Home Blog Page 1973

डेक्कन महाविद्यालयाचा परिसर देशाचा ऐतिहासिक अमूल्य ठेवा- उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत

पुणे, दि.३१:- येरवडा येथील डेक्कन महाविद्यालय पदव्युत्तर व संशोधन संस्थेचा परिसर देशाचा ऐतिहासिक अमूल्य ठेवा असल्याचे प्रतिपादन उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

डेक्कन महाविद्यालय पदव्युत्तर व संशोधन संस्थेला श्री.सामंत यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी कुलगुरु डॉ. प्रमोद पांडे, उपकुलगुरु डॉ. प्रसाद जोशी, शिक्षण संचालक धनराज माने, माजी कुलपती जी. बी. देगलूरकर आदी उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले, महाविद्यालयातील ऐतिहासिक दुर्मिळ ठेवा अमूल्य असून तो जगासमोर आणण्यासाठी प्रयत्न करावे. या ऐतिहासिक ठेव्याचे डिजीटायझेशन करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. संगणकीय यंत्रणेसाठी शासनाच्यावतीने आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. परिसराचा विकास करण्यासाठी उद्योगांच्या सामाजिक दायित्व निधीमधून मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावा. मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री यांच्याशी चर्चा करुन डेक्कन महाविद्यालयाचा परिसर शनिवार व रविवार या दोन दिवशी पर्यटकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे श्री. सामंत म्हणाले.

यावेळी श्री.सामंत यांनी पुरातत्व संग्रहालय, प्रोगैतिहासिक विधीका, मराठा संग्रहालय, जमखिंडी संस्थान संग्रह, संस्कृत आणि कोशशास्त्र विभाग, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर हे विद्यार्थी असताना वास्तव्य असलेल्या खोलीस भेट देवून पहाणी केली.

राज्याच्या नियोजनबद्ध अंमलबजावणीने योजना सर्वदूर पोहचल्या-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई दि ३१ योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या असोत, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्याच्या यंत्रणेचे मोठे योगदान असते. हे प्रयत्न पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित झाले पाहिजेत. मला आनंद व समाधान आहे की, या योजना राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर प्रशासकीय यंत्रणेने नियोजनपूर्वक लाभार्थींपर्यंत यशस्वीरित्या पोहचविल्या असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

विविध केंद्रीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थीशी सहयाद्री अतिथीगृहातून संवाद साधतांना ते बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत ग्रामविकास विभागाने राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्यानिमित्त मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रत्येक लाभार्थीशी संवाद साधून त्यांना योजनांचा लाभ कसा मिळाला तसेच त्यांच्या आणखी काही अपेक्षा आहेत का ते जाणून घेतले. ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.

यावेळी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी मुंबईमधील यासीन शब्बीर शेख, निशा शर्मा, कुंजू पवार या महिलांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभाचे प्रमाणपत्रही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते देण्यात आले.

योजनांमध्ये राज्याचा मोठा सहभाग

केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये राज्याचाही 40 टक्के वाटा आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेने अगदी तालुका आणि गाव पातळीवर काम करून या योजनांचे लाभ लोकांपर्यंत पोहचविले आहेत आणि लाभार्थींच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहिले की हीच आपल्या आयुष्याची कमाई वाटते.

महाराष्ट्राच्या प्रभावी कामगिरीचे कौतुक

प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यात ५,००,००० घरे ग्रामीण भागात बांधली असून यंदाही ५ लाख घरे बांधत आहोत. ३५०० कोटी रुपयांचा निधी यासाठी उपलब्ध करून दिला आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की. २०२२-२३ मध्ये जल जीवन मिशनमध्ये १९ लाख कुटुंबास नळ जोडणी व पिण्याचे शुद्ध पाणीपुरवठा देण्यासाठी १९०० कोटी इतका निधी उपलब्ध करू दिला आहे.

याशिवाय पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना स्वच्छ भारत योजना (ग्रामीण व शहरी) इतर केंद्र शासन पुरस्कृत योजना राबविण्यात राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरीय यंत्रणाच्या सक्रीय सहभाग व नियोजनबद्ध अंमलबजावणीमुळे योजनांचा लाभ पोहचविणे शक्य झाले असेही ते म्हणाले.

व्याज परतावा सुरू करा

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांना देखील केंद्राने बंद केलेला पीक कर्जावरील दोन टक्के व्याज परतावा परत सुरू करावा व लाखो शेतकऱ्यांची अडचण दूर करावी अशी विनंती केली.

अंमलबजावणीचा दुष्काळ महाराष्ट्रात नाही

केवळ योजनांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असे चित्र महाराष्ट्रात नसून शेवटच्या घटकांपर्यंत अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अगोदरच्या पिढ्यांनी लढा दिला आहे. आपल्या देशातल्या लोकांना समाधानाने जीवन जगावे लागता यावे म्हणून प्रयत्न करून या पिढ्यांचे योगदान सार्थ ठरवते अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी महाआवास त्रैमासिक, आझाद का अमृत महोत्सव प्रगती अहवाल, मिशन महाग्राम या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी साधलेल्या संवादात, नगर जिल्ह्यातील दरेवाडीचे मीरा कारंडे, लोणी बुद्रुकचे विनोद पारखे, चांदेगावचे सुखदेव उबाळे, कोल्हापूर जिल्ह्यातील हसुर दुमालाचे जिजाबाई पाटील, सांगरुळचे लक्ष्मी साठे, अर्जूनीचे नितीन आढाव, नाशिक जिल्ह्यातील कवनईचे आनंद पाटील, सटवाई वाडीचे नामदेव मेधाने, बागलाणचे मीरा पवार, नागपूर जिल्ह्यातील भंडारबोडीचे मीराबाई गणवीर, सुमन दोनारकर, खेर्डीचे संगीता निकम, औंरगाबाद जिल्ह्यातील रायपूर येथील बाळू राऊत, भराडीचे कृष्णा महाजन, फुलंब्रीचे सुवर्णा भुईगल या लाभार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले.

फोर्ब्स’ने गौरविलेल्या आर्या तावरेचेउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले कौतुक

0

मुंबई, दि, 31: आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित ‘फोर्ब्स’ मासिकाने गौरविलेली आणि मूळची बारामतीकर असणारी लंडनस्थित युवा उद्योजक आर्या तावरेनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईतील त्यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर्याच्या नवीन स्टार्टअपची माहिती घेत तिचे कौतुक केले.

मुळची बारामतीची असणारी आणि सध्या लंडनमध्ये राहणाऱ्या आर्या तावरेने अवघ्या बावीसव्या वर्षी ‘फ्युचरब्रिक्स’ नावाने ‘स्टार्टअप’ सुरू करून ब्रिटनमधील लघू व मध्यम बांधकाम व्यावसायिकांना निधी उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे. अनेक मोठ्या वित्तपुरवठा कंपन्या तिच्या कंपनीशी जोडल्या गेल्या आहेत. तिच्या या कामगिरीची दखल ‘फोर्ब्स’ मासिकाने घेतली आहे. युरोपमधील वित्तपुरवठा वर्गवारीतील तीस वर्षांखालील पहिल्या तीस व्यक्तींच्या यादीत आर्याचा समावेश करण्यात आला आहे. ‘फोर्ब्स’ मासिकातील प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत आर्याच्या रूपाने मराठी मुलीचा समावेश झाला आहे. तिच्या कामाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सविस्तर माहिती घेत तिची आस्थेवाईकपणे चौकशी केली, तिच्या कामाचे कौतुक केले.


सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता १५ दिवसांत सुरू झालाच पाहिजे :आमदार मिसाळांनी सुनावले अधिकाऱ्यांना….

पुणे- सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता १५ दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी कळविली आहे.आज मिसाळ यांनी अधिकाऱ्यांसोबत या रस्त्याची पाहाणी केली. यावेळी कारणाशिवाय दिरंगाई बद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले आणि कामाबाबत हलगर्जीपणा ,विनाकारण दिरंगाई अजिबात खपवून घेतली जाणार नाही असे सुनावले . यावेळी महापालिका अधिकाऱ्यांनी पर्यायी रस्ता १५ दिवसात सुरु होईल असे त्यांना आश्वासन दिले .श्रीनिवास बोनाला, प्रकल्प प्रमुख, व्ही जी कुलकर्णी, पथ विभाग प्रमुख, अमित घुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक, उदयसिंग शिंगाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिहगड रोड वाहतूक विभाग, प्रदीप आव्हाड, क्षेत्रीय अधिकारी सिहगड क्षेत्रीय कार्यालय, अमर शिंदे, कार्यकारी अभियंता पथ , राखी चौधरी, अभियंता पथ, अतुल कडू अभियंता पथ, अजय वायसे, कार्यकारी अभियंता प्रकल्प , सुश्मिता शिर्के, अधिक्षक अभियंता प्रकल्प, महादू थोपटे उपअभियंता , निखिल रंधवे, कनिष्ठ अभियंता, विश्वास ननावरे , प्रवीण दिवेकर , विशाल पवार उपस्थित होते.

मिसाळ म्हणाल्या, जनता वसाहत पु. ल. देशपांडे उद्यानामागील रस्ता काँक्रिट करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यावर वृक्ष छाटणी आणि इलेक्ट्रिक विभागाची कामे १५ दिवसांत पूर्ण होतील. त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे.विश्रांती नगर रस्ता , विठ्ठल मंदिर मागील रस्ता, हिंगणे चौक, कॅनॉल रस्ता आदी कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलाच्या जागेची पाहाणी केली.

मूकअभिनय करणे ही हृदयाला स्पर्श करणारी शक्तिशाली कला : अशोक कुमार चट्टोपाध्‍याय

0

मुंबई, 31 मे 2022

मूकअभिनय हा समर्थ कला प्रकार आहे, या कलेतून कोणताही शब्द न वापरता तुमच्या हृदयाला स्पर्श करता येते, असे ‘अॅन ऑड टू क्वाइट्यूड’ या माहितीपटाचे दिग्दर्शक अशोक कुमार चट्टोपाध्याय प्रतिपादन केले. फ्रेंच क्रांतीच्या काळात , क्रांतिकारकांनी त्यांचा निषेध नोंदविण्‍यासाठी माइम म्हणजेच मूकभीनयाचा वापर केला. सामाजिक समस्यांला वाचा फोडण्‍याची ताकद आजही या कलाप्रकारामध्‍ये  त्यात आहे, असे ते म्हणाले. १७व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त आयोजित ‘#मिफ संवाद’ मध्ये ते बोलत होते.

आपल्या चित्रपटाबद्दल बोलताना अशोक कुमार चट्टोपाध्याय म्हणाले की, ‘अॅन ऑड टू क्वाइट्यूड’  हे ‘माइम’ कलेतील उस्ताद आणि भारतीय मूकभीनयाचे प्रवर्तक,  जोगेश दत्ता यांचे चरित्र आणि जगप्रसिद्ध माइम कलाकार बनण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाचे रेखाटन म्हणजे हा चित्रपट आहे. “जोगेशदा  13-14 वर्षांचे असताना त्यांचे पालक गेल्यामुळे ते अनाथ झाले. स्वातंत्र्याच्या पहाट ज्यावेळी उगवत होती,  त्यावेळी ते सियालदाह स्‍थानकावर होते. आधीच्या पूर्व पाकिस्तानातील कफल्लक  निर्वासित म्हणून त्यांनी स्वातंत्र्याचा सूर्योदय पाहिला. हॉटेल, चहाचे टपरी कामगार अशा अनेक विचित्र नोकऱ्या त्यांनी केल्या आहे आणि जीवनात येणा-या चित्रविचित्र    अनुभवांना सामोरे गेले. त्यांच्याकडे असलेल्या उत्कृष्‍ट निरीक्षण शक्तीतून, त्यांनी  इतरांच्या नकला करायला प्रारंभ केला  आणि यातूनच नक्कल करण्याचे कौशल्य विकसित केले. त्यांची विनोदबुद्धीही उत्तम होती. त्यांनी स्वतःहून अनेक स्क्रिप्ट तयार केल्या. हळुहळू त्यांनी स्वबळावरच ‘माइम’ कला विकसित केली. तासनतास केलेल्या सरावाने त्यांनी दाखवलेली कला एक आख्यायिका बनली,” असे चट्टोपाध्‍याय यावेळी  म्हणाले.

माईम उस्तादांबरोबर त्यांना प्रदीर्घ काळ सहवास लाभला. त्यामुळे त्या आठवणी सांगताना अशोककुमार म्हणाले, जोगेश दत्ता यांनी या  कलाप्रकारासाठी ज्या प्रकारचे समर्पण दिले आहे, ते खरोखर आश्चर्यकारक आहे. “त्यांनी  आपले हे शरीर मंदिरासारखे आहे, असे मानले आणि कठोरतेने  आहारविषयक नियम आणि दिनचर्या पाळली. आजच्या काळात , बहुतांश लोकांमध्ये अशा प्रकारचे समर्पण गायब आहे,” ते पुढे म्हणाले.

“मोबाईल आणि इंटरनेटच्या क्रेझमुळे लोक स्टेज अॅक्टिव्हिटी विसरत आहेत. रंगमंचावर कला पाहण्यासाठी पूर्वीसारखी गर्दी सभागृहात होत नाही. आम्ही सभागृहाच्या उद्देशाने कला बनवत आहोत. अडीच इंची मोबाईल स्क्रीन कलाकृतीला न्याय देऊ शकत नाही. माझ्यासाठी ते माध्यम नाही. गाणे, संगीत किंवा नाटक बघायचे असेल तर प्रेक्षागृहात जावे लागेल”, असे मत अशोक कुमार चट्टोपाध्याय  व्यक्त केले. 

‘अॅन ऑड टू क्वाइट्यूड’ या विषयी  थोडक्यात

मूकअभिनय कलेतील दिग्गज जोगेश दत्ता यांचा  स्थानिक महोत्सवांमध्ये स्टँडअप कॉमेडियन होण्यापासून ते भारतातील पहिली ‘माइम’ अकादमी स्थापन करणारे  भारतीय ‘माइम’चे प्रणेता होण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटात आहे.

दिग्दर्शकाबद्दल

अशोक कुमार चट्टोपाध्याय हे चित्रपट आणि जाहिरातींचे दिग्दर्शक आहेत. त्यांनी कोलकाता म्युनिसिपल कॉर्पोरेशन, अरोरा फिल्म कॉर्पोरेशन आणि संगीत नाटक अकादमीसाठी चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे, त्यांच्या फिल्मोग्राफीमध्ये – ‘ए डिव्हाईन पर्क्यूशन’(२०१५), ‘गहना बोरी’ (२०१६) आणि ‘ द गोल्डन ग्लोरी’  (२०१७) यांचा समावेश आहे.

“हे 130 कोटी भारतीयांचे कुटुंब माझे आहे, तुम्ही सर्वजण माझ्या आयुष्यातील सर्व काही आहात आणि माझे हे आयुष्य देखील तुमच्यासाठी आहे”

0

शिमला-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिमाचल प्रदेशातील शिमला येथे ‘गरीब कल्याण संमेलना’ला संबोधित केले. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा अभिनव जाहीर कार्यक्रम देशभरातल्या राज्यांच्या राजधानी, जिल्हा मुख्यालये आणि कृषी विज्ञान केंद्रांवर आयोजित करण्यात आला.  देशभरातील निवडून आलेले लोकप्रतिनिधी सरकारच्या विविध कल्याणकारी कार्यक्रमांबद्दल जनतेची मते जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी थेट संवाद साधतील अशी या संमेलनाची संकल्पना होती.

पंतप्रधानांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत आर्थिक लाभांचा 11 वा हप्ता देखील यावेळी जारी केला. यामुळे 10 कोटी पेक्षा अधिक लाभार्थी शेतकरी कुटुंबांना सुमारे 21,000 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करणे शक्य होईल. यावेळी पंतप्रधानांनी देशभरातील (PM-KISAN) लाभार्थ्यांशी संवाद साधला. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर हे शिमला येथे उपस्थित होते.

लडाखमधील लाभार्थी ताशी टुंडुप यांच्याशी संवाद साधताना, पंतप्रधानांनी लडाखमध्ये पर्यटकांचे आगमन आणि सरकारी योजनांबद्दलचा त्यांचा अनुभव याविषयी विचारले. लष्करातील जवान म्हणून त्यांच्या सेवेचे पंतप्रधानांनी कौतुक केले. ताशी टुंडुप म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजना, शौचालये, गॅस जोडणी  आणि शेतीशी संबंधित लाभ सारख्या योजनांचा लाभ मिळवताना त्यांना कोणतीही अडचण आली नाही.

बिहारमधील ललिता देवी जी या प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला, स्वच्छ भारत आणि जल जीवन मिशनच्या लाभार्थी आहेत. या योजनांमुळे त्यांचे जगणे सुसह्य आणि सन्माननीय झाल्याचे त्यांनी पंतप्रधानांना सांगितले. पंतप्रधान म्हणाले की, घरामुळे मुलांचे शिक्षण, लग्न अशा अनेक गोष्टी योग्य रीतीने होतील.

पश्चिम त्रिपुरा येथील पंकज शानी एक राष्ट्र एक रेशन कार्ड, पीएम गरीब कल्याण आणि इतर अनेक योजनांचे लाभार्थी आहेत. त्यांनी सांगितले की त्यांना जलजीवन मिशन, एक राष्ट्र एक रेशन कार्ड, प्रधानमंत्री आवास योजना आणि वीज जोडणी यांसारख्या अनेक योजनांचा लाभ मिळाला आहे. वन नेशन वन रेशन कार्डमुळे बिहारमधून स्थलांतर करूनही त्यांना कोणतीही अडचण येत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

कर्नाटकातील कलबुर्गी येथील आयुष्मान भारतच्या लाभार्थी संतोषी यांनी या योजनेबाबतचा आपला अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या की आरोग्य आणि निरामयता केंद्र आणि मोफत तपासणी आणि औषधे यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक बदल घडत  आहेत. त्यांच्या उत्तम संवाद कौशल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली आणि तिने निवडणूक लढवावी कारण ती खूप लोकप्रिय होणार आहे असे गंमतीत म्हणाले.

गुजरातमधील मेहसाणा इथले प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे लाभार्थी अरविंद यांना पंतप्रधानांशी बोलताना खूप आनंद झाला. त्यांनी सांगितले की या योजनेमुळे त्यांच्या मंडप सजावट व्यवसायाचा विस्तार झाला आहे आणि ते डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देत आहेत. आपल्या कर्मचार्‍यांना सरकारी योजनेबद्दल माहिती दिल्याबद्दल आणि रोजगार निर्माण करणारे बनल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले. पंतप्रधानांनी त्यांच्या मुलीला खेळातले तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आशीर्वादही दिले.

कार्यक्रमाच्या ठिकाणी, सिरमौर हिमाचल प्रदेश येथील समा देवी उपस्थित होत्या, ज्या प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, आयुष्मान योजना, मुख्यमंत्री गृहिणी सुविधा योजनेच्या लाभार्थी आहेत. पंतप्रधानांनी शेतीतील तिची परिस्थिती आणि तिथल्या कामांबद्दल माहिती विचारली.

उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी या महत्त्वपूर्ण प्रसंगी हिमाचलमध्ये उपस्थित राहताना आनंद झाल्याची भावना व्यक्त केली. पंतप्रधान किसान योजनेच्या माध्यमातून 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत लाभ जाहीर करता आले याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेंतर्गत आर्थिक लाभ देशभरातील शेतकऱ्यांना शिमला येथून जारी करताना आनंद झाल्याचे ते म्हणाले. 130 कोटी नागरिकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले.

मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने  कोरोना महासाथीत ज्या मुलांनी आपले आईवडील गमावले आहेत, त्यांची जबाबदारी पीएम केअर्सच्या माध्यमातून घेण्याच्या उपक्रमाबद्दलही पंतप्रधानांनी काल समाधान व्यक्त केले. मोदी म्हणाले की  8  वर्षाचा कार्यकाल साजरा करण्याच्या प्रसंगी हिमाचल प्रदेशात असावे, ही सूचना मी त्वरित मान्य केली कारण हे राज्य माझी कर्मभूमी आहे. पंतप्रधान म्हणाले की मी नेहमीच स्वतःला पंतप्रधान नव्हे तर 130 कोटी नागरिकांच्या कुटुंबातील सदस्य समजतो. केवळ मी एखाद्या फाईलवर स्वाक्षरी करतो तेव्हाच मी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारतो. तो क्षण एकदा  संपला की मी पुन्हा पंतप्रधान रहातच नाही तर तुमच्या कुटुंबाचा सदस्य बनतो आणि 130 कोटी देशवासियांचा प्रधानसेवक होतो. मी जर देशासाठी काही करू शकत असेल तर ते केवळ 130 कोटी देशवासियांचा आशिर्वाद आणि शुभेच्छांमुळेच, असे म्हणाले. पुढे ते भावनावश होऊन म्हणाले की, माझ्या कुटुंबातील 130 कोटी नागरिकांच्या आशा आणि आकांक्षांशी जोडला जाणे, हे कुटुंबचे हेच ते काय माझ्याकडे आहे, तुम्ही लोकच माझ्यासाठी जीवनात सर्वकाही आहात आणि हे आयुष्य तुम्हालाच समर्पित आहे. पंतप्रधान म्हणाले की. सरकार 8 वर्षे पूर्ण करत असताना त्यांनी आपण प्रत्येकाच्या कल्याणासाठी, प्रत्येक भारतीयाच्या सन्मानालसाठी, प्रत्येक भारतीयाच्या सुरक्षेसाठी, आणि प्रत्येक भारतीयाच्या भरभराटीसाठी  शक्य तितके करण्याच्या निर्धाराचा त्यांनी पुनरूच्चार केला, ज्यामुळे त्यांना आनंदी आणि शांतता लाभेल.

2014 च्या अगोदरच्या सरकारचा  भ्रष्टाचार हा व्यवस्थेचा अत्यावश्यक भाग आहे, अशी समजूत होती आणि भ्रष्टाचाराविरोधात लढा देण्य़ाच्या ऐवजी सरकार त्याला शरण गेले, त्यानंतर देशाने पाहिले की योजनांचा पैसा गरजूंपर्यंत पोहचण्याआधी तो लुटला जात होता, यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. जनधन, आधार आणि मोबाईल (जेएएम) या त्रिसूत्रीमुळे पैसा लाभार्थींच्या खात्यांमध्ये थेट जमा होत आहे, अशीही पुस्ती त्यांनी जोडली. पूर्वी स्वयंपाकघरात धुराच्या त्रासाची सक्ती होती, आज उज्वला योजनेंतर्गत एलपीजी सिलिंडर्स मिळवण्याची सुविधा आहे. पूर्वी उघड्यावर शौचाला जाण्याचे लज्जास्पद कृत्य नशिबी होते. आता गरीबांना शौचालयांची प्रतिष्ठा लाभली आहे. पूर्वी आजारावरील उपचारांसाठी पैसा जमा करण्याची असहाय्यता होती, आज  प्रत्येक गरीबाला आयुषमान भारत योजनेचा आधार आहे.  पूर्वी तिहेरी तलाकची भीती होती, आज आपल्या हक्कासाठी लढण्याचे धैर्य आहे.

पंतप्रधानांनी नमूद केले की, कल्याणकारी योजना, सुशासन आणि गरीबांचे कल्याण (सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण) यांनी लोकांसाठी सरकारचा अर्थ बदलून टाकला आहे. आता सरकार लोकांसाठी काम करत आहे. मग ती पंतप्रधान गृहनिर्माण योजना असो, शिष्यवृत्ती असो की निवृत्तीवेतन योजना असो, भ्रष्टाचाराची संधी किमान मर्यादित झाली आहे. पूर्वी ज्या समस्या कायमस्वरूपी म्हणून गृहित धरल्या जात होत्या, त्यावर सरकार कायमस्वरूपी तोडगा देण्याचा प्रयत्न करत आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनेमुळे लाभार्थीच्या यादीतून 9 कोटी नावे वगळून चोरी आणि गळतीचा अन्याय संपुष्टात आणला आहे.

पंतप्रधान म्हणाले की, गरीबाला तो सक्षम झाल्यामुळे त्याचा दैनंदिन आयुष्यातील संघर्ष संपतो, तेव्हा तो आपली गरीबी दूर करण्यासाठी नव्या उर्जेसह कामाला लागतो. या विचारासह आमच्या सरकारने पहिल्या दिवसापासूनच गरीबाला सक्षम करण्यास सुरूवात केली. त्याच्या जीवनातील प्रत्येक लहान काळजीची गोष्ट आम्ही कमी करण्याचा प्रयत्न केला, असे सांगून ते पुढे म्हणाले की, आमच्या कोणत्या न कोणत्या योजनेमुळे देशातील बहुतेक सर्व कुटुबांना लाभ होत आहे.

सशस्त्र दलांमध्ये हिमाचलच्या प्रत्येक कुटुंबाचे योगदान नमूद करून पंतप्रधान म्हणाले की, वन रँक वन पेन्शन ही योजना चार दशकांच्या प्रतिक्षेनंतर आमच्या सरकारने राबवली आणि माजी सैनिकांना थकबाकी दिली. त्यामुळे हिमाचलमधील प्रत्येक कुटुंबाला लाभ झाला आहे. आमच्या देशात कित्येक दशकांपासून व्होट  बँक राजकारण चालत आले आहे आणि त्याने देशाचे मोठ्या प्रमाणावर नुकसानही केले आहे. आम्ही नवीन भारत उभारण्यासाठी काम करत आहोत, व्होटबँक नव्हे, असे ते म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की शंभर टक्के लाभ शंभर टक्के लाभार्थींकडे पोहचावेत, यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. लाभार्थींच्या परिपूर्णतेपर्यत पोहचण्याची आम्ही प्रतिज्ञा केली आहे. शंभर टक्के  सक्षमीकरण याचा अर्थ पक्षपात संपवणे, शिफारशींचा अडथळा दूर करणे आणि लांगूलचालन संपवणे हा आहे. शंभर टक्के सक्षमीकरण याचा अर्थ, प्रत्येक गरीबाला सरकारी योजनांचा पूर्ण लाभ मिळणे असाही आहे.

देशाच्या वाढत्या प्रतिष्ठेवर भाष्य करताना पंतप्रधान म्हणाले की, भारत सक्तीमुळे कुणापुढेही मैत्रीचा हात पुढे करत नाही तर मदतीचा हात देतो. कोरोना काळातही, आम्ही औषधे आणि 150 देशांना लसी पुरवल्या.

पुढील पिढ्यांच्या उज्वल भविष्यासाठी तसेच एकवीसाव्या शतकात उज्वल भारत  निर्माण करण्यासाठी काम करण्याच्या आवश्यकतेवर पंतप्रधानांनी जोर दिला.  असा भारत की ज्याची ओळख ही वंचितपणा नाही तर आधुनिकता आहे. आमच्या क्षमतेपुढे कोणतेही उद्दिष्ट अशक्य नाही. पंतप्रधान पुढे म्हणाले की भारत आज जगातील सर्वात जलद गतीने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. भारतात आज विक्रमी संख्येने परकीय चलन येत आहे आणि निर्यातीत भारत विक्रम प्रस्थापित करत आहे. देशाच्या प्रगतीत आम्ही पुढे येऊन आमची भूमिका बजावावी, असे त्यांनी शेवटी आवाहन केले.

बोरिवली खादी महोत्सव २०२२ मध्ये देशी फॅशनच्या नवीन डिझाईन्स

0

मुंबई : अथर्व स्कूल ऑफ फॅशन अँड आर्ट्स आणि मुंबई खादी ग्रामोद्योग असोसिएशन ट्रस्ट (कोरा केंद्र) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय ‘खादी महोत्सव २०२२’ची सांगता बोरिवलीच्या कोरकेंद्र मैदानावर रंगतदारपणे झाली. , यावेळी बोरिवलीचे आमदार सुनील राणे, वर्षा राणे आदी उपस्थित होते. बोरिवली खादी महोत्सवाच्या समारोपाचा सर्वात रोमांचक कार्यक्रम, तिसर्‍या दिवशी फॅशन शोमध्ये रॅम्पवर आधुनिक डिझाईन्स तसेच आसाम, मराठी, गुजराती आणि इतर लोकगीते यांसारख्या देशातील अनेक पारंपारिक नृत्य आणि संगीताचे प्रदर्शन पाहायला मिळाले. श्रोत्यांकडून लोकगीते. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी, अथर्व स्कूल ऑफ फॅशन अँड आर्ट्स तसेच हस्तमेलाप, पूनम राठी, भाविन व्होरा, अजय अरविंदभाई खत्री आणि उत्कर्ष जैन या आघाडीच्या डिझायनर्स आणि ब्रँड लेबल्सनी त्यांचे नवीनतम कलेक्शन सादर केले. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या शोमध्ये गुंजन सारडा, जान्हवी देधिया, गिन्नी जैन तसेच अथर्व स्कूल ऑफ फॅशन अँड आर्ट्सच्या डिझायनर विद्यार्थ्यांनी आकर्षक फॅशन शो सादर केला.

खादी महोत्सवात देशभरातील अनेक नामवंत कलाकारांनी स्टॉल्समध्ये खादीच्या कपड्यांसह इतर अनेक कलाकुसरीचे प्रदर्शन केले. देशातील अनेक राज्ये तसेच दूरवरच्या शहरांनी उत्कृष्ट कलाकृतींच्या प्रदर्शनात मोठ्या उत्साहाने भाग घेतला आहे. अथर्व फाउंडेशनचे अध्यक्ष आणि बोरिवलीचे आमदार सुनील राणे यांनी खादी महोत्सवाचे नियोजन केले आहे. खादी महोत्सवात भारताचा वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा दाखवण्यासाठी स्थानिक फॅशन पोशाखांवर 10 डिझायनर्सनी वैशिष्ट्यीकृत केले. या खादी महोत्सवाच्या डिझायनर्सनी विविध भारतीय संस्कृती आणि परंपरांचे अनोखे उत्सव आणि प्रदर्शन सादर केले. खादी हे स्वातंत्र्यपूर्व काळातील सामाजिक बदलाचे साधन आहे आणि आधुनिक काळात पुनरुज्जीवन आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. आणि आपल्या महान स्वातंत्र्यसैनिकांच्या माफक पेहरावामुळे, खादी फॅशनचे प्रतीक बनली आहे.

खादी महोत्सव 2022 च्या समारोपप्रसंगी सुनील राणे म्हणाले की, खादी महोत्सवात देशातील विविधतेचे, आधुनिक आणि पारंपरिक रंगसंगीत, नृत्य, कला, हस्तकला यासह फॅशनचे उत्तम सादरीकरण पाहायला मिळाले. देशातील विविध कलाकारांनी आपल्या कार्यक्रमाला अविस्मरणीय बनवले. आम्ही गल्फ फेस्टिव्हलमध्ये या इव्हेंटसह लोकल फॉर लोकलला प्रोत्साहन दिले आहे, देशाच्या सर्व भागांतील कलाकारांना, ब्रँड्स, स्टोलाला त्यांचे कलेक्शन कोणत्याही शुल्काशिवाय दाखवण्यासाठी दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती निमित्त अभिवादन

0

मुंबई, दि. ३१ : प्रजाहितदक्ष, कुशल प्रशासक, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी उपस्थित होते. या सर्वांनीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यकारभाराने प्रजाहितदक्षतेचा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी स्त्रीशिक्षण, हुंडाबंदी, पर्यावरण रक्षण असे सुधारणावादी तसेच ग्रामविकास आणि पायाभूत सुविधांच्या विकासाच्या योजना, प्रकल्प जाणीवपूर्वक राबविले. नदीचे घाट, वाटसरूंसाठीच्या धर्मशाळा, मंदिरांची उभारणी-त्यांचा जिर्णोद्धार अशा अनेक गोष्टी आजही त्यांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष देत उभ्या आहेत. कुशल राज्यकर्ती, रणधुरंधर, मुत्सद्दी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ”

यूपीएलचे वाईनेरो आणि बीओन्से हे द्राक्ष उत्पादकांसाठी अद्वितीय उपाय उत्पादन निर्यातक्षमता आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय सुधारणा

मुंबई, 31 मे 2022: द्राक्ष पिकातील डाऊनी आणि पावडर मिल्ड्यूवर मात करण्याच्या उद्देशाने शाश्वत कृषी उत्पादने आणि सुविधांची जागतिक पुरवठादार कंपनी यूपीएल लिमिटेडने वाईनेरो आणि बीओन्से हे अद्वितीय जैवसुविधा उपाय सादर केले आहेत. ही उत्पादने निर्यातीसाठी पात्र होण्यात प्रमुख अडथळे ठरणाऱ्या द्राक्ष उत्पादकांना भेडसावणाऱ्या कमाल अवशिष्ट भागाची मर्यादा आणि प्रतिकार व्यवस्थापनाच्या महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करतात.

द्राक्ष निर्यात करणारे उत्पादक कठोर निर्यात नियमांचे पालन करण्यासाठी ५५ दिवसांच्या छाटणीनंतर रसायनांचा वापर करण्यास नाखूष असतात आणि परिणामी जास्तीत जास्त अवशिष्ट पातळी तयार होऊन त्यामुळे निर्यात माल अनेकदा नाकारला जातो. वाईनेरो आणि बीओन्सेची असाधारण वैशिष्ट्ये दीर्घकालीन नियंत्रण आणि जास्तीत जास्त अवशिष्ट मर्यादेची चिंता दूर करण्यात मदत करतात. त्यांचे जैव-उत्तेजक गुणधर्म द्राक्षांना त्यांची गुणवत्ता जास्त काळ टिकवून ठेवण्यास आणि उच्च किमती आकर्षित करण्यास मदत करतात. मर्यादित पर्याय आणि हवामान बदलाच्या वाढत्या प्रभावामुळे जैव उपाय ही काळाची गरज आहे.

डाउनी मिल्ड्यू विरूद्ध सुव्यवस्थित प्रतिकार विकसित करण्यासाठी रासायनिक उत्पादनांच्या संयोगाने प्री-ब्लूमपासून कॅप फॉलपर्यंत सुरुवातीच्या टप्प्यात वाईनेरोचा वापर केला जाऊ शकतो. दुसरीकडे, बीओन्सेचा वापर बेरीच्या सेटिंग स्टेजपासून रासायनिक उत्पादनांच्या संयोगाने केला जाऊ शकतो. त्यामुळे वनस्पतींना पावडर मिल्ड्यूला पद्धतशीरपणे प्रतिकार करण्यास मदत होते.

यूपीएलचे भारत क्षेत्र संचालक आशिष डोभाल म्हणाले, “यूपीएलमध्ये, आम्ही आमच्या मुख्य भागधारकांच्या म्हणजेच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि यशासाठी वचनबद्ध आहोत. आम्हाला आमच्या एनपीपी (नैसर्गिक वनस्पती संरक्षण) बीयू अंतर्गत शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादनांचा पुरवठा करण्याची आशा आहे. त्यातून नाविन्यपूर्णतेद्वारे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. वाईनेरो आणि बीओन्से त्यांच्या असाधारण अवशिष्ट नियंत्रण आणि प्रतिकार व्यवस्थापन वैशिष्ट्यांसह, अतिरिक्त उत्पन्न आणि रोग नियंत्रणाच्या बाबतीत द्राक्ष उत्पादकांसाठी एक गेम चेंजर ठरेल.”

नाशिकचे शेतकरी भूषण राजेंद्र शिंदे म्हणाले, “मी ११ एकर जमिनीवर निर्यातीसाठी द्राक्षे पिकवतो. मी डाऊनी आणि पावडर मिल्ड्यूचा सामना करण्यासाठी कीटकनाशके वापरली आहेत परंतु त्यामुळे द्राक्षांमध्ये अवशिष्ट भाग उरतात आणि त्यामुळे निर्यात करणे अशक्य होते.  मला जाणवले की अवशिष्ट-मुक्त जैव उपायांची आवश्यकता आहे.  मी माझ्या द्राक्ष पिकावर वाईनेरो आणि बीओन्सेचा वापर केला. यूपीएलच्या मदतीसाठी धन्यवाद. सुरुवातीला, मी छाटणीनंतर ४५ व्या आणि ५२ व्या दिवशी वाईनेरोच्या दोन फवारण्या केल्या आणि छाटणीनंतर ७० व्या आणि ७५ व्या दिवशी बीओन्सेच्या दोन फवारण्या केल्या. मी यूपीएलचे जैवसुविधा उपाय वापरत असताना हवामानात सातत्य नव्हते परंतु तरीही दर्जेदार द्राक्षे निर्यातीसाठी योग्य ठरतील असे द्राक्ष उत्पादन मला मिळाले. माझी द्राक्षे अवशिष्टमुक्त होती आणि मी सहजतेने त्यांची निर्यात करू शकलो. वाईनेरो आणि बीओन्सेसाठी मी यूपीएलचा आभारी आहे.”

नव्या आव्हांनासोबत ‘राजहंस’ विद्यालयाच्या खेळाडूंचे सराव सत्र सुरु!

0

‘मुंबई ग्लॅमर नगरी’ अर्थात ‘अंधेरी पश्चिम’ आणि या परिसरात अकरा एकरच्या निसर्गसंपन्न परिसरात डौलात उभ्या असलेल्या ‘राजहंस’ विद्यालयाच्या भव्य पटांगणामध्ये सध्या लगबग सुरु झाली आहे ती विविध खेळांची. आंतरविद्यालयीन क्रीडा स्पर्धांमध्ये ‘राजहंस’ विद्यालय राज्यात अव्वलस्थानी आहे. आजमितीस या विद्यालयाच्या खेळाडूंना जगभरात आपला खेळ करण्याची संधी मिळाली आहे. गेल्या दहा वर्षांत विद्यालयाने केलीली कामगिरी विशेष असून राज्यासह देश विदेशात आपली पताका फडकवण्यात या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना यश आले आहे. सॉफ्टबॉल आणि बेसबॉल हे जगभरातील अत्यंत लोकप्रिय खेळ. या खेळांतही वर्चस्व मिळवून गेली दहा वर्षे मुंबई, उपनगरे, तालुका, जिल्हा, राज्य, देशातील स्पर्धांमध्ये नावलौकिक मिळविला आहे. राजहंस विद्यालयाने गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात अनेक क्रीडा स्पर्धा जिंकल्या आहेत.

‘राजहंस’ विद्यालयाने ‘कोविड- १९’च्या प्रादुर्भावानंतर प्रथमच आपल्या यशस्वी खेळाडूंची मोट बांधत आजपासून मुंबईतील आपल्या भव्य प्रांगणात सराव सुरु केला आहे. शेकडो विद्यार्थी या मोहिमेत उत्साहाने सहभागी झाले आहेत. यावर्षी फ़ुटबाँल टीमचे कर्णधारपद अबीर जितानी याला देण्यात आले असून तो या खेळात विशेष प्रवीण आहे. तसेच सॉफ्टबॉल खेळातही त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यावेळी ‘सॉफ्टबॉल’ आणि ‘बेसबॉल’चे मुंबई उपनगर सचिव त्रिभुवन सिंग यांची विशेष उपस्थिती होती. ‘फुटबॉल’ प्रशिक्षक प्रज्वल चंदन आणि ‘सॉफ्टबॉल’ आणि ‘बेसबॉल’ प्रशिक्षक विकी मिश्रा प्रशिक्षण कलेचे त्यांनी विशेष कौतुक केले.

फुटबॉल संघाचा कर्णधार अबीर जितानी आणि त्याच्या संघातील खेळाडू विद्यार्थ्यांना आपल्या विद्यालयाचे वर्चस्व कायम राखण्याचे मोठे आव्हान आहे. कर्णधार अबीर म्हणतो की, “कोविड-19मुळे आमच्यापैकी कोणीही तीन वर्षांपासून प्रत्यक्ष सराव केलेला नाही. आम्ही सातवीतून थेट १०वी मध्ये आणि मैदानातही आलो आहोत. त्यामुळे अनेक अडचणी आहेत. त्यासोबत आमच्या विद्यालयाची प्रतिष्ठा जपणं हेही आमचं कर्तव्य असल्याने त्याकडे आम्ही संधी आणि आव्हान म्हणून पहात आहोत. मला माझ्या संघातील सर्व खेळाडू मित्रांचे सहकार्य मिळत असून आमचे सर्व प्रशिक्षक, आमचा खेळ सुधारण्यासाठी, झटत आहेत. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कलादेवी गंगाधरन, क्रीडा प्रमुख मनोज नायर प्रत्येक मुलाच्या कामगिरीकडे बारकाईने वैयक्तिकरित्या लक्ष देत आहेत.”

या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती कला गंगाधरन म्हणाल्या कि “आमचे सर्व विद्यार्थी खूपच सक्रिय आणि उत्साही आहे. पालकांचेही विशेष कौतुक करावे लागेल. आमचे विद्यालय सातत्याने खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देत असते. माझ्यामते मुलांच्या आयुष्यात दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात, एक म्हणजे शिक्षण आणि दुसरे म्हणजे खेळ. खेळात मुलांनी सहभाग घेतल्यास त्यांचा उत्साह वाढतो आणि त्यांच्या सर्वांगीण विकासात याचा खूप फायदा होतो. त्यांच्यात विचार व नेतृत्व करण्याचे गुण तयार होतात. त्यांना लक्ष केंद्रित करण्याची सवय लागते आणि नकळतपणे त्यांचा सर्वांगीण विकास घडत जातो”

राजहंस  विद्यालयाचे क्रीडा प्रमुख मनोज नायर म्हणाले “आमच्या विद्यालयाची क्रीडा विभागातील कामगिरी उत्तुंग आहे. मुंबई व महाराष्ट्रातील आमच्या विद्यार्थी खेळाडूंची आणि विद्यालयाची कामगिरी पाहून ‘महाराष्ट्र राज्य सरकारने’ २०१९ मध्ये कलेक्टर निधीतून रु. एक लाखाचे पारितोषिक संस्थेला देऊन गौरव केला आहे. राजहंस विद्यालयाने मुंबई व उपनगर, जिल्हा, लातूर, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, चंद्रपूर, अकोला, गडचिरोली, बुलढाणा, वर्धा, अमरावती, यवतमाळ, नागपूर अश्या राज्यातील विविध स्पर्धा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा कामगिरी केली आहे.

राजहंस विद्यालय विविध खेळांमध्ये गेली दहा वर्षे राज्यात अव्वल आहे. परीक्षक मुलांकडून भरपूर सराव करून घेत त्यांना विविध खेळींमध्ये तरबेज तर करीत आहेतच शिवाय मैदानी खेळांची गोडी लावण्यातही यशस्वी ठरले आहेत. हा आदर्श आपल्या इतर शाळांनी घेऊन अभ्यासासोबत मैदानी खेळ्यांमध्ये मुलांना गोडी लावून पारंगत केल्यास सुदृढ आणि सशक्त युवा भारत नक्कीच निर्माण होऊ शकेल.

-शरद लोणकर अध्यक्ष :सलाम पुणे

कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग पुणे येथील प्रजोत विरेश पाटणे याने पटकावले टाटा क्रूसिबल कॅम्पस क्विझ २०२२च्या क्लस्टर ११ फायनलचे विजेतेपद

पुणे : कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग पुणे येथील प्रजोत वीरेश पाटणे कॅम्पससाठी भारतातील सर्वात मोठ्या व्यवसाय क्विझची ऑनलाइन आवृत्ती असलेल्या टाटा क्रूसिबल कॅम्पस क्विझ २०२२ च्या क्लस्टर फायनल्समध्ये विजयी झाला.

महाराष्ट्र २ विभागाचे प्रतिनिधित्व करणारी क्लस्टर११ फायनल्स ही एक रोमांचकारी घटना होती. त्यामध्ये सहभागींनी त्यांचे वेगवान विचार आणि तीक्ष्ण प्रश्नमंजुषा क्षमता दाखवून दिली.

विजेत्याला ३५,००० रु.चे रोख बक्षीस मिळाले आणि आता राष्ट्रीय अंतिम फेरीसाठी पात्र होण्यासाठी प्रादेशिक पातळीवरील अंतिम फेरीत त्याची स्पर्धा होईल. सिम्बायोसिस लॉ स्कूल पुणे मधील समाहिथ अदूर याला १८,००० रु. रोख किंमतीचे बक्षीस देत उपविजेता घोषित करण्यात आले. टाटा ऑटोकॉम्प सिस्टम्स लिमिटेड, पुणेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अरविंद गोयल हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे होते आणि व्हर्च्युअल बक्षीस वितरण समारंभात त्यांनी पुरस्कार वितरण केले.

महामारीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देताना टाटा क्रूसिबल क्विझ २०२० पासून ऑनलाइन स्वरूपात पार पडली.

कॅम्पस क्विझच्या ऑनलाइन आवृत्तीसाठी देश पातळीवर २४ क्लस्टर्समध्ये विभागणी करण्यात आली आहे आणि ऑनलाइन प्रिलिम्सच्या दोन स्तरांनंतर प्रत्येक क्लस्टरमधून आघाडीवरील १२ अंतिम स्पर्धकांना वाईल्ड कार्ड फायनल्ससाठी आमंत्रित केले जाईल. त्यापैकी आघाडीवरील ६ अंतिम स्पर्धक नंतर २४ ऑनलाइन क्लस्टर फायनल मध्ये स्पर्धा करतील. या २४ क्लस्टर्सचे पुढे चार झोन- दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि उत्तर असे गट केले गेले आहेत आणि प्रत्येक झोनमध्ये ६ क्लस्टर्स असतील.

प्रत्येक क्लस्टर फायनलमधील विजेता नंतर विभागीय अंतिम फेरीसाठी पात्र होईल. चार विभागीय अंतिम फेरीतील विजेते थेट राष्ट्रीय अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. चार विभागीय अंतिम फेरीतील उपविजेते वाइल्ड कार्ड फायनलमध्ये भाग घेतील आणि ४ पैकी २ उपविजेते नंतर राष्ट्रीय अंतिम फेरीसाठी पात्र होतील. एकूण ६ फायनलिस्ट नॅशनल फायनलमध्ये भाग घेतील आणि सर्वाधिक गुण मिळविणाऱ्याला नॅशनल चॅम्पियन म्हणून मुकुट घातला जाईल आणि. प्रतिष्ठेच्या टाटा क्रूसिबल ट्रॉफीसह २.५ लाख रुपयांचे भव्य बक्षीस मिळेल.

टाटा क्रूसिबल फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन आणि यूट्यूब चॅनेलवर सर्व फायनल दाखवल्या जात आहेत.

आपल्या कुशल, अद्वितीय आणि विनोदी शैलीसाठी ओळखले जाणारे प्रख्यात क्विझमास्टर ‘पिकब्रेन’ गिरी बालसुब्रमण्यम हे या क्विझचे सूत्रसंचालक आहेत.

टाटा मोटर्स, टाटा प्ले, मिया बाय तनिष्क, टाटा १ एमजी आणि टाटा सीएलआयक्यू हे या आवृत्तीचे सह-प्रायोजक आहेत.

खासगी शाळांमध्ये, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मोफत द्या-काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांची मागणी

पुणे
 मध्यमवर्गीय व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये  माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मोफत देण्याची मागणी पुणे महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांनी केली आहे.
यासंदर्भात पुणे महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र  पाठवले आहे. त्यात म्हटले आहे कि,  भारत देश हा तरुणांचा देश आहे. या तरुण पिढीच्या जोरावर भारत महासत्ता बनण्याकडे वाटचाल करत आहे. तरुणांना योग्य शिक्षण, मार्गदर्शन व कौशल्य विकास हे चांगल्या प्रकारे मिळाल्यास भारत लवकरच महासत्ता बनेल असा विश्वास आहे. त्या दृष्टीने शिक्षण हक्क कायदा २००९ प्रमाणे मध्यमवर्गीय व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळेत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मोफत करून बळकटी देण्याची गरज आहे.  शिक्षण हक्क कायदा २००९ या कायद्यामुळे मध्यमवर्गीय व आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना चांगल्याप्रकारे दर्जेदार प्राथमिक शिक्षण मिळत आहे. परंतु प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर आर्थिक परिस्थिमुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण अर्धवट सोडून हे विद्यार्थी दिशाहीन,व्यसनाधीन होतात यामुळे देशाचे मोठे नुकसान होत आहे. याकडेही  आबा बागुल यांनी    लक्ष वेधले आहे. जिल्हापरिषद,  नगरपालिका, महानगरपालिकेच्या शिक्षणाचा दर्जा सध्या घसरत चालला आहे. हा दर्जा घसरत असताना आपण निर्जीव गोष्टींवर जास्त भर देत आहोत, म्हणजेच शहरे स्मार्ट करण्याकरिता आपण कोट्यवधी रुपये दरवर्षी  खर्च करतो. त्यातून तेच तेच रस्ते, तेच तेच पदपथ, ड्रेनेज लाईन व इतर विकास कामे करतो.  परंतु भविष्यात देशाला महासत्ता बनवणाऱ्या मध्यमवर्गीय व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे व मोफत शिक्षण देण्यासाठी आपण खर्च करत नाही. ही देशाच्या विकासाला खीळ देणारी बाब आहे. देशात अनेक चांगले विद्यालये कॉलेजेस आहेत. परंतु तेथे चांगली गुणवत्ता असताना फक्त आर्थिक परिस्थिती नाही म्हणून करोडो विध्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपण याकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे. त्याकडेच दुर्लक्ष केले जाते की, काय अशी आमची भावना दिवसेंदिवस होत चालली आहे. आपण या सर्व बाबींचा विचार करून देशाच्या भविष्याचा विचार करून मध्यमवर्गीय व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण खासगी शाळेत मोफत केल्यास २० वर्षानंतर ही मुले देशाचा झेंडा जगाच्या पाठीवर घेऊन जातील. ही पुणे महानगरपालिकेची राजीव गांधी अकॅडमी ऑफ इ लर्निंग स्कूल निर्माण केल्यानंतर लक्षात आले. शिक्षण काळाची गरज आहे. परंतु आजची शैक्षणिक अवस्था पाहिल्यास निवृत्तीला आलेले शिक्षक, कायमस्वरूपी भरती नाही, सहा महिने मुदतीवर शिक्षक भरती, यामुळे चांगले शिक्षक मिळत नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान आणि नुकसानच होत आहे. नगरपालिका, महानगरपालिका व राज्य शासन कोट्यवधी रुपये शिक्षणावर खर्च करते. परंतु त्यातून काहीही साध्य होत नाही. त्यांना प्राथमिक शिक्षण दिले जाते. ते आठवी पर्यंतच असते  आठवीपर्यंतच  शिकवून आपण त्यांचा पाया कमजोर करत आहोत. या देशातील प्रत्येक घटकाला शिक्षणाचा अधिकार आहे. म्हणून सर्व घटकातील विद्यार्थी विद्यार्थिनींना जे काही शिक्षण घ्यायचे म्हणजे माध्यमिक उच्च माध्यमिक अति उच्च माध्यमिक या साठी १०० टक्के  शिक्षण मोफत असले पाहिजे व खाजगी शाळेत मुख्यतः हे शिक्षण मोफत असले पाहिजे.  त्यासाठी या शाळेंना सरकारकडून अनुदान देऊन त्याची तजवीज केली पाहिजे.अशी अपेक्षा आबा बागुल यांनी व्यक्त केली आहे.  आपला स्मार्ट सिटी प्रोजेक्ट चांगला आहे परंतु ती शहरे चालवणारेच स्मार्ट नसतील तर स्मार्ट शहरांचा उपयोग काय? १०० स्मार्ट सिटी करण्याऐवजी माध्यमिक व उच्च माध्यमिक  शिक्षण मोफत करून शिक्षणाची १०० स्मार्ट शहरे याकडे लक्ष दिले गेले तर शिक्षणाचा पाया अधिक मजबूत होईल.  स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत असताना हे धाडसी पाऊल उचलणे गरजेचे आहे. मोठ मोठ्या कंपन्यांच्या सीएसआर फंडातून शाळा दत्तक घेऊन त्याद्वारे मदत घेता येईल का? याबाबतही विचार केला पाहिजे, केंद्र सरकारने ७५ टक्के राज्य सरकारने १५ टक्के व नारपालिका व महानगरपालिकेने ५ टक्के अनुदान द्यावे. जर प्राथमिक शिक्षणाप्रमाणे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले तरच देशात शिक्षणाचा पाया मजबूत होईल.  देशाची आर्थिक स्थिती बळकट करायची असेल तर शिक्षण हा एकच मोठा पर्याय आहे.  आपण या देशाचे पालक आहात आपण मन की बात करून नागरिकांना दिलासा देता. त्याप्रमाणे देशातील विद्यार्थ्यांच्या मनातील बात ओळखून आपण त्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मोफत करावे त्यासाठी कायदा करावा. यासाठी प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करावी . जिल्हापरिषद, नगरपालिका महानगरपालिका यांना केंद्राकडून राज्याकडून अनुदान द्यावे व देशाला महासत्ता बनवणाऱ्या हातांना बळकटी द्यावी असेही आबा बागुल यांनी नमूद केले आहे. 

पुणे महापालिका प्रभाग महिला आरक्षण सोडत झाली जाहीर , पहा कोण कोणते प्रभाग झालेत आरक्षित …(व्हिडीओ)

पुणे- निवडणूक आयोगाच्या आदेशानाव्ये आज पुणे महापालिकेच्या प्रभागांची महिला आरक्षण सोडत काढण्यात आली. महापालिका आयुक्त विक्रम कुमार ,अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनावडे, उपायुक्त यशवंत माने ,आशिष महादळकर आदी अधिकारी यांच्या उपस्थितीत गणेश कला क्रीडा मंच येथे हि सोडत काढण्यात आली पहा .. कोण कोणते प्रभाग झालेत आरक्षित … व्हिडीओ

पुणे महानगरपालिका २०२२ सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या उपस्थितीत १७३ जागांची आरक्षण सोडत पार पडली. या सोडती मध्ये अनेक विद्यमान नगरसेवकांना धक्का बसल्याचे दिसत आहे.तर यामध्ये विशेषतः १७३ जागांमध्ये ८७ जागा या महिला साठी आरक्षित झाल्या आहेत.

सर्वसाधारण खुला प्रभाग

प्रभाग ६ ब, ५ ब, ५८ ब, ५४ ब, ५१ ब, ४५ ब, ४४ ब, ४१ ब, ३४ ब, ३३ ब, ३१ ब, ३० ब, २८ ब, १८ ब, १६ ब, १५ ब, १३ ब, १ क, २ क, ३ क, ४ क, ५ क, ६ क, ७ क, ८ क, ९ क, १० क, ११ क,  १२ क, १४ क, १५ क, १६ क, १७ क, १८ क, १९ क, २० क, २१ क, २२ क, २३ क, २४क, २५ क, २६ क, २७ क, २८ क, २९ क, ३० क, ३१ क, ३२ क, ३३ क, ३४ क, ३५ क, ३६ क, ३७ क, ३८ क, ३९ क, ४० क, ४१ क, ४२ क, ४३ क, ४४ क, ४५ क, ४६ क, ४७ क, ४८ क, ४९ क, ५० क, ५१ क, ५२ क, ५३ क, ५४ क, ५५ क, ५६ क, ५७ क व ५८ क.

अनुसुचीत जाती महिला आरक्षित प्रभाग

प्रभाग ९ येरवडा, प्रभाग ३- लोहगाव विमाननगर, प्रभाग ४२ रामटेकडी सय्यदनगर, प्रभाग ४७ कोंढवा बुद्रुक, प्रभाग ४९ मार्केटयार्ड महर्षीनगर, प्रभाग ४६ महम्मदवाडी उरळी देवाची, प्रभाग २० पुणे स्टेशन आंबेडकर रोड, प्रभाग २६ वानवडी वैदुवाडी, प्रभाग २१ कोरेगाव पार्क मुंढवा, प्रभाग ४८ अप्पर इंदिरानगर, प्रभाग १० शिवाजीनगर गावठाण – संगमवाडी, प्रभाग ४ खराडी वाघोली

महिला आरक्षित अ आणि ब विभाग

प्रभाग – २ अ, ३ ब, ४ ब, ५ अ, ६ अ, ७ ब, ८ ब, ९ ब, १० ब, ११ ब, १२ ब, १४ ब, १५ अ , १६ अ, १७ अ, १८ अ, १९ ब, २० ब, २१ ब, २२ ब, २३ अ, २४ अ, २५ अ, २६ ब, २७ ब, २८ अ, २९ अ, ३० अ, ३१ अ, ३२ अ, ३३ अ, ३४ अ, ३५ अ, ३६ अ, ३७ ब, ३८ ब, ३९ ब, ४० अ, ४१ अ, ४२ ब, ४३ अ, ४४ अ, ४५ अ, ४६ ब, ४७ ब, ४८ ब, ४९ अ, ५० ब , ५१ अ, ५२ अ, ५३ अ, ५४ अ, ५५ अ, ५६ अ, ५७ अ, ५८ अ, २९ ब, ४९ ब, ३६ ब, ४३ ब, २५ ब, २३ ब, ५७ ब, ५५ ब, १७ ब, ३२ ब, २ ब, ३५ ब, ५६ ब, ४० ब, ५३ ब, २४ ब, ५२ ब

अनुसूचित खुला

प्रभाग ८ अ, प्रभाग ७ अ, प्रभाग ५० अ, प्रभाग ३७ अ, प्रभाग २७ अ, प्रभाग  २२ अ, प्रभाग १ अ, प्रभाग १९ अ, प्रभग १२ अ, प्रभाग ११ अ

अनुसूचित जमाती

प्रभाग १ क्र.१ ब महिला, प्रभाग १४ अ – एसटी खुला

पिंपरी चिंचवड महापालिका आरक्षण सोडत

एकूण – १३९ जागा

एकूण प्रभाग – ४६

अनुसूचित जाती – २२ पैकी ११ महिला

अनुसूचित जमाती – ३ पैकी ३ महिला

सर्व साधारण – ११४ पैकी ५७ महिला

१ ) अ – महिला खुला

ब – महिला खुला

क – खुला

२) अ – अनुसूचित जाती

ब – महिला खुला

क – खुला

३) अ – महिला खुला

ब –  खुला

क – खुला

४) अ – महिला खुला

ब –  खुला

क – खुला

५) अ – महिला खुला

ब –  खुला

क – खुला

६) अ – अनुसुचित जमाती महिला

ब – महिला खुला

क – खुला

७) अ – महिला खुला

ब – महिला खुला

क – खुला

८) अ – महिला खुला

ब – महिला खुला

क – खुला

९) अ – महिला खुला

ब –  खुला

क – खुला

१०) अ – महिला खुला

ब –  खुला

क – खुला

११) अ – अनुसूचित जाती महिला

ब – महिला खुला

क – खुला

१२) अ – महिला खुला

ब –  महिला खुला

क – खुला

१३) अ – महिला खुला

ब – महिला खुला

क – खुला

१४) अ – अनुसूचित जाती महिला

ब – महिला खुला

क – खुला

१५) अ – महिला खुला

ब –  खुला

क – खुला

१६) अ – अनुसूचित जाती खुला

ब – महिला खुला

क – खुला

१७) अ – अनुसूचित जाती खुला

ब – महिला खुला

क – खुला

१८) अ – अनुसूचित जाती महिला

ब – महिला खुला

क – खुला

१९) अ – अनुसूचित जाती महिला

ब – महिला खुला

क – खुला

२०) अ – अनुसूचित जाती महिला

ब – महिला खुला

क – खुला

२१) अ – महिला खुला

ब – महिला खुला

क – खुला

२२) अ – अनुसूचित जाती

ब – महिला खुला

क – खुला

२३) अ – महिला खुला

ब –  खुला

क – खुला

२४)

अ – अनुसूचित जाती महिला

ब – महिला खुला

क – खुला

२५) अ – अनुसूचित जाती

ब – महिला खुला

क – खुला

२६) अ – महिला खुला

ब –  खुला

क – खुला

२७) अ – महिला खुला

ब – महिला खुला

क – खुला

२८) अ – महिला खुला

ब –  खुला

क – खुला

२९) अ – अनुसूचित जमाती

ब – महिला खुला

क – खुला

३०) अ – महिला खुला

ब – महिला खुला

क – खुला

३१) अ – महिला खुला

ब – महिला खुला

क – खुला

३२) अ – अनुसूचित जाती

ब – महिला खुला

क – खुला

३३) अ – महिला खुला

ब –  खुला

क – खुला

३४) अ – अनुसूचित जाती महिला

ब – महिला खुला

क – खुला

३५)  अ – अनुसूचित जाती महिला

ब – महिला खुला

क – खुला

३६) अ – महिला खुला

ब – महिला खुला

क – खुला

३७) अ – अनुसूचित जाती महिला

ब – महिला खुला

क – खुला

३८) अ – अनुसूचित जाती

ब – महिला खुला

क – खुला

३९) अ – अनुसूचित जाती

ब – महिला खुला

क – खुला

४०) अ – महिला खुला

ब – महिला खुला

क – खुला

४१) अ – अनुसूचित जाती महिला

ब – अनुसूचित जमाती महिला

क – खुला

४२) अ – महिला खुला

ब – महिला खुला

क – खुला

४३) अ – अनुसूचित जाती महिला

ब – महिला खुला

क – खुला

४४) अ – अनुसूचित जाती

ब – अनुसूचित जमाती महिला

क – खुला

४५) अ – महिला खुला

ब –  खुला

क – खुला

४६) अ – अनुसूचित जाती

ब – महिला खुला

क – महिला खुला

ड – खुला

बनावट बिलांद्वारे शासनाचा १९.९३ कोटींचा महसूल बुडविणाऱ्या दोघांना अटक

0

मुंबई, दि. 30 : 133 कोटी रुपयाच्या खोट्या बिलांद्वारे शासनाची फसवणूक करत 19.93 कोटी रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या दोघांना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने धडक कारवाई करुन दि. 27/05/2022 रोजी अटक केली. अनिल देवराम जाधव व संतोष अशोक शिंदे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून त्यांना महानगर दंडाधिकाऱ्यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मे. देवराम ट्रेडर्स व में. अपोलो एंटरप्राईज या उल्हासनगर व नालासोपारा येथील व्यावसायिक आस्थापनांवर महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाच्या करचोरी विरोधी पथकाने दि. 27/05/2022 रोजी विशेष अन्वेषण कारवाई सुरु केली होती. तपासणी दरम्यान व्यापाऱ्यांनी बनावट वीजबिल, आधार आणि पॅनद्वारे नोंदणी प्रमाणपत्र घेतल्याचे आढळून आले.

राहुल द्विवेदी, राज्यकर सहआयुक्त, अन्वेषण – अ, मुंबई व संजय सावंत राज्यकर उपआयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक राज्यकर आयुक्त नंदकुमार दिघे व रविकांत कांबळे यांनी ही कार्यवाही केली. या मोहिमेद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने या आर्थिक वर्षात आतापर्यंत एकूण सोळा जणांना अटक केली आहे.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आणि कार्य जगभरातील राज्यकर्त्यांसाठी आदर्श – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

मुंबई, दि. 30:- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सर्वकालीन महान राज्यकर्त्या, कुशल प्रशासक होत्या. थोर विचारवंत होत्या. त्यांचे विचार सुधारणावादी, अंधश्रद्धेवर प्रहार करणारे होते. त्यांचे कार्य, विचार जगभरातील राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यश्लोक, राजमाता, अहिल्यादेवी माँसाहेबांच्या कार्याचं, विचारांचं स्मरण करुन त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन केले आहे.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचे स्मरण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी जात, पात, धर्म, पंथ, प्रांतांच्या, सीमा ओलांडून संपूर्ण देशात लोकोपयोगी कार्याचा डोंगर उभा केला. देशभर मंदिरं, नदीघाट, धर्मशाळा, पाणपोयी बांधल्या. अनिष्ट रुढी, प्रथा, परंपरा यांच्याविरुद्ध लढा दिला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी महान योद्धा होत्या. कुशल प्रशासक, न्यायप्रिय, प्रजाहितदक्ष, दानशूर राज्यकर्त्या होत्या. मुलकी आणि लष्करी प्रशासन वेगळे करुन कुशल राज्यकारभाराची चुणुक त्यांनी दाखवली. महिलांच्या सक्षमीकरणाचं काम त्यांनी केलं. महिलांना शिक्षण, प्रशिक्षण, अधिकार दिले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी सर्वकालीन आदर्श राष्ट्रनिर्मात्या आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला.