Home Blog Page 1970

डीवाय पाटील पुरस्कृत 16व्या रमेश देसाई मेमोरियल 16 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एन हर्षिनी, ऐश्वर्या जाधव, अस्मि आडकर, प्रणव रेथीन आरएस यांचा उपांत्य फेरीत प्रवे

0

कोल्हापूर, 2 जून 2022 : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व कोल्हापूर जिल्हा टेनिस संघटना(केडीएलटीए) यांच्या वतीने आयोजित व डीवाय पाटील पुरस्कृत 16व्या रमेश देसाई मेमोरियल 16 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात कर्नाटकाच्या एन हर्षिनी, महाराष्ट्राच्या अस्मि आडकर, ऐश्वर्या जाधव यांनी तर, मुलांच्या गटात तामिळनाडूच्या प्रणव रेथीन आरएस, कर्नाटकाच्या तनुष घिडयाल या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 

कोल्हापूर येथील केडीएलटीए टेनिस कॉम्प्लेक्स या ठिकाणी सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या गटात कर्नाटकाच्या बिगरमानांकीत एन हर्षिनी हिने चौदाव्या मानांकित तामिळनाडूच्या हरिताश्री वेंकटेशचा टायब्रेकमध्ये 3-6, 7-6(0), 6-0 असा पराभव करून आगेकूच केली. पुण्याच्या दहाव्या मानांकित अस्मि  आडकरने अव्वल  मानांकित खेळाडूवर विजय मिळविणाऱ्या तामिळनाडूच्या माया राजेश्वरनचा 7-6(5), 6-4 असा तर, दुसऱ्या मानांकित कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवने आंध्रप्रदेशच्या सहाव्या मानांकित मनोज्ञ मदासूचा 6-2, 6-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. नवव्या मानांकित महाराष्ट्राच्या आकृती सोनकुसरेने श्री तन्वी दसरीचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. 

मुलांच्या गटात तामिळनाडूच्या आठव्या मानांकित प्रणव रेथिन आरएस याने ओडिशाच्या दुसऱ्या मानांकित देबासिस साहूचा 6-3, 6-1 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. अव्वल मानांकित कर्नाटकाच्या क्रिश त्यागीने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत तेलंगणाच्या वेंकट बटलांकीला 6-2, 6-2 असे पराभूत केले. 

निकाल: उपांत्यपुर्व फेरी: मुली
ऐश्वर्या जाधव(महा)(2)वि.वि.मनोज्ञ मदासू(आंध्रप्रदेश)(6) 6-2, 6-1;  

आकृती सोनकुसरे(महा)(9)वि.वि.श्री तन्वी दसरी 6-3, 6-2; 

अस्मि  आडकर(महा)(10)वि.वि. माया राजेश्वरन(तामिळनाडू)7-6(5), 6-4;  

एन हर्षिनी(कर्नाटक)वि.वि.हरिताश्री वेंकटेश (तामिळनाडू)(14)3-6, 7-6(0), 6-0;

मुले:
क्रिश त्यागी(कर्नाटक)(1)वि.वि.वेंकट बटलांकी(तेलंगणा)6-2, 6-2; 
 तनुष घिडयाल(कर्नाटक)(13)वि.वि. आराध्य क्षितिज(कर्नाटक)6-2, 4-6, 6-3;  

तेजस आहुजा(हरयाणा)(4)वि.वि.अर्जुन राठी(हरयाणा)(6) 6-3, 6-3; 
प्रणव रेथिन आरएस(तामिळनाडू)(8)वि.वि.देबासिस साहू(ओडिशा)(2) 6-3, 6-1; 

दुहेरी: मुले: उपांत्य फेरी: 
तेजस आहुजा/क्रिश त्यागी[1] वि.वि.अर्जुन पंडित/जैसन डेव्हिड[3]6-2, 6-1;  

प्रणव रेथीन आरएस/महालिंगम खांडवेल वि.वि.वेंकट बटलांकी/देबसिस साहो 6-4, 7-6(5);


मुली:  उपांत्यपूर्व फेरी: 
सेजल भुतडा/माया राजेश्वरन वि.वि.हर्षिनी विश्वनाध/मनोज्ञ मदासु  [1] 6-3, 3-6, 10-6; 

ऐश्वर्या जाधव/आकृती सोनकुसरे[3] वि.वि.अस्मि आडकर/अवनी चितळे  6-3, 6-2;

नैनिका बेन्द्रम/शगुन कुमारी[4]वि.वि.अपरा खांडरे/प्रिन्सी मांडागला 6-1, 6-2;सायली ठक्कर/श्रीनिधी बालाजी[2] वि.वि.आरुषी रावळ/इशिता मिधा 6-1, 6-2. 

कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा, शहरात पाणीपुरवठा व्यवस्थित करण्यावर विशेष लक्ष द्या – मुख्यमंत्री

0

कंत्राटदाराने हलगर्जीपणा दाखविल्यास कठोर कारवाई; मुख्यमंत्री संकल्प कक्षातून योजनेच्या कामाचा  घेणार आढावा

मुंबई, दि. २- मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा, कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे याकरिता सध्याच्या पाणी वितरणात आणखी जादा पाणी कसे उपलब्ध होईल यासाठी विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून नागरिकांना योग्य रीतीने पाणी मिळेल हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. पाणी योजनेच्या कामात कंत्राटदाराने हलगर्जीपणा दाखविल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. दरम्यान, औरंगाबाद शहराच्या १६८० कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण करण्यासाठी या योजनेचा मुख्यमंत्री संकल्प कक्षातून नियमितपणे आढावा घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज दिले.

औरंगाबाद शहर पाणीपुरवठा प्रकल्पाच्या कामाचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी आयोजित बैठकीत आढावा घेतला. बैठकीला उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती सोनिया सेठी,  पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा हे उपस्थित होते तर दूरदृश्य प्रणालीद्वारे औरंगाबादचे विभागीय आयुक्त डॉ. सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय आदी सहभागी झाले होते.

औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणे हे प्राधान्याचे काम असून शहर पाणीपुरवठा योजनेचे काम निधीअभावी  रेंगाळणार नाही, याची दक्षता शासनाने घेतली आहे.  शहराच्या पारोळ्यापर्यंत पाणी आणणे, ते साठविण्यासाठी टाक्या बांधणे ही कामे तातडीने करावी लागणार असून या योजनेचा काही भाग हा जायकवाडी प्रकल्पात असल्याने त्यासाठी केंद्रीय वन विभागाची परवानगी आवश्यक आहे, ही परवानगी मिळविण्यासाठी वन विभागाने तातडीने केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

शहरात पाणीपुरवठ्याची नवीन योजना पूर्ण होईपर्यंत कालावधी लागणार असून कोणत्याही परिस्थितीत  शहरात पाण्याअभावी परिस्थिती बिकट होणार नाही यासाठी गतीने कार्यवाही करून विभागीय आयुक्तांनी सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिले. शहर पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम कंत्राटदार संथ गतीने करीत असल्याच्या तक्रारी आहेत ही अतिशय गंभीर बाब असून त्यांनी कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखविल्यास विविध कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. वेळेत काम पूर्ण करुन घेण्यासाठी संबंधित कंत्राटदारांकडून हमीपत्र लिहून घेण्याबरोबरच कालबद्धरित्या काम पूर्ण होण्यासाठी वेळापत्रक तयार करा आणि मुख्यमंत्री संकल्प कक्षातून योजनेच्या कामाचा नियमित आढावा घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. सुनील केंद्रेकर, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी औरंगाबाद शहरातील पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाच्या वतीने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेशासाठी आवाहन

0

पुणे दि.२: धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या अनुषंगाने भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी पुणे जिल्ह्यातील समर्थ ज्ञानपीठ संस्था, सोमेश्वरनगर, ता. बारामती संचलित सह्याद्री पब्लिक स्कूल, बाघळवाडी, ता. बारामती या शाळेची निवड करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. इच्छुकांनी या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन समोर, आळंदी रोड, पुणे व शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.

अखेरीस ईडीचे समन्स .. सोनिया गांधी, व राहुल गांधीनाही…

नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँडरिंगप्रकरणी चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, त्यांचे पुत्र व काँग्रेस नेते राहुल गांधी या दोघांना चौकशीसाठी हजर राहण्याबद्दल समन्स बजावले आहे.

राहुल गांधी यांनी आज, गुरुवारी (दि.२ जून) व सोनिया गांधी यांनी ८ जूनला ईडीच्या मध्य दिल्लीतील मुख्यालयात हजर राहावे असे या समन्समध्ये म्हटले आहे.

देशाची दिशाभूल करण्यासाठी केंद्र सरकारने रचलेले हे कारस्थान आहे, अशी टीका काँग्रेसने समन्स प्रकरणावर केली आहे. काँग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य देतील. विदेश दौऱ्यावर असल्याने आपल्याला ५ जूननंतर चौकशीला बोलाविण्यात यावे असे पत्र राहुल गांधी यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना लिहिले आहे.

खरगे, बन्सल यांची आधीच चौकशी

नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राचे मालक असलेल्या यंग इंडियन या संस्थेवर गैरव्यवहारांचे आरोप झाले आहेत. तेथील मनी लाँडरिंगप्रकरणी ईडीला सोनिया व राहुल गांधी यांचे जबाब नोंदवून घ्यायचे आहेत. नॅशनल हेरॉल्ड हे वृत्तपत्र असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडकडून प्रसिद्ध केले जाते. या वृत्तपत्रातील गैरव्यवहारप्रकरणी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, पवन बन्सल यांची ईडीने नुकतीच चौकशी केली होती.

लोकशाहीवरील हल्ला : सुरजेवाला
काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, ईडीने सोनिया गांधी व राहुल गांधी यांना पाठविलेले समन्स हे केंद्र सरकारच्या डावपेचांचा भाग आहे. या संकटावर काँग्रेस पक्ष आपल्या कार्यकर्त्यांच्या भक्कम पाठबळाच्या आधारे निश्चित मात करेल. लोकशाहीवरील हा हल्ला आम्ही परतवून लावू.

सोनिया गांधी, राहुल गांधी यंग इंडियनचे प्रवर्तक

भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१३ मध्ये केलेल्या तक्रारीनंतर नॅशनल हेरॉल्डमधील आर्थिक व्यवहारांबाबत प्राप्तिकर खात्याने चौकशी केली. त्याची न्यायालयाने दखल घेतली होती. त्यानंतर ईडीने मनी लाँडरिंगविरोधी कायद्यानुसार नव्याने या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी हे यंग इंडियनचे प्रवर्तक व समभागधारक आहेत.

‘गैरकृत्य केले नसेल तर चिंता कशाला’

केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी म्हणाले की, नॅशनल हेरॉल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने चौकशीसाठी समन्स पाठविल्याने सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी चिंता करण्याचे कारण नाही. जर त्या दोघांनी काहीही चुकीचे कृत्य केले नसेल तर त्यांनी चिंता करू नये. काँग्रेस नेत्यांनी यावर संतप्त केला होता. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर किशन रेड्डी यांनी ही प्रतिक्रिया दिली.

नॅशनल हेरॉल्डसारख्या खोट्या प्रकरणांत गुन्हे दाखल करून मोदी सरकारच्या हाती काहीही लागणार नाही. या सरकारचे कारस्थान कदापिही यशस्वी होणार नाही.
– अभिषेक मनू सिंघवी

मायग्रेन टाळता येऊ शकतो..

0

मायग्रेन (Migraine) ही एक सामान्य आरोग्य समस्या आहे जी जगातील प्रत्येक सातव्या व्यक्तीस प्रभावित करते. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये मायग्रेन तीन पटीने अधिक सामान्य आहे.

जेव्हा एखाद्या व्यक्तीला मायग्रेन असतो तेव्हा एखाद्या व्यक्तीला डोक्याच्या एका बाजूला तीक्ष्ण किंवा मध्यम डोकेदुखीचा अनुभव येतो. ही डोकेदुखी (Headaches) 4-72 तास टिकते. या दरम्यान व्यक्तीला मळमळ, उलट्या, चक्कर येणे, प्रकाश सहन न होणे आणि मोठा आवाज यासारख्या समस्या उद्भवतात.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ‘मायग्रेन हा न्यूरोलॉजिकल (Neurological) आजार आहे. ज्या लोकांना मायग्रेनची समस्या आहे, त्यांना महिन्यातून अनेक वेळा मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. मायग्रेनची काही जुनी प्रकरणे देखील आहेत ज्यात व्यक्तीला महिन्याच्या 15 दिवसांपेक्षा जास्त काळ डोकेदुखी असू शकते.

मायग्रेन कशामुळे होऊ शकते? –

चीज, अल्कोहोल (Alcohol), चॉकलेट, नट, प्रक्रिया केलेले पदार्थ, विशिष्ट गंध, तेजस्वी प्रकाश, झोपेचा त्रास, मासिक पाळी, रजोनिवृत्ती, प्रवास, हवामानातील बदल आणि तणाव या सर्वांमुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.

मायग्रेनचे चार टप्पे –

मायग्रेनचे चार टप्पे असतात. प्रोड्रोम फेज (Prodrome phase) नावाचा पहिला टप्पा डोकेदुखी सुरू होण्याच्या काही तास आधी सुरू होतो. या दरम्यान व्यक्ती चिडचिड आणि उदास होईल. त्याला पुन्हा पुन्हा जांभई येईल आणि त्याची खाण्यापिण्याची इच्छा वाढेल.

दुसरा टप्पा ऑरा फेज आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला त्याच्या डोळ्यांसमोर प्रकाशाच्या तिरक्या रेषा दिसतात. याला डोळे आंधळे करणे म्हणतात. या दरम्यान, व्यक्तीला असे वाटते की त्याचे शरीर सुन्न झाले आहे आणि त्यात मुंग्या आल्या आहेत.

तिसरा टप्पा म्हणजे डोकेदुखीचा टप्पा जो 4-72 तास टिकतो आणि चौथा टप्पा म्हणजे मायग्रेन हँगआउट टप्पा (Migraine hangout stage) ज्यामध्ये व्यक्ती सामान्यतः अस्वस्थ, चिडचिड आणि गोंधळलेली असते.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ‘महिलांना मासिक पाळी दरम्यान मायग्रेन होऊ शकतो कारण या काळात इस्ट्रोजेन हार्मोन कमी होते. दोन तृतीयांश प्रकरणांमध्ये, रजोनिवृत्तीनंतर मायग्रेन कमी होतो. पण काही रुग्णांमध्ये रजोनिवृत्तीनंतरही ते सुरू होऊ शकते.’

मुलांनाही मायग्रेन होतो –

लहान मुलांमध्येही मायग्रेनची समस्या उद्भवू शकते. मुलांमध्ये मायग्रेन डोकेदुखीसह नसतात, परंतु त्यांना उलट्या होतात किंवा पोटशूळ होतो. अगदी लहान मुलांमध्ये, पोटशूळ हे मायग्रेनचे पहिले लक्षण असू शकते. जर पालकांपैकी एखाद्याला मायग्रेनचा त्रास होत असेल तर त्यांच्या मुलास हा त्रास होण्याची शक्यता 50 टक्क्यांपर्यंत वाढते. दुसरीकडे, आई-वडील दोघांनाही मायग्रेनची समस्या असल्यास, मुलामध्ये मायग्रेनचा धोका 75 टक्क्यांनी वाढतो.

बचाव कसा करायचा? –

डॉक्टर म्हणतात की मायग्रेन ही धोकादायक समस्या नाही, पण काही उपायांनी याला प्रतिबंध करता येतो. यामध्ये धूम्रपान सोडणे, अल्कोहोलपासून दूर राहणे, जास्त प्रमाणात कॅफिन कमी करणे आणि मायग्रेनने पीडित महिलांनी गर्भनिरोधक गोळ्या टाळणे यांचा समावेश होतो.

औषधांशिवायही मायग्रेन थांबवता येतो, असे त्यांचे म्हणणे आहे. यामध्ये दीर्घ श्वास घेणे आणि योगासने करणे समाविष्ट आहे. शरीराला पुरेशी विश्रांती देऊनही मायग्रेन टाळता येऊ शकतो.

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भगीरथ कार्यातील मी एक छोटा सीपाही….हार्दिक पटेलच्या ट्वीट ने चर्चाच चर्चा

हार्दिक पटेल आज भाजपमध्ये प्रवेश करत आहे. आज सकाळी सकाळी प्रवेशाच्या कार्यक्रमापूर्वी हार्दिक पटेल याने केलेले ट्वीट मोठे चर्चेचा विषय ठरणारे आहे.

पाटीदार समाजाच्या आंदोलनाच्या माध्यमातून हार्दिक पटेल हे नाव पुढे आले.पाटीदार समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व हार्दिक पटेल यांनी केले. त्यांच्या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हार्दिक पटेल यांनी आक्रमक होत भाजपा सरकारशी संघर्ष केला. शिक्षाही भोगली. त्यानंतर हार्दिक यांनी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. आणि आता त्यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपात प्रवेश करत आहेत. हार्दिक यांच्या भाजपा प्रवेशानंतरच्या घडणाऱ्या कृतींवर त्यांचे पाटीदार आंदोलनातील सर्व सहकारी लक्ष ठेवून असणार आहेत. हार्दिक पटेल त्यांच्या आंदोलनातील काही प्रमुख मागण्या आता भाजपा सरकारकडून कशा पूर्ण करून घेतात याकडे यावर त्यांच्या सहकाऱ्यांची पुढची भूमिका अवलंबून असणार आहे.

पाटीदार अनामत आंदोलन समिती ( पीएएएस) च्या  नेतृत्वाखाली २०१५ साली झालेल्या आंदोलनानंतर अखेसरीस सरकारने आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या वर्गासाठी १० टक्के आरक्षणाची घोषणा केली. पण, भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारने पाटीदार आंदोलकांवर देशद्रोहाच्या आरोपासह अनेक फौजदारी गुन्हे दाखल केले. या आंदोलना दरम्यान १४ आंदोलकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी हे आंदोलन शांत करण्यासाठी सरकारने प्रतिसाद देत आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार काही लोकांवरील गुन्हे मागे घेतले तर काही लोकांवर अजूनही गुन्हे दाखल आहेत. ते गुन्हे मागे घेण्यासह आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या घरातील प्रत्येकी एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याची मागणी अजून कायम आहे. 

स्पर्धेच्या युगात वृत्तपत्रांचे स्थान आजही अबाधित – माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु.आदिती तटकरे

0

मुंबई, दि. 1 : स्पर्धेच्या युगात वृत्तपत्रांचे स्थान आजही अबाधित असल्याचे मत माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी व्यक्त केले. पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून इंडिया ग्राऊंड रिपोर्ट (आयजीआर) प्रकाशनाच्या माध्यमातून दै. दो बजे दोपहर या वृत्तपत्राचे पुन:प्रकाशन आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस अभिवादन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार महादेव जानकर, माजी आमदार भाई जगताप, माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह, दै. दो बजे दोपहर चे संपादक अरुण लाल, सह संपादक राजा अदाते उपस्थित होते.

राज्यमंत्री मंडळातील तरुण महिला सदस्य तसेच पालकमंत्री म्हणून केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले व उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते पुरस्कार व सन्मानपत्र देऊन राज्यमंत्री कु. तटकरे यांना सन्मानित करण्यात आले.

राज्यमंत्री कु. तटकरे म्हणाल्या, राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना नियमित वृत्तपत्र वाचनाची चांगली सवय जडली. पत्रकारितेच्या कार्यकक्षा बदलत असताना प्रिंट मिडीया प्रमाणेच सोशल मीडिया, ई-न्यूज या माध्यमातून राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक घडमोडींची माहिती दिवसभरात स्मार्टफोनच्या माध्यमातून पहायला मिळते. तरीही माझ्यासारख्या अनेकांना सकाळच्या चहासोबत वृत्तपत्र हाती असावे, असे नेहमी वाटते. वृत्तपत्रासाठी चिकाटीने कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे हे सर्व उपलब्ध होते. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना आपल्या माध्यमातून होणाऱ्या जबाबदारीपूर्ण लिखाणातून आम्ही बऱ्याच नवीन गोष्टी शिकत असतो, असेही दै. दो बजे दोपहर या वृत्तपत्रास शुभेच्छा देताना राज्यमंत्री कु. तटकरे म्हणाल्या.

राजकारणाचा वारसा लाभला असला तरी विधिमंडळाची पहिली पायरी चढताना एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या पद, कर्तव्य व जबाबदारीची भावना अधिक प्रकर्षाने जाणवते. क्षेत्र कोणतेही असो आपल्या कर्तव्याची जबाबदारी, चिकाटी व यासारख्या सन्मानपूर्ण प्रोत्साहान सोहळ्यातून मिळणारी ऊर्जा मोठी भरारी घेण्यासाठी उपयुक्त ठरते. पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त राजकीय क्षेत्रातील कार्यासाठी हा पुरस्कार मिळणे माझ्यासाठी भाग्याचा क्षण असल्याची भावना मंत्री कु. तटकरे यांनी बोलून दाखवली.

भूदान व ग्रामदान जमिनींसाठी अभ्यास समिती नियुक्त

0

मुंबई, दि.1 : राज्यातील भूदान व ग्रामदान अधिनियमाअंतर्गत जमिनीच्या संदर्भात शासनाची भूमिका ठरविण्याकरिता सर्वंकष अभ्यास करुन शासनास योग्य शिफारस करण्यासाठी महसूलचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती गठित करण्यात आली आहे.

महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव या समितीचे अध्यक्ष असतील. वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यांनी नामनिर्देशित केलेले प्रधान सचिव किंवा सचिव स्तरावरील अधिकारी या समितीत सदस्य असतील. याशिवाय विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, पुण्याचे विभागीय आयुक्त, नाशिकचे विभागीय आयुक्त, नागपूरचे विभागीय आयुक्त या समितीत सदस्य असतील. महसूल व वन विभागाचे उपसचिव या समितीचे सदस्य सचिव असतील.

राज्यातील विविध भागातील भूदान व ग्रामदान अधिनियमाअंतर्गत जमिनीच्या वापराच्या सद्यस्थितीचा अभ्यास करुन अशा जमिनीचे झालेले बेकायदेशीर हस्तांतरण व वापरात बदल यावर उपाययोजना सुचविणे, नागरीकरणाच्या प्रभाव क्षेत्रातील भूदान व ग्रामदान जमिनींच्या वापर व विनियोगाच्या संनियंत्रण आणि व्यवस्थापनाविषयी शिफारशी करणे ही या समितीची कार्यकक्षा राहणार आहे.

महसूल विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास समितीस अहवाल सादर करण्याकरिता मदत करण्यासाठी अमरावती विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय उपसमिती गठित करण्यात आली आहे. राज्यातील विविध भागातील भूदान व ग्रामदान अधिनियमाअंतर्गत जमिनींच्या वापराची सद्यस्थितीचा अभ्यास करुन अशा जमिनींचे झालेले बेकायदेशीर हस्तांतरण व वापरात बदल यावर उपाययोजना सुचविणे, नागरीकरणाच्या प्रभाव क्षेत्रातील भूदान व ग्रामदान जमिनींचा वापर व विनियोगाच्या संनियंत्रण आणि व्यवस्थापनाविषयी शिफारशी करणे हे या समितीचे काम असणार आहे.

अहमदनगर-पुणे मार्गावर धावली राज्य पर‍िवहन महामंडळाची राज्यातील पह‍िली ‘ई-बस’

अहमदनगर, १ जून – राज्य पर‍िवहन महामंडळाची पह‍िली बस १ जून १९४८ रोजी पुणे-अहमदनगर मार्गावर धावली होती. त्या इत‍िहासाची १ जून २०२२ रोजी अहमदनगर-पुणे दरम्यान पुनरावृत्ती झाली. अहमदनगर-पुणे दरम्यान ‘श‍िवाई’ या राज्यातील पह‍िल्या व‍िद्युत घटावरील (ई-बस) सेवेची सुरूवात महाराष्ट्र राज्य पर‍िवहन महामंडळाचे पहिले वाहक अहमदनगर येथील लक्ष्मणराव शंकरराव केवटे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली.

एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवेला ७४ वर्ष पूर्ण झाली आहेत. अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण झाले आहे. एसटीची पहिली बस माळीवाडा येथून पुण्याच्या द‍िशेने धावली होती. श‍िवाई ही ‘ई-बस’ ही याच मार्गावरून धावणार आहे. आज तारकपूर आगारातून या ‘ई-बस’ सेवेला सुरूवात करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले ,महापौर रोहिणी शेंडगे, आयुक्त शंकर गोरे ,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार ,निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित ,विभाग नियंत्रक विजय गीते , शिवाई ई -बसचे वाहक जयदेव हेंद्रे व चालक गणेश साबळे आदी उपस्थ‍ित होते.

श‍िवाई ‘ई-बस’ अहमदनगर येथून पहिल्या द‍िवशी सकाळी साडेनऊ वाजता व त्यानंतर रोज सकाळी सात वाजता पुण्याच्या द‍िशेने जाणार आहे. एसटी महामंडळाने एक मोठे पाऊल उचलले आहे. टप्प्याटप्प्याने श‍िवाई ई-बस वाढव‍िण्याचे न‍ियोजन आहे. या उपक्रमामुळे इंधन बचतीबरोबरच प्रदूषण ही कमी होणार आहे.

विद्युत प्रणालीवर चालणाऱ्या शिवाई बसची वैशिष्ट्ये
शिवाई बस विद्युत घटावर चालणारी आहे. त्यामुळे बस प्रदूषण विरहित, पर्यावरण पूरक, वातानुकुलीत व आवाज विरहित आहे. बसला आकर्षक रंगसंगतीमध्ये ‘शिवाई’असे नाव देण्यात आले आहे. बस एकदा चार्ज केल्यानंतर जास्तीत जास्त २५० कि.मी. पर्यंत जाऊ शकते. प्रत्येक प्रवाशांसाठी स्वतंत्र व स्वनियंत्रित वातानुकुलीत लुव्हर बसविण्यात आले आहे व त्या सोबत वाचण्यासाठी स्वतंत्र दिवा देण्यात आला आहे. ही बस १२ मीटर लांबीच्या सांगाड्यावर बांधण्यात आली असून तिची रुंदी २.६ मीटर व उंची ३.६ मीटर आहे. सांगाड्याच्या खालच्या बाजूस बसच्या मधोमध प्रशस्त असा सामान कक्ष देण्यात आला आहे.

शिवाई बसमध्ये ४३ प्रवाशांसाठी बैठक व्यवस्था असून प्रवासी सीट हे ‘पुश बॅक‘ प्रकारचे देण्यात आले आहे. प्रत्येक दोन सीटच्यामध्ये दोन्ही प्रवाशांचे मोबाईल चार्जिंगसाठी स्वतंत्र युएसबी पोर्ट देण्यात आले आहे. चालक केबिन मध्ये प्रवाशी घोषणा यंत्रणा बसविली आहे. तसेच आपात्कालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांना सावध करण्यासाठी यंत्रणा असून त्याचे बटन चालक कक्षात देण्यात आले आहे. प्रवासी कक्षातील हालचालीवर देखरेखीसाठी कॅमेरा प्रवाशी कक्षात बसविण्यात आले आहे. प्रवाशांच्या मनोरंजनासाठी अँड्रॉईड टीव्ही बसविण्यात आला आहे

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्याचे – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे निर्देश

0

मुंबई, दि. 1 : सध्या घडत असलेले सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, सोशल मीडिया आणि ऑनलाइनच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच पोलिसांचं कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज दिले.

राज्यातील वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आणि महाराष्ट्र राज्य सायबर सुरक्षा विभागाचा आढावा गृहमंत्री श्री.पाटील यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला. या बैठकीस अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश शेठ, प्रधान सचिव सुरक्षा संजय सक्सेना, अपर पोलीस महासंचालक सायबर व आर्थिक गुन्हे मधुकर पांडे, अपर पोलीस महासंचालक नियोजन व समन्वय संजय वर्मा,विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव, सह पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांसह गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सायबर गुन्ह्यांना अटकाव करण्यासाठी राज्यात सायबर पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून प्रभावीपणे सायबर कायद्याची अंमलबजावणी करण्याबरोबरच दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी विभागाच्या सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात यावा. सायबर गुन्ह्यांची उकल लवकरात लवकर करता यावी, आरोपीविरोधातील भक्कम पुरावे गोळा करता यावेत तसेच भविष्यात या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजता यावेत यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्याच्या सूचनाही गृहमंत्री श्री. वळसे-पाटील यांनी यावेळी दिल्या.सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी राज्यातील पोलिस दलाला व्यापक यंत्र सामग्री देण्यात आलेली आहे. या उपलब्ध साधनसामुग्रीचा परिपूर्ण वापर करावा. तसेच या विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

धार्मिक भावना भडकावणारे, सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे प्रकार घडल्यास त्यांना तत्काळ अटकाव करावा लागतो यासाठी सायबर स्पेसवरुन संबंधित मजकूर हटविणे आवश्यक असते. त्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार करण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच गुन्हेगाराला कठोर शासन करण्यासाठी विद्यमान कायद्यातील ज्या कलमांमध्ये दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यांचा परिपूर्ण अभ्यास करून त्यादृष्टीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही गृहमंत्री यांनी यावेळी दिले. सायबर गुन्ह्यांबाबत तक्रार नोंदविण्यासाठी असलेल्या हेल्पलाईन क्रमांकाची प्रभावी प्रसिद्धी करण्यात यावी. तसेच या आव्हानाला तोंड देण्यासाठी शासनामार्फत सुरु असलेल्या उपाययोजना, अत्याधुनिक तंत्रप्रणाली आणि व्यवस्थेसंदर्भात जनतेमध्ये जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.या बैठकीत सायबर विभाग सक्षमीकरण, सद्यस्थितीत सुरु असलेलं प्रकल्प आणि अन्य अनुषंगिक बाबींवर सविस्तर चर्चा झाली.

स्वस्त धान्य दुकादारांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

0

मुंबई, दि. 1 : स्वस्त धान्य दुकादारांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत या दुकानांवर स्वस्त धान्याव्यतिरिक्त काही वस्तू विकण्यास परवानगी देण्यात आली असून त्यात स्टेशनरीचा समावेश आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

मंत्रालयात अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ यांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे  केंद्रीय अध्यक्ष पुष्पराज देशमुख, राज्य संघटना अध्यक्ष, डी.एन पाटील, उपाध्यक्ष राजेश अंबुसकर, चंद्रकांत यादव, विजय पंडित, प्रभाकर पाडले यांच्यासह महाराष्ट्रभरातून आलेले स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.

स्वस्त धान्य दुकानदारांच्या अनेक समस्या आहेत. त्यातल्या काही मागण्या केंद्र सरकारशी निगडित आहेत. शासन त्याबाबत देखील पत्रव्यवहार करत आहोत. स्वस्त धान्य दुकानदारांना धान्याव्यतिरिक्त अन्य पदार्थ विकायला शासनाने परवानगी दिली आहे. त्यात स्टेशनरी, शाम्पू, साबण, डिटर्जंट, हॅण्डवॉश, चहापत्ती, कॉफी या वस्तूंचा समावेश आहे. येणाऱ्या काळात आणखी काही गोष्टींचा समावेश यात करण्यात येणार असल्याची माहिती देखील मंत्री श्री.भुजबळ यांनी यावेळी दिली.

स्वस्त धान्य दुकानदारांच्या धान्य पुरवठा आणि अन्य काही मागण्यांबाबत आगामी काळात बैठक आयोजित करून ते प्रश्न देखील तातडीने सोडवू, असेही मंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

व्यावसायिक, संगीत व प्रायोगिक नाट्य परीक्षण समितीची पुनर्रचना

0

मुंबई, दि. 1 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत नाट्य निर्मिती संस्थांना नवीन नाट्य निर्मितीसाठी अनुदान योजनेअंतर्गत व्यावसायिक, संगीत व प्रायोगिक नाट्य परीक्षण समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे.

या समितीमध्ये अहमदनगरचे शाम शिंदे, पुण्याचे गिरीश परदेशी, मुंबईचे प्रभाकर सावंत आणि नागपूरचे राजेश चिटणीस अशा 4 सदस्यांचा अशासकीय सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

जीएसटी महसूल संकलन; वार्षिक 44% वाढ

0


नवी दिल्ली, 1 जून 2022

मे 2022 मध्ये एकूण जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवाकर महसूल संकलन 1,40,885 कोटी रुपये इतके झाले आहे. यात सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी 25,036 कोटी रुपये, एसजीएसटी अर्थात राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोटी 32,001 कोटी रुपये, आयजीएसटी म्हणजेच एकात्मिक वस्तू आणि सेवा करापोटी 73,345 कोटी  रुपये (माल आयातीवर संकलित केलेल्या 37469  कोटींसह) आणि उपकर 10,502 कोटी रुपये ( मालाच्या आयातीवर संकलित  केलेल्या 931 कोटी रुपये सह ) यांचा समावेश आहे.

सरकारने समझोत्याच्या स्वरूपात आयजीएसटीमधून सीजीएसटीला  27,924 कोटी रुपये  आणि  एसजीएसटीला  23,123 कोटी रुपये चुकते केले आहेत.

नियमित समझोत्यानंतर मे 2022 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटीसाठी 52,960 कोटी रुपये आणि एसजीएसटी साठी 55,124 कोटी रुपये आहे.याव्यतिरिक्त, केंद्र सरकारने 31.05.2022 रोजी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 86,912 कोटी रुपये जीएसटी भरपाई देखील जारी केली आहे.

मे 2022 चा जीएसटी  महसूल हा  मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा 44% जास्त आहे.या महिन्यात, मालाच्या आयातीतून मिळणारा महसूल 43% अधिक नोंदवण्यात आला. आणि देशांतर्गत व्यवहारातून मिळणारा महसूल (सेवांच्या आयातीसह) हा गेल्या वर्षी  याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा 44% अधिक आहे.

जीएसटी लागू  झाल्यापासून मासिक जीएसटी संकलनाने चौथ्यांदा तर  मार्च 2022 पासून सलग तिसऱ्या महिन्यात 1.40 लाख कोटी रुपयांचा  टप्पा ओलांडला  आहे . मे महिन्यातील संकलन, जे एप्रिलच्या पहिल्या महिन्याच्या परताव्याशी संबंधित आहे , ते एप्रिलमध्ये  नेहमीच कमी असते.  मात्र तरीही  मे 2022 मध्ये, जीएसटी  महसूलाने 1.40 लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. एप्रिल 2022 मध्ये  एकूण ई-वे बिलांची संख्या 7.4 कोटी होती, जी मार्च 2022 मधील  7.7 कोटी ई-वे बिलांपेक्षा 4% कमी आहे.

एप्रिल 2021 च्या तुलनेत एप्रिल 2022 मध्ये प्रत्येक राज्यात संकलित झालेल्या  जीएसटी महसुलाची  राज्यनिहाय  आकडेवारी खालील तक्त्यांमध्ये दिली आहे.

खालील तक्त्यामध्ये चालू वर्षातील मासिक एकूण जीएसटी महसुलातील कल दाखवला आहे. मे 2021 च्या तुलनेत मे 2022 मध्ये प्रत्येक राज्यात संकलित जीएसटीची राज्यनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे :

State-wise growth of GST Revenues during May 2022[1]

StateMay-21May-22Growth
Jammu and Kashmir23237260%
Himachal Pradesh54074137%
Punjab1,2661,83345%
Chandigarh13016729%
Uttarakhand8931,30946%
Haryana4,6636,66343%
Delhi2,7714,11348%
Rajasthan2,4643,78954%
Uttar Pradesh4,7106,67042%
Bihar8491,17839%
Sikkim25027912%
Arunachal Pradesh3682124%
Nagaland294967%
Manipur2247120%
Mizoram152570%
Tripura396567%
Meghalaya12417440%
Assam7701,06238%
West Bengal3,5904,89636%
Jharkhand2,0132,46823%
Odisha3,1973,95624%
Chattisgarh2,0262,62730%
Madhya Pradesh1,9282,74642%
Gujarat6,3829,32146%
Daman and Diu00153%
Dadra and Nagar Haveli22830031%
Maharashtra13,56520,31350%
Karnataka5,7549,23260%
Goa229461101%
Lakshadweep01148%
Kerala1,1472,06480%
Tamil Nadu5,5927,91041%
Puducherry12318147%
Andaman and Nicobar Islands4824-50%
Telangana2,9843,98233%
Andhra Pradesh2,0743,04747%
Ladakh512134%
Other Territory12118552%
Center Jurisdiction1411400%
Grand Total70,9511,02,48544%

रखडलेली विविध अपूर्ण कामे दोन दिवसात पूर्ण करा…विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या अधिका-यांना सूचना

0

मुंबई-विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज मुंबई महानगर पालिकेतील अधिकारी यांच्यासमवेत पश्चिम उपनगरातील मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील दहिसर, बोरिवली व कांदिवली येथील महापालिकेच्या विविध वॉर्डमधील सुरु असलेल्या पावसाळ्यापूर्वीच्या कामांची, नाल्यांची साफसफाई, नाल्यांचे खोलीकरण तसेच डिपी रोड , सर्व्हीस रोड, भुमिगत वाहनतळ ,श्री कृष्ण नदिवरील पुलाची पाहणी केली व त्या कामांचा आढावा घेतला. यावेळी येथील उपस्थित नागरिकांनी पालिकेच्या रखडलेल्या रस्ते व नाल्याच्या कामाबद्दल विरोधी पक्ष नेत्यांकडे आपली गा-हाणी मांडली त्यानंतर या परिसरातील विविध ठिकाणची रखडलेली रसत्यांची, नाल्यांची आदी कामे दोन दिवसात तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना उपस्थित महापालिका अधिका-यांना विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी सूचना दिल्या. यावेळी या पाहणी दौ-यात मुंबई महापालिकेचे उपायुक्त भाग्यश्री कापसे सहाय्यक पालिका आयुक्त आंडे, जावेद, नांदेडकर यांच्यासह एमएमआरडीए, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, प्रकाश दरेकर, सचिन शिरवाडकर, निशा परुळेकर, मंडळ अध्यक्ष दिलीप उपाध्याय,माजी नगरसेविका प्रितम पंडागळे, विक्रांत चौगुले,अमित उतेकर, रश्मी भोसले, आदी उपस्थित होते.

धनगर समाजाला प्राधान्याने आरक्षण द्या

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची मागणी

मुंबई – समाजातील वंचित, उपेक्षित,श्रमिक, कष्टकरी यांना महाविकास आघाडी सरकारने न्याय दिला तर हा घटक आक्रोश करणार नाही. त्यामुळे दुर्बल व वंचित धनगर समाजाला प्राधान्याने आरक्षण द्यावे, ही आमची मागणी आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले.
सार्वजनिक जयंती समारोह समितीतर्फे राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती के.सी.कॉलेज सभागृह, चर्चगेट, मुंबई येथे साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, अहिल्यादेवींच्या कर्तृत्वाचा पाढा वाचायला गेला तर तास न तास कमी पडतील. अहिल्यादेवी यांचे कर्तृत्व सर्वव्यापी, सर्वस्पर्शी होते. त्यांच्याकडे पाहत असताना एक कुशल प्रशासक म्हणून पाहिले जाते. ज्या काळात अत्याधुनिक साधनसामग्री, आधुनिक नेटवर्क उपलब्ध नसताना वेगवेगळ्या विषयांचे नियोजन कसे करावे, राज्यकारभार कसा चालवावा याचा त्या आदर्श मानल्या जातात. म्हणून एवढ्या वर्षानंतर त्यांच्या प्रशासकीय कारभाराचे आपण कौतुक व गौरव करत आहे.
अहिल्यादेवी या पराक्रमी, लढवय्या होत्या. त्यांचे पराक्रम नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. त्याही वेळेला त्यांचा दृष्टिकोन पाण्याच्या संदर्भात दूरदृष्टीचा होता. म्हणून पाण्यासाठी विहिरी काढणे, साठवणूक करणे, साठवण तलाव करणे, यावर त्या आग्रही असायच्या. विधवांच्या विषयांमध्ये विधवा महिलांना त्यांच्या पतीच्या संपत्तीमध्ये पहिला वाटा मिळाला पाहिजे हे सांगणाऱ्या अहिल्यादेवी होळकर होत्या. मुलांना दत्तक घेण्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. अन्नछत्र तयार करणे, धर्मशाळा बांधणे अशा वेगवेगळ्या घटकांना ज्याची गरज असेल त्याची त्यांनी उभारणी केली. त्यांचे धर्माच्या बाबतीत कामही सर्वश्रुत आहे. आजही आम्ही मंदिराच्या विषयावरून वादविवाद करतोय. आजही लोकांना मंदिर व धर्माच्याबाबतीत लढावे लागतेय, हे दुर्दैव आहे. म्हणून त्यांच्या स्मृती आज प्रेरणादायी आहेत. त्याही वेळेला धर्माचे गुणगान, धर्माचे रक्षण यासाठी अहिल्यादेवी होळकर आघाडीवर होत्या. मंदिराचा जीर्णोद्धार करणे, मंदिरांची प्रतिष्ठापना करणे, देवी देवतांची स्थापना करणे यासाठी अहिल्यादेवी होळकर यांनी पुढाकार घेतला होता.
आपले हक्क आम्हाला मिळाले पाहिजेत आणि म्हणून सर्वात प्रथम आपण सर्व समाज बांधवांनी संघटित होण्याची गरज आहे. आमच्या मागण्या या किरकोळ व छोट्या आहेत. आम्हाला आरक्षण द्यावे, ही आमची मागणी आहे असे सांगताना दरेकर म्हणाले की, आम्ही आमच्या आरक्षणासाठी पाठपुरावा करू. आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी कुठल्याही पक्षाचे दुमत नाही. परंतु त्याला गती देऊन ते लवकरात लवकर मिळण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आम्ही सर्व जण प्रयत्न करू.
धनगर समाजाला आर्थिक पाठबळ देताना सरकारच्या वित्त विभागाने हात आखडता घेता कामा नये.२८ एप्रिलला वेगवेगळ्या महामंडळाना आपण निधी दिला मग अहिल्यादेवी महामंडळाला एक कवडी देता आली नाही. उन्हं, वारा, पावसात आमचा धनगर समाज काम करतो त्याला ४००-५०० कोटी रुपये का देऊ शकत नाही? बिल्डरच्या सबसिडीसाठी हजारो कोटी रुपये देतो त्यातला एक चतुर्थांश रूपये दिले तरी पुरेसे आहे. दारूसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती देण्यात येतात, त्या कशासाठी देतो, त्या बंद करा, त्यापेक्षा जे वंचित आहेत, त्यांना थोडे आर्थिक पाठबळ दिले तरी हा समाज आक्रोश करणार नाही.
याप्रसंगी व्यासपीठावर विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे, गृहमंत्री दिलीपजी वळसे पाटील, सार्वजनिक जयंती समारोह समितीचे अध्यक्ष गणेश हाके, मुरहरी केळे, हेमालया देवकाते, शशिकांत झोरे, नगरसेविका सुरेखा पाटील, शिवाजी शेंडगे, उज्वला हाके, डॉ. स्मिता काळे यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.