खासगी शाळांमध्ये, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मोफत द्या-काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांची मागणी

Date:

पुणे
 मध्यमवर्गीय व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये  माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मोफत देण्याची मागणी पुणे महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांनी केली आहे.
यासंदर्भात पुणे महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र  पाठवले आहे. त्यात म्हटले आहे कि,  भारत देश हा तरुणांचा देश आहे. या तरुण पिढीच्या जोरावर भारत महासत्ता बनण्याकडे वाटचाल करत आहे. तरुणांना योग्य शिक्षण, मार्गदर्शन व कौशल्य विकास हे चांगल्या प्रकारे मिळाल्यास भारत लवकरच महासत्ता बनेल असा विश्वास आहे. त्या दृष्टीने शिक्षण हक्क कायदा २००९ प्रमाणे मध्यमवर्गीय व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळेत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मोफत करून बळकटी देण्याची गरज आहे.  शिक्षण हक्क कायदा २००९ या कायद्यामुळे मध्यमवर्गीय व आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना चांगल्याप्रकारे दर्जेदार प्राथमिक शिक्षण मिळत आहे. परंतु प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर आर्थिक परिस्थिमुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण अर्धवट सोडून हे विद्यार्थी दिशाहीन,व्यसनाधीन होतात यामुळे देशाचे मोठे नुकसान होत आहे. याकडेही  आबा बागुल यांनी    लक्ष वेधले आहे. जिल्हापरिषद,  नगरपालिका, महानगरपालिकेच्या शिक्षणाचा दर्जा सध्या घसरत चालला आहे. हा दर्जा घसरत असताना आपण निर्जीव गोष्टींवर जास्त भर देत आहोत, म्हणजेच शहरे स्मार्ट करण्याकरिता आपण कोट्यवधी रुपये दरवर्षी  खर्च करतो. त्यातून तेच तेच रस्ते, तेच तेच पदपथ, ड्रेनेज लाईन व इतर विकास कामे करतो.  परंतु भविष्यात देशाला महासत्ता बनवणाऱ्या मध्यमवर्गीय व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे व मोफत शिक्षण देण्यासाठी आपण खर्च करत नाही. ही देशाच्या विकासाला खीळ देणारी बाब आहे. देशात अनेक चांगले विद्यालये कॉलेजेस आहेत. परंतु तेथे चांगली गुणवत्ता असताना फक्त आर्थिक परिस्थिती नाही म्हणून करोडो विध्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपण याकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे. त्याकडेच दुर्लक्ष केले जाते की, काय अशी आमची भावना दिवसेंदिवस होत चालली आहे. आपण या सर्व बाबींचा विचार करून देशाच्या भविष्याचा विचार करून मध्यमवर्गीय व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण खासगी शाळेत मोफत केल्यास २० वर्षानंतर ही मुले देशाचा झेंडा जगाच्या पाठीवर घेऊन जातील. ही पुणे महानगरपालिकेची राजीव गांधी अकॅडमी ऑफ इ लर्निंग स्कूल निर्माण केल्यानंतर लक्षात आले. शिक्षण काळाची गरज आहे. परंतु आजची शैक्षणिक अवस्था पाहिल्यास निवृत्तीला आलेले शिक्षक, कायमस्वरूपी भरती नाही, सहा महिने मुदतीवर शिक्षक भरती, यामुळे चांगले शिक्षक मिळत नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान आणि नुकसानच होत आहे. नगरपालिका, महानगरपालिका व राज्य शासन कोट्यवधी रुपये शिक्षणावर खर्च करते. परंतु त्यातून काहीही साध्य होत नाही. त्यांना प्राथमिक शिक्षण दिले जाते. ते आठवी पर्यंतच असते  आठवीपर्यंतच  शिकवून आपण त्यांचा पाया कमजोर करत आहोत. या देशातील प्रत्येक घटकाला शिक्षणाचा अधिकार आहे. म्हणून सर्व घटकातील विद्यार्थी विद्यार्थिनींना जे काही शिक्षण घ्यायचे म्हणजे माध्यमिक उच्च माध्यमिक अति उच्च माध्यमिक या साठी १०० टक्के  शिक्षण मोफत असले पाहिजे व खाजगी शाळेत मुख्यतः हे शिक्षण मोफत असले पाहिजे.  त्यासाठी या शाळेंना सरकारकडून अनुदान देऊन त्याची तजवीज केली पाहिजे.अशी अपेक्षा आबा बागुल यांनी व्यक्त केली आहे.  आपला स्मार्ट सिटी प्रोजेक्ट चांगला आहे परंतु ती शहरे चालवणारेच स्मार्ट नसतील तर स्मार्ट शहरांचा उपयोग काय? १०० स्मार्ट सिटी करण्याऐवजी माध्यमिक व उच्च माध्यमिक  शिक्षण मोफत करून शिक्षणाची १०० स्मार्ट शहरे याकडे लक्ष दिले गेले तर शिक्षणाचा पाया अधिक मजबूत होईल.  स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत असताना हे धाडसी पाऊल उचलणे गरजेचे आहे. मोठ मोठ्या कंपन्यांच्या सीएसआर फंडातून शाळा दत्तक घेऊन त्याद्वारे मदत घेता येईल का? याबाबतही विचार केला पाहिजे, केंद्र सरकारने ७५ टक्के राज्य सरकारने १५ टक्के व नारपालिका व महानगरपालिकेने ५ टक्के अनुदान द्यावे. जर प्राथमिक शिक्षणाप्रमाणे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले तरच देशात शिक्षणाचा पाया मजबूत होईल.  देशाची आर्थिक स्थिती बळकट करायची असेल तर शिक्षण हा एकच मोठा पर्याय आहे.  आपण या देशाचे पालक आहात आपण मन की बात करून नागरिकांना दिलासा देता. त्याप्रमाणे देशातील विद्यार्थ्यांच्या मनातील बात ओळखून आपण त्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मोफत करावे त्यासाठी कायदा करावा. यासाठी प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करावी . जिल्हापरिषद, नगरपालिका महानगरपालिका यांना केंद्राकडून राज्याकडून अनुदान द्यावे व देशाला महासत्ता बनवणाऱ्या हातांना बळकटी द्यावी असेही आबा बागुल यांनी नमूद केले आहे. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणवत मर्डर्स’ – उलगडणार एक थरारक रहस्य!

२२ जूनपासून रात्री १०.१५ वाजता सोनी मराठीवर! कौटुंबिक भावना, नात्यांची...

पुण्यात 500 मुलांसोबत पार पडले स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकारातून योगसत्र

विद लव्ह एनजीओ आणि एपिफनी स्कूलसोबत 500 मुलांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन पुणे,: आरोग्य आणि समावेशकतेचा संदेश देत विद लव्ह एनजीओने एपिफनी स्कूलच्या सहकार्याने 19 जून रोजी वंचित समुदायातील 500 मुलांसाठी विशेष आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन केले. योग मॅट्स नसतानाही मुलांनी चादरी आणि टॉवेल्स अंथरून संपूर्ण उत्साहाने आणि मनापासून योग केला. यामुळे एक महत्त्वाचा संदेश मिळाला की योगासाठी साधनांपेक्षा इच्छाशक्ती, सहभाग आणि सकारात्मक मनोवृत्ती अधिक महत्त्वाची असते. या कार्यक्रमात मुलांनी उत्साहाने योगासने, प्राणायाम, ध्यान आणि बजाज प्लँकथॉनपासून प्रेरित #100SecondsPlankTogether या उपक्रमात सहभाग घेतला. "500 Children. One Breath. One Future." या संकल्पनेखाली आयोजित या उपक्रमाचा उद्देश प्रत्येक मुलाला आरोग्य, आत्मविश्वास आणि आशा मिळण्याचा समान हक्क आहे, हा संदेश देणे हा होता. विद लव्ह एनजीओच्या संस्थापक डिंपल सोमजी म्हणाल्या, "आजचा दिवस केवळ योगाचा नव्हता, तर तो आपलेपणाचा उत्सव होता. 500 मुलांना एकत्र योग करताना, हसताना आणि सहभागी होताना पाहणे म्हणजे प्रत्येक मुलाला त्याच्या शारीरिक, भावनिक आणि मानसिक विकासासाठी संधी मिळायला हवी, याची पुन्हा एकदा जाणीव करून देणारा क्षण होता." एपिफनी स्कूलच्या मुख्याध्यापिका संगीता कदम म्हणाल्या, "असे कार्यक्रम केवळ तंदुरुस्तीपुरते मर्यादित नसून मुलांसाठी सुंदर आठवणी निर्माण करतात, चांगल्या सवयी रुजवतात आणि त्यांना विशेष व महत्त्वाचे असल्याची जाणीव करून देतात." या कार्यक्रमाने एपिफनी स्कूलमधील अनेक मुलांच्या शैक्षणिक गरजांकडेही लक्ष वेधले. ही मुलं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून येतात. अनेकांच्या कुटुंबांवर गरीबी, गुन्हेगारी, मद्यपान आणि कठीण जीवनस्थितीची छाया आहे. काही मुलांचे संगोपन एकल पालक करत असून ते रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आयोजकांनी व्यक्ती, कुटुंबे, संस्था आणि कॉर्पोरेट क्षेत्राला शालेय फी, गणवेश, वह्या, शालेय साहित्य आणि इतर आवश्यक गोष्टींसाठी पुढे येऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमाचा समारोप अल्पोपहार, पुस्तकं आणि क्रीडा साहित्य वाटप तसेच प्रत्येक मुलाला शिकण्याची, वाढण्याची आणि प्रगती करण्याची संधी मिळावी, या सामूहिक संकल्पाने झाला. विद लव्ह एनजीओ विषयी:  विद लव्ह एनजीओ ही पुणेस्थित स्वयंसेवी संस्था असून शिक्षण, आरोग्य, स्वयंसेवा आणि प्रेमळ कृतींच्या माध्यमातून मुलं आणि समुदायांसाठी अर्थपूर्ण संधी निर्माण करण्यासाठी कार्यरत आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१००० सूर्यनमस्कारचे उदिष्ट पूर्ण – धीरज घाटे

पुणे :-अंतराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्त भारतीय जनता पार्टी पुणे...