Home Blog Page 1940

राहुल गांधी सिद्धू मुसेवालाचे घरी,भेटले नातलगांना ..

0

चंदीगड-काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवारी मानसा येथे पोहोचले. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंग आणि आई चरण कौर यांना भेटून शोक व्यक्त केला.

यानंतर राहुल गांधींनी ट्विट केले की, मुसेवालाचे आई-वडील ज्या दु:खातून जात आहेत ते वर्णन करणे कठीण आहे. त्यांना न्याय देणे आमचे कर्तव्य असून आम्ही त्यांना न्याय देऊ. राहुल गांधी म्हणाले की, पंजाबची कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. पंजाबमध्ये शांतता राखणे हे आप सरकारच्या आवाक्याबाहेर आहे.

सिद्धू मुसेवाला यांची 29 मे रोजी संध्याकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.सिद्धू मुसेवाला पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वडिंग यांच्या जवळचे होते. मुसेवाला यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी मानसा मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती. मात्र, आम आदमी पक्षाचे डॉ.विजय सिंगला यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. यानंतर आप सरकारने त्यांची सुरक्षा कमी केली. दुसऱ्याच दिवशी मुसेवाला यांची हत्या झाली.पंजाबमध्ये या वर्षी फेब्रुवारीमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. आम आदमी पक्षाने 117 पैकी 92 जागा जिंकून सरकार स्थापन केले. येथील कायदा व सुव्यवस्थेच्या दुरवस्थेमुळे आता सरकार गोत्यात आले आहे. राज्याच्या गुप्तचर यंत्रणेच्या अपयशावर जनता आणि विरोधी पक्ष सवाल करत आहेत. धमकी मिळाल्यानंतरही मूसेवाला यांची सुरक्षा का काढून घेण्यात आली, असा सवालही केला जात आहे.

असुदुद्दीन ओवेसी यांनी दिलेली ऑफर काँग्रेसने स्वीकारली

मुंबई- एमआयएम प्रमुख असुदुद्दीन ओवेसी यांनी दिलेली ऑफर काँग्रेसने स्वीकारली असून, राज्यसभा निवडणुकीसाठी एमआयएमशी संवाद साधणार असल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. राज्यसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी आज मुंबईत काँग्रेसची बैठक होतेय. या बैठकीला काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे उपस्थित आहेत. या बैठकीपूर्वी पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला.राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आमच्याशी संपर्क केल्यास त्यांना मतदान करू, असे वक्तव्य एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. मात्र, अद्याप महाविकास आघाडीने आमच्याशी कोणताही संपर्क साधला नाही. महाराष्ट्रातील एमआयएमच्या आमदारांनाही मविआच्या नेत्यांकडून संपर्क साधण्यात आला नाही. आम्ही 2 दिवस त्यांची वाट पाहू, अशी भूमिका आज ओवेसी यांनी जाहीर केली.

ओवेसी यांच्या भूमिकेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आम्ही एमआयएमशी नक्कीच संवाद साधू. छोटे पक्ष आणि अपक्षांच्या आम्ही संपर्कात आहोत. आमचे सगळे उमेदवार हे विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवाय समाजवादी पक्षही आमच्यासोबत असल्याचे सांगायला ते विसरले नाहीत.पटोले म्हणाले, काँग्रेसच्या आमदारांना प्रशिक्षणाची काहीच गरज नाही. फक्त मतदानाची थोडी पद्धत सांगितली जाणार आहे. शिर्डीमध्ये आमचे दोन दिवसाचे अधिवेशन झाले. त्याचा शंभर दिवसांचा कार्यक्रम आम्ही तयार केला आहे. काँग्रेस विचारधारेची चळवळ महाराष्ट्रात उभी करायची आहे. त्यावर आम्हाला चर्चा करायची आहे. दरम्यान, काँग्रेसचे सर्व आमदार हे पटोलेंच्या निवासस्थानी थांबणार असल्याचे समजते.राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये यासाठी महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष खबरदारी घेताना पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक घेणार आहेत. ट्रायडेंट हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून सध्या मतांची जुळवाजुळव सुरू आहे. त्यापाठोपाठ काँग्रेस आमदारांना देखील बॅग भरून मुंबई येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काँग्रेसने इम्रान प्रतापगडींना उमेदवारी दिली आहे.विधान परिषदेबाबत काँग्रेस उद्या निर्णय घेण्यात येणार, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. आज शिवसेनेच्या वतीने दोन उमेदवारांच्या नावाची चर्चा सुरू झाली असून राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसेंच्या नावाची चर्चा सुरू आहे.

असदुद्दीन ओवेसींची खुली ऑफर,महाविकास आघाडीने संपर्क साधल्यास मदत करू

हैदराबाद- महाविकास आघाडीने आमच्याशी संपर्क केल्यास त्यांना राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करू, असे वक्तव्य एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. मात्र, अद्याप महाविकास आघाडीने आमच्याशी कोणताही संपर्क साधलेला नाही. महाराष्ट्रातील एमआयएमच्या आमदारांनाही मविआच्या नेत्यांकडून संपर्क साधण्यात आलेला नाही. आम्ही 2 दिवस त्यांची वाट पाहू, अशी भूमिका आज ओवेसी यांनी जाहीर केली.येत्या 10 जूनला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीनिमित्त राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भाजप व शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यात आता एमआयएमने एंट्री केली आहे. आज पत्रकारांशी संवाद साधताना ओवेसी म्हणाले, राज्यसभेसाठी 10 तारखेला निवडणूक होत आहे. त्यामुळे आम्ही आणखी 2 दिवस मविआकडून काही प्रतिसाद मिळतो का, याची वाट पाहू. त्यानंतर आम्ही निवडणुकीबाबत निर्णय घेऊ, असे ओवेसी यांनी सांगितले.

राज्यसभा निवडणुकीत आपले उमेदवार जिंकून आणण्यासाठी मविआला आमची गरज आहे. त्यामुळे मविआच्या नेत्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ओवेसी यांनी केले. तसेच, मविआला पाठिंबा देण्याबाबत महाराष्ट्रातील नेत्यांशीही बोलणे झाले आहे. राज्यात धुळे आणि मालेगाव येथे एमआयएमचे 2 आमदार आहेत. या 2 आमदारांनी कोणाला पाठिंबा द्यायचा, याचा निर्णय आपण 2 दिवसानंतर घेणार असल्याचे ओवेसी यांनी सांगितले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादला 8 जूनला जाहीर सभा होत आहे. त्यावर ओवेसी म्हणाले, लोकशाहीत प्रत्येकाला सभा घेण्याचे स्वातंत्र्य असते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सभेवर आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही. मीदेखील लवकरच औरंगाबादला जाहीर सभा घेऊन जनतेशी संवाद साधणार आहे.

पुणे महानगरपालिकेस माझी वसुंधरा पुरस्कार

पुणे-पुणे महानगरपालिकेस माझी वसुंधरा पुरस्कार राज्य सरकारच्या वतीने नुकताच देण्यात आला.जागतिक पर्यावरण दिननिमित्त माझी वसुंधरा अभियान, महाराष्ट्र शासन अंतर्गत ५ जून २०२२ रोजी मुंबई येथे पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रम प्रसंगी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  उपमुख्यमंत्री अजित पवार,  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,  पर्यटन व राजशिष्ठाचार तथा पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे
व इतर मान्यवर उपस्थित होते.पंचतत्वांचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेल्या माझी वसुंधरा अभियान २.०, २०२१-२२ स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध महानगरपालिका, नगर पालिका, ग्रामपंचायतीनी सहभाग घेतला होता. विविध गटांपैकी अमृत शहरे या गटामध्ये राज्यस्तरावर
पुणे महानगरपालिकेस तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले.  महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र स्वीकारले.या प्रसंगी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन केलेल्या EV (इलेक्ट्रिक व्हेकल) सेल साठी विशेष ओळख म्हणून पुणे शहराला  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडून सन्मानित करण्यात आले. पुणे शहर हे EV  सेल स्थापन करणारे भारतातील पहिले शहर आहे. महाराष्ट्र राज्याची EV  पोलिसीचे उद्दिष्टे साधण्यासाठी व शहरामध्ये इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याच्या हेतूने EV  प्रयत्नशील आहे. सन २०२१ मध्ये पुणे शहरात ६२०५ इतकी वाहने नोंदविली गेली, तसेच जानेवारी २०२२ पासून मे २०२२ पर्यंत ५ महिन्याच्या कालावधीतच पुणे शहरात ८०५३ इतकी वाहने नोंदविली गेली. पुणे शहराच्या या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन भारतातील इतर शहरे सुद्धा EV  सेल स्थापन करण्यास उत्सुक आहेत.

लाल महालात स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज यांचा पुतळा बसवावा – संभाजी ब्रिगेड

पुणे-लाल महालातील राष्ट्रमाता जिजाऊ व बाल शिवबा यांच्या समूहशिल्पा मध्ये स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज यांचा पुतळा बसवला गेला पाहिजे. पुणे महानगरपालिकेला संभाजी ब्रिगेडच्या वतीने गेली दहा-बारा वर्षं झाली मागणी करून सुद्धा जाणीवपूर्वक सूडबुद्धीने शहाजी महाराज यांचा पुतळा बसवला जात नाही. पूर्वी राष्ट्रवादीची सत्ता असताना आणि आत्ता भाजपची सत्ता असताना सुद्धा वारंवार मागणी करून सुद्धा लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा फक्त मतांसाठी वापर करून त्यांच्या विचारांचा मात्र जागर करत नाहीत. महापौर आणि खासदार यांच्या पुढच्या राजकारणामुळे लाल महालात स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांचा पुतळा बसवला गेला नाही. ही शिवप्रेमी म्हणून फार मोठी खंत आहे. महापालिका आयुक्त यांनी पुतळ्याच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन लालमहालात स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज यांचा पुतळा बसवावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे.

ते म्हणाले,’ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 348 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त लाल महाल येथे संभाजी ब्रिगेड पुणे शहराच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. पाच नद्यांचे पाणी आणून छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा करण्यात आला. माजी उपमहापौर दिपक मानकर, शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर, माजी जिल्हाधिकारी प्रभाकर देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.

कोथरूड मध्ये शिवसृष्टी होणार होती. मात्र स्थानिक भागातील घाणेरडे राजकारणामुळे कोथरूड येथील ऐतिहासिक शिवसृष्टी चांदणी चौक मध्ये हलवण्यात आली. हे घाणेरडे राजकारण पुण्यात करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेणारे शिवाजी महाराजांच्या विचारांशी मात्र गद्दारी करत आहे, हे सहन होणार नाही. शिवसृष्टी चे काम का थांबवले गेले ते तात्काळ सुरू करावे.अशीही मागणी यावेळी करण्यात आली .

सौ. अप्सरी कासीम शेख संभाजी ब्रिगेड महिला आघाडी विभाग अध्यक्ष येरवडा,संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत धुमाळ, महानगर अध्यक्ष अविनाश मोहिते, उपाध्यक्ष ज्योतिबा नरवडे, सचिव संदीप कारेकर, सिद्धार्थ कोंढाळकर, कुमार पवार, अविनाश घोडके, कीर्तिकुमार घोरपडे, राजेश आडसूळ, शंकर तात्या कुटे, सौ. अप्सरी कासीम शेख, जनता वसाहत चे अध्यक्ष मनपल्ली सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

सनी निम्हण आयोजीत शिबिरात ८०९ रक्तदात्यांनी केले रक्तदान

सोमेश्वरवाडी :

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून माजी नगरसेवक सनी उर्फ चंद्रशेखर विनायक निम्हण यांच्या संकल्पनेतून सोमेश्वर देवस्थान सोमेश्वरवाडी पाषाण, विठ्ठल सेवा मंडळ सोमेश्वरवाडी(एक गाव एक गणपती) यांच्या वतीने श्री शिवशंभु चारिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास विक्रमी ८०९ रक्तदात्यांनी उस्फुर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.

कार्यक्रमाची माहिती देताना माजी नगरसेवक सनी निम्हण म्हणाले की, आम्ही केलेल्या आवाहनाला परिसरातील युवकांनी नागरिकांनी आणि महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद देत रक्तदान केले हे फार आनंददायी आहे. परिसरातील तरुणांनी समाजाचे ऋण फेडण्यासाठी, निरोगी समाजासाठी, शिवविचारांना जागत, मोठ्या प्रमाणात सर्वांनी येऊन रक्तदान केले त्याबद्दल मी रक्तदात्यांचा आभारी आहे. येणाऱ्या पुढील काळात देखील वेगवेगळ्या समाजोपयोगी कार्यक्रम आपण राबविणार आहोत त्यास देखील आपण असाच उदंड प्रतिसाद देत रहाल असा विश्वास आहे.

यावेळी सोमेश्वर देवस्थान विश्वस्त पोपटराव जाधव, कै. बाळोबा सुतार दिंडी अध्यक्ष खंडू अरगडे, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, औंध गाव विश्वस्त मंडळ अध्यक्ष योगेश जुनवणे, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, राहुल कोकाटे, प्रल्हाद सायकर, प्रकाश बालवडकर, RPI चे रमेश ठोसर, संजय निम्हण, संजय बालवडकर, गोविंद रणपिसे, मोरेश्वर बालवडकर, बालम सुतार, योगेश सुतार, रुपेश जुनवणे, मुन्ना शिंदे, सुप्रीम चोंधे, आणि परिसरातील सांप्रदायिक क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जून उपस्थित राहून रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले.

या रक्तदान शिबिराचे आयोजन माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण, सोमेश्वर देवस्थान सोमेश्वरवाडी पाषाण, विठ्ठल सेवा मंडळ सोमेश्वरवाडी(एक गाव एक गणपती) यांनी केले होते.

पालखी सोहळ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घ्या – विशाल धनवडे

पुणे- पावसाळा,कोरोना, आणि त्यानंतर आता तिसऱ्या वर्षी होऊ घातलेला संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यासाठी महापालिका हद्दीतील संपूर्ण पालखी मार्ग आणि आजूबाजूच्या परिसरातील अवस्था याबाबत अडीअडचणी ,समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने निर्णय घेऊन कार्यवाही होण्यासाठी अगोदर एक सर्वपक्षीय बैठक महापालिका प्रशासनाने घेऊन नियोजन करावे अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी येथे केली आहे.

सोहळ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी मंडप व्यवस्था, पालखी मार्गांवरील रस्त्यांची झालेली दुरावस्था , वृक्ष छाटणी , तसेच पालखी सोहळ्याच्या दिवशी 24 तास पाणी मिळावे याकरिता पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन दिले. यावेळी माजी नगरसेवक विशाल धनवडे, गजानन पंडित, विभाग प्रमुख चंदन साळुंके, स्वातीताई कथलकर, भाऊ शिंदे, योगेश खेंगरे , अनिकेत थोरात , अनिल ठोंबरे, सनी मुसळे यादी शिवसैनिक उपस्थित होते.

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

पुणे दि.6: साखर आयुक्त शेखर गायकवाड व सहसंचालक मंगेश तिटकारे लिखीत एफआरपी महितीपुस्तिका व साखर उद्योगातून इथेनॉल निर्मिती व त्याचा एफआरपी वर परिणाम या पुस्तकांच्या सुधारित दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन ज्येष्ठ नेते खासदार शदर पवार यांच्या हस्ते झाले.

वसंतदादा साखर इन्स्टिट्युट येथे आयोजित साखर परिषद-२०२२ कार्यक्रमात ऊसतज्ज्ञ डॉ. मधुकर पाटील यांच्या ‘रसराज’ पुस्तकाचेही प्रकाशन श्री. पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

काश्मिरी पंडीतांवर हल्ले:गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा -शिवसेनेचे पुण्यात आंदोलन

पुणे-महाराष्ट्र सरकारने काश्मीरमधील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात शैक्षणिक सोयीसुविधा निर्माण करून त्यांना सुरक्षितता देण्याचे जाहीर केले आहे, मात्र काश्मिरी पंडीतांवर जेव्हा जेव्हा हल्ले होतात तेव्हा तेव्हा भाजप बैठकांशिवाय काहीच करत नाही, आता बैठका खुप झाल्या कारवाईची धमक दाखवणे गरजेचे आहे. यासाठी शिवसेना पुणे शहराच्यावतीने काश्मीर पंडितावर झालेल्या हल्ल्याचा जाहिर निषेध करून, गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी घेऊन येथे शिवसेनेने आंदोलन केले.
या आंदोलनात शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, महिला शहर संघटीका संगीता ठोसर, पल्लवी जावळे, उपशहरप्रमुख प्रशांत राणे, बाळासाहेब मालुसरे, भरत कुंभारकर, आनंद गोयल, किशोर रजपूत, राजेंद्र शिंदे, नंदू घाटे, राजेश मोरे, नंदू येवले, संतोष गोपाळ, उमेश वाघ, मकरंद पेठकर, दिलीप पोमण, नितीन शिंदे, संतोष तोंडे, रुपेश पवार, नितीन रावळेकर, राम थरकुडे, युवराज पारीख, गौरव पापळ, परेश खांडके, रमेश क्षीरसागर, आकाश पहिलवान, अतुल दिघे, संदीप गायकवाड, अर्जुन जानगवळी, बाळासाहेब गरुड, अजय शिंदे, अनंत घरत, राहुल जेकटे, अमर मारटकर, नितीन पवार, राहुल आलमखाने, पराग थोरात, संजय वाल्हेकर, शैलेश मोरे, प्रसाद गिजरे, अनिल माझिरे, बकुळ डाखवे, विकी धोत्रे, मुकुंद चव्हाण, संतोष भुतकर, आकाश रेनुसे, विलास कथलकर, राजेश वाल्हेकर, छाया भोसले, विद्या होडे, अनिता परदेशी, स्वाती कथलकर, भावना थोरात, करुणा घाडगे, गौरी चव्हाण, संगिता भिलारे, अनुपमा मांगडे, ज्योती पवार उपस्थित होते

यावेळी संजय मोरे म्काहणाले,’काश्मिर खोऱ्यात पुन्हा काश्मिरी हिंदू पंडितांवर हल्ले होऊन सलग हत्यासत्र सुरू झाले आहे. ज्ञानवापी मशिद, ताजमहालाखालचे शिवलिंग शोधणारे, रस्त्यावर हनुमान चालिसा पठण करून महागाई आणि काश्मीर हत्या विषयावरून जनतेचे लक्ष विचलित करू पाहणारे सर्व नवहिंदुत्ववादी कश्मीरातील हिंदूंच्या हत्या आंधळे बहिरे बनुन पहात आहेत. अशावेळी पंडितांच्या समर्थनासाठी महाराष्ट्रातूनच गर्जना झाली आहे, काश्मिरी पंडितांना महाराष्ट्र आधार देईल, काय हवं ते करेल असा 56 इंच छातीचा दिलदारपणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवून महाराष्ट्र हा आधार या भारताचा आणि हिंदुचा हेच सिद्ध केले काश्मिरी प्रजा तळमळत आहे, आणि राजा सत्तेचा आठवा उत्सव साजरा करीत आहे. महाराष्ट्राने पंडितांच्या आधारासाठी बाहू पसरले आहेत, शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची हीच परंपरा आहे…

मराठी भाषा भवन मराठीला जागतिक दर्जा मिळवून देईल : विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0

मराठी भाषेच्या नियोजन कार्यशाळेत व्यंगचित्र, ग्राफिटी आणि काव्य या विषयांच्या विशेष विभागाची केली सुचना

मुंबई विद्यापीठ, राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग याबाबत हे काम करीत आहे ते अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे मराठी प्रेमींना एक जिव्हाळ्याच्या विषयावरचे काम मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मराठी भाषा विभाग मंत्री ना. सुभाष देसाई यांच्या पुढाकाराने होत आहे ही एक अत्यंत भावनिक आणि मनाला भिडणारी बाब आहे.

मराठी भाषा भवन उभे राहत असतानाच राज्यात मराठी भाषेच्या विकासाचे काम होत असतानाच पद्य कविता, ग्राफिटी यांच्यासोबत व्यंगचित्र या महत्त्वाच्या कला प्रकाराची निर्मिती व त्याबाबतच्या प्रक्रिया याबाबतचे संहितीकरण भाषेच्या अभ्यासासाठी आवश्यक आहे. या माध्यमातून अनेक मराठी साहित्यिक महत्त्वाच्या पैलूबाबत चिंतन व अभ्यास होईल.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्र बाबत विशेष योगदान होते. या अनुषंगाने गेल्या काही वर्षांत या विषयात उल्लेखनीय काम केलेल्या अनेक व्यंगचित्रकारांच्या अभिव्यक्तिला त्यात स्थान असावे, असे आवाहन आज डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

मराठी भाषेच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व काम करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी काम करणार आहे. या कामासाठी निधीची कमतरता पाडणार नाही, असे यावेळी मराठी भाषा विभाग मंत्री ना. श्री. सुभाष देसाई यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित मान्यवर साहित्यिकांना मराठी शब्दकोश पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. नीलम गोऱ्हे यांचा मराठी भाषा विभागाचे मंत्री महोदय ना. सुभाष देसाई यांनी हे पुस्तक देऊन विशेष सत्कार केला. या कार्यशाळेत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गणेश देवी, प्रा. रंगनाथ पठारे, डॉ. हरी नरके, डॉ. राजा दीक्षित, डॉ. सदानंद मोरे, डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, डॉ.रेणुका ओझरकर, श्री. भूपाल रामनाथकर, भाषा संग्रहालयाचे संचालक श्री. सव्यासाची मुखर्जी, अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गाग राणी, सहसचिव मिलिंद गवादे, संजय पाटील, विशेष कार्य अधिकारी सुचित्रा देशपांडे, प्रदीप ठाकरे आदी उपस्थित होते.

भारतीय रेल्वेने आयआरसीटीसीचे संकेतस्थळ तसेच ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन आरक्षण केल्या जाणाऱ्या तिकिटांची मर्यादा वाढविली

0

नवी दिल्ली, 6 जून 2022

रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने ऑनलाईन पद्धतीने आरक्षण  केल्या जाणाऱ्या तिकिटांची  संख्या वाढवली आहे. आधार क्रमांकाशी संलग्न नसलेल्या वापरकर्त्या आयडीद्वारे याआधी एका महिन्यात जास्तीतजास्त 6 तिकिटे काढता येत होती मात्र नव्या नियमानुसार, ही मर्यादा 12 तिकिटांपर्यंत वाढविण्यात आली आहे. आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या वापरकर्त्या आयडीद्वारे आता एका महिन्यात 12 ऐवजी 24 तिकिटे काढता येऊ शकतील. अर्थात या तिकिटांचे  आरक्षण  करणाऱ्या प्रवाशांपैकी कोणत्याही एका प्रवाशाच्या तिकीटाची आधार क्रमांकद्वारे  पडताळणी केली जाईल असे रेल्वेने म्हटले  आहे.

सध्या रेल्वे विभागाचे आयआरसीटीसी संकेतस्थळ तसेच ॲप यांचा वापर करून आधार क्रमांकाशी संलग्न नसलेल्या वापरकर्त्या आयडीद्वारे एका महिन्यात जास्तीतजास्त 6 तिकिटे काढता येतात आणि आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या वापरकर्त्या आयडीद्वारे एका महिन्यात जास्तीतजास्त 12 तिकिटे काढता येतात आणि यातील कोणत्याही एका प्रवाशाच्या तिकीटाची आधार क्रमांक वापरून पडताळणी केली जाते.

महसुलातील तूट भरून काढण्यासाठी 14 राज्यांना 7,183 कोटी 42 लाख रुपयांचे अनुदान वितरीत

0

वर्ष 2022-23 मध्ये महसुलातील तूट भरून काढण्यासाठी राज्यांना एकूण 86,201 कोटी रुपयांचे अनुदान

नवी दिल्ली, 6 जून 2022

वित्त मंत्रालयाच्या व्यय विभागाने आज 14  राज्यांना 7,183 कोटी 42 लाख कोटी रुपयांचा पोस्ट डिव्होल्यूशन रेव्हेन्यू डेफिसिट (PDRD) अनुदानाचा तिसरा मासिक हप्ता वितरीत केला आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार हे अनुदान देण्यात आले आहे.

पंधराव्या वित्त आयोगाने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 14 राज्यांना एकूण 86,201 कोटी  पोस्ट डिव्हॉल्यूशन रेव्हेन्यू डेफिसिट ग्रँटची शिफारस केली आहे. शिफारस केलेले अनुदान शिफारस केलेल्या राज्यांना व्यय विभागाकडून 12 समान मासिक हप्त्यांमध्ये जारी केले जाते. जून, 2022 महिन्यासाठी 3 रा हप्ता वितरीत केल्यामुळे, 2022-23 मध्ये राज्यांना जारी करण्यात आलेल्या महसूल तूट अनुदानाची एकूण रक्कम रु. 21हजार 550 कोटी 25 लाख इतकी आहे.

राज्यघटनेच्या कलम 275 नुसार राज्यांना विकासोत्तर महसूल तूट अनुदान दिले जाते. हस्तांतरणानंतर राज्यांच्या महसूल खात्यातील तफावत भरून काढण्यासाठी वित्त आयोगांच्या शिफारशींनुसार राज्यांना लागोपाठ अनुदान जारी केले जाते.

हे अनुदान मिळण्यासाठी राज्यांची पात्रता आणि 2020-21 ते 2025-26 या कालावधीसाठी अनुदानाचे प्रमाण हे पंधराव्या आयोगाने राज्याच्या महसूल आणि खर्चाच्या मूल्यांकनातील तफावतीच्या आधारे निश्चित केले होते. या काळात.

2022-23 या कालावधीत पंधराव्या वित्त आयोगाने ज्या राज्यांना विकासोत्तर महसूल तूट अनुदानाची शिफारस केली आहे ती पुढीलप्रमाणे आहेत: आंध्र प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, केरळ, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल.

2022-23 साठी शिफारस केलेल्या डिव्हॉल्यूशन रेव्हेन्यू डेफिसिट ग्रँटचा राज्यवार तपशील आणि राज्यांना तिसरा हप्ता म्हणून जारी केलेली रक्कम खालीलप्रमाणे आहे:

(Rs in crore)

S. No.Name of StatePDRDG recommended by FC-XV for the year 2022-23.Amount of 3rd instalment released for the month of June, 2022.Total PDRDG released to States during 2022-23.
1Andhra Pradesh10,549879.082637.25
2Assam4,890407.501222.50
3Himachal Pradesh9,377781.422344.25
4Kerala13,1741097.833293.50
5Manipur2,310192.50577.50
6Meghalaya1,03386.08258.25
7Mizoram1,615134.58403.75
8Nagaland4,530377.501132.50
9Punjab8,274689.502068.50
10Rajasthan4,862405.171215.50
11Sikkim44036.67110.00
12Tripura4,423368.581105.75
13Uttarakhand7,137594.751784.25
14West Bengal13,5871132.253396.75

तीनही वीज कंपन्यांसमोर आर्थिक स्थिती सुधारण्यांचे आव्हान – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

0

मुंबई, दि. ६ जून २०२२: ऊर्जा ही प्रगतीचे इंजिन आहे. या इंजिनाला गती व इंधन देण्याचे आव्हान वीज कंपनीचे कर्मचारी निश्चितपणे पार पाडतील असा विश्वास राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज व्यक्त केला. महावितरणच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई येथील महावितरणच्या प्रकाशगड मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. 

६ जून हा जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन. या दिवशी मराठी मातीत उगविलेल्या स्वराज्याच्या सुर्याने राज्याला व देशाला हजारो वर्ष पुरेल अशी ऊर्जा निर्माण केली आहे. त्याच दिवशी महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या कंपन्यांचा स्थापना दिन. ऊर्जेचा संबंध थेट प्रगतीशी असल्याने ऊर्जेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे, या तीनही कंपन्यांसमोर आज “आर्थिक आरोग्य” सुधारणे, वीज पुरवठ्याची सरासरी किंमत कमी करणे, कृषी ग्राहकांना दिवसा वीजपुरवठा करणे, शाश्वत आधारावर वाजवी दरात दर्जेदार वीज उपलब्ध करून देणे, कोळसा संकटावर कायमस्वरूपी तोडगा काढणे, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांच्या क्रॉस सबसिडीचा भार कमी करून त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यास सक्षम करणे, नूतनीकरणक्षम ऊर्जेचे प्रमाण वाढवणे जेणेकरुन कार्बन फूट प्रिंट मोठ्या प्रमाणात कमी केली तरच  या कंपन्या चांगली कामगिरी करू शकतील आणि राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करू शकतील.  

लवकरच बसविण्यात येणारे स्मार्ट मीटर हे प्राधान्याने प्री-पेड आणि पोस्टपेड असतील. स्मार्ट मीटरच्या वापरामुळे वीज उपकंपन्यांची आर्थिक व्यवहार्यता सुनिश्चित होईल,अशी अपेक्षा आहे. स्मार्ट मीटरमुळे मनुष्यबळावरील खर्चही कमी होण्यास मदत होईल, असे नियोजन असल्याची माहिती डॉ राऊत यांनी दिली. अलिकडच्या काळात प्रभावी कोळसा व्यवस्थापनाच्या माध्यमातून उत्पादन खर्च 30 ते 40 पैसे प्रति युनिटने कमी झाला आहे. महानिर्मिती वीज निर्मितीच्या विविध पर्यायांबाबत लवचिक भूमिका घेत आहोत.

शेतकरी हा सरकारचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे त्याला २४ तास वीज पुरवठा व सामान्यांना स्वस्त व गुणवत्तापूर्ण वीज पुरवठा करण्याला प्राधान्य दिल्या जात आहे. कृषी पंप धोरणांतर्गत राज्यातील शेतक-यांचा एक तृतियांश थकबाकी माफी करण्याचे ऐतिहासिक काम केले असून नियम व निकषांनुसार सर्व शेतक-यांनी या योजनेचा लाभ घेतला तर या शेतक-यांना सुमारे ३० हजार कोटींच्या वीज बिल माफी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यात इतर गुंतवणूक दार मोठया प्रमाणात यावेत, त्यांनी गुंतवणूक करावी व इथल्या स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी विभाग कटीबद्ध आहे. स्वितर्झलॅण्ड येथील परिषदेत सहभागी होत ५४ हजार कोटींची गुंतवणूक ऊर्जा क्षेत्रासाठी आणली आहे. यातील ४ हजार कोटी हे केवळ विर्दभासाठी असणार आहेत. अपारंपारीक ऊर्जा हे नवीन उद्योजकांसाठी मोठे दालन म्हणून उपलब्ध होणार आहे. थोडक्यात देशी परदेशी गुंतवणूक दारांना जास्तीच जास्त सोई सुविधा देण्यासाठी ऊर्जा विभाग सिध्द असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील उद्योगजकांनी इतर राज्यांबरोबर स्पर्धात्मक राहण्यासाठी त्यांना वाजवी वीज दर व इतर सोई सुविधा देण्यासाठी कटीबध्द असल्याची ग्वाही देत डॉ. नितीन राऊत यांनी व्यवसायीक, औदयोगिक, घरगुती व कृषी वीज पंप ग्राहकांना तसेच उद्योगांना इतर राज्यांपेक्षा स्वस्त व गुणवत्तापूर्ण वीज मिळावी यासाठी आपण प्रयत्नरत असल्याचे सांगितले.

याप्रसंगी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री विजय सिंघल, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री संजय खंदारे यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी महावितरण व महानिर्मितीचे सर्व संचालक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महावितरणचे अस्तित्व टिकवणे ग्राहक-कर्मचाऱ्यांच्या हातात

0

मुंबई : दिनांक ०६ जून २०२२;- ‘महावितरण हे देश पातळीवर अनेक राज्यांच्या तुलनेत सक्षमच आहे. ग्राहकांनी घेतलेल्या सेवेचे मुल्य दिले पाहिजे तरच कोणताही व्यवसाय टिकू शकतो. सरकारी कंपन्याही यास अपवाद नाहीत. मात्र दुर्दैवाने भारतीय समाजास जात धर्म, प्रदेश आदी बाबी कळतात मात्र ऊर्जा क्षेत्राचे महत्व कळत नाही. त्यामुळेच महावितरणची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा स्थितीत कंपनीचे खाजगीकरण टाळायचे असेल तर महावितरणमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कामाच्या गुणवत्तेत वाढ केली पाहिजे तसेच वीज बिलाची वसूली केली पाहिजे. ग्राहकांनीही वेळेत बिल भरले पाहिजे. अन्यथा महावितरणचे खाजगीकरण टाळणे अशक्य आहे,’ असे मत ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले.

            महावितरणच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त प्रकाशगड येथील सभागृहात आयोजित ‘विद्युत क्षेत्रातील सद्यस्थिती व आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल होते. याप्रसंगी संचालक(वित्त) रवींद्र सावंत, संचालक(संचालन) संजय ताकसांडे, संचालक(प्रकल्प) प्रसाद रेशमे, संचालक(वाणिज्य) डॉ.मुरहरी केळे व संचालक (मानव संसाधन) डॉ.नरेश गीते यांची प्रमुख उपस्थिती होती.

            कुबेर पुढे म्हणाले, ‘जगातिक स्तरावर कोणत्याही देशाची विकासाची दिशा व वेग हे ऊर्जा क्षेत्र घडवत असते. नागरिकांना मागेल तेवढी ऊर्जा उपलब्ध असली पाहिजे, हेच प्रगतीचे लक्षण आहे. भविष्यातील विजेच्या गरजेचे नियोजन करताना मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. राज्याच्या बाबतीत विचार करता लोकांनी बिले न भरल्यास व भूमिका न घेतल्यास लोकांच्या मालकीची असलेली कोणतीच सरकारी कंपनी अस्तित्वात राहणार नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कठोर भूमिका घेऊन वसुली केली पाहिजे, याला कोणताच दुसरा पर्याय नाही. राजकीय भूमिकेतून ग्राहकांकडून वीजबिल वसुलीस विरोध असल्यास सरकारने आपल्या निधीतून महावितरणला पैसे उपलब्ध करून द्यावेत.’

            अध्यक्षीय भाषणात विजय सिंघल म्हणाले, ‘कोरोना काळात आणि त्या नंतर सर्वच कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. मात्र आपल्या समोरील आव्हाने अजून संपली नाहीत. अजून व्यावसाईक पद्धतीने काम करावे लागेल. थकीत वीजबिल वसूल करणे, वीजहानी कमी करणे आदी बाबींवर काम करावे लागेल. क्षेत्रीय स्तरावर कार्यरत प्रत्येक कर्मचाऱ्याने अजून प्रयत्न वाढवल्यास हे कामही अवघड नाही.’

            या कार्यक्रमास प्रकाशगड येथील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपली उपस्थिती लावली होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली निमजे यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक(प्रकल्प) प्रसाद रेशमे यांनी मानले. तत्पूर्वी वर्धापन दिनानिमित्त प्रकाशगड इमारतीच्या परिसरात मानवी शृंखला करण्यात आली.

कोलते-पाटील डेव्हलपर्स आणि टाटा पॉवर यांची भागीदारी इलेक्ट्रिक वाहन वापर सुविधाजनक बनवून पर्यावरण पूरक विकासाला चालना देणार

पुणेमुंबई आणि बंगलोरमधील सर्व कोलते-पाटील प्रकल्पांमध्ये इव्ही चार्जिंगच्या पायाभूत सोयीसुविधा पुरवल्या जाणार 

पुणे ६ जून, २०२२:  इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सेवासुविधा पुरवणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी टाटा पॉवरने पुणे-स्थित आणि मुंबई व बंगलोरमध्ये देखील वेगवान आगेकूच करत असलेले, आघाडीचे स्थावर मालमत्ता विकासक कोलते-पाटील डेव्हलपर्ससोबत (केपीडीएल) भागीदारी केली आहे.  पुणे, मुंबई आणि बंगलोर या शहरांमधील सर्व कोलते-पाटील प्रकल्पांमध्ये इलेक्ट्रिक वाहन वापरणाऱ्यांना चार्जिंगच्या सर्वसमावेशक सुविधा पुरवण्यासाठी चार्जिंग स्टेशन्स सेट अप करण्यासाठी टाटा पॉवरसोबत भागीदारी करण्यात आली आहे.

शहरी भागांमध्ये वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या हवामान बदलाच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी हरित, पर्यावरणपूरक वाहतुकीच्या उपाययोजनांमध्ये इलेक्ट्रिक वाहने आणि चार्जिंगच्या पायाभूत सोयीसुविधा महत्त्वाची भूमिका बजावतात. इव्ही चार्जिंगच्या अखंडित सुविधा पुरवण्यात कौशल्य आणि आजवर बजावलेली यशस्वी कामगिरी यांच्या बळावर टाटा पॉवर कोलते-पाटील डेव्हलपर्सच्या निवासी ग्राहकांना श्रेणीतील सर्वोत्कृष्ट इव्ही चार्जिंग सुविधा प्रदान करेल. यामुळे त्यांची इ-मोबिलिटी अधिक सुविधाजनक बनेल शिवाय त्यांना एकसमान, सर्वव्यापी इव्ही चार्जिंग अनुभव मिळवता येईल.

आपल्या ग्राहकांना सर्वसमावेशक चार्जिंग सुविधा पुरवण्यात टाटा पॉवर आघाडीवर आहे, यामध्ये चार्जर्सची मालकी, उभारणी, देखभाल आणि अपग्रेडेशन यांचा समावेश आहे.  टाटा पॉवर आणि कोलते-पाटील डेव्हलपर्स यांच्या भागीदारीमुळे केपीडीएलच्या सर्व प्रकल्पांमधील इव्ही मालकांना त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग करून घेण्याची सुविधा २४X७ उपलब्ध राहील, तसेच टाटा पॉवरच्या ईझेड चार्ज मोबाईल ऍपमार्फत मॉनिटरिंग आणि इ-पेमेंट सुविधांचा देखील त्यांना लाभ घेता येईल.

टाटा पॉवर ही इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधा प्रदान करणारी भारतातील आघाडीची कंपनी आहे.  त्यांनी १५०० पेक्षा जास्त सार्वजनिक व अर्ध-सार्वजनिक इव्ही चार्जर इन्स्टॉल केले असून अजून ५५० पेक्षा जास्त चार्जर्सचे काम उभारणीच्या विविध टप्प्यांवर सुरु आहे. कंपनीने संपूर्ण भारतभरात १३००० पेक्षा जास्त होम चार्जर्स (खाजगी वापरासाठी) आणि २०० पेक्षा जास्त बस चार्जिंग पॉईंट्सचे नेटवर्क निर्माण केले आहे.

टाटा पॉवरच्या ईझेड चार्ज मोबाईल ऍप्लिकेशनमुळे युजर्सना इव्ही चार्जिंग स्टेशन्स कुठे आहेत ते शोधता येते, स्लॉट्सचे प्री-बुकिंग करता येते, वाहनाचे चार्जिंग, मॉनिटरिंग, इ-पेमेंट इत्यादी सुविधा मिळतात.  ग्राहकांच्या आवश्यकता आणि सोयीनुसार दिल्या जाणाऱ्या इव्ही चार्जिंग सुविधा सातत्याने वाढत असलेल्या इव्ही इकोसिस्टिमसाठी पायाभूत संरचनेचा कणा आहेत आणि त्यामुळे ग्राहकांना ऊर्जा बचतीच्या पर्यायांचा सुलभपणे वापर करता येतो.

टाटा पॉवरचे न्यू बिझनेस सर्व्हिसेसचे चीफ श्री. गुरिंदर सिंग संधू म्हणाले, महामार्गांवरनिवासी व व्यापारी संकुलांमध्ये चार्जिंग स्टेशन्स उभारून टाटा पॉवर भारतामध्ये घडून येत असलेल्या इ-मोबिलिटी परिवर्तनाचे नेतृत्व करत आहे. इव्ही चार्जिंग क्षेत्रात आमच्याकडे असलेल्या तांत्रिक नैपुण्याचे बळ आणि देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये कोलते-पाटील डेव्हलपर्सची प्रचंड मोठी ग्राहकसंख्या यांचा मिलाप झाल्याने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याचे प्रमाण वेगाने वाढेल यात काहीच शंका नाही.”

यावर प्रतिक्रिया देताना कोलते-पाटील डेव्हलपर्सचे ग्रुप सीईओ श्री. राहुल तलेले म्हणाले, “टाटा पॉवरसोबत ही भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. पर्यावरणसमाजप्रशासन (ईएसजी) आणि ग्राहक-केंद्री दृष्टिकोन या गोष्टी आमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत. कोलते-पाटील डेव्हलपर्स पर्यावरणस्नेही वास्तू उभारतातज्यांची रचना व अंमलबजावणी आजच्यासाठी सर्वोत्तम आणि भविष्यासाठी सज्ज आहे. टाटा पॉवरसोबत भागीदारीमुळे आम्ही आमच्या प्रकल्पांमधील रहिवाशांची जीवन गुणवत्ता स्मार्ट व पर्यावरणपूरक पद्धतीने अधिक जास्त सुधारू शकणार आहोत.”

येत्या भविष्यकाळात निवासी आणि व्यापारी संकुलांसाठी अत्यावश्यक सुविधा बनण्याची क्षमता इव्ही चार्जिंग स्टेशन्समध्ये आहे.  त्यांच्या या मागण्या वेळेत पूर्ण करण्याची क्षमता टाटा पॉवरमध्ये असून सरकारच्या नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लॅनला अनुसरून आवश्यक पायाभूत सुविधा पुरवून टाटा पॉवर खाजगी व सार्वजनिक वाहनांच्या इलेक्ट्रिफिकेशनला साहाय्य प्रदान करत आहे.