयामार्फत सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये गृहीणी, तरुण आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपयुक्त प्रशिक्षण देण्यात येते. तसेच अल्पकालिन अभ्यासक्रमदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अलिकडेच सिंबायोसिस सेंटर फॉर ऑनलाईन लर्निंगची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्राद्वारके मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कमी खर्चात ऑनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाला विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

 देशातील पहिले मधाचे गाव महाबळेश्वर मध्ये …उद्योग मंत्री सुभाष देसाई

0

मुंबई, दि. 10 : ग्रामीण अर्थव्यवस्थेत रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी आणि मधमाशा पालनाद्वारे मधसंकलन व्यवसाय करण्याच्या दृष्टीने खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने ‘प्रकल्प मधमाशी’ राबवून त्या अंतर्गत ‘मधाचे गाव’ ही योजना राबविण्यात येत आहे. १६ मे रोजी या योजनेचा शुभारंभ होणार असून, महाबळेश्वर येथील मांघर हे देशातील पहिले मधाचे गाव ठरणार असल्याची माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

आज मंत्रालयात पत्रकार परिषदेत मंत्री श्री.देसाई बोलत होते. यावेळी खादी व ग्रामोद्योगच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशु सिन्हा उपस्थित होत्या.

मंत्री श्री सुभाष देसाई म्हणाले, मध व त्यापासून तयार होणारी उत्पादने तसेच या प्रक्रियेतून प्राप्त होणारी उप-उत्पादने ही ग्रामीण अर्थव्यवस्थेत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतात. मधमाशी पालनामुळे शेती उत्पादनातही वाढ होते. 

या योजनेचे उद्दिष्ट म्हणजे, उत्तम दर्जाचे मध उत्पादन करणे. मध संकलनासंबंधातील सेवांचा दर्जा उंचावणे, मधमाशांचा दवाखाना प्रयोगशाळा उभारणे, मधप्रक्रिया, ब्रँडींग सेवा उपलब्ध करणे, सेंद्रीय मध संकलनास चालना देणे, मधमाशांच्या वसाहती गावपातळीवर निर्माण करणे.

‘मधाचे गाव’ या उपक्रमांतर्गत गावात मधमाशांची संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. या निमित्ताने महाबळेश्वराला येणाऱ्या पर्यटकांना व ग्राहकांना शुद्ध व दर्जेदार मध मिळणार आहे. मधाचे गाव हे निसर्गाचे संरक्षण, संवर्धन करण्याबरोबरच डोंगराळ व जंगली भागात राहणाऱ्या लोकांसाठी कायमस्वरुपी रोजगार निर्माण करणारा प्रकल्प ठरणार आहे. निसर्गातील अन्न साखळीतील महत्वाचा घटक म्हणून मधमाशांकडे पाहीले जाते. मधमाशांमुळे पीक उत्पादनात देखील भरघोस वाढ होत आहे.

मांघर गावातील 100 पैकी 80 कुटुंब मधुपालनाचा व्यवसाय करीत असून, या संकल्पनेमुळे बाजारात शुद्ध मध उपलब्ध होईल. हा एक शेतीपुरक व्यवसाय ठरू शकतो. खादी व ग्रामोद्योग मंडळाकडून शेतक-यांना प्रोत्साहन, प्रशिक्षण आणि सहाय्य देण्यात येणार आहे. मधाचे संकलन करण्याच्या प्रक्रियेला महाबळेश्वर येथे प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू असल्याची माहिती मंत्री श्री.देसाई यांनी दिली. देशातील हा पहिलाच प्रकल्प असून राज्यातील इतर जिल्ह्यात देखील हा प्रकल्प राबविला जाणार आहे. मधमाशा संवर्धनासोबत निसर्ग संवर्धनासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल. असेही ते म्हणाले.

मराठी राजभाषा धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करणार

मराठी भाषा संवर्धन आणि मराठी राजभाषा धोरणाची काटेकोर अंमलबजावणी राज्य शासन करणार आहे. राज्यातील सर्वच क्षेत्रातील दुकान व आस्थापनावरील पाट्या या मराठीत ठळक अक्षरात व अर्ध्याभागात असाव्यात यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. पुढील एक महिना सर्व दुकाने आणि आस्थापनांना याबाबत सूचना देण्यात आल्या असून, त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही मराठी भाषा मंत्री श्री.देसाई यांनी दिली.

शालेय शिक्षणाच्या सर्व मंडळांच्या शाळेत मराठी विषय अनिवार्य करण्यात येणार आहे. याचबरोबर, मुंबई महानगरपालिकेचे दैनंदिन कामकाज आणि सर्व प्राधिकरणाचेही सर्व कामकाज यापुढे मराठीतच होईल यामुळेच मराठी भाषेचे संवर्धन होण्यास मदत होईल, अशी माहितीही श्री. देसाई यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यात २०० होमगार्डना आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

पुणे दि.१०-राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, रायगड आणि पुणे या जिल्ह्यात चक्रीवादळ, अतिवृष्टी, पुरपरिस्थिती आणि भूस्खलनामुळे झालेल्या जिवीत व वित्तहानीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती प्रवण ६ जिल्ह्यात २०० होमगार्डना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

भविष्यात आपत्तीची परिस्थिती उद्भवल्यास होमगार्ड आणि नागरी संरक्षण दल प्रशिक्षित आणि सज्ज असणे गरजेचे आहे. त्यामुळे पोलीस महासंचालक तथा महासमादेशक होमगार्ड डॉ.बी.के.उपाध्याय आणि अपर पोलीस महासंचालक तथा उपमहासमादेशक होमगार्ड ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली २० मे पर्यंत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षण जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांचेशी समन्वय ठेवून संबधित जिल्ह्याच्या होमगार्ड कार्यालयामार्फत आयोजित करण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचे वेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि अन्य प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रित करण्यात येणार असल्याचे होमगार्ड उपमहासमादेशक ब्रिजेश सिंह यांनी कळविले आहे.

वर्षभरात 405 कोटी रुपयांचे 833 किलो स्मगलींगचे सोने पकडले

0

परवाच्या कारवाईत लखनौ आणि मुंबई येथून 11 किलो सोने पकडले .

सोन्याच्या स्मगलिंग साठी नवनवे फंडे …

नवी दिल्‍ली, 10 मे 2022- 2021-22 या कालावधीत, महसूल गुप्तचर संचालनालय अधिकाऱ्यांनी एकूण 833 किलो तस्करी करून आणलेले  सोने जप्त केले आहे, ज्याचे मूल्य 405 कोटी रुपये इतके आहे त्यानंतर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) गेल्या आठवड्यात लखनौ आणि मुंबई येथे सलग दोन वेळा यशस्वी कारवाई करून हवाई मार्गाने संघटीतपणे होणाऱ्या सोन्याच्या तस्करीचे प्रयत्न हाणून पाडले आहेत, ज्यात सोने लपवून नेण्याची सामान्य पद्धत वापरली होती.

कारवाईसाठी अचूक रुपरेषा निश्चित करून, दिनांक 06.05.2022 रोजी, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी दुबईहून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, एअर कार्गो कॉम्प्लेक्स,  येथे आलेल्या मालाची तपासणी केली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001TGY2.jpg
https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002VE86.jpg

आयात माहिती कागदपत्रांत याची नोंद, “वेगवेगळे सुटे भाग आणि ड्रम प्रकाराचे सफाई मशीन” म्हणून घोषित करण्यात आले होते, परंतु काळजीपूर्वक तपासणी केल्यावर, 3.10 कोटी रुपये मूल्य असलेले 5.8 किलो  सोने चकत्यांच्या आकाराच्या स्वरूपात आयात केलेल्या मशीनच्या दोन मोटर रोटर्समध्ये लपवून ठेवलेले आढळले.  हा आयातदार दक्षिण मुंबईत असून त्याला तातडीने कारवाई करून अटक करण्यात आली आहे. या आयातदाराला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

लखनऊमध्ये देखील डीआरआय अधिकाऱ्यांनी मुंबईतील या जप्तीच्या एक दिवस आधी दिनांक 05.05.2022 रोजी आणखी एका जप्तीची कारवाई केली.  त्या प्रकरणात देखील,डीआरआयने लखनौच्या चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एअर कार्गो कॉम्प्लेक्समध्ये “इलेक्ट्रिकल थ्रेडिंग मशीन” असल्‍याचे सांगितलेल्‍या आयात माल पकडला आणि तिथेही मशिनमध्‍ये सोन्याच्‍या चकत्‍या लपविल्‍याचे आढळले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0030ZZT.jpg
https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004H1PE.jpg

एकूण 5.2 किलो सोने, ज्याचे मूल्य  2.78 कोटी रुपये आहे,ते या  प्रकरणांत जप्त करण्यात आले आहे.तपासांच्या या मालिकेमुळे हवाई मालवाहू आणि कुरिअर मार्गाने मूळ परदेशी सोन्याची भारतात तस्करी करण्याची नवीन कार्यपद्धती शोधण्यास मदत झाली आहे.  अशा तपासण्यांमुळे डीआरआय(DRI) ची तस्करीच्या निरनिराळ्या आणि अत्याधुनिक पद्धती शोधण्याची आणि त्यांचा सामना करण्याची क्षमता मजबूत होत असते.  

भारतीय संगीताच्या मानबिंदूचा अस्त

0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. १०:- संतूर या वाद्याची जगाला ओळख करून देणारा, संतूरच्या अलौकिक तरंगांनी जगाला भुरळ घालणारा भारतीय संगीत क्षेत्राचा एक मानबिंदू अस्ताला गेला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ संगीतकार, संतूरवादक पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांना निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पंडित शर्मा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात येणार आहेत. त्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, पंडित शर्मा आणि संतूर वाद्य यांचे अतूट असे नाते आहे. त्यांच्या नावानेच संतूरला ओळख मिळाली. तर भारतीय संगीताला संतूर मिळाले. पंडित शर्मा यांच्या संतूरच्या अलौकिक स्वरांनी केवळ भारतीयांना नाही, तर जगाला भूरळ घातली. जम्मू काश्मिरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात, तर याच भूमीतील संतूर या एका लोकवाद्याच्या स्वर्गीय अशा तरंगांची पंडितजींनी जगाला ओळख करून दिली. जगभरात जिथे भारतीय संगीत पोहचले आहे, तिथे संतूर पोहचले. हे पंडित शर्मा यांच्या अखंड साधनेचे योगदान आहे. विनम्र स्वभावाच्या पंडित शर्मा यांनी संगीत क्षेत्राची अखंड सेवा केली. पंडित शर्मा यांचे योगदान भारतीय संगीत क्षेत्राला कदापिही विसरता येणार नाही. शिवकुमार शर्मा हे भारतीय संगीत क्षेत्राच्या मानबिंदूपैकी एक होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीताचा एक मानबिंदू अस्ताला गेला आहे. पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मां यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

पंडितजींनी ‘संतूर’सारख्या काश्मिरी लोकवाद्याला
भारतीय संगीतात मानाचं स्थान मिळवून दिलं…

पंडितजींच्या ‘संतूर’ सूरांशिवाय भारतीय संगीत अपूर्ण
— उपमुख्यमंत्री अजित पवार

ज्येष्ठ संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मांच्या ‘संतूर’वादनानं कोट्यवधी संगीतरसिकांना स्वर्गीय आनंदाची अनुभूती दिली. पंडितजींनी ‘संतूर’सारख्या काश्मिरी लोकवाद्याला भारतीय संगीतात मान मिळवून दिला. त्यांच्या ‘संतूर’वादनानं भारतीय संगीतविश्व खऱ्या अर्थानं समृद्ध झालं. पंडितजींच्या ‘संतूर’ सूरांशिवाय भारतीय संगीत अपूर्ण आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

पंडित शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली वाहतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पंडित शिवकुमार शर्मा यांच्या संतूरवादनानं भारतीय अभिजात संगीताला नवी ओळख, जागतिक लोकप्रियता मिळवून दिली. पंडित हरीप्रसाद चौरसिया यांचं बासरीवादन आणि पंडित शिवकुमार शर्मांच्या संतूरवादनाची जुगलबंदी हा भारतीय संगीतातला अनमोल ठेवा आहे. पंडितजींचं निधन ही भारतीय संगीतक्षेत्राची मोठी हानी असून, पंडीतजी आणि त्यांचं संतूरवादन भारतीय संगीतात अजरामर आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.