Home Blog Page 1972

जगातील TOP10 मधील श्रीमंत ..त्यांच्यावरही आहे पहा केवढे कर्ज ….

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत समाविष्ट असलेले मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांची नावे विदेशी कर्ज घेणाऱ्यांच्या यादीत असल्याचे एका अहवालात म्हटले आहे असे सूत्रांचे म्हणणे आहे , सूत्रांच्या माहितीनुसार . बँक ऑफ बडोदानं भारतीय कंपन्यांनी घेतलेल्या विदेशी कर्जाचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आकडेवारीच्या आधारे असं म्हटलं आहे की, भारतीय कंपन्यांनी घेतलेल्या एकूण विदेशी कर्जात अंबानी आणि अदानी यांच्या कंपन्यांचा वाटा २० टक्के इतका आहे.अहवालात पुढे म्हटलं आहे की, २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारतीय कंपन्यांनी विदेशी कर्जदारांकडून ३८.२ बिलियन डॉलरचं (भारतीय चलनात २.९ लाख कोटी रुपये) कर्ज घेतलं आहे. यामध्ये मुकेश अंबानींच्या रिलायन्स उद्योग समूहाने आणि गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील कंपन्यांनी ८.२५ बिलियन डॉलरचं (भारतीय चलनात ६३ हजार कोटी) कर्ज घेतलं आहे.

भारतीय कंपन्या आपली भांडवलासंबंधित गरज पूर्ण करण्यासाठी एक्सटर्नल कमर्श‍ियल बोरोविंग्स (ECB) कडून विदेशी कर्ज घेतात. हा कर्ज पुरवठा युरोप, जपान आणि यूएस सारख्या देशांकडून केला जातो. भारतीय बँकांच्या तुलनेत हे कर्ज अधिक स्वस्त असते. कारण विकसित देशांचे व्याजदर विकसनशील देशांपेक्षा कमी आहेत.

अहवालात म्हटलं आहे की, गेल्या ८ वर्षांत भारतीय कंपन्यांनी २६० बिलियन डॉलरचं विदेशी कर्ज घेतलं आहे. हे कर्ज परदेशी भांडवली बाजार, व्यावसायिक बँका आणि खाजगी इक्विटी गुंतवणूकदारांकडून घेतलं आहे. अदानी समूहाचे गौतम अदानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांची संपत्ती १९० अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे. दोघांच्या सर्व कंपन्यांचं एकूण बाजारी भांडवल एकत्रित केलं तर ते ३३ लाख कोटी रुपयांपेक्षा (429 बिलियन डॉलर) अधिक आहे.असेही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजते आहे.

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती १०२ बिलियन डॉलर इतकी असून ते जगातील ७ व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ९३ बिलियन डॉलर एवढी असून ते जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत १० व्या क्रमांकावर आहेत.

भरधाव वाहनाच्या धडकेने व्यापारी अतुल कोठारींचा मृत्यू 

पुणे- भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार व्यापाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना गंगाधाम-बिबवेवाडी रस्त्यावर घडली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
अतुल जयंतीलाल कोठारी (वय ४५, रा. हाईड पार्क सोसायटी, मार्केट यार्ड) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार व्यापाऱ्याचे नाव आहे. याबाबत कोठारी यांचे भाऊ नितीन (वय ४७, रा. मार्केट यार्ड) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार अतुल कोठारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास गंगाधाम-बिबवेवाडी रस्त्याने जात होते. आईमाता मंदिराजवळ भरधाव वाहनाने दुचाकीस्वार अतुल यांना धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी अतुल यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.पसार झालेल्या वाहनचालकाचा शोध घेण्यात येत असून सहायक पोलीस निरीक्षक रामदास मुंढे तपास करत आहेत.

अविनाश भोसले आठ जूनपर्यंत सीबीआय कोठडीत

अजब श्रीमंतीच्या गजब कहाणीतला पुण्यातील तिसरा नायक (?)

पुणे- येथील बहुचर्चित उद्योजक अविनाश भोसले यांस ​मुंबईतील ​​​​​​सीबीआय विशेष न्यायालायाने 10 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. आता त्यांचा मुक्काम आठ जूनपर्यंत सीबीआय कोठडीत असेल.सीबीआयने अविनाश भोसले यांना 26 मे रोजी पुण्यातून अटक केली होती. भोसले गत अनेक दिवसांपासून येस बँक व डीएचएफएल बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या रडारवर होते.

सीबीआयने डीएचएफल आणि येस बँक घोटाळ्याप्रकरणी अविनाश भोसलेंना अटक केली होती. सीबीआयने केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा भोसलेचा दावा कोर्टाने फेटाळला आहे. तसेच सीबीआयला अविनाश भोसलेला मुंबईबाहेर नेण्यास मनाई कोर्टाने केली आहे.अटकेनंतर मुंबईतील सीबीआय कोर्टात त्यांना हजर करण्यात आले होते. सीबीआयने भोसलेची 10 दिवसांसाठी कोठडी मागितली होती. मात्र सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करत भोसलेच्या वकिलांनी कोठडीला विरोध केला होता. कोर्टाने हा दावा फेटाळला आहे.

सीबीआयने डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी अविनाश भोसलेवर ही कारवाई केली. भोसले याचे नाव येस बँक घोटाळाप्रकरणीही चर्चेत होते. या दोन्ही प्रकरणाची सीबीआयने चौकशी सुरू केली होती. शिवाय याप्रकरणी पुणे – मुंबई परिसरातील तब्बल 8 ठिकाणी छापेमारी केली होती. या छाप्यातून सीबीआयच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागल्याचे समजते. त्यातूनच ही कारवाई करण्यात आली आहे.

रिक्षावाला ते ३ हेलिकॉप्टरचा मालक अजब श्रीमंतीच्या गजब कहाणीतला पुण्यातील तिसरा नायक (?)

अविनाश भोसले हे इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या बांधकाम कंपनीचे मालक आहेत. त्यांचा जन्म संगमनेर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील निवृत्ती गणपत भोसले हे संगमनेर येथील सावर्जनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता होते. रोजगाराच्या शोधात पुण्यात आलेल्या अविनाश भोसले यांनी रिक्षाचालक म्हणून सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी बांधकाम क्षेत्रात उडी घेतली. रिक्षा चालक ते मोठे बांधकाम व्यावसायिक हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्याबद्दलच्या `सक्सेस स्टोरीज` नेहमीच सोशल मीडियात व्हायरल होत असतात.

याआधी जप्त झाली होती मालमत्ता

ईडीने याआधी अविनाश भोसले यांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने आतापर्यंत अविनाश भोसले याच्यावर केलेली ही मोठी कारवाई आहे.

वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या ४८२ व्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा व अभिवादन

पुणे – वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या ४८२ व्या जयंतीनिमित्त पुणे शहरातील समस्त राजपूत समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यान येथून शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे.

महाराणा प्रताप उद्यानातील महाराणा स्मारकातील पुतळ्यास सकाळी ९.३० वाजता पुष्पहार अर्पण व अभिवादन केल्यावर गुणवंत व कर्तबगार व्यक्तिंचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे.

महाराणा प्रताप यांची जयंती तिथीनुसार मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचे ठरले आहे. महाराष्ट्र सरकारने शासन परिपत्रक काढुन राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात महाराणा जयंती शासकीय पध्दतीने साजरी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर वीरशिरोमणी महाराणाजींना शासनाने राष्ट्रपुरुष म्हणून घोषित केल्याने यावर्षी संपुर्ण राज्यांमधे व पुणे शहरात यंदाची जयंती मोठ्या प्रमाणात विविध सामाजिक, धार्मिक मिरवणूक व अभिवादन करुन साजरी करण्यात येणार आहे.

शोभायात्रा महाराणा प्रताप उद्यान येथून सुरुवात होईल. चिंचेची तालीम , सेवा मंडळ, फडगेट पोलीस चौकी शितळादेवी चौकातून मिठगंज पोलीस चौकी मार्गे कस्तुरे चौकात समारोप होईल. मिरवणुकीत ढोल ताशा पथक व बँड पथक देखील सहभागी होणार आहे. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या विकासाकरीता भरीव निधी देणार- उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत

पुणे, दि.३१:- श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देऊ असे प्रतिपादन उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. विद्यापीठाच्या परिसरातील ‘महर्षी कर्वे कुटीर’ स्मारक स्वरुपात विकसित व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करुन स्मारकाच्या विकासालाही निधी देण्याची ग्वाहीदेखील श्री. सामंत यांनी दिली.

कर्वे रोड येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातील आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिक्षण संचालक धनराज माने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, एसएनडीटी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या डॉ. नलिनी पाटील, प्राचार्य डॉ. माधवी कुलकर्णी आदी उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले, एसएनडीटी हे नावाजलेले विद्यापीठ असून या ठिकाणी ज्ञानदानाचे कार्य सक्षमपणे चालते. विद्यापीठातील सांघिक वृत्तीमुळे व क्षमतेमुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक विकासास मदत होत आहे. विद्यार्थांच्या मागणीची दखल घेवून त्यांना इंटरनेट सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. विद्यापीठातील रस्त्यांची कामे येत्या दिवसात मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

विद्यापीठातील शैक्षणिक सुधारणा करण्यासाठी, शिक्षण व विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शासनाचे सहकार्य नेहमीच राहील. नवीन शैक्षणिक धोरणानुसार शैक्षणिक क्षेत्रात बदल करण्यासाठी प्रयत्न करावेत. एकूणच पुण्याच्या शैक्षणिक विकासासाठी कटिबद्ध असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना महान व्यक्तींची माहिती देण्यात येणार आहे. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातील विद्यार्थांसोबत नागरिकांना महर्षी धोंडो केशव कर्वे आणि बाया कर्वे या महान व्यक्तींची माहिती मिळण्यासाठी अभ्यास केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे, असेही श्री. सामंत म्हणाले.

यावेळी ‘रिसर्च क्रोनीक्लर’ या नियतकालिकांचे प्रकाशन करण्यात आले तसेच विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेंच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

बुद्धिबळामुळे सतत जागरूक राहण्याची सवय : देवेंद्र फडणवीस

पहिल्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ग्रन्डमास्टर्स खुल्या बुद्धिबळ स्पर्धेला प्रारंभ

पुणे, ३१ मे २०२२: बुद्धिबळात सातत्याने अत्यंत जागरूक राहून अचूक चाली कराव्या लागतात. एकही चाल चुकली, तर डाव हातचा जाऊ शकतो. म्हणूनच बुद्धिबळासारख्या खेळामुळे आपल्याला सतत जागरूक राहण्याची, चुका टाळण्याची सवय लागते. हीच सवय कायम ठेवून आगामी स्पर्धेत यशस्वी व्हा, असा कानमंत्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित खेळाडूंना दिला.
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या वतीने आयोजित व अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या पहिल्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ओपन ग्रॅन्डमास्टर बुद्धिबळ स्पर्धेला श्रीशिवछत्रपती क्रीडानगरी, बालेवाडी येथे आज प्रारंभ झाला. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष ड़ॉ. परिणय फुके, वरिष्ठ उपाध्यक्ष ग्रॅन्डमास्टर अभिजीत कुंटे, उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे व गिरीश चितळे,  महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे माजी अध्यक्ष व निमंत्रक अशोक जैन आणि मानद सचिव निरंजन गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते. 
या स्पर्धेत भारतासह 24 देशांमधील 140 खेळाडूंनी सहभाग घेतला असून त्यात 17 ग्रॅन्डमास्टर्स, महिला ग्रॅन्डमास्टर्स आणि 29 आंतरराष्ट्रीय मास्टर्स खेळाडूंचा सहभाग आहे. या स्पर्धेत 2000 पेक्षा जास्त एलो गुणांकन असलेल्या खेळाडूंचा सहभाग आहे.
या स्पर्धेबरोबरच 1 ते 4 जुन दरम्यान पुणे ओपन बुद्धिबळ स्पर्धाही होणार असून त्यात 2000 पेक्षा कमी एलो गुणांकन असलेल्या खेळाडूंचा सहभाग आहे. बुद्धिबळाप्रमाणेच राजकारणातही डोळ्यात तेल घालून दक्ष राहावे लागते. एकही चाल चुकली, तर पराभव ठरलेलाच. आम्हीही 2019 च्या विधानसबा निवडणुकीत अशाच एका चुकीमुळे पराभूत झालो होतो. तशा चुका तुम्ही करू नका, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
कोणताही खेळ खळताना त्यातील खाचाखोचा नीट समजावून घ्या, असे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राने देशाला अनेक ग्रॅन्डमास्टर दिले आहेत आणि आता युवा खेळाडू तोच वारसा पुढे चालवीत आहेत. या स्पर्धेतील खेळाडूंचा भरघोस सहभाग पाहून मला खूपच आनंद होत आहे. फिडे नियमानुसार ही स्पर्धा होत असल्याने अनेकांना या स्पर्धेतून ग्रॅन्डमास्टर किंवा आंतरराष्ट्रीय मास्टर नॉर्म मिळविण्याची संधी आहे. खिलाडू वृत्ती, खेळभावना आणि स्पर्धात्मकता हे गुण ज्याच्याकडे असतात, तो स्पर्धाही जिंकतो आणि खर्‍या आयुष्यातही यश मिळवितो.
बुद्धिबळासारख्या खेळात तुमच्या क्षमतेची कसोटी लागते. या खेळात समोरच्या खेळाडूच्या कौशल्याचा नीट अभ्यास करणेही महत्त्वाचे असते. नेमकी हीच गोष्ट तुम्हाला स्पर्धेत आणि प्रत्यक्ष आयुष्यातही उपयोगी पडेल, असे सांगून महाराष्ट्राचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार म्हणाले की, आम्ही असा अभ्यास केल्यामुळेच 2019 विधानसभेच्या निवडणुकीत विजयी ठरलो. हीच परंपरा यापुढेही कायम राहील.
गेल्या दोन वर्षांच्या ाकलावधीत सारे काही ठप्प जाले होते. त्यामुळे क्रीडाक्षेत्रालाही फटका बसला. परंतु आता सारे काही रुळावर येत असून आम्ही गेल्या चारपाच महिन्यांतच अनेक स्पर्धा घेतल्या आहेत, असे सांगून श्री. केदारी म्हणाले की, महाराष्ट्र ओपन स्पर्धेमुळे उदयोन्मुख खेळाडूंबरोबरच प्रतिथयश खेळाडूंनाही चांगले व्यासपीठ मिळाले आहे.
‘खेलो इंडिया’ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे सराव व प्रशिक्षण शिबीर चालू असल्याचे सांगून श्री. केदार म्हणाले की, या सगळ्याचा पुरेपूर फायदा खेळाडू निश्‍चितच करून घेतील. महाराष्ट्रात या वर्षअखेरपर्यंत अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे क्रीडा विद्यापीठ सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

पुणे जिल्ह्यात ८ लाख मालमत्तांवर महिलांचे नाव

पुणे-भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पुणे जिल्हा परिषदेने महिलांना मालमत्तेचा अधिकार देण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे. आतापर्यंत ग्रामीण भागातील ८ लाख १५ हजार अर्थात ८८ टक्के मालमत्तांवर महिलांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे.

मालमत्तेचा आणि त्याच्या मालकांचा तपशील ग्रामपंचायती ठेवतात. जागतिक स्तरावर, महिलांकडे २० टक्क्यापेक्षा कमी मालमत्तेची मालकी आहे. गतवर्षी स्वातंत्र्यदिनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत क्षेत्रात विशेष महाफेरफार अभियान राबविण्यास सुरूवात करण्यात आली. मोहीमेची सुरूवात करताना पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिलांकडे १६ टक्के मालमत्ता होती.

मालमत्तेच्या मालकीचा अभावामुळे महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य, तसेच अधिकारांचा वापर करण्याच्या क्षमतेला मर्यादा येतात. महिलांच्या सक्षमीकरणाचा उपाय म्हणून सर्व ग्रामपंचायतींना मालमत्तेचे सध्याचे मालक आणि लाभार्थी महिलांकडून मालकी तपशीलात फेरफार करण्यासाठी संयुक्त अर्ज मागवण्याच्या सूचना देण्यात आल्या. या संकल्पनेला नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला.

जिल्ह्यातील सुमारे सव्वा दोन लाख महिला बचत गटांशी जोडल्या गेल्या आहेत. फेरफार मोहीम सुनियोजितपणे पुढे नेण्यासाठी या महिलांना सहभागी करण्यात आले. गावात बैठका, मेळावे, वैयक्तिक भेटीच्या माध्यमातून प्रबोधनावरही भर देण्यात आला. या उपक्रमाला सामाजिक चळवळीचे स्वरुप देण्यात जिल्हा परिषद व्यवस्थापनाला यश आहे. सरपंच-ग्रामसेवकांपासून मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी या उपक्रमात योगदान दिले.

यावर्षी महिला दिनापर्यंत ६  लाख ४२ हजार मालमत्ता घरातील महिला सदस्यांच्या मालकीच्या होत्या. स्वामीत्व योजनेदरम्यान काढलेल्या मालमत्तेचे स्पष्ट नकाशे असलेले अद्ययावत मालमत्ता कार्ड वितरित करण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. प्रॉपर्टी कार्ड्सच्या वितरणामुळे या कामाला गती मिळाली आणि अधिकाधिक कुटुंबांनी महिलांचे नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज केला.

आता ही संख्या आठ लाखापेक्षा अधिक मालमत्तांवर पोहोचली आहे, जी ग्रामीण भागातील मालमत्तांपैकी ८८ टक्के आहे. प्रॉपर्टी कार्डवर कर्ज मिळू शकते आणि घरातील स्त्रीच्या संमतीशिवाय घरातील पुरुष सदस्य कर्ज घेऊ शकत नाहीत. एकप्रकारे महिलांना या माध्यमातून घरातील महत्वाच्या निर्णयात सहभागी होण्याचा आणि पर्यायाने सन्मानाचे जीवन जगण्याचा अधिकार मिळाला आहे.

आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.पुणे-महिलांना सन्मान देण्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि दैनंदीन जीवनातही त्यांच्या अधिकारांचे रक्षण व्हावे यासाठी ही संकल्पना राबविण्यात आली आहे. नागरिकांनी दिलेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. महिला सक्षमीकरणासाठी हे महत्वाचे पाऊल ठरावे.

लीना दळवी, काटेवाडी, ता.बारामती- महिलांच्या नावावर मिळकत असणे ही काळाची गरज आहे. यामुळे महिलांचे  सक्षमीकरण होऊन महिलांना मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी मदत होते. महिलांची मानहानी टाळली जाण्यासाठी मदत होते.  मिळकत माझ्या नावावर झाल्याने मला खूप समाधान वाटत आहे.  हे घर माझे आहे ही समाधानाची भावना माझ्या मनात राहील.

स्नेहा अविनाश थोरात, पिंपळी, ता. बारामती-महिलांच्या नावावर मिळकत असणे  खूप चांगले आहे. आज मला माझ्या हक्काचे घर मिळले आहे. महिलांच्या मनात यामुळे सुरक्षिततेची भावना असते. माझ्या घरातील सदस्यांनी स्वखुशीने माझ्या नावावर घर केले आहे.

डेक्कन महाविद्यालयाचा परिसर देशाचा ऐतिहासिक अमूल्य ठेवा- उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत

पुणे, दि.३१:- येरवडा येथील डेक्कन महाविद्यालय पदव्युत्तर व संशोधन संस्थेचा परिसर देशाचा ऐतिहासिक अमूल्य ठेवा असल्याचे प्रतिपादन उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

डेक्कन महाविद्यालय पदव्युत्तर व संशोधन संस्थेला श्री.सामंत यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी कुलगुरु डॉ. प्रमोद पांडे, उपकुलगुरु डॉ. प्रसाद जोशी, शिक्षण संचालक धनराज माने, माजी कुलपती जी. बी. देगलूरकर आदी उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले, महाविद्यालयातील ऐतिहासिक दुर्मिळ ठेवा अमूल्य असून तो जगासमोर आणण्यासाठी प्रयत्न करावे. या ऐतिहासिक ठेव्याचे डिजीटायझेशन करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. संगणकीय यंत्रणेसाठी शासनाच्यावतीने आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. परिसराचा विकास करण्यासाठी उद्योगांच्या सामाजिक दायित्व निधीमधून मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावा. मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री यांच्याशी चर्चा करुन डेक्कन महाविद्यालयाचा परिसर शनिवार व रविवार या दोन दिवशी पर्यटकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे श्री. सामंत म्हणाले.

यावेळी श्री.सामंत यांनी पुरातत्व संग्रहालय, प्रोगैतिहासिक विधीका, मराठा संग्रहालय, जमखिंडी संस्थान संग्रह, संस्कृत आणि कोशशास्त्र विभाग, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर हे विद्यार्थी असताना वास्तव्य असलेल्या खोलीस भेट देवून पहाणी केली.

राज्याच्या नियोजनबद्ध अंमलबजावणीने योजना सर्वदूर पोहचल्या-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई दि ३१ योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या असोत, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्याच्या यंत्रणेचे मोठे योगदान असते. हे प्रयत्न पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित झाले पाहिजेत. मला आनंद व समाधान आहे की, या योजना राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर प्रशासकीय यंत्रणेने नियोजनपूर्वक लाभार्थींपर्यंत यशस्वीरित्या पोहचविल्या असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

विविध केंद्रीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थीशी सहयाद्री अतिथीगृहातून संवाद साधतांना ते बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत ग्रामविकास विभागाने राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्यानिमित्त मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रत्येक लाभार्थीशी संवाद साधून त्यांना योजनांचा लाभ कसा मिळाला तसेच त्यांच्या आणखी काही अपेक्षा आहेत का ते जाणून घेतले. ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.

यावेळी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी मुंबईमधील यासीन शब्बीर शेख, निशा शर्मा, कुंजू पवार या महिलांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभाचे प्रमाणपत्रही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते देण्यात आले.

योजनांमध्ये राज्याचा मोठा सहभाग

केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये राज्याचाही 40 टक्के वाटा आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेने अगदी तालुका आणि गाव पातळीवर काम करून या योजनांचे लाभ लोकांपर्यंत पोहचविले आहेत आणि लाभार्थींच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहिले की हीच आपल्या आयुष्याची कमाई वाटते.

महाराष्ट्राच्या प्रभावी कामगिरीचे कौतुक

प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यात ५,००,००० घरे ग्रामीण भागात बांधली असून यंदाही ५ लाख घरे बांधत आहोत. ३५०० कोटी रुपयांचा निधी यासाठी उपलब्ध करून दिला आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की. २०२२-२३ मध्ये जल जीवन मिशनमध्ये १९ लाख कुटुंबास नळ जोडणी व पिण्याचे शुद्ध पाणीपुरवठा देण्यासाठी १९०० कोटी इतका निधी उपलब्ध करू दिला आहे.

याशिवाय पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना स्वच्छ भारत योजना (ग्रामीण व शहरी) इतर केंद्र शासन पुरस्कृत योजना राबविण्यात राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरीय यंत्रणाच्या सक्रीय सहभाग व नियोजनबद्ध अंमलबजावणीमुळे योजनांचा लाभ पोहचविणे शक्य झाले असेही ते म्हणाले.

व्याज परतावा सुरू करा

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांना देखील केंद्राने बंद केलेला पीक कर्जावरील दोन टक्के व्याज परतावा परत सुरू करावा व लाखो शेतकऱ्यांची अडचण दूर करावी अशी विनंती केली.

अंमलबजावणीचा दुष्काळ महाराष्ट्रात नाही

केवळ योजनांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असे चित्र महाराष्ट्रात नसून शेवटच्या घटकांपर्यंत अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अगोदरच्या पिढ्यांनी लढा दिला आहे. आपल्या देशातल्या लोकांना समाधानाने जीवन जगावे लागता यावे म्हणून प्रयत्न करून या पिढ्यांचे योगदान सार्थ ठरवते अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी महाआवास त्रैमासिक, आझाद का अमृत महोत्सव प्रगती अहवाल, मिशन महाग्राम या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी साधलेल्या संवादात, नगर जिल्ह्यातील दरेवाडीचे मीरा कारंडे, लोणी बुद्रुकचे विनोद पारखे, चांदेगावचे सुखदेव उबाळे, कोल्हापूर जिल्ह्यातील हसुर दुमालाचे जिजाबाई पाटील, सांगरुळचे लक्ष्मी साठे, अर्जूनीचे नितीन आढाव, नाशिक जिल्ह्यातील कवनईचे आनंद पाटील, सटवाई वाडीचे नामदेव मेधाने, बागलाणचे मीरा पवार, नागपूर जिल्ह्यातील भंडारबोडीचे मीराबाई गणवीर, सुमन दोनारकर, खेर्डीचे संगीता निकम, औंरगाबाद जिल्ह्यातील रायपूर येथील बाळू राऊत, भराडीचे कृष्णा महाजन, फुलंब्रीचे सुवर्णा भुईगल या लाभार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले.

फोर्ब्स’ने गौरविलेल्या आर्या तावरेचेउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले कौतुक

0

मुंबई, दि, 31: आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित ‘फोर्ब्स’ मासिकाने गौरविलेली आणि मूळची बारामतीकर असणारी लंडनस्थित युवा उद्योजक आर्या तावरेनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईतील त्यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर्याच्या नवीन स्टार्टअपची माहिती घेत तिचे कौतुक केले.

मुळची बारामतीची असणारी आणि सध्या लंडनमध्ये राहणाऱ्या आर्या तावरेने अवघ्या बावीसव्या वर्षी ‘फ्युचरब्रिक्स’ नावाने ‘स्टार्टअप’ सुरू करून ब्रिटनमधील लघू व मध्यम बांधकाम व्यावसायिकांना निधी उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे. अनेक मोठ्या वित्तपुरवठा कंपन्या तिच्या कंपनीशी जोडल्या गेल्या आहेत. तिच्या या कामगिरीची दखल ‘फोर्ब्स’ मासिकाने घेतली आहे. युरोपमधील वित्तपुरवठा वर्गवारीतील तीस वर्षांखालील पहिल्या तीस व्यक्तींच्या यादीत आर्याचा समावेश करण्यात आला आहे. ‘फोर्ब्स’ मासिकातील प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत आर्याच्या रूपाने मराठी मुलीचा समावेश झाला आहे. तिच्या कामाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सविस्तर माहिती घेत तिची आस्थेवाईकपणे चौकशी केली, तिच्या कामाचे कौतुक केले.


सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता १५ दिवसांत सुरू झालाच पाहिजे :आमदार मिसाळांनी सुनावले अधिकाऱ्यांना….

पुणे- सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता १५ दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी कळविली आहे.आज मिसाळ यांनी अधिकाऱ्यांसोबत या रस्त्याची पाहाणी केली. यावेळी कारणाशिवाय दिरंगाई बद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले आणि कामाबाबत हलगर्जीपणा ,विनाकारण दिरंगाई अजिबात खपवून घेतली जाणार नाही असे सुनावले . यावेळी महापालिका अधिकाऱ्यांनी पर्यायी रस्ता १५ दिवसात सुरु होईल असे त्यांना आश्वासन दिले .श्रीनिवास बोनाला, प्रकल्प प्रमुख, व्ही जी कुलकर्णी, पथ विभाग प्रमुख, अमित घुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक, उदयसिंग शिंगाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिहगड रोड वाहतूक विभाग, प्रदीप आव्हाड, क्षेत्रीय अधिकारी सिहगड क्षेत्रीय कार्यालय, अमर शिंदे, कार्यकारी अभियंता पथ , राखी चौधरी, अभियंता पथ, अतुल कडू अभियंता पथ, अजय वायसे, कार्यकारी अभियंता प्रकल्प , सुश्मिता शिर्के, अधिक्षक अभियंता प्रकल्प, महादू थोपटे उपअभियंता , निखिल रंधवे, कनिष्ठ अभियंता, विश्वास ननावरे , प्रवीण दिवेकर , विशाल पवार उपस्थित होते.

मिसाळ म्हणाल्या, जनता वसाहत पु. ल. देशपांडे उद्यानामागील रस्ता काँक्रिट करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यावर वृक्ष छाटणी आणि इलेक्ट्रिक विभागाची कामे १५ दिवसांत पूर्ण होतील. त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे.विश्रांती नगर रस्ता , विठ्ठल मंदिर मागील रस्ता, हिंगणे चौक, कॅनॉल रस्ता आदी कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलाच्या जागेची पाहाणी केली.

मूकअभिनय करणे ही हृदयाला स्पर्श करणारी शक्तिशाली कला : अशोक कुमार चट्टोपाध्‍याय

0

मुंबई, 31 मे 2022

मूकअभिनय हा समर्थ कला प्रकार आहे, या कलेतून कोणताही शब्द न वापरता तुमच्या हृदयाला स्पर्श करता येते, असे ‘अॅन ऑड टू क्वाइट्यूड’ या माहितीपटाचे दिग्दर्शक अशोक कुमार चट्टोपाध्याय प्रतिपादन केले. फ्रेंच क्रांतीच्या काळात , क्रांतिकारकांनी त्यांचा निषेध नोंदविण्‍यासाठी माइम म्हणजेच मूकभीनयाचा वापर केला. सामाजिक समस्यांला वाचा फोडण्‍याची ताकद आजही या कलाप्रकारामध्‍ये  त्यात आहे, असे ते म्हणाले. १७व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त आयोजित ‘#मिफ संवाद’ मध्ये ते बोलत होते.

आपल्या चित्रपटाबद्दल बोलताना अशोक कुमार चट्टोपाध्याय म्हणाले की, ‘अॅन ऑड टू क्वाइट्यूड’  हे ‘माइम’ कलेतील उस्ताद आणि भारतीय मूकभीनयाचे प्रवर्तक,  जोगेश दत्ता यांचे चरित्र आणि जगप्रसिद्ध माइम कलाकार बनण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाचे रेखाटन म्हणजे हा चित्रपट आहे. “जोगेशदा  13-14 वर्षांचे असताना त्यांचे पालक गेल्यामुळे ते अनाथ झाले. स्वातंत्र्याच्या पहाट ज्यावेळी उगवत होती,  त्यावेळी ते सियालदाह स्‍थानकावर होते. आधीच्या पूर्व पाकिस्तानातील कफल्लक  निर्वासित म्हणून त्यांनी स्वातंत्र्याचा सूर्योदय पाहिला. हॉटेल, चहाचे टपरी कामगार अशा अनेक विचित्र नोकऱ्या त्यांनी केल्या आहे आणि जीवनात येणा-या चित्रविचित्र    अनुभवांना सामोरे गेले. त्यांच्याकडे असलेल्या उत्कृष्‍ट निरीक्षण शक्तीतून, त्यांनी  इतरांच्या नकला करायला प्रारंभ केला  आणि यातूनच नक्कल करण्याचे कौशल्य विकसित केले. त्यांची विनोदबुद्धीही उत्तम होती. त्यांनी स्वतःहून अनेक स्क्रिप्ट तयार केल्या. हळुहळू त्यांनी स्वबळावरच ‘माइम’ कला विकसित केली. तासनतास केलेल्या सरावाने त्यांनी दाखवलेली कला एक आख्यायिका बनली,” असे चट्टोपाध्‍याय यावेळी  म्हणाले.

माईम उस्तादांबरोबर त्यांना प्रदीर्घ काळ सहवास लाभला. त्यामुळे त्या आठवणी सांगताना अशोककुमार म्हणाले, जोगेश दत्ता यांनी या  कलाप्रकारासाठी ज्या प्रकारचे समर्पण दिले आहे, ते खरोखर आश्चर्यकारक आहे. “त्यांनी  आपले हे शरीर मंदिरासारखे आहे, असे मानले आणि कठोरतेने  आहारविषयक नियम आणि दिनचर्या पाळली. आजच्या काळात , बहुतांश लोकांमध्ये अशा प्रकारचे समर्पण गायब आहे,” ते पुढे म्हणाले.

“मोबाईल आणि इंटरनेटच्या क्रेझमुळे लोक स्टेज अॅक्टिव्हिटी विसरत आहेत. रंगमंचावर कला पाहण्यासाठी पूर्वीसारखी गर्दी सभागृहात होत नाही. आम्ही सभागृहाच्या उद्देशाने कला बनवत आहोत. अडीच इंची मोबाईल स्क्रीन कलाकृतीला न्याय देऊ शकत नाही. माझ्यासाठी ते माध्यम नाही. गाणे, संगीत किंवा नाटक बघायचे असेल तर प्रेक्षागृहात जावे लागेल”, असे मत अशोक कुमार चट्टोपाध्याय  व्यक्त केले. 

‘अॅन ऑड टू क्वाइट्यूड’ या विषयी  थोडक्यात

मूकअभिनय कलेतील दिग्गज जोगेश दत्ता यांचा  स्थानिक महोत्सवांमध्ये स्टँडअप कॉमेडियन होण्यापासून ते भारतातील पहिली ‘माइम’ अकादमी स्थापन करणारे  भारतीय ‘माइम’चे प्रणेता होण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटात आहे.

दिग्दर्शकाबद्दल

अशोक कुमार चट्टोपाध्याय हे चित्रपट आणि जाहिरातींचे दिग्दर्शक आहेत. त्यांनी कोलकाता म्युनिसिपल कॉर्पोरेशन, अरोरा फिल्म कॉर्पोरेशन आणि संगीत नाटक अकादमीसाठी चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे, त्यांच्या फिल्मोग्राफीमध्ये – ‘ए डिव्हाईन पर्क्यूशन’(२०१५), ‘गहना बोरी’ (२०१६) आणि ‘ द गोल्डन ग्लोरी’  (२०१७) यांचा समावेश आहे.

“हे 130 कोटी भारतीयांचे कुटुंब माझे आहे, तुम्ही सर्वजण माझ्या आयुष्यातील सर्व काही आहात आणि माझे हे आयुष्य देखील तुमच्यासाठी आहे”

0

शिमला-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिमाचल प्रदेशातील शिमला येथे ‘गरीब कल्याण संमेलना’ला संबोधित केले. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा अभिनव जाहीर कार्यक्रम देशभरातल्या राज्यांच्या राजधानी, जिल्हा मुख्यालये आणि कृषी विज्ञान केंद्रांवर आयोजित करण्यात आला.  देशभरातील निवडून आलेले लोकप्रतिनिधी सरकारच्या विविध कल्याणकारी कार्यक्रमांबद्दल जनतेची मते जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी थेट संवाद साधतील अशी या संमेलनाची संकल्पना होती.

पंतप्रधानांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत आर्थिक लाभांचा 11 वा हप्ता देखील यावेळी जारी केला. यामुळे 10 कोटी पेक्षा अधिक लाभार्थी शेतकरी कुटुंबांना सुमारे 21,000 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करणे शक्य होईल. यावेळी पंतप्रधानांनी देशभरातील (PM-KISAN) लाभार्थ्यांशी संवाद साधला. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर हे शिमला येथे उपस्थित होते.

लडाखमधील लाभार्थी ताशी टुंडुप यांच्याशी संवाद साधताना, पंतप्रधानांनी लडाखमध्ये पर्यटकांचे आगमन आणि सरकारी योजनांबद्दलचा त्यांचा अनुभव याविषयी विचारले. लष्करातील जवान म्हणून त्यांच्या सेवेचे पंतप्रधानांनी कौतुक केले. ताशी टुंडुप म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजना, शौचालये, गॅस जोडणी  आणि शेतीशी संबंधित लाभ सारख्या योजनांचा लाभ मिळवताना त्यांना कोणतीही अडचण आली नाही.

बिहारमधील ललिता देवी जी या प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला, स्वच्छ भारत आणि जल जीवन मिशनच्या लाभार्थी आहेत. या योजनांमुळे त्यांचे जगणे सुसह्य आणि सन्माननीय झाल्याचे त्यांनी पंतप्रधानांना सांगितले. पंतप्रधान म्हणाले की, घरामुळे मुलांचे शिक्षण, लग्न अशा अनेक गोष्टी योग्य रीतीने होतील.

पश्चिम त्रिपुरा येथील पंकज शानी एक राष्ट्र एक रेशन कार्ड, पीएम गरीब कल्याण आणि इतर अनेक योजनांचे लाभार्थी आहेत. त्यांनी सांगितले की त्यांना जलजीवन मिशन, एक राष्ट्र एक रेशन कार्ड, प्रधानमंत्री आवास योजना आणि वीज जोडणी यांसारख्या अनेक योजनांचा लाभ मिळाला आहे. वन नेशन वन रेशन कार्डमुळे बिहारमधून स्थलांतर करूनही त्यांना कोणतीही अडचण येत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

कर्नाटकातील कलबुर्गी येथील आयुष्मान भारतच्या लाभार्थी संतोषी यांनी या योजनेबाबतचा आपला अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या की आरोग्य आणि निरामयता केंद्र आणि मोफत तपासणी आणि औषधे यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक बदल घडत  आहेत. त्यांच्या उत्तम संवाद कौशल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली आणि तिने निवडणूक लढवावी कारण ती खूप लोकप्रिय होणार आहे असे गंमतीत म्हणाले.

गुजरातमधील मेहसाणा इथले प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे लाभार्थी अरविंद यांना पंतप्रधानांशी बोलताना खूप आनंद झाला. त्यांनी सांगितले की या योजनेमुळे त्यांच्या मंडप सजावट व्यवसायाचा विस्तार झाला आहे आणि ते डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देत आहेत. आपल्या कर्मचार्‍यांना सरकारी योजनेबद्दल माहिती दिल्याबद्दल आणि रोजगार निर्माण करणारे बनल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले. पंतप्रधानांनी त्यांच्या मुलीला खेळातले तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आशीर्वादही दिले.

कार्यक्रमाच्या ठिकाणी, सिरमौर हिमाचल प्रदेश येथील समा देवी उपस्थित होत्या, ज्या प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, आयुष्मान योजना, मुख्यमंत्री गृहिणी सुविधा योजनेच्या लाभार्थी आहेत. पंतप्रधानांनी शेतीतील तिची परिस्थिती आणि तिथल्या कामांबद्दल माहिती विचारली.

उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी या महत्त्वपूर्ण प्रसंगी हिमाचलमध्ये उपस्थित राहताना आनंद झाल्याची भावना व्यक्त केली. पंतप्रधान किसान योजनेच्या माध्यमातून 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत लाभ जाहीर करता आले याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेंतर्गत आर्थिक लाभ देशभरातील शेतकऱ्यांना शिमला येथून जारी करताना आनंद झाल्याचे ते म्हणाले. 130 कोटी नागरिकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले.

मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने  कोरोना महासाथीत ज्या मुलांनी आपले आईवडील गमावले आहेत, त्यांची जबाबदारी पीएम केअर्सच्या माध्यमातून घेण्याच्या उपक्रमाबद्दलही पंतप्रधानांनी काल समाधान व्यक्त केले. मोदी म्हणाले की  8  वर्षाचा कार्यकाल साजरा करण्याच्या प्रसंगी हिमाचल प्रदेशात असावे, ही सूचना मी त्वरित मान्य केली कारण हे राज्य माझी कर्मभूमी आहे. पंतप्रधान म्हणाले की मी नेहमीच स्वतःला पंतप्रधान नव्हे तर 130 कोटी नागरिकांच्या कुटुंबातील सदस्य समजतो. केवळ मी एखाद्या फाईलवर स्वाक्षरी करतो तेव्हाच मी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारतो. तो क्षण एकदा  संपला की मी पुन्हा पंतप्रधान रहातच नाही तर तुमच्या कुटुंबाचा सदस्य बनतो आणि 130 कोटी देशवासियांचा प्रधानसेवक होतो. मी जर देशासाठी काही करू शकत असेल तर ते केवळ 130 कोटी देशवासियांचा आशिर्वाद आणि शुभेच्छांमुळेच, असे म्हणाले. पुढे ते भावनावश होऊन म्हणाले की, माझ्या कुटुंबातील 130 कोटी नागरिकांच्या आशा आणि आकांक्षांशी जोडला जाणे, हे कुटुंबचे हेच ते काय माझ्याकडे आहे, तुम्ही लोकच माझ्यासाठी जीवनात सर्वकाही आहात आणि हे आयुष्य तुम्हालाच समर्पित आहे. पंतप्रधान म्हणाले की. सरकार 8 वर्षे पूर्ण करत असताना त्यांनी आपण प्रत्येकाच्या कल्याणासाठी, प्रत्येक भारतीयाच्या सन्मानालसाठी, प्रत्येक भारतीयाच्या सुरक्षेसाठी, आणि प्रत्येक भारतीयाच्या भरभराटीसाठी  शक्य तितके करण्याच्या निर्धाराचा त्यांनी पुनरूच्चार केला, ज्यामुळे त्यांना आनंदी आणि शांतता लाभेल.

2014 च्या अगोदरच्या सरकारचा  भ्रष्टाचार हा व्यवस्थेचा अत्यावश्यक भाग आहे, अशी समजूत होती आणि भ्रष्टाचाराविरोधात लढा देण्य़ाच्या ऐवजी सरकार त्याला शरण गेले, त्यानंतर देशाने पाहिले की योजनांचा पैसा गरजूंपर्यंत पोहचण्याआधी तो लुटला जात होता, यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. जनधन, आधार आणि मोबाईल (जेएएम) या त्रिसूत्रीमुळे पैसा लाभार्थींच्या खात्यांमध्ये थेट जमा होत आहे, अशीही पुस्ती त्यांनी जोडली. पूर्वी स्वयंपाकघरात धुराच्या त्रासाची सक्ती होती, आज उज्वला योजनेंतर्गत एलपीजी सिलिंडर्स मिळवण्याची सुविधा आहे. पूर्वी उघड्यावर शौचाला जाण्याचे लज्जास्पद कृत्य नशिबी होते. आता गरीबांना शौचालयांची प्रतिष्ठा लाभली आहे. पूर्वी आजारावरील उपचारांसाठी पैसा जमा करण्याची असहाय्यता होती, आज  प्रत्येक गरीबाला आयुषमान भारत योजनेचा आधार आहे.  पूर्वी तिहेरी तलाकची भीती होती, आज आपल्या हक्कासाठी लढण्याचे धैर्य आहे.

पंतप्रधानांनी नमूद केले की, कल्याणकारी योजना, सुशासन आणि गरीबांचे कल्याण (सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण) यांनी लोकांसाठी सरकारचा अर्थ बदलून टाकला आहे. आता सरकार लोकांसाठी काम करत आहे. मग ती पंतप्रधान गृहनिर्माण योजना असो, शिष्यवृत्ती असो की निवृत्तीवेतन योजना असो, भ्रष्टाचाराची संधी किमान मर्यादित झाली आहे. पूर्वी ज्या समस्या कायमस्वरूपी म्हणून गृहित धरल्या जात होत्या, त्यावर सरकार कायमस्वरूपी तोडगा देण्याचा प्रयत्न करत आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनेमुळे लाभार्थीच्या यादीतून 9 कोटी नावे वगळून चोरी आणि गळतीचा अन्याय संपुष्टात आणला आहे.

पंतप्रधान म्हणाले की, गरीबाला तो सक्षम झाल्यामुळे त्याचा दैनंदिन आयुष्यातील संघर्ष संपतो, तेव्हा तो आपली गरीबी दूर करण्यासाठी नव्या उर्जेसह कामाला लागतो. या विचारासह आमच्या सरकारने पहिल्या दिवसापासूनच गरीबाला सक्षम करण्यास सुरूवात केली. त्याच्या जीवनातील प्रत्येक लहान काळजीची गोष्ट आम्ही कमी करण्याचा प्रयत्न केला, असे सांगून ते पुढे म्हणाले की, आमच्या कोणत्या न कोणत्या योजनेमुळे देशातील बहुतेक सर्व कुटुबांना लाभ होत आहे.

सशस्त्र दलांमध्ये हिमाचलच्या प्रत्येक कुटुंबाचे योगदान नमूद करून पंतप्रधान म्हणाले की, वन रँक वन पेन्शन ही योजना चार दशकांच्या प्रतिक्षेनंतर आमच्या सरकारने राबवली आणि माजी सैनिकांना थकबाकी दिली. त्यामुळे हिमाचलमधील प्रत्येक कुटुंबाला लाभ झाला आहे. आमच्या देशात कित्येक दशकांपासून व्होट  बँक राजकारण चालत आले आहे आणि त्याने देशाचे मोठ्या प्रमाणावर नुकसानही केले आहे. आम्ही नवीन भारत उभारण्यासाठी काम करत आहोत, व्होटबँक नव्हे, असे ते म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की शंभर टक्के लाभ शंभर टक्के लाभार्थींकडे पोहचावेत, यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. लाभार्थींच्या परिपूर्णतेपर्यत पोहचण्याची आम्ही प्रतिज्ञा केली आहे. शंभर टक्के  सक्षमीकरण याचा अर्थ पक्षपात संपवणे, शिफारशींचा अडथळा दूर करणे आणि लांगूलचालन संपवणे हा आहे. शंभर टक्के सक्षमीकरण याचा अर्थ, प्रत्येक गरीबाला सरकारी योजनांचा पूर्ण लाभ मिळणे असाही आहे.

देशाच्या वाढत्या प्रतिष्ठेवर भाष्य करताना पंतप्रधान म्हणाले की, भारत सक्तीमुळे कुणापुढेही मैत्रीचा हात पुढे करत नाही तर मदतीचा हात देतो. कोरोना काळातही, आम्ही औषधे आणि 150 देशांना लसी पुरवल्या.

पुढील पिढ्यांच्या उज्वल भविष्यासाठी तसेच एकवीसाव्या शतकात उज्वल भारत  निर्माण करण्यासाठी काम करण्याच्या आवश्यकतेवर पंतप्रधानांनी जोर दिला.  असा भारत की ज्याची ओळख ही वंचितपणा नाही तर आधुनिकता आहे. आमच्या क्षमतेपुढे कोणतेही उद्दिष्ट अशक्य नाही. पंतप्रधान पुढे म्हणाले की भारत आज जगातील सर्वात जलद गतीने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. भारतात आज विक्रमी संख्येने परकीय चलन येत आहे आणि निर्यातीत भारत विक्रम प्रस्थापित करत आहे. देशाच्या प्रगतीत आम्ही पुढे येऊन आमची भूमिका बजावावी, असे त्यांनी शेवटी आवाहन केले.

बोरिवली खादी महोत्सव २०२२ मध्ये देशी फॅशनच्या नवीन डिझाईन्स

0

मुंबई : अथर्व स्कूल ऑफ फॅशन अँड आर्ट्स आणि मुंबई खादी ग्रामोद्योग असोसिएशन ट्रस्ट (कोरा केंद्र) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय ‘खादी महोत्सव २०२२’ची सांगता बोरिवलीच्या कोरकेंद्र मैदानावर रंगतदारपणे झाली. , यावेळी बोरिवलीचे आमदार सुनील राणे, वर्षा राणे आदी उपस्थित होते. बोरिवली खादी महोत्सवाच्या समारोपाचा सर्वात रोमांचक कार्यक्रम, तिसर्‍या दिवशी फॅशन शोमध्ये रॅम्पवर आधुनिक डिझाईन्स तसेच आसाम, मराठी, गुजराती आणि इतर लोकगीते यांसारख्या देशातील अनेक पारंपारिक नृत्य आणि संगीताचे प्रदर्शन पाहायला मिळाले. श्रोत्यांकडून लोकगीते. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी, अथर्व स्कूल ऑफ फॅशन अँड आर्ट्स तसेच हस्तमेलाप, पूनम राठी, भाविन व्होरा, अजय अरविंदभाई खत्री आणि उत्कर्ष जैन या आघाडीच्या डिझायनर्स आणि ब्रँड लेबल्सनी त्यांचे नवीनतम कलेक्शन सादर केले. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या शोमध्ये गुंजन सारडा, जान्हवी देधिया, गिन्नी जैन तसेच अथर्व स्कूल ऑफ फॅशन अँड आर्ट्सच्या डिझायनर विद्यार्थ्यांनी आकर्षक फॅशन शो सादर केला.

खादी महोत्सवात देशभरातील अनेक नामवंत कलाकारांनी स्टॉल्समध्ये खादीच्या कपड्यांसह इतर अनेक कलाकुसरीचे प्रदर्शन केले. देशातील अनेक राज्ये तसेच दूरवरच्या शहरांनी उत्कृष्ट कलाकृतींच्या प्रदर्शनात मोठ्या उत्साहाने भाग घेतला आहे. अथर्व फाउंडेशनचे अध्यक्ष आणि बोरिवलीचे आमदार सुनील राणे यांनी खादी महोत्सवाचे नियोजन केले आहे. खादी महोत्सवात भारताचा वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा दाखवण्यासाठी स्थानिक फॅशन पोशाखांवर 10 डिझायनर्सनी वैशिष्ट्यीकृत केले. या खादी महोत्सवाच्या डिझायनर्सनी विविध भारतीय संस्कृती आणि परंपरांचे अनोखे उत्सव आणि प्रदर्शन सादर केले. खादी हे स्वातंत्र्यपूर्व काळातील सामाजिक बदलाचे साधन आहे आणि आधुनिक काळात पुनरुज्जीवन आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. आणि आपल्या महान स्वातंत्र्यसैनिकांच्या माफक पेहरावामुळे, खादी फॅशनचे प्रतीक बनली आहे.

खादी महोत्सव 2022 च्या समारोपप्रसंगी सुनील राणे म्हणाले की, खादी महोत्सवात देशातील विविधतेचे, आधुनिक आणि पारंपरिक रंगसंगीत, नृत्य, कला, हस्तकला यासह फॅशनचे उत्तम सादरीकरण पाहायला मिळाले. देशातील विविध कलाकारांनी आपल्या कार्यक्रमाला अविस्मरणीय बनवले. आम्ही गल्फ फेस्टिव्हलमध्ये या इव्हेंटसह लोकल फॉर लोकलला प्रोत्साहन दिले आहे, देशाच्या सर्व भागांतील कलाकारांना, ब्रँड्स, स्टोलाला त्यांचे कलेक्शन कोणत्याही शुल्काशिवाय दाखवण्यासाठी दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती निमित्त अभिवादन

0

मुंबई, दि. ३१ : प्रजाहितदक्ष, कुशल प्रशासक, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी उपस्थित होते. या सर्वांनीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यकारभाराने प्रजाहितदक्षतेचा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी स्त्रीशिक्षण, हुंडाबंदी, पर्यावरण रक्षण असे सुधारणावादी तसेच ग्रामविकास आणि पायाभूत सुविधांच्या विकासाच्या योजना, प्रकल्प जाणीवपूर्वक राबविले. नदीचे घाट, वाटसरूंसाठीच्या धर्मशाळा, मंदिरांची उभारणी-त्यांचा जिर्णोद्धार अशा अनेक गोष्टी आजही त्यांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष देत उभ्या आहेत. कुशल राज्यकर्ती, रणधुरंधर, मुत्सद्दी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ”